Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सावाना शिक्षक गौरव पुरस्कार जाहीर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय, नाशिक आणि नागरिक शिक्षक गौरव समिती यांच्या वतीने आयोजित ४९ व्या नागरिक शिक्षक गौरव सोहळ्यातील सन्मानार्थी शिक्षकांच्या नावांची घोषणा समितीचे अध्यक्ष प्रा. यशवंतराव पाटील व कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी केली.

शुक्रवारी (७ सप्टेंबर)सायंकाळी ६ वाजता प. सा. नाट्यगृह येथे डिजिटल मॅùन हर्षल विभांडिक यांच्या हस्ते या शिक्षकांचा गौरव करण्यात ûयेणार आहे. त्याचबरोबर आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला रोईंग क्वाड्रापल शर्यतीत सुवर्णपदक मिळवून देणारे दत्तू भोकनळ, फ्रान्स येथे पार पडलेली आयर्नमùन - २०१८ स्पर्धा पूर्ण करणारे पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल व त्यांची कन्या रविजा सिंघल, योगप्रसार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पंतप्रधान विशेष पुरस्काराने सन्मानित झालेले विश्वासराव मंडलिक यांचा विशेष गौरव यावेळी करण्यात येणार आहे.

..

सन्मानित करण्यात येणारे शिक्षक

प्राथमिक विभाग

दीपाली निवृत्ती रायते (मनपा शाळा क्र. १०, केला विद्यालय, पंचवटी), प्रमिला कृष्णा आहेर (मनपा शाळा क्र. ४६, उपनगर), मोहिनी अतुल भगरे (मोहिनीदेवी रुंग्ठा प्राथमिक विद्यामंदिर, अशोकस्तंभ), सुनीता भास्कर जाधव (नवीन मराठी शाळा, सानेगुरुजीनगर, जेलरोड)

..

माध्यमिक विभाग

पुष्पा सोपानदेव चोपडे (नवरचना विद्यालय, सावरकरनगर), विजय बंडू म्हस्के (जनता विद्यालय, गांधीनगर), लक्ष्मण सखाराम जाधव (पेठे विद्यालय), ज्ञानेश्वर बाळकृष्ण महाजन ( माùडर्न एज्यु. सोसायटीचे माध्यमिक विद्यालय, सिडको)

..

उच्च माध्यमिक विद्यालय विभाग

मीनाक्षी विष्णू पानसरे (डी. डी. बिटको हायस्कूल व ज्यु. काùलेज)

..

महाविद्यालयीन विभाग

डॉ. अशोक विश्राम बोराडे (एचपीटी आर्टस आणि आरवायके सायन्स महाविद्यालय), डॉ. दिलीप भिकाजी शिंदे (कर्मवीर शांतारामबापू वावरे महाविद्यालय), डॉ. वसंत गोविंद वाघ (व्ही. एन. नाईक महाविद्यालय)

..

कला, क्रीडा विभाग

चंद्रकांत बंडुजी भाग्यवंत (गुरू गोविंदसिंग पब्लिक स्कूल), कला विभाग - प्रा. संजय काशिनाथ बागूल, शास्त्रीय संगीत विभाग- शशिकांत बळवंत मुजुमदार, विशेष गौरव विभाग - विद्या आनंद फडके, रमेश बाळू जाधव, व्यावसायिक विभाग - डॉ. जय मनोहर बिरारी (कर्मवीर अॅùड. गणपतराव बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय), सेवानिवृत्त - उत्तमराव तुकाराम देवरे (प्राथमिक), वासुदेव रामचंद्र शिंगणे (माध्यमिक) व प्रा. हर्षवर्धन रामचंद्र कडेपुरकर (महाविद्यालय)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अधीक्षक नलिनी पाटील निलंबित

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कॅरमबोर्डची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या बाल निरीक्षणगृहाच्या अधीक्षक नलिनी पाटील यांना निलंबित करण्याबाबतचे आदेश आयुक्तालयातून काढण्यात आले आहेत. या आदेशाचे पत्र जिल्हा महिला व बाल कल्याण विभागास मिळाले आहे.

लाचखोरीच्या गुन्ह्यात पाटील यांच्यासह लिपिक प्रशांत देसले यांना अँटि करप्शन ब्युरोने (एसीबी) मंगळवारी (दि. २१) उंटवाडीरोडवरील बालनिरीक्षणगृहातच सापळा रचून अटक केली होती. या सापळ्यानंतर एसीबीने पाटील यांच्यासह देसलेवर निलंबनाची कारवाई करण्याबाबतचे पत्र जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाला पाठवले होते. या विभागाने हे पत्र पुणे येथील आयुक्तालयाला सादर केले. आयुक्तालय प्रशासनाने एसीबीच्या पत्राची दखल घेत संबंधितांना निलंबित करण्याबाबतच्या आदेशाचे पत्र पाठवले आहे. हे पत्र नुकतेच प्राप्त झाले असून, त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती विभागातील सूत्रांनी दिली. अधिकारांची कमतरता असलेल्या महिला व बालकल्याण विभागाचा आणखी एक अधिकारी काही महिन्यांसाठी कमी झाला आहे. त्यामुळे मुळातच अतिरिक्त कामाचा ताण असलेल्या अधिकाऱ्याकडेच बाल सुधारगृहाचा कारभार सोपविण्यात आला असल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यवसाय शिक्षकांचे उद्या धरणे

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाची रुपांतरण प्रक्रिया स्थगित करून या अभ्यासक्रमाला अनुदान देऊन सक्षमीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी व्होकेशनल टीचर्स असोसिएशनकडून राज्यव्यापी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. मंगळवारी (४ सप्टेंबर) सहसंचालक कार्यालय व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालयासमोर दुपारी ३ ते ५ या वेळेत हे आंदोलन होणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाकडील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे व्यवसाय अभ्यासक्रमाच्या प्रगतीला अडथळे निर्माण होत असून, हा अभ्यासक्रम प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे असोसिएशनकडून सांगण्यात येत आहे. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाबाबत रुंपातरण प्रक्रिया पूर्णत: स्थगित करून या अभ्यासक्रमाला एनएसक्यूएफचा दर्जा प्राप्त करून द्यावा व अनुदान देऊन सक्षमीकरण करण्यात यावे, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात येणार आहे. त्याबरोबरच उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाकडील विद्यार्थी संख्या पूर्ववत प्रती तुकडी २० ठेवण्यात यावी, आढावा समितीचा अहवाल सार्वत्रिक करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, घड्याळी तासिकेवरील शिक्षकांच्या मानधनात वाढ करावी तसेच पायाभूत अभ्यासक्रमासाठी एम कॉम, बीएड ही पर्यायी शैक्षणिक अर्हता असावी, राज्य व केंद्र सरकारच्या सेवाशर्ती नियमावलीत व्यवसाय अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात यावा, प्रत्येक अभ्यासक्रमासाठी पुढील शिक्षणाच्या संधी असाव्यात, विद्यार्थ्यांना सैनिक भरतीसाठी पात्र ठरविण्यात यावे, शासन निर्णयानुसार करण्यात आलेल्या पदभरतीला कालमर्यादेत मंजुरी मिळावी, आदी मागण्या या आंदोलनातून मांडण्यात येणार आहे. नाशिकमधील जास्तीत जास्त व्यवसाय शिक्षकांनी यावेळी हजर रहावे, असे आवाहन अध्यक्ष गणेश टर्ले यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीकृष्णदेवराय यांनी दिलेले दागिने गेले कोठे?

0
0

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सोळाव्या शतकातील विजयनगर साम्राज्याचा सम्राट श्रीकृष्णदेवराय यांनी तिरुपती बालाजी मंदिराला दान केलेले दागिने कोठे आहेत, असा सवाल केंद्रीय माहिती आयोगाने विचारला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग, सांस्कृतिक मंत्रालय, आंध्र प्रदेश सरकार आणि तिरुमला तिरुपती देवस्थानला आयोगाने हा प्रश्न विचारला असून, या प्रकरणी उत्तर द्यावे, असेही म्हटले आहे.

माहिती आयुक्त श्रीधर अचार्युलू यांनी या प्रकरणात पंतप्रधान कार्यालयाकडूनही स्पष्टीकरण मागवले आहे. तिरुपती मंदिराला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे; तसेच मंदिराचे बांधकाम आणि इतर दुर्मीळ दागिनांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय नियमावली लागू करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. बीकेएसआर अय्यंगार यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान ही मागणी करण्यात आली आहे. सुरुवातीला विविध संस्थांकडून त्यांनी या प्रकरणात उत्तर मागितले होते. मात्र, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी माहिती आयोगाचे दरवाजे ठोठावले होते. तिरुपती मंदिराच्या देखभालीचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला होता. १५०० वर्षे जुने असलेले मंदिर राष्ट्रीय वारसास्थळ म्हणून जाहीर झाल्यास त्याची देखभाल उत्तम होईल, अशी आशा व्यक्त करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चिमुकल्यांनी घडविल्या श्रीगणेशाच्या मूर्ती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लहान वयातील मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजवली की आपोआपच त्याचा लाभ पर्यावरणाच्या भविष्यासाठी होतो, या विचाराने सार्वजनिक वाचनालयाच्या बालभवन विभागाच्या वतीने गणेशमूर्ती निर्मितीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सार्वजनिक वाचनालयाच्या लिमये सभागृहात ही कार्यशाळा पार पडली.

इयत्ता चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत सहभाग घेतला. मनीषा मोरे यांनी गणेशमूर्ती बनविण्याचे मार्गदर्शन केले. सावानाचे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, कार्याध्यक्ष धर्माजी बोडके, बालभवन समिती अध्यक्ष संजय करंजकर, समिती सदस्य प्रकाश वैद्य, गीता बागूल, ज्योती फड, अर्चना सूर्यवंशी, प्रकाश पोळ यांची उपस्थिती होती.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसला टाळून शाडू मातीच्या गणपतीचीच प्रतिष्ठापना घरोघरी करावी, यासाठी शहरात रविवारी विविध ठिकाणी कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले होते. के. के. वाघ इंजिनीअरिंग कॉलेजच्या मैदानावरदेखील रविवारी ही कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) येथेही ही कार्यशाळा घेण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनयातून उलगडला सावित्रीबाईंचा जीवनपट

0
0

हृदयाला भिडणाऱ्या संवादांनी आणले अंगावर शहारे

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंगावर रोमांच उभे करणारे सावित्रीबाई यांच्या जीवनातील प्रसंग.. थेट हृदयाला भिडणारे त्यांचे बोलीभाषेतील चपखल संवाद.. ते तेवढ्याच ताकदीने रसिकांपर्यंत पोहोचविणारा सशक्त अभिनय अन सावित्रीबाई फुलेच जणू समोर येऊन आत्मकथन करताहेत की काय असा होणारा भास हा सगळा माहोल रविवारी कुसुमाग्रज स्मारकामध्ये जमून आला. निमित्त होते सपान निर्मित आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजीत 'व्हय मी सावित्रीबाई' या एकपात्री नाट्य प्रयोगाचे.

येथील विशाखा हॉलमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एकपात्री नाटकाचे. मान्यवरांच्या उपस्थितीत या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. तो अनुभवण्यासाठी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी या नाट्यप्रयोगासाठी मेहनत घेणाऱ्या कलावंतांचा मकरंद हिंगणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर नाट्यप्रयोगाला सुरुवात झाली. जोतिबा फुले यांच्याशी विवाह झाल्यानंतरचा सावित्रीबाईंच्या जीवनाचा एकेक पैलू उलगडू लागला. सावित्रीबाईंचा शैक्षणिक प्रवास, समाजाकडून सुरू झालेली अवहेलना, पदोपदी गिळावे लागणारे अपमानाचे घोट असा अनूभव कथन करणारे अनेक धारदार प्रसंग अभिनेत्री दामिनी जाधव यांनी आपल्या सशक्त अभिनयाद्वारे रसिकांच्या डोळ्यांसमोर जीवंत केले. चपखल शब्दफेक, काळजाला भिडणारे आवाजातील चढउतार अन चेहऱ्यावरील हावभावांनी तत्कालीन परिस्थिती डोळ्यांसमोर उभे करण्याचे कसब यांमुळे रसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. सुषमा देशपांडे यांनी अजरामर केलेली ही कलाकृती सचिन शिंदे यांनी अतिशय नावीन्यपूर्ण पद्धतीने उभी केली. लक्ष्मण कोकणे, रोहित सरोदे, राहुल गायकवाड, नीलेश सूर्यवंशी, धनंजय देशमुख, प्रथमेश देशपांडे, चेतन बर्वे, कार्तिकेय कत्रोजवार, उर्वराज गायकवाड आदींनी रंगमंच व्यवस्था सांभाळली.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उमाकांत निखारे यांना वसुंधरा पुरस्कार

0
0

गोवर्धने, शिवानी गणेश यांना वसुंधरा मित्र पुरस्कार

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

एकलहरे विद्युत निर्मिती केंद्राचे प्रमुख उमाकांत निखारे यांना वसुंधरा सन्मान तर वन्यजीव छायाचित्रकार संग्राम गोवर्धने व पर्यावरण विषय माध्यमातून मांडणाऱ्या शिवानी गणेश यांना वसुंधरा मित्र पुरस्कार जाहीर झाला आहे. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथे प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले यांच्या हस्ते व किर्लोस्कर लार्ज इंजिनचे शीतल कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. ६) सायंकाळी सहा वाजता पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

नाशिक शहरात मंगळवारी (दि. ४) ते शुक्रवारी (दि. ७) सप्टेंबर या कालावधीत किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. किर्लोस्कर व वसुंधरा क्लबच्या पुढाकाराने देशातील ३० हून अधिक शहरांमध्ये हा महोत्सव भरविण्यात येतो. नाशिकमध्ये सलग नऊ वर्षे हा महोत्सव होतो. महोत्सवाचा या वर्षीचा विषय 'प्रदूषण टाळा, नदी वाचवा' असा आहे. वसुंधरा महोत्सवात या वर्षी थेट महाविद्यालयातच लघुपट दाखविण्यात येणार आहे. नॅशनल अन्थम हा भारतीय राष्ट्रगीताच्या पार्श्वभूमीवर वन्यजीवन चित्रित करण्यात आलेल्या लघुपटाचे याच महोत्सवात स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. शैलेजा देशपांडे व डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांचे व्याख्यान, फोटो प्रदर्शन, चर्चासत्र महाविद्यालयात होणार असल्याची माहिती किर्लोस्कर समूहाचे जगदीश गदगे, कुसुमाग्रज फिल्म सोसायटीचे हेमंत बेळे यांनी दिली.

उमाकांत निखारे हे राष्ट्रीय अणुऊर्जा प्रकल्प एकलहरे येथे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत आहेत. टीपीएस, महाजेनको येथे ऊर्जा संवर्धनातील योगदानाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. इको-फ्रेंडली मॅजिक बॉक्स नावाची अद्वितीय यंत्रणा वापरून स्वयंपाक घरातील कचऱ्यापासून जैविक खत निर्माण करण्याचा प्रकल्प त्यांनी राबविला आहे. परिसर प्लास्टिक मुक्ती व कॅन्टिनजवळ बायोगॅस प्रकल्प सुरू केला आहे.

संग्राम गोवर्धने हे आर्किटेक्ट असून वाईल्ड लाईफ फोटोग्राफी हा त्यांचा छंद आहे. त्यांची पर्यावरण प्रेमी म्हणून ओळख असून छायाचित्र काढताना त्यांनी जंगलातील महत्त्वाच्या विषयांवर दस्तऐवज गोळा केला आहे.

शिवानी गणेश या पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. पर्यावरण या विषयात त्या विशेष रुची ठेवतात. पर्यावरण विषयावरील अनेक लेखांमधून त्यांनी जनजागृती केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंजीतकुमार, मोनिका प्रथम

0
0

ठाणे वर्षा मरेथॉनवर नाशिकचे वर्चस्व

--

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ठाणे जिल्हा हौशी अॅथलेटिक्स संघटना व ठाणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २९ व्या राज्यस्तरीय ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये पुरुषांच्या खुल्या गटात नाशिकच्या रंजीतकुमार पटेल याने व महिलांच्या खुल्या गटात एलआयसीच्या मोनिका आथरे हिने प्रथम क्रमांक पटकावला.

नाशिकच्या रंजीतकुमार याने २१ किलोमीटरचे अंतर १ तास ७ मिनिटे ४१ सेकंदात पूर्ण केले. मोनिकाने १५ किलोमीटरचे अंतर ५६ मिनिट २२ सेकंदात पूर्ण केले. पुरुषांमध्ये द्वितीय क्रमांक दीपक कुंभार याने पटकावला. त्याने निर्धारित अंतर १ तास ८ मिनिटे ३२ सेकंदात पूर्ण केले. तृतीय कमांक संतोष कुमार याने मिळवला. त्याने १ तास ९ मिनिटे ४९ सेकंदात अंतर पूर्ण केले.

महिलांच्या खुल्या गटात द्वितीय क्रमांक पुण्यातील रेल्वे विभागाच्या स्वाती गाढवे हिने मिळवला. तिने निर्धारित अंतर ५७ मिनिटे १६ सेकंदात पूर्ण केले. तृतीय क्रमांक नाशिकच्याच आरती देशमुख हिने मिळवला. तिने १ तास २ मिनिटे ४८ सेकंदात अंतर पूर्ण केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पोस्ट बँके’बाबत साशंकता

0
0

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचे लोकार्पण करण्यात आले. मात्र, देशभरातील पोस्ट कार्यालयांना घरघर लागलेली असताना पोस्ट बँक येणार दारी हा उपक्रम यशस्वी ठरू शकेल का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. शहरातील बहुतांश पोस्ट कार्यालये अजूनही अडचणीच्या ठिकाणी असून, पोस्ट कार्यालयांसाठी आरक्षित असलेल्या मोक्याच्या जागा आजदेखील धूळ खात पडून असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पोस्ट बँक आपल्या दारी हा उपक्रम ज्येष्ठांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. परंतु, त्यासाठी पोस्ट कार्यालयांसाठी योग्य जागा व व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे, असे नागरिकांनी मत व्यक्त केले.

पुरेसे मनुष्यबळ करावे उपलब्ध

देश स्वतंत्र झाल्यापासून अनेक दशके पोस्ट कार्यालये समाजजीवनाचा अविभाज्य घटक राहिली. मात्र, कालांतराने पोस्ट कार्यालायचा उपयोग केवळ शासकीय कागदपत्रे घरी येण्यासाठीच सुरू झाला. आता नव्याने पोस्ट बँक आपल्या दारी उपक्रम केंद्राने सुरू केला ही आनंदाचीच बाब आहे. मात्र, त्याकरिता सरकारने पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.

-आकाश निगळ

लाभ मिळणार का हाच खरा प्रश्न

नाशिकमधील बोटांवर मोजण्याइतकी पोस्ट कार्यालये सोडली, तर इतर भाडेतत्त्वावरील जागेत सुरू असलेल्या कार्यालयांची अवस्था बिकट आहे. अडगळीच्या जागेत कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. आधार कार्ड काढलेल्या अनेकांना तर पोस्टमन कमी असल्याने पोस्ट कार्यालयातच जावे लागते. त्यामुळे पोस्ट बँकिंग सुरू झाल्यावर ग्राहकांना खरा लाभ मिळणार का हाच प्रश्न आहे.

-अरुण शिंदे

अंमलबजावणीसाठी योजावेत पूरक उपाय

पोस्ट कार्यालयाच्या पडून असलेल्या जागावर नव्याने कार्यालये उभारावीत, अशी मागणी सातत्याने नागरिक, ग्राहकांकडून केली जाते. परंतु, याबाबत निधीच उपलब्ध नसल्याचे चक्क खासदार व आमदारांकडून सांगितले जाते. अशा स्थितीत आलेली पोस्ट बँक आपल्या घरी संकल्पना योग्य असली, तरी तिची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी योग्य पूरक उपाय योजले जावेत.

-अमित भालेराव

सरकारने उभारावी स्वतंत्र यंत्रणा

गेल्या काही वर्षांपासून पोस्ट कार्यालयात केवळ शासकीय नोकरीसाठी भरलेल्या अर्जांचे परीक्षा प्रवेशपत्र आले का याची माहिती घेण्यासाठीच जावे लागते. पोस्टाचे असे नाममात्र ठरण्याजोगे व्यवहार सुरू असल्याने आता पोस्ट बँक आपल्या घरी योजना राबविताना अगोदर पोस्ट खात्यांच्या कार्यालयांना अच्छे दिन आले पाहिजेत. त्यासाठी सरकारने स्वतंत्र यंत्रणा उभारली पाहिजे.

-निखिल जाधव

कार्यालयांची मरगळ करावी दूर

खुद्द पंतप्रधानांनी लोकार्पण केलेल्या भारतीय पोस्ट पेमेंट बँकेचा सर्वाधिक लाभ ज्येष्ठ नागरिकांना मिळण्याची शक्यता वाटते. त्यामुळे विविध समाजघटकांच्या सोयीच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्यासह पोस्ट कार्यालयांना आलेली मरगळ सरकारी यंत्रणेने दूर केली पाहिजे. केवळ नावालाच योजना असणे महत्त्वाचे नसून, संबंधित योजनेची योग्य अंमलबजावणी होणेदेखील गरजेचे आहे.

-शंकर पाटील

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अडीचशे सायकलिस्ट्सची ब्रह्मगिरी परिक्रमा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनतर्फे आणि महापालिकेचे निवृत्त चीफ इंजिनीअर यू. बी. पवार यांच्या सहकार्याने आयोजित नाशिक-त्र्यंबकेश्वर सायक्लोथॉनमध्ये अडीचशेहून अधिक सायकलिस्ट्सने ब्रह्मगिरी परिक्रमा पूर्ण केली. यावेळी सायकलिंग आणि ट्रेकिंग असा दुहेरी अनुभव सायकलिस्टला मिळाला.

नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संजय दराडे, नाशिक महापालिकेचे निवृत्त चीफ इंजिनीअर यू. बी. पवार, लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेटचे राजेंद्र वानखेडे, नाशिक सायकलिस्ट्सचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रविवारी(२ सप्टेंबर) सकाळी ६ वाजता गोल्फ क्लब येथून सायक्लोथॉनला सुरुवात झाली. नाशिक ते त्र्यंबकेश्वर असे सायकलिंग केल्यानंतर २० किमीची पायी परिक्रमा पूर्ण करीत ब्रह्मगिरीचे निसर्गसौंदर्य अनुभवण्याची सुवर्णसंधी सायकलिस्ट्सने साधली. या सायक्लोथॉनला कान्हेरे मैदान येथून सुरुवात झाल्यानंतर-त्र्यंबक रोड-अंजनेरी-पेगलवाडी-पहिने-कोजोळी-गौतम ऋषी टेकडी-दुगारवाडी फाटा-त्र्यंबक-नाशिक परत असा या परिक्रमेचा मार्ग होता. एकूण ४० महिलांनी या सायक्लोथॉनमध्ये सहभाग नोंदविला. रस्ता संपल्यानंतर गौतम टेकडी येथून सुमारे ४०० मीटरचा चढ सायकल खांद्यावर घेत सायकलिस्टस मार्गस्थ झाले. तेथे राजेंद्र निंबाळते आणि त्यांच्या सहकारी स्वयंसेवकांनी सायकल घेऊन जाण्यासाठी मदत केली.

सात वर्षांपासून सुरू असलेल्या २० किलोमीटर ब्रह्मगिरी परिक्रमेमध्ये एसपी संजय दराडे यांनी पूर्णवेळ सहभाग नोंदवत सर्व परिक्रमा पूर्ण केली. यावेळी सायकलिंग आणि ट्रेकिंग असा दुहेरी अनुभव सायकलिस्टला मिळाला. यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये धर्मराज जगधाने यांना सायकल भेट देण्यात आली. सायक्लोथॉनच्या मार्गावर ठिकठिकाणी पाणी उपलब्ध करण्यात आले होते. रुग्णवाहिका, बॅकअप व्हॅन पूर्ण प्रवासादरम्यान उपलब्ध होती. यू. बी. पवार, योगेश शिंदे, अॅड. वैभव शेटे, डॉ. मनीषा रौदळ यांच्या समन्वयाने ही मोहीम राबवली गेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता स्टेट बँक चौकात यंत्रणेला बळींची प्रतीक्षा?

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

उड्डाणपूल ओलांडताना ट्रकच्या धडकेत मायलेक ठार झाल्यानंतर कमोदनगर येथील भुयारी मार्गाचे काम तातडीने सुरू झाले आहे. मात्र, स्टेट बँक चौकातील काम सुरू करण्यासाठी महामार्ग प्राधिकरण कमोदनगरप्रमाणे दुर्घटनेची वाट पाहत आहे का, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

महामार्गाच्या या कामांचा ठेका देऊन झालेला असतानाही हे काम अजूनही का सुरू करण्यात आले नाही, असा प्रश्न परिसरातून उपस्थित होत आहे. मुंबई महामार्गावर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाच्या उभारणीतील त्रुटींमुळे अनेकांना अपघाता प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने या त्रुटी दूर करण्यासाठी के. के. वाघ कॉलेज ते गरवारे पॉइंट या ठिकाणी किमान अकरा सुधारणा मंजूर करून त्यांची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यानुसार वर्षभरापूर्वी येथील कामांची 'वर्क ऑर्डर' दिल्यानंतरही कमोदनगर येथील भुयारी पादचारी मार्गाचे काम सुरू झालेले नव्हते. येथे जीवघेणा अपघात झाल्यानंतर नागरिकांनी आंदोलनाची भूमिका घेतल्याने महामार्ग प्राधिकरणाला खडबडून जाग आली आणि त्यांनी येथील कामाला सुरुवात केली आहे. कमोदनगरप्रमाणेच सिडकोतील स्टेट बँक चौकातही अशाच प्रकारचा भुयारी मार्ग मंजूर झाला असून, त्याचेही काम सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, केवळ कमोदनगर येथीलच काम सुरू झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्‍त केली आहे.

--

एकच ठेकेदार असूनही...

एकाच ठेकेदाराला ही सर्व कामे दिली असली, तरी यातील काही कामांची सुरुवात अद्यापही झालेली नाही. महामार्गावर होणाऱ्या अपघातांची संख्या विचारात घेऊन अत्यावश्यक कामे प्रथम करणे किंवा सर्वच कामे एकाच वेळी सुरू करण्याची अट का घालण्यात आली नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कमोदनगरला जशी दुर्घटना घडली तशीच दुर्घटना घडण्याची वाट प्रशासन किंवा संबंधित ठेकेदार बघत नाही ना, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डीबीटी’ला कडवा विरोध

0
0

'एआयएसएफ'च्या जिल्हा अधिवेशनात ठराव; सनातनवरही बंदीची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विद्यार्थ्यांवर लादण्यात येणाऱ्या डीबीटीच्या निर्णयास ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या (एआयएसएफ) जिल्हास्तरीय अधिवेशनात कडाडून विरोध दर्शविण्यात आला. याशिवाय दिल्लीमध्ये संविधान जाळण्याच्या झालेल्या प्रयत्नांच्या निषेधासह मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेचा निषेध आणि सनातन संस्थेवर बंदी घालण्यात यावी या मागणीसह चार प्रमुख ठराव संघटनेच्या अधिवेशनात मांडण्यात आले.

द्वारका परिसरातील वीज वर्कर्स पतसंस्थेच्या सभागृहात हे अधिवेशन झाले. यावेळी अधिवेशनासाठी राज्याचे अध्यक्ष व राष्ट्रीय उपाध्यक्ष पंकज चव्हाण, राज्य उपाध्यक्ष शंबुक संकल्पना उदय, शिक्षण अभ्यासक डॉ. मिलिंद वाघ, राजू देसले, महादेव खुडे आदी मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. वर्तमानात संविधानिक मूल्यांना लक्ष्य केले जात आहे. या मूल्यांच्या रक्षणासाठी सजग होण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन मार्गदर्शक पंकज चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना केले.

या अधिवेशनास संघटनेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून विराज देवांग तर शहराध्यक्ष म्हणून आकाश निरवारे यांची निवड करण्यात आली. तसेच अधिवेशनादरम्यान जिल्हा आणि शहर कौन्सिलची निवड करण्यात आली. यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष महेश कपनूरकर व अविनाश दोंदे, जिल्हा सचिवपदी सिद्धांत गायकवाड, सहसचिवपदी अपेक्षा जाधव यांची निवड करण्यात आली. शहर उपाध्यक्षपदी तल्हा शेख, शहर सहसचिवपदी सुनील राठोड, कौन्सिल सदस्य म्हणून पियुष बाफना, राकेश साळुंके, मयूर जाधव आदी पदाधिकाऱ्यांची निवड झाली. आकाश निरवारे यांनी सूत्रसंचालन केले. संघटनेचे मार्गदर्शक राजू देसले यांनी मनोगत व्यक्त केले. तल्हा शेख यांनी आभार मानले.

गरज स्वायत्त विद्यार्थी चळवळींची

शिक्षण क्षेत्रातील वाढते खासगीकरण, विद्यार्थी निवडणूका, सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेकडील सरकारने केलेले दुर्लक्ष, शिष्यवृत्ती, वसतिगृहाचे प्रश्न, आरक्षण अशा विविध प्रश्नांवर शिक्षण अभ्यासक डॉ. मिलिंद वाघ यांनी उपस्थितांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज चव्हाण, उपाध्यक्ष शंबुक यांनी विद्यार्थी चळवळीच्या इतिहासाविषयी तसेच वर्तमान स्थितीत विद्यार्थी चळवळीची दिशाभूल केली जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच स्वायत्त विद्यार्थी चळवळींची गरज असल्याचेही मत यावेळी नोंदविण्यात आले.

राष्ट्रीय परिषदेत मांडणार मुद्दे

चालू महिन्यात २७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत संघटनेचे राष्ट्रीय अधिवेशन आंध्र प्रदेशमधील अनंतपूर येथे होणार आहे. या अधिवेशनात नाशिकच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी स्थानिक स्तरावरून प्रयत्न केले जाणार असल्याने नवनियुक्त कार्यकारिणीने सांगितले. तर राज्याध्यक्ष पंकज चव्हाण यांनी १० सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय शिष्यवृत्ती व वसतिगृह हक्क परिषदेचे आयोजन साने गुरुजी स्मारक, पर्वती पायथा, सिंहगड पुणे येथे होणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी यावेळी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

फोटो : सतिश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

श्रीकृष्ण दर्शनाने भाविक तृप्त

0
0

इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाला सुरुवात

…..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंतराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) नाशिकच्या वतीने तीन दिवसीय श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाला रविवारी सुरुवात झाली. जन्माष्टमी निमित्त मंदिराची तसेच श्री राधा कृष्णांच्या विग्रहांची सुंदर सजावट करण्यात आली आहे. सकाळपासून मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. श्रीकृष्णांचे दर्शन घेण्यासाठी शहरभरातून हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

रविवारी सकाळी ५ वाजता मंगल आरतीपासून महोत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद भागवत प्रवचन झाले. यावेळी बोलताना श्रीमान शिक्षाष्टकं प्रभू म्हणाले, की श्रीकृष्णांचा दिव्य स्पर्श व्यक्तीला पवित्र करणारा असतो. जन्माष्टमीसारख्या पवित्र दिवशी आपणही त्यांचे दर्शन घेऊन दिव्य स्पर्शाचा अनुभव करू शकतो. यावेळी डॉ. कुलकर्णी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत लघुनाटिका प्रस्तूत केली. बाळ गोपाळ प्री स्कूलच्या विद्यार्थिनींनी श्लोकांचे पठण केले. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी, चेतना ग्रुपने व कनकलता प्रतिष्ठान यांनी सामूहिक नृत्य प्रस्तूत केले.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज (३ सप्टेंबर) सकाळी ५ वाजता मंगल आरतीपासून महोत्सवाला सुरुवात होईल. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन, आरती, श्रीमद्भागवत प्रवचन होणार आहे. रात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्ण महाआरती व महाभोग अर्पण करण्यात येणार असून, जन्माष्टमी निमित्ताने १ हजार ८ पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. मंदिराबाहेर विविध आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन व विक्री स्टॉल्स असणार आहेत. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी उद्या (४ सप्टेंबर) संध्याकाळी ७ ते ९ या कालावधीत नंदोत्सव आणि श्रील प्रभुपाद आविर्भाव दिवस महोत्सव साजरा केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जागतिक जलतरणमध्ये नाशिकच्या खेळाडूंचे यश

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व मुर्शिदाबाद स्विमिंग असोसिएशनच्या वतीने पश्चिम बंगालमधील बेहरामपूर येथे झालेल्या ७५ व्या जागतिक लांब पल्ल्याच्या स्पर्धेत स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात सराव करणाऱ्या नाशिकच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करीत स्पर्धा पूर्ण केली.

स्पर्धेत दशमराज बान्ते, रणवीर भोसले, वेदांत देवरे, प्रज्वल सोनजे, सलील केळकर यांनी १९ किलोमीटर अंतर अवघ्या २ तास ४० मिनिटात पार केले. तसेच ८१ किलोमीटर अंतर हे जयंत दुबळे यांनी यशस्वीरीत्या पार केले. प्रत्येक खेळाडू सोबत एक या प्रमाणे राजेंद्र निंबाळते, राजू वाईकर, ताराचंद्र बान्ते, बापू सोनजे, आशिष निंबाळते, हर्षल जाधव व डॉ. जयप्रकाश दुबळे हे प्रशिक्षकही सहभागी झाले. स्पर्धेत फ्रान्स, बांग्लादेश, स्पेन तसेच भारतातून स्पर्धक सहभागी झाले. यामध्ये १९ किलोमीटरसाठी ३८ तर ८१ किलोमीटरसाठी १६ स्पर्धकांची निवड झाली होती. स्पर्धेला स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता आहे. स्पर्धेत निवड होण्यासाठी किमान १९ किलोमीटरसाठी सात किलोमीटर पोहणे व ८१ किलोमीटरसाठी १९ किलोमीटर पोहण्याचा अनुभव असणे गरजेचे होते.

सर्व स्पर्धकांचे पश्चिम प्रभाग सभापती वैशाली भोसले, नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, जॉय कांबळे, विशाल बनकर यांनी अभिनंदन केले. या सर्वांना निनाद निंबाळते, हरी सोनकांबळे यांचे मार्गदर्शन तसेच रेखा केळकर यांचे सहकार्य लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भद्रकालीच्या राजाचे धुमधडाक्यात स्वागत

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये मानाचा समजल्या जाणाऱ्या 'भद्रकालीच्या राजा'चे युवक उन्नती मित्र मंडळाच्या वतीने रविवारी मंडपात धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले. नाशिकमध्ये ही परंपरा नव्याने रुजत असून, यंदाचे हे दुसरे वर्ष होते.

भद्रकालीच्या राजाचे रंगकाम दरवर्षी म्हसरुळ येथील कांबळे यांच्याकडे होते. त्याची मिरवणूक यंदा देवधर गल्ली येथून काढण्यात आली. सुरुवातीला राजाचे विधीवत पूजन करण्यात आले. आरती झाल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. संध्याकाळी पाच वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. राजाला पहिली सलामी देण्याचा मान यंदा नटनाथ ढोल पथकाला देण्यात आला. त्यानंतर माऊली ढोल पथक व जल्लोष ढोलपथकाने मिरवणुकीत वादन केले. देवधर गल्ली, रविवार पेठ, रविवार कारंजा, बोहोरपट्टी कॉर्नर, धुमाळ पॉइंट, गाडगेमहाराज पुतळा मार्गे राजाची मिरवणूक फ्रूट मार्केट येथे पोहचली. येथीही विधीवत पूजन करण्यात येऊन राजाला विराजमान करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


माझे, काय चुकले ते सांगा

0
0

आमदार खडसेंचा पक्षास सवाल

म. टा. वृत्तसेवा, रावेर

मी ज्या पक्षाला मोठ करण्यासाठी माझे जीवन खर्ची घातले. त्या पक्षाने सर्व चौकशी केली असून, मी निर्दोष असल्याचे सांगण्याची जबाबदारी असताना ते का सांगत नाही, असा प्रश्न आमदार खडसे यांनी त्यांच्या वाढदिवशी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित केला. ‘माझे काय चुकले तेवढे सांगावे मी राजकारण सोडतो’ असा सवालही आमदार एकनाथ खडसे यांनी रविवारी कोथळी (ता. मुक्ताईनगर) येथे आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमप्रसंगी पक्षाला केला.

मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथील नियोजित जागेवर रविवारी राज्यातील पहिल्या अल्पसंख्यांक बांधवांसाठी असलेल्या तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे भूमिपूजन दुपारी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व आमदार एकनाथ खडसे यांच्या हस्ते करण्यात आले. ८७ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून हे महाविद्यालय साकारले जात आहे. यासाठी १३. ३६ कोटी रुपयांचा निधी पहिल्या टप्प्यात प्राप्त झाला आहे. प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार रक्षा खडसे, मध्य प्रदेशचे खासदार नंदकुमार चव्हाण, आमदार संजय सावकारे, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार उदेसिंग पाडवी, आमदार शिरीष चौधरी, आमदार सुरेश भोळे, मुक्ताईनगर नगराध्यक्ष नजमा तडवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, माजी आमदार गुरुमुख जगवाणी, माजी राज्यमंत्री अमीर साहेब, जळगाव मनपा नगरसेवक भगत बालाणी, बेलगंगा चेअरमन चित्रसेन पाटील, भुसावळ नगरसेवक पिंटू कोठारी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

राज्यातील सत्तेत माझा खारीचा वाटा
अडीच वर्षांत नाथाभाऊंवर विविध प्रकारचे आरोप झाले, त्यांच्या खोलवर चौकशा झाल्या, निष्पन्न काही झालेच नाही फक्त देशभरात बदनामी माझी झाली. सर्व आरोपातून निर्दोष मुक्त झाल्याने सरकारची आता मी निर्दोष आहे हे सांगण्याची जबाबदारी आहे, असा खोचक टोला आमदार खडसे यांनी यावेही लगावला. मात्र, तसे होत नसल्याने सर्व जिल्ह्यात जाऊन जनतेपुढे मी चुकलो कुठे? याबाबत विचारणा करणार असून, माझी चूक सांगा राजकारण सोडतो असे खडसे म्हणाले. मी जर कुठे चुकलेलो असेल तर सरकारने मला ते सांगावे. आपण जनतेची माफी मागू. पक्षासाठी ४० वर्षे खर्ची घातल्याने मला मंत्रिपद मिळाले संघर्षातून ते मिळविले आहे, असेही त्यांनी सांगितले. राज्यात भाजपने जी सत्ता मिळविली त्यात माझादेखील खारीचा वाटा असल्याचेही खडसे म्हणाले.


मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बसस्थानकाची पुन्हा निविदा!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या सातपूर येथील बसस्थानकाच्या कामासाठी पुन्हा नवीन निविदा काढल्या जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रस्त्यावर थांबून बसची प्रतीक्षा करणाऱ्या सातपूरवासीयांची परवड थांबणार तरी कधी, असा सवाल परिसरातून उपस्थित केला जात आहे.

त्र्यंबकेश्वररोडवर असलेल्या सातपूर गावातील बसस्थानकाचे काम निधीअभावी रखडलेले असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. या बसस्थानकासाठी आमदार सीमा हिरे यांनी ४० लाख रुपयांची निधी मंजूर करवून आणला आहे. मात्र, त्यानंतर आता पुन्हा नवीन निविदा काढण्यात येणार असल्याने या बसस्थानकाचा वनवास संपणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे. एसटी महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ निविदा काढून या स्थानकाचे काम तातडीने मार्गी लावावे, अशी मागणी सातपूरवासीयांकडून करण्यात येत आहे.

शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीला लागून अगदी मुख्य रस्त्यावर एसटी महामंडळाचे बसस्थानक आहे. परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून या स्थानकाची दुरवस्था झाली असल्याने काही वर्षांपूर्वी तत्कालीन आमदारांनी दीड कोटीचा निधी मंजूर करीत स्थानकाचे भूमिपूजन केले होते. मात्र, त्यानंतर काम रखडले. नंतर आमदार हिरे यांनी बंद पडलेल्या सातपूर बस स्थानकाच्या कामाची माहिती घेतली असता संबंधित जागा एमआयडीसीची असल्याचे समोर आले. त्यानंतर एमआयडीसीला जागेच्या मोबदल्यात सरकारने लाखो रुपये अदा केल्यावर एसटी महामंडळाकडे जागा वर्ग करण्यात आली. एसटी महामंडळाला जागा ताब्यात मिळाल्यावर बसस्थानकाचे काम जोमाने हाती घेण्यात आले होते. परंतु, काही स्थानिक पुढाऱ्यांनी आर्थिक हव्यासापोटी कामात अनेकदा अडथळा आणला. त्यानंतरही काम सुरू केल्यावर निधी संपल्याने पुन्हा ते अर्धवट सोडण्यात आलेले आहे.

तात्काळ कार्यवाहीचा अपेक्षा

काही महिन्यांपूर्वी विधान परिषद व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे अनेक महिने काम बंद राहिले. आचारसंहिता संपल्यावर आमदार हिरे यांनी तात्काळ नव्याने काम सुरू करण्यासाठी ४० लाख रुपयांची निधी मिळावा याकरिता मंत्रालयात पाठपुरावा सुरू केला. आता लवकरच निधी उपलब्ध होणार असला, तरी पुन्हा नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यामुळे साहजिकच अधिक वेळ वाया जाणार असल्याने या बसस्थानकाच्या कामाकडे प्रशासनानेच योग्य लक्ष घालून लवकरात लवकर काम कसे मार्गी लागेल याबाबत नियोजन करावे, अशी भावना प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.

ऐसपैस जागेवर बसस्थानकाचे जोमाने काम सुरू होते. मात्र, निधी संपल्याने काही महिन्यांपासून ते रखडले आहे. आता नव्याने निधी मंजूर होत असतानाच नवीन निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही प्रक्रिया आता गतीने राबविण्याची गरज आहे. जेणेकरून भररस्त्यावर उभ्या राहणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होऊ शकेल.

-दीपक सोनवणे, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्याचा विकास खुंटला

0
0

मनसेप्रमुख राज ठाकरे यांची टीका

धुळे : गेल्या तीस वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात सत्ता होती. मात्र, त्यातही त्यांनी काय केले तर फक्त नोटाबंदी. खरेतर लोकसंख्येवर नियंत्रण मिळविणे महत्त्वाचे आहे. पण हे अजून त्यांना कळत नाही. तर दुसरीकडे धुळे शहर गेल्या काही वर्षांपूर्वी चांगले होते. मात्र, विकास होण्याऐवजी उलट खुंटला आहे, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

धुळे शहरात काही भागात रस्ते झालेत बाकी ‘जैसे थे’ स्थिती आहे. मी आता महानगरपालिका निवडणुकीसाठी आलो नाही तर शहर बदलले की नाही हे पाहण्यास आलो होतो, असेही राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी दीड वाजता शहरातील राजर्षी शाहू महाराज नाट्यमंदिरात मनसेचा उत्तर महाराष्ट्रस्तरीय कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. नाशिक मनपामध्ये भाजप सत्तेत येण्यापूर्वी झालेली कामे स्मार्ट सिटी योजनेत दाखवित आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर नाशिक शहराला दत्तक घेणार होते पण अजून तेथे फिरकलेदेखील नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. आजच्या घडीला शहरात बाहेरची लोकं वाढली असून, आपली मराठी माणसे कमी होत आहे, असेही ठाकरे म्हणाले. धुळे शहर काही वर्षांपूर्वी सर्वात श्रीमंत होते. त्या शहराची आज धूळ धाण झाल्याची स्थिती आहे. जळगाव, धुळे नंदुरबारच्या शहरातील तरुणांना आपल्या शहरासाठीचे, महाराष्ट्राचे स्वप्न पाठवण्याचे आवाहन त्यांनी केले. मेळाव्याला धुळे मनसे जिल्हाध्यक्ष मनीष जाखेटे, शहराध्यक्ष अविनाश मोरे, महिला आघाडीच्या प्राची कुलकर्णी, अजित राजपूत, नंदुरबार जिल्हाध्यक्ष अजय सोनवणे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासाचा दृष्टिकोन असावा

0
0

धुळ्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे मत; मनपाच्या इमारतीचे लोकार्पण

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्यात व देशात नेतृत्व करणाऱ्या लोकांचा विकास करण्याचा दृष्टिकोन असला पाहिजे. जेणेकरून सत्तेत आल्यानंतर सत्तेचा उपयोग हा संपूर्ण राज्याला होईल, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले. ते रविवारी धुळ्यात महापालिकेच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.

आपल्याला या देशात वावरायचे असेल तर सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्र घ्यावे लागेल. त्यांच्यात सामंजस्य निर्माण केले तर सामाजिक जागृतीची एक जबरदस्त शक्ती निर्माण होईल आणि त्यातून देश व राज्याचा बदलता चेहरा समोर येईल, असेही मत खासदार पवार यांनी धुळ्यात केले. धुळे महापालिकेच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा रविवारी दुपारी बारा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाला.

देशासह महाराष्ट्राचे चित्र बदलत असून, बदलत्या चित्राला पोषक अशा प्रकारचे काम नगरपालिका, महापालिकेने केले पाहिजे, असे खासदार पवार यावेळी बोलताना म्हणाले. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पाठीमागे राज्य व केंद्र सरकारनेही ठामपणे उभे राहणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. याबाबत देशपातळीवर चर्चा होते. मात्र, टीकाही केली जाते. राज्य व देशाचे नेतृत्व करणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन हा विकासाला प्रोत्साहित करण्याचा ठेवल्यास जनतेला फायदा होईल. आपण, सत्तेत असल्यानंतर सत्तेचा उपयोग हा संबंध राज्याला होणे गरजेचे आहे. तेही माझे कार्यक्षेत्र, कार्यकक्षा आहे. यामुळे त्या भागाला महत्त्व राहील यासंबंधीची खबरदारी घेतली नाही, तर माझा उपयोग हा संकूचित मनोवृत्तीने कार्य करणारी व्यक्ती म्हणून मर्यादित घटकांना होईल, असे पवार शेवटी म्हणाले.

कार्यक्रमाला महापौर कल्पना महाले, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार अमरिश पटेल, आमदार कुणाल पाटील, आमदार डी. एस. अहिरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, युवराज करणकाळ, सुनील महाले, संदीप महाले, आयुक्त सुधाकर देशमुख, उपायुक्त रवींद्र जाधव, उपमहापौर उमेर अन्सारी, स्थायी समितीच्या सभापती वालीबेन मंडोरे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती माधुरी अजळकर, उपसभापती जैबुन्निसा पठाण, सभागृहनेते अमोल मासुळे, विरोधी पक्षनेत्या वैशाली लहामगे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधिक्षक विश्वास पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बालभारती’च्या मजकुरालाकॉपीराइट पॉलिसीचे कवच

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी प्रकाशकांकडून होणाऱ्या वाङ्मयचौर्याला चाप बसविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, बालभारतीने कॉपीराइट पॉलिसी आणली आहे. बालभारतीच्या अभ्यासक्रमावर आधारित कोणत्याही मजकुराचे प्रकाशन करण्यापूर्वी 'बालभारती'कडून परवानगी घेणे गरजेचे असून, त्यासाठी खासगी प्रकाशकांना १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. बालभारतीच्या ebalbharati.in या वेबसाइटवर ही ऑनलाइन नोंदणी करायची आहे. परवानगी न घेता अनधिकृतरीत्या प्रकाशकांनी मजकुराचा वापर केल्याचे आढळल्यास कॉपीराइट अॅक्टअंतर्गत प्रकाशकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा बालभारतीकडून देण्यात आला आहे.

'बालभारती'च्या जिवावर अनेक वर्षे खासगी प्रकाशकांनी दुकानदारी चालवली होती. बालभारतीतील अभ्यासक्रमाच्या आधारावर गाइड, नोट्सची विक्री करून मोठा नफा त्यातून कमावला जात होता. याला चाप बसवण्यासाठी बालभारतीने सर्व मजकूर कॉपीराइटअंतर्गत आणला असून, बालभारतीअंतर्गत प्रकाशित केलेल्या पाठ्यपुस्तकावर आधारित शैक्षणिक पूरक साहित्य प्रकाशित करणाऱ्या व्यक्ती, संस्था, क्लासेस यांना मंडळाकडे रीतसर नोंदणी करून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यासाठी मंडळाला काही मानधनही द्यावे लागणार आहे. मात्र, अद्याप अशा प्रकारचा व्यवसाय करणाऱ्या बहुसंख्य व्यक्ती, संस्था, क्लासेस यांनी मंडळाकडे अजून नोंदणी केलेली नसून, काही लोकांनी नोंदणी करूनही परवाना फी मंडळाकडे अदा केलेली नाही. अशा सर्वांनी १५ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करून फी भरणे बंधनकारक असणार आहे. विनानोंदणी परवाना शुल्क न भरता जर कोणत्या व्यक्ती, संस्था, क्लासेस यांनी त्यांचे साहित्य बाजारात विक्री केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पाठ्यपुस्तक मंडळाचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी जाहीर केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images