Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

महिंद्रा, यश फाऊंडेशनचे समाजभान

0
0

महिंद्रा, यश फाऊंडेशनचे समाजभान

नाशिक : एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या बाळगोपाळांनी दहीहंडी फोडून गोपाळकाल्याचा आनंद लुटला. गंगापूररोडलगतच्या आकाशवाणी टॉवरजवळील महिंद्रा जीप हाउसलगतच्या लेन क्रमांक दोनमध्ये हा कार्यक्रम झाला. महिंद्रा आणि महिंद्रा व यश फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडी फोडण्यासाठी प्रेरित करणाऱ्या गीतांनी या बच्चेमंडळींचाही उत्साह वाढविला. समाजात अनेक घटक श्री कृष्ण जन्मदिवसानिमित्त दहीहंडीचा उत्सव साजरा करतात. एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या चिमुकल्या बाळगोपाळांनाही सर्वसामन्यांप्रमाणेच सकारात्मक दृष्टीने आयुष्य जगता यावे, तसेच प्रत्येक क्षणामधून आनंद वेचता यावा या उद्देशाने सालाबादाप्रमाणे यंदाही दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला महिंद्रा आणि महिंद्राचे कमलाकर घोंगडे, सुशील नांबियार, नामदेव येलमामे आणि यश फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. १५० बाळगोपाळ व त्यांचे कुटुंबीय या उत्सवात उत्साहाने सहभागी झाले. विविधरंगी फुग्यांनी सजविलेली दहीहंडी बालगोपाळांचे लक्ष वेधून घेत होती. ती फोडण्यासाठी मानवी मनोरे रचण्यात आले. पाण्यामध्ये चिंब भिजत दहीहंडी फोडण्याचे आवाहन बच्चेमंडळींनी लीलया पेलले. नृत्य, खेळासह मनोरंजक कार्यक्रमांचा त्यांनी आनंद लुटला. संकटांवर मात करून सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाचा आनंद लुटा, असे आवाहन घोंगडे यांनी केले. पाटील यांनी उपस्थित बाळगोपाळांच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा दिल्या.

-------------

फोटो आहे. (\Bसुधारित- एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या बालगोपाळांनी फोडली दहीहंडी)

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकमध्ये प्रथमच रंगणार दृष्टीबाधितांची बुद्धिबळ स्पर्धा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना व राष्ट्रीय दृष्टिहीन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दृष्टीबाधित खेळाडूंसाठी पश्चिम विभागीय आंतरराष्ट्रीय खुल्या मानांकित बुद्धिबळ स्पर्धा आयोजनाचा मान नाशिक जिल्ह्याला प्रथमच मिळाला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ६ सप्टेंबर रोजी कालिका मंदिराच्या हॉलमध्ये होणार असून, या स्पर्धा ६ ते ९ सप्टेंबर अशा चार दिवस रंगणार आहे.

नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटना गेल्या ४४ वर्षांपासून कार्यरत असून, अतिशय नि:स्वार्थ भावनेने जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ उपक्रमांचे सातत्याने आयोजन करीत आहे. संघटनेच्यामाध्यमातून अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकचे नाव उज्ज्वल केले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा बुद्धिबळ खेळाडू विदित गुजराथी, राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता वरुण वाघ, प्रचीती चंद्रात्रेय, राष्ट्रीय रजत पदक विजेती धनश्री राठी असे अनेक नावाजलेले बुद्धिबळ खेळाडू घडविण्यास संघटनेचे उपक्रम मदतशील राहिले आहेत. या स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, व छत्तीसगड या सहा राज्यांतील तब्बल २०० पेक्षा अधिक दृष्टीबाधित खेळाडू येणार आहे. सर्व खेळाडूंची राहण्याची व जेवणाची संपूर्ण व्यवस्था जिल्हा संघटनेतर्फे मोफत करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू मदन बागायतकर, स्वप्नील शाह, शिरीष पाटील यांच्यासारखे नावाजलेल्या खेळाडूंचा यात समावेश आहे. दृष्टीबाधित असूनही दर्जेदार बुद्धिबळ डावांचा आनंद घेण्यासाठी भारतभरातील तमाम बुद्धिबळ प्रेमी या बुद्धिबळ सोहळ्यानिमित्त्याने स्पर्धेस भेट देणार आहे. दृष्टीबाधित खेळाडूंच्या पश्चिम विभागीय निवड चाचणीतून निवड झालेले खेळाडू राष्ट्रीय ब बुद्धिबळ स्पर्धेसाठी पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेचे संपूर्ण थेट प्रक्षेपण चेसविकी डॉट कॉम या संकेत स्थळावर होणार असून, संपूर्ण जगभरातील खेळाडूंना याचा आस्वाद घेता येणार आहे.

या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय दृष्टिहीन संस्थेचे उपाध्यक्ष डी. पी. जाधव, जगदीप कवाळ, अजित कुलकर्णी, अखिल बुद्धिबळ अंध महासंघाचे स्वप्नील शाह, नाशिक बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विनय बेळे, धनंजय बेळे, सचिव सुनील शर्मा, विनायक वाडीले, सचिन निरंतर, भूषण कासलीवाल, भूषण ठाकूर, सचिन व्यवहारे, भूषण पवार, वैभव चव्हाण आदी प्रयत्नशील आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिककर सायकलीस्ट्सने पूर्ण केली ‘डेथ रेस’

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिककर सायकलीस्ट्स किशोर काळे आणि संगमनेरचे विजय काळे यांनी जगातील अवघड स्पर्धांपैकी समजली जाणारी, 'डेथ रेस' असे टोपण नाव असलेली 'भूतान-टूर ऑफ द ड्रॅगन' ही स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली आहे. एकाच वर्षात चार भारतीय सायकलीस्टसने स्पर्धा पूर्ण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नाशिककर दोघांसह उत्तराखंड मधील दोघांनीही ही रेस पूर्ण केली आहे.

१ सप्टेंबर रोजी झालेल्या 'टूर ऑफ ड्रॅगन'च्या नवव्या स्पर्धेत जगभरातून एकूण ३५ सायकलीस्टने सहभाग नोंदवला. किशोर काळे यांनी ही रेस १७ तासात तर विजय काळे यांनी १८ तासात पूर्ण केली. यावेळी स्पर्धा पूर्ण करणाऱ्या दोघा सायकलीस्टचा भूतान ऑलिम्पिक कमिटीचे चेअरमन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या आधी २०१२ मध्ये डॉ. महेंद्र महाजन यांनी तर गेल्यावर्षी २०१७ मध्ये डॉ. हितेंद्र महाजन यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. २०१८ मध्ये किशोर काळे आणि विजय काळे यांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. यास्पर्धेबद्दल किशोर काळे म्हणाले की, पहिल्या प्रयत्नात केवळ १० मिनिटांसाठी स्पर्धा सोडण्याची नामुष्की पत्करावी लागल्यानंतर मी जोमाने सराव करीत स्पर्धा पूर्ण करण्याचे ध्येय ठेवूनच सहभागी झालो होतो.

या स्पर्धेत एकूण चार घाट चढून उतरायचे असतात. त्यातील शेवटचा घाट सलग ४० कि.मी.च्या चढायचा असल्याने स्पर्धेतील आव्हान शेवटपर्यंत जीवंत असते. नाशिक सायकलीस्ट्स परिवार यामुळे हे शक्य झाले.

…..

काय आहे 'टूर ऑफ द ड्रॅगन'

जगभरात होणाऱ्या विविध सायकलिंग स्पर्धांपैकी 'डेथ रेस' असे टोपण असलेल्या या स्पर्धेत एका दिवसात २६८ कि.मी. अंतर पार करायचे असते. समुद्र सपाटीपासून १ हजार २०० मीटर ते ३ हजार ३४० मीटर अशी उंची हिमालयीन पर्वतरांगांतून ४० किमीपेक्षा जास्त लांबीचे तीन घाट ओलांडत पूर्ण करावी लागणारी जगातील सर्वात कठीण एकदिवसीय सोलो सायकल स्पर्धा आहे. ही स्पर्धा आजवर खूप कमी सायकलीस्टना पूर्ण करता आली आहे.

थिम्फू शहरात संपते स्पर्धा

प्रचंड थंडीत भूतानमधील भूमतांग येथून १ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजता सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी सायंकाळी ६ वाजताचा कटऑफ असतो. म्हणजेच एकूण १६ तासात २६८ कि.मी. अंतर या अवघड पर्वतीय रांगांमधून घाट रस्त्यांवरून पूर्ण करावयाची असते. एका मोजणीनुसार प्रत्येक सायकलीस्टला एका दिवसाच्या या रेस दरम्यान सरळ रेषेत ३७९० मीटर (१२४३४ फुट) चढून ३९५० (१२९५९ फुट) उतरून पूर्ण करावी लागते. भूतानची राजधानी थिम्फू शहरात ही स्पर्धा संपते. या स्पर्धेत प्रथम क्रमांकास १ लाख ५० हजाराचे पारितोषिक देण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अबब! गंगापूर धरणात १०१ टक्के पाणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हावासीयांची पुढील वर्षभराची पाण्याची गरज भागविणाऱ्या धरणांमधील एकूण पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा चक्क १०१ टक्के दर्शविण्यात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पावसाचा जोर ओसरल्याने गंगापूर धरणातून विसर्ग बंद करण्यात आला असून, ५६३० दशलक्ष घनफूट पाणीसाठवण क्षमता असलेल्या या धरणामध्ये ५६८६ दलघफू उपयुक्त पाणीसाठा दर्शविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

गंगापूर धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्राकडे मराठावाडावासीयांचे लक्ष लागलेले असते. या पाणलोट क्षेत्रातील पावसावर मराठवाड्याची भिस्त अवलंबून आहे. येथे पाऊस झाला, तर गंगापूर धरणसूमहातील पाण्याची पातळी वाढत जाते. ठराविक क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा धरणात उपलब्ध झाला, तर त्याहून अधिक पाणी साठवून न ठेवता त्याचा विसर्ग केला जातो. नाशिक शहर, नांदूरमध्यमेश्वरमार्गे हे पाणी औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरणापर्यंत पोहोचते. दोन दिवसांपासून गंगापूर धरणसमूहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग थांबविण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाकडून सोमवारी प्राप्त झालेल्या धरणांमधील पाणीसाठ्याच्या अहवालात गंगापूर धरणातील पाणीसाठा १०१ टक्के एवढा दर्शविण्यात आला आहे.

ही चूकच...

आमच्याकडील अहवालाप्रमाणे गंगापूर धरणामधील आजचा उपयुक्त पाणीसाठा ५३८६ दशलक्ष घनफूट म्हणजेच ९५.६७ टक्के असल्याची माहिती पाटबंधारे विभागातील सूत्रांनी दिली आहे. मात्र, माध्यमांपर्यंत आलेल्या अहवालात तो नजरचुकीने ५६८६ एवढा दाखविला गेल्याने धरणसमूहामधील पाणीसाठा १०१ टक्क्यांवर पोहोचला असेल, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दही हंडी

0
0

मेरी परिसरात

कृष्णजन्मोत्सव

नाशिक : मेरी भागात श्रीकृष्ण जन्मोत्सव व दहीहंडी विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त भाविकांनी दर्शनासह प्रसादाचा लाभ घेतला. म्हसरूळ ग्रामस्थांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात रात्री ९ ते १२ पर्यंत श्रीकृष्ण जन्मोत्सव आधारित अरुण महाराज जामठीकर यांचे हरिकिर्तन झाले. या वेळी म्हसरूळ ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांच्या उपस्थितीत रात्री बाराला श्रीकृष्णाचा जयघोष, फटाक्यांच्या आतषबाजीत अन् पुष्पवर्षावात श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. जनक महाराज सोळंके, किसनराव वडजे, संपतराव सातकर, वसंतराव मोराडे, रंगनाथ मोरे, प्रकाश उखाडे, प्रशांत मोराडे, सोमनाथ वडजे यांनी श्रीकृष्ण प्रतिमेसह पाळणापूजन केले. दुसऱ्या दिवशी सायंकाळी मारुती मंदिराच्या प्रांगणात युवकांसह बालमंडळांनी दहीहंडी फोडण्याचा आनंद लुटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये पेट्रोल ८७.१५ रुपये!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पेट्रोल आणि डिझेल दराचा पुन्हा भडका उडाला असून, सर्वसामान्यांसह सर्वांनाच त्याची झळ बसू लागली आहे. शहरात पेट्रोलचा दर ८७ रुपये १५ पैसे प्रतिलिटरपर्यंत गेला असून, डिझेलचा दरही प्रतिलिटर ७५ रुपयांपर्यंत गेला आहे. आतापर्यंतची ही सर्वांत मोठी दरवाढ असून, वाहतूकदारांना या दरवाढीचा सर्वाधिक फटका बसू लागला आहे. परिणामी, महागाईचा भडका उडण्याची भीती नाशिककर व्यक्त करू लागले आहेत. दरवाढ अशीच सुरू राहिली तर पुढील आठवड्यात पेट्रोलचे दर ९० रुपयांपर्यंत पोहोचतील, असे संकेत पेट्रोलपंप चालकांनी दिले आहेत.

अन्न, वस्त्र आणि निवारा याप्रमाणेच आता इंधन हीदेखील जीवनावश्यक बाब बनली आहे. इंधनाचे दर वाढले की नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेल यांसारख्या इंधनाचे दर वाढू लागले आहेत. मध्यंतरी काही दिवस इंधनाचे दर स्थिर होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून त्यामध्ये रोज काही पैशांनी वाढ होऊ लागली आहे. जिल्ह्यात गेल्या चार दिवसांत पेट्रोलचे दर साधारणत: दीड ते पावणेदोन रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे सामान्यांसह वाहतूकदारांच्या खिशाला मोठी झळ बसू लागली आहे. रोज सकाळी सहा वाजता इंधनाचे नवीन दर येतात. सोमवारी (३ सप्टेंबर) नाशिकमध्ये पेट्रोल ८६ रुपये ९९ पैसे प्रतिलिटर होते. मंगळवारी ते ८७ रुपये १५ पैसे प्रतिलिटर दराने विक्री केले जाऊ लागले. पुढील आठवड्यापर्यंत ते ९० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वितरकांकडून व्यक्त केली जाऊ लागली आहे.

विक्रीत घट नाही

इंधनाचे दर वाढत असले तरी पेट्रोल आणि डिझेलची मागणी मात्र कमी होऊ शकलेली नाही. शहरात प्रत्येक पेट्रोलपंपावर वाहनांच्या रांगा कायम असून, विक्रीमध्ये घट झाली नसल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

भांडवल अधिक लागते

इंधनाचे दर वाढल्यामुळे विक्रेत्यांची अधिक कोंडी होऊ लागली आहे. पेट्रोल, डिझेल खरेदीसाठी पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागतात. त्यामुळे विक्रेत्यांना अधिक भांडवलाची व्यवस्था करणे भाग पडते आहे. विशेष म्हणजे विक्रेत्यांना मिळणाऱ्या कमिशनमध्ये वाढ झालेली नाही. त्यामुळे अधिक भांडवल ओतूनही पंपचालकांचा आर्थिक लाभ मात्र पूर्वीएवढाच आहे. इंधन दरवाढ अशीच सुरू राहिली तर पुढील आठवड्यापर्यंत पेट्रोलचे दर ९० रुपये प्रतिलिटर होतील.

- नितीन धात्रक, पेट्रोल डिलर्स असोसिएशन

वाहतूकदारांवर आत्महत्येची वेळ

इंधन दरवाढीमुळे वाहतूकदारांवर आत्महत्येची वेळ आली आहे. दर तीन दिवसांनी इंधनाचे दर प्रतिलिटर एक रुपयाने वाढत आहे. त्यामुळे वाहतूकदारांना इंधन खरेदीवरच अधिक पैसा खर्च करावा लागत आहे. वाहतूकदार कंपन्यांकडे पैसे वाढवून मागतात; परंतु मागणी केल्यानंतर ती १५ ते २० दिवसांनी पूर्ण होते, तोपर्यंत नुकसान वाहतूकदारांना सहन करावे लागते आहे. ही इंधन दरवाढ पुढील दहा दिवस अशीच सुरू राहिली तर वाहतुकीच्या खर्चात २० ते ३० टक्के वाढ करणे अनिवार्य ठरणार आहे. साहजिकच त्यामुळे नागरिकांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागतील.

- अंजू सिंघल, ट्रान्स्पोर्ट असोसिएशन

पेट्रोलचे दर वाढल्यामुळे आमचे कंबरडे मोडते आहे. दिवसाआड किमान १०० रुपयांचे पेट्रोल भरावे लागत असून, त्यामुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. रोजच इंधनाची दरवाढ होत असून, ती अशीच सुरू राहिली तर जगणे मुश्कील होणार आहे.

- प्रवीण जाधव, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांसाठी विशेष मतदार नोंदणी अभियान

0
0

गायकवाड सभागृहात उद्या कार्यक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार जिल्हा प्रशासनाच्या निवडणूक शाखेने दिव्यांग बांधवांच्या मतदार नोंदणीवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. छायाचित्र मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत गुरुवारी (दि. ६) दादासाहेब गायकवाड सभागृहात सकाळी १० ते दुपारी ३ यावेळेत दिव्यांग मतदार नोंदणी शिबिर होणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार नोंदणीला जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. मतदारांच्या जनजागृतीसाठी चित्ररथ बनविण्यात आला असून तो प्रत्येक तालुक्यात जाऊन जनजागृतीचे काम करीत आहे. जिल्ह्यात दिव्यांग बांधवांनी संख्या मोठी असली तरी तेवढी मतदारनोंदणी नाही. त्यामुळे त्यांची मतदार नोंदणी करण्यासाठी निवडणूक शाखेने विशेष परिश्रम घेण्यास सुरुवात केली आहे. मतदार नोंदणीसाठी विशेष शिबिर होणार आहे. शहरातील नाशिक पूर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम आणि देवळाली विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग मतदारांना या शिबिरात नावनोंदणी करता येणार आहे.

शिबिरासाठी येताना दोन पासपोर्ट आकाराची रंगीत छायाचित्रे, रहिवासी पुरावा म्हणून शिधापत्रिका, विद्युत देयक, आधारकार्ड, फोन बिल, भाडे तत्त्वावर राहात असल्यास मालकाचा करारनामा, वयाचा पुरावा म्हणून जन्मदाखला, शाळा सोडल्याचा दाखला, पारपत्र, पॅनकार्ड व जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेले दिव्यांग प्रमाणपत्र सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाने त्यांच्या संघटनांशी संपर्क साधला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खिडकीत हात घालून ५० हजाराची चोरी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरात कुटुंब झोपले असल्याची संधी साधून चोरट्यांनी उघड्या खिडकीतून रोकड आणि दागिने असा सुमारे ५० हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना सिडकोतील विराटनगर भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उमेश कैलास शर्मा (रा. अंबिका संकुल, विराटनगर) यांनी तक्रार दिली आहे. शर्मा कुटुंबिय सोमवारी रात्री घरात झोपलेले असताना चोरट्यांनी साडेतीन हजार रुपयांची रोकड, मोबाइल आणि सोन्याचे दागिने असा सुमारे ४७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.

--

भाजीबाजारात मोबाइल चोरी

भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या ग्राहकाच्या खिशातील मोबाइल चोरट्यांनी हातोहात लांबविल्याची घटना कलानगर भाजीबाजारात घडली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रवीण बळवंत सोनवणे (रा. कलानगर, दिंडोरीरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी सकाळी सोनवणे कलानगर येथील भाजीबाजारात खरेदीसाठी गेले होते. गर्दीत चोरट्यांनी त्यांच्या मोबाईल चोरून नेला.

--

इंडिगोसह तीन दुचाकींची चोरी

शहरातून एका इंडिगो कारसह तीन दुचाकी चोरट्यांनी पळवून नेल्या. या प्रकरणी मुंबईनाका, सरकारवाडा, अंबड आणि इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवकुमार रामास्वामी कॉडेर (रा. पनवेल) हे सोमवारी मुंबईनाका भागात आले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारास शताब्दी हॉस्पिटल समोरील दुभाजका पलिकडे त्यांनी त्यांची कार (एमएच ०२ एपी ९५५५) पार्क केली असता अज्ञात चोरट्यांनी कार पळवून नेली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पवननगर येथील सुरज मिस्तरी हा युवक गेल्या शुक्रवारी सकाळी भावीन व्हिल्स शोरूममध्ये गेला होता. पार्किंगमध्ये लावलेली त्याची दुचाकी (एमएच १५ जीजे १२६८) चोरट्यांनी हातोहात लांबविली. साईबाबानगर भागात राहणारा आसिफ पठाण हा युवक २५ ऑगस्ट रोजी सिनेमा बघण्यासाठी त्रिमूर्ती चौकातील दिव्या अ‍ॅडलॅब येथे गेला होता. सिनेमा थिएटर बाहेर लावलेली त्याची दुचाकी (एमएच १५ डीआर ३३२७) अज्ञात चोरट्यांनी पळवून नेली. नवनाथ आव्हाड यांची दुचाकी (एमएच १५ ईटी १६२१) २८ ऑगस्ट रोजी रात्री चोरीस गेली. वडाळा पाथर्डी रोडवरील माऊंट प्लाझा या सोसायटीच्या पार्किंगमध्ये हा गुन्हा घडला.

--

बुधवारपेठेत पाच जुगारी गजाआड

बुधवार पेठेतील देशपांडे गल्लीत उघड्यावर जुगार खेळणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली. भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मयुर दिवटे, विकास नाईकवाडे, राजेश जाधव, अमोल मानकर आणि भारत डांगरे अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

--

अल्पवयीन मुलाचा मृत्यू

तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने १३ वर्षांच्या मुलांचा मृत्यू झाला. ही घटना गोविंदनगर भागात घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कार्तिक शिवाजी हासे (१३ रा. श्रीनंद अपार्ट. गोविंदनगर) असे या मुलाचे नाव आहे. सोमवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. राहत्या घराच्या गॅलरीत कार्तिक उभा असताना खाली कोसळला. यात गंभीर जखमी झाल्याने त्यास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणेशोत्सवावरील विघ्न टळले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जाचक अटींवरून गणेश मंडळांनी निषेध मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर महापालिकेने दोन पावले मागे येत, सार्वजनिक गणेश मंडळांवरील जाचक अटींचे शुक्लकाष्ट बऱ्याच प्रमाणात कमी केले आहे. त्यामुळे गणेश महामंडळाकडून काढण्यात येणारा निषेध मोर्चा रद्द करण्यात आला आहे. महापालिकेने अग्निशमन विभागाची पाचशे रुपयांची अट रद्द केली असून, विद्युत विभागाच्या दाखल्याचीही अट शिथिल केली आहे. मंडळ व महापालिकेतील हा तिढा मिटवण्यात पालकमंत्र्यांची शिष्टाई महत्त्वपूर्ण ठरली आहे. महापालिकेने ढिलाई दिल्याने मंगळवारपर्यंत २३८ गणेश मंडळांनी परवानगीसाठी अर्ज केले. त्यापैकी दीडशेहून अधिक मंडळांना महापालिकेने परवानगी दिली आहे. त्यामुळे काहीअंशी मंडळांवरील विघ्न टळले आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने मंडप धोरणासह गणेश मंडळांबाबत पत्रक काढल्यानंतर जवळपास महिनाभरापासून महापालिका विरूद्ध मंडळ असा वाद निर्माण झाला होता. रस्त्यावरील गणेश मंडळांची प्रतिष्ठापनाही मंडप धोरणाच्या कठोर अटींमुळे अडचणीत आली होती. दुसरीकडे मंडळांना अग्निशमन विभागाकडून प्रतिदिन पाचशे रुपयांची अट टाकण्यात आली होती. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत अधीक्षकांचा ना हरकत दाखला सक्तीचा करण्यात आला होता. या वादावरून सोमवारी आयुक्त तुकाराम मुंढे आणि गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. नियमावलीनुसारच मंडळांना परवानगी देण्याच्या निर्णयावर आयुक्त ठाम असल्याने महामंडळाने निषेधाचा गणेशोत्सव जाहीर करीत महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी पुन्हा सूत्रे फिरवत आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ आयुक्तांना भेटायला पाठवले. आमदार फरांदे यांच्यासह महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार यांच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेतली. विविध कर उपायुक्त सुहास शिंदे, आयुक्त मुंढे यांच्यासोबत झालेल्या चर्चेत महाापलिकेने दोन पावले मागे येत अग्निशमन दाखला व विद्युत विभागाची अट रद्द केली.

गावठाणावर अटी कायम

गावठाणातील रस्त्यांवरही गणेशोत्सव साजरा करण्यावर या वेळी चर्चा झाली. मात्र, प्रशासन मात्र नियमावलीवर ठाम राहिले. त्यामुळे गावठाणातील गणेश मंडळांवर मंडप धोरणाच्या परवानग्या मात्र लागू राहणार आहेत. गणेश मंडळांना परवानग्या देण्यासाठी महापालिकेच्या वतीने विभागीय कार्यालयांमध्ये एक खिडकी योजना सुरू केली आहे. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर झाल्यानंतर मोर्चा रद्द केल्याचे समीर शेटे यांनी जाहीर केले.

पालकमंत्र्यांची शिष्टाई

ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये, यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार फरादे यांनी प्रयत्न सुरू केले होते. महामंडळाचे पदाधिकारी आणि आयुक्तांना प्रत्येकी दोन- दोन पावले मागे येण्यास महाजन यांनी भाग पाडले. बी. डी. भालेकरच्या वादावरही पडदा टाकत दोन दिवसांपासून मंडप धोरणावरून पदाधिकारी आणि आयुक्त यांच्यात समन्वय साधण्याचे काम पालकमंत्र्यांनी केले. त्यामुळे तूर्त या वादावर आता पडदा पडला आहे.

मात्र तक्रार आल्यास कारवाई!

गणेश मंडळांच्या मंडपावरून शहरात राजकारण सुरू झाले आहे. विरोधी पक्षांकडून भाजपला घेरले जात असल्याने भाजपचीच अडचण झाली आहे. त्यामुळे आता प्रशासनानेही याबाबत संयमाची भूमिका घेतली असून, मंडळांकडे कानाडोळा करण्याचा निर्णय घेतला आहे. मंडळांच्या मंडपाकडे दुर्लक्ष केले जाणार असले तरी रस्त्यावर अतिक्रमण होऊ नये याची काळजी मंडळांना घ्यावी लागणार आहे. तक्रार आल्यास मात्र कारवाई करू, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे संयमाने आता हा विषय हाताळला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात शेतकरी आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव तालुक्यातील सोनज येथे समाधान रंगनाथ खोमणे (वय ३८) या शेतकऱ्याने १ सप्टेंबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत ६७ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. समाधान यांच्या वडिलांच्या नावे शेती असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. समाधान याच्या आत्महत्येबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला मंगळवारी प्राप्त झाला. या घटनेमुळे सप्टेंबरमधील पहिल्या शेतकरी आत्महत्येची नोंद झाली आहे. यंदा ऑगस्टमध्ये सर्वाधिक १२ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे चांगला पाऊस झाला असतानाही जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढच होत असल्याने जिल्हा प्रशासनही चक्रावले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्होकेशनल शिक्षकांचे धरणे

0
0

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला मागण्यांकडे वेधले लक्ष

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एकीकडे शासनासह विविध सामाजिक संस्था आणि शिक्षक संघटना शिक्षक दिनाच्या कार्यक्रमांची पूर्वतयारी करत असतानाच शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला मंगळवारी व्होकेशनल टिचर्स असोसिएशनने वर्षानुवर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसाठी धरणे आंदोलन धरले. गडकरी चौक परिसरातील आयटीआय सहसंचालकांच्या कार्यालयाबाहेर संघटनेने हे आंदोलन केले.

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाबाबत रुपांतरण प्रक्रिया पूर्णत: स्थगित करण्यात येऊन या अभ्यासक्र मास एनएसक्यूएफचा दर्जा द्यावा व अनुदान देऊन सक्षमीकरण करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हे धरणे धरण्यात आले. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाकडील विद्यार्थीसंख्या पूर्ववत प्रतितुकडी २० ठेवण्यात यावी, या अभ्यासक्रमासंदर्भात नेमण्यात आलेल्या आढावा समितीचा अहवाल सार्वत्रिक करून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. घड्याळी तासिकेवर कार्यरत शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी. पायाभूत अभ्यासक्रम शिकविणाऱ्या तासिका तत्वावरील शिक्षकांची पर्यायी शैक्षणिक अर्हता एम. कॉम. बी. एड. किंवा एम. ए. (इको.) बी. एड. अशी करण्यात यावी. शिकाऊ उमेदवारी योजना शासनस्तरावरून प्रभावीपणे राबवावी. राज्य व केंद्राच्या सेवाशर्ती नियमावलीत उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात यावा. प्रत्येक व्यवसाय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना संबंधित व्यवसाय शिक्षणाच्या दृष्टीने उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात. या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी सैनिक भरतीसाठी पात्र ठरविले जावेत. ५० टक्के पदे भरण्यासंदर्भातील शासन निर्णयानुसार पदभरतीला कालमर्यादेत मंजूरी देण्यात यावी. जिल्हा व विभागीय कार्यालयात शिक्षकांची प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाल काढण्यात यावी आणि महानगरातील ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्यात यावी, अशा मागण्यांचे निवेदन यावेळी व्होकेशनल टिचर्स असोसिएशनच्या वतीने व्यवसाय शिक्षण विभागाच्या सहसंचालकांना देण्यात आले. या धरणे आंदोलनात संघटनेचे सचिव डी. आर. मुरकुटे, उपाध्यक्ष जयंत भाभे, कार्याध्यक्ष प्रकाश तराळे, कोषाध्यक्ष संजय विसपुते आदी उपस्थित होते.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाईला खाकीचा हात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिस दलाने स्पर्धा परीक्षा, तसेच पोलिस व सैन्य भरतीसाठी प्रयत्त्न करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी पोलिस स्टेशननिहाय केंद्रे सुरू केली आहेत. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या कल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेमध्ये युवकांना ग्रामीण पोलिस दलातील राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळांडूमार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या उपक्रमाची घोषणा नाशिक जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धेदरम्यान करण्यात आली होती. उद्घाटनदेखील त्याचवेळी झाले होते. मंगळवारी (दि. ४) प्रत्यक्षात या उपक्रमाची सुरुवात झाली. मंगळवारी पेठ तालुक्यातील दादासाहेब बीडकर कॉलेज येथे अधीक्षक दराडे यांच्या हस्ते, तर पेठ उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक सचिन गोरे, निरीक्षक लीलाधर कानडे, डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा हेमलता बीडकर, प्राचार्य डॉ. आर. बी. टोचे यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जवळपास ३०० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना दराडे यांनी मार्गदर्शन केले. नागरिकांशी थेट संपर्क वाढवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरू शकतो. दरम्यान, मालेगाव विभागाचे अपर अधीक्षक निलोत्पल यांनीही मंगळवारी मालेगाव शहरातील एमएसजी कॉलेजमध्ये स्पर्धा परीक्षा, तसेच पोलिस व सैन्य भरती प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपअधीक्षक रत्नाकर नवले, अजित हगवणे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व प्राध्यपकवृंद उपस्थित होता. अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांनी निफाड तालुक्यातील सायखेडा येथील स्वामी षटकोपाचार्य महाराज कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत परीक्षा व भरती प्रक्रियेतील अडचणी आणि त्यावरील उपाय याबाबत मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे यावेळी पोलिस खेळाडूंनी प्रात्यक्षिके सादर केली. उपअधीक्षक माधव पडिले, निरीक्षक अंबादास मोरे आदी उपस्थित होते. दरम्यान, कळवणचे उपअधीक्षक सदाशिव वाघमारे यांनी कळवण कॉलेजमध्ये, तर नाशिक ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे यांनी ओझर येथील कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मनमाडच्या सहायक अधीक्षिका आर. रागसुधा यांनी, तसेच मालेगाव उपविभागाचे उपअधीक्षक शशिकांत शिंदे यांनी उपविभागातील कॉलेजांमध्ये उपस्थित विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निरसन करून मार्गदर्शन केले.

--

उपक्रम ठरणार पथदर्शी

ग्रामीण भागातील युवकांचा नोकरीकडे कल वाढत आहे. मात्र, त्यादृष्टीने सर्वांनाच मार्गदर्शन उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेली ही केंद्रे ग्रामीण भागातील युवकांसाठी पथदर्शी ठरणारी आहेत. राज्यात २०१८-१९ मध्ये होणाऱ्या विविध विभागांतील भरती प्रक्रियांसाठी हे भरतीपूर्व प्रशिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे.

--

प्रत्येक पोलिस स्टेशननिहाय या उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. कॉलेजच्या प्राचार्यांशी संपर्क साधून वेळ निश्चित करण्यात येणर आहे. जिल्ह्यातील २८ कॉलेजेसमध्ये प्रशिक्षण पार पडणार असून, याचा विद्यार्थ्यांसह युवकांनी लाभ घ्यावा.

-संजय दराडे, पोलिस अधीक्षक

(लोगो : शुभ वार्ता)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोपण केलेल्या वृक्षांवर रानगवताचे ‘अतिक्रमण’

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दिंडोरीरोडच्या कडेला पादचारी मार्गाच्या बाजूला वृक्षारोपण करण्यात आलेले आहे. येथे लावण्यात आलेल्या रोपांची वाढ होत असतानाच या रोपांवर पावसामुळे फोफावलेल्या गवताने 'अतिक्रमण' केले आहे. वृक्षारोपण जितक्या जोमाने केले जाते, तितके त्यांचे संवर्धन केले जात नसल्याने या वृक्षरोपांची वाढ खुंटल्याचे चित्र दिसून येत आहे.

दिंडोरीरोडची मॉडेलरोड म्हणून ओळख आहे. आरटीओ कॉर्नरपर्यंतचा या रोडचा भाग 'मेरी'च्या आवाराचा आहे. तारवाला सिग्नलपासून ते आरटीओ कॉर्नरच्या सिग्नलपर्यंतच्या भागात रस्त्याच्या पूर्वेला पादचारी मार्गालगत विविध वृक्षांची रोपे लावण्यात आली आहेत. हा भाग मेरी वसाहतीचा आहे. येथील वृक्षारोपणानंतर या रोपांच्या संवर्धनाची फारशी काळजी घेतलेली दिसत नाही. त्यामुळे काही रोपे लागवडीनंतर पाण्याअभावी जळून गेली आहेत. जी काही रोपे तग धरून आहेत, ती वाढलेल्या गवताने झाकाळली आहेत. रोपांच्यावर गवत आणि वेली वाढलेल्या आहेत. त्यामुळे रोपांच्या वाढीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. हे गवत काढण्याची तसदी घेतले जात नाही. त्यामुळे या रोपांच्या वाढीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे येथील गवत त्वरित काढण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

-------

साइडपट्ट्या खोदल्याने नागरिकांची गैरसोय (फोटो) (स्वतंत्र सिंगल)

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर येथील अशोकनगर परिसरात एका खासगी कंपनीने रस्त्यांच्या साइडपट्ट्या खोदल्याने नागरिकांना ऐन पावसाळ्यात गैरसोय सहन करावी लागत आहे.

महापालिकेच्या हद्दीत रस्ता अथवा साइडपट्ट्या खोदण्यासाठी रीतसर परवानगी घ्यावी लागते. परंतु, एका खासगी कंपनीकडून कुठलीही परवानगी न घेता अशोकनगर भागात रस्त्याच्या साइडपट्ट्या खोदून काम केले जात आहे. याबाबत नगरसेविका माधुरी बोलकर यांनी महापालिकेच्या बांधकाम विभागाला जाब विचारत संबंधित कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बांधकाम उपअभियंता संजय पाटील यांनी पाहणी करून संबंधित खासगी कंपनीवर कारवाई करण्यात येईल, असे सांगितले. संबंधित कंपनी अनेकदा कुठलीही परवानगी न घेता सर्रासपणे रस्ते खोदत असल्याचा आरोपही नगरसेविका बोलकर यांनी केला आहे.

------

हॉटेल्समुळे ड्रेनेज तुंबल्याने गैरसोयीची नागरिकांची तक्रार (फोटो) (थोडक्यात)

सातपूर : कामगार वस्ती असलेल्या सातपूर कॉलनीतील महापालिकेच्या मार्केटमधील, तसेच परिसरातील काही हॉटेल्सकडून मोठ्या प्रमाणावर सांडपणी कचऱ्यासह ड्रेनेजमध्ये टाकले जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचे ड्रेनेज चेंबर तुंबत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. नुकतेच काही हॉटेलचालकांनी खासगी कामगारांमार्फत ड्रेनेजचे चोकअप काढण्याचे काम केले. मात्र, सांडपाण्याची स्वतंत्र पाइपलाइन टाकलेली असूनही अशी स्थिती उद्भवत असल्याने परिसरातील व्यावसायिकांसह नागरिकांना गैरसोय सहन करावी लागत आहे.

--

मूर्ती दुकानावर कारवाई

पंचवटी : गणेशमूर्तींच्या दुकानांसाठी महापालिकेने लिलावात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मात्र, असे असतानाही एका दुकानदाराने महापालिकेकडे अर्ज करून पेठरोड येथे दुकानासाठी तात्पुरते शेड उभारण्याची लेखी मागणी केली. त्या दुकानदाराला त्याची पोच मिळाल्यावर त्याने मंगळवारी दुकान थाटण्यास सुरुवातही केली होती. मात्र, महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून त्याला दुकान काढून घेण्यासह लिलावात सहभागी होऊन नंतर दुकान थाटण्यास सांगण्यात आले.

--

तपोवनात जन्मोत्सव (फोटो)

पंचवटी : तपोवनातील श्रीराम पर्णकुटी येथे श्रीराम पर्णकुटी संत सेवा शिबिर अन्नक्षेत्र चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने श्रीकृष्णजन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. महंत बैजनाथ रामदयाल गुरू नृत्यगोपालदास यांनी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. विश्वस्त संदीप बनकर, मनोज धीमन, सुनील लुथोरिया, शिवकुमार शर्मा, अशोक राठोड, योगेंद्र शर्मा, दीपक बैरागी, ललित शर्मा आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक-पान-१ लीड

0
0

अधिकाऱ्यांना जाळण्याचा प्रयत्न!

येवल्यात देवरगावमधील प्रकार; वीजचोरी विरोधी पथकातील अभियंता, महिला कर्मचारी जखमी

--

- अभियंत्यासह महिला कर्मचारी जखमी

- तीन जणांवर गुन्हा दाखल

- यशवंत सोनवणे घटनेची पुनरावृत्ती टळली

म. टा. वृत्तसेवा, येवला

मनमाडजवळ इंधन भेसळखोरी रोखण्यासाठी गेलेल्या अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना जिवंत जाळल्याच्या दुर्दैवी घटनेची पुनरावृत्ती मंगळवारी (ता. ४) येवला तालुक्यात थोडक्यात टळली. देवरगाव येथे वीजचोरी रोखण्यासाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्यासह महिला कर्मचाऱ्याला मारहाण करीत अंगावर रॉकेल ओतून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत दोघे जण जखमी झाले असून, येवला तालुका पोलिस स्टेशनमध्ये तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने वीजचोरी विरोधात धडक मोहीम उघडली आहे. मंगळवारी दुपारी मनमाड उपविभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेश बाबुराव जाधव (वय ५२) यांच्या नेतृत्वाखालील ८ पुरुष व २ महिला अशा एकूण १० वीज कर्मचाऱ्यांचे पथक देवरगावमधील गोराडे बंधूंच्या शेडची तपासणी करण्यासाठी गेले होते. गोराडे यांनी शेडच्या वीज मीटरमध्ये फेरफार करण्यासह बाहेरून अनधिकृतरित्या वीज वायर जोडून घेतल्याचा संशय असल्याने या पथकाने कारवाईस सुरुवात केली. यावेळी खंडू मोतीराम गोराडे व ज्ञानेश्वर मोतीराम गोराडे यांनी पथकातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेश जाधव यांना शिवीगाळ करीत वाद घातला. "कारवाई करणारे तुम्ही कोण" अशी विचारणा करीत पथकातील कर्मचाऱ्यांना लाकडी दांड्याने मारहाण केली. यानंतर घरातील रॉकेलचा डबा अभियंता जाधव यांच्या अंगावर ओतण्यात आला. हा प्रकार बघून पथकातील महिला वीज कर्मचारी कमल चांगदेव जाधव (वय ४०) यांनी धाव घेतली. गोराडे बंधूंनी त्यांनाही मारहाण करीत त्यांच्या अंगावरही रॉकेल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. अभियंता जाधव व कमल जाधव जखमी झाले आहेत. येवला तालुका पोलिस स्टेशनमध्ये गोराडे बंधूंसह आणखी एका जणावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अटकेसाठी ठिय्या

घडल्या प्रकारानंतरही संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली नव्हती. यामुळे संशयितांना अटक होत नाही तोपर्यंत पोलिस स्टेशन समोरून उठणार नाहीत, असा पवित्रा घेत महावितरणच्या मनमाड विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत ठिय्या दिला.

..

ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. महावितरणचे अधिकारी अन् कर्मचारी नियमानुसार एकीकडे वीजगळती कमी करणे व ग्राहकांना चांगली सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असतानाच वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांकडून असा प्रकार समोर येतो हे नक्कीच खेदजनक आहे.

- राजाराम डोंगरे, कार्यकारी अभियंता, महावितरण, मनमाड विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुशल चोपडाला दुहेरी मुकुट

0
0

जिल्हा मानांकन टेबल टेनिस

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मानांकन टेबल टेनिस संघटनेतर्फे दुसऱ्या जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत कुशल चोपडा याने सबज्युनिअर व कॅडेट गटातील विजेतेपदासह दुहेरी मुकुटाचा मान मिळवला. पुरुष एकेरीत अजिंक्य शिंत्रेने विजेतेपद मिळवले. सबज्युनिअर गटात विजेतेपद मिळविणाऱ्या सायली वाणीचे दुहेरी मुकुटाचे स्वप्न भंगले. तिला ज्युनिअर गटात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

स्पर्धेत सबज्युनिअर गटातील अंतिम फेरीत कुशलने लोवित चांदूरकरचा अटीतटीच्या लढतीत १३-१५, १३-११, ११-६, ७-११, ११-८, ११-७ असा ४-२ ने पराभव केला. कॅडेट गटाचे विजेतेपदही आपल्या नावावर करताना कुशलने अंतिम फेरीत आर्यन पोळचा ११-९, ११-४, ११-५ असा सहज पराभव करीत दुहेरी मुकुटाचा मान मिळविला.

पुरुष एकेरीत राज्य कर्मचारी बिमा निगमचा अजिंक्य शिंत्रे याने पंकज राहणेचा ११-९, १२-१०, १२-१०, ११-८ असा ४-० ने पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सबज्युनिअर गटात सायली वाणीने अंतिम फेरीत सायली बक्षीचा ४-२ ने पराभव केला. मात्र, ज्युनिअर गटात सायली वाणीचे दुहेरी मुकुटाचे स्वप्न भंगले. तिला तनिषा कोटेचाकडून पराभव स्वीकारावा लागला. रोमहर्षक लढतीत तनिषाने सायलीचे आव्हान १४-१२, १०-१२, ११-९, १३-११, ८-११, ११-८ असे ४-२ ने मोडीत काढले. सबज्युनिअर गटातील पराभवातून स्वत:ला सावरत सायली बक्षीने यशस्वी कमबॅक करीत कॅडेट गटाचे विजेतेपद मिळवले. तिने मिताली पूरकरचा ११-९, ११-४, ११-४ असा सहज पराभव केला.

ज्युनिअर गटातील मुलांमध्ये सुधांशू वाणीने सौमित देशपांडेचा चुरशीच्या सामन्यात ९-११, ११-९, ११-९, ११-७, १०-१२, ११-८ असा ४-२ ने पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या पराभवातून सावरत सौमित देशपांडेने यूथ गटाचे जेतेपद आपल्या नावावर करताना अर्चित भडकमकरचा ४-० असा दणदणीत पराभव केला.

स्माइल व स्पिनॅच संस्थेचे सचिव अजिंक्य वाघ यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. नरेंद्र छाजेड यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. शेखर भंडारी यांनी सूत्रसंचालन केले. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी, राजेश भरवीरकर या वेळी उपस्थित होते. अजिंक्य शिंत्रे, जय मोडक, पुरुषोत्तम आहेर आदींनी सहकार्य केले. अभिषेक छाजेड, सारंग नाईक, पीयूष चोपडा, विनीत पोळ, दिवेंदू चांदूरकर, वंदना कोटेचा आदी उपस्थित होते.

स्पर्धेचा निकाल

सबज्युनिअर (मुले) : विजेता- कुशल चोपडा, उपविजेता- लोवित चांदूरकर

कॅडेट गट : विजेता- कुशल चोपडा, उपविजेता- आर्यन पोळ

एकेरी (पुरुष) : विजेता- अजिंक्य शिंत्रे, उपविजेता- पंकज रहाणे

ज्युनिअर (मुले) : विजेता- सुधांशू वाणी, उपविजेता- सौमित देशपांडे

सबजुनिअर (मुली) : विजेती- सायली वाणी, उपविजेती- सायली बक्षी

ज्युनिअर (मुली) : विजेती तनिषा कोटेचा, उपविजेती- सायली वाणी

कॅडेट (मुली) : विजेती- सायली बक्षी, उपविजेती- मिताली पूरकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देवळालीत बेशिस्तीने कोंडी

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प शहरात नवीन पार्किंग आराखड्यानुसार नियोजित ठिकाणे रिक्षाथांबे उपलब्ध करून दिलेले असतानादेखील काही जणांच्या बेशिस्तमुळे प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याची स्थिती आहे.

रविवारी बाजाराच्या ठिकाणी सतीश कॉम्प्लेक्स ते जुने बस स्थानक हे २०० मीटरचे अंतर पार करण्यासाठी १५ मिनिटाचा वेळ लागतो, तर अन्य दिवशी झेंडा चौकासारख्या पार्किंग नसलेल्या ठिकाणी रिक्षा उभी करत वाहतुकीस अडथळा निर्माण केला जात आहे. शहरात काही दिवसांपासून रिक्षाचालकांचे अन्य वाहनचालकांशी वाद होत आहेत. वाहतूक आराखड्यानुसार रिक्षाचालकांना प्रवासी वाहतूक करण्यासाठी गवळीवाडा लेन, वीज कंपनी कार्यालयासमोरील रस्ता, राजकमल पान शॉपशेजारील रस्ता, हॉटेल शांघायसमोरील रस्ता, रामभरोसे कॉम्प्लेक्स, शिगवा रिक्षा स्टँड अशा ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र, बिटकोकडून भगूरकडे जाण्यासाठी असणाऱ्या रिक्षा नो-पार्किंग झोन असलेल्या झेंडा चौक येथे अनधिकृतपणे थांबवू प्रवाशांची चढ-उतर केली जाते. झेंडा चौकाच्या बाजूनेदेखील अशाच पद्धतीने अनधिकृतपणे प्रवासी घेण्यासाठी रिक्षा थांबत असतात. या सर्वांवर नियंत्रण मिळविण्यासाठी असलेल्या शहर वाहतूक पोलिस चौकीत नियमितपणे वाहतूक पोलिस असणे अनिवार्य आहे. मात्र, येथे कधीच वाहतूक पोलिस नजरेस पडत नसल्याने रिक्षाचालक बेशिस्तपणे वागत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

बाजाराच्या दिवशी खोळंबा

रविवारच्या दिवशी येथील आठवडेबाजार भरत असल्याकारणाने बाजारातून येणारे प्रवासी मिळविण्यासाठी रिक्षा आपल्या नियोजित थांब्यावर न थांबता मनमानी कारभार करीत बाजारात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावरील जुन्या मुलींच्या शाळेजवळच थांबतात. त्यामुळे पादचाऱ्यांपासून रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रत्येक वाहनधारकास अडचण निर्माण होते. शिवाय शाळेच्या मैदानावर बाजारात येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग उपलब्ध करून दिल्याने वाहने पार्किंग करताना व बाहेर काढताना या रिक्षाचालकांमुळे अडथळा निर्माण होऊन वाहतुकीची कोंडीत भर पडत आहे.

(३ कॉलम)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जळगावसाठी वाढदिवस मस्ट

इंदिरानगरमध्ये रविवारीविनाशुल्क बुद्धिबळ स्पर्धा

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मॉर्फी चेस अॅकॅडमीतर्फे ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता विनाशुल्क बुद्धिबळ स्पर्धा होणार आहे. पराग, प्लॉट नंबर ४३, मोदकेश्वर सोसायटी, इंदिरनगर येथे ही स्पर्धा होईल. पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी व सातवी ते नववी अशा गटांमध्ये खेळाडूंची विभागणी करून त्यांना विशेष प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात येणार आहेत. बुद्धिबळाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता व्हावी या हेतूने ही स्पर्धेचे होणार आहे. स्पर्धेत इंदिरानगर व परिसरातील खेळाडूंना प्राधान्याने प्रवेश दिला जाईल. स्पर्धेत एकूण ३० खेळाडूंना प्रथम येणाऱ्यास प्राधान्य याप्रमाणे प्रवेश देण्यात येईल. पहिली ते नववीतील विद्यार्थ्यांना स्पर्धेत प्रवेश दिला जाईल. स्पर्धेसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ९३७००४५०४३ किंवा morphychessacademy333@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. खेळाडूंनी सोबत बुद्धिबळ संच आणावा, असे आवाहन अॅकॅडेमीचे संचालक महेश शिंदे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वंचितांच्या मुलांसाठी झटणारा शिक्षक

0
0

शिक्षकदिन विशेष

Tweet : @ashwinikawaleMT

ashwini.kawale@timesgroup.com

नाशिक : सामाजिक, आर्थिकदृष्ट्या मागासलेपण, नशेच्या आहारी गेलेले पालक, मजुरी करून घराला आर्थिक हातभार लावण्याची चिमुकल्यांवर आलेली वेळ... अशा दाहक परिस्थितीत सापडलेल्या कुटुंबांतील मुलांना शिक्षणप्रवाहात आणण्यासाठी झटणारे शिक्षक म्हणजे सुरेश धारराव. निफाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २ मध्ये ते शिक्षक आहेत. धारराव यांनी स्वत:च्या अपंगत्वावर मात करीत समाजविकासाचा आदर्श आपल्या कार्यातून सिद्ध केला आहे.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थी गळती, अनुपस्थितीचे प्रमाण आजही मोठे आहे. पालकांमध्ये शिक्षणाविषयी असलेले मागासलेपण ही मोठी समस्या यामागे आहे. यामुळेच आजही हजारो बालके शिक्षणाच्या प्रवाहात येण्यापासून वंचित आहेत. हे चित्र पाहून सोडून देण्यापुरते न ठेवता ते बदलण्याचा ध्यास धारराव यांनी घेतला. जन्मतःच पोलिओबाधित असल्याने त्यांच्यासमोर आव्हाने मोठी आहेत. मात्र, देशाचे भविष्य सुशिक्षित असावे, या हेतूने त्यांनी स्वतःची दुःखे बाजूला सारून वंचित घटकांतील मुला-मुलींना शिकवण्यासाठी काम सुरू केले. आर्थिक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या कष्टकरी, मजूर, व्यसनाधीनता यांत गुरफटलेल्या पालकांच्या मुलांना शिक्षणप्रवाहात आणण्याचे कार्य ते करीत आहेत. कधीही शिक्षणाच्या वाटेला न गेलेल्या पालकांसमोरून त्यांच्या मुलांना शाळेत घेऊन जाणेच मोठे आव्हान होते. हे आव्हान यशस्वीपणे पेलत त्यांनी शेकडो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.

राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

धारराव यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी शिक्षकदिनी उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

एक मित्र एक विद्यार्थी

'एक मित्र एक विद्यार्थी' दत्तक योजना सुरू करून धारराव यांनी त्यांच्या मित्रांना गरजू मुलांना दत्तक घेण्याविषयी आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक शाळांमधील गरीब मुलांना मदतीचा आधार मिळाला. याशिवाय सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदतही मिळवून दिली. शाळेत बचत बँक स्थापन केली. हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लाभदायक ठरत आहेत.

जिद्द, चिकाटी आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणतेच ध्येय अशक्य नाही. विद्यार्थ्यांनी शाळेत यावे यासाठी त्यांच्या पालकांचाही विश्वास जिंकावा लागतो. शाळा भरण्यापूर्वी त्यांच्या वस्तीतून मुलांना शाळेत आणून त्यांना शिक्षणाचे धडे देत आहे. शाळेचे झांज पथक तयार करून त्यातून येणारी रक्कम विद्यार्थीहितासाठी वापरतो. असे अनेक उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी करीत आहे.

- सुरेश धारराव, शिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदिवासींचा पुण्यात उद्या महामोर्चा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पुणे येथील आदिवासी विकास संशोधन संस्थेवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आदिवासी समाजाच्या विविध संघटनांतर्फे गुरुवारी (दि. ६) पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे. महामोर्चात घटनेचा निषेध नोंदविला जाणार असून, यात मोठ्या संख्येने आदिवासी बांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केले आहे. धनगर समाज आरक्षणासंदर्भात टाटा संस्थेने सर्वेक्षण केलेला अहवाल सरकारला ३१ ऑगस्ट रोजी प्राप्त झाला आहे. हा अहवाल जाहीर करण्याासाठी पिचड यांनी सरकारला आठ दिवसांचा अल्टिमेटमही दिला आहे.

नाशिक दौऱ्यावर असलेले पिचड यांनी मंगळवारी नाशिक येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन महामोर्चाची घोषणा केली. पिचड यांनी सांगितले, की धनगर समाजाने आदिवासी समाजात आरक्षणाचा दावा केल्यानंतर, सरकारने धनगर आदिवासी आहेत की नाही, याचे संशोधन करण्यासाठी केंद्रपुरस्कृत आदिवासी संशोधन संस्था राज्यासह देशात असतानादेखील टाटा या खासगी संस्थेला संशोधनाचे काम दिले. टाटाने चार वर्षांत सर्वेक्षण करून ३१ ऑगस्ट २०१८ रोजी आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. सरकारने या अहवालाचा अभ्यास करण्यापूर्वी टाटाने सादर केलेल्या अहवालात नेमके काय आहे ते सर्वांसमोर आणावे. याकरिता तातडीने हा अहवाल सादर करण्याची मागणी पिचड यांनी केली. हा अहवाल सरकार दडवत असल्याचा आरोप त्यांनी केला. धनगर समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही; मात्र त्यांना आमच्या आदिवासींत घुसवू नका, असेही पिचड यांनी स्पष्ट केले. हा अहवाल मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या राज्याच्या जनजाती सल्लागार समितीपुढे ठेवण्यात येऊन त्यावर चर्चा झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी या वेळी केली. निवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांनी सरकारला सादर केलेला आदिवासी विकास योजनेतील भ्रष्टाचाराचा अहवाल धूळ खात पडून आहे, त्याप्रमाणे धनगर समाज सर्वेक्षण अहवाल धूळ खात पडू नये. हा अहवाल प्रसिद्ध करावा; अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा पिचड यांनी या वेळी दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images