शहर परिसर सर्वांची साथ गरजेची शहरात वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कामाचा ताण असतानाही विविध शाळांमध्ये जाऊन रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करून ते एक वेगळा आदर्श निर्माण करीत आहेत. खरोखरच हा उपक्रम स्तुत्य आहे. त्यांच्या या स्तुत्य प्रयत्नांना सर्वांनीच साथ द्यावी. -महेंद्र पवार नांदगाव अखेर रेशन कार्ड मिळाले ही गर्दी आहे रेशन कार्ड घेण्यासाठीची. नांदगाव तालुक्यातील पाथर्डी येथील हा फोटो आहे. गेल्या काही महिन्यांपासून परिसरात रेशन कार्डचा मोठा तुटवडा होता. त्यामुळे परिसरातील गोरगरिबांची गैरसोय होत होती. मात्र, आता रेशन कार्ड उपलब्ध झाल्याने नागरिकांची अशी रांग लागत आहे. -रवी आहेर शहर परिसर प्लास्टिकचा तिरंगा नकोच प्लास्टिकच्या तिरंगी ध्वजांची अजूनही काही ठिकाणी विक्री होत आहे. हा प्रकार बंदच केला पाहिजे. जेणेकरून राष्ट्रध्वजाचा आणि पर्यायाने देशाचा अवमान होणार नाही. प्रशासनाने प्लास्टिकचे तिरंगी ध्वज विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे, तरच असे प्रकार थांबू शकतील. -आकाश घाडगे आडगाव नाका एटीएम, पैसे भरणा बंदने गैरसोय बँक ऑॅफ इंडियाच्या आडगाव नाका येथील एटीएम, पैसे भरणा आणि प्रिंट मशिन अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे बँकेच्या परिसरातील ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे बँकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी येथील मशिन लवकरात लवकर सुरू करून दिलासा द्यावा. -प्रमोद क्षीरसागर वडाळा नाका अस्वच्छतेचे साम्राज्य वडाळा नाक्यावरील रेणुकानगर परिसरात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. वडाळा गाव परिसरात विविध विकारांच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने येथे त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी. -हेमंत साळी त्र्यंबकरोड झाडांची करावी छाटणी ईदगाह मैदानासमोर त्र्यंबकरोडवरील दुभाजकात असलेली झाडे अशी अस्ताव्यस्त वाढली आहेत. त्यांची नियमित आणि प्रमाणबद्ध तोड न झाल्याने वाहतुकीस आता या झाडांच्या फांद्यांचा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. रस्ता ओलांडणाऱ्यांच्या जिवालाही त्यामुळे धोका निर्माण झाला आहे. -संजय अहिरे (सिटिझन रिपोर्टर)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट