Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

रेंगाळलेले प्रश्न सोडवा

0
0
गंजमाळ येथील घरकुल प्रकल्पाला होणाऱ्या विलंबासह शहरातील अस्वच्छता, खराब रस्ते यावरुन महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे बुधवारी मोर्चा काढण्यात आला.

विद्यार्थीनींच्या सुरक्षेचं काय ?

0
0
दिल्लीतील बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या असुरक्षिततेबाबत उठविलेल्या आवाजाला व्यापक स्वरुप मिळालं. परंतु केवळ बलात्कार झाला तरच महिला असुरक्षित आहे असं समजायाच का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

वनविभागात अचानक बदलीचे वारे

0
0
वनविभागात अचानक बदलीचे वारे संचारले असून नाशिक वन्यजीव विभागाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक अनिल मोहन यांची नागपूरला बदली करण्यात आली आहे.

‘एटीकेटी’ मिळालेले विद्यार्थी होस्टेल सुविधेपासून वंचित

0
0
आदिवासी विकास भवनांतर्गत येणाऱ्या होस्टेलमध्ये प्रवेश देण्यासाठीच्या जाचक अटी अद्यापही लादल्या जात आहेत.

घोटी येथे बालविवाह रोखला

0
0
घोटी परिसरातील भरवीर खुर्द येथे गुरुवारी (११ जुलै) होणारा बालविवाह नाशिक येथील चाइल्ड लाइन संस्थेने घोटी पोलिसांच्या मदतीने थांबवला.

दुष्काळग्रस्तांना बॉशचे २२ लाख

0
0
राज्यातील दुष्काळग्रस्तांसाठी बॉश कंपनीतील कामगारांनी चार तासांचे वेतन आणि तेवढीच व्यवस्थापनाची रक्कम असा एकूण २२ लाख ६४ हजार २१0 रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला आहे.

घंटागाड्या झाल्यात गायब

0
0
विरोध, चर्चा, नियमांत बदल अशी कसरत पार पडल्यानंतर अखेर वादग्रस्त आणि पूर्वीच्याच कंत्राटदारांना महापालिकेने घंटागाडीचा ठेका दिला. मात्र, ठेका मंजूर होताच इंदिरानगर, पंचवटीतील हिरावाडीसह शहरातील अनेक वॉडॉंमध्ये घंटागाड्याचे दर्शन दुर्लभ झाले आहे.

खतप्रकल्पावर पुन्हा खासगीकरणाचा प्रयोग

0
0
महापालिकेच्या वादग्रस्त खतप्रकल्पाच्या दूरवस्थेला प्रशासनाचा कारभार जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढत सदर खतप्रकल्प पुन्हा खासगी तत्त्वावर चालवण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला आहे.

सत्ताधारी नगरसेवक हतबल

0
0
महापालिकेत मनसे आणि भाजपची सत्ता आल्यापासून काही ठराविक पदाधिकाऱ्यांच्या वॉर्डातच विकासकामे किंवा पैसा खर्च होत असून यामुळे सत्ताधारी गटातील नगरसेवक कमालीचे नाराज झाले आहेत.

१८ सरकारी वकिलांची नियुक्ती

0
0
सरकारी वकिलांच्या कामांमध्ये पारदर्शकता राहावी, म्हणून हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे जिल्हा कोर्टातील सरकारी वकिलांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत.

जेईई, नीट परीक्षेसाठी एमकेसीएलची टेस्ट सीरिज

0
0
मेडिकल आणि इंजिनीअरिंग प्रवेशांसाठी राष्ट्रीय स्तरावर घेण्यात येणाऱ्या जेईई आणि नीट परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या यशाचे प्रमाण वाढावे, यासाठी महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लि.ने विद्यार्थ्यांना टेस्ट सीरिज उपलब्ध करून दिली आहे.

मनमाड रेल्वे पुलासाठी मेगाब्लॉक

0
0
मनमाड रेल्वे स्थानकावर चार वर्षांपासून अर्धवट असलेल्या पादचारी पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी रेल्वे प्रशासनातर्फे मंगळवारी मेगाब्लॉक घेण्यात आला. त्याचबरोबर ११, १३ व १५ जुलै रोजी मेगाब्लॉक देण्यात आले.

नागगाव सरपंचाकडून भ्रष्टाचार

0
0
सिन्नर तालुक्यातील नायगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचाने मिळालेला पाच लाख रुपयांचा विकास निधी परस्पर काढून घेत भष्ट्राचार केला असल्याची तक्रार शिवसेनेनी केली आहे.

संतप्त पालकांकडून नासधूस

0
0
मध्य रेल्वे प्रशासनाने मनमाड शहरातील पंचवटी विभागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे पाचवी ते सातवीचे वर्ग बंद केल्याचा निर्णय घेतला. याबाबत पालकांना कोणतीही कल्पना देण्यात न आल्याने संतप्त पालकांनी शाळेच्या फर्निचरची नासधूस केली.

कोळशामुळे वीजनिर्मिती ठप्प

0
0
दरवर्षी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या कोळशाच्या अडचणीचा यंदाही वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. एकलहरे औष्णिक केंद्रातील तीनपैकी दोन संच बंद असून सध्या एका संचातून १६२ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे.

माहेश्वरी समाजाकडून बहिष्कार

0
0
मंगल कार्यालयास नाव देण्याच्या वादातून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील माहेश्वरी समाजाने चौघा कुटुंबांना वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

नाशिकमध्ये सरीवर सरी

0
0
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना बुधवारी दमदार सरींनी ओले चिंब केले. दुपारपासून सुरू झालेल्या पावसाच्या धारा रात्री उशिरापर्यंत कोसळतच होत्या.

जेलरोड परिसरातून घंटागाड्याच गायब

0
0
नाशिकरोडच्या जेलरोड भागात घंटागाडी नियमीत येत नसल्याने लोक त्रस्त झाले असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घंटागाड्या येत नसल्याने घंटागाड्या गेल्या कुठे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

सटाणा तालुक्याकडे पावसाची पाठ

0
0
मृग नक्षत्रासोबतच पावसाने समाधानकारक सुरुवात केली. दुष्काळातून दिलासा मिळणार, अशा आशेत असतानाच महिनाभरापासून पावसाने सटाणा तालुक्याकडे पाठ फिरवली आहे.

सॅण्ट्रो-कंटेनर धडकेत एक ठार

0
0
येवल्याहून शिर्डीकडे जाणाऱ्या सॅण्ट्रो कारला कंटेनरने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण ठार, तर पाच जण जखमी झाले. या अपघातात जळगाव जिल्ह्यातील कजगाव येथील जयंतकुमार मगनलाल न्याती (४७) हे जागीच ठार झाले. जखमींना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images