Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

स्वाइन फ्लूने आणखी दोघांचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वाइन फ्लू आजारावर उपचार घेत असलेल्या आणखी दोन जणांचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. यामुळे स्वाइन फ्लू तसेच त्यासदृश आजाराचे आतापर्यंत २८ बळी झाले आहेत.

भाऊसाहेब मथुरे (वय ५५, रा. आंबेगाव, ता. दिंडोरी) व विंचुरे (ता. बागलाण) येथील महारू दोधा गायकवाड (वय ५५) अशी दोन्ही मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. दोन दिवसांपूर्वी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना मथुरे यांना अत्यवस्थ अवस्थेत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवारी पहाटे ५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. स्वाइन फ्लूमुळे महारू गायकवाड यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच गुरुवारी (दि.२०) उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रुग्णांच्या उपचारासाठी सव्वाचारशे कोटींचा निधी

$
0
0

फोटो - पंकज चांडोले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पैशांची अडचण व उपचारांची कमतरता यामुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये. त्यासाठीच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना राबविण्यात येत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत ही योजना सरकारकडून पोहोचविण्यात आली आहे. तीन वर्षांमध्ये या योजनेचा ८० टक्के रुग्णांनी लाभ घेतला आहे. या योजनेसाठी तीन वर्षांत सव्वाचारशे कोटींचा निधी मंत्रालयाने उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी दिली.

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत मोफत २-डी इको तपासणी शिबिर शालिमार येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात झाले. हे शिबिर शुक्रवारी व शनिवारीझाले. शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांनी तपासणी केली. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख विशेष कार्य अधिकारी शेटे यांनी संदर्भसेवा रुग्णालयास भेट दिली. त्या वेळी शिबिरात सहभागी झालेल्या बालपणापासून हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची चौकशी शेटे यांनी केली. त्या वेळी ते म्हणाले, की सरकारी रुग्णालयात सर्व सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. खासगी रुग्णालयांपेक्षाही अधिक सुसज्ज तंत्रज्ञान सरकारी रुग्णालयात उपलब्ध आहे. कोणताही रुग्ण पैशांअभावी किंवा उपचारांअभावी दगावणार नाही, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेत प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात येत नसल्याने प्रत्येक अर्जदारास याचा फायदा होत आहे. सरकारी रुग्णालयात मिळणाऱ्या उपचारांसंदर्भात रुग्णांमध्येही सकारात्मकतेची भावना निर्माण झाली आहे. खासगी रुग्णालयांऐवजी सरकारी रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहे, असा दावा शेटे यांनी केला. योजनेतील नियमांतर्गत अर्ज करणाऱ्या रुग्णांना नक्कीच निधी उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच शासकीय रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येतही लवकरच वाढ करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅन्सर म्हणजे मृत्यू नव्हे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कॅन्सर म्हणजे मृत्यू असा समज प्रत्येकाचा झाला आहे. मात्र, कॅन्सरग्रस्त प्रत्येक रुग्णाचा मृत्यू होईलच असे नाही. अनेक रुग्णांचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाल्याची उदाहरणे आहेत. कॅन्सर असल्याचे निदान वेळेत झाल्यास प्रगत तंत्रज्ञान आणि औषधोपचारांच्या मदतीने कॅन्सर बरा करता येतो. कॅन्सरवर उपलब्ध असलेल्या उपचारांमुळे आता भारतात कॅन्सरमुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट होऊ लागली आहे, असा प्रतिपादन डॉ. नागेश मदनूरकर यांनी दिला.

रोटरी हेल्थ सोसायटीतर्फे शनिवारी (दि. २२) 'प्रोटेस्ट ग्रंथींचा कॅन्सर' या विषयावर डॉ. मदनूरकर यांचे व्याख्यान झाले. गंजमाळ येथील रोटरी हॉलमध्ये सायंकाळी ५ वाजता हे व्याख्यान झाले. त्या वेळी उपस्थितांसोबत संवाद साधताना डॉ. मदनूरकर म्हणाले, की तोंड, घसा आणि ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण भारतात अधिक आहे. यासह इतर सर्व प्रकारच्या कॅन्सरवर उपचार उपलब्ध आहेत. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाला कॅन्सर होण्याचा धोका असतो. कॅन्सर हा संसर्गजन्य रोग नाही. त्यामुळे कॅन्सर झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यावर कॅन्सर होण्याचा धोका संभवतो, हा समज नागरिकांनी मनातून काढून टाकावा. कॅन्सरवर उपचार करताना केमोथेरेपी केली जाते. या थेरपीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. कॅन्सर पूर्णपणे बरा झाल्यास तो पुन्हा होण्याचा धोका कमी असतो, अशी माहिती डॉ. मदनूरकर यांनी दिली. रोटरी हेल्थ सोसायटीचे अध्यक्ष राधेय येवले यांच्यासह इतर पदाधिकारी व नाशिककर उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तंत्रज्ञानाने युक्त मराठी शाळा बांधणार

$
0
0

​फोटो - पंकज चांडोले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

काळानुरूप बदलायला हवे हे तत्त्व मराठी शाळांनादेखील लागू होते. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये उत्तम गुणवत्ता असूनही पालकांची कॉन्व्हेंट शाळांना पसंती मिळत आहे. मराठी शाळांच्या गुणवत्तेचा दर्जा कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र सेवा संघ काळानुसार बदलणार आहे. लवकरच कॉन्व्हेंट शाळांच्या तुलनेत अधिक सुसज्ज तंत्रज्ञान असणारी मराठी शाळेची इमारत तयार करणार आहोत, असे प्रतिपादन महाराष्ट्र सेवा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे यांनी केले.

महाराष्ट्र सेवा संघ संस्थेला शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीस ५८ वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने संस्थेचा वर्धापनदिन सोहळा शनिवारी (दि. २२) शरणपूर रोड येथील रचना विद्यालयातील एस. एम. जोशी सभागृहात झाला. त्या वेळी उद्योजक संजय शिरोडे, संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत धामणे, उपाध्यक्ष विजय डोंगरे, कोशाध्यक्ष निरंजन ओक, सचिव सुधाकर साळी, सहसचिव शांताराम अहिरे व्यासपीठावर होते. धामणे म्हणाले, की मराठी शाळेतून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी पालकांमध्ये सकारात्मकता निर्माण होण्यासाठी हे पाऊल संस्थेने उचलले आहे. लवकरच या नव्या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात होईल. या नव्या प्रकल्पासाठी संस्थेसोबत जोडलेले सर्व सदस्य, शिक्षक, कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी व पालक यांचे सहकार्य लाभणार आहे. या सोहळ्यात संस्थेतील कार्यक्षम शिक्षक आणि निवृत्त शिक्षक, कर्मचारी, तसेच संस्थेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. काव्यवाचन, संगीतनाट्य प्रवेश, संगीत, अभिनय या कलाविष्कारांनी वर्धापनदिनाचा सोहळा रंगला.

हे आहेत सत्कारार्थी

वैशाली मईंद, नितीन पवार, शकुंतला दाणी, मंजुषा पुजारी, वनिता जगताप, श्रीपाद कुलकर्णी, संतोष खैरनार, स्नेहल सदावर्ते, मनिराम चव्हाण, प्रमोद देशमुख, मनीषा सप्रे या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त रश्मी दांडेकर, श्रद्धा कुलकर्णी, अरुणा फुंब्रीकर, दादाजी आहिरे, अनिल माळी यांना गौरविण्यात आले. इराण संघाच्या प्रशिक्षक शैलजा जैन व उद्योजक संजय शिरोडे यांचा विशेष सत्कार या वर्धापनदिन सोहळ्यात करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशकात पेट्रोल दर ९० रुपये १२ पैशांवर

$
0
0

नाशिक : नाशिक जिल्ह्यातही इंधनाच्या दराने नव्वदी पार केली असून, शनिवारी पेट्रोलचा दर प्रतिलिटर ९० रुपये १२ पैसे एवढा झाल्याचे पहावयास मिळाले. गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर वाढतच असून, शनिवारी पेट्रोलचा दर तब्बल ४७ पैशांनी वाढून ९० रुपये १२ पैशांपर्यंत पोहोचला. दरम्यान, डिझेलचा दरही आता प्रतिलिटर ७७ रुपये १८ पैशांवरून ७७ रुपये ५१ पैशांपर्यंत पोहोचला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरोपाची सज्जता...

$
0
0

निरोपाची सज्जता...

भक्तांच्या लाडक्या विघ्नहर्त्याला आज, रविवारी (दि. २३) निरोप देण्यात येत आहे. त्यासाठी घरोघरी, सार्वजनिक मंडळे अन् प्रशासकीय यंत्रणांचीही विसर्जन मिरवणुकीच्या पूर्वसंध्येला शनिवारी धावपळ दिसून आली. शहरातून पोलिसांसह अन्य सुरक्षा दलांच्या जवानांकडून सशस्त्र संचलन करण्यात आले. पोलिस आयुक्तांनी स्थितीचा आढाव घेत मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले, तर 'आरटीओ'कडून मिरवणुकीतील वाहनांची तपासणी करण्यात आली. महापालिकेकडून मदत केंद्रे, कृत्रिम तलाव, पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही आदींसह विविध कामे मार्गी लावण्यात आली. या वातावरणाचा चित्रवृत्ताद्वारे घेतलेला वेध...

सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिबट्या दिसताच महिला मजुरांची पळापळ

$
0
0

उंबरखेडमध्ये वावर; पिंजरा लावण्याची मागणी\B

\B

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

चिंचखेड (ता. दिंडोरी) येथील वास्तव्यानंतर बिबट्याने आता निफाड तालुक्यातील उंबरखेडकडे मोर्चा वळविला आहे. शनिवारी दुपारी चार वाजता उंबरखेडच्या सरपंच उषाताई गांगुर्डे यांच्या शेतातवळ बाळासाहेब गांगुर्डे यांच्या शेतात कांदा लागवड सुरू असताना काही महिलांना या बिबट्याचे दर्शन झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. बिबट्याचे दर्शन झाल्याने या महिला प्रचंड घाबरल्या आहेत. मळ्यात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी वाघाची धास्ती घेतली आहे. वाघाला प्रथमदर्शनी पाघणाऱ्या महिला प्रमिला बडे यांनी सांगितल्यानुसार हा बिबट्या अत्यंत धिप्पाड व मोठा जबडा असलेला होता. बडे यांनी अवघ्या वीस फुटावरून बिबट्या बघितल्यामुळे त्या खूप घाबरल्या आहेत. परिसरात मोठी दहशत पसरली असून, या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वीस फुटांवर दर्शन

चिंचखेड शिवारात बिबट्या आल्याची चर्चा तीन-चार दिवसांपासून सुरू आहे. चिंचखेड व उंबरखेड ही दोन्ही गावे शेजारी शेजारी आहेत. शनिवारी दुपारी तीन ते चार वाजे दरम्यान उंबरखेड येथील पाच सात महिला उंबरखेड शिवारात बाळासाहेब गांगुर्डे यांच्या शेतात कांदा लागवड करीत होत्या. त्याचवेळी प्रमिला बडे कांदा रोपांचे किती वाफे शिल्लक राहिले म्हणून बघायला गेल्या असता २० फुटावर मक्याच्या शेतातनू बिबट्या येताना त्यांना दिसला.

मुलाला उचलून काढला पळ

प्रमिला यांच्यासोबत त्यांचा छोटा मुलगाही होता. बिबट्या समोर असल्यानंतर गर्भगळीत झालेल्या प्रमिला मुलाला उचलून ओरडत पळत सुटल्या. कांदा लागवड करणाऱ्या महिलाही घाबरून पळाल्या. बाळासाहेब गांगुर्डे हे त्याच शेतात औत चालवत होते. काही क्षणातच बिबट्या पुन्हा मकाच्या शेतात पळाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रोलेट जुगार खेळणाऱ्या दोन जणांना अटक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोबाइलवर फनरेप अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करून ऑनलाइन रोलेट जुगार खेळविणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

सादिक खान सैफखान पठाण (रा. पखाल रोड) आणि परवेज जुबेर शेख (रा. नाईकवाडीपुरा) अशी अटक केलेल्या संशयित जुगारींची नावे आहेत. फाळके रोड भागात दोन युवक नागरिकांना ऑनलाइन जुगार खेळण्यास भाग पाडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी दुपारी पोलिसांनी छापा मारला. या वेळी दसेरासमोर संशयित मोबाइलवर फनरेप अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करून रोलेट नावाचा जुगार खेळताना आणि खेळविताना आढळले. संशयितांच्या ताब्यातून १,५०० रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल इरफान शेख यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार पाटील तपास करीत आहेत.

लॅपटॉपसह कम्प्युटर चोरी

सिक्युरिटी एजन्सीच्या कार्यालयातून लॅपटॉपसह एक कम्प्युटर चोरी झाल्याप्रकरणी भावा-बहिणीविरुद्ध सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

धारा तायडे व मंगेश तायडे अशी संशयितांची नावे आहेत. प्रशांत सुधाकर काळे यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. काळे यांचे शरणपूर रोडवरील रवी चेंबर्स या इमारतीत बॉस सिक्युरिटी एजन्सीचे कार्यालय आहे. या कार्यालयात दोघे संशयित नोकरीस होते. काळे बाहेरगावी गेल्याची संधी साधत संशयितांनी सुमारे २० हजार रुपयांच्या कम्प्युटरसह लॅपटॉप लंपास केला. हवालदार निकम तपास करीत आहेत.

कारमधून लॅपटॉप लंपास

रस्त्यावर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉपसह महत्त्वाची कागदपत्रे लंपास केली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मुकुंद बाळासाहेब मोगल (रा. कोठुरे, ता. निफाड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आणि चेतन आहेर असे दोघे मित्र बुधवारी (दि. १९) रात्री जेवणासाठी सिबल हॉटेलमध्ये गेले होते. त्र्यंबक रोडवरील महिंद्रा शो-रूमच्या बाजूला पार्क केलेल्या त्यांच्या कारची (एमएच १५/ईबी ७५७६) काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉपची बॅग लंपास केली. बॅगेत बँकेची महत्त्वाची कागदपत्रे होती. हॉटेलमधून परतल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला.

मारहाण करीत तरुणास लुटले

लिफ्टचा बहाणा करून दुचाकीवर बसलेल्या चोरट्याने चालकास मारहाण करीत मोबाइल लंपास केल्याची घटना उपनगर भागात घडली. या प्रकरणी सुगंध निर्मळ नावाच्या संशयिताविरुद्ध उपनगर पोलिस स्टेशनमध्ये लूटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला. ओमकार देवंद्र गवांदे (रा. आवटे मळा, जयभवानीनगर) या तरुणाने तक्रार दिली आहे. ओमकार गुरुवारी रात्री मोपेडवर घराकडे जात असताना संशयिताने समतानगर येथील रॉयल मिल्क दूध डेअरीसमोर अडवून त्याच्याकडे लिफ्ट मागितली. या वेळी संशयिताने बळजबरीने दुचाकीवर बसून, मला माझ्या घरी सोडून दे, असे म्हणत पंचशीलनगर, शिवाजीनगर, तसेच साराबाई कट्टा आदी भागातून उपनगर येथील छोटी जनता शाळेजवळ नेत गवांदे याला पट्ट्याने मारहाण केली. या वेळी दारू सेवन करण्यासाठी पैसे दे, असे म्हणून अंगझडती घेतली. अंगझडतीत पैसे निघाले नाही म्हणून पुन्हा मारहाण केली. या वेळी खिशातील २० हजार रुपयांचा मोबाइल काढून घेत संशयिताने पोबारा केला. उपनिरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

मालट्रकवरून पडून एकाचा मृत्यू

भाजीपाल्याने भरलेल्या मालट्रकवर दोरी बांधत असताना तोल जाऊन पडल्याने एकाचा मृत्यू झाला. ही घटना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात घडली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश रामचंद्र गांगुर्डे (रा. रविशंकर सोसा. राहू हॉटेलजवळ) असे या व्यक्तीचे नाव आहे. गांगुर्डे गुरुवारी रात्री मार्केट यार्डात भाजीपाल्याने भरलेल्या स्वत:च्या आयशर ट्रकवर ताडपत्री बांधत असताना ही घटना घडली. अचानक तोल गेल्याने ट्रकवरून ते खाली पडले. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. २१) दुपारी त्यांचा मृत्यू झाला. हवालदार देशमुख तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रुग्णांच्या उपचारासाठी सव्वाचारशे कोटींचा निधी

$
0
0

फोटो - पंकज चांडोले

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पैशांची अडचण व उपचारांची कमतरता यामुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू होऊ नये. त्यासाठीच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता योजना राबविण्यात येत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील रुग्णांपर्यंत ही योजना सरकारकडून पोहोचविण्यात आली आहे. तीन वर्षांमध्ये या योजनेचा ८० टक्के रुग्णांनी लाभ घेतला आहे. या योजनेसाठी तीन वर्षांत सव्वाचारशे कोटींचा निधी मंत्रालयाने उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती विशेष कार्य अधिकारी ओमप्रकाश शेटे यांनी दिली.

राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाच्या अंतर्गत मोफत २-डी इको तपासणी शिबिर शालिमार येथील विभागीय संदर्भसेवा रुग्णालयात झाले. हे शिबिर शुक्रवारी व शनिवारीझाले. शिबिरात दोनशेहून अधिक रुग्णांनी तपासणी केली. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख विशेष कार्य अधिकारी शेटे यांनी संदर्भसेवा रुग्णालयास भेट दिली. त्या वेळी शिबिरात सहभागी झालेल्या बालपणापासून हृदयरोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णांची चौकशी शेटे यांनी केली. त्या वेळी ते म्हणाले, की सरकारी रुग्णालयात सर्व सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. खासगी रुग्णालयांपेक्षाही अधिक सुसज्ज तंत्रज्ञान सरकारी रुग्णालयात उपलब्ध आहे. कोणताही रुग्ण पैशांअभावी किंवा उपचारांअभावी दगावणार नाही, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेत प्रकरणे प्रलंबित ठेवण्यात येत नसल्याने प्रत्येक अर्जदारास याचा फायदा होत आहे. सरकारी रुग्णालयात मिळणाऱ्या उपचारांसंदर्भात रुग्णांमध्येही सकारात्मकतेची भावना निर्माण झाली आहे. खासगी रुग्णालयांऐवजी सरकारी रुग्णालयात रुग्ण उपचार घेत आहे, असा दावा शेटे यांनी केला. योजनेतील नियमांतर्गत अर्ज करणाऱ्या रुग्णांना नक्कीच निधी उपलब्ध करून देण्यात येईल, तसेच शासकीय रुग्णालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संख्येतही लवकरच वाढ करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेलिब्रिटींसोबत मारा गप्पा!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'च्या वतीने सभासदांसाठी अनेक नावीन्यपूर्ण कार्यक्रम, कार्यशाळा व उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्याअंतर्गत आता सभासदांना सेलिब्रिटींसोबत गप्पा मारण्याची खास संधी कल्चर क्लबतर्फे उपलब्ध करवून देण्यात आली आहे.

प्रसिद्ध अभिनेता संतोष जुवेकर, अभिनेत्री प्रणाली घोगरे आणि दिग्दर्शक समीर पाटील यांच्यासोबत गप्पा मारण्याची संधी 'मटा कल्चर क्लबत'र्फे सभासदांना उपलब्ध करवून देण्यात येत आहे.

'महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब'च्या सभासदांसाठी 'मीट अँड ग्रीट' या खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत सभासदांना मराठी सिनेसृष्टीतील तीन दिग्गज सेलिब्रिटींसोबत गप्पा मारण्याची संधी उपलब्ध करवून देण्यात आली आहे. मंगळवारी (दि. २५) दुपारी ४.३० वाजता अंबड येथील दि गेट वे हॉटेलमध्ये सभासद या सेलिब्रिटींना भेटू शकणार आहेत. सेलिब्रिटींना सिनेसृष्टीच्या निगडित प्रश्न सभासद विचारू शकतात, तसेच सेलिब्रिटींसोबत छानसा सेल्फीदेखील सभासदांना क्लिक करता येणार आहे. या खास भेटीसाठी कोणतेही शुल्क सभासदांकडून घेण्यात येणार नाही. सेलिब्रिटींची भेट घेण्यासाठी सभासदांना नावनोंदणी करणे गरजेचे आहे. सोमवारी (दि. २४) रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत ०२५३-६६३७९८७ किंवा ९४२२५१३५६९ या क्रमांकांवर संपर्क साधून नावनोंदणी करता येईल.

---

लोगो : कल्चर क्लब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ती’ मी नव्हेच!

$
0
0

नाव बदलून लग्न करीत दहा तरुणांना लुबाडले

....

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला साजेशी घटना नुकतीच उघडकीस आली. एका महिलेने एक नव्हे, दोन नव्हे, तर चक्क दहा जणांशी नावे बदलून गुपचूप लग्न लावून सर्वांचीच फसवणूक केली. दहापैकी एका जणाने तिचे हे प्रकरण चव्हाट्यावर आणत तिलाच नव्हे, तर लग्न लावून तरुणांची पैशांसाठी फसवणूक करणारी पाच जणांची टोळीच गजाआड केली. यामुळे एका लग्नाच्या गोष्टीला इथे पूर्णविराम मिळाला.

सोलापूर येथील ओम हवा मल्लिनाथ वधू-वर सूचक केंद्र लग्न लावून देत असल्याचे राजेंद्र काळे यांना समजले. त्यानंतर त्यांनी जातेगावातील आपल्या नातेवाइकांसह सोलापूर गाठले. तेथे ज्योती अशोक काळे हिचे स्थळ मिळाले अन् लगेच त्यांचे लग्नही लावले. या विवाहापोटी ठरलेले ८० हजार रुपये मुलीला हुंडा म्हणून संस्थेला देण्यात आले. तसेच ५ हजार ५५१ रुपये देऊन त्याच्या पावत्याही घेण्यात आल्या. लग्नानंतर जातेगाव (ता. नांदगाव) येथे ज्योती नांदावयास आली. मात्र ती पुन्हा पुन्हा सोलापूरला जात असे. एकदा तिच्यासोबत पती राजेंद्र चव्हाण गेले असता 'मुलीला दागिने का घातले नाही', अशी विचारणा करून एकटे नांदगावी पाठवून दिले. त्यानंतर २१ दिवसांनी ज्योती जातेगावला आली. त्यानंतरही ज्योतीचे सोलापुरात वारंवार जाणे सुरूच होते.

ज्योतीला काकू व मावशीचा वारंवार फोन येत असे. फोन आला की, ती बाहेर जाऊन बोलत असल्याने राजेंद्र यास शंका आली. त्याने तिच्या मोबाइलमध्ये कॉल रेकॉर्डर सुरू करून संभाषण रेकॉर्ड केले. त्यात 'तुझ्यासाठी नाशिकचे आणखी एक स्थळ आले आहे. तू सोलापूरला ये' अशा सूचना दिल्याचे त्याने ऐकले. त्याने तिच्या भ्रमणध्वनीतील एका नंबरवर कॉल करून विचारणा केली असता संतोष सूर्यवंशी (रा. तासगाव, जि. सांगली) यांच्याशी संपर्क झाला. त्याला राजेंद्र याने विचारले असता त्याने हा फोन माझी पत्नी 'सुजाता'चा असल्याचे सांगितले. तेव्हा दोघांना आपली फसवणूक झाल्याचे कळले. तसेच सोलापुरातील काळे नामक तिचे नातेवाइक नसून फसवणूक करणारी एक टोळी असल्याची खात्री झाली. ज्योतीचे खरे नाव लक्ष्मी पाथरे असून, तिने मुंबई, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, शिर्डी, राजस्थान, गुजरात आदी ठिकाणच्या तरुणांशी लग्न केल्याचे तपासात पुढे आले आहे.

- सविस्तर वृत्त...?

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढीव कालव्यांचे होणार फेरसर्वेक्षण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

हरणबारी वाढीव उजवा कालवा व केळझर वाढीव कालवा क्र. आठच्या कामांचे तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व प्रधान सचिव सुर्वे यांनी दिल्याची माहिती बागलाणचे आमदार दीपिका चव्हाण यांनी दिली. चव्हाण यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, पश्‍चिम वाहिनी नदी खोऱ्यातून गुजरातकडे वाहून जाणारे वळण योजनांद्वारे उपलब्ध झालेले क्र. ५३.०२ दलघफू पाणी हरणबारी व केळझर वाढीव कालव्यासाठी उपलब्ध झाले आहे. बागलाण तालुका हा अवर्षणप्रवण तालुका आहे. सततच्या दुष्काळी परिस्थिीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. तसेच शेतकरी आत्महत्याचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हे पाणी मिळावी अशी मागणी केली होती. विधानमंडळ समितीने त्यास मंजुरी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन हजारांवर फौजफाटा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणूक, तसेच घरगुती गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी तब्बल तीन हजार पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी नियुक्त केला आहे. यात एका राज्य राखीव पोलिस दलाच्या कंपनीचा समावेश असून, रात्री विसर्जन सोहळा संपेपर्यंत हा बंदोबस्त कायम राहणार आहे.

उत्सवकाळात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई केली असून, वेळोवेळी शांतता कमिटीच्या बैठका पार पडल्या आहेत. रविवारच्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे, सर्व पोलिस सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक, निरीक्षक, सहायक निरीक्षक, तसेच उपनिरीक्षक, १०० नवीन भरती झालेले पोलिस शिपाई, एक एसआरपीएफ कंपनी, क्यूआरटी, आरसीएफ, दंगा नियंत्रण पथक, ३०० पुरुष होमगार्ड्स, १०० महिला होमगार्ड्स, तसेच शहर पोलिस दलातील कर्मचारी असा तब्बल तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात असणार आहे.

--

उपनगरांकडे लक्ष

शहरात मुख्य विसर्जन मिरवणुकीसह नाशिकरोड, इंदिरानगर, सिडको, सातपूर आदी ठिकाणी मंडळांतर्फे छोट्या-मोठ्या मिरवणुका काढल्या जातात. या भागात मंडळांची संख्यादेखील मोठी असून, येथे सकाळपेक्षा सायंकाळच्या सुमारास मिरवणुका काढण्यास प्राधन्य दिले जाते. यावर्षी मुख्य विसर्जन मिरवणुकीचे नियोजन बदलण्यात आले असून, त्याचा परिणाम सिडको, सातपूर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प आदी उपनगरांमध्ये दिसणार का, याची उत्सुकता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘छात्रभारती’ रस्त्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंगणवाडीपासून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण मोफत मिळावे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्के खर्च सरकारने शिक्षणावर करावा, शिक्षणाचे खासगीकरण थांबवावे यांसह विविध मागण्यांसाठी छात्रभारती संघटनेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी शनिवारी रस्त्यावर उतरले. शालिमार परिसरात मोर्चा काढून सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविण्यात आला.

शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे, अशी छात्रभारतीची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. सध्या शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून रॅली काढण्यात आली. यावेळी सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील विनाअनुदानित धोरण रद्द करावे, शिक्षणात भारतीय संविधानातील मूल्यांचा समावेश करावा, सच्चर कमिशन आयोगाचा अहवाल लागू करावा, स्पर्धा परीक्षांद्वारे रिक्त जागा त्वरित भराव्यात यांसह विविध मागण्या करण्यात आल्या. बेरोजगार युवकांना मासिक भत्ता देण्यात यावा, विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणानुसार रोजगाराची हमी द्यावी, शिक्षक व प्राध्यापकांच्या रिक्त जागा त्वरित भराव्यात असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी किमान वेतन कायदा लागू करण्यात यावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविल्याची माहिती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राकेश पवार, सागर निकम, दीपक देवरे, शहराध्यक्ष समाधान बागुल, राहुल सूर्यवंशी यांनी केले आहे.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सार्वजनिक नैतिकता!

$
0
0

कायदा सापेक्ष असतो. अस्तित्वात आला की तो पाळण्याची जबाबदारी साहजिकच सार्वभौम प्रजासत्ताक राज्यातील नागरिकांवर येते. मात्र, कायद्यातील पळवाटा, त्याचे सामाजिक परिणाम यावर लोकसंख्येचा, कायदेपंडितांचा, न्यायव्यवस्थेचा थेट प्रभाव पडतो. त्यामुळे दर काही वर्षांनी कायद्याची मोडतोड होऊन नवा नियम जन्माला घातला जातो.

अरविंद जाधव

arvind.jadhav@timesgroup.com

१८ व्या शतकाच्या अखेरीस इंग्रजांविरुद्ध जनमत एकत्र करण्याचे काम सुरू होते. मराठा आणि केसरी या दोन वृत्तपत्रांच्या माध्यमातून लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर हे काम करीत होते. याच दरम्यान इंग्रज सरकारने संमती वयाचे बिल म्हणजे कायदा करण्याचे ठरविले. वैचारिकदृष्ट्या हिमालयाचे टोक गाठणाऱ्या टिळक, आगरकर यांच्यात वादाची ठिगणी पडली. बालविवाह, मुलींची शारीरिक स्थिती, त्यातून निर्माण होणाऱ्या वैद्यकीय समस्या यामुळे इंग्रज सरकाराचा कायदा महत्त्वाचा असून, त्याची अंमलबजावणी होणे महत्त्वाचे असल्याची भूमिका आगरकरांनी घेतली. दुसरीकडे इंग्रज कोण? आमचा धर्म आहे, आम्ही काय ते पाहू अशी भूमिका टिळकांनी घेतली. या दोन विचारवंताच्या भूमिकेला एक अधिष्ठान होते. याच वादातून आगरकरांना जिवंतपणीच आपल्या प्रेतयात्रेला समोरे जावे लागले. अर्थात, काही दिवसांतच इंग्रज सरकारने कायदा पारित केलाच. या घटनेला आता सव्वाशे वर्षांहून अधिक कालावधी लोटला. मध्यंतरीच्या काळात देश स्वतंत्र झाला. मुलीच्या लग्नाचे वय हळूहळू १४, १६ आणि १८ अशा टप्प्यांनी वाढत गेले. एखाद्या कायद्याची निर्मिती होताना कोणी काय खस्ता खाल्ल्या आणि त्याचे नेमकी काय फळ आजमितीस मिळते, हे पाहणे रंजकच म्हणावे लागेल.

सव्वाशे वर्षाहून अधिक काळानंतरही समाजातून बालविवाहाची समस्या मोडीत काढणे शक्य झालेले नाही, यापेक्षा आणखी दुर्दैव काय असू शकते? वर्षभरात कधी तरी एखादी स्वयंसेवी संस्था थोडेफार धाडस करून बालविवाह रोखते. बालविवाहाच्या केसेस होत नाहीत, याचा अर्थ बालविवाह होतच नाहीत, असे नाही. शहरी आणि ग्रामीण असा भेद करून हा विषय संपवता येणार नाही. अगदी दोनचार वर्षांपूर्वी एका संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सिडकोत असा बालविवाह रोखला होता. एकीकडे बालविवाहाचा प्रश्न महत्त्वाचा मानला जात असताना आता १४ ते १८ या वयोगटातील पळून जाणाऱ्या मुला-मुलींच्या संख्या पाहून एखाद्यास आकडी आल्यास नवल वाटू नये. १६ वर्षांची मुलगी १८ किंवा १९ वर्षांच्या मुलाबरोबर घर सोडते. १८ वर्षांपर्यंतची मुले बेपत्ता झाली किंवा पळून गेली तरी पोलिस अपहरणाचा गुन्हा दाखल करतात. दोन ते तीन वर्षे लोटतात. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यास काही तरी क्लू मिळतो आणि तपास पथक एका अपत्यासह त्या दाम्पत्यास घेऊन परततात. मुलीसह अपत्याची रवानगी वात्सल्य या संस्थेत केली जाते, तर मुलाची रवानगी सेंट्रल जेलमध्ये होते. दोघांच्या सहमतीला नाही तर कायद्याचे पालन होणे आवश्यक असल्याने हा सर्व ड्रामा पुढे येतो.

दुर्दैवाने, समाजाचा एक मोठा भाग आज या नव्या समस्येचा सामना करतो आहे. लोकसंख्यावाढीबरोबर आणि त्यातून निर्माण होणाऱ्या जटिल समस्यांवर उतारा म्हणून नवनवीन कायदे अस्तित्वात येतात. कोणी कायद्याच्या बाजूचे तर कोणी विरोधात! कायद्यालाही राजकीय पक्षाच्या चष्म्यातून पाहिले जाते. तिहेरी तलाक, सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यावर घातलेली बंदी अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यातच मागील आठवड्यात सुप्रीम कोर्टाने कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील अंमलबजावणीची प्रक्रिया पुन्हा एकदा पोलिसांच्या गळ्यात टाकली. ८० टक्के पती-पत्नीचा वाद हा अहंकारातून पुढे आलेला असतो. या अहंकाराला दोन्ही बाजूचे कुटुंबीय आणि नातेवाईक खतपाणी घालण्याचे काम करतात. एकदा की हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले, की हातातून सर्व निसटते. एकमेकांना धडा शिकवण्यासाठी प्रयत्न केले जातात. अर्थात, यात पोलिसांची भूमिका महत्त्वाची ठरते. बऱ्याचदा पोलिस दोघांपैकी एकाची बाजू घेऊन त्यांचे हित जोपासतात, तर काही प्रकरणांमध्ये दोन्ही बाजूंच्या मंडळींना आर्थिक झटका देण्यात येतो. कलम -४९८अ नुसार हुंडाप्रकरणी थेट अटक करता येणार नाही, असा निकाल २७ जुलै २०१७ रोजी सुप्रीम कोर्टाच्या दोन न्यायाधीशांच्या पीठाने दिला होता. तसेच हुंडा प्रकरणांमध्ये पडताळणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक कुटुंब कल्याण समिती नियुक्त करावी. या समितीचा अहवाल आल्यानंतरच अटकेचा निर्णय घ्यावा, त्यापूर्वी नाही. तसेच अशा प्रकरणांमध्ये कायद्याचा दुरुपयोग होत असल्याबद्दल सुप्रीम कोर्टाकडून चिंता व्यक्त करण्यात आली होती. यानंतर पोलिसांचे सर्वाधिकार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील कुटुंबकल्याण समितीकडे गेले. या समितीच्या कामकामास वर्षही पूर्ण झालेले नसताना सुप्रीम कोर्टाने पुन्हा आपला निर्णय फिरवला. कायद्यानुसार मिळालेल्या अधिकारांवर या निर्णयामुळे गदा येत असल्याचे स्पष्ट करीत विवाहितेचा छळ होत असल्यास पोलिसांनी पतीसह सासरच्या व्यक्तींना अटक करावी, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.

१९९० च्या दशकात अस्तित्वात आलेल्या या कायद्याच्या दुरुपयोगामुळे त्याच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेत अनेक बदल झाले. मात्र, त्याचा थेट फायदा झाला असे दिसत नाही. आजमितीस या कायद्यानुसार दाखल होणाऱ्या खटल्यांमध्ये १०० पैकी फारतर ७ ते ८ गुन्हे सिद्ध होतात. कोणाचे तरी चुकते पण जबाबदारी कोणीही घेत नाही. वाहतूक हा सर्वांत जिकिरीचा प्रश्नही याचमुळे हळूहळू भीषण रूप धारण करतो आहे. शहरी भागात मिळणाऱ्या पैशांनी आत्मसन्मानाची व्याख्या बदलली. सामाजिक दृष्टिकोनातून सृजनशीलता लोप पावल्याने वाहतूक नियम मोडणारा २०-२२ वर्षांचा युवक वाहतूक पोलिसांच्या तोंडावर ५०० रुपये भिरकावण्याची हिंमत दाखवतो. रस्त्यावर ज्या ठिकाणी पोलिस उभे असतात त्या ठिकाणी शिस्त दिसते. मात्र, पोलिस हटल्यास पुन्हा अनागोंदी सुरू होते. वाहतूक नियम आजचे नाही. त्याबाबत मागील तीन ते चार पिढ्यांमध्ये जागरूकता आली. पण त्याचा उपयोग फार तर १० ते २० टक्केच होतो. खरं तर, सार्वजनिक नैतिकता हा विषय तसा महत्त्वाचा!

काही दिवसांपूर्वी एक परिचित सिंगापूरमध्ये गेले. या देशाची स्थिती अगदीच मुंबईप्रमाणे! भरपूर वाहनांची गर्दी. भारत, पाकिस्तान, श्रीलंका अशा आशियाई देशांबरोबरच युरोपीय देशांतील नागरिक मोठ्या संख्येने राहतात. राजधानातील गजबजलेल्या रस्त्यांवर त्यांचे हॉटेल होते. हॉटेलकडे जाणारा रस्ता अगदीच अरुंद, अगदी आपल्या मेनरोडप्रमाणे! वर कोसळणारा पाऊस होताच. टॅक्सी पार्क होऊन त्यातील सर्व सामान बाहेर काढेपर्यंत साधारणत: १० मिनिटांचा कालावधी गेला असेल; एवढ्या वेळात पाठीमागे मोठ्या स्वरूपात वाहतूक कोंडी झाली. सर्व वाहनचालक प्रतीक्षेत होते की कधी एकदा टॅक्सी पुढे जाईल; पण या वेळेत एकही हॉर्न वाजला नाही की कोणी टॅक्सीचालकाच्या आईबहिणीचा उद्धार केला नाही. या सर्वांवर त्या टॅक्सीचालकाचे म्हणणे होते, नो हॉकिंग... हॉकिंग... टेन्शन्स...! आशियाचे आर्थिक केंद्र म्हणून उदयास आलेल्या या देशातील एका टॅक्सीचालकाची ही समज तर जगाला दिशा दाखवणाऱ्या, सर्वांत जास्त युवा असलेल्या भारतात कायदापालनाबाबत एवढी उदासीनता कशी, असा प्रश्न सहजच उपस्थित होतो!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नेता, साधूंचे वर्तन सुधारल्यास रामराज्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

लोकप्रतिनिधी आणि साधू या दोन घटकांकडे समाज आदराने पाहत असतो. त्यांचे वर्तन आदर्श राहिले तरच समाजही त्यांचे अनुकरण करेल. त्याद्वारेच खऱ्या अर्थाने रामराज्याकडे वाटचाल सुरू होऊ शकते, असे प्रतिपादन साध्वी हिराजी यांनी शुक्रवारी केले.

मानवधर्म प्रणेते सद्गुरूदेव श्री सत्पालजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित सद्भावना संमलेनात साध्वी हिराजी बोलत होत्या. मानव उत्थान सेवा समितीच्या श्री हंस कल्याण धाममध्ये झालेल्या या कार्यक्रमास साध्वी मुक्तिकाजी, साध्वी उत्तमजी यांच्यासह नगरसेवक पंडित आवारे, संतोष गायकवाड, नगरसेविका सुप्रिया खोडे, सावता प्रतिष्ठानचे नरेश काळे, प्रशांत कोल्हे आदी उपस्थित होते. या वेळी साध्वी हिराजी म्हणाल्या, की समाजात सद्भावना निर्माण व्हावी, असे प्रत्येकाला वाटते; परंतु त्याकरिता स्वत:मध्ये बदल करण्याची कुणाची तयारी नाही. समाजाचे नेतृत्व लोकप्रतिनिधी करीत असतात. जनतेमधून निवडून गेल्याने समाज त्यांना मानतो, तर अध्यात्माच्या मार्गावर चालायला लावणाऱ्या संतांपुढेही नतमस्तक होतो. मात्र, या दोन्ही घटकांचे जीवन आज आदर्शवत राहिलेले नाही. राजकारणी आणि साधू यांनी आपले जीवन आदर्शवत बनविले तर रामराज्याची स्थापना होऊन खऱ्या अर्थाने देश विश्वगुरू होऊ शकेल, असा विश्वास हिराजी यांनी व्यक्त केला. प्रारंभी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण झाले. यामध्ये वेदनिका बंशमोती आणि दामिनी सोनी या चिमुकल्यांनी नृत्याविष्कार सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. नगरसेवक गायकवाड आणि नगरसेविका खोडे यांनी मनोगत व्यक्त केले. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मानवधर्मप्रेमींची सामाजिक बांधिलकी

मानव उत्थान सेवा समिती आणि संजीवनी रक्तपेढीतर्फे जन्मोत्सवाचे औचित्य साधून रक्तदान शिबिर झाले. सकाळी १० ते दुपारी एक या कालावधीत झालेल्या रक्तदान शिबिरात सुमारे ५० दात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. सुमित राजपूत, विश्वनाथ पतंगे, शिल्पा बर्डे, विरेश गांगुर्डे, गोरख गवळी आदींनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निनादिनी संगीतोत्सव

$
0
0

निनादिनी संगीतोत्सव!

दोन दिवसीय 'निनादिनी संगीतोत्सवात' प्रख्यात गायिका विदुषी डॉ. अलका देव मारुलकर यांच्या प्रतिभावंत शिष्यांनी शास्त्रीय गायनाच्या मैफिलींमधून अतिशय प्रभावीपणे कलाविष्कार श्रोत्यांपुढे सादर केला. विलंबित ख्याल, विस्तारत जाणारा रागविस्तार, लयकारी, ताना, छोटा ख्याल किंवा तराणा यात लयीशी खेळत केलेल्या बंदिशीचा विस्तार हे सर्व पैलू प्रत्येक कलाकाराने अतिशय प्रभावीपणे सादर केले.

अश्विनी भार्गवे

निनादिनी आयोजित दोन दिवसीय 'निनादिनी संगीतोत्सवात' प्रख्यात गायिका विदुषी डॉ. अलका देव मारुलकर यांच्या प्रतिभावंत शिष्यांचा कलाविष्कार शास्त्रीय गायनाच्या मैफिलींमधून अतिशय प्रभावीपणे समस्त श्रोतावर्गासमोर साकार झाला. १ व २ सप्टेंबर रोजी स्वर्णिमा सभागृह, इंदिरानगर नाशिक येथे हा संगीतोत्सव दिमाखात साजरा झाला. या कार्यक्रमात विदुषी डॉ. अलकाताईंकडे समग्र गायकीची तालीम घेत असलेल्या नाशिक, गोवा, कोल्हापूर येथील जवळपास २१ शिष्यांचा सहभाग होता. हा संपूर्ण कार्यक्रम दोन दिवसांमध्ये चार सत्रात सादर करण्यात आला. कु. गौरी पाध्ये (ललत), पूजा नाईक मान्द्रेकार (नटभैरव), शिल्पा डुबळे परब (शुद्ध सारंग, मेघमल्हार), तेजा ढवळीकर (भीमपलास), जयश्री राजेगावकर (मधुवंती), अश्विनी भार्गवे (गौडमल्हार), प्रीतम नाकील (श्री), कु. स्वराली पणशीकर (पूर्वी, तिलक कामोद), शिवानी मारुलकर दसककर (संपूर्ण पूर्वा, नटकेदार) या कलाकारांनी पहिल्या दिवशी, तर कु. अमृता जाधव (बिलासखानी तोडी), समीक्षा भोबे काकोडकर (विभास), कु. रजिंदर कौर (अहिर भैरव), कु. गौरी दसककर (जौनपुरी), कु. ईश्वरी दसककर (बहादुरी तोडी), श्रीराम तत्ववादी (देसी), कु. सुरश्री दसककर (मुलतानी), नितीन ढवळीकर (गौरी, मारवा), रचना गाडगे (भूप), प्राजक्ता पितळे (यमन), विनया परब (छायानट), कु. कल्याणी दसककर (बिहागडा) या कलाकारांनी दुसऱ्या दिवशी शास्त्रीय गायन सादर केले.

प्रत्येक कलाकाराच्या मैफिलीतून त्या त्या रागाचा सुंदर आविष्कार मांडण्यात आला. विलंबित ख्याल, त्यात विस्तारत जाणारा रागविस्तार, लयकारी, ताना, छोटा ख्याल किंवा तराणा यात लयीशी खेळत केलेल्या बंदिशीचा विस्तार हे सर्व पैलू प्रत्येक कलाकाराने अतिशय प्रभावीपणे सादर केले. समग्र गायकीचे शिस्तबद्ध निकष सर्वच कलाकारांच्या गायकीतून साकारले गेले.

पहिल्या दिवशी कु. गौरी पाध्ये यांच्या आश्वासक गाण्याने मैफिलीला सुरुवात झाली. त्यांनी गायलेल्या ललत रागाने मैफिलीची रंजकता वाढली. दुसऱ्या दिवशीची सुरुवात कु. अमृता जाधव यांच्या राग बिलासखानी तोडीने झाली. अतिशय आत्मविश्वासपूर्ण गात त्यांनी रसिकश्रोत्यांची वाहवा मिळवली. अश्विनी भार्गवे यांनी राग गौड मल्हार आणि त्यानंतर प्रेमांजलीतील अभंग उत्कृष्टपणे सादर केला. कु. गौरी दसककर यांनी राग जौनपुरी व त्यानंतर सादर केलेली तिलक कामोद रागातील ठुमरी विशेष उल्लेखनीय ठरली. गौरीच्या रूपाने एक ठुमरी गायिका नावारूपाला येत आहे, असे विशेष कौतुक डॉ. अलकाताईंनी केले. प्रत्येक कलाकाराने रागगायनानंतर डॉ. अलकाताईंनी आजवर केलेल्या उत्तम कलाविष्कारांपैकी असणाऱ्या प्रेमांजली या मिराबाईच्या अभंगांचे आणि उपशास्त्रीय गायनात ठुमरीचे सादरीकरण केले.

शिवानी मारुलकर दसककर यांनी गौरी, पूर्वी, मारवा इ. रागांगांचे मिश्रण असणारा संपूर्ण पूर्वा हा राग अप्रतिम सादर केला. यात गौरीतील निषादाचे काम, पूर्वीतील दोन मध्यमांचे काम आणि या दोन्ही रागांगातील कोमल धैवतच्या संगतीनंतर आश्चर्यकारकरित्या येणारा मारवातील शुद्ध धैवत सुखद अनुभूती देऊन जात होता. असे म्हणणे सुयोग्य ठरेल की, हा राग गाण्याचे धारिष्ट्य प्रतिष्ठित गायकही कदाचित करत नसावेत, असा हा आव्हान असणारा राग त्यांनी ताकदीने सादर केला आणि यानंतर गायलेला नटकेदारही रसिकांची दाद मिळवून गेला. ठुमरी गायनाने तर मैफिलीचा कळस गाठला. याच सत्रात गायलेल्या गोव्याच्या शिल्पा डूबळे परब यांनी प्रसिद्ध असा शुद्ध सारंग हा राग गायकीचे अनेक पैलू दाखवत एक वेगळ्याच उंचीवर नेला. तसेच, त्यानंतर गायलेला मेघमल्हार राग उपस्थितांची वाहवा मिळवून गेला. गोव्याच्या कु. स्वराली पणशीकर यांनी देखील पूर्वी रागात गायकीचा अप्रतिम आविष्कार सादर करत, तिलक कामोद रागात विस्ताराची सुंदर मांडणी करून मैफलीत रंगत आणली. दुसऱ्या दिवशीच्या सत्रात श्रीराम तत्ववादी यांनी देसी राग अतिशय दर्जेदार गायकीने सादर करून त्यानंतर बाबुल मोरा या ठुमरीने उपस्थितांची मने जिंकली. कु. ईश्वरी दसककर यांनी बहादूरी तोडी या रागात लयीचा सुंदर मेळ साधत साकारलेली लयकरी भरभरून दाद घेऊन गेली. तसेच, नंतरचे प्रेमांजलीतील भजन उत्तम सादर केले. गोव्याचे कलाकार नितीन ढवळीकर यांनी गौरी हा राग जयपूर घराण्याच्या शिस्तबद्ध गायकीने आणि त्या रागाचा संपूर्ण डौल सांभाळत सादर केला. त्यांनी सादर केलेला मारवा रागही खूप भावला. संपूर्ण कार्यक्रमाचे शेवटचे सादरीकरण कु. कल्याणी दसककर यांनी आपल्या बहारदार गायकीद्वारे राग बिहागडा गाऊन केले. राग भैरवीतील सजनवा ही ठुमरी रसिकश्रोत्यांची वाहवा मिळवून गेली.

या कार्यक्रमात कु. कृपा परदेशी, कु. ईश्वरी दसककर आणि कु. कल्याणी दसककर यांनी संवादिनी साथसंगत तर सुजित काळे, श्री. रसिक कुलकर्णी आणि श्री. सारंग तत्ववादी यांनी तबला साथसंगत अतिशय समर्थपणे, समर्पक आणि गायकीला पोषक अशी केली. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध हार्मोनिअमवादक सुभाष दसककर, तबला वादक नितीन पवार, गायक अविराज तायडे, आशिष रानडे आणि अनेक जाणकार मंडळींची उपस्थिती लाभली. सर्वच कलाकारांनी त्यांच्या गायकीतून समग्र गायकीचा आणि रसोनिष्पत्तीचा कळस गाठला. समस्त रसिकश्रोत्यांनी आणि उपस्थित असलेल्या जाणकार संगीतज्ज्ञांनी उत्स्फूर्तपणे भरभरून दाद दिली आणि या मोठ्या कार्यक्रमाच्या एकूणच सूत्रबद्धतेचे विशेष कौतुक केले. हा दोन दिवसीय संगीतमहोत्सव एकूणच अतिशय अप्रतिम, नेटका, सूत्रबद्ध आणि एक अनोखा संगीतानुभव समस्त श्रोतृवर्गाला देऊन गेला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गोदावरी’च्या बाप्पाला थाटात निरोप

$
0
0

आज निलमणीची निघाणार मिरवणूक

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड ते कुर्ला दरम्यानच्या सर्व प्रवाशांसाठी लाडक्या ठरलेल्या गोदावरी एक्स्प्रेसमधील गणरायाला शनिवारी सायंकाळी मनमाड येथे भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. पोलिस उप-अधीक्षक आर. रागसुधा यांच्या हस्ते आरती करण्यात आली. त्यानंतर 'गोदावरी राजा'ला रेल्वे स्थानकासमोर ढोल ताशांच्या गजरात निरोप देण्यात आला.

'गणपती बाप्पा मोरया'च्या जयजयकाराने रेल्वे स्थानक परिसर दुमदुमला होता. गोदावरी राजाच्या मिरवणुकीत विविध पथकांच्या प्रात्यक्षिकांनी मनमाडकरांचे लक्ष वेधले. यासह दिंडोरी, नाशिक येथील ढोलपथक हे या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले. मिरवणुकीत सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच चाकरमाने, प्रवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोदावरी राजा मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र खैरे यांनी उपस्थितांचे स्वागत व सत्कार केला. रेल्वे प्रवासातील अडचणी दूर कर, रेल्वे प्रवास सुरक्षित व सुखकर राहू दे, प्रवाशांच्या सुरक्षिततेचे रेल्वेत उपाय करण्याचे रेल्वे व पोलिस प्रशासनाला सुचू दे, अशाच मागण्या जणू रेल्वे प्रवासी व चाकरमाने

गणरायाकडे करीत होते.

विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

मनमाड शहरात दत्त मंदिर मार्गावरील गणेश कुंड येथे घरगुती व मंडळांच्या गणेशाचे विसर्जन करण्यात येणार आहे. गणेश कुंडात पाणी सोडण्यात आले असून, विसर्जन व्यवस्थित व्हावे यासाठी पालिकेने अधिकारी व कर्मचाऱ्यांची विविध पथके तैनात केली आहेत. रविवारी सकाळी निलमणी गणेशाची पुणेरी थाटात पालखीतून मिरवणूक निघणार असून, नेहमीप्रमाणे ही मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरेल असे मंडळाचे अध्यक्ष नितीन पांडे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस

$
0
0

२३ सप्टेंबर

अरुण शिरोडे

उद्योजक

महेंद्र पोद्दार

बांधकाम व्यावसायिक

देवांग जानी

अध्यक्ष, गोदाप्रेमी सेवा समिती

अजय ब्रह्मेचा

अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशन

अनिल जाधव

उद्योजक

अभय ओझरकर

अध्यक्ष, जनस्थान ग्रुप

२४ सप्टेंबर

निर्मला गावित

आमदार

सचिन बागड

क्रेडाई सदस्य

स्वप्नील डांगरीकर

परीक्षक, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विधानसभा मतदारसंघात तब्बल आठ उपमहानगप्रमुख

$
0
0

शिवसेनेत पदांची खैरात!

'मध्य विधानसभा'साठी ८ उपमहानगप्रमुख; २० शाखांसाठी ४० प्रमुख

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये शिवसेनेतील खांदेपालटानंतर तब्बल सात महिन्यानंतर विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकारिणीला अखेर मुहूर्त लागला आहे. शिवसेनेच्या इतिहासात प्रथमच एका विधानसभा मतदारसंघासाठी जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मुखपत्रात कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात तब्बल आठ उपमहानगरप्रमुख, १४ विभागप्रमुख आणि चार संघटकांची नावे जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात २० च्या आसपास शाखा असताना, ४० शाखाप्रमुखांची घोषणा करण्यात आल्याचा दावा पक्षातीलच नेत्यांकडून करण्यात आल्या आहे. महानगरप्रमुख सचिन मराठे यांच्या मर्जीतील लोकांचीच वर्णी लावल्याचाही आरोप शिवसैनिकांकडून केला जात आहे. त्यामुळे या पक्षात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीनंतर तब्बल एक वर्षभरानंतर शिवसेनेने नाशिकमध्ये खांदेपालट केला. मार्चमध्ये अजय बोरस्ते यांना बदलून त्यांच्या जागी दोन महानगप्रमुखांची पदे निर्माण करीत या पदांवर सचिन मराठे आणि महेश बडवे यांची नियुक्ती करण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी पुन्हा नाशिकवरील पकड अधिक मजबूत केली. परंतु, खांदेपालटानंतर शिवसेनेतील गटबाजी पुन्हा उफाळून येत सरळ दोन ते तीन गट पक्षात निर्माण झाले. एका गटाने तर थेट महानगरप्रमुखांच्या बैठकांकडेच पाठ फिरवली. विधान परिषद निवडणुकीत पक्षात कशीबशी एकी निर्माण झाली असली तरी ही निवडणूक संपताच पक्षाने आपली आक्रमकता गमावली. नागरिकांशी संपर्क आणि नागरी प्रश्नांवरील शिवसेनेची आक्रमकताच लयाला गेल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे पक्षावर टीका होत असतानाच मंगळवारी महानगरप्रमुख सचिन मराठे यांच्याकडून नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. येथे आठ उपमहानगरप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजाभाऊ क्षीरसागर, शरद देवरे, वैभव खैरे, संतोष ठाकरे यांच्यासह सचिन बांडे, अजय चौगुले, दत्ता दंडगव्हाळ, शशीकांत कोठुळे या चौघांसाठी कार्यालयीन उपमहानगप्रमुख अशी नवीन पदे निर्माण करण्यात आली आहे. अनिल साळुंखे, कमलेश परदेशी, रवींद्र जाधव, वीरेंद्रसिंग टिळे यांच्यावर संघटकपदाचा भार सोपविण्यात आला आहे. तब्बल १४ विभागप्रमुख, ४० शाखाप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठीची ही पहिलीच जम्बो कार्यकारिणी असल्याची पक्षातच चर्चा होते आहे.

निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप

निष्ठांवतांना डावलण्याची परंपरा खांदेपालटानंतरही कायम आहे. मध्य विधानसभा मतदारसंघासाठी जाहीर झालेल्या कार्यकारिणीत महानगर प्रमुख सचिन मराठे यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांचीच वर्णी लावण्यात आल्याचा आरोप कार्यकर्ते खासगीत करीत आहेत. दोन महिन्यांपूर्वीच पक्षात आलेल्या एका कार्यकर्त्याला थेट उपमहानगप्रमुख केल्याचा आरोप निष्ठांवताकडून करण्यात आला आहे. पक्षांतर्गत विरोधकांना पद्धतशीरपणे डावलण्यात आल्याचा आरोप काही शिवसैनिकांनी केला असून, यामुळे गटबाजीत वाढच होईल असा दावा केला जात आहे. त्यामुळे ही नाराजी दूर करण्यासाठी मराठेंना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. आता शहरातील अन्य तीन मतदारसंघांच्या कार्यकारिणीला कधी मुहूर्त लागणार याकडे शिवसैनिकांच्या नजरा लागून आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images