Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विज्ञान प्रकल्पांचे आज प्रदर्शन

0
0

नाशिक : लाडशाखीय वाणी समाजातर्फे विद्यार्थी संशोधनवृत्तीतून पुढे आलेल्या विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन मंगळवारी (दि. २) होणार आहे. या वेळी विद्यार्थी गुणगौरव सोहळा होणार आहे. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संकल्पनेवर आधारित तयार केलेले प्रयोग व प्रकल्प प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. नाशिकरोड येथील �कदम लॉन्समध्ये दुपारी ४ वाजता प्रदर्शन होईल. या वेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील, शिक्षणविस्तार अधिकारी डॉ. नेहा शिरोरे, सायन्स प्रकल्प निरीक्षक अभिलाष वाघ, मंडळाचे अध्यक्ष सचिन बागड, प्रशांत शिरोडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात येणार आहे. विद्यार्थी गुणगौरव आणि विज्ञान प्रदर्शनासाठी नाशिककरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नाशिकरोडच्या लाडशाखीय वाणी मंडळाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंग्यू, स्वाइन फ्लू हाताबाहेर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सप्टेंबर महिन्यातच ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवला असला तरी, या महिन्यात शहर परिसरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूने कहर केला आहे. शहर डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि साथीच्या आजारांनी हायअलर्टवर गेले आहे. सप्टेंबर महिन्यात शहरात डेंग्यूचे १६५, तर स्वाइन फ्लूचे १३६ बाधित रुग्ण आढळून आले असून, संशयितांचा आकडा पाचशेच्याही पार गेला आहे. विशेष म्हणजे सरकारी आणि खासगी रुग्णालयेही स्वाइन फ्लू व डेंग्यूसह विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांनी फुल्ल असून, पेशंटच वेटिंगवर असल्याचे चित्र आहे. डेंग्यूसदृश्य आजाराने सोमवारी दोघांचा जीव घेतला असून, स्वाइन फ्लूने महिनाभरात शहरात सात जणांचा बळी गेला आहे. दुसरीकडे महापालिका आणि जिल्हा रुग्णालयांकडून काळजी घेण्याचे सोपस्कार पार पाडले जात आहेत.

ऑक्टोबर हिटचा तडाखा सुरू झाला असला तरी, दिवसा प्रचंड तापमान आणि रात्री थंड हवामानामुळे शहरात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. ताप, सर्दी-पडसे, खोकला, डोकेदुखी आणि व्हायरल फिवरच्या रुग्णांची संख्या हजारोंच्या घरात आहे. डेंग्यू व स्वाइन फ्लूनेसुद्धा धुमाकूळ घातला आहे. गेल्या तीन वर्षांपासून तर डेंग्यू, स्वाइन फ्लू नाशिककरांची पाठ सोडत नाही. त्यात सातत्याने वाढ होत आहे. महापालिकेकडून दरवर्षी आरोग्य व वैद्यकीय विभागाकडून जनजागृती केली जात असली, तरी ती कागदावरच असल्याचे चित्र आहे. जूनपासून शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जून महिन्यात शहरात डेंग्यूचे १४३ संशयित, तर ६८ बाधित रुग्ण होते. जुलै महिन्यात त्यात अधिक वाढ होऊन संशयित ३९४ तर १०३ बाधित रुग्ण होते. ऑगस्टमध्ये डेंग्यूने दीडशतक केले. ऑगस्ट महिन्यात ५४४ संशयित, तर १४८ बाधित होते. सप्टेंबर महिन्यात तर सर्व रेकॉर्ड मोडले असून, डेंग्यूचे ५२० संशयित तर १६५ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या नऊ महिन्यांत शहरात डेंग्यूचे १८५३ संशयित रुग्ण आढळून आले असून, बाधितांचा आकडा ५३३ पर्यंत पोहचला आहे. हवामानातील बदलांमुळे स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचा प्रकोप वाढत चालल्याने महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला अक्षरश: घाम फुटला आहे.

डेंग्यूने दोघांचा बळी

स्वाइन फ्लूपाठोपाठ आता डेंग्यूचेही बळी जाण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात डेंग्यूसदृश आजाराने दोन महिलांचा बळी गेला आहे. वैशाली बोरसे (३६) आणि आरती शिंदे (१६) अशी त्यांची नावे असून, यासंदर्भातील एकाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पालिकेने दुजोरा दिला आहे. दुसऱ्या रुग्णाची खातरजमा पालिकेकडून केली जात आहे. त्यामुळे शहरातील डेंग्यूच्या बळींची संख्या तीनवर पोहचली आहे.

सप्टेंबरमध्ये १६ मृत्यू

शहर व परिसरात स्वाईन फ्लूच्या बळींचा आकडा हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.सप्टेंबर महिन्यात शहरात स्वाईन फ्लूने ९ जणांचा जीव गेला असून त्यातील ७ पालिका हद्दीतील आणि २ पालिका हद्दीबाहेरील आहे.तर आतापर्यंत स्वाईन फ्लूने २५ जणांचा बळी गेला असून त्यात ९ शहरातील आणि १६ महापालिका हद्दीबाहेरील लोकांचा समावेश आहे.एकट्या सप्टेंबर महिन्यात १६ जणांचा जीव गेला असून त्यात ७ मनपा हद्दीतील ९ महापालिका हद्दीबाहेरील आहेत.त्यामुळे स्वाईन फ्लूबाबत शहरच हायअलर्टवर गेले आहे.

डेंग्यूची आकडेवारी

महिना संशयित बाधित

जून १४३ ६८

जुलै ३९४ १०३

ऑगस्ट ५४४ १४८

सप्टेंबर ५२० १६५

स्वाइन फ्लूची आकडेवारी

महिना बाधित

जानेवारी ते ऑगस्ट १९

सप्टेंबर १२६

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात

0
0

मोफत रोगनिदान शिबिर

नाशिक : आश्रय वृद्धाश्रमाच्या वतीने महात्मा गांधी जयंतीनिमित्त २ ते ८ ऑक्टोबरदरम्यान मोफत रोगनिदान शिबिर होणार आहे. बोधलेनगर येथील उत्तरानगर परिसरातील आश्रय वृद्धाश्रमात सकाळी १० ते २ या वेळेत हे शिबिर होईल. ज्येष्ठांनी या शिबिरात आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन वृद्धाश्रमातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता वैद्यकीय विभागाला गळती

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील आरोग्य व्यवस्था सलाइनवर असतानाच, दुसरीकडे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला गळती लागली आहे. दोन दिवसांत महापालिकेच्या रुग्णालयातील डॉ. सुरेश इंदोरीकर, डॉ. देवश्री सुलाखे व डॉ. उमाकांत सोनवणे या तीन डॉक्टरांनी महापालिकेच्या कारभाराला कंटाळून राजीनामे दिले आहेत. अपुरे मनुष्यबळ, प्रशासकीय तणावापाठोपाठ लोकप्रतिनिधींकडून होत असलेल्या त्रासाने डॉक्टरांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पालिका रुग्णालयांमधून काढता पाय घेतला आहे. महापालिकेने गेल्या महिन्यात २० डॉक्टरांसाठी जाहिरात काढली असता, केवळ आठच डॉक्टर पालिकेला मिळाले आहेत. त्यामुळे एकीकडे डॉक्टर मिळत नसताना, दुसरीकडे डॉक्टरांच्या गळतीमुळे महापालिकेसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.

महापालिकेचा वैद्यकीय विभागच सध्या सलाइनवर असून डॉक्टरांची कमरतरता मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. महापालिकेची पाच रुग्णालये आणि तीस शहरी आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. परंतु, या रुग्णालयांसह आरोग्य केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांची कमतरता आहे. एकीकडे वैद्यकीय विभागातून डॉक्टर सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या जागेवर नवीन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात येत नाही. त्यामुळे वैद्यकीय विभागाचा भार हा राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत भरलेल्या डॉक्टरांवर आहे. परंतु, अपुरे मनुष्यबळ, वाढलेला प्रशासकीय ताण आणि लोकप्रतिनिधींकडून दररोज होत असलेल्या बेछूट आरोपांमुळे आता डॉक्टरांची गळती सुरू आहे. डॉ. नारायण भोये यांनी यापूर्वीच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला आहे. त्यापाठोपाठ आता राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत मानधनावर घेतलेल्या तीन डॉक्टरांनी राजीनामे सादर केले आहेत. पंचवटीत एका नगरसेवकाच्या आरोपामुळे दुखावलेले डॉ. सुरेश इंदोरीकर यांच्यापाठोपाठ डॉ. देवश्री सुलाखे व डॉ. उमाकांत सोनवणे यांनीही राजीनामे सादर केले आहेत. त्यामुळे डॉक्टरांच्या गळतीमुळे पालिकेच्या वैद्यकीय विभागासमोर नव्याने संकट उभे राहिले आहे.

जागा वीस, आले अवघे आठ डॉक्टर

महापालिकेने गेल्या महिन्यात २० पदे मानधनावर भरण्याचा निर्णय घेत, त्यासंदर्भातील जाहिरातही प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीला १६ जणांनी प्रतिसाद देत महापालिकेने तत्काळ त्यांची नियुक्तीही केली होती. परंतु, पालिकेतील सध्याच्या बदललेल्या वातावरणात आणि नगरसेवक आणि नागरिकांच्या तक्रारींमुळे पालिकेत कार्यरत असलेल्या डॉक्टरांचे हाल पाहून यातील केवळ आठ डॉक्टर नोकरीत रुजू झाले आहेत. आठ जणांची निवड होऊनही त्यांनी पालिकेच्या सेवेकडे पाठ फिरवली आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या महासभेत स्वाइन फ्लूच्या रुग्णाची दक्षता न घेतल्याच्या कारणावरून वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयराम कोठारी व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश इंदोलीकर यांना निलंबित करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेची सेवा नकोच, अशी भावना डॉक्टरांमध्ये बळावत चालली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेचे कार्यालय हटवले

0
0

नाशिक : महापालिकेने आता शहरातील राजकीय पक्षांच्या अनधिकृत कार्यालयांवर वक्रदृष्टी फिरवली असून, सोमवारी टाकळी रोडवरील शिवसेनेच्या पीरघोडेस्वार बाबा दर्ग्याजवळ अनधिकृतपणे उभारलेले कार्यालय जमीनदोस्त केले. महापालिकेला ई कनेक्ट अॅपवर याबाबत तक्रार प्राप्त झाली होती. त्यामुळे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने सोमवारी ही कारवाई केली. पक्षांच्या अनधिकृत कार्यालयांची तक्रार आल्यास थेट कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेने दिला आहे. शिवसेनेच्या कार्यालयाची तक्रार ही पक्षांतर्गत विरोधकांकडून करण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचे महाप्रमुख सचिन मराठे यांच्या प्रभागातच पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केल्याने हा राजकीय पक्षांसाठी मोठा इशारा मानला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परतीचा तडाखा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर परतीच्या पावसाने सोमवारी शहरासह जिल्ह्याच्या काही भागात दमदार हजेरी लावली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह दाखल झालेल्या पावसाने नागरिकांना शब्दश: झोडपून काढले. या पावसामुळे शहरवासीयांना उष्म्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारणाऱ्या पावसाने सोमवारी शहराच्या काही भागात सायंकाळी जोरदार कमबॅक केले. ढगाळ वातावरण आणि निर्माण झालेला उकाडा यामुळे आज पाऊस पडेल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ही शक्यता सायंकाळनंतर खरी ठरली. सायंकाळी साडेपाचनंतर पावसाच्या हलक्या सरींनी शहरात जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह येऊन परतीच्या पावसाने दमदार सलामी दिली आहे. शहरात सीबीएस, पंचवटी, गंगापूर रोड, कॉलेजरोड, सिडको परिसरात पावसाच्या मुसळधार सरींनी हजेरी लावली. त्यामुळे अवघ्या काही मिनिटांतच सर्वत्र पाणी-पाणी झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. रस्त्यांवर ठिकठिकाणी पाण्याची तळी साचली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानो काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही तुटून पडल्या. सायंकाळच्या सुमारास पावसाला सुरूवात झाल्याने विद्यार्थीवर्गासह घराकडे परतणाऱ्या चाकरमान्यांची धांदल उडाली. विजांच्या कडकडाटाने नागरिकांना धडकी भरविली.

हा परतीचाच पाऊस

मान्सून परतीच्या प्रवासाला लागला असून, हा परतीचाच पाऊस असल्याची माहिती हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी दिली. या पावसाला मान्सूनोत्तर पाऊसही म्हटले जाते. या आठवड्यात आणि नवरात्रात देखील हा पाऊस कोसळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. पूर्वकडून पश्चिमेकडे अत्यंत वेगाने वारे वाहू लागल्याने ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो आहे.

...रब्बीतील पिकांना फायदा

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुबार पेरणी करूनही जिल्ह्याच्या अनेक भागात पिके पाण्याअभावी करपू लागली आहेत. थोडाफार तग धरलेल्या पिकांना आणखी काही दिवस पाऊस पडल्यास जीवदान मिळू शकते. रब्बीमधील गहू, हरबरा यांसारख्या पिकांना मात्र हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.

...कॉलेजरोडला एक जखमी

वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामूळे कॉलेजरोडवर एका झाडाची फांदी कोसळली. कारवर ही फांदी कोसळल्याने एकजण जखमी झाला. त्यास उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. गांधीनगर, सिन्नरफाटा, गंगापूर रोड परिसरातही झाडे कोसळली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. अग्निशमन विभागाने तात्काळ वाहने व जवानांचे पथक संबंधित स्थळी पाठविली. त्यांनी ही झाडे बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला.

त्र्यंबकेश्वरला जोरदार हजेरी

त्र्यंबकेश्वर येथे सायंकाळी सातच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. पितृपंधरवड्याच्या निमित्ताने पिंडदान व अन्य धार्मिक विधींसाठी मोठ्या संख्येने भाविक मुक्कामी येत आहेत. या पावसाने त्यांची चांगलीच धांदल उडविली. या पावसाचा भात पिकाला फायदा होणार असल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीला पोलिस संरक्षण द्या

0
0

याचिकाकर्ता राजेश पंडित यांचे गृह विभागाला साकडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी संरक्षण उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची नसून, पोलिसांची असल्याचे सांगत, महापालिकेने आपले सुरक्षारक्षकही काढून घेतले आहेत. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिस संरक्षण देण्याची मागणी याचिकाकर्ता राजेश पंडित यांनी पोलिस महासंचालकांकडे केली होती. मात्र, त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद मिळत नसल्याने पंडित यांनी गोदावरीला पोलिस संरक्षण कधी मिळेल, असा सवाल करीत, त्याबाबतचे स्मरणपत्र गृह विभागाच्या अव्वर सचिवांकडे सादर केले आहे. गोदावरी नदीपात्राला पोलिस संरक्षण देण्याचे आणि त्यासाठी ४ पोलिस उपनिरीक्षक, ३० पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. या संदर्भात गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या दालनात २४ जुलै २०१७ रोजी बैठक होऊन न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याला एक वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी पोलिस संरक्षण पुरविण्याच्या न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे न्यायालयाचा अवमान होत आहे. न्यायालयाच्या या आदेशांची अंमलबजावणी का होत नाही, याची सखोल माहिती न्यायालय व याचिकाकर्ता म्हणून आपल्याला मिळावी, अशी मागणी पंडित यांनी पत्राद्वारे केली आहे. उच्च न्यायालयाने याचिकेवरील अंतिम निकाल राखून ठेवला असून, पुढील सुनावणी २९ नोव्हेंबर २०१८ रोजी होत आहे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान-१ पॉईंटर

0
0

वाचकहो, दिलगीर आहोत...

वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी पुकारलेल्या असहकारामुळे १ ऑक्टोबरपासून आपल्यापर्यंत अंक पोहचविण्यात अडचणी येत आहेत. तरीदेखील संस्थेतील सर्व घटक अंक पोहचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. शहरात ठिकठिकाणी पाचशेहून अधिक केंद्रांवर वृत्तपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत, याची वाचकांनी नोंद घ्यावी. पुरेसे कमिशन देऊनही पुन्हा ते अवाजवी वाढवावे तसेच अंकाची किंमतही वाढवावी, अशी टोकाची भूमिका विक्रेत्यांनी घेतल्याने अडचण उद्भवली आहे. कृपया वाचकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करावे. आपल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

महाराष्ट्र टाइम्स

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गांधीजी पॉईंटर

पापक्षालनासाठी गांधींचे गोदास्नान!

0
0

गौतम संचेती/ रमेश पडवळ, नाशिक

महात्मा गांधी अन् नाशिकचं नातं अनोखं आहे. बॅरिस्टर झाल्यानंतरही या महात्म्याला जातीत घ्यायचं की नाही, यावर जातपंचायतीत झगडा सुरू होता. कुटुंबाच्या आग्रहावास्तव जातीत पुन्हा प्रवेश मिळावा म्हणून या महात्म्याला १८९१ मध्ये गोदावरीत स्नान करावे लागलं होतं. अर्थातच, हे त्यांच्या मनाविरूद्ध घडले होतं. मोहनदास ते महात्मा होण्याच्या या प्रवासातील ही पहिली बंडाची ठिणगी नाशिकच्या गोदाकाठावर त्यांच्या मनात भडकली होती.

महात्मा गांधीजींची आज १५० वी जयंती. मोहनदास ते महात्मा हा त्यांचा प्रवास अद्भुत अन् प्रेरणादायी आहे. वेदनांमधून प्रवास केल्याशिवाय समाजाची जडणघडण उलगडत नाही, हे त्यांनी फक्त सांगितलं नाही तर यातून त्यांना जावेही लागलं होतं. याचं एक अनोख उदाहरण त्यांनी त्यांच्या 'सत्याचे प्रयोग' आत्मकथेतून उलगडलं आहे अन् त्या घटनेचा संबंध आहे नाशिकशी. १८८७ साली काठेवाडीतील मोहनदास गांधी हे मॅट्रिक्युलेशनची परीक्षा पास झाले. त्यांच्या वडिलांचे त्यापूर्वी निधन झाले होते. दिवाणपदाची जबाबदारी घेण्यासाठी मोहनदास यांनी परदेशात जावून बॅरिस्टर व्हावे, असे त्यांच्या वडिलांचे मित्र मावजी दवे यांनी सुचविले. जातीतून विरोध सुरू झाला. आपल्या जातीतून आतापर्यंत कोणीही समुद्र ओलांडलेला नाही. तेथे गेल्यावर धर्मभ्रष्ट होतो, असे त्यांच्या समाजातील समजुतीमुळे ज्ञाती (जातपंचायत)मध्ये खळबळ माजली. बापूजींना जातपंचायतीचाही सामना करावा लागला. पण, शिक्षणासाठी परदेशात जाणारच हे ठरवूनच त्यांनी जातपंचायतीला उत्तरे दिली. अखेर त्यांना जातीबाहेर केले गेले. बॅरिस्टर होवून १८९१ ला ते पुन्हा भारतात परतले. मात्र जातीचा वाद सुरूच होता. जातपंचायतीत फूट पडली. अखेर त्यांचा मोठा भाऊ त्यांना पापक्षालनासाठी नाशिकला गोदास्नानासाठी घेऊन आले. राजकोटला परतल्यावर जातपंचायतीला भोजन दिले. हे सर्व गांधीजींच्या मनाविरूद्ध घडले होते.

गांधीजी व नाशिक भेटी

गांधीजी मालेगाव, मनमाड, नांदगाव, सिन्नर, येवला येथे आल्याच्या नोंदी आहेत. नाशिकला त्यांनी बऱ्याच वेळा भेट दिल्याचे आढळले आहे. इतिहास व पुरातत्त्व विभागाचे अभ्यासक भुंजग बोबडे यांनी या नोंदी दिल्या आहेत. गांधीजी दुसऱ्यांदा २२ मे १९२१ ला जिल्ह्यात आल्याची नोंद आहे. त्यावेळेस नाशिकहून संगमनेर येथे गेले होते. त्यानंतर ते येवला येथे व पुढे रहात्याला गेले. ३ ऑगस्ट १९२१ रोजी गांधीजी रेल्वेने जात होते. तेव्हा त्यांनी मनमाडच्या नागरिकांची भेट घेतली. त्या भेटीनंतर परदेशी कपड्यांची होळी करण्यात आली. १८ नोव्हेंबर १९२२ रोजी ते पुन्हा पंजाब मेलने मनमाडहून जात होते. त्यावेळी त्यांनी प्लॅटफॉर्मवरच भाषण केले तेव्हा ५०० नागरिक उपस्थित होते. त्यांना स्वातंत्र्य लढ्यासाठी ३५० रुपयांची भेट देण्यात आली. नांदगावकरांनाही ५० रुपये भेट द्यायचे होते. पण, गाडी तेथे थांबली नाही. त्यामुळे ती भेट नंतर देण्यात आली. यानंतर गांधीजी मालेगाव येथे आल्याची नोंद आहे. तेव्हा दोन हजार नागरिक उपस्थित होते. येथे त्यांनी दोन हजाराची मदत देण्यात आली होती. तेथून ते नांदगावला गेले, तेथेही त्यांचे भाषण झाले. त्यानंतर ते नाशिकरोडला आले. येथून ते कारने नाशिकला आले. तेव्हा ते छगन दामोधर श्राफ यांच्या घरी गेले. त्यांनी लक्ष्मीनारायण मंदिर, शाहू छत्रपती होस्टेल, अनंत विद्यार्थी गृह व पांजरपोळ येथे भेट दिली. भाषनानंतर त्यांना आठ प्रश्न विचारण्यात आले. यावेळी सहा हजार लोक उपस्थित होते. त्यानंतर ते सिन्नरला गेल्याची नोंद आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेकअपच्या नव्या तंत्राने भरा नवरात्रीत रंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाच्या नवरात्रीत मेकअपच्या नव्या तंत्रानुसार गरबा नाइट्समध्ये रंगत तुम्हाला आणता येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे मेकअप कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपला आहे. नवरात्रोत्सवात रास-दांडिया आणि गरबा खेळण्यासाठीची लगबगदेखील सुरू झाली आहे. गरबा नाइट्समध्ये प्रत्येकाला समोरच्या वर आपली छाप पडावी, असे वाटत असते. त्यासाठी मेकअप अतिशय महत्त्वाचा ठरतो. गरब्याची वेशभूषा आणि मेकअप तुमचे सौंदर्य अधिक खुलवतो. असा सौंदर्य खुलविणारा मेकअप शिकण्याची संधी 'मटा कल्चर क्लब'च्या कार्यशाळेद्वारे लाभणार आहे.

त्र्यंबकेश्वररोडवरील आज, मंगळवारी (दि. २) अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था येथे दुपारी ३ वाजता मेकअप कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कल्चर क्लब सदस्यांना १०० रुपये, तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी ०२५३-६६३७९८७ किंवा ९४२२५१३५६९ या क्रमांकांवर संपर्क साधावा. ऑनलाइन सभासदत्त्वासाठी www.mtcultureclub.com या भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बरेच काही शिकण्याची संधी

मेकअप आर्टिस्ट रोहित मिस्त्री आणि नूतन मिस्त्री या कार्यशाळेत तरुणींना मेकअपचे तंत्र शिकविणार आहेत. नवरात्रीत गरब्याच्या वेशभूषेप्रमाणे मेकअप कसा करायचा यासह रेग्युलर मेकअपदेखील शिकविण्यात येणार आहे. त्यासोबत नवरात्रोत्सवासाठी अनेक प्रकारच्या हेअर स्टाइल आणि नवरंगांच्या साड्या नेसण्याचे विविध प्रकारही कार्यसाळेत शिकविले जाणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्लास्टिक कारवाई पथकाला घेराव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जैविक विघटन असलेल्या प्लास्टिकच्या कॅरी बॅगवर महापालिकेने कारवाई करून तेली गल्लीतील एका व्यापाऱ्याला पाच हजाराचा दंड ठोठावल्यामुळे सोमवारी रविवार कारंजा परिसरातील संतप्त व्यापाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या गाडीला घेराव घातला. यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी दुकानेही बंद करुन महानगरपालिकेच्या कारवाईचा निषेध केला. तब्बल अर्ध्या तासाच्या विरोधानंतर अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.

रविवार कारंजा येथे दुपारी ११ वाजता शिवम ट्रेडर्स या दुकानावर महानगरपालिकेचे अधिकारी गेले. येथे त्यांनी जैविक विघटन होणाऱ्या 'गो ग्रीन' या प्लास्टिकचा वापर केल्याबद्दल पाच हजारांचा दंड ठोठावत पावती दिली. या पावतीवर 'पिशवी वापराबाबत दंडात्मक कारवाई ५१ मायक्रॉनपेक्षा कमी जाडी' असे म्हटले आहे. त्यानंतर हे अधिकारी दुसऱ्या दुकानातही हीच कारवाई करत असताना शिवम ट्रेडर्सने चुकीची कारवाई केल्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांना सांगितले. त्यानंतर सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद करत अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यानंतर या अधिकाऱ्यांच्या गाडीला घेरावही घालण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलावले व कारवाई करण्याचा इशाराही दिला. पण, व्यापाऱ्यांनी चुकीच्या कारवाईला विरोध करून आपला संताप कायम ठेवला. त्यानंतर गो ग्रीनचे वितरक यांनाही व्यापाऱ्यांना बोलावले. त्यांनी या पिशव्या सरकारच्या नियमात बसणाऱ्या असून, तसा अर्ज महानगरपालिकेकडे दिला असल्याचे सांगितले. त्यानंतरही अधिकाऱ्यांनी आपला हेका सोडला नाही. पण, व्यापाऱ्यांनी आपला विरोध कायम ठेवल्यानंतर या अधिकाऱ्यांनी काढता पाय घेतला. यावेळी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, समीर पवार, राहुल डागा, विजय शहा, नंदू चांदवडकर, रमेश पटेल, मनोज वडेजा, भरत पटेल यासह व्यापारी उपस्थित होते.

मायक्रॉन मोजण्याचे मशिनच नाही

अधिकाऱ्यांनी मायक्रोन ५१ मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असल्याचे सांगितल्यानंतर व्यापाऱ्यांनी मायक्रॉन मोजण्याचे मशिन कोठे आहे. असा प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी मशिन नसल्यामुळे अधिकाऱ्यांचाही गोंधळ उडाला.

व्यापाऱ्यांचा प्लास्टिकबंदीला विरोध नाही. पण, चुकीची कारवाई करत असेल तर त्याला विरोध केला जाईल. विघटन होणाऱ्या प्लास्टिकचा वापर केल्यानंतरही कारवाई होत असेल तर व्यापारी आंदोलन करतील.

- प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, व्यापारी संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना दणका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विनाहेल्मेट दुचाकी हाकणाऱ्या दुचाकीस्वारांना सोमवारी शहर वाहतूक शाखेने दणका दिला. अवघ्या काही तासांत अडीचशेहून अधिक वाहनचालकांकडून ५०० रुपयांप्रमाणे दंड वसूल करण्यात आला. तात्काळ तडजोड शुल्क न भरणाऱ्या दुचाकीस्वारांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. ही मोहीम यापुढे तीव्र करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

शहर वाहतूक शाखेच्या चार युनिट्स सुरू झाल्या असून, त्याचा परिणाम कारवाईच्या संख्येवर झाला आहे. मुंबई नाका येथे दररोज कारवाई होत असते. सोमवारी याच ठिकाणी विशेष मोहीम हाती घेण्यात आली. वाहतूक शाखेचे १६ कर्मचारी व अधिकाऱ्यांनी विनाहेल्मेट दुचाकीस्वारांकडे लक्ष वळविले. सकाळच्या सत्रात अवघ्या दोन ते तीन तासांत ही कारवाई करण्यात आली. याबाबत बोलताना वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले, की शहरात होणाऱ्या जीवघेण्या अपघातांमध्ये दुचाकीस्वारांचा मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यातच हेल्मेट नसलेले दुचाकीस्वार मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडतात. यापूर्वी हेल्मेट वापराबाबत अनेकदा जनजागृती करण्यात आली. मात्र, त्याचा तितकासा फरक पडत नाही.

--

कारवाईत राहणार सातत्य

चार युनिट्सच्या माध्यमातून सातत्याने कारवाई सुरू असतेच. मात्र सोमवारी मोठी कारवाई हाती घेण्यात आली. विशेष म्हणजे या कारवाईत सातत्य ठेवण्यात येणार असल्याचे देवरे यांनी स्पष्ट केले. आज, मंगळवारी (दि. २) शहरातील एका महत्त्वाच्या रस्त्यावर फौजफाटा उतरवून कारवाई करण्यात येईल. दंडात्मक कारवाई झाल्यानंतर दुचाकीस्वार हेल्मेटला प्राधन्य देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाघ आला, कोणी नाही पाहिला!

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

एखादी गोष्ट अस्तित्वात नसताना तिचा आभास निर्माण करणे, यासाठी 'लांडगा आला रे आला' ही जातक कथा प्रसिद्ध आहे. असाच काहीसा प्रकार सातपूर परिसरात सोमवारी घडला. सोमवारी पहाटे शहरात चक्क वाघ आल्याची अफवा पसरली आणि तो पाहण्यासाठी नागरिकांनी नंदिनीच्या पुलाकडे धाव घेतली.

सोमवारी पहाटे अंबडलिंकरोडवरील नंदिनी नदीच्या पुलाखाली वाघ आल्याची अफवा पसरली. यानंतर अंबड एमआय़डीसीत कामावर जाणाऱ्यांनी वाहने थांबवून वाघाला पाहण्यासाठी गर्दी केली. मात्र, वाघ तर सोडाच श्वानदेखील दृष्टीस न पडल्याने सगळ्यांची निराशा झाली. याबाबत दिवसभर सातपूर परिसरात अफवांचे पेव फुटले होते.

दरम्यान, वाघ आल्याची अफवा पसरल्याने नंदिनीच्या पुलावर एकच गर्दी झाली होती. नेमका वाघ पाहिला कोणी, याबाबत मात्र कुणालही सांगता येत नव्हते. अंबड लिंकरोडवरील पुलावर कामगारांची वाघ पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याने तिडके यांनी पोलिसांना फोन करत माहिती दिली. पोलिस आल्यावर त्यांनी नाहक गर्दी करून

उभे असलेल्या कामगारांना हटकले. परंतु, तब्बल तीन तास वाघ पुलाखाली असल्याची अफवा पसरल्याने महिला कामगारांसह नागरिक 'वाघ दिसला का' असे एकमेकांना विचारत होते.

मस्करीची झाली अफवा

याबाबत नंदिनी नदीच्या पुलाच्या बाजूला राहणारे शेतकरी गोकुळ निगळ यांना विचारले असता त्यांनी ही अफवा असल्याचे सांगितले. याबाबत तिडके यांनी सांगितले की, मुख्य जलवाहिनीचा व्हॉल्व बंद करण्यासाठी महापालिकेच्या ठेकेदाराचे कर्मचारी आले होते. यावेळी पहाटे उघड्यावर शौच करणाऱ्या एकाला कर्मचाऱ्यांनी इथून निघ, वाघ आला

असे मिश्किलीत सांगितले. यानंतर संबंधित व्यक्तीने जोरात आवाज देत नंदिनी नदीच्या पुलाखाली वाघ आल्याची आवई उठवली. यामुळे अंबड एमआयडीसीत

पहिल्या पाळीवर जाणारे काम पुलावर थांबून वाघ कुठे आहे, असे वाकून पाहात असल्याचे तिडके यांनी सांगितले.

सातपूर भागात वाघ किंवा बिबट्या आजपर्यंत आलेले नाहीत. 'वाघ आला रे..' असे एका शौच करणाऱ्या व्यक्तीला पाणीपुरवठा विभागाच्या कामगारांनी सांगितले. त्यानंतर संपूर्ण सातपूरमध्ये ही अफवा पसरली.

- गोकुळ तिडके, स्थानिक शेतकरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाणी समाजाची उद्या बैठक

0
0

म. टा. वृ्तसेवा, पंचवटी

लाडशाखीय वाणी समाज पंचवटी मित्रमंडळ आयोजित बैठक बुधवारी (दि. ३) सायंकाळी साडेसहा वाजता श्रीकृष्णा माधव मंगल कार्यालय, किशोर सूर्यवंशी मार्ग, आरटीओ कार्यालयाजवळ होणार आहे.

पुणे येथे दि. २४ व दि. २५ नोव्हेंबरला होणाऱ्या महाअधिवेशन २०१८ च्या संदर्भात या बैठकीत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राजेश कोठावदे, सचिन बागड, प्रशांत केतकर, भगवान खैरनार, आबासाहेब सोनजे, सुरेश धामणे, सुनील मुसळे, शरद वाणी, अभय नेरकर आदी उपस्थित राहणार आहेत. बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष राहुल वेढणे, पंचवटी समन्वयक अड. प्रवीण अमृतकर, प्रभाकर कोठावदे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्वाइन फ्लूने दोन महिलांचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक/निफाड

जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा झपाट्याने प्रसार होत असून, रविवारी दोन महिलांचा मृत्यू झाला. या महिला निफाड व सिन्नर तालुक्यातील आहेत. सिव्हिल हॉस्पिटलच्या स्वाइन फ्लू विशेष कक्षात उपचार घेणाऱ्या कुंदेवाडीच्या (ता. सिन्नर) महिलेचा स्वाइन फ्लूसदृश तापाने रविवारी मृत्यू झाला. संगीता पवार (वय ३५) असे महिलेचे नाव आहे.

नांदूरमध्यमेश्वर (ता. निफाड) येथील सुरेखा विलास डांगले (वय ४२) या महिलेचाही स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला. निफाड तालुक्यात आतापर्यंत पाच जणांचा या आजाराने बळी घेतला आहे. सुरेखा डांगले या पाच ते सहा दिवसांपासून आजारी होत्या. त्यांना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रविवार रात्री ११ वाजेच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आतापर्यंत गोदाकाठ भागातील रामनगर येथील २, पिंपळस रामाचे, विंचूर येथील प्रत्येकी १ आणि नांदूरमध्यमेश्वर येथील १ अशा पाच जणांचा स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला आहे.

- संबंधित वृत्त..नाशिक प्लस १

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलिस्टच्या रॅलीत पर्यावरणाचा जागर

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीने गांधी जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या नाशिक-मुंबई सायकल रॅलीत पर्यावरणाचा जागर करण्यात आला. यावेळी मुंबईकरांनी रविवारी वाहने कमी वापरावीत याबाबत जनजागृती करण्यात आली.

गांधी जयंती हा दिवस भारतीय सायकल दिन म्हणून साजरा व्हावा या उद्देशाने दरवर्षी १ ते २ ऑक्टोबर अशी दोन दिवसीय रॅलीत काढण्यात येते. यंदाच्या वर्षी ८० हून अधिक सायकलिस्टने या पर्यावरण संवर्धन सायकल रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. १ ऑक्टोबर रोजी भिवंडी फाट्यापर्यंत प्रवास केल्यानंतर मंगळवारी सकाळी ६ वाजता शांग्रीला रिसॉर्टपासून सायकलिस्टनी मुंबईकडे कूच केले.

ठाण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि महापौर मीनाक्षी शिंदे यांनी ठाणे महापालिकेतर्फे सर्व सायकलिस्टस सदस्यांचे जंगी स्वागत केले. येथून कल्याण डोंबिवली, ठाणे आणि मुंबईतील ५० हून अधिक सायकलिस्ट रॅलीमध्ये सहभागी झाले. मुंबई पोलिस आणि स्थानिक सायकलिस्ट संघटनेने प्रचंड वाहतूक असताना नियोजनात मदत करीत सायकलिस्टना वेळेत पोहचण्यास मदत केली. मुंबईकरांमध्ये कुतूहलाचा विषय झालेल्या पर्यावरण संवर्धन रॅलीमध्ये सायकलवर लावलेले फलक आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

दुपारी १२ पर्यंत सर्व सायकलिस्ट 'गेटवे ऑफ इंडिया' येथे पोहचले. तेथे व्हीआयपी सुरक्षेचे विशेष पोलिस महानिरीक्षक आयर्नमॅन कृष्ण प्रकाश आणि एमटीडीसीचे सहव्यवस्थापक आशुतोष राठोड यांनी नाशिक सायकलिस्टचे स्वागत केले. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कृष्णप्रकाश यांनी या चळवळीचे भरभरून कौतुक करीत नाशिकमध्ये खेळ संस्कृती अशीच बहरत जावो यासाठी सदिच्छा दिल्या.

स्वच्छतेचे फलक

नाशिक सायकलिस्टकडे असलेल्या स्वच्छतेविषयी जनजागृती करणारे फलक मुंबईकरांचे लक्ष वेधून घेत होते. 'गेटवे ऑफ इंडिया' येथे उपस्थित पर्यटकांना यावेळी सायकलचे महत्त्व पटवून देत सायकलचा प्रचार व प्रसार करण्यात आला. नाशिकमध्ये सुरू असलेल्या सायकल चळवळीचे कौतुक यावेळी सर्वांनीच केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमची विहीरच विकली

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आमच्या गावातील पिण्याच्या पाण्याचा स्रोत खासगी मालकाला विकला. त्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीची विहीर परस्पर विकत ग्रामस्थांना समस्येच्या जाळ्यात टाकणाऱ्या या प्रकाराची चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी खालप ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले आहे.

देवळा तालुक्यातील खालप ग्रामपंचायतीचे काही ग्रामस्थांनी सध्या आंदोलन सुरू केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या मालकीची विहीर गेल्या दीड ते दोन वर्षांपूर्वी एका खासगी मालकाला विकण्यात आली. त्यामुळे तेथील जलस्रोत बंद झाला आहे. यामुळे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी कुठून आणायचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सरपंच, ग्रामसेवकांनी ग्रामस्थांना विचारात न घेता, तसेच सरकारी परवानगी न घेता, परस्पर ग्रामपंचायतीच्या मालकीची विहीर विक्री केली आहे, असा आरोप खालप ग्रामस्थांनी केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या विहिरीचे पाणी बंद झाल्याने दुसऱ्या एका विहिरीतून पाणी घ्यावे लागते. हे पाणी अतिशय अशुद्ध असून, विहिरीने तळ गाठला आहे. त्यामुळे गावात आरोग्याच्या समस्याही उपलब्ध झाल्या आहेत. ग्रामस्थांच्या हितासाठी कार्यरत असणारी ग्रामपंचायत स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी ग्रामस्थांचे जीवन धाब्यावर बसवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. सतराहून अधिक ग्रामस्थांनी या संदर्भात तक्रार केली असून, तक्रारदारांमध्ये तीन ग्रामपंचायतींच्या सदस्यांचाही सहभाग आहे. गेल्या दोन वर्षांपासून गावातील विहीर विकल्याची तक्रार ग्रामस्थांनी नोंदविली आहे. त्यावर सरकारदरबारी कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. ग्रामस्थांच्या हक्काची विहीर विकून पिण्याच्या पाण्याचा स्रोत संपवणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी ग्रामस्थ शहरातील गोल्फ क्लब मैदानावर उपोषणाला बसले आहेत. मौजे खालप येथील ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकांवर त्वरित कारवाई करा, अशी मागणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या सर्व प्रकाराची माहिती खालप ग्रामस्थांनी विभागीय कार्यालय नाशिक, ग्रामीण पोलिस आयुक्तालय, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, गटविकास अधिकारी, देवळा तहसील कार्यालय, देवळा पोलिस स्टेशन या कार्यालयात लेखी स्वरूपात दाखल केली आहे.

ग्रामपंचायतीने विनापरवाना विहीर खासगी मालकाला विकल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. या पुराव्यांनिशी तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, सरकारदरबारी याची कोणतीही दखल घेतली जात नाही. या प्रकरणी सखोल चौकशी व्हावी आणि पाण्याचा स्रोत विकणाऱ्यांवर त्वरित कारवाई व्हावी, ही आमची मागणी आहे.

- कैलास देवरे, खालप ग्रामस्थ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता कालिकेचेही पेड दर्शन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकची ग्रामदेवता असलेल्या कालिका मातेचे आता पेड दर्शनही उपलब्ध करून देण्यात आले आहे. नवरात्रोत्सव काळात दूरवरून येणाऱ्या भक्त मंडळींना कालिका मातेचे दर्शन होत नाही. त्यामुळे त्यांना माघारी फिरावे लागते. त्यांच्या सोयीसाठी ही पेड दर्शनाची सुविधा करण्यात आली आहे. जिल्हाभरात अनेक देवीदेवतांचे दर्शन पेड असून, कालिका मंदिरासाठी प्रथमच 'पेड' दर्शनाचा निर्णय विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिककरांचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिकादेवी मंदिर विश्वस्तांची यात्राकाळातील नियोजनासंदर्भात कालिका मंदिर सभागृहात नुकतीच बैठक झाली. यावेळी बहुमताने हा निर्णय घेण्यात आला. कालिकादेवीच्या यात्रेत नाशिक शहर, जिल्ह्यासह धुळे, जळगाव, नंदुरबार, पुणे, मुंबई, नगर, पालघर, वाडा, सुरत आदी ठिकाणांहून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. दूरवरून येणाऱ्या भाविकांसह स्थानिक भाविकांना गर्दीमुळे दर्शन घेता येत नाही. त्यामुळे तत्काळ पेड दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या कामात विश्वस्तांसह नाशिककरांनी सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले. ग्रामदैवत कालिकादेवी मंदिर संस्थानचे सरचिटणीस डॉ. प्रतापराव कोठावळे, खजिनदार सुभाष तळाजिया, भय्यासाहेब कोठावळे, यादवराव पाटील, किशोर कोठावळे, सुरेंद्र कोठावळे, आबा पवार, दीपक तळाजिया, सतीश कोठावळे, कृष्णा कोठावळे, राम पाटील आदी उपस्थित होते.

जनजागृतीवर भर

प्रतिवर्षी कालिकादेवी मंदिर संस्थानतर्फे या वर्षी भाविकांना सुविधा देण्यात येणार आहेत. सामाजिक बांधिलकी म्हणून 'बेटी बचाव अभियान', 'स्वच्छता अभियान', 'वृक्षारोपण, अवयवदान', प्लास्टिक बंदी, गोवंश जतन व पालन, वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे यावर मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्याचा मानस मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संशयितांना जामीन

0
0

संशयितांना जामीन

दुर्मिळ वन्यजीव प्राण्यांची तस्करी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले. वन विभागाने या दोघांच्या आठ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. मात्र, कोर्टाने वन विभागाची विनंती फेटाळून लावत संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्याचवेळी संशयितांनी जामीन अर्ज सादर केल्याने त्यावर सुनावणी होऊन तोदेखील मंजूर करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images