Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बांधकाम व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील नवीन बांधकामांवर बंदी घालण्याचे आदेश दिल्याने या निर्णयाचा नाशिकमधील बांधकाम व्यवसायावर परिणाम होणार आहे. त्यामुळे याप्रश्नी बांधकाम व्यावसायिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

यापूर्वीच घनकचऱ्याच्या विषयावरून 'एनजीटी'ने बांधकामांवर बंदी घातली होती. त्यातून कसाबसा बाहेर पडलेला बांधकाम व्यवसाय नंतर कपाटांच्या प्रश्नात अडकला होता. त्यातून आता कुठे हा व्यवसाय बाहेर पडत असतानाच आता थेट सर्वोच्च न्यायालयानेच राज्यातील नवीन बांधकामांवर बंदी घातली आहे. त्यामुळे नाशिकमधील बांधकामेदेखील ठप्प होणार असल्याने आधीच अडचणीत असलेल्या शहरातील बांधकांम व्यावसायिकांची चिंता आणखी वाढली आहे. बांधकाम क्षेत्र दिवसेंदिवस निराशेच्या खाईत लोटले जात असून, हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनीअर्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विजय सानप यांनी व्यक्त केली आहे. याप्रश्नी सरकारने व्यवस्थित बाजू मांडली नसल्यानेच ही परिस्थिती ओढावली असून, निष्क्रिय सरकारविरोधात आंदोलन करण्याचा इशारा सानप यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनमाड पोलिस विभाग प्रथम

$
0
0

ग्रामीण पोलिस क्रीडा स्पर्धेचा समारोप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ग्रामीण पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित क्रीडा स्पर्धेत मनमाड पोलिस विभागाने विजेते पद पटकावले. नाशिक पोलिस मुख्यालयाचा संघ या स्पर्धेत सर्व साधारण विजेता ठरला असून कळवण विभागाला द्वितीय क्रमांक मिळाला आहे.

ग्रामीण पोलिस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचा शुक्रवारी समारोप झाला. पोलिस अधीक्षक संजय दराडे व जिल्हा परिषदेचे सीईओ नरेश गिते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आडगाव येथील पोलिस मुख्यालयाच्या ग्राऊंडवर समारोप सोहळा झाला. समारोप समारंभाप्रसंगी आदिवासी आणि पावरा लोकनृत्याचा बहारदार कलाविष्कार सादर करण्यात आला. तसेच सावकर मल्लखांब संघाच्या वतीने यावेळी मल्लखांबाच्या विविध प्रकारांचे प्रात्यक्षिक दाखविले. यावेळी आशियाई रोईंग स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल संतोष कडाळे, अखिल भारतीय पोलिस क्रीडा स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणारे सावळीराम शिंदे, समाधान गवळी, प्रभाकर आंबेकर, बाळासाहेब भोर, विजय सुरूडे, अमोल देशमुख, सागर राऊत यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी अपर पोलिस अधीक्षक विशाल गायकवाड, उपअधिक्षक सुरेश जाधव, उपविभागीय अधिकारी आर.रागसुधा यांसह सर्व पोलिस अधिकारी उपस्थित होते.

..

हे आहेत विजेते

जलतरण - शिरीष चव्हाण (प्रथम), संतोष कडाळे (द्वितीय)

बॉक्सिंग - सचिन पिंगळे, रवींद्र टर्ले, बापू पगारे, संदीप बनकर, हरी पालवे, रोहीत मोरे, जगदिश कडाळे, समाधान शिंदे, योगेश हिरे, विकास गिते

कुस्ती (महिला) - अश्विनी मडावी

बॉक्सिंग (महिला) - अस्मिता मडवई, मनिषा खांडेकर

खोखो व कबड्डी - मनमाड विभाग (प्रथम) नाशिक मुख्यालय संघ (द्वितीय)

बेस्ट अॅथलॅटिक - युवराज चव्हाण आणि योगिता वाघ बेस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा प्रारंभ

$
0
0

खासदार, महापौरांनी उघडले खाते

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भारतीय टपाल खात्याची इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन झाले. देशात एकाचवेळी ६५० ठिकाणी या बँका सुरू करण्यात आल्या असून त्याचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला. त्यानंतर या शाखेचे उद्घाटन देशभरात स्थानिक लोकप्रतिनिधींनी केले. नाशिक विभागातील उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे व सीमा हिरे उपस्थित होते.

गंजमाळ येथील जीपीओ ऑफिसच्या आवारात या बँकचा मुख्य उद्घाटन सोहळा झाला. बँक सुरू होण्यापूर्वी नाशिकमध्ये २ हजार ५०० खाते उघडण्यात आली असून यात खासदार गोडसे व महापौर भानसी यांच्या खात्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. यावेळी खासदारांना क्यूआर कोडची प्रतिमा भेट देण्यात आली. देशातील सर्वांत मोठे बँकिंग जाळे निर्माण ही बँक असणार आहे. देशभरात ६५० बँकेबरोबरच ३ हजार २५० केंद्र (अॅक्सेस पॉइंट) असणार असून नाशिक जिल्ह्यात नाशिक व मालेगाव येथे मुख्य शाखा असणार आहे. नाशिक पोस्ट विभागात दिंडोरी, पालखेड, नळवळपाडा, तिटवे येथे सुविधा केंद्र असणार असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र आघाव यांनी दिली. या बँकेमार्फत केवळ आधारकार्ड व फोन नंबरवर खाते उघडण्यात येणार असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. बँकेचे क्यूआर कार्ड सुरक्षित असून त्यामुळे कोणतीही फसवणूक होणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

प्रवर अधीक्षक पी. जे. कांकाडकी यांनी या बँकेमार्फत दिल्या जाणाऱ्या अतिरक्त सेवांची माहिती दिली. इंटरनेट बँकिंग, पोस्टमनमार्फत घरपोच बँकिंग, इन्स्टंट रेमिटन्स, एईपीएस, एपीबीएस, विविध सेवांची बिल, व्हरच्युअल डेबिट कार्ड, एनईएफटी, आरटीजीस, आयएमपीएस, यूपीआय, मोफत एसएमएस अलर्ट, मिस्ड कॉल सेवा, मोबाइल बँकिंग अॅप्लिकेशन यांचा या सेवांमध्ये सहभाग आहे, असे कांकाडकी यांनी सांगितले. यावेळी पोस्ट खात्याचे पंकज कुलकर्णी, संजय फडके, एम. एस. अहिरराव आदी उपस्थित होते.

सोहळ्याचे थेट प्रक्षेपण

देशभरात एकाच वेळी लोकार्पण सोहळा होणार असल्याने त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यासाठी कार्यक्रमाच्या मंचावर मोठा स्क्रिन लावण्यात आला. या सोहळ्याचे व पंतप्रधानाच्या भाषणाचे चित्रण उपस्थितांनी बघितले. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक म्हणजे बदलत्या युगाचे पाऊल ओळखून केलेली सुरुवात आहे. या बँक सुरू करून पंतप्रधान मोदी यांनी चांगली सुरुवात केली आहे. त्याचे देशभर स्वागत होईल, असे मत व्यक्त केले जात आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक पोस्टमनमार्फत प्रत्येक घरापर्यंत पोहचणार आहे. डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या बँकेची मदत होणार आहे. अधिकाधिक लोकांनी या बँकेत खाते उघडावे.

- हेमंत गोडसे, खासदार

महिलांसाठी उपयोगी

केंद्र सरकारने ही बँक सुरू करून पोस्टमला जीवदान दिले. या बँकेमुळे महिलांना मोठी मदत होणार आहे. बँकेत न जाताही महिलांना मोठी बचत करणे शक्य होऊ शकेल. या बँकेमार्फत मिळणारी घरपोच सेवा चांगली आहे.

- रंजना भानसी, महापौर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठवडाभरात तीन शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, आणखी तीन शेतकऱ्यांनी नैराश्यापोटी आत्महत्या केली आहे. बागलाण आणि नांदगाव तालुक्यात या घटना घडल्या. त्यामुळे चालू वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ६६वर पोहोचली आहे.

कर्जबाजारीपणा, बँकांचा तगादा, नापिकी, नैसर्गिक अरिष्ट यांसारख्या संकटांचा सामना करताना हतबल झालेले शेतकरी मृत्यूला कवटाळत आहेत. चालू वर्षात आतापर्यंत ६६ शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची नोंद जिल्हाधिकारी कार्यालयात झाली आहे. आत्महत्यांचे हे सत्र सुरूच असून २४ ते ३१ ऑगस्ट या आठवडाभरात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला आहे. राजेंद्र बाळासाहेब जाधव (वय ४०, रा. सावरगाव, ता. नांदगाव) यांनी २४ ऑगस्ट रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. २५ ऑगस्ट रोजी बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील कैलास पोपट गायकवाड (वय ४२) या शेतकऱ्याने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. भास्कर महादू निंबारे (वय ५०, रा. चंदनपुरी, ता. नांदगाव) या शेतकऱ्याने ३१ ऑगस्ट रोजी राहत्या घराच्या मागे पहाटे निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या नावे चंदनपुरी येथे शेतजमीन आहे. शनिवारी १ सप्टेंबर रोजी या घटनेचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशमूर्ती विक्रीसाठी गुरुवारी गाळेलिलाव

$
0
0

मनपाकडून २९ ठिकाणे निश्चित

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

येत्या १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सव साजरा होणार असल्याने गणेशमूर्ती विक्रीच्या गाळ्यांच्या लिलावाची प्रक्रिया महापालिकेमार्फत सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने सहा विभागातील ४५८ गाळ्यांसाठी २९ ठिकाणे निश्चित केले असून येत्या गुरूवारी (दि. ६) आणि शुक्रवारी (दि. ७) असे दोन दिवस लिलाव केले जाणार आहेत. यंदा सिव्हिल हॉस्पिटलसमोरील जागेऐवजी इदगाह मैदानावर १२४ गाळे उभारण्यात येणार आहेत. पाच दिवसांसाठी हे गाळे देण्यात येणार असून त्यासाठी चार हजार रुपयांचे डिपॉझिट निश्चित करण्यात आले आहेत.

गणेशोत्सव अवघ्या १२ दिवसांवर येऊन ठेपल्यानंतरही गणेश मूर्ती विक्री गाळ्यांचा वाद सुरू आहे. 'सिव्हिल'समोर दरवर्षी गणेशमूर्ती विक्रीचे गाळे उभारले जातात. यंदा मात्र सायलेन्स झोनमुळे तेथे गाळे उभारले जाणार नाहीत. त्यामुळे जागेचा वाद सुरू असतांनाच शनिवारी महापालिकेने गणेश मूर्ती विक्रीचे गाळे लावण्यासाठीच्या जागा निश्चित केल्या. महापालिकेकडून यंदा ४५८ गाळ्यांचा लिलाव केला जाणार आहे. सहा विभागात जागा निश्चित करण्यात आल्या असून नाशिक पश्चिममध्ये इदगाह मैदानावर सर्वाधिक १२४ गाळ्यांना परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी शुक्रवारी (दि. ७) लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे. लिलावासाठी ४ हजार रुपयांची डिपॉझिट निश्चित करण्यात आली असून ९ सप्टेंबर ते १३ तारखेपर्यंत गाळे लावता येणार आहेत. लिलावात भाग घेण्यासाठी ओळखीचा पुरावा द्यावा लागणार आहे.त्यामुळे या गाळ्यांना किती प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागले आहे.

येथे असणार गाळे

महापालिकेने नाशिक पूर्वमध्ये ३, नाशिक पश्चिम मध्ये ३ आणि पंचवटीत ९ ठिकाणी गणेश मूर्ती विक्री गाळ्यांना परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी गुरुवारी (दि. ६) महापालिकेच्या तिसऱ्या मजल्यावरील स्टोअर रुममध्ये लिलाव प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर सिडकोमध्ये ८, नाशिकरोडला ४, आणि सातूपर विभागात दोन ठिकाणी गाळ्यांना परवानगी देण्यात आली आहे. सर्वाधिक १२४ गाळे इदगाह मैदानावर असतील. तर त्यापाठोपाठ ४० गाळे सातपूर क्लबमध्ये असणार आहेत. अन्य ठिकाणी २ ते १५ गाळ्यांनाच परवानगी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केंद्रीय परिषदेसाठी दोन डॉक्टरांची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आयुर्वेद व युनानी विद्याशाखेतून भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेसाठी आयुर्वेद विद्याशाखेतून वैद्य दत्तात्रय पाटील व युनानी विद्याशाखेतून डॉ. वसिम अहमद यांची निवड झाली आहे.

डॉ. अहमद हे मालेगावातील मोहम्मदिया तिबिया कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून तर पाटील हे उदगीर येथील धन्वंतरी आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयात प्राचार्य आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले की, भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद अधिनियमानुसार महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेवर आयुर्वेद व युनानी विद्याशाखेतून प्रत्येकी एक सदस्य निवडून देण्यात येतो. यासाठी आयुर्वेद व युनानी विद्याशाखेतील सदस्यांची निवडणूक घेतली जाते. यातून सदर सदस्यांची निवड करण्यात आली. या अनुषंगाने विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून वैद्य पाटील व डॉ. अहमद यांची निवड झाली आहे. याबद्दल दोन्ही डॉक्टरांचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर, प्रति-कुलगुरु डॉ. मोहन खामगांवकर, कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी विद्यापीठातर्फे अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक एलआयसी अव्वल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) च्या नाशिक विभागाने २०१७-१८ या आर्थिक वर्षात १.९३ लाख विम्यांची विक्री केली असून त्यातून ३७७ कोटींचा प्रिमियम प्राप्त झाला आहे. सुमारे ९ हजार मृत्यू दावे निकाली काढले असून देशपातळीवर प्रथम क्रमांक कायम ठेवल्याचा दावा वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक तुलसीदास गडपायले यांनी केला आहे.

'एलआयसी'च्या ६२ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून १ ते ७ सप्टेंबर या काळात एलआयसी सप्ताह साजरा करण्यात येतो. या पार्श्वभुमीवर 'एलआयसी'च्या नाशिक विभागाच्या उपलब्धीची माहिती गडपायले यांनी दिली. विमा विक्रीत गत आर्थिक वर्षात १९ टक्के वृद्धी झाली. चालू वर्षात नाशिक विभागाने ९० कोटींचा प्रिमियमचा पल्ला आधीच गाठला. प्रधानमंत्री वय वंदना योजनेंतर्गत ८७ कोटींचा प्रिमियम जमा करण्यात आला आहे. २०१७-१८ मध्ये विभागात २.७० लाख सर्व्हायवल बेनेफिट व परिपक्वता दावे निकाली काढले होते. ज्याद्वारे ९४३ कोटी रुपये अदा करण्यात आले. एकूण १२७ कोटी रुपयांचे ८ हजार ९९१ मृत्यू दावे निकाली काढून नाशिक विभागाने देशपातळीवर प्रथम क्रमांक पटकावला आहे. वर्धापन दिनाचे औचित्य साधून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वृक्षलागवड, आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

अनेक सेवा ऑनलाइन

अधिकाधिक सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न 'एलआयसी'ने सुरू केले आहेत. 'एलआयसी' मोबाइल अॅप अँड्राइडवर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचे आठ लाख वापरकर्ते आहेत. त्यावर पॉलिसी स्व सेवा देखील उपलब्ध असून पॉलिसीची माहिती, प्रिमियम भरणा, पुनरुज्जीवन, ऑनलाइन कर्जासाठी विनंती, कर्ज परतफेड तसेच तक्रार निवारण यासारख्या सेवाही येऊ घातल्या आहेत. अॅलर्ट व नोटिफिकेशनद्वारे ग्राहकाला त्याच्या पॉलिसी संदर्भातील माहिती वेळोवेळी पुरविली जाऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस जोड


खड्ड्यात पडल्याने वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खोल खड्ड्यात पडून एका अनोळखी वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे. याबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये घटनेची नोंद करण्यात आली आहे.

या व्यक्तीचे वय ६० ते ६५ च्या दरम्यान असून, सकाळीच्या सुमारास त्या ठिकाणी कामगार आले असता ही घटना उघडकीस आली. काही दिवसांपूर्वी एक वृद्ध अशाच एका खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाला होता; मात्र त्याला वाचविण्यात यंत्रणेला यश आले होते. खड्ड्यात पावसाचे पाणी नसल्याने व अग्निशमन यंत्रणेने तत्काळ प्रयत्न केल्याने या वृद्धाला वाचविण्यात आले होते. मात्र, शनिवारी मृतावस्थेत सापडलेली व्यक्ती तितकी सुदैवी ठरली नाही. खड्ड्यात पावसाचे पाणी साचले असून, या व्यक्तीचा रात्री किंवा पहाटे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

'सिव्हिल'मध्ये दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे 'सिव्हिल' प्रशासनाने या घटनांची पुनर्रावृत्ती होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, पोलिसांना या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसून, घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

..

एक्स्लो पॉईंटजवळ तरुणीचा विनयभंग

दुचाकीवरून पाठलाग करून तरुणाने अंबड येथील एक्स्लो पॉईंटजवळ तरुणीचा विनयभंग केला. ही घटना शुक्रवारी (दि. ३१) घडली. या प्रकरणी एका परप्रांतीयाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. २६ वर्षांच्या पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री ९ वाजता संशयित सुशील भगवतीप्रसाद यादव (३८, रा. जयकृष्ण रो-हाऊस, पाथर्डी फाटा, नाशिक) याने आपल्या दुचाकीवर (एमएच १५ एवाय १८८५) तिचा पाठलाग केला. त्यानंतर संशयिताने पीडितेच्या घराजवळ येऊन 'तूच मला बघत होतीस', असे म्हणून जवळ जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने आरडाओरड केली. यामुळे संशयित यादवने पळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पीडित तरुणीच्या भावाच्या लक्षात येताच त्याने संशयित यादवला पकडले. मात्र, यादवने पीडितेच्या भावाला शिवीगाळ करीत धक्‍काबुक्‍की केली. अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

महिलेचा घरात विनयभंग

एकटी महिला घरात असताना मद्याच्या नशेत आलेल्या एकाने तिचा हात पकडून विनयभंग केला. या प्रकरणी संशयिताविरुद्ध सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

दिलीप सखाराम देवकर (रा. श्रमिकनगर, सातपूर) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिला गुरुवारी (दि. ३०) रात्री साडेदहा वाजता घरी असताना संशयित दिलीप देवकर हा मद्य प्राशन करून तिच्या घराजवळ आला. पीडितेच्या घराचा दरवाजा वाजवून ती बाहेर आल्यानंतर तिचा विनयभंग केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. डी. चव्हाण करीत आहेत.

..

कारसह बुलेटची चोरी

गंगापूर रोडवरील लोकमान्यनगर तसेच आडगाव नाका परिसरातून एका कारसह बुलेटची चोरट्यांची चोरी केली आहे. या प्रकरणी सरकारवाडासह पंचवटी पोलिस चोरीची नोंद करण्यात आली आहे.

गंगापूररोडवरील लोकमान्यनगर येथून चोरट्यांनी मयूर गिरिजाशंकर थेटे (त्र्यंबकेश्वर) यांची कार (एमएच १५ डीएम ४७४६) मंगळवारी, २८ ऑगस्ट रोजी दुपारी अडीच वाजता शिवगंगा अपार्टमेंटजवळून चोरून नेली. याबाबत सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक पी. के. धात्रक करीत आहेत.

बुलेट चोरी

आडगाव नाक्यावरील पद्मालय अपार्टमेंटमधून चोरट्याने रॉयल एनफिल्ड बुलेट चोरून नेली आहे. या प्रकरणी ज्योती देवरे (उदय प्लाझा, पंचवटी) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी सोमवारी, २७ ऑगस्ट रोजी रात्री या बुलेटवर (एमएच १५ एफझेड ३१३२) हात साफ केला. पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास हवालदार बी. व्ही. वाघ करीत आहेत.

मोबाइल लांबविला

दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीच्या बॅगमधील मोबाइल चोरट्यांनी लांबविला. रविवार कारंजा भागात शुक्रवारी (दि. ३१) ही घटना घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवार पेठेतील मिरजकर लेन येथे राहणाऱ्या संजय राजाराम चुंबळे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. चुंबळे हे शुक्रवारी (दि. ३१) दुपारी २ वाजता ते रविवार कारंजा येथून मुलीला दुचाकीवरून घेऊन जात होते. याच वेळी त्यांच्या मुलीने पाठीवरील बँगच्या बाहेरील कप्प्यात १२ हजार ४८० रुपयांचा मोबाइल ठेवला होता. प्रवासादरम्यान, चोरट्यांनी तो हातोहात लांबविला. याबाबत पोलिस हवालदार ए. आर. राठोड तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचा धरणसाठा ७९ टक्क्यांवर

$
0
0

जिल्ह्यात २४ धरणे असून, त्यामधील पाणीसाठा ७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणात आजमितीस ५२ हजार ४६ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. गंगापूर धरण समूहात ९९९० दशलक्ष घनफूट म्हणजेच ९७ टक्के तर पालखेड धरण समूहात ८८ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गिरणा खोऱ्यातील पाणीसाठा ६९ टक्क्यांवर पोहोचला आहे. जून ते आजतागायत जिल्ह्यात ८० टक्के पाऊस झाला आहे.

...

धरण समूहातील साठा (टक्केवारीत)

गंगापूर - ७७

पालखेड - ८८

गिरणा - ६९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशन दुकानाबाबत ग्रामस्थांची तक्रार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील अजंग येथील ग्रामस्थांनी मंत्री दादा भुसे यांची शनिवारी भेट घेत रेशनदुकानाच्या कारभाराबाबत तक्रारींचा पाढा वाचला. येथील रेशन दुकान क्रमांक २ गावातील मुक्ताई महिला बचत गटास चालवण्यास देण्यात आले आहे. तसा ठराव देखील ग्रापच्या ग्रामसभेत करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मात्र दादाजी अहिरे नामक व्यक्तीने ग्रामस्थांची दिशाभूल करून स्वतःच्या नावे करून घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यासह बेघरांना घरकुल मिळावे, वृद्ध निराधारांना पगार मिळावेत, रेशन कार्ड मिळावेत आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या. यावेळी दादा भुसे यांनी अजंग ग्रामस्थांच्या समस्या समजून घेतल्या. तसेच सदर रेशन दुकानबाबत तपासणी करण्याच्या सूचना तहसीलदार ज्योती देवरे यांना केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनवा, शाडू मातीचे लाडके बाप्पा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या लाडक्या बाप्पांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करीत यंदाचा गणेशोत्सवाचा उत्साह तुम्ही आणखी संस्मरणीय करू शकता. त्यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब व लायन्स क्लब ऑफ पंचवटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज, रविवारी (दि. २)इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

लाडक्या गणरायाचे लवकरच आगमन होत असल्याने प्रत्येकात वेगळाच उत्साह संचारला असून, बाप्पांच्या स्वागतासाठीची खरेदी जोर धरू लागली आहे. सुबक आणि आकर्षक गणेशमूर्ती सर्वांनाच आकर्षित करीत आहेत. अशाच सुबक मूर्ती तुम्हालाही बनवता येऊ शकतात. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब व लायन्स क्लब ऑफ पंचवटीने अशी संधी नाशिककरांना इको फ्रेंडली गणेशमूर्ती मेकिंग कार्यशाळेद्वारे उपलब्ध करून दिली आहे. खुटवडनगर येथील माहेरघर मंगल कार्यालयात दुपारी ३ ते ६ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. प्रसिद्ध मूर्तिकार आनंद तांबट या कार्यशाळेत गणेशमूर्ती बनविण्यास शिकविणार आहेत. 'पीओपी'च्या मूर्तींपासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी शाडू मातीच्या गणेशमूर्तींकडे सर्वांचा कल वाढला आहे. इको फ्रेंडली गणेशोत्सवासाठी सर्वजण अाग्रही भूमिका घेत आहेत. बारा दिवसांवर आलेल्या लाडक्या गणेशोत्सवासाठी यंदा स्वत: घडविलेल्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याचे सुख अनुभवण्याची संधी तुम्हाला या कार्यशाळेतून मिळणार आहे. कार्यशाळेत सहभागासाठी १०० रुपये शुल्क राहणार आहे. गणेशमूर्ती बनविण्यासाठी आवश्यक माती आयोजकांकडून देण्यात येणार आहे.

--

लोगो : मटा कल्चर क्लब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कचऱ्याने ‘स्मार्ट’ला ग्रहण!

$
0
0

कचऱ्याने 'स्मार्ट'ला ग्रहण!

शहरात उघड्यावर कचराफेक सुरूच; प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

शहराचा एकीकडे विकास होत असताना दुसरीकडे कचऱ्याच्या वाढलेल्या प्रमाणाने 'स्मार्ट'सिटीलाच ग्रहण लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे. शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांच्या कडेला तसेच नागरी वसाहतींना साचलेल्या कचऱ्याचे ग्रहण लागल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. याकडे आयुक्तांनी तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष दिल्यास शहर 'स्मार्ट' होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

नाशिक महापालिकेत आयुक्त तुकाराम मुंढे व सत्ताधारी यांच्या वादात मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मध्यस्थी केल्याने काही प्रमाणात वाद निवडला आहे. पण, या सर्व वादामध्ये शहरातील स्वच्छतेचा विषय मागे पडला आहे. अनेक महत्त्वांच्या ठिकाणी उघड्यावर सर्रास कचराफेक सुरूच असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याबाबत महापालिकेच्या स्वच्छता विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी नाशिककरांनी केली. विशेष म्हणजे, गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यालगत असलेल्या भागात सर्वाधिक कचराफेक केला जात असल्याने परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होत आहे.

शहरात अनेक ठिकाणी महापालिकेचे आरक्षित भूखंड, खासगी विकसकांच्या पडून असलेल्या जागांवर कचरा फेकलेला दिसून येतो. जलसिंचन विभागाच्या डाव्या कालव्यालगत तर दररोज कचरा व डेब्रेज टाकले जाते. याबाबत कोणतीही कार्यवाही का केली जात नाही, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

दंडात्मक करावाई करावी

नागरी कामे होत नसल्याने अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. मनपाच्या आरोग्य विभागाने शहरातील नाशिकरोड, पंचवटी, सिडको, पश्चिम, मध्य व सातपूर विभागात रोजच उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. त्याचबरोबर नागरिकांवर दंडात्मक कारवाई करायला हवी. जेणेकरून एखाद्यास दंडात्मक करावाईस सामोर जावे लागल्यास पुढचा आपोआप शहाणा होईल, असेही काहींचे मत आहे.

वेगाने विकसित होत असलेल्या शहरात सर्रास उघड्यावर कचरा टाकला जातो. याबाबत नागरिकांनी आपली मानसिकता बदलायला हवी. त्यानंतर आपले शहर स्मार्ट सिटीकडे वाटचाल करू शकेल.

दिनेश बच्छाव, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज ठाकरेंच्या सभेत लाइटची वायरच कापली!

$
0
0

धुळेः

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची धुळे शहरात जाहीर सभा झाली. या सभेत राज यांनी चेहऱ्यावर येणारा लाइट बंद करण्यास सांगितलं. पण यावेळी लाइट बंद करण्याऐवजी थेट वायरच कापण्यात आली. या प्रकारामुळे राज ठाकरेंनी डोक्यालाच हात लावला.

जाहीर भाषणावेळी राज यांच्या चेहऱ्यावर एका लाइटचा थेट प्रकाश येत होता. यामुळे राज ठाकरे यांनी तो लाइट बंद करायला सांगितलं. पण व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मनसेच्या कार्यकर्त्याने लाइट बंद करण्याऐवजी थेट वायरच कापली. हे बघून राज ठाकरेही चकीत झाले. 'मला असाच मनसैनिक अपेक्षित आहे', असं ते म्हणाले. राज यांच्या या वक्तव्यानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला.

मराठवाड्यातील बीड, जालना, औरंगाबादचा दौरा अटोपल्यानंतर राज ठाकरेंनी आज उत्तर महाराष्ट्रात धुळ्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी धुळे शहराच्या विकासाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. धुळ्यात खूप वर्षांपूर्वी आलो होतो. पण धुळे शहराचा विकास होण्याऐवजी बिघाडच झालाय, अशी टीका त्यांनी केली. यानंतर राज ठाकरे रात्री आठच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सातारा हिल’वर राधाकृष्णन यांची छाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अत्यंत आव्हानात्मक समजली जाणाऱ्यात सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेवर नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आपला ठसा उमटविला आहे. अर्ध मॅरेथॉनमधील २१ किलीमीटरचे अंतर त्यांनी अवघ्या २ तास १६ मिनिटांमध्ये पूर्ण केले.

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे यांच्या हस्ते या अर्ध मॅरेथॉनचे उद्घाटन करण्यात आले. या मॅरेथॉनचे यंदा सातवे वर्ष होते. स्पर्धेत देशभरातून जवळपास ७ हजार धावपटूंसह इथिओपिया, केनिया, फिनलँड, जर्मनीसह सात अन्य देशांमधून शंभरहून अधिक धावपटू या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. डोंगर पठारावर होणाऱ्या या स्पर्धेला आजवर लाभलेला हा सर्वाधिक प्रतिसाद मानला जातो आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी २१ किलीमीटर अंतर अवघ्या २ तास १६ मिनिटांमध्ये पूर्ण केली. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणेश मंडळांना दिलासा

$
0
0

बी. डी. भालेकर मैदानाऐवजी गणेश मंडळांना साधुग्रामची जागा सुचवण्यात आली होती. मात्र, ती शहराबाहेर असल्याने या जागेला मंडळांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर आयुक्तांनी ईदगाहच्या जागेचा पर्याय सुचवला. मात्र, सामाजिक शांततेचा मुद्दा पुढे करीत या जागेला पोलिसांनी आक्षेप घेतला. या काळातच ईद असल्याने मुस्लिम बांधवांनीही ईदगाह मैदानाबाबत आक्षेप नोंदवला. महापालिका आयुक्त आणि महापौरांनी बैठक घेऊन गणेश मंडळांशी चर्चाही केली. मात्र, तिढा कायम राहिला. अखेर पालकमंत्र्यांनी हस्तक्षेप करीत बी. डी. भालेकर मैदानालाच परवानगीचे निर्देश दिल्याने तिढा सुटला. त्यामुळे गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तक बाप गेला कुठे?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचा दत्तक बाप कुठे गेला? असा प्रश्न करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दत्तक घोषणेची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी खिल्ली उडवली. धुळे येथून रविवारी रात्री नाशिकला मुक्कामी आले असता त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांवर निशाना साधला.

रविवारी रात्री आठ वाजता राज ठाकरे यांचे नाशिकला आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी नाशिकचे विविध प्रश्न त्यांच्यासमोर मांडले.

नाशिक येथे मुक्काम करून ते सकाळी साडेदहा वाजता पुणे येथे जाणार असल्यामुळे या मुक्कामात त्यांनी कार्यकर्त्यांशी पंधरा मिनिटे संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी प्रत्येक वेळेस मीच बोलायचे का? असे सांगत तुम्ही बोला असे कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले. त्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्यासमोर अनेक समस्या मांडल्या. एकलहरे येथील प्रकल्प विदर्भात हलवला जात आहे. आतापर्यंत सर्वांनी विरोध केला. पण, मनसेने विरोध केला तर हा प्रकल्प हलवला जाणार नाही. यामुळे अनेकांचा रोजगाराचा प्रश्नही सुटेल, असे कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यावर राज ठाकरे यांनी मात्र मौन पत्करले. गेल्या पाच वर्षांत मनसेने महापालिकेत अनेक विकासकामे केली. पण, आता काहीच कामे होत नाहीत. अनेक प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत राज ठाकरे यांना लक्ष घालण्याची विनंती केली. यावेळी वीज दरवाढ, उद्योग स्थलांतर करीत असल्याचेही प्रश्न मांडण्यात आले. यावेळी स्केटिंगसाठी स्टेडियम हवे, यासाठी या खेळाडूंनी राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

लोकांनी केलेला विरोध कमी का?

महापालिकेने केलेली करवाढ, त्याला झालेला विरोध यावर एका कार्यकर्त्याने पक्षाने आंदोलन करायला हवे होते असे सांगितले. त्यावर राज ठाकरे यांनी यावेळी लोकांनी केलेला विरोध कमी होत का? असे सूचक वक्तव्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीकरांचे पाणी महागणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

पाण्याचा वाढता वापर लक्षात घेता कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या बैठकीत पाणीपट्टी करात दरवाढ करण्याबाबत सुचविण्यात होते. त्यावर नुकत्याच झालेल्या बैठकीत एकमत झाल्याने आता नागरिकांच्या पाणीबिलात वाढ होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

गेल्या सहा वर्षांपासून नागरिकांना हजार लिटरमागे ३ रुपये ५० पैसे कर आकारणी करण्यात येत असून, व्यावसायिकांसाठी हाच दर ३० रुपये आहे. आता पाणीपट्टीत किमान ७५ पैशांची वाढ करण्यावर एकमत झाले आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे पाणीपट्टी कर थकित आहे त्यांना एकरकमी तडजोडीसाठी मार्च २०१९ पर्यंत मुदत देण्यात येऊन दंड व व्याजात सूट मिळणार आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्डाची सर्वसाधारण सभा अध्यक्ष ब्रिगेडियर पी. रमेश यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. त्यात अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णय घेण्यात आले. बैठकीस उपाध्यक्षा मीना करंजकर, नगरसेविका प्रभावती धिवरे, सचिन ठाकरे, भगवान कटारिया, आशा गोडसे, दिनकर आढाव, कावेरी कासार, बाबूराव मोजाड, ब्रिगेडिअर ए. के. श्रीवास्तव, कर्नल कमलेश चौहान, कर्नल राहुल मिश्रा, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार आदी उपस्थित होते. बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार शहरात आगामी पंधरा दिवसांत पार्किंगची स्वतंत्र यंत्रणा राबविण्यात येणार आहे. त्याशिवाय पाणीपट्टीत वाढ, रस्ते दुरुस्ती, विविध समित्या, वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिक सभागृह, ई-लर्निंग व वाचनालयासाठी २० लाखांचे साहित्य आदी कामांनाही मंजुरी देण्यात आली.

रस्तेदुरुस्ती आठ दिवसांत

शहरात वाहतुकीस त्रासदायक ठरत असलेल्या मोकाट जनावरांच्या प्रश्नांवर निर्णय घेताना संबंधित मालकांवर कठोर व दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गत दोन महिन्यांत झालेल्या कारवाईदरम्यान बोर्डाला दंडाच्या रकमेतून एक लाख रुपये महसूल प्राप्त झाला. पावसामुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था पाहता आठ दिवसांत रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये सर्वत्र मुरूम टाकण्यात येऊन नागरिकांचा होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दिवाळीनंतर शहरात भूमिगत गटाराच्या कामांमुळे झालेली रस्त्याच्या डांबरीकरणाची व काँक्रिटीकरणाची कामे मार्गी लावण्यात येतील.

१५ पासून 'पे अँड पार्क'

शहरवासीयांना भेडसावणारा पार्किंगचा प्रश्‍न मार्गी लावताना प्रशासनाने हौसनरोड, आठवडेबाजार व पोलिस स्टेशनलगत तीन ठिकाणी दुपारी १ ते रात्री ९ या वेळेत 'पे अँड पार्क'ची व्यवस्था केली असून, व्यापाऱ्यांनी दिलेल्या निवेदनावरही सभेत चर्चा करण्यात आली. दि. १५ सप्टेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, पहिले १५ दिवस ही सुविधा मोफत दिली जाणार आहे. वॉर्ड ४ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सभागृहाला खासदार हेमंत गोडसे आणि आमदार योगेश घोलप यांच्या निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये जिल्हा नियोजन मंडळाकडून देण्यात आले असून, या कामालाही मंजुरी देण्यात आली. वॉर्ड २ मध्ये असलेली लायब्ररी व अभ्यासिकेसाठी २० लाखांचे अत्याधुनिक फर्निचर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कॅन्टोन्मेंट शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या विकासाकरिता ई-लर्निंग सुविधेला मंजुरी देण्यात येऊन आवश्यक असलेली शिक्षकसंख्या वाढविली जाणार आहे. शहरात लावण्यात येणाऱ्या फलकांसाठी पुढील सभेत निर्णय घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्णजन्मोत्सवाचा पंचवटीत उत्साह

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

धार्मिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंचवटीत श्रीकृष्णजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. जुना आडगाव नाका येथील श्रीकृष्णनगरमधील कृष्ण मंदिरात रविवारी सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. येथे सोमवारी (दि. ३) दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

तपोवनातील श्रीराम पर्णकुटी येथे महंत रामदयाल बैजनाथ महाराज यांच्या हस्ते कृष्णपूजनाचा आणि पाळण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. नांदूर आणि म्हसरूळ येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनात श्रीकृष्णजन्मोत्सव साजरा करण्यात आला. कोणार्कनगर येथे सोमवारी दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. तारवालानगर सांस्कृतिक, कला व क्रीडा मित्रमंडळाने दहीहंडी उत्सवात विविध वृक्षांची रोपे वाटली. नागरिकांनी ही रोपे आपल्या घरासमोर, मोकळ्या जागेत लावावीत, असे आवाहनह यावेळी करण्यात आले. स्वच्छ, सुंदर, निरोगी शहर बनविण्याच्या दृष्टीने मंडळाने हा उपक्रम राबविला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्यथा, तीव्र आंदोलन छेडणार!

$
0
0

'केळझर'च्या कामाबाबत आमदार चव्हाण यांचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील केळझर चारी क्रमांक आठचे प्रलंबित काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी दिलीप काळे यांनी आमदार दीपिका चव्हाण यांना शनिवारी दिले. याबाबत त्यांनी दि. १० ते २० सप्टेंबर एवढी मुदत मागितल्याने शनिवारी (दि. १) संबंधित कार्यालयास कुलूप ठोकण्याचा निर्णय तूर्त मागे घेतला. मात्र, हे काम सुरू होण्यास विलंब झाल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी रविवारी दिला.

बागलाण तालुक्यातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या केळझर चारी क्रमांक आठचे काम सुरू व्हावे या मागणीसाठी लाभक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांनी स्वातंत्र्यदिनी वीरगाव (ता. बागलाण) येथील विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल घेत आमदार दीपिका चव्हाण यांनी गिरणा खोरे प्रकल्प विभागात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शनिवारी चारीचे प्रलंबित काम सुरू करण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे प्रत्यक्ष कामास सुरुवात न झाल्याने येथील लघु पाटबंधारे विभाग कार्यालयास कुलूप लावण्याच्या तयारीत असलेल्या आमदार चव्हाण यांची कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी दिलीप काळे यांनी भेट घेऊन चर्चा केली.

यामध्ये येत्या १० ते २० सप्टेंबरपर्यंतची अखेरची मुदत मागून घेत तसे लेखीपत्र काळे यांनी आमदार चव्हाण यांना दिले. या वेळी माजी आमदार संजय चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, बाजार समितीचे संचालक केशव मांडवडे, शिवाजी पवार, संजय पवार, मिलिंद शेवाळे, हितेंद्र बागूल, अनिल चव्हाण, सरपंच अमोल बच्छाव, किरण पाटील आदींसह शेतकरी उपस्थित होते.

केळझर चारी क्रमांक आठच्या कामासाठी सरकारची अंतिम मान्यता असून, वाढीव निधीदेखील मंजूर आहे. मात्र, डोंगरेज शिवारातील काही शेतकऱ्यांचा या कामास विरोध असल्याने काम प्रलंबित आहे. वाढीव किमतीसाठी नव्याने प्रक्रिया राबविण्यात होणारा विलंब लक्षात घेता मूळ ठेकेदाराच्या संमतीने नवीन ठेकेदाराकडे काम हस्तांतरित केले आहे. वादात असलेल्या डोंगरेज शिवारातील एक किलोमीटर कामासाठी भूमिगत जलवाहिनी टाकण्याचा निर्णय झाला आहे.

- दीपिका चव्हाण, आमदार, बागलाण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images