Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

खोटा दाखला देवून वाढवली निवृत्ती

$
0
0

नाशिक : महापालिकेच्या महेश जाधव या कर्मचाऱ्यांने शाळेचा बनावट दाखला देवून सेवा वाढवल्याचे समोर आले आहे. संबंधित जाधव हे सेवानिवृत्त झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून, त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे. सोबतच त्यांचे निवृत्ती वेतनही थांबवण्यात आले आहे. जाधव यांनी महापालिकेत सादर केलेल्या शाळेच्या दाखल्यावर जन्मतारीख १९६० दर्शवली आहे. परंतु प्रत्यक्षात त्यांची जन्मतारीख ही १९५६ आहे. सेवा वाढवण्यासाठी त्यांनी हा प्रकार केल्याचे समोर आल्यानंतर त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहिद जवानाच्या कुटुंबाला मिळाले घर

$
0
0

'हॅबिटॅट'कडून लाखमोलाचा आधार

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

पाच अतिरेक्यांना कंठस्नान घालून त्यांच्याशी लढताना धारातीर्थी पडलेल्या भयाळे (ता. चांदवड) येथील शहीद शंकर शिंदे यांच्या वृद्ध आई-वडिलांना

घर बांधून देत हॅबिटॅट फॉर ह्युमॅनिटी ऑफ इंडिया या संस्थेने परिस्थितीने गांजलेल्या अवस्थेत त्यांना लाखमोलाचा आधार दिला.

लष्करी जवान शंकर शिंदे याला अतिरेक्यांशी लढताना फेब्रुवारी २०१६ मध्ये वीरमरण आले. मुलाच्या या असामान्य मरणाचे अप्रूप व अभिमान बाळगणाऱ्या शिंदेच्या कुटुंबीयांना मात्र पुढील दोन वर्षात मोठ्या आर्थिक अडचणींना, हलाखीच्या आयुष्याला सामोरे जावे लागले. मोडकळीला आलेले जुने घर, उदरनिर्वाहाचा प्रश्न, दुष्काळी भागातील नापिकी हे प्रश्न जगणे मुश्किल करत असतानाच माणूसपणाचा परिसस्पर्श झालेली हॅबिटॅट संस्था त्यांच्या मदतीला धावली. शिंदे कुटुंबियांना त्यांच्या जागेतच लाखमोलाचे घर बांधून देऊन संस्था पदाधिकाऱ्यांनी जणू शिंदे परिवारासह गावकाऱ्यांच्याच मनात घर केले. राजन सॅम्युएल यांनी शिंदे कुटुंबीयांना घर बांधून देण्याची जबाबदारी स्वीकारली. नीलेश करकरे, ऋतुजा पोवळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकल्पाला मूर्त रूप दिले.

श्रमदानासाठी आले शेकडो हात

ग्रामपंचायतीकडून माहिती घेण्यापासून घर साकार करेपर्यंत सगळ्या गोष्टी निष्ठेने करण्यात आल्या. विशेष म्हणजे संस्था स्वयंसेवकांच्या मदतीला गावातील सहहृदयी माणसे धावली. सर्वांचे हात श्रमदानाला पुढे आले. संस्थेने आर्थिक सहाय्य केले. लाखमोलाचे घर साकार करत हॅबिटॅटने शहीद शंकर यांना आगळी मानवंदना दिली. काही दिवसांपूर्वी नव्या घराची चावी गावातील सरपंच व मान्यवरांच्या उपस्थितीत शिंदे कुटुंबीयांना देण्यात आली.

आमचे घर पडले होते. राहण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. घरात व्हेंटिलेशन नव्हते, शौचालयसारखी प्राथमिक सुविधाही नव्हती. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने घर बांधणे कठीण होते. पण 'हॅबिटॅट'ने डोळे पुसले, नवे घर दिले. या माणुसकीच्या देवदूतांचे आभार मानले तेवढे कमीच ठरतील.

- सुमन चंद्रभान शिंदे, शहीद शंकर यांच्या आई

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंद काळतही औषधांचा पुरवठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऑल इंडिया ऑर्गनायझेशन केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट यांनी शुक्रवारी (दि. २८) सरकारच्या धोरणांविरुद्ध राज्यव्यापी बंद पुकारला आहे. बंद काळात औषध पुरवठा सुरळीत राहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत सर्व सरकारी, निमसरकारी रुग्णालयात व रुग्णांच्या सोयीकरिता खासगी हॉस्पिटल्स व वैद्यकीय व्यावसायिकांना पुरेशा प्रमाणात औषधसाठा पेशंटला उपलब्ध करुन द्यावा, असे अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

प्रशासनातर्फे बंद काळात स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षात सहाय्यक आयुक्त प्र. ब. मुंधडा (९९६७९१४११६), औषध निरीक्षक तथा सहय्यक आयुक्त सं. ने. काले (९८६७२५८२५९), औषध निरीक्षक शहर जी. द. जाधव (९४०४६२९३३०), औषध निरीक्षक शहर सु. सा. देशमुख (९८५०१७७८५३), औषध निरीक्षक ग्रामीण चं. अ. मोरे (९४२३४९५०६९) अन्न व औषध प्रशासन, कक्ष क्र. २३, ५ मजला उद्योग भवन, आयटीआय सिग्नल, त्र्यंबक रोड, सातपूर येथे उपस्थित असतील. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक ०२५३-२३५१२०१ यावर संपर्क साधावा, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मॉल आक्रमणाला विरोध

$
0
0

व्यापाऱ्यांचा आज बंद; ५० हजार दुकानांचे व्यवहार होणार ठप्प

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मेट्रो मॉल व येऊ घातलेल्या वॉलमार्ट व फ्लिपकार्ड यांच्या कराराला विरोध करण्यासाठी शहरातील ५० हजाराहून अधिक दुकाने शुक्रवारी (दि. २८) बंद राहणार आहे. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स व व्यापारी महासंघ या बंदमध्ये सामील होणार आहे. सर्व व्यापारी रविवार कारंजा येथे सकाळी १० वाजता एकत्र येणार आहे. त्यानंतर चांदीच्या गणपतीची आरती करून ते जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे.

बंदमध्ये सामील होण्यासाठी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांच्या अध्यक्षतेखाली सारडा संकुल विविध व्यापारी संघटनेची बैठक झाली. त्यानंतर गुरुवारी सोशल मीडियावरुन या बंदचे आवाहन करण्यात आले. हा बंद कडकडीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी त्यात किती

किती व्यापारी सामील होतात याबाबत अद्याप पूर्ण माहिती मिळू शकलेली नाही.

बंदमध्ये व्यापाऱ्यांनी सामील व्हावे यासाठी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया, नाशिक धान्य किराणा घाऊक व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, राजेश मालपुरे, भावेश मानेक यांनी आवाहन केले आहे. नाशिक किरकोळ किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शेखर दशपुते, विजय कुलकर्णी, प्रसाद जाजू, नाशिक मोटार मर्चंटचे अध्यक्ष चढ्ढा, हार्डवेअर मर्चंटचे संतोष लोढा, प्लायवुड मर्चंटचे हसमुख पोकार, नाशिक मोटार मर्चंटचे माजी अध्यक्ष सुरेश चावला आदींसह विविध व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिक बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे.

मेडिकल दुकानेही बंद

नाशिक डिस्ट्रिक्ट केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने या बंदला पाठिंबा दर्शविला असून जिल्ह्यातील तब्बल साडेचार हजार केमिस्ट दुकाने बंद राहणार आहे. औषधांची ऑनलाइन विक्री आणि ई-फार्मसीच्या निषेधार्थ देशभरातील औषध विक्रेते शुक्रवारी बंद ठेवणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठांसाठी आता विरंगुळा केंद्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या वतीने आता शहरातील जेष्ठांच्या करमणुकीसाठी विरंगुळा केंद्र सुरू केले जाणार असून, त्यासाठी नगरसेवकांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

महापालिकेच्या समाजमंदिरांमध्येच ही विरंगुळा केंद्रे प्रस्तावित केले जाणार असून, त्यात ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक सुविधांसह आरोग्य तपासणीचीही सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी दिली आहे. यासंदर्भातील धोरण तयार करण्याचे काम सुरू असून नगरसेवकांकडून प्रस्ताव आल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले आहे. त्यामुळे ज्येष्ठांसाठी हा मोठा आधार ठरणार आहे.

सध्या शहरातील ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी उद्याने हेच आधार आहेत. परंतु, उद्यानांचीही अवस्था फारसी समाधानकारक नसल्याने ज्येष्ठांची परवड होत आहे. धार्मिक स्थळे ही ज्येष्ठांसाठी आधार होती. परंतु, न्यायालयाच्या निर्णयाने गल्लीबोळासह रस्त्यांवरील धार्मिक स्थळे हटविण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठांची ही परवड पाहता, त्यांच्यासाठी विरंगुळा केंद्र तयार करण्याची संकल्पना सभापती हिमगौरी आहेर-आडके यांनी प्रशासनाला सुचवली आहे. प्रशासनानेही या संकल्पना मान्य केली असून, त्यासाठी नगरसेवकांकडूनच प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. प्रभागांमध्ये असलेल्या समाजमंदिराच्या जागांमध्ये ही विरंगुळा केंद्रे सुरू केली जाणार आहेत. त्यासाठी महापालिका या जागांवर आवश्यक सुविधा व साहित्य उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी लागणारा खर्चही महापालिकाच करणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक प्रभागात एक विरंगुळा सुरू केले जाणार असून, त्यासंदर्भात धोरण ठरवण्याची कारवाई प्रशासनाकडून सुरू आहे. महासभेने मान्यता दिल्यास ज्येष्ठांसाठी हा मोठा आधार ठरणार आहे.

आरोग्य तपासणी होणार

महापालिकेकडून ज्येष्ठांच्या करमणुकीसाठी सुरू करण्यात येणाऱ्या विरंगुळा केंद्रात ज्येष्ठांना आरोग्य सुविधाही देण्याचा मानस आहे. या केंद्रामध्येच ज्येष्ठांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच प्राथमिक उपचारही देण्याचा मानस आहे. अवघड उपचारही महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये करण्याचे प्रस्तावीत आहे. त्यामुळे या विरंगुळा केंद्रात करमणूक साधनांसह उपचाराचाही सुविधा उपलब्ध होणार असल्याने ज्येष्ठांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ तिघांवर दावा दाखल करणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नूतन बांधकाम अनियमितता संदर्भात माजी पदाधिकारी प्रमुख कार्यवाह मिलिंद जहागिरदार, अर्थसचिव स्वानंद बेदरकर आणि कार्याध्यक्ष विनया केळकर यांच्यावर असलेला १७ लाख रुपयांचा ठपका आर्किटेक्ट अनिल चोरडिया यांच्या अहवालामुळे ठळक होत असून, यासंदर्भात धर्मादाय आयुक्तांकडे दावा दाखल करण्याचा निर्णय सार्वजनिक वाचनालयाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतर्फे घेण्यात आला. गुरुवारी मु. शं. औरंगाबादकर सभागृहात वार्षिक सर्वसाधारण सभा झाली.

सावाना संस्थेच्या आवारात करण्यात आलेल्या नूतनीकरण कामासंदर्भात आर्किटेक्ट यांनी मोजमाप करून सादर केलेल्या अहवालासंदर्भात चर्चा करण्यात येणार तसेच जबाबदार व्यक्तींविरूद्ध काय कारवाई करायची, याचा निर्णय सभेस उपस्थित सभासद घेणार, असा विषय विषयपत्रिकेत मांडण्यात आला होता. त्यानुसार सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर प्रचंड गोंधळच्या वातावरणात सभा सुरू करण्यात आली.

अंदाजपत्रक मंजूर करताना सभासदांनी प्रचंड गोंधळ घातला. सावाना सभेस येताना अहवाल हातात दिला जातो तो आठ दिवस आधी देण्यात यावा अशी सूचना भालचंद्र देव यांनी करताच सर्वच सभासदांचा बांध फुटला आणि प्रत्येकाने व्यासपीठावर येत अहवाल घरी देण्यात यावा अशी सूचना मांडली. त्यावर श्रीकांत बेणी यांनी पुढील वर्षापासून ताळेबंद तसेच अंदाजपत्रक घरपोच देण्यात येईल असे सांगितले. श्रीकृष्ण शिरोडे, हिराताई कुलकर्णी यांनी ही सूचना मांडली. तर विकास तराडे यांनी परशुराम साईखेडकर नाट्यगृह वातानुकूलीत करून कालिदासवर बहिष्कार टाकावा व प. सा. वापरावे असे सांगितले. त्यावर बेणी यांनी मेन्टेनन्ससाठी त्याचीही भाडेवाढ करावी लागेल असे सांगताच देणगीदारांकडून देणगी घ्या, खर्च कमी करा अशा सूचना अनेकांनी केल्या. सभेत गोंधळ वाढल्यानंतर अॅड. अजय निकम यांनी विषयानुसार कामकाज करावे आयत्या वेळेचे विषय नंतर घ्यावे अशी सूचना केली. त्यावर बराच वेळ गोंधळ माजला. यशवंत पाटील, सुहास टिपरे यांनी अनुक्रमे अहवाल घरी द्यावा व समितीवर जे निवडले आहेत ते बैठकांना तरी येतात का याकडे लक्ष वेधले. मुकुंद बेणी यांनी प्रकाशकांकडून पुस्तके घेत असताना कोणते निकष लावले जातात अशी विचारणा केली. तसेच सावानाचे कर्मचारी पुस्तक घेण्याच्या बदल्यात कमिशन घेत असल्याचा आरोपही बेणी यांनी यावेळी केला. माजी पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा विषय आल्यानंतर श्रीपाद कुलकर्णी यांनी असे करता येणार नसल्याची सूचना मांडली. असे केल्यास सावानाच्या कार्यकारिणीवर जे येथून पुढे काम करतील त्यांच्यात दहशत निर्माण होईल असा रास्त मुद्दा त्यांनी मांडला.

प्रारंभी संजय करंजकर यांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली. अॅड. भानुदास शौचे यांनी इतिवृत्त वाचन केले. तसेच शंकर बर्वे, गिरीश नातू यांनी ताळेबंद-जमाखर्च सादर केला.

..तर पालिकेवरही दावा

जुन्या वास्तुंची घरपट्टी माफ करण्यात यावी असे परिपत्रक १९९५ मध्ये शासनाने काढले होते. त्यानुसार सावानाची घरपट्टी माफ व्हावी असे पत्र महापालिकेला दिले होते. मात्र, त्यांनी जप्तीची नोटीस पाठवल्यावर नाईलाज होऊन काही रक्कम भरावी लागली. पुन्हा यंदाच्या वर्षीची रक्कमही भरावी लागली परंतु, याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार सुरू असून त्यांनी भरलेली रक्कम परत न दिल्यास त्यांच्यावर दावा दाखल करण्यात येणार असल्याचे प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी यांनी सांगितले.

-अहवाल विषयावर रेंगाळली सभा

- पसा वातानुकुलीत करण्यावरून खडाजंगी

- आर्थिक ताळेबंद घरी देण्यावरून वाद

- पुस्तकांमागे कर्मचारी कमीशन खात असल्याचा आरोप

- ४६ हजार ९४४ पुस्तके गायब झाल्याचा सभासदाचा दावा

- जहागिरदार यांच्याकडून पैसे वसूल करण्याची मागणी

- नाट्यगृह दुरुस्तीबाबत बेणींचे आश्वासन

न्यायालयात जाणार नाही असे जाहीरनाम्यात मग जातात कसे, सभासदांचा सवाल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेख हत्येतील चौघांना कोठडी

$
0
0

शेख हत्येतील चौघांना कोठडी

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

रेल्वेतील अवैध खाद्य पेय विक्रीच्या वर्चस्वाच्या वादातून झालेल्या समीर शेख याच्या हत्येप्रकरणी मनमाड न्यायालयाने गुरुवारी चार आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी तर १३ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली.

मनमाडच्या एकता नगरमध्ये ३८ जणांच्या टोळक्याने बुधवारी (दि. २६) पूर्व वैमनस्य आणि खाद्यपेय विक्रीच्या वादातून समीर शेख याच्यावर सशस्त्र हल्ला चढवत बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी पोलिसांनी १७ संशयितांना गुरुवारी मनमाड न्यायालयात उभे केले असता चौघांना तीन ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी तर १३ जणांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

इतर संशयितांच्या तपासासाठी मनमाड पोलिसांची विविध पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरच अटक होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांचे मिशन प्रभाग तीन ऑक्टोबारपासून

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या वॉक विथ कमिशनर या उपक्रमाला उत्तर देण्यासाठी महापौर रंजना भानसी सज्ज झाल्या असून, येत्या ३ ऑक्टोबरपासून त्यांचा 'मिशन प्रभाग' हा दौरा सुरू होणार आहे. नाशिकरोडपासून या दौऱ्याची सुरूवात होणार असून, एका आठवड्यात चार प्रभागांना भेटी देण्यात येणार आहे.

अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची सक्ती केली जाणार असल्याने या अधिकारी किती प्रतिसाद देतात याकडे लक्ष लागून आहे.

पालिकेत सध्या आयुक्त तुकाराम मुंढेंकडून लोकप्रतिनिधींना महत्त्व दिले जात नसून, नगरसेवकांना केवळ कागदोपत्रीच किंमत ठेवली आहे. त्यामुळे पालिकेत सध्या मुंढेंविरुद्ध सत्ताधारी भाजप असा संघर्ष सुरूच आहे. नगरसेवकांच्या कामांना केराची टोपली दाखवली जात असताना, मुंढेंकडून मात्र स्वत:ची प्रतिमा उजळण्यासाठी वॉक विथ कमिशनरसारखे उपक्रम सुरू केल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला जात आहे. गेल्या महासभेत आयुक्तांविरोधातील खदखद थेट नगरसेवकांनी व्यक्त केल्यानंतर महापौर रंजना भानसी आक्रमक झाल्या होत्या. त्यांनी नगरसेवकांचे प्रश्न ऐकून घेण्यासह नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महासभेतच महापौर प्रभागाच्या दारी या योजनेची घोषणा केली होती. त्यामुळे आयुक्तांच्या वॉक विथ कमिशनर या उपक्रमाला भाजपकडून जशास तसे उत्तर देण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याची चर्चा आहे. गुरूवारी महापौर रंजना भानसी यांनी 'मिशन प्रभाग' या मोहिमेचा शुभारंभाची तारीख जाहीर केली आहे. येत्या ३ ऑक्टोबरपासून महापौर दर आठवड्याला चार प्रभागांना भेटी देणार आहेत. प्रभागात जाण्यापूर्वी तेथील चार नगरसेवकांकडून प्रभागाची सद्यस्थितीच्या कामांची माहिती घेतली जाणार आहे. महापौर प्रत्यक्ष जावून या कामांचीही पाहणी करणार असून, नागरिकांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे महापौरांच्या या प्रभाग मिशनकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत.

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

आयुक्त मुंढेंच्या वॉक विथ कमिशनरला प्रशासनातील सर्व अधिकारी झाडून उपस्थित असतात. त्याच धर्तीवर महापौरांचाही मिशन प्रभाग हा उपक्रम राहणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांनाही पाचारण करण्यात येणार आहे. महापौरांनी आदेश दिल्यास आयुक्तांसकट सर्व अधिकाऱ्यांना उपस्थित रहावे लागणार आहे. परंतु गेल्या सात महिन्यांचा अनुभव पाहता पालिकेतील अधिकारी हे महापौरांसह पदाधिकाऱ्यांचे फोनही स्वीकारत नाहीत. त्यामुळे या महापौरांच्या मिशन प्रभागाकडे अधिकारी कसे बघतात, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कृषिमूल्य आयोगावर सरकारचा अंकुश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, सटाणा

'देशातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कृषिमूल्य आयोगाची स्थापन करण्यात आली. शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य भाव मिळावा, अन्न, धान्य आयात निर्यात संदर्भात योग्य धोरण ठरवावे यासाठी कृषिमूल्य आयोग काम करते. मात्र, कृषिमूल्य आयोग सरकारच्या अधिपत्त्याखाली चालत असल्याने सरकारचा अंकुश त्यावर आहे. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणे कठीण झाले आहे. यामुळे निवडणूक आयोगाप्रमाणे कृषिमूल्य आयोग देखील स्वायत्त व्हायला हवा. तर शेतकऱ्यांना न्याय मिळेल.' असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांनी व्यक्त केला. तालुक्यातील उत्राणे गावात झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.

खा. शेट्टी म्हणाले,'२०१४ च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरकार आल्यास उत्पन्न खर्चावर आधारित दीड पट अधिक हमीभाव देऊ, असे आश्वासन दिल होते. मात्र, सत्तेत आल्यावर भाजप सरकारने देखील शेतकऱ्यांचा विश्वासघात केला.' केंद्र सरकारतर्फे कांद्यावर प्रक्रिया प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात आणण्यासाठी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांसोबत आपण देखील प्रयत्न करणार असल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले.

यावेळी दूध आंदोलनात अटक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. नामपूर बाजार समितीतील नवनियुक्त संचालकांचा सत्कार खा. शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला. मेळाव्यात स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, सातबारा कोरा करावा, वीजबील माफ करावीत, हमीभावाचा कायदा करावा, या मागण्या मांडण्यात आल्या. पावसाने पाठ फिरविल्याने राज्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. मेळाव्याचे आयोजक दिपक पगार, प्रदेश अध्यक्ष प्रकाश पोपळे, राज्य प्रवक्ते संदीप जगताप, नाना बच्छाव, महिला प्रदेशाध्यक्ष रसिका ढगे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॅरम स्पर्धेत धुळ्याचे महंमद जैद, वैष्णवी पाटील विजयी…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा क्रीडा अधिकारी, नाशिक यांच्या वतीने आणि नाशिक जिल्हा कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने नाशिकच्या जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित केलेल्या विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत १४ वर्षाआतील मुले आणि मुली गटात धुळयाचे महंमद जैद आणि वैष्णवी पाटील विजयी झाले.

या स्पर्धेत नाशिक जिल्हा, नाशिक महानगर, जळगाव महानगर, जळगाव जिल्हा, धुळे महानगर, धुळे जिल्हा, आणि नंदुरबार येथील खेळाडूंनी सहभाग घेतला. यामध्ये मुलांच्या अंतिम लढतीत धुळ्याच्या एल. एम. सरदार शाळेच्या खेळाडूंनी वर्चव राखले आणि याच शाळेच्या महंमद जैदीने विजेतेपद तर मोहमद सोहेलने उपविजेतेपद पटकावले. तर मुलीमध्ये शिरपूरच्या एच. आर. पटेल शाळेच्या वैष्णवी पाटीलने या स्पर्धेत आपली छाप सोडली आणि या स्पर्धेचे मुलींचे विजेतेपद पटकावले तर याच शाळेच्या हेतल पटेलने उपविजेतेपद मिळविले.

या स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू अंजना ठमके, छत्रपट पुरस्कार प्राप्त क्रीडा संघटक अशोक दुधारे, आनंद खरे, कॅरमच्या आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा छत्रपती पुरस्कार प्राप्त आयेशा शेख, राजेश क्षत्रिय, प्रशांत भाबड, अशोक कचरे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी केले.

स्पर्धेचा निकाल

१४ वर्षे मुली

वैष्णवी पाटील (शिरपूर, धुळे), हेतल पटेल (शिरपूर,धुळे), वसुंधरा आहेर (रचना शाळा, नाशिक), कल्याणी बोंडे (रचना शाळा, नाशिक), रष्मीन जाफर खाटीक (धुळे), कल्याणी रघुवंशी (शिरपूर).

१४ वर्षे मुले

महंमद जैद (धुळे), मोहमद सोहेल (धुळे), निसर्ग पावरा (शिरपूर), दर्शन रजाळे (अमळनेर), शेख हुझेफा जाकीर (जळगाव),

यासिर हुसेन इकबाल (धुळे).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवीण ठिपसे यांचा उद्या होणार सत्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा बुद्धिबळ संघटना व नाशिक एज्युकेशन सोसायटी यांच्यातर्फे इंटरनॅशनल ग्रॅड मास्टर प्रवीण ठिपसे यांचा सत्कार क्रीडा मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत शनिवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता रंगुबाई जुन्नरे शाळा, काठेगल्ली, द्वारका येथे सत्कार करण्यात येणार आहे.

भारताच्या विश्वनाथन आनंद याने २९ सप्टेंबर २००७ रोजी जागतिक बुद्धिबळ विजेता झाला. भारताला बुद्धिबळ क्षेत्रात सर्वोच्च ओळख निर्माण झाली. चॅलेंजर चेस अकादमीचे संचालक शरद वझे यांनी २००८ पासून हा दिवस विजय दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा करण्यास सुरवात केली. या दिवसाचे औचित्य साधून हा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. हा विजय दिवस क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत संघटनेने साजरा करण्याचे ठरविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुणे विद्यापीठात साकारणार ‘भाषाबन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामध्ये उद्या (दि. २९) 'पेन इंटरनॅशनल काँग्रेस' या आंतरराष्ट्रीय स्तरावरील साहित्यविषयक परिषदेमध्ये सहभागी झालेल्या विविध देशांतील साहित्यिकांचे स्वागत केले जाणार आहे. या परिषदेमध्ये ८० देशांमधील सुमारे १८० साहित्यिक सहभागी होणार आहेत.

साहित्यिकांच्या औपचारिक स्वागतासहितच आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्रामध्ये जगातील सुमारे सहा हजार भाषणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 'भाषाबना'ची निर्मिती आमंत्रित साहित्यिकांच्या हस्ते करण्यात येणार आहे. 'या भाषाबनातील रोपे साहित्यिकांच्या हस्ते लावण्यात येतील. जागतिक पातळीवरील भाषा समृद्धीचे प्रतिनिधित्व हे भाषाबन करेल,' अशी माहिती आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी यावेळी बोलताना दिली.

कार्यक्रमास कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच प्र-कुलगुरू डॉ. एन एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, पेन इंटरनॅशनलचे संचालक डॉ. कार्ल्स टोर्नर व अध्यक्ष जेनिफर क्लेमंट, प्रसिद्ध भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी हे देखील या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. पेन इंटरनॅशनल काँग्रेसची ही भारतामधील पहिलीच परिषद आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या परिषदेचे 'इंटलेक्चुअल पार्टनर' आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समाधान गवळी, योगेश लभडे यांना कांस्य

$
0
0

रोईंग स्पर्धेत पोलिस दलाचे यश

…म. टा. प्रतिनिधी,नाशिक

अखिल भारतीय पोलिस रोईंग वॉटरस्पोर्ट स्पर्धेत नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे राष्ट्रीय खेळाडू समाधान गवळी व नाशिक शहर आयुक्तालयाचे योगेश लभडे यांनी कांस्यपदक पटकावले.

पंजाब राज्यातील चंदिगड शहरात २२ सप्टेंबर पासून १८ व्या अखिल भारतीय पोलिस रोईंग वॉटरस्पोर्ट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पोलिस दलातर्फे नाशिक ग्रामीणचे रोईंगपटू राष्ट्रीय खेळाडू समाधान गवळी व नाशिक शाहर पोलिस आयुक्तालयाचे योगेश लभडे यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत डबल स्कल या रोईंग क्रीडा प्रकारात समाधान गवळी व योगेश लभडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र पोलिस दलास कांस्यपदक मिळवून दिले. राष्ट्रीय पातळीवर झालेल्या सदर रोईंग स्पर्धेत देशभरातील एकूण २२ संघांनी सहभाग नोंदविला होता.

नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे समाधान गवळी हे राष्ट्रीय पातळीवरील रोईंगपटू असून त्यांनी ८ वर्षांपासून महाराष्ट्र राज्य पोलिस दलातर्फे अखिल भारतीय पोलिस रोईंग स्पर्धेत यश संपादन करून सुवर्ण, रजत तसेच कांस्य पदक मिळविले आहे. त्यांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करून नाशिक ग्रामीण पोलिस दलासह महाराष्ट्र राज्य पोलिस दलाचा नावलौकिक वाढविला असून त्यांना सहायक पोलिस उपनिरीक्षक पदी पदोन्नतीही देण्यात आली आहे. सध्या ते नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून नवीन पोलिस कर्मचाऱ्यांना रोईंगसह विविध क्रिडा प्रकारांचे प्रशिक्षण देत आहेत. समाधान गवळी व योगेश लभडे यांचे महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी विशेष अभिनंदन केले आहे. तसेच नाशिक शाहर पोलिस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल, विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. छेरिंग दोरजे, पोलिस अधीक्षक नाशिक ग्रामीण संजय दराडे यांनीही दोन्ही खेळांडूचे अभिनंदन करून भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करावी यासाठी शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूत नाशिक राज्यात अव्वल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मागील नऊ महिन्यांत स्वाइन फ्लूमुळे नाशिकमध्ये ३० नागरिकांचा बळी गेला. यात नाशिक शहर, जिल्हा तसेच आजुबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. हे प्रमाण राज्यात सर्वाधिक असून, स्वाइन फ्लूचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ऐन सप्टेंबर महिन्यात पावसाने दडी मारली. ऑक्टोबर हीट जाणवण्यास सुरुवात झाली असली तरी थंडीचा कडाकाही वाढू शकतो. आरोग्य यंत्रणेसाठी ही धोक्याची घंटा ठरली आहे. राज्यात पुणे आणि नाशिकमध्ये यंदा स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून, नाशिकमध्ये आतापर्यंत ३० जणांचा बळी गेला आहे. यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक बळी सप्टेंबर महिन्यातच गेले आहेत. राज्य आरोग्य विभागाने नाशिक तसेच पुणे येथील स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच आरोग्य विभागास सूचना केल्या असून, संशयित पेशंटवर वेळीच उपचार करण्यासाठी तपासणीवर भर देण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती राज्य साथरोग नियंत्रण शाखेचे सहसंचालक डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली. मागील वर्षी स्वाइन फ्लूने नाशिकमध्ये ७५ जणांचा बळी गेला होता. यंदा हे प्रमाण कमी असले तरी सप्टेंबर महिन्यात संशयित पेशंट आणि मृत्यूंमध्ये अचानक वाढ झालेली दिसते. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात स्वाइन फ्लू फैलावाच्या आणि त्यास प्रतिबंध करण्याबाबत चर्चा झाली असे डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले.

प्रादूर्भावास पोषक वातावरण

नाशिक आणि पुणे या दोन शहरांमधील थंड वातावरण स्वाइन फ्लूच्या फैलावासाठी पोषक ठरत असल्याचे डॉ. आवटे यांनी स्पष्ट केले. या दोन शहरांमध्ये पावसाळ्यात तसेच त्यानंतर थंड वातावरण निर्माण होत असल्याने स्वाइन फ्लूचा प्रादूर्भाव झपाट्याने होतो. त्यामुळे दरवर्षी या दोन जिल्ह्यांमध्ये मृत्यू होतात. यासाठी जनजागृती महत्त्वाची असून, नागरिकांनी देखील कोणत्याही फ्लूबाबत सावधानता बाळगावी असे आवाहन त्यांनी केले.

क्रॉनिक आजाराचे पेशंट सर्वाधिक बळी

हायपर टेन्शन, डायबेटिस तसेच गरोदार स्त्रियांबाबत, कॅन्सरची लागण झालेल्या पेशंटला स्वाइन फ्लूची लागण झाल्यास त्यांची दगवण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा पेशंटकडे विशेष लक्ष ठेवण्याची गरज असते. स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या ६० टक्के व्यक्तींना कॅन्सर, अस्थमा, मधुमेह असे आजार असल्याचे आजवर समोर आले आहे. उर्वरित घटनांमध्ये पेशंटवर अगदीच शेवटच्या टप्प्यात स्वाइन फ्लूचे निदान होऊन उपचार सुरू करण्यात आले होते. तापमानातील चढ उताराचा परिणाम स्वाइन फ्लूच्या फैलावास कारणीभूत ठरत असल्याचा दावा आरोग्य विभागातील सूत्रांनी केला.

स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्यास संबंधित पेशंटवर लागलीच उपचार सुरू करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषत: आजाराची लागण झालेल्या पेशंटला स्वाइन फ्लूची लक्षणे दिसल्यास अहवालाची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही.

- डॉ. प्रदीप आवटे, सहसंचालक, राज्य साथरोग नियंत्रण शाखा

जिल्ह्यात टॅमीफ्लूसह अत्यावश्यक औषधांचा मुबलक साठा असून, उपचारांबाबत आवश्यक त्या सूचना करण्यात आल्या आहेत. आजवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे मृत्यू झाले, त्यातील बहुतांश पेशंट शेवटच्या क्षणी दाखल झाले होते. तसेच त्यांना इतर आजारांची लागण झालेली होती. स्वाइन फ्लूला रोखण्यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी.

- डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरावर आजारछाया

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहराला डेंग्यू, चिकुनगुनिया, स्वाइन फ्लूपाठोपाठ 'व्हायरल फिवर'नेही विळखा घातला आहे. गेल्या नऊ महिन्यांत विषाणूजन्य तापाचे तब्बल ३८ हजार ४३५ तर २४ दिवसांत साडेतीन हजार रुग्ण आढळून आले आहेत. सोबतच नऊ महिन्यांत सात हजार ९७९ जणांना अतिसाराची लागण झाल्याचे पालिकेच्या दप्तरी नोंद आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून स्वाइन फ्लू, डेंग्यू आणि साथीच्या आजारांमध्ये नाशिकचा राज्यातच पहिला क्रमांक आहे. डेंग्यू, चिकुनगुनिया, स्वाईन फ्लू या आजारांच्या साथीने नाशिकला पुरते जेरीस आणले आहे. या आजारांमुळे मृत्यूदरात अचानक मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे या आजारांच्या साथींवर नियंत्रण मिळवून नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या महापालिका तसेच अन्य शासकीय यंत्रणा मात्र सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे. साथीच्या आजारांबाबत ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नसल्याने वाढत्या आजारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डेंग्यू, स्वाइन फ्लूपाठोपाठ तापसदृश आजाराची मोठी साथ शहर परिसरात असून, १ जानेवारी ते २४ सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३८ हजार ४३५ जणांना या आजाराची लागण झाली आहे. चालू महिन्यात २४ दिवसांतच तापसदृश आजाराचे तीन हजार २८५ रुग्ण आढळले आहेत. तापसदृश आजाराने कोणाचा बळी घेतला नसला तरी, रुग्णालयांमध्ये बील भरताना नागरिकांच्या नाकी नऊ येत आहेत. शहरात गेल्या वर्षीही तब्बल ६० रुग्णांना तापसदृश आजाराने वेढले होते. तापसदृश आजारापाठोपाठ अतिसाराचे रुग्णही महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये येत आहेत. नऊ महिन्यांत अतिसाराच्या तब्बल सात हजार ९७९ रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले आहेत. सप्टेंबरमध्ये ३९४ जणांना अतिसाराची लागण झाल्याची आकडेवारी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. ताप सदृश आजारापाठोपाठ विषमज्वर ८७०, कावीळ १३१, तर चिकुनगुनियाची ४६ जणांना लागण झाल्याची पालिकेच्या दप्तरी नोंद आहे.

स्वाइन फ्लू, डेंग्यूचा प्रकोप

शहरात आतापर्यंत १०२ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. यापैकी ७ जणांचा मृत्यू ओढावला आहे. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक ८३ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा स्वाइन फ्लूग्रस्त रुग्णांच्या मृत्यूदरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डेंग्यू आजाराचा मोठा उद्रेक दिसून येत असून, १ जानेवारी ते २४ सप्टेंबर या कालावधीत तब्बल ४९४ जणांना डेंग्यू झाल्याचे महापालिकेच्या अहवालातून समोर आले आहे. गेल्या २४ दिवसांतच १२६ जणांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महापालिकेच्या अहवालात मात्र डेंग्यूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची नोंद नजरेआड करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सत्ताधारी-प्रशासन कुरघोड्यांत मग्न

शहराची ओळख रुग्णांचे शहर अशी होत असताना, सत्ताधारी भाजप आणि प्रशासन मात्र एकमेकांवर कुरघोड्या करण्यात व्यस्त आहे. प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अधिकारावरून सुरू असलेल्या भांडणात आरोग्याबाबतच्या उपयायोजनांकडेही दुर्लक्ष होत असून, नागरिकांना वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे. शहराचे आरोग्यच धोक्यात आले असताना प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये एकमेकांची जिरवण्याच्या सुरू असलेल्या स्पर्धेत सर्वसामान्यांच्या जीवाचा खेळ होत असल्याचे चित्र आहे.

१ जानेवारी ते २४ सप्टेंबरपर्यंतचे रुग्ण

आजार- रुग्ण

तापसदृश आजार- ३८,४३५

अतिसार- ७,९७९

विषमज्वर- ८७०

डेंग्यू- ४९४

कावीळ- १३१

स्वाइन फ्लू- १०२

चिकुनगुनिया- ४६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘घरकुल’चे राजकारण नको

$
0
0

मालेगाव : शहरातील झोपडपट्टीधारकांना हक्काचे घर मिळावे यासाठी पालिकेच्या म्हाळदे व सायने शिवारात घरकुल योजनेअंतर्गत काम सुरू आहे. योजनेच्या गुणवत्ता, दर्जा, विविध परवानग्याबाबत पालिकेतील विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. यास महापौर शेख रशीद व आयुक्त संगीता धायगुडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून स्पष्टीकरण दिले. घरकुल योजनेच्या कामासाठीच्या सर्व परवानग्या, जमीन हस्तांतरण, विविध गुणवत्ता चाचण्या, पायाभूत सुविधांची पूर्तता केली आहे. शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना हक्काचे घर मिळणार असल्याने विरोधकांनी यात राजकारण करू नये असे आवाहन महापौर शेख रशीद यांनी यावेळी केले.

म्हाळदे शिवारातील घरकुल योजनेत शनिवारी शहरातील कालीकट्टी नाला व राहुल नगर येथील ५१३ झोपडपट्टीधारकांना स्थलांतरित करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर महापौर यांच्या दालनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमहापौर सखाराम घोडके, सभापती जयराज पाटील, पालिका उपायुक्त नितीन कापडणीस, सहा. आयुक्त विलास गोसावी उपस्थित होते. घरकुल योजनेच्या अंमलबजावणी बाबत महागठबंधन आघाडीच्या नेत्यांकडून विविध आरोप करण्यात आल्याने या आरोपांबाबत महापौर व आयुक्तांनी स्पष्ट शब्दात नकार देत झोपडपट्टीधारकांचे स्थलांतरण करण्याचा निर्धार व्यक्त केला. महापौर शेख म्हणाले, विरोधकांकडून जाणीवपूर्वक या योजेनेबाबत नागरिकांमध्ये खोटे गैरसमज पसरवले जात आहेत. गरिबांना हक्काचे घर या योजनेत मिळणार असून त्यांचे भले विरोधकांना नको आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात हे काम होत असल्यानेच विरोधकांनी खोटे आरोप करण्यास सुरुवात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रक्तपेढी, लाँड्रीचालकांना महावितरणचे आवाहन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महावितरण कंपनीतर्फे दाखल वीजदरवाढीच्या प्रस्तावावर निकाल देताना राज्य वीज नियामक आयोगाने रक्तपेढी, तसेच लाँड्री व्यवसायाचा कमी वीजदराच्या वर्गवारीत समावेश केला आहे. त्यानुसार बदल करणे सुलभ व्हावे, यासाठी संबंधितांनी उपविभागीय कार्यालयात संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

राज्यातील सर्व सरकारी व खासगी रक्तपेढ्यांना पूर्वी वाणिज्यिक वर्गवारीचा वीजदर लागू होता. आयोगाच्या निर्णयानुसार आता तो अनुक्रमे लघुदाब सरकारी व इतर या तुलनेने कमी वीजदराच्या वर्गवारीत आला आहे. रक्तपेढी ग्राहकांप्रमाणे लाँड्री ग्राहकांचा समावेश पूर्वी वाणिज्यिक वर्गवारीत होत होता. आता तो कमी वीजदराच्या वर्गवारीत समाविष्ट करण्यात आला आहे. आयोगाने दिलेला निर्णय दि. १ सप्टेंबर २०१८ पासून लागू झाला असून, त्यानुसार बदल करण्यात येत आहे. हे काम आणखी सुलभ व्हावे, यासाठी संबंधित रक्तपेढी, तसेच लाँड्रीचालकांनी सविस्तर माहितीसह आपापल्या उपविभागीय कार्यालयांत संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेकअप वर्कशॉप मंगळवारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रोत्सव येत असल्याने महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे विशेष मेकअप वर्कशॉप मंगळवारी (दि. २ ऑक्टोबर) रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्र्यंबक रोडवरील अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था येथे दुपारी तीन वाजता वर्कशॉप होईल.

मेकअप आर्टिस्ट रोहित मिस्त्री आणि नूतन मिस्त्री हे यात मार्गदर्शन करणार आहेत. नवरात्री मेकअप, रेग्युलर मेकअप, नवरात्रोत्सवासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या हेअर स्टाइल, नवरात्रोत्सवासाठी साडी नेसण्याचे वेगवेगळे प्रकार या वर्कशॉपमध्ये शिकविले जाणार आहेत. या वर्कशॉपसाठी कल्चर क्लब सभासदांना सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे सभासदांना १०० रुपये फी द्यावी लागणार आहेत. तर, इतरांसाठी ४०० रुपये फी असणार आहे. या वर्कशॉपबाबत अधिक माहितीसाठी ०२५३-६६३७९८७ किंवा ९४२२५१३५६९ या क्रमांकावर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत तर महाराष्ट्र टाइम्स, २ रा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाइन सभासदत्त्वासाठी www.mtcultureclub.com या भेट द्यावी.

लोगो : कल्चर क्लब

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरित क्षेत्रास ‘रेड सिग्नल’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीअंतर्गत विकसीत करण्यात येणाऱ्या मखमलाबाद व हनुमानवाडी येथील साडेसातशे एकरांवर नगररचना परियोजना राबविण्यास स्मार्ट सिटीच्या बैठकीत भाजपसह, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या संचालकांनी कडाडून विरोध केला. आधी जुनी कामे पूर्ण करा, मगच नव्या कामांचा विचार करण्याचा सल्ला त्यांनी दिला. यामुळे नागरिकांची मते जाणून घेतल्यानंतरच परियोजनेला मंजुरी देण्याचा निर्णय स्मार्ट सिटीच्या बैठकीत घेण्यात आला. सोबतच स्मार्ट सिटी योजनेचा निधी महा-आयटी कंपनीकडे वर्ग करण्याचा विषय नामंजूर करीत, त्याबाबत राज्यसरकारशी चर्चा करून निर्णय घेण्याचे बैठकीत निश्चित करण्यात आले

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी कार्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची नववी नियमित व दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष सीताराम कुंटे याच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके, आयुक्त तुकाराम मुंढे, संचालक व विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, सभागृहनेता दिनकर पाटील, काँग्रेस गटनेता शाहु खैरे, गुरूमित बग्गा, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आदी उपस्थित होते. स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. यावेळी आयुक्त मुंढे यांनी मखमलाबाद व हनुमानवाडीतल्या टीपी स्कीमचे सादरीकरण केले. परंतु, यावर भाजपसह, शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या संचालकांनी आक्षेप घेतला. लोकनियुक्त सात संचालकांपैकी महापौर रंजना भानसी यांच्यासह पाटील, बोरस्ते, खैरे, बग्गा या संचालकांनी याला तीव्र विरोध केला. हा विषय येथे सादर करणेच चुकीचे असल्याचे मत त्यांनी मांडले. आधी शेतकरी, नगरसेवकांची चर्चा होणे अपेक्षित असताना, तो थेट महासभेवर सादर केल्याबद्दलही संचालकांनी आक्षेप घेतला. शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असल्याने या ठिकाणी टीपी स्कीम होणे अशक्यच असल्याची भूमिका काही संचालकांनी मांडली. कंपनीकडून गावातच सुरू असलेल्या कामांची बोंब आहे, त्यामुळे नवीन कामे घेताना नागरिकांना विश्वासात घ्या, असे काही सदस्यांनी सुचवले. दिनकर पाटील यांनी नेहरू गार्डनसह अन्य उदाहरणे देत स्मार्ट सिटीतील कामांची स्थितीच समजत नाही. नेहरू गार्डनचे काम तर उच्च न्यायालयाच्या आक्षेपामुळे थांबले आहे. जुनेच प्रकल्प पूर्ण होत नाहीत आणि हरित क्षेत्राचा बोजा शेतकऱ्यांवर टाकण्याची घाई केली जात असल्याची टीका केली. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय घ्यावा, तसेच हा विषय महासभेवर मंजुरीसाठी असल्याचे निदर्शनास आणून दिल्याने अध्यक्ष कुंटे यांनी महासभा सर्वोच्च असल्याने महासभेच्या निर्णयानंतर पुढील भूमिका ठरविण्याचा निर्णय दिला. त्यामुळे टीपी स्कीमचा निर्णय आता पूर्णत: महासभेच्या हाती गेला आहे.

'कालिदास'चे तुम्हीच बघा!

कालिदास कलामंदिराच्या अवाजवी भाडेवाढीसंदर्भात शाहु खैरे यांनी मुद्दा उपस्थित करीत भाडेवाढ कमी करण्याची मागणी केली. परंतु, भाडेवाढीचे तुम्हीच बघा असे सांगत कुंटे यांनी भाडेवाढीच्या वादात हस्तक्षेप टाळला. स्थानिक पातळीवरचा हा विषय असल्याचे सांगत, त्याबाबत हात झटकले. स्मार्ट सिटीसाठी प्राप्त झालेल्या निधी ठेवी स्वरुपात राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसचे शाहु खैरे व गुरुमित बग्गा यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत गावठाणात सुरू असलेल्या कामांची माहिती स्थानिक नागरिकांना दिल्यास त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनांची दखल घेऊन अंमलबजावणी करणे सोपे जाईल, असे सुचविले. त्यास संमती देत गावठाण भागातील लोकांना कामांची माहिती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

संचालकांची पुनर्नियुक्ती

या बैठकीत तुषार पगार आणि भास्कर मुंढे यांच्या पुनर्नियुक्तीस मान्यता देण्यात आली. स्वतंत्र संचालक म्हणून तुषार पगार, भास्कर मुंढे यांच्या संचालकपदाची मुदत संपली होती. त्यामुळे त्यांच्या पुनर्नियुक्तीचा प्रस्ताव सभेत सादर करण्यात आला. त्याला एकमताने मान्यता देण्यात आली.

महा-आयटीचे प्रकल्प अडचणीत

शहरात माहिती व तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प राज्यशासनाच्या महा-आयटीकडून राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीचा निधी या कंपनीकडे वर्ग करण्यात येणार आहे. परंतु, केंद्र सरकारनेच असा निधी वर्ग करता येत नसल्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे हा निधी महा-आयटी विभागाकडे वर्ग करण्याच्या विषयालादेखील कडाडून विरोध करण्यात आला. त्यामुळे याबाबत राज्यसरकारशी चर्चा करून निर्णय घेण्याचे ठरले. महा-आयटीकडून राबविण्यात येत असलेले सीसीटीव्ही व केबलचे प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे.

लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवा!

स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल यांच्याकडून माहिती दिली जात नाही, त्यांना बोलावूनही ते येत नसल्याची खंत महापौर रंजना भानसी यांनी बैठकीत मांडली. अन्य संचालकांनी त्यांच्याकडून माहिती मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या. त्यामुळे कुंटे यांनी लोकप्रतिनिधींचा सन्मान ठेवत त्यांनी विचारलेली माहिती तत्काळ उपलब्ध करून देण्याची सूचना केली. स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीचा निषेध म्हणून काही संचालकांनी भोजनावर बहिष्कार टाकल्याची चर्चा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मशिदीच्या भोंग्यातून मतदान नोंदणी जागृती

$
0
0

नाशिकमधील पहिलाच प्रयोग, नागरिकांचा प्रतिसाद

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मतदार नोंदणीसाठी सरकार व प्रशासन विविध उपक्रम राबवित असते. नाशिकमध्ये मात्र अभिनव उपक्रम रावबिण्यात आला. मतदारांनी मतदानासाठी नोंदणी करावी, यासाठी थेट मशिदीच्या भोंग्यातून आवाहन करण्यात आले. त्याला मतदारांनी प्रतिसाद देत या उपक्रमाचे कौतुकही केले.

मतदार नोंदणी अभियानासाठी नाशिकमध्ये प्रथमच मशिदीच्या भोंग्याचा वापर निवडणूक शाखेने केला. शहरातील सात मशिदीतून या अभियानाची माहिती देऊन मतदार नोंदणीसाठी नागरिकांना जागृत केले. जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या माध्यमातून नाशिक तहसीलदारांनी हे अभियान राबविले.

तहसीलदार शशिकांत आवळकंठे यांनी शुक्रवारी या अभियानाला सुरुवात केली. मतदारांनी त्यांच्या या अभिनव उपक्रमाला प्रतिसादही दिला. मतदार नोंदणीमध्ये नावाचा समावेश करणे, नाव कमी करणे, दुरुस्ती करणे, स्थळ बदल यासारखी माहिती यावेळी देण्यात आली. त्यानंतर फॉर्म वाटपाचेही आवाहन करण्यात आले. त्यानंतर काही वेळात मतदारांनी १५०० फॉर्म नेले. त्यात १२५ फॉर्म लोकांनी भरूनही दिले. मशिदीच्या लाउडस्पिकरमधून आतापर्यंत 'आजान' होत असे. पण, पहिल्यांदा निवडणुकीमध्ये मतदारांना जागृत करण्याचे काम करण्यात आल्यामुळे अनेकांना कुतूहल वाटले.

...

येथे राबविला उपक्रम

काजीनगर, खोडेनगर, गुलमोहर कॉलनी, फातेमानगर, साईनाथ नगर, जयदीप नगर आणि जुने नाशिक येथील मशिदीत हा उपक्रम राबविण्यात आला. नाशिक विधानसभा मतदारसंघ (मध्य) च्या परिसरात याची सुरुवात झाली. यानंतरही असे उपक्रम घेण्यात येणार असून, त्याद्वारे जनजागृती केली जाणार असल्याचे तहसीलदार आवळकंठे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images