Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भ्रष्टाचार निर्मूलनात तारीख पे तारीख

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत तक्रारींचा ओघ वाढत असला तरी या तक्रारींचे जलदगतीने निवारण होत नसल्याचा खेदजनक प्रकार सुरूच असल्याचे मंगळवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. जिल्हा परिषद आणि महसूल यंत्रणेबाबत सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या तक्रारी असून, काही प्रकरणांचा तर गेल्या तीन-चार वर्षांतही निपटारा झाला नसल्याची बाब पुढे आली. विशेष म्हणजे यंदा प्रथमच बहुतांश सरकारी यंत्रणांचे जबाबदार अधिकारी उपस्थित असल्याचे पहावयास मिळाले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक झाली. तीन महिन्यांनी घेतल्या जाणाऱ्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, पोलिस उपायुक्त माधुरी कांगणे यांच्यासह महापालिका, जिल्हा परिषद, ग्रामीण पोलिस, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, समाज कल्याण विभाग व अन्य सर्वच सरकारी कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते. सुरुवातीला गत बैठकांमध्ये मांडण्यात आलेल्या तक्रारींच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर नव्याने दाखल झालेल्या तक्रारींवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत एकूण ६३ तक्रारी जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीपुढे ठेवण्यात आल्या. विविध विभागांच्या प्रशासनांनी तब्बल ३५ कोटींचा भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी मांडून या प्रकरणांच्या चौकशीची मागणी करण्यात आली. समितीपुढे आलेल्या सुमारे २५ तक्रारींमध्ये संबंधित विभागांकडून अद्याप अहवालच सादर केला गेला नसल्याची माहिती पुढे आली. या प्रकरणांमध्ये ठोस निर्णय न देता तक्रारदारांना केवळ तारखांवर तारखा दिल्या जात असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली.

..

घोटाळ्याच्या तक्रारींचा पाऊस

सर्वाधिक तक्रारी महसूल आणि जिल्हा परिषदेच्या असल्याचेही बैठकीत स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याचा विषय तक्रारदारांनी पुन्हा या बैठकीमध्ये मांडला. मुक्त विद्यापीठात अपात्र व्यक्तींनाही प्राध्यापक व अन्य पदांवर नेमणूक देण्यात आल्याची तक्रार मांडण्यात आली. काही अभ्यासक्रमांच्या नावाखाली १९ कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा झाल्याचा दावाही करण्यात आला. सिव्हिल हॉस्पिटल येथील औषध खरेदी प्रकरणात ५१ लाख ५० हजार रुपयांचा भ्रष्टाचार झाला असल्याची तक्रार करण्यात आली. आदिवासी विकास विभागात ३५ लाखांचा रेनकोट घोटाळा तर त्र्यंबकेश्वर येथेही शिक्षक वेतन आणि भत्त्यांबाबतचा सुमारे एक कोटी १० लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा दावा करण्यात आला. अशा काही महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये संबंधित विभाग अहवाल सादर करीत नसल्याने तक्रारदारांनी नाराजी व्यक्त केली. प्राप्त तक्रारी आणि त्यावर करण्यात आलेली कार्यवाही याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित यंत्रणांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करारनाम्याच्या नोटिसांनी धास्तावले गाळेधारक

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कर प्रणालीत केलेल्या बदलांनंतर येथील महापालिकेच्या गाळेधारकांना नवीन करारानामा करून घेण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे गाळेधारक धास्तावले असून, त्यांनी या नोटिसांबाबत विचारणा करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांच्या दारी धाव घेतली आहे.

महापालिकेने बजावलेल्या करारनामा नोटिशींमध्ये सात दिवसांच्या आत महापालिकेने दिलेल्या अटी-शर्तींप्रमाणे नवीन करारानामा सादर करण्यास सांगितले आहे. तसे न केल्यास महापालिका प्रशासन पुन्हा गाळा त्यांच्या ताब्यात घेईल, असेही नमूद करण्यात आलेले आहे. त्यामुळे याप्रश्नी सातपूर कॉलनीतील गाळेधारकांनी मनसेचे गटनेते नगरसेवक सलिम शेख यांची भेट घेत अगोदरच गाळ्यांचे भाडे वाढविण्यात आले आहे. आता पुन्हा नव्याने करारनामा करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्याने आर्थिक संकट वाढल्याची तक्रार मांडली. येथे येणाऱ्या ग्राहकांना योग्य पार्किंग करण्यासाठी जागाच नसल्याने व्यवसाय पाहिजे त्याप्रमाणात होत नाहीत. त्यातच महापालिका गाळेधारकांकडून भाडेवसुली करीत असताना घरपट्टीदेखील लागू करते. आता नव्याने पुन्हा करारनामा करून घेण्याबाबत नोटिसा दिल्याने याबाबत स्थानिक नगरसेवकांनी आवाज उठवावा, अशी अपेक्षा येथील व्यावासायिकांनी व्यक्त केली आहे.

महापालिकेकडून गाळा घेतला त्यावेळी केवळ सातशे रुपये भाडेआकारणी करण्यात आली होती. आता तेच भाडे दोन हजारांहून अधिक करण्यात आले आहे. त्यातच या गाळ्यांना महापालिका घरपट्टीही देते. आता पुन्हा नव्याने करारनामा करण्यासाठी नोटिसा बजावण्यात आल्याने गाळेधारक धास्तावले आहेत.

-शंकर देवघरे, गाळाधारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेरे अंगने मे तुम्हारा, क्या काम हैं?

0
0

आमदार अनिल गोटे यांचा स्वपक्षीय नेत्यांना टोला

म. टा. वृत्तसेवा, धुळे

फिफ्टी प्लस किंवा मायनस करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी, प्लस-मायनस चालणार नाही, असे प्रसिद्धीपत्रक काढून आमदार अनिल गोटे यांनी स्वपक्षातील नेत्यांनाच आव्हान दिले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अनिल गोटे यांचे हे पत्रक आल्याने पुन्हा राजकीय वातावरण तापू लागले आहे.

धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून जनतेने मला तिसऱ्यांदा निवडून दिले असून, ‘मेरे अंगने मे तुम्हारा, क्या काम हैं’ असा सवालदेखील आमदार अनिल गोटे यांनी कोणाचेही नाव न घेता स्वपक्षातील नेत्यांवरच निशाण साधला आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शतप्रतिशत भाजपच राहिल, असा दावाही या पत्रकातून करण्यात आला आहे. धुळे शहर म्हणजे धर्मशाळा नव्हे, कोणीही उठावे आणि आपल्या तोंड खुपसावे, आता यापुढे हे चालणार नाही. शहराच्या मतदारसंघाला जणू कोणी वारसच नाही अशा पद्धतीने मनपा निवडणुकीबद्दल बेताल वक्तव्य केले जात आहे, असेही त्यात म्हटले आहे.

बाहेरच्यांकडून ‘मुंगेरीलाल’ची स्वप्ने
सर्व पक्षांच्या दारात जोगवा मागून आमच्या पक्षात विश्रांतीसाठी थांबलेले उपरे आता पक्षाचे मालक असल्यासारखे मनपा निवडणुकीसंबंधी वक्तव्य करीत आहेत, असेही या पत्रकात नमूद केले आहे. काहींनी धुळे महानगरपालिकेची वाट लावण्याचा विडा उचलला आहे. पक्षातील कर्तृत्व शून्य लोक आता मनपाची सूत्रे हाती घेण्याची ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ पाहत आहेत, असेही यात आमदार अनिल गोटे यांनी म्हटले आहे. हे मैदान आमचे असून, धुळे शहर माझे घर आहे. त्यामुळे मेरे अंगने में तुम्हारा क्या काम हैं? असा प्रश्न आमदार अनिल गोटे यांनी प्रसिध्दी पत्रकातून केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात पाच लाखांची भांग जप्त

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरातील देवपूर भागातील बिलाडी रोडवरील एका बंद घरातून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने कारवाई करीत भांग जप्त केली. एकूण ५ लाख रुपये किमतीची ही भांग असून, जवळपास १७४ गोण्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मंगळवारी (दि. २५) दुपारी पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

देवपुरातील बिलाडीरोड भागातील एकता नगरात प्लॉट नं. १३१ मध्ये एका बंद घरात भांगची साठवणूक केली असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्रभर पाळत ठेवली. यानंतर मंगळवारी दुपारी पोलिसांनी याठिकाणी छापा टाकून प्रत्येकी २५ किलो वजनाच्या भांगच्या १७४ गोण्या आढळून आल्या. घराचे मालक यशवंत दौलत सैंदाणे यांनी आपले घर दीपक कुऱ्हे नावाच्या व्यक्तीस भाड्याने दिले आहे. या घरात दीपक कुऱ्हे याने सुका बारीक भांगच्या एकूण १७४ गोण्या जमा केल्या असल्याचे आढळून आले. प्रत्येक गोणी २५ किलो ग्रॅम वजनाची असून प्रति किलो ११० रुपये भावाप्रमाणे असा एकूण ४ हजार ५३० किलो ग्रॅम वजनाची ही सुकी भांग आहे. त्याची किंमत एकूण ४ लाख ७८ हजार ५०० रुपये इतकी आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी कारवाई करीत दीपक कुऱ्हेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी तरुणाची मृत्यूशी झुंज
चाळीसगाव : शहरालगतच्या टाकळी प्र. चा. येथे गणपती विसर्जनानंतर चौघांनी अकील ऊर्फ बबलू सलीम खाटिक या २३ वर्षीय तरुणास लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. धुळे येथील खासगी रुग्णालयात तो तरुण उपचार घेत असून, त्याची मृत्यूशी झुंज सुरू आहे. रविवारी गणेश विसर्जनाच्या दिवशी स्वयंवर मंगल कार्यालय रस्त्यावरील शिवराजे गणेश मित्रमंडळाजवळ किरकोळ कारणावरून अकील खाटिक व दीपक गावडे या दोघांना चौघांनी मारहाण केली होती. रात्री ९.३० वाजता ही घटना घडली होती. या प्रकरणी फारूख शफी खाटिक यांच्या तक्रारीवरून भावडू पाटील, विक्की ढवळे, बळीराम महाजन, आण्णा चौधरी या चौघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तरुणास मारहाण
रावेर : शहरातील रथगल्लीत एका तरुणाने वेगात बुलेट नेऊन भिंतीला ठोस मारून नुकसान केले. तसेच शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मोहंमद अजहर मोहंमद रईस (रा. नागझिरी रोड) याने बुलेट मोटारसायकल वेगाने घेऊन जात भूषण कासार यांच्या भिंतीला ठोस मारली. यात भिंत पडून नुकसान झाले, यात तरुण स्वतः जखमी झाला. घटनास्थळावरून मोटारसायकल हलवण्याचा प्रयत्न केला असता दोघांनी भूषण कासार यास शिवीगाळ व मारहाण केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बलाढ्य भाजपला तुकाराम मुंढें पडले भारी

0
0

नाशिक

विनोद पाटील


नवी मुंबई आणि पुण्यात भाजपचे सर्व नेते सनदी अधिकारी तुकाराम मुंढेंना घालवण्यात भाजपसह सर्वपक्षीय नेते यशस्वी ठरले असतांना, नाशिकमध्ये मात्र मुंढें हेच भाजपला भारी पडले आहेत.मुढेंनी अवघ्या सात महिन्यात सत्ताधारी भाजपला पूर्णत: डॅमेज केले आहे.मुंढेंच्या कार्यशैलीमुळे आता भाजपचे आमदार,पदाधिकारी आणि नगरसेवक एकमेकांचे दुश्मन बनले असून लोकसभा व विधानसभा निवडणूकांमध्ये आम्हाला आता विचारू नका असा इशाराच त्यांनी पक्षाला देवून टाकला आहे.निवडणूकांच्या तोंडावर पक्षात आलेल्यांनी तर नको ही भाजप असे म्हणत वेगळी चूल मांडण्याची तयारी केल्याने पक्षासमोर फुटीचे मोठे संकट उभे राहिले आहे.

नाशिक दत्तक घेतलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांनी नाशिकच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि पुण्यातील भाजप नेत्यांचा पक्षावरील रोष कमी करण्यासाठी सात महिन्यांपूर्वी पुण्याहून नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढेंना आणले.परंतु मुंढेंची कार्यशैली अवघ्या सात महिन्यातच पक्षासह,पालकमंत्री गिरीश महाजन,भाजपचे आमदार,पदाधिकारी आणि नगरसेवकांसाठी हानीकारक ठरली .शहरात तीन आमदार,महापालिकेत पू्र्ण सत्ता असतांनाही,गेल्या सहा महिन्यापासून मुंढेंनी घेतलेल्या विविध निर्णयावरून मुंढें विरुद्ध भाजप असाच संघर्ष सुरू असल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे आता जनतेत हसू होत आहे.मुंढेनी एकतर्फी लागू केलेल्या करवाढीच्या निर्णयाने तर,भाजपसह जनतेची कोंडी झाल्याने मुंढेंना घालवण्याचा हरप्रकारे प्रयत्न भाजप नेत्यांनी करून पाहिला.परंतु मुंढेंना वाचवण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यानीच हस्तक्षेप केल्याने,मुंढेंवरील अविश्वास प्रस्ताव बारगळला.मुंढेंनी आपल्यावरील रोष कमी करण्यासाठी ५० टक्के करवाढ रदद करून जनतेची सहानुभूती मिळवली. अविश्वास ठरावाच्या निमित्ताने घडल्या प्रकाराने राज्यभरात भारतीय जनता पक्षाची पुरती नाचक्की झाली.या सर्व प्रकाराने पालकमंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्यावरच पदाधिकाऱ्यांनी तोंडसुख घेणे सुरू केल्याने मुंढे प्रकरणात भाजपने स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे.आगामी विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीतही पक्षाला या प्रकरणाची किंमत मोजावी लागणार असल्याची अटकळ बांधली जात आहे.


एकीकडे मध्यमवर्ग मुंढेंच्या उचापतींनी नाराज असतांना नाशिककरांमधील उच्चभ्रू वर्ग कर्तव्यदक्ष मुंढे यांच्या बाजूने उभे ठाकत अविश्वास ठरावच का आणला, याचा जाब विचारत असल्याने भाजपची कोंडी झाली आहे. या चक्रव्यूहातून बाहेर पडणे अद्याप तरी भाजपला जमू शकलेले नाही. कर्तव्यदक्ष मुंढे प्रत्येक गोष्टीत थेट नियमांवरच बोट ठेवत असल्याने भाजपच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना ते जुमानात नसल्याने पक्षाचीच पंचाईत झाली आहे. आता तर पदाधिकारी आणि आमदारांमध्येच मुंढेंवरून आरोप प्रत्यारोपांचे महाभारत सुरू झाले आहे.मुंढेंनी गणेशोत्सवाबाबत असलेल्या जाचक अटी ‌ शर्तीवरून भाजपला अक्षरश: जेरीस आणले होते.पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद कसाबसा शांत झाला.पण त्याच मुंढेंनी पालकमंत्र्याच्या उपस्थितीत गणेश विसर्जन मिरवणुकीत त्यांच्यासोबत तालावर ठेका धरून स्थानिक नेत्यांना डिवचले आहे.मुख्यमंत्र्यांकडून नाशिकसाठी मंजूर करून आणलेला ३० कोटींचा निधी मुंढेंनी अडवून ठेवला आहे.तर,आमदार सानप यांना दंडापोटी अभ्यासिकेचे ९ लाख रुपये भरण्यास बाध्य केले आहे.महापौर रंजना भानसी यांच्यासह पालिकेतील पदाधिकाऱ्यांना मुंढेंनी कोणतेच काम शिल्लक ठेवलेले नाही.विशेष म्हणजे महासभेने घेतलेल्या निर्णयांना मुंढेंनी केराची टोपली दाखवली आहे.मुंढेंच्या या प्रशासकीय राजवटीमुळे जगातील सर्वात बलाढ्य पक्षाचे स्थानिक नेते आता मुंढेंपुढे चक्क हतबल झाले आहेत.थेट मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांचा आशिर्वाद असल्याने नाशिकचे भाजप नेतेच हतबल झाले आहेत.महापालिकेत काही चालत नाही,तर दुसरीकडे जनतेपुढे तोंड दाखवायला जागा शिल्लक राहीली नाही.मुंढेंवरून एका बड्या पदाधिकाऱ्यांने तर आमदारांनाच शिविगाळ करत वेगळी चूल मांडण्याची तयारी केली आहे. मुख्यमंत्री, पालकमंत्री स्थानिक नेत्यांचे ऐकून घेत नसल्याने आता आमदार व पदाधिकाऱ्यांनीच एकमेकांना टारगेट करणे सुरू केले असून पक्षाची अब्रूच चव्हाट्यावर आली आहे.

लोकसभा,विधानसभा विसरा


नाशिकमध्ये भाजपची कामगिरी उंचावण्यापेक्षा आयुक्त मुंढेंचीच प्रतिमा अधिक उजळ होत आहे, तर अविश्वास प्रस्तावावरून भाजपने हात दाखवून अवलक्षण करून घेतल्याने या पक्षाची प्रतिमा दिवसेंदिवस डागाळली आहे.शेतीवरील कर कायम असून मुंढेंनी आता तर,२ लाख ६९ हजार मालमत्ता अनधिकृत ठरवल्या आहेत.त्यामुळे,तीन आमदार,महापौर,पदाधिकारी,६६ नगरसेवक पूर्ण जेरीस आले असून ते दररोज एकमेकांचाच उद्धार करत आहेत.मुख्यमंत्री,पालकमंत्री आणि प्रदेशाध्यक्षही ऐकून घेत नसल्याने लोकसभा,विधानसभा निवडणुकीतल्या पक्षाच्या विजयाचे आता आम्हाला विचारु नका अशा सरळ धमक्या आमदार,नेत्यांकडून देण्यात आल्या आहेत.महापालिकेतील काही नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी तर थेट पक्षाला रामराम करण्याची तयारी सुरू केली आहे.तर,वरीष्ठ नेत्यांनी सबुरीचा सल्ला दिल्याने नाशिकमध्ये मुंढें पक्षाला भारी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिनाभराचा दिलासा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात मोकळ्या भूखंडांवरील अनधिकृत ७२ धार्मिक स्थळांना आणखी महिनाभर दिलासा मिळाला आहे. यासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी उच्च न्यायालयाने ३१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलल्याने या धार्मिक स्थळांवरील कारवाईला न्यायालयाने यापूर्वी दिलेली स्थगितीदेखील ३१ ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलली आहे. त्यामुळे महिनाभर पालिकेची कारवाई पुन्हा लांबली आहे.

महापालिकेने मोकळ्या भूखंडावरील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईविरोधात विश्वस्तांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ४ सप्टेंबर रोजी न्या. बी. आर. गवई आणि एम. एस. कर्णिक यांच्या पीठाने २५ सप्टेंबरपर्यंत पालिकेच्या कारवाईला स्थगिती दिली होती. अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधातील कारवाईबाबत न्यायालयाने विचारणा केल्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये महापालिकेने पुन्हा एकदा शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात कारवाईचा बडगा उगारला होता. पहिल्या दोन टप्प्यांत रस्त्यावरील तसेच शासकीय जागांवरील १५६ अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा मारल्यानंतर २००९ नंतरच्या ५७४ अनधिकृत धार्मिक स्थळांच्या दिशेने महापालिकेने आपल्या कारवाईचा मोर्चा वळविला. त्यापैकी कॉलनीअंतर्गत मोकळ्या भूखंडांवरील ७२ अनधिकृत धार्मिक स्थळांना निष्कासनाच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. पालिकेच्या या कारवाईविरोधात धार्मिक स्थळ बचाव कृती समितीची स्थापना करण्यात आली होती. या कृती समितीच्या वतीने विनोद थोरात व कैलास देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करीत ७२ धार्मिक स्थळांवरील महापालिकेच्या कारवाईला यापूर्वीच उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. २५ सप्टेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी होणार होणार होती. परंतु, ही सुनावणी झाली नाही. बुधवारी उच्च न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ ऑक्टोबरला घेण्याचे जाहीर केले. त्यामुळे अजून महिनाभर या धार्मिक स्थळांना दिलासा मिळाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लढवय्या कॉम्रेड’चे रविवारी प्रकाशन

0
0

\B

\Bनाशिक : शेतकरी व आदिवासी यांच्या प्रश्नांसाठी लढणारे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून विविध अन्यायांविरुद्ध लढणाऱ्या पुंजाबाबा गोवर्धने यांच्यावर आधारित सुमन गोवर्धन लिखित 'लढवय्या - कॉम्रेड पुंजाबाबा गोवर्धने' पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. गंगापूर रोड येथील कर्मवीर बाबूराव ठाकरे इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये रविवारी (३० सप्टेंबर) दुपारी ३.३० वाजता हा सोहळा होणार आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य डॉ. भालचंद्र कांगो यांच्या हस्ते प्रकाश करण्यात येणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत. यावेळी खासदार हेमंत गोडसे, मविप्र संस्थेच्या सरचिटणीस निलिमा पवार आदी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रीन कॉरिडॉरसाठी एअर अॅम्बुलन्सचा वापर

0
0

कोल्हापूरहून आणले यकृत; नाशिकच्या रुग्णाचे वाचले प्राण

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमधील ५१ वर्षीय रुग्णावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यासाठी एअर अॅम्बुलन्सच्या मदतीने कोल्हापूरमधून २ तास ४५ मिनिटांत यकृत आणण्यात आले. 'ग्रीन कॉरिडॉर'साठी नाशिकमध्ये प्रथमच एअर अॅम्बुलन्सचा वापर करण्यात आला. कोल्हापूरच्या एका रुग्णाने यकृत दान केल्यामुळे नाशिकच्या रुग्णाचे प्राण वाचविण्यात यश आले.

कोल्हापूर शहरातील एका ५८ वर्षीय व्यक्तीचा वाहन चालविताना अपघात झाला. त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना त्या व्यक्तीचा मेंदू मृत झाल्याचे निदान केले गेले. उपचार सुरू असताना बुधवारी (दि. २६) त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्या व्यक्तीचे अवयव दान करण्याची इच्छा कुटुंबीयांनी व्यक्त केली. झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन कमिटीच्या वतीने तात्काळ ग्रीन कॉरिडॉरची व्यवस्था करण्यात आली. कोल्हापूर ते ओझर विमानतळ एअर अॅम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली. ओझर ते नाशिक पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडर करण्यात आले. नाशिकमध्ये खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ५१ वर्षीय रुग्णाला त्या व्यक्तीचे यकृत वापरत प्रत्यारोपण करण्यात आले.

बुधवारी सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांनी कोल्हापूरहून एअर अॅम्बुलन्स आणि पोलिसांच्या मदतीने नाशिकमधील खासगी रुग्णालयात यकृत पोहोचविण्यात आले. त्यानंतर रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यात आली. प्रत्यारोपण सर्जन डॉ. विपीन विभुते यांनी ही शस्त्रक्रिया केली. एअर अॅम्बुलन्ससाठी एअर पोर्ट मॅनेजर एन. गुरव यांनी ग्रीन कॉरिडॉरासाठी विशेष परिश्रम घेतले. अवयन दानाचे महत्त्व यामुळे पुन्हा एकदा अधोरेखीत झाले असल्याचे मत डॉ. विभुते यांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ग्रामपंचायतीसाठी ७२ टक्के मतदान

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. या ग्रामपंचायतींसाठी सरासरी ७२ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील २० ग्रामपंचायतींमधील सरपंचपदासह सदस्यांच्या ९१ जागांसाठी बुधवारी (दि.२६) मतदानप्रक्रिया राबविण्यात आली. दोन ग्रामपंचायतींमध्ये सरपंचासह सर्व जागा, तर एका ग्रामपंचायतीत सरपंच वगळता सर्व सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित ९१ जागांकरिता बुधवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान घेण्यात आले. इगतपुरी तालुक्यात ४८ जागांसाठी, त्र्यंबकेश्‍वरमध्ये १९, निफाडमधील १६, येवल्यातील सहा, तर बागलाणमधील दोन जागांसाठी मतदान झाले. त्र्यंबकेश्वर तालुक्यात ७८.७३, निफाडमध्ये ६६.७५, येवल्यात ५७.१६, बागलाणमध्ये ७२.९९ तर इगतपुरीत ८२.४९ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या ग्रामपंचायत शाखेने दिली आहे. कळवण आणि निफाडमधील काही ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचपदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. कळवणमध्ये ४९.२१ टक्के तर निफाडमध्ये ८१.३७ टक्के मतदान झाले. उद्या गुरुवारी (दि.२७) सकाळी संबंधित तालुक्यांच्या तहसील कार्यालयांत मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फास्ट पान-३ साठी

0
0

दहा जणांना कोठडी

जेलरोड : नाशिकरोडच्या दोन काल सेंटरमधून खोटे फोन करुन अमेरिकेच्या नागरिकांना गंडा घालणाऱ्या अकरा युवकांपैकी दहा जणांना पुन्हा पाच दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे. तर एकाला जामीन मंजूर झाला आहे.

न्यायालयाने सुरुवातीला अकरा जणांना २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी दिली होती. आज मुदत संपल्यामुळे अकरा संशयितांना उपनगर पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता दहा जणांना पुन्हा पाच दिवसांची म्हणजे १ आक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. तर ऋुतिक कटारीयाचा जामीन न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रभाकर रायते यांनी दिली. पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी फिर्याद दिली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध विक्रेत्यांची उद्या दुकाने बंद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

औषधांची ऑनलाइन विक्री आणि ई-फार्मसीच्या निषेधार्थ देशभरातील औषध विक्रेत्यांनी शुक्रवारी २८ सप्टेंबर रोजी मेडिकल दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने या बंदला पाठिंबा दर्शविला असून, जिल्ह्यातील तब्बल साडेचार हजार केमिस्ट दुकाने बंद ठेऊन सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविणार आहेत.

ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट (एआयओसीडी) या देशातील केमिस्ट व वितरकांच्या सर्वात मोठ्या संघटनेने औषधांच्या ऑनलाइन विक्रीला विरोध केला आहे. केंद्र सरकारने इंटरनेटच्या माध्यमातून औषधांची विक्री करण्याचा दिलेला कोणताही आदेश किंवा ई-फार्मसींना देशात कोणत्याही स्वरुपात कार्य करण्याची दिलेली मुभा याचा निषेध करण्यासाठी एक दिवसाचा बंद पुकारण्यात आला आहे. ऑनलाइन विक्रीमुळे व्यावसायिकांचे नुकसान तर होईलच, त्याचबरोबर ग्राहकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळेत जिल्हाभरातील औषध विकेते या बंदमध्ये सहभागी होणार आहेत. सामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठीची काळजी संघटनेने घेतली असून, त्यांना अत्यावश्यक औषधे उपलब्ध करून देण्यासाठी गोळे कॉलनीतील केमिस्ट भवन येथून सहकार्य केले जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष अतुल अहिरे, सचिव राजेंद्र धामणे यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदोन्नतीवर मेहेरनजर!

0
0

कृषि विभागातील बाबू बदलीनंतरही मूळ ठिकाणी सेवेत

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पदोन्नतीचा लाभ पदरात पाडून घेण्यासाठी मराठवाड्यासह विदर्भातील बदल्या स्वीकारणाऱ्या कृषि विभागातील ज्या बाबूंनी अवघ्या तीन महिन्यांतच मराठवाडा आणि विदर्भाला रामराम ठोकला होता, त्या कृषि अधिकाऱ्यांची लॉबी अखेरीस मुख्यमंत्र्यांना भारी भरली असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. या बदली प्रकरणात ज्या बाबूंना बदलीचे गिफ्ट मिळाले होते त्या कृषि अधिकाऱ्यांना पुन्हा पदोन्नतीने बदली झालेल्या ठिकाणी पाठविण्यास शासन अपयशी ठरले आहे.

जानेवारी २०१८ मध्ये राज्याच्या कृषि विभागातील गट क मधील ६० कृषि पर्यवेक्षकांच्या गट ब मधील कृषि अधिकारी पदावर पदोन्नतीने बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी बहुतांश कृषि पर्यवेक्षकांच्या बदल्या मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यात मंडळ कृषि अधिकारी या पदावर करण्यात आल्या होत्या. यापैकी तब्बल २२ कृषि अधिकाऱ्यांनी बदलीला तीन महिने पूर्ण होण्याच्या आतच पुन्हा आपल्या पदोन्नतीपूर्वीच्या आस्थापनेवर बदली करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या २२ कृषि अधिकाऱ्यांत नाशिक विभागातील ९ कृषि अधिकाऱ्यांचा समावेश होता. बदलीनंतर पुन्हा तीन वर्षे बदली न करण्याचा सामान्य प्रशासन विभागाचा आदेश असतानाही या कृषि अधिकाऱ्यांची एप्रिल २०१८ मध्येच पुन्हा बदली झाल्याची बाब उघड झाली होती. या सर्व अधिकाऱ्यांच्या बदली प्रकरणातून सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याची बाब उघड झाली होती.

सोयीच्या ठिकाणी तळ

विदर्भ आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या महसुल विभागांत काम करण्यास नाखुष असणाऱ्या कृषि अधिकाऱ्यांनी पदोन्नतीची बक्षिसी स्वीकारण्यासाठी बदली आदेश स्वीकारले. परंतु, प्रत्यक्षात या कृषि अधिकाऱ्यांनी बदलीच्या ठिकाणी काम केलेच नाही. या अधिकाऱ्यांच्या लॉबीने पुन्हा आपल्या सोयीच्या ठिकाणी बदल्या करून घेतल्या. या अधिकाऱ्यांची राज्य स्तरावर कार्यरत असलेल्या लॉबीवर कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांची मेहेरनजर आहे याचा शोध सामान्य प्रशासन विभागाला आजवर लागलेला नाही. त्यामुळे पदोन्नतीची मलई पदरात पाडून घेतलेले कृषि विभागातील हे सर्व बाबू आपल्या सोयीच्या ठिकाणी अद्यापही तळ ठोकून आहेत.

पदोन्नत्तीचा लाभ घेतलेले कृषि अधिकारी

नाव

जानेवारीताल पदस्थापना

एप्रिलमधील पदस्थापना

विष्णू आहेर

पवनी, जि.भंडारा

पाटोदा,ता.येवला,जि.नाशिक

मनोहर गाजरे

सेलू, जि. वर्धा

भुसावळ, जि. जळगाव

निंबा शिंदे

चोपडा, जि. जळगाव

घोटी-१,ता. इगतपुरी, जि.नाशिक

संजय पाटील

उरण, जि. रायगड

हरसुल-१,ता.त्र्यंबक, जि. नाशिक

अरविंद देसले

लोणी, ता. राहता, जि.नगर

चाळीसगाव-२, जि. जळगाव

अमृत पवार

आमगाव, जि. गोंदिया

कुसुंबा, ता. जि.धुळे

रवींद्र चौधरी

सावली, जि.चंद्रपुर

कळंबु, ता. शहादा, जि.नंदुरबार

नीळकंठ पाटील

चिमुर, जि.चंद्रपूर

मंदाणे, ता. शहादा, जि.नंदुरबार

कांतीलाल पाटील

काटोल-१, जि.नागपूर

कोरीट, ता. जि.नंदुरबार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रशासनाला पटले स्वच्छतेचे महत्त्व

0
0

\Bत्र्यंबकमध्ये कुशावर्तासह, कणखल तिर्थाची साफसफाई\B

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील कुशावर्ताच्या स्वच्छतेबाबत नगर पालिकेने तातडीने लक्ष घातले असून, पितृपंधरवड्याच्या गर्दीचा ओघ लक्षात घेत नियोजन सुरू केले आहे. कुशावर्ताच्या दुरवस्थेबाबत 'महाराष्ट्र टाइम्स'ने बुधवारच्या (दि. २६) अंकात स्वच्छतेची प्रयोग'शाळा' असे परखड वृत्त प्रकाशित करताच पालिका प्रशासनाला लागत आली.

पालिकेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मंदिराचे पुष्पपुजक उल्हास आराधी यांनी बुधवारी सकाळीच तातडीने कणखल तिर्थाची स्वच्छता मोहीम हाती घेतली. साठलेल्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याची ओरड भाविक करीत होते. बुधवारच्या स्वच्छता मोहिमेत पाण्याचा तुंबारा दुर्गंधीस कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे हे पाणी वाहते कसे राहित यासाठी नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान कार्यालयीन अधीक्षक अरुण गरूड आणि कर्मचारी यांनी बुधवार सकाळपासूनच स्वच्छतेचे काम सुरू केले आहे. कुशावर्ताच्या समोरच असलेल्या कणखल तिर्थाची दूरवस्था दूर झाली आहे. त्याचप्रमाणे कुशावर्ताठी असलेला फिल्टर प्लँट पुन्हा कार्यान्वीत करून तो महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून ताब्यात घेणार आहे.

कुशावर्त तीर्थ हे त्र्यंबक नगरीचे महत्त्वाचे तीर्थस्थान आहे. येथील स्वच्छतेबाबत अधिकाधीक काळजी घेण्यात येत आहे. स्वच्छता आणि सुशोभिकरण यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याकरिता स्वतंत्र निधी उपलबध्द करून देण्याची तयारी दर्शविली आहे. --पुरुषोत्तम लोहगावकर, नगराध्यक्ष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कालिदास’साठी स्थायीला साकडे

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक महापालिकेने केलेली कालिदास कलामंदिराची भाडेवाढ ही कलाकारांना न पेलवणारी असून, तिचा पूर्नविचार व्हावा यासाठी शहरातल्या जनस्थान व्हॉट्सअप ग्रुपच्या रंगकर्मींनी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांची बुधवारी भेट घेतली. हिमगौरी आडके यांनीही याबाबत सकारत्मकता दर्शविली असून याबाबत विचार केला जाईल, असे आश्वासन कलाकारांच्या शिष्टमंडळाला दिले.

नाशिक महापालिकेने प्रस्तावित केलेली महाकवी कालिदास कलामंदिराची करवाढ ही कलावंतांना पेलणारी नसून, सांस्कृतिक क्षेत्राचे कंबरडे मोडणारी आहे. या करवाढीमुळे नाशिकची सांस्कृतिक चळवळ धोक्यात येणार असून, बाहेरील नाटकांचे प्रयोगदेखील शहरात होणार नाहीत, असेही यावेळी आडके यांना सांगण्यात आले.

मुंबई-पुण्यात असलेल्या नाट्यगृहांच्या तुलनेत कालिदास कलामंदिराची दरवाढ ही हौशी प्रायोगिक नाट्य कलावंतांना न परवडणारी आहे. संगीत आणि नृत्याच्या क्षेत्रातील कलावंतांनाही याची झळ पोहोचणार आहे. ही दरवाढ झाल्यास बाहेरून येणारी व्यावसायिक नाटके नाशिकला येणार नाहीत. याचा परिणाम नाशिकच्या सांस्कृतिक क्षेत्रावर होणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांत सुसज्ज असलेल्या नाट्यगृहाचे भाडे साडेचार हजारापेक्षा अधिक नाही. त्यामुळे त्या तुलनेत भाडेवाढ व्हावी. नाट्यगृहाची भाडेवाढ करताना प्रायोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, बालनाट्य, सेमिनार, मीटिंग, चर्चासत्र, परिसंवाद, पुस्तक प्रकाशन, गॅदरिंग, ऑर्केस्ट्रा, व्याख्यान, हौशी नाट्य संस्था, रंगीत तालीम आदींसाठी वेगवेगळे दर आहेत. नाशिक महापालिकेनेही त्याचप्रमाणे दर आकारणी करावी. कॉर्पोरेट सेक्टरच्या सेमिनारला वेगळे दर आहेत. त्याचे दर वेगळे असावेत.

महापालिकेने कालिदास कलामंदिराचे नूतनीकरण केल्याचा दावा केला असला तरीही ते तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण नाही. नाटकासाठी लागणारे स्पॉट हे कमी दर्जाचे असल्याने स्टेजपर्यंत प्रकाशझोत येत नाही. त्याचप्रमाणे स्टेजच्या बाजूलाच पॉवरपॅक लावल्याने त्याचा आवाज रंगमंचावर येतो. त्यामुळे कलावंताला ते विचलित करणारे आहे, तसेच विंगा या लोखंडी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे स्टेजवर सेट लागू शकत नाही. नाटकाचा बॅकड्रॉप व विंगा या काळ्या रंगाच्या हव्यात. मात्र, त्या निळ्या रंगाच्या करण्यात आल्या आहेत. बहुतेक नाशिकमधील कालिदास कलामंदिर महाराष्ट्रातील एकमेव कलामंदिर अशा सुविधांनी युक्त असेल. या सुविधा व्यवस्थित होत नाही, तोपर्यंत येथे नाटकाचा प्रयोग होऊ शकत नाही. इत्यादी गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खासदार राजू शेट्टी आज सटाण्यात

0
0

सटाणा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी दुपारी उत्राणे (ता. बागलाण) येथे जाहीर नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बागलाण तालुक्यातील उत्राणे येथे सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत निवडून आलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संचालकांचा तसेच दूध आंदोलनात शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून अटक झालेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभासह शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या शेतकरी मेळाव्यात गडगडलेल्या कांद्याला अनुदान त्वरीत मिळावे, कांद्याला हमीभाव केंद्राने जाहीर करावा, सरसकट सातबारा उताऱ्यावरील कर्जमुक्त करावे, नाशिक जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, तसेच स्वामिनाथन आयोग त्वरीत लागू करावा या सह विविध मागण्यासाठी या शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अभ्यासक्रमातून पर्यटनाला गती

0
0

सौरभ बेंडाळे, नाशिक

पर्यटन विकासाला सरकारकडून अधिक चालना मिळत आहे. बदलत्या जीवनशैलीत पर्यटनासाठी पर्यटकांचा ओढा अधिक आहे. देशभरातीलच नव्हे तर जगातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटक कायम उत्सुक असतात. या पर्यटकांच्या सहली, निवास, आरोग्य, जेवण यांसह इतर महत्त्वांच्या बाबींचे नियोजन अतिशय उत्तम करावे लागते. यासाठी टुरिस्ट मॅनेजमेंट कंपन्यांची संख्या वाढत आहे. या व्यवसायाला आणि पर्यटनाला आता टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी अभ्यासक्रमातून अधिक गती मिळणार आहे.

सरकारच्या स्किल डेव्हलपमेंट योजनेच्या अंतर्गत यूजीसीच्या मान्यतेनुसार नाशिक जिल्ह्यातील पाच कॉलेजांमध्ये टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अभ्यासक्रम सुरू होत आहे. पुढील काही महिन्यांत या कॉलेजांमध्ये हा अभ्यासक्रम सुरू होत आहे. आर्टस, कॉमर्स किंवा सायन्स विभागातून बारावी उत्तीर्ण विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकणार आहेत. त्यामुळे पर्यटन क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी बारावीनंतर पर्यटन विषयात पदवी घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट डिप्लोमा हा एकमेव पर्याय होता. शहरातील केटीएचएम कॉलेज आणि पंचवटी कॉलेजमध्ये पर्यटन अभ्यासक्रमावर आधारित सर्टिफिकेट डिप्लोमाचा अभ्यासक्रम आहे. अनेक विद्यार्थी या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. मात्र, पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण फक्त एचपीटी कॉलेजमध्ये घेता येत होते. याच्या जोडीला क्रेडिट सिस्टिमवर आधारित टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना पदवी घेता येणार आहे. पदवीच्या माध्यमातून ट्रॅव्हल कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी करता येणार आहे. त्याशिवाय स्वतःची ट्रॅव्हल कंपनी किंवा पर्यटक गाइड म्हणून विद्यार्थ्यांना काम करता येणार आहे. सध्या ट्रॅव्हल टुरिझमच्या पदवी आणि डिप्लोमाचे शिक्षण घेत विद्यार्थी ट्रॅव्हल कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. अनेक नव्या ट्रॅव्हल कंपन्यांमधून विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी देण्यात येत आहेत. त्यासोबत महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या अंतर्गत सरकारी नोकरीच्या संधीदेखील विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून खुल्या होणार आहे. या व्होकेशनल अभ्यासक्रमातून पर्यटन व्यवसायाच्या विकासाला अधिक गती मिळणार आहे.

या कॉलेजांमध्ये सुरू होणार अभ्यासक्रम

गोएसो संस्थेचे एचपीटी आर्टस अँड आरवायके सायन्स कॉलेज, नाशिक

मविप्र संस्थेचे कर्मवीर रावसाहेब थोरात कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज, वणी

मविप्र संस्थेचे कर्मवरी गणपतदादा मोरे कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज, निफाड

मविप्र संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान कॉलेज, नांदगाव

व्ही. एन. नाईक संस्थेचे कला व विज्ञान कॉलेज, दिंडोरी

ट्रॅव्हल अँड टुरिझमची पदवी घेतल्यानंतर अनेक ट्रॅव्हल कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे. विद्यार्थ्यांना परदेशी भाषेचे ज्ञान असल्यास अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतात. करिअरचा नवा पर्याय म्हणून विद्यार्थी या क्षेत्राकडे पाहत आहेत.

- डॉ. दत्तात्रय हरपळे, समन्वयक, ट्रॅव्हल टुरिझम विभाग, एचपीटी कॉलेज

नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. पण, ट्रॅव्हल टुरिझम क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत आहेत. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या दृष्टीने पर्यटन क्षेत्रातील पदवी विद्यार्थ्यांसाठी लाभदायक असणार आहे.

- डॉ. पी. एस. कुदनर, समन्वयक, ट्रॅव्हल टुरिझम विभाग, मविप्र कॉलेज, वणी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दो पल’ मधून लता मंगेशकर यांना मानवंदना

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतरत्न गानसरस्वती लता मंगेशकर यांच्या ८९ व्या वाढदिवसानिमित्त फेदर टच स्टुडिओजच्या वतीने 'दो पल' या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवारी (दि. २९ सप्टेंबर) सायंकाळी ६.३० वाजता स्वर्णिमा सभागृह, बापू बंगल्यासमोर, इंदिरानगर येथे होणार असून, महाराष्ट्र टाइम्स कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहेत.

लता मंगेशकर यांनी सात दशकांत ९८० हिंदी चित्रपटांतून गाणी गायली असून, मदन मोहन आणि त्यांच्यातील सांगीतिक प्रवासाचे सुरेल रसग्रहण या कार्यक्रमात सादर करण्यात येणार आहे. लता मंगेशकर या ९० व्या वर्षात पदर्पण करीत असून, त्यांच्या ७५ वर्षांच्या सुरेल प्रवासाला नाशिककर कलावंतांच्या वतीने मानवंदना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमात केवळ गाणी नाहीत तर संगीतकार मदनमोहन आणि लता मंगेशकर यांच्या सांगीतिक प्रवासाचे अनोखे रसग्रहण सादर केले जाणार आहे. कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन जयेश आपटे यांचे असून, संहिता आणि निवेदन रुपाली देशमुख यांचे आहे. रसिका नातू आणि शिवानी जोशी या लताजींची गाणी सादर करतील. प्रमोद पवार आणि कृपा परदेशी वादनाची साथ करतील. तांत्रिक सहाय्य आदित्य राहणे आणि शुभम जोशी यांचे आहे. या कार्यक्रमाला तन्वी अमित यांचे विशेष सहाय्य लाभले आहे. स्वर्णिमा सभागृह यांचेही सहकार्य आहे. या कार्यक्रमासाठी शुभम जोशी, फेदर टच स्टुडिओज (मोबाइल नं. ८१४९४८६३९५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाट्य परिषदेचे निवेदन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कालिदास कला मंदिराची झालेली दरवाढ रद्द करावी यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखेतर्फे स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हौशी कलाकारांसाठी नाशिक महापालिका सहकार्य करेल, अशी ग्वाही यावेळी हिमगौरी आहेर-आडके यांनी नाट्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.

या शिष्टमंडळात नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, सुनील ढगे, जयप्रकाश जातेगावकर, राजेंद्र जाधव, उमेश गायकवाड यांच्यासह प्रतिनिधींचा समावेश होता. यावेळी सर्व गटनेते, महापौर, उपमहापौर यांना देखील निवेदन देण्यात आले. यावेळी रवींद्र कदम आणि सुनील ढगे यांनी कलाकारांची बाजू मांडली. सुनील ढगे म्हणाले की, ही दरवाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे नाशिकची सांस्कृतिक चळवळ थांबणार आहे. रवींद्र कदम यांनी हौशी कलाकारांची बाजू मांडली. ते म्हणाले की, हौशी कलाकारांना नाटक करणे मुष्कील होणार आहे. जातेगवकर म्हणाले की, महाराष्ट्रातील कोणत्याच नाट्यगृहाचे इतके दर नाहीत. तेव्हा पुन्हा विचार करावा, असे त्यांनी सांगितले. यावेळी सभापतींनी याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘डिजिटल सुविधांचा वापर वाढवा’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात सद्य:स्थितीत घरपट्टी १५ तर, पाणीपट्टीची १४ टक्के वसुली ही डिजिटल पेमेंटद्वारे होत आहे. डिजिटल पेमेंटचा वापर वाढविण्यासाठी महापालिकेने ५२ सेवा ऑनलाइन केल्या असून, महापालिकेचे मोबाइल ॲप व वेबसाइटवरून या सेवांचे ऑनलाइन पेमेंट करता येणार आहे. डिजिटल पेमेंट सुरक्षित असून, त्याची पावतीही मिळते. नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात डिजिटल पेमेंटचा उपयोग करावा, असे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

महापालिका, प्रधान संचार लेखा कार्यालय आणि नाशिक महानगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी डिजिटल पेमेंट मेळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बीएसएनएलचे महाप्रबंधक महाजन, लेखाधिकारी सुहास शिंदे, संचार लेखाच्या विभा मिश्रा, दीप्ती अरोरा उपस्थित होत्या. तुकाराम मुंढे यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या डिजिटल पेमेंट धोरणानुसार महानगरपालिकेने डिजिटल पेमेंटसाठी घेतलेल्या पुढाकाराची माहिती दिली. केंद्र शासन व राज्य शासनाने डिजिटल पेमेंट वाढण्याच्या धोरणानुसार डिजिटल पेमेंटचा नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात वापर करून शासनाच्या धोरणास वाव द्यावा, असे आवाहन महाजन यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंदा दिवाळीपूर्वीच बोनस

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सत्ताधारी भाजपने यंदा दिवाळीला अजून सव्वा महिन्याचा अवकाश असतानाच पालिकेतील सात हजार कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाची शुभवार्ता दिली आहे. गेल्या महासभेत झालेल्या ठरावावर महापौर रंजना भानसी यांनी बुधवारी सह्या केल्या असून, तो ठराव मंजुरीसाठी नगरसचिवांमार्फत प्रशासनाकडे रवाना करण्यात आला आहे. गेल्या वेळेपेक्षा जास्त सानुग्रह अनुदान देण्यासह दिवाळीच्या पंधरा दिवस आधीच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांवर सानुग्रह अनुदान जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

दरवर्षी दिवाळीनिमित्त पालिकेच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सानुग्रह अनुदानाचा घोळ सुरू होतो. सानुग्रह अनुदान किती द्यायचे यावरून वाद निर्माण होतात. त्यामुळे यंदा हे वाद टाळण्याची खबरदारी सत्ताधारी भाजपने घेतली आहे. गतवर्षी दिवाळीत प्रत्येकी १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. त्यामुळे यंदाही कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वेध लागले होते. चालू वर्षी कर्मचाऱ्यांनी प्रत्येकी १७ ते २० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी केली होती. गेल्या महासभेत भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर, शिवसेना प्रणित म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रविण तिदमे व कॉँग्रेस नगरसेवक समीर कांबळे यांनी यासंदर्भातील प्रस्ताव मांडला होता. त्याला महासभेने मंजुरी दिल्यानंतर बुधवारी महापौर रंजना भानसी यांनी या ठरावावर स्वाक्षरी करत, प्रशासनाकडे अंमलबजावणीसाठी हा ठराव पाठवला आहे. नुकत्याच झालेल्या महासभेच्या मान्यतेसाठी सादर केला होता. सध्याच्या महागाईचा विचार करता गतवर्षीपेक्षा अधिक सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच सानुग्रह अनुदानाची रक्कम दिवाळीच्या १५ दिवस अगोदर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बॅँक खात्यावर जमा करण्याचा निर्णय या ठरावाद्वारे घेण्यात आला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते दिनकर पाटील, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके तसेच सर्वपक्षीय गटनेत्यांशी व कामगार संघटनेच्या नेत्यांशी चर्चा करून सानुग्रह अनुदानाची रक्कम निश्चित करण्यात येईल, असे महापौर भानसी यांनी सांगितले.

यांना मिळणार सानुग्रह अनुदान

महापालिकेतील स्थायी पदावरील सर्व अधिकारी व कर्मचारी, फिक्स पे वरील कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, रोजंदारी कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी, मानद वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी मुख्य सेविका, सेविका, मदतनीस, अंशकालिन शिक्षिका व शिक्षण मंडळावरील सर्व कर्मचारी, शिक्षण मंडळावरील सुरक्षा रक्षक, खतप्रकल्पावरील कर्मचारी, सर्व शिक्षा अभियानांतर्गत मानधनावरील कर्मचारी, मनपा क्षयरोग नियंत्रण सोसायटीतील सर्व कर्मचारी, आरसीएच प्रकल्पांतर्गत कार्यरत कर्मचारी, मनपा बुस्टर पंपीग स्टेशनवरील कर्मचारी, एनयुएचएमवरील १६२, एनयुएलएममधील सात कर्मचाऱ्यांना हे सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images