Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रार्इनपाडा घटनेच्या दोषींना फाशी द्या

$
0
0

निषेधार्थ मोर्चाद्वारे भटका जोशी समाजाची मागणी

म. टा. प्रतिनिधी,जळगाव

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे गोसावी समाजाच्या पाच भिक्षुंना जमावाने मारहाण करून त्यांची हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भटका जोशी समाज सेवा संघातर्फे बुधवारी (दि. ४) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.

धुळे जिल्ह्यात राईनपाडा येथे पाच भिक्षुंची हत्या करण्यात आली. राज्यामध्ये डवरी गोसावी समाज हा पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करीत असतो. ७० टक्के समाज मुलभूत गरजांसाठी गावोगावी फिरत असतो, असे असताना पुरोगामी महाराष्ट्रात त्यांच्यावर अमानूष हल्ले करून त्यांना ठार मारल्याची घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे, असे या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ अखिल भटका जोशी समाज सेवा संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात पुरुषांसह महिलांनीदेखील मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर अडविण्यात आला. या वेळी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. या वेळी सुरेश वाकोद, दिलीप जोशी, सुरतसिंग जोशी, वसंत वाकोद, सुनील जोशी, सुमीत जोशी, विलास साळुंके, हिरामण भवर, गणेश वायकर, मोहन भवर, संदीप जोशी, पांडुरंग जोशी, ईश्‍वर चव्हाण, गंगाराम वायकर, विष्णू अनार हे उपस्थित होते. दरम्यान, वाकोद येथील शांताई फाउंडेशनतर्फेदेखील या घटनेचा निषेध करण्यात आला आहे. ज्या भिक्षुंची हत्या झाली आहे त्यांच्या कुटुंबीयांना २५ लाखांची मदत करून त्यांचे पुर्नवसन करावे, अशी मागणी सुरेश जोशी, गजानन जोशी, विलास जोशी, विशाल जोशी यांनी केले. राईनपाडा येथील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, भटक्या विमुक्त जाती-जमातींना शासकीय सवलती देवून संरक्षण कायदा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

साक्रीत शनिवारी निषेध मोर्चा
धुळे : साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे भटके विमुक्त नाथपंथी डवरी समाजाच्या पाच निष्पाप व्यक्तींची जमावाकडून क्रूरपणे हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध व्यक्त करीत दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच खटल्यासाठी ॲड. उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय नवनाथ गोसावी संघटनेतर्फे बुधवारी साक्री तालुका तहसीलदार संदीप भोसले यांना देण्यात आले. त्याचबरोबर येत्या शनिवारी (दि. ७) येथील तहसील कार्यालयावर संघटनेच्यावतीने निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. अखिल भारतीय नवनाथ गोसावी संघटनेच्या मागण्यांना शहर लाडशाखीय वाणी समाज व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांनीदेखील पाठिंबा दिला आहे.

राईनपाडा येथे घडलेल्या अमानवीय घटनेने मानव जातीला कलंक फासला आहे. भटके विमुक्त नाथपंथी डवरी समाजाच्या पाच निष्पाप व्यक्तींची क्रूर हत्या झाली आहे. घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. खटल्यासाठी ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती व्हावी तसेच ज्या समाजकंटकांनी सोशल मीडियावर अफवा पसरविली, त्यांनाही कठोर शासन व्हावे. या घटनेतील व्यक्तीच्या परिवाराला २५ लाख रुपये लाभ मिळावा तसेच संरक्षण मिळावे. परिवारातील एका सदस्याला नोकरी मिळावी तसेच सरकारने त्यांच्या परिवारास घर बांधण्यासाठी मदत करावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या वेळी तालुकाध्यक्ष गोटू जगताप, अशोकगिरी महाराज, आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र मोरे, लाडशाखीय वाणी समाजाचे अध्यक्ष प्रमोद येवले, शिवसेनेचे किशोर वाघ, गोविंदा सोनवणे, भटू जाधव, राहुल गोसावी, देवेंद्र पवार, मुकेश पवार, सागर गोंधळी, हिंमत गोसावी, राजू गोंधळी, किशोर गोंधळी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एचव्हीडीएस’द्वारे कृषीपंपांना वीजजोडणी

$
0
0

जळगाव परिमंडळासाठी ४७६ कोटींची निधी; १६ नवीन उपकेंद्रांसाठी २६ कोटी

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

महावितरणच्या जळगाव परिमंडळातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पैसे भरून प्रलंबित २०,२२४ कृषीपंपांना वीजजोडणी देण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणाली व सोळा नवीन उपकेंद्राच्या उभारणीसाठी ४७६ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामाच्या निविदा प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आल्याची माहिती मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी ‘मटा’शी बोलताना दिली आहे.

यामध्ये जळगाव परिमंडळातील जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्रलंबित कृषीपंपांच्या उच्चदाब वितरण प्रणाली उभारण्यासाठी ४२५ कोटी रुपये, नवीन १६ उपकेंद्रे उभारण्यासाठी २६ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. याचबरोबर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेतून नंदुरबार जिल्ह्यातील १४८८ अनूसुचित जमातीतील पैसे भरून प्रलंबित कृषीपंपाना २५ कोटींचा निधी तर जळगाव जिल्ह्यासाठी २२७ कोटी ११ लाख, धुळे जिल्ह्यासाठी १३६ कोटी ९८ लाख तर नंदुरबारसाठी ८७ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यानंतर आता दोन वा तीन कृषीपंपग्राहकांसाठी कमी क्षमतेचे एक वितरण रोहित्र असणार आहे. त्यामुळे संबंधित कृषीपंपग्राहकांमध्ये रोहित्राबद्दल स्वमालकीची भावना निर्माण होईल. योग्य दाबाचा वीजपुरवठा होऊन कृषीपंप व्यवस्थित चालतील तसेच वीजचोरीस आळा बसेल.

कृषीपंपांच्या वीजजोडणीची आकडेवारी...

जळगाव परिमंडळात...........२०,२२४
धुळे जिल्हा....................... ६१६३
जळगाव जिल्हा ................. १०१८९
नंदुरबार............................ ३८७२

उच्चदाब वितरण प्रणाली...
उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे ४१५ व्हॉल्टच्या लघुदाब वीजवाहिनीऐवजी ११ केव्हीची उच्चदाब वीजवाहिनी उभारणी करून १०० केव्हीए/६३ केव्हीए या उच्चक्षमतेच्या वितरण रोहित्राऐवजी वीजभारानुसार २५ केव्हीए व त्यापेक्षा कमी क्षमतेच्या वितरण रोहित्रांचा वापर करून वीजवापरकर्त्यांना वीजजोडणी उपलब्ध करून दिली जाते.

होणारे फायदे...
वीजेची तांत्रिक हानी कमी होऊन वितरण रोहित्रे जळण्याचे प्रमाणात घट होईल
वितरण रोहित्रावरील वीजभार मर्यादित असणार
अतिभार व लघुदाब वाहिन्यातील तांत्रिक बिघाड होणार नाही
अनधिकृत कृषीपंपाद्वारे वीजवापरास चाप

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्ती वाटप अन् शुभमंगलही!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

दि ब्लाईंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन आणि पुण्यातील श्रीमंत दगडू शेठ हलवाई चॅरिटेबल ट्रस्टतर्फे राज्यभरातील १२२ अंध विद्यार्थी-विद्यार्थिनींना प्रत्येकी पंधराशे रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. याशिवाय याच कार्यक्रमात दोन अंध जोडप्यांच्या लग्नाच्या रेशीमगाठीही जुळविण्यात आल्या. हा कार्यक्रम नाशिक-पुणे रोडवरील स्वयंवर मंगल कार्यालयात पार पडला.

याप्रसंगी कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, श्रीमंत दगडू शेठ हलवाई चॅरिटेबल ट्रस्टचे महेश सूर्यवंशी, दत्ता गायकवाड, लायन्स क्लबचे अध्यक्ष सचिन कर्णिक, गुडविलचे संस्थापक कालिदास मोरे, जैन सोशल ग्रुपचे शरद शहा आदी उपस्थित होते. दि ब्लाईंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. संस्थेचे महासचिव दत्ता पाटील, खजिनदार विजया दबे, तेजस्विनी शेवाळे, सपना चांडक यांनी संयोजन केले.

संदीप सोनकांबळे आणि अनिता वालंबे तसेच गणेश पाटील आणि पार्वती लोंढे या जोडप्यांच्या रेशीमगाठी याच कार्यक्रमात जुळल्या. त्यांच्या शुभमंगल प्रसंगी उपस्थितांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. दोन्ही नवदांपत्यास उपस्थितांच्या सहकार्याने संसारोपयोगी साहित्याचीही भेट देण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मास्टर्स ट्रेनर’ करणार गणित सोपं

$
0
0

आयआयटी मुंबई-राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानचा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील विद्यार्थ्यांचा गणित विषयातील दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांकडून योग्य अध्यापन केले जाणे आवश्यक आहे. या विचाराने आयआयटी मुंबई आणि राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने 'क्वालिटी इम्प्रुव्हमेंट इन मॅथ एज्युकेशन' हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. परीक्षेद्वारे शिक्षकांची निवड करण्यात येणार असून राज्यातील सुमारे ३०० निवडक माध्यमिक स्तरावरील गणित शिक्षकांना एक वर्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर प्रशिक्षित मास्टर ट्रेनर्स इतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे गणित आणखी सोप्पं करणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणिताची भीतीचे प्रमाण मोठे आहे. हा विषयच अनेक विद्यार्थ्यांना नको वाटतो. पण तो अधिक प्रभावी आणि सोप्या पद्धतीने शिकवला गेला तर विद्यार्थीही कंटाळणार नाही, या दृष्टीकोनातून प्रशिक्षणाची रचना करण्यात आली आहे. गेल्या वर्षी राज्यातील २७३ माध्यमिक स्तरावरील गणित शिक्षकांची निवड झाली होती. त्यांना मास्टर ट्रेनरचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर प्रशिक्षकांनी संपूर्ण राज्यात सप्टेंबर-डिसेंबर २०१७ मध्ये १२ हजार ५०० शिक्षकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. अधिकाधिक शिक्षकांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्यासाठी मास्टर ट्रेनरची संख्याही जास्त असणे आवश्यक आहे, या विचाराने आता ३०० शिक्षकांची दुसरी बॅच तयार करण्यात येणार आहे. इयत्ता नववी व दहावीला गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना या परीक्षेसाठी अर्ज करता येणार असून ८ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर प्रशिक्षण पूर्वपरीक्षा १४ जुलै रोजी सकाळी ११ ते १ या दोन तासात होणार आहे. बहुपर्यायी प्रश्नांद्वारे परीक्षा घेतली जाणार आहे. शिक्षकांना https://goo.gl/forms/pVgrUtJXIKgmniwx1 या लिंकवर नोंदणी करता येणार आहे. या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक विद्या प्राधिकरण नाशिकचे उपसंचालक जालिंदर सावंत यांनी केले आहे.

असे असेल परीक्षेचे स्वरुप

प्रशक्षिण पूर्वपरीक्षेत सुमारे २५ टक्के प्रश्न प्राथमिक बीजगणित, रेखीय बीजगणित, अमूर्त बीजगणित, आणि संख्या सिद्धांतावर आधारित असणार आहेत. तर उर्वरित प्रश्न गणिताच्या इतर क्षेत्रावर आधारित असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नीट’ परीक्षेच्या तयारीबाबत मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेल्या नीट परीक्षेविषयी विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र टाइम्सच्या प्लॅनेट कॅम्पसअंतर्गत 'नीट परीक्षेची तयारी कशी करावी', या मार्गदर्शनपर शनिवारी (दि. ७) व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कॉलेजरोडवरील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमधील प्राचार्य एम. एस. गोसावी फार्मसी कॉलेजमधील सायंकाळी ५ ते ७ या वेळेत हा सेमिनार होणार आहे. यावे‌ळी रोहित जोशी मार्गदर्शन करणार आहेत. जोशीज् लर्निंग सेंटर या सेमिनारचे प्रायोजक आहेत. वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना नीट परीक्षा होणे आवश्यक आहे. मात्र, परीक्षेच्या काठीण्य पातळीमुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षेबाबत भीती असते. तसेच परीक्षेचे स्वरुप, कालावधी आदी प्रश्न असतात. या प्रश्नांबरोबरच नीट परीक्षेची सर्व माहिती, अभ्यासाची तयारी कशी करावी, या विषयी मार्गदर्शन केले जाणार आहे.

लोगो : प्लॅनेट कॅम्पस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदव्युत्तरसाठी प्रवेश सुरू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सार्वजनिक आरोग्य पोषणशास्त्र, आरोग्य सेवा व्यवस्थापन व औषध निर्मिती क्षेत्रतील नाविण्यपूर्ण पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली आहे.

याबाबत कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर म्हणाले, की आरोग्य शिक्षणातील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशन), एमबीए (हेल्थ केअर एडमिनिस्ट्रेशन) व एम. एस्सी. (फार्मस्युटिकल मेडिसिन) हे पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य ज्ञान असणे महत्त्वाचे आहे. यासाठी विद्यापीठाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशन) हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांमधून विद्यार्थ्यांना पोषण विषयक कार्यक्रमांचे सुयोग्य नियोजन, व्यवस्थापन, प्रत्यक्ष कृती आणि मूल्यमापन अशा सर्व व्यवस्थापकीय कौशल्यज्ञान याचा अभ्यासक्रमात समावेश केला आहे. विद्यापीठाचे नाशिक मुख्यालयात सुरू करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी आरोग्य विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात.

विद्यार्थ्यांना हॉस्पिटल व्यवस्थापन, हॉस्पिटल सेवेचे सुयोग्य नियोजन आणि व्यवस्थापन आदीबाबत कौशल्य प्रशिक्षण गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठातर्फे एमबीए (हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेशन) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यासाठी आरोग्य विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ शकतात. यासाठी औषध निर्मिती संदर्भातील क्लिनिकल ट्रायल, मेडिकल राईटिंग, फार्माको व्हिजीलन्स, रेग्युलेटरी अफेयर्स, मेडिका मार्केटिंग, क्लिनिकल रिसर्च आणि क्लिनिकल टाडा व्यवस्थापन आदी कौशल्य असणे गरजेचे आहे. यासाठी विद्यापीठातर्फे एम. एस्सी. (फार्मस्युटिकल मेडिसिन) हा उपयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमासाठी आरोग्य विज्ञान शाखेतील पदवीधर तसेच बी. एस्सी. लाईफ सायन्स आणि बायोटेक्नॉलॉजी व फार्मसी पदवीधर विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकतात.

एन्ट्रन्स २९ जुलै रोजी

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले, की विद्यापीठाच्या मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ (न्यूट्रिशन), एमबीए (हेल्थ केअर अॅडमिनिस्ट्रेशन) व एम. एस्सी. (फार्मस्युटिकल मेडिसिन) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची विद्यापीठातर्फे नाशिक, मुंबई, पुणे व नागपूर येथे केंद्रीय सामायिक परीक्षा २९ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेची गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित होतील.

फोटो : आरोग्य विज्ञान विद्यापीठ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भर पावसात निघणार आदिवासी विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा

$
0
0

वसतिगृहांसंदर्भातील असुविधांविरोधात एल्गार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास विभागाच्या राज्यभरातील वसतिगृहात आश्रयास राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाशी संबंधित काही निर्णयांविरोधात एल्गार पुकारला आहे. कुठल्याही संघटनेचा आश्रय न घेता विद्यार्थ्यांचे संघटन करून भर पावसाळ्यात १३ ते १८ जुलै दरम्यान, पुणे-नाशिक मार्गावर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चा नाशिकमधील आदिवासी विकास भवनवर १८ जुलै रोजी धडकणार असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आदिवासी विकास विभागाचे राज्यभरात ४९१ वसतिगृह कार्यरत आहेत. त्यामध्ये ३५ हजार ४४४ मुले आणि २२ हजार ८५१ मुली असे एकूण ५८ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. वसतिगृहातील या नोंदणीकृत विद्यार्थ्यांना काही वर्षांपासून सातत्याने तेथील असुविधांबाबत वाचा फोडावी लागत होती. यावर उपाय म्हणून शासनाने वसतिगृहात देण्यात येणारे शैक्षणिक साहित्य, जेवण या सुविधा बंद करून त्यापोटी येणाऱ्या खर्चाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याला याप्रकारे जेवण उपलब्ध होणे शक्य नाही किंवा विद्यार्थिनी जेवणासाठी सायंकाळी वसतिगृहाबाहेर कशा जाऊ शकतील, असा प्रश्न या विद्यार्थ्यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. याशिवाय डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) अंतर्गत मेससाठी प्रतिविद्यार्थी दिला जाणारा निधी अपूर्ण असल्याने ही योजना बंद व्हावी यासह विविध मागण्यांसाठी हा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. पत्रकार परिषदेत भरत तळपाडे, प्रवीण धांडे, मदन पथवे, स्वप्नील धांडे, उद्धव येंगटे, दीपक बहिरम आदी विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.

असा असेल मोर्चाचा मार्ग

पहिला टप्पा : शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह मांजरी फार्म, पुणे-हडपसर-मुंढवा चौक-कोरेगांव पार्क-खडकी-दापोडी-कासारवाडी (नाशिक फाटा)-भोसरी-मोशी-चाकण-राजगुरूनगर (खेड) मुक्काम.

दुसरा टप्पा : मंचर-नारायणगाव-आळेफाटा

तिसरा टप्पा : संगमनेर-नांदूरशिंगोटे-मुक्काम

चौथा टप्पा : सिन्नर-नाशिकरोड-नासर्डी पूल-द्वारका-गडकरी चौक-नाशिक आदिवासी आयुक्तालय

अशा आहेत विद्यार्थ्यांच्या मागण्या

सरकारने वसतिगृहांमध्येच खानावळ सुरू करावी

पेसा अंतर्गत सरकारी दफ्तरी जागा भरण्यात याव्यात

'एसआयटी'च्या वतीने विद्यार्थ्यांकडून केली जाणारी वसुली थांबवावी

समांतर पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी

वसतिगृह प्रवेशासाठी जात पडताळणी सक्तीची करावी

जातपडताळीसाठी सहा महिन्यांचा अवधी मिळावा

गृहपालांना कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करावे

त्यांचे निवासस्थान वसतिगृहाजवळच असणे बंधनकारक करावे

असुविधांना कारणीभूत अधिकारी वर्गावर कायदेशीर कारवाई करावी

प्रधानमंत्री कौशल्य योजना वसतिगृहांमध्ये राबवावी

वसतिगृहातील महागाई भत्त्यात वेळोवेळी वाढ करावी

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाची निर्मिती करावी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दृष्टिहीन संघाची १४ जुलै रोजी सभा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्राची (नॅब) तातडीची सभा शनिवारी, १४ जुलै रोजी ठाणे जिल्ह्यातील विठ्ठलवाडी पूर्व स्टेशन येथील पाण्याच्या टाकीसमोरील महिला आधार केंद्रात होणार आहे. ही माहिती संघाचे सभासद डी. जी. जाधव यांनी पत्रकारांना दिली. यावेळी राजेंद्र देवरे, जगदीप कवाळ, डी. एन भरडे आदी उपस्थित होते.

जाधव यांनी सांगितले की, चार महिन्यात संघाची निवडणूक घेणे आवश्यक आहे. त्यात सर्व वैध सभासदांना सहभागी होण्याचा अधिकार मिळावा म्हणून निवडणूक प्रक्रिया पार पडेपर्यंत सात सभासदांची तदर्थ कमिटी नियुक्त करण्यात येणार आहे. ही कमिटी निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य करेल. नवीन कार्यकारिणीच्या घोषणेपर्यंत कमिटी अस्तित्वात राहील. १६ ऑक्टोबर २०१६ रोजी संघटनेची निवडणूक त्र्यंबकेश्वर येथे सभासदांना डावलून घेण्यात आली. त्याला दोन हजार सभासदांनी धर्मादाय आयुक्त कार्यालयात आक्षेप घेतला. धर्मादाय सहआयुक्त गाडे यांनी निवडणूक अवैध जाहीर केली. अशाच पद्धतीने २०१४ मध्ये लातूर येथील सामान्य सभेतबाबतचा बदल अर्ज नामंजूर करण्यात आला. २०१० मध्ये नागपूर येथे झालेल्या सभेतील घटना दुरस्तीबाबतचा अर्ज नामंजूर करण्यात आला. कलम 14 एफच्या नुसार राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्राचा सभासद राष्ट्रीय दृष्टीहीन संघ दिल्लीचा सभासदत्त्वाचा राजीनामा देणार नाही. त्या सभासदाचे महाराष्ट्राचे सभासदत्त्व संपुष्टात येईल. या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने पाच हजार सभासदांना निवडणुक प्रक्रियेत सहभाग नाकारण्यात आला होता. या मुद्द्यावर दत्तात्रय जाधव, सीताराम बेडसे आदींनी संघर्ष कायम ठेवत न्याय मिळिवला. वरील बदल अर्ज लक्षात घेतल्यास वसंत सिद्धेश्वर हेगडे व महादेव गुरव यांच्या नेतृत्वाखालील कार्यकारिणी बेकायदेशीर ठरली असून त्यांचा कालावधी अवैध ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रलंबित दाखल्यांसाठीआमदार शेख यांचा ठिय्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील तहसील कार्यालयात अनेक विद्यार्थ्यांचे दाखले अडकले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे काँग्रेसचे आमदार असिफ शेख यांनी बुधवारी अचानक ठिय्या आंदोलन केले. शेख यांच्याशी चर्चेनंतर संबंधित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने हे दाखले वितरीत करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

दहावी-बारावीचे निकाल लागले असून, पुढील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी लागणारे उत्पन दाखला, वय अधिवास यासह विविध कागदपत्रे काढण्यासाठी तहसील आवारातील सेतू कार्यालयात विद्यार्थी, पालकांनी गर्दी केली आहे. मात्र तब्बल दोन हजार दाखले प्रलंबित असल्याने ते मिळावेत यासाठी आमदार शेख यांनी कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. हेतूपुरस्कार दाखले प्रलंबित ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विविध प्रकारच्या दाखल्यांवर सध्या डिजिटल स्वाक्षरी केली जात असते.

या दाखल्यांबाबत येथील नायब तहसीलदार विलास चव्हाण यांना अधिकार देण्यात आले आहेत. मात्र त्यांच्याकडून दाखल्यांचा निपटारा होत नसल्याने शेख यांनी आंदोलन केले. तहसीलदार देवरे यांनी शेख यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तातडीने प्रलंबित दाखल्यांवर स्वाक्षरी करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विमानतळावरील पर्यटन लाऊंज गायब

$
0
0

निधी देणारेच टर्मिनलमधून हद्दपार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तब्बल ८४ कोटी रुपयांच्या पर्यटन निधीतून साकारलेल्या विमानतळ टर्मिनलमधून पर्यटन लाऊंज गायब झाल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. त्यामुळे निधी देणारा पर्यटन विभागच तेथून हद्दपार झाल्याचे स्पष्ट होत आहे. नाशिकसह राज्यभरातील पर्यटन स्थळांचे मार्केटिंग करण्याची नामी संधी यामुळे हुकली आहे. तसेच, यंदा साजऱ्या होणाऱ्या 'व्हिजिट महाराष्ट्र' या वर्षातच पर्यटन विकास महामंडळावर नामुष्कीही ओढावली आहे.

ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल)च्या जागेत नाशिक विमानतळाच्या ठिकाणी राज्य सरकारने पर्यटन निधीतून अत्याधुनिक पॅसेंजर टर्मिनल साकारले आहे. सन २०१४ मध्ये या टर्मिनलच्या उद्घाटनानंतर राज्याचे तत्कालीन बांधकाम आणि पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून टर्मिनलमध्ये पर्यटन विभागाचे लाऊंज साकारण्यात आले. मात्र, त्याचवर्षी केंद्र व राज्यात सत्तांतर झाल्याने या टर्मिनलच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला. महाराष्ट्र विमानतळ प्राधिकरणाने याकामी पुढाकार घेतला आणि एचएएलला नाममात्र दराने हे टर्मिनल देखभालीसाठी हस्तांतरीत केले. हे टर्मिनल २०१४ ते २०१७ या काळात धूळ खात पडून होते. २४ डिसेंबर २०१७ रोजी एअर डेक्कन कंपनीची, तर गेल्या महिन्यात नाशिक-दिल्ली-नाशिक ही सेवा सुरू झाली. सरासरी १२५ प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. अशा परिस्थितीत या प्रवाशांना पर्यटनाकडे आकर्षित करण्याची नामी संधी आहे. मात्र, टर्मिनलच्या ठिकाणी असलेले पर्यटन लाऊंज गायब झाल्याने पर्यटनाविषयी माहिती प्रवाशांना उपलब्ध होऊ शकणार नाही.

असे झाले त्रांगडे

एचएएलची जमीन, पर्यटनचा निधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने हे टर्मिनल साकारले. इतका मोठा निधी देऊनही पर्यटन विभागाला या ठिकाणी हक्काची जागा देण्यात येईल, अशी कुठलीही तजवीज केली नसल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी राज्य सरकारने सखोल चौकशी करावी, अशी मागणीही होत आहे.

विमानतळावरील पर्यटनाचे लाऊंज बंद होणे ही बाब योग्य नाही. यामुळे केवळ नाशिक नाही, तर संपूर्ण राज्याच्या पर्यटनाचे नुकसान आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे. हा लाऊंज तातडीने सुरू करावा.

- छगन भुजबळ, माजी पर्यटनमंत्री

--

लाऊंजबाबत माहिती घेतो. नाशिकला विमानसेवा नसल्याने कदाचित हे लाऊंज बंद झाले असेल. आता सेवा सुरू झाली आहे. त्यामुळे हे लाऊंज सुरू करण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल.

- विजयकुमार गौतम, प्रधान सचिव, पर्यटन विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब! अडीच लाख दुबार मतदार

$
0
0

जिल्हा प्रशासनाकडून नावे वगळण्यासाठी मोहीम हाती

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील मतदार याद्यांमध्ये तब्बल अडीच लाखांहून अधिक मतदारांची नावे दुबार असल्याचे धक्कादायक वास्तव जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या शोध मोहिमेतून पुढे आले आहे. नाशिक शहरात ४९ हजार ४५० मतदारांची नावे दुबार आढळली असून त्यांच्याकडे नोटिशींद्वारे खुलासा मागविण्यात आला आहे. तर जिल्ह्यात दोन लाख पाच हजार दुबार नावे वगळण्यासाठी मोहीम हाती घेण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

विधान परिषदेसाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या राबविल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निवडणूक विभाग काहीसा निश्चिंत झाला आहे. या विभागाने आता आपले पूर्ण लक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर केंद्रीत केले आहे. एप्रिल-मे २०१९ मध्ये लोकसभेची तर ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. चुकांरहित मतदार यादीवरच निवडणुकीची भिस्त अवलंबून असल्याने ही मतदार यादी अत्यंत अचूक आणि अद्ययावत ठेवण्यास निवडणूक विभागाने प्राधान्य दिले आहे. निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरच्या मदतीने मतदार याद्या तपासण्यात आल्या असून त्यामध्ये अनेक नावे समान असल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधितांच्या नावांप्रमाणेच पत्ता आणि छायाचित्रेही पडताळून पाहण्यात आली आहेत. त्यामध्ये बरेचसे साम्य आढळून आल्याने ही हजारो नावे दुबार ठरविण्यात आली आहेत.

जिल्ह्यात आजमितीस ४४ लाख २६ हजार १३६ मतदार आहेत. यामध्ये दोन लाख ५४ हजार ४५० मतदारांची नावे दुबार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नाशिक शहरात एकाच मतदारसंघात दोन किंवा त्याहून अधिकवेळा नावे आढळून आलेल्या मतदारांची संख्या ४९ हजार ४५० एवढी आहे. तर जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये दोन लाख पाच हजार मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या मतदार संघांमध्ये आढळून आल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

खुलाश्याची जबाबदारी मतदाराकडे

बोगस मतदान होऊ नये यासाठी दुबार नावे वगळण्याची मोहीम निवडणूक शाखेने हाती घेतली आहे. अशी नावे आढळलेल्या मतदारांना त्यांच्या दोन्ही पत्त्यांवर नोटीसा पाठविण्यात येणार आहेत. मतदार यादीमधील कोणते नाव ठेवावे आणि कोणते वगळावे याचा खुलासा संबंधित मतदाराने निवडणूक शाखेच्या यंत्रणेकडे करणे अपेक्षित आहे. हा खुलासा प्राप्त झाल्यास त्याला अनुसरून एक नाव वगळण्याची कार्यवाही केली जाईल. परंतु, या नोटिसींना मतदाराने प्रतिसाद दिला नाही तर बुथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) च्या माध्यमातून दोन्ही पत्त्यांवर पोहोचून पंचनामा केला जाईल. मतदार ज्या पत्त्यावर आढळणार नाही तेथील रहिवाशांकडे विचारपूस करून पंचनामा करण्यात येईल. त्याची माहिती 'बीएलओ' संबंधित तहसीलदार आणि जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेला देतील. ज्या पत्त्यांवर मतदार आढळले नाहीत तेथील नावे मतदार यादीमधून वगळण्यात येणार आहेत.

शहरात ४९ हजार ४५० तर ग्रामीण भागात दोन लाख पाच हजार नावे दुबार आढळली आहेत. ही नावे वगळण्यासाठीची कार्यवाही सुरू केली असून शहरात अशा ८० टक्के मतदारांना नोटिसा पाठविल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निदेर्शांनुसार ग्रामीण भागातही लवकरच यासाठीची मोहीम आम्ही हाती घेणार आहोत.

- गणेश राठोड, तहसीलदार, निवडणूक शाखा

लोगो : मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मृत संशयित कोर्टात हजर होतो तेव्हा...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक /म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

बलात्काराच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेला परंतु, नंतर कोर्टात हजर न होता पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयिताला पेठ तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या संशयिताचा मृत्यू झाल्याचे सांगत त्याच्या आईने पोलिसांची आणि न्यायालयाचीदेखील दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकारही पुढे आला आहे. त्यामुळे या संशयिताला सहकार्य करणाऱ्या त्याच्या आईसह आणखी काहीजणांवर कारवाईसाठी पोलिसांनी पाऊले उचलली आहेत.

मधुकर शंकर गांगुर्डे (वय २२, रा. आंबापाणी, ता. पेठ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयाने १८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. इंदिरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१४ मध्ये भारतनगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी बलात्कारासह पोस्कोचा गुन्हा दाखल करून गांगुर्डे याला अटक केली. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सहा महिन्यांनी त्याची जामिनावर सुटका झाली. त्यानंतर न्यायालयाने वारंवार वॉरंट बजावूनही तो कोर्टात हजर होत नव्हता. पोलिस त्याच्या घरापर्यंत पोहोचले तेव्हा त्याच्या आईने मधुकर मृत झाल्याची माहिती दिली. ही माहिती पोलिसांनी कोर्टात दिल्यानंतर कोर्टाने संबंधित प्रकरणातील जामिनदारांना कोर्टामध्ये हजर करण्याचे आदेश दिले. संबंधित जामिनदाराने मधुकर गांगुर्डे जिवंत असल्याची माहिती कोर्टाला दिली. त्यामुळे कोर्टाने इंदिरानगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले. त्यानुसार इंदिरानगर पोलिस स्टेशनचे हवालदार विवेक पाठक, अरुण टोंगारे आणि पोलिस नाईक सोमनाथ शिंदे यांनी पेठ तालुक्यात जाऊन गोपनीय माहितीच्या आधारे गांगुर्डे याचा शोध घेतला. तो आंबापाणी येथे राहात असल्याची त्यांची खात्री पटली. मंगळवारी सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्यासह हवालदार सुंदर कोकाटे, विनोद खांडबहाले, अखलाक शेख यांच्या पथकाने त्याला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता १८ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मृत्यूचा दाखला सादर

मधुकर याला शिक्षेपासून वाचविण्यासाठी त्याच्या आईने मुलाचा बनावट मृत्यूचा दाखला सादर केल्याचे बोलले जात आहे. पोलिसांची आणि न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्याने या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याची तयारी इंदिरानगर पोलिसांनी सुरू केली आहे. या प्रकरणात मृत्यूचा बनावट दाखला सादर केला असल्यास तो कोणी तयार करून दिला याची चौकशीदेखील केली जाणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मधुकर गांगुर्डे याने नात्यातील एका मुलीशी विवाह केला होता. पकडले जाऊ नये यासाठी तो पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यावर राहात होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उंबरे कुटुंबाला मदत

$
0
0

जेलरोड : रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यावेळी दगड कोसळून उळूप (ता. भूम) येथील अशोक उंबरे याचा मृत्यू झाला होता. नाशिकच्या 'महाराष्ट्र माझा' परिवाराने त्याच्या कुटुंबियांना ५१ हजारांची मदत नुकतीच दिली. सिन्नरचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, 'महाराष्ट्र माझा'चे संस्थापक अध्यक्ष बंटी भागवत, अध्यक्ष धोंडीराम रायते, सदस्य सोमनाथ आढाव, नीलेश भागवत, दीपक पाटील-कदम, राहुल वरळे, संदीप वारे, भरतरी वारे, सोहेल पठाण, सागर भंडारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ चुलत भावाला आज होणार अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

चेष्टेतून चुलत भावाला मुलांचा अपहरणकर्ता भासवून त्याचा फोटो व्हायरल करणाऱ्या संशयित तरुणास कोर्टाच्या परवानगीने गुरुवारी (दि. ५) अटक केली जाणार असल्याची माहिती उपनगरच्या पोलिस सूत्रांनी दिली.

या प्रकरणी विहीतगाव येथील हांडोर मळा येथील अफजल हैदर मुलतानी या २३ वर्षीय तरुणाने उपनगर पोलिस ठाण्यात दोन जुलैला अर्ज दिला होता. अफजल हा गॅरेजमध्ये काम करतो. अफजल हा मुलांचे अपहरण करणारा व्यक्ती असल्याचा दावा करणारी ऑडिओ क्लिप व्हॉटसअॅपवर व्हायरल झाली होती. त्यासोबत अफजलचा फोटोही होता. अफजलने उपनगर पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक प्रभाकर रायते यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. प्राथमिक चौकशीत सदर फोटो अफजलचा चुलत भाऊ गुलाब रसूल मुलतानीने तीन महिन्यापूर्वी काढल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी कोर्टात अर्ज केला होता. कोर्टाच्या परवानगीने अटक केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाची रिपरिप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर हळूहळू वाढत असून, बुधवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. शहरात दिवसभरात सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाने जोरदार मुसंडी मारली आहे.

गेल्या दोन-तीन दिवसांपासून शहरात पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. शहरवासीयांची बुधवारची सकाळ पावसाच्या सरींनी उजाडली. दिवसभर कधी हलक्या सरी, तर कधी उघडीप असा अनुभव नागरिकांनी घेतला. मंगळवारी सकाळी आठ ते बुधवारी सकाळी आठ या २४ तासांत शहरात ६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सकाळपासून सायंकाळी साडेपाचपर्यंत साडेसात मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पावसाचा जोर वाढला असून, बुधवारी सकाळी १२८.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. इगतपुरी ४५ मिमी, पेठमध्ये ३०.३, त्र्यंबकेश्वरमध्ये २०, सुरगाणा १२.२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याखेरीज नाशिक, दिंडोरी, निफाड, सिन्नर, चांदवड, देवळा, येवला, कळवण, मालेगाव या तालुक्यांमध्येही पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भर पावसात दिव्यांगांचा आक्रोश

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने 'कडू' अनुभवानंतरही दिव्यांगांसाठी राखीव तीन टक्के निधीवर खर्च केला तर नाहीच, उलट जाहीर केलेली दिव्यांग निवृत्ती वेतन योजनादेखील गुंडाळल्याने संतप्त झालेल्या प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या नेतृत्वाखाली दिव्यांगांनी न्यायासाठी महापालिकेबाहेर चार तास पावसाच्या सरी झेलत ठिय्या आंदोलन केले. भेटीची वेळ नसल्याचे सांगत, आयुक्तांनी भेटीस नकार दिल्याने संतप्त झालेल्या दिव्यांगांनी महापालिकेवरच हल्लाबोल करत, आयुक्तांचा निषेध केला. दिव्यांगांच्या भावना अनावर होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शिष्टमंडळाला अखेर भेटीसाठी वेळ देत, दिव्यांगांसाठीच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

महापालिकेला दिव्यांग कायद्यानुसार हद्दीतील दिव्यांगांसाठी बजेटमध्ये ३ टक्के राखीव निधी करणे बंधनकारक आहे. १९९५पासून महापालिकेने दिव्यांगांसाठी तीन टक्के राखीव निधी खर्च केलेला नाही. त्यामुळे दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने मोर्चाद्वारे महापालिकेला धडक देणाऱ्या संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू आणि तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यातील वाद हातापायीवर गेल्याचा प्रसंग गतवर्षी २४ जुलै रोजी घडला होता. या घटनेनंतर महापालिकेने दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजनांच्या घोषणांचा पाऊस पाडत २० कोटींचा आराखडा जाहीर केला होता. दिव्यांगांसाठी पेन्शन योजनादेखील तत्कालीन आयुक्तांकडून जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांकडून अर्जदेखील भरून घेण्यात आले होते. अंध-अपंग व्यक्तींनी मोठ्या आशेने महापालिकेत धडपड करीत अर्ज भरण्यास गर्दी केली होती. परंतु, तत्कालीन आयुक्तांची बदली झाल्यानंतर दिव्यांगांच्या योजना बासनात गुंडाळल्या गेल्या. दिव्यांगांसाठीचा राखीव निधी पुन्हा अखर्चित राहिला.

त्यामुळे प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पानमंद यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी पुन्हा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मुख्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर सुरुवातीला आयुक्तांनी भेट नाकारल्याने मोर्चाचे रुपांतर ठिय्या आंदोलनात होऊन प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. याचवेळी पाऊसही सुरू झाल्याने मोर्चेकऱ्यांनी प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला. संतप्त दिव्यांगांनी थेट महापालिकेच्या गेटचीच तोडफोड सुरू केली. काहींनी गेटवरून उड्या मारून आत प्रवेश केला. त्यामुळे दिव्यांगांना रोखणे पोलिस आणि सुरक्षा रक्षकांच्या हाताबाहेर गेले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून अखेर आयुक्त मुंढे यांनी मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाला साडेतीन तासांनंतर भेट देण्याचे मान्य केले. मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेत प्रलंबित मागण्या मांडल्या. दिव्यांगांसाठी विविध कल्याणकारी योजनांचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी प्रशासनाने पाठविला असून, या प्रस्तावाला मंजुरी मिळताच योजनांची अंमलबजावणी केली जाईल, असे आश्वासन मुंढे यांनी या शिष्टमंडळाला दिले.

मग 'वॉक विथ कमिशनर' का घेता?

दिव्यांगांची भेट घेण्यास आयुक्त मुंढेंनी नकार दिल्यानंतर दिव्यांग चांगलेच संतप्त झाले होते. आयुक्तांनी भेटण्याची वेळ चार वाजेची असल्याचे सांगत, अतिरिक्त आयुक्तांना भेटा असा निरोप दिव्यांगाना देण्यात आला. त्यामुळे दिव्यांग अधिकच संतप्त झाले आणि आताच भेट हवी असा आग्रह धरत, भर पावसात ठिय्या आंदोलन सुरू केले. आयुक्त सकाळी 'वॉक विथ कमिशनर' घेऊन नागरिकांना भेटतात, तर मग जिल्हाभरातून आलेल्या दिव्यांगांना का भेटत नाहीत, असा सवाल दिव्यांगांनी यावेळी केली. संतप्त दिव्यांगांनी यावेळी आयुक्तांच्या विरोधात निषेधाच्याही घोषणा दिल्यात.

अंमलबजावणीचे आश्वासन

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दिव्यांग कल्याण विकासाच्या योजनांचा प्रस्ताव महासभेच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून, त्यामुळे दिव्यांगांचे प्रलंबित प्रश्न सुटणार असल्याची प्रतिक्रिया प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन पानमंद यांनी आयुक्त मुंढे यांच्या भेटीनंतर व्यक्त केली आहे. दिव्यांग व्यक्ती स्वावलंबी बनावा, सक्षम बनावा यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी आयुक्तांच्या भेटीनंतर सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑनलाइन प्रणालीत महावितरणची आघाडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

कंत्राटदारांची देयके पेपरलेस केंद्रीय प्रणालीद्वारे ऑनलाइन अदा करण्यास महावितरणने सुरुवात केली आहे. डिजिटल इंडिया धोरणांतर्गत ऑनलाइन देयके उपलब्ध करून देणारी महावितरण देशातील पहिलीच वीज वितरण कंपनी ठरली आहे. लवकरच सर्व कर्मचाऱ्यांची देयकेही ऑनलाइन अदा करण्यात येणार आहेत.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांचा कंपनीच्या कामकाजात संपूर्ण पारदर्शकतेचा व जास्तीतजास्त ऑनलाइनचा आग्रह असून कंत्राटदार, पुरवठादार यांच्यासोबत कर्मचाऱ्यांनाही त्यांची देयके मिळण्यासाठी कुठेही अडचण होऊ नये, यावर त्यांचा विशेष भर आहे. आधुनिक माहिती तंत्रज्ञानासमवेत योग्य सांगड घालून ईआरपी या प्रणालीचा वापर करीत यापूर्वीच पेपरलेस झालेल्या महावितरणने सर्व आर्थिक व्यवहार ऑनलाइन करण्याकडे प्रवास सुरू केला असून, महावितरण आता कॅशलेसही झाले आहे.

महावितरणने आपल्या सर्व कंत्राटदार आणि पुरवठादारांची देयके ऑनलाइन पद्धतीने अदा करण्यास जून २०१८ पासून सुरू केले असून, कर्मचाऱ्यांचे वेतन, इतर भत्ते, स्थायी आणि अस्थायी अग्रीम उचल यासोबतच आवश्यक कार्यालयीन खर्चाची प्रतिपूर्तीही ऑनलाइन पद्धतीने लवकरच करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने महावितरणच्या मुख्यालयात केंद्रीय देयक अदायगी प्रणाली सुरू करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

महावितरणमध्ये कंपनीचे विविध दैनंदिन आर्थिक व्यवहार ईआरपी प्रणालीद्वारे करण्यात येत असल्याने कंत्राटदाराला कामाचे कार्यादेश आणि खरेदी आदेशही ईआरपी मार्फत करण्यात येत आहे. त्यात अधिक सुसूत्रता आणून राज्यातील सर्व कंत्राटदारांची देयके मुंबई येथील मुख्यालयातील केंद्रीय प्रणालीव्दारे निश्चित कालमर्यादेत ऑनलाइन पद्धतीव्दारे अदा करण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ ४४ नगरसेवकांना नोटिसा

$
0
0

धुळे मनपा आयुक्तांकडून कार्यवाही; पंधरा दिवसांत खुलाशाची मुदत

म.टा.वृत्तसेवा,धुळे

धुळे महापालिकेत सर्वसाधारण सभेदरम्यान गैरवर्तवणूक, शहरातील बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणप्रकरणी महापालिकेतील ४४ नगरसेवकांवर कारवाईचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने गेल्या आठवड्यात दिले होते. या सूचनेवरून आयुक्त सुधाकर देशमुख यांनी आता त्या सर्व ४४ नगरसेवकांना नोटिसा बजावल्या असून, खुलासा सादर करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

महापालिकेच्या सन २०१३ च्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या ४४ नगरसेवकांनी बेकायदेशीर बांधकाम, अतिक्रमण केले आहे. त्यांच्याविरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार अनिल गोटे यांनी २०१६ मध्ये सरकारकडे केली होती. त्यावर महापालिका प्रशासनाकडून तत्कालीन आयुक्त डॉ. नामदेव भोसले यांनी सविस्तर अहवाल सादर केला होता. त्यानंतर संबंधित ४४ नगरसेवकांनी केलेली गैरवर्तवणूक, बेकायदेशीर बांधकामे व अतिक्रमणाबाबत चौकशी करून सुस्पष्ट अभिप्रायांसह अहवाल सादर करावा, असे पत्र नगरविकास विभागाने गेल्या आठवड्यात मनपा आयुक्तांना दिले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने ही कार्यवाही सुरू केली आहे.

अन्यथा अपात्रतेची कारवाई?
याबाबत नगरसेवकांना नोटिसा बजाविण्यात येत असून, त्यात अनधिकृत बांधकामप्रकरणी आपले खुलासे व दस्तऐवज १५ दिवसांच्या आत नव्याने सादर करावे, मुदतीत खुलासा सादर न केल्यास पूर्वीच्या महापालिका अभिलेखात उपलब्ध असलेला पत्रव्यवहार विचारात घेण्यात येईल. कोणतेही लेखी म्हणणे प्राप्त न झाल्यास उपलब्ध दस्तऐवजांच्या आधारे आपणास म्हणणे मांडण्याची संधी देऊन किंवा संधी न देता अधिनियमातील कलम १३ अन्वये अपात्र ठरविण्याबाबत कार्यवाहीसाठी सरकारला अहवाल सादर केला जाईल, असेही नोटिशीत नमूद केले आहे. यामध्ये विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे, गंगाधर माळी, सुनील सोनार, ज्योत्स्ना पाटील, वैभवी दुसाणे, अफजुलन्निसा अन्सारी, गुलाब महाजन, प्रभावती चौधरी, शरद वराडे, अहमद शेख, गणेश मोरे, प्रशांत श्रीखंडे यांच्यासह ४४ नगरसेवकांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१३६ अंगणवाड्यांना अखेर टाळे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने पटसंख्या कमी असलेल्या आणि समान हजेरीपट असलेल्या तब्बल १३६ अंगणवाड्यांना चालू शैक्षणिक वर्षापासून कायमस्वरुपी टाळे लावले आहे. यातील ५३ अंगणवाड्यांच्या हजेरीपटात मोठा घोळ आढळून आला असून त्यात एक लाभार्थ्याचे नाव हे दोन ते तीन अंगणवाड्यांमध्ये आढळून आले होते तर ४३ अंगणवाड्यांमध्ये २५ पेक्षा कमी पटसंख्या आढळून आली होती. त्यामुळे या १३६ अंगणवाड्या कायमस्वरुपी बंद केल्याने यात कार्यरत असलेल्या १३६ सेविका व तेवढ्याच मतदनीस अशा २७२ मानधनावरील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे महापालिकेचे पावणेदोन कोटी रुपये वाचणार आहेत. परंतु, बचतीच्या नावाखाली गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची एकमेव व्यवस्था अंगणवाड्याही बंद केल्याने त्याला विरोध होण्याची शक्यता आहे. शहरात एकात्मिक बालविकास केंद्र (आयसीडीएस) आणि महापालिकेच्या मिळून ४१२ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांमध्ये जवळपास १२ हजार बालके शिक्षण घेतात. या मुलांना शिक्षणसह पोषण आहारही दिला जातो. त्यामुळे झोपडपट्टीतील मुलांमध्ये कुपोषणाचे प्रमाणही कमी होते. परंतु, महापालिकेने बचतीच्या नावाखाली ४१२ पैकी १३६ अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेने फेब्रुवारी महिन्यात केलेल्या सर्वेक्षणात अंगणवाड्यांमध्ये मोठा घोळ आढळून आला होता.

अनेक अंगणवाड्यांमध्ये पटसंख्या अत्यंत कमी होती. ५३ अंगणवाड्यांच्या हजेरीपटात घोळ आढळून आला होता. या अंगणवाड्यांमध्ये एक लाभार्थी दोन ते तीन ठिकाणी लाभ घेत असल्याचे आढळून आले होते. त्यात १,०३६ मुले समान आढळून आली होती. एकाच योजनेचा लाभ घेत असल्याने या सर्व ५३ अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेत येथील समान लाभार्थ्यांना एकात्मिक बाल विकास विभागाच्या अंगणवाड्यांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. पटसंख्या कमी असलेल्या ४३ अंगणवाड्यांमधील लाभार्थी मुलांना जवळच्या अंगणवाड्यांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. जवळपास ४० अंगणवाड्यांची पटसंख्या ही दहा मुलांपेक्षा कमी आहे. त्यांचेही स्थलांतर नजीकच्या शाळांमध्ये करण्यात आले आहे.

नगरसेवकांचा विरोध?

महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने अंगणवाड्याही चालविल्या जातात. गोरगरीब मुलांना व बालकांना त्यांच्या घराजवळ मोफत शिक्षण मिळावे, हा त्यामागचा उद्देश होता. परंतु, महापालिकेने आता बचतीच्या नावाखाली या अंगणवाड्या बंद करण्याचा निर्णय घेतल्याने त्याला नगरसेवकांचाही विरोध होण्याची शक्यता आहे. या अंगणवाड्यांमध्ये कार्यरत असेलेले सेविका आणि मदतनीस हे नगरसेवकांच्या मदतीनेच मानधनावर रूजू झालेले असतात. त्यामुळे महासभेत हा प्रस्ताव आल्यानंतर त्याला विरोध होण्याची शक्यता आहे.

सर्वेक्षणातील त्रुटींमुळे निर्णय

महापालिकेच्या माध्यमातून नाशिक पूर्व विभागात ९१, नाशिक पश्चिम विभागात ५२, पंचवटी ७८, नाशिकरोड ७२, सिडको ६७ तर सातपूर विभागात ५३ अंगणवाड्या चालविल्या जातात. या अंगणवाड्यांचे महापालिकेने फेब्रुवारीत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात १११ अंगणवाड्यांमध्ये प्रत्येकी केवळ ४ ते १४ विद्यार्थीच असल्याचे आढळून आले. काही अंगणवाड्यांमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्यांना सुविधादेखील उपलब्ध नव्हती. खासगी जागेतील अंगणवाड्यांची अवस्था तर अत्यंत वाईट होती. त्यापैकी १३६ अंगणवाड्या बंद करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. यामध्ये नाशिक पूर्व विभागातील २३, पंचवटी विभागातील १८, नाशिकरोड १९, सिडको २, सातपूर ७, नाशिक पश्चिम विभागातील ३२ अंगणवाड्यांचा समावेश आहे. या अंगणवाड्यांमधील २७६ सेविका व मदतनीस यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणपूरक घंटागाडी राखणार त्र्यंबकची स्वच्छता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर नगर परिषदेने पर्यावरण पूरक उपक्रम हाती घेत बॅटरीवर चालणाऱ्या घंटागाडीचा वापर सुरू करण्याची तयारी केली आहे. उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार यांच्या पुढाकाराने आखण्यात आलेल्या या उपक्रमात पर्यावरणपूरक घंटागाडीचे यशस्वी प्रात्याक्षिक घेण्यात आले.

त्र्यंबक शहरातील मध्यवर्ती ठिकाणी काही वस्त्यांमध्ये अरुंद आणि चढ-उताराचे रस्ते आहेत. परिणामी तेथे नागरिकांच्या थेट घरांपर्यंत घंटागाडी पोहचू शकत नाही. याच समस्येवर तोडगा काढत पर्यावरणपूरक घंटागाडीचा उपक्रम आखण्यात आला. थेट गल्लीबोळात जाऊन कचरा गोळा करणारी घंटागाडी त्र्यंबक नगर परिषदेने प्रात्यक्षिकांसाठी मागविली होती. ही घंटागाडी रिक्षेच्या आकाराची आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या या घंटागाडीचे शहरात प्रात्यक्षिक घेण्यात आले. उपनगराध्यक्ष स्वप्नील शेलार याच्यासह आरोग्य सभापती विष्णू दोबाडे, सागर उजे, सामाजिक कार्यकर्ते कुणाल उगले आदींसह नगरसेवक उपस्थित होते. त्र्यंबक येथे वर्षभर भाविक-पर्यटकांचा सतत ओघ असतो. संपूर्ण भारतातून भाविक पर्यटक येत असतात ही नगरी प्रदूषणमुक्त रहावी याकरिता बॅटरीवर चालणारी घंटागाडी शहरात असावी अशी संकल्पना उपनगराध्यक्षांनी यापूर्वीच मांडली होती.

अशी आहे घंटागाडी

बॅटरीवर चालणाऱ्या या घंटागाडीची बॅटरी चार्ज केल्यावर ती साधारण १०० तास पुरते. तसेच या गाडीतून एका वेळी तब्बल ४०० किलो कचरा गोळा करून वाहून नेणे शक्य आहे. विशेष म्हणजे या घंटागाडीला हॅड्रोलिक सिस्टीम आहे. त्यामुळे गोळा केलेला कचरा रिकामा करणेही सोपे आहे. त्र्यंबक नगर पालिकेने लवकरात लवकर या गाड्या आणून कार्यान्वित कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images