Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बार्न्स स्कूलमध्ये आज शालेय फुटबॉल स्पर्धा

$
0
0

बार्न्स स्कूलमध्ये आज शालेय फुटबॉल स्पर्धा

देवळाली कॅम्प : येथील बार्न्स स्कूलमध्ये आज, मंगळवारी (दि. २८) तिसाव्या अखिल महाराष्ट्र अँग्लो इंडियन शालेय फुटबॉल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता या स्पर्धेस प्रारंभ होणार आहे. शालेय विद्यार्थ्यांत बंधुभाव आणि खिलाडूपणा वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने १९८८ पासून ही स्पर्धा आयोजित केली जात असून, यंदा देवळालीतील बार्न्स स्कूलकडे या स्पर्धेचे यजमानपद आलेले आहे. या स्पर्धेत राज्यातील १० संघ सहभागी झालेले असून, त्यात मुंबईची बॉम्बे स्कॉटिश स्कूल, सेंट पीटर्स स्कूल, चॅम्पियन स्कूल, पुण्याची बिशप्स स्कूल अशा माध्यमिक गटातील चार, तर उच्च माध्यमिकमध्ये देवळालीची बार्न्स स्कूल, मुंबईची ख्रिस्त चर्च स्कूल, बाँम्बे स्कॉटिश स्कूल, कॅथेड्रल अँड जॉन कॅनन स्कूल, पुण्याची बिशप्स स्कूल अशा सहा संघांचा समावेश आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक व बास्केटबॉल प्रशिक्षक राजेश क्षत्रिय यांची प्रमुख उपस्थिती राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ठार मारण्याचा प्रयत्न; पाच वर्षांची सक्तमजुरी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह घरी आलेल्या मित्रावर गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी दीपक उर्फ सोनू अशोक परदेशी (रा़ साईराम रो हाउस, म्हाडा कॉलनी, पाथर्डी शिवार) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. सी. खटी यांनी सोमवारी (दि. २७) पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची सुनावली.

आरोपी दीपक परदेशी यास पत्नी कोमलच्या चारित्र्यावर संशय होता. दीपकचा १९ ऑगस्ट २०१६ रोजी वाढदिवस असल्याने त्याचा मित्र नागेश्वर बंगाली ठाकूर (रा. शांतीनगर, मांडसांगवी) हा मित्रांसह केक घेऊन रात्रीच्या वेळी पार्टी करण्यासाठी परदेशीच्या घरी गेला होता. केक कापल्यानंतर सर्व मित्र दारू प्याले आणि निघून गेले. मात्र, ठाकूर हा परदेशीच्या घरी थांबलेला होता़ चरित्र्यावर संशय घेत दीपकने रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पत्नीशी भांडण सुरू झाले. भांडण विकोपाला गेल्यानंतर परदेशीने बॅगमधून गावठी कट्टा काढून पत्नीवर एक तर ठाकूरवर दोन गोळ्या झाडल्या. कोमलच्या डोक्यात गोळी घुसल्याने ती गंभीर जखमी झाली तर ठाकूरच्या गळ्यास व गालास गोळ्या चाटून गेल्या. गोळीबारामुळे घाबरलेल्या ठाकूरने आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांनी परदेशीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये परदेशीविरुद्ध ठार मारण्याबाबतचा गुन्हा दाखल झाला. कोर्टात सरकारी वकील कल्पक निबांळकर यांनी आठ साक्षीदार तपासले. परदेशीची पत्नी कोमल हिने सरकार पक्षाला सहकार्य केले नाही. मात्र, डोक्यास झालेली जखम व हॉस्पिटलमध्ये झालेले उपचाराबाबत तिला आपले म्हणणे मांडता आले नाही. सबळ पुराव्यांमुळे कोर्टाने परदेशी यास दोषी ठरवत पाच वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिडको-प्रभाग सभा

$
0
0

(फोटो आहे)

सत्ताधाऱ्यांवरच भांडण्याची वेळ!

नाशिकरोड प्रभागसमिती सभेतील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड प्रभाग समितीची सभा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करून सोमवारी (ता. २७)तहकूब करण्यात आली. त्यानंतर सभापती पंडित आवारे यांच्या दालनात झालेल्या पालिका अधिकारी व नगरसेवकांच्या बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी पालिका अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर आगपाखड केली.

नाशिकरोड विभागीय कार्यालयात झालेली ही सभा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करून तहकूब करण्यात आली. प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेवक बाजीराव भागवत, केशव पोरजे, सत्यभामा गाडेकर, ज्योती खोले, मिरा हांडगे, जयश्री खर्जुल, विशाल संगमनेरे, सुनिता कोठुळे, अंबादास पगारे, सीमा ताजणे, मंगला आढाव आदी उपस्थित होते. त्यानंतर प्रभाग सभापतींच्या दालनात झालेली बैठक नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपाने गाजली. पालिकेच्या विद्युत, बांधकाम, पाणी या विभागाच्या अधिकाऱ्यांवर उपस्थित नगरसेवकांनी प्रश्नांची सरबत्ती केली. खड्ड्यांच्या प्रश्नावरही नगरसेवकांनी उपस्थित अधिकाऱ्यांवर तोंडसुख घेतले. गेल्या वेळच्या प्रभाग सभेत गाजलेल्या विषयांकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचे उघड झाल्याने नगरसेवकांचा तिळपापड झाला.

सत्ताधाऱ्यांवरच भांडण्याची वेळ

सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांवरच भांडण्याची दुर्दैवी वेळ आल्याने त्यांचे हसू झाले. पालिकेत भाजपला सत्ता मिळाल्यापासून आतापर्यंत झालेल्या सर्व प्रभाग सभेत भाजपच्याच नगरसेवकांना आपल्या प्रभागातील नागरी समस्या दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांशी झगडावे लागत असल्याने सत्ताधारी भाजपचा पालिका प्रशासनावर कोणताही अंकुश राहिलेला नसल्याची बाबही या निमित्ताने उघड झाली आहे. शहरात सर्व प्रभागांत बहुतेक पथदीप गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेले असल्याच्या प्रश्नाकडे प्रत्येक प्रभाग सभेत शिवसेनेसह भाजपच्या सर्वच नगरसेवकांनी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधलेले आहे. याशिवाय, अतिक्रमणाच्या मुद्द्यावरही सर्वपक्षीय नगरसेवकांनी आवाज उठविला आहे. मात्र, हे सर्व प्रश्न शहरात जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचायत समिती सदस्यास मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड पंचायत समितीचे सदस्य शिवा सुराशे यांच्यावर रविवार (दि. २६) रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान निफाड येवला महामार्गावर नैताळे गावाजवळ प्राणघातक हल्ला झाला. हल्लेखोर फरार झाले असून रात्री उशिरापर्यंत निफाड पोलिसात गुन्हा नोंदविणे सुरू होते. सुराशे यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहे.

शिवसेनेचे शिवा सुरासे हे खडक माळेगाव गणातून पंचायत समितीचे प्रतिनिधित्त्व करतात. निफाड येथून लासलगावकडे रविवारी रात्री आपल्या खासगी वाहनातून मित्रांसमवेत जात असताना नैताळे येथील बोरगुडे पेट्रोल पंपासमोर अज्ञात गुंडांनी त्यांची गाडी अडविली. आणि हॉकी स्टिक, लोखंडी रॉड व सळया यांनी मारहाण केली. यात शिवा सुराशे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना नैताळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि नंतर नाशिक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सुराशे यांच्यावर अचानक झालेला हल्ला राजकीय हेतूने की प्रशासनातील वाद यामुळे झाला अशी चर्चा नागरिकांमध्ये पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अकरावीच्या जागा वाढवा’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अकरावी प्रवेशात दहा टक्के जागा वाढवून मिळाव्यात, याबाबतच्या कार्यवाहीसाठी सर्व कॉलेजांना सूचित करावे, ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून काही विद्यार्थ्यांना अजूनही प्रवेश मिळालेले नाहीत. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्यापासून विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी खोळंबा होत असल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

पक्षाच्या वतीने शिक्षण उपसंचालक यांना अकरावी प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्याचे निवेदन देण्यात आले. अकरावीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविली जात असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागते. यंदाही तशीच परिस्थिती उद्भवली आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे झालेले नाही. त्यामुळे या प्रवेश प्रक्रियेचा गोंधळ समोर येऊ लागल्याचा आरोप पक्षाने केला आहे.

प्रवेश प्रक्रियेतून सध्या काही कॉलेजांचे प्रवेश विद्यार्थी क्षमतेनुसार पूर्ण झाले आहेत. या कॉलेजांमध्ये अकरावीच्या अध्यापनाचे कार्य सुरू झाले आहे. त्यामुळे वंचित विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाबाबतचा संभ्रम अधिक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर अकरावी प्रवेशाच्या १० टक्के जागा वाढवून द्याव्यात. तसेच सर्व वंचित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल. याकडे आपण वैयक्तिक लक्ष द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिक्षण उपसंचालक यांच्याकडे करण्यात आली. मनविसे राज्य उपाध्यक्ष संदीप भवर, शहराध्यक्ष सौरभ सोनवणे, संदीप पैठणपगार आदी उपस्थित होते.

पुढील वर्षी अशी तरतूद करा

शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत ७५ टक्के जागा शहरातील विद्यार्थ्यांसाठी तर २५ टक्के जागा नाशिक बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवाव्यात. जेणेकरून नाशिक बाहेरील विद्यार्थी अकरावी प्रवेशापासून वंचित राहणार नाहीत, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली.

मॅनेजमेंट कोटा रद्द करू नये

अकरावी प्रवेशातील मॅनेजमेंट कोटा ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करू नये, त्यासंदर्भात सर्व कॉलेजांना सूचित करावे, मॅनेजमेंट कोटा कॉलेजांनी समर्पित केल्याने कित्येक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित रहावे लागते. रिक्त जागांबाबत सर्व खुलासा वेबसाइटवर शिक्षण विभागाने करावा, अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तलवार घेऊन फिरणाऱ्या तरुणास पेठरोडला अटक

$
0
0

नाशिक : तलवार बाळगून फिरणाऱ्या तरुणास पंचवटी पोलिसांनी पेठ रोडच्या अंबिकानगर झोपडपट्टीतून अटक केली. संजय गोटीराम दळवी (२४, रा. अंबिकानगर झोपडपट्टी, पेठरोड, पंचवटी) असे त्याचे नाव आहे. संजय दळवी हा झोपडपट्टीत तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना रविवारी (दि. २६) मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे निमुळत्या टोकाची मूठ असलेली दोन फुटांची तलवार सापडली.

विवाहितेचा विनयभंग

नाशिक : विवाहितेचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणाऱ्या एकाविरुद्ध इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश तुपसुंदर (४९, रा. राजीवनगर, इंदिरानगर) असे या संशयिताचे नाव आहे. दोन वर्षांपूर्वी शहर पोलिसांनी तुपसुंदरला तडीपारही केले होते. इंदिरानगर भागातील २८ वर्षांची पीडित विवाहिता सोमवारी (दि. २०) सकाळी ११ वाजता गजानन मंदिरामागून जात असताना संशयित गणेशने तिचा पाठलाग करून अडविले. तिचा हात पकडून विनयभंग केला. तिला धमकावल्यानंतर तो पळून गेला.

मोपेडची चोरी

नाशिक : द्वारका, पखाल रोड भागातून चोरट्यांनी मोपेड चोरून नेली. रियाज पापामियाँ शेख (रा. पखालरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २१ व २२ ऑगस्ट रोजी सोसायटीच्या पार्किंगच्या मागे त्यांनी मोपेड (एमएच १५ सीएक्स ७६२५) उभी केली होती. चोरट्यांनी ती चोरून नेली आहे. याबाबत मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार सोनार करीत आहेत.

मद्यधुंद तरुणास अटक

नाशिक : मद्यधुंद अवस्थेत दुचाकी हाकणाऱ्यास भद्रकाली पोलिसांनी गंजमाळ परिसरात अटक केली. गणेश संजय खैरनार (२३, रा. मधुशील अपार्टमेंट, अंबड) असे त्याचे नाव आहे. मद्याचे सेवन करून गंजमाळ येथील मेडिकल दुकानासमोरून शनिवार (दि. २५) रात्री अकरा वाजता दुचाकी वेडीवाकडी चालवताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. याबाबत पोलिस शिपाई भाऊसाहेब चत्तर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास एसएसआय जाधव करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरपोच सेवेला मिळेना ‘आधार’!

$
0
0

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : अत्यवस्थ रुग्ण, अपंग, ज्येष्ठ नागरिक इतकेच नव्हे तर गर्भवती महिलांची फरफट थांबावी यासाठी त्यांना घरपोच आधार सेवा देण्याचा वसा जिल्हा प्रशासनाने स्वीकारला असला; परंतु या सुविधेला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे खेदजनक वास्तव पुढे आले आहे. शहरात गत वर्षभरात केवळ २१२ नागरिकांनी या घरपोच सेवेचा लाभ घेतला. जनजागृतीच्या अभावामुळे हा चांगला उपक्रम गुंडाळला जाण्याची भीती यामुळे व्यक्त होऊ लागली आहे.

भारतीय नागरिकत्वाचा पुरावा म्हणून गेल्या काही वर्षांपासून आधारकार्डला महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच आपला प्रत्येक व्यवहार आणि सेवेला आधार लिंक करण्याचा आग्रह सरकारने धरला आहे. नवीन आधारकार्ड काढणे असो किंवा आधार कार्डमध्ये दुरुस्त्या करणे असो यासाठी गतवर्षी आधार केंद्रांवर नागरिकांची झुंबड उडू लागली. तत्पर सेवा मिळत नसल्याने नागरिकांना मनस्ताप होऊ लागला. ज्येष्ठ नागरिक, अत्यवस्थ रूग्ण, गर्भवती महिला, अपंग बांधवांची फरफट होऊ लागल्याने युनिक आयडेंटिफिकेशन ऑथेरिटी ऑफ इंडियाने (यूआयएडी) अशा घटकांना घरी जाऊन सेवा देण्याचे निर्देश दिले. याबाबतच्या सूचना प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने गतवर्षी ऑगस्टमध्ये अशा घटकांसाठी दोन किट कार्यान्वित केले.

वर्षभरात या दोन किटच्या मदतीने २१२ नागरिकांना घरपोच सेवा देण्यात आली आहे. ८९ ज्येष्ठ नागरिक, ५९ अत्यवस्थ व्यक्ती, हॉस्पिटल्समध्ये दाखल ४३ रुग्ण तसेच अपंग आणि गर्भवती महिला अशा २१ व्यक्तींना जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या प्रतिनिधींनी घरी जाऊन आधारबाबतची सेवा पुरविली आहे. यामध्ये नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो यांमध्ये दुरुस्तीसारखी कामे करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या प्रतिनिधींनी पाथर्डी फाट्यापासून मखमलाबादपर्यंत आणि श्रमिकनगरपासून नाशिकरोडपर्यंत शहराच्या सर्वच भागात सेवा पुरविली आहे. इतकेच नव्हे तर अनाथ आश्रमातील मुलांचे आधारकार्डही अशाच पद्धतीने काढून दिली आहेत.

कलेक्टर ऑफिसला बनते यादी

शारिरीक मर्यांदांमुळे आधार केंद्रांवर जाऊन आधार नोंदणी किंवा दुरुस्ती करणेच शक्य नाही अशा नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासन शाखेत मदत मागता येते. अशा व्यक्तींचे नाव आणि पत्ता तेथे नोंदवून घेतला जातो. त्याची माहिती संबंधित किट हाताळणाऱ्या प्रतिनिधींना दिली जाते. त्या त्या परिसरात संबंधित प्रतिनिधी प्रिंटर, जीपीएस, पडदा, थंब स्कॅनर, आय स्कॅनर, लॅपटॉप, कॅमेरा घेऊन जातात. शक्यतो एका परिसरात किमान तीन ते चार जणांकडून घरपोच सेवेची मागणी होत असल्यास ही सेवा देणे सोयीचे ठरत असल्याचे प्रतिनिधींचे म्हणणे आहे.

यांनी घेतला सेवेचा लाभ

ज्येष्ठ नागरिक : ८९

अत्यवस्थ व्यक्ती : ५९

हॉस्पिटल्समध्ये दाखल रुग्ण : ४३

अपंग, गर्भवती महिला व इतर : २१

एकूण : २१२

लोगो : मटा विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

६६० जणांवर फेरीमार्गात उपचार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीला फेरी मारण्यासाठी गेलेल्यांपैकी तब्बल ६६० गरजू रुग्णांना जिल्हा प्रशासनाच्या आरोग्य यंत्रणेने तात्काळ उपचार सुविधा पुरविली.

फेरीमार्गावर रएका रुग्णाच्या हृदयामध्ये वेदना होत असल्याचे काही भाविकांच्या लक्षात आले. तेथे जवळच उपस्थित रुग्णवाहिकेतील पथकाला याची माहिती देण्यात आली. या रुग्णावर तातडीने प्राथमिक उपचार करून त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याखेरीज आरोग्याच्या तक्रारी उद्भवल्याने अन्य १२ रुग्णांनाही त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. फेरी मार्गावर चालतेवेळी जखमी होणे, अशक्तपणा जाणवू लागणे, मळमळणे, चक्कर येणे, पोटदुखी, हातपाय दुखणे यासारख्या आरोग्याच्या किरकोळ तक्रारी असणाऱ्या तब्बल ६४७ रुग्णांना जिल्हा प्रशासनाने सज्ज ठेवलेल्या आरोग्य यंत्रणेने मदत केल्याची माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मोबाइल चोरणाऱ्या तीन जणांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

बळी मंदिराच्या समोरील सरस्वती नगरमधील श्रीराम मोबाईल शॉपी येथे घरफोडी करून मोबाइल चोरीची घटना मंगळवारी, २१ ऑगस्टला घडली होती. तेथून ४८ हजार ९६० रुपयांचे मोबाइल चोरीस गेल्याची तक्रार सुनील झाल्टे यांनी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये केली होती.

या प्रकरणाचा तपास करताना अजय उर्फ काळ्या विष्णू घोडके (वय १९, रा. फ्लॅट नंबर १, साई महिमा सोसायटी, बळी मंदिरामागे), ऋषिकेश सुभाष चव्हाण (वय २१, रा. फ्लॅट नंबर १५, साई महिमा सोसायटी), प्रवीण उर्फ गोल्या सिद्धार्थ शिरसाट (वय १९, रा. अमृतधाम साई नगर, पंचवटी) यांना आडगाव पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सॅमसंग, मायक्रोमॅक्स, नोकिया, रेड मी, एलवाय, एलजी, स्पाईस, व्हीवो, झीव्हाक्स असे १४ मोबाइल हस्तगत करण्यात आले. आडगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरक्षक सूरज बिजली, पोलिस उपनिरीक्षक दिनेश मुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी या चोरट्यांना पकडून अटक केली.

वस्ताऱ्याने हल्ला

नाशिक : पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी एका पादचाऱ्यावर दोघांनी धारदार वस्ताऱ्याने हल्ला केल्याची घटना तलावडी भागात घडली. या घटनेत गंजमाळ भागात राहणारा तरुण जखमी झाला असून, त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयितास पोलिसांनी अटक केली आहे.

अझर फारुख शेख (३०, रा. खडकाळी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून शाहरुख शेख नावाचा त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. मोसिन सादीक पठाण (रा. पंचशिलनगर, गंजमाळ) या युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी मोसीन तलावडी भागातून रस्त्याने पायी जात असतांना पाठीमागून आलेल्या संशयितांनी शिवीगाळ करीत 'तू केस वापस ले', असे सांगत वाद घातला. यावेळी एकाने त्याच्या पाठीवर वस्ताऱ्याने वार केला. घटनेचा अधिक तपास हवालदार ढोली करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरात घुसून मारहाण

$
0
0

नाशिक : घरात घुसून तिघांनी एकास बेदम मारहाण केल्याची घटना तलावडी भागात घडली. या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल करीत एकास अटक केली. सादिक सलीम मेमन (रा. तलावडी) असे अटक झालेल्या संशयिताचे नाव आहे. तर खालीद जाकिर शेख (रा. खडकाळी) व परवेज मेमन (रा. तलावडी) हे दोघे अद्याप फरार आहेत. खडकाळी भागातील सलीम वजीर शेख यांना रविवारी (दि. २६) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास संशयितांनी घरात प्रवेश करून मागील भांडणाची कुरापत काढत बेस बॉलच्या बॅटने जबर मारहाण केली. यात शेख जखमी झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नीरज चोप्राचा ‘गोल्डन थ्रो’

$
0
0

नीरज चोप्राचा 'गोल्डन थ्रो'

सुधासिंग, नीना, धरुणला रौप्यपदक

वृत्तसंस्था, जकार्ता

भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत सोमवारचा दिवस अॅथलेटिक्ससाठी 'गोल्डन' ठरला. नीरज चोप्राने भाला फेकमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवले. भाला फेकमधील भारताचे हे एशियाडमधील पहिलेच सुवर्णपदक ठरले. त्याचबरोबर सुधासिंगने महिलांच्या ३ हजार मीटर स्टीपलचेसमध्ये, लांब उडीत नीना वरकिलने आणि पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत धरुण अय्यास्वामीने रौप्यपदकाची कमाई केली.

भाला फेकमध्ये नीरजने ८८.०६ मीटर फेक करून सुवर्णपदक निश्चित केले. चीनच्या लियू क्विहेनने (८२.२२ मी.) रौप्य, तर पाकिस्तानच्या अर्षद नदीमने (८०.७५ मी.) ब्राँझपदक मिळवले. या प्रकारात एकेकाळी पाकिस्तानचे वर्चस्व होते. भारताचा दुसरा खेळाडू शिवपालसिंग (७४.११ मी.) आठव्या स्थानावर राहिला. नीरजने पहिल्या प्रयत्नात ८३.४६ मीटर फेक केली. दुसरा प्रयत्न फाउल ठरला. तिसऱ्या प्रयत्नात त्याने ८८ मीटरचा टप्पा ओलांडला. चौथ्या प्रयत्नात ८३.२५, तर पाचव्या प्रयत्नात ८६.३६ मीटर कामगिरी नोंदवली. अखेरचा प्रयत्न फाउल ठरला. त्याचबरोबर नीरजने नवा राष्ट्रीय विक्रमही रचला. या वर्षीच्या दोहा डायमंड लीगमध्ये त्याने ८७.४३ मीटर कामगिरी नोंदवली होती. १९८२नंतर भाला फेकमधील भारताचे हे पहिलेच पदक ठरले. २० वर्षीय हरियाणाच्या सोनपतमधील नीरजने या वर्षीच्या गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवले आहे. भुवनेश्वरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली होती. २०१६मध्ये नीरजने २० वर्षांखालील जागतिक स्पर्धेत विक्रमासह सुवर्णपदक मिळवले होते.

३ हजार मी. स्टिपलचेस

सुधासिंगने महिलांच्या ३ हजार मीटर स्टिपलचेसमध्ये आपला ठसा उमटविला. तिने ९ मिनिटे ४०.०३ सेकंद वेळ नोंदवून दुसरे स्थान मिळवले. बहरिनच्या विंफ्रेड यावीने ९ मिनिटे ३६.५२ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक, तर व्हिएतनामच्या थि ओन्हा न्गुयेनने ९ मिनिटे ४३.८३ सेकंद वेळ नोंदवून ब्राँझपदक पटकावले. ३२ वर्षीय सुधासिंगने २०१०च्या एशियाडमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. त्या एशियाडमध्ये प्रथमच या प्रकाराचा समावेश करण्यात आला होता. सुधासिंगची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी ९ मिनिटे २६.५५ अशी असून, मोसमातील सर्वोत्तम वेळ ९ मिनिटे ३९.५९ सेकंद अशी होती. जूनमध्ये झालेल्या आंतरराज्य अजिंक्यपद मैदानी स्पर्धेत तिने ही कामगिरी नोंदवली होती.

४०० मीटर अडथळा

पुरुषांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत धरुण अय्यास्वामीने राष्ट्रीय विक्रमासह रौप्यपदकाची कमाई केली. धरुणने ४८.९६ सेकंद वेळ नोंदवून दुसरे स्थान मिळवले. धरुणने मार्च महिन्यात फेडरेशन कपमध्ये ४९.४५ सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम रचला होता. 'एशियाड'मध्ये त्याने आपल्या या कामगिरीत सुधारणा केली. कतारच्या अब्देररहमान साम्बाने ४७.६६ सेकंद वेळ नोंदवून स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळवले. २१ वर्षीय तमिळनाडूचा धरुण ३०० मीटरपर्यंत चौथ्या स्थानावर होता. शेवटच्या १०० मीटरमध्ये त्याने वेग वाढवून दोन स्पर्धकांना मागे टाकले आणि वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी नोंदवली. भारताचे या प्रकारातील २०१०मधील पहिलेच पदक ठरले. त्या वेळी जोसेफ अब्राहमने सुवर्णपदक मिळवले होते.

लांब उडी

महिलांच्या लांब उडीत नीना वरकिलने महिलांच्या लांब उडीत रौप्यपदक मिळवले. तिची चौथ्या प्रयत्नातील ६.५१ मीटर उडी सर्वोत्तम ठरली. व्हिएतनामच्या थि थू थाओ बुई ६.५५ मीटर कामगिरीसह सुवर्ण, तर चीनच्या शू शिओलिंगने ६.५० मीटर कामगिरीसह ब्राँझपदक मिळवले. नीनाने सहा प्रयत्नांत अनुक्रमे ६.४१, ६.४०, ६.५०, ६.५१, ६.४६, ६.५० मीटर कामगिरी नोंदवली. नयना जेम्सला (६.१४ मी.) अकरा स्पर्धकांमध्ये दहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

'पदक आईला अर्पण'

२१ वर्षीय धरुण म्हणाला, 'आठ वर्षांचा असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यानंतर आईने खूप कष्टाने वाढविले. आमच्यासाठी तिने अनेक सुखांचा त्याग केला. हे पदक तिला अर्पण करतो. तू एक शिक्षिका असून, अजूनही तिला महिन्याकाठी केवळ १४ हजार मानधन मिळते.'धरुण हा तमिळनाडूमधील तिरुपूरचा रहिवाशी आहे. या कामगिरीने आपल्याला नोकरी मिळेल आणि घराला आर्थिक हातभार लावता येईल, अशी आशाही धरुणने व्यक्त केली. शर्यतीबाबत तो म्हणाला, 'माझे प्रतिस्पर्धी कुठे आहेत, याचा विचार डोक्यात नव्हताच. मला फक्त माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करायचे होते. राष्ट्रीय विक्रमापेक्षा चांगली कामगिरी करू शकलो, याचा आनंद आहे.'आशियाई स्पर्धेच्या सहा महिने आधी तो पोलंड आणि चेक प्रजासत्ताकमध्ये सराव करीत होता. त्याचा फायदा झाल्याचे धरुण म्हणाला.

'पदकाने प्रेरणा मिळेल'

उत्तर प्रदेशच्या अमेठी येथील सुधासिंग म्हणाली, 'इंचिऑन एशियाडमध्ये मी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. मात्र, पदक मिळवण्यासाठी ती पुरेशी ठरली नव्हती. स्टीपलचेसमध्ये अनेक नवीन मुली येत आहेत. ही आनंददायी गोष्ट आहे. या प्रकारात पूर्वी असे चित्र दिसत नव्हते. आशा आहे माझ्या या पदकाने भारताच्या इतर युवा अॅथलिटना प्रेरणा मिळेल.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर तहसीलवर मेंढरांसह मोर्चा

$
0
0

अनुसूचित जमातीत समावेशासाठी धनगर समाजाचे आंदोलन

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सत्ता मिळताच पहिल्या कॅबिनेट बैठकीत आरक्षण देण्याचे आश्‍वासन भाजपने निवडणुकीपूर्वी दिले होते. मात्र, चार वर्षे उलटूनही धनगर समाजाला आरक्षण मिळाले नसल्याने सरकारने फसविले, आता त्यांना जागा दाखवून देण्याची वेळ आली आहे, असा इशारा देत धनगर समाजास अनुसूचित जमातीत आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने तहसील कार्यालयावर मेंढरांसह मोर्चा काढण्यात आला.

शहरातील आडवा फाटा येथील हुतात्मा स्मारकापासून सकाळी ११ वाजेच्या सुमारास धनगर आरक्षण कृती समितीच्यावतीने मोर्चास प्रारंभ झाला. सिन्नर बसस्थानक, शिवाजी चौक मार्गे वावीवेस येथून बारागाव पिंप्री रस्त्याने जात मोर्चा तहसील कार्यालयाच्या प्रांगणात स्थिरावला. तेथे मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना तयार करताना तसेच आमलात आणताना धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक ३६ अन्वये समाविष्ट केले होते. मात्र, सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून धनगर समाजास वंचित ठेवत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

गेल्या निवडणुकीत सत्तेवर येताच धनगर समाजास आरक्षण देण्याचे वचन दिले होते. मात्र चार वर्षे होऊनही त्याची पूर्ती केली नाही. याशिवाय आरक्षणासाठी नेमलेल्या टीस समितीचा अहवालही अद्याप प्राप्त झालेला नाही. एकूणच सर्व बाबतीत सरकार चालढकल करत आहे. गेल्या निवडणुकीत धनगरांच्या घोंगडीची उब मिळाल्याने युतीची सत्ता आली. मात्र, समाजास अद्याप आरक्षण मिळालेले नाही, असे मत वक्त्यांनी मांडले. 'सिटू'चे हरीभाऊ तांबे, कानडी समाजाचे राजेंद्र बिन्नर, विनायक बिन्नर, भारीप बहुजन महासंघ यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीस पाठिंबा जाहीर केला. यावेळी धनगर समाजाचे नेते आनंदा कांदळकर, राजाभाऊ खेमनार, बाबा कांदळकर, लक्ष्मण बर्गे, पंचायत समितीच्या सदस्या योगिता कांदळकर, नवनाथ मुरडनगर, आदी उपस्थित होते. सभेच्या शेवटी तहसीलदार नितीन गवळी, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना आंदोलकांनी निवेदन दिले.

घोषणांचा दणदणाट

'येळकोट, येळकोट जय मल्हार, पिवळा झेंडा फडकला, धनगर राजा भडकला, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, बस् झाले राजकारण... आता फक्त आरक्षण' यासारख्या घोषणा देत तालुक्यातील धनगर बांधवांनी सिन्नर शहर दणाणून सोडले. समाज बांधवांनी तहसील कार्यालयासमोर डफाच्या तालावर पारंपरिक नृत्य केले.

बड्या नेत्यांची उपस्थिती

धनगर समाजाच्या आरक्षणास आमदार राजाभाऊ वाजे व माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी पाठिंबा दर्शविला. आरक्षण ही समाजाची प्रमुख मागणी असून त्यावरच लक्ष केंद्रीत करावे, आंदोलन करताना सरकारला दखल घेण्यास भाग पाडावे, दबाव निर्माण करावा. मागण्यांसाठी सनदशीर मार्गाचा अवलंब करा. आरक्षणाची मागणी रास्त असून मी तुमच्या सोबत असल्याची ग्वाही कोकाटे यांनी दिली. चर्चेशिवाय प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे चर्चेची तयार ठेवा, अशी सूचनाही त्यांनी केली. तत्पूर्वी, युवानेते उदय सांगळे हे बसस्थानक भागात मोर्चात सहभागी होऊन काही वेळ धनगर समाजाच्या नेत्यांसोबत चालत गेले. माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, बापू गोजरे, हर्षद देशमुख, कृष्णा कासार हे यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तु भोकनळ टॉकटाईम

$
0
0

शब्दांकन : फणिंद्र मंडलिक

नाहीतर, दोन सुवर्णपदकाचा मानकरी झालो असतो

…भारताच्या रोव्हर्सनी आशियाई क्रीडा स्पर्धेत रोइंगमध्ये एक सुवर्ण आणि दोन ब्राँझपदके मिळवून चमकदार कामगिरी केली. यात दत्तू भोकनळ, स्वर्णसिंग, ओम प्रकाश आणि सुखमीत सिंग यांनी क्वाड्राप्ले स्कल्स सांघिकमध्ये सुवर्णयश मिळवले. यातील दत्तू भोकनळ हा नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्याच्या तळेगाव रोहीचा रहिवासी आहे. दत्तूच्या या यशाबद्दल त्याच्याशी केलेली बातचीत...

व‌ैयक्तिक आणि सांघिक स्कल्सबाबत अनुभव कसा होता

या स्पर्धेत मी दोन इव्हेंटमध्ये भाग घेणार होतो. पहिला इव्हेंट हा सिंगल स्कल (वैयक्तीक) व दुसरा क्वाड्राप्ले स्कल्स (सांघिक) होता. या ठिकाणी गेल्यावर वातावरणातील बदलाने माझी तब्येत बिघडली. थंडी, ताप, खोकला सुरू झाला. डोके दुखू लागल्याने वैयक्तिक खेळातून माघार घ्यावी लागली. मात्र क्वाड्राप्ले स्कल्सच्या अंतिम फेरीत आमच्या संघाने ६ मिनिटे १७.१३ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक मिळवले. आमच्या संघाने इंडोनेशिया आणि थायलंडच्या संघाला मागे टाकले. इंडोनेशियाने ६ मिनिटे २०.५८ सेकंद वेळ नोंदवून रौप्यपदक, तर थायलंडच्या संघाने ६ मिनिटे २२.४१ सेकंद वेळ नोंदवून ब्राँझपदक मिळवले. माझी तब्येत बिघडली नसती तर मी आज दोन सुवर्णपदकांचा मानकरी होऊ शकलो असतो.

स्पर्धेसाठी कशी तयारी केली?

सन २०१४ पासून या खेळाला सुरुवात केली. आज इथपर्यंत पोहचेल असे वाटले नव्हते. सैन्यदलात दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने खेळ सुरू झाला. २०१४ पासून सातत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळत असल्याने पूर्वी ज्याप्रमाणे दबाव यायचा तसा दबाव यावेळी नव्हता. यावेळी विजयाची खात्री होती. एक वर्ष आधी स्पर्धेची तयारी सुरू केली होती. सकाळी ७.३० ते ११.३० वाजेपर्यंत सराव करायचो. रोज ३६ किलोमीटर रोइंग करायचो. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा सरावा असे एक वर्षांपासून सुरू होते. त्याचप्रमाणे पायाचे, पोटाचे, पाठीचे मसल्स तयार करण्यावर भर दिला. जास्तीत व्यायाम करून शारीरिक तंदुरुस्ती कशी चांगला राखता येईल याकडे लक्ष दिले. त्याचप्रमाणे मानसिक तंदुरुस्तीवर देखील भर दिला. आजपर्यंत विविध स्पर्धांमध्ये १० ते १२ सुवर्णपदके मिळवली असून, एकाच ठिकाणी सिल्व्हर मेडल मिळवले आहे. शारीरिक मेहनतीबरोबरच आहारावर देखील लक्ष केंद्रीत केले होते.

पदक मिळविल्यानंतर परिवाराला कसे वाटले

मी पदक मिळवल्याने माझ्या दोन्ही भावांना, आजोबांना गावातील सर्व लोकांना आनंद झाला. पदक मिळाल्याचे जाहीर होताच कुटुंबातीलस सदस्यांसह गावातील प्रत्येकाला माझ्याशी कधी बोलेल, असे झाले होते. स्पर्धेत पदक मिळवायचे या ध्येयाने मी प्रेरीत झाल्याने आठ महिन्यांपासून गावाला गेलो नाही. माझ्या आजीचे निधन झाले त्यावेळी देखील मला येता आले नाही. कोणत्याही परिस्थितीत सरावात खंड पडू द्यायचा नव्हता. आज आई-वडील नाहीत, त्यांना देखील खूप आनंद झाला असता.

मुलांसह पालकांना काय सांगशील?

सध्याचे युग हे संगणकाचे युग आहे. प्रत्येक लहान मुलगा हा मोबाइलशी खेळताना दिसतो. आपल्या मुलांना मोबाइलपासून दूर ठेवा. सोशल मीडियाचा वापर कमी करा. आपले म्हणणे मुलांवर लादू नका. जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळायला लावा. शरीराचा विकास झाला तरच मनाचा विकास होईल. मैदानी खेळ खेळल्याने बौद्धिक विकास होण्यास मदत होईल. आपल्या मुलाला ज्यात करिअर करायचे आहे त्यात त्याला करू द्या कशाचीही बळजबरी करू नका. माझ्या वडिलांनी मला तू हेच कर असे कधी सांगितले नाही. त्यामुळेच मला हे यश मिळाले आहे. ज्या खेळाडूंना नौकानयनमध्ये करियर करायचे आहे त्यांनी जोमाने सराव करा, असे मी नक्की सांगेल.

पुढे कोणत्या स्पर्धेवर लक्ष केंद्रीत आहे?

स्पर्धा या आयुष्यात येतच रहाणार आहेत. कोणत्या स्पर्धेवर लक्ष केंद्रीत केले हे आता सांगणे उचित ठरणार नाही. मेहनत करायची हे एकमेव ध्येय आहे स्पर्धा कोणताही येऊ द्या त्यात यश मिळवायचेच हेच स्वप्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

$
0
0

सलसाडीतील संतप्त ग्रामस्थांचा तहसीलदारांवर हल्ला

म. टा. वृत्तसेवा, धुळे

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात सलसाडीच्या शासकीय आश्रमशाळेत सोमवारी सकाळी एका शाळकरी विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर त्या ठिकाणी गेलेल्या सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांसह तहसीलदारांवर संतप्त ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला चढवला. यात दोन्ही अधिकारी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती आटोक्यात आणली.

नंदुरबारमधील तळोदा तालुक्यातील सलसाडी गावातील शासकीय आश्रमशाळेत सोमवारी (दि. २७) सकाळी सहा वाजता डीपीचा शॉक लागून पाचवीतील सचिन चंद्रसिंग मोरे याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर पालकांनी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन केले. आश्रमशाळेत सोयीसुविधा उपलब्ध नसल्याचाही या वेळी आरोप करण्यात आला. जोपर्यंत प्रकल्प अधिकारी येणार नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली.

दरम्यान, सकाळी १० वाजता प्रकल्प अधिकारी विनय गौडा व तहसीलदार योगेश चंद्रे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकारी आल्याचे समजताच ग्रामस्थांनी लाठ्याकाठ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अधिकारी गौडा व चंद्रे या दोघांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तत्काळ नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. राजपत्रित अधिकाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्याचा निषेध म्हणून राजपत्रित अधिकारी संघटना काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे संघटनेने सांगितले.

या प्रकरणाची प्रशासनाकडून चौकशी करून कारवाई करण्यात येईल, तसेच विद्यार्थ्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबत पोलिसाकडून पंचनामा करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.
- मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी, नंदुरबार

घटनेनंतर संतप्त पालकांना आणि ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करीत पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. विद्यार्थ्याचा मृतदेह त्याच्या पालकांना देण्यात आला असून, सलसाडी परिसरात शांतता आहे.
- चंद्रकांत गवळी, अप्पर पोलिस अधीक्षक

(फोटो - पंकज पाटील)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरफार कक्ष गुंडाळणार!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्थावर मालमत्ता खरेदीबाबत दुय्यम निबंधकांकडे झालेल्या दस्तावेज नोंदणीची माहिती थेट संबंधित तलाठ्याला ऑनलाइन पाठविली जाणार आहे. त्यामुळे तहसील कार्यालय किंवा तलाठ्यांकडे हेलपाटे मारण्यापासून नागरिकांची सुटका होणार आहे. या निर्णयामुळे तहसील कार्यालयातील फेरफार कक्ष बंद होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

घरदार, भूखंड किंवा तत्सम स्थावर मालमत्तांची खरेदी केल्यानंतर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्यानंतर संबंधित नोंद तहसील कार्यालयातही घेतली जाते. सातबारा संगणकीकरणाचे काम सरकारने हाती घेतल्यानंतर आता यापुढे जमीन, जागा, घरासारख्या स्थावर मालमत्तांच्या खरेदीबाबतच्या दस्तांची माहिती नोंदणी कार्यालयाकडूनच थेट तलाठ्यांच्या ऑनलाइन डेस्ककडे पाठविली जाणार आहे. त्यावर १५ दिवसांत तलाठ्यांना फेरफार अर्थातच खरेदी केलेल्या व्यक्तीच्या नावाची नोंद करावी लागणार आहे. नाव नोंदविण्याच्या प्रक्रियेतील कालावधी कमी व्हावा, नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत याकरीता तहसील कार्यालयांमधील फेरफार कक्ष बंद करून थेट तलाठ्यांच्या लॉगिनलाच नोंदणीकृत दस्त उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यासाठी सरकारी यंत्रणेने पावले उचलली आहेत. तलाठ्यांनी १५ दिवसांत फेरफारची नोंद केली नाही तर अशा प्रलंबित नोंदीची माहिती महसूलमधील तहसीलदारांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या अधिकाऱ्यांना ऑनलाइन प्रक्रियेत दिसणार आहे. त्यामुळे ही कामे वेगाने मार्गी लागण्यास मदत होणार आहे. दस्तनोंदणी करताना खरेदीदार आणि विक्रीदार या दोघांनाही आधार क्रमांक सादर करणे बंधनकारक असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विघ्नहरणासाठी धावाधाव!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने शहरातील गणेशोत्सव मंडळांवर कडक अटी-शर्ती लादल्याने यंदा गणेशोत्सव साजरा करणे अवघड झाले आहे. मात्र, शहराचा मानबिंदू ठरणाऱ्या या पारंपरिक उत्सवावरील अटी-शर्तींचे विघ्न घालविण्यासाठी नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची धावाधाव सुरू असल्याचे चित्र आहे.

शहरातील यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवावर आलेले हे विघ्न दूर करण्यासाठी नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाने नुकतीच पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन अटींमध्ये शिथिलता आणावी, असे साकडे घातले आहे. पालकमंत्री महाजन यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की गणेशोत्सव साजरा करताना महापालिकेने अनेक अटी-शर्तींचे पालन करण्यास सांगितले आहे. महापालिकेचे गणेशोत्सव मंडळांबाबतचे धोरण उत्सवाला अडचणीत आणण्याचे आहे. महापालिकेने जे नियम लादले आहेत ते जाचक असून, हा उत्सव यापूर्वी जसा निर्विघ्न पार पडला आहे, तसाच यंदाही पार पाडण्यासाठी जाचक अटी-शर्तींत शिथिलता आणावी. मंडप उभारणीबाबत महापालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परवानगीची आवश्यकता सांगितली आहे, ही अट रद्द करण्यात यावी, मंडळांना मिळालेल्या जाहिरातींवर कर लादू नये, महापालिकेच्या बी. डी. भालेकर मैदानावर गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यंदा ती मोडीत काढण्याचे षडयंत्र रचले जात असून, गणेशोत्सव मंडळांना त्याच ठिकाणी उत्सव साजरा करण्याची परवानगी देण्यात यावी, उत्सवकाळात मंडळांच्या कार्यकर्त्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल केले जातात, ते दाखल करण्यात येऊ नयेत. रात्री दहा वाजेनंतरही देखावे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात यावी.

विविध विभागांच्या तक्रारी

पुणे येथे डीजे लावण्याची परवानगी देण्यात आली आहे, त्याच धर्तीवर नाशिक शहरातही डीजेला परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. मिरवणुकीत जी वाहने सहभागी होणार आहेत त्यांना आरटीओकडून एक दिवस आधी परवानगी देण्यात यावी, विर्सजन मिरवणुकीची परवानगी दोन दिवसांसाठी असावी, गणेशोत्सव काळातील शेवटचे पाच दिवस मध्यरात्री १२ वाजेपर्यंत देखावे उघडे ठेवण्याची व वाद्ये वाजविण्याची परवानगी देण्यात यावी. या काळात महावितरणकडून वीज मीटर घेणे सक्तीचे केले जाते, त्याची सक्ती करण्यात येऊ नये, असेही निवेदनात म्हटले आहे. त्यात महापालिका, पोलिस व महावितरण यांच्या संदर्भातील तक्रारींचा समावेश आहे.

\B

(लीड, २ कॉलम फोटो)\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

#‘वुई सपोर्ट मुंढे’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात सत्ताधारी भाजपने आणलेल्या अविश्वास प्रस्तावाचे सोशल मीडियावरही पडसाद उमटले आहेत. काही गट प्रस्तावाच्या समर्थनार्थ तर काही गट प्रस्तावाच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत. फेसबुक, ट्वीटर, व्हॉट्सअॅपवर मुंढेंच्या समर्थनार्थ पोस्ट फिरवल्या जात आहेत. कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठिशी उभे राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 'वुई सपोर्ट मुंढे' अशा हॅशटॅगवर नगरसेवकांना ट्रोल केले जात आहे. मुंढेंनी भ्रष्टाचार थांबविल्यानेच अस्वस्थ झालेल्या नगरसेवकांनी मुंढे हटाव मोहीम हाती घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आवाहन केल्यानंतर मुंढे यांच्या समर्थनार्थ सायंकाळी विश्रामगृहावर बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीस तीस जणांनी हजेरी लावून मुंढेंसोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला.

अवाजवी करवाढ आणि लोकप्रतिनिधींना दिल्या जाणाऱ्या अपमानास्पद वागणुकीच्या विरोधात सत्तारूढ भाजपनेच मुंढेंच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव सादर केला असून, त्यावर येत्या १ सप्टेंबर रोजी फैसला होणार आहे. मुंढे यांच्या विरोधात थेट सत्तारूढ पक्षानेच अविश्वास प्रस्ताव आणल्यावरून सोशल मीडियावर याची दिवसभर चर्चा होती. मुंढे कर्तव्यदक्ष अधिकारी असून, त्यांनी महापालिकेच्या कारभाराला शिस्त लावल्याने त्यांची नाशिकला गरज असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या. त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याचे आवाहन करण्यात आले. 'तुकाराम मुंढे भाजपला का नको आहेत?', 'पारदर्शक कारभाराला सर्वजण का घाबरतात?' असे एकेक प्रश्न करीत सोशल मीडियावर टीका सुरू आहे. सचिन मालेगावकर, जितेंद्र भाबे, जसबीर सिंह, समाधान भारतीय यांनी लोकसंघटन सुरू केले असून, सोशल मीडियाबरोबरच प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंढे यांनी लोकप्रतिनिधींच्या चुकीच्या कामांना चाप लावल्यानेच त्यांना विरोध केला जात असल्याचा दावा यावेळी करण्यात आला. मुंढे यांना पाठिंबा देण्यासाठी विविध सामाजिक संघटनांकडून शासकीय विश्रामगृहावर 'मी नाशिककर' झेंड्याखाली सोशल मीडियाद्वारे आवाहन करत, बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीला ३० जणांनी हजेरी लावली.

वॉक फॉर कमिशनर

सोशल मीडियावर आवाहन केल्यानुसार विश्रामगृहावर आयोजित केलेल्या बैठकीत मुंढे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुंढे यांच्या समर्थनार्थ ३१ ऑगस्ट रोजी 'वॉक फॉर कमिशनर' मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता गोल्फ क्लब येथून हा मोर्चा निघणार असून, यात नाशिककरांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आज रॅली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय क्रीडा विश्वाला उच्चत्तम बिंदूवर नेऊन ठेवणाऱ्या व भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपद सांभाळून अनेक वेळेस विश्वविजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी पंचवटीत क्रीडा रॅली काढण्यात येणार आहे. सकाळी नऊ वाजता ही रॅली काढण्यात येईल. आडगाव नाक्यापासून पंचवटी कारंजापर्यंत काढण्यात येणाऱ्या या क्रीडा रॅलीत स्कूलचे विद्यार्थी विविध खेळांचे ठिकठिकाणी प्रदर्शन करणार आहे.

स्वामीनारायण स्कूलमधून सकाळी नऊ वाजता निघणाऱ्या या रॅलीला मुख्याध्यापिका अस्मिता पटेल या ध्वज दाखवून सुरूवात करतील. नवीन आडगाव नाका, जुना आडगाव नाका, निमाणीमार्गे पंचवटी कारंजापर्यंत ही क्रीडा रॅली काढण्यात येईल. याप्रसंगी विद्यार्थी क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, स्केटिंग, ढोल, झांज अशा विविध क्रीडा प्रकारांचे प्रदर्शन करून नागरिकांना खेळ खेळण्यासाठी प्रवृत्त करणार आहे. रॅलीच्या प्रारंभी शौर्याचे प्रतिक असणारे घोडेस्वार राहणार आहेत. क्रीडा रॅली यशस्वी होण्यासाठी संस्थेचे स्वामी ज्ञानपुराणी महाराज, प्रशासक माधवस्वामी महाराज, मुख्याध्यापिका अस्मिता पटेल, क्रीडा शिक्षक डॉ. संदीप पाटील, अर्चना नाटकर, विनायक पारवे, आकाश आंबेकर परिश्रम घेत आहेत. यानिमित्त महिला शिक्षकांचा हॉकीचा प्रदर्शनीय सामना खेळविण्यात येणार आहे. याचबरोबर मुलांचा कबड्डी व डॉजबॉलचा सामना खेळविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात

$
0
0

पुरस्कारांसाठी अर्ज

पाठविण्याचे आवाहन

नाशिक : ग्रंथालय संचालनालय यांच्यामार्फत २०१८-१९ या वर्षासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय आणि डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक ग्रंथमित्र या पुरस्कारांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या कार्यालयात २८ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी सांगितले. पुरस्काराअंतर्गत सार्वजनिक ग्रंथालयांना १० ते ५० हजार रुपये पारितोषिक, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. राज्यस्तरीय प्रत्येकी एक उत्कृष्ट कार्यकर्ता व सेवक यांना प्रत्येकी २५ हजार रुपये, पारितोषिक, सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ०२५३-२५०६७१७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

पाटील यांचे व्याख्यान

नाशिक : उद्योजक सुधीर पाटील यांचे लेखक तुमच्या भेटीला उपक्रमाअंतर्गत रविवारी (दि. २ सप्टेंबर) रोजी 'जागतिक पर्यटन : एक आनंदपर्वणी' या विषयावर व्याख्यान होणार आहे. गंगापूर रोड येथील शंकराचार्य कुर्तकोटी सभागृहात संध्याकाळी ६.३० वाजता व्याख्यान होईल. जेष्ठ माध्यमतज्ज्ञ रविराज गंधे मुलाखत घेणार आहेत. नाशिककरांनी व्याख्यानास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन शंकराचार्य न्यासतर्फे करण्यात आले आहे.

संस्कृत पाठांतर स्पर्धा

नाशिक : संस्कृत भाषा सभेतर्फे संस्कृत दिनाचे औचित्य साधून संस्कृत पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. २ सप्टेंबर) रोजी नेहरू गार्डन जवळील सारडा कन्या विद्यामंदिरात दुपारी दोन वाजता ही स्पर्धा होणार आहे. १ ली ते ४ थी आणि ५ वी ते १० वी अशा दोन गटात ही स्पर्धा होईल. स्पर्धेत संस्कृत भाषेतून कथाकथन आमि वक्तृत्व करता येईल. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सभेचे अध्यक्ष अॅड.अशोक खुटाडे यांनी केले आहे.

माहितीकोषबाबत आवाहन

नाशिक : शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वंकष माहितीकोष तयार करण्यात येणार आहे. यासाठी सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाइन नोंदणी प्रणालीमध्ये भरावी, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांनी केले आहे. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून देण्यात आलेला लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरावा. माहिती ऑनलाइन नोंदणीप्रणालीमध्ये भरल्यानंतर जिल्हा सांख्यिकी अधिकारी कार्यालयाकडून माहिती प्राप्त झाल्याबाबतचे प्रमाणपत्र देण्यात येईल. वेतन देयकाच्या सोबत हे प्रमाणपत्र जोडले तरच नोव्हेंबर २०१८ या महिन्यापासून वेतन कोषागार कार्यालयामार्फत मंजूर होतील. त्यामुळे आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर माहितीकोष जिल्हा सांख्यिकी कार्यालयात सादर करावा, असे आवाहन जिल्हा सांख्यिकी कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

भोसलाचा वर्धापन दिन

नाशिक : भोसला मिलिटरी स्कूलचा ८१ वा वर्धापन दिन सोहळा शनिवारी (दि. १ सप्टेंबर) रोजी संपन्न होणार आहे. सकाळी ८.३० वाजता स्कूलच्या धर्मवीर ग्राऊंडवर हा सोहळा होणार आहे. यावेळी वास्तु पूजन आणि ध्वजारोहण होणार आहे. या सोहळ्यास आवर्जून उपस्थित रहावे, असे आवहन भोसला मिलिटरी स्कूलतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटी-

$
0
0

बाळासाहेबांचे पेन्सिल चित्र साकारणार

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कामास प्रारंभ

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रेखाटन ट्रस्टच्या पाचव्या पेन्सिल चित्रातील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या कामास सोमवारी टेक्नोहब इन्स्टिट्यूट, दिंडोरी रोड येथे प्रारंभ झाला. ३ हजार ५०० चौरस फुटात हे चित्र साकारण्यात येणार आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनपट पेन्सिल चित्रातून यामाध्यमातून रेखाटण्यात येणार आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा ५ फूट उंच आणि ७०० फूट लांबीचा जीवनपट पेन्सिल रेखाटण्याच्या या उपक्रमासाठी फ्रान्स येथून पेपर, पेन्सिल ऑस्ट्रिया येथून आणि खोडरबर जर्मनी येथून मागविण्यात आले आहेत. दोन महिन्यांत ही कलाकृती पूर्ण करून नोव्हेंबर २०१८ मध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या उपक्रमास ५ बाय ७ फूटाची एक फ्रेम असणार आहे. अशा ९९ फ्रेम असतील. त्यासाठी अंदाजे ८०० ते १००० पेन्सिल व ५ डझन खोडरबर लागणार आहेत.

हे रेखाटन ३ हजार ५०० चौरस फुटात हे चित्र साकारण्यात येणार आहे. या चित्रात शिवसेनाप्रमुखांचा जीवनप्रवास, त्यांचे शिक्षण, घर, सामाजिक व राजकीय प्रवास, व्यक्तिमत्त्व, शेवटापर्यंत असणाऱ्या गोष्टींचा समावेश होणार आहे. त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड प्राप्त अशोक नागपुरे व रेखाटन ट्रस्टच्या निवडक कलाकारांच्या सहकार्याने ही कलाकृती रेखाटण्यात येणार आहे. याचा प्रारंभ ट्रस्टचे किशोर नागपुरे, कुणाल नागपुरे, चित्रकला शिक्षक भा. रा. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images