Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नाशिककरांचे आरोग्य धोक्यात

$
0
0

लोगो

डॉक्टर्स डे

vinod.patil@timesgroup.com

Vinod.PatilMT

नाशिक : शहराचे आरोग्य ज्या महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या हाती, तो वैद्यकीय विभागच सध्या कोमात गेला आहे. महापालिकेत सध्या दोनशे डॉक्टरांची आवश्यकता असताना, वैद्यकीय विभागाचा कारभार अवघ्या ६० डॉक्टरांवर सुरू आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांची १०३ पदे मंजूर असतानाही ४३ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. वैद्यकीय विभागाकडे फिजिशियन, मानसोपचारतज्ज्ञ आणि त्वचारोज्ज्ज्ञ एकही नाही. वैद्यकीय विभागात ७५४ पदे मंजूर असताना केवळ ४५१ कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय विभागाचा गाडा सुरू आहे. त्यामुळे अपुऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारीसंख्येमुळे शहरातील रुग्णांची हेळसांड होत असून, नाशिककरांचे आरोग्यच धोक्यात आले आहे.

महापालिकेच्या माध्यमातून शहरात चार रुग्णालये, प्रसूतिगृहे, दवाखाने व ३० शहरी प्राथमिक आरोग्यसेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना सेवा-सुविधा पुरविल्या जातात. मात्र, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने या सेवा देताना अडचणी येत आहेत. सद्य:स्थितीत महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर वैद्यकीय विभागासाठी ७५४ पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी ४५१ पदांवरच कर्मचारी कार्यरत असून, तब्बल ३०३ पदे रिक्त आहेत. महापालिकेच्या अस्तित्वातील, तसेच नव्याने उभारण्यात येत असलेल्या रुग्णालये, दवाखान्यांसाठी उपलब्ध कर्मचारीसंख्या अत्यंत तोकडी आहे. शहराचा दिवसेंदिवस वाढणारा विस्तार व वाढती लोकसंख्या लक्षात घेता, महापालिकेच्या रुग्णालयांवरील रुग्णसंख्येचा ताण मात्र वाढतच आहे. जागितक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार एक हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टरची आवश्यकता आहे. त्यामुळे २० लाख लोकसंख्येसाठी शहरात किमान दोन हजार डॉक्टर आवश्यक आहेत. शहरात खासगी डॉक्टरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असली तरी शहरातील पाच ते सहा लाख गोरगरीब रुग्णांचा भार हा महापालिकेच्या रुग्णालयांवरच असतो. त्यामुळे सध्याच्या भारतीय स्टँडर्डनुसार महापालिकेला किमान दोनशे डॉक्टरांची गरज असताना, सध्या केवळ ६० डॉक्टरांवरच वैद्यकीय विभागाचा गाडा सुरू आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे सध्या एकही फिजिशियन नाही. सोबतच मानसोपचारतज्ज्ञ, कान, नाक व घसातज्ज्ञ आणि त्वचारोगतज्ज्ञांची पदेही रिक्त आहेत. वैद्यकीय अधीक्षकपदाचा कार्यभारही प्रभारींच्या हाती आहे. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे मंजूर असताना, सध्या या पदावर एकही वैद्यकीय अधिकारी नाही. असिस्टंट मेंट्रन, एक्स रे टेक्निशियन, एक्स रे असिस्टंट अशी तांत्रिक पदांचीही कमतरता आहे. त्यामुळे रुग्णांना सेवा देताना, सध्याच्या डॉक्टरांचीही दमछाक होत आहे.

भरतीही बारगळली

अपुऱ्या डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारीसंख्येमुळे रुग्णांची हेळसांड होत असल्याने महापालिकेने आपल्या हॉस्पिटलमध्ये मानधन तत्त्वावर २८ डॉक्टरांसह २५१ अन्य पदांची जम्बो भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. वाढत्या आस्थापना खर्चाचा हवाला देत सरकारने नोकरभरतीला बंदी घातल्याने पेचात सापडलेल्या महापालिकेने या पदांची मानधनावर भरती करण्याचा प्रस्ताव तयार करीत तो महासभेतही मंजूर करून घेतला होता. त्यासाठी दरवर्षी साडेचार कोटींचा खर्च अपेक्षित होता. मात्र, आता हा भरतीचा प्रस्तावही बारगळला आहे.

नव्याने आराखडा

महापालिकेकडून सध्या नव्याने आस्थापना आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी वैद्यकीय विभागालाही नव्याने आराखडा तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार वैद्यकीय विभागाने तातडीने पदे भरण्यासंदर्भातील आवश्यक स्टाफची यादी प्रशासन उपायुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक व रिक्त पदे भरण्यासंदर्भात नवीन आराखडा तयार केला जात आहे.

पदाचे नाव मंजूर पदे रिक्त पदे

वैद्यकीय अधीक्षक १ १

उपवैद्यकीय अधीक्षक १ १

निवासी वैद्यकीय अधिकारी २ २

मुख्य वैद्यकीय अधिकारी २ १

वैद्यकिय अधिकारी १०३ ४३

प्रयोगशाळा तंत्रज्ञ ४ ४

फिजिशियन ३ ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


तडीपार गुन्हेगार जेरबंद

$
0
0

तडीपार गुन्हेगार जेरबंद

सिडको : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीसह विविध भागांत गुन्हे दाखल असलेल्या सुमित संदीप दिंडोरकर याला पोलिसांनी तडीपार केलेले असतानाही तो अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की सुमित दिंडोरकरवर विविध गुन्हे दाखल असल्याने त्याला हद्दपार केले होते. मात्र, हद्दपार असतानाही तो अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्यासह गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गणेश चौक येथे सापळा रचला. सुमित येणार असल्याची माहिती मिळाली असल्याने पोलिसांनी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये सुमितवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास हवालदार भास्कर मल्ले करीत आहेत. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनेक तडीपार केलेले गुन्हेगार फिरत असल्याचे वारंवार समोर आले आहे. पोलिसांनी त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मगिरी परिसरात आज डॉक्टरांकडून वृक्षारोपण

$
0
0

ब्रह्मगिरी परिसरात आज डॉक्टरांकडून वृक्षारोपण

सिडको : नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील डॉक्टरांकडून आज, रविवारी (दि. १) ब्रह्मगिरी परिसरात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. हरितविश्व व हरित ब्रह्मगिरी या संस्थांतर्फे ही माहिती देण्यात आली. सकाळी सात वाजता त्र्यंबकेश्वरमधील आंबेडकर चौकापासून प्रभात फेरी निघणार असून, उदासीन आखाडामार्गे ती ब्रह्मगिरीकडे जाईल. ब्रह्मगिरी पर्वतावर पिंपळ, हिरडा, बेहडा, आवळा, चिंच, मोह, साग, नीलगिरी, करवंदे, शिसव, आंबा, सीताफळ, फणस, काजू, सादडा आदींचे रोपण करण्यात येणार आहे.

--

गावठी कट्टा जप्त (फोटो)

सिडको : अंबड पोलिसांनी शनिवारी एका तरुणाकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त केले. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वावरेनगर भागात रवी रामअंजोर त्रिपाठी (वय २७, रा. सातपूर) हा गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी हेमंत आहेर व दीपक वाणी यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांना ही माहिती दिल्यावर गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक तुषार चव्हाण, विजय पवार, दत्तात्रय गवारे व दुष्यंत जोपळे यांनी वावरेनगर भागात सापळा रचून ही कारवाई केली. त्रिपाठी यास अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

--

तडीपार जेरबंद

सिडको : अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीसह विविध भागांत गुन्हे दाखल असलेल्या सुमित संदीप दिंडोरकर याला तडीपार केलेले असतानाही तो अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. अंबडचे वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांच्यासह गुन्हे शोध पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गणेश चौक येथे ही कारवाई केली. हवालदार भास्कर मल्ले तपास करीत आहेत.

---

पॉइंटर्स

आरोग्य बँक मदतीला -२

बहुद्देशीय हॉल वेटिंगवर! -३

विठ्ठला टाळ विठ्ठ्ल दिंडी, विठ्ठला तोंडी उच्चारा -४

अनुष्काशी सह'मत' -५

कलेतून मिळाला अर्थार्जनाचा मार्ग -६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विहिरीतून बाहेर पडताच बिबट्याने ठोकली धूम

$
0
0

पाडळीतील घटना; वनविभागाच्या प्रयत्नातून मिळाले जीवदान

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

तालुक्यातील पाडळी येथे अन्नपाण्याच्या शोधार्थ फिरत असलेला दोन वर्षे वयाचा बिबट्या शुक्रवारी (दि.२९) रात्री विहिरीत पडला. शनिवारी (दि. ३०) वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला जीवदान दिले. मात्र विहिरीत टाकलेल्या शिडीवर सरसर चढून वर आलेल्या बिबट्याने धूम ठोकली.

तालुक्यातील पाडळी येथे नाईका मळा परिसरात बाळू व विष्णू रेवगडे यांची शेतजमीन आहे. येथेच यांची सामाईक विहीर आहे. शुक्रवारी रात्री अन्नपाण्याच्या शोधार्थ परिसरात आलेल्या बिबट्याला अंदाज न आल्याने तो विहिरीत पडला. विहिरीत जवळपास एक परस पाणी असून, पाण्यात पडलेल्या बिबट्याने विहिरीच्या एकाबाजूला असलेल्या कपारीत आश्रय घेतला. सकाळी विष्णू रेवगडे यांचा मुलगा दत्तू हा विहिरीकडे मोटार सुरू करण्यासाठी गेला असता, मोटार सुरू होत नसल्याने त्याने विहिरीत डोकावून पाहिले असता बिबट्याच्या डरकाळ्यांचा आवाज त्याला ऐकू आला. भरभीत झालेल्या दत्तूने लागलीच कुटुंबीयांना याबाबत कळविले. तोपर्यंत रेवगडे यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याची वार्ता पाडळी गावात पसरली. घटनास्थळी बघ्यांची खूप गर्दी जमली. वनविभागाचे अधिकारी पी. बी. सोनवणे यांना घटनेची माहिती देण्यात आल्यानंतर सोनवणे यांच्यासह अनिल साळवे, सरोदे लोंढे यांच्यासह व कर्मचाऱ्यांनी पाडळी येथे धाव घेऊन ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले.

सुमारे ७ ते ८ परस खोल असलेल्या विहिरीत प्रारंभी बाज सोडण्यात आली. तसेच शिडीही लावण्यात आली. बिबट्याने जीवरक्षणासाठी आलेल्या बाजेवर बसकन मांडल्यानंतर दोराच्या सहाय्याने बाजेसह बिबट्याला वर खेचण्यात येत होते. विहिरीतून बाहेर येण्यासाठी काही अंतर बाकी असतानाच बिबट्याने बाजेवरून शिडीचा आधार घेत कठड्यावर येवून जवळच असलेल्या गिन्नी गवताच्या दिशेने धूम ठोकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकांच्या आरोग्यासाठी ‘त्यांची’ समाजसेवा

$
0
0

बालरोगतज्ज्ञ डॉ. संगीता बाफना यांचे थॅलेसिमिया, कुपोषणाविषयी कार्य

ashwini.kawale@timesgroup.com

Tweet : @ashwinikawaleMT

नाशिक : कुपोषण, थॅलेसिमियासारख्या समस्यांवर काम करून बालकांच्या आरोग्याची स्वत:च्या मुलाप्रमाणे काळजी घेणाऱ्या डॉ. संगीता बाफना शहरातील बालरोगतज्ज्ञांपैकी एक नाव. त्र्यंबकेश्वर, हरसूल येथील साप्ते, आंबोली, घुमोरी अशा भागांमधील कुपोषित मुलांची काळजी घेणे असो किंवा आदिवासी शाळा वैद्यकीयदृष्ट्या दत्तक घेणे असो, बालकांना केंद्रस्थानी ठेवून शक्य तितके कार्य करण्याचा प्रयत्न त्या करत आहेत. वैद्यकीय पेशा हा केवळ मिळकतीचे साधन नव्हे तर समाजाची सेवा करण्याचे माध्यम आहे, हे ओळखत निरपेक्ष भावनेने त्यांचे कार्य सुरू आहे.

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण काहीतरी उद्देश ठेवून धावत असल्याचे दिसते. वैद्यकीय क्षेत्रही याला अपवाद नाही. पण अनेक डॉक्टर असेही आहेत जे वैद्यक क्षेत्राकडे समाजसेवा म्हणून बघत आहेत. डॉ. संगीता बाफना या थॅलेसिमिया फाउंडेशन नाशिक, जनकल्याण ब्लड बँक थॅलेसिमिया सेंटर नाशिक, टचवूड फाउंडेशन, नाशिक या संस्थांच्या संचालकपदी कार्यरत असून, या माध्यमातून सुरू असलेले त्यांचे काम आज अनेक चिमुकल्यांसाठी वरदान ठरत आहे. सकस आहार, बालकांच्या आरोग्याची योग्य काळजी, वेळोवेळी तपासणी या माध्यमातून बालकांना कुपोषणातून बाहेर काढायचे, या निर्धारातून डॉ. संगीता बाफना यांनी जिल्ह्यातील कुपोषणग्रस्त बालकांसाठी काम करणे सुरू केले. पालक योग्य काळजी घेत नसल्याने आज बालकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होते आहे, हे ओळखत अंगणवाड्या, ग्रामीण भागातील घराघरांमध्ये प्रबोधन करण्यात त्यांचा सहभाग आहे. लहान मुलांना काय व कसा आहार दिला पाहिजे, स्वच्छता व आरोग्य यांचा संबंध अशा कित्येक गोष्टी त्या बालकांच्या निरोगी आरोग्यासाठी करत आहेत. ना पैशांची ना प्रसिद्धीची अपेक्षा केवळ समाजाची सेवा हे लक्षात ठेवून अव्याहतपणे त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. गेल्या तीन वर्षांपासून जलाराम गतिमंद शाळेतील मुलांची नियमित तपासणी, आदिवासी भागांमध्ये आरोग्याची होत असलेली हेळसांड पाहता शाळा वैद्यकीय दत्तक घेतली आहे.

चिमुकल्यांच्या वेदना जाणल्या

थॅलेसिमिया या आजारामुळे चिमुकल्यांना होणाऱ्या वेदना जाणत २७ वर्षे डॉ. बाफना सेवा करत आहेत. या मुलांना जगवण्यासाठी दर महिन्याला त्यांना रक्त द्यावे लागते. या मुलांचे त्यांचे भविष्य काय, हे नेमके ठाऊक नसले तरी त्यांच्या वेदना कमी करायच्या आणि चांगल्या दिवसांची दारे त्यांच्यासाठी खुली करायची, या उद्देशाने २७ वर्षांचा काळ त्या कार्य करीत आहेत.

लहान बालकांना वैद्यकीय सेवांची मोठी गरज आहे, हे ओळखत मी या कार्याला सुरुवात केली. नाशिकमधील अनेक संस्थांच्या माध्यमातून एकत्रित येत काम करतात. त्यात वेळोवेळी सहभाग नोंदवून समाजासाठी माझ्या कार्याचा उपयोग व्हावा, यासाठी प्रयत्नशील आहे. प्रत्येकाने समाजकार्यासाठी आपला वाटा दिलाच पाहिजे.

डॉ. संगीता बाफना, बालरोगतज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कारप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येवला येथील रहिवाशी व मालेगाव येथे शिक्षणासाठी आलेल्या १४ वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी समीर जुनेद अन्सारी (रा. कछी रोड, परदेशपुरा, येवला) याला १० वर्ष सक्तमजुरी व ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली जिल्हा अपर सत्र न्यायधीश आर. एच. मोहंमद यांनी हा निकाल दिला.

येवला येथील बालिका मालेगाव येथे काकांकडे शिक्षणासाठी आली होती. समीर जूनेद अन्सारी याने तिच्यावर पाळत ठेवत तिला १० जून २०११ रोजी पळवून नेले. औरंगाबाद येथे तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी सदर बालिकेच्या काकाने जुनेदविरुद्ध १३ जून २०११ रोजी आझाद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास पूर्ण होवून न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता. सरकारी पक्षातर्फे अॅड. बी. एस. शेवाळे यांनी सहा साक्षीदार तपासले. सबळ पुरावे लक्षात घेता न्यायालयाने जूनेदला भादवी कलम ३६३, ३६६ अंतर्गत पाच वर्ष सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. भादवी कलम ३७६ अंतर्गत १० वर्ष सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून दहा हजार रुपये पीडित बालिकेला देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर्स करताहेत प्राणवायूचे प्रत्यारोपण

$
0
0

ग्रीन रिव्होल्यूशनने जगविली २० हजार रोपे

-

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : येणाऱ्या पिढ्यांसाठी गुंतवणूकच करायची असेल तर ती केवळ पैशांची करून चालणार नाही. प्रदूषणाचा विळखा आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत चालल्याने प्राणवायूचीही गुंतवणूक करणे अनिवार्य ठरू लागले आहे. शहरातील अनेक डॉक्टर्सला याचीच जाणीव झाल्यामुळे त्यांनी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धनाचा वसा स्वीकारला आहे. हाच वसा पुढे सुरू ठेवण्यासाठी रविवारी (दि. १ जुलै) रोजी निसर्गाच्या सानिध्यात रोपांची लागवड करून अनोख्या पद्धतीने ठिकठिकाणी डॉक्टर्स डे साजरा केला जाणार आहे.

आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रे तंतर

अरं जगणं मरणं एका श्वासाचं अंतर

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेमधील या ओळीतून ऑक्सीजनचा आणि जगण्याचा थेट संबंध अधोरेखित होतो. रुग्णसेवा करणारे डॉक्टर्स उपचारांद्वारे एकप्रकारे रुग्णांच्या श्वासांमध्ये कधी अंतर पडू देत नाहीत. श्वासासाठी महत्त्वाचा असतो तो ऑक्सीजन. हा ऑक्सीजन मोफत पुरविणाऱ्या झाडांचीच दुर्दैवाने कत्तल होऊ लागली आहे. त्यामुळे निसर्गाचा समतोल बिघडत असून, पर्यावरणाचाही ऱ्हास होत आहे. ही परिस्थिती बदलावी यासाठी शहरातील काही डॉक्टर्सने तीन वर्षांपूर्वी वृक्षारोपणाची एक मोहीम हाती घेतली. चुंचाळे शिवार येथील एका टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आले. केवळ रोपे लावून ही डॉक्टर मंडळी थांबली नाही. तर ती जगावीत यासाठी सर्वतोपरी योगदानही दिले. चुंचाळे येथील आनंदकानसह त्र्यंबकरोडवरील वासाळी, बेळगावढगा आणि पेठरोडवरील तवली फाटा येथे सुमारे २० हजार रोपे लावून ती जगविण्यात आली आहेत. या रोपांच्या संवर्धनासाठीच्या सर्व उपाययोजना सुरूवातीला काही डॉक्टर्स आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी स्वखर्चाने केल्या. परंतु या मोहिमेचा वेलू गगनावरी जाऊ लागला तसा सीएसआरमधून वस्तूरुपात या मोहिमेला मदत मिळू लागली. रोपांसह पाणी पुरविण्याचे पाइप, खते, बि-बियाणे या स्वरुपात ही मदत मिळत आहे. ग्रीन रिव्होल्यूशन ही खऱ्या अर्थाने क्रांती ठरत असून त्यामध्ये आता विविध क्षेत्रातील मान्यवरही जोडले जाऊ लागले आहेत. प्रत्येक रविवारी किमान दोन तास वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी दिले जात असून, येथे वनराई वाढू लागली आहे. कळवण आणि सिन्नर तालुक्यातही ग्रीन रिव्होल्यूशन अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले असून, ही रोपेही आता बाळसे धरू लागली आहेत.

---

..कोट..

ग्रीन रिव्होल्यूशन ही मोहीम तीन वर्षांपूर्वी सुरू झाली. ३५ ते ४० डॉक्टरांसह विविध क्षेत्रातील मान्यवर या मोहिमेत आहेत. आम्ही आतापर्यंत २० हजार रोपे जगविली आहेत. वृक्ष ही उघड्यावरची संपत्ती आहे. लोकसहभाग वाढावा याकरिता आम्ही प्रयत्न करीत आहोत. रविवारी १ जुलै रोजी आम्ही दोन हजार रोपांची लागवड करीत आहोत.--डॉ. संदीप आहेर, ग्रीन रिव्होल्यूशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवघ्या २० दिवसांत विनयभंगाच्या गुन्ह्याचा निकाल

$
0
0

आरोपीस तीन वर्षांची सक्तमजुरी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस कोर्टाने तीन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी अवघ्या २० दिवसात ही सुनावणी पूर्ण करीत हा निकाल दिला.

राजू मोतीराम चव्हाण असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ७ जानेवारी २०१८ रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ११ वर्षांची अल्पवयीन मुलगी घरात पाणी भरीत होती़ एकटी मुलगी असल्याची संधी साधून आरोपी राजू चव्हाण (वय ४२) घरात घुसला़ पीडित मुलीला उचलून घेत त्याने तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर चव्हाण पळून गेला़ दरम्यान झालेला प्रकार मुलीने वडिलांना सांगितला. त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी लागलीच विनयभंग तसेच बाललैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. महिला पोलिस उपनिरीक्षक सी. एस. पाटील यांनी तपासाअंती दोषारोपपत्र सादर केले. अॅड. शिरीष कडवे यांनी सुनावणी दरम्यान नऊ साक्षीदार तपासले. कोर्टात पीडित मुलीची आणि आरोपीला घटनास्थळावरून पळून जाताना पाहणारा साक्षीदार या दोघांची साक्ष महत्त्वाची ठरली. त्याआधारे कोर्टाने चव्हाण यास दोषी ठरवून तीन वर्षे सक्तमजुरी आणि तीन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास तीन महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. विनयभंग तसेच बलात्कारच्या घटनांमध्ये जलद सुनावणी निकाल लागला तर निश्चितच अशा गुन्ह्यांचे प्रमाण कमी होऊ शकते, अशी भावना यामुळे व्यक्त होत आहे.

--

खटल्याचा घटनाक्रम

७ जानेवारी २०१८-गुन्हा घडला

८ जानेवारी - गुन्हा दाखल

९ एप्रिल - दोषारोपपत्र दाखल

११ जून - खटल्याच्या कामास सुरुवात

२९ जून - खटल्याची सुनावणी पूर्ण, निकाल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृक्ष लागवडीचा मालेगावी जागर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

महाराष्ट्र शासनाच्या वनविभागाच्या वतीने १ ते ३१ जुलै दरम्यान १३ कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या जनजागृतीसाठी उपविभागीय वनविभाग, आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समिती, सामाजिक वनीकरण विभाग व शहरातील शाळा-महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी व जनजागृती फेरी काढण्यात आली. यानिमित्ताने शहरातील कॅम्प रस्त्यावरील वनविभाग कार्यालय आवारात वृक्ष लागवडीचा जागर पाहायला मिळाला.

दरवर्षीप्रमाणे यंदादेखील येथील वनविभागाकडून वनमहोत्सवाअंतर्गत १४ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष निर्धारित करण्यात आले आहे. यानिमित्ताने जनजागृती करण्यासाठी वृक्षदिंडी आयोजित करण्यात आली होती. विविध शाळांमधून आलेल्या रॅलीचे वन विभागाच्या कार्यालय आवारात समारोप करण्यात आला. यावेळी उपविभागीय वन अधिकारी जगदीश येडलावर, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, विशेष सरकारी वकील शिशिर हिरे, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड, भाग्यलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन यू. आर. पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे, सामजिक वनीकरण विभागाचे शामकांत देसले आदी उपस्थित होते. समारोपाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निखील पवार यांनी केले. वृक्ष लागवड व संवर्धन करणारे खातून एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन शेख रिजवान अब्दुल मुतलीफ व दीपक बच्छाव यांना वृक्षमित्र पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल व वृक्ष भेट देऊन गौरविण्यात आले.

या जनजागृती फेरीत शहरातील र. वी. शाह विद्यालय, या. ना. जाधव विद्यालय, काकाणी विद्यालय, मदर आयेशा विद्यालय, काबरा विद्यालय, के. बी. एच. विद्यालय, ए. टी. टी. हायस्कूल, आर. बी. एच. विद्यालय, जागृती विद्यालय, शुभदा विद्यालय, जेएटी गर्ल्स हायस्कूल, नवभारत विद्यालय, सानेगुरुजी विद्यालय, विनय मंदिर विद्यालय, अजिंठा विद्यालय आदी शाळातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू अड्डे, वाळू वाहतूक बंद करण्याचा ठराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

लोहोणेर येथे सुरू असलेले गावठी दारूअड्डे, अवैध वाळू वाहतूक, गावठी दारू बनविण्यासाठी लागणारा गूळ व नवसागरसह इतर रसायन विक्रीवर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी असा महत्वपूर्ण ठराव विशेष ग्रामसभेत सर्वानुमते मजूर करण्यात आला. लोहोणेर गावालगत गिरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या हातभट्ट्या बिनबोभाट चालू आहेत. याबाबत वृत्तपत्रात वृत्त प्रसिद्ध होताच गुन्हे शाखेच्या वतीने धाड सत्र सुरू करण्यात आले होते. सुमारे तीन लाखाचा ऐवज गुन्हे शाखेच्या हाती लागला होता. दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या हातभट्ट्यांमुळे गावातील बहुतांश तरुण पिढी व्यसनाच्या आहारी गेली आहे. या व्यवसायाला आळा घालण्यासाठी तसेच लोहोणेर गावालगत गिरणा नदीच्या पात्रातून सुरू असलेला अवैध वाळू उपसा व चोरटी वाहतूक थांबावी यासाठी लोहोणेर ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयवंता बच्छाव होत्या. या ठरवास उपस्थित ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे पदाधिकाऱ्यांनी हात उचवून अनुमोदन दिले. अवैध गौण खनिज प्रतिबंध दक्षता समिती स्थापन करण्यात आली असून या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष सरपंच बच्छाव, सदस्य यू. बी. खैरनार, ग्रामविकास अधिकारी, ए. आर. पूरकर, अरविंद उशीरे, पोलिस पाटील, विष्णू वाघ, कोतवाल यांची या दक्षता समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

योगसाधनेने अवतरेल ‘वसुधैव कुटुंबकम्’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

योगशास्त्रामध्ये माणसातील माणूसपण जागविण्याचे सामर्थ्य आहे. योगामुळे आपसातील संघर्ष मिटून माणूस माणसाशी जोडला जातो आहे. आज समाजाने मानसिकता बदलली, तर योगसाधनेने 'वसुधैव कुटुंबकम्' प्रत्यक्षात अवतरेल. स्वर्ग-नरक काहीही नसून, योगामध्ये परमार्थ साधून पृथ्वीचा स्वर्ग करण्याची ताकद आहे, असे प्रतिपादन योगविद्याधाम गुरुकुलचे कुलगुरू डॉ. विश्वासराव मंडलिक यांनी केले.

योगविद्या प्रसाराचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना गेल्या वर्षीपासून दिला जाणारा पंतप्रधान पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मंडलिक यांचा योगविद्याधाम योग व निसर्गोपचार केंद्र व 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वतीने सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. व्यासपीठावर 'महाराष्ट्र टाइम्स'चे निवासी संपादक शैलेंद्र तनपुरे, योगविद्याधामचे अध्यक्ष मनोहर कानडे, पौर्णिमा मंडलिक, श्यामला राईकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, महापालिकेचे निवृत्त उपायुक्त दत्तात्रेय गोतिसे, प्रवीण देशपांडे आदी उपस्थित होते. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ओमकार प्रतिमापूजन व दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर 'दिशादिशांतून नाद निनादे, योग शिका अन् योग जगा'चा संदेश उत्कर्षा हांडोरे, भक्ती हांडोरे, ईश्वरी हांडोरे यांनी योगगीतातून दिला.

प्रास्तविकातून सुनील जाधव यांनी पुरस्कार निवडीविषयी माहिती दिली. शिल्पा शर्मा यांनी पाहुण्यांचा, प्रवीण देशपांडे यांनी सत्कारमूर्तींचा, तर विदित गुजराथी यांनी संस्थेचा परिचय करून दिला. त्यानंतर डॉ. मंडलिक यांना गौरविण्यात आले. डॉ. मंडलिक यांनी योग समजून घेत समाजात तो परावर्तित केला असून, त्यासाठी केवळ योगसाधक न घडवता त्यांनी योगशिक्षकही घडविले असल्याचे गौरवोद्गार शैलेंद्र तनपुरे यांनी काढले. या वेळी २१ योगशिक्षकांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. प्रथम १० योग प्रवेश साधकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सायली काळे यांनी योगविद्या वर्गाबाबत माहिती दिली. डॉ. निवेदिता खोत व अनुजा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. नलिनी कड यांनी आभार मानले. योगविद्याधामचे सर्व साधक, शिक्षक या वेळी उपस्थित होते. विश्वकल्याण प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

योगशिक्षकांचा सन्मान

समाजात अधिकाधिक योगविद्येचा प्रचार व प्रसार व्हावा या हेतूने २१ जून रोजी जागतिक योगदिनी संयुक्त वर्गात मोफत योगप्रवेश वर्ग शिकविणाऱ्या योगशिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शिल्पा शर्मा, पूजा रायकिसानी, पूजा उभ्रानी, सचिन कुमावत, अर्चना भावसार, उद्धव हांडोरे, सायली काळे, कामिनी तनपुरे, निवेदिता खोत, सोनाली पाटील, हर्षद पटेल, नलिनी कड, भारती शेट्टी, चेतना कुलकर्णी, वर्षा मोरे, दीप्ती पट्टे, चैतन्य कुलकर्णी, राम गोतिसे, प्रियांका डोळस, आकाश नेहरे, दिलीप नेरकर, विभा लोहिया, स्मिता लोहार आदींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान एक हेल्पलाइन

$
0
0

साक्षी कल्पवृक्ष

SAKSHI KALPAVRUKSH

९५.२० टक्के

--

शिवणकाम करीत साक्षीने मिळविले यश

--

gautam.sancheti@ timesgroup.com

Tweet - gsanchetiMT

--

नाशिक : आईवडील शिवणकाम करून घरखर्च भागवत असले तरी त्यातून संपूर्ण कुटुंबाचा रहाटगाडा चालवणे मुश्किल होते. अशा बिकट परिस्थितीतही न डगमगता आईला शिवणकामात मदत करणाऱ्या साक्षी कल्पवृक्षने दहावीत ९५.२० टक्के गुण मिळवून श्रीराम विद्यालयात पहिला येण्याचा मान मिळवला. तिला प्रशासकीय सेवेत जायचे आहे. मात्र, यासाठी तिला दानशूरांच्या मदतीचा हात हवा आहे.

गोदाकाठावर असलेल्या शनीचौकात सिंधी वाड्यात राहणाऱ्या कल्पवृक्ष कुटुंबीयाची गुजराण ही शिलाई कामावर आहे. वडील मोतीलाल हे एका दुकानात शिलाईचे काम करतात, तर आई घरातच पिको फॉल व हातशिलाईचे काम करते. या कामातून कल्पवृक्ष कुटुंबीयाच्या हातात जेमतेम सहा ते सात हजार रुपये पडतात. त्यानंतर घराचे भाडे व इतर खर्च जातात. फारसे पैसे शिल्लक राहत नाही. तुटपुंज्या पैशातून कल्पवृक्ष कुटुंबीयाने मात्र मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष दिले आहे. साक्षी पाचवी ते दहावीपर्यंत श्रीराम विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षकांनी तिला प्रोत्साहन व मार्गदर्शन केल्यामुळे तिने कोणतीही शिकवणी न लावता हे यश मिळवले आहे. जुनी पुस्तके व वाट्याला आलेले आर्थिक दारिद्र्य याला न डगमगता साक्षीने शिक्षणावर लक्ष केंद्रित केले. साक्षीचा भाऊ रोहित सातवीत असून, तो वर्गात पहिला येण्याचा मान मिळवतो. कर्नाटकमधील विजापूर जिल्ह्यातील बागकोट हे या कुटुंबीयाचे मूळ गाव आहे.

- सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पगडी’ने सुटला हॉटेल ट्रेडमार्कचा गुंता

$
0
0

--

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

--

फ्रँचाइसी करार रद्द झाल्यानंतर नावात थोडेबहुत बदल करीत इतर बाबी पूर्वीप्रमाणेच ठेवणाऱ्या नागपुरातील हॉटेल मालकास मुंबई हायकोर्टाने दणका दिला. सात दिवसांत नावासह इतर बाबी बदलून नव्याने व्यवसाय करण्यासाठी सात दिवसांची मुदत हायकोर्टाने दिली असून, यावर पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे. या प्रकरणी हॉटेल पंचवटी गौरवतर्फे हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

नाशिकमधील हॉटेल पंचवटी गौरवच्या मुंबई, पुणे, गुडगाव, बेंगलुरू, इंदूर, नोएडासह इतर शहरांमध्ये फ्रँचाइसी आहेत. नागपूरमध्येसुद्धा पाच वर्षांपासून अक्षय आणि अश्विन लिंबाना या पिता-पुत्रांनी पंचवटी गौरव हॉटेल सुरू केले होते. या वर्षाच्या सुरुवातीला लिंबाना यांनी हा करार संपवण्याबाबत पंचवटी गौरवच्या व्यवस्थापनाशी चर्चा केली. त्यास मंजुरी देण्यात आली. मात्र, काही दिवसांतच लिंबाना यांनी पंचवटी गौरव हे नाव बदलून पंचरत्न राघव या नावाने आहे तेच दुकान सुरू केले, तसेच पंचवटी राघव या नावाच्या ट्रेडमार्क रजिस्ट्रेशनसाठी अर्ज सादर केला. याबाबतची माहिती नाशिक येथील गौरव चांडक यांना समजल्यानंतर त्यांनी अॅड. हिरेन कमोद यांच्यामार्फत मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस. जे. काथावाला यांच्या कोर्टात धाव घेतली. गेल्या शुक्रवारी याबाबत युक्तिवाद झाला. सुरुवातीलाच या दोन नावांमध्ये साम्य नसल्याचा मुद्दा काथावाला यांनी उपस्थित केला. त्यावर अॅड. कमोद यांनी युक्तिवाद करताना लिंबाना जाणीवपूर्वक पंचवटी गौरव हॉटेलचा ट्रेडमार्क असलेल्या पगडीचा वापर करीत असल्याचे सांगितले. ही पगडी ट्रेडमार्कमध्ये समाविष्ट आहे. नावात थोडासा बदल असला तरी त्यासाठी वापरण्यात आलेली फाँटसाइज एकच आहे. ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, तेथील वातावरण, जेवण आदी सर्व हॉटेल पंचवटी गौरवच्या धर्तीवर असल्याचे त्यांनी पुराव्यानिशी कोर्टात उपस्थित केले. पंचवटी हा शब्द शहराची ओळख असून, त्याच्याच आधारे अशिलाचा व्यवसाय इतक्या वर्षांपासून सुरू असल्याचे कमोद यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा न्यायमूर्ती काथावाला न्यायनिवाडा करण्याच्या तयारीत असताना लिंबाना पिता-पुत्रांनी झालेली चूक मान्य केली. मात्र, चूक मान्य करून या प्रकरणावर पडदा पाडणे चुकीचे होईल. पंचवटी गौरवची कोणतीही ओळख, खाणाखुणा हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना दिसणार नाहीत, अशा पद्धतीने यात सुधारणा व्हावी, अशी विनंती अॅड. कमोद यांनी केली. कोर्टाने ती मान्य करीत हा बदल करण्यासाठी लिंबाना पिता-पुत्रास सात दिवसांचा कालावधी दिला. कोर्टाने दिलेल्या आदेशाचे पालन झाले की नाही, याचा आढावा घेण्यासाठी पुढील सुनावणी मंगळवारी होणार आहे.

तीन ते चार दशकांपासून एकत्रित कुटुंबाने केलेल्या तपश्चर्येचे फळ आता कुठे मिळण्यास सुरुवात झाली आहे. पंचवटी गौरव हा ब्रँड म्हणून समोर येत असताना त्याचा गैरवापर झाला. हा पहिलाच प्रकार असल्याने त्याची गंभीर नोंद घेऊन याचिका दाखल केली होती.

- गौरव चांडक, हॉटेल पंचवटी गौरव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाडीवऱ्हेच्या प्लास्टिक कारखान्यावर धाड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात प्लास्टिकबंदी जाहीर झाल्यानंतर सर्वत्र कारवाईचे सत्र सुरू झाल्यानंतरही प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन सुरू असलेल्या वाडीवऱ्हे येथील एका कारखान्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांनी धाड टाकली. या धाडीत प्लास्टिक पिशव्या व कच्चा माल जप्त केल्याची चर्चा आहे. दरम्यान, अशी कोणतीच कारवाई केली नसून, उत्पादन बंद करण्याच्या सूचना दिल्याची माहिती कारखानदाराने दिली.

वाडीवऱ्हेच्या या कारखान्याविरुद्ध पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्याकडे तक्रार गेल्यानंतर त्यांनी थेट कारवाईचे आदेश मुंबईच्या पथकाला दिले. त्यानंतर ही कारवाई झाली. या कारवाईबद्दल नाशिकच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला कोणतीच माहिती नव्हती. त्यांना धाड टाकल्याचे समजताच ते नंतर तेथे पोहोचले. याबाबत नाशिकच्या प्रदूषण नियंत्रण मंडळानेही माहिती देण्यास नकार दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंढेंचा अल्टिमेटम धुडकावला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रीनफिल्ड लॉन्स प्रकरणात माफीनामा सादर करावा लागल्यामुळे संतप्त झालेले आयुक्त तुकाराम मुंढे यांनी किन्सिंग्टन प्रकरणात संचालक विक्रांत मतेंनी नोटिसांवर नोटिसा देणाऱ्या आयुक्तांना शनिवारी तीन पानी लिफाफा पाठवून महापालिकेची कारवाईच बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे. महापालिकेच्या अल्टिमेटममध्ये दीड कोटी रुपये भरण्यास नकार देत, आयुक्तांनाच कायद्याचे धडे शिकवले आहेत. चौकशी न करता कोणालाही नोटीस देणे बेकायदेशीर असून, उलट आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकार कोणत्या कायद्यान्वये वापरले व निधी जमा करण्याचे आदेश कोणत्या कायद्यान्वये दिले, याचा खुलासा करण्याचे आव्हान महापालिकेला दिले आहेत. उलट आमच्या पत्राकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी महापालिकेवर केला आहे. त्यामुळे मुंढे आणि मते यांच्यातील वाद आणखीच चिघळला आहे.

आयुक्त मुंढेंना ग्रीनफिल्ड प्रकरणी झालेली मानहानी जिव्हारी लागली असून, ग्रीनफिल्डचे संचालक मते यांच्यातील वादाला शनिवारी नवी कलाटणी मिळाली आहे. चांदशी शिवारातील मते यांच्या मालकीच्या किन्सिंग्टन क्लबच्या संरक्षक भिंतप्रकरणी महापालिकेकडून नोटिसांचा फार्स सुरू आहे. ग्रीनफिल्ड प्रकरण उद्भवल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी संरक्षक भिंत कोसळल्यानेच महापालिकेचे रस्ते, तसेच गॅबियन वॉलचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवत आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मते यांना १ कोटी ४० लाखांच्या नुकसानभरपाईची नोटीस देत, ४८ तासांत पैसे भरण्याचा अल्टिमेटम दिला होता. पाठोपाठ 'किन्सिंग्टन' क्लबच्या संरक्षक भिंती कोसळून गोदावरी नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शुक्रवारी पर्यावरण विभागानेही नोटीस बजावली आहे. आयुक्तांनी दिलेली मुदत शनिवारी संपली असून, मतेंनी दीड कोटी रुपये भरण्यात नकार दिला आहे. उलट महापालिकेची कारवाईच बेकायदेशीर ठरवली असून, महापालिका चुकीच्या पद्धतीने न्यायप्रविष्ट प्रकरणांत काम करीत असल्याचा ठपका ठेवला आहे. विक्रांत मतेंनी शनिवारी आयुक्तांना खुलासा सादर करीत, हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आपण या प्रकरणात कारवाई करू शकत नाही, असा दावा केला आहे. गॅबियन वॉल ही नैसर्गिक आपत्तीमुळे कोसळली असून, त्याचा आमच्या क्लबशी संबंध नाही. याउलट आम्हीच महापालिकेला २३ ऑक्टोबर २०१७ रोजी वस्तुस्थिती अहवाल पाठवला होता. मात्र, त्यावर कारवाई करण्याऐवजी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये आमच्यावर कारवाई केली जात आहे. महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केला असून, एक कोटी ४० लाख भरण्याचे आदेश आपण कोणत्या कायद्यान्वये दिला, अशी विचारणा केली आहे. आपत्ती व्यवस्थापनाने कोणतीही चौकशी न करता कारवाई का केली, अशी उलट विचारणा केली आहे. संरक्षक भिंत व रस्त्याचे डिझाइन शहर अभियंत्यामार्फत प्रमाणित करून घेण्याचे निर्देश कोणत्या कलमांद्वारे मनपाने दिले आहेत, याचा बोध होत नाही. बफर झोनमध्ये कुठल्याही प्रकारचे बांधकाम केलेले नाही. लॉन्स केलेले नाही. जमिनीची धूप होऊ नये यासाठी गवत लावलेले आहे. नदीकाठच्या रस्त्याची जागा महापालिकेने संपादित केलेली नाही. सिंहस्थाचे कारण देत मतेंच्या मालकीच्या नदीकाठच्या जागेवर मनपाने रस्ता बांधला. रस्त्याची जागा लवकरात लवकर संपादित करून मोबदला अदा केला जाईल, असे आश्वासन मनपाने दिल्याने रस्ताबांधणीस हरकत घेतली गेली नाही. आजतागायत भूसंपादनाची कार्यवाही मनपाने केलेली नसताना रस्ता दुरुस्त करून देण्याची मागणी करणे कायदेशीर नसल्याचे मते यांनी या खुलाशात नमूद केले आहे.

मुंढेंच्या भूमिकेकडे लक्ष

महापालिकेने किन्सिंग्टन प्रकरणात आतापर्यंत चार नोटिसा दिल्या आहेत. संबंधित क्लब हा चांदशी शिवारात असतानाही, केवळ ग्रीनफिल्डचा बदला म्हणून मतेंच्या मालमत्तांना लक्ष्य करण्याचे काम मनपाकडून सुरू आहे. त्यामुळे मतेंनीही हा प्रश्न आता प्रतिष्ठेचा केला असून, त्यांनी कायद्याचा अभ्यास करून आयुक्तांना जशास तसे उत्तर दिले आहे. दीड कोटी भरण्याचा अल्टिमेटम झुगारत, उलट महापालिकेला कायद्याचे अगाध ज्ञान नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे एक प्रकारे हा मुंढेंनाच डिवचण्याचा प्रकार असून, या खुलाशावर आता मुंढे काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हाभर आजपासून वृक्षारोपण मोहीम

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या ५० कोटी वृक्षलागवडीच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत यंदा राज्यात १३ कोटी वृक्षलागवड करण्यात येणार आहे. जिल्ह्यातही ठिकठिकाणी सरकारच्या विविध विभागांसह सामाजिक संघटनांतर्फे वृक्षारोपण करण्यात येणार आहे. ही वृक्षारोपण मोहीम एक ते ३१ जुलै या कालावधीत राबविण्यात येणार असून, तिचा प्रारंभ धोंडेगाव येथे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

वन विभाग, सॅमसोनाइट साउथ एशिया प्रा. लि व तैनवाला फाउंडेशनतर्फे धोंडेगाव येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता वृक्षलागवड होणार आहे. ही मोहीम ३१ जुलैपर्यंत सुरू राहील. जिल्ह्यात ७२ लाख २६ हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रोपवाटिकांमध्ये एक कोटी २३ लाख २५ हजार रोपे तयार असून, त्यामध्ये नीम, सिसू, शिरस, बाभूळ, शिसम, खैर, आवळा, शिवम, करंज, साग, अंजन, वावळा, आपटा, खाया, आंबा, चिंच, जांभूळ, सीताफळ, वड, पिंपळ, उंबर, बेहडा, हिरडा, रिठा, अर्जुन सादडा, कवठ, अमलतास या रोपांचा समावेश आहे.

त्रिपक्षीय करारांतर्गत नाशिक वनवृत्तातील पश्चिम भाग विभागांतर्गत सॅमसोनाइट नाशिक यांच्यामार्फत मौजे धोंडेगाव व देवरगाव येथे ४५ हेक्टर क्षेत्रावर ४९,५०० रोपांची लागवड करण्यात येणार आहे. याखेरीज सरकारच्या ३४ विभागांमधील अधिकारी, कर्मचारीदेखील विविध ठिकाणी वृक्षारोपण करणार आहेत. त्यासाठीची ठिकाणे निश्चित झाली असून, तयारीदेखील पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटनांच्या वतीनेही ठिकठिकाणी वृक्षारोपण होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात १०५ टक्के पाऊस

$
0
0

मालेगावात १४६, तर निफाडमध्ये अवघा २४ टक्के पाऊस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांना अनेक दिवस प्रतीक्षा करावयास लावणाऱ्या पावसाने महिनाअखेरीस चांगली फटकेबाजी केली. त्यामुळे जिल्ह्यात पावसाने जूनची सरासरी ओलांडली. जिल्ह्यात १०५ टक्के पाऊस झाला असून, मालेगावात सर्वाधिक १४६ टक्के पाऊस झाला आहे. निफाड तालुक्यात सर्वांत कमी २४ टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी पावसाने चौफेर फटकेबाजी केली. विशेष म्हणजे १ जूनपासूनच पावसाला सुरुवात झाली. मात्र, यंदा मात्र पावसाने नाशिककरांना प्रतीक्षा करायला लावली. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. मात्र, त्यानंतर तो गायब झाला. तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात मात्र दोन- तीन दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे पावसाने सरासरी ओलांडली आहे. जिल्ह्यात जूनमध्ये सरासरी २३२४ मिलिमीटर पाऊस होतो. याचाच अर्थ प्रत्येक तालुक्यात सरासरी १५४.९७ मिलिमीटर पाऊस होतो. मात्र, यंदा १ ते ३० जून या कालावधीत २४४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील १५ पैकी आठ तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. मालेगाव १४६.६, नाशिक १४५.२, बागलाण १४१.३, इगतपूरी १२७.१, चांदवड १२६.४, सिन्नर ११८.५, देवळा ११७.२, पेठ १०६.६ टक्के पाऊस झाला आहे. याशिवाय कळवण तालुक्यात ९९.५० टक्के पावसाची नोंद झाली आहे. अन्य तालुक्यांमध्ये मात्र पावसाने निराशा केली आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये ८०.७, सुरगाण्यात ६७.७, नांदगावात ५९.९, दिंडोरीत ५४.३ आणि निफाडमध्ये सर्वांत कमी २४ टक्के पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सरासरी १६२.७३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आर्इ -वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी सी. ए. व्हायचंय!

$
0
0

Pravin.chaudhari@timesgroup.com

आई-व‌डील कमी शिकले असले तरी त्यांनी आम्हाला संस्कार दिले. या संस्काराच्या शिदोरीतूनच प्रतिकूल परिस्थितीतही धीराने व कष्टाने मी अभ्यासावर लक्ष केंद्रित करीत लक्ष्य साधले. घरात आजीच्या आजारपणाचा खर्च करून दोन मुलांना शिकवतांना वडिलांची होणारी ओढाताण ही कुठीतरी थांबली पाहिजे, असे सारखे वाटायचे. त्यातूनच मला चांगला अभ्यासाची प्रेरणा मला मिळाल्याचे सृष्टी वाणी सांगते. सृष्टीने प्रतिकुल परिस्थितीतदेखील जिद्दीने अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत ९२.६० टक्के गुण मिळवले. तिला आर्इ-वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी सी. ए. व्हायचंय!

सृष्टी महेश वाणी ही नंदिनीबार्इ वामनराव विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. महाबळ परिसरातील एका जुन्या घरात ती कुटुंबासह राहते. वडील महेश वाणी वृत्तपत्र वाटपाचे काम करतात. आर्इ गृहिणी आहे. लहान भाऊ ८ वीच्या वर्गात शिकतो. आजी पक्षघाताच्या आजाराने ग्रस्त असल्याने त्या बेडवर असतात. वडिलांच्या मिळकतीवर जेमतेम घर चालते. त्यात आजीच्या आजारावरही बराच खर्च होतो.

आर्इ-वडील कमी शिकलेले असले तरी मुलगी हुशार असल्याने तिचे शिक्षण पूर्ण करायची त्यांची इच्छा. त्यांच्या या इच्छेला सृष्टीने अभ्यासाच्या जोरावर बळ दिले. दहावीच्या वर्षात दररोज चार तास अभ्यास केला, उर्वरित वेळेत आर्इला घरकामात मदत आजारी आजीची सेवा करून तिने हे यश संपादन केले. सृष्टी लहानपणापासूनच शांत, सुस्वभावी, हुशार आणि समंजस आहे. परिस्‍थितीअभावी तीला अनेक गोष्टींसाठी तडजोड करावी लागली. पण तिने कधीच तक्रार केली नाही किंवा हट्ट धरला नसल्याचे वडील महेश वडील कौतुकाने सांगतात. सृष्टीला अकरावी कॉमर्सला प्रवेश घेवून सी. ए. व्हायचे आहे. मात्र, तिच्या कुटुंबास शिक्षणाच्या खर्चाची चिंता आहे.

नाव - सृष्टी महेश वाणी
SRUSHTI MAHESH WANI
गुण - ९२.६०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निमा’साठी मोर्चेबांधणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) २९ जुलै रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज विक्रीला रविवारी सुरुवात झाली. पण, पहिल्या दिवशी एकही अर्ज गेला नाही. अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १२ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत असल्यामुळे या निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. २९६४ सदस्य असलेली निमा ही जिल्ह्यातील उद्योजकांजी शिखर संस्था असून, त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीत सत्ताधारी गटाविरुद्ध पॅनल तयार करण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. विरोधी गटानेसुद्धा चाचपणी सुरू केली असून, तगडे उमेदवार उभे करण्यासाठी व्यूहरचना आखली आहे. गेल्या वेळी बिनविरोध निवडणूक झाली होती. पण, यंदा तशी शक्यता कमी आहे. या निवडणुकीत नूतन अध्यक्षांसह सहा पदाधिकारी व ३४ कार्यकारीणी सदस्यांची निवड केली जाणार आहे. मोठ्या उद्योग गटासाठी यंदा अध्यक्षपद राखीव आहे. त्यामुळे दोन्ही गट अध्यक्षपदाचा उमेदवार शोधण्याची चाचपणी करीत आहेत. दोन उपाध्यक्ष (लहान व मोठे उद्योग गटातून प्रत्येकी एक), मानद सरचिटणीस (कोणत्याही गटातून), दोन सचिव (लहान व मोठे उद्योग गटातून प्रत्येकी एक) आणि खजिनदार (एक जागा, कोणत्याही उद्योग गटातून) अशा पदाधिकाऱ्यांसह एकूण ४१ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यासाठी निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून व्ही. के. भूतानी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

२९ जुलै रोजी मतदान होणार असून ३० ला मतमोजणी होणार आहे. पण, उमेदवारी अर्ज १२ जुलैपर्यंत भरावे लागणार असल्यामुळे त्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एटीएम’मध्ये लुबाडले!

$
0
0

पैसे काढून देण्याच्या बहाण्याने कार्डची आदलाबदल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बँक एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने कार्डची अदलाबदल करून एका संशयिताने वृद्ध महिलेच्या बँक खात्यातील तब्बल ३६ हजार रुपये काढून घेतले. हा प्रकार जेलरोड येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये घडला.

या प्रकरणी मालती सुरेशचंद्र देव (६४, रा. फ्लॅट क्रमांक ५, धिरज हौसिंग सोसायटी, भीमनगर, जेलरोड) यांनी उपनगर पोलिसांकडे तक्रार दिली आहे. १३ जून रोजी सांयकाळी साडेसात वाजेच्या सुमारास देव जेलरोडवरील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. मात्र, सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतरही देव यांच्या हाती पैसे पडले नाही. यावेळी तिथे असलेला एक अज्ञात आरोपी पुढे आला. त्याने देव यांना मदतीचा बहाणा करीत त्यांचे कार्ड काढून एसबीआय बँकेचे दुसरेच कार्ड त्यांच्या हाती सोपवले. यानंतर देव घरी परतल्या. यानंतर चोरट्याने देव यांच्या खात्यातील ३६ हजार रुपये काढून घेतले. विशेष म्हणजे यानंतर देव यांच्या खात्यावर एका अनोळखी व्यक्तीने २१ हजार रुपये जमा करून त्यातील २० हजार रुपये काढून घेतले. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पीएसआय एस. बी. पवार करीत आहेत.

त्रिवेणी सोसायटीत भरदुपारी घरफोडी

चोरट्यांनी भरदुपारी घरफोडी करून तब्बल ६० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. २९) दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास सिडकोतील बाल उद्यानाजवळील त्रिवेणी सोसायटातील संध्यादीप बंगला येथे घडली. या प्रकरणी संध्या प्रदीप चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी दरवाजाची कडी उघडून त्यांच्या घरात प्रवेश केला. घरात ठेवलेले तीन तोळ्याची सोन्याची पोत, चार ग्रॅमचे कर्णफुले, मोत्याचा हार आणि दहा हजार रुपयांची रोकड असा ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार खांडेकर करीत आहेत.

शौचालयात विनयभंग

सार्वजनिक शौचालयात गेलेल्या महिलेचा ६५ वर्षांच्या वृद्धाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. दत्तात्रय मोराडे (६५, रा. सातपूरगाव) असे संशयित आरोपीचे नाव आहे. घटना शुक्रवारी (दि. २९) रात्री नऊ वाजेच्या सुमारास सातपूर भाजी मंडईतील सार्वजनिक शौचालयात घडला. पीडित महिला बाथरुमसाठी गेली असता संशयित मोराडे याने तेथे तिचा विनयभंग केला. घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून संशयित मोराडेला अटक केली. अधिक तपास पीएसआय जाधव करीत आहेत.

गावठी कट्ट्यासह अटक

गावठी कट्टा बाळगणाऱ्या रवी रामअंजोर त्रिपाठी (२७, रा. ११२०, एमएची बी कॉलनी, सातपूर) यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक लोखंडी बॉडी असलेला कट्टा जप्त करण्यात आला. कामटवाडा परिसरातील सह्याद्री चौकातील नागेश्वर मंदिरासमोर पोलिसांनी त्रिपाठीला शुक्रवारी (दि. २९ जून) रात्री ११ वाजेच्या सुमारास जेरबंद केले. संशयिताविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित त्रिपाठीकडे हा कट्टा कोठून आला, तो कोणाला देणार होता, याचा सविस्तर तपास पोलिस शिपाई दीपक वाणी करीत आहेत.

तडीपारास अटक

शहर पोलिसांनी वर्षभरासाठी तडीपार केलेले असताना शहरात वास्तव्य करणाऱ्या तडीपारास पोलिसांनी अटक केली. सुमित संदीप दिंडोरीकर (२२, रा. एन १०, गणेश चौक, सिडको) असे या संशयिताचे नाव आहे. दिंडोरीकरविरुद्ध शरीर आणि मालमत्तेविरुद्ध अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यास पोलिस उपायुक्त परिमंडळ दोन यांनी १८ सप्टेंबर २०१७ रोजी एक वर्षांसाठी तडीपार केले होते. या काळात त्यास शहर किंवा जिल्ह्याच्या भागात वास्तव्य करण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी (दि. २९ जून) रात्री नऊ वाजेच्या सुमारास दिंडोरीकर गणेश चौकातील साई हॉस्पिटल येथे पोलिसांना सापडला. त्याच्याविरोधात अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास हवालदार मल्ले करीत आहेत.

..

अल्पवयीन मुलाचा अर्धांगवायूने मृत्यू

पॅरेलिसीस अर्थात अर्धांगवायूने अवघ्या १५ वर्षांच्या मुलाचा मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी (दि. ३० जून) घडली. चेतन गुलाबराव पाटील (इंडोलाईन फर्निचरसमोर, साईग्रामनगर, ११, पाथर्डी-अंबड लिंकरोड) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. चेतनाला सकाळी त्रास सुरू झाला. त्यामुळे चेतनचे वडील गुलाबराव पाटील यांनी त्यास दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. पक्षघातामुळे ज्येष्ठ नागरिकांना किंवा तरुणांना त्रास होतो. मात्र, याचा फटका अगदी अल्पवयीन मुलाला बसल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते आहे. दरम्यान, या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, घटनेचा अधिक तपास पोलिस नाईक चव्हाण करीत आहेत.

..

इंदिरानगरमध्ये

तरुणीची आत्महत्या

इंदिरानगर परिसरातील चार्वाक चौकात राहणाऱ्या २५ वर्षांच्या तरुणीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. युवतीच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसून, या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे.

गौरी मंजित वल्टे (२५, रा. श्रीराम अपार्ट. क्रमांक ६, चार्वाक चौक, इंदिरानगर) या तरुणीचे नाव आहे. गौरीने शनिवारी (दि. ३० जून) सकाळच्या सुमारास घरातील फॅनला दोरी बांधून गळफास घेतला. ही घटना उघडकीस येताच तिला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित करण्यात आले. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक ए. के. जगताप करीत आहेत.

तरुणाचा गळफास

पाथर्डी फाटा येथे राहणाऱ्या अमित हीर किशोर शहा (३०) या तरुणाने घरात गळफास लावून आत्महत्या केली. अमितच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नसून, या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना शनिवारी (दि. ३० जून) सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. त्यापूर्वी, अज्ञात कारणातून अमितने गळफास लावून घेतला होता. दरम्यान, आत्महत्येची घटना उघडकीस येताच त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटनेचा अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images