Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सिद्धार्थनगर झोपडपट्टी स्थलांतरास विरोध

$
0
0

सिद्धार्थनगर झोपडपट्टी स्थलांतरास विरोध

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बॉइज टाऊन शाळेजवळ असलेली सिद्धार्थनगर झोपडपट्टी महापालिकेने हटविण्याचा निर्णय घेतला असून, येथील रहिवाशांना चुंचाळे शिवारात स्थलांतरित करणार असल्याची माहिती रहिवाशांना मिळाली आहे. या स्थलांतरास येथील रहिवाशांनी विरोध केला आहे.

या ठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या रहिवाशांना येथून स्थलांतरित करू नये, अशा आशयाचे निवेदन येथील रहिवाशांकडून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे, की महापालिकेच्या सातपूर विभागात असलेल्या सिद्धार्थनगर झोपडपट्टीत जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेंतर्गत सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, लाभार्थींची यादी निश्चित करण्यात आली असल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. मात्र, ही परिस्थिती वस्तुस्थितीला धरून नाही. या झोपडपट्टीत अद्याप सर्वेक्षणच झालेले नाही. ही झोपडपट्टी १९६० सालापासून अस्तित्वात असून, येथील रहिवासी आजूबाजूच्या कामधंद्यांवर पोट भरीत आहेत. या झोपडपट्टीत महापालिकेने विविध सोयी-सवलतीही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. २००८ मध्ये या झोपडपट्टीचा समावेश जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेत समावेश करण्यासाठी महापालिकेने आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, येथील रहिवाशांनी त्याला विरोध केला होता. आता अचानक या कारवाईने जोर पकडला आहे. महाराष्ट्र सरकारच्या 'जीआर'मध्ये जी घरे सध्या ज्या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी राहू द्यावीत, असे नमूद करण्यात आलेले आहे. मात्र, तरीही महापालिका स्थलांतराचा घाट घालीत आहे. याबाबत महापालिकेला २००२ पासून आजतागायत अनेकदा निवेदने दिली आहेत. या झोपडपट्टीला कोणत्याही प्रकारे हात लावू नये, असा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. या निवेदनावर नगरसेवक शिवाजी गांगुर्डे, प्रियंका घाटे, किशोर घाटे यांच्यासह रहिवाशांच्या सह्या आहेत. याबाबतचे निवेदन आयुक्तांनाही देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मुढेंवरील ‘अविश्वास’ बारगळला

$
0
0

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापौरांनी प्रस्ताव घेतला मागे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

करवाढीवरून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तक्षेपानंतर अखेर मागे घेण्याची नाचक्की सत्तारूढ भाजपवर शुक्रवारी ओढवली आहे. महापौर रंजना भानसी यांनी प्रस्ताव मागे घेत असल्याचे जाहीर केले. सरसकट करवाढ मागे घेण्यावर ठाम असलेल्या सत्तारूढ भाजपने शुक्रवारी यू टर्न घेत, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने अविश्वास प्रस्ताव मागे घेण्याची घोषणा केली. त्यामुळे नाशिककरांवरील ५० टक्के करवाढ कायम राहणार आहे. दरम्यान, करवाढ मागे घेण्याच्या निर्णयातही अनेक त्रुटी असून, त्या दूर करण्याासठी मुख्यमंत्र्यांकडे जाणार असल्याचे महापौर भानसी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे करवाढीवरून भाजपमध्ये नाराजी कायम आहे.

करयोग्य मूल्यात भरमसाट वाढ, नगरसेवकांचा अवमान, प्रशासकीय राजवटीमुळे सत्तारूढ भाजपने आयुक्त मुंढे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर शनिवारी फैसला होणार होता. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून अविश्‍वास प्रस्तावावरून शहरातील वातावरण ढवळून निघाले. मुंढे समर्थक व विरोधक असे दोन गट पडले होते. प्रस्तावाच्या बाजूने नगरसेवकांसह ५२ संघटना उभ्या राहिल्या होत्या, तर मुंढेंच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मोहीम सुरू झाली होती. तरीही भाजप ठाम राहिल्यानंतर मुंढेंनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून गुरुवारी पत्रकार परिषद घेत ५० टक्के करवाढ मागे घेतली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने हा निर्णय झाल्याचे आयुक्तांनी सांगितले असले तरी सत्ताधारी भाजप या निर्णयावर समाधानी नव्हते. विरोधकांना सोबत घेण्याचा प्रयत्न भाजपने केला; परंतु थेट मुख्यमंत्र्यांकडून मुंढे यांची नियुक्ती झाल्याने ऐनवेळी भाजप माघार घेण्याच्या शक्‍यतेने शिवसेनेसह राष्ट्रवादीने सावध भूमिका घेतली होती. तरीही भाजपचे नेते अविश्वास प्रस्तावावर ठाम होते. अखेर मुख्यमंत्री आणि पालकमत्री गिरीश महाजन यांनी सूत्रे फिरवत, स्थानिक भाजप नेत्यांना अविश्वास प्रस्ताव मागे घेण्यास भाग पाडले आहे. मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी महापौर भानसी यांच्याशी याबाबत थेट चर्चा करून प्रस्ताव मागे घेण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे शुक्रवारी सकाळी प्रस्ताव मागे घेत असल्याचे महापौर भानसी यांनी जाहीर केले. भाजपनेच प्रस्ताव मागे घेतल्याने तो आता बारगळला आहे. त्यामुळे नाशिककरांवर ५० टक्के करवाढीचे संकट कायम आहे.

भाजप नेते नॉटरिचेबल

भाजपच्या अविश्वास प्रस्तावावर विरोधी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेला सुरुवातीपासूनच शंका होती. त्यामुळे या पक्षांनी सावध भूमिका घेत महासभेतच भूमिका मांडू, असे जाहीर केले होते. दुसरीकडे या प्रस्तावाच्या समर्थनार्थ सभागृह नेते दिनकर पाटील यांच्यासह संभाजी मोरुस्कर व अन्य नेत्यांनी 'रामायण'वरून दोन दिवसांत सूत्रे हलवून अविश्‍वासाच्या बाजूने कौल जमविला होता. मात्र, ऐनवेळी महापौरांनी प्रस्ताव मागे घेण्याचे जाहीर केल्यानंतर भाजप नेतेच तोंडघशी पडले. भाजपमधील एका गटाने तर पक्षाची बदनामी कशी झाली हे सांगण्यात धन्यता मानली, तर दुसऱ्या गटातील नेत्यांनी नॉट रिचेबल होणे पंसत केले.

कोट....

सरसकट करवाढ रद्द करण्याची भूमिका असली तरी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून आयुक्तांवरील प्रस्ताव मागे घेण्यात आला आहे. शुद्धिपत्रकात अजूनही त्रुटी आहेत. अनिवासी दर भरमसाट असून, त्यात आणखी सुधारणा करण्याची संधी आहे. येत्या पंधरा दिवसांत पालकमंत्र्यांना घेऊन मुख्यमंत्र्यांना त्यात बदल करण्यासंदर्भात साकडे घालू. आयुक्त नगरसेवकांना विश्‍वासात घेऊन कामे करतील, अशी अपेक्षा आहे.

- रंजना भानसी, महापौर

कोट....

माझ्याकडे नागरिक आले होते. त्यांनी मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी निवेदन दिले असून, ते मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहे. अविश्वास प्रस्ताव रद्द करण्याचा निर्णय महापौरांचा असून, त्या संदर्भात अद्याप माझ्याकडे काहीही आलेले नाही. त्यावर मी भाष्य करणार नाही.

- तुकाराम मुंढें, आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृती समिती न्यायालयात जाणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पिवळ्या पट्ट्यातील शेतीवरील कर कायम राहिल्याने तसेच निवासी व अनिवासी क्षेत्रावरील करही जास्त असल्याचे कारण देत अन्याय निवारण कृती समितीने आता थेट उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ५० टक्के करकपात घेण्याची घोषणा केल्यानंतर सत्तारुढ भाजपने अविश्वास प्रस्ताव मागे घेतला असला तरी अन्याय निवारण कृती समिती मुंढे आणि सत्ताधाऱ्यांच्या निर्णयावर समाधानी नाही. अविश्वास प्रस्ताव मागे घेतल्याने आयुक्तांचे करवाढीबाबतचे सुधारित १३९ क्रमांचा आदेश कायम राहणार असून करवाढ लागू होणार आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेलाच उच्च न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे करवाढीचा चेंडू पुन्हा न्यायालयात जाणार असल्याने करवाढीवरील वाद आता मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत.

महासभा रद्द

आयुक्त मुढे यांच्यावरील अविश्वास प्रस्ताव मागे घेतल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी विरोधकांकडून महासभेत कोंडी होण्याच्या शक्यतेने अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी बोलवलेली विशेष महासभा रद्द केली आहे. पडदा पाडण्यासाठी महापौर रंजना भानसी यांनी अखेर महासभा रद्द केली. अविश्वास प्रस्तावावर सह्या केलेल्या १५ पैकी १४ सदस्यांनी पुन्हा रद्द करण्याचे पत्र दिल्यानंतर महापौरांनी विशेष सभा रद्द करण्याचे जाहीर केले आहे. तर महासभा रद्द करण्यावरूनही कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजपवर हल्लाबोल

महासभा रद्दच्या पत्रावर सभागृहनेते दिनकर पाटील यांनी सही करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे स्थायीच्या १४ सदस्यांच्या सह्यांच्या आधारे महासभा रद्द करण्याची अधिसूचना महापौरांनी जारी केली आहे. एकदा बोलावलेली महासभा रद्द करता येत नाही, असा दावा विरोधकांकडून केला जात असून त्याला कायदेशीर आव्हान देऊ, असा इशारा दिला आहे. महासभा रद्द झाल्याने विरोधकांना भाजपवर हल्लाबोल करण्याची संधी मात्र आता गेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टाला लाभणार नवीन इमारत

$
0
0

चार महिन्यात भूमिपूजन करण्याचा वकील संघ सभेत मनोदय

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा न्यायालयाकरीता मंजूर झालेल्या अतिरिक्त जागेमध्ये २५५ कोटी रुपये खर्चून सुसज्ज इमारत उभारण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या आठ दिवसांमध्ये उच्च न्यायालयाकडून मंत्रालयात जाईल. पुढील चार महिन्यांत या नवीन इमारतीचा भूमिपूजन समारंभ करण्याचा मनोदय असून सर्व वकील बांधवांनी जिल्हा वकील संघाला साथ द्यावी, असे आवाहन शुक्रवारी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये करण्यात आले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेजवळील एच. आर. डी. सेंटर येथे नाशिक जिल्हा वकील संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे यांच्यासह पदाधिकारी अॅड. प्रकाश आहुजा, अॅड. जालिंदर ताडगे, अॅड. शरद गायधनी, अॅड. श्यामला दीक्षित, अॅड. संजय गिते आदींसह वकील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा न्यायालयाची जागा ही अपुरी ठरू लागल्याने पोलिस मुख्यालयाकडील जागा मिळावी यासाठी गेली अनेक वर्ष संघर्ष सुरू होता. अखेर या पाठपुराव्याला यश आले आहे. अजूनही रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असला तरी इमारतीचे काम सुरू करण्यास त्याचा अडसर नसल्याचे या सभेत सांगण्यात आले. न्यायालयाच्या इमारतीसाठी २०५ कोटी तर पार्किंग इमारतीसाठी ५५ कोटी रुपये अपेक्षित असून पुढील आठ दिवसांत याबाबतचा प्रस्ताव उच्च न्यायालयाकडून मंत्रालयाकडे पाठविला जाणार आहे. त्यामुळे मंत्रालयाकडून लवकर निधी प्राप्त व्हावा यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. पुढील चार महिन्यांत नव्या इमारतीच्या कामाचा भूमिपूजन समारंभ करण्याचा मनोदय अॅड. ठाकरे यांनी व्यक्त केला.

जुन्या इमारतीवर बांधकाम नाही

जुन्या इमारतीवर बांधकाम केले जाणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले. मात्र, तरीही वकिलांसाठी अधिकाधिक जागा उपलब्ध व्हावी, यासाठी या जुन्या इमारतीवर शेड उभारण्यात येणार आहे. ही जागा वापरावयास मिळणार असल्याने वकील बांधवांनी समाधान व्यक्त केले. वकिलांच्या उत्कर्षासाठी अनेक उपक्रम राबविण्याचे विचाराधीन असून त्यास सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन वकील संघाच्या बैठकीत करण्यात आले.

असा आहे अपेक्षित खर्च

न्यायालयीन इमारती : २०५ कोटी

पार्किंग इमारत : ५५ कोटी रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामातून जनतेचा विश्वास संपादित करण्याच्या सूचना

$
0
0

'आप'चे राज्य अध्यक्ष सावंत यांचा कार्यकर्त्यांशी संवाद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जनतेच्या विविध दुर्लक्षित मागण्यांकडे लक्ष द्या. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातून जनहिताच्या कामांसाठी तळागाळापर्यंत काम करा. जिल्हास्तरावर बुथ मजबूत करा. जनतेचा विश्वास संपादित करत भ्रष्टाचार विरहित महाराष्ट्र घडवा, असा सल्ला आम आदमी पक्षाचे (आप) राज्य अध्यक्ष सुधीर सावंत यांनी केले.

'आप'च्या वतीने शहरातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. यावेळी सावंत यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मेळाव्याला 'आप'चे राज्य़ सचिव सुभाष तंवर, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय जाधव, सचिव प्रभाकर वायचळे, शहराध्यक्ष अॅड. बंडूनाना डांगे उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी जिल्हास्तरावर कार्यरत व्हावे. महाराष्ट्रात 'आप'चे संघटन अधिक मजबूत होण्यासाठी कार्य करावे. आगामी निवडणुकीत 'आप' विजयी व्हावी, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करावे. तसेच जनतेच्या दुर्लक्षित समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे अनेक सल्ले या मेळाव्यात कार्यकर्त्यांना देण्यात आले. त्यावेळी 'आप'चे शहर उपाध्यक्ष विकास पाटील, जगमेरसिंग खालसा, सचिव अनिल कौशिक यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

जनतेची स्थिती बिकट

सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रातील जनतेची स्थिती अतिशय बिकट केली आहे. तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवू म्हणणाऱ्या सरकारने अद्याप नोकरीचा प्रश्न सोडवलेला नाही. सरकारी यंत्रणेचा वापर स्वतःच्या सोयीनुसार सरकार करून घेत आहे. जनतेच्या मनातून सत्ताधारी उतरले आहेत. जनतेच्या मनात 'आप'चे स्थान निर्माण करा, असे आवाहनही सावंत यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अविश्वासाचा रंगला खेळ!

$
0
0

सत्तास्पर्धेतून भाजपची नाचक्की

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सत्तेवरून आमदारांमध्ये सुरू असलेली सुंदोपसुंदी व पदाधिकाऱ्यांच्या चढाओढीच्या राजकारणामुळे सत्तारुढ भाजपचे मोठे नुकसान झाले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या अविश्वास प्रस्तावावरून तर भाजपने स्वत:च्या पायावरच धोंडा मारून घेतला आहे. मुंढे प्रकरणावर पक्षाची नाचक्की झाली असून, भाजप हरले अन् मुंढे जिंकल्याचा संदेश जनमानसात गेला आहे. त्यामुळे नियोजनाअभावी दीड वर्षानंतरही भाजपच्या हाती भोपळाच आला आहे. त्यामुळे पक्षाच्या डॅमेज कंट्रोलसाठी आता थेट भाकरीच फिरवण्याचे पक्षासमोर मोठे आव्हान आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर महापालिकेच्या इतिहासात प्रथमच नाशिककरांनी एकहाती भाजपकडे सत्ता दिली. परंतु, अवघ्या दीड वर्षातच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी जनतेने भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर टाकलेल्या विश्वासाचे मातेरे केले आहे. आयुक्त मुंढे यांच्यावरील अविश्वास नाट्य फसले आहे. नाशिककरांनी भाजपच्या पदरात तीन आमदार आणि महापालिकेतील सत्ता असे भरभरून दान टाकले. परंतु, सत्ता मिळाल्यापासून भाजप आमदारांमध्ये पालिकेच्या वर्चस्वावरून सुरू झालेल्या स्पर्धेमुळे पक्षासह मुख्यमंत्री व पालकमंत्र्यानाही तोंडघशी पडावे लागले आहे. यामुळे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे आपसूकच पालिकेचा सुकाणू गेला. त्यामुळे सानपांनीही सुरुवातीपासून आमदार सीमा हिरे आणि आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिकेपासून दूर ठेवण्याचे राजकारण केले. पालिकेतील सर्व पदाधिकारी आपल्या ताब्यात ठेवत पदांचीही खैरात वाटली. त्यामुळे अंतर्गत हेवेदावे सुरू होऊन थेट आपल्या पक्षाच्या सभापतींविरोधातच नगरसेवकांनी वेळोवेळी अविश्वासाचे हत्यार उपसले. पदाधिकाऱ्यांच्या गोंधळी कारभारामुळे मुख्यमंत्र्यांवरच खापर फुटायला लागल्याने मुख्यमंत्र्यांनी थेट तुकाराम मुंढेंच्या हातातच पालिकेची सत्ता सोपवली.

मुंढे पर्वामुळे नाशिकच्या विकासासह वादविवादाला पूर्णविराम लागेल अशी मुख्यमंत्र्यांना अपेक्षा होती. परंतु, मुंढे आणि पदाधिकाऱ्यांमध्येच अहंकाराची लढाई सुरू झाली. मुंढे यांनी पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनाही काम शिल्लक ठेवले नाही. त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी मुंढे यांच्या विरोधात बंडाचे हत्यार उपसत मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले. करवाढीचे हत्यार पुढे करीत अविश्वास प्रस्ताव दाखल करून मुंढेंसह मुख्यमंत्र्यांच्याच अडचणी वाढवल्या. त्यामुळे या सगळ्या नाट्याचे सूत्र आपसूकच शहराध्यक्ष या नात्याने सानप यांच्याकडे गेले होते. सानप यांनीही नगरसेवकांचा रोष ओढवून घेण्यापेक्षा अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचे निर्देश दिले. हा प्रस्ताव पारीत होऊ नये, यासाठी एका आमदारानेच मग फिल्डिंग लावली. एकाचवेळी अविश्वास प्रस्ताव बारगळायचा आणि दुसरीकडे यात भाजपची नाचक्की झाल्याचे सांगून स्पर्धक कमी करण्याचे राजकारण सुरू झाले. त्यातूनच पालिकेतील पदाधिकाऱ्यांचा पद्धतशीर वापर करण्यात आला. परंतु, नियोजनाअभावी या प्रस्तावरून भाजपचीच कोंडी झाली आहे. आता प्रस्तावच मागे घेतल्याने नगरसेवकांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही, तर दुसरीकडे सत्तारुढ पक्षालाच आपल्या मुख्यमंत्र्यांवर भरवसा राहिला नसल्याने अविश्वास आणावा लागला असा संदेश गेला. त्यामुळे याचा मोठा फटका भाजपला बसणार असून, आगामी काळात विरोधक अधिकच हावी होणार असल्याचे चित्र आहे.

-

मग निर्णय कोणाचा

मुंढे यांच्यावर अविश्वास दाखल करण्याचा निर्णय पक्षाचा असल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु, या अविश्वास प्रस्तावावार स्थायी समिती अध्यक्षा हिमगौरी आहेर आडके यांनी सही केली नाही. या संपूर्ण नाट्यापासून त्या दूर राहिल्या. त्यामुळे अविश्वास प्रस्तावावरून भाजपमध्येच बेबनाव असल्याचे समोर आले होते. दिनकर पाटील यांनी सानप आणि महापौरांच्या सांगण्यानुसारच अविश्वासाचे पत्र दिल्याचे जाहीर पत्रकच दिले. त्यामुळे भाजपमध्येच या प्रस्तावावरून डामाडोल स्थिती होती. कोणत्याही तयारीनिशी आणि सगळ्यांना गृहीत धरून सानप यांनी पुढाकार घेत प्रस्ताव दाखल केला. तर, प्रस्ताव दाखल करण्यासंदर्भात माझ्यापर्यंत कोणताही आदेश नव्हता अशी माहिती आहेर-आडके यांनी दिली. त्यामुळे हा निर्णय पक्षाचा नव्हता असे त्यांच्या वक्तव्यावरूनच समोर आले आहे. त्यामुळे नेमका निर्णय कोणचा असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सन्मित्र सभासदांना आधार निधीचे वाटप …

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लाड शाखीय समाज सन्मित्र मंडळाच्या वतीने सभासदांना आपत्कालीन निधी व आधार निधीचे वाटप करण्यात आले.

मालेगाव येथील कै. राहुल पुरुषोत्तम शिरोडे व धुळे येथील कै. गोकुळ बाबुलाल अमृतकर यांच्या परिवाराकडे ५० हजार रुपयांचा तर धुळे येथील मनीषा यशवंत कोतकर यांना आपत्कालीन निधी म्हणून १० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. सन्मित्र मंडळाचे सभासद होऊन विविध योजनांचा लाभ घ्या, असे आवाहन अध्यक्ष भूषण महाजन यांनी यावेळी केले. मदतनिधी देतेप्रसंगी मंडळाचे उपाध्यक्ष शरद धामणे, संचालक वसंतराव येवलेकर, शरद वाणी, सुनील मुसळे, सचिन बागड, पिंपळनेर वाणी समाजाचे अध्यक्ष जयवंत बागड, मालेगाव येथील अशोक सोनगिरे, उदय राहुडे, धुळे येथील राजेंद्र पाचपुते आदी उपस्थित होते.

वाढत्या महागाईत कुटुंबातील खर्च भागविणे ही तारेवरची कसरत होऊ लागली आहे. यावर तोडगा शोधत १९८८ मध्ये स्थापन झालेल्या लाडशाखीय वाणी समाज सन्मित्र मंडळातर्फे समाजातील गरजूंना विविध योजनांद्वारे आधार देण्याचे काम केले जात आहे. कोणता दिवस कसा येईल हे सांगता येत नाही. यासाठी सन्मित्र मंडळाची आधार योजना समाजातील बांधवांसाठी काम करते आहे. शिष्यवृत्ती योजना, सन्मित्र सभासद पालकत्व योजना, सन्मित्र ग्रंथालय योजना, सन्मित्र रुग्णोपयोगी साहित्य योजना, सन्मित्र वैद्यकीय आपत्कालिन निधी योजना या सारख्या योजना राबविण्यात येत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्षा उलटून प्रवासी जखमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

एसटी क्वाटर्सकडून स्वातंत्र्य चौकाकडे वळण घेत असताना रिक्षा उलटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. या अपघातात दीपक हातगडे (रा़ राजीवगांधीनगर) हा प्रवासी किरकोळ जखमी झाला तर रिक्षाचे नुकसान झाले. चालक कासम पटेल हे रिक्षा (एमएच १९ व्ही ८५१६) तीन ते चार प्रवासी घेऊन हरिविठ्ठलच्या दिशेने जाण्यासाठी निघाले होते. लेवा भवन परिसरातील एसटी क्वाटर्सजवळून स्वातंत्र्य चौकाकडे जाण्यासाठी रिक्षाचालक कासम यांनी वळण घेतले. रिक्षा भरधाव असल्यामुळे ती अचानक उलटली. यात रिक्षात बसलेले प्रवासी दीपक हे किरकोळ जखमी झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


राजेंद्र उगले, वाढदिवस

वाढदिवस

$
0
0

मनोज जगताप, वाइन उद्योजक

विवेक पाटणकर, आर्किटेक्ट

निशिगंधा मोगल, माजी आमदार

प्रशांत कुलकर्णी, कर सल्लागार

किशोर अहिरे, उद्योजक

जीवन लासुरे, विभाग अध्यक्ष, म्युनिसिपल कर्मचारी सेना

सुहास दाणी, संपादक, मासिक भालचंद्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अजूनही टँकरवरच भीस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्याचे तीन महिने संपले तरी अजूनही जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या कायम आहे. त्यामुळे टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढावली आहे. जिल्ह्यात ४२ टँकरला मुदतवाढ देण्यात आली असून, त्यापैकी १८ टँकर एकट्या येवला तालुक्यात धावणार आहेत.

जिल्हावासियांना पावसाने यंदा जूनपासूनच तरसवले आहे. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये देखील महिन्याच्या शेवटी शेवटी पावसाने समाधानकारक हजेरी लावून त्या त्या महिन्यांची सरासरी गाठली. चालू हंगामात आतापर्यंत सरासरीच्या ८० टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणांची पाणीपातळी वाढण्यास मोठी मदत झाली आहे. परंतु तरीही मालेगाव, बागलाण, येवला, नांदगाव यांसारख्या तालुक्यांमधील काही मंडळाकडे पावसाने पाठ फिरविल्याने तेथील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाच तालुक्यांमधील ५७ गावे आणि १४६ वाड्यांना ४२ टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जुलै पाठोपाठ ऑगस्टनंतर पुन्हा टँकर्सला मुदतवाढ देण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढावली आहे. संबंधित गावे आणि वाड्यांमधील पाण्याच्या नैसर्गिक साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा सुरूच ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याखेरीज २८ विहिरी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २१ विहिरी गावांची तहान भागविण्यासाठी तर उर्वरित सात विहिरी टँकरसाठी अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत.

-

तालुका गावे/वाड्या टँकर

येवला ५० १८

सिन्नर ४८ ९

मालेगाव ३५ ८

नांदगाव ६६ ६

देवळा ४ १

एकूण २०३ ४२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तू रंग भरत गेलीस...

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हळूच लावा हळद सयांनो... सुचत नसेल जेव्हा काही..., तू रंग भरत गेलीस... आदी कवितांचे वाचन अन् सोबतीला बासरीचा मधुर सूरांची साथ... अशा धुंद वातावरणात कवितांचे रसग्रहण करण्यात नाशिककर हरखले होते. जीवनातील वेगवेगळ्या वळणांवर आधारित कवितांचे श्रवण करताना शनिवारी नाशिककरांची सायंकाळ काव्यमय झाली.

पुस्तक पेठ नाशिकच्या वतीने लेखक आणि कवी संतोष वाटपाडे यांच्या 'ही बाग कुणाची आहे' या प्रसिद्ध कविता संग्रहातील निवडक कवितांचे वाचन शनिवारी करण्यात आले. डिसुझा कॉलनीतील प्रौढ नागरिक मित्रमंडळ येथे सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम झाला. काव्यसंग्रहातील कवितांचे वाचन तनुजा मुळे आणि भावना कुलकर्णी यांनी केले. कवितेच्या सादरीकरणाला प्रवीण गुळवे यांनी बासरीची अप्रतिम साथ दिली. प्रसिद्ध लेखक आणि तंत्रज्ञानतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. जीवनातील विविध टप्प्यांवर येणाऱ्या प्रसंगांवर काव्यसंग्रहातील कविता आधारित होत्या. नववधूच्या भावना व्यक्त करणाऱ्या सुचत नसेल जेव्हा काही... या काव्यवाचनाला रसिकांनी कमालीची दाद दिली. डोंबारी, शेतकरी, कष्टकरी यांच्या जीवनातील कटू प्रसंगांवर भाष्य करणाऱ्या कविताही यावेळी सादर करण्यात आल्या. नाशिककर रसिक काव्यश्रवणात दंग झालेले बघायला मिळाले.

(फोटो सतीश काळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्रिवेणी संगमासाठी प्रयत्न गरजेचे

$
0
0

शिर्डी संस्थानचे अध्यक्ष डॉ. हावरे यांचे मत

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

भाविक पर्यटकांना अपेक्षीत असलेला त्र्यंबकेश्वर-शिर्डी-शनिशिंगणापूर असा त्रिवेणी संगम होण्यासाठी शिर्डी साईबाबा संस्थान आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांनी संयुक्तिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे मत शिर्डी संस्थानचे अध्यक्ष आणि त्र्यंबकेश्वरचे विश्वस्त यांच्या चर्चेत व्यक्त करण्यात आले.

शिर्डी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे व नलीनी हावरे शनिवारी त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर त्यांनी त्र्यंबक देवस्थान ट्रस्टचे विद्यमान विश्वस्त संतोष कदम, माजी विश्वस्त कैलास घुले व पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांच्या समवेत चर्चा केली.

त्र्यंबकेश्वर येथे आलेल्या भाविकांना शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे भेट देण्याची इच्छा असते अथवा शिर्डी येथे आलेला भाविक त्र्यंबकेश्वरला दर्शनास येत असतो. भाविकांसाठी शनिशिंगणापूर, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर या तीन तीर्थक्षेत्रांचे एकत्रित टूर पॅकेज शासनस्तरावर तयार केले तर त्याचा लाभ देशभरातील भाविक, पर्यटकांना होईल आणि पर्यटनात वाढ होईल अशी संकल्पना कैला घुले यांनी व्यक्त केली. यावर डॉ. हावरे, संतोष कदम आणि प्रशांत गायधनी यांची सकारात्मक चर्चा झाली. त्र्यंबकेश्वर येथे शिवलिंग खोल गर्भगृहात आहे. भाविकांचे समाधान होईल असे दर्शन घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा लागतो आदी विषयावरही चर्चा झाली. त्याच सोबत देवस्थान ट्रस्ट हे देणगी घेत असते त्यामुळे त्यावर सेवाकर अथवा जीएसटी भरण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट करण्यात आले. डॉ. हावरे यांचा देवस्थान ट्रस्टच्या वतीने सत्कार करण्यात आला.

000

दुचाकीस्वाराचा मृत्यू

सिन्नर : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर दुचाकी आदळली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण ठार झाला. सिन्नर-शिर्डी महामार्गावर रतन इंडिया कंपनीजवळ शुक्रवारी (दि. ३१) रात्री साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. प्रशांत नवनाथ गुरुळे (वय २७ रा. खोपडी ता. सिन्नर) असे तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी रात्री प्रशांत सिन्नरकडून खोपडीकडे दुचाकीने (एमएच १५ जीएम ०४४७) जात होता. मुसळगाव फाट्याच्या पुढे रतन इंडिया कंपनीच्या गेटजवळ डाव्या बाजूने उभ्या असलेल्या ट्रकवर (एमएच ०४, डीडी ५७९८) त्याची दुचाकी आदळली. या अपघातात प्रशांतचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्पोर्टसाठी

$
0
0

दृष्टिक्षेप

- २०१८ एशियाडमध्ये भारताने स्क्वॉशमध्ये १ रौप्य आणि ४ ब्राँझ अशी पाच पदके मिळविली. भारताने प्रथमच एका एशियाडमध्ये पाच पदके मिळविली. महिला संघाने रौप्य, तर पुरुष संघाने ब्राँझ मिळविले. तसेच, महिलांच्या एकेरीत दीपिका पल्लीकल, जोश्ना चिनप्पा यांनी ब्राँझपदके, तर पुरुष एकेरीत सौरव घोषालने ब्राँझ मिळविले.

- एशियाडमध्ये सांघिक स्क्वॉशमध्ये महिलांनी तिसरे पदक मिळविले. भारताने २०१० एशियाडमध्ये ब्राँझ, तर २०१४ एशियाडमध्ये रौप्यपदक मिळविले होते.

भारतीय महिलांना रौप्य

- स्क्वॉश

वृत्तसंस्था, जकार्ता

सलग दुसऱ्या एशियाडमध्ये भारतीय महिला स्क्वॉश संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारत आणि हाँगकाँग हे संघ सुवर्णपदकासाठी आमनेसामने होते. गुरुवारीच या संघांत साखळी लढत झाली होती. त्यात हाँगकाँगने बाजी मारली होती. या वेळी हाँगकाँगला हरवून भारतीय संघ सु‌वर्णयश मिळविणार का, याबाबत औत्सुक्य होते. मात्र, शनिवारी अंतिम लढतीत हाँगकाँगने भारतावर २-० अशी मात केली. त्यात हाँगकाँगच्या हो त्झे लोकने भारताच्या सुनयना कुरूविलावर ११-८, ११-६, १०-१२, ११-३ अशी मात केली, साखळी लढतीत सुनयनाने होला हरवले होते, त्या कामगिरीची पुनरावृत्ती सुनयना करता आली नाही. पहिल्या गेममध्ये सुनयनाने कडवी झुंज दिली. मात्र, मोक्याच्या क्षणी पॉइंट मिळवीत होने बाजी मारली. त्यापाठोपाठ दुसरी गेम जिंकून होने २-० अशी आघाडी घेतली होती. आव्हान राखण्यासाठी सुनयनला तिसरी गेम जिंकणे गरजेचे होते. या गेममध्ये १०-९ अशा आघाडीसह सुनयनाने गेम पॉइंट मिळविला होता. मात्र, होने पॉइंट घेत १०-१० अशी बरोबरी साधली. त्यानंतर सलग दोन पॉइंट घेत सुनयनाने बाजी मारली आणि आव्हान राखले. चौथ्या गेममध्ये मात्र होने सुनयनाला प्रतिकाराची फारशी संधी न देता विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यापाठोपाठ, दुसऱ्या लढतीत हाँगकाँगच्या अॅनीने भारताच्या जोश्ना चिनप्पावर ११-३, ११-९, ११-६ अशी मात केली. जागतिक क्रमवारीत अॅनी ११व्या, तर जोश्ना १६व्या क्रमांकावर आहे. एकंदरीतच भारतीय संघाने यंदाच्या एशियाडमध्ये चांगली कामगिरी केली. प्रथमच भारताने एकाच एशियाडमध्ये पाच पदके पटकावली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४८ हजार नावांवर फुली

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली असून दुबार, स्थलांतरित किंवा मृत व्यक्ती अशी जिल्ह्यातील सुमारे ४८ हजार १६४ मतदारांची नावे त्यामधून वगळण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांची संख्या आता ४२ लाख ६० हजार ३९२ झाली आहे. हीच मतदार संख्या पूर्वी ४३ लाख १५ हजार ५८० एवढी होती.

१० जानेवारी २०१८ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण ४३ लाख १५ हजार ५८० मतदार आहेत. त्यामध्ये २२ लाख ६७ हजार ५३८ पुरूष, तर २० लाख ४७ हजार ९६९ महिला मतदारांचा समावेश आहे. त्यानंतर जिल्ह्यात बुथ लेव्हल ऑफिसर (बीएलओं) च्या मदतीने मतदार पडताळणी मोहीम राबविण्यात आली. अनेक भागात बीएलओंनी घरोघरी जाऊन मतदारांची माहिती संकलित केली. दुबार नावे असलेली, मृत झालेल्या, अन्यत्र स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीमधून वगळण्यात आली आहेत. १ सप्टेंबर २०१८ रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात ४२ लाख ६७ हजार ४१६ मतदार असून, त्यामध्ये २२ लाख ३७ हजार ७८२ पुरूष आणि २० लाख २२ हजार ५३६ महिला मतदारांचा समावेश आहे. म्हणजेच २९ हजार ७६५ पुरूषांची तर २५ हजार ४२४ महिला मतदारांची नावे त्यामधून वगळण्यात आली आहेत.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष छायाचित्र मतदारयाद्यांचा संक्षिप्त पुनपर्रीक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरूवात झाली आहे.

त्यांतर्गत जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक विभागाने मतदान केंद्रांवर नागरिकांच्या माहितीसाठी मतदार याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत. नव मतदारांना नोंदणी तर मतदार यादीमध्ये नावे समाविष्ट असलेल्या मतदारांना त्यामध्ये आवश्यक त्या दुरूस्त्या करता येणार आहेत.

-

तालुकानिहाय मतदार

तालुका मतदार

नांदगाव ३०३४७१

मालेगाव मध्य २५८१८३

मालेगाव बाह्य ३१९९०२

बागलाण २६७३०८

कळवण २५८३६९

चांदवड २६८२९७

येवला २८०३०५

सिन्नर २८१९३८

निफाड २५९२२५

दिंडोरी २८५८१३

नाशिक पूर्व ३२८९९९

नाशिक मध्य २९३५८८

नाशिक पश्चिम ३६५०३४

देवळाली २४८२३८

इगतपुरी २४८७४६

-

मतदार संघनिहाय घटलेली संख्या

तालुका संख्या

नांदगाव ७१०२

मालेगाव मध्य ४५७१

मालेगाव बाह्य ३५६३

बागलाण ८६८

कळवण ३१५१

चांदवड ३६१२

येवला १६४०

सिन्नर २१३५

दिंडोरी ४३४५

नाशिक पूर्व १३२२३

नाशिक पश्चिम ४६८०

देवळाली २६६९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


काम करतांना भीती ठेऊ नका

$
0
0

सुरेश हावरे यांचे उद्योगकुंभात मार्गदर्शन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पैसे नसतील तर व्यवसाय करता येत नाही, असा अनेकांचा समज आहे. व्यवसायात इतरांची मदत घ्यावीच लागते. अर्थात, पुढे त्याचा विश्वास सार्थक ठरवावा लागतो. त्यामुळे उद्योजकाने काम करतांना मनात कुठलीही भीती ठेऊ नये, असे मार्गदर्शन शिर्डीतील साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी 'उद्योगकुंभ २०१८' या राज्यस्तरीय परिषदेत केले.

सॅटेर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट आयोजित हॉटेल एक्स्प्रेस इन येथे झालेल्या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून आंतराष्ट्रीय आय. टी. तज्ज्ञ अच्युत गोडबोले, प्रसिद्ध राष्ट्रीय स्तरावरील कॉर्पोरेट लॉयर नितीन पोद्दार, आंतराष्ट्रीय सौंदर्य तज्ज्ञ रेखा चौधरी, मेक इंडिया उपक्रमातील राज्य सरकारचे भागीदार कॅप्टन अमोल यादव, भाटिया उद्योजक भावेश भाटिया, अभिनेता संदीप कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

परिषदेच्या सुरुवातीला नितीन पोद्दार यांनी मराठी माणूस व्यवसाय करतांना कुठे चुकतो, याची उदाहरणे दिली. व्यवसाय करतांना अनेकदा पार्टनर घेणे गरजेचे ठरते. त्यामुळे अनेक फायदे होतात. मात्र मराठी माणसाला पार्टनर नकोच असतो, असे त्यांनी सांगितले. नव्या उद्योजकाला श्वासाइतकी यशाची गरज वाटायला हवी, असे मत भारतीय बनावटीच्या पहिल्या विमानाचे उत्पादन करण्याच्या तयारीत असलेल्या अमोल यादव यांनी मांडले. आपण विमान बनवू शकतो ही बाब सोपी वाटली; मात्र ते भारतात बनविण्याबाबत मात्र खरे आव्हान असल्याचे जाणवल्याचे त्यांनी सांगितले. परिषदेच्या पहिले चर्चासत्रात पियुष सोमाणी, सुधीर मुतालिक, श्रीकृष्ण गांगुर्डे यांच्याशी अजित मराठे यांनी चर्चा केली.

उद्योगात बदल घडणे गरजेचे आहे. चित्रपट मनोरंजन क्षेत्रांत कॉन्टेन्ट दिला नाही तर व्यवसाय करता येणार नाही. अनेक निर्माते एक चित्रपट फसला की बाहेर जातात. मात्र, मी अनेक निर्माते एकत्र करत नवीन कल्पनेवर चित्रपट निर्मिती करत असल्याचे अभिनेते निर्माते संदीप कुलकर्णी यांनी सांगितले. गेल्या १० वर्षात गणिताच्या कितीतरी पटीने तंत्रज्ञान आले आहे. नवीन तंत्र शिकले नाहीत तर तुम्ही संपणार, असे अच्युत गोडबोले यांनी सांगितले. दर दहा वर्षात बदल अचूकपणे टिपा तरच तुम्ही टिकाल. तुम्हाल रिसर्च करावा लागणार असून त्यातून मार्ग सापडणार आहे. तुम्हाला जुगाड शिकवा लागणार असल्याचे सांगितले.

यावेळी क्लबतर्फे संजय मोरे, महेश सावरीकर, संदीप सोमवंशी, मृदुला क्षेमकल्याणी, अमोल कासार, प्रवीण काकड, समीर शहा अध्यक्ष संगमनेर विभाग, पराग मनोहर, तुषार पाटील, संजय शिंदे, झाकीर मन्सुरी आदी सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फुटबॉल खेळाडूंना जागतिक स्तरावर पोहोचवणार

$
0
0

फुटबॉल असोशिएन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्ट मानस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील सर्व फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक, पंच आणि खेळाडूंचे पालक यांच्यापर्यंत फुटबॉल स्पर्धांची माहिती पोहोचावी. अधिकाधिक खेळाडू फुटबॉलकडे आकर्षिले जावेत. जिल्ह्यासह देशभरातील विविध स्पर्धांमध्ये खेळाडूंना सहभागी होता यावे. त्यासाठीचे चोख प्रशिक्षण त्यांना मिळावे यासाठी नाशिकमधून फुटबॉल खेळाडूंना जागतिक स्तरावर ठसा उमटविण्याच्या हेतूने प्रोत्साहित करत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सर्व खेळाडूंपर्यंत फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्टचे उपक्रम पोहोचावेत, या हेतूने असोशिएन आता वेबसाईट, फेसबुक पेज, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर सक्रिय झाली आहे.

फुटबॉल असोसिएशन ऑफ नाशिक डिस्ट्रिक्टच्या वतीने शनिवारी पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी नाशिक क्रीडा विभागाचे उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, असोशिएनचे अध्यक्ष डॉ. अनिरूद्ध धर्माधिकारी, सेक्रेटरी अर्जुन टिळे यांसह रतन लथ, सचिन जोशी, गुलजार कोकणी, के. जी. गुप्ता, साहेबराव पाटील, अजिंक्य वाघ उपस्थित होते. फक्त प्रशिक्षण नव्हे तर खेळाडूंना योग्य व्यासपीठ, सुविधा आणि संधी देण्यासाठी क्रीडा विभागाच्या वतीने असोशिएनला संपूर्ण सहाकार्य मिळेल, असे उपसंचालक डॉ. दुबळे यांनी सांगितले. क्रीडा अधिकारी नाईक यावेळी म्हणाले, नाशिकच्या खेळाडूंना भारताच्याच नव्हे तर जागतिक मैदानावर फुटबॉल स्पर्धेत सहभागी करण्याचे आमचे ध्येय आहे. यावेळी असोशिएनच्या लोगोचे अनावरण करण्यात आले.

या उपक्रमांचे करणार आयोजन

नियमित खेळाडू प्रशिक्षण वर्ग, प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण वर्ग, पंच प्रशिक्षण शिबिर, महिला व पुरूषांसाठी फुटबॉल स्पर्धा, बेबी फुटबॉल लीग स्पर्धा, खेळाडूंना शिष्यवृत्तीसह पुरस्कार आणि बक्षिसे दिली जातील. तसेच नाशिक शहर व जिल्ह्यातील फुटबॉल स्पर्धकांसाठी नाशिक फुटबॉल लीग स्पर्धेचे नोव्हेंबर २०१८ मध्ये आयोजन करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शल्यचिकित्सक डॉ.होले यांचे निधन

$
0
0

शल्यचिकित्सक डॉ. होले यांचे निधन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा शासकीय रुग्णालयाचे अतिरिक्‍त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गजानन होले यांची प्रकृती बुधवारी (२९ ऑगस्ट) रोजी अचानक बिघडल्याने शरणपूर रोडवरील खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांना नेण्यात आले. उपचारादरम्यान शनिवारी (१ सप्टेंबर) रोजी सकाळी नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. होले यांना गेल्या काही वर्षांपासून कर्करोगाने ग्रासले होते. तीस वर्षे प्रख्यात सर्जन म्हणून डॉ. होले यांनी सेवा केली आहे. शहरी भागासह ग्रमीण भागातही त्यांचे विशेष कार्य आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगी व मुलगा असा परिवार आहे. डॉ. होले यांच्या निधनाने जिल्हा रुग्णालयात पोकळी निर्माण झाल्याची भावना रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पॉइंटर्स

$
0
0

गिरवली रॅम्पची बाराखडी -२

कचऱ्याने 'स्मार्ट'ला ग्रहण -३

सीसीटीव्हींचा 'वॉच' -४

आयुष्याचा 'गेम' नको -५

निसर्गाच्या कुशीतले देवबांध -६

---

रस्त्यावरील तेलाने वाहनांची घसरगुंडी

जेलरोड : नाशिकरोडला वर्दळीच्या रस्त्यावर सांडलेल्या खाद्यतेलावरून वाहने घसरून अनेक जणांना आपटी खावी लागल्याचा प्रकार शनिवारी घडला. नाशिककरोड बसस्थानक ते अनुराधा टॉकीजकडे जाणाऱ्या मार्गावरून जाणाऱ्या खासगी वाहनातील तेलाच्या डब्यातून साधारण दीड ते दोन किलोमीटरपर्यंत तेल सांडत जाऊन रस्ता निसरडा झाल्याने अनेक दुचाकीस्वारांची घसरगुंडी उडाली. परिसरातील व्यावसायिक आणि नागरिकांनी तातडीने तेलावर माती आणि भुसा टाकल्याने पुढील दुर्घटना टळली.

--

'आयुक्तांना हटवा' (फोटो)

नाशिकरोड : अवास्तव करवाढ करणाऱ्या महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे विभागीय महसूल उपायुक्त दिलीप स्वामी यांच्याकडे शनिवारी निवेदनाद्वारे करण्यात आली. अंगणवाडी, अतिक्रमण, हॉकर्स झोन, कर्मचारी निलंबन याविषयीचे त्यांनी घेतलेले निर्णय नागरिकांच्या हितविरोधी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. भारत विणकर, प्रकाश दुर्धढवळे, नीलेश उन्हवणे, मधुकर वाघमारे, सचिन हिरे, युवराज साठे, रवी पगारे, गौतम सातदिवे, सचिन गायकवाड, भारत राठोड आदी उपस्थित होते.

--

आज पुरस्कार वितरण

जेलरोड : महावीर इंटरनॅशनल व महावीर सौभाग्य सेवाभावी संस्था यांच्यातर्फे आज, रविवारी (दि. २) दुपारी अडीचला आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. तपोवन येथील जैन स्थानकात होणाऱ्या या सोहळ्याप्रसंगी आमदार बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, मिसेस इंटरनॅशनल डॉ. नमिता कोहक प्रमुख पाहुणे राहतील. नागरिकांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन डॉ. पारस सुराणा, अनिल नहार, सीए लोकेश पारख, राजेंद्र बाफना, संगीता बाफना यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांकडून पुन्हा कारवाईस्त्र

$
0
0

पवार, महाजनांची विभागीय चौकशी प्रस्तावित

शाखा अभियंता रत्नपारखी निलंबित

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपला शिस्तीचा बडगा कायम ठेवला असून शनिवारी २५७ कोटींच्या रस्ते योजनेप्रकरणी निवृत्त शहर अभियंता यू. बी. पवार यांचा खुलासा फेटाळून लावत, त्यांची विभागीय चौकशीचे आदेश दिल्याचे वृत्त आहे. तर निवृत्त अनिल महाजनांचाही खुलासा फेटाळला असून त्यांच्यावरही कारवाईची तयारी सुरू केली आहे. मिळकत विभागातील शाखा अभियंता जगदीश रत्नपारखी याला निलंबित केले. परिचारिकेला अपशब्द वापरल्याप्रकरणी माजी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांनी नोटीस बजावली. तसेच बोगस नोकरभरतीप्रकरणी सचिन सूर्यवंशी या शिपायाला निलंबित केल्याची चर्चा आहे.

अविश्वास प्रस्ताव फेटाळला गेल्यानंतर आयुक्त मुंढे पुन्हा अॅक्शन मूडमध्ये आले आहेत. याचा पहिला फटका निवृत्त शहर अभियंता यू. बी. पवारांना बसला आहे. भाजपच्या २५७ कोटींच्या रस्ते विकास योजनेत पवार यांनी महासभेच्या मागच्या दाराच्या ठरावानुसार निविदा प्रक्रिया राबवली होती. या कामात त्यांच्याकडून तरतूद नसल्याने हरकत घेणे अपेक्षित होते. परंतु, पवार यांनीच या योजनेला बळ दिल्याने मुंढेंनी पवारांना यापूर्वीच निवृत्तीनंतर पवारांना नोटीस बजावत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले. मात्र, कौटुंबिक कारण देत, पवार यांनी खुलासा देण्यात उशीर केला. सूचना दिल्यानंतर पवारांनी याबाबत खुलासा सादर केला आहे. परंतु, मुंढेंनी त्यांचा हा खुलासा फेटाळून लावत, त्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अग्निशामक विभागाच्या 'ना हरकत दाखल्या'सह विविध कारणाने चर्चेत असलेल्या अनिल महाजन यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्याबाबत त्यांनाही खुलासा सादर केला होता. परंतु, मुंढेंनी तो अमान्य केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील एका परिचारिकेला अपशब्द वापरल्या प्रकरणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेद्र भडांरी यांनी नोटीस बजावली आहे. महापालिकेतील बोगस नोकर भरती प्रकरणातील संशयित झोपडपट्टी विभागातील शिपाई सचिन सूर्यवंशी याला निलंबित केल्याचे समजते.

तक्रारी येऊ देऊ नका

मुंढेंनी शनिवारी दिवसभर बैठकाचा जोर लावत प्रलंबित कामांचा निपटारा करण्याचे आदेश दिले आहेत. मुंढेंनी सकाळी विभागप्रमुखांच्या बैठकीत कामांचा आढावा घेतला. त्यानंतर अधिकारी व काही निवडक कर्मचाऱ्यांची बैठक घेत कामांबाबत झाडाझडती घेतली. नगरसेवकांसह नागरिकांच्या तक्रारी येऊ देऊ नका, असे आदेश देत तक्रारी आल्यात थेट कारवाई करू, असा इशाराच आयुक्तांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images