Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आपत्ती कक्षांचा तात्काळ समन्वय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका अग्निशमन विभाग, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि लष्कर विभागांशी तातडीने संपर्क साधत प्रशासकीय यंत्रणेने आपल्या गतिमानतेचा प्रत्यय दिला. यातून घटनेची वरिष्ठांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती देण्यात येऊन संबंधितांना मदत उपलब्ध करून देणे शक्य झाले.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे फायर ऑफिसर गायकवाड यांना बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास निफाड तालुक्यातील स्थानिक ग्रामस्थांकडून विमानाच्या दुर्घटनेबाबतची फोनद्वारे माहिती मिळाली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला दुर्घटनेबाबत कळविले. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी तात्काळ वरिष्ठांना याबाबत माहिती देऊन अन्य यंत्रणांशी समन्वय साधण्यास सुरूवात केली. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाला याबाबतची माहिती देण्यात आली. ग्रामीण पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली.

अपघातग्रस्त विमान लष्काराचे असल्याचे स्थानिक रहिवाशांकडून सांगितले जाऊ लागल्याने देवळाली येथील लष्कराच्या कार्यालयाशीही आपत्ती व्यवस्थापन विभागाने संपर्क साधला. दुपारी बाराच्या सुमारास जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी घटनास्थळाला भेट देत अपघाताची माहिती घेतली आणि या दुर्घटनेची कारणे शोधा, असे निर्देश संबंधितांना दिले. एसबी २१० असे या सुखोई विमानाचे नाव असून त्याची चाचणी घेण्यात येत होती. ओझरपासून साधारण २० किलोमीटरवर गेल्यानंतर विमानामध्ये बिघाड झाल्याचे दोन्ही पायलटच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पॅराशुटद्वारे उड्या मारल्या. त्यानंतर हे विमान कोसळल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने या दुर्घटनेबाबतचा प्राथमिक अहवाल माहितीस्तव राज्य सरकारला पाठविल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. घटनास्थळावर मदतीसाठी एअर फोर्सने हेलिकॉप्टर पाठविल्याचे सांगितले जात होते. परंतु हेलिकॉप्टर पाठविण्याची आवश्यकता भासली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दुपारी स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अडीच एकर बागेचे नुकसान

$
0
0

द्राक्ष-डाळींब शेतीचा पंचनामा करणार; मदत मिळण्याची शक्यता

म. टा. वृत्तसेवा, निफाड

तालुक्यातील वावी व गोरठाण शिवारातील द्राक्ष आणि डाळिंब बागेवर लढाऊ विमान कोसळले. यात जीवित हानी झाली नसली तरी अडीच एकर द्राक्ष आणि डाळींब बागेचे नुकसान झाले. त्याची पाहणी जिल्हाधिकारी, एचएएलचे अधिकारी, महसूल प्रशासन आदींनी केली. या नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असून मदत देण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. तशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

मुंबई आग्रा महामार्गावर शिरवाडे वणी गावापासून चार किलोमीटरवरील गोरठाण व वावी या गावांजवळ लढाऊ विमान कोसळले. वावी-शिरवाडे, वणी शिवारातील सुखदेव बाबुराव निफाडे व योगेश ढोमसे यांच्या शेतात हे विमान कोसळले. स्फोट झाल्याने मोठा आवाज होऊन आगीचे लोट तयार झाले. त्यामुळे सुखदेव बाबुराव निफाडे यांच्या गट नंबर २८२ मधील नवीन दीड एकर द्राक्षबाग व योगेश ढोमसे यांच्या गट नंबर २८४ मधील एक एकर द्राक्षबागेचे विमानाच्या स्फोटामुळे नुकसान झाले. सुखदेव निफाडे व योगेश ढोमसे यांच्या डाळिंब व द्राक्षबागांचे सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले.

वैमानिक जखमी

विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे लक्षात येताच विमानातील वैमानिकानी पॅराशूटच्या साहाय्याने उडी घेतली यात त्यांना द्राक्षबागाच्या तारा लागल्याने ते जखमी झाले तर कोसळलेल्या विमानाचा काही भाग सुखदेव निफाडे यांच्या मुलाच्या अंगावर पडल्याने त्यालाही दुखापत झाली. त्यास पिंपळगाव बसवंत येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थदाखल करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, विमान कोसळले तेव्हा द्राक्षबागेत मजुरही काम करीत असल्याचे निफाडे यांनी सांगितले. वैमानिकानांही वायू दलाने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

मोठा अपघात टळला

विमान कोसळले त्या ठिकाणापासून काही अंतरावर २२० केव्हीची विद्युत वाहिनी आहे. कोसळलेल्या विमानाचे काही भाग या विद्युत वाहिनीच्या मनोऱ्यावर पडल्या. त्यामुळे विद्युत वाहिनीच्या तारा तुटल्या. काही तारा तुटण्याच्या अवस्थेत आहेत. या तारा तुटल्या असत्या तर मोठा अनर्थ झाला असता, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. शिवाय येथून जवळच रसाळ आणि जगताप या शेतकऱ्यांच्या वस्त्या आहेत. विमान थोडे जरी मागे किंवा पुढे असते तर मोठी हानी झाली असती, असा अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला.

बघ्यांची घटनास्थळी धाव

विमान कोसळल्याची बातमी काही क्षणात पसरल्याने घटनास्थळी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. प्रशासनाचे अधिकारी, पोलिस यंत्रणा, ओझर वायू दलाचे अधिकारी-कर्मचारी आदींनी घटनास्थळाकडे धाव घेतली. परिसरातील नागरिकांनी सुरुवातीला मदतकार्यात सहभाग घेतला. त्यानंतर अग्निशमन वाहने, अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या. जिल्हाधिकारी राधाकृष्णन यांनीही घटनास्थळी भेट देत प्रशासन व्यवस्थेला सूचना केल्या. शिरवाडे ते वावी या मार्गावर वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने मदतकार्यात अडथळे आले. त्यामुळे पोलिसांनी संतापाच्या भरात रस्त्यात उभी असलेली वाहने आडवी पाडली.

विमान कोसळल्याचे समजल्याने तब्बल दहा हजाराच्या आसपास नागरिक घटनास्थळी जमले. गर्दीवर नियंत्रण आणणे आमच्यासमोर मोठे आव्हान होते. स्थानिक पोलिस पाटील आणि ग्रामस्थांनी कळविल्यानंतर दहा मिनिटांच्या आत पोलिसांची मोठी कुमक तेथे दाखल झाली. विमान कोसळले तेथून दीड किमी अंतरावर दोन्ही वैमानिक जमिनीवर आले होते. त्यांना तातडीने मदत पोहचविण्यात आली. एचएएल आणि पिंपळगावच्या अॅम्ब्युलन्स त्वरीत मदतीसाठी आल्या. सुदैवाने विमान शेतात कोसळले. घरावर कोसळले असते तर अधिक हानी झाली असती.

- सुरेश मनोरे, पोलिस निरीक्षक,

पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपायुक्तांकडील चर्चा निष्फळ

$
0
0

महिंद्रच्या बडतर्फ कामगारांचे उपोषण सुरुच

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महिंद्रा अॅण्ड महिंद्रात युनियनचे कामकाज करतांना चार वर्षांपूर्वी बडतर्फ केलेल्या दोन कामगारांकडे युनियने पाठ फिरवल्यामुळे त्यांनी आठ दिवसापासून बेमुदत उपोषणाला सुरू केले आहे. या कामगारांना कामगार उपायुक्तांनी बुधवारी चर्चेला बोलावले. पण, युनियनचे पदाधिकारीच उपस्थित न राहिल्याने कोणताही तोडगा निघाला नाही. अखेर या कामगारांनी आपले उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.

युनियचे काम करताना २०१४ मध्ये तत्कालीन सरचिटणीस प्रवीण शिंदे व उपाध्यक्ष अमोल सोनवणे यांनी कंपनीने बडतर्फ केले. त्यानंतर त्यांनी युनियनच्या घटनेप्रमाणे आर्थिक मदत मागितली. पण, युनियनने ती न दिल्यामुळे त्यांनी कामगार उपायुक्त यांच्याकडे पत्रव्यवहार केला. पण, येथेही त्यांना न्याय न मिळाल्यामुळे त्यांनी बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसले. या उपोषणाच्या माध्यमातून त्यांनी विविध मागण्या सुद्धा केल्या. २०११ ला झालेल्या युनियनच्या सर्वसाधारण बैठकीत युनियनचे कामकाज करत असतांना व्यवस्थापनाने बडतर्फीची कारवाई केल्यास सर्व कामगारांनी एक दिवसाचा पगार बडतर्फ केलेल्या पदाधिकाऱ्यास देण्याचा ठराव केला होता. तो युनियन फंडातून देण्यात यावा. युनियनच्या घटनेप्रमाणे कलम २७ मधील ग, घ, ड याप्रमाणे मदत मिळावी. तसेच कोर्टातील केसेस व कोर्टाचे कामकाज चालविण्यासाठी युनियन फंडातून आर्थिक मदत द्यावी, युनियन फंडातून घटनेनुसार बेकारी भत्ता मिळावा, अशा त्यांच्या मागण्या आहेत.

पदाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार

महिंद्रा अॅण्ड महिंद्रा एम्पॉइज युनियनच्या विद्यमान कमिटीने युनियनच्या घटनेचा अवमान करून तीन वर्षांसाठी फेरनिवड करून घेतली आहे. युनियनच्या बेकायदेशीर व गैर कामकाजाची चौकशी करावी. तसेच त्यांनी केलेल्या खोट्या खुलाशावर विश्वास ठेवू नये, असेही निवेदन आंदोलक कामगारांनी उपायुक्तांना दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोकिळेची मृत्यूशी झुंज अपयशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड कोर्टातील उंच वृक्षावर पतंगाच्या मांजात अडकलेल्या कोकिळेला वाचवण्याचे प्रयत्न अखेर अपुरे पडले. सुटकेसाठी तीव्र संघर्ष करून या निष्पाप पक्षाने मान टाकल्यानंतर कोर्ट आवारातील उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली.

नाशिकरोडच्या कोर्टाच्या आवारात उंच झाडे आहेत. एक झाड शेजारी असलेल्या जलकुंभापेक्षा उंच वाढले आहे. त्याच्या वरच्या फांदीवर मांजामध्ये कोकिळेचे एक पंख अडकले. तिने सुटकेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. मात्र, जोरात फडफड केल्याने ती मांजात आणखी गुरफटत गेली. मांजा उजवे पंख कापत खोलवर रुतला. त्यामुळे तिचा प्रतिकार क्षीण होत गेला.

कोर्टातील अधीक्षक रामेश्वर बैरागी, क्लर्क यशवंत पगारे, दीपक कदम, किरण कर्डिले, किशोर काळे यांच्या लक्षात ही बाब आल्यावर त्यांनी नाशिकरोड महापालिकेचे अग्निशमन अधिकारी ए. यू. जाधव, फायरमन आर. बी. आहेर, व्ही. के. ताजनपुरे यांच्याशी संपर्क साधला. विद्युत विभागाची शिडीची गाडी बोलावण्यात आली. कोर्टापुढील रस्त्यापासून कोर्टापर्यंत वाहनांची गर्दी होती. ही वाहने हटवून गाडी आणेपर्यंत कोकिळा अर्धमेली झाली होती. ती ज्या फांदीवर अडकली होती, त्याच्या खालच्या फांदीवर प्रचंड मोठे आग्यामोहोळ आहे. कोर्टात सकाळपासूनच गर्दी असते. मोहोळाला धक्का लागला तर कोर्टात गोंधळ उडाला असता. काही वर्षांपूर्वी धुराने मोहोळ उठून कोर्ट आवारातील लोकांना धडा मिळाला होता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी अत्यंत काळजी घेत शिडी वर नेली. तथापि, कोकिळा सर्वात वरच्या फांदीवर अडकली होती. जमिनीपासून हे अंतर चार मजल्यांइतके होते. तिथपर्यंत काठी पोहचणेही अवघड होते.

अखेर प्राण सोडले

अग्निशमन दलाचे कर्मचारी, नागरिक, पक्षीप्रेमी आदींनी अर्धा तास प्रयत्न केले. मात्र, पक्षापर्यंत पोहचता येत नव्हते. शेजारी दुसरी मजूबत फांदीही नव्हती. कोर्टाचे कामकाज सुरू असल्याने मोहोळाला धक्का न लावता पक्षाला सोडविण्याचे प्रयत्न सुरू होते. पाऊसही सुरू झाला होता. खूप प्रयत्न करुनही या फांदीपर्यंत पोहचता येत नव्हते. अखेर नाईलाजाने प्रयत्न थांबविण्यात आले. सायंकाळी उशिरा पावसाचा जोर वाढत गेला आणि कोकिळेची जगण्याची लढाईही क्षीण होत गेली. अखेर तीव्र जखमांनी कोकिळेने प्राण सोडला. नायलान मांजावर बंदी असताना त्याचा वापर यंदाही संक्रातीला झाला. त्याची किंमत पक्षांना चुकवावी लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौदा हजार प्रकरणे निकाली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नाशिक यांनी गेल्या सहा महिन्यांत १६ हजार १७३ प्रकरणांपैकी १४ हजार ७३० प्रकरणे निकाली काढली आहेत. प्रलंबित १३८२ प्रकरणांपैकी ८८२ प्रकरणे अर्जदार यांच्या पातळीवर त्रुटीअभावी प्रलंबित आहेत. उर्वरित ५०० प्रकरणे ८ दिवसांपूर्वी समितीकडे जमा करण्यात आली आहेत. मुदतीत वैधता प्रमाणपत्र मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य वंदना कोचुरे यांनी दिली.

तंत्रशिक्षण विभागाच्या निर्देशांनुसार २५ जून २०१८ पर्यंत प्राप्त झालेली प्रकरणे निपटारा करण्यासाठी जात पडताळणी समिती स्तरावर अधिक कर्मचारी वृंदाचा वापर करून रात्री उशिरापर्यंत छाननी करण्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे समितीकडून २५ जूनपर्यंत ९ हजार ८४२ प्रकरणे निकाली काढण्यात आलेली आहेत. उर्वरित प्रकरणांवर निर्णय घेण्याची कार्यवाही चालू आहे. त्याचबरोबर समितीत बुधवारी दोन हजार ६५० वैधता प्रमाणपत्रे तयार असून, अर्जदाराने किंवा पालकांनी कार्यालयात येऊन जात वैधता प्रमाणपत्र घेऊन जाण्याचे आवाहन समितीमार्फत करण्यात आले आहे.

समितीने २१ ते २५ मे २०१८ या कालावधीत कॅम्प घेतले. तसेच त्रुटी पूर्तता करण्याबाबत ३ हजार ७५ दूरध्वनी लघुसंदेश पाठविण्यात आले. त्रुटीपूर्तता कॅम्पमध्ये २ हजार १५८ त्रुटींची पूर्तता करून अर्ज जमा करून घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफी मिळूनही शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळूनही एका शेतकऱ्याने गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली. मालेगाव तालुक्यातील देवघट गावात ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे जिल्ह्यात चालू वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ४६ झाली आहे.

शेषनाथ पुंजाराम पगार (वय ४०) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी मंगळवारी, २६ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास घरात गळफास घेतला. त्यांच्या नावे देवघट येथील गट क्र. ६४०/२ येथे सामाईक क्षेत्र आहे. या गटावर विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे कर्ज असून या शेतकरी कुटुंबाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेतला असल्याची प्राथमिक माहिती तहसीलदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली आहे. पगार यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही, असे जिल्हा प्रशासनाकडून बुधवारी सांगण्यात आले. जिल्ह्यात १ जानेवारी ते २६ जून या कालावधीत शेतकरी आत्महत्येच्या ४६ घटनांची नोंद झाली आहे. जून महीन्यातील ही आठवी घटना असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीक कर्जाचा लाभ घेण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कळवण तालुक्यातील चालू पीक हंगामात कर्ज घेण्यास पात्र व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ प्राप्त होऊन नवीन कर्ज घेण्यास पात्र झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्जपुरवठा करून शकत नसल्यास अशा शेतकऱ्यांनी कळवण तालुक्यातील राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँकामार्फत पीक कर्जाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कळवण तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या सचिवांना प्रत्येक पात्र शेतकऱ्याकडून राष्ट्रीयकृत बँकेचा कर्ज मागणी अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांच्या पुर्ततेसह संबंधित राष्ट्रीयकृत बँकेस देण्याबाबत सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांनी आपल्या क्षेत्रातील विविध कार्यकारी संस्थेच्या सचिवांशी संपर्क साधावा. तसेच राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकामार्फत कर्ज पुरवठा संबंधित समस्या असल्यास सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कळवण, नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत कोल्हापूर फाटा, तळ मजला, कळवण येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेना नगरसेवक करणार पालखी स्वागत

$
0
0

स्वनिधीतून सातपूरमध्ये सोहळ्याची तयारी

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

भाजपची सत्ता असलेल्या महाापलिकेकडूनच यंदा संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात नकार दिल्यानंतर शिवसेनेने आता या पालखी सोहळ्याचे स्वागत करण्याची तयारी दर्शवली आहे. यंदाच्या संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताचा सर्व खर्च शिवसेनेचे महापालिका नगरसेवक आपल्या मानधनातून करणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दिली आहे.

दरवर्षी संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखी त्रंबकेश्वर येथून निघून सातपूर येथे मुक्कामी असते. दुसऱ्या दिवशी महापालिकेच्या वतीने जलतरणतलाव येथे पालखीचे स्वागत केले जाते. परंतु, यंदा महापालिकेने कोणत्याही सण उत्सवासाठी निधी देणार नसल्याचे जाहीर केल्यामुळे शिवसेना नाशिकच्या सर्व नगरसेवकांनी आपल्या माणधनातून पालखीचे स्वागत करण्याचे ठरविले आहे. सातपूर येथे गुरुवारी (दि. २८) पपया नर्सरी जवळील सौभाग्य लॉन्स येथे संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे स्वागत केले जाणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी शिवसेना संपर्कप्रमुख भाऊलाल चौधरी, जिल्हाप्रमुख, खासदार, आमदार, नगरसेवक, शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

संत निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी भव्य मंडप टाकण्यात आला आहे. पालखीचे रितिरिवाजानुसार सर्व पूजन केले जाईल. वारकरी व दिंडीतील भाविकांसाठी नाश्त्याची व पाण्याची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. दिंडीमध्ये निवृत्तिनाथांच्या नामाचा गजर करण्यासाठी टाळ, मृदंग, चिपळ्या देण्यात येणार असून वारकऱ्यांना आपापसात संपर्क साधण्यासाठी वॉकी टॉकी देण्याची व्यवस्था शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

भाजपवर निशाना

देश व महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतांच्या योगदानाचे महत्त्व सांगण्याची गरज नाही. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या राजकीय पक्ष सत्तेत आल्यावर त्याच हिंदुत्ववादी धर्माशी संबंधित सण, उत्सवांवर अनेक निर्बंध घालत आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला भगवा आणि संत महात्म्यांनी धर्माचे प्रतीक म्हणून उभारलेला भगवा एकाच असून त्याचा योग्य मानसन्मान फक्त शिवसैनिकच राखू शकतात. त्यामुळे शिवसैनिकांनी व नाशिककरांनी गुरुवारी (दि. २८) दुपारी चार वाजता सातपूर येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते व शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी केले आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुखोई विमान कोसळून खाक

$
0
0

- पिंपळगाव बसवंतजवळील घटना

- दोन्ही पायलट पॅराशूटमुळे सुखरूप

- सखोल चौकशीचे आदेश

--

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर येथील हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या (एचएएल) कारखान्यात निर्मिती करण्यात आलेले सुखोई ३० (एमकेआय) हे लढाऊ विमान बुधवारी सकाळी उड्डाणानंतर काही वेळातच पिंपळगाव बसवंत नजीक वावी ठुशी गावाजवळील शेतात कोसळून खाक झाले. या दुर्घटनेत दोन्ही वैमानिक पॅराशूटच्या सहाय्याने सुखरूप जमिनीवर उतरले. गेल्या दीड दशकात प्रथमच एचएएलच्या विमानाला असा अपघात झाला आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून, तपास सुरू झाला आहे. तसेच, या दुर्घटनेत अडीच एकर द्राक्ष आणि डाळिंब बागेचे नुकसान झाले असून, एक शेतमजूरही जखमी झाला आहे.

एचएलमध्ये यावर्षी तयार झालेल्या पहिल्याच एसबी २१० या विमानाची एचएएलकडून वैमानिक विंग कमांडर प्रशांत नायर आणि विमान चाचणी इंजिनीअर स्वॉड्रन लिडर एल बिस्वाल हे या चाचणी घेत होते. बुधवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हे विमान ओझरच्या धावपट्टीवरून हवेत झेपावले. काही फेऱ्या मारल्यानंतर अचानक विमानात मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचे नायर आणि बिस्वाल यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने ओझरच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाला (एटीसी) सांगितले. 'एअरक्राफ्ट इज आऊट ऑफ कंट्रोल' हा संदेश वैमानिकाने एटीसीला दिला. त्याचक्षणी नायर आणि बिस्वाल यांनी आपत्कालीन परिस्थितीसाठी देण्यात आलेले विमानातील बटण दाबले आणि पॅराशूटच्या मदतीने जमिनीवर उतरले. मात्र, तांत्रिक बिघाडामुळे विमानाला आग लागली होती. हे विमान वावी ठुशी गावाजवळील द्राक्ष आणि डाळिंबाच्या बागेत कोसळले. वेग अधिक असल्यामुळे विमानाचे विविध भाग काही दूरवर पडले.

--

विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. त्याद्वारे अपघात का झाला, विमानात काय बिघाड झाला हे स्पष्ट होईल. एचएएलच्या अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे. द्राक्ष आणि डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. त्याचा पंचनामा करून आर्थिक मदतीसाठी एचएएलकडे पाठपुरावा केला जाईल.

- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात-बारा होणार अपडेट

$
0
0

शहरातील नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा निर्णय

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : सात-बारा उताऱ्यांच्या ऑनलाइन डिजिटलायजेशनच्या प्रक्रियेत अलीकडे व्यवहार दिसत नसल्याने जमीन किंवा तत्सम मालमत्ता खरेदी विक्रीत नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता बळावू लागली आहे. असे प्रकार रोखण्याकरीता जिल्हा प्रशासनाने पाऊले उचलली असून अलीकडेच व्यवहार झालेले सातबारा तातडीने अपडेट करा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला दिले आहे. महापालिका क्षेत्रात आजमितीस असे ४ हजार ९८९ सात-बारा उतारे असून त्यांचे अपडेशन सुरू करण्यात आले आहे.

सात-बारा उतारे हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज असून ते ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्ह्यात सर्व्हर डाउन सारख्या अनेक अडथळ्यांची शर्यत पार करीत हे काम सुरू आहे. कोणत्याही व्यक्तीला सात-बारा उतारा घरबसल्या मिळविता यावा, त्याकरीता तलाठी किंवा मंडळ अधिकाऱ्यांचे हातपाय धरण्याची गरज भासू नये या उद्देशाने राज्य सरकारने सर्व सात-बारा उतारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. हा दस्तऐवज अत्यंत महत्त्वपूर्ण असून तो महसूल विभागाने वर्षानुवर्षे जोपासला आहे. डिजिटल इंडियांतर्गत असे लाखो उतारे ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरू केली. सर्वप्रथम या सर्व उताऱ्यांचे स्कॅनिंग करण्यात आले. त्यानंतर या उताऱ्यांची दुरुस्ती, पुर्नदुरुस्तीची प्रक्रिया हाती घेण्यात आली. नाशिक तालुका वगळता अन्य सर्व तालुक्यांमध्ये पुर्नदुरुस्तीसह अपडेशनची कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून हे उतारे डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइनवर अपलोड होण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. नाशिक शहरासह तालुक्यात मात्र छोटे-छोटे गट असून भूधारक, हक्कधारकांची संख्या खूपच अधिक आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सात-बारा उतारे ऑनलाइनचे काम प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

तलाठ्यांना आदेश

शहरात भूखंड, सदनिका व तत्सम स्थावर मालमत्तांचे व्यवहार सातत्याने सुरू असतात. अलीकडच्या काळातील अशा व्यवहारांच्या नोंदी सात-बारा उताऱ्यावर घेतल्या नाही तर अशा मालमत्तांचा पुन्हा व्यवहार होऊन संबंधित ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता बळावते. असे प्रकार घडू नयेत, यासाठी शहरातील सात-बारा उताऱ्यांच्या दुरुस्ती आणि पुर्नदुरुस्तीसह अपडेशनला प्राधान्य देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. सद्यस्थितीत शहरातील असे ४ हजार ९८९ सात-बारा उतारे अपडेट नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे उतारे सर्वप्रथम अपडेट करून डिजिटल स्वाक्षरीसह ते नागरिकांना ऑनलाइन उपलब्ध करून द्या, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने शहरात कार्यरत तलाठ्यांना दिले आहेत.

अलीकडेच मालमत्तांचा व्यवहार झालेल्या व नोंदणी प्रलंबित असलेल्या सात-बारा उताऱ्यांचे प्राधान्याने अपडेशन करा, असे निर्देश यंत्रणेला दिले आहेत. अशा व्यवहारांत नागरिकांची फसवणूक होण्याची शक्यता अधिक असल्याने अलीकडचे व्यवहार प्रथम सात-बारा उताऱ्यावर घेतले जातील. शक्य तेवढ्या लवकर हे काम मार्गी लावून हे उतारे प्राधान्याने ऑनलाइन उपलब्ध करून द्या, असे आदेश तलाठ्यांना दिले आहेत.

- डॉ. शशिकांत मंगरूळे,

उपजिल्हाधिकारी, प्रशासन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८३ वर्षीय सुमती बापट करणार अवयवदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गजानन महाराजांची पोथी मुखोद्गत असणाऱ्या येथील ८३ वर्षीय सुमती बापट यांनी अवयवदानाचा निर्णय घेऊन समाजासमोर नवीन आदर्श घालून दिला आहे. स्वत:चा व कुटुंबीयांचा अवयवदानाचा रीतसर अर्ज त्यांनी नाशिक रोटरी क्लबचे अध्यक्ष अनिल सुकेणकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

केवळ नाशिकमध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात सुमती बापट यांचे मुखोद्गत पोथी-पारायणांचे कार्यक्रम सुमारे ४६ वर्षांपासून होत आहेत. १९७२-७३ साली अशोकस्तंभावरील श्रीगजानन महाराजांच्या मठात प्रकटदिनानिमित्त उत्सवाच्या कार्यक्रमात दिवसभर प्रसाद वाटता वाटता त्यांनी पोथी म्हटली आणि तेव्हापासून कार्यक्रमांना सुरुवात झाली. महाराष्ट्राशिवाय, इंदौर, बडोदा अशा अनेक ठिकाणी त्या कार्यक्रमांना जाऊन मुखोद्गत पोथी पारायणांचे कार्यक्रम करतात. त्यांच्या अवयवदानाच्या निर्णयाने त्या केवळ धार्मिकतेतच नव्हे तर सामाजिक क्षेत्राबाबतही पुढे असल्याचे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले आहे, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्त मुंढेंचा आमदारांना दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपचे शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप यांच्या आमदार निधीतून दलित वस्तीतल्या कामांचे फुगवलेले प्राकलन कमी करून दाखवल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढेंनी आता मध्यच्या भाजप आमदार प्रा. देवयानी फरांदेना दुसरा दणका दिला आहे.

शहरातील प्रभाग क्र. १२ मध्ये व्यायामशाळा सुरू असतानाच त्या ठिकाणी जिम्नॅशिअम हॉल बांधून व्यायाम साहित्य पुरविण्याच्या आमदार फरांदे यांच्या २० लाखांच्या प्रस्तावावर आयुक्तांनी फुली मारली आहे. त्यांसदर्भातील पत्र जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना पाठवले असून, या ठिकाणी व्यायामशाळा सुस्थितीत चालू असल्याचे सांगत, निधी परत पाठवला आहे. दरम्यान, आपणच हा प्रस्ताव मागे घेतल्याचा दावा आमदार फरांदे यांनी केला आहे.

महापालिकेच्या प्रभाग क्र. १२ मधील राहुल नगर भागात व्यायामशाळा सुरू आहे. परंतु, येथील साहित्याची मोडतोड झाल्याची तक्रार आमदार फरांदेंकडे केली होती. त्यानुसार आमदारांनी आमदार निधीतून येथे जिम्नॅशिअम हॉल बांधण्यासाठी १५ लाख रुपये आणि या हॉलमध्ये व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पाच लाख असे २० लाखांचा निधी दिला होता. त्यांसदर्भातील पत्र जिल्हा नियोजन विभागाकडून महाापलिकेलाही प्राप्त झाले होते. परंतु आ.फरांदेचे काम आयुक्त मुंढेंच्या त्रिसूत्रीच्या कात्रीत सापडले आहे.

आमदार निधीतील कामांवरदेखील वक्रदृष्टी

आयुक्तपदाची सुत्रे स्वीकारल्यापासून तुकाराम मुंढे यांनी प्रशासकीय सुधारणेची मोहीम हाती घेतली आहे. विकासकामांसाठीदेखील त्यांनी कामाची निकड, तांत्रिक व्यवहार्यता आणि उपलब्ध निधी या त्रिसुत्रीचा अवलंब केला असून, या त्रिसूत्रीच्या आधारेच नगरसेवकांनी सूचविलेली प्रभागांतील तब्बल साडेतीनशे कोटी रुपयांची विकासकामे आयुक्तांनी रद्द केली आहेत. त्यामुळे नगरसेवकांमध्ये आयुक्त मुंढे यांच्याविषयी नाराजी आहे. नगरसेवकांच्या प्रस्तावांना कात्री लावणाऱ्या आयुक्तांनी आता आमदार निधीतील कामांवरदेखील वक्रदृष्टी वळविली आहे. यापूर्वी प्रभाग क्रमांक ४ मधील फुलेनगर भागात आमदार बाळासाहेब सानप यांच्या पुढाकाराने मागासवर्गीय वस्ती विकास योजनेतून केल्या जाणाऱ्या ड्रेनेच्या कामांना कात्री लावल्यानंतर आता आमदार देवयानी फरांदे यांच्या आमदार निधीतील कामांनाही मुंढे यांनी केराची टोपली दाखविली आहे. विशेष म्हणजे, या व्यायामशाळेत व्यायामाचे साहित्यही उपलब्ध होते. त्यामुळे महापालिकेने आमदार फरांदे यांचा प्रस्ताव रद्द करण्यात येत असल्याचे जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्यामुळे हा आमदार फरांदेंसाठी मोठा झटका मानला जात आहे.

काही स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आपण हा प्रस्ताव दिला होता. परंतु, प्रस्तावित ठिकाणी यापूर्वीच व्यायामशाळा असल्याचे कळाल्यानंतर आपणच हा प्रस्ताव मागे घेतला आहे. यासाठीचा निधी अन्य कामांसाठी वळविण्यात येत आहे.

- प्रा. देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्तिनाथ पालखीचे आज प्रस्थान

$
0
0

पंढरपूर वारीसाठी प्लास्टिकमुक्तीचा संकल्प

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूर वारीसाठी गुरुवारी (दि. २८) प्रस्थान होत आहे. यावेळेस निर्मळ वारी, हरित वारी, प्लास्टिक मुक्तवारी असा संकल्प करण्यात आला आहे.

वारकऱ्यांना निरोप देण्यासाठी सरकारचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्र्यांचे एस. ओ. डी. श्रीकांत भारती उपस्थित राहणार आहेत. त्र्यंबकेश्‍वर येथे बुधवारी दुपारपासूनच वारकऱ्यांची गर्दी झाली आहे. परभणी भागातील १५ दिंड्या आलेल्या होत्या. येथे निवाऱ्याची सुविधा नसल्याने काही वारकरी परत गेले असून ते गुरुवारी सकाळी येणार असल्याचे समजते.

संतश्रेष्ठ संत श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या या पालखी सोहळा परिसरातील ४० ते ४५ दिंड्यांमधून सुमारे २५ हजार वारकरी सहभागी होणार असल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. यंदा प्रथमच पालखी सोहळ्याचे नियोजन फक्त संस्थांना पुरते मर्यादित न ठेवता २५ वर्षांपासून पालखी सोबत असलेल्या एक-एक प्रतिनिधींना सोबत घेत २५ वारकऱ्यांची समिती संस्थान अध्यक्ष संजय धोंडगे यांच्या मार्गदर्शन खाली तयार करण्यात आली आहे. संपूर्ण पालखी सोहळ्याचे नियोजन समितीमार्फत केले जाणार आहे. पालखी सोहळा वारी निर्मळवारी, हरितवारी, प्लास्टिकमुक्त वारी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. संपूर्ण पालखीत प्लॅस्टिक हद्दपार करून संस्थानकडून वारकऱ्यांना पत्रावळी उपलब्ध करून देणार आहे.

पालखी नियोजनाची बैठक नाशिक येथे झाली. यावेळी दिंडीत माफक दरात गॅस सिलिंडर, पोलिस संरक्षण, पेयजलचे टँकर्स, अखंडित वीज सेवा, औषधोपचार आदींची पूर्तता शासनाने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पालखी सोहळा अध्यक्ष पंडित महाराज कोल्हे यांनी पूर्ण नियोजन केले आहे. रथासाठी येथील माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे यांची बैलजोडी जोडण्यात येणार आहे. तसे पत्र त्यांना देवस्थानने दिले आहे. आठवडाभरापासून ते रथाची डागडुजी करत आहेत.

प्रत्येक जिल्ह्यात रिंगण सोहळा

नाशिक, नगर, सोलापूर या तीन जिल्ह्यांतून पालखी जात असल्याने या प्रत्येक जिल्ह्याच्या एका ठराविक जागेवर तीन अश्‍व रिंगण व्हावेत, अशी वारकऱ्यांची इच्छा आहे. त्यामुळे रिंगणासाठी निरीक्षक पालखीत सहभागी होणारे किर्तनकार व वारकरी जागा शोधणार आहेत. दरम्यान, त्र्यंबक शहरातील पांडू कोरडे आणि मित्र मंडळ काही वर्षांपासून येथे मुक्कामी आलेल्या वारकरी भाविकांची जेवणाची व्यवस्था करत असतात यावर्षी देखील करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वटवृक्षाची लागवड करत ‘पौर्णिमा’ साजरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वटपौर्णिमेचे औचित्य साधून 'आपलं पर्यावरण' संस्था आणि नाशिक वनविभागाने झाडे लावण्याचा संदेश देत वटवृक्षांची लागवड केली. महौपार रंजना भानसी यांनी या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला हजेरी लावत झाडे लावत उपक्रमाचे कौतुक केले. म्हसरूळ येथील वन कक्षात हा कार्यक्रम झाला.

यावेळी महापौर भानसी यांनी म्हसरूळ येथील वनकक्षात पर्यावरण दिनी लागवड केलेल्या वृक्षांची पाहणी केली. याठिकाणी निर्माण होणाऱ्या 'नाशिक वनराई' च्या कामाचे त्यांनी कौतुक केले. ३५ प्रकारची विविध विविध दुर्मिळ झाडांची त्यांनी आस्थेवाईकपणे माहिती घेतली. आपलं पर्यावरणचे शेखर गायकवाड यांनी त्यांना सर्व नाशिक वनराई ची माहिती दिली. याप्रसंगी वनविभागाच्या डीसीएफ टी. ब्यूला, एसीएफ स्वप्नील घुरे, एसीएफ कांचन पवार, आरएफओ प्रशांत खैरनार उपस्थित होते.

नाशिकचा पर्यावरण समतोल साधण्यासाठी वृक्षलागवड आणि संवर्धन सातत्य असणे गरजेचे आहे. आपलं पर्यावरण आणि वनविभाग ते कार्य करत आहेत. महापालिका त्यांना नक्कीच सहकार्य करेल. वटपौर्णिमा वटवृक्षाची लागवड करून साजरी एक नवा पायंडा आज पडला.

- रंजना भानसी, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेचे दागिने घेऊन पोबारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एका पादचारी महिलेला बोलण्यात गुंतवित तिचा विश्वास संपादन करून चोरट्यांनी ७० हजार रुपये किमतीचे दागिने लांबविले. ठक्कर बाजार बसस्थानकाजवळ मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. महिलेने रात्री उशिरा फिर्याद दिली असून, सरकारवाडा पोलिसांनी अज्ञातांवर गुन्हा दाखल केला आहे.

कल्पना देवीदास करोटे (वय ५०, रा. भद्रकाली) यांनी फिर्याद दिली आहे. त्या अशोकस्तंभ परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करतात. मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास त्या नेहरू गार्डनजवळून पायी चालल्या होत्या. यावेळी दोघांनी त्यांना थांबविले. औरंगाबादला जाणारी बस कोठून मिळेल अशी विचारणा त्यांना केली. ठक्कर बसस्थानकातून मिळेल अशी माहिती देतानाच करोटे यांनी त्यांना रिक्षाने जाण्याचा सल्ला दिला. ते दोघेजण करोटे यांनाही रिक्षामध्ये बसवून ठक्कर बसस्थानकात घेऊन आले. तिघेही रिक्षातून उतरले. त्यानंतर रिक्षावाला निघून गेला. एवढे दागिने अंगावर घालायचे नाहीत. चोरटे कान, तसेच गळा कापून दागिने हिसकावून नेतात असे सांगत चोरट्यांनी करोटे यांचा विश्वास संपादन केला. त्यांना हे दागिने काढून रुमालात ठेवण्यास सांगितले. त्यांनी दागिने रुमालात ठेवण्यासाठी चोरट्यांच्या हातात दिले. हा रुमाल पर्समध्ये ठेऊन द्या असे सांगत चोरटे तेथून निघून गेले. करोटे यांनी पर्समध्ये तपासणी केली असता रुमालात दागिन्यांऐवजी दगड आणि कागद आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. करोटे यांना संमोहित करून चोरट्यांनी दागिने लांबविले असावेत, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उपाशी विद्यार्थिनींचा ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी शासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीअंतर्गत सुविधांचे पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाची व्यवस्थित अंमलबजावणी न झाल्याचा फटका पेठ रस्त्यावरील आदिवासी विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना बसला आहे. एकीकडे डीबीटीचे पैसेही खात्यावर जमा झालेले नाहीत तर दुसरीकडे वसतिगृहात जेवण पुरविणाऱ्या ठेकेदारासही मुदतवाढ देण्यात आली नाही. परिणामी, सलग तीन दिवस या विद्यार्थिनींची उपासमार झाली. अखेर विद्यार्थिनींनी एकत्र येत प्रकल्पाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या देत कैफियत मांडली. यानंतर मात्र प्रशासनाला खडबडून जाग आली असून, याप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. या त्रुटी दूर करण्याचाही प्रयत्न आदिवासी विकास विभागाकडून सुरू झाला आहे.

या वसतिगृहात निवासी विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांऐवजी या सुविधांचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार अगोदर जेवण पुरविणाऱ्या ठेकेदाराचा जेवण पुरविण्याचा ठेका १६ जूनपर्यंत होता. हा ठेका संपल्यानंतरही ठेकेदाराने विद्यार्थिनींना २३ जूनपर्यंत जेवणाची सुविधा दिली. मात्र हे जेवण पुरविण्यासाठी मुदतवाढ न मिळाल्याने अखेरीस ठेकेदारास सुविधा बंद करावी लागली. परिणामी, प्रकरण गृहपालांकडे गेल्यानंतर बाहेरील मेसचा पर्याय त्यांनी सुचविला. पण पावसाळ्यातील असुविधा आणि वेळमर्यादेचा विचार करून विद्यार्थिनींनी मेसचालकांच्या मदतीने जेवण वसतिगृहात बनविण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावास गृहपालांनी विरोध दर्शविल्याने मेसचालकाने पावसातच विद्यार्थिनींचे जेवण आणून ठेवल्याची तक्रार या विद्यार्थिनींनी प्रकल्पाधिकाऱ्यांकडे केली आहे. दरम्यान, ठेकेदाराकडून बंद करण्यात आलेली जेवणाची सुविधा, डीबीटीचे खात्यावर जमा न झालेले पैसे, मेसचालकास वसतीगृहात जेवण बनविण्यास विरोध या स्थितीमुळे या विद्यार्थिनींना तब्बल तीन दिवस उपाशीपोटी काढावे लागले. काही विद्यार्थिनींनी वडापाव आदी खाद्यपदार्थ आणून वेळ काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचाही त्यांच्या आरोग्यास त्रास झाला. या वसतिगृहात शिक्षणासाठी आलेल्या अनेक विद्यार्थिनी या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देणाऱ्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे अतिरिक्त पैसेही नाहीत. त्यातच या असुविधेत भर म्हणून पाऊसही पडल्याने विद्यार्थिनींनी अखेर प्रकल्पाधिकाऱ्यांचे कार्यालय गाठून कैफियत मांडली.

ठेकेदाराकडून जेवण

आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयात येवून ठिय्या आदोंलन केल्यानंतर आदिवासी विभागाला जाग आली असून विभागाने ठेकेदारामार्फत जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या मुलींना अखेर वसतिगृहात जेवण मिळाले आहे. परंतु, ठेकेदाराचे पैसे कसे अदा करायचे, हा वाद मात्र कायम राहिला आहे. ठेकेदाराने ३० जूनपर्यंत मुलींना जेवण द्यावे, असे निर्देश प्रकल्प कार्यालयाने ठेकेदाराला दिले आहेत. त्यामुळे तूर्तास मुलींची उपासमार टळली आहे.

जेवणाचा दर्जा निकृष्ट

हे जेवण अत्यंत निकृष्ट असल्याचे येथील मुले आणि मुली सांगत आहेत. भात चांगला शिजलेला नसतो. कच्चा भात खाल्ला जात नाही. वरणात जास्त प्रमाणात पाणी असते. भाजीसोबत चपाती दिली जात नाही. अनेक दिवसांपासून तर केवळ वरण-भात आणि खिचडी असेच जेवण दिले जात आहे. जेवण चांगले मिळत नसल्यामुळे काही विद्यार्थी-विद्यार्थिनींनी जेवण घेण्यास नकार दिला होता. चपातीची मागणी केल्यानंतर कुठून तरी बाहेरूनच चपात्या आणल्या जात आहेत. पूर्वी पंधरा दिवसातून मांसाहार आणि गोड पदार्थ दिले जात होते. सध्या तेही बंद झालेले आहेत. अशीही विद्यार्थ्यांची तक्रार आहे. यावर, चपाती मशिन बिघडल्यामुळे हा प्रकार घडत असल्याचे एकलव्य स्कूलचे प्राचार्य सुरेश देवरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामबंद आंदोलनाने आदिवासी वेठीस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यसरकारने सेवानिवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकावाड समितीच्या अहवालानुसार आदिवासी विभागातील भ्रष्टाचारी अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करताच विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हे कारवाईच्या भीतीने बिथरले आहेत. विभागाच्या कारवाईविरोधात आयुक्तालयासह २९ प्रकल्प कार्यालयांमध्ये दोन दिवसांपासून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. परंतु, या आंदोलनामुळे मात्र सर्वसामान्य आदिवासी आणि शालेय विद्यार्थी वेठीस धरले जात आहेत. या आंदोलनामुळे दोन दिवसापासून जातपडताळणी समितीचेही कामकाज ठप्प झाल्याने आदिवासी विद्यार्थ्यांची चांगलीच परवड होत आहे.

आदिवासी विभागात सन २००४ ते २००९ या काळात अनुसूचित जमाती कल्याणकारी योजनेंतर्गत झालेल्या घोटाळ्यांची चौकशी करणाऱ्या उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड समितीने भ्रष्टाचाराची चौकशी पूर्ण करीत, राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. यात तत्कालीन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजय गावित यांच्यासह राज्यातील चोवीस प्रकल्प कार्यालयांतर्गत येत असलेल्या सर्व प्रकल्प अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप ठेवत तसा अहवाल सरकारला सादर केला. सरकारने या अहवालावर कामकाज करून कारवाई करण्याबाबत सूचना करण्यासाठी करंदीकर समितीची स्थापना केली होती. या समितीने गायकवाड समितीच्या अहवालावर संबंधित तत्कालीन अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची सूचना केली होती. गायकवाड समिती आणि करंदीकर समितीकडून सूचना मिळताच शासनाने राज्यातील या प्रकरणात ठपका ठेवत जवळपास सहाशेच्या आसपास अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

परंतु, आदिवासी विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या या कारवाईला आता आदिवासी आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच २९ प्रकल्प कार्यालयातील प्रकल्प अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी खोडा घालण्यास सुरुवात केली आहे. गायकवाड समितीने केवळ भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचीच बाजू ऐकून घेतल्याचे सांगत, आमची बाजूही ऐकून घ्या, या मागणीसाठी आता दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे राज्याचे आदिवासी विभागाचे कामकाज ठप्प पडले आहे. विशेष म्हणजे यात आठ आदिवासी जातपडताळणी समित्यांचेही कामकाज ठप्प झाले आहे. या आंदोलनामुळे मात्र सर्वसामान्य आदिवासींसह शालेय प्रवेशासाठी जातपडताळणी समितीच्या कार्यालयात चकरा मारणाऱ्या आदिवासी विद्यार्थी वेठीस धरले गेले आहेत. कामकाज होत नसल्याने सर्वसामान्य आदिवासीनांही आयुक्तालयातून परत जावे लागत आहे. विद्यार्थ्यांना जातपडताळणी समितीची बैठक दोन दिवसांपासून होत नसल्याने दाखल्यांचेही काम रखडले आहे. त्यामुळे आदिवासी आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या या वेठीस धरण्याचे भूमिकेमुळे आदिवासींमध्ये संतापाचे वातावरण आहे.

जात पडताळणी समितीची दोन दिवसापासून बैठक झाली नसली, तरी अर्ज स्वीकृतीचे काम सुरू आहे. अर्जांची स्क्रुटिनीही केली जात आहे. आदिवासी विद्यार्थ्यांना अडचण होऊ नये. समितीच्या बैठकांचे नियोजन करण्यात आले आहे.

- डी. के. पानमंद, सहआयुक्त, जात पडताळणी समिती, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैभवला देशासाठी करायचय दर्यावर राज्य!

$
0
0

वैभव पांडे

VAIBHAV PANDE

९५.४० टक्के

०००००००००००००

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

वर्षानुवर्षे पडणाऱ्या दुष्काळाला कंटाळून आई-वडिलांनी कुंभेफळ (ता. अकोले, जि. नगर) हे आपले गाव सोडले. पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी आपले बिऱ्हाड आठ-नऊ वर्षांपूर्वी नासाका साखर कारखाना परिसरात आणले. छोटीशी खोली दरमहा भाड्याने घेतली अन् संसाराचा गाडा हाकण्यासाठी सुरुवातीला पडेल ते काम करण्यास सुरुवात केली.

कमाई तशी अगदी तुटपुंजीच. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कायमच बेताची राहिली. शाळेची पुस्तकेच काय गणवेशही दुसऱ्याचा वापरावा लागला. अशाही बिकट परिस्थितीत नाशिक साखर कारखाना कार्यस्थळवरील माध्यमिक विद्यालय या शाळेतील वैभव सोमनाथ पांडे या विद्यार्थ्याने इयत्ता दहावी परीक्षेत थेट ९५ टक्के मिळवत यशाला गवसणी घातली. 'एनडीए'मध्ये प्रशिक्षण घेऊन देशाच्या नौदलात उच्च अधिकारी होऊन देशाच्या सागर किनाऱ्यांवरील सीमेचे संरक्षण करण्याचे ध्येय वैभवने उराशी बाळगले आहे. मात्र, कुटुंबातील गरिबीच्या दशावतारामुळे त्याच्यासह त्याच्या कुटुंबाला त्याचे ध्येय प्राप्त करण्याची मोठी चिंता वाटू लागली आहे.

वैभवचे वडील नासाका परिसरातील एका बिस्किट कंपनीत रोजंदारीवर काम करतात. एकट्याच्या कमाईवर घरखर्चाचा मेळ बसेनासा झाल्याने वैभवची आईही घराबाहेर पडली. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतावर काम करून त्याही मुलांच्या शिक्षणासाठी चार पैसे मिळवत आहेत. मुलगा वैभवला शिकवतांना दोन्ही मुलींनाही उच्च शिक्षण मिळावे आणि त्यादेखील स्वतःच्या पायावर उभ्या राहाव्यात, यासाठी वैभवचे आई-वडील कष्ट उपसत आहेत. आमच्या शिक्षणासाठी पैसा लावता यावा, म्हणून आजारी असल्यावरही आई-वडील कधी दवाखान्यात गेले नाहीत, असे वैभव सांगतो. एवढ्या वर्षात आजारावर घरच्याघरी उपाय करून पैसे वाचविणाऱ्या आपल्या आई-वडिलांना गरिबीच्या जोखडातून बाहेर काढण्यासाठी उच्च शिक्षण घेण्याची वैभवची जिद्द आणि निर्धार पक्का आहे. स्वतः शिक्षण घेऊन दोन्ही बहिणींनाही उच्च शिक्षणाची संधी प्राप्त करून देण्याचे वैभवचे शब्द त्याला त्याच्या खांद्यावरील जबाबदारीचे भान एवढ्या लहान वयातच आल्याचे पुरावा ठरतात.

खेळण्या-बागडण्याच्या वयात गरिबीच्या चटक्यांनी होरपळलेल्या वैभवची नजर मात्र नौदलात अधिकारी बनून देशसेवा करण्याबरोबरच आई-वडिलांना गरिबीच्या गर्तेतून बाहेर काढण्याच्या ध्येयमार्गावर मार्गस्थ होण्याची तयारी करीत आहे. वैभवला त्याचे सर्वोच्च ध्येय साध्य करण्याच्या वाटेवरील सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे गरिबीचा. समाजातील दानशुरांचे हात त्याच्या मदतीला आले तर त्याच्या ध्येयमार्गातील हा अडथळा कायमचा दूर होण्यास हातभार लागणार आहे.

शिक्षकांकडून प्रोत्साहन

वैभवचे आजी-आजोबा गावी राहतात. त्यांच्या उपचार खर्चाची जबाबदारीही वैभवच्या कुटुंबावरच आहे. आजोबांचे आजारपणही कायम असल्याची खंत व्यक्त करतांना वैभव हळवा होतो. शाळेची फीदेखील शाळेच्या शेवटच्या दिवशी भरता आली. शाळेतील हिरामण गुळवे, रवींद्र मालुंजकर या शिक्षकांनी अभ्यासासाठी वेळोवेळी जसे प्रोत्साहन दिले तसेच देशाच्या संरक्षण दलातून देशसेवा करण्याची प्रेरणाही दिसल्याचे वैभव अभिमानाने सांगतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपाशी विद्यार्थिनींचा ठिय्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांमध्ये भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी शासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या खात्यावर डीबीटीअंतर्गत सुविधांचे पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाची व्यवस्थित अंमलबजावणी न झाल्याचा फटका पेठ रस्त्यावरील आदिवासी विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींना बसला आहे. एकीकडे डीबीटीचे पैसेही खात्यावर जमा झालेले नाहीत तर दुसरीकडे वसतिगृहात जेवण पुरविणाऱ्या ठेकेदारासही मुदतवाढ देण्यात आली नाही. परिणामी, सलग तीन दिवस या विद्यार्थिनींची उपासमार झाली. अखेर विद्यार्थिनींनी एकत्र येत प्रकल्पाधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या देत कैफियत मांडली. यानंतर मात्र प्रशासनाला खडबडून जाग आली असून, याप्रकरणी चौकशी सुरू झाली आहे. या त्रुटी दूर करण्याचाही प्रयत्न आदिवासी विकास विभागाकडून सुरू झाला आहे.

या वसतिगृहात निवासी विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधांऐवजी या सुविधांचे पैसे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार अगोदर जेवण पुरविणाऱ्या ठेकेदाराचा जेवण पुरविण्याचा ठेका १६ जूनपर्यंत होता. हा ठेका संपल्यानंतरही ठेकेदाराने विद्यार्थिनींना २३ जूनपर्यंत जेवणाची सुविधा दिली. मात्र हे जेवण पुरविण्यासाठी मुदतवाढ न मिळाल्याने अखेरीस ठेकेदारास सुविधा बंद करावी लागली होती.

ठेकेदाराकडून जेवण

आदिवासी विद्यार्थ्यांनी प्रकल्प कार्यालयात येवून ठिय्या आदोंलन केल्यानंतर आदिवासी विभागाला जाग आली असून विभागाने ठेकेदारामार्फत जेवणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या मुलींना अखेर वसतिगृहात जेवण मिळाले आहे. परंतु, ठेकेदाराचे पैसे कसे अदा करायचे, हा वाद मात्र कायम राहिला आहे. ठेकेदाराने ३० जूनपर्यंत मुलींना जेवण द्यावे, असे निर्देश प्रकल्प कार्यालयाने ठेकेदाराला दिले आहेत. त्यामुळे तूर्तास मुलींची उपासमार टळली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जुगार अड्ड्यांवर शहर पोलिसांचे छापे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील पंचवटी, इंदिरानगर व भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीतील तीन जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापे टाकले. या कारवाईत १२ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केले आहे.

पंचवटीतील मालेगाव स्टॅण्ड परिसरात सिद्धी टॉवरमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पंचवटी पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी मंगळवारी (दि. २६) छापा टाकला़ तेथे बाळू पगारे व त्याचे चार साथीदार जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. दुसरी कारवाई इंदिरानगर पोलिस स्टेशन हद्दीतील वडाळागावात करण्यात आली़ सजरा गल्लीतील जुगार अड्ड्यावर दुपारच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला. संशयित शेख अब्दुल पठाण व त्याचे दोन साथीदार पत्त्यांवर जुगार खेळताना सापडले. या संशयितांकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. भद्रकालीतील ठाकरे गल्लीत पिंपळचौक परिसरातील जुगार अड्ड्यावरही पोलिसांनी कारवाई केली आहे. संशयित नीलेश शेलार व त्याचे तीन साथीदार ताडी दुकानाजवळील बोळीत मटका जुगार खेळताना आढळून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images