Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘चौकशी’, ‘मंजुळा’ सादरीकरणाने नाशिककर मुग्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दि जिनीअस या संस्थेतर्फे पसा नाट्ययज्ञात शुक्रवारी 'चौकशी' हा दीर्घांक व 'मंजुळा' ही एकांकिका सादर करण्यात आली. रश्मी काळोखे लिखित व प्रवीण काळोखे दिग्दर्शित या नाटकांसाठी नाशिककर रसिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात ही नाटके सादर झाली.

'चौकशी' हा दीर्घांक रश्मी काळोखे यांनी लिहिला असून सुप्रसिद्ध लेखक जयंत पवार यांच्या लघुकथेवर आधारित आहे. हा दीर्घांक सामाजिक असंतुलनावर भाष्य करतो. जन्मभर चौकशीच्या फेऱ्यात अडकलेल्या पारी नावाच्या स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून समाजाचा एक मोठा पट उलगडला जातो. या स्त्रीच्या माध्यमातून सामाजिक राजकारण, कौटुंबिक नातेसंबंध, मानसिक ताने बाने, समाजात स्त्रीला दिली जाणारी हीन वागणूक, परंपरा अशा कित्येक घटकांचे पारीच्या आयुष्यातील विविध चौकशीच्या रुपाचे दर्शन हे नाटक घडवते. एका गरीब कुटुंबात जन्माला आलेली पारी आयुष्यातल्या कित्येक छोट्या मोठ्या घटनांमुळे चौकशीच्या फेऱ्यात अडकत राहते आणि प्रेक्षकांना समाजाचे विद्रूप भयाण रूप दाखवून अंतर्मुख करते. सतत चौकशीने त्रस्त झालेली पारी जेव्हा काळाच्या उदरात गडप होते तेव्हा कुणीही साधी चौकशीही करीत नाही, असा विरोधाभास हे नाटक दाखवून समाजाला त्यांचा विद्रूप चेहरा दाखवून देते.

दीर्घांकाचे नेपथ्य गुलाब पवार, कुणाल पाटील आणि बाळकृष्ण तिडके यांचे तर प्रकाश योजना विनोद राठोड यांची होती. या दीर्घांकाचे संगीत आनंद ओक, तेजस बिल्दिकर यांचे तर वेशभूषा रश्मी काळोखे, रंगभूषा माणिक कानडे यांची होती. नाटकाचे सूत्रधार दत्ता पाटील, सुनील जाधव, देवेन कापडणीस व निर्मिती सहाय्य प्रतिभा पाटील शकुंतला जाधव मिथिला कापडणीस यांचे होते. रंगमंच व्यवस्था सागर यलमामे, ज्योती चंद्रमोर यांची होती.

नाटकात भानुदास पाटील, विलास हांडगे, तुषार बनकर, कल्पेश पाटील, कुणाल पाटील, चैतन्य जोशी, सागर बागूल, सनी मिश्रा, नितीन सांगळे, शिवा देशमुख, राहुल पाटील, शुभम कपिले, करिश्मा शिंदे, श्रद्धा उबाळे, रिया लिंबे, पूजा पुरकर, स्मिता प्रभू, वर्षा पटेल, दुर्गा शिवसेन, प्राजक्ता नागपुरे, आदित्य थोरात, आदित्य काळोखे, सागर शेळके, आरती पाटील, अभिषेक पाटील, सुयोग झुर्टे, श्रेया बोराडे यांनी भूमिका साकारल्या.

रोमांच गूढ भयनाट्याचा

दि जिनियस निर्मित 'मंजुळा' ही एकांकिका सादर झाली. 'मंजुळा' हे गूढ भयनाट्य आहे. यातील मंजुळा हे प्रमुख पात्र मानसिकरित्या असंतुलित आहे. मानसिक आरोग्य बिघडलेली व्यक्ती किती भयानक निर्णय घेऊ शकतो याचा अनुभव ही एकांकिका प्रेक्षकांना देते. या एकांकिकेसाठी स्किजोफ्रेनिया या मानसिक आजाराचा आधार घेतलेला होता. मंजुळा एकांकिकेचे लेखन निशिकांत कामत, दिग्दर्शन प्रवीण कांबळे, नेपथ्य - गुलाब पवार, कुणाल पाटील व बाळकृष्ण तिडके, प्रकाश योजना - विनोद राठोड, संगीत - सुदीप मिशाळ, विपुल पाठक, तेजस बिल्दीकर, वेशभूषा - राहुल पाटील, रंगभूषा - माणिक कानडे, नृत्य दिग्दर्शन - सागर बागूल यांची तर रंगमंच व्यवस्था सनी मिश्रा, सागर एलमामे यांची होती. यात भानुदास पाटील, विलास हांडगे, तुषार वनकर, कल्पेश पाटील, कुणाल पाटील, सागर बागूल, सनी मिश्रा, नितीन सांगळे, शिवा देशमुख, राहुल पाटील, करिश्मा शिंदे, शिवानी पाबळे, सागर शेळके, अंकिता चेवले, रिया लिंबे, श्रद्धा उबाळे, पूजा पूरकर, स्मिता प्रभू, वर्षा पटेल यांनी भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


त्र्यंबक ट्रस्टीसाठी दिग्गजांच्या मुलाखती

$
0
0

विश्वास ठाकूरांची उपस्थिती; नीलिमा पवार गैरहजर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तपदासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी विश्वास बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर सह अनेक प्रतिष्ठीत उमेदवारांनी मुलाखती दिल्या. आजच्या यादीत नाव असलेल्या मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी मात्र मुलाखत दिली नाही. या मुलाखतीला गुरुवारपासून सुरुवात झाल्यानंतर दोन दिवसात ११३ पैकी ३९ उमेदवारांच्या मुलाखती दिल्या आहेत. मुलाखती ४ जुलैपर्यंत चालणार आहेत.

११३ उमेदवारांच्या यादीत वकील, शिक्षण क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची नावे आहे. शुक्रवारी यापैकी विक्रम कदम, विश्वास ठाकूर, संजय कुलकर्णी, मनाली दिघे, मोहन कालेकर, दत्तात्रय जोशी, अंजली धामणे, बाळासाहेब अडसरे, तेजस ढेरगे, श्याम गंगापुत्र, कैलास घुले, अॅड. पराग दीक्षित, हेमंत परदेशी, अॅड. धनजंय देशमुख, श्रीकृष्ण लोणारी, धनजंय गंगापुत्र, दिलीप गोडे, सतीश जोशी यांनी मुलाखती दिल्या.

त्र्यंबकेश्वर ट्रस्टवर नऊ ट्रस्टी असून अध्यक्ष जिल्हा न्यायधीश व सचिव नगरपालिका मुख्याधिकारी हे पदसिद्ध आहेत. तर इतर तीन जागांवर असलेले ट्रस्टी हे पुरोहित संघ सह दोन नियुक्त आहे. त्यामुळे चार ट्रस्टी हे नियुक्त केले जाणार असून त्यासाठी या मुलाखती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जून महिन्यात गुरुवार, शुक्रवारी मुलाखती झाल्यानंतर शनिवारी या मुलाखती होणार आहे. त्यानंतर जुलै महिन्यात २ ते ४ तारखेपर्यंत या मुलाखती घेण्यात येणार आहे.

अशी होते मुलाखत

ट्रस्टी पदाच्या या मुलाखतीसाठी प्रत्येकाला दहा मिनिटे दिली जात असून त्यात त्यांनी आपली वैयक्तिक माहिती सांगायची आहे. ट्रस्टी का होऊ इच्छितात, यासह ट्रस्टी झाल्यानंतर काय करणार, यासारखे प्रश्नही विचारले जात आहे. या मुलाखतीतच उमेदवाराचा बायोडाटा घेतला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोची २४ उद्याने पुन्हा महापालिकेकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या २४ उद्यानांच्या देखभालीचे काम ठेकेदाराकडून काढून घेण्यात आले आहे. महापालिकेचा उद्यान विभाग या उद्यानांची जबाबदारी घेणार आहे. ठेकेदाराकडे सहा मोठ्या उद्यानांचे कंत्राट देण्यात आले आहे. मनुष्यबळ तोकडे असताना महापालिका या उद्यानांची देखभाल कशी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नाशिकरोडला एकच उद्यान निरीक्षक होता. सध्या नगररचनात काम केलेले अभियंता एजाज शेख यांच्याकडे हा अतिरिक्त कार्यभार आहे. महापालिकेची नाशिकरोडला १२२ उद्याने असून, त्यापैकी ठेकेदाराकडे सोमानीसह ४५ उद्याने कायम ठेवण्यात आली आहेत. त्यात सोमानी, मुक्तिधाममागील आनंदनगर येथील आडकेनगर १, २ व ३, जेलरोडचे महालक्ष्मी उद्यान, चैतन्यनगर उद्यान क्रमांक १ आणि २, चेहेडीचे उद्यान, प्रेस्टिज पार्क, शिखरेवाडी जॉगिंग ट्रॅक आदींचा समावेश आहे. या उद्यानांखेरीज अन्य उद्याने ठेकेदाराकडे होती. त्यातील २४ उद्याने महापालिकेने पुन्हा आपल्या ताब्यात घेतली आहेत. ही उद्याने छोटी म्हणजे चारशे ते पाचशे चौरस मीटर आकाराची आहेत. या उद्यानांमध्ये अनेक वर्षांपासून हिरवळ नाही, पाण्याची सोय नाही. अशी उद्याने महापालिका चालविणार आहे. ठेकेदाराची जबाबदारी फक्त उद्यान स्वच्छतेची असताना त्याच्याकडून पाणी, हिरवळीची अपेक्षा केली जात होती. दरम्यान, मुक्तिधामशेजारील सोमानी गार्डनमधील हिरवळ बऱ्यापैकी टिकून आहे. येथे झाडांचीही निगा राखली जात आहे. झोके, घसरगुंडी व इतर खेळणी बऱ्या अवस्थेत आहेत. लहान मुलांची रेल्वे आणि मनोरंजनाच्या इतर खेळांमुळे असल्याने येथे कायम वर्दळ असते. जेलरोडच्या पार्वताबाई गार्डनची स्थितीही उत्तम असल्याने चांगला प्रतिसाद मिळतो. दुर्गा उद्यानासह चेहेडी गावातही चांगले उद्यान आहे.

महापालिकेने २४ उद्याने पुन्हा ताब्यात घेतली असली, तरी त्यांची देखभाल चांगल्या पद्धतीने होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागात ३४ कर्मचारी आहेत. महापालिकेत अनेक वर्षांपासून भरती झालेली नाही. कंत्राटी पद्धतीने कर्मचारी घेऊन कामे केली जात आहेत. कमी कर्मचारी असल्याने उद्यानांची देखभाल करणे अवघड जाते. नाशिकरोडला अऩेक उद्यानांची जाळीची कुंपणे गायब झाली आहेत. काही ठिकाणी केवळ बाकडे उरली आहेत.

--

या उद्यानांची झालीय दुर्दशा

जेलरोडच्या महापालिका कार्यालयाशेजारील उद्यानात तर जनावरेही जात नाहीत. कारण, येथील झाडे जळाली आहेत. खेळणी तुटलेली आहेत. भीमनगरमधील गार्डनचीही दुरवस्था झालेली आहे. साने गुरुजीनगरमधील गार्डनमध्ये गायी ठाण मांडून बसतात. बहुतांश उद्यानांचे रुपांतर कचराकुंड्यांत झाले आहे. जेलरोडच्या ओमनगरध्येही गवत वाढले आहे. चंपानगरीत गार्डनचा वापर क्रिकेटसाठी होत आहे. समाजकंटकांनी खेळणी गायब केली. जय हनुमाननगरच्या गार्डनमध्ये गाजरगवत वाढले आहे. उपनगरमधील मकरंदनगरसमोरील गार्डनमधील सर्व खेळणी गायब होऊन फक्त मैदान उरले आहे. पवारवाडी, बोराडेनगर, जय भवानीरोड, र. ज. बिटको हायस्कूलसमोरील गार्डनमध्येही सुविधांची वानवा आहे. बहुतांश उद्यानांमध्ये झाडे आहेत, तर खेळणी नाहीत आणि खेळणी आहेत तर झाडे नाहीत. उद्यानांसाठीच्या भूखडांवर कचरा व माणसांचे अतिक्रमण होत आहे. काही गार्डन रात्री मद्यपींचा व प्रेमीयुगलांचा अड्डा बनली आहेत.

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

उघड्या घंटागा़डीने 'कचऱ्यावर पाणी' (फोटो) (पेज फोटोशेजारी सिंगल)

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेने घरोघरी कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांना ओला व सुका कचरा वेगळा घेण्याचे आदेश दिलेले आहेत. घंटागाडी कर्मचाऱ्यांकडूनदेखील महापालिकेच्या आदेशाचे पालन केले जाते. परंतु, परिसरात उघड्या घंटागाडीद्वारे कचरा संकलन केले जात असल्याने घंटागाडीतील सर्वच कचरा ओला होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ओला व सुका कचरा संकलनाला अर्थच उरत नसल्याने अशा उघड्या घंटागाड्या बंदिस्त कराव्यात,अशी मागणी परिसरातून होत आहे.

-----

तारवालानगर-पेठरोडवर दुतर्फा होतेय कचराफेक (फोटो) (थोडक्यात)

पंचवटी : मेरीच्या जलविज्ञान प्रकल्पापासून जाणाऱ्या तारवालानगर सिग्नल ते पेठरोड सिग्नल या रस्त्याच्या दुतर्फा सर्रासपणे कचरा, मेडिकल वेस्ट, डेब्रिज टाकले जात आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडी असल्याने या झाडांच्या आडोशाला हा कचरा टाकला जातो. त्यामुळे या भागात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. या परिसराकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. येथे रस्त्याने जाताना वाहनातूनच कचराफेक केली जात आहे. त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही. स्वच्छता कर्मचारी व घंटागाडी कर्मचारी येथील कचरा साफ करीत नसल्याने कचरा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात अले असून, येथे स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.

--

रेल्वे सल्लागार समिती

जेलरोड : भुसावळ मंडळांतर्गत नाशिकरोड रेल्वे स्टेशनसाठी रेल्वे सल्लागार समितीच्या दहा सदस्यांची निवड मुख्य वाणिज्य निरीक्षक आणि स्टेशन प्रबंधकांनी केली आहे. या समितीत गुरू गोविंदसिंग इंजिनीअरिंगचे प्राचार्य डॉ. नीलकंठ निकम, नाशिक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर गोडसे, प्रवीण आडके, सचिन वाघ, सामाजिक कार्यकर्ते सुरेश कदम, बबन मोरे, संदीप कटारे, पोलिसपाटील समाधान बोडके, महिला सदस्या डॉ. मेघा सायखेडकर, राजेंद्र पाटील यांचा समावेश आहे. समितीमध्ये देवळाली कॅम्पच्या पाच जणांची वर्णी लागली असून, समितीचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे.

--

उंबराची काढली साल (फोटो)

जेलरोड : जेलरोडच्या माळीनगर कॉलनीतील साईबाबा मंदिरासमोरील उंबराच्या झाडाच्या सर्व फांद्या छाटल्यानंतर आता या झाडाची साल काढण्यात आल्याने हे झाड सुकले आहे. असा प्रकार करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाई करण्याची मागणी परिसरातून होत आहे. उपनगर येथील इच्छामणी गणेश मंदिराजवळील टेलिफोन कॉलनी येथील नीलगिरीच्या झाडांची सालही अशाच पद्धतीने काढण्यात आली आहे. परिसरातील झाडांची अशी हत्या करण्याचा प्रकार सुरू असूनदेखील कोणतीही यंत्रणा कारवाई करीत नसल्याने वृक्षप्रेमी नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अॅम्ब्युलन्स, पाणी टँकरची वारकऱ्यांसाठी सुविधा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ पायी दिंडी सोहळ्यात सहभागी वारकरी बांधवांसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने रुग्णवाहिकेसह, डॉक्टर, औषधे, पिण्याच्या पाण्याचा टँकर यासारख्या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आणि पुन्हा परतीचा प्रवास पंढरपूर ते नाशिक या दरम्यान ही सेवा पुरविण्यात येणार आहे. स्वर्गीय भय्यूजी महाराज व स्वर्गीय आणासाहेब जावळे पाटील यांच्या स्मरणार्थ ही सेवा पुरविण्यात आली आहे. नाशिक पंचायत समितीजवळ हभप भागवताचार्य संतोषा नंदगिरीजी महाराज, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे आदींच्या हस्ते शुक्रवारी रुग्णवाहिका आणि टँकर सेवेचा शुभारंभ करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता कडवा कालवा कार्यालयाचे स्थलांतर

$
0
0

आमदार छगन भुजबळ यांचा तीव्र आक्षेप

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक येथील उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेले कडवा कालवा विभागाचे कार्यालय धुळे येथे स्थलांतरित करण्याचा शासनाने २८ जून रोजी निर्णय घेतला आहे. सदर विभागांतर्गत असलेली अनेक कामे अपूर्ण अवस्थेत व प्रगतीत असूनही शासनाने हे कार्यालय स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्याने सदर अन्यायकारक निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.

भुजबळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की नाशिक जिल्ह्यातील उत्तर महाराष्ट्र प्रदेश जलसंपदा विभागाच्या अंतर्गत असलेले कडवा कालवा विभाग कार्यालय सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी धुळे येथे स्थलांतरित करण्याचा शासनाने अन्यायकारकरित्या निर्णय घेतला आहे. सदर विभागाअंतर्गत उर्ध्व गोदावरी प्रकल्पामधील पुणेगांव, तिसगांव, ओझरखेड, दरसवाडी तसेच वळण योजना या प्रकल्पांची बरीचशी सिंचन निर्मितीची कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पामध्ये पुणेगांव-दरसवाडी-डोंगरगांव पोहोच कालव्याचा समावेश असून या कालव्याची बहुतांश कामे अपूर्ण असून सदर कालव्याचे अस्तरीकरण करण्याचे प्रस्तावित आहे. चांदवड व येवला या दुष्काळी तालुक्यांसाठी हा कालवा जीवनदायी आहे. या कालव्याची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी कडवा विभागाची अतिशय गरज आहे.

त्याचप्रमाणे या विभागांतर्गत झार्लीपाडा, आंबेगण, पिंप्रज, धोंडाळपाडा, चाफ्याचा पाडा, रानपाडा,आंबाड,पायरपाडा व चिमणपाडा या नऊ प्रवाही वळण योजनांची कामे असून या योजनांची कामेसुद्धा प्रगतीपथावर आहेत. विभागांतर्गत काश्यपी प्रकल्प, गौतमी प्रकल्प, ओतूर प्रकल्प असे विविध प्रकल्प अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. जिल्ह्यातील उर्ध्व गोदावरी प्रकल्प हा यशस्वी प्रकल्प असून त्यापासून अवर्षणग्रस्त असलेले चांदवड, पूर्व दिंडोरी, निफाड, येवला या तालुक्यास लाभ होत आहे. उपलब्ध पाण्याचा विनियोग चांगल्या प्रकारे होण्यासाठी अस्तित्वातील कालवे सुस्थितीत ठेवण्यासाठी या विभागाची गरज आहे. सद्यस्थितीत कडवा कालवा विभागाअंतर्गत ४७० कोटींची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे ही अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी या विभागाची गरज आहे. असे असतानाही सरकारने अन्यायकारकरित्या सदर कार्यालय धुळे येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील जलसिंचनाची अपूर्ण कामे मार्गी लागण्यासाठी सदर कार्यालय नाशिक येथेच पूर्ववत सुरु ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘प्रोजेक्ट गोदा’ला चालना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपाठोपाठ लागू झालेली शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता आता निकालानंतर शिथिल झाली आहे. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून स्मार्ट सिटीच्या गोदा प्रोजेक्टसह शहराच्या नवीन विकासकामांच्या अंमलबजावणीतला अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे महापालिकेकडून आता विकासकामांचा बार उडवला जाणार आहे. पुढील आठवड्यात स्मार्ट सिटी अंतर्गत राबविल्या जाणाऱ्या २३० कोटींच्या 'प्रोजेक्‍ट गोदा' प्रकल्पाला गती मिळणार असून, स्मार्ट सिटी कंपनीकडून पुन्हा निविदा काढली जाणार आहे. याशिवाय, स्मार्ट सिटीअंतर्गत येणाऱ्या २८२ कोटींच्या स्काडा मीटर आणि २४ तास पाणीपुरवठा योजनेसह १२० कोटींच्या 'स्मार्ट आयसीटी बॅकबोन फॉर स्मार्ट सिटी'लाही चालना मिळणार आहे.

महापालिकेच्या वतीने मंजूर करण्यात आलेली सर्व कामे आयुक्त मुंढे यांनी रद्द केली असली तरी स्मार्ट सिटी अंतर्गत आणि बजेटमध्ये मंजूर झालेल्या कामांचा नाशिककरांना दिलासा मिळेल, असे चित्र होते. जानेवारी महिन्यात स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाकांक्षी गोदा प्रोजेक्टचा २३० कोटींचा पहिला फेज मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे या कामांना एप्रिलअखेर सुरुवात होणे अपेक्षित होते. स्मार्ट सिटीअंतर्गत एप्रिलमध्ये पाणीपुरवठ्यासंबंधी पाइपलाइन टाकणे, तसेच स्काडा मीटर बसवणे, २४ तास पाणीपुरवठा यासाठी २८२ कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया राबवण्याचे निश्चित झाले होते, तर १२० कोटी रुपये खर्चाचा 'स्मार्ट आयसीटी बॅकबोन फॉर स्मार्ट सिटी' या एकत्रित प्रकल्पालाही एप्रिलमध्येच चालना मिळणार होती. याशिवाय, स्मार्ट सिटीअंतर्गत स्मार्ट रोडसह अनेक लहान-मोठ्या प्रकल्पांचा शुभारंभ होणार होता. परंतु, प्रत्यक्षात एप्रिलमध्ये विधानपरिषदेची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे स्मार्ट सिटीसह बजेटच्या कामांना काहीसा ब्रेक लागला. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेची आचारसंहिता संपताच पुन्हा शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे गेल्या अडीच महिन्यांपासून नाशिकच्या विकासकामांमागे आचारंसहितेचे शुक्लकाष्ठ लागले होते. परंतु, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता शिथिल झाली आहे. आचारसंहिता शिथिल होण्याच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रलंबित गोदाप्रोजेक्टसह विविध विकासकामांच्या निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात २३० कोटींच्या गोदा प्रोजेक्टची निविदा काढली जाणार आहे. सोबतच स्मार्ट आयसीटी बॅकबोन फॉर स्मार्ट सिटीसह स्काडा प्रणालीचे काम सुरू होणार आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या कामांनाही वेग येणार आहे.

बजेटलाही गती मिळणार

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मंजूर असलेल्या गोदाप्रकल्पासह, स्कोडामीटर, रेट्रोफिटिंगअंतर्गत मंजूर असलेल्या जवळपास सहाशे कोटींच्या कामां सोबतच महापालिकेच्या सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाच्या बजेटमध्ये मंजूर झालेल्या भांडवली कामांच्या सर्व निविदा जून महिन्यातच काढण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.महासभेने बजेटला मान्यता दिल्याने बजेटच्या प्रस्तावांना पुन्हा महासभेवर आणण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. तसेच स्थायीवरही प्रस्ताव सादर केला जाणार नाही. त्यामुळे या विकासकामांच्या प्रारंभाला होणारा उशीर टळणार असून, निविदा मंजूर होताच थेट विकासकामांना सुरुवात होणार आहे.त्यामुळे विकासकामांचा बार जूनमध्ये उडणार आहे. त्यामुळे आचारसंहिता संपताच या कामांचा धडाका सुरू होणार आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षकाच्या निरोप समारंभात विद्यार्थी, पालक गहिवरले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

एखाद्या शिक्षकाची बदली झाली म्हणून संपूर्ण गावावर शोककळा पसरणे, विद्यार्थ्यांनी रडारड करणे असा अनुभव इगतपुरी तालुक्यातील फांगुळगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची बदली झाल्यानंतर संपूर्ण तालुक्याला आला. यामुळे जि. प. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते किती घट्ट असते हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

फांगुळगाव शाळेत गेल्या अकरा वर्षांपासून असलेले शिक्षक वैभव धर्मराज गगे यांची बदल झाली. त्यांची बदली होताच संपूर्ण गावावर जणू शोककळाच पसरली. गेले पंधरा दिवस विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या तोंडी एकच विषय होता तो म्हणजे आपल्या सरांची बदली झाली.

ऑनलाइन बदल्यांची अपरिहार्यता लक्षात घेता गावकऱ्यांनी हा निर्णय स्वीकारला. सरांच्या निरोप समारंभात संपूर्ण गाव जमा झाले. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. विद्यार्थ्यांना हुंदका आवरणे अवघड झाले होते. गगे सरांबद्दल बोलताना प्रत्येकाचा कंठ दाटून येत होता. इगतपुरी तालुक्यात मुंबईतील विविध संस्थांच्या मदतीने तालुक्यातील बावीस शाळांचे डिजिटलायजेशन व तीन गावात महिलांसाठी पाणीपुरवठ्याची सोय गगे सरांनी करून दिली आहे. 'तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिले त्यामुळे ह्या जन्माचे सार्थक झाले,' अशी भावना गगे सरांनी यावेळी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिल्लीच्या व्यापाऱ्यांबाबत खोत यांना साकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण, मालेगाव, सटाणा व साक्री तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांचे नोव्हेंबर २०१७ ते फेब्रुवारी २०१८ या आठ महिन्या दरम्यान विक्री केलेल्या द्राक्षांचे ७ कोटीहून अधिक रक्कम दिल्ली येथील आर. जे. सी. कंपनीच्या संचालकांनी पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी द्राक्ष उत्पादकांनी राज्याचे कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची भेट घेवून निवेदन दिले आहे. खोत यांनी या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे संबंधित व्यापाऱ्यांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. सदाभाऊ खोत यांची द्राक्ष उत्पादक खंडू शेवाळे, जिभाऊ कापडणीस, बापू खैरणार, नामपूर बाजार समितीचे संचालक दीपक पगार यांनी भेट घेतली. बागलाण तालुक्यातील मोसम परिसरासह, साक्री, मालेगाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी गेल्या ३० पेक्षाही अधिक वर्षांपासून दिल्ली येथील आजादपूर बाजार समितीमधील अधिकृत व्यापारी आर. जे. सी. कंपनीच्या दुकान क्र. सी. ४९४ चे मालक रेाहित प्रकाश अजवाणी, जतीन अजवाणी, व प्रकाश अजवाणी यांच्याकडे द्राक्ष पाठवित होते. आजपर्यंत द्राक्ष विक्रीचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा होत होते.

मात्र नोव्हेंबर २०१७ ते फेब्रुवारी १८ या महिन्या दरम्यान सुमारे ७ कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे विक्री केलेल्या द्राक्षांचे पैसे अद्यापही आमच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. वेळोवेळी दुरध्वनीद्वारे चर्चा हेावून पैसे पाठवित असल्याचे भासवित होते. मात्र आज आठ महिने उलटूनही आमचे पैसे मिळत नसल्याने आमची पसवणुक झाल्याची आमच्या लक्षात आल्या असल्याचे द्राक्ष उत्पादकांनी राज्यमंत्री खोत यांना दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फनिक्युलर ट्रॉलीचे सोमवारी लोकार्पण

$
0
0

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशातील पहिल्या फनिक्युलर ट्रॉली प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा सोमवारी (२ जुलै) मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या मुख्य उपस्थितीत वणी येथील सप्तश्रृंग गडावर होणार आहे. फडणवीस यांचा प्राथमिक दौरा शुक्रवारी सकाळी प्राप्त झाल्याने जिल्हा प्रशासनही तयारीला लागले आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येत असतात. चैत्रोत्सव व नवरात्रोत्सवात येथे मोठी यात्रा भरते. देवीच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाण्याकरिता भाविकांना ५५१ पायऱ्या चढाव्या लागतात. अपंग, वृद्ध तसेच बालकांना या पायऱ्या चढण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात. भाविकांच्या सोयीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी फनिक्युलर ट्रॉलीच्या प्रस्तावाला मान्यता मिळविली. १५ ऑगस्ट २००९ रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. अनेक अडचणींवर मात करीत तब्बल नऊ वर्षांनी हा प्रकल्प पूर्ण झाला आहे. या ट्रॉलीच्या वापराला यंत्रणांनी तपासणीअंती हिरवा कंदील दाखविला आहे.

आचारसंहितेत अडकले होते उद्घाटन

विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक व त्यापाठोपाठ आलेल्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यात आचारसंहिता लागू होती. त्यामुळे या ट्रॉलीचे लोकार्पण लांबणीवर पडत होते. परंतु, शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता लवकरच संपणार असून, त्यामुळे पुन्हा विकासकामांचा धडाका सुरू होणार आहे. या ट्रॉलीच्या लोकार्पण सोहळयाला २ जुलैचा मुहूर्त जवळपास निश्‍चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतचे संकेत दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांचा दौरा

मुख्यमंत्र्यांचा प्राथमिक दौरा शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानुसार सोमवारी दुपारी बारा वाजता मुख्यमंत्री फडणवीस विमानाने ओझर विमानतळावर उतरतील. तेथून वाहनाने ते दुपारी एक वाजता सप्तशृंग गडावर पोहोचतील. येथे फनिक्युलर ट्रॉलीचे लोकार्पण करण्यात येईल. त्यानंतर भवानी पाझर तलावाचेही उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर ते पुन्हा ओझर विमानतळावर येऊन विमानाने मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात ऐनवेळी बदल होऊ शकतो, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा पार पडावा, याकरिता जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही सुरू केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवे औद्योगिक धोरण ‘उद्योगस्नेही’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात नवे औद्योगिक धोरण हे 'उद्योगस्नेही' असणार असून, ते सप्टेंबरअखेर जाहीर केले जाईल. हे धोरण राज्यात औद्योगिक विकास प्रगतिपथावर नेणारे असेल, असे सांगत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाशिक येथे उद्योजकांशी संवाद साधला. ते म्हणाले, की महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण हे देशात पहिल्या क्रमांकाचे असेल. त्यात जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती कशी होईल यावर फोकस केला जाणार आहे. हे धोरण जाहीर करण्यापूर्वी राज्यभर उद्योजकांशी संवाद साधला जात आहे. त्यातून त्यांच्या सूचना व अडचणी लक्षात घेऊन धोरण तयार केले जाणार आहे. हे धोरण तयार झाल्यानंतर ते सर्वांना बघतासुद्धा येईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्याचे नवीन औद्योगिक धोरणाची रूपरेषा ठरविण्याकरिता उद्योगमंत्री सुभाष देसाई तीन दिवसांच्या राज्य दौऱ्यावर असून, शुक्रवारी ते नाशिकला आले. या वेळी आयोजित केलेल्या बैठकीत विविध औद्योगिक संघटनांबरोबर हॉटेल ताजमध्ये त्यांनी चर्चा केली. या वेळी उद्योजकांनी नाशिकचे विविध औद्योगिक प्रश्नही त्यांच्यासमोर मांडले. बैठकीत नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे, जळगाव येथील उद्योजकांसह आयमा, निमा, नाइस, उद्योगभारतीसह विविध संघटनांनी सहभाग घेतला. राज्याने २०१३ मध्ये ठरवलेले औद्योगिक धोरण पाच वर्षांसाठी होते. त्याची मुदत ३१ मार्च २०१८ रोजी संपुष्टात आली. त्यानंतर या धोरणास मंत्रिमंडळाने सहा महिने मुदतवाढ दिली. ३० सप्टेंबरपर्यंत ही वाढ आहे. त्यामुळे उद्योगमंत्र्यांनी सप्टेंबरपूर्वी हे धोरण जाहीर करणार असल्याचे सांगितले.

राज्याचे औद्योगिक धोरण महत्त्वाचे असून, त्यासाठी उद्योगमंत्र्यांनी हा दौरा केला. उद्योगमंत्री बुधवारी पुणे येथे गेले. त्यानंतर गुरुवारी ते सोलापूर व लातूर येथे त्यांनी उद्योजकांशी संवाद साधला. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी औरंगाबाद व नाशिक येथील औद्योगिक संघटनांबरोबर चर्चा केली. नाशिक येथे झालेल्या बैठकीत 'निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर, 'आयमा'चे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, राजेंद्र आहिरे, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर, लघु उद्योग भारतीचे संजय महाजन, निर्यात संघटनेचे रमेश पवार, 'नाइस'चे अध्यक्ष विक्रम सारडा, सिन्नरचे नामकर्ण आवारे, मालेगावचे अन्सारी खुर्शीद यांच्यासह जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगरच्या उद्योजकांनी नव्या धोरणाबाबत सूचना केल्या.

उद्योजकांच्या मते, असे असावे धोरण

- औद्योगिक धोरण ठरवताना ते उद्योजकांसाठी सरळ व स्पष्ट असावे

- उद्योजकांना चालना मिळावी

- राज्याच्या झोनबदलाचा विचार करावा

- सर्वांसाठी समान संधी असावी

- वीजदर राज्यात सारखे असावे

- स्थानिक स्वराज संस्थांच्या करापासून मुक्तता करून औद्योगिकनगरी करावी

- नव्या उद्योगांसाठी जशा योजना आहे तशाच अडचणीत असलेल्या उद्योगांसाठी असाव्यात

- निर्यातीला प्रोत्साहन मिळावे, महिला उद्योजकांना प्लॉटवाटपात आरक्षण असावे

- झूमला वैधानिक दर्जा द्यावा

- कृषी प्रक्रिया उद्योगासाठी धोरण असावे

कामगार संघटनेबाबत रोष

उद्योजकमंत्र्याच्या बैठकीत गुन्हे दाखल असलेल्या कामगार संघटनेवर बंदी टाकावी. त्यासाठी धोरण जाहीर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. औद्योगिक शांतता व तंटामुक्त औद्योगिक क्षेत्र असावे यासाठी नियम असावे अशी अपेक्षा सुध्दा व्यक्त करण्यात आली.

दोन हजार प्लॉट ताब्यात

राज्यातील उद्योग सुरु न झालेले दोन हजार औद्योगिक प्लॉट ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे वाटपही आता लवकर केले जाईल अशी माहिती उद्योगमंत्री यांनी दिली. नव्या उद्योगांना संधी मिळावी ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोलंबिका प्रकरणी दस्ताऐवज लवादाकडे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवी संस्थान जमीन घोटाळा प्रकरणातील महत्त्वाचा दस्ताऐवज जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी महाराष्ट्र महसूल लवादाकडे सोपविला. या प्रकरणी येत्या ७ जुलै रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

कोलंबिका देवी संस्थानच्या १८० एकर जागेची परस्पर विक्री करण्यात आल्याचे प्रकरण दोन महिन्यांपूर्वी उघडकीस आले. महसूलमधील अधिकारी आणि संस्थानच्या काही विश्वस्तांसह २६ जणांवर जिल्हा प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी राहुल पाटील यांच्याकडे अर्धन्यायिक सुनावणी सुरू होती. परंतु, संस्थानच्या विश्वस्तांनी या प्रकरणी महसूल लवादाकडे याचिका दाखल केली. त्यामुळे लवादाने प्रांताच्या सूनावणीला स्थगिती दिली आहे.

महसूल लवादाकडे शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणाशी संबंधित सर्व दस्ताऐवज सादर करण्याचे निर्देश लवादाने दिले. त्यानुसार तो सादर केल्याची माहिती तहसीलदार महेंद्र पवार यांनी दिली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

छाप्यांनंतरही अड्डे जोमात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

एकलहरेरोडवरील अरिंगळे मळा येथे बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करणाऱ्यास नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने छापा टाकून अटक केली. या अड्ड्यावरून नाशिकरोड पोलिसांनी शिवाजी तुकाराम अरिंगळे (वय ४२) यास ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (ई) नुसार कारवाई केली आहे. या संशयिताकडून पोलिसांनी दारूही जप्त केली आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशा प्रकारची कारवाई वारंवार केली जात असूनही जुगार आणि बेकायदेशीर दारू विक्रीचे अड्डे सुरूच असल्याचे चित्र आहे.

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकलहरे भागातील सिद्धार्थनगर, अरिंगळे मळा, पळसे, शिंदे या ठिकाणी बेकायदेशीर दारूविक्रीचे अड्डे सर्रास सुरू आहेत. याशिवाय शहरातील देवळालीगाव, सुभाषरोड, जेलरोड पाण्याची टाकी, गोरेवाडी, बिटको हॉस्पिटलजवळ, पळसे, शिंदे, सिन्नर फाटा रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार, नाशिकरोड बस स्थानकाच्या पाठीमागे, चेहेडी जकात नाका या ठिकाणी जुगाराचे अड्डे सुरू आहेत. त्यातील काही अड्ड्यांवर पोलिसांनी धाडीही टाकल्या आहेत. मात्र, या प्रत्येक कारवाईत संबंधित जुगार अड्ड्यांचे मालक फरार झाल्याची नोंद पोलिस दप्तरी आहे. बहुतेक जुगार अड्ड्यांवर कल्याण बाजार नावाचा जुगार सुरू असतो. अनेक अड्डे स्थानिक आजी-माजी नगरसेवकांच्या नातेवाइकांच्या मालकीचे असल्याचे यापूर्वीच्य कारवाईतून उघड झाले आहे. गेल्या काही वर्षांत नाशिकरोड पोलिसांना अंधारात ठेवून पोलिस उपायुक्तांनी इतर पोलिस ठाण्यांच्या पोलिस पथकाच्या सहकार्याने जुगार अड्ड्यांवर छापे टाकले आहेत.

अनैतिक व्यवसायही तेजीत

नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत शिंदे गावाजवळ एका ढाब्यावर नुकताच अनैतिक व्यवसायाचा अड्डा पोलिसांनी धाड टाकून उद्ध्वस्त केला. यापूर्वीही शहरातील अत्यंत वर्दळीच्या अशा बिटको चौकातच एका लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे पोलिस छप्यात उघड झाले होते. येथून मोठ्या संख्येने महिलांची सुटका करण्यात आली होती. शिंदे गावाजवळील अनैतिक व्यवसायाच्या अड्ड्यावर परप्रांतीय मुलीही आढळून आल्या होत्या. हा अड्डाच मुळात परप्रांतीयाकडून चालविला जात होता. असे असतानाही स्थानिक पोलिसांना मात्र सुगावाही लागला नव्हता.

ओव्हरलोड वाहतुकीसाठी चिरिमिरी

सिन्नर फाटा येथे पोलिस चौकीसमोरूनच दररोज शेकडो ओव्हरलोड वाहने बिनधास्त ये-जा करताना दिसतात. विशेष म्हणजे येथे बऱ्याचदा नाकाबंदीही सुरू असते. एकलहरे येथून राखेची वाहतूक करणारी सिन्नरच्या अथवा नाशिकच्या दिशेने जाणारी ओव्हरलोड वाहने पोलिसांसमोरच सर्रास ये-जा करताना दिसून येतात. एकलहरे येथील राखेची वाहतूक करणारी ओव्हरलोड वाहने कोटमगाव, जाखोरीमार्गे थेट शिंदे गावाजवळ महामार्गावर येऊन पुढे पुण्याच्या दिशेन जातात. परंतु, त्यापैकी कोणत्याही वाहनांवर पोलिस कारवाई करताना दिसत नाहीत. चिरिमिरीचा धंदा येथेही जोरात सुरू असल्याचे दिसून येते.

(लोगो : क्राइम वॉच)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल

$
0
0

शिरपूर तालुक्याच्या कोळीद, पनाखेडला कारवाई

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील कोळीद व पनाखेड गावात बोगस वैद्यकीय व्यवसाय थाटून बसलेल्या चौघा बोगस डॉक्टरांविरुद्ध शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, एकजण पसार झाला आहे. या कारवाईमुळे बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी बैठक घेऊन बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा परिषद व महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली. या चारही डॉक्टरांविषयी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे यापूर्वीही तक्रारी होत्या. त्यानुसार बुधवारी (दि. २७) सकाळी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी शिवचंद्र सांगळे, शिरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रसन्न कुलकर्णी, आयुर्वेद अधिकारी डॉ. मुरमरे, अन्न निरीक्षक शामराव साळी, डॉ. प्रेमराज चव्हाण, पोलिस निरीक्षक शिरसाठ व दहा कॉन्स्टेबलच्या पथकाने या डॉक्टरांवर धडक कारवाई केली. यामध्ये ताजुद्दीन करुद्दीन शेख, आसिफ युसूफ पिंजारी व सादिक शब्बीर लोहार (तिघे रा. कोळीद) हे बोगस डॉक्टर पथकाला आढळून आले. तर पनाखेड गावात राकेश शंकरलाल भत्रावाले हा बोगस डॉक्टर आढळून आला. यातील सादिक लोहार हा फरार झाला असून, इतर तिघांना बोगस डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वैद्यकीय साहित्यही जप्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा कृषिविकास

$
0
0

नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वच प्रकारची पिके घेतली जात असल्याने नाशिकला 'राज्याचे किचन' म्हंटले जाते. नाशिक हा उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचा कृषी व औद्योगिक जिल्हा आहे. नाशिक जिल्हा द्राक्ष, कांदा यासाठी देशभरातच नव्हे, तर जगभरात प्रसिद्ध आहे. कांदा, द्राक्ष, टोमॅटो व फुले निर्यातीत नाशिक राज्यात आघाडीवर आहे. जिल्ह्यात शेतीवर आधारित उद्योगधंद्यांचे जाळे पसरले आहे. साखर कारखाने, बेदाणा केंद्र, वाइनरी, शीतगृहे यामुळे रोजगार निर्माण झाला आहे. बदलत्या काळाप्रमाणे नाशिकची पीकसंस्कृतीही बदलत चालली आहे. अशा या नाशिक जिल्ह्याच्या कृषिसंस्कृतीवर आजच्या (१ जुलै) कृषिदिनानिमित्त टाकलेला प्रकाश.

नाशिकमधील पिके

नाशिकमध्ये कांदा, द्राक्ष, डाळिंब, बाजरी, ज्वारी, हरभरा, मका, गहू, ऊस, पेरू, कापूस, भात, नाचणी, वरई, मूग, मठ, कुळीद, उडीद, तूर, फूलशेती याशिवाय भाजीपालाही मोठ्या प्रमाणात घेतला जातो. कांदा, द्राक्ष व टोमॅटो निर्यातही केले जाते.

पीकपद्धती व प्रमुख पिके

द्राक्ष, कांदा, भात, गहू, मका, बाजरी, डाळिंब ही नाशिकमधील प्रमुख पिके आहेत. १९९५ पूर्वी बाजरी, मका, ज्वारी, कुळीद, हरभरा या पिकांवर नाशिकचा भर होता. मात्र, यानंतर कृषी क्षेत्रात झपाट्याने बदल होत गेला. आज द्राक्ष, कांदा, टोमॅटो या नगदी पिकांवर शेतकऱ्यांचा भर आहे. नाशिक, निफाड, चांदवड, दिंडोरी, सिन्नर, बागलाण ही तालुके द्राक्ष शेतीसाठी ओळखली जातात. मालेगाव, कळवण, देवळा, बागलाण, येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर, चांदवड या तालुक्यांत प्रामुख्याने कांदा व डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, सुरगाणा ही तालुके भात, नाचणी, वरईच्या पिकांसाठी ओळखली जातात.

नाशिकमधील निर्यात होणारी पिके

मंत्रभूमी म्हणून नाशिक ओळखले जात असले तरी जिल्ह्याची खरी ओळख कृषीमुळेच होते. नाशिकमधून कांदा व द्राक्ष जगभरात निर्यात केले जातात. देशात सुमारे ३३ टक्के कांदा महाराष्ट्रातून पुरवला जातो. यामध्ये जिल्ह्याचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. द्राक्ष निर्यातीतही राज्यात नाशिक आघाडीवर आहे. याशिवाय टोमॅटोचीही निर्यात केली जाते. यामुळे देशाला परकीय चलनही प्राप्त होते. सरकारी धोरण कुचकामी असतानाही नाशिकमधून दरवर्षी हजारो टन कांदा, द्राक्ष व टोमॅटोची निर्यात होते.

द्राक्ष निर्यातीची आकडेवारी (टनमध्ये)

वर्ष……....…….. निर्यात

२०११-२०१२....…२८,०००

२०१२-२०१३.....…४८,४६५

२०१३-२०१४….....६७,२४४

२०१४-२०१५.....…४९,७६८

२०१५-२०१६….....१,००,००८

या आकडेवारीवर नजर टाकल्यास शेती विकसित होत गेली तसतशी निर्यातही वाढत गेली. १९९९ मध्ये अवघी चार हजार टन निर्यात होत होती. त्यानंतरच्या पंधरा वर्षांच्या आकडेवारी नजर टाकल्यास दरवर्षी त्यात वाढच होत गेली. २०१५-२०१६ मध्ये एक लाख टन विक्रमी निर्यात झाली. नाशिकच्या बदलत्या शेतीचे हे सुखावह व आनंददायी चित्र आहे.

कांदा निर्यात

वर्ष ..................निर्यात (टन लाखात)

२०११-१२..............१५.५२

२०१२-१३...............१८.२२

२०१३-१४..............१३.५८

२०१४-१५..............१०.८६

२०१५-१६..............११.१४

२०१६-१७...............३५.०

भारतातून कांदा निर्यात वाढत गेली आहे. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा ३३ टक्के असून, त्यामध्ये नाशिक जिल्ह्याचा वाटा ७० टक्के आहे.

नाशिकमधील बदलेली पीकपद्धती

जिल्ह्याच्या प्रारंभी ज्वारी, बाजरी, मका, कुळीद ही पिके प्रामुख्याने घेतली जात होती. शेतीचा विकास होत गेला तशीतशी पीकपद्धतही बदलत गेली. आज फूलशेती, स्ट्रॉबेरीचेही पीक घेतले जाऊ लागले आहे. कॉफीचे पीक घेण्याचाही प्रयोग नाशिकमध्ये झाला आहे. शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करू लागला आहे. पिकांचे लागवडीखालील क्षेत्रही झपाट्याने वाढले आहे. शेतकरी गटशेतीही करू लागले आहेत. यामुळे शेतात एकाच वेळी वेगवेगळी पिके घेता येणे शक्य होत आहे. जिल्ह्याचा विचार केल्यास कसमादे (कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा), चायना (चांदवड, येवला, नांदगाव) असे विभाजन केले जाते. याशिवाय त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी ही आदिवासी तालुके म्हणून ओळखली जातात. निफाड व दिंडोरी ही कृषीतील आघाडीची तालुके आहेत. सिन्नर या दुष्काळी तालुक्यानेही नवी ओळख निर्माण केली आहे. भाजीपाल्याबरोबर द्राक्ष व डाळिंब शेती येथे झपाट्याने विकसित झाली आहे.

कसमादे पट्टा

कसमादे पट्ट्यात ४० ते ५० वर्षांपूर्वी बाजरी, मका, ज्वारी, कुळीद, गहू व हरभरा ही पिके प्रामुख्याने घेतली जात होती. पावसावर शेती अवलंबून होती. यामुळे ही पिके घेणे सोयीचे ठरत होते. मात्र, शेतीचा विकास होत गेल्याने शेतकरी प्रयोग करू लागला. यामुळे आज बाजरी, मका, ज्वारी, कुळीद, गहू, हरभरा ही दुय्यम पिके झाली असून, सटाणा व कळवणमध्ये द्राक्ष, डाळिंब, ऊस व कांद्याने प्रथम स्थान घेतले आहे. या नगदी पिकांमुळे या तालुक्यातील अर्थकारण झपाट्याने बदलले आहे. मालेगाव व देवळा या दुष्काळग्रस्त तालुक्यांतही पीकपद्धतीत बदल झाला आहे. बाजरी, मका, कुळीद या पिकांबरोबरच कांदा आणि डाळिंबाचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. याशिवाय मालेगाव तालुक्यात कपाशीचेही उत्पादन घेतले जात आहे. या भागात तीन साखर कारखाने असल्याने काही शेतकरी उसाचेही उत्पादन घेत आहेत.

चायना पट्टा

चायना म्हणजे चांदवड, येवला व नांदगाव. या तालुक्यांतील शेतकऱ्यांनीही वेगवेगळे प्रयोग करून पीकपद्धतीत आमूलाग्र बदल आणला आहे. या तालुक्यांमध्ये बाजरी, मका, भाजीपाला ज्वारी ही पारंपरिक पिके शेतकरी आजही घेत आहेत. मात्र, उत्पन्नवाढीसाठी शेतकऱ्यांनी शेतीतही नवनवीन प्रयोग करून विकास साधला आहे. चांदवड तालुक्यात द्राक्षशेती मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय फूलशेतीचा प्रयोग येथे यशस्वी झाला आहे. येवला तालुक्यात आज कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाऊ लागले आहे. द्राक्ष शेतीही येथे केली जात आहे. यामुळे नाशिकची कृषिसंस्कृती दिवसागणिक बदलत चालल्याचे दिसून येत आहे. नांदगावमध्ये कपाशी, गहू, डाळिंब पिकाने मोठे क्षेत्र व्यापले आहे. यामुळे पर्जन्यमान कमी असूनही शेतकरी पिकांमध्ये बदल करू लागला आहे.

आदिवासी तालुक्यातील शेती

त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ व सुरगाणा ही आदिवासी तालुकेही शेतीमध्ये प्रयोग करू लागली आहेत. येथे पर्जन्यमान अधिक असल्याने भात, नाचणी, वरई, हरभरा ही पारंपरिक पिके आजही प्रामुख्याने घेतली जातात. या पिकांवर अवलंबून न राहता येथील शेतकरी नव्या पिकांकडे वळले आहेत. सुरगाणा तालुक्यात स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जात आहे. स्ट्रॉबेरी उत्पादनात महाबळेश्वर आघाडीवर असले तरी सुरगाण्यातही या पिकाने चांगले बस्तान बसवले आहे. इगतपुरी व त्र्यंबकेश्वरमध्ये टोमॅटो शेती केली जात आहे. याशिवाय फळशेती करण्याकडेही या तालुक्यांचा कल वाढू लागला आहे.

-

सिन्नर, निफाड, दिंडोरी व नाशिक

सिन्नर हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. मात्र, या तालुक्याने शेततळे निर्माण करून आपली दुष्काळी ओळख जवळपास पुसून टाकली आहे. यामुळे या तालुक्यात आज शेतीला बहर आला आहे. बाजरी, गहू, भाजीपाला या पिकांबरोबर आज द्राक्ष, कांदा व डाळिंब ही पिके शेतकरी मोठ्या प्रमाणात घेऊ लागले आहेत. निफाड व दिंडोरी ही सधन तालुके म्हणून ओळखली जातात. या तालुक्यांमध्ये बहुपीक पद्धत पाहायला मिळते. द्राक्ष, कांदा, गहू, मका, फूलशेती व भाजीपाला अशी विविध पिके घेण्यात ही तालुके आघाडीवर आहेत. द्राक्ष निर्यातीत निफाड व दिंडोरी ही जिल्ह्यातील आघाडीची तालुके आहेत. पाण्याची व्यवस्था असल्याने या तालुक्यांमध्ये सुरुवातीपासून नगदी पिके घेण्यात येत आहेत. पाण्यामुळे या तालुक्यांतील लागवडीखालील क्षेत्रातही वाढ झाली आहे.

निफाड तालुका (४७ वर्षांची आकडेवारी)

वर्ष ..……. एकूण क्षेत्र…...लागवडीखालील क्षेत्र

१९८०…….......१०५१०३…...... ७६,९८१

१९९०…….....१०५१०३….......७९,२०१

२०००……......१०५,१०३.......……८१,८१२

२०१०…...... १,०५,१०३......……८४,२३१

२०१७….......१०५,१०३..…... ८४,९२५

या एका तालुक्याचा जरी आढावा घेतला तरी लागवडीखालीत क्षेत्रात वाढ झाल्याचे दिसून येते.

शेतीवर आधारित उद्योगधंदे

साखर कारखाने

नाशिकमध्ये जवळपास सर्वच प्रकारची पिके घेतली जात असल्याने, त्यावर आधारित अनेक उद्योगधंद्यांचे जाळे जिल्ह्यात निर्माण झाले आहे. जिल्ह्यात छोटी-मोठी २४ धरणे आहेत. यामुळे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. येथे ऊसशेती मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने साखर कारखान्यांचा पाया रोवला केला. जिल्ह्यात सहकारी व खासगी मिळून एकून नऊ साखर कारखाने सुरू करण्यात आले. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हक्काचे आपले साखर कारखाने मिळाले, तर स्थानिकांना रोजगार मिळाला. उसामुळे जिल्ह्यात सहकाराचे जाळे विणले गेले. कादवा, वसाका, निसाका, गिरणा, नासाका, रानवड या सहकारी कारखान्यांबरोबरच रावळगाव, द्वारकाधीश, केजीएस या कारखान्यांनी जिल्ह्याच्या कृषी व्यवसायाला बळकटी दिली. यामुळे कृषी व्यवसायाला नवा आयाम मिळाला.

वायनरी उद्योग

द्राक्षपंढरी म्हणून नाशिकने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दर्जा व गुणात्मक द्राक्ष उत्पादनामुळे द्राक्षांची मागणी वाढली. यामुळे द्राक्ष क्षेत्रातही वाढ झाली. द्राक्षांचे उत्पादन वाढल्याने त्यावर आधारित उद्योगांची गरज निर्माण झाली. यामुळे जिल्ह्यात वायनरी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली गेली. देशाची वाइन कॅपिटल म्हणून नाशिक नावारूपाला आले. यामुळे द्राक्षांना विदेशीबरोबरच स्थानिक बाजारपेठही उपलब्ध होऊन चांगले दर मिळण्यास मदत झाली. यामुळे रोजगारवाढीलाही चालना मिळाली. जगातील सुमारे २० देशांत नाशिकची वाइन जाते. सुला विनियार्ड, यॉर्क वायनरीज, फ्लेमिंगो, व्हिनटेज, एनडी, सोमो अशा नामांकित वाइनरींनी नाशिकचे नाव सातासमुद्रापार नेले आहे. याशिवाय बेदाणा उद्योगही वाढीस लागला.

पोल्ट्री, गोटफार्म व दुग्धव्यवसाय

पोल्ट्री व्यवसायही भरभराटीस येत आहे. उद्योगांसारखा व्यवसायातही रोजगार निर्माण होत आहे. नाशिकमध्ये पोल्ट्री व्यवसायाने प्रगती करीत देशात दुसरे स्थान मिळवले आहे. सिन्नर, देवळा, मालेगाव, सटाणा, चांदवड, निफाड, कळवण या भागांत बारमाही पिके घेऊ न शकणारे शेतकरी पोल्ट्री व्यवसायाकडे वळाले आहेत. सध्या जिल्ह्यात सुमारे पाच हजार पक्ष्यांची क्षमता असलेले ५२०० पोल्ट्री युनिट्स आहेत. या उद्योगातून सुमारे २५ ते ३० हजार युवकांना रोजगार मिळाला आहे.

शेतीचे क्षेत्र कमी होत गेल्याने शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन व गोटफार्म हा जोडधंदा म्हणून पसंती दिली. सद्य:स्थितीत सिन्नर तालुक्यात सर्वाधिक गोटफार्म आहेत. अलीकडे या व्यवसायाने मोठी प्रगती केली आहे. शेळ्यांची बाहेरील देशात निर्यात होऊ लागल्याने गोटफार्मची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दुग्ध व्यवसायामुळे शेतकरी सक्षम होण्यास मदत झाली. नाशिक दूध उत्पादनात सक्षम असून, बाहेरील जिल्ह्यातही दूध पुरवले जाते. मुंबईला भाजीपाल्याबरोबरच दुधाचाही पुरवठा केला जातो. यामुळे शेतीवर आधारित जोडधंदा वाढीस लागण्याबरोबर रोजगारही उपलब्ध झाला.

(संकलन : अनिल पवार)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुपोषणाचे पुनर्सर्वेक्षण करा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील एकही मूल कुपोषित राहणार नाही व ग्राम बालविकास केंद्रातून आहार व उपचारापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्वांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. त्यासाठी गावातील अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका, ग्रामसेवकांनी पुन्हा पुन्हा सर्वेक्षण करून कुपोषित बालके शोधावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे यांनी केले. नाशिक जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्ह्यात मोहीम सुरू केली असून, त्यासाठी बैठकींचे सत्र सुरू झाले आहे.

नाशिक व दिंडोरी तालुक्याची एकत्रित आढावा बैठक शनिवारी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील सभागृहात झाली. त्या वेळी लांडगे बोलत होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक प्रमोद पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डेकाटे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी दत्तात्रेय मुंडे, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी ईशाधीन शेळकंदे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश नंदनवरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. गर्जे आदी उपस्थित होते.

लांडगे यांनी विविध विभागांचा आढावा घेताना अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. पिण्याच्या पाण्याचा आढावा घेताना लांडगे यांनी सर्व जलस्रोतांचे शुद्धीकरण करून पावसाळ्यात एकाही गावात साथ उद्भवणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. अंगणवाडीचा आढावा घेताना अपूर्ण अंगणवाडी बांधकामे त्वरित पूर्ण करण्याचे आदेश दिले. धोकादायक व नादुरुस्त अंगणवाडीत एकही तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित बालक आढळून न आल्याने तेथे पुन्हा सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले.

सुरुवातीला महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मुंडे यांनी कुपोषण निर्मूलनासाठी ग्रामस्तरावर स्थापन करण्यात आलेल्या ग्राम बालविकास केंद्राबाबत आढावा घेण्यात आला. आरोग्य व आहारसंहितेनुसार आहार व औषधे देण्यात येत आहे की नाही, याबाबत सर्व संबंधितांकडून माहिती घेण्यात आली. दिंडोरी तालुक्यात पुनर्सर्वेक्षण करून सर्व तालुका व ग्रामस्तरावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राम बालविकास केंद्रांना नियमित भेटी देण्याचे आदेश दिले. डॉ. डेकाटे यांनी आरोग्य विभागाचा आढावा घेताना दूषित पाण्याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेळकंदे यांनी दूषित पाणी नमुने, टीसीएल तपासणीचा आढावा घेतला. शौचालय वापराबाबत प्रत्येक गावात जनजागृती करून हागणदारीमुक्त गावाचा दर्जा टिकवून ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत व सातत्य ठेवण्याचे निर्देश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नामकोची निवडणूक डिसेंबरअखेर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेत रिझर्व्ह बँकेने प्रशासक हटवण्याचा निर्णय घेतला असून, पाच जानेवारीच्या आत संचालक मंडळाच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मर्चंट बँकेच्या नवनियुक्त संचालकांच्या निवडणुका डिसेंबरअखेर होण्याची शक्यता आहे. बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत रिझर्व्ह बँकेने पाठवलेल्या आदेशाची माहिती दिली. मात्र, निवडणुकीच्या तारखेबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले.

रिझर्व्ह बँकेने ६ जानेवारी २०१४ रोजी अनिमिततेचे कारण पुढे करीत संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून जे. बी. भोरिया यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर बँकेचा जसा नफा वाढला तसा एनपीए वाढला. त्यामुळे बँकेची स्थिती नाजूक असल्याच्या तक्रारी सभासदांनी सुरू केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. बँक बरखास्त करताना प्रशासक म्हणून भोरिया यांची चार वर्षांसाठी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांना वर्षभरासाठी पुन्हा मुदत दिली. ही मुदत ६ जानेवारी २०१९ रोजी संपणार आहे. त्याअगोदर त्यांना संचालक मंडळाची निवड करून त्यांच्याकडे कार्यभार सोपवावा लागणार आहे.

मुदतीपूर्वी संचालक मंडळ बरखास्त

नाशिक मर्चंट बँकेची निवडणूक २०१० मध्ये झाली होती. या वेळी हुकूमचंद बागमार यांच्या पॅनलचे सर्व २१ पैकी २० संचालक निवडून आले होते. विरोधी गटातर्फे गजानन शेलार हे एकमेव सदस्य होते. संचालक मंडळाला वर्ष बाकी असताना व बागमार चेअरमन असतानाच बँक बरखास्त झाली.

काय आहे पत्रात?

रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक प्रबंधक एस. पी. कडेमणी यांनी ११ जून रोजी पत्र पाठवले असून, ते बँकेला शनिवारी मिळाले. त्यात सबसेक्शन ३६ एएए नुसार बीआर अॅक्टनुसार संचालक मंडळाकडे ५ जानेवारी २०१९ पूर्वी कार्यभार हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ५ जानेवारीपूर्वी या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

८० शाखा, दीड लाखावर सभासद

मल्टिस्टेट शेड्युल बँकेचा दर्जा असलेल्या नाशिक मर्चंट बँकेच्या ८० शाखा असून, त्यात ७८ शाखा राज्यात, तर हैदराबाद व सुरत येथे दोन शाखा आहेत. या बँकेचे १ लाख ७९ हजार ९०५ सभासद आहेत. ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला ५४ कोटी १ लाखाचा ढोबळ, तर सर्व खर्च व तरतुदीनंतर ३५ कोटी २१ लाखांचा निव्वळ नफा मिळाला होता.

पाचव्या वर्षी नफा

प्रशासक नियुक्तीनंतर बँकेला सलग पाचव्या वर्षी भरघोस नफा झाला होता. बँकेकडे या आर्थिक वर्षात १४८६ कोटी ३० लाख ठेवी होत्या. त्यात तीन महिन्यांत घट झाली असून, आज बँकेकडे १४२१ कोटी ६९ लाख ठेवी आहेत, त्याचप्रमाणे आर्थिक वर्षात ८४९ कोटी ७ लाख रुपयांचे कर्ज होते. जूनअखेर हे ८३९ कोटी १९ लाख झाले आहे. गुंतवणूक ९९१ कोटी ३८ लाख व रिझर्व्ह फंड ४१७ कोटी २७ लाख व भागभांडवल ५० कोटी १२ लाख कायम आहे. बँकेचे निव्वळ एनपीएचे प्रमाण आर्थिक वर्षात १०.५९ टक्के झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दाभाडी पोहोचले फिरते पोलिस पथक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील छावणी पोलिस ठाणे अंतर्गत जिल्ह्यातील पहिले फिरते पोलिस पथक उपक्रमाचे शनिवारी दाभाडी येथे उद्घाटन करण्यात आले. पोलिस आणि नागरिक यांच्यातील संवाद साधला जावा यासाठी या पथकाची निर्मिती करण्यात आली. पहिल्याच दिवशी पाच तक्रारींचा निपटारा करण्यात आला, असल्याचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केले.

जयहिंद इंग्लिश मीडिअम स्कूल अॅण्ड ज्यूनिअर कॉलेजच्या सभागृहात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी छावणी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार घुसर, वाहतूक शाखेचे पो. नि. नरेंद्र भदाणे, नगरसेविका ज्योती भोसले, वीजवितरण कंपनीचे चव्हाण, तलाठी पी. पी. मोरे, दशरथ निकम, मनोज हिरे, उपसरपंच नीलिमा बाविस्कर, अमृत निकम आदी उपस्थित होते.

हर्ष पोद्दार म्हणाले, छोट्या स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यास नागरिक धजावत नसतात. फिरते पोलिस पथक उपक्रमामुळे पोलिस आणि नागरिक यामध्ये संवाद साधला जाऊन दुरावा कमी होण्यास मदत होईल. पोलिस निरीक्षक घुसरे यांनी सांगितले, सर्वसामान्य नागरिक अनेकदा पोलिस ठाण्यात येण्यास घाबरतात. एखादी समस्या छोटी असतानाच तिचा निपटारा केला नाही तर ती पुढे मोठ्या समस्येत तिचे रुपांतर होते. त्यामुळे फिरते पोलिस स्टेशनअंतर्गत पोलिस अधिकाऱ्यांनी गावांमध्ये, शहरी भागांत जावून नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करणे या उपक्रमात अपेक्षित आहे.

नरेंद्र भदाणे, दामिनी पथक महिला समुपदेशक केंद्राच्या अपेक्षा पगार यांनीही मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींनी कोपर्डी अत्याचाराच्या घटणेवर पथनाट्य सादर केले.

काय आहे पथक?

फिरते पोलिस ठाणे अंतर्गत एक पोलिस उप निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक या अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली एक हवालदार, शिपाई असे कर्मचारी असतात. हे पथक त्या त्या ठिकाणी जावून तात्पुरती व्यवस्था करून एका दिवसांसाठी पोलिस ठाणे उभारून कामकाज करतात.

पाच अर्जांवर कार्यवाही

दाभाडी येथे पहिल्याच दिवशी या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण पाच तक्रार अर्जावर कार्यवाही करण्यात आल्याची माहिती घुसर यांनी दिली. यात दोन तक्रारी अर्जावर जागेवर निपटारा करण्यात यश आले. शेजाऱ्यांमध्ये असलेला वाद दोन्ही बाजूकडील तक्रारदारांमध्ये चर्चेअंती तडजोड करत मिटविण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत हत्याकांड- पान एकवरून

$
0
0

....एकच टाहो फोडला!

--

म. टा. वृत्तसेवा, घोटी

खेडभैरव (माळीवाडा) येथील तिहेरी हत्येने इगतपुरी तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. या घटनेनंतर मृतांच्या नातलगांनी घटनास्थळी व घोटी ग्रामीण रुग्णालयात एकच गर्दी केली होती. या तिन्ही मृतदेहांवर नाशिक जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. दरम्यान, घोटी ग्रामीण रुग्णालयात आपली आई, पत्नी व चार वर्षीय मुलाचा मृतदेह पाहताच गणेश शंकर चिमटे यांनी एकच टाहो फोडला. या घटनेतून वाचलेला यशला पाहून त्यांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

गावातच शेती व मजुरी करणारा गणेश हा आपल्या कुटुंबासमवेत माळवाडी या छोट्याशा वाडीत राहतो. शेजारी त्याचे दोन भाऊ व त्याचे कुटुंबीय राहतात. चुलतभाऊ सचिन गणपत चिमटे हा आपल्या आईवडिलांसह राहतो. हत्याकांडाची घटना घडली तेव्हा गणेश कावनई येथे गेला होता, तर अन्य दोन भाऊ हे शेतीच्या कामात व्यस्त होते. गणेशच्या घरात आई हिराबाई, पत्नी व दोन मुले रोहित व यश होते. याचदरम्यान पुतण्या सचिन हा घरात शिरला व त्याने चुलती हिराबाई, चुलत भावजयी मंगल व रोहित यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जागीच गतप्राण केले.

दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयित सचिन गणपत चिमटे हा अविवाहित आहे. त्याने १२ वी पर्यंत शिक्षण घेतले आहे. बारावीपर्यंत शिक्षण घेऊनही काही करीत नाही, याबाबत नेहमी चेष्टा करीत असल्यामुळे रागाच्या भरात आपण हे कृत्य केल्याची कबुली संशयित सचिनने दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच कुटुंबातील तिघांची हत्या

$
0
0

- चुलती, चुलत वहिनी व पुतण्याचा खून

- इगतपुरीतील खेडभैरव (माळवाडी) येथील घटना

- सख्या पुतण्यानेच केली हत्या

..

म. टा. वृत्तसेवा, घोटी

खेडभैरव परिसरातील माळवाडी (ता. इगतपुरी) येथे शनिवारी सकाळी साडेनऊ वाजता सख्ख्या चुलत भावाच्या कुटुंबावर धारदार चाकूने हल्ला करीत एका जणाने तिघांची हत्या केली. या घटनेत एक सहा वर्षीय बालक बाहेर पळून गेल्याने सुदैवाने त्याचे प्राण वाचले. पोलिसांनी संशयितास अटक केली असून, या घटनेत वापरलेला चाकू ताब्यात घेतला आहे. रागाच्या भरात हे कृत्य केल्याची कबुली संशयित आरोपीने दिल्याने पोलिस सूत्रांनी सांगितले.

माळवाडी येथे गणेश शंकर चिमटे हा आपल्या कुटुंबासमवेत राहतो. शनिवारी गणेश हा बाहेर गेला होता, तर घरी त्याची आई, पत्नी व मुले होती. शनिवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शेजारीच राहणाऱ्या गणेश चिमटे यांचा चुलतभाऊ सचिन गणपत चिमटे (वय २१) याने अचानक घरात घुसून चुलती हिराबाई शंकर चिमटे, भावजयी मंगल गणेश चिमटे (वय ३०) यांच्यावर धारदार शस्राने प्राणघातक हल्ला चढविला. अनपेक्षितपणे हा हल्ला झाल्याने या दोन्ही महिलांना प्रतिकार करता आला नाही. सपासप वार केल्यामुळे सासू-सुना जागीच गतप्राण झाल्या. संशयित आरोपी सचिनने रोहित गणेश चिमटे (वय ४) व यश गणेश चिमटे (वय ६) यांच्यावरही वार केले. मानेवर घाव बसल्याने रोहित गंभीर जखमी झाला, तर यशच्या हातावर घाव बसल्यानंतर त्याने घरातून पळ काढत आरडाओरड केल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

जखमी रोहित व यशला तत्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्याने रोहितचा मृत्यू झाला. यशच्या हातावर उपचार करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नाशिक ग्रामीणचे उपअधीक्षक अतुल झेंडे, सहायक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव आदींनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपी सचिन चिमटे यास ताब्यात घेऊन घटनेचा पंचनामा केला.

- सविस्तर वृत्त...

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नामको’ची प्रशासकमुक्ती!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेत रिझर्व्ह बँकेने प्रशासक हटविण्याचा निर्णय घेतला असून, पाच जानेवारीच्या आत संचालक मंडळाच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मर्चंट बँकेच्या नवनियुक्त संचालकांच्या निवडणुका डिसेंबरअखेर होण्याची चिन्हे आहेत. बँकेचे प्रशासक जे. बी. भोरिया यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत रिझर्व्ह बँकेने पाठविलेल्या आदेशाची माहिती दिली. मात्र, निवडणुकीच्या तारखेबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे सांगितले.

रिझर्व्ह बँकेने ६ जानेवारी २०१४ रोजी अनिमिततेचे कारण पुढे करीत संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक म्हणून जे. बी. भोरिया यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर बँकेचा जसा नफा वाढला तसा एनपीए वाढला. त्यामुळे बँकेची स्थिती नाजूक असल्याच्या तक्रारी सभासदांनी सुरू केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. बँक बरखास्त करताना प्रशासक म्हणून भोरिया यांची चार वर्षांसाठी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांना वर्षभरासाठी पुन्हा मुदत दिली. ही मुदत ६ जानेवारी २०१९ रोजी संपणार आहे. त्याअगोदर त्यांना संचालक मंडळाची निवड करून त्यांच्याकडे कार्यभार सोपवावा लागणार आहे.

मुदतीपूर्वी संचालक मंडळ बरखास्त

नाशिक मर्चंट बँकेची निवडणूक २०१० मध्ये झाली होती. या वेळी हुकूमचंद बागमार यांच्या पॅनलचे सर्व २१ पैकी २० संचालक निवडून आले होते. विरोधी गटातर्फे गजानन शेलार हे एकमेव सदस्य होते. संचालक मंडळाला वर्ष बाकी असताना व बागमार चेअरमन असतानाच बँक बरखास्त झाली.

काय आहे पत्रात?

रिझर्व्ह बँकेचे सहाय्यक प्रबंधक एस. पी. कडेमणी यांनी ११ जून रोजी पत्र पाठवले असून, ते बँकेला शनिवारी मिळाले. त्यात सबसेक्शन ३६ एएए नुसार बीआर अॅक्टनुसार संचालक मंडळाकडे ५ जानेवारी २०१९ पूर्वी कार्यभार हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे ५ जानेवारीपूर्वी या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत.

८० शाखा, दीड लाखावर सभासद

मल्टिस्टेट शेड्युल बँकेचा दर्जा असलेल्या नाशिक मर्चंट बँकेच्या ८० शाखा असून, त्यात ७८ शाखा राज्यात, तर हैदराबाद व सुरत येथे दोन शाखा आहेत. या बँकेचे १ लाख ७९ हजार ९०५ सभासद आहेत. ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात बँकेला ५४ कोटी १ लाखाचा ढोबळ, तर सर्व खर्च व तरतुदीनंतर ३५ कोटी २१ लाखांचा निव्वळ नफा मिळाला होता.

पाचव्या वर्षी नफा

प्रशासक नियुक्तीनंतर बँकेला सलग पाचव्या वर्षी भरघोस नफा झाला होता. बँकेकडे या आर्थिक वर्षात १४८६ कोटी ३० लाख ठेवी होत्या. त्यात तीन महिन्यांत घट झाली असून, आज बँकेकडे १४२१ कोटी ६९ लाख ठेवी आहेत, त्याचप्रमाणे आर्थिक वर्षात ८४९ कोटी ७ लाख रुपयांचे कर्ज होते. जूनअखेर हे ८३९ कोटी १९ लाख झाले आहे. गुंतवणूक ९९१ कोटी ३८ लाख व रिझर्व्ह फंड ४१७ कोटी २७ लाख व भागभांडवल ५० कोटी १२ लाख कायम आहे. बँकेचे निव्वळ एनपीएचे प्रमाण आर्थिक वर्षात १०.५९ टक्के झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images