Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आठ मोठ्या शहरांत जुलैमध्ये विमानसेवा

$
0
0

'आयमा'च्या कार्यक्रमात खासदार गोडसे यांची माहिती

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधून देशातील इतर शहरात उद्योग, व्यवसाय निमित्ताने उद्योजक, व्यापारी व नागरिक यांना विमान सेवेद्वारे जलद गतीने जाता येता यावे, वेळेची बचत व्हावी व नाशिकचा विकास मोठ्या प्रमाणात घडवून यावा यासाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. आता जुलैपर्यंत नाशिकहून अजून विमानसेवा देशातील आठ मोठ्या शहरांशी जोडण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

विमानसेवा सुरू केल्यामुळे उद्योग व्यवसायवाढीस गती दिल्याबद्दल अंबड इंडस्टिॅज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन तर्फे खासदार गोडसे यांचा सत्कार झाला. यावेळी त्यांनी विमानसेवेबरोबरच रस्ते, इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब तसेच इतर विकासाच्या योजनांबाबत माहिती दिली. या सत्कार सोहळ्यात आयमा अध्यक्ष वरुण तलवार, जनरल सेक्रेटरी ललित बुब, आयमा सल्लागार समितीचे चेअरमन एस. एस. आनंद, सेमिनार समितीचे चेअरमन धनंजय दीक्षित, जेट एअरवेजचे किरण ताम्हणकर उपस्थित होते.

याप्रसंगी निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर व कार्यकारिणी सदस्य यांनीही खासदार गोडसे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी जेट अेअरवेजचे अनिल ताम्हणकर यांनी जेट अेअरवेज विषयी प्रोजेक्टरवर माहिती दिली. उद्योजकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच उद्योजकांनी जेट एअरवेजच्या सोयीसुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळे मनपाच्या ४४ नगरसेवकांची चौकशी

$
0
0

गैरवर्तवणूकप्रकरणी नगरविकासचे आदेश

म. टा. वृत्तसेवा, धुळे

धुळे महानगरपालिकेतील ४४ नगरसेवकांनी गैरवर्तवणूक, बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणप्रकरणी अपात्र ठरवून मनपा बरखास्त करण्याची मागणी शहराचे आमदार अनिल गोटे यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्या अनुषंगाने याबाबत चौकशी करून सरकारला अभिप्रायासह अहवाल सादर करण्याच्या सूचना नगरविकास विभागाने आयुक्त सुधाकर देशमुख यांना केली. याबाबत उपकुलसचिव शं. त्र्यं. जाधव यांच्या स्वाक्षरीचे पत्र मनपा प्रशासनास प्राप्त झाले आहे.

महापालिकेच्या दि. ३१ एप्रिल २०१६ रोजीच्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी अशोभनीय वर्तन करून तत्कालीन आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांच्यावर हल्ला केला होता. तसेच शहरात दि. १५ मे २०१४ रोजी महापालिकेने तत्कालीन उपमहापौर फारुख शहा हाजी अन्वर शहा यांचे सर्व्हे नं. ५७ ब वरील अतिक्रमण नियमित करण्याबद्दल ठराव केला होता. प्रत्यक्षात अशा ठराव करणे मनपासह सरकारच्या हिताविरुद्ध आहे. तसेच विनापरवानगी संबंधित भुखंड ३६ लाख १८ हजार रुपयात विक्रीसही काढला. यासह देवपूर सर्व्हे नं. २५ येथे जयहिंद ट्रस्टच्या जागेतून दर्शविण्यात आलेला १५ मीटर रुंदीचा डीपी रस्ता शहर विकास योजनेतून वगळण्याचा बेकायदेशीर निर्णय घेतला आहे, असे आमदार गोटे यांनी पत्रात नमूद केले होते. तत्कालीन आयुक्त संगीता धायगुडे यांच्यावरही अशाच प्रकारे हल्ला झाला होता. त्यामुळे महापालिकेच्या ४४ सदस्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबतही आमदार गोटेंनी निवेदन दिले होते. या निवेदनानंतर आलेल्या अहवालात नगरसेवकांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून महापालिका अधिनियम १९४९ च्या कलम ड चे सरळ उल्लंघन केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्याची दखल घेत मनपा आयुक्तांनी सरकारला अहवाल देत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे कळविले होते. मात्र, आता पुन्हा नगरविकास विभागाने मनपा आयुक्तांना दिलेल्या पत्रात संबंधित ४४ सदस्यांनी केलेली गैरवर्तवणूक, बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणाबाबत चौकशी करून स्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करावा, असे म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरपंचांसह ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

$
0
0

योजना निधी अपहाराचा प्रकार उघड

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिरपूर तालुक्यातील चाकडू ग्रामपंचायतीत विविध शासकीय योजनांच्या तब्बल ६७ लाख ६२ हजार रुपयांच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी सरपंच ठुमाबाई सुकाम मुखडे, तत्कालीन ग्रामसेवक रवींद्र नथ्थू तमखाने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात शिरपूर पंचायत समितीसमोर चाकडू ग्रामपंचायतीमधील गैरकारभाराविरुद्ध ग्रामस्थांनी दि. २४ जूनपासून जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. त्यांची दखल घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी शिरपूर पंचायत समितीकडून करण्यात आली नाही. उलट प्रकरणाच्या फेरतपासणीसाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली. त्यामुळे चाकडू ग्रामस्थ व प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीच्या प्रवेशद्वाराला ताळे ठोको आंदोलन केले. त्यामुळे अखेर जिल्हा परिषदेअंतर्गत करण्यात आलेल्या चौकशीअंती सरपंच आणि ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. चाकडू ग्रामपंचायत अंतर्गत सन २०१६ ते २०१८ या कालावधीत विविध शासकीय योजना, ग्रामनिधी सरकारकडून प्राप्त झालेला विकास कामांचा असा एकूण निधी ६७ लाख ६१ हजार ९९४ रुपयांचा स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी अपहार करून सरकारची फसवणूक केली. म्हणून शिरपूर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रेटा गुलजार पावरा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरपंच ठुमाबाई मुखडे व तत्कालीन ग्रामसेवक रवींद्र तमखाने यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात मंगळवारी (दि. २६) रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूने वाढविली धास्ती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने परिसरातील रहिवासी चांगलेच धास्तावले आहेत. परिसरातील काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांच्या भागातही डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढत असून, त्याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. डेंग्यूने त्रस्त असलेल्या नागरिकांची माहिती तरी घ्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.

सातपूर भागातील अशोकनगर येथे दर वर्षी डेंग्यूच्या आजाराचे अनेक रुग्ण आढळून येतात. यंदाही येथे डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, तरीही महापालिकेकडून केवळ नावालाच प्रबोधनाची मोहीम राबविण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महापालिकेच्या सातपूर प्रभागात असलेल्या कामगारनगर, अंबड लिंकरोड, सावरकरनगर, अशोकनगर, राधाकृष्णनगर, शिंदे मळा परिसर आदी भागातील असंख्य कामगारांच्या कुटुंबीयांना डेंग्यू अथवा डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे. परंतु, तरीही जिल्हा रुग्णालय अथवा महापालिकेचा आरोग्य विभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढतच आहे. सरकारी यंत्रणांकडून उपचारांबाबतही हलगर्जीपणा केला जात असल्याने दुखणे अन् औषधोपचाराच्या खर्चाने कामगार जेरीस आले आहेत. महापालिकेच्या मलेरिया विभागाने सातपूर भागात रस्त्यांवर साचलेल्या पाण्यांमध्ये औषध फवारणी करावी, अशी मागणी कामगारवर्गाकडून होत आहे.

जेसीबीतील पाण्यात अळ्या

अशोकनगर भागात असलेल्या दत्त मंदिर परिसरातील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर खासगी मालकीचा जेसीबी उभा करण्यात आलेला आहे. या जेसीबीत साचलेल्या पावसाच्या पाण्यात डासांच्या अळ्या असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची निर्मिती झाल्यास आसपास राहणाऱ्यांचे आरोग्यच धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. मात्र, यासंदर्भात तक्रारी करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरातील रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सातपूर भागात गेल्या काही वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे घरात पाणीसाठा करताना काय काळजी घ्यावी, याबाबत प्रबोधन केले जाते. मात्र, असे असतानादेखील साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होणाऱ्या डासांमुळे डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण परिसरात मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.

-डॉ. क्रांतिवीर म्हसदे, सातपूर

अचानक थंडीतापाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात रक्त तपासणी केली असता डॉक्टरांनी डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे सांगितले. घराजवळ असलेल्या पावसाळी पाण्याच्या ढाप्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने डेंग्यूचे डास निर्माण होत असावेत. महापालिकेच्या संबंधित विभागाने याप्रश्नी लक्ष घालावे.

-कल्पना पिंगळे, अशोकनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंत्यसंस्कारासाठी लाकडाऐवजी गोवऱ्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या माध्यमातून शहरातील स्मशानभूमीत राबविण्यात येत असलेल्या मोफत अंत्यसंस्कार योजनेसाठी आता लाकडाऐवजी गोवऱ्या वापरल्या जाणार आहेत. महापालिकेचे सभागृहनेते दिनकर पाटील यांच्या पत्रावरून फेब्रुवारीच्या महासभेत ठराव संमत करण्यात आला आहे. सदरील ठराव हा अशासकीय असल्याने त्याची अंमलबजावणी प्रशासन करणार काय, याबाबत आता उत्सुकता लागून आहे.

महापालिका क्षेत्रात सहाही विभागात स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर होतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड केली जाते. परिणामी पर्यावरणाचा समतोल ढासळू लागला आहे. प्रदूषण व तापमानात वाढ होत आहे. त्यास पर्याय म्हणून अंत्यसंस्कार समयी लाकडाऐवजी गोवऱ्यांचा वापर केल्यास वृक्षतोड थांबेल. पर्यायाने प्रदूषण व तापमानात होणारी वाढही कमी होईल. त्याचप्रमाणे गोवऱ्या दहन केल्याने वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. बचत गटांच्या माध्यमातून या गोवऱ्या खरेदी केल्यास अनेक बेरोजगारांना रोजगारही उपलब्ध होईल, अशा आशयाचा अशासकीय प्रस्ताव सभागृहनेते पाटील यांनी फेब्रुवारी २०१८ मधील महासभेवर सादर केला होता. हा प्रस्ताव व्यवहारिक व कमी खर्चाचा तसेच पर्यावरणासाठी उपयुक्त असल्याचा दावाही पाटील यांच्याकडून करण्यात आला होता. या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे. आता प्रशासन या प्रस्तावाची कितपत अंमलबजावणी करते हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन हजार पोलिसांचे सर्व्हिस बुक डिजिटल

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक: सरकारी नोकरीत सर्व्हिस बुक फार महत्त्वाचे असते. यावर कर्मचाऱ्याची पदोन्नती, निवृत्तीनंतरचे मिळणारे लाभ अवंलबून असतात. मात्र, हे पुस्तक स्वरुपात असल्याने त्यात गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी तीन हजार ३६ पोलिस कर्मचाऱ्यांच्या सर्व्हिस बुकची डिजिटल नोंद केली आहे.

सर्व्हिस बुक नसेल तर कर्मचाऱ्यांचे आयुष्यच बर्बाद होते. सर्व्हिस बुकमध्ये पोलिस कर्मचाऱ्यास मिळणारे पुरस्कार, झालेली शिक्षा, बदल्यांचे ठिकाण, पदोन्नती अशी सर्व बारीकसारीक माहिती असते. हे सर्व लेखी स्वरुपात असते. यामुळे काही पाने गहाळ होणे किंवा जाणीवपूर्वक गहाळ करणे, तसेच सर्व्हिस बुक बेपत्ता होणे असे प्रकार घडू शकतात. नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात असा प्रकार काही वर्षांपूर्वी घडला होता. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची डिजिटल स्वरुपात नोंद करून घेतली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले की, असे काम करणारे नाशिक शहर पोलिस राज्यात पहिलेच आहेत. सर्व्हिस बुक व्यवस्थित असणे हे कर्मचाऱ्यासाठी तसेच प्रशासनासाठी फार महत्त्वाचे आहे. सर्व्हिस बुकची नोंद एका क्लाउडवर करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात केव्हाही गरज लागल्यास सर्व्हिस बुक उपलब्ध असणार आहे. तसेच नव्याने भरण्यात येणारी माहितीदेखील त्यात अपडेट करणे सोपे होणार आहे. अधिकाऱ्यांच्या सर्व्हिस बुकची नोंद आयुक्तालय स्तरावर होत नाही. मात्र, एक नोंद व्हावी म्हणून अधिकाऱ्यांच्या सर्व्हिस बुकदेखील क्लाउडवर अपलोड करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले.

स्टोअर रूमचा बदलला चेहरा

लेखा, आस्थापना, विभागीय चौकशी, गुन्हे आदी विभागाची महत्त्वाची कागदपत्रे असतात. या विभागांची माहिती वर्षानुवर्षे जतन करावी लागते. यापूर्वी अशा फाइल्स गाठोड्यात भरून स्टोअर रूममध्ये भरून ठेवल्या जात होत्या. यामुळे महत्त्वपूर्ण कागदपत्रांची हेळसांड होत होती. आता येथे मोठमोठी कपाटे तयार करण्यात आली असून, त्यात विभाग आणि वर्षांनुसार कागदपत्रे जमा केली जात आहेत.

सद्भावना कँटिन कॅशलेस

शहर पोलिसांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या सद्भावना कँटिनमधील व्यवहार नुकतेच कॅशलेस करण्यात आले आहेत. याठिकाणी येणाऱ्या ग्रामीण आणि शहर पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना कार्डद्वारेच पेमेंट करावे लागते. यामुळे आर्थिक व्यवहार पारदर्शक होण्यास मदत मिळते.

(समाप्त)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेवा पुन्हा सुरू करणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तांत्रिक कारणांमुळे राज्यभरातील खंडित झालेली विमानसेवा येत्या १० ते १५ दिवसात पुन्हा सुरू करण्याचा खुलासा एअर डेक्कन कंपनीने केला आहे. विविध प्रकारच्या अडचणींना कंपनीला तोंड द्यावे लागत आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

उडान सेवेसाठी मुंबई हे केंद्र असेल असे सांगण्यात आले. मात्र, मुंबईत कुठलीही सुविधा देण्यात आली नाही. अशा स्थितीतही कंपनीने नाशिकला केंद्र बनवून सेवा सुरू केली. त्यातही अनेक अडचणी आल्या. नाशिकमध्ये विमानांसाठी हँगर उपलब्ध नाही. मुंबईत रात्री पार्किंग उपलब्ध नाही. वेळेचाही तेथे विषय आहेच. देशात वैमानिकांची कमतरता आहे. वैमानिकांना लागणाऱ्या विविध प्रकारच्या परवानग्या वेळेत मिळत नाहीत, त्यामुळे वैमानिक सेवेत उपलब्ध होत नाहीत. विविध अडथळे दूर करण्याबाबत हवाई वाहतूक मंत्रालयाने आश्वासन दिले आहे. त्यामुळे येत्या १० ते १५ दिवसात महाराष्ट्रातील सर्व सेवा पुन्हा कार्यन्वित करु, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. कंपनीच्या अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ही सर्व माहिती प्रसारित केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भय्यूजी महाराज यांचा मोक्षविधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

राष्ट्रसंत भैय्यूजी महाराज यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी (दि. २८) नाशिकरोड येथील मुक्तिधाममध्ये मोक्षविधी केला. याप्रसंगी भैय्यूजी महाराजांचे इंदूरसह नाशिक शहरातील शिष्यगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरुवारी सकाळी आठ वाजता नवनाथ संप्रदायाच्या परंपरेप्रमाणे भैय्यूजी महाराजांच्या कुटुंबीयांनी नवनाथ सिद्धी अनुष्ठान विधी केला. त्यानंतर दत्तात्रय पूजन करण्यात आले. नवग्रह शांती विधीही पार पडला. त्यानंतर मोक्षदेवता विष्णू पूजन आणि शेवटी प्रभू रामचंद्र पूजन करण्यात आले. दुपारी १२.२७ वाजता हा विधी पूर्ण झाला. हा विधी भैय्यूजी महाराजांचे शिष्य विनायक यांनी केला. याप्रसंगी भैय्यूजी महाराजांच्या पत्नी डॉ. आयुषी शर्मा यादेखील उपस्थित होत्या. मोक्षविधीचे पौरोहित्य त्र्यंबकेश्वरच्या आनंद आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी अनिकेत आनंद महाराज आणि मुक्तिधामचे पंडित नागेशशास्त्री देशपांडे यांच्यासह इतर ब्रह्मवृंदांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकच्या तरुणीचा युकेमध्ये करिश्मा

$
0
0

७० वर्षांतील पहिलाच पुरस्कार पटकाविला

१५ वर्षांपासून अखंड रुग्णसेवा

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : jitendratarte@MT

नाशिक : युकेच्या आरोग्यसेवेतील विशेष योगदानासाठी ज्या बाहेरील देशांमधील सेवाभावी कर्मचाऱ्यांना ७० वर्षांच्या काळात युके सरकारकडून पहिल्यांदाच गौरविण्यात आले त्या कर्मचाऱ्यांमध्ये नाशिकच्या तरुणीचा समावेश आहे. कश्मिरा निवृत्ती आंधळे या पस्तीशीपार फिजीओथेरपिस्ट महिलेचा गौरव त्यांच्या अखंड सेवाकार्याबद्दल युके सरकारच्या वतीने करण्यात आला. नुकत्याच झालेल्या एका सोहळ्यात तेथील पंतप्रधान थेरेसा मे यांच्या हस्ते नाशिकच्या करीश्मा यांना गौरविण्यात आले.

युकेमध्ये १९४८ च्या दरम्यान स्थापन झालेल्या 'नॅशनल हेल्थ स्कीम' (एनएचएस) च्या सत्तराव्या वर्षपूर्तीनिमित्त युके सरकारच्या वतीने संस्थेच्या स्थापनेपासून प्रथमच या प्रकारे गौरव समारंभाचे आयोजन केले होते. युकेच्या वैद्यकीय क्षेत्रात विशेष योगदान देणाऱ्या अश्वेत व अल्पसंख्यांक वंशाच्या दहा व्यक्तींची या गौरवासाठी निवड करण्यात आली होती. वैद्यकीय क्षेत्रांतर्गत दहा उपविभाग करण्यात आले होते. यामध्ये फिजीओथेरपिस्ट म्हणून इंग्लंडमध्ये १५ वर्षांपासून योगदान देणाऱ्या कश्मिरा आंधळे यांची निवड करण्यात आली होती. त्यांना तेथील सरकारने 'वाईंडरश ७०' या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित केले. 'एनएचएस'मध्ये दीर्घकाळ योगदान देणाऱ्या जगभरातील दहा देशातील सदस्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. यामधून कश्मिरा या मूळ नाशिकच्या कॉलेजरोड परिसरातील रहिवासी आहेत. युकेतील ईस्ट बर्कशायर येथे त्या २००३ मध्ये स्थायिक झाल्या. त्यांचे पती निवृत्ती सांगळे हे तेथे सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून कार्यरत आहेत.

गौरव देशासाठी अभिमानास्पद

अठरा महिन्यांच्या दिव्यांग बालकांपासून तर जर्जर अवस्थेतील ज्येष्ठ नागरीकांपर्यंत सर्व प्रकारच्या रुग्णांसाठी कश्मिरा यांनी आजवर दिलेल्या अखंड सेवाकार्याचा विचार या पुरस्कारासाठी करण्यात आला. जगभरातील नामांकीत वैद्यकीय तज्ज्ञ एनएचएसमध्ये योगदान देत असताना भारतीय आणि मूळ नाशिकच्या तरुणीचा झालेला गौरव देशासाठी अभिमानास्पद असल्याचे तिचे वडील अॅड. ललित सांगळे आणि निवृत्ती मुख्याध्यापिका मीना सांगळे यांनी 'मटा' शी बोलताना म्हटले आहे. कश्मिरा या आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त भरत आंधळे यांच्या वहिनी आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपनगर परिसरातील अतिक्रमणे हटविली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

उपनगर येथील म्हसोबा मंदिराजवळील फेरीवाले व भाजीविक्रेत्यांवर गुरुवारी सायंकाळी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई केली. या कारवाईत विक्रेत्यांचे हातगाडे, फळे, भाज्या जप्त करण्यात आल्या.

उपनगरच्या या रस्त्यावर नवीन निवासी इमारती झाल्या आहेत. त्यामुळे येथील लोकवस्ती वाढली आहे. या नागरिकांसाठी उपनगर बाजारात भाजीमंडई आहे. परंतु, तेथे पूर्वीप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याने भाजीविक्रेते रस्त्यावर बसू लागले आहेत. म्हसोबा मंदिर रस्त्यावर भाजी व फळविक्रेत्यांबरोबरच अन्य व्यावसायिकांनीही बस्तान मांडल्याने वाहतुकीला अडथळा होत होता. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने गुरुवारी पोलिसांच्या बंदोबस्तात कारवाई केली. नारायणबापू चौकाजवळील होली फ्लॉवर शाळेच्या रस्त्यावरही भाजी व अन्य विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. मात्र, महापालिकेचे पथक येथे येण्याआधीच या रस्त्यावरील विक्रेते पसार झाले. परंतु, महापालिकेने येथे कारवाई केली नाही. भाजीविक्रेत्यांना मकरंद कॉलनीशेजारील मैदानात, तसेच उपनगर नाक्यावर नो हॉकर्स झोनमध्ये जागा देण्यात आली आहे. परंतु, ते तेथे न बसता म्हसोबा मंदिर व होली फ्लॉवर शाळेच्या रस्त्यावर बस्तान मांडत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे महापालिकेला कारवाई करावी लागली. या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

--

२ कॉलम (फोटो आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंद्रकांत गोडसे यांना राज्याचा वनश्री पुरस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

शहराच्या पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेत गेली पाच वर्षे स्वखर्चातून देवळाली कॅम्पमध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून वृक्षारोपण करून झाडांचे संगोपन करीत सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेल्या चंद्रकांत गोडसे यांना राज्य सरकारचा सामाजिक वनीकरण विभागाचा मानाचा समजला जाणारा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

चंद्रकांत गोडसे यांनी देवळालीच्या विविध भागात वेळोवेळी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनास चालना दिली आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे लामरोड, भैरवनाथ मंदिर परिसर, तसेच देवळालीतील अनेक ठिकाणे हिरवाईने बहरत आहेत. वृक्ष लागवड आणि संवर्धन करताना त्यांनी प्रत्येक झाडासाठी स्वखर्चातून ट्री गार्ड बसविले आहेत. शिवाय स्वतःच्या खर्चातून उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई असताना टँकरद्वारे दिवसाआड न चुकता पाणीपुरवठा केला आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या नावे त्यांनी संपूर्ण शहरात वृक्षारोपण करीत गेल्या पाच शेकडो झाडे जगविली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य सरकारच्या सामाजिक वनीकरण विभागाने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. राधास्वामी सत्संग व्यास, मुरबाड-कल्याण मार्ग येथे दि. १ जुलै रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वने तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचे खासदार हेमंत गोडसे, आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, भगूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सचिन मराठे, माजी खासदार राजाभाऊ गोडसे, नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड, विलास शिंदे, अजय बोरस्ते आदींसह देवळालीतील लोकप्रतिनिधी, पर्यावरणप्रेमी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक संघटनांतर्फे स्वागत करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंगापूर पोलिसांकडून पाच गुन्ह्यांची उकल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर पोलिसांनी सराईत धरपकड करीत पाच गुन्ह्यांचा उलगडा केला. या कारवाईत सात संशयितांना ताब्यात घेत पोलिसांनी तीन लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात बुलेटसह दोन दुचाकी, मोबाइल आणि सोन्या-चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे.

गंगापूर हद्दीत ७ जून रोजी लुटमारीचा प्रकार घडला होता. गुन्हा दाखल करीत पोलिसांनी तपास करून जितेंद्र मधुकर फसाळे (२०), उत्तम मुरलीधर फसाळे (२०) आणि किरण गंगाराम फसाळे (१९, तिघे रा. गंगाम्हाळूंगी, ता. जि. नाशिक) यांना ताब्यात घेतले. संशयितांनी दुचाकीसह (एमएच १५ जीएच ८५६५) मोबाइल असा सुमारे एक लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला. दरम्यान, १५ जून रोजी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात पोलिसांनी संतोष केरबा कांबळे (३५) आणि प्रमोद बाळाजी पाडदे (२१ दोघे रा. नांदेड) या जोडगोळीला अटक करून त्यांच्याकडून ३० ग्रॅम सोन्याची लड आणि मोबाइल असा सुमारे ८८ हजाराचा ऐवज जप्त केला. सोमवारी (दि.१७) दाखल गुन्ह्यात सिद्धेश बाळासाहेब आहेर (२० रा. वडनेर भैरव) याच्या ताब्यातून बुलेट (एमएच १५ एफके ५०३५)तर जगदीश आप्पा जाधव (२१, रा. नरखेड-मेहुनबारे ता. चाळीसगाव) याच्याकडून दुचाकी (एमएच १५ अ‍ेएफ ५००२) जप्त करण्यात आली. ही दुचाकी संशयितांनी वडनेर भैरव पोलिस स्टेशन हद्दीतून चोरली आहे.

वरिष्ठ निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक समीर वाघ, एएसआय अनिल बागूल, हवालदार विष्णू उगले, माणिक गायकर, पोलिस नाईक दत्तू गायकवाड, शिपाई नितीन नेटारे, तुषार देसले, केशव ढगे, घनश्याम भोये, तुळशीदास चौधरी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखी फोटो

शाळा-पालक वाद विकोपाला

$
0
0

विस्डम हायस्कूलमधील फी वाढीवर सूचनेनंतरही तोडगा नाहीच

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल प्रशासन आणि पालक सुषमा गोराणे यांच्यात तीन वर्षांपासून फीवाढीवरून सुरू असलेला वाद विकोपाला गेला आहे. शाळा प्रशासन व पालक दोघेही आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने हा वाद मिटण्याऐवजी आणखी चिघळला आहे. याचीच प्रचिती गुरुवारी पुन्हा आली. सकाळी आठपासून दुपारी एक वाजेपर्यंत गोराणे यांच्याकडून आपल्या पाल्याला वर्गात बसू देण्याची मागणी करण्यात आली. परंतु, शाळेने त्यांना जुमानले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

सुषमा गोराणे यांची दोन्ही मुले गंगापूर रोडवरील विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होती. यातील मोठ्या मुलाला शाळेतून त्रास होत असल्याच्या कारणास्तव गोराणे यांनी गेल्या वर्षी शाळेतून काढून घेतले. मात्र, २०१५ पासून शाळेने केलेल्या फी वाढीविरोधात सुरू केलेले बंड त्यांनी सुरुच ठेवले आहे. त्यांचा लहान मुलगा अद्याप या शाळेत शिक्षण घेत असला तरी त्याचीही दोन वर्षांपासून फी त्यांनी भरलेली नाही. परिणामी, विस्डम प्रशासनाने त्याचा दाखला गोराणे यांना दिला आहे. शाळा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, गोराणे या शाळेची बदनामी करत असून मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यापर्यंत जाऊन शाळेला फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत. गोराणे यांनी फीदेखील भरू नये व दाखला घेऊन दुसऱ्या शाळेत प्रवेश करावा, असे सांगितले. तरी त्या वाद मिटवत नसल्याने हैराण झाले असल्याचे मत शाळा प्रशासन व्यक्त करीत आहे.

गोराणे यांनी त्यांच्या पाल्याची दोन वर्षांपासून फी भरलेली नाही. शिवाय, शाळेला या ना त्या कारणांनी बदनाम करणे सुरू आहे. आमच्या संस्थेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना आज विनाकारणच कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. हायकोर्टाच्या नियमाप्रमाणे एक वर्षापेक्षा जास्त काळ होऊनही एखाद्या विद्यार्थ्याची फी भरण्यात आली नसेल तर त्या विद्यार्थ्याला दाखला देण्याचा अधिकार आहे. असे असतानाही शाळेने त्याला आतापर्यंत बसू दिले. मात्र, गोराणे यांच्याकडून कोणतेही सहकार्य लाभत नसून आमच्या शाळेची बदनामी करण्याचे कारस्थान त्यांनी रचले आहे. अनेक पालकांनीही गोराणे यांच्या पाल्याविरोधात आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत.

- मनीष अग्रवाल, विश्वस्त,

विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल

शाळा व्यवस्थापन माझ्याबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी पसरवत आहे. माझा बेकायदेशीर फी भरण्यास विरोध असून कायद्यानुसार फी भरायला मी तयार आहे. परंतु, शाळा मला गेटमध्ये प्रवेशही करू देत नाही. फी भरण्याविषयी विचारणा केल्यास उत्तरे दिली जात नाही. माझ्या मोठ्या मुलाला या शाळेने त्रास दिला; आता लहान मुलाचा निकालही देत नाही. शिवाय, त्याला वर्गातही बसू देत नाही. शिक्षण उपसंचालकांनी वारंवार सूचना देऊनही शाळा कोणताही प्रतिसाद देत नसून गुरुवारीही आम्हाला सकाळी ८ वाजेपासून १ वाजेपर्यंत गेटबाहेर उभे ठेवले.

- सुषमा गोराणे, पालक

विस्डम हाय इंटरनॅशनल स्कूल आणि पालक दोघे मागे व्हायला तयार नसल्याने त्यांच्यातीत वाद विकोपाला गेला आहे. शाळेलाही तीन वेळा नोटीस देऊन विद्यार्थ्याला बसविणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, दोघांकडून कोणतीही सामंजस्याची भूमिका घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे.

- नितीन उपासनी,

प्रशासनाधिकारी, महापालिका शिक्षण विभाग

शाळांच्या फीसंदर्भात कायद्यातच अनेक त्रुटी आहेत. कित्येक शाळांनीही अद्याप व्यवस्थित फी ठरवलेली नाही. शाळा व्यवस्थापनांकडून कोर्टाचे नियम दाखवले जातात; पण काही नियम हे कोर्टाने ठराविक शाळांपुरतेच दिलेले असतात, हे लक्षात घ्यायला हवे. फीबाबत शाळा आणि पालक यांच्यातील वादावर तोडगा निघत नाही, हे व्यवस्थेचे अपयश आहे.

- डॉ. मिलिंद वाघ, शिक्षण बाजारीकरण विरोधी मंच

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एचएएल’कडून तपास सुरू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुखोई ३० एमकेआय या विमानाच्या झालेल्या दुर्घटनेची हिन्दुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कडून सखोल चौकशी सुरू झाली आहे. त्यासाठी विशेष पथक निर्माण करण्यात आले आहे. सध्या विमानाचे विविध अवशेष गोळा करण्यावर 'एचएएल'ने भर दिला आहे.

'एचएएल'कडून निर्माण करण्यात आलेले आणि हवाई दलास सुपूर्द करण्यास सज्ज असलेल्या सुखोई ३० एमकेआय या विमानाच्या काही अखेरच्या चाचण्या घेतल्या जात होत्या. 'एचएएल'चे लढाऊ विमान बुधवारी (दि. २७) सकाळी धावपट्टीवरून हवेत झेपावल्यानंतर त्याने काही फेऱ्या मारल्या आणि अचानक त्यात तांत्रिक बिघाड झाला. ही बाब लक्षात आल्यानंतर वैमानिक आणि सहवैमानिकाने इमर्जन्सीसाठी असलेले बटण दाबले आणि आसनासह ते विमानाच्या खाली आहे. तत्क्षणी पॅराशूट उघडले आणि हे दोन्ही जण जमिनीवर सुखरुप आले. मात्र, विमानाला आग लागली आणि ते शेतात जाऊन कोसळले. विमानाचे विविध सुटे भाग इतस्तत: पसरले आणि जवळपास ८० टक्के विमान जळून खाक झाले. सुखोई विमानाचा गेल्या १६ वर्षांतील हा पहिलाच अपघात आहे. त्यामुळे 'एचएएल'ने याची गंभीर दखल घेतली आहे. सद्यस्थितीत विमानाचे विविध अवशेष गोळा करण्यावर भर दिला जात आहे. सखोल चौकशीसाठी आवश्यक असलेला ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. 'एचएएल'ने एक पथक नेमले आहे. याद्वारे ही चौकशी केली जाणार आहे. सर्वप्रथम वैमानिक आणि सहवैमानिक या दोघांची चौकशी केली जाणार आहे. चाचणीवेळी त्यांना आलेला अनुभव, विमानात काय बिघाड झाला होता, विमानात काय सुधारणा हवी आहे, याबाबत त्यांची चौकशी होणार आहे.

हलगर्जी कुठे झाली?

ओझर 'एचएएल'मध्ये यंदा तयार झालेले हे पहिलेच लढाऊ विमान होते. त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते आहे. असे असतानाही अपघात झाल्याने या विमानाची जुळणी कधी आणि केव्हा झाली, विविध भाग जोडण्यात आले त्याचे प्रमाणपत्र, संबंधित विभागांनी मारलेले शेरे, सूचना, विविध भागांची जुळणी आदींबाबत चौकशी सुरू झाली आहे. कुठल्या टप्प्यात काही हलगर्जी झाली का, हे सुद्धा यानिमित्ताने पाहिले जात आहे.

ब्लॅक बॉक्सची तपासणी

संरक्षण विभागाच्या क्वालिटी अॅश्युअरन्स महासंचालक या विभागाचे वरिष्ठ अधिकारीही लवकरच नाशकात दाखल होणार आहेत. त्यांच्याकडून ब्लॅक बॉक्सची पाहणी आणि त्याद्वारे संशोधन केले जाणार आहे. त्यात या अपघाताची योग्य कारणे समोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पान-१ साठी

$
0
0

किशोर दराडे आघाडीवर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षण मतदारसंघासाठी विक्रमी मतदान झाल्याने उत्सुकता लागलेल्या या मतमोजणीत टीडीएफमधील फाटाफुटीचा फायदा शिवसेना पुरस्कृत किशोर दराडे यांना मिळाला असून, त्यांनी पहिल्या फेरीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संदीप बेडसे यांच्यावर ५,९१६ मतांनी आघाडी घेतली. मात्र, विजयासाठी आवश्यक असलेला २३ हजार ९९० मतांचा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण न करू शकल्याने दुसऱ्या पसंतीची मते मोजण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. विजयासाठी आता दुसऱ्या क्रमांची मतेच निर्णायक ठरणार आहेत.

मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर दराडे यांना सर्वाधिक १६,८८६ मते मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीचे बेडसे यांना १०,९७० मते मिळाली. भाजपचे अनिकेत पाटील ६,३२९ मते घेऊन तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले, तर टीडीएफचे भाऊसाहेब कचरे ५,१६७ मतांसह चौथ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे दराडे यांनी एकूण मतांमध्ये जवळपास ५,९१६ मतांनी आघाडी घेतली. दराडे यांना सर्वाधिक मते मिळाली असली तरी विजयासाठी आवश्यक असलेला कोटा त्यांना पूर्ण करता आला नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या पसंतीच्या मतांची मतमोजणी सुरू करण्यात आली आहे.

संबंधित वृत्त...३

कोकणात डावखरेंची आघाडी

ठाणे : कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचा अंतिम निकाल गुरुवारी रात्री उशिरापर्यंत लागू शकला नव्हता. पहिल्या पसंतिक्रमाच्या मतमोजणीत भाजपचे निरंजन डावखरे यांनी आघाडी घेतली होती. ७४ हजारांपैकी पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये ५६ हजार मतांची मोजणी झाली होती. त्यात डावखरे यांना २१ हजार ४६७, तर शिवसेनेच्या संजय मोरे यांना १८,५१९ मते मिळाली. राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांना १२ हजार मते मिळाली होती. विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये कुणालाही ओलांडता येणार नाही हे स्पष्ट झाल्याने निवडणुकीचा निकाल दुसऱ्या पसंतीच्या मतांवर गेला होता.

पहिल्या पसंतीच्या मतांची मोजणी झाल्यानंतर जी वैध मते ठरतील त्याच्या निम्म्याहून एक मत अधिक मिळविणारा उमेदवार विजयी होणार आहे. पहिल्या पसंतीत ही मते कुणालाही मिळाली नाही. त्यामुळे सर्वांत कमी मते मिळालेल्या उमेदवारांच्या (चढत्या क्रमानुसार) मतपत्रिकेवरील दुसऱ्या पसंतीची मते हस्तांतरित केली जातील. त्यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा जो सर्वांत पहिल्यांदा पूर्ण करेल त्या उमेदवाराला विजयी घोषित केले जाईल. तीन प्रमुख उमेदवारांव्यतिरीक्त अन्य उमेदवारांना मिळालेल्या मतांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला यांच्या मतपत्रिकांवरील दुसऱ्या क्रमांकाच्या मतांवर विजयाची भिस्त अवलंबून आहे. पहिल्या पसंतीत डावखरे यांना मिळालेल्या आघाडीच्या जोरावर त्यांना विजयाची सर्वाधिक चिन्हे दिसत आहे. मात्र, दुसऱ्या पसंतीत काही चमत्कार घडल्यास हे पारडे बदलू शकते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

$
0
0

आत्महत्येच प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नांदगाव तालुक्यातील मूळडोंगरी येथील दोन महिलांच्या बुडून मृत्यूप्रकरणी नांदगाव पोलिसांनी बुधवारी रात्री महिलांच्या सासरच्या लोकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

तालुक्यातील मूळडोंगरी येथे २६ जून रोजी वाल्याबाई मोरे व सुमन मोरे या दोघी जावांचा विहिरीत पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी नांदगाव पोलिस ठाण्यात आधी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र महिलांचे मामा बाबूलाल कारंडे यांनी आपल्या दोन्ही भाचींचा माहेरून ६० हजार रुपये आणावे यासाठी सासरच्या लोकांनी शारीरिक, मानसिक छळ केला. त्यामुळे या छळाला कंटाळून दोघींनी विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची फिर्याद बुधवारी नांदगाव पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी तानाजी मोरे, काळू मोरे, आत्माराम मोरे, बाळू मोरे, साखराबाई मोरे, महादू मोरे, सीताराम मोरे, गजु मोरे या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

00

तरुणाची आत्महत्या

मनमाड : चांदवड येथे २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी डावखरनगर भागात घडली. कृष्णा बाळू म्हस्के असे

मयत तरुणाचे नाव असून, त्याने गुरुवारी दुपारी राहत्या घरी पंख्याला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. चांदवड पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषी सहाय्यकाने परस्पर विकले बियाणे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

तालुक्यातील शेतकऱ्यांना मका प्रात्यक्षिक प्रकल्पांतर्गत महाबीजकडून मोफत वितरित होणारे २ क्किंटल मका बियाणे कृषी सहाय्यकाने परस्पर एका व्यापाऱ्याला व काही शेतकऱ्यांना २०० रुपये प्रतिकिलोप्रमाणे विकल्याचा धक्कादायक प्रकार पिंपळकोठेचे सरपंच किशोर भामरे यांनी उघडकीस आणला आहे.

हे प्रकरण अंगलट येणार असल्याचे दिसू लागताच संबंधित कृषी सहाय्यक के. आर. पीठे यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र पिंपळकोठेचे सरपंच किशोर भामरे यांनी हा घोटाळा बाहेर आणला आहे.

राज्य शासनाकडून कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महाबीजकडून प्रत्येकी दोन किलो मका बियाणे मका वितरित केले जात आहे. बागलाण तालुक्यातील पिंपळकोठे गावाच्या सरपंचांनी दिलेल्या माहितीनुसार गावाला याच योजनेतून २ क्किंटल मका बियाणे आले होते. मात्र कृषी सहाय्यक पीठे यांनी हे मका बियाणे शेतकऱ्यांना मोपत न वाटप करत पिंपळकोठे येथील काही शेतकरी व एक बियाणे विक्रेत्यांशी परस्पर व्यवहार करून विकले.

कृषी सहाय्यक पीठे यांच्या मका बियाणे घोटाळा सरपंच किशोर भामरे यांनी उघडकीस आणताच घोटाळेबाज कृषी सहाय्यकाने त्यांना आर्थिक आमीष दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र भामरे यांनी आमिषाला बळी न पडता हा मका घोटाळा प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बोलावून उघडकीस आणला आहे. सदरचा घोटाळा पिंपळकोठे गावापुरता मर्यादीत नसून, या घोट्याळ्याशी व्याप्ती संपूर्ण तालुकाभर असल्याची शक्यता सरपंच भामरे यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उच्चशिक्षितांकडून वाहनचोरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातून वाहने चोरी करणाऱ्या आणि धुळे जिल्ह्यात त्यांची विक्री करणाऱ्या चौघांना शहर पोलिसांच्या क्राइम ब्रँच युनिट दोनच्या पथकाने शिताफीने अटक केली. हे चौघे सुशिक्षित असून, यातील एक संशयित बी. एस्सीच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेतो. या टोळीचा मुख्य सूत्रधार फरार असून, संशयितांकडून पोलिसांनी १५ दुचाकी जप्त केल्या.

आकाश अशोक मराठे (मूळ रा. धुळे, हल्ली सिद्धेश्वर मंदिरासमोर, महाराणा प्रताप चौक, सिडको), उमेश उर्फ पप्पू युवराज मोरे (रा. मोहाडी, उपनगर, दंडेवाले बाबानगर, तिखी रोड, धुळे), शरद भरत बुवा (रा. शिरपूर, वाडीगाव, धुळे) आणि राहुल सुभाष वाघ (रा. फुलेनगर, शिंगावे गाव, ता. शिरपूर, धुळे) अशी या चौघांची नावे आहेत. या टोळीचा मुख्य सूत्रधार भुसावळ येथील असून, तो सध्या फरार आहे. यातील मराठे आणि बुवा हे डीएमएलटी झालेले, तर उमेश मोरे याने इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केलेला आहे. राहुल वाघ हा बी. एस्सीच्या दुसऱ्या वर्गात शिकतो आहे.

मूळचा धुळ्याचा असलेला आकाश काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये नातेवाइकांकडे राहायला आला होता. त्याची ओळख भुसावळ येथील फरार आरोपीबरोबर होती. त्याने वाहनचोरी कशी करायची आणि त्यातून कसा पैसा मिळतो, याची माहिती मराठेला दिली. यानंतर या दोघांनी रमेश मोरे याला सोबत घेऊन शहरात ठिकठिकाणी तसेच धुळे, चाळीसगाव आणि गुजरात राज्यातही वाहनांची चोरी केली. चोरलेल्या वाहनांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी राहुल आणी शरद पाहत होते. यातील आकाशबाबात पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार युनिट दोनच्या पथकाने त्यास काठेगल्ली येथून दोन दिवसांपूर्वी अटक केली. यानंतर उर्वरित टोळीचा छडा लागला. ही मुले सराईत नाहीत. मात्र, वाहनचोरीनंतर मिळणाऱ्या पैशांमुळे एकामागून एक गुन्हे करीत गेले.

याबाबत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की संशयितांकडून १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पाचव्या संशयितास अटक झाल्यानंतर आणखी काही वाहने जप्त होतील. मागील महिन्याभरात शहर पोलिसांनी या १५ वाहनांसह ६३ पेक्षा अधिक वाहने जप्त केली आहे. पत्रकार परिषदेला उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अशोक नखाते, युनिटचे निरीक्षक दिनेश बर्डेकर उपस्थित होते. ही कारवाई सहायक निरीक्षक अभिजीत सोनवणे, पीएसआय रवींद्र सहारे, महेश इंगोले, विजय लोंढे, एएसआय राजेंद्र जाधव, हवालदार श्रीराम सपकाळ, रमेश घडवजे, शामराव भोसले, गुलाब सोनार, राजाराम वाघ, अन्सार सैय्यद, पोलिस नाईक संजय ताजणे, देवकिसन गायकर, मोतीलाल महाजन, परमेश्वर दराडे, नितीन भालेराव, ललिता आहेर, योगेश सानप, बाळा नांद्रे, महेंद्र सांळुखे, याद डंबाळे, पोलिस शिपाई जयंत शिंदे, विजय पगारे, संतोष ठाकुर, मधुकर साबळे आदींनी केली.

लॉक सिस्टिम महत्त्वाची

शहरातील बहुतांश वाहनचोरीच्या घटना पार्किंगमध्ये घडतात. सुरक्षित वाटणारे ठिकाणच दगा देते. मुळात नवीन अथवा जुन्या कोणत्याही वाहनांचे हँडललॉक तितके मजबूत नसते. एक जोराचा झटका दिल्यानंतर हँडललॉक उघडते. त्यानंतर चोरटे वाहन स्टार्ट करण्यासाठी वायरी जोडून ते डायरेक्ट करतात व पसार होतात. यासाठी वाहनाला फ्रंट लॉक अथवा इतर मजबूत लॉक सिस्टिमची गरज असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

स्वत:च्या नंबर प्लेटचा वापर

यातील संशयित आरोपी आपल्याकडील वाहन क्रमाकांचा रजिस्ट्रेशन क्रमाकांची प्लेट चोरी केलेल्या वाहनास वापरत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याची बाब पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी सांगितली. वाहनचोरीनंतर नाकाबंदी दरम्यान पोलिसांच्या हाती लागले तर फसायला नको म्हणून ही तजवीज करण्यात आली होती. चौघा संशयितांच्या पोलिस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीने रागविल्याने पत्नीने सोडले घर

$
0
0

गाण्याचा आवाज कमी करायला सांगितल्याने वाद

म. टा. वृत्तसेवा, सिडको

कामटवाडे परिसरातील विवाहित महिलेस मोबाइलवरील गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगणे पतीसाठी तापदायक ठरले आहे. पतीने बोलल्याने घरात वाद होऊन रागावलेली पत्नी घरातून निघून गेली. पतीने दोन दिवस शोध घेऊन पत्नी सापडू शकली नाही. अखेर पतीने अंबड पोलिस ठाण्यात धाव घेत पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामटवाडे परिसरातील शंभुराजेनगर येथील शंकरभाई भाऊनाथ कापसे (३९) यांनी अंबड पोलिसात फिर्याद दिली आहे. प्रिया (२९) यांना घरातील मंडळींनी मोबाइलवरील गाण्याचा आवाज कमी करण्यास सांगितले. यावरून झालेल्या भांडणाचा राग येऊन प्रिया घरातून निघून गेल्या. पत्नी गेल्याचे लक्षात आल्याने पती शंकरभाई यांनी परिसरात तसेच आपल्या नातेवाइकांकडेही शोध घेतला. मात्र, त्या सापडल्या नाही. अखेर प्रिया यांचे पती शंकरभाई कापसे यांनी अंबड पोलिस धाव घेत घटनेची माहिती देत तक्रार दिली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी नोंद केली असून पुढील तपास चव्हाण करीत आहेत.

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मुले, मुली व महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण शहरात सर्वाधिक आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी पोलिसांनीही ठोस उपाययोजना राबविण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्‍त केली जात आहे.

लोगो : चर्चा तर होणारच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images