Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

प्रशासकांची वाढली चिंता

$
0
0

पूर्वानुभव नसल्याने अनुभवी सहकाऱ्यांची हवी मदत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेत रिझर्व्ह बँकेने प्रशासक हटवण्याचा निर्णय घेतला असून ५ जानेवारीच्या आत संचालक मंडळाच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यामुळे माजी संचालक आतापासून प्रचाराला लागले आहे. पण, दुसरीकडे या निवडणुकीच्या पद्धतीबाबत कोणतीच माहिती नसल्याने प्रशासकांची चिंता वाढली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या कामाचा अनुभव असलेल्या प्रशासक जे. बी. भोरीया यांना सहकार क्षेत्रातील निवडणुकीचा अनुभव नसल्याने त्यांच्यासमोर मोठा पेच आहे. त्यामुळे यातील अनुभवी माणसाची मदत त्यांना घ्यावी लागणार आहे. या बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमृता साठे यांना अगोदरच्या कोणत्याही निवडणुकीचा अनुभव नाही.

मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी सहा महिने बाकी असल्यामुळे त्याची तयारी आतापासून करावी लागणार आहे. त्यामुळे त्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी करावी लागणार आहे. गेल्या वेळेस २१ संचालक निवडून आले होते. त्यांचे गटही वेगवेगळे होते. त्यामुळे यासर्वांची माहिती घेऊन या निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे.

निवडणुकीसाठी माजी संचालक मंडळाने वैयक्तिक बैठका घेणे सुरू केले आहे. तर दुसरीकडे प्रमुख मंडळी आठवड्याभरात बागमार परिवाराबरोबर निवडणुकी संदर्भात चर्चा करणार आहे. मर्चंट बँकेचे १ लाख ८० हजार सभासद असून त्यांच्यापर्यंत पोहचणे अवघड आहे. त्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे आतापासून सर्वजण कामाला लागले असले तरी प्रशासकांची तयारी मात्र संथ गतीने सुरू आहे.

लोगो : नामको निवडणूक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शब्द सामर्थ्यातून कविता होते चिरंतन

$
0
0

विनायकदादा पाटील यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यक्त होण्यासाठी प्रत्येकजण वेगवेगळी माध्यमे वापरीत असतात. तन्वी अमित यांनी कविता हे माध्यम निवडले आहे. त्यांच्या कवितेत असलेले शब्द सामर्थ्य हे कविता चिरंतन करण्याचा प्रवास असल्याचे प्रतिपादन वनाधिपती विनायकदादा पाटील यांनी केले.

शब्दमल्हार प्रकाशनाच्या वतीने तन्वी अमित यांच्या 'निष्पर्ण फांदीवरचे पक्षी' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन कुसुमाग्रज स्मारकात रविवारी झाले. यावेळी ते बोलत होते. काही लोक व्यक्त होण्यासाठी बोलतात, काही न बोलता व्यक्त होतात. व्यक्त होणे हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून असते. व्यक्त होण्यासाठी प्रभावी जगता आले पाहीजे. जगणे वेगळे असले की कविता आपोआप जन्माला येते. कवितेत बीज महत्त्वाचे असते जगण समृद्ध करण्यासाठी शब्दांची कसोटी लागते व त्यातूनच कविता जन्माला येते, असेही विनायकदादा पाटील यांनी सांगितले.

यावेळी शब्द मल्हारचे प्रकाशक स्वनंद बेदरकर म्हणाले, की मी काव्य संग्रह प्रकाणित करताना या कविता का लिहितात? याचा शोध घेतला. यांच्या कवितेतून या वेगळे काहीतरी सांगू पाहण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत. यांच्या कवितेत द्रौपदी आहे, राधा आहे तसेच फेसबुक व्हॉट्सअॅपमध्ये रमणारी स्त्री देखील आहे त्यामुळी ही समकालिन कविता वाटते. कवयित्री तन्वी अमित म्हणाल्या, की मी कवितेकडे गेले नाही, कविता माझ्याकडे आली. कविता करण्याचे ठरवले नव्हते. आपोआप सुचत गेली अनेकांना ती वाचून दाखवली त्यातून ती समृद्ध होत गेली. जाई सराफ व पियू शिरवाडकर यांनी सूत्रसंचालन केले.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरीच्या लोखंडी सळ्या हस्तगत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूरजवळील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतून चोरीस गेलेले आणि नाशिक शहरात लपविण्यात आलेले १५ लाख ५७ हजारांचे २७ टन वजनाचे स्टील (लोखंडी सळई) गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने जप्त केले. या प्रकरणी पोलिसांनी अजीज मुख्तार मलिक (वय ४२, रा. धुळे) याला अटक केली आहे.

पाथर्डी रोडवरील ज्ञानेश्‍वरनगर परिसरातून चोरीचे स्टील जप्त करण्यात आले. ही कारवाई शनिवारी (दि.७) सकाळी दहाच्या सुमारास करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट दोनचे उपनिरीक्षक सहारे यांना मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्‍वरनगर येथे अज्ञात व्यक्तीने लोखंडी सळईचा साठा आणला असून, तो विक्री करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे समजले. हा स्टीलचा साठा नागपूर येथील बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतून चोरल्याचे पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी केलेल्या तपासात पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी संशयित विक्रेत्याचा शोध घेतला. त्या वेळी ज्ञानेश्‍वरनगर परिसरातील मैदानावर ठेवलेल्या स्टीलच्या साठ्याजवळ मलिक आला. त्याने स्टील विक्रीचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला अटक केली. त्याचे भंगार दुकान असून, त्याच्याकडून टाटा टिस्कॉन, लोखंडी सळ्या असा मुद्देमाल जप्त केला आहे. सहाय्यक निरीक्षक अभिजित सोनवणे, उपनिरीक्षक रवींद्र सहारे, महेश इंगोले, विजय लोंढे, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र जाधव, हवालदार श्रीराम सपकाळ, रमेश घडोजे, श्यामराव भोसले, गुलाब सोनार, राजाराम वाघ, अन्सार सय्यद, संतोष ठाकूरे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहिता छळ प्रकरणी डॉक्टर पतीवर गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपला शारीरिक आणि मानसिक छळ होत असल्याची तक्रार कल्पिता सुबोध परदेशी (वय २३) यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कल्पिता यांचा पती डॉ. सुबोध गोविंद परदेशी, तसेच नातलग असणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यासह पती, सासू, सासरा आणि नणंदांवर गुन्हा दाखल केला आहे.

सुबोध गोविंद परदेशी, गोविंद पुरलालजी परदेशी, निर्मला गोविंद परदेशी (तिघे रा. गोविंद व्हिला, लेन क्र. ३, कल्पतरूनगर), नणंद दीप्ती महेश देवीकर, महेश देवीकर आणि नणंद प्रीती मयंक पटेल अशी संशयितांची नावे आहेत. सुबोध डॉक्टर असून, तो पोलिस अधिकारी देवीकर यांचा नातेवाईक असल्याची माहिती तपास अधिकारी प्रणिता पवार यांनी दिली. सध्या काठे गल्लीतील साईविहार को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीमध्ये कल्पिता परदेशी राहतात. त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे, की २० जानेवारी २०१७ ते २० ऑक्टोबर २०१७ या कालावधीत सासरी नांदत असताना संशयितांपैकी काहींनी संगनमताने शारीरिक व मानसिक छळ केला. लग्नात आईवडिलांनी चढविलेले सोन्या-चांदीचे दागिने काढून घेऊन अपहार केला आणि आपणास घराबाहेर काढले. विधी आणि सेवा प्राधिकरणाकडून मुंबई नाका पोलिस स्टेशनला मिळालेल्या तक्रारीत देवीकर दाम्पत्याचे नाव नसून, केवळ फिर्यादीच्या पतीचे नाव असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लक्ष्मी ताठे होती गांजाची मुख्य डिलर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गांजा तस्करी प्रकरणात अटक केलेली लक्ष्मीबाई ताठे ही शहरात मुख्य डिलर म्हणून काम करीत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे लक्ष्मीबाईच्या माहेरीदेखील हाच व्यवसाय होता, असे पोलिसांनी सांगितले. गांजा तस्करीप्रकरणी पोलिसांनी अटक केलेली लक्ष्मीबाई ताठे १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत आहे.

शहर पोलिसांच्या क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने बुधवारी (दि. ४) मध्यप्रदेशातील सेंधवा येथून अटक केली. पोलिसांनी शहरात सुरू असलेल्या गांजा तस्करीचा पर्दाफाश केल्यापासून लक्ष्मीबाई फरार होती. युनिट एकने १२ जून रोजी तपोवनात ६८० किलो गांजा पकडला होता. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक आणि क्लिनर असलेल्या यतीन शिंदे आणि सुनील शिंदे यांना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीनुसार पोलिसांनी सिन्नर येथे छापा मारून संतोष गोळेसर यास अटक करीत ३९० किलो गांजा जप्त केला. गुन्ह्याचा सखोल तपास करताना पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातून सुरेश बेलदार आणि सुखदेव पवार (दोघे रा. पारोळा, जि. जळगाव) यांना बेड्या ठोकल्या. एवढेच नव्हे, तर ओदिशा येथून मोठ्या स्वरुपात गांजा पाठविणारा मुख्य सूत्रधार अकबर सदबल खान यालाही जेरबंद केले. १२ जून रोजी गांजा पकडण्यापूर्वी लक्ष्मीबाई आणि ओदिशा राज्यातील मुख्य सूत्रधार अकबर यांचे बोलणे झाले होते. याबाबत युनिट एकचे पोलिस निरीक्षक आनंद वाघ यांनी सांगितले की, ओदिशा राज्यातील अकबर हा मुख्य सूत्रधार असून, तो सध्या फरार असलेल्या दोघा भावांच्या ऑर्डरनुसार गांजा पाठवण्याचे काम करतो. आलेला गांजा जळगाव, सिन्नर येथे उतरविला जात होता. उर्वरित सर्व गांजा लक्ष्मीबाईकडे सपूर्द केला जायचा.

वडीलही याच व्यवसायात

पोलिसांच्या चौकशीत आपण किरकोळ गांजा विक्री करीत असल्याची कबुली लक्ष्मीबाई ताठे हिने दिली आहे. आता पोलिसांनी तपासाला गती दिली असून, गांजा तस्करीची पाळेमुळे खोदून काढू, असे पीआय वाघ यांनी स्पष्ट केले. लक्ष्मीबाईचे वडीलही याच व्यवसायात होते. तिच्या पतीलाही एकदा गांजा तस्करीच्या गुन्ह्यात अटक झाली होती, असे वाघ यांनी स्पष्ट केले. सध्याच्या तपासानुसार लक्ष्मीबाई आणि अकबर यांचे थेट बोलणे होत असल्याचे समोर आले आहे. तपास सुरू असून, यात दोषी आढळून येणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असे वाघ यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलात्कार प्रकरणी जन्मठेपची शिक्षा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मानसिकदृष्ट्या विकलांग असलेल्या अवघ्या साडेआठ वर्षांच्या मुलीला घरात नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या शिवनाथ मोतीराम बोरसे (रा. यशवंतनगर, ता. जि. नाशिक) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी जन्मठेप व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना २३ ऑक्टोबर २०१५ रोजी दसऱ्याच्या दिवशी घडली होती. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुसऱ्या ठिकाणी राहणाऱ्या पीडित मुलीस आरोपी शिवनाथ बोरसे हा यशवंतनगरमधील स्वत:च्या घरात घेऊन गेला होता. न्यायाधीश घोडके यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता. यामध्ये सरकारी वकील विनयराज तळेकर व सुप्रिया गोरे यांनी दहा साक्षीदार तपासले. खटल्यात वैद्यकीय अधिकारी व पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. कोर्टासमोर आलेले साक्षीदार व पुराव्यानुसार आरोपी बोरसे यास दोषी ठरविण्यात आले. न्यायाधीशांनी आरोपीस जन्मठेप तसेच २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजचोरीत एक वर्षाची शिक्षा अन् ३२ लाखांचा दंड

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आइस्क्रीम फॅक्टरीसाठी असलेल्या वीजमीटरमध्ये काही तरी केमिकल टाकून त्याचा ९९ टक्के वेग कमी करणाऱ्यास जिल्हा कोर्टाने दोषी ठरवत एक वर्षाची कैद, तर तब्बल ३२ लाखांचा दंड ठोठावला आहे. २०१५ मध्ये उघडकीस आलेल्या या गुन्ह्याचा खटला जिल्हा व सत्र न्यायाधीश एच. टी. पांडे यांच्या कोर्टात सुरू होता.

श्यामलाल जगदीशचंद्र शर्मा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. शर्माची पंचवटीत सावरिया आइस्क्रीम नावाची फॅक्टरी होती. यासाठी घेतलेल्या वीज मीटरमध्ये काही तरी केमिकल टाकून फेरफार करण्यात आला. यामुळे वीजमीटरची गती ९९ टक्के कमी झाली होती. २०१५ मध्ये वीज महामंडळाच्या भरारी पथकाने शर्माच्या फॅक्टरीवर छापा मारला असता, ही बाब उघडकीस झाली. शर्माविरोधात नाशिकरोड येथील वीज महामंडळासाठी असलेल्या विशेष पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायाधीश पांडे यांच्या कोर्टात सुनावणी सुरू झाली. बचाव पक्षाने याबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचा मुद्दा मांडला. मात्र, भरारी पथकातील दोन इंजिनीअर, तसेच फिर्यादी आणि तपासाधिकारी अशा चार जणांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकारी पक्षातर्फे अॅड. योगेश कापसे यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षाने सादर केलेले साक्षी-पुरावे ग्राह्य धरत कोर्टाने शर्माला दोषी ठरवले व एक वर्षाची कैद आणि तब्बल ३२ लाख रुपयांचा दंड ठोठावला. काही महिन्यांपूर्वी गृह विभागाने राज्यातील असे १४ पोलिस स्टेशन बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात नाशिकरोड येथील पोलिस स्टेशनचा समावेश होता. हे पोलिस स्टेशन बंद झाल्यानंतर एक मोठा निकाल आल्याची भावना व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांनी बाजारात केली जनजागृती

$
0
0

सिन्नर : धुळे येथील घटनेनंतर सिन्नर पोलिसांनी पत्रके वाटून जनजागृती केली. मुले पळविणारी टोळी समजून काही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी रविवारी बाजारात पत्रके वाटण्यात आली. या प्रसंगी सिन्नर पोलिस स्टेशनचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संगीता गिरी, सहाय्यक निरीक्षक मोकळ, सहाय्यक उपनिरीक्षक गणेश परदेशी, हवालदार सचिन गवळी, राहुल निरगुडे आदींनी जनजागृती केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक बहुतांची अंतरे

$
0
0

बहुतांची अंतरे नाशिक

००००००००००

अन्यथा 'ब्रेन ड्रेन' अटळ!

'संशोधकांना ब्रिटनकडून पायघड्या' (मटा - ८ जुलै) ही बातमी वाचली. देशाच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवून आणण्याची व प्रगती आलेख उंचावण्याची क्षमता केवळ संशोधनात आहे. म्हणूनच योग्य सोयीसुविधा व संधी देत पोषक वातावरण निर्माण करून देत जगभरातील संशोधकांच्या ज्ञानाचा आपल्यासाठी फायदा करून घेणे प्रगत देशांना महत्त्वाचे वाटते. प्रगत देश व अप्रगत किंवा प्रगतीशील देश यामध्ये हाच फरक आहे. प्रगतीशील देशात याविषयीचे दिलासादायक चित्र नाही. मूलभूत विज्ञान संशोधन क्षेत्राचे खच्चीकरण, निधीकपात यासारख्या मुद्द्यांमुळे संशोधकांना हक्कासाठी रस्त्यावर उतरावे लागते, तर दुसरीकडे उच्चपदस्थ राजकारणी दुराभिमान, छद्मविज्ञानाला बळ देत भूतकाळातील आपल्या तथाकथित कर्तृत्वाचे व गतवैभवाचे सातत्याने अवास्तव गोडवे गात असतात. समाजजीवनातील वैज्ञानिक दृष्टीकोन व शोधकतेचा अभाव, परंपरांचा दुराभिमान व त्यातून निर्माण होणाऱ्या वाढत्या अंधश्रद्धा ही या परिस्थितीस बळ देणारी कारणे ठरतात. भारतीय वैज्ञानिक परदेशात जाऊन कर्तृत्व गाजवतात हे खरेच; मात्र त्यांच्यासाठी आपल्याकडेही संशोधनात्मक पोषक वातावरण निर्माण होईल की नाही, हा खरा प्रश्न आहे. अन्यथा 'ब्रेन ड्रेन' होणे अटळ आहे.

- राजेंद्र फेगडे, नाशिकरोड

उदत्तीकरण कशासाठी?

देशद्रोहाचे आरोप असलेला, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तुरुंगवारी करून आलेल्या, कधी काळी आकंठ व्यसनात बुडालेल्या, ज्या विविध उद्योगांमुळे आई, वडील, पत्नी, बहीण अशा सगळ्यांना प्रचंड यातना देणाऱ्या परंतु, सिनेसृष्टीत दबदबा असलेल्या अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित संजू चित्रपट बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्या पुढे व्यवसाय करीत आहे. यात अभिनेता रणबीर कपूरने संजूबाबाची भूमिका छान केली. परेश रावल यांनी सुनील दत्त तर मनीषा कोईरालाने नर्गिस दत्त यांच्या भूमिकेला न्याय दिला, अशा कौतुकाच्या बातम्याही झळकत आहे. मुळात आजच्या तरुणाईपुढे असा कोणता मोठा आदर्श या चित्रपटाने ठेवला आहे? आपला जीवनपट आहे तसा प्रेक्षकांसमोर मांडल्याचा ढोल बडविला तरी त्यातील भंपकपणा लपून राहणार नाही. चित्रपटात फक्त रायफलचा उल्लेख करणारा संजूबाबा सहा हॅण्डग्रेनेडबाबत सोयिस्कर मौन का बाळगतो? जोशमध्ये आणि चुकीच्या लोकांना साथ देत मुंबईमधील साखळी बॉम्बस्फोटातील कटाचा आपणही भाग होतो, हे लपविण्यामागील उद्देश काय? संजय दत्त यातून बाहेर काढण्यासाठी बड्या बड्यांनी मदत केल्याचेही कोणीही नाकारू शकत नाही. आश्चर्य तर भारतीय प्रेक्षकांचे वाटते. कोणतेही समाजभान न जपणारा, व्यसनाधीन व गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या या चित्रपटासाठी त्यांनी केलेली गर्दी व्यथित करणारी आहे.

- सुदर्शन गांगुर्डे, सिडको, नाशिक

गरज स्वयंशिस्तीची

तंत्रज्ञान जेवढे प्रगत होत आहे तसेच जग जवळ येऊ लागले आहे. पण यात माणूस एकमेकांपासून वेगाने दूर होत आहे. लहान मुलांपासून अगदी वयोवृद्ध माणसे सोशल मीडियाच्या (व्हॉट्सअॅप / फेसबुक) रोगाने झपाटली गेली आहेत. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे आपल्या खासगी आयुष्यात कोणीही डोकवणं असमर्थनीय आहे. शेवटी तंत्रज्ञान आपल्यासाठी विकसित केले आहे, याचा वापर आपण काळजीपूर्वक करायचा, की तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आपले जीवनातील सर्व पत्ते उघडे करायचे, हे आपणच ठरवायला हवे. कुठे तरी बंधन, स्वयं शिस्त घालणे आवश्यक आहे.

- अमित मानवी, इंदिरानगर, नाशिक

निरर्थकतेसाठी वापर नको

शासकीय पातळीवर उपाय म्हणजे पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर व्हॉट्सअॅप, फेसबुकवरील अनेक वादग्रस्त मेसेज, बनावट व्हिडिओ, बदनामीकारक मजकुराचे प्रमाण व्हायरल होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सोशल मीडियाचा वापर नेमका कशासाठी करावा याचा विसर पडून राजकरण व निरर्थक वादविवादासाठी ही माध्यमे वापरली जात आहेत. त्यात सातत्याने वाढही होत आहे. आता तरी याचा उपयोग सद्विचारांचा प्रसार, कालसुसंगत विचार व चांगल्या उपक्रमांना बळ देण्यासाठी व्हावा, एवढीच अपेक्षा!

- उमा काळे, सातपूर कॉलनी, नाशिक

कट प्रॉक्टिसला हवा लगाम

आपल्याकडे देवानंतर डॉक्टरवर विश्वास ठेवला जातो. मात्र, गेल्या काही वर्षात वैद्यकीय क्षेत्रात व्यावसायिकतेचा मोठ्या प्रमाणात शिरकाव झाला आहे. पेशंटच्या भीतीचा फायदा घेऊन गरज नसलेल्या वेगवेगळ्या टेस्ट करून अक्षरशः लूट केली जाते. यात पेशंटच्या आर्थिक परिस्थिती, मनाची स्थिती याचाही विचार केला जात नाही. पूर्वी 'फॅमिली डॉक्टर' ही संकल्पना होती; ती आता संपुष्टातच आली आहे. अगदी साध्या दुखण्यासाठी जरी दवाखान्यात गेले तरी आर्थिक पिळवणूक केली जाते. सर्व रिपोर्ट 'नॉर्मल' आले या आनंदात पेशंट हॉस्पिटलबाहेर पडतो. पण एवढ्या टेस्टची खरोखरच गरज होती का? याचे उत्तर कोणी देत नाही. अर्थात, यात काही अपवादही आहेच. तसेच अनेक डॉक्टर्स जनरिक औषधे लिहून देण्याबाबत रस दाखवितात का? विशिष्ट मेडिकलमधूनच औषधे घेण्याचा आग्रह कशासाठी? म्हणून या कट प्रॉक्टिसला लगाम घालणे आवश्यक आहे.

- प्रशांत कुलकर्णी, मनमाड

दिसू द्या कायदाचा धाक!

सोशल मीडियांवरील एक संदेश समाजमनाची माथी भडकाविण्यासाठी किती घातक ठरू शकतो, हे धुळे, नागपूरमधील ताज्या घटनांवरून दिसून आले आहे. 'वरातीमागून घोडे', या उक्तीप्रमाणे पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरू केली. सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत दिली. मात्र, पोलिसांनी गुन्हेगारांचा जलद शोध घ्यावा, त्याच्यावर गुन्हे दाखल केल्यानंतर तपास कार्यात राजकारणाचा शिरकाव होऊ नये. नागरिकांनीही सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. जमावाने या पाच जणांना मरेपर्यंत मरून टाकले आणि कायदा हातात घेऊन काय मिळवले? खरे तर नागरिकांनी सोशल मीडियावर असा मजकूर टाकू नये. मजकुरांच्या विश्वासार्हतेबाबत खातरजमा करावी. या प्रकरणी सखोल चौकशी करून प्रत्येक दोषींवर कारवाई करण्यात यावी. या घटनेतील प्रत्यक्ष साक्षीदारांना पोलिस संरक्षण द्यावे. शहरातील विविध भागातील भिक्षेकऱ्यांनी धसका घेऊन वस्त्या हलविल्या आहे. वासुदेव व्यवसाय करणाऱ्यांनी करायचे काय? भटक्या कुटुंबांनी कशाचा आधार शोधावा? यावर कायद्याने आपल्या कृतीतून दोषींना जलद कठोर शिक्षा करावी.

- नानासाहेब मंडलिक, ओझर, निफाड

..

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोहल्यावर चढण्यापूर्वी काळाने घातली झडप

$
0
0

रेल्वेगाडीच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील संसरी गावातील तरुणाचा रुळ ओलांडत असताना अदांज न आल्याने रेल्वेगाडीचा धक्का लागून मृत्यू झाला. त्याचा पुढच्या रविवारी (दि. १५) विवाह होणार होता. मात्र, विवाहापूर्वीच त्याचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नीलेश अशोक गिते (वय २७) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. नेहमीप्रमाणे रविवारी पहाटे तो भाजीपाला खरेदी करण्यासाठी देवलाली कॅम्पकडे येत होता. परंतु रुळ ओलांडत असताना त्याला गाडीचा अदांज आला नाही. रेल्वे गाडीचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झला. नीलेशचा येत्या रविवारी (दि. १५) विवाह होणार होता. घरात एकीकडे त्याच्या विवाहाची लगबग सुरू होती; मात्र काळाने बोहल्यावर चढण्याआधीच हिरावून घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मनमिळावू स्वभावाचा नीलेश हा ज्येष्ठ शिवसैनिक रमेश गिते यांचा पुतण्या होता. दरम्यान, या प्रकरणी रेल्वे पोलिस डायरीमध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ टक्केच कर्जवाटप!

$
0
0

खरीप कर्जवाटपासाठी बँकांपुढे अडचणी

- जुलैपर्यंत लक्षांक पूर्ण करण्याचा प्रयत्न

- पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रस्ताव अल्प प्रमाणात

- पीककर्जासाठी बँकांचे २६२५ कोटी ७० लाखांचे लक्षांक

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

खरीप हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला असला तरी पीक कर्जवाटप संथगतीने सुरू असल्याची माहिती समोर आल्यानंतर सरकारी पातळीवर याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. खरीप पिकाच्या लक्षांकाच्या जवळपास कर्जवाटप व्हावे, यासाठी आता प्रयत्न सुरू झाले आहेत. सोमवारी यासाठी जिल्हाधिकारी यांनी लीड बँकेची बैठक बोलावली आहे. दुसरीकडे जुलैपर्यंत खरीप हंगामाचे पीक कर्जवाटप व्हावे, यासाठी बँक अधिकारी कामाला लागले आहेत. पण, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रस्ताव अल्प प्रमाणात आल्यामुळे बँकांची अडचण वाढली आहे.

पीककर्जासाठी बँकांनी २६२५ कोटी ७० लाखांचे लक्षांक ठेवले असतांना प्रत्यक्षात २७ टक्केच वाटप झाले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँक याअगोदर सर्वाधिक पीककर्ज देत होती. पण, बँक अडचणीत असल्यामुळे या बँकेकडून कर्जवाटपाचे प्रमाण कमी झाल्यामुळे राष्ट्रीयीकृत बँक व खासगी बँकेकडे कर्जवाटपाची मोठी जबाबदारी आहे. त्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीच्या सचिवांनी या बँकांना पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे प्रस्ताव पाठवणे अपेक्षित आहे. पण, या सोसायटींनी याद्याच न पाठवल्यामुळे बँकेला कर्जदार शोधणे अवघड झाले आहे. त्यात संपर्क नंबर व पत्ता नसल्यामुळे बँक या शेतकऱ्यांशी संपर्क साधू शकत नाही. त्याचप्रमाणे काही बँकांनी लाभार्थी शेतकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रस्ताव पाठविण्याचे सांगितले आहे.

या खासगी व राष्ट्रीयीकृत बँकेत शेतकरी खातेदार नसणे ही सुध्दा अडचण झाली आहे. प्रस्ताव आल्यानंतर खाते उघडणे व त्यानंतर कर्जाच्या प्रस्ताव मंजूर होत असल्यामुळे यातही वेळ जात असल्याचे बोलले जाते. एकीकडे कर्ज नाही, तर दुसरीकडे पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६ लाख ५२ हजार ५५७ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख ७६ हजार ९२८ हेक्टरवर पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी २७.११ टक्के आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटही पावसामुळे निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे कपात बँकेला महागात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

क्यूआयएसनुसार स्टॉक स्टेटमेंट न दिल्यामुळे खात्यातून ८ लाख ८१ हजार रुपये कापून घेणे बँक ऑफ बडोदाला महागात पडले आहे. ग्राहक न्यायमंचाने हे पैसे खातेदाराला परत करण्याबरोबरच ९ टक्के व्याज देण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे शारीरिक श्रम व मानसिक त्रासापोटी ७ हजार व अर्जाचा खर्च तीन हजार असा १० हजारांचा दंडही ठोठावला आहे.

नाशिकरोड येथील जमुना इन्फ्रा. प्रोजेक्टतर्फे राजेश मावजी पटेल यांनी पिंपळगाव बहुला येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेविरूद्ध तक्रार दिल्यानंतर हा निकाल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने दिला आहे. पटेल यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बँकेकडून कॅश क्रेडिट फॅसिलिटी घेतली होती. त्यामुळे खात्याच्या नियमांचे नेहमी पालन केले. दर महिन्याला मुदतीत स्टॉक स्टेटमेंट दिले. पण, २७ जून २०१६ ला बँकेने कोणतीही पूर्वसूचना न देता व विना परवानगी त्यांच्या खात्यातून ८ लाख ८१ हजार रुपयांची रक्कम क्यूआयएस स्टेटमेंट न दिल्यामुळे बेकायदेशीररीत्या कापून घेतली. बँकेकडे याबाबत विचारणा केल्यानंतर त्यांनी अगोदर मेल पाठवल्याचे म्हटले आहे. पण, या मेलमध्ये स्टेटमेंट किती दिवसांत दाखल करायचे हे कळविले नव्हते. अटी व शर्तीत स्टेटमेंट देणे ही बाब नसतानाही पैसे कापून घेतले. त्यानंतर मागणी करूनदेखील ते परत जमा केले नाहीत.

या तक्रारीवर बँक ऑफ बडोदाने आपली बाजू मांडताना सांगितले की, जमुना इन्फ्रा प्रोजेक्टला २०१० साली कॅश क्रेडिट कर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा वेगळे कर्ज २०१५ मध्ये देण्यात आले. कर्ज मंजुरीच्या अटींमध्ये दर तिमाही व सहामाही क्यूआयएसनुसार स्टॉक स्टेटमेंट देणे बंधनकारक आहे. ते न दिल्यास दोन टक्के पीनल इंटरेस्ट देण्याची अट आहे. पण, अट न पाळल्यामुळे रक्कम योग्य रीत्या कापण्यात आली.

या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायमंचाने कर्ज करारनाम्यात पीनल इंटरेस्टची अट खरोखर होती, असे गृहीत धरले तरी त्यांचे उल्लंघन झाले आहे. याची सूचना व तसे स्टेटमेंट तक्रारदारांनी पहिल्या तिमाहीत दिले नाही. याबाबतची नोटीस बँकेने द्यायला हवी होती. केवळ एक दिवस अगोदर ई-मेलवर नोटीस पाठवून घाईघाईने पैसे वजा करून घेणे ही सेवेतील कमतरता नव्हे तर अनिष्ठ व्यापारी प्रथादेखील आहे. त्यामुळे बँकेने खात्यातून वजावट केलेली ८ लाख ८१ हजार रक्कम परत करावी, असे आदेश दिले. त्याचबरोबर १० हजारांचा दंडही ठोठावला. हा निर्णय न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे व सदस्य सचिन शिंपी यांनी दिला. तक्रारदाराकडून अॅड. एस. एम. दायमा यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नवजात शिशूंचे मृत्यू रोखण्यात यश

$
0
0

महाराष्ट्र देशात तिसऱ्या स्थानी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-नवजात शिशूंचे मृत्यू रोखण्यात राज्य सरकारला थोडे यश मिळाले आहे. आशा कर्मचाऱ्यांच्या मदतीने राबविण्यात येत असलेल्या विविध कार्यक्रमांमुळे महाराष्ट्राचा क्रमांक चौथ्यावरून तिसऱ्यावर आला आहे. यामुळे प्रसूत होणाऱ्या मातांसह नवजात शिशूंची सुरक्षा वाढली असल्याचे दिसून येत आहे.

केंद्र सरकारने २०१२ मध्ये राज्य सरकारला नवजात शिशूंच्या मृत्यूबाबत कडक उपाययोजना कराव्यात असे आदेशित केले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने कडक पावले उचलली असून, २०१७-१८ च्या केलेल्या पाहणीत नवजात शिशूंचे मृत्यू रोखण्यात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावरून तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. बालकांच्या वाढत्या मृत्यूप्रकरणी केंद्र सरकारने नवजात कृती आराखडा तयार केला असून, त्यानुसार राज्य सरकाराला मृत्यू रोखण्याचे आदेश देण्यात आले. सर्वात जास्त नवजात शिशूंचे मृत्यू इशान्य भारतात होत असून, त्या खालोखाल मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, राजस्थान, उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. शंभरपैकी ३० नवजात शिशू या ठिकाणी मृत्युमुखी पडत असल्याचा अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झाला आहे. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, गुजराथ, हरियाणा, हिमाचल, जम्मू काश्मीर, झारखंड या राज्यांमध्ये शंभर पैकी २६ नवजात शिशूंच्या मृत्यूचे प्रमाण आहे. कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये २१ इतके, तर महाराष्ट्रात हाच आकडा खाली आला असून, शंभरपैकी १६ बालकांचे मृत्यू होत असल्याचे अहवालात प्रसिध्द करण्यात आले आहे. पंजाब आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्याची स्थिती सारखीच आहे. त्या खालोखाल तामिळनाडू राज्याची स्थिती आहे. या राज्यात शंभरपैकी ११ बालके दगावत असल्याचे लक्षात आले आहे. मात्र केरळमध्ये सर्वात कमी शंभरपैकी १० नवजात शिशूंचे मृत्यू होत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. केंद्राने आदेश दिल्यानंतर महाराष्ट्राने नवजात शिशूंच्या अॅक्शनप्लॅनची कडक अंमलबजावणी केली आहे. यासाठी प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान राबविण्यात आले. त्याचप्रमाणे गर्भधारणा झाल्यापासून ते बाळाच्या वयाच्या एक हजार दिवसांपर्यंत ट्रॅकिंग करण्यात येत आहे. जननी शिशू सुरक्षा कार्यक्रमांतर्गंत गर्भवती मातांना पोषण आहार व वैद्यकीय मार्गदर्शन दिले जात आहे.

आशांचे कार्य मोलाचे

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांची व्यवस्था नव्हती. त्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात आली. आशासेविकांना गृहभेटी सक्तीचे करून माता आणि बालक यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येत आहे. आजही काही गावांमध्ये घरातच प्रसूती करण्याची प्रथा आहे. यावेळी प्रसूती करताना घरातील साधने वापरल्याने जंतुसंसर्ग होऊन बाळ दगावण्याचे प्रमाण जास्त होत. अशा गावांमधील नागरिकांचे परिवर्तन करून सुसज्ज असे ऑपरेशन थिएटर तयार करण्यात आले आहे. युनिसेफने प्रसिध्द केलेल्या अहवालात ही माहिती प्रसिध्द करण्यात आली आहे.

जालना जिल्ह्यात लहान मुलींच्या विवाहाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे येथे जन्माला येणारी बाळं ही कमी वजनाची भरत होती. आज आपण तिसऱ्या क्रमांकावर असलो तरीही येत्या काही दिवसांत पहिल्या क्रमांकावर पोहचू यात शंका नाही. सरकारी पातळीवरदेखील चांगले प्रयत्न होत आहेत. उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे.

- अलका गाडगीळ, प्रोजेक्ट लिडर, चरखा-युनिसेफ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्लोजिम इंडियाची साडेपंचवीस लाखांना फसवणूक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कॅनडा कॉर्नर येथील ग्लोजिम इंडिया प्रा. लि. कंपनीची तब्बल २५ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत राजेश शंकरराव गिरमे (वय ५९, रा. गुरुव्हिला डाइन, दातेनगर) यांनी फिर्याद दिली आहे.

गिरमे यांच्या फिर्यादीनुसार, कॅनडा कॉर्नरवरील ग्लोजिम इंडिया या कंपनीसाठी जिमचे साहित्य खरेदी करायचे होते. त्यानुसार संबंधित कंपनीने संजय राव (रा. १०९ बी, साथीबाई कॉटेज, वरळी, मुंबई) याच्याशी संपर्क साधला होता. ग्लोजिमने या व्यवहारापोटी संजय राव याला चेक आणि आरटीजीएसद्वारे २५ लाख ६० हजार रुपये अदा केले. मात्र, या जिमचे साहित्य राव याने पाठविलेच नाही. साहित्य मिळत नसल्याने गिरमे यांनी पैशांसाठी पाठपुरावा सुरू केला असता, त्यालाही संशयित रावने प्रतिसाद दिला नाही. ही घटना १ फेब्रुवारी २०१४ ते १९ जुलै २०१५ या काळात घडली. सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेळके तपास करीत आहेत.

हातातील मोबाइल खेचून दुचाकीस्वारांची धूम

रस्त्याने मोबाइलवर बोलत पायी जात असलेल्या व्यक्तीच्या हातातील मोबाइल हिसकावून दुचाकीस्वार चोरट्यांनी धूम ठोकली. ही घटना जेहान सर्कलकडून नरसिंहनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर घडली.

अमोल मधुकर पनके (वय ५३, रा. १०, प्रतिबिंब अपार्ट., मते नर्सरी रोड, सावरकरनगर) यांनी फिर्याद दिली आहे. सहा जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास पनके घराकडे पायी निघाले होते. जेहान सर्कलकडून नरसिंहनगरकडे जाणाऱ्या रोडवरील योगेश इलेक्ट्रॉनिक्स दुकानासमोर चोरट्यांनी संधी साधली. दुचाकीवर आलेल्या दोन भामट्यांनी पनके यांच्या हातातील तीन हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बागूल तपास करीत आहेत.

घंटा चोरण्याचा प्रयत्न

मंदिरातील घंटा चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी एकाला अटक केली. योगेश उर्फ मयुरेश क्षत्रिय (वय २४, रा. प्रियदर्शन सोसायटी, फ्लॅट क्रमांक ७, अमृतधाम, आडगाव) असे संशयिताचे नाव आहे.

या प्रकरणी राहुल रामकिसन चव्हाण (रा. शुभवास्तू अपार्ट. बनकर चौक) यांनी फिर्याद दिली आहे. जाकीर हुसेन हॉस्पिटल परिसरातील शिवनेरी झोपडपट्टी परिसरातील शितळादेवी पाथरीवाली मंदिरात शनिवारी (दि. ७) सकाळी ९ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. मंदिरातील पितळेची घंटा योगेश काढत असल्याची बाब नागरिकांच्या लक्षात आली. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. भद्रकाली पोलिसांनी या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल केला असून, हवालदार एस. एल. सातपुते तपास करीत आहेत.

जुगारींना अटक

भगतसिंग झोपडपट्टीत मोकळ्या जागी जुगार खेळणाऱ्या सहा जणांना इंदिरानगर पोलिसांनी अटक केली. संशयितांकडून जुगाराचे साहित्य, तसेच रोकड हस्तगत करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (दि. ७) दुपारी साडेचारच्या सुमारास करण्यात आली. महंमद हनित लतीफ (वय ५३, रा. इंदिरा गांधी वसाहत), अनिरुद्ध मसूकर (५२, रा. शारदा शाळेसमोरील पटांगण), निंबा जाधव (६५, रा. प्रताप चौक, सिडको), तुकाराम जाधव (५६, रा. राजीवनगर झोपडपट्टी), रावसाहेब कांबळे (६७, रा. इंदिरा गांधी वसाहत) आणि भीमराव धरंतर (रा. हरीश शर्मा खडी क्रशरसमोरील झोपडी) अशी या संशयितांची नावे आहेत. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमधील कर्मचाऱ्याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार निकम तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेशिस्तीला टोईंगची मात्रा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जानेवारी ते जून या सहा महिन्यांमध्ये शहरात २३ हजार ७४ वाहनांना टोईंग करण्यात आले. याद्वारे ४६ लाख ३० हजार ९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, याशिवाय तीन हजार ७२ वाहनचालकांनी सात लाख ५० हजार १०० रुपयांचा दंड कार्डद्वारे जमा केला. सरासरी महिन्याकाठी चार वाहनांना टोईंग केले जात आहे. मात्र, तरीही शहरात अजूनही वाहतूक शिस्त निर्माण होण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

बेशिस्त पार्किंगची तीव्रता कमी करण्यासाठी शहर पोलिसांनी टोईंग व्हॅन सिस्टिम अद्यावत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नियुक्त झालेल्या ठेकेदाराने कामही सुरू केले. यावर्षी फक्त टोईंग झालेल्या वाहनमालकांनी ५३ लाख ८१ हजार रुपयांचा दंड जमा केला. यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. याशिवाय तीन हजार ७२ वाहनचालकांनी सात लाख ५० हजार १०० रुपयांचा दंड क्रेडिट अथवा डेबिट कार्डच्या माध्यमातून जमा केला. मोटार व्हेइकल अॅक्टमधील तरतुदींनुसार टोईंग केलेल्या दुचाकीसाठी २९९ तर चार चाकी वाहनांसाठी ६४० रुपये दंड आकारला जातो. दुचाकीच्या एकूण दंडापोटी २०० रुपये वाहतूक शाखेस तर ९९ रुपये संबंधित ठेकेदाराकडे जातात. तेच चारचाकी वाहन जमा करण्यात आले तर २०० रुपये वाहतूक शाखेला तर ४४० रुपये ठेकेदारला मिळतात. ही प्रक्रिया सुरळीत वाटत असली तरी टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांबाबत ओरडही होते आहे.

मुख्य भागातच कारवाई

काही दिवसांपूर्वी थत्तेनगरमधील एचडीएफसी बँकेसमोर टोईंग कर्मचाऱ्यांनी एका कारचालकास मारहाण केल्याचे सांगितले जाते. टोईंग व्हॅनवरील सीसीटीव्हीही कार्यरत नसल्याची चर्चा असून, जुने पोलिस आयुक्तालयातील वाहतूक शाखेच्या कार्यालयापासून अगदीच जवळच्या ठिकाणावरील चार चाकी वाहने सातत्याने टोईंग करण्याकडे कर्मचारी लक्ष देतात, असा आरोप सर्वसामान्याकडून होतो आहे. जागेची आणि वाहनांची उपलब्धता नसल्याने शहराचा मुख्य भाग वगळता इतर ठिकाणी कोठेही टोईंग होत नाही.

वाहतूक विभागाची कामगिरी

महिना...........केसेस.................वसूल दंड (रुपयांमध्ये)

जानेवारी...........१,५९२...........३, २४, ३००

फेब्रुवारी...........३,४९४...........६,९९,४००

मार्च...............५,५६४...........११,१५,२००

एप्रिल.............४,८२०.............९,६९,५००

मे..................४,१८७.............८,३९,१००

जून................३,४१७.............६,८३,४००

एकूण.............२३,०७४.............४६,३०,९००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुख्यालयातील रस्त्याबाबत उद्या अंतिम सुनावणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिस मुख्यालयातील रस्त्याबाबत मुंबई हायकोर्ट मंगळवारी (दि. १०) अंतिम निर्णय देणार आहे. या निर्णयाकडे पोलिस, कोर्ट प्रशासनासह वकिलांचे लक्ष लागले आहे. मागील तीन ते चार महिन्यांपासून याबाबत हायकोर्टात सतत सुनावणी होत राहिली.

पोलिस मुख्यालयाची अडीच एकर जागा मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने जिल्हा कोर्टाला हस्तांतरित करण्यात आली. पोलिस मुख्यालयात एक मुख्य रस्ता असून, जिल्हा कोर्टाच्या लगतपासून या रस्त्यापर्यंतची जागा हस्तांतरीत करण्यात आली आहे. सदर जागेचा ताबा मिळाल्यानंतर पोलिस मुख्यालयातील रस्ता कोर्टासाठी देण्याची मागणी पुढे करण्यात आली. त्यानुसार हायकोर्टात दावा करण्यात आला. पहिल्या प्रकरणात ठेच लागलेल्या पोलिस प्रशासनाने यावेळी मात्र कंबर कसली. सीबीएस येथील रस्त्याचे सुरू असलेले काम आणि इतर काही कारणांमुळे पोलिस मुख्यालयातील रस्ता मिळण्याबाबत वकील आग्रही राहिले. मात्र, पोलिस मुख्यालयातील रस्ता सार्वजनिक नसून, या रस्त्याची महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच नगररचना विभागाकडे नोंदच नसल्याचा मुद्दा पोलिस प्रशासनाने हायकोर्टात उपस्थित केला. तसेच जिल्हा कोर्टासमोरील रस्ता बंद नसून, त्यावर दररोज शेकडो वाहने प्रवास करीत असल्याचे पुरावे पोलिस प्रशासनाने हायकोर्टात दाखल केले. पोलिस मुख्यालयातील रस्त्याबाबत माजी पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच येथे वास्तव्यास असलेले पोलिस कुटुंबही एकत्र येण्यास सुरुवात झाली आहे. जवळपास तीन महिन्यांच्या रस्सीखेचानंतर मुंबई हायकोर्ट आपला निर्णय १० जुलै रोजी सुनावणार आहे. या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलिस मुख्यालयातील मैदान महत्त्वाचे असून, उर्वरीत जागेत वेगवेगळी कार्यालये, तसेच पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांच्या कामासदेखील मंजुरी मिळाली असून, पुढील ५० वर्षांचा विचार करता ही जागा अपुरी पडणार आहे. सिंहस्थ कुंभमेळा तसेच पोलिस भरतीसारख्या मोठ्या इव्हेंटचे नियोजन अगदीच कमी जागेत कसे पार पडणार, असा प्रश्नही पोलिस प्रशासनाला सतावत असल्याने पोलिसांनी ही भूमिका घेतल्याचे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राईनपाडा घटनेतील मुख्य संशयित अटकेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

साक्री तालुक्यातील राईनपाडा गावातील सामूहिक हत्याकांडाच्या घटनेत जमावाला चिथावणी देण्यासह पाचही जणांवर मरेपर्यंत वार करणारा मुख्य संशयित आरोपी दशरथ काळग्या पिंपळसे (वय ३५) याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला अखेर यश आले आहे. हे पथक दोन दिवसांपासून वार्सा येथील कळंबबारी जंगलात तळ ठोकून होते. सुमारे ७ किलोमीटरचा परिसर पायी फिरून पोलिसांनी त्याला शोधून काढत अटक केली.

राईनपाडा या गावात दि. १ जुलै रोजी आठवडे बाजाराच्या दिवशी डवरी गोसावी समाजातील पाच भिक्षुकांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. या अमानूष घटनेनंतर ग्रामस्थ गाव सोडून पसार झाले आहेत. अद्यापही गावात तणावपूर्ण शांतता आहे. रविवारी या घटनेला आठ दिवस उलटले असून, रविवारचा आठवडे बाजार असूनही राईनपाड्यात व्यापाऱ्यांनी पाठ फिरविल्याने बाजार भरला नव्हता. त्यामुळे परिसरात अद्यापही भीतीचे वातावरण असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. हत्याकांडाच्या व्हिडीओ क्लीपवरून मारेकऱ्यांची ओळख पटवून त्यांचा शोध घेतला जात आहे. मुख्य संशयितांपैकी महारू वंक्या पवार व हिरालाल उर्फ ढवळू आत्माराम गवळी या दोघांना नुकतीच अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या तपासातून या सामूहिक हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार दशरथ काळग्या पिंपळसे (३५, रा. राईनपाडा ता. साक्री) याचे नाव समोर आले असून, त्याने चिथावणी दिल्यानेच जमाव प्रक्षुब्ध झाला होता. तर घटनेच्या वेळी पांढऱ्या रंगाचा शर्ट घातलेला दशरथ हा निर्दयीपणे पाचही जणांवर वार करीत असल्याचे क्लीपमध्ये दिसत आहे.

वार्सा गावाजवळ असलेल्या कळंबा गावात त्याची सासरवाडी आहे. त्यामुळे पोलिसांनी कळंबा येथे पाळत ठेवली होती. तो पिंपळनेर-नवापूर रोडवरील कळंबबारी जंगलात दडून बसल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेचे पथक दोन दिवसांपासून जंगलात थांबून होते. अखेर पोलिसांनी रविवारी सकाळी दशरथला ताब्यात घेतले. त्यानंतर अटकेची कार्यवाही सुरु करण्यात आली होती. वैद्यकीय तपासणीसह इतर कामकाज उशिरापर्यंत सुरू होते. आज त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अपर पोलिस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून गुलाब रामा पाडवी ( ५५, चौपाडा) यालाही अटक रविवारी उशिरा अटक करण्यात आली. या संशयिताने व्हिडीओमध्ये पांढरी टोपी आणि खांद्यावर रुमाल घेतल्याचेही पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा उद्योग थांबवावा

$
0
0

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांचा खासदार राजू शेट्टींवर निशाणा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

आपल्या अस्तित्व टिकवण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा उद्योग थांबवा, अशी सूचना वजा टीका महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी जळगाव दौऱ्यावर असताना केली.

आपण जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी भांडत असतो, त्यावेळी शेतकऱ्यांसोबत सामान्यांचेही नुकसान करीत असतो, याचा विचारही खासदार राजू शेट्टी यांनी करायला हवा, असेही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. खासदार राजू शेट्टी यांनी अवलंबलेले आंदोलनाचे तंत्र हे देशविरोधी असल्याचेही, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जळगावात पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी त्यांनी खासदार राजू शेट्टी यांच्या वक्तव्यांचा समाचार घेत कायदा हातात घेण्याची भाषा सरकार खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी खासदार शेट्टी यांना दिला.

महाजन, खडसेंनीच घ्यावा युतीचा निर्णय

जळगाव पालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबतच्या युतीबाबतही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, पालकमंत्री असलो तरीही वेळेच्या मर्यादा आहेत. त्यामुळे मी संघटनात्मक कामांना वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा अंदाज घेत याबाबतचा निर्णय जलसंपदामंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनीच घ्यायचा आहे, असेही महसूलमंत्री पाटील म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिडेंवर कारवाईचा फास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

''माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो' असे वादग्रस्त वक्तव्य करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांनी महापालिकेची नोटीस अखेर धुडकावली. वैद्यकीय विभागाने पाठवलेली नोटीस स्वीकारण्यास भिडेंनी नकार दिल्यानंतर, भिडेंवरील कारवाईचा फास आवळण्यास सुरुवात केली आहे. भिडेंनी संततीप्राप्तीचे वादग्रस्त वक्तव्य केल्याचे व्हिडीओ क्लिपमध्ये प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. आता भिडेंबाबत काय कारवाई होते, याबाबत निर्णय घेण्यासाठी शुक्रवारी (दि. १३) पीसीपीएनडीटी कमिटीची बैठक बोलवण्यात आली आहे.

संभाजी भिडे सध्या राज्यभर आपल्या बेताल वक्तव्यांनी गाजत आहेत. नाशिकमधील एका कार्यक्रमात भिडेंनी संततीप्राप्तीवर वादग्रस्त वक्तव्य केले होते. भिडेंच्या या वक्तव्यावर राज्यभर टीका झाली. त्यांच्यावर कारवाईचीही मागणी करण्यात आली. भिडेंच्या या वक्तव्यावर गणेश बोऱ्हाडे यांनी कुटुंबकल्याण विभागाच्या 'लेक लाडकी' या वेबसाइटवर लेखी तक्रार केली होती. त्यानुसार पुण्याच्या आरोग्य उपसंचालकांनी नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला भिडेंच्या या वक्तव्यासंदर्भात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणातील तक्रारदार बोऱ्हाडे यांनी भिडेंचा पत्ता लेखी स्वरूपात महापालिकडे पाठवला होता. भिडेंच्या वक्तव्याची वैद्यकीय विभागाच्या पथकाने तपासणी केल्यानंतर १९ जून रोजी त्यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यांना सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, भिडेंना नोटीस देऊन तीन आठवडे झाले तरी त्यांचा खुलासा आला नाही. उलट भिडेंनी नोटीस स्वीकारण्यास नकार दिला. नोटीस परत आल्याने महापालिका पेचात पडली असून, भिडेंचे करायचे काय, असा प्रश्न वैद्यकीय विभागासमोर उभा ठाकला आहे.

दरम्यान, भिडेंची नोटीस परत आल्यानंतर चिंतेत पडलेल्या वैद्यकीय विभागाने भिडेंबाबत निर्णय घेण्यासाठी आता शुक्रवारी (१३) पीसीपीएनडी कमिटीची बैठक बोलावली आहे. या आठ सदस्यीय समितीसमोर भिडेंचा विषय ठेवला जाणार असून, भिडेंबाबत काय करायचे याचे मंथन या बैठकीत केले जाणार आहे. भिडेंची व्हिडीओ क्लिप वैद्यकीय विभागाने तपासली असून, यात प्राथमिकदृष्ट्या भिडे दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे भिडेंवर न्यायालयीन खटला भरण्यासंदर्भात या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदगावात शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात निफाड पाठोपाठ नांदगाव तालुक्यातही एका शेतकऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या केली. त्यामुळे जिल्ह्यात चालू वर्षांत आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५६ झाली आहे.

निफाड तालुक्यातील उगाव येथे दोन दिवसांपूर्वी रामदास बिरार या शेतकऱ्याने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली होती. पाठोपाठ नांदगाव तालुक्यातही एका शेतकऱ्याने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सुत्रांनी दिली. मच्छिंद्र बोरसे (वय ४१) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते नांदगाव तालुक्यातील साकोरे येथील रहिवाशी आहेत. याबाबतची माहिती मिळाली असली तरी प्राथमिक अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images