Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

देशात मुलींच्या जन्मदरात वाढ

$
0
0

डॉ. राजेंद्र फडके यांचा दावा

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'बेटी बचाव बेटी पढाओ' उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे लोकांमध्ये जागृती झाली असून, स्त्री भ्रूणहत्येत घट होऊन मुलींच्या जन्मदरात मोठी वाढ झाली आहे. महाराष्ट्रातही मुलींचा जन्मदर कमालीचा वाढला असून चंद्रपूर, गडचिरोली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांमध्ये तर तो एक हजारपेक्षाही अधिक असल्याचा दावा बेटी बचाव बेटी पढाओ योजनेचे राष्ट्रीय राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी केला आहे.

भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी हितगूज साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'बेटी बचाव बेटी पढाओ' (बीबीबीपी) या ड्रीम प्रोजेक्टच्या साडेतीन वर्षांच्या काळातील फलनिष्पत्तीची माहिती डॉ. फडके यांनी दिली. यावेळी प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, पवन भगूरकर, गिरीश पालवे व्यासपीठावर होते. सन २०१४ मध्ये मुलींचा जन्मदर सरासरी ९२९ इतका होता. काही राज्यांत तर हा दर प्रतिहजारी ८५० पेक्षाही कमी होता. हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आदी राज्यातील १६१ जिल्ह्यांत मुलींच्या जन्मदराची परिस्थिती भयावह असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर देशातील स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण रोखावे आणि समाजाचा मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नात गांभीर्याने लक्ष घातले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी या विषयाला हात घालून २१ जानेवारी २०१५ ला 'बीबीबीपी' या उपक्रमाला चालना देऊन त्याच्या राष्ट्रीय संयोजकाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. सहा राष्ट्रीय पथकांच्या मदतीने या उपक्रमाची सुरुवात झाली. सर्व राज्ये, सर्व जिल्हे आणि अगदी मंडल स्तरावर याची रचना करण्याचे निश्चित झाल्यानंतर अथक प्रयत्नातून अनेक ठिकाणी ही रचना पूर्ण झाली, तर काही ठिकाणी ती प्रगतीपथावर आहे. स्वयंसेवी संस्था, डॉक्टर, संत-महंत यांच्या संयुक्त प्रयत्नातून हा उपक्रम जणू जनचळवळ बनली आणि हळूहळू त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले, असे डॉ. फडके यांनी नमूद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सदैव देशहिताचा विचार केला

$
0
0

श्रद्धांजली सभेत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भामरे यांचे विचार

म. टा. वृत्तसेवा, धुळे

माजी पंतप्रधान अटलजींनी देशाच्या हिताचा सदैव विचार केला. त्यांच्यासारखे लोकप्रियता लाभलेले नेते फार कमी झाले. मला त्यांचा अगदी थोडा सहवास लाभला, मी स्वतःला भाग्यवान समजतो, असे विचार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केले.

अटलजी आज आपल्यात नसले तरी त्यांच्या कार्याच्या रूपाने आणि विचारांच्या रूपाने ते सदैव आपल्यात आहेत, असेही ते म्हणाले. या वेळी विविध लोकप्रतिनिधींनीदेखील अटलजींच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी सांयकाळी दिल्ली येथे निधन झाले. स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शहरातील शाहू नाट्य मंदिरात या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा घेण्यात आली. यासाठी आमदार कुणाल पाटील, आमदार डी. एस. अहिरे, महापौर कल्पना महाले, माजी मंत्री रोहिदास पाटील, माजी महापौर भगवान करणकाळ, अनुप अग्रवाल, संजीवनी सिसोदे, कल्पना गंगवार, रमेश श्रीखंडे, युवराज करणकाळ यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

जळगावात आज सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी निधन झाले. जळगावात स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज (दि. १९) सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्हावासीयांतर्फे स्व. अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी सर्वपक्षीय, सर्वधर्मीय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सरदार वल्लभभाई पटेल लेवा हॉल, येथे आज दुपारी ४ वाजता ही श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील समाजातील प्रत्येक घटकाने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रामीण जिल्हाध्यक्ष उदय वाघ व आमदार सुरेश भोळे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कन्हैया कुमार साधणार तरुणांशी संवाद

$
0
0

नाशिकमध्ये उद्या गुंफणार

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या तरुणांनीही सरकारला आपल्या हक्कांसाठी प्रश्न विचारावेत, तरुणांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी नाशिकमधील तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी जेएनयू विद्यार्थी संघाचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमारचे व्याख्यान होणार आहे. तरुणांनो ! निर्भय बना... प्रश्न विचारा! या विषयावर कन्हैया तरुणांसोबत उद्या, सोमवारी संवाद साधणार आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेचे ५६ वे व्याख्यान सोमवारी (२० ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता परशुराम सायखेडकर सभागृहात होणार आहे. यावेळी कन्हैया कुमार तरुणांसोबत सरकारच्या विविध भूमिका, रोजगार आणि विकास या विषयांवर संवाद साधणार आहे. कन्हैया कुमारची तुपसाखरे लॉन्स येथे ५ नोव्हेंबर २०१८ रोजी जाहीर सभा झाली होती. शहरातील पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटनांनी या सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी सभेपूर्वीच अनेक वादंग निर्माण झाले होते. यावेळी मात्र कन्हैयाच्या व्याख्यानाला अद्याप कोणत्याही संघटनेने विरोध केलेला नाही. पोलिसांनी देखील या व्याख्यानाला परवानगी दिली आहे. तरुणांच्या रास्त प्रश्नांवर तोडगा निघावा, यासाठी कन्हैयाचे व्याख्यान आयोजित केल्याचे डॉ. दाभोलकर व्याख्यानमाला समितीने सांगितले.

..

पोलिसांचा चोख बंदोबस्त

कन्हैया कुमारच्या व्याख्यानाप्रसंगी कोणताही गदारोळ होऊ नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी नाशिक पोलिस आयुक्तालयाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. व्याख्यानासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

...

या मुद्द्यांवर साधणार संवाद

- देशाच्या विकासासाठी तरुणांची भूमिका काय असावी.

- सरकारला तरुणांनी कोणते प्रश्न विचारण्याची गरज आहे.

- विकासाची स्वप्ने दाखविणाऱ्या सरकारकडून रोजगार उपलब्ध का झाला नाही.

- दिशाभूल करणाऱ्या सध्याच्या परिस्थितीचे आकलन कसे करायचे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवभूमीच्या मदतीला धावली मंत्रभूमी

$
0
0

मल्याळी असोसिएशनकडून आज जाणार केरळला मदत

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

केरळमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक मल्याळी कल्चरल असोसिएशनने मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. यावर्षी असोसिएशनच्या वतीने नाशकात ओनम सण साजरा केला जाणार नाही. तसेच, पूरग्रस्तांसाठी आर्थिक मदतीसह फूड पॅकेट, जीवनावश्यक वस्तू आज (दि. १९) केरळमध्ये पाठविल्या जाणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून केरळमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आपत्ती उद्भवली आहे. केरळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. देशभरातील सर्व नागरिक आपले बांधव असून, संकटकाळात त्यांना मदत करणे आपले कर्तव्य आहे, या हेतूने नाशिक मल्याळी कल्चरल असोसिएशनतर्फे केरळमधील आपत्ती ग्रस्तांसाठी मदत पाठविली जाणार आहे. नाशिकहून केरळमध्ये रविवारी वाहनाद्वारे मदत पोहोचवली जाईल. यामध्ये मूगडाळ, तूरडाळ, तांदूळ, साखर, मीठ, चहाची पाने, ओट्स, पाणी, साबण, टूथपेस्ट, टूथब्रश, कपडे, टॉवेल्स, स्वेटर, सॅनिटरी पॅड, बॅटरी, बेबी फूड, डायपर या वस्तू पाठविण्यात येणार आहेत.

..

वस्तूंचे संकलन

कामटवाडे येथील माऊली आणि इच्छामणी लॉन्स येथे २२ ऑगस्टपर्यंत वस्तूंचे संकलन सुरू असणार आहे. मल्याळी बांधवांनी या वस्तू संकलित करण्यास सुरुवात केली आहे. सर्व नाशिककरांनी या कार्यात हातभार लावावा, असे आवाहन नाशिक मल्याळी कल्चरल असोसिएशनने केले आहे.

..

ओनम सेलिब्रेशन नाही

मल्याळी बांधवांच्या नववर्षाची सुरुवात ओनम या सणापासून होते. श्रावणातील शुक्ल पक्षात पहिले दहा दिवस हा सण साजरा होतो. यंदा १५ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट या कालावधीत ओनम सण साजरा होत आहे. मात्र यंदा हा सण साजरा करायचा नाही, असा निर्णय नाशिकमधील मल्याळी बांधवांनी घेतला आहे. आपले बांधव संकटात असताना सणोत्सव साजरे करण्याचे मन होत नसल्याचे मत मल्याळी बांधवांनी व्यक्त केले आहे.

...

केरळच्या आपत्ती निवारणासाठी हातभार लावावा, या हेतूने पन्नास हजार रुपये मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये असोसिएशनतर्फे जमा करण्यात आली आहे. मल्याळी बांधवांनी आणि नाशिककरांनी देखील शक्य होईल त्या पध्दतीने मदत करायला हवी.

- अनुप पुष्पंगयन, सचिव, मल्याळी कल्चरल असोसिएशन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

meri photo

उपोषणाद्वारे ‘कमको’च्या कारभारावर ताशेरे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण मर्चंट बँकेच्या सत्ताधारी संचालक मंडळाच्या कारभाराबाबत ताशेरे ओढत, सभासदांच्या भल्यासाठी माजी संचालक कैलास जाधव यांनी १५ ऑगस्टला उपोषणाचे हत्यार उपसले. सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणीच चौकशी करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी जाधव यांनी उपोषण मागे घेतले.

'कमको' बँकेच्या ५७ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच उपोषणाच्या प्रसंगाला संचालक मंडळाला सामोरे जावे लागले. संस्थापक संचालक स्व. एकनाथ जाधव यांचे पुत्र व 'कमको'चे माजी संचालक कैलास जाधव उपोषणात विविध विषयांवर आक्षेत घेतला आहे. १३० कोटींच्या ठेवी असलेल्या बँकेचे जिल्हाभरात कार्यक्षेत्र असूनही नाशिक येथे शाखा नाही. तेव्हा महाराष्ट्र कार्यक्षेत्र करण्याचा घाट घातला जात आहे. बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील सन २०१५-१८ या कालावधीत केलेले सभासद रद्द करावेत. अभोणा शाखेची वास्तू भाडेतत्त्वावर असताना कळवणच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीचे सुशोभीकरण करण्याचे काम संचालक मंडळाने का हाती घेतले. शिवाय काम अंतिम टप्प्यात असूनही नूतनीकरणाचे कोटेशन व निविदा का प्रसिद्ध करण्यात आल्या नाहीत, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. विद्यमान चेअरमन प्रवीण संचेती, संचालक प्रा. निंबा कोठावदे, प्रभाकर विसावे, पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर, सहाय्यक निबंधक प्रकाश देवरे आदींनी कैलास जाधव यांची समजूत काढत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. सायंकाळी ५ वाजता जिल्हा उपनिबंधकांनी १५ दिवसात याप्रकरणी चौकशी अधिकारी नेमून सखोल चौकशी करू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर जाधव यांनी उपोषण मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलेमुळे व्यवसाय करता येतो

$
0
0

कलेमुळे व्यवसाय करता येतो

कामिनी पवार यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विद्यार्थिनींना शिक्षणाबरोबरच एखादी कला अवगत असावी. कलेमुळे व्यवसाय देखील करता येतो असे प्रतिपादन नाशिकरोड संकुल नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या निमंत्रक कामिनी पवार यांनी केले. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात पर्यावरण मंडळांतर्गत आयोजित कार्यशाळेत कामिनी पवार यांनी विद्यार्थिनींना कागदी गुलाबाची फुले बनवायला शिकविले. रंगीत कागदांची फुले बनवताना काय काळजी घ्यावी, त्याचे कटिंग कसे असावे, पाकळ्यांना आकार कसा द्यावा अशा गोष्टी विद्यार्थिनींना समजावून सांगितल्या. विद्यार्थिनींनी अतिशय मनापासून हे प्रशिक्षण घेतले व आनंदाने फुले बनवून इतर विद्यार्थिनींनाही त्याचे प्रशिक्षण दिले जाईल याचे आश्वासन दिले. या कार्यशाळेत पर्यावरण प्रमुख डॉ. मीनल बर्वे यांनी परिचय करून दिला. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या डॉ. लीना पांढरे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आक्षेपार्ह व्हिडीओ अंगाशी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

धार्मिक भावना भडकतील असा स्वत:च्या आवाजातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या परप्रांतीय संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.

सरकारवाडा पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. नाभो मोहन बेरा (वय ३८, सध्या रा. सराफ बाजार, मूळ रा. हुबळी, पश्चिम बंगाल) असे या संशयिताचे नाव आहे. तो शहरातील एका सराफी पेढीमध्ये काम करतो. या संशयिताने एका धर्माविषयीचा भावना भडकावणारा व्हिडीओ बंगाली भाषेत रेकॉर्ड करून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी इब्राहिम शेख यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करण्याबाबत वेळोवेळी जनजागृती करूनदेखील अधूनमधून सोशल मीडियाचा अशा प्रकारे गैरवापर सुरूच असल्याचे चित्र असून, असे प्रकार रोखण्यासाठी शासकीय यंत्रणांसह विविध समाजघटकांच्या सहकार्याने सर्वंकष धोरण आखण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

--

बनावट नोटरीद्वारे चुना

नाशिक : बनावट नोटरीच्या माध्यमातून परस्पर तलाठ्याकडून सातबारा उताऱ्यावर पीक पाहणी लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. प्रमोद वसंतराव दाभाडे (रा. वाई, जि. सातारा) आणि दिगंबर विश्वनाथ गोरे (रा. खिरेगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) अशी या संशयितांची नावे आहेत. रविवार पेठेतील रहिवासी काशीनाथ खंडूशेठ सोनार यांची गंगापूर तालुक्यातील हरसूल येथे पाच एकर जमीन आहे. ही जमीन दिगंबर गोरे यास भाडेतत्त्वावर दिल्याचा बनाव करून संशयितांनी जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला. दि. २१ नोव्हेंबर २०१४ ते २०१५ यादरम्यान एक वर्षासाठी सोनार यांच्याकडून प्रतिएकर पाच हजार रुपये याप्रमाणे भाडेतत्त्वावर घेतल्याचा इंग्रजी भाषेतील करार नोटरी करून घेतला. या बनावट कराराची नोंद तलाठ्याच्या माध्यमातून परस्पर सातबारा उताऱ्यावर लावून घेत पीक पाहणीत स्वत:च्या नावाची नोंद केली. हा प्रकार सोनार यांच्या लक्षात येताच त्यांनी यासंदर्भात पोलिसांत फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

--

वृद्धेची पोत खेचली

नाशिक : घराच्या अंगणात थांबलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत हिसकावून चोरट्याने पोबारा केला. दिंडोरीरोड भागात हा प्रकार घडला. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा जवाहरप्रसाद चौरसिया (वय ६४, रा. श्रीकृष्ण रो-हाऊस, समृद्धी कॉलनी) यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. ही वृद्ध महिला शुक्रवारी सायंकाळी अंगणात उभी असताना ही घटना घडली. रस्त्याने जाणारी ४० ते ४५ वयोगटातील व्यक्ती तुमचे पत्र आले आहे का अशी विचारणा करण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आली. त्यांच्या गळ्यातील ४५ हजार रुपये किमतीची सोन्याची पोत खेचून संबंधित संशयिताने पोबारा केला.

--

शॉक लागून एकाचा मृत्यू

नाशिक : विद्यूत मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या त्र्यंबक तालुक्यातील शेतकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. पिंपळगाव खांब शिवारात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे. रामदास बाळू फनेडे (रा. कौलपाडा, ता. त्र्यंबकेश्वर) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रामदास फनेडे शुक्रवारी सायंकाळी पिंपळगाव खांब शिवारातील आपल्या शेतात गेले होते. तेथील विद्युत मोटार सुरू करीत असताना रोहित्रातील मोकळ्या वायरचा शॉक त्यांना बसला. दूरवर फेकले गेल्याने ते गंभीर जखमी झाले होते. कुंडलिक जाधव यांनी त्यांना तातडीने बिटको रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांचा मृत्यू झाला.

--

(लोगो : \Bक्राईम डायरी\B)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


हजारो कुटुंबे उघड्यावर...

$
0
0

जिल्हा प्रशासनाकडून माहिती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील नवापुरात गुरुवारी रात्रीतून १४४ मिमी. पाऊस बरसल्याने रंगावली नदीला महापूर येऊन २०० घरे, अनेक वाहने वाहून गेली. या महापुरात तीन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाला. त्याबाबत तातडीने महावितरण कंपनीकडून नवीन तारा टाकण्याचे काम सुरू असून, लवकरच वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याचे कंपनीच्या अधिकारी माहिती दिली आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केल्याने अनेकांचे प्राण वाचले. अद्यापही परिसरातील जवळपास ५०० घरात पाणी घुसल्याने अनेक संसार उघड्यावर आले असून, शेकडो पशूधन पुरात वाहून गेले आहे.

सन १९७६ नंतर प्रथमच आलेल्या या महापुरामुळे नवापूर परिसरातील हजारो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहे. तसेच नवापूर तालुक्यातील अनेक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर-सुरत महामार्गावरील वाहतूक गुरुवारी मध्यरात्रीपासूनच बंद केली होती. त्यामुळे अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांची भलीमोठी रांग लागली होती. यासाठी पर्यायी मार्गाचा अवलंब करून वाहतूक वळविण्यात आली.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही नुकसानग्रस्तांना मदतकार्य करण्याचे काम सुरू असून, महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात येत आहेत. लवकरच याबाबत सविस्तर आकडेवारी समोर येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जिल्हाधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह पोलिस अधीक्षक व अधिकारी, कर्मचारी यांनी दोन दिवसांपासून नवापूर ठाण मांडून परिस्थिती नियंत्रणात आण्ण्यात यश मिळविले आहे.

नवापूर शहरात दाखल झालो असून, जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेत आपत्तीमध्ये मृत झालेल्या पाचपैकी चार जणांची ओळख पटली आहे. शासनाकडून त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात येत आहे. तर मृत पावलेल्या जनावंराच्या मालकांनादेखील भरपाई देण्यात येणार आहे. येत्या काही तासांत परिस्थिती पूर्वपदावर येऊन जनजीवन सुरळीत होणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

- मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी, नंदुरबार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जज प्रतिक्रिया

$
0
0

परीक्षक म्हणतात...

'महाराष्ट्र टाइम्स'ने श्रावणक्वीनद्वारे मुलींना आपले कलागुण सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध केले आहे. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुली खूप तयारीनिशी स्पर्धेत उतरल्या आहेत. आपले ध्येय आणि आवड यांचा भविष्यात उत्तमरितीने समतोल साधू शकतील. सर्व मुली मुंबई पुण्याच्या मुलींसोबत उत्तमरितीने स्पर्धेत उतरण्यासाठी तयार आहेत. 'श्रावणक्वीन'मुळे नक्कीच त्यांना अभिनय क्षेत्रात, नृत्य क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळेल.

- गौरी किरण, अभिनेत्री

----

श्रावणक्वीन या स्पर्धेद्वारे आम्हाला खूप सुंदर चेहरे, उत्तम वक्ते, उत्तम व्यक्तिमत्व मिळाले. आजच्या मुली सौंदर्याबरोबर गुणवत्ता, विद्वत्ता याला पण तितकंच महत्त्व देत आहेत याचं कौतुक वाटतं. नाशिकमधून यावर्षी खूप चांगला प्रतिसाद मिळालाय आणि महाराष्ट्र पातळीवरसुद्धा त्या स्वतःला उत्कृष्ट पद्धतीने सादर करतील याची खात्री वाटते.

- नवीन तोलानी, डान्स एक्सपर्ट

---

श्रावणक्वीन हा खप मोठा प्लॅटफॉर्म आहे. सिनेक्षेत्रात, नाट्यक्षेत्रात किंवा फॅशनच्या दुनियेत स्वतःचे स्थान निर्माण करण्यासाठी मुलींना ही खप मोठी संधी आहे. आपल्या नाशिकला कलेचा वारसा मिळाला आहे. नाशिकच्या मुलींमध्ये विविध कलागुण आहेत ते त्या आज सिद्ध करताय. ही एक फक्त सौंदर्य स्पर्धा नसून व्यक्तिमत्व सिद्ध करण्याची स्पर्धा आहे. या स्पर्धेद्वारे आपल्या व्यक्तिमत्वाला मुली नक्कीच अजून उभारी देतील.

- किरण भालेराव, अभिनेता

---

आज खूप आनंद वाटतोय की नाशिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर मुली सहभाग नोंदवतात. त्यांचे कलागुण खूप सुंदररित्या सादर करत आहे. या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी आणि स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी मुलींनी अतोनात मेहनत घेतली आहे. इतक्या कमी वयात एवढ्या मोठ्या स्पर्धेत त्या आपला स्थान निर्माण करताय याचा खूप अभिमान वाटतो.

- तनु भाटिया,

०००००००००००००

संकलन - हर्षल भट, लखन सावंत, अक्षय सराफ, कल्पेश उघडे, स्नेहल अमृतकर, प्रथमेश चांदवडकर, भाग्यश्री मोरे, देवेंद्र पाटील, किशोर नागरे, विवेक कोळी, अमित पवार, सौरभ अमृतकर, राहुल गायकवाड, सुहास परदेशी, अश्विनी भालेराव, अश्विनी हाडपे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औद्योगिक क्षेत्रातील बदल आत्मसात करा

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

नोकरीच्या मोजक्याच संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांनी नोकरीत अडकण्यापेक्षा उद्योजकतेच्या प्रवाहात सामील व्हावे. शिक्षणाच्या वाढत्या प्रसारामुळे औद्योगिक क्षेत्रात होणारे बदलही आत्मसात करावेत, असे आवाहन डॉ. मो. स. गोसावी यांनी केले.

कॉलेजरोड, गंगापूररोड वाणी समाज मित्रमंडळाच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त रावसाहेब थोरात सभागृह येथे आयोजित 'शिक्षणविश्व' कार्यक्रमात ते बोलत होते. वाणी समाजातर्फे दर वर्षी शिक्षणविश्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे, बडोद्याचे अतिरिक्त आयुक्त (जीएसटी) उन्मेश वाघ व लाइफ कोच दिलीपकुमार औटी उपस्थित होते. आदर्श व्यक्ती आपल्यातच ओळखावा. जिद्द व चिकटीच्या बळावर विद्यार्थ्यांनी यश संपादन करावे, असे मत उन्मेश वाघ यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास वाणी समाज मित्रमंडळाचे सर्व पदाधिकारी, संचालक, तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आवडीचे क्षेत्र निवडा!

विद्यार्थ्यांनी करिअरची दिशा काळजीपूर्वक निवडावी. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना सकारात्मक दृष्टिकोन असणे अत्यंत आवश्यक असते. आपल्या आवडीचे शिक्षण घेतल्यास काम करण्याचे समाधान मिळते. आवड, कल ओळखून विद्यार्थ्यांनी करिअरची निवड करावी, असा आग्रही सल्ला आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

--

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ तिघांवर ठपका

$
0
0

सावाना नूतनीकरणातील संशयास्पद खर्चाबाबत अहवाल सादर

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयाच्या (सावाना) नूतनीकरण कामात १६ लाख रुपये संशयास्पदरित्या खर्च केल्याचा ठपका चौकशी अधिकाऱ्यांनी संस्थेचे तत्कालीन तीन पदाधिकाऱ्यांवर ठेवला आहे. या तिघांव्यतिरिक्त अन्य व्यक्ती जबाबदार आहेत की नाही, हे ठरविण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून फेरलेखापरीक्षण केले जाणार आहे. त्यातून प्राप्त झालेल्या अहवालानुसार संबंधितांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे.

'सावाना'च्या नूतनीकरण कामाबाबत समित्यांकडून संशय व्यक्त झाल्याने 'सावाना'चे तत्कालीन प्रमुख कार्यवाह मिलिंद जहागिरदार, कार्याध्यक्षा प्रा. विनया केळकर व अर्थसचिव स्वानंद बेदरकर यांचे आजीव सभासदत्त्व रद्द करण्याच निर्णय विशेष सर्वसाधारण सभेने घेतला होता. त्याबाबत पुष्टी देणारा आर्किटेक्ट अनिल चोरडिया यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्यात १६ लाख रूपये संशयास्पद रित्या खर्च हा मुद्दा उपस्थित करून या तिघांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

दोन वर्षांपूर्वी 'सावाना'चे परशुराम साईखेडकर नाट्यगृह, औरंगाबादकर सभागृह व अन्य काही बाबींचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्यातील व्यवहारांत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला होता. 'सावाना'च्या ५ मार्च २०१७ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील प्राथमिक अहवाल सादर करण्यात आला. मात्र, सभासदांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून अंतिम अहवाल सादर करण्याची सूचना केली. त्यानुसार चौकशी अधिकारी म्हणून वास्तुविशारद अनिल चोरडिया यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी नूतनीकरणाशी संबंधित सर्व व्यक्तींशी संपर्क साधून त्यांना म्हणणे सादर करण्यास सांगितले होते. सर्व कंत्राटदार, साहित्य पुरवठादार, सावानाचा सेवकवर्ग, आजी व माजी कार्यकारी मंडळ सदस्य व निर्णयप्रमुख यांचा त्यात समावेश होता. त्यांपैकी काहींनी प्रतिसाद दिला; तर काहींनी म्हणणे सादर केले नाही. त्याचा अभ्यास करून चोरडिया यांनी अंतिम अहवाल तयार केला. तो 'सावाना'चे अध्यक्ष, कार्याध्यक्ष व प्रमुख सचिवांना सादर करण्यात आला आहे. त्यानुसार फॅब्रिकेशन, रंगकाम, सुतारकामात एकूण १५ लाख ७९ हजार ५०२ रुपयांचा संशयास्पद खर्च झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या सर्व कामाची जबाबदारी तत्कालीन पदाधिकारी मिलिंद जहागिरदार, प्रा. विनया केळकर व स्वानंद बेदरकर यांच्यावर निश्‍चित करण्यात आली आहे.

विशेष सभेच्या आदेशानुसार संबंधितांना त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती. प्राथमिक चौकशी अहवालातील नोंदीही त्यांना पाठविण्यात आल्या. मात्र, संबंधित तिघा माजी पदाधिकाऱ्यांनी चौकशी अधिकाऱ्यांपुढे म्हणणे मांडले नाही. त्यामुळे त्यांना आरोप मान्य आहेत, असे म्हणता येऊ शकते. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या फेरलेखापरीक्षणानंतर फौजदारी कारवाईचा निर्णय घेतला जाईल.

- श्रीकांत बेणी, प्रमुख सचिव, सावाना

'सावाना'त सात लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याबद्दल सरकारी केस, एका बाईच्या घरात घुसून तिला मारहाण केल्याबद्दल अटक आणि वसंत व्याख्यानमालेतील भ्रष्टाचार अशा केसेस ज्यांच्यावर सुरू आहेत अशा बेणींनी आमची चौकशी मनमाडहून आयात केलेल्या एका आर्किटेक्टकडून करावी यामागील गौडबंगाल आणि राजकारण लगेचच समजते. या सर्व बनावाविरुद्ध आम्ही न्यायालयात गेलेलो आहोत. लवकरच दूध का दूध-पानी का पानी होईल. तोपर्यंत बाजारात विकत मिळणारे असे कितीही अहवाल त्यांनी आणावेत.

- मिलिंद जहागिरदार, माजी प्रमुख कार्यवाह, 'सावाना'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरक्षणाला पर्याय ‘स्किल’च!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजाची वर्तमानस्थिती ही आव्हानात्मक आहे. आरक्षणासारख्या आधारांची गरज आज समाजातील अनेक घटकांना नक्कीच आहे, यात दुमत नाही. पण सरकारदरबारी मिळणारे आरक्षण हे रोजगारासारखी समस्या शंभर टक्के सोडवू शकणार नाही. यासाठी कौशल्यांचे विकसन हाच आरक्षणास समांतर पर्याय होऊ शकतो. याचा अर्थ आरक्षणास विरोध असा नाही, पण विकासाची स्वप्न पाहताना कौशल्य विकास त्यासाठी तितकाच पूरक ठरू शकतो, असे प्रतिपादन नामवंत उद्योजक हणमंतराव गायकवाड यांनी केले. \B

\Bमराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या वतीने आयोजित समाजदिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. रावसाहेब थोरात सभागृहात रविवारी दुपारी हा सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाभरातून संस्थापरिवारातील सदस्य व हितचिंतक आणि विद्यार्थी उपस्थित होते. ते म्हणाले, 'सद्य:स्थितीत सामाजिक तराजू दोलायमान आहे. सातत्याने मोर्चे, आंदोलने काढण्याची वेळ देशातील अनेक घटकांवर येत आहे. या सामाजिक आव्हानांचा विचार करताना मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी मला बोलावून घेत अशा मुद्द्यांवर चर्चाही केली. ही स्थिती बघता केवळ आरक्षण युवकांच्या विकासासाठी पूरक ठरू शकेल, असे मला वाटत नाही. या जोडीला कौशल्य विकसनाची कास धरा. जगाच्या बाजारपेठेची दिशा ओळखा. त्या बाजारपेठेला जे हवे, नेमके तेच दर्जेदारपणे आणि प्रामाणिकपणाचे मूल्य देऊन पुरविण्याचा प्रयत्न करा' , असा सल्लाही त्यांनी यावेळी युवकांना केला.

या भाषणात गायकवाड यांनी उद्योजकता आणि शेती या विषयांच्या विविध अंगांना सोदाहरण स्पर्श केला. यशस्वी शेती आणि यशस्वी उद्योजकतेसाठी त्यांनी काही कानमंत्रही उपस्थितांना दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे होते. व्यासपीठावर सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, चिटणीस डॉ. सुनील ढिकले, उपसभापती राघोनाना अहिरे, संचालक नाना महाले, भाऊसाहेब खातळे, उत्तमबाबा भालेराव, प्रल्हाद गडाख, डॉ. विश्राम निकम, डॉ. प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, रायभान काळे, हेमंत वाजे, डॉ. शोभा बच्छाव, दत्तात्रय पाटील, श्रीराम शेटे, विश्वास मोरे, डॉ. जयंत पवार, मुरलीधर पाटील, अॅड. पंडितराव पिंगळे, अशोक पवार, शिरीष कोतवाल, जयदीप निकम, डॉ. तानाजी वाघ, सेवक सदस्य नानासाहेब दाते, गुलाबराव भामरे, सर्व शिक्षणाधिकारी उपस्थित होते.

सरचिटणीस नीलिमा पवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. तुषार शेवाळे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्रमुख अतिथींचा परिचय प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी करून दिला.

स्वत्वाची जाणीव हरवू नका!

यावेळी युवकांविषयी बोलताना ते म्हणाले, 'स्वत्वाची जाणीव वर्तमानातला युवक हरवत चालला आहे. आपण एखादी गोष्ट इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने करू शकतो, या बद्दलचा आत्मविश्वास म्हणजे स्वत्वाची जाणीव. आजही हजारो युवकांशी संबंध येतो. करिअर, व्यवसाय, नोकरी, शिक्षण या मुद्द्यांवर त्यांच्याशी संवाद साधताना स्वत:बद्दलचा त्यांच्यातील आत्मविश्वास वजा होत असल्याचे मला स्पष्टपणे जाणवते. जीवनात प्रगतीच्या पायऱ्या गाठायच्या असतील तर स्वत्वाची जाणीव हरवू नका', असा सल्लाही त्यांनी युवकांना दिला.

शेतीकडे व्यवसाय म्हणून बघा\B

\Bगायकवाड म्हणाले, आपल्या पूर्वजांनी शेकडो वर्षांपासून शेती केली. आजही आपण पारंपरिक पद्धतीने शेती करतो. मात्र, थोडासा अभ्यास आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन शेतीमध्ये काही युक्त्या वापरल्यास उत्पादन अनेक पटींनी वाढू शकते, याची उदाहरणे त्यांनी मांडली. नोकरी आणि उद्योगांप्रमाणेच शेतीमध्येही आव्हाने आहेतच. याकडे सकारात्मकपणे बघा. शेतीकडे व्यवसाय म्हणून बघा. निरोगी भारत घडविण्यासाठी रसायनमुक्त शेतीस प्राधान्य द्या, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्याला व्हावा प्रतिभेचा स्पर्श

$
0
0

सूर्योदय संमेलनात प्रा. डॉ. कोतापल्ले यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

ज्याप्रमाणे चिंतनशील कविता समाजाला अंतर्मुख करीत असते. त्याचप्रमाणे कथा व कादंबरीदेखील अंतर्मुख करण्याचे काम करीत असते. मात्र, त्यासाठी साहित्याला प्रतिभेचा स्पर्श व्हावा लागतो, असे प्रतिपादन प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी केले.

सूर्योदय सर्व समावेशक मंडळ आयोजित आणि दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित एक दिवसीय राज्यस्तरीय चौदावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे रविवारी (दि. १९) आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. नागनाथ कोतापल्ले होते. संमेलनाचे उद्घाटन २१ व्या अखिल भारतीय बालकुमार मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा नामवंत लेखिका डॉ. विजया वाड यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सेवादास दलुभाऊ जैन, नामवंत कथा कादंबरीकार भारत सासणे, तेरावे सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाचे समारोपीय अध्यक्ष खान्देशातील डॉ. संजीवकुमार सोनवणे, कवी प्रा. वा. ना. आंधळे उपस्थित होते. १९४५ नंतरचा कालखंड तर मराठी कथेच्या दृष्टीने अतिशय भरभराटीचा होता, त्यामुळेच हा काळ कथेच्या नावाने ओळखला जात होता. मात्र, आताच्या कालखंडात एकूणच साहित्याचीच चर्चा होत नसल्याची खंत या वेळी प्रा. डॉ. कोतापल्ले यांनी व्यक्त केली.

भाषा टिकविण्यासाठी वाचनसंस्कृती गरजेची
सध्याच्या काळात मराठी भाषा टिकवायची असेल तर लहान मुलांमध्ये वाचनसंस्कृती वाढविणे आवश्यक आहे. साहित्यिक साहित्य लिहित असले तरी ते वाचणारे कोणी राहतील की नाही, अशी शंका निर्माण झालेली आहे. त्यामुळे मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत डॉ. विजया वाड यांनी व्यक्त केले.

परिसंवाद, कविसंमेलनाने रंगत
साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात लेखक सुबोध जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात सुबोध जावडेकर, नीलम माणगावे, प्रा. डॉ. संजीव गिराशे, प्रा. डॉ. सतीश म्हस्के यांनी ‘कथा कशी स्फुरते’ यावर आपले मनोगत व्यक्त केले. तिसरे कथाकथन सत्र लेखिका विनीता ऐनापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यामध्ये विलास मोरे, गोपीचंद धनगर, भास्कराव चव्हाण यांनी कथांचे सादरीकरण केले. यानंतर कविसंमेलन हे खान्देशकवी पांडूरंग सुतार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यामध्ये सहभागी झालेल्या कवींनी शब्द झंकार याविषयावर कवितांचे सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळविली.

यांना दिले पुरस्कार...
डॉ. भवरलालजी जैन सूर्योदय साहित्य रत्न पुरस्कार प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांना तर दलुभाऊ जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार भारत सासणे यांना देण्यात आला. तसेच लेखिका डॉ. विजया वाड, विनीता ऐनापुरे, लेखक सुबोध जावडेकर, गझलकार प्रदीप निफाडकर, लेखिका नीलम माणगावे, लेखक ऐश्वर्य पाटेकर यांनाही यावेळी साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच सूर्योदय साहित्य पुरस्कार शशिकांत हिंगोणेकर, जगदीश पाटील, पौर्णिमा हुंडीवाले, ल. सि. जाधव, किरण सोनार, माया धुप्पड, रावसाहेब कुंवर यांना देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदापात्रात पुन्हा सर्रास वाहनधुलाई

$
0
0

गोदापात्रात पुन्हा सर्रास वाहनधुलाई (फोटो)

पंचवटी : सध्या गोदावरीला पाणी सोडण्यात आल्याने गोदापात्रात वाहने धुण्यासाठी रविवारी म्हसोबा पटांगणावर गर्दी झाली झाली होती. येथे वाहने धुणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे हे चित्र नित्याचे झाले आहे. गोदावरीच्या पाण्यात कपडे, वाहने, जनावरे धुण्यासाठी मनाई असतानाही येथे सर्रास वाहने धुण्यात येत आहेत. म्हसोबा पटांगणाच्या भागात वाहनांची प्रचंड गर्दी होत आहे. त्यामुळे गोदावरीचे प्रदूषण वाढत असून, येथे त्वरित कारवाई करण्याची मागणी गोदाप्रेमींकडून होत आहे.

--

विकासकामांचा प्रारंभ

गंगापूररोड : प्रभाग क्रमांक ८ मध्ये विविध विकासकामांचा प्रारंभ शिवसेनेचे महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्या हस्ते झाला. गंगापूररोडवरील सिरीन मेडोज, सुवर्णकार सोसायटी व सूर्यकांता सोसायटी येथे येथे जॉगिंग ट्रॅक उभारण्यात येणार आहेत. गंगापूर गावातील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे नगरसेवक तथा शिवसेना गटनेते विलास शिंदे यांनी सांगितले. नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेविका राधा बेंडकुळे, नयना गांगुर्डे, अजय गाडे, ज्ञानेश्वर पाटील, गोकुळ पाटील, तसेच नागरिक उपस्थित होते. या कामांसाठी एक कोटी वीस लाखांचा निधी उपलब्ध झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.

--

चौकीसमोर बेशिस्त पार्किंग (फोटो)

सातपूर : कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचे काम पोलिस करीत असतात. परंतू, त्यांच्या चौकीबाहेरच बेशिस्तपणा दिसत असेल, तर अनेकांना आश्चर्य वाटेल. सातपूरच्या अशोकनगर पोलिस चौकीबाहेर सध्या असेच चित्र दिसून येत आहे. येथे रोजच दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच बेशिस्तपणे उभी केली जात आहेत. त्याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालकांसह नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लहवित-शिंदे गावांना ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

लहवित येथील ग्रामपंचायतीस नाशिक तालुक्यासाठीचा यंदाचा तालुका स्मार्ट ग्राम पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तब्बल दहा लाख रुपये आणि सन्मानपत्र असे स्वरुप असलेला हा पुरस्कार जलसंपदा व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामपंचायतीस गौरविण्यात आले.

नाशिक तालुक्यातून लहवित व शिंदे या दोन्ही ग्रामपंचायतींना समान गुण प्राप्त झाल्याने दोघांनाही हा पुरस्कार विभागून देण्यात आला. लहवित ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच विमल मुठाळ, उपसरपंच प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड व ग्रामविकास अधिकारी जयवंत भामरे यांनी या पुरस्काराचा स्वीकार केला. स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण तसेच पारदर्शकता व तंत्रज्ञान या पाच गोष्टी विचारात घेऊन प्रत्येक घटकास गुण देण्यात येतात. सर्वाधिक गुण प्राप्त ग्रामपंचायतीस 'स्मार्ट ग्राम' पुरस्कार दिला जातो. या कार्यक्रमाप्रसंगी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, सीईओ नरेश गिते, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, पोलिस अधीक्षक संजय दराडे, आमदार बाळासाहेब सानप, शिंदे गावच्या सरपंच माधुरी तुंगार, ग्रामविकास अधिकारी विजय जाधव आदी उपस्थित होते.

स्पर्धेत सहभागी प्रत्येक ग्रामपंचायतींची वैयक्तिक-सार्वजनिक शौचालयाची सुविधा व वापर, पाणी गुणवत्ता तपासणी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, ग्रामपंचायत कार्यालय, स्मशानभूमी, क्रीडांगण, बाजारपेठ व व्यायामशाळा या पायाभूत सुविधांचा विकास, आरोग्य व शिक्षणविषयक सुविधांची तपासणी करण्यात आली. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी, महिला बचतगट कार्य, प्लास्टिकबंदी, घरपट्टी व पाणीपट्टी वसुली, नियमित वीजबील भरणा, अपंग-मागासवर्गीय-महिला बालकल्याण खर्च, लेखा परीक्षण पूर्तता कशी केली जाते याची माहिती घेण्यात आली. याशिवाय मासिक ग्रामसभांचे आयोजन, मादकद्रव्य बंदी, सामाजिक दायित्व म्हणून सामूहिक-आंतरजातीय विवाह सोहळे, बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक, एलइडी बल्ब-पथदीप व सौरदिव्यांचा वापर, बायोगॅस, वृक्ष लागवडी प्रमाण, जलसंधारण कामे, अभिलेखाचे संगणकीकरण असे निकष निश्चित करण्यात आले होते.

लोगो : शुभवार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नंदिनी’पात्रात कचराफेक

$
0
0

अंबड लिंकरोड

'नंदिनी'पात्रात कचराफेक

मालवाहतूक करणाऱ्या वाहनातील कचरा सातपूर-अंबड लिंकरोडवर नंदिनी (नासर्डी) नदीत टाकताना टिपलेला हा फोटो. अशा गलिच्छ लोकांपासून शहरातील नद्यांचे संरक्षण कसे करता येईल यासाठी महापालिकेने योग्य ते उपाय करावेत. दक्ष नागरिकांच्या मदतीने अशांवर कडक कारवाई करावी.

-चंद्रकांत महाले

शहर परिसर

हे थांबणार केव्हा?

शहरात अनेक ठिकाणी नदीकिनारी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांच्या पुढाकाराने इशारेवाज सूचनाफलक लावण्यात आलेले आहेत. मात्र, तरीदेखील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा, बांधकामातील कचरा नदीपात्रात टाकला जात आहे. वाळू उपसाही जोरात सुरू आहे. हे थांबणार केव्हा?

-हेमंत साळी

मेरी

मोकाट जनावरांना आवरा

मेरी परिसरातील कलानगर येथे मोकाट जनावरे रस्त्याच्या मधोमध बसतात. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. जनावरे वाहनांना अचानक आडवी येतात आणि त्यामुळे अपघात होतात. पादचाऱ्यांनादेखील येथून जीव मुठीत घेऊन चालावे लागते. महापालिकेने याप्रश्नी लक्ष घालावे.

-सतीश दाभाडे

मखमलाबादरोड

रस्त्याची सात वर्षांपासून प्रतीक्षा

मखमलाबादरोडवरील गॅस गोडाऊनच्या मागे मातोश्रीनगरमधील व्यंकटेश दर्शन रो-हाऊससमोर गेल्या सात वर्षांपासून रस्ता बनविण्याकरिता अर्ज केलेला असूनदेखील अद्यापही प्रशासन, नगरसेवकांकडून कार्यवाही झालेली नाही. परिसरातील रहिवाशांची गैरसोय दूर करावी, ही संबंधितांना विनंती!

-अलोक पाठक

घोटी-अकोले रस्ता

खड्ड्यांमुळे चालकांची कसरत

घोटी ते अकोले रस्त्याची खड्ड्यांमुळे प्रचंड दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर मोठा अपघातदेखील होऊ शकतो. प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि संभाव्य दुर्घटना टाळावी. नाही तर नाहक कुणाचा तरी बळी जाऊ शकेल.

-पुष्पा मडागे

द्वारका

शहर बसथांब्याची दुरवस्था

द्वारका येथील शहर बसथांब्यावरील सुरक्षा बारला वाहनाने धडक दिल्याने त्याची अवस्था अशी धोकादायक झाली आहे. याबाबतचे वृत्त या अगोदरही दिलेले आहे. पण, याप्रश्नी काहीच कार्यवाही झालेली नाही. निदान प्रवाशांना सुरक्षितपणे उभे राहता यावे यासाठी तरी संबंधित अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा.

-एस. दाभाडे

(सिटिझन रिपोर्टर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तिहेरी हत्याकांडातील संशयितास कोठडी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अनैतिक संबंधातून एका बालिकेसह दोन महिलांना जिवंत जाळणाऱ्या जलालउद्दीन खान (५५, मूळ राहणार, कन्होठिया गाव, अलिगढ, उत्तर प्रदेश) या संशयितास नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने २४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली. रेल्वे प्रवासात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळालेल्या जलालउद्दीनला क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने उत्तर प्रदेशातील अलिगढ येथून शिताफीने अटक केली.

अनैतिक संबंधातून झालेल्या किरकोळ भांडणानंतर संतप्त झालेल्या जलालउद्दीनने प्रेयसी संगीता देवरे, देवरे यांची मुलगी प्रीती रामेश्वर शेंडगे (२०) व नऊ महिन्यांची नात श्रद्धा यांच्यावर रॉकेल टाकून पेटवून दिले होते. ६ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. बालिकेसह दोन्ही महिलांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हत्याकांडानंतर संशयित आरोपीने उत्तरप्रदेशकडे धूम ठोकली होती. पोलिसांनी लागलीच विमानाने प्रवास करीत त्यास अलीगढ येथून अटक केली. परतीच्या रेल्वे प्रवासात मात्र मथुरा येथे पोलिसांना चकवा देत जलालउद्दीन फरार झाला होता. पोलिसांची दोन पथके त्याच्या मागावर होती. जवळपास एक आठवडा पोलिसांना गुंगारा देणाऱ्या संशयिताचा माग युनिट एकच्या पथकाने काढला. दोन दिवसांपूर्वी युनिटचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलिस हवालदार प्रवीण कोकाटे, स्वप्नील जुंद्रे, दीपक जठार, राहुल पालखेडे, विशाल देवरे यांचे पथक शोधासाठी रवाना करण्यात आले होते. त्यांनी अलिगढ जिल्ह्यातील बिनिपूर येथून खान यास ताब्यात घेतले. आज, रविवारी जिल्हा कोर्टात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यास २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तपसिद्धीतून व्हावे सर्व घटकांचे कल्याण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सौख्य बाजूला सारत तपाचा मार्ग अवलंबला पाहिजे. तप केल्याने अनेक समस्यांचे निराकरण होते. परंतु, तप स्वार्थासाठी नव्हे, तर सर्वांच्या हितासाठी असावे. आपल्या तपसिद्धीतून सर्वांचे कल्याण होणे गरजेचे आहे, असे निरूपण सुशीलकुवरंजी म. सा. यांनी केले.

जैन चातुर्मासानिमित्त रविवार कारंजा जैन स्थानक येथे चातुर्मास प्रवचन सोहळा सुरू आहे. या सोहळ्यानिमित्त रविवार (दि. १९ ऑगस्ट) रोजी सुशीलकुंवरजी म. सा. यांचे प्रवचन झाले. त्यावेळी त्यांनी तप आत्मशुद्धीसाठीच असावे. तप करीत असताना दुसऱ्या गोष्टींचा मोह करणे चुकीचे आहे. अध्यात्म आणि तपसिद्धी एकाग्रतेनेच साध्य करता येते. असे निरूपण त्यांनी केले. यावेळी अध्यात्मातील काही प्रासंगिक उदाहरणांनी तपाचे महत्त्व त्यांनी पटवून दिले. या प्रवचन सोहळ्यासाठी जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---

लोगो : चातुर्मास प्रवचन

रविवार कारंजा

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिव्यक्ती जपणारा ‘ठेवा संस्कृतीचा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलांना आपले मत व्यक्त करण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप असणे ही अभिनव कल्पना आहे. व्हॉट्सअॅप ग्रुपवर फक्त मेसेजेस फॉरवर्ड न करता. सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम राबविणे ही अभिमानास्पद बाब आहे. महिलांना अभिव्यक्त होण्यासाठी संधी देणारा 'ठेवा संस्कृतीचा' या ग्रुपचे कार्य कौतुकास्पद आहे, असे मत ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांनी व्यक्त केले.

ठेवा संस्कृतीचा या व्हॉट्सअॅप ग्रुपतर्फे रविवारी सकाळी ११ वाजता राका कॉलनीतील ज्योती कलश सभागृहात हा सोहळा झाला. यावेळी सदानंद जोशी बोलत होते. कार्यक्रमस्थळी मंचावर कवी किशोर पाठक आणि रंगकर्मी पल्लवी पटवर्धन होते. अभिनय आणि सांस्कृतिक क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल रेखा केतकर यांना ठेवा संस्कृतीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच पाणी फाउंडेशनसोबत सामाजिक उपक्रमात विशेष कामगिरी केल्याबद्दल गितांजली आव्हाड यांना सामाजिक क्षेत्राचा ठेवा संस्कृतीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

तीन वर्षांपासून व्हॉट्सअॅपवर 'ठेवा संस्कृतीचा' हा ग्रुप आहे. यामध्ये शहरातील सांस्कृतिक, क्रीडा, शिक्षण, सामाजिक यांसह सर्व क्षेत्रातील महिला सहभागी आहेत. काम करणाऱ्या महिलांना आपले मन मोकळे करण्यासाठी हा ग्रुप महत्त्वाचा ठरत आहे. या ग्रुपच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यातून ठेवा संस्कृतीचा हा पुरस्कार प्रदान केला जातो, अशी माहिती ग्रुप अॅडमिन पल्लवी पटवर्धन यांनी दिली. मनाली गर्गे, सोहा लाळे, वैशाली साठे, वैशाली शुक्ल, भाग्यश्री बेळगे आणि इतर सदस्यांनी सोहळ्याचे संयोजन केले.

लोगो : कल्चर वार्ता ......... फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>