Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गणेशोत्सवावर नियमांचे विघ्न

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात यंदा गणेशोत्सव साजरा करण्यावरून महापालिका आणि गणेश मंडळांमधील वाद विकोपाला गेला आहे. शहरात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच गणेश मंडळांना परवानगी देण्याची ठाम भूमिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतली असून, नियमांबाबत तडजोडीस नकार दिला आहे. त्यामुळे संतापलेल्या गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी यंदा शहरात शासन आणि प्रशासनाच्या निषेधाचा गणेशोत्सव साजरा करण्याचा इशारा दिला आहे. मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर परवानग्या दिल्या नाहीत, तर येत्या चार दिवसांत शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा निषेध मोर्चा महापालिकेवर काढला जाणार आहे.

गणेशोत्सव अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपला असतानाही, गणेश मंडळांचा वाद थांबण्याऐवजी वाढतच चालला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त मुंढे यांनी जारी केलेल्या परिपत्रकातील जाचक नियम-अटींवरून गणेश मंडळे आणि प्रशासनात संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. मनपाच्या नियमावलीनुसार शहरात गणेशोत्सव साजरा होणारच नाही, असा दावा मंडळांनी केला असून याबाबत पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडेही धाव घेतली होती. पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्येही परवानग्या देण्यात याव्यात, अशा मागण्या मंडळांनी केल्या आहेत. बी. डी. भालेकरसह पालिकेच्या पत्रकाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार, महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, उपाध्यक्ष रामसिंग बावरी, कार्याध्यक्ष पद्माकर पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. ३) आयुक्त मुंढे यांची भेट घेत जाचक नियम शिथील करण्याची तसेच मंडप उभारणीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगीची अट रद्द करण्याची मागणी केली. परंतु, ही मागणी धुडकावून लावत शासन आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशांव्यतिरिक्त इंचभरदेखील अतिरिक्त जागा मंडळांना उपलब्ध करून न देण्याची भूमिका मुंढे यांनी घेतली. गणेश मंडळांनी मंडपाच्या नकाशाला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून 'ना हरकत दाखला' घेतल्याशिवाय महापालिकेकडून परवानगी मिळणार नाही, असे स्पष्ट केले. गावठाणात पर्यायी रस्त्यांच्या ठिकाणी मंडप उभारू देण्याच्या मागणीला देखील मुंढे यांनी नकार दिला. यामुळे संतप्त झालेल्या गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेत पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली. यंदा शासन आणि प्रशासनाच्या निषेधाचा गणेशोत्सव साजरा केला जाईल. कुठलाही देखावा न उभारता निषेधाची फलके उभारली जातील. तसेच मंडळांशी चर्चा करून महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनावर निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा अध्यक्ष शेटे व गटनेते शेलार यांनी दिला. प्रशासनाला जाचक अटी कायम ठेवायच्या असतील तर गणेश मंडळे परवानगीच घेणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीस रामसिंग बावरी, पद्माकर पाटील, देवांग जानी, कैलास मुदलियार, चेतन व्यवहारे, निखील पवार आदी उपस्थित होते.

पालकमंत्रीही हतबल

आयुक्त मुंढे यांच्या भेटीनंतर नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांनी पालकमंत्री महाजन यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधत आयुक्त भेटीत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. गणेशोत्सव दहा दिवसांवर येऊन ठेपला असताना पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही आयुक्तांकडून मंडळांना दिलासा मिळू न शकल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. यावेळी पालकमंत्री महाजन यांनी हतबलता व्यक्त केल्याने यंदा निषेधाचा गणेशोत्सव साजरा करण्याचे तसेच महापालिकेवर निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय महामंडळाने घेतल्याची माहिती पालकमंत्र्यांना यावेळी देण्यात आली.

काँग्रेसची टीका

शहर काँग्रेसच्या वतीने हिंदूत्ववादी सरकारच्या सत्ता काळात उत्सव साजरा करावा की नाही, असा थेट सवाल आयुक्त तुकाराम मुंढे यांना आज निवेदनाद्वारे करण्यात आला. आयुक्त मुंढे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, शहरात पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा केला जातो. परंतु, हिंदूत्वाच्या मुद्द्यावर सत्तेवर आलेल्या सरकारकडून हिंदू सणांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध आणले जात आहेत. मंडळांना कायद्याचा धाक दाखवून छळ केला जात आहे. परवानगीसाठी दरदिवशी पाचशे रुपये भरणे लहान मंडळांना परवडणारे नाही. मंडप टाकणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जात असल्याने मंडळांचे कार्यकर्ते हैराण झाले आहेत. शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, काँग्रेस गटनेते शाहू खैरे, नगरसेविका वत्सला खैरे, आशा तडवी, राहुल दिवे, सुरेश मारू, नीलेश खैरे आदींसह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

भालेकर मैदानाचा वाद मिटला

बी. डी. भालेकर मैदानावर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आयुक्तांना या ठिकाणी सार्वजनिक मंडळांना आरास उभारण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोमवारी आयुक्तांनी या ठिकाणी गणेश मंडळांना परवानगी देण्यास सहमती दर्शवली आहे. या ठिकाणी स्मार्ट सिटीच्या पार्किंगचे काम सुरू असल्याने गणेश मंडळांना यंदा परवानगी नाकारली होती. त्यावरून मोठा वाद सुरू होता. अखेरीस पालकमंत्र्याच्या आदेशावरून सोमवारी मुंढेंनी माघार घेत, या ठिकाणी गणेश मंडळांना गणेशस्थापनेस परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला बी. डी. भालेकरचा वाद अखेर संपुष्टात आला आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा कोलकाता शहरात दुर्गा पूजा न झाल्यास हिंसेची भाषा करतात, तर दुसरीकडे महाराष्ट्रात सरकार हिंदू सणांना आडकाठी आणत असल्याने दुजाभाव दिसतो. प्रशासन अटी ‌व शर्तींवर ठाम असतील तर यंदा निषेधाचा गणेशोत्सव साजरा करू व परवानगी घेणार नाही.

- समीर शेटे, अध्यक्ष, गणेशोत्सव महामंडळ.

प्रशासनाने अग्निशामक बाबतच्या काही अटी रद्द केल्या असून, केवळ स्थळपाहणी करून सुरक्षिततेची खात्री केली जाईल. बांधकाम विभाग आणि विद्युत निरीक्षकाच्या दाखल्याची अट शिथील केली आहे. परंतु, काही जण चुकीचा अर्थ काढत आहेत. उच्च न्यायालय आणि शासनाच्या अटींनुसार काढलेल्या पत्रकावर महापालिका ठाम आहे.

- सुहास शिंदे, उपायुक्त, विविध कर विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

$
0
0

दिंडोरी : परमोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन वर्षात घडलेली ही तिसरी घटना आहे.

परमोरी शिवारात ज्ञानेश्वर दिघे यांच्या कुटुंबातील महिला टोमॅटोच्या शेतात काम करीत होत्या. शेजारीच लहान मुलेही खेळत होते. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास शेजारील ऊसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने सार्थक ज्ञानेश्वर दिघे (वय ३) या बालकावर हल्ला करीत त्याला ऊसाच्या शेतात ओढत नेले. हे पहाताच सार्थकची आई व आजीने आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे शेतकरी जमा झाले. त्यांनी ऊसात शोध घेतला सार्थक जखमी अवस्थेत आढळून आला. त्यास तातडीने दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मच गया शोर सारी नगरी रे

राधे कृष्ण, गोपाल कृष्ण...

$
0
0

टीम मटा

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातील विविध मंदिरे, मंडळे, शैक्षणिक व सामाजिक संस्थांतर्फे विविध कार्यक्रम झाले. 'राधे कृष्ण, गोपाल कृष्ण'च्या जयघोषात ठिकठिकाणी फोडण्यात आलेल्या दहीहंडीने या सोहळ्याची रंगत आणखी वाढविली.

(कॉमन लीड)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृष्ण जन्माष्टमी शाळा

कलानगरमध्ये सोनसाखळी लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीस्वार चोरट्यांनी ओढून नेली. ही घटना घटना दिंडोरीरोडवरील कलानगर भागात घडली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

मेघा गोविंद बेंडसे (रा. बालाजी चौक, कलानगर) यांनी या प्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी त्या आपली मुलगी सोनाली हिस सोबत घेऊन शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या असताना हा प्रकार घडला. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मायलेकी फेरफटका मारीत असतांना कृष्णलिला बंगला भागात पाठीमागून दुचाकीवर आलेल्या चोरट्यापैकी एकाने त्यांच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रुपयांची सोन्याची पोत तोडून पोबारा केला. अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक सावळा करीत आहेत.

रोकड चोरीप्रकरणी दोघांना अटक

पार्क केलेल्या ऑटोरिक्षाच्या डिक्कीतून चोरट्यांनी १२ हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना पाथर्डी फाटा भागात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी तपास करून दोघा संशयितांना अटक केली.

सिद्धार्थ अंबादास भिसे (रा. पाथर्डी फाटा) आणि रखमाजी महादेव भाग्यवंत (रा. महादेववाडी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. स्वदेश विहार भागात राहणारे सुनील अंतू सोनवणे या रिक्षाचालकाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. सोनवणे यांनी रविवारी (दि. १) सकाळी पाथर्डी फाटा येथील फळांच्या दुकानासमोरील रिक्षाथांब्यावर आपली रिक्षा पार्क केली. प्रवाशांची वाट पाहणारे सोनवणे रिक्षापासून थोडे दूर गेले असता चोरीचा प्रकार घडला. दोघा भामट्यांनी रिक्षात बसून डिक्कीत ठेवलेले बारा हजार रुपयांची रोकड काढून घेतली. मात्र, ही घटना अन्य रिक्षाचालकांच्या लक्षात येताच दोघांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

तडीपार नाजीर अटक

गुन्हेगारी कारवायांमळे हद्दपार केलेले असतांना शहरात वावर ठेवणाऱ्या नाजिर शेख शाकिर (२६, रा. जिनतनगर, वडाळागाव) यास पोलिसांनी अटक केली. नाजीरविरुद्ध मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई युनिट एकच्या पथकाने केली. रविवारी सायंकाळी शेख सारडा सर्कल भागात आलेला असताना युनिटने सापळा लावून त्यास पकडले. बग्गा स्विट दुकानाजवळ ही कारवाई करण्यात आली. अधिक तपास हवालदार क्षीरसागर करीत आहेत.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळांच्या प्रांगणात ‘गोविंदा आला रे’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातील पूर्व प्राथमिक शाळांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राधा-कृष्णाच्या वेशभूषेतील चिमुकल्यांमध्ये हा सण साजरा करण्याविषयी मोठा आनंद निर्माण झाला होता. शाळेतच छोटी दहीहंडी करून 'गोविंदा आला रे'च्या तालावर ती फोडण्याची मजा त्यांनी लुटली.

--

अशोका ग्लोबल प्री-स्कूल

अशोका ग्लोबल प्री-स्कूल अशोका हाऊस, अशोका मार्ग येथील शाळेमध्ये गोकुळाष्टमीनिमित्त श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात झाला. प्रारंभी श्रीकृष्णलीलांवर आधारित कथारुपी नाटक सादर करण्यात आले. तसेच, शिक्षकांनी सुंदर असे कृष्णाचे रूप घेऊन नृत्य सादर केले. नंतर 'गोविंदा आला रे आला'च्या घोषात छोट्या छोट्या कृष्णांनी शिक्षकांच्या मदतीने दहीहंडी फोडली. 'मैया मोरी मैं नहीं माखन खायो' असे म्हणत छोट्याशा नटखट गोपाळकृष्णांनी आणि राधांनी प्रसादरुपी माखन खाल्ले. अशा आनंदी व उत्साही वातावरणात हा सोहळा साजरा करण्यात आला.

- -

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूल

रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलमधील शिशुवृंद, प्राथमिक आणि माध्यमिक विभागात कृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शाळेतील सर्व मुले राधा-कृष्णाच्या पारंपरिक वेशभूषेत उपस्थित होती. विद्यार्थ्यांनी 'गोविंद बोलो हरी, गोपाल बोलो', 'आज आनंदी आनंद झाला' हे राधा-कृष्णावर आधारित गाणे सादर केले. 'गोविंद बोलो हरी' या कृष्णाच्या गाण्यावर इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी नृत्य सादर केले. माध्यमिक विभागात मुलांनी कृष्ण-सुदामा यांच्या भेटीवर नाटिका प्रस्तुत केली. दिया गुजराती हिने जन्माष्टमीचे महत्त्व समाजवून सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच सर्वधर्मसमभाव, संस्कृती, परंपरेची जोपासणा व्हावी, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

- -

वाल्मीकी टॉट्स स्कूल

नाशिक : गंगापूररोडवरील वाल्मीकी टॉट्स प्री प्रायमरी स्कूलमध्ये कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी राधा-कृष्णाची वेशभूषा करून शाळेत आले होते. विद्यार्थ्यांना यावेळी कृष्णजन्माची गोष्ट सांगण्यात आली. कृष्णलीला हे नाट्यदेखील सादर करण्यात आले. त्यानंतर शाळेतील शिक्षिकांनी नृत्य सादर केले. यावेळी शाळेच्या संचालिका सीमंतिनी कोकाटे, मुख्याध्यापिका मोनिका गोडबोले, सीमा कोतवाल आदी उपस्थित होते.

(सर्वांचे फोटो आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळा रस्त्यावरअपघातात एक ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा- देवळा रस्त्यावर सावंतनगरजवळ बोलेरो जीप आणि प्रवासी वाहतूक करणाऱ्या अॅपे रिक्षा यांच्यात सोमवारी झालेल्या अपघातात विष्णू किसन माळी (वय ५०, रा. लोहणेर) यांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षातील चार महिलांसह आठ प्रवासी गंभीर जखमी आहेत. हुसेन विठ्ठल पवार (वय ३०), रामदास सखाराम वाघ (५०), बकूबाई वसंत जाधव (४७), गीताबाई फुले जाधव (६०), चंद्रकला रणेश जाधव (४४), मोहन संजय खैरनार (२७), जयाबाई अनिल पवार (२७, सर्व रा. लोहणेर) अशी जखमींची नावे आहेत. सटाण्याकडे येत असलेली बोलेरो जीपने (एमएच ४१/व्ही ७३६१) सटाण्याहून लोहणेरकडे प्रवासी घेऊन जाणाऱ्या अॅपे रिक्षाला (एमएच ४१/सी २४३६) सोमवारी जोरदार धडक दिली. जखमींवर सटाणा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकरोड परिसरात उत्साह

$
0
0

नाशिकरोड परिसरात उत्साह (फोटो)

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड परिसरातील मंदिरे आणि विविध संस्थांतर्फे श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. जेलरोड, देवळालीगाव, विहितगाव, उपनगर, टाकळी, शिंदे, पळसे येथेही उत्साह दिसून आला. ठिकठिकाणी विविध मंडळांतर्फे दहीहंडी फोडण्यात आली.

मुक्तिधाममध्ये जन्मोत्सवाप्रसंगी दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. विश्वस्त हिरालाल चौहान, मोहन चौहान, जगदीश चौहान, विजय चौहान, आदित्य चौहान यांच्या हस्ते पूजा व महाआरती झाली. अनिकेतशास्त्री देशपांडे, नागेशशास्त्री देशपांडे, राजू कुलकर्णी, सुरेश मानकर, नाना पवार, ज्ञानेश्वर यंदे यांनी संयोजन केले.

देवळीलगाव येथे महानुभाव परिवारातर्फे भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा अन् महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. सुधाकर महानुभाव, सुरेश महानुभाव, कामगार नेते अरुण महानुभाव, दुयय्म निबंधक अधिकारी संजय महानुभाव, विजय महानुभाव यांच्या हस्ते पूजा व आरती झाली. शिवसेना उपविभागप्रमुख चंदू महानुभाव, सुनील महानुभाव, मानस महानुभाव, अतिष महानुभाव आदींनी संयोजन केले. पंचक येथील सद्गुरूनगरमध्ये भोजने परिवारातर्फे श्रीकृष्ण जन्ममहोत्सव सोहळा साजरा झाला. सकाळी मूर्तीस मंगल स्नान घालण्यात आले. दुपारी महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, नगरसेवक विशाल संगमनेरे, शरद मोरे, नवनाथ टिळे आदी उपस्थित होते. प्रभाकर भोजने, सागर भोजने आदींनी संयोजन केले.

नूतन प्राथमिक शाळा (फोटो)

देवळाली कॅम्प : भगूर येथील नूतन प्राथमिक विद्यामंदिर शाळेत दहीहंडी फोडण्यात आली. राधा-कृष्णाच्या मूर्तीचे पूजन पालक-शिक्षक संघाचे उपाध्यक्ष शरद करंजकर आणि नितीन करंजकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी राधा व कृष्णाची वेशभूषा केली होती. श्रीकृष्ण गीतांच्या तालावर विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडली. यावेळी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्णाचे वर्णन करणाऱ्या विविध गवळणी सादर केल्या. रुपाली शहाणे यांनी गोपाळकल्याविषयी माहिती दिली. मुख्याध्यापिका उषा परदेशी, मीना गोजरे, सुनंदा गायखे, रंजना सोनवणे, सुरेखा कानवडे, निवृत्ती तुपे, तृप्ती पावसे, आनंद कस्तुरे आदींनी संयोजन केले.

---

अभिनव बालविकास मंदिर (फोटो)

जेलरोड : येथील आशिष मॉँटेसरी व अभिनव बालविकास मंदिरात गोपाळकाला आणि दहीहंडी उत्साहात साजरी झाली. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा, गोपिकांच्या वेशभूषा केल्या होत्या. शाळेच्या मैदानात विद्यार्थ्यांनी पताका, फुगे लावून दहीहंडी सजवली होती. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम केले. नंतर तीन थरांचा मनोरा रचून दहीहंडी फोडली. मुख्याध्यापिका जयश्री सरोदे यांच्या हस्ते कृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिक्षिका नलिनी गांगुर्डे यांनी गीतेचा अध्याय सादर केला. नयना चौधरी यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांना दही, लाह्या, केळी, पोहे यांचा प्रसाद वाटण्यात आला.

---

डॅफोडिल वंडर स्कूल

जेलरोड : येथील डॅफोडिल वंडर एज्युकेशनल स्कूलमध्ये दहीहांडीचा कार्यक्रम झाला. विद्यार्थी राधा-कृष्णाच्या वेशभूषेत आले होते. छानशी सजावट करून विद्यार्थ्यांनी दहीहंडी बांधली होती. गो गो गोविंदा या व अन्य कृष्ण गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्य केले. संस्थेचे संस्थापक दत्तात्रय धात्रक व मुख्यध्यापिका पायल पंजाबी यांनी विद्यार्थ्यांना गोकुळोष्टमीचे महत्त्व सांगितले. कार्यक्रम संपल्यावर दही, केळी व पोहे यांचा प्रसाद विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला. यावेळी शिक्षक, पालक, कर्मचारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारला उशिराचे शहाणपण

$
0
0

राज्यातील आरोग्यसेवेचा कसा बोजवारा उडाला आहे याचे वास्तव गेल्या पावसाळी अधिवेशनात उघड झाले होते. राज्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रे अथवा शासकीय रुग्णालयांतील बहुतांश डॉक्टर कर्तव्यकाळात हजरच राहत नसल्याची वस्तुस्थिती आहे. अशा कामचुकार डॉक्टरांच्या मनमानीला आता लगाम लागणार आहे. कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विनापरवानगी गैरहजेरीदरम्यान उपचारांअभावी रुग्णाचा अथवा प्रसूतिदरम्यान मातेचा किंवा बाळाचा मृत्यू झाल्यास अशा वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय नुकताच राज्य सरकारने घेतला आहे. त्यांची महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी रद्द करण्याची शिफारस खुद्द सरकारमार्फत केली जाणार आहे. रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा निष्काळजी डॉक्टरांना वठणीवर आणण्यासाठी सरकारने घेतलेला हा निर्णय स्तुत्य असला, तरी सरकारला उशिरा शहाणपण सुचल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कारवाईचा निर्णय स्वागतार्ह

बहुतांश सरकारी रुग्णालयांतील परिस्थिती अत्यंत वाईट असते. रात्रीच्या वेळी निवासी डॉक्टर्सही हजर नसल्याचा अनुभव ग्रामीण भागातील नागरिकांना वारंवार येतो. अशा प्रकारचा कामचुकारपणा करणाऱ्या डॉक्टरांना कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी राज्य सरकारने घेतलेला कडक कारवाई करण्याचा निर्णय नक्कीच स्वागतातार्ह आहे, असेच म्हणावे लागेल.

-अजय कातोरे

अंमलबजावणी कशी होणार?

रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या डॉक्टरांना थेट निलंबित करण्याचा सरकारचा निर्णय स्तुत्य असला, तरी या निर्णयाची अंमलबजावणी कशी होणार हा खरा प्रश्न आहे. अशा डॉक्टरांवर कारवाईची तरतूद असलेले नियम आहेतच. परंतु, त्यानुसार कारवाई झाल्याचे कधी आढळले नाही. त्यामुळे या निर्णयाचेही असेच काहीसे होण्याची शक्यता वाटते.

-सौरभ जैन

रुग्णसेवेतील अडचणीही समजून घ्याव्यात

विनापरवानगी गैरहजर राहिल्यास रुग्णाचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशी चूक करणाऱ्या डॉक्टरांना माफी नसावी, याविषयी कुणाचेही दुमत नाही. मात्र, अशा घटना आपल्या राज्यात ज्या भागात घडतात त्या भागातील रुग्णसेवेशी संबंधित अडचणीही सरकारने समजून घेतल्या पाहिजेत. कित्येक सरकारी रुग्णालयांत मूलभूत सुविधाही उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे.

-आकाश वाणी

भ्रष्टाचार वाढण्याची शक्यता

विनापरवानगी गैरहजर राहिलेल्या डॉक्टरांच्या सेवाकाळात रुग्णाला वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्यास रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना घडली, तर संबंधित डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय नुकताच सरकारने जाहीर केला. हा निर्णय भ्रष्टाचाराला खतपाणी देणारा ठरू शकतो. हा निर्णय स्वागतार्ह असला, तरी त्याची दुसरी बाजू धोकादायकही ठरू शकते.

-पंकज घाडगे

पारदर्शीपणे व्हावी अंमलबजावणी

रुग्णसेवेत हलगर्जीपणा करणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रांसह शासकीय रुग्णालयांतील दोषी डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय योग्य असला, तरी सरकारला हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. असा निर्णय कधीच घेणे आवश्यक होते. परंतु, आतापर्यंत कित्येक रुग्णांना डॉक्टरांच्या या मनमानीचा फटका बसला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी पारदर्शीपणे झाली पाहिजे.

-प्रकाश केंगे

(आमचा आवाज)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार, गोडसे कुटुंबीयांचे सांत्वन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

मनसेचे नेते डॉ. प्रदीप पवार यांचे वडील नारायण कृष्णांजी पवार तसेच शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्राचे पहिले खासदार दिवंगत राजाभाऊ गोडसे यांचे नुकतेच निधन झाले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पवार आणि गोडसे कुटुंबीयांचे सोमवारी त्यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले.

डॉ. पवार यांच्या निवासस्थानी नारायण पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावळी डॉ. पवार यांनी वडीलांच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेनेत असताना नाशिक जिल्हा व परिसराचे मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावताना राज ठाकरे यांच्याशी राजाभाऊ गोडसे त्यांचे सलोख्याचे संबंध होते. ठाकरे यांनी मनसेची स्थापन केल्यानंतरदेखील गोडसे यांनी आपल्या संबंधांमध्ये कायम ओलावा ठेवला. त्यामुळे नाशिक दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांनी गोडसे यांच्या संसरी येथील निवासस्थानी भेट दिली आणि त्यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण केली. गोडसेंच्या पत्नी लता, पुत्र युवराज, कन्या मीनाक्षी व पूजा आदी कुटुंबीयांचे ठाकरे यांनी सांत्वन करीत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष गणपत महाले, अॅड. राहुल ढिकले, खंडेराव मेढे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष रतनकुमार इचम, माजी महापौर अशोक मुर्तडक, महापालिकेचे गटनेते सलीम शेख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कालिदास’ची पाच आकडी भाडेवाढ न परवडणारी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सुमारे नऊ कोटी रुपये खर्चून अद्ययावत करण्यात आलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या मुहूर्ताच्या कार्यक्रमाला अनेक दिवस वाट पाहावी लागली. एका व्याख्यानाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली असली तरी कालिदासचा दर प्रचंड वाढविण्यात आल्याने कलावंतांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे. चार आकड्यांवरून कालिदासची भाडेवाढ एकदम पाच आकडी केल्याने कला सादर करणाऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडणार आहे.

महाकवी कालिदास कलामंदिराचे पुनरुज्जीवन करण्याचे टाळाटाळ करणारी महापालिका अनेक वर्षांनंतर त्यासाठी तयार झाली. कसाबसा निधी गोळा करीत कालिदास नव्याने उभे केले. मात्र, आता हा मेळ जमवायचा कसा, याचे गणित बसविण्यासाठी महापालिकने कालिदासची प्रचंड भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीवर कलाकार नाराज असून, आता कार्यक्रम सादर कसे करायचे, असा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.

अशी झाली भाडेवाढ

सकाळच्या सत्रासाठी नाटक तीन हजारांहून सोळा हजारांवर नेऊन ठेवले आहे. दुपारच्या सत्रात ३५०० हून १९ हजार, तर रात्रीच्या सत्रासाठी चार हजारांहून २२ हजारांवर नेऊन ठेवण्यात आले आहे. शास्त्रीय गायनासाठी सकाळच्या सत्रात ३५०० हून १९ हजारांवर गेले आहे. दुपारचे सत्र चार हजारांहून २१,०५०, तर रात्रीसाठी साडेचार हजारांहून २४,०५० रुपये इतके करण्यात आले आहे. सभा, संमेलने व जादूचे प्रयोग या कार्यक्रमांसाठी कालिदास बुक करणाऱ्यांना सकाळचे सत्र पाच हजारांहून २७ हजारांवर पडणार आहे. दुपारच्या सत्रासाठी साडेपाच हजार रुपयांवरून ३० हजारांवर नेण्यात आले आहे. बालनाट्यासाठी १५०० हून नऊ हजार, १७५० हून साडेनऊ हजार, तर दोन हजारांहून दहा हजार आठशे पन्नास रुपयांपर्यंत नेऊन ठेवण्यात आले आहे.

सरकारतर्फे नाटकास 'करमुक्त' दर्जा देण्यात आला आहे. सरकार नाट्यप्रयोगांसाठी अनुदानही देते. केंद्र सरकारनेही नाटकांच्या ५०० रुपयांपर्यंतच्या तिकिटावर जीएसटी लावलेला नाही. नाटकाने व्यावसायिकदृष्ट्या मुख्य धारेत तग धरावा, या उद्देशाने या बाबी जाणीवपूर्वक करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने कालिदास कलामंदिराची केलेली भाडेवाढ सुसंगत नाही. सध्या ९० टक्के नाटकांचे बुकिंग ५० हजारांच्या आत आहे. मुंबई- पुण्याबाहेर फक्त नाशिकमध्ये नाटके सातत्याने होतात. मात्र, चारपाचशे रसिकांवर तग धरून असलेली ही चळवळ या भाडेवाढीमुळे जवळपास संपणार आहे. भाडेवाढीच्या या शक्यतेमुळेच कलावंत खासगीकरणाला विरोध करीत होते.

- जयप्रकाश जातेगावकर, नाट्य व्यवस्थापक

भाडेवाढ अवाजवी

कालिदासच्या नूतनीकरणासाठी नऊ ते दहा कोटींचा खर्च झाला असला, तरी तो पूर्णत: भाड्यातून वसूल करणे बरोबर नाही. कारण नाट्यगृहे ही नफा कमावण्यासाठी नसतात. ती समाजाची गरज आहे. त्यामुळे महापालिकेने भाडेवाढ कमी करावी व स्थानिक हौशी रंगकर्मींना महिन्यातून दोन दिवस सवलतीच्या दरात नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे. महाकवी कालिदास कलामंदिराची भाडेवाढ अवाजवी आहे. सध्याच्या दरापेक्षा दोन-तीन हजारांनी दर वाढविणे संयुक्तिक ठरले असते. महाराष्ट्रात पुण्या-मुंबईपासून ते अन्य कोणत्याही शहरात नाट्यगृहाचे भाडे साडेआठ ते नऊ हजार रुपये आहे. महापालिकेने ही दरवाढ मागे घेऊन रंगकर्मींना दिलासा द्यावा.

- रवींद्र ढवळे, ज्येष्ठ रंगकर्मी, नाशिक

पूर्वी शाळा-महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनांचे कार्यक्रम कालिदासमध्ये होत असत. आता २० ते २५ हजार रुपये भाडे कोणत्या शाळेला परवडेल? महापालिका आयुक्तांनी कालिदासच्या देखभालीच्या खर्चाचा मांडलेला हिशेब बरोबर असला, तरी अशाने नाट्यप्रयोग, कार्यक्रमच होणार नाहीत आणि नाट्यगृह पडून राहील. कार्यक्रमच झाले नाहीत तर नूतनीकरणाचा काहीच उपयोग होणार नाही. कालिदास कलामंदिराची भाडेवाढ निषेधार्हच आहे. महापालिकेने व्यावसायिक आणि हौशी नाट्यप्रयोगांमध्ये फरक करायला हवा. त्यातून हौशी रंगकर्मींचा आत्मविश्वास डळमळू शकेल व पैशांअभावी आपण 'कालिदास'सारख्या मोठ्या रंगमंचावर प्रयोग करू शकत नाही, असा विचारही त्यांच्या मनात येईल.

- पूनम पाटील, अभिनेत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस

सभागृहनेत्यांचा लेटरबॉम्ब!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास नाट्य फसल्यानंतर आता भाजपमध्येच अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. सभागृहनेते दिनकर पाटील यांनी पक्षातील नेत्यांवरच लेटरबॉम्ब टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी शिवसेनेसह विरोक्षी पक्षांवर टीकास्र सोडले. अविश्वास प्रस्ताव आणण्याची चूक ही आमदार बाळासाहेब सानप व महापौर रंजना भानसी यांचीच होती, तसेच भाजपमधील काही लोकांची जिरवण्यासाठीच मुंढे यांना नाशिकमध्ये आणल्याचा दावा पाटील यांनी केला. दोन लोकांच्या जिरवण्याच्या नादात संपूर्ण नाशिककरांना वेठीस धरू नये, असे आवाहन त्यांनी केले.

दिनकर पाटील यांनी सलग तिसऱ्या दिवशी सोशल मीडियावर पत्र टाकून अविश्वास नाट्यावर भाष्य केले. पाटील यांनी अविश्वास प्रस्तावावरून स्वपक्षातील नेत्यांवरही हल्ले केले असून, मला बळीचा बकरा करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला. अविश्वास प्रस्तावाची चूक आपली नसून ती आमदार सानप व महापौर भानसी यांची आहे. मी स्वत:च्या लेटरहेडवरच प्रस्ताव दिला होता, असे सांगत प्रस्ताव आल्यानंतरही १२७ सदस्य गप्प कसे, हा सवाल उपस्थित केला. आता सर्वांना मुंढे यांच्या दबावाखाली काम करावे लागणार आहे. मुंढे यांना भाजपमधील एक-दोन लोकांची जिवण्यासाठीच आणले असण्याची शक्यता आहे. या लोकांची पक्षपातळीवर जिरवण्याची आवश्यकता होती. मात्र, त्यामुळे नाशिककरांना वेठीस धरले जात आहे, अशी टीका त्यांनी केली. पक्षातील काही नगरसेवक आणि नेत्यांनी मुंढेंना मदत केल्याचा आरोपही त्यांनी केला असून, असे खेकडे पक्षात असल्याची टीकाही त्यांनी केली. आपल्या शहरात कोणी येतो अन् भाषण करून नाशिकवर ताबा मिळवतो, नाशिक लुटून नेतो, अशी टीका त्यांनी केली आहे. सोशल मीडियावर मुंढेंच्या समर्थनार्थ असलेल्या लोकांवरही पाटील यांनी टीकास्र सोडले.

शेलार, बडगुजरांवर आरोप

पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले आणि कम्युनिस्ट देसलेंवरही टीकास्र सोडले. शेतकऱ्यांची बाजू घेणारे अचानक मुंढेंचे समर्थक कसे होऊ शकतात, असे सांगत शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवरही टीका केली. शिवसेना एकीकडे अल्टिमेटम देत असताना, त्यांच्या पक्षाचे नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार आयुक्तांना का भेटावयास गेले, असा सवाल उपस्थित केला. मुंढेंनी शेलारांचे हॉटेल पाडले आहे, तर प्रवीण गेडाम यांनी बडगुजर यांना नोटीस दिली आहे. त्यामुळे आपल्यावरील कारवाई टाळण्यासाठी त्यांनी धडपड केल्याचा आरोप केला आहे.

आरोप चुकीचे : देसले

आयुक्त मुंढे यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चात मी सहभागी नव्हतो, असे सांगत पाटील यांचे आरोप राजू देसले यांनी फेटाळले आहे. या उलट भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही करवाढीविरोधात मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. आम्ही शेतकरी व कामगार वर्गासाठी सातत्याने संघर्ष करीत आहोत. सामान्य जनतेची करवाढ रद्द व्हावी, महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी संघर्ष करू. नाशिककर जनतेची फसवणूक सत्ताधारी पक्षाने थांबवावी. करवाढीसोबत कालिदास कलामंदिराचे अवाजवी भाडे कमी करून दत्तक नाशिकला न्याय द्या ,अशी मागणी देसले यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळू उपशाने मजुराचा बळी

$
0
0

सवंदगाव येथील दुर्घटना; मालेगाव प्रशासनावर ग्रामस्थांचा संपात

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील गिरणा व मोसमनदीपात्रात सर्रासपणे अवैध वाळू उपसा होत असल्याचे प्रकार दिवसेंदिवस उघडकीस यत आहेत. याच अवैध वाळू उपशाने सोमवारी एका मजुराचा बळी गेल्यामुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. तालुक्यातील सवंदगाव येथील गिरणापात्रालगत वाळू आणि मातीच्या खदान (मोठा खड्डा)मधून अवैध वाळू उपसा करताना ट्रॅक्टरवर खदान कोसळल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

या परिसरातून रोजच अवैध वाळू उपसा होत असतो. गिरणानदी पात्रात व पात्रालगत मोठ्या खदानी असून, या खोलगट खदानीत ट्रॅक्टर उतरून सोमवारी अवैध वाळू उपसा करताना सकाळी दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. साधारण १५ ते २० फुट खोल असलेल्या खदानीत वाळू उपसा सुरू असताना खदानीचा एक मोठा भाग अचानक कोसळला. यावेळी ट्रॅक्टरवर असलेल्या मजुरांपैकी भावडू रामचंद्र वाघ (वय २२, रा. म्हाळदे शिवार) हा ढिगाऱ्याखाली दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य दोघे भोलेनाथ लालचंद माळी (वय १८) व राकेश शांताराम माळी (वय २३, दोन्ही रा. म्हाळदे शिवार) गंभीर जखमी झाले.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ व पोलिसांनी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. जखमींना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. पोलिसांनी वाळूचा ट्रॅक्टर जप्त केला असून, दुर्घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर करण्यात आलेल्या पंचनाम्यात ट्रॅक्टर (एमएच ४१ डी ७९७४) मालक युसुफ पेहलवान याच्याकडे गौणखनिज वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचे म्हटले tkr आहे.

...तर दुर्घटना घडली नसती

सवंदगाव परिसरातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असतो. याबाबत सवंदगाव सरपंच व ग्रामस्थांनी वेळोवेळी महसूल व पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र ग्रामस्थांच्या तक्रारीकडे वेळीच लक्ष का दिले गेले नाही? वाळूमाफियांना प्रशासन पाठिशी घालत आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. यामुळे महसूल व पोलिस प्रशासन संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे. प्रशासनाने वेळीच कारवाई केली असती, तर ही दुर्घटना घडली नसती असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

वाळू उपसा सुरुच

तालुक्यातील अवैध वाळू उपशाबाबत कठोर कारवाई होत नसल्यानेच वाळूमाफियांचे धाडस वाढले आहे. सध्या गिरणा व मोसम दोन्ही नदीपात्रात पावसाचे पाणी वाहत आहे. तरी देखील अवैध वाळूउपसा होत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सवंदगावजवळ गिरणा नदीपात्रालगत असलेल्या गावठाण जमिनीवरील खदानीतून वाळू उपसा सुरू आहे. याबाबत महसूल व पोलिस प्रशासन कारवाई करेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इस्कॉन जन्माष्टमी

‘अपना साथी’चा आधाराश्रमात सोहळा

$
0
0

'अपना साथी'चा आधाराश्रमात सोहळा (फोटो आहे)

नाशिक : श्रीकृष्ण जन्माष्टमीचा आनंद आधाराश्रमातील बालकांनाही उपभोगता यावा या उद्देशाने अपना साथी फाऊंडेशनतर्फे आधाराश्रमात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यात आली. येथील बाळगोपाळांसोबत दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या अध्यक्ष सोनल गौर यांच्या भाषणाने झाली. जन्माष्टमीनिमित्त संस्थेने आश्रमाला तांदूळ, सफरचंद, शालोपयोगी साहित्य, तान्हुल्यांना खेळणी, तसेच गोपाळकाल्याचा प्रसाद भेट म्हणून दिला. सचिव पूनम जाधव यांनी दहीहंडी का फोडली जाते, याची माहिती दिली. तसेच 'हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाल की' अशा घोषणा देऊन आश्रामातील एका चिमुकल्या कृष्णाने हंडी फोडण्याचा मान मिळविला. कार्यक्रमादरम्यान संगीतखूर्ची, पासिंग द पास बॉल अशा खेळांचा मनमुराद आनंदही लुटला. येथील आनंदी कदम या मुलीने देशभक्तीपरगीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली�. अर्पिता देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. पूनम जाधव यांनी आभार मानले. बीना साऊ, अर्चना पाटील, संगीता कदम, सोनम रॉय आदी उपस्थित होत्या.

--

'जीबीएस'तर्फे प्रबोधनपर दहीहंडी (फोटो आहे)

नाशिक : गोसावी बहुउद्देशीय संस्थेच्या (जीबीएस)वतीने वाहतूक प्रबोधनपर दहीहंडी साजरी करण्यात आली. यात वाहतुकीच्या नियमांसंदर्भात संस्थेच्या 'मस्ती की पाठशाळा' या प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी वाहतुकीसंदर्भात फलक दर्शवून यंदाची दहीहंडी ही कुठलाही अनावश्यक खर्च न करता साजरी केली. हंडी फोडणाऱ्या गोविंदाला 'सेफ्टी गार्ड्स वापरा व अपघात टाळा', 'हेल्मेट वापरा' असे सांगत हेल्मेट घालून दहीहंडी फोडण्यात आली. विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचे फलक फडकावले. गोपाळकाला म्हणुन संस्कार चिठ्ठीचा काला तयार करण्यात आला होता. परिसर स्वच्छ राखणे, दररोज शाळेत जाणे, वडिलधाऱ्यांचा सन्मान करणे अशा चिठ्ठ्यांचे गोकुळाष्टमीचा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. या दहीहंडी महोत्सवात आडगावचे वाहतूक पोलिस निरीक्षक सदानंद इनामदार, उपनिरीक्षक रमेश काशीद, हेड कॉन्स्टेबल सुरंजे व नवले, तसेच संस्थेच्या अध्यक्षा सुनीता गोसावी, सचिव विनोद गोसावी, स्वयंसेवक तुषार धुमाळ, धनश्री गिरी, समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थिनी प्रतिभावाघ, गौतमी पवार, स्नेहलता सोनावणे, तसेच शुभम पगारे आदी उपस्थित होते.

--

(२ फोटो आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘आयर्नमॅन’चे जंगी स्वागत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

फ्रान्समधील ट्रायथलॉन स्पर्धा विक्रमी वेळेत पूर्ण केल्यानंतर 'आयर्नमॅन' किताब जिंकलेल्या पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांचे नाशिकच्या प्रवेशद्वारावर पाथर्डी फाटा येथे हजारो नागरिकांसह पोलिस अधिकाऱ्यांनी ढोलताशांच्या गजरात जंगी स्वागत केले. त्यांची कन्या रवीजा, पत्नी व आई-वडिलांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

डॉ. सिंगल यांनी पाथर्डीफाटा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. सुरुवातीला नाशिक पोलिस दलाच्यावतीने व नंतर शहरातील नगरसेवक, सामाजिक संस्थांच्या यांच्यावतीने डॉ. सिंगल यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्यासमवेत स्पर्धेत भाग घेतलेली व अवघ्या ५ मिनिटांनी स्पर्धेच्या विजयापासून दूर राहिलेली त्यांची कन्या रवीजा, पत्नी व त्यांचे आई-वडिल यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. सिंगल यांच्या स्वागतासाठी पोलिस बॅण्ड पथकासह ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पोलिस आयुक्तालयाच्या वतीने पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त बापू बांगर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे, मधुकर कड, दिनेश बर्डेकर यांच्यासह उपस्थित प्रत्येकाने डॉ. सिंगल यांचा सत्कार केला. नगरसेवक सतीश सोनवणे, शाम बडोदे, दिलीप दातीर, सुदाम डेमसे, सुप्रिया खोडे, पुष्पा आव्हाड आदींसह नागरिक व संपूर्ण शहर आयुक्तालय पाथर्डी फाट्यावर उपस्थित होते.

इच्छाशक्तीने सर्वसाध्य

सत्काराने भारावून गेलेले सिंगल यावेळी उत्तर देताना म्हणाले की, इच्छाशक्‍तीच्या बळावर सर्व साध्य करता येते. कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी शारीरिक वयाची नाही तर आपल्या मनाची तयारी असणे महत्त्वाचे असते, हे आयर्नमॅन स्पर्धा जिंकल्यानंतर स्पष्ट झाले. ही स्पर्धा म्हणजे स्पर्धकांच्या शारीरिक, मानसिक व संयमाची परीक्षा पाहणारी आहे. यामुळे एक आगळावेगळा अनुभव आला. थंडीच्या वातावरणात सकाळी ७ वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली. शरीराच्या आणि मनाच्या संयमाची ही कसोटी समजून केवळ इच्छाशक्तीच्या बळावर स्पर्धेचे तीनही अवघड टप्पे निर्धारित वेळेपूर्वी ४७ मिनिटे आधीच पार करू शकलो. ही स्पर्धा ५० व्या वर्षी जिंकल्यामुळे मनस्वी आनंद झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इस्कॉन’मध्ये अवतरले चैतन्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन) नाशिकतर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत जल्लोषात साजरा झाला. या सोहळ्यासाठी मुंबईहून आलेले व्रजविहारी प्रभू यांचे जन्माष्टमी प्रवचन झाले. जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त मंदिर, तसेच श्री राधा-कृष्ण मूर्तींची आकर्षक सजावट केल्याने परिसरात चैतन्य अवतरले होते.

जन्माष्टमीच्या दिवशी वृंदावनाचे व तेथे झालेल्या कृष्णलीलांचे स्मरण स्मरण केल्याने व्यक्ती पवित्र होते. भगवान श्रीकृष्ण हे दिव्य स्तरावर आहेत व आपण भौतिक स्तरावर संघर्षमयी जीवन जगत आहोत. भगवंतांच्या लीलांचे श्रवण केल्याने आपणही दिव्यत्वाची अनुभूती घेऊ शकतो, आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व संकटांना सामोरे जाऊ शकतो, असे निरूपण व्रजविहारी प्रभू यांनी केले.

जन्माष्टमीच्या आदल्या दिवशी रविवारी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. डॉ. कुलकर्णी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत लघुनाटिका सादर केली. बालगोपाळ प्री-स्कूलच्या विद्यार्थिनींनी श्लोकपठण केले. ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनी, चेतना ग्रुप व कनकलता प्रतिष्ठान यांनी सामुदायिक नृत्य सादर केले.

श्री राधा-कृष्णाचे दर्शन घेण्यासाठी नाशिक शहराबरोबर लासलगाव, चाळीसगाव, जळगाव, संगमनेर, निफाड, पिंपळगाव, सटाणा, शिरपूर, मुंबई या ठिकाणांहून हजारो भाविकांनी गर्दी केली होती. मंदिराबाहेर विविध आध्यात्मिक ग्रंथांचे प्रदर्शन व विक्री केली जात असून, विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थांनी सेवेसाठी सक्रिय सहभाग घेतला. जन्माष्टमी महोत्सव यशस्वीतेसाठी मंदिराचे अध्यक्ष गोपालानंद प्रभू व कृष्णधन प्रभू ,लीलाप्रेम प्रभू, सहस्रशीर्ष प्रभू, अनंतमुकुंद प्रभू, नृसिंह कृपा प्रभू, श्रीमती जेऊरकर माताजी, अंतरंगा शक्तीदेवी आणि इतर कृष्णभक्तांनी प्रयत्न केले.

सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगत

सोमवारी सकाळपासूनच मंदिरात विविध कार्यक्रमांना प्रारंभ झाला. पहाटे ५ वाजता मंगल आरती झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्रा जप, दर्शन आरती, श्रीमद भागवत प्रवचन झाले. श्रीकृष्णाच्या विविध लीला प्रदर्शित करणारी लघुनाटकेही सादर करण्यात आली. दिवसभर कीर्तन, भजनांचे कार्यक्रम झाले. हजारो भाविकांनी श्री राधा-कृष्णांना पंचामृताने अभिषेक केला. नृत्याली ग्रुपद्वारे कृष्णलीलेवर आधारित नृत्य सादर करण्यात आले. मध्यरात्री १२ वाजता भगवान श्रीकृष्णंना महाआरती व महाभोग अर्पण करण्यात आला. भगवान श्रीकृष्णांना सायंकाळी एक हजार आठ पदार्थांचा नैवेद्य दाखविण्यात आला.

(फोटो आहेत.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ऑक्सिटोसिन’च्या गैरवापराकडे दुर्लक्ष

$
0
0

'एफडीए' प्रशासन उदासीन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गाई-म्हशीचे दूध वाढावे म्हणून सर्रासपणे 'ऑक्सिटोसिन' औषधाचा वापर होत असतांना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या औषधाच्या गैरवापराबद्दल पाच वर्षांमध्ये एकही गुन्हा दाखल झाला नसल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) सहआयुक्त कार्यालयाने दिली आहे. याबाबत सुनील ओसवाल यांनी वर्षभरापूर्वी माहिती मागितली होती. 'ऑक्सिटोसिन'च्या गैरवापराबद्दल कारवाई झाली नसल्याचे ओसवाल यांनी सांगितले.

गाई-म्हशींना 'ऑक्सिटोसिन'चे इंजेक्शन देऊन दूध वाढविले जात असल्यासंबंधी ओसवाल यांनी माहिती अधिकारात नाशिक येथील सहायक आयुक्त 'एफडीए'कडे विचारणा केली होती. त्यात 'ऑक्सिटोसिन'ची अवैध विक्री प्रकरणी पाच वर्षांमध्ये फक्त एकच गुन्हा विभागाने दाखल केल्याचे विचारलेल्या प्रश्‍नांच्या उत्तरात म्हटले होते.

प्रसूतीकाळात अतिरिक्त रक्तस्रावाला प्रतिबंध करण्यासाठी 'ऑक्सिटोसिन'चा वापर केला जात असतो. स्तनपानासाठीही हे महत्त्वाचे मानले जाते. औषधाच्या अवैध आणि अतिरिक्त वापराणे कर्करोगाची भीती असते. 'ऑक्सिटोसिन'चा गैरवापर होत असल्याच्या अनेक तक्रारी असताना 'एफडीए' प्रशासनाकडून हवी तशी कारवाई होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोहीम शून्य

'ऑक्सिटोसिन' अवैध विक्रीप्रकरणी नाशिक विभागात कधीच मोहीम राबविली गेली नाही. गायी-म्हशीच्या गोठ्यांची संख्या किती व गोठे कोठे आणि कधीपासून आहेत याचीही माहिती 'एफडीए'कडे उपलब्ध नाही. गोठ्यांना या विभागातील अधिकाऱ्यांनी अचानक किंवा कधीही भेटी दिलेल्या नाहीत, असे उत्तरात नमूद करण्यात आल्याचे ओसवाल यांनी म्हटले आहे. दरम्यान, वर्षभरात काय कारवाई केली, याबाबत 'एफडीए'ची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता माहिती मिळू शकली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images