Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जिल्हाधिकारी कार्यालयात सौर प्रकाश!

$
0
0
ऐतिहासिक वास्तू असलेल्या नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात लवकरच सौर ऊर्जेचा प्रकाश पडणार आहे. यासंदर्भात सर्व्हे करण्यात आला असून कार्यालयातील बहुतांश विजेची मागणी सौर ऊर्जेद्वारे पूर्ण करण्यात येणार आहे.

जळगावातील धरणे रिकामीच

$
0
0
गतवर्षाच्या तुलनेत यंदा समाधानकारक पाऊस पडत असला तरी जिल्ह्यातील धरणात अद्याप समाधानकारक पाणीसाठा नाही. अन्य धरणातही पाणीसाठ्याची गंभीर स्थिती आहे. धरणात पाणीसाठा नसल्याने प्रशासकीय पातळीवर चिंता व्यक्त होत आहे.

घरातून एक लाख लंपास

$
0
0
कॅम्प भागात अज्ञात चोरट्यांनी एका बंगल्याचा कडीकोयंडा तोडून रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने असा १ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

एआरके महिंद्रा दालनाचा शुभारंभ

$
0
0
महिंद्राचे अधिकृत शो रूम म्हणून एआरके ऑटो व्हिल्स हे दालन नाशिककरांच्या सेवेत आले. महिंद्राने नुकतीच लाँच केलेली सेंच्युरो ही मोटारसायकल दालनात दाखल झाली आहे.

कंटेनरच्या धडकेत एक ठार

$
0
0
येवल्याहून शिर्डीकडे जाणाऱ्या सॅण्ट्रो कारला कंटेनरने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक ठार, तर पाच जण जखमी झाले. येवला-कोपरगाव रस्त्यावरील साई सावन ढाब्याजवळ गुरुवारी सकाळी हा अपघात घडला.

येवल्यातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त

$
0
0
येवले शहरातील एका जागेवरून अनाधिकृत बांधकामे लोखंडी टपऱ्या काढण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने दिल्यानंतर येवला नगरपालिकेने गुरुवारी अतिक्रमण मोहीम हाती घेतली. यामध्ये ७४ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

समतासंदेश देणारे आद्यपीठ

$
0
0
वारकऱ्याची वारीबद्दल जशी एकविधता, तशीच पंढरीसंबंधाने अनन्यता. किती? तर, ‘आणिक न करी तीर्थव्रत.’ पुराणांतरीही पंढरीचे महिमान गाईलेले आहे. ब्रह्मदेवाच्या प्रदीर्घ कालगणनेचा दिनांत, त्याचे शतवर्षांते गणित आणि अठ्ठावीस युगांची पूर्णता पंढरीस होते, इतकी ही नगरी जुनाट आणि चिरंतनही असल्याचे श्रीनामदेवराय सांगतात.

शालेय वाहतुकीसाठी १५ एसटी वाढल्या

$
0
0
नाशिक शहरातील जवळपास ७५ हजार शालेय विद्यार्थी दररोज एसटी बसने प्रवास करतात. सध्या शालेय बस वाहतुकीच्या ५० फेऱ्या असून त्यामध्ये शुक्रवारपासून १५ अतिरिक्त बसची वाढ होणार आहे.

‘सीमॅट’ प्रवेश परीक्षा सप्टेंबरमध्ये

$
0
0
अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेमार्फत (एआयसीटीई) एमबीए अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०१४-२०१५ मधील प्रवेशासाठी ‘सीमॅट’ या प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले असून २६ ते ३० सप्टेंबरदरम्यान ही ऑनलाइन परीक्षा होणार आहे.

नाशिक-पुणे रोड अंधारात

$
0
0
ऐन पावसाळ्यात नाशिक-पुणे रोडवरील अनेक ठिकाणचे पथदीप बंद असून वाहनचालकांना वाहन चालवणे कठीण जात आहे. या बंद पथदीपांमुळे किरकोळ अपघात होण्याचे प्रकार होत आहेत.

गटतट विसरा

$
0
0
'मिशन २०१४' अंतर्गत काँग्रेसची सत्ता कायम ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे, त्याआड येणारी गटबाजी, हेवेदावे खपवून घेतले जाणार नाहीत, असा सूचक इशारा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा राज्याचे सहप्रभारी श्योराज वाल्मिकी यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला.

विज्ञानाच्या प्रसाराचा प्रयोग पोहोचणार देशभर

$
0
0
क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या विज्ञानाच्या प्रसारासाठी संडे सायन्स स्कूल ही संकल्पना गेल्या दशकभरापासून नाशिकमध्ये रूजवली गेली आहे. प्राथमिक स्तरापासून राबवला जाणारा हा प्रयोग आता देशभर पोहोचणार आहे.

रिक्षातून होणार मोबाइल रिचार्ज

$
0
0
ग्राहकांना जास्तीत जास्त चांगल्या आणि घरपोच सुविधा देण्याच्या स्पर्धेत युनिनॉरने आघाडी घेतली असून, आता नाशिकमधील रिक्षाचालकांकडूनही युनिनॉरचे रिचार्ज मिळणार आहे. पुण्यानंतर ही ऑटो रिचार्ज सुविधा नाशिकमध्ये सुरू करण्यात आली.

गोदावरीची जबाबदारी पालिकेचीच

$
0
0
गोदावरी नदीला प्रदूषणमुक्त करण्याची जबाबदारी नाशिक महापालिकेचीच असून त्यांनीच आवश्यक तो खर्च करावा, अशी खंबीर भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने गुरुवारी मुंबई हायकोर्टात मांडली. मात्र, याप्रकरणी महापालिकेची बाजू ऐकूनच कोर्ट निकाल देणार आहे.

पेट्रोलपंप चालकांचाही एल्गार

$
0
0
एलबीटी कायद्यातील जाचक तरतुदींना विरोध करण्यासाठी पेट्रोलपंप चालकांनीही संपाचे हत्यार उपसले आहे. येत्या १५ आणि १६ जुलै रोजी महापालिका हद्दीतील सर्व पेट्रोलपंप कडकडीत बंद पाळणार असल्याचे नाशिक जिल्हा पेट्रोलपंप असोसिएशनचे सचिव विजय ठाकरे यांनी ‘मटा’ला सांगितले.

कैद्यांच्या वेतनातही होणार भरघोस वाढ!

$
0
0
महाराष्ट्रातील कैद्यांनाही इतर राज्यांप्रमाणे किमान वेतन देण्याची मागणी होऊ लागल्याने यावर निर्णय घेण्यासाठी सरकारने समिती स्थापन केली आहे. या समितीने वाढ सुचविल्यास कैद्यांच्या वेतनात भरघोस वाढ होणार असून अभिनेता संजय दत्तलाही याचा लाभ मिळणार आहे.

खेळातून विज्ञानाची गोडी आता देशभर!

$
0
0
शालेय विद्यार्थ्यांना खेळातून विज्ञानाची गोडी लागावी यासाठी सुमारे दशकभरापासून नाशिकमध्ये संडे सायन्स स्कूलचा अभिनव प्रयोग सुरू आहे. या अफलातून प्रयोगाला मिळालेले यश पाहून आता तो देशभरातील महत्त्वाच्या ४० शहरांमध्ये राबवला जाणार आहे.

मोरवाडी परिसराला बसची प्रतीक्षा

$
0
0
गंगापूर रोडवरील आसारामबापू आश्रमापासून मोरवाडी परिसरात जाण्यासाठी वाहतूक सेवेअभावी नागरिकांचे हाल होत आहेत. या मार्गावर बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

चव्हाण प्रतिष्ठानतर्फे शनिवारी ‘दि लास्ट लीयर’

$
0
0
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नाशिक विभागीय केंद्र व दादासाहेब फाळके फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपट रसिकांना दर महिन्यात दाखविण्यात येणाऱ्या चित्रपटांमध्ये शनिवार, १३ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता दिग्दर्शक ऋतुपर्णो घोष यांचा ‘दि लास्ट लियर’ दाखविण्यात येणार आहे.

साहित्य अकादमीतर्फे ग्रंथप्रदर्शन

$
0
0
मुंबई साहित्य अकादमीच्या प्रादेशिक कार्यालयाच्यावतीने महात्मा गांधी रोड येथील मायबोली वाचनालयात ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार (१३ जुलै) दुपारी चार वाजता वनाधिपती विनायकदादा पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्‌घाटन होईल.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images