Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आरोपींना मृत्यूदंडाची मागणी

$
0
0

राईनपाड्याच्या घटनेच्या निषेधार्थ साक्रीत मोर्चा

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राईनपाडा घटनेतील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा झालीच पाहिजे, अशा घटना पुन्हा होणार नाही, याची सरकारने हमी घेतलीच पाहिजे आदी मागण्या करीत शनिवारी (दि. ७) अखिल भारतीय भटक्या विमुक्त जाती, जमाती संघटनेच्या वतीने करण्यात आले. साक्रीतील शिवाजी वाचनालय येथून तहसील कचेरीवर हा निषेध मोर्चा काढण्यात आला.

या निषेध मोर्चाला भारिप बहुजन महासंघानेदेखील पाठिंबा देत सहभाग घेतला. राईनपाडा (ता. साक्री) येथे १ जुलैला भटक्या जमातीतील नागपंथी डवरी समाजाच्या ५ भिक्षुकांची मुले पळवणारी टोळी असल्याच्या अफवेतून जमावाने निर्घृणपणे ठेचून हत्या केली. या घटनेच्या निषेधात राज्यभरातील नागपंथी तसेच भटक्या विमुक्त जाती संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. शनिवारी साक्रीत अखिल भारतीय भटक्या विमुक्त जमाती संघटना यांच्या वतीने या घटनेविरोधात मोर्चा काढण्यात आला. संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात राईनपाडा घटनेतील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे, भटक्या विमुक्त समाजाचा पोट भरण्यासाठी भिक्षा मागणे हेच साधन आहे. त्यामुळे सरकारने त्यांना कायमस्वरुपी मान्यता देऊन ओळखपत्र द्यावे, पीडित कुटुंबांना २५ लाख मोबदला देऊन त्यांचे पुनर्वसन करावे, पक्के घर बांधून द्यावे व एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी, घटनेच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करून सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चात भटक्या समाजाचे अशोक गिरी, गोकुळ जगताप, मनोज गोसावी, सागर गोसावी, राहुल शिंदे, उमेश बाबर, गणेश जगताप, भोलानाथ जोशी, प्रकाश साळवे, किशोर वाघ, पंकज मराठे, गोविंदा सोनवणे, भटू पवार आदी सहभागी झाले होते. भारिपने स्वतंत्र निवेदन देत आपल्या मागण्या मांडल्या. या वेळी कमलाकर मोहिते, संजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युतीला खडसेंचेच आव्हान?

$
0
0

महापालिकेसाठीच्या युतीवर सावट; पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष

pravin.chaudhari@timesgroup.com

महापालिका निवडणुकीसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व शिवसेना नेते सुरेश जैन यांनी युतीची घोषणा केली. मात्र, दोन्ही पक्षांकडून जागावाटपावरून रस्सीखेच सुरू असतानाच भाजपचे माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी युतीला जाहीर विरोध केला आहे. तसेच प्रसंगी इच्छुक समर्थकांसह आघाडीचे आव्हान उभे करण्याची खेळी चालविल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. आज (दि. ८) जळगावात पालकमंत्री चंद्रकांत पाटील व गिरीश महाजन दोघेही येत असल्याने युतीबाबतचे अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

जळगाव महापालिकेची निवडणुकसाठी दि. १ ऑगस्ट रोजी मतदान होत आहे. यासाठी निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, ४ जुलैपासून नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच जलसंपदामंत्री गिरीश महाजन व शिवसेना नेते माजी आमदार सुरेश जैन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन भाजप-शिवसेना युतीची घोषणा केली होती. या वेळी दोन्ही नेत्यांनी पक्षश्रेष्ठींची परवानगी घेऊन युतीसाठी हिरवा कंदीला मिळवला तरी दोन्ही पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मात्र १९ प्रभागातील संपूर्ण ७५ जागांसाठी घेण्यात येत आहेत. त्यामुळे अद्याप युती आहे की नाही, यावर नक्की होत नाही असेच दिसते. युतीच्या घोषणेनंतर जागावाटपाची बैठक लवकरच घेण्याचेदेखील या नेत्यांनी जाहीर केले होते. मात्र, या बैठकीलाही अद्याप मुहूर्त गवसला नसल्याने शिवसेना व भाजपमधील आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार संभ्रमात पडले आहे.

खडसेंची जाहीर नाराजी
महापालिका निवडणूक जाहीर होताच माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी युतीला विरोध जाहीर केला होता. गेल्या निवडणुकीच्या प्रचारात खडसे यांनीच सुरेश जैन यांच्या खान्देश विकास आघाडीविरोधात टीकेची झोड उठवली होती. त्यामुळे जैनांसोबतची युती मान्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, पक्षातील मंत्री गिरीश महाजन यांनी मध्यस्थी करीत जैन यांची मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट करून देत युतीसाठी मान्यता मिळवली. यामुळे खडसे यांनी या युतीच्या व्यासपीठावर बसून प्रचार करण्यास नकार दिला आहे. इतकेच नव्हे तर प्रसंगी समर्थकांना घेऊन महापालिका निवडणुकीच आघाडी देऊन आव्हान उभे करण्याची खेळी चालविली आहे.

भाजप-खाविआत जागांसाठी रस्सीखेच
भाजपचे महानगराध्यक्ष व आमदार सुरेश भोळे यांनी भाजपला ७५ पैकी कमीत कमी ४० जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दुसरीकडे सुरेश जैन यांचे बंधू व जैनांच्या खान्देश विकास आघाडीचे नेते रमेश जैन यांनी आमचे ४७ विद्यमान नगरसेवक असल्याने जागेच्या मागणीसाठी हा बेस असेल असे स्पष्ट केले आहे. योग्य सन्मान राखतील तरच युती करावी, अशी सेना व खाविआच्या कार्यकर्त्यांची भावना असल्याचे म्हणत त्यांनीही योग्य न मिळल्यास युतीची शक्यता कमी असल्याचे संकेत दिले आहेत.

जागावाटपाअभावी इच्छुक संभ्रमात
महापालिका निवडणुकीसाठी नेत्यांनी युतीची घोषणा केली असली तरी अद्याप जागावाटाबाबत प्राथमिक चर्चा न झाल्याने दोन्ही पक्षांमधील इच्छुक संभ्रमात पडले आहेत. दि. ४ जुलैपासून नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. तर दि. ११ जुलैपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारले जाणार आहे. अद्याप युतीचे जागा वाटप होत नसल्याने इच्छुकाचीदेखील गोची झाली आहे.

पालकमंत्री आज जळगावात
महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज (दि. ८) जळगावात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यानच्या त्यांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांच्यासोबत जलसंपदामंत्री गिरीश महाजनदेखील जळगावात उपस्थित राहणार असल्याने युती व जागावाटपाचा अंतिम फैसला त्यांच्या उपस्थितीत होऊन अंतिम चित्र स्पष्ट होणार असल्याचे सांगितले जात आहे. जागा वाटपतील रस्सीखेच, आमदार खडसे यांची टोकाची भूमिका व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन पालकमंत्री काय घोषणा करतात याकडे पदाधिकारी व इच्छुकांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उड्डाणपुलाच्या कामास अखेर प्रारंभ

$
0
0

पिंपळगाव-चिंचखेड चौफुलीचा प्रश्न मार्गी लागणार

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगाव शहरातील चिंचखेड चौफुलीवरील बहुचर्चित उड्डाणपुलाच्या कामास ३१ जुलै रोजी प्रारंभ झाला.

पिंपळगाव बसवंत शहरातील चिंचखेड चौफुली अपघातांसाठी कृप्रसिद्ध स्पॉट व परिसरात नेहमीच मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने मंजूर असलेल्या बहु प्रतिक्षीत उड्डाणपुलाच्या कामास सुरवात झाल्याने वाहतूक कोंडीपासून वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.

चिंचखेड चौफुली परिसरात १८ मीटरचे तीन बोगदे असलेला उड्डाणपूल व उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रोड अशी रचना असलेला उड्डाणपूल प्रत्यक्षात पूर्ण उभारण्यात येणार आहेत. रोजच होणारी वाहतूक कोंडी पाहता या चौफुलीवर उड्डाणपूल होणे गरजेचे होते. मात्र यासाठी वाहनधारकांसह पिंपळगावकरांना किमान दोन ते अडीच वर्ष वाट पहावी लागणार यात काही शंकाच नाही.

आशिया खंडातील क्रमांक एकची व्यापारी व शेती बाजारपेठ असा नावलौकिक असणाऱ्या पिंपळगाव बसवंत शहरात मोठ्या प्रताणात उलाढाल होते. साहजिकच शहरातून जाणाऱ्या महामार्गावर सतत वाहनांची गर्दी असते. चिंचखेड चौफुलीवर अपघात व वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाल्याने उड्डाणपुलामुळे जोपुळ रोड, पिंपळगाव बाजार समितीकडे जाणारी वाहने बोगद्यांतून मार्गक्रमण करणार आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक उड्डाणपुलावरून सरळ जाणार असल्याने परिसरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या सुटणार आहे

राष्ट्रीय महामार्गा साकारताना चिंचखेड चौफुली परिसरात उड्डाणपुलाची गरज असतानाही कोणतीही व्यवस्था नव्हती, या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा यासाठी विविध राजकीय पक्षाच्या माध्यमातून विविध आंदोलने करण्यात आली. त्यामुळे केंद्र सरकारने पिंपळगाव चौफुली परिसरात उड्डाणपूल मंजूर केला. दोन वर्षांपूर्वी केंद्रीय दळणवळण रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याच उड्डाणपुलाचे भूमीपूजनही झाले. त्यानंतर उड्डाणपुलाच्या कामास अखेर मुहूर्त लागल्याने कामास जोरदार सुरवात झाली आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यासाठी किमान दोन वर्षे लागणार आहेत.

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे चिंचखेड चौफुलीवरील मंजूर झालेल्या उड्डाणपुलाचे कामे सुरू करण्याबाबत वारंवार पाठपुरवठा केला होता. शासनाने याची दखल घेतल्याने या पुलाच्या कामास अखेर सुरवात झाली आहे.--बापूसाहेब पाटील, जिल्हा संघटक भाजप

..............

पिंपळगाव शहरातील चिंचखेड चौफुलीवरील बाजार समितीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होते. गेल्या दोन वर्षांपासून मंजूर असलेल्या उड्डाणपुलाच्या कामास अखेर प्रारंभ झाल्याने वाहन धारकांना वाहतूक कोंडीपासून सुटका होऊन मोठा दिलासा लाभेल.--

दीपक शिंदे, मनसे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टार्टअप मंत्रवर आज मार्गदर्शन

$
0
0

स्टार्टअप मंत्रवर आज मार्गदर्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुमागो इन्फोटेकच्या वतीने आज (८ जुलै) 'स्टार्टअप मंत्र २०१८' या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्टार्टअप करू इच्छिणाऱ्या तरुणाईला विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. कुर्तकोटी सभागृह, शंकराचार्य न्यास संकुल, जुना गंगापूर नाका या ठिकाणी दुपारी ४ ते सायंकाळी ८ वाजेदरम्यान हा कार्यक्रम होणार आहे.

त्यात स्टार्ट अप मार्गदर्शक गिरीश पगारे, सिलिकॉन व्हॅली संस्थेचे संचालक प्रमोद गायकवाड, उद्योगवर्धिनीचे संचालक सुनील चांडक हे स्टार्टअपमधील संधी, स्टार्टअपचा प्रवास, स्टार्टअपदरम्यान येणाऱ्या अडचणी आणि स्टार्टअपसाठी उपलब्ध सरकारी योजनांची माहिती देतील. याशिवाय के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजचे उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. एस. साने, गुरूगोविंद सिंग पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. पी. एस. दुग्गल, संदीप फाउंडेशन संचलित इंजिनीअरिंग कॉलेजचे प्रा. डॉ. अमोल पोटगंटवार हे विद्यार्थ्यांना स्टार्टअप प्रोत्साहन मिळण्यासाठी शैक्षणिक संस्थांचे योगदान या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भगूरला मोकाट कुत्र्यांचा दोन बालिकांना चावा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूरमधील तेली गल्ली येथील संताजी मंगल कार्यालय परिसरात मोकाट कुत्र्यांनी दोन लहान बालिकांवर हल्ला करून चावा घेतल्याची घटना घडली. कुत्र्यांनी बालिकांवर हल्ला केल्या लक्षात येताच नागरिकांनी तातडीने धाव घेत बालिकांची सुटका केल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या प्रकारामुळे परिसरातील मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तेली गल्लीत राहणाऱ्या तीनवर्षीय अलिना रियाज शेख आणि चारवर्षीय तुलसी दुर्गश मेहेरे या बालिकांचे आई-वडील सकाळी मोलमजुरीस गेल्यानंतर त्या आपल्या घरासमोर खेळत असताना समोरून आलेल्या मोकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवून दोघींनाही चावा घेतला. हा प्रकार नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने या बालिकांना कुत्र्यांच्या तावडीतून सोडविल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या हल्ल्यात दोन्ही बालिकांच्या कानाला, डोक्याला व डोळ्याच्या बाजूला जखमा झाल्या आहेत. या प्रकारामुळे भगूरवासीयांनी संताप व्यक्त करीत भगूर नगरपालिकेने परिसरातील मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कुत्री मारणे अथवा पकडणे दोन्हींवरही बंदी असल्याने अशा घटना भविष्यात वाढण्याची भीती व्यक्त होत असून, याप्रश्नी तातडीने उपाययोजना करण्याची अपेक्षाही नागरिकांतून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हुल्लडबाज पर्यटकांना पोलिसांचा दणका

$
0
0

पेगलवाडीत वाहन तपासणी; दहा जणांवर कारवाई

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

पावसाळी सुरू झाला की हौशी पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात जाण्यासाठी अक्षरश: धडपड करतात. पार्टी करण्यासाठी तर आठवडाभर नियोजन करून सारेच दैनंदिन आयुष्यातील शीन घालविण्यासाठी पर्यटनाच्या नावाखाली अक्षरश: हुल्लडबाजी करतात. त्र्यंबक परिसरात प्रत्येक पावसाळ्यात अशा हुल्लडबाज पर्यटकांमुळे स्थानिकांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे अशा पर्यटकांना प्रतिबंध घालण्यासाठी त्र्यंबक पोलिसांनी शनिवारी धडक मोहीम सुरू केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे, अप्पर अधीक्षक विशाल गायकवाड, उप अधीक्षक शामराव वाळवी यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबक पोलिसांनी खास नाकाबंदी केल्याने मद्यपी या परिसरातून माघारी फिरले.

त्र्यंबक परिसरात पहिणे घाटात दरवर्षी पावसाळ्यात तरुणांकडून वेगात दुचाकी, चारचाकी चालविणे, मद्यप्राशन करून या परिसरात धिंगाणा घालणे, स्थानिक शेतकऱ्यांना त्रास देणे असे प्रकार होत असतात. याबाबत अनेकदा तक्रार करूनही अशा हुल्लडबाजांवर कठोर झाल्याचे आठवत नाही. मात्र यंदा पोलिसांनी सुरुवातीपासून खबरदारी घेत अशा हौशी पर्यटकांवर नजर ठेवली आहे. शनिवारी त्र्यंबक पोलिसांनी पहिणे घाट परिसरात वाहनांची तपासणी केली. पोलिसांना पाहताच अनेक तरुणांना बाईकवरच धूम ठोकली. पेगलवाडी फाटा येथे वाहनांची तपासणी करण्यात आली. काही वाहनांमध्ये मद्याच्या बाटल्या आढळल्या. त्या तेथेच ओतून देण्यात आल्या. मोटार वाहन कायद्याप्रमाणे १० वाहन चालकावर करवाई करण्यात आली.

निसर्गाचा आनंद घ्या

पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे, उपनिरीक्षक कैलास अकुले, मेहेर, घुगे, खैरे आदींसह कर्मचाऱ्यांनी जागोजाग तपासणी सत्र राबविले. निसर्ग सहलीचा आनंद घ्या. मात्र मद्य पिणे कुटुंबासह सहलीला आलेल्यांना त्रास देणे. रस्त्यावर धिंगाणा घालणे, असे प्रकार करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्र्यंबक पोलिसांनी दिला आहे. सहलीला आलेल्यांनी निसर्गाचा आनंद घ्यावा. सेल्फी काढतांना काळजी घ्यावी. पाण्याच्या खोलीचा अंदाज नसल्याने जलशयाच्या जवळ जाऊ नये. डोंगरकडे निसरडे झाले असून, अशा ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलनि:सारणाची ११० कोटींची कामे

$
0
0

सहाही विभागांत होणार कामांना सुरुवात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपताच प्रशासनाने बजेटच्या अंमलबजावणीवर जोर दिला आहे. पहिल्या टप्प्यात नववसाहतींमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठीच्या कामाला मंजुरी दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात शहरातील मलवाहिकांचे जाळे टाकण्यास प्राधान्य देण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. शहरात नव्याने मलवाहिका टाकण्यासाठी महापालिकेने ११० कोटींची कामे करण्यास सुरुवात केली असून, त्यासाठीच्या निविदा प्रसिद्ध केल्या आहेत.

महापालिकेच्या वतीने गेल्या आठवड्यात नववसाहतींमधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामाला मंजुरी दिली होती. शहरातील सहा विभागांतील पाणीपुरवठा यंत्रणा सुधारण्यासाठी पुढाकार घेतला असतानाच आता मलवाहिकांच्या कामांनाही प्राधान्य दिले जात आहे. महापालिकेच्या बजेटमध्ये तरतूद केल्याप्रमाणे ही कामे होणार असून, शहराच्या सहा विभागांमध्ये नऊ कामांचा समावेश आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बजेटमध्ये सादर करताना ज्या भागात ड्रेनेज व पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आचारसंहिता संपुष्टात येताच कामांना वेग आला आहे. नववसाहती, दलित व आदिवासी भागात ड्रेनेज लाइन टाकल्या जाणार आहेत. त्यासाठी ११० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य व यांत्रिकी विभागाने शनिवारी निविदाप्रक्रिया सुरू केली आहे. या निविदांना देकार येताच कामांनाही सुरुवात केली जाणार आहे. विशेष म्हणजे ही कामे बजेटमध्ये मंजूर असल्याने स्थायी आणि महासभेत हे विषय ठेवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या कामांना लगेच गती मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मी ताठेंची सेनेतून हकालपट्टी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गांजा विक्री प्रकरणात अटक झालेल्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी लक्ष्मी ताठे यांची अखेर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी ताठे यांच्या हकालपट्टीची घोषणा केली. ताठे यांच्यामुळे बदनामी होत असल्याने शिवसेनेकडून तातडीने त्यांच्या हकालपट्टीची घोषणा करण्यात आली आहे.

पंचवटीतील गांजा विक्री प्रकरणात शिवसेनेच्या पदाधिकारी असलेल्या लक्ष्मी ताठे यांचे नाव गोवले गेल्याने पक्षाची बदनामी सुरू झाली होती. विशेष म्हणजे पोलिसांच्या रेकॉर्डवर नाव आल्यानंतर ताठे या फरार झाल्या होत्या. महापालिकेच्या निवडणुकीत ताठे यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. तसेच, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनाही अरेरावी केली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये ताठे यांची हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु, शिवसेनेत खांदेपालट झाल्यानंतर सिडकोतील एका बड्या नेत्याच्या मदतीने विधान परिषद निवडणुकीपूर्वी ताठे यांना उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख संजय राऊत यांच्या उपस्थितीत पक्षात पावन करून घेण्यात आले होते. परंतु, त्यांचे नाव गांजा विक्री प्रकरणात गोवले गेल्यानंतर पक्षाची अडचण निर्माण झाली होती. दोन दिवसापूर्वीच ताठे यांना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली. न्यायालयाने ताठेंना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पक्षाची बदनामी होत असल्याने अखेर शिवसेनेने त्यांच्या हकालपट्टीची घोषणा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक - ग्रामपंचायतीमध्ये आता ‘गुगलशीटचा’ वापर

$
0
0

शुभवार्ता

--

ग्रामपंचायतींमध्ये आता 'गुगलशीटचा' वापर

-

पेपरलेस काम, तत्काळ माहिती मिळणार

-

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमधील विविध विषयांची माहिती संकलित करण्यासाठी गुगलशीटचा वापर करण्यास सुरवात केली आहे. यासाठी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या विविध विषयांबाबत प्रपत्र तयार करण्यात आले असून, प्रत्येक ग्रामपंचायतीमधून सदरची प्रपत्र भरण्यात येणार आहेत. याबाबत ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आढावा बैठक घेऊन याबाबत माहिती देण्यात आली.

ग्रामपंचायत विभाग हा जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक महत्त्वाचा विभाग आहे. सर्व प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी ग्रामस्तरावर ग्रामसेवकाकडून करण्यात येते. तसेच विविध प्रकारचे अहवाल व माहितीदेखील ग्रामसेवकाकडूनच घेण्यात येते. यासाठी ग्रामपंचायत विभागाने मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली माहिती संकलनासाठी विविध विषयांचे प्रपत्र तयार केले आहेत. सदरचे प्रपत्र गुगलशीटवर टाकण्यात आले असून, प्रत्येक ग्रामपंचायतीने संगणक परिचालकाच्या मदतीने सदरचे प्रपत्र भरावयाचे आहे. प्रपत्र भरल्यावर ग्रामपंचायत तसेच तालुकानिहाय माहिती उपलब्ध होणार असून, आढावा घेण्यासाठी तसेच ग्रामपंचायतीमधील कामाची प्रगती कळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.

यामध्ये घरपट्टी, पाणीपट्टी वसुली, किरकोळ मागणी, कर वसुली, जिल्हा ग्राम निधी, कर्ज, मासिक सभा, महिला व ग्रामसभा, सदस्य रिक्त पद, नवीन निवडणूक माहिती, टी.सी. एल. पाणी पुरवठा स्त्रोत, लेखापरिक्षण शक पुर्तता, अफरातफर अहवाल, १४ वित्त पंचवार्षिक आराखडा आदी विषयांचा समावेश आहे. शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत आपले सरकार अंतर्गत सुविधा व पेपरलेस काम, लेखापरीक्षण अहवाल आदी विषयांचा आढावा घेण्यात आला.

डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची माहिती एकत्रित संकलित करता यावी यासाठी ग्रामपंचायत विभागाकडून गुगलशीटचा वापर करण्यात येणार आहे. यासाठी विविध विषयांचे प्रपत्र तयार करण्यात आली आहेत. याबाबत तालुका तसेच ग्रामपंचायत स्तरावर सूचना देण्यात आल्या असून, सदरचे प्रपत्र भरण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.--राजेंद पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनसेची जम्बो कार्यकारिणी जाहीर

$
0
0

कार्यकारिणीत १२४ शाखांप्रमुखांसह २७९ पदाधिकाऱ्यांचा समावेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने संघटनात्मक बांधणीला सुरुवात झाली असून, नाशिकचा गड पुन्हा सर करण्याच्या दिशेने कामकाज सुरू झाले आहे. पक्षाला पुनर्वैभव प्राप्त करण्यासाठी पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी तब्बल १२४ शाखाप्रमुखांसह २७९ शिलेदारांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. शहरातील एका प्रभागासाठी प्रत्येकी एक उपविभाग अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष व चार शाखा अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाला पुनर्वैभव प्राप्त होईल, असा दावा शहराध्यक्ष अनिल मटाले यांनी केला आहे.

महापालिका निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर मनसेनेला पुन्हा उभारी देण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा प्रयत्न सुरू झाले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही नाशिकमध्ये दौरा करून पक्षाच्या विस्तारासाठी प्रयत्न केले. त्यात स्थानिक पदाधिकाऱ्यांना राज्य कार्यकारिणीत पदोन्नती देण्यात आली. शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक अनिल मटाले यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता शहराच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा झाली. या जम्बो कार्यकारिणीत १२४ शाखाप्रमुखांसह २७९ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. शहराध्यक्ष १, प्रवक्ता २, विभाग निरीक्षक ३, कार्यालयीन अध्यक्ष व सचिव संघटन प्रत्येकी एक, उपशहराध्यक्ष ७, विभाग अध्यक्ष ५, शहर सरचिटणीस १०, शहर संघटक ३४, शहर चिटणीस २९, उपविभाग अध्यक्ष ३१, प्रभाग अध्यक्ष ३१, शाखा अध्यक्ष १२४ अशी एकूण २७९ पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी राहणार आहे. पक्षाचे सरचिटणीस अशोक मुतर्डक व डॉ. प्रदीप पवार, प्रदेश उपाध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, शहराध्यक्ष अनिल मटाले, महापालिकेचे गटनेते सलिम शेख यांनी पक्षाच्या राजगड कार्यालयात नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले.

अशा आहेत नियुक्त्या

विभाग अध्यक्ष साहेबराव खर्जुल (नाशिकरोड), भाऊसाहेब निमसे (पंचवटी), रामदास दातीर (सिडको), प्रकाश निगळ (सातपूर), अंकुश पवार (मध्य नाशिक), संदीप लेनकर व किशोर जाचक (प्रवक्ते), निरीक्षक प्रकाश कोरडे (पूर्व विधानसभा), सचिन भोसले (मध्य), सोपान शहाणे (पश्‍चिम), शहर उपाध्यक्ष राम संधान, श्रीराम कोठुळे, संतोष क्षीरसागर, नितीन साळवे, अॅड. अतुल सानप, सुनील मटाले, सचिन सिन्हा, शहर सरचिटणी सत्यम खंडाळे, संतोष कोरडे, निखिल सरपोतदार, सोमनाथ वडजे, प्रवीण भाटे, प्रवीण पवार, विक्रम कदम, सचिन शिसोदिया, प्रमोद साखरे, सतीष रावते आदी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशाला यादवीची भीती

$
0
0

माजी न्या. अभय ठिपसेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीडियाचा उपयोग बुद्धिभेद करण्यासाठी केला जात आहे. आज न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. प्रशासनाकडूनच न्यायव्यवस्थेवर दबाव येत असून, फुटीरतावादी आणि जातीयवादी शक्तींना बळ मिळत आहे. देशातील जातीयवादी शक्तींना उन्माद चढला आहे, अशा शब्दात मुंबई हायकोर्टाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी शनिवारी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तसेच, देशात यादवी माजेल अन् पुढची निवडणूक होईल, की नाही अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत अभय ठिपसे यांनी गेल्या महिन्यात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर शनिवारी ठिपसेंनी नाशिकमध्ये प्रथमच काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री पी. चिदंबरम यांच्या उपस्थितीत जाहीर भाषण केले. काँग्रेस प्रवेशानंतर शनिवारी त्यांनी प्रथमच केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवला. सामाजिक प्लॅटफॉर्मवर मी पहिल्यांदाच बोलत आहे, असं सांगत अभय ठिपसे यांनी मोदी सरकारवर टीका केली. मी राजकारणात प्रवेश केल्यानंतर अनेक चांगल्या आणि वाईट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. देशात न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात असून, सरकार न्यायव्यवस्थेला दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप ठिपसे यांनी यावेळी केला. सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांना पत्रकार परिषद घेऊन आपल्या व्यथा मांडाव्या लागतात, त्यांच्यावर ही हतबलता कशामुळे आली, हे आपण लक्षात घ्यायला हवे. देशात सध्या एका विचारसरणीचा पुरस्कार केला जात आहे, असेही ते म्हणाले.

देशात जातीयवाद वाढला आहे. राज्यघटना आपल्यावर कोणी लादली नसून, ती आपण आपल्यासाठी स्वीकारली आहे. आज राज्यघटना अडचण वाटू लागली आहे. त्यामुळे तिला बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आज समाज भरकटलेला आहे, कारण संविधानाचं समाजाला ज्ञान नाही. आज विशिष्ट वर्गाला त्यांचे प्राबल्य वाढवायचे आहे. त्यामुळे देशाच्या एकात्मतेसाठी हे चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.

-

सोहराबुद्दीन खटला चुकीचा

सोहराबुद्दीन खटल्यात इन कॅमेरा आरोपींची करावी लागणारी सुनावणी ही बाब माझ्यासाठी धक्कादायक होती. अशा प्रकारच्या खटल्यांच्या सुनावण्या या उघडपणे चालल्या पाहिजेत. सोहराबुद्दीन खटला चुकीच्या पद्धतीने चालवला गेला असा आरोप त्यांनी केल्याने या खटल्याचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. सध्या देशात काहीतरी चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. अनेक संशयास्पद आरोपी हे सोडले जात आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

...म्हणून मी काँग्रेसमध्ये

सध्या सर्वत्र अराजकतेचे राज्य दिसून येत आहे. समाज वेगळ्या दिशेने भरकटतोय. स्वांतत्र्यावर गदा आणली जात आहे. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले याची जाण मला आहे. लोकशाही बुडवणाऱ्या जातीयवादी शक्तींना विरोध करण्यासाठी आणि चांगले काम करण्यासाठी मी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे, असे अभय ठिपसे यांनी सांगितले.

२०१९ नंतर मोदी काय करणार : केतकर

केंद्रात मोदी सरकार आल्यापासून देशात जातीय तणाव वाढला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव होणार असून, नंतर नरेंद्र मोदी काय करणार?, असा प्रश्न मला पडला आहे, अशी मिश्किल टिप्पणी खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केली. मोदी नसेल तर कोण असा प्रश्न ज्यांच्या मनात आहे, त्यांच्याबद्दल मला हसू येतंय, असेही केतकर म्हणाले. अशी परिस्थिती यापूर्वीही निर्माण झाली आहे. काँग्रेस घराणेशाही करीत नाही. नाहीतर लालबहादूर शास्त्री, मोरारजी देसाई पंतप्रधान झाले नसते. मोदी सरकार आल्यापासून देशात जातीय तणाव वाढत आहे. त्यामुळे देशाला वाचवण्याची वेळ आली आहे. काँग्रेसमध्ये अनेक अवगुण आहेत. परंतु बहुधार्मिकता, बहु सांस्कृतिकता आणि राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्याचे महत्त्वाचे काम काँग्रेसने केले आहे. काँग्रेसने कधीही देशाला फूटू दिले नाही. त्यामुळे काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सैन्य भरती निवड चाचणी

$
0
0

नाशिक : सप्टेंबर-ऑक्टोबर २०१८ मध्ये एआरओ मुंबई अंतर्गत सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा येथील मेस्को करिअर अकॅडमीतर्फे १० जुलै रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत सैन्यभरती प्रशिक्षण मार्गदर्शन व निवड चाचणी होणार आहे. जिल्ह्यातील भरती होण्यास इच्छुक उमेदवारांनी सैनिकी मुलांचे वसतिगृह, त्र्यंबकरोड, शासकीय दूध डेअरी समोर, नाशिक येथे नियोजित वेळेत मूळ कागदपत्रासह हजर राहावे.

--

फळपीक विमा योजना

नाशिक : प्रतिकूल हवामान घटकापासून विमा संरक्षण देण्यासाठी नाशिक विभागात ३७ तालुक्यांतील १८० महसूल मंडळात पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना राबविण्यात येणार आहे. विविध वित्तीय संस्थांकडे पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या व अधिसूचीत फळ पिकासाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर असणाऱ्या शेतकऱ्यांना ही योजना सक्तीची राहील. बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक आहे. डाळिंब पिकासाठी फळधारणेच्या अवस्थेत कमी पावसासाठी विमा संरक्षण कालावधी १५ जुलै ते १५ ऑगस्ट फळवाढीच्या अवस्थेत कमी पावसासाठी १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर आणि काढणी अवस्थेत जास्त पावसासाठी १६ ऑक्टोबर ते ३० डिसेंबर आहे. विमा भरण्याची अंतिम मुदत १४ जुलै आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थचक्र मोडीत

$
0
0

अथर्चक्राची वाट

अर्थव्यवस्थेचा विकास एक अर्थचक्र असते. गुंतवणुकीतून रोजगार, रोजगारातून भांडवल निर्मिती आणि त्यातून पुन्हा रोजगार हे अर्थचक्र असते. परंतु, सध्याच्या सरकारने हे अर्थचक्र मोडीत काढण्याचे काम केले आहे. गुंतवणूक नसल्याने रोजगार निर्मिती ठप्प झाली आहे. त्यामुळे एकूणच संपूर्ण अर्थव्यवस्थाच संकटात सापडली आहे. यूपीए सरकारच्या काळात निर्यात ही ३.१४ बिलियन डॉलर होती, ती घसरून ३.३ बिलियन डॉलरपर्यंत खाली आली आहे.

-

पंक्चर चाकांवर अर्थव्यवस्था

गंतवणूक, रोजगार, कंझम्पशन आणि सरकारचा खर्च अशी अर्थव्यवस्थेची चार चाके असतात. परंतु, सध्या या अर्थव्यवस्थेची गुंतवणूक, रोजगार आणि कंझम्पशन ही तीन चाके पंक्चर झाली असतांना सरकारचा खर्च मात्र वाढत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धर्मादायतर्फे लवकरच मोफत डायलिसीस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गरजू रुग्णांना मोफत डायलिसीस सुविधा मिळावी, याकरिता धर्मादाय आयुक्तालयाने पावले उचलली आहेत. विविध विश्वस्त व्यवस्थांना याबाबत धर्मादाय आयुक्तालयाने आवाहन केले असून, त्यास या संस्थांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लवकरच ही सेवा सुरू होण्याची शक्यता असून, गरीब कुटुंबांमधील गरजू रुग्णांसाठी ती वरदान ठरणार आहे.

एखाद्या रुग्णाची किडणीची कार्यक्षमता अगदीच कमी होते किंवा किडणी काम करणे पूर्णपणे बंद करते तेव्हा डायलिसीसची गरज भासते. औषधे घेऊनदेखील उलटी होणे, मळमळणे, उमाळे येणे, अशक्तपणा वाटणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी किडणी रोगाची लक्षणे दिसत राहतात, तेव्हा डॉक्टरांकडून डायलिसीसचा सल्ला दिला जातो. परंतु, डायलिसीस उपचाराचा खर्च अधिक असल्याने अनेक रुग्णांना ते घेणे परवडत नाहीत. अशा रुग्णांना मोफत डायलिसीस मिळावे, याकरिता धर्मादाय आयुक्तालय प्रयत्नशील होते. राज्याच्या धर्मादाय आयुक्तांच्या निर्देशानुसार नाशिक जिल्ह्यातही धर्मादाय आयुक्त कार्यालयाने मोफत डायलिसीस सुविधा मिळवून देण्याकरिता पावले उचलली आहेत. या विषयावर विचारविनिमय करण्यासाठी अलीकडेच धर्मादाय आयुक्त कार्यालयात बैठक बोलविण्यात आली होती. धर्मादाय सहआयुक्त प्रदीप घुगे यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या या बैठकीला धर्मादाय उपायुक्त कांचनगंगा सुपाते-जाधव, सहायक धर्मादाय आयुक्त कृष्णा सोनवणे, राम लिप्ते, रोहिणी थोरात यांसह विश्वस्त व्यवस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

पेठ, सुरगाण्यासाठीही नियोजन

पेठ, सुरगाण्यासह जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन धर्मादाय आयुक्तालयाने सुरू केले आहे. या उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आश्वासन विश्वस्त व्यवस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. याबाबतची पुढील बैठक १७ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उत्तर महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यात रविवारी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली तर दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाडला झोडपून काढत रहिवाशांना सुखद धक्काही दिला. पुढील ४८ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. इगतपूरीसह, पेठ आणि सूरगाणा या तालूक्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. शनिवारी सकाळी आठ ते रविवारी सकाळी आठ या २४ तासांमध्ये जिल्ह्यात ३०३.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. तर शहरात अवघा २.३ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला.

रविवारी दिवसभरात सिडको, पंचवटी, कॉलेजरोड, नाशिकरोड या परिसरात पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण पहायला मिळाले. ग्रामीणच्या काही भागातही पावसाने कमबॅक केले असून मनमाडसह आसपासच्या परिसरात मोठ्या विश्रांतीनंतर हजेरी लावली आहे. सुरगाण्यात रविवारी सकाळपर्यंत सर्वाधिक ११० मिमी, तर पेठमध्ये ७२.५ मिमी पावसाची नोंद झाली. इगतपुरीत ५८ मिमी, त्र्यंबकेश्‍वरमध्ये ३३, येवल्यात ८, मालेगाव ६ तर बागलाणमध्ये दोन मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला. पुढील ४८ तासांमध्ये उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


टँकर फेऱ्या घटूनही टंचाईचे ढग कायम

$
0
0

टँकर्सची संख्या २८२ वरून १०४ वर

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जून आणि जुलै महिन्यात नाशिक विभागात झालेल्या पावसामुळे विभागातील टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत घट झाल्याने टँकरसंख्याही कमी झाली आहे. पाणीटंचाईच्या झळा कमी झाल्याने प्रशासनाला टॅँकर दिलासा मिळाला आहे. शनिवारपर्यंत (दि. ७) विभागातील टंचाईग्रस्त गावांची संख्या ३३५ वरून १३७ इतकी झाली, तर टँकर्सची संख्या २८२ वरून १०४ इतकी कमी झाली आहे.

नाशिक विभागात जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्याअखेर टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत १९८, तर टॅँकर्सच्या संख्येत १७८ इतकी मोठी घट आली आहे. विभागात जून व जुलै महिन्यात आतापर्यंत झालेल्या पावसामुळे टंचाईग्रस्त ३३५ गावांपैकी १९८ गावांसह ३८९ वाड्यांवरील पाणीटंचाई संपुष्टात आली आहे. विभागातील नंदुरबार आणि नगर या दोन जिल्ह्यांतील टंचाईग्रस्त गावांची संख्या शुन्यावर आल्याने हे दोन्ही जिल्हे टँकरमुक्त झाले आहेत. उर्वरित तिन्ही जिल्ह्यांपैकी जळगाव जिल्ह्यात ७९, नाशिक जिल्ह्यात ४४ आणि धुळे जिल्ह्यातील १४ गावांतील टंचाईस्थिती कायम आहे. या गावांना टँकरदवारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा प्रशासनातर्फे अद्यापही सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील ५३ वाड्यांवरील पाणीटंचाईदेखील कायम आहे. टंचाईची तीव्रता जास्त असलेल्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण, मालेगाव, सुरगाणा आणि नांदगाव तर नगर जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर, पाथर्डी आणि राहता या तालुक्यांतील टंचाईग्रस्त गावांवरील पाणीटंचाईचे ढग निवळल्याने या गावांची टँकरच्या फेऱ्यातून मुक्तता झाली आहे.

टंचाईग्रस्त प्रमुख तालुके

सिन्नर (१२), येवला (३२), शिंदखेडा(९), साक्री(३), धुळे (२), अमळनेर (२९), जामनेर (१९), पारोळा (१६), चाळीसगाव (८), जळगाव (३), मुक्ताईनगर आणि भुसावळ (२) या बारा तालुक्यांतील १३७ गावांत सध्या पाणीटंचाई कायम आहे. उर्वरित ४२ तालुके टंचाईमुक्त झाले आहेत. नाशिक, जळगाव आणि धुळे या तिन्ही जिल्ह्यांना अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

नाशिक विभागातील टंचाईस्थिती

जिल्हा जून २०१८ जुलै २०१८

गावे - टॅँकर्स गावे - टॅँकर्स

नाशिक १११ - ८४ ४४- ३१

धुळे १५- १२ १४- ११

नंदुरबार २- १ ०-०

जळगाव १४४- ११४ ७९- ६२

नगर ६३-७१ ०-०

एकूण ३३५-२८२ १३७- १०४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरणस्नेही उमंगसाई

$
0
0

पाथर्डी शिवारात गेल्या तीन वर्षांपासून २६ कुटुंबे एकत्र राहत असलेल्या उमंगसाई अपार्टमेंटमधील सभासदांचे जणू एकच कुटुंब तयार झाले आहे. प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचे काम या अपार्टमेंटमधील पर्यावरणप्रेमी रहिवासी करीत आहेत. वर्षभर विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबविणाऱ्या या अपार्टमेंटने पर्यावरण संवर्धनाचा वसा स्वीकारला असून, पदाधिकाऱ्यांची समिती नियुक्त केली नसतानाही सर्वच सभासद येथे गुण्यागोविंदाने नांदत आहेत.

--

संकलन : राजन जोशी

--

शहर चोहोबाजूंनी विस्तारत असताना गेल्या काही वर्षांपासून पाथर्डी फाट्यापासून पाथर्डी गावापर्यंतचा परिसर झपाट्याने विकसित होऊ लागला आहे. त्यामुळे येथे रहिवासी वस्ती वाढू लागली आहे. पाथर्डी शिवारात असेच अलीकडच्या काळात उभे राहिलेले अपार्टमेंट म्हणजे उमंगसाई. या अपार्टमेंटमध्ये २६ सदनिका आहेत. त्यापैकी बहुतांश सदनिकांमध्ये घरमालक स्वत: वास्तव्यास आहेत, तर काही सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आलेल्या आहेत. हे भाडेकरूदेखील अपार्टमेंटमधील सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. येथील रहिवाशांनी सुरुवातीपासूनच पर्यावरण संवर्धनाचा ध्यास घेतला आहे. शहरीकरणात वाढ नव्हती तोपर्यंत पाथर्डी शिवार हिरवळीने नटलेले होते. परंतु, काळानुरूप या ठिकाणी सिमेंटचे जंगल उभे राहिले आहे. या भागाला पुन्हा हिरवळीने सजविण्यासाठी या सोसायटीचे सभासद प्रयत्नशील आहेत. परिसरात वृक्षारोपण करणे आणि आहे ती झाडे जगविण्याचे काम येथील रहिवासी स्वयंस्फूर्तीने करीत आहेत. या झाडांभोवती रांगोळी काढण्याची प्रथा याच अपार्टमेंटमध्ये पाहावयास मिळते.

गतवर्षी अपार्टमेंटमधील सभासदांनी अंजनेरी येथे जाऊन वृक्षारोपण केले होते. यंदा खंडोबाच्या टेकडीवर वृक्षारोपण करण्याचे नियोजन सभासदांनी केले आहे. अपार्टमेंटमधील महिलांमध्येही एकीचे दर्शन घडते. गप्पागोष्टींमध्ये वेळ व्यर्थ घालण्यापेक्षा महिला सक्षमीकरणासाठी अपार्टमेंटमधील महिला अधिक प्रयत्नशील असतात. अपार्टमेंटमध्ये भाडेकरू म्हणून कुणी राहावयास आले, तर त्याची रीतसर पोलिस स्टेशनमध्ये नोंद व्हावी याकरिता अपार्टमेंटमधील सभासद आग्रही असतात. किंबहुना तसा नियमच केल्याने भाडेकरू आणि घरमालकाला पोलिसांना माहिती द्यावीच लागते. या निर्णयाचा फायदा गैरप्रकार रोखण्यासाठी होतो, असे सभासद सांगतात. अपार्टमेंटच्या देखभाल-दुरुस्तीच्या खर्चाचे नियोजनही अपार्टमेंटमधील सभासदांनी करून ठेवले आहे. येथील क्रियाशील रहिवाशांमुळे परिसरातील अन्य सोसायट्यांनाही उमंगसाई अपार्टमेंटची अपूर्वाई वाटते.

-

सण-उत्सवांतही निसर्गभान

भारतीय संस्कृतीबद्दल आत्मीयता बाळगणाऱ्या या अपार्टमेंटमध्ये गणेशोत्सवाबरोबरच विविध सण-उत्सव उत्साहात साजरे केले जातात. गणेशोत्सवात तर दहा दिवस धूम असते. चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सारेच या उत्सवात सहभागी होतात. लहान मुले, महिला, तसेच पुरुषांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यानिमित्ताने सभासदांच्या आनंदाला उधाण येते. गणेशाची आराससुद्धा पर्यावरणपूरक व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी असेल याची कटाक्षाने काळजी घेतली जाते. गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी याच भागात हौद तयार करण्यात आला आहे. तेथेच परिसरातील सर्व गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.

वाढदिवसांचे अनोखे सेलिब्रेशन

पूर्वी अपार्टमेंटमधील सभासदांचा किंवा त्यांच्या कुटुंबातील व्यक्‍तीचा वाढदिवस एकत्रित साजरा करण्यात येत होता. मात्र, असे करण्यापेक्षा आता फादर्स डेला सर्व पुरुषांचा आणि मदर्स डेला महिलांचा, तर चिल्ड्रेन्स डेला लहानग्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतो. अपार्टमेंटच्या स्वच्छतेबरोबरच आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील याची काळजी या सभासदांकडून घेतली जाते. परिसरातील नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास संबंधितांना समजावून सांगण्याचे काम अपार्टमेंटमधील सभासद करतात. त्यामुळे अपार्टमेंटबरोबरच परिसरही स्वच्छ राहण्यास मदत होते. अपार्टमेंटच्या देखभालीसाठी येथे रखवालदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे हा रखवालदार आणि त्याचे कुटुंबीय हेदेखील अपार्टमेंटचाच भाग बनले आहेत.

आमची सोसायटी आमची शान

(आवाहन घ्यावे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भय्यू महाराज यांच्या अस्थींचे विसर्जन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

आध्यात्मिक गुरू भय्यू महाराज यांच्या अस्थींचे रविवारी (दि. ८) रामकुंड येथे विसर्जन करण्यात आले. त्यांच्या अस्थी रामकुंडावर आणल्यानंतर त्या दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. अस्थींचे विधीवत पूजन केल्यानंतर त्या रामकुंडात विसर्जित करण्यात आल्या.

अस्थी विसर्जनप्रसंगी रामकृष्ण महाराज लहवीतकर यांच्या प्रवचन झाले. गंगा गोदावरी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी पूजेचे पौरोहित्य केले. सर्वोदय परिवाराचे शिष्य तसेच राजकीय, धार्मिक, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवरांनी श्रध्दांजली अर्पण केली. महाराजांचा मानवता धर्म या पुढेही सुरू ठेवण्याचा आणि त्यांचे कार्य पुढेही अविरतपणे सुरू ठेवण्यात येणार असल्याचे श्रध्दांजली अर्पण करणाऱ्यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते समाजातील गरीब कुटुंबातील मुला-मुलींना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, सुनील बागूल, तहसीलदार राजश्री अहिरराव, शिवाजी सहाणे, राम महाराज गणेशकर, अण्णासाहेब महाराज आहेर, करण गायकर आदी उपस्थित होते. उमेश शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाईक कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे यश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

येथील क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी. ए. व बी. कॉम.च्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादित केले.

तृतीय वर्ष वाणिज्य वर्गात प्रतिभा बोंबले हिने (७१.८३ टक्के) प्रथम, शांताराम गायकवाड याने (७०) द्वितीय, युवराज जाधव याने (६७) तिसऱ्या क्रमांक तर तृतीय वर्ष कला वर्गात गणेश भोये याने (७४) प्रथम, कांतीलाल गायकवाड याने (६५) द्वितीय, भाग्यश्री गायकवाड हिने (६५) तृतीय उतीर्ण मिळविला. द्वितीय वर्ष वाणिज्य वर्गात योगिता गांगोडे (६३), प्रभाकर चौधरी (६२), यशवंत गांगोडे (५९) तर द्वितीय वर्ष कला वर्गात प्रकाश चौधरी (७४), दुर्वास गायकवाड (६९), सीताराम वार (६७) यांनी यश मिळविले. विशेष बाब म्हणजे द्वितीय व तृतीय वर्ष कला वर्गात प्रथम तीन क्रमांकाने आलेल्या सहा पैकी पाच विद्यार्थी इतिहास विभागाचे आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, सरचिटणीस हेमंत धात्रक, उपाध्यक्ष प्रभाकर धात्रक, सहचिटणीस अॅड. तानाजी जायभावे, संचालक व कॉलेज विकास समितीचे अध्यक्ष यशवंत दरगोडे, संचालक कचरू आव्हाड, संचालक शरद बोडके, प्राचार्य डॉ. संजय सानप, उपप्राचार्य प्रा. डॉ. सुनील उगले आदींनी अभिनंदन केले आहे.

विद्यार्थ्यांना वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. धीरज झाल्टे, प्रा. वैशाली गांगुर्डे, इतिहास विभागप्रमुख प्रा. पंकजा आहिरे, प्रा. डॉ. महादेव कांबळे, प्रा. राजेंद्र डोईफोडे, प्रा. डॉ. अनिल आहिरे, प्रा. रुपाली सानप, नीलेश महाजन, योगेश बोडके आदींचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रमुख पदाधिकाऱ्यांची पुन्हा होणार बैठक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंडस्ट्रिज ॲण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (निमा) २९ जुलै रोजी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहे. येत्या एक-दोन दिवसात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत एकता पॅनलच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ही १२ जुलै असून त्यापूर्वी सगळ्यांशी चर्चा करून कोअर कमिटीला निर्णय घ्यावा लागणार आहे.

अवघ्या चार दिवसात या निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी 'निमा'मध्ये वाढणार आहे. गेल्या काही दिवसापासून या निवडणुकीत दोन गट पडेल अशी चर्चा होती. पण, निवेक येथे झालेल्या माजी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असले तरी एकाच पदासाठी दोन ते तीन नावे आल्यामुळे त्यातून एकाचे नाव निवडणे पदाधिकाऱ्यांना अवघड जाणार आहे. तसेच अध्यक्षपद मोठ्या उद्योग गटातून असल्यामुळे यातील इच्छुकही बिनविरोध होणार असली तरच आमचे नाव पुढे करा, अशा सूचना करत आहे. त्यामुळे या निवडणुकीत काय घडामोडी होतात, हे महत्त्वाचे आहे.

प्रमुख पदाधिकारी घेणार निर्णय

निवडणुकीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची एक औपचारिक समिती बनविण्यात आली असून ते सर्वांची चर्चा करून निर्णय घेणार आहे. या समितीमध्ये दीपक राठी, दादा पवार, विजय तलवार, मधुकर ब्राह्मणकर, मनीष कोठारी, डी. जी. जोशी, धनजंय बेळे, रमेश वैश्य, तुषार अमृतरकर यांच्यासह 'निमा'चे अध्यक्ष मंगेश पाटणकर, 'आयमा'चे अध्यक्ष वरुण तलवार, चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा तसेच ज्येष्ठ उद्योजक असणार आहे.

अध्यक्षपदासाठी राठीचे नाव चर्चेत

निमा ही २ हजार ९६४ सदस्य असलेली जिल्ह्यातील उद्योजकांची शिखर संस्था आहे. त्यामुळे या निवडणुकीला महत्त्व आहे. तेथे नूतन अध्यक्षांसह सहा पदाधिकारी व ३४ कार्यकारिणी सदस्यांची निवड केली जाणार आहे. या निवडणुकीत मोठ्या उद्योजक गटासाठी अध्यक्षपद राखीव या पदासठी हिरामण आहेर व के. एल. राठी यांच्या नावांची चर्चा आहे.

लोगो : निमा निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images