Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वाळूचे नऊ ट्रक पकडले

$
0
0
प्रमाणापेक्षा अधिक वाळू वाहतूक करणाऱ्या आणि अवैधरित्या मुरुमाची नाशकात आवक करणाऱ्या एकूण नऊ ट्रकवर महसूल विभागाने शुक्रवारी कारवाई केली. याप्रकरणी विभागाने दोन लाखांचा दंड वसूल केला आहे.

उपयुक्त संशोधनावर पुणे विद्यापीठ भर देणार

$
0
0
केवळ संशोधकांची संख्या वाढून उपयोग नाही. त्या संशोधनाचा समाजाला होणाऱ्या उपयोगाचे मूल्यमापन व्हायला हवे. या दृष्टीने आगामी टप्प्यात पुणे विद्यापीठ उपयुक्त संशोधनावर भर देणार आहे, अशी भूमिका कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी मांडली.

'अनमोल नयनतारा'कडून उत्तराखंडसाठी १ लाख

$
0
0
बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी अनमोल नयनतारा समूहाच्या वतीने उत्तराखंडमधील पूरग्रस्तांसाठी एक लाख रुपयांची मदत देण्यात आली.

पुणे विद्यापीठ कॅम्पसचा प्रस्ताव उद्या

$
0
0
बहुचर्चित पुणे विद्यापीठाच्या कॅम्पसचा प्रस्ताव सोमवारी सरकारला सादर होणार असल्याची माहिती पुणे विद्यापीठाच्या बीसीयूडीचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी दिली. पुणे विद्यापीठाच्या नाशिक विभागीय उपकेंद्रात आयोजित संस्थाचालकांच्या कार्यशाळेत ते बोलत होते.

गोदामातून जप्त साहित्य ३४ लाखांचे

$
0
0
तिगरानिया चौकाजवळील गोदामातून पुरवठा विभागाने जप्त केलेले धान्य आणि ट्रक यांची एकूण मालमत्ता ३४ लाखांची असल्याचे शनिवारी स्पष्ट झाले. याप्रकरणी पवन चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भद्रकाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

कालबाह्य टर्बिडिटी मीटरमुळे गढूळ पाणी

$
0
0
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या जलशुद्धीकरण केंद्रांवर पाण्यातील मातीचे प्रमाण शोधणारे टर्बिडिटी मीटर जुनाट झाल्याने मातीचे प्रमाण शोधणे कठीण झाले आहे. परिणामी शहरात मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा होत असल्याची बाब पुढे आली आहे.

निकिता, तू खूप शिक... मोठी हो!

$
0
0
'शैक्षणिक विभागातच कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात, हे मला माहीत आहे, त्यातही निकिताने डॉक्टर व्हायचे, इंजिनीअर व्हायचे, अशा पारंपरिक वाटेने न जाता सीए होण्याची वाट निवडली आहे, या वाटेवर तिला कोणतीही अडचण येऊ नये, अशी माझी इच्छा असल्याने मी तिला सखोल मार्गदर्शन करायला तयार आहे.' हे शब्द आहेत प्रज्ञा पांगम यांचे.

गुणवत्तेबाबत तडजोड नाहीच!

$
0
0
पुणे विद्यापीठाच्या विकेंद्रीकरणाचा भाग म्हणून विद्यापीठाचा नाशिक कॅम्पस विकसित करण्यात येणार आहेत. या कॅम्पसच्या शिवनई (ता. दिंडोरी) येथील जागेची पाहणी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी शनिवारी केली.

उपनगर भागात पाण्याचे दुर्भिक्ष्य

$
0
0
उपनगर परिसरातील काही भागांत गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्या भरत नाहीत. त्यामुळे रहिवाशांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

मिशन इलेक्ट्रॉनिक्स

$
0
0
जगातील सर्वाधिक गतीमान इलेक्ट्रॉनिक्स मार्केट म्हणून भारतावर अनेक देशांची नजर आहे. आगामी काळातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची भारतीय मागणी पाहता चीन, जपान आणि कोरिया या तीन देशांनी आतापासूनच आक्रमक पद्धतीने धोरण स्विकारले आहे.

नाशिक ते दिल्ली १७ तासांत

$
0
0
मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते निजामुद्दीन (दिल्ली) या मार्गावर राजधानी एक्स्प्रेससारखी नवीन गाडी सुरू करण्याचा निर्णय मागील अर्थसंकल्पात जाहीर केला. त्यानुसार ही गाडी येत्या काही दिवसांत सुरू होणार असून मध्य रेल्वेने त्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

'वारक-यांनी सहकार्य करावे'

$
0
0
समाजातील अनिष्ठ रूढींबाबत संतांच्या विचारांची जाण ठेवत जादूटोणाविरोधी विधेयकाला वारक-यांनी सहकार्य करावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.

माळढोकसाठी ३ संवर्धन प्रकल्प

$
0
0
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोकच्या संवर्धनासाठी राज्यात तीन ठिकाणी प्रकल्प साकारले जाणार आहेत.

जेलरोडला पोहचल्या घंटागाड्या

$
0
0
जेलरोडच्या काही भागामध्ये घंटागाडी येत नसल्याच्या पार्श्वभुमीवर स्थानिक स्वच्छता निरीक्षक व प्रभागातील नगरसेवकांनी विषेश लक्ष दिल्याने प्रभाग क्रमांक ३३ व ३५ कचरामुक्त झाला आहे.

पांडवलेणीसाठी सरसावले नाशिककर

$
0
0
शहराचे वैभव म्हणून ओळख असलेल्या पांडवलेण‌ी डोंगराभवती शहरीकरण वेगाने सुरू आहे. याचा विचार करून या डोंगराच्या संरक्षणासाठी उपाययोजनाची गरज असल्याचे वृत्त ‘मटा’ने प्रसिद्ध केले होते.

मुक्त विद्यापीठातून विद्यार्थी संसदच हद्दपार

$
0
0
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात विद्यार्थी संसदच नसल्याने विद्यापीठाचा केंद्रबिंदू असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच मुक्त विद्यापीठातून डावलण्यात येत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे.

कॉलेजेसने अतिरीक्त शुल्क वसुली थांबवावी

$
0
0
मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून बेकायदा वसुल केली जात असलेले अतिरिक्त शुल्क कॉलेजेस घेऊ नये. कॉलेजेसवर विद्यापीठाने नियंत्रण न ठेवल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेने पुणे विद्यापीठाला दिला आहे.

पार्किंगचे नव्हे, दंडाचे नियोजन

$
0
0
नाशिकरोड परिसरात पार्किंगचे नियोजन नसताना वाहन उचलण्याची कारवाई सुरू झाल्याने संतापलेल्या नागरिकांनी आधी पार्किंगचे नियोजन करा नंतर दंडात्मक कारवाई करा अशी मागणी केली आहे.

अहो जरा थांबा...

$
0
0
काही सोहळ्यांमधील कार्यक्रम पत्रिकेतील आपली भूम‌िका कोणती ? याचा उलगडा अनेकदा चांगल्या जाणकारांनाही होत नाही. अभिव्यक्तीच्या ओघात हे जाणकार वहावत जाण्याचाच धोका अधिक असतो.

‘त्या’ निर्णयाचा गैरफायदा नको !

$
0
0
खासगी शाळांची फी वाढ हा केवळ नाशिकचाच नव्हे, तर संपूर्ण राज्याचा प्रश्न बनला आहे. अन्य शहराच्या तुलनेत नाशिकमधील पालक याबाबत अधिक सजग बनल्यामुळे शहरात या समस्येतून शाळा विरुध्द पालक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images