Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

थोडक्यात -

$
0
0

शंकराचार्य न्यासतर्फे

आरोग्यभान व्याख्यानमाला

नाशिक : शंकराचार्य न्यासतर्फे आरोग्यभान व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. २४ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ६.३० वाजता गंगापूर रोडवरील शंकाराचार्य कुर्तकोटी सभागृहात हार्ट अटॅक विषयावर व्याख्यान होणार आहे. डॉ. मनोज चोपडा, डॉ. साकेत जुनागडे, डॉ. नितीन घैसास आणि डॉ. अभयसिंग वालीया यांची मुलाखत व्याख्यानात होणार आहे. नाशिककरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन शंकाराचार्य न्यास तर्फे करण्यात आले आहे.

भजन संध्या कार्यक्रम

नाशिक : रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये शनिवारी (दि. २५ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ५ वाजता भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रह्मचैतन्य भजनी मंडळ या कार्यक्रमात सादरीकरण करणार आहे. नाशिककरांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन सोसायटीचे अध्यक्ष राधेय येवले, कार्याध्यक्ष प्रा.डॉ.यशवंत पाटील, सचिव शर्मिला मेहता यांनी केले आहे.

पालखी सोहळ्याचे आयोजन

नाशिक : साळी समाजाचे आद्यदैवत भगवान जिव्हेश्वर यांच्या जयंती निमित्त शुक्रवार (दि.२४ ऑगस्ट) रोजी पालखी सोहळा संपन्न होणार आहे. सकाळी ९ वाजता जुने नाशिक परिसरातील चव्हाटा येथील साळीवाडा येथील जिव्हेश्वर मंदिरापासून पालखी सोहळ्यास सुरूवात होईल. दुपारी १ वाजता जुने नाशिक परिसरातील डिंगर आळी येथील गणपती मंदिरात पालखीची सांगता होईल. या सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सकुळ साळी समाज पंचमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बायकोच्या प्रियकराचा खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

बायकोशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने पत्नीच्या प्रियकराच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून भरदिवसा खून केल्याची खळबळजनक घटना बुधवारी (दि.२२) पावणेदोन वाजेच्या दरम्यान एकलहरे-गंगावाडी रोडवरील रेल्वे पुलाजवळ घडली. थरकाप उडविणाऱ्या या घटनेत संदीप वसंतराव मरसाळे (वय २९, रा. आर्ची व्ह्यू अपार्टमेंट, भैरवनाथनगर, जेलरोड) याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. संदीपचा खून करणाऱ्या दीपक भगवान पगार (वय ३५, रा. गंगावाडी, एकलहरे रोड, जेलरोड) यास नाशिकरोड पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला आहे.

या घटनेंनंतर मृत संदीप मरसाळे याचा मित्र अक्षय माधव बागाईत (वय २४, रा. भैरवनाथनगर, जेलरोड) याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीनुसार संदीप मरसाळे याचे आरोपी दीपक पगार याची पत्नी किरण हिच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा दीपकला संशय होता. त्यामुळे दीपक आणि संदीप यांच्यात यापूर्वी वाद झालेले होते. शिवाय दीपक आणि त्याची पत्नी किरण यांच्यातही वाद होऊन पत्नी किरण तीन वर्षांपूर्वीच माहेरी निघून गेलेली होती. याशिवाय त्यांनी घटस्फोटासाठीही दावा केलेला होता. मंगळवारी रात्री संदीप मरसाळे याचे आई-वडील शतपावलीसाठी गेले असता दीपक पगार याने त्यांना शिवीगाळ करून मुलाचा काटा काढीन, असे धमकावले होते. बुधवारी दुपारी संदीप दीपकबरोबरचा जुना वाद मिटविण्यासाठी त्याचे मित्र अक्षय बाणाईत, आदित्य बोराडे आणि सुमित काकडे यांना घेऊन घटनास्थळी मोटारसायकलवरून गेला होता. परंतु, यावेळी वाद मिटला नाही. दीपकने संदीपला मारण्यासाठी त्याच्या मित्रांना बोलावण्यासाठी फोन केला. त्यामुळे संदीप व त्याचे तिघे मित्र माघारी भैरवनाथनगरला आले. परंतु, एकट्याला गाठून दीपक संदीपला मारू शकतो या भीतीने संदीप व त्याचे मित्र पुन्हा पावणेदोन वाजता रेल्वे पुलाजवळ गेले. यावेळी दीपक त्याच्या मोटारसायकलजवळ एकटाच उभा होता. संदीपची मोटारसायकल दीपकजवळ येताच दीपकने त्याच्याकडील कुऱ्हाडीने संदीपच्या डोक्यात वार केले. यावेळी त्याच्या घाबरलेल्या मित्रांनी संदीपला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, दीपकने त्यांच्यापैकी अक्षयवर हल्ला केल्याने सर्वांनी घटनास्थळावरून पोबारा केला. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक आयुक्त मोहन ठाकूर, पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी दीपक पगार याला ताब्यात घेतले व पंचनामा केला. संदीपचा मृतेदह जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. या घटनेतील मृत संदीप हा दसक येथील ओमसाई ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम करीत होता. आरोपी दीपक पगार हा ड्रायव्हर म्हणून काम करतो.

रेल्वे पुलाजवळ कोणी कोणाला बोलावले?

संदीपची हत्या झाली त्या रेल्वेपुलाजवळ कोणी कोणाला बोलावले होते, याविषयी पोलिस तपास करीत आहेत. प्रेमात अडचण ठरणाऱ्या प्रेयसीच्या पतीचाच काटा काढण्याचा प्रियकराचा डाव होता. कदाचित त्यासाठीच प्रियकराने प्रेयसीच्या पतीला घटनास्थळी बोलावले असण्याची शक्यता आहे. परंतु, प्रेयसीच्या पतीचा काटा काढण्याच्या प्रयत्नात प्रत्यक्षात प्रियकराचाच घात झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पर्धा परीक्षांसाठी दिव्यांगांना कोचिंग

$
0
0

हर्षल भट, कॉलेज क्लब रिपोर्टर

सरकारी, खासगी क्षेत्रातील नोकरी तसेच स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी दिव्यांग सशक्तीकरण विभागातर्फे अपंग विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग देण्यात येत आहे. विभागातर्फे नमूद केलेल्या कोचिंग केंद्रावर विद्यार्थ्यांना कोचिंग दिले जाणार आहे.

सरकारी व खासगी क्षेत्रातील नोकरीसाठी, स्पर्धा परीक्षांची तयारी तसेच तांत्रिक व व्यावसायिक क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंग सुविधेचा लाभ घेता येणार आहे. किमान पदवी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी कोचिंग सुविधेचा लाभ घेऊ शकतात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ४५०० रुपये तर इतर राज्यातील विद्यार्थ्यांना ७००० रुपये दरमहा दिव्यांग भत्ता दिला जाणार आहे. दिव्यांगता व समक्ष आरोग्य अधिकारी यांच्याकडून दिव्यांग प्रमाणपत्र असलेले विद्यार्थीच केवळ योजेनेसाठी पात्र ठरू शकतात. याआधी योजनेचे लाभार्थी ठरलेले विद्यार्थी पुन्हा अर्ज करू शकत नाही. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यानी प्रत्यक्ष कोचिंग सेंटरला भेट देऊन प्रवेश घेणे बंधनकारक आहे. तसेच दिव्यांगता अधिकाऱ्यांकडून मिळालेले प्रमाणपत्र जमा करणे अनिवार्य आहे. कोचिंग केंद्राची यादी www.disabilityaffairs.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनविकासावर ड्रोनची नजर!

$
0
0

मटा विशेष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यभरात वनविभागाकडून सुरू असलेल्या विकासकामांवर आता ड्रोन कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. विकासकामांचे फोटो तसेच त्याचे व्हिडिओचित्रीकरण करुन या कामामध्ये पारदर्शकता आणण्याचा निर्णय वनविभागाने घेतला आहे. त्यानुसार नाशिक वनविभागाने सर्वप्रथम पुढाकार घेतला आहे. यामुळे विकास कामांपूर्वीची आणि नंतरची स्थिती या साऱ्यांचे पुरावे मिळणार असून, विकासकामातील प्रगतीही नजरेत राहणार आहे.

महाराष्ट्र राज्य वन विभागातर्फे राज्यभरात कोट्यवधी वृक्षांची लागवड आणि संवर्धनासाठी उपक्रम राबविले जात आहेत. या अंतर्गत सुरू असलेल्या वृक्ष लागवड, वृक्ष संगोपन आणि रोप वाटिका या विकासकामांचे वन संरक्षण विभागातर्फे चित्रीकरण करण्यात येणार आहे. याची सुरूवात नाशिकच्या पूर्व वन संरक्षण विभागातर्फे करण्यात आली आहे. राज्यभरात तेरा कोटी वृक्षांची लागवड करण्याचे वन विभागाचे उद्दिष्ट्य आहे. या अंतर्गत राज्यात सर्वत्र वृक्ष लागवडीचे उपक्रम राबविले जात आहेत. नाशिकमध्ये शहरासह जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, चांदोरी यांसह इतरही भागात वृक्ष लागवड आणि संगोपन होत आहे. ५ जून रोजी पर्यावरण दिनाचे औचित्य साधून राज्य वनविभाग, सर्व महापालिका, जिल्हा परिषद यांसह सामाजिक संस्था, शाळा आणि कॉलेजांनी राज्यांतील सर्व ठिकाणी लाखो वृक्षांची लागवड केली. राज्यभरात लागवड करण्यात आलेल्या या वृक्षांना वेळेवर खत आणि पाणी दिले जात आहे. यामुळे वृक्षांची चांगली वाढ होत आहे. याची अधिकृत माहिती संकलित करण्यासाठी सर्व वृक्ष लागवडीच्या प्रकल्पांचे चित्रीकरण ड्रोनद्वारे केले जाणार आहे. यातून वृक्षांची एकूण संख्या, वृक्ष लागवडीनंतरची परिस्थिती यांचे चित्रीकरण वनसंरक्षण विभागातर्फे करण्यात येणार आहे. यासोबतच जिल्ह्यातील रोप वाटिकांमधील कामाचेही चित्रीकरण होणार आहे. चित्रीकरणाच्या माध्यमातून संकलित होणारी माहिती वन विभागाच्या मुख्य कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. असे वन संरक्षण विभागाने सांगितले आहे. नाशिकच्या वन विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबतची माहिती नाशिक पूर्व वन संरक्षण विभागाने वेबसाइटवर जाहीर केली आहे.

राज्यभरात १३ कोटी वृक्षांची लागवड केली जात आहे. या उपक्रमाचे राज्यभरातील वन संरक्षण विभागातर्फे चित्रीकरण करण्यात येणार आहे. हे चित्रीकरण वन विभागाच्या वेबसाइटवरही अपलोड केले जाईल.

- टी. ब्युला, उपवनसंरक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमणावर हातोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

नगरपालिकेच्या वतीने पाइपलाइनच्या कामात अडथळा ठरणारे शहरातील वावी वेस ते नवा पूलपर्यंत (जय मल्हार खाणावळ) तसेच मुख्य वाहतुकीच्या रस्त्यालगत अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यांवर ओटे, पायऱ्या व इतर ठिकाणी विनापरवाना अनधिकृत असलेली अतिक्रमणे हटविण्याची मोहीम पालिकेने हाती घेतली आहे. मात्र त्यातून निवासी बांधकामे वगळण्यात आली. मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील मुख्य रस्त्यावरील दीडशे जणांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. मात्र आचारसंहिता असल्यामुळे कारवाई पुढे ढकलण्यात आली होती. व्यापारी, व्यावसायिक यांची बैठक घेवून पालिकेने सूचना केल्या आहेत. त्यामुळे अतिक्रमण मोहीमेबाबत सहकार्य करावे, असे आवाहन मोहिमेचे प्रमुख बावीस्कर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मित-जितेंद्र राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या वेस्ट झोनल राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत अमित वंजारा या नवोदित नेमबाजाने ४०० पैकी ३७६ गुण प्राप्त करीत वरिष्ठ एअर पिस्तूल गटात रौप्य पदक पटकाविले. या विजयामुळे त्याची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे. मित विजारनिया हा नाशिक जिमखाना येथे विनर्स शूटिंग क्लबच्या केंद्रावर सराव करतो. नोव्हेंबरमध्ये दिल्ली येथे राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. आपली नोकरी सांभाळून तो तीन तास नियमित सराव करतो. जितेंद्र खैर हा खेळाडू ४०० पैकी ३७६ गुण प्राप्त करून वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. हे दोन्ही नेमबाज श्रद्धा नालमवारच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. या यशाबद्दल नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड व सेक्रेटरी राधेश्याम मुंदडा यांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’मुळेच मी इंजिनीअर होऊ शकले

$
0
0

हेल्पलाइनच्या माध्यमातून मदत मिळालेल्या चौताली तुंगारचे उद्गार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्सच्या मदतीनेच मी आज इंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षाला कराड येथे शिकते आहे. 'मटा'ने मला अर्थिक मदत दिली म्हणूनच माझे इंजिनीअर होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. हे उद्गार आहेत २०१३ मध्ये मटा हेल्पलाइनच्या उपक्रमातून मदत मिळालेल्या चैताली तुंगार हिचे.

चैताली ही एकलहरा रोडवर असलेल्या छोट्याशा घरात आई, वडील व आजी सोबत राहते. वडील प्रिंटींग प्रेसमध्ये नोकरीला तर आई खासगी कामे करीत होती. आर्थिक चणचण असल्याने चैतालीचे वडील एकलहऱ्यापासून द्वाराकापर्यंत सायकलवर कामाला येत होते. दोन पैसे वाचले तर आपल्या मुलीच्या शिक्षणाला उपयोगी पडतील, हाच त्यामागचा एकमेव उद्देश होता. हुशार असल्याने चैतालीला दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले. गुण मिळाले त्याचा आनंद होण्यापेक्षा मुलीला पुढे कसे शिकवायचे याचे चिंता तिच्या वडलांना होती. चैताली शिकत असलेल्या कोठारी कन्या शाळेतील शिक्षकांनी तिला मटा हेल्पलाइनविषयी माहिती दिली. तिच्या वडलांनी सायकलवर 'मटा'चे ऑफिस गाठून तिच्याबद्दल माहिती दिली. तिची कहाणी वाचून नाशिकमधील अनेक दानशुरांनी भरघोस मदत केली. या मदतीतून चैतालीने सामनगाव येथील इंजिनीअरिंग कॉलेजला प्रवेश घेऊन इलेक्ट्रिकचा डिप्लोमा पूर्ण केला. चांगले मार्क मिळाल्याने तिचा कराड येथील गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग येथे नंबर लागला. तेथेही ती गुणांमध्ये अव्वल राहिली. याठिकाणी ती शेवटच्या वर्षाला शिक्षण घेते आहे.

मला मटाच्या माध्यमातून पैसे मिळाले, म्हणूनच इंजिनीअरिंगचे माझे स्वप्न पूर्ण होऊ शकले. शहरातील दानशुरांनी दाखवला विश्वास आणि त्याचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. आजवर मला 'मटा'च्या माध्यमातून जी मदत मिळाली तिचे व्याजच फक्त खर्च केले आहे. मूळ रक्कम तशीच ठेवली आहे. ही रक्कम मला लागली नाही तर आगामी काळात जी गरजू मुले आहेत त्यांना मदत म्हणून देण्याचा मानस आहे. मला मिळालेल्या पैशाच्या व्याजावरच माझे शिक्षण झाले आहे. उलट जे पैसे जास्त मिळालयचे त्यात माझा होस्टेल आणि जेवणाचा खर्च सुद्धा सुटला. पैशाअभावी मला शिकता येईल की नाही अशी माझ्या वडीलांनी चिंता होती; मात्र आता माझे शिक्षण झाल्याने तेही निर्धास्त झाले आहे. मुलगी शिकली पाहिजे, असा त्यांचा कायम विचार होता. नुकताच माझी 'टीसीएस'साठी कॅम्पस इंटरव्हूद्वारे निवड झाली आहे. नोकरी लागल्यानंतर अनेकांना मदत करण्याची इच्छा आहे, असेही चैताली आवर्जून सांगते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदित्य ठाकरे नाशकात

$
0
0

ßआदित्य ठाकरेंचा

आजपासून दौरा

नाशिक : शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे २४ ऑगस्टपासून दोन दिवस नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. २४ ऑगस्ट रोजी ग्रामीण भागात तर, २५ ऑगस्ट रोजी नाशिक शहरात त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ चौधरी यांनी दिली.

शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता मालेगाव येथे मोफत दाखले वाटप व आरोग्य शिबिर होईल. दुपारी दोन वाजता नांदगाव येथे सेल्फ डिफेन्स व आरोग्य शिबिराला ठाकरे उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर पिंपळगांव बसवंत व सायंकाळी पाच वाजता दिंडोरीतील मोहाडी येथील सह्याद्री अॅग्रोला ते भेट देणार आहेत. शनिवार सकाळी दहा वाजता रोजी सिडकोतील महाआरोग्य शिबिर, साडेअकरा वाजता मध्य नाशिक मतदार संघात सेल्फ डिफेन्सच्या कार्यक्रमानंतर ठाकरे भगुर येथील बसस्थानकाच्या भूमीपुजनाला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर घोटी येथे इगतपुरी-त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघ संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रोड फर्निचरवर तीन कोटींची उधळण

$
0
0

(शुभवार्ता)

शहरातील रस्ते चकाकणार

सुशोभीकरणासाठी तीन कोटींची तरतूद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील रस्ते अधिक चकचकीत व सुशोभित करण्यासह वाहतूक सुरक्षेसाठी महापालिकेने तीन कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. रोड फर्निशिंगअंतर्गत थर्मोप्लास्टिक पेन्ट मारणे, कॅटआय बसविणे, रोडमार्कर, डेलीनेटर, साईन बोर्ड बसवणे, झेब्रा पट्टे मारणे, रिफ्लेक्टर्स बसविणे आदी कामे केली जाणार आहेत. वर्षभरासाठी हे काम केले जाणार असल्याने रस्त्यांच्या सौंदर्यात अधिक भर पडणार आहे.

महापालिका हद्दीत जवळपास दोन हजार १८९० किलोमीटर लांबीचे रस्ते आहे. शहरातील बहुसंख्य प्रमुख रस्ते डांबरीकरण झाले असून, चकचकीत आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यात तसेच मनसेच्या सत्ताकाळात रस्त्यांवर सातशे कोटींचा खर्च झाला आहे. त्यामुळे रस्ते चकचकीत असले तरी त्यावर दिशादर्शक फलक व सुरक्षेसाठीच्या उपाययोजना करणे आवश्यक असते. या उपाययोजनांसाठी दरवर्षी पाच ते सहा कोटींचा खर्च केला जातो. वाहतुकीच्या सुरक्षेसाठी रिफ्लेक्टर्स लावणे, स्पीड ब्रेकर्सवर पट्टे मारणे, झेब्रा क्रॉसिंग,थर्मोप्लास्टिक पेन्ट मारणे, कॅटआय बसविणे, डेलीनेटर लावणे आदी कामे केली जातात. पावसाळ्यात या सर्व कामांवर पाणी फेरले जाते. त्यामुळे दरवर्षी निविदा काढून नव्याने ही कामे केली जातात. यंदा बजेटमध्ये रस्ते सुरक्षितता शीषर्काखाली तीन कोटी १३ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने या कामासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. २६ सप्टेंबरपर्यत पात्र ठेकेदारांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. या कामांमुळे रस्त्यांचे सौंदर्य अधिक वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समता विचारींकडून मनमाडला निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनामागील मुख्य सूत्रधाराला त्वरित अटक करावी. तसेच समतेच्या विचारांचा राज्यात पुरस्कार व्हावा यासह इतर मागण्यांसाठी गुरुवारी मनमाड शहरात समता विचारी कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी दाभोळकर यांच्या खुनामागे असलेल्या जात्यांध सूत्रधाराचा शोध घेऊन तातडीने अटक व्हावी, अशी मागणी व अपेक्षा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मनमाड शहरात गुरुवारी येथील शिवाजी चौकात फुले, शाहू, आंबेडकर समतावादी विचारांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र जमले. हातात विविध फलक घेवून ते एकात्मता चौकात आले. त्यांनी जोरदार निदर्शने केली. दाभोळकर यांच्या खुनामागे असलेल्या जात्यांध वृत्तीचा पर्दाफाश करावा तसेच सूत्रधाराचा तपास लावून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी निदर्शकांनी घोषणा दिल्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अशोक परदेशी, प्रभारी नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ पगारे, फुले शाहू आंबेडकर मूलनिवासी मंचचे फिरोज शेख, नगरसेवक रवींद्र घोडेस्वार, आनंद शिनगारे, अशोक व्यवहारे उपस्थित होते. निर्देशकांनी मंडल अधिकारी कैलास चौधरी यांना मागण्यांचे निवेदन दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनुस्मृती, ईव्हीएम मशिनचे दहन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'मोदी तेरी दादागिरी नहीं चलेगी..., मोदी तेरी गुंडागिरी नहीं चलेगी' अशा घोषणा देत राष्ट्रवादी महिला काँग्रेसने 'संविधान बचाओ.. देश बचाओ' रॅलीत गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकात मनुस्मृती आणि ईव्हीएम मशिनचे दहन केले. या वेळी माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान उपस्थित होते. या वेळी जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

उत्तर महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी बारापासून 'संविधान बचाओ.. देश बचाओ' कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी महिलांनी 'मेरा संविधान' ही नृत्यनाटिका सादर केली. त्यानंतर संविधानावरील माहितीपट दाखविण्यात आला. संविधान बचाओ, महिलांवरील वाढते अत्याचार, महिला आरक्षण, सातबारा, शेतकरी आत्महत्या आदी ठराव संमत करण्यात आले. जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे व शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले.

प्रमुख नेत्यांबरोबरच अरुण गुजराथी, माजी आमदार विद्या चव्हाण, उषा दराडे, सुरेखा ठाकरे, सक्षना सलगर यांची या वेळी भाषणे झाली. माजी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, आमदार दीपिका चव्हाण, नरहरी झिरवाळ, जळगावच्या महिला जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील, नंदुरबारच्या जिल्हाध्यक्षा हेमलता, धुळ्याच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्षा राजश्री घुले पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या अमृता पवार, शहराध्यक्षा अनिता भामरे, नगरसेविका सुषमा पगारे, समिना मेमन, गजानन शेलार, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

$
0
0

नाशिक : अंगणात खेळत असलेल्या चार वर्षांच्या बालिकेचा विषारी सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाला. ही घटना चांदशी (ता. नाशिक) येथे घडली.

वेदिका मुरलीधर ठोमरे (रा. अशोका शाळेजवळ, चांदशी) असे मृत बालिकेचे नाव आहे. वेदिका गुरूवारी (दि. २३) सकाळी आपल्या घरासमोर अंगणात खेळत असतांना तिचा विषारी सापावर पाय पडला. यामुळे तिला सर्पदंश झाला होता. ही बाब लक्षात येताच वडील मुरलीधर ठोमरे यांनी तिला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिक तालुका पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बुरुडवाडीत आत्महत्या

नाशिक : पंचवटी, संजयनगर परिसरातील बुरूडवाडीमधील रहिवाशी असलेल्या सुभाष बाळू निसाळ (४७) या व्यक्तीने आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. निसाळ यांनी गुरूवारी (दि.२३) सकाळी अज्ञात कारणातून साडीने गळफास लावून घेतला. ही बाब लक्षात येताच त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तात्काळ दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदित्या ठाकरे प्रथमच मालेगावी येणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे शुक्रवारी मालेगाव दौऱ्यावर येत असल्याने शिवसैनिक व युवा सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आदित्य ठाकरे यांचा हा पहिला मालेगाव दौरा असून, त्यांच्या स्वागताची शहरात जय्यत तयारी करण्यात आली आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता शहरातील मनमाड चौफुली येथे आदित्य ठाकरे यांचे आगमन होईल. त्यानंतर बाईक रॅली, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, युवक-युवतींशी संवाद, बाळासाहेब ठाकरे तालुका क्रीडा संकुल येथे महिला व युवतींसाठी कराटे प्रशिक्षण आदी कार्यक्रम होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बारावी’चा आज निकाल

$
0
0

\B'बारावी'चा आज निकाल\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज, शुक्रवारी (दि. २४ ऑगस्ट) दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. मंडळाच्या http://mahresult.nic.in या वेबसाइटवर हा निकाल पाहता येणार आहे. नाशिकमधील ६ हजार ३०८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा तेरा केंद्रांवर दिली होती. परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून यंदा कठोर नियमावलीही तयार करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रावणक्वीनच्या सौंदर्याला तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा स्पर्श

$
0
0

जपा त्वचेचं सौंदर्य

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित श्रावणक्वीन स्पर्धेच्या ग्रुमिंग सेशनमध्ये स्पर्धकांना स्पर्श क्लिनिकतर्फे सौंदर्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सौंदर्याचा ठेवा कसा टिकवून ठेवता येईल आणि बाह्य सौंदर्यावर भर न देता अंतरसौंदर्य कसे प्रखरतेने टिकवता येईल यावर तज्ज्ञ डॉ. सचिन वाघ यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

या सेशनमध्ये तज्ज्ञांनी स्पर्धकांना मार्गदर्शन करत त्यांच्या समस्यांचे निवारण केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. सचिन वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध विषयांवर भर दिला आणि मार्गदर्शन केले. यावेळी तरुणींना केस गळती व त्यांची कारणे आणि त्यावरील उपाय, निरोगी त्वचेचे रहस्य, निरोगी त्वचा ठेवण्यासाठी लागणारे उपाय, त्वचेला हानिकारक असणाऱ्या गोष्टी, उन्हाळ्यात त्वचेवर घेण्यात येणारी खबरदारी, घातकी ठरत असलेल्या फेअरनेस क्रीम, गोरेपणा आणि सुंदरतेसाठी करण्यात येणारा अतिविचार, चांगल्या सवयी पाळा, तणाव टाळा, बदललेल्या जीवन शैलीचा त्वचेवर होणारा परिणाम या गोष्टींविषयी मार्गदर्शन करण्यात आले. बदललेल्या जीवन शैलीत बदल करण्याचा सल्ला यावेळी तज्ज्ञांनी स्पर्धकांना दिला. सर्व स्पर्धकांना स्पर्शतर्फे एक वर्षासाठी मोफत कौन्सेलिंग करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


एक्सेल टार्गेट शुटर्स असोसिएशनचे नेमबाज राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र (पेन्डींग)

$
0
0

एक्सेल टार्गेट शुटर्स असोसिएशनचे नेमबाज

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अहमदाबाद येथे सुरू असलेल्या वेस्ट झोन राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत एक्सेल टार्गेट शुटर्स असोसिएशनचे चार नेमबाज राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. अपूर्वा पाटील ही युवा नेमबाज या स्पर्धेसाठी पात्र झाली आहे. अपूर्वा जन्मताच कर्णबधीर असून, यंत्राच्या सहाय्याने ती ऐकू शकते. ती नियमितपणे पिस्तूल नेमबाजीचा तांत्रिक सराव करते. ती सध्या आठवीत शिकत आहे. तिला नेमबाजीचा सराव करण्यासाठी विविध स्तरावरून मदत घ्यावी लागते. एक्सेल नेमबाजी संस्थेने देखील तिला सरावासाठी शिष्यवृत्ती दिली आहे. दिल्ली येथे नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या खुल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी ती पात्र ठरली आहे.

श्रावणी देवरे ही नवोदित नेमबाज असून ती दहावीत शिकते आहे. गेल्या एक वर्षांपासून ती नेमबाजीचा सराव करत आहे. ती नेमबाजीमधील एअर पिस्तूल या क्रीडा प्रकारात राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. समृद्ध वखारे अकरावीत भोसलामध्ये शिकत आहे. गेल्या दोन वर्षांपासून नेमबाजीचा सराव करीत आहे. एअर पिस्तूल नेमबाजी क्रीडा प्रकारात तो देखील राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. त्याची ही द्वितीय राष्ट्रीय स्पर्धा आहे. सोहम पासवान नववीत शिकत असून, गेल्या दोन वर्षांपासून नेमबाजीचा सराव करतोय. सोहम पासवान देखील ही द्वितीय राष्ट्रीय स्पर्धा खेळणार आहे. हे सर्व नेमबाज मोनाली गोऱ्हे (राष्ट्रीय प्रशिक्षक) व सह प्रशिक्षक तेजस्विनी सोनपत्की यांच्या मार्गदर्शनाखाली भीष्माराज बाम शूटिंग रेंज, एक्स एल टार्गेट शूटर्स असोसिएशन येथे सराव करतात. एक्सेल नेमबाजी संस्थेच्या अध्यक्षा शर्वरी लथ यांनी सर्व नेमबाजांचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिरजकर फसवणुकीत आणखी तिघांना अटक

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील गुंतवणुकदारांना कोट्यवधी रुपयांना गंडावणाऱ्या मिरजकर सराफ फसवणुकीच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेने आणखी तिघा संशयितांना अटक केली आहे. या तिघांना कोर्टाने शुक्रवारपर्यंत (दि. २४) पोलिस कोठडी सुनावली असून, पोलिसांकडून मालमत्तेचा शोध सुरूच आहे.

भरत सोनवणे, वृशाल नगरकर आणि विजयदीप पवार अशी या तिघा संशयित आरोपींची नावे आहेत. या संशयितांकडून मिरजकर घोटाळ्यातील व्यवहाराची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. दरम्यान, या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हर्षल नाईक याच्यासह माजी नगरसेवक व त्रिशा जेम्सचा संचालक अनिल चौघुले आणि आणखी काही संशयित फरार आहेत. या प्रकरणी गुंतवणूकदारांची संख्या वाढत असून, आतापर्यंत ७०८ तक्रारी नोंदवून घेण्यात आल्या आहेत. या तक्रारदाराच्या तक्रारींनुसार या घोटाळ्यात २२ किलो सोन्याची गुंतवणूक आणि २१ कोटींपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याचे दिसते. आर्थिक गुन्हे शाखेने आतापर्यंत ३० किलो चांदी आणि अवघे १५ तोळे सोने हस्तगत केल्याचे समजते.

याबाबत पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले की, संशयितांच्या मालमत्तांचा शोध घेतला जातो आहे. आतापर्यंत सात ते आठ संशयितांना अटक केली असून, मुख्य सूत्रधार हर्षल नाईकला अटक करणे बाकी आहे. पोलिस तपासात निष्पण होणाऱ्या मालमत्तांची खातरजमा करण्यात येत असून, त्यानंतर सदरची मालमत्ता जप्त करण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केरळला मदतीसाठी रेल्वे पार्सल मोफत

$
0
0

केरळला मदतीसाठी रेल्वे पार्सल मोफत

जेलरोड : केरळमध्ये महापुराने थैमान घातले असून, तेथे देशभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. ज्या व्यक्ती अथवा संस्थांना रेल्वेने केरळला मदतीची पार्सल पाठवायची असतील त्यांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती भुसावळच्या वरिष्ठ वाणिज्य प्रबंधकांनी दिली आहे. भुसावळ रेल्वे विभागातून केरळमधील एर्नाकुलमसाठी एक व्हीपीएच पार्सल व्हॅन मंगला एक्स्प्रेसद्वारे रवाना झाली. जळगावच्या भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशनने या व्हॅनद्वारे आठशे पॅकेजची मदत पाठविण्यात आली. त्याला मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने पार्सलचा कोणताही दर आकारला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवहन अधिकारी आज शहरात

$
0
0

परिवहन अधिकारी आज शहरात

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

देशभरात पायलट प्रोजेक्ट ठरलेल्या स्वयंचलित वाहन तपासणी केंद्राची पाहणी करण्याकरिता आणि आज, शुक्रवारी (दि. २४) होत असलेल्या परिषदेसाठी देशभरातील परिवहन विभागाचे अधिकारी नाशिकमध्ये हजेरी लावणार आहेत. देशात प्रथमच अशी परिषद होत आहे. सातपूर येथील हॉटेल आयबीएसमध्ये सकाळी पावणेदहा ते दुपारी ३ या वेळेत ही परिषद होईल.

नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या आवारात २०१५ मध्ये देशातील पहिल्या संपूर्ण स्वयंचलित वाहन निरीक्षक व तपासणी केंद्राची उभारणी करण्यात आली. हे केंद्र सुरू झाल्यापासून ८१ हजार वाहनांची तपासणी याद्वारे करण्यात आली. या केंद्राची उपयुक्तता लक्षात येण्यासाठी देशभरातील परिवहन आयुक्त, तसेच अधिकारी यांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला आहे. रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने याच पार्श्वभूमीवर तांत्रिक परिषदही घेतली आहे. या परिषदेला मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, देशभरातील परिवहन आयुक्त, अप्पर परिवहन आयुक्त, उपायुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी, सीआयआरटी, एआरएआय व आयसीएटी या संस्थांचे संशोधक असे ८० अधिकारी सहभागी होणार आहेत. नाशिकमध्ये होणारी देशातील ही पहिलीच परिषद असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सांगितले. नाशिकमध्ये सुरू असलेल्या स्वयंचलित केंद्रामुळे मानवी हस्तक्षेप टळतो, तसेच यामुळे वाहनातील दोष मशिनद्वारेच समोर येतात. स्वयंचलित केंद्रात वाहन तपासणीमुळे वाहनदोषामुळे होणारे अपघात घटू शकतात, असा दावा करण्यात येतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूररेषेतील बांधकामांना अभय?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सन २००८ मध्ये गोदावरी आणि नंदिनी (नासर्डी) नदीला आलेल्या महापुरानंतर आखलेल्या लाल व निळ्या पूररेषांमुळे नदीकाठावर बाधित झालेल्या हजारो इमारतींना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दोन्ही नद्यांचे पूरप्रभाव क्षेत्र कमी करण्यासंदर्भातील आघात मूल्यमापन अहवाल (इम्पॅक्ट अॅसेसमेंट रिपोर्ट) महापालिकेला तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी दिली.

महापालिकेने गोदावरी व नंदिनी नदीपात्रातील पूरप्रभाव कमी करण्यासाठी सहा बंधारे हटविल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. सोबतच दोन्ही नद्यांचा गाळ काढला जाणार असल्याने येथील बांधकामांना दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुरुवारी राज्यातील परिवर्तनीय प्रकल्पांचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या व्हिडीओ कॉन्फरन्सला आयुक्त मुंढे यांच्यासह आमदार प्रा. फरांदे, सीमा हिरे, महापौर रंजना भानसी, स्थायी समितीच्या सभापती हिमगौरी आहेर-आडके आदी उपस्थित होते. आमदार प्रा. फरांदे यांनी यावेळी गोदावरी आणि नंदिनी नदीची पूररेषा कमी करण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी आयुक्त मुंढे यांनी नंदिनी नदीपात्रात पुराला अडथळा ठरणारे पिंपळगाव खांब, सातपूर व अंबड लिंकरोड, टाकळी येथील रामदास स्वामी मठ येथील जुना पूल, काठे गल्लीतील सोनजे मार्गावरील नंदिनी नदीपात्रातील बंधारा, आयटीआय सिग्नल व सिडकोतील संभाजी चौकातील नंदिनी नदीपात्रातील बंधारा महापालिकेने हटविल्याची माहिती दिली. त्याव्यतिरिक्त स्मार्ट सिटीअंतर्गत गोदावरी व नंदिनी नदीपात्रातील गाळ काढून खोलीकरण केले जाणार असून, होळकर पुलाखाली बलून गेट बसविले जाणार आहे. होळकर पूल ते धोबी घाटदरम्यान नदीपात्रातील काँक्रीट हटविले जाणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भातील आघात मूल्यमापन अहवाल सादर करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या आहेत. त्यामुळे या दोन्ही नद्यांची पूररेषा कमी होण्यास मदत होणार आहे.

--

गावठाणाला होणार फायदा

गोदावरी आणि नंदिनीला सन २००८ व २०१६ मध्ये आलेल्या महापुरात नदीकाठावरील रहिवासी भाग हा पूर्णतः पाण्याखाली गेला होता. त्यामुळे हजारो मिळकतींचेही नुकसान झाले होते. सन २००८ मध्ये आलेल्या महापुरानंतर पूररेषा तयार करण्याचा निर्णय झाला होता. त्यासाठी महापालिका, जलसंपदा व केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राच्या पुणे कार्यालयाकडून सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातून दोन्ही नदीकाठांवर निळी व लाल रेषा निश्चित करून यादरम्यान येणाऱ्या मिळकतींना परवानगीच नाकारण्यात आल्याने जवळपास साडेतीन हजार मिळकती अडचणीत सापडल्या होत्या. त्यामुळे ही अडचण दूर करण्यासाठी सरकारकडे पाच वेळा बैठका घेण्यात आल्या. या नव्या प्रयत्नांमुळे पूरप्रभाव क्षेत्र घटणार असून, या मिळकतींनाही बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळणार असल्याची माहिती आमदार प्रा. फरांदे यांनी दिली आहे.

--

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आघात मूल्यमापन अहवाल (इम्पॅक्ट अॅसेसमेंट रिपोर्ट) सादर करण्याचे आदेश दिल्याने पुराचे अडथळे दूर होऊन पूररेषेचा प्रभाव कमी होणार आहे. त्यासाठी अभ्यास समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. पूररेषेचे नव्याने सर्वेक्षण होऊन नवी पूररेषा अस्तित्वात येईल. त्यामुळे दोन्ही नद्यांकाठच्या रहिवाशांना त्याचा मोठा फायदा होणार आहे.

-प्रा. देवयानी फरांदे, आमदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images