Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एकलहरे परिसरात लवकरच पोलिस चौकी

$
0
0

एकलहरे परिसरात लवकरच पोलिस चौकी

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

एकलहरे येथे डिजिटल पोलिस चौकी सुरू करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत सत्यवादी सोशल ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांना दिले. संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीबाबतच्या सूचनाही त्यांनी केल्या आहेत.

सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी एकलहरे येथय्जाऊन एकलहरे वीजनिर्मिती केंद्राचे मुख्य व्यवस्थापक उमाकांत निखारे यांच्याशी चर्चा केली. सिद्धार्थनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाशेजारील इमारतीत पोलिस चौकीसाठी लवकरच जागा उपलब्ध करून देण्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे लवकरच एकलहरे पंचक्रोशीवासीयांची पोलिस चौकीची मागणी पूर्ण होणार आहे. एकलहरे येथे पोलिस चौकी सुरू करण्याबाबत आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांना पक्षाच्या संघटक सीमा गांगुर्डे-साळवे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले, त्यात ही मागणी करण्यात आली होती. निवेदनानुसार नाशिकरोड पोलिस स्टेशन हद्दीतील एकलहरेची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. येथील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिस चौकीची गरज आहे. पूर्वी एकलहरे वसाहतीत एक पोलिस चौकी होती. मात्र, सध्या ती बंद आहे. त्यामुळे एकलहरे गाव, वसाहत आणि सामनगाव परिसरातील काही घटना घडल्यास नागरिकांना पाच ते सात किलोमीटरवरील नाशिकरोडला यावे लागते. त्यात वेळ, पैसा वाया जातो. त्यामुळे येथे पोलिस चौकी सुरू करावी, असे निवेदनात म्हटले होते.

--

कॅन्टोन्मेंटच्या औषधालय वास्तूचे आज लोकार्पण

देवळाली कॅम्प : येथील कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये प्रसिद्ध उद्योगपती वासुदेव श्रॉफ यांनी किशनचंद दौलतानी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बांधून दिलेल्या औषधालयाच्या वास्तूचा लोकार्पण सोहळा आज, मंगळवारी (दि. १४) सकाळी ११ वाजता होणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर पी. रमेश यांच्या हस्ते या वास्तूचे लोकार्पण होईल. देवी दौलतानी, मुख्य कार्यकारी अजय कुमार, उपाध्यक्षा मीना करंजकर, नगरसेवक बाबुराव मोजाड, दिनकर आढाव, सचिन ठाकरे, भगवान कटारिया आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती मेडिकल सुप्रिटेंडंट डॉ. जयश्री नटेश यांनी दिली.

--

बसस्थानकात खड्डे (फोटो)

जेलरोड : नाशिकरोड बसस्थानकात मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून, त्यामुळे प्रवासी आणि बसचालकांचे हाल होत आहेत. हे खड्डे त्वरित बुजवण्याची मागणी होत आहे. स्थानकात प्रवेश करतानाच चार-पाच मोठे खड्डे आहेत. गाडी प्रवेश करताना प्रवाशांना जोरदार हादरे बसतात. गाडी बाहेर काढतानाही खड्डे असल्याने हादरे बसतात. गाडी पुढे गेल्यावर डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. खड्डे बुजवून हाल थांबवावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे

--

(फोटो आहे)

निर्माल्य कलश फुटले

पंचवटी : तपोवनातील जनार्दन स्वामी आश्रमाच्या पश्चिमेला ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कलशांची मोडतोड झाली आहे. या निर्माल्य कलशाचे दोन तुकडे झालेले असल्यामुळे येथे टाकण्यात येणारे निर्माल्य उघड्यावरच पडलेले दिसत आहे. नवीन निर्माल्य कलश वापराविना पडून असताना येथे तुटलेले निर्माल्य कलश ठेवण्यात आलेले असल्याने भाविक नाराजी व्यक्त करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांदा व्यापाऱ्याच्या मालमत्तेचा लिलाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे सुमारे दोन कोटी रुपये थकविल्याप्रकरणी मुंगसे येथील जय भोलेनाथ ट्रेडर्सचा संचालक व्यापारी शिवाजी सूर्यवंशी याच्या स्थावर व जंगम मालमत्तेची लिलाव प्रक्रिया सोमवारी येथील तहसील कार्यालयात पार पडली.

सूर्यवंशी यांच्या चारचाकी वाहनाचा लिलाव झाला असला तरी शेतजमिनीचा लिलाव मात्र होऊ शकला नाही. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांच्यासह बाजार समिती सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, नायब तहसीलदार सागर कारंडे आदी उपस्थित होते. तालुक्यातील सुमारे २०० हून अधिक कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करून देखील सुमारे दोन कोटींहून अधिकची रक्कम थकल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. शेतकऱ्यांचे पैसे मिळावेत यासाठी आंदोलने झाली.

सूर्यवंशी याने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला कांदा बांग्लादेशी व्यापाऱ्यास विक्री केला होता. त्यामुळे बाजार समितीचे पथक थेट बांग्लादेशात जाऊन रिकाम्या हाती परत आले होते. अखेर हे प्रकरण जिल्हाधिकाऱ्यांकडे ल्यानंतर जमीन महसुलाच्या थकबाकीपोटी व्यापाऱ्याची कार व शेतजमीन जप्त करण्यात आली होती. दरम्यान वेळोवेळी बाजार समिती संचालक मंडळाने शेतकऱ्यांचे ९० लाखांहून अधिक थकीत पैसे वाटप केले आहेत.

जप्त मालमत्तेचा लिलाव सोमवारी पार पडला. यात सुनील पवार, मोहन जगताप, कपिल पिंपळे, मयूर पाटील, राजेंद्र खैरनार, दीपक जगताप यांनी सहभाग घेतला. सर्वप्रथम चारचाकी वाहनाचा (एमएच ४१ व्ही ७४१०) लिलाव करण्यात आला. चार लाख रुपये मूल्यांकन असलेल्या वाहनाची ४ लाख ८० हजार अशी सर्वोच्च बोली सुनील पवार यांनी लावल्याने वाहन पुढील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना देण्यात येणार आहे. मात्र, शेतजमीन लिलावात कुणीही अनामत रक्कम भरून सहभाग न घेतल्याने जप्त केलेल्या १ हेक्टर ८२ आर जमिनीचा लिलाव होऊ शकलेला नाही. लिलाव प्रक्रिया पार पडल्यानंतर शेतकऱ्यांची थकीत रक्कम दिली जाणार असल्याचे सभापती जाधव यांनी 'मटा'शी बोलतांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रावणक्वीन रजिस्ट्रेशनसाठी थोडचे दिवस शिल्लक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित श्रावणक्वीन स्पर्धेच्या एलिमिनेशन राऊंडसाठी आता थोडेच दिवस शिल्लक असून, भरभरून रजिस्ट्रेशन झाले आहे. कॉलेजियन युवती रोजच 'मटा'च्या ऑफिसमध्ये रजिस्ट्रेशनसाठी हजेरी लावत असून, तुम्हालाही श्रावणक्वीन बनण्याची इच्छा असेल तर तो मूकुट तुमच्यापासून दूर नाही. महाराष्ट्राची श्रावणक्वीन व्हायचे असेल, तर या स्पर्धेत भाग घ्या, रजिस्ट्रेशनसाठी थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत.

श्रावणक्वीन स्पर्धेचे यंदाचे आठवे वर्ष आहे. यापूर्वी ही स्पर्धा दर वर्षी घेण्यात येते. पूर्वी नाशिकमधून निवडलेले तीन स्पर्धक ग्रूमिंगसाठी मुंबईला पाठविण्यात येत असत. मात्र, कालांतराने नाशिकलाच ग्रुमिंग होऊ लागले. निवडीपासून ग्रूमिंग, इन्ट्रोडक्शन, कम्युनिकेशन स्किल्स, शोरूम व्हिजिट, फॅशन डिझायनिंग, फिटनेस हेल्थ केअर, फोटोशूट, ग्रँड रिहर्सल आणि फायनल नाशिकमध्येच होणार आहे. या स्पर्धकांतून निवडले गेलेले तीन स्पर्धक मुंबईला जाणार असून, तेथे ग्रँड फिनाले होऊन महाराष्ट्राची एक श्रावणक्वीन निवडली जाणार आहे. त्यामुळे तरुणींना मोठी संधी असून, अधिकाधिक तरुणींनी श्रावणक्वीन स्पर्धेत सहभागी व्हावे.

श्रावणक्वीन ही केवळ ब्यूटी काँटेस्ट नाही, तर पर्सनॅलिटी काँटेस्ट आहे. व्यक्तिमत्त्व, प्रतिभा, कलागुण, हजरजबाबीपणा आणि बुद्धिमत्ता या जोरावर प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीसाठी स्पर्धक निवडले जाणार आहेत. या निकषांमुळे केवळ मॉडेलिंग क्षेत्रातच नाही, तर गायन, अभिनय, नृत्य या क्षेत्रांतही मुलींसाठी श्रावणक्वीनच्या व्यासपीठामुळे करिअरचे दालन खुले होऊ शकेल. दिग्गज परीक्षक आणि ग्रुमिंग एक्सपर्टसमुळे स्पर्धकांना कलाकार म्हणून स्वतःला नव्याने शोधण्याची संधी मिळते. इथे फक्त गायन, नृत्य किंवा अभिनय याच कलांना व्यासपीठ मिळते असे नाही, तर नकलाकार, रांगोळीकार, चित्रकार, अँकर, शिल्पकार अशा कोणत्याही कला दोन मिनिटांच्या टॅलेंट राउंडमध्ये सादर करण्याची परवानगी आहे. ओळख, टॅलेंट राउंड आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून अंतिम फेरीसाठी स्पर्धक निवडले जातील.या

स्पर्धेसाठी प्रत्यक्ष नोंदणी देखील खुली असून, ऑनलाइन नोंदणी करणे शक्य होत नसेल त्यांनी ऑफिसमध्ये येऊन प्रत्यक्ष नोंदणी करावयाची आहे. येताना आपले पोस्टकार्ड साइज दोन फोटो, आयडेंटिटी प्रूफ आणावे. ऑफिसमध्ये येऊन एक फॉर्म भरावा लागणार आहे.

या स्पर्धेकरिता नावनोंदणीसाठी अट फक्त एकच आहे, ती म्हणजे १८ ते २५ वयोगटातली अविवाहित तरुणी असणे. ज्यांना ऑनलाइन फॉर्म भरावयाचा आहे त्यांनी प्राथमिक फेरीसाठी नावनोंदणी करण्यासाठी www.mtshravanqueen.com या वेबसाइटवर जाऊन 'पार्टिसिपेट नाऊ'वर क्लिक करावे. तेथील फॉर्म भरावा. सोबत फोटो अपलोड करावा. स्पर्धेचे नियम साइटवर दिलेले आहेत. अधिक माहितीसाठी ०२५३-६६३७९८७ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत संपर्क करावा.

या प्राथमिक फेरीची विस्तृत माहिती आणि इतर नियम जाणून घेण्यासाठी वाचत राहा, रोजचा महाराष्ट्र टाइम्स.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ लाखांचा मद्यसाठा जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात विक्रीसाठी येत असलेला तब्बल पाऊणेनऊ लाख रुपयांचा बेकायदा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने हस्तगत केला. या प्रकरणी दोघा संशयित तस्करांना अटक करण्यात आली आहे.

दमण येथे निर्मित मद्याची राज्यात विक्री करण्यास बंदी आहे. मात्र, तस्कर हा मद्यसाठी चोरी छुप्या पध्दतीने राज्यात आणतात. या वाहतुकीवर लक्ष ठेऊन असलेले विभागाचे उपआयुक्त प्रसाद सुर्वे, अधीक्षक सी. बी. राजपूत तसेच कळवणे विभागाचे निरीक्षक आर. एस. सोनवणे, दुय्यम निरीक्षक डी. डी. चौरे, जे. बी चव्हाणके यांना मोठ्या स्वरूपात तस्करी होत असल्याची माहिती सोमवारी मिळाली. त्यानुसार, या पथकाने सुरगाणा तालुक्यातील चिचपाडा येथील वन विभागाच्या चेक नाक्यावर नाकाबंदी लावली. यावेळी पथक वाहनांची तपासणी करीत असताना दोन कार पथकाच्या हाथी लागल्या. वाहनांमध्ये दमण येथे निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस बंदी असलेला तब्बल आठ लाख ८४ हजार ८०० रुपयांचा मद्यसाठा हाती लागला. पथकाने दोन्ही संशयितांना जेरबंद करीत विविध व्हिस्की, बियरच्या बॉटल्स जप्त केल्या. ही कारवाई निरीक्षक आर. एस. सोनवणे, दुय्यम निरीक्षक जे. बी. चव्हाणके, डी. डी. चौरे, सहायक दुय्यम निरीक्षक पंडित जाधव, जवान संतोष कडलग, अवधूत पाटील, पांडुरंग वाईकर, गणेश शेवगे आदींनी सहभाग घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांना अभय

$
0
0

त्रुटी दूर करण्यासाठी 'यूजीसी'कडून मुदतवाढ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दूरस्थ शिक्षण पध्दतीचे कुठलेही अभ्यासक्रम देशभरात रद्द करण्यात आलेले नाहीत. विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रम प्रस्ताव छाननीदरम्यान ज्या अभ्यासक्रमांमध्ये त्रुटी आढळून येतील, त्या भरून काढण्यासाठी संबंधित विद्यापीठांना एक महिन्याची मुदत दिली जाणार असल्याचा खुलासा केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (यूजीसी) केला आहे. यासंदर्भातील पत्र मुक्त विद्यापीठांनाही पाठवण्यात आले आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ प्रशासनालाही 'यूजीसी'चे पत्र मिळाल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी दिली.

'यूजीसी'च्या या खुलाशामुळे दूरस्थ पध्दतीने शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. देशभरातील मुक्त व इतर अशा साधारण ३५ विद्यापीठातील दूरस्थ शिक्षण पध्दतीचे काही अभ्यासक्रम 'यूजीसी'कडून रद्द करण्यात आल्याची माहिती दोन दिवसांपासून पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. शिक्षण क्षेत्रात तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्याची 'यूजीसी'ने तातडीची दखल घेत खुलासा केला आहे. तसे पत्रही संबंधित विद्यापीठांना तातडीने पाठविले गेले. या पत्रातील आशयानुसार, देशभरातील दूरस्थ शिक्षण पध्दतीचे कुठलेही अभ्यासक्रम रद्द करण्यात आलेले नाहीत. इतर अभ्यासक्रम व अनुषंगिक माहिती १६ ऑगस्टला 'यूजीसी'च्या वेबसाइटवर प्रसिध्द करण्यात येणार आहे. त्यानंतरही काही अभ्यासक्रमांबाबत संभ्रम असल्यास 'यूजीसी'कडे नियमानुसार दाद मागता येणार असल्याचे या प्रसिध्दीपत्रकात अधोरेखित केले आहे. त्यामुळे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी अशा माहितीबाबत चिंता करू नये, असे आवाहन विद्यापीठाचे कुलसचिव दिनेश भोंडे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांसाठी एकत्रित दावे

$
0
0

महापौर, विश्वस्तांच्या बैठकीत घेतला निर्णय

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील मोकळ्या भूखंडांवरील अनधिकृत ठरविलेल्या धार्मिक स्थळांवरील कारवाईला स्थगिती मिळविण्यासाठी विश्‍वस्तांमार्फत सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. मोकळ्या जागेवरील मंदिरे ही संस्कार केंद्रे, तर मशिदी या मदरसे असल्याचा दावा न्यायालयात केला जाणार आहे. त्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र विश्वस्तांतर्फे न्यायालयात दाखल केले जाणार असल्याने ही धार्मिक स्थळे वाचण्याची शक्यता आहे. दरम्यान, न्यायालयात धाव घेण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांची भेट घेण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या वतीने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील सन २००९ नंतरची मोकळ्या भूखंडांवरील ७१ धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यासंदर्भात नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. एकूण ५७२ धार्मिक स्थळांवर हातोडा चालवला जाणार आहे. त्यामुळे विश्वस्तांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, त्यांनी कारवाईला विरोध केला आहे. शिवसेनेने यापूर्वीच धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी उच्च न्यायालयात नव्याने याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप विरोधातील रोष कमी करण्यासाठी भाजपतर्फे सोमवारी धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांची महापौर निवासस्थानावर बैठक बोलावली होती. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, सभागृह नेते दिनकर पाटील, गटनेते संभाजी मोरुस्कर, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, नगरसेवक अजिंक्‍य गिते यांच्यासह विश्वस्त उपस्थित होते.

धार्मिक स्थळांचे सर्वेक्षण करण्यासाठी समिती गठीत करण्याच्या न्यायालयाच्या सूचना असताना समिती गठीत न करताचं अनाधिकृत ठरविण्यात आल्याची बाब अॅड. मिनल भोसले यांनी निदर्शनास आणून दिली. प्रशासनाच्या वतीने उपायुक्त रोहिदास बहिरम यांनी बाजू मांडली. पालिकेने हरकती नोंदविण्यासाठी संधी दिली नसल्याचा आरोप विश्वस्तांनी यावेळी केला. सर्वेक्षण चुकीच्या पद्धतीने केल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला. सभा मंडपानांही नोटिसा दिल्याचा दावा यावेळी करण्यात आला. आमदार फरांदे यांनी न्यायालयीन बाब असल्याने एकत्रितपणे बाजू मांडण्याची भूमिका मांडली. त्यावर मंदिरे हे संस्कार केंद्रे, तर मशिदी या मदरसे असल्याचा दावा न्यायालयात करण्याचा निर्णय यावेळी करण्यात आला. यानंतर संस्कार केंद्र बचाव कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. कृती समितीच्या अध्यक्षपदी विनोद थोरात यांची नियुक्ती करून एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. त्यामुळे धार्मिक स्थळांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

..

सलोखा बिघडवू नका

ऐन सणासुदीच्या काळात महापालिकेने शहरातील सलोख्याचे वातावरण बिघवडण्याचे काम सुरू केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शांततेला गालबोट लागले, तर त्याला प्रशासनच जबाबदार असेल, असा दावा यावेळी करण्यात आला. सन २००९ मध्ये न्यायालयाने निकाल दिला असताना कारवाईला आठ वर्षे विलंब का झाला असा सवाल करण्यात आला. धार्मिक स्थळे हटविण्यावरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पहिल्या सोमवारी भाविकांची तुरळक गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबेकश्वर येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा श्रावणात अधिक ओघ असल्याने राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु, पहिल्या श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या तुरळक असल्याचे पहावयास मिळाले.

बारा ज्योर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. श्रावणात तर भाविकांची रिघ लागते. त्यांना त्र्यंबकेश्वरपर्यंत सहज पोहोचता यावे, त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सीबीएस येथील बसस्थानकातून सुमारे १०० बसेसची व्यवस्था केली होती. भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेऊन पुरेशा बसेस सोडण्याचे नियोजन महामंडळाने केले. रविवारी (दि. १२) सायंकाळनंतर फेरीसाठी जाणाऱ्यांचा ओेघ होता. परंतु, सोमवारी दिवसभर फारसा ओघ नसल्याचे पहावयास मिळाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चाळीस कोटींची मदत

$
0
0

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या नाशिक विभागातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ४० कोटी ५८ लाखांची मदत पाठवली आहे. ६९ हजार ४६७ शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली.

नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहमदनगर जिल्ह्यात गतवर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी तसेच अवकाळी पाऊस झाला. यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यातील २६ हजार ८८३ शेतकऱ्यांसाठी २२ कोटी ३४ लाख ३२ हजार रुपये भरपाईपोटी देण्यात आले आहेत. पाच जिल्ह्यांमध्ये साधारणत: ३३ हजार ३५३ हेक्टरवरील पिकांना या पावसाचा फटका बसला होता. जिल्ह्यात द्राक्ष, कांदा आणि डाळिंब पिकाला सर्वाधिक फटका बसला, तर जळगावात केळी आणि अन्य काही पिकांचे नुकसान झाले. प्राप्त निधी जिल्हा स्तरावरून डीबीटी अंतर्गत बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे. गेल्याच आठवड्यात सरकारने २०१६ मध्ये गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी १८ लाख रुपयांचा निधी पाठविला होता.

..

जिल्हानिहाय मदत

जिल्हा शेतकरी क्षेत्र (हेक्टर) अनुदान

नाशिक २८८८३ १३८७६ २२३४.३२

जळगाव ३२३४५ १४११४ ११०५

नगर ९२५८ ४४८८ ६०६

नंदुरबार ८४२ ८०७ १०१

धुळे १३९ ६६ ११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुत्रे पळवताहेत अर्धवट जळालेले मृतदेह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील मोरवाडी येथील अमरधाममधील अर्धवट जळालेल्या मृतदेहांचे अवयव परिसरातील कुत्रे थेट रस्त्यावर घेऊन आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सिडकोतील मुख्य रस्त्यावर असलेल्या मोरवाडी येथील अमरधाममध्ये पालिकेने काही दिवसांपूर्वीच कोट्यवधी रुपये खर्चून सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सिडकोतील सुविधा उपलब्ध असलेली ही एकच स्मशानभूमी असल्याने येथे वारंवार गर्दी होत असते. मागील दोन ते तीन दिवसांपासून याठिकाणी सायंकाळी काही कुत्रे स्मशानभूमीत अर्धवट जळालले मृतदेहांचे अवयव थेट रस्त्यावरच घेऊन येत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. सोमवारीही असाच प्रकार घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये याबाबत चर्चा सुरू झाली. या स्मशानभूमीबाबत अनेक तक्रारी येत असतानाही ठेकेदारावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यापूर्वी सिडकोतील सभापतींसह सर्वच नगरसेवकांनी या स्मशानभूमीच्या ठेकेदाराबाबत तक्रारी करून आंदोलन केले होते.

अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालतात

स्मशानभूमीच्या ठेकेदाराबद्दल यापूर्वी सर्वपक्षीय नगरसेवकांनी आंदोलन करूनही प्रशासनाला जाग येत नाही. अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे ठेकेदाराला पाठीशी न घालता ठोस कारवाई करून काळ्या यादीत टाकावे.

- रत्नमाला राणे, नगरसेविका

मृतदेहाची अवहेलना झाल्याचे लक्षात आल्यावर तातडीने कर्मचारी पाठविले होते. ठेकेदाराबाबत तक्रारी येत असल्या तरी नवीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही सुविधा एकदम बंद करता येणार नाही.

- डॉ. सचिन हिरे, आरोग्याधिकारी

अशा व्यक्‍तीचा ठेका रद्द करून फौजदारी गुन्हे दाखल करावे. माणुसकीला काळिमा फासणार हा प्रकार आहे. अत्यंविधी होईपर्यंतची जबाबदारी पूर्णपणे येथील कर्मचाऱ्यांची असते.

- हर्षा बडगुजर, सभापती, सिडको

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सनातन संस्था, भिडेंना राजाश्रय

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील घातपाताच्या घटनांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांचा सहभाग समोर आला आहे. असे असूनही शिवप्रतिष्ठान संघटनेचे संभाजी भिडे आणि सनातन संस्थेला राजाश्रय मिळत असल्याचा गंभीर दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केला आहे. राज्यात सापडलेली स्फोटके ही फटाके आहेत का? असा सवाल करीत या प्रकरणात सनातन सोबत अनेक संघटना ही दडलेल्या असून, त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे.

जिल्हा दौऱ्यावर आलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, की केंद्र व राज्यातील भाजप सरकारकडून कोणत्याही आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यासाठी 'मोदी हटाव-संविधान बचाव' हा नारा देत देशात महाआघाडी केली जाणार असून, यात शिवसेना नसणार असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्र व राज्य सरकार सर्वाधिक भ्रष्ट आहेत. सत्तेवर येण्यापूर्वी भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा भाजपने केलेला दावा फोल ठरला आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्गाला प्राधान्य दिले जात आहे. कर्जमाफीत मोठा घोटाळा झाला आहे. राफेल प्रकरणात ३६ कोटींचा घोटाळा झाला आहे. मात्र त्यावर केंद्र सरकार गप्प असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

मराठा आरक्षण हाताळण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत. आघाडी सरकारने आरक्षण दिले होते मात्र भाजप सरकारला हे आरक्षण टिकविता आलेले नाही. आरक्षणाबाबत त्यांची भूमिका फसवाफसवीचे आहे. विरोधकांना विश्वासत घेतले जात नाही. त्यामुळे आरक्षणाबाबत सरकारकडून ठोस काहीही सांगितले जात नाही. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सरकारची भूमिक संदिग्ध असल्याने ते रस्त्यावर उतरले आहेत. मराठा आरक्षण चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेस आमदार डॉ. सुधीर तांबे, शहराध्यक्ष शरद आहेर, संपतराव सकाळे, डॉ. शोभा बच्छाव, डॉ. हेमलता पाटील, डॉ. तुषार शेवाळे, राहुल दिवे, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, सुनील आव्हाड, भारत टाकेकर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भारत ‘अ’ संघाने मालिका जिंकली

$
0
0

दुसरा सामना अनिर्णित; अय्यर, बावणे यांची अर्धशतके

वृत्तसंस्था, बेंगळुरू

भारत 'अ' संघाने दक्षिण आफ्रिका 'अ' संघाविरुद्धच्या दोन अनऑफिशियल कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली. भारत 'अ' संघाने पहिला सामना डाव आणि ३० धावांनी जिंकला होता. मालिकेतील दुसरा सामना सोमवारी अनिर्णित राहिला. भारत 'अ'संघाकडून दुसऱ्या डावात श्रेयस अय्यर आणि अंकित बावणे यांनी अर्धशतके झळकावली.

चारदिवसीय सामन्यात हनुमा विहारीचे शतक (१४८) आणि अंकित बावणेच्या (८०) अर्धशतकाच्या जोरावर भारत 'अ' संघाने पहिल्या डावात ३४५ धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तर देताना दुसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका 'अ' संघाने ३ बाद २१९ धावा केल्या होत्या. तिसऱ्या दिवसाच्या खेळाला पावसाचा फटका बसला. रविवारी केवळ ३२.४ षटकांचाच खेळ झाला. तिसऱ्या दिवसअखेर दक्षिण आफ्रिका संघाने ७ बाद २९४ धावा केल्या होत्या. अखेरच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिका संघ किती धावांपर्यंत मजल मारणार, याबाबत उत्सुकता होती. मात्र, सोमवारी दक्षिण आफ्रिका संघाला कालच्या धावसंख्येत केवळ २५ धावांची भर घालता आली. अर्थात, ३१९ धावांवर दक्षिण आफ्रिका 'अ' संघाचा डाव आटोपला आणि भारत 'अ' संघाला २६ धावांची आघाडी मिळाली. भारत 'अ' संघाकडून महंमद सिराजने ७२ धावांत ४, अंकित राजपूतने ५२ धावांत ३, तर युझवेंद्र चहलने ८४ धावांत २ बळी घेतले.

दुसऱ्या डावात भारत 'अ' संघाची ३ बाद ५४ अशी स्थिती झाली होती. पहिल्या डावात शतकी खेळी करणाऱ्या विहारीला खाते उघडता आले नाही, तर पृथ्वी शहा ४ धावा आणि मयंक अगरवाल २८ धावाकरून परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अंकित बावणे यांनी झळकविलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारत 'अ' संघाने ५१व्या षटकांत ४ बाद १८१ धावांपर्यंत मजल मारली. अखेरीस ही लढत अनिर्णित राहिली. श्रेयसने १०३ चेंडूंत ४ चौकार आणि ४ षटकारांसह ६५ धावांची, तर अंकित बावणेने १०० चेंडूंत ९ चौकारांसह नाबाद ६४ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक : भारत 'अ' : पहिला डाव - सर्वबाद ३४५ आणि दुसरा डाव - ५१ षटकांत ४ बाद १८१ (श्रेयस अय्यर ६५, अंकित बावणे नाबाद ६४, दुआन ऑलिव्हर १०-५-२४-२; सेनुरन मुथूस्वामी १२-२-४५-२) अनिर्णित वि. दक्षिण आफ्रिका 'अ' : पहिला डाव - ९८.२ षटकांत सर्वबाद ३१९ (झुबेर हमझा ९३, सारेल एरवी ५८, रूडी सेकंड ४७, सेनुरन मुथूस्वामी ३५, महंमद सिराज २१.२-४-७२-४; अंकित राजपूत २०-७-५२-३; युझवेंद्र चहल २२-१-८४-२).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्राहकांकडून निषेध अन् बहिष्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वीज नियामक आयोग ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आले नसून, महावितरणचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी आले आहे. वीज नियामक आयोगाकडूनच ग्राहकांच्या हक्कांची पायमल्ली होत असल्याचा निषेध करीत ग्राहकांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात निषेध नोंदवत सुनावणीवर बहिष्कार घातला.

आयोगाचे सचिव अभिजीत देशपांडे, सदस्य मुकेश फुल्लर, आय. एम. बोहरी यांच्यासमोर सकाळी १० वाजता सुनावणी सुरू झाली. महावितरणच्या वतीने ही दरवाढ कशी योग्य आहे, हे आयोगाला पटवून देण्यासाठी महावितरणच्या वित्त विभागाचे संचालक सतीश चव्हाण यांनी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन दाखवले. आयोगानेही महावितरणचे म्हणणे ऐकून घेत ग्राहकांनी आपली बाजू मांडावी, असे सांगितले. यावेळी नाशिकचे सतीश शहा हे बाजू मांडण्यासाठी उभे राहिले असता पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवण्याची परवानगी द्यावी, अशी त्यांनी आयोगाला विनंती केली. मात्र, आयोगाने ती मागणी फेटाळली. यावेळी शहा यांनी पुन्हा पुन्हा मागणी केली असता आयोगाने ती मान्य करण्यास नकार दिला. यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व ग्राहकांनी शहा यांना बाजू मांडण्यासाठी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करू द्यावे, असा आग्रह धरला. मात्र, आयोगाने ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. आयोग जर ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेणार नसेल तर या सुनावणीला काय अर्थ आहे, असा सवाल करीत उपस्थित असलेल्या ग्राहकांनी निषेधाच्या घोषणा देत सुनावणीवर बहिष्कार घातला. यावेळी वातावरण तणावपूर्ण झाले होते.

सुनावणीला अध्यक्षच अनुपस्थित

वीज दरवाढीसंदर्भातील सुनावणी वीज नियामक आयोगाच्या अध्यक्षांच्या उपस्थितीत होणे गरजे असते. मात्र, नाशिकची सुनावणी ही एकतर्फी होत असून, महावितरणचे संचालक असलेले प्रतिनिधीच ही सुनावणी घेत असल्याने यातून काही निष्पन्न होणार नाही. ही ग्राहकांची दिशाभूल असल्याचे मत ग्राहक पंचायतीचे विलास देवळे यांनी व्यक्त केले.

'प्रेझेंटेशनसाठी मुंबईत या'

ग्राहक आणि औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी बाहेर पडल्यानंतर येथे उपस्थित असलेल्या महावितरण व पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. ग्राहकांना पीपीटी दाखवायचे असेल तर त्यांनी ते मुंबईला येऊन दाखवावे, असा निरोप आयोगाच्या वतीने देण्यात आला. यावेळी निमाचे माजी अध्यक्ष मधुकर ब्राह्मणकर म्हणाले की, आम्हाला जर पीपीटी दाखवण्यासाठी मुंबईला यायचे असेल, तर नाशिकमध्ये सुनावणी कशाला घेतली? सुनावणीदेखील मुंबईतच घ्यायला हवी होती. याअगोदर ज्यावेळी सुनावणी झाली, त्या त्या वेळी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन दाखवण्यात आले. यावेळी ही आडकाठी का, असाही सवाल त्यांनी केला.

ऐकायचे नसेल तर परत जा

आयोग जर ग्राहकांचे म्हणणे ऐकून घेणार नसेल, तर आयोगाने सुनावणी न घेता परत जावे, अशी मागणी यावेळी ग्राहकांनी केली. हा आयोग अत्यंत 'बायस' असून, ग्राहकांची दिशाभूल करणारा आहे. आयोगाला माहिती देण्यासाठी लोकांनी एक महिन्यापासून प्रयत्न केले. ते प्रयत्न वाया जाणार आहेत. सुनावणीदरम्यान आम्ही पीपीटी पाहणार नाही, असे आयोगाने आधी सांगायला हवे होते, असेही म्हणणे काही ग्राहकांनी मांडले.

लोकप्रतिनिधींची पाठ

एरवी महावितरणच्या नावाने खडी फोडणाऱ्या विरोधी पक्षातील नेत्यांनी या सुनावणीकडे पाठ फिरवली. माजी आमदार किंवा विद्यमान नगरसेवकांनी या ठिकाणी येणे अपेक्षित होते. मात्र, हेमंत गोडसे वगळता याठिकाणी कुणीही फिरकले नाही. दरवेळी पत्रकबाजी करणारे नेते गायब असल्याने ग्राहकांमध्ये नाराजीचा सूर होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लालपरी’साठी स्थळशोधणी

$
0
0

मेळा स्थानकावरील बांधकामामुळे त्र्यंबक भाविकांची कोंडी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी त्र्यंबकेश्‍वरला जातात. भाविकांसाठी दरवर्षी मेळा बस स्थानकातून शेकडो बसेस त्र्यंबकला दिवस-रात्र फेऱ्या मारतात. यंदा मात्र मेळा बस स्थानकावर बांधकाम सुरू असून, एसटी प्रशासनाला नवीन जागेचा पर्याय शोधावा लागला आहे. एसटी प्रशासन याबाबत महापालिकेकडे गोल्फ क्लब मैदानाजवळील जागेची मागणी करणार आहे.

श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकराजाचे दर्शन घेणे धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी लाखो भाविक नाशिकमधून त्र्यंबकला रवाना होतात. याच दिवशी ब्रह्मगिरीला पायी प्रदिक्षणा घातली जाते. भाविक रविवारी रात्री फेरीला सुरुवात करून सोमवारी पहाटेनंतर नाशिकला परततात. त्यात एसटी महामंडळाचा सहभाग मोठा असतो. दरवर्षी किमान दोनशे ते अडीचशे बसेस मेळा बस स्थानकावरून ये-जा करतात. या पार्श्वभूमीवर सीबीएस ते टिळकवाडी सिग्नलवरील वाहतूक बंद ठेवली आहे. यासह मेळाबसस्थानक ते हॉटेल राजदूत हा मार्ग एकेरी वाहतुकीसाठी ठेवण्यात येतो. भाविकांची संख्या मोठी असल्याने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे उपाय राबविले जातात. यंदा मात्र मेळा बस स्थानकाचे काम सुरू असून, तिथे नियोजनासाठी जागा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे महामंडळाने नियोजनासाठी दुसऱ्या जागेचा शोध सुरू केला आहे. मेळा बस स्थानकापासून जवळ असलेल्या गोल्फ क्लब मैदानाजवळील इदगाह मैदान यासाठी सोयीचे ठरू शकते. त्यानुसार, एसटी महामंडळ महापालिकेशी पत्रव्यवहार करीत असून, महापालिका प्रशासनाचा हिरवा कंदिला मिळाल्यानंतर एसटी प्रशासनासह पोलिसही वाहतूक आणि बंदोबस्ताचे नियोजन हाती घेणार आहे.

तिसऱ्या श्रावणी सोमवारी यंदा किमान २५० बस फेऱ्यांचे नियोजन आहे. मेळा बस स्थानकाऐवजी यंदा दुसऱ्या जागेचा पर्याय शोधला जातो आहे. याबाबत लवकरच महापालिका प्रशासनाशी चर्चा होणार आहे.

- अरुण सिया,

विभागीय वाहतूक नियंत्रक, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक: बिबट्याचा बछडा मुलांसह बिछान्यात

$
0
0

विजय बारगजे । घोटी (नाशिक)

इगतपुरी तालुक्यातील धामनगाव येथे बिबट्याच्या बछड्याने आज पहाटे एका झोपडीवजा घरात शिरकाव करीत लहान मुलांच्या बिछान्याचा आसरा घेतला. पहाटेच्या सुमारास या बछड्यानं गारठलेल्या अवस्थेत प्रवेश केला. घरात मच्छरदाणीत झोपलेल्या मुलांसमवेत बछडयाने दीड तास निवांत झोप घेतली. ही बाब लक्षात येताच वनविभागाने तात्काळ धाव घेत भाजीपाला केरेटच्या सहाय्याने बछड्याला ताब्यात घेतलं.

इगतपुरी तालुक्यातील धामनगावात गावात आज पहाटे हा प्रकार घडला. येथील मनीषा बर्डे यांचे आदिवासी कुटुंब पती आणि दोन मुलांसोबत भरवस्तीत राहते. पहाटे चारच्या सुमारास प्रात:विधीसाठी दरवाजा उघडल्यानंतर बाहेर असलेले बिबट्याचे ३ महिन्यांचे पिल्लू घरात घुसले. हे त्यांना समजलेच नाही. घरात बर्डे यांची २ मुलं मच्छरदाणी पांघरून झोपलेली होती. बिबट्याच्या पिल्लानं त्या मुलांच्या बिछान्यात अलगद प्रवेश केला. पहाटे पाचच्या सुमारास ही बाब मनीषा बर्डे यांच्या लक्षात आली. मुलांच्या बिछान्यात बिबट्याला बघताच त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी तात्काळ गावकऱ्यांच्या मदतीने वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. इगतपुरीचे वन परिक्षेत्राधिकारी आर. पी. ढोमसे यांचे मार्गदर्शन घेऊन वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनी वनरक्षक रेश्मा पाठक, संतोष बोडके, बबलू दिवे, भोराबाई खाडे, फैजअली सय्यद, दशरथ निरगुडे, श्रावण निरगुडे, रामदास बगड, मुरलीधर निरगुडे यांच्यासह धाव घेऊन जाळ्यांच्या साहाय्याने बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले. बिबट्याचे हे पिल्लू ३ वर्षांचे असले तरी त्याच्याकडून लहान बालकांना इजा होण्याची शक्यता होती. सुदैवानं तसं काही झालं नाही.
<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebook.com%2Fmaharashtratimesonline%2Fvideos%2F481723718978695%2F&show_text=0&width=560" width="560" height="308" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true"></iframe>
गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण

इगतपुरी तालुक्यात मानवी वस्तीत बिबट्या दिसण्याच्या घटना हल्ली वाढल्या आहेत. १५ दिवसांपूर्वी याच परिसरात एका विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछडयाला बाहेर काढण्यात आलं होतं. तर, तीन दिवसांपूर्वी पिंपळगाव मोर शिवारात डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या झोपडीतून आजारी बिबट्याला बाहेर काढण्यात आलं. मात्र, आजारानं त्याचं निधन झालं. त्यानंतर आज तिसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. त्यामुळं वन खात्यानं आवश्यक ते सुरक्षेचे उपाय करावेत अशी मागणी केली जात आहे.

''बिछान्यात बिबट्याचे पिल्लू असल्याचे समजताच १५ मिनिटांत दखल घेऊन त्याला ताब्यात घेतले. बिबट्या मानवी जीवनासाठी घातक नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये.'' - गोरक्षनाथ जाधव, वन परिमंडळ अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकाच इमारतीतील दोन घर फोडली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पाथर्डी शिवारात भरदिवसा एकाच इमारतीतील दोन फ्लॅट फोडून चोरट्यांनी एक लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यात सोन्याचांदीच्या दागिन्यांसह रोकडचा समावेश आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

दीपक साहेबराव गाडेकर (रा. ग्लोरियस अ‍ॅव्हेन्यू, ग्रीनव्हील समोर) यांनी तक्रार दिली आहे. गाडेकर कुटुंबिय आणि त्यांचे शेजारी अनुष्का शेवाळे या सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी गाडेकर यांच्या घरातून ८९ रुपये किमतीचे तर शेवाळे यांच्या घरातून ४१ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरून नेले.

--

शिवशाहीची काच फोडली

बसला हात देवून थांबण्याचा इशारा करीत काच फोडल्याची घटना वडाळानाका भागात घडली. या प्रकरणी चालकाच्या तक्रारीवरून तेजाळे वाड्यात राहणाऱ्या तरुणाविरुद्ध भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

योगेश तेजाळे (२७ रा. तेजाळे चौक, वडाळानाका) असे त्या संशयिताचे नाव आहे. पुणे बस डेपोचे चालक राजाराम धांईंजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सोमवारी ते विनावाहक शिवशाही (एमएच ०६ बी डब्ल्यू ०५१६) बस दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास पुण्याच्या दिशेने पनेत असताना वडाळानाका भागात संशयिताने बसला हात देवून थांबविले. प्रवासी असल्याचे समजून धोईंजे यांनी बस थांबविली. मात्र, संशयिताने लाकडी दांड्याने बसच्या काचेवर घाव घातला.

--

मधूबन कॉलनीतील आत्महत्या

मधूबन कॉलनीत राहणाऱ्या ४४ वर्षाच्या व्यक्तीने मद्याच्या नशेत विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. या आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याबाबत पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. संजय मोतीराम चौधरी (४४ रा. आव्हाड निवास, मधुबन कॉलनी) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. सोमवारी रात्री संजय चौधरी यांनी अज्ञात कारणातून मद्याच्या नशेत विषारी औषध सेवन केले. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

--

आनंदनगरला घरफोडी

गंगापूररोड परिसरातील आनंदनगरात चोरट्यांनी घरफोडी करून ३७ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी जयकुमार शंकरराव जाधव (रा. आकाशवाणी टावरजवळ, आनंदनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गंगापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुरुवारी हे कुटुंब बाहेरगावी गेलेले असताना चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून लॅपटॉप व कपाटात ठेवलेले सोन्याचांदीचे दागिने आणि रोकड असा सुमारे ३७ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला.

--

मालट्रकसह दुचाकीची चोरी

ट्रक टर्मिनस भागात पार्क केलेल्या मालट्रकसह मोटारसायकल चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी आडगाव आणि नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे येथील ट्रकचालक कलीमोद्दीन चिरागोद्दीन शेख यांनी तक्रार दिली आहे. कलीमोद्दीन शेख २७ जुलै रोजी आपल्या ताब्यातील बारा टायर मालट्रक (एमएच १८ एए ७७३६) घेवून शहरात दाखल झाले. ऐनवेळी घराकडे परतावे लागल्याने त्यांनी आपला मालट्रक टर्मिनस जवळील रस्त्याच्या कडेला पार्क केला होता. अज्ञात चोरट्यांनी तो पळवून नेला. ही घटना गेल्या रविवारी उघडकीस आली. सर्वत्र शोध घेवूनही मालट्रक मिळून न आल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. अधिक तपास उपनिरीक्षक मुळे करीत आहेत. अयुब कासम सय्यद (रा.प्रभात अपा.भगवा चौक,पंपीग स्टेशन जवळ चेहडी) यांची दुचाकी (एमएच १५ बीवाय १९१४) २४ जुलै रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी पळवून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निवडणुकीसाठी सज्ज

$
0
0

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे सूतोवाच

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपच्या 'वन नेशन वन इलेक्शन' या भूमिकेवर शिवसेना संपर्कप्रमुख व खासदार संजय राऊत यांनी तीव्र टीका केली आहे. देशात 'वन नेशन वन इलेक्शन' सोबतच एकच संविधान का नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपला सध्या डोळ्यासमोर फक्त निवडणुकाच दिसत आहेत. भाजपने ठरवले तर लोकसभेसोबत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचीही निवडणूक ते घेऊ शकतात, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी झाली तरी दोन्ही आव्हाने स्वीकारायला शिवसेना तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजपच्या 'वन नेशन वन इलेक्शन' धोरणाची खिल्ली उडवली. देशात सर्वत्र बेबंदशाहीचा सुरू आहे. त्यामुळे देशभर भाजप विरोधी वातावरण तयार झाले आहे. सन २०१४ च्या निवडणुकातील चित्र आणि २०१९ मधील निवडणुकांमधील चित्र पूर्णत: वेगळ राहणार आहे. मोदी आणि भाजपची लोकप्रियता घटली आहे. भाजप फार काळ जनतेला मुर्ख बनवू शकत नसल्याचे सांगत भाजपने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे, असा आरोपही त्यांनी केला. निवडणुकांपासून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना दूर ठेवायला हवे. यासाठी तसा कायदाही केला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. शिवसेनेची ताकद वाढत असून, आम्ही भाजपशी दोन हात करायला कधीही तयार आहोत. आमची कोणाशीही आघाडी नाही. पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू असून, स्वबळावर लढण्याचा शिवसेनेचा नारा कायम असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

..

मुख्यमंत्र्यांनी नावे जाहीर करावीत

मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये बाहेरच्या लोकांनी हिंसा केल्याचा दावा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हिसांचार करणाऱ्यांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान राऊत यांनी दिले आहे. औरंगाबादमध्ये हिंसक घटनांमुळे किमान २५ हजार बेरोजगार झाले. अनेक ठिकाणी खासगी आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान केले. त्यामुळे राज्याला अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याला संपूर्ण राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विविध अपघातात चार जणांचा मृत्यू

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. त्यात महिलेसह दोन दुचाकीस्वारांचा समावेश असून, या प्रकरणी अंबड, उपनगर आणि पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्यांची नोंद करण्यात आली.

ललित श्यामसिंग चव्हाण (३१, रा. कुमावतनगर, मखमलाबाद रोड) हे बुधवारी (दि. ८) पाथर्डी फाटा येथून नाशिकच्या दिशेने आपल्या दुचाकीवर (एमएच १५ जीएच १०६०) प्रवास करीत असतांना स्टेट बँक चौकातील सर्व्हिस रोडवर अपघात झाला. दुचाकी घसरल्याने चव्हाण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. पोलिस नाईक चकोर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खडके करीत आहेत.

दुसरा अपघातात देवळाली गाव परिसरात झाला. आनंदनगरमधील ज्ञानेश्वर तुकाराम गायकवाड (५७ रा. मनपा शाळा क्र. १२५ मागे, आनंदनगर) यांचा सोमवारी (दि. १३) सायंकाळी दत्तमंदिर रोडने देवळाली गावाकडे जात असतांना त्यांचा आपल्या स्विफ्ट कारवरील (एमएच १५ जीएफ ९०१९) ताबा सुटला. यात त्यांची कार फोनच्या डीपीवर धडकली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने गायकवाड यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी सुशील गायकवाड यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार विंचू करीत आहेत.

अपघाताची तिसरी घटना पुणे रोडवर घडली. या घटनेत प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुनील सतीश सेहगल (४६ रा. तुळजा भवानी मंदिराजवळ, जाचकनगर) या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. सेहगल हे रविवारी (दि. १२) रात्री आपल्या अ‍ॅटोरिक्षा (एमएच १५ ईएच ३४३३) मध्ये दोन महिला प्रवासी घेऊन नाशिकरोडच्या दिशेने जात असताना त्यांना अचानक शारिरीक त्रास सुरू झाला. यामुळे ही रिक्षा बिटको कॉलेजसमोरील सुयोजित कॉम्प्लेक्स कंपाउंडला लावलेल्या पत्र्यांवर जाऊन आदळली. जखमी झालेल्या सुनील यांना बेशुद्ध अवस्थेत बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. रिक्षातील प्रवासी मंगल मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक गोसावी करीत आहेत.

मोपडवरून पडल्याने महिला मृत्यूमुखी

म्हसरूळ येथील निर्मला पुरुषोत्तम कानिरे (रा. बालाजी सोसा. म्हसरूळ) या सोमवारी (दि. १३) सायंकाळी प्रवास करीत असताना आपल्या मोपेडवरून घसरल्या. गंभीर जखमी झालेल्या कानिरे यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली असून, अधिक तपास हवालदार झाडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एएसआय भवर यांना राष्ट्रपती पदक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस दलात उत्कृष्ट कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येस राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. यात शहर पोलिस दलातील सहाय्यक उपनिरीक्षक बाळू भवर यांना उल्लेखनीय कामगिरी बद्दल राष्ट्रपती पोलिस पदक, तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव उगले यांच्यासह पोलिस आयुक्तालयातील तिघांना आणि राज्य गुप्तचर विभागातील एका अधिकाऱ्यास प्रशंसनीय कामगिरीबद्दलचे पोलिसपदक जाहीर करण्यात आले आहे.

पोलिस दलासाठी सर्वोच्च सन्मान समजला जाणाऱ्या राष्ट्रपती पदकाची यादी मंगळवारी (दि.१४) जाहीर करण्यात आली. यामध्ये राष्ट्रपती पदकांच्या उल्लेखनीय गटामध्ये शहर पोलिस दलातील नियंत्रण कक्षात कार्यरत असलेले सहाय्यक उपनिरीक्षक बाळू प्रभाकर भवर यांचा समावेश आहे. प्रशंसनीय कामगिरीबद्दल देण्यात येणारे पोलिसपदक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक पंजाबराव वसंतराव उगले, अंबड पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक अरुण संपत आहिरे, नाशिकरोड पोलिस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष नाना जाधव, परिमंडळ दोनचे चालक सहायक पोलिस उपनिरीक्षक आरिफ खान दौडखान पठाण आणि राज्य गुप्तचर विभागाच्या नाशिक कार्यालयातील नानाकुमार सुरेशप्रसाद मिसर यांना जाहीर झाले आहेत. पदक विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सर्वच स्थरातून अभिनंदन करण्यात आले.

..

राष्ट्रपती पदक : बाळू भवर

पोलिसपदक : पंजाबराव उगले, अरुण आहिरे, सुभाष जाधव, आरिफ खान दौडखान पठाण, नानाकुमार मिसर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कालिदास’चे आज लोकार्पण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पेारेशन लिमिटेड व नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आज (दि. १५) सकाळी ११ वाजता महाकवी कालिदास कलामंदिर व महात्मा फुले कलादालन लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, नाट्य परिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी, नाट्य संमेलन अध्यक्षा कीर्ती शिलेदार यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महापौर रंजना भानसी भूषविणार आहेत.

यावेळी महापालिकेचे पदाधिकारी, आमदार, खासदार तसेच नगरसेवक यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, नगरसेविका वत्सला खैरे, अॅड. वैशाली भोसले यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामे थांबविण्याचा डाव

$
0
0

महाआघाडीच्या नेत्यांना महापौर शेख यांचे उत्तर

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात आजवर झालेली विकासकामे काँग्रेसच्याच काळात झाली आहेत. मात्र महागठबंधन आघाडीचे नेते माजी आमदार मौलाना मुफ्ती, बुलंद इक्बाल यांच्यासह विरोधकांकडून निराधार तक्रारी करून विकासकामे थांबण्याचा प्रयत्न केला जात आहे. नागरिकांची दिशाभूल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र विकासकामांबाबत तक्रारी असल्यास कोणत्याही चौकशीला आम्ही तयार आहोत. ज्यांनी कधी ही विकासाची कामे केली नाहीत ते 'विकास की तलाश' पदयात्रा काढताहेत, हे हास्यास्पद आहे, अशा शब्दात महापौर शेख रशीद यांनी पालिकेतील विरोधकांना उत्तर दिले आहे.

महापौर दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शनिवारी महागठबंधनचे नेते बुलंद व मुफ्ती इस्माईल यांनी महापौर शेख यांच्या कार्यकाळात विकासकामांमध्ये भ्रष्टाचार बोकाळला असल्याचा आरोप करीत त्या विरोधात १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान शहरातील विविध प्रभागातून 'विकास की तलाश' पदयात्रा काढणार असल्याची घोषणा केली होती. या पार्श्वभूमीवर महापौर शेख यास काय उत्तर देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत महापौरांनी विविध विकासकामांची माहिती देत विरोधकांना उत्तर दिले.

शेख म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस व जनता दल पक्षातच तिकीट वाटपावरून मोठा भ्रष्टाचार चालतो. त्यामुळे त्यांनी आम्हाला नैतिकता शिकवू नये. विरोधक स्वतः तोडीबाज आहेत. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शहरवासियांची दिशाभूल केली जात आहे. विकासकामांबाबत त्यांनी तक्रार करावी. प्रसंगी न्यायालयीन लढाई लढण्याची देखील तयारी असल्याचे महापौर यांनी स्पष्ट केले.

विकासकामांना वेग येणार

शहरात आगामी वर्षभरात होवू घातलेल्या विकासकामांची माहिती त्यांनी दिली. आचारसंहितेमुळे खोळंबलेली विकासकामे आता वेगाने सुरू होणार आहेत. यात प्रभाग १३ मध्ये ३० खाटांचे सुसज्ज रुग्णालय उभे राहणार असून, त्यासाठी ५ कोटींची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होईल. शहरातील रस्ते व गटारीसाठी बजेटमध्ये ८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पावसाळा संपताच कामे सुरू होतील. त्यासोबतच १० कोटींची मागणी सरकारकडे केली आहे. भूयारी गटार या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी नव्याने निविदा काढण्यात आली आहे. यासह चारही प्रभागांसाठी वैकुंठ रथ, शवविच्छेदन पेटी मागविण्यात आली आहे.

पदयात्रेचे करणार स्वागत

बुधवारपासून महागठबंधन आघाडीकडून काढण्यात येणाऱ्या पदयात्रेचे काँग्रेस कार्यकर्ते स्वागत करतील. ज्यांना 'विकास की तलाश' आहे त्यांना विकासकामे दाखवतील. विरोधकांनी सत्तेत असताना कोणती विकासकामे केलीत? याचे देखील उत्तर त्यांना द्यावे लागेल. या पदयात्रेमुळे उलट आम्ही केलेली विकासकामे जनतेपुढे येतील, असे महापौर यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images