Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

स्वप्नील, तन्मय, वरुणचीराज्य बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आंतरशालेय विभागीय मुलांच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत नाशिकच्या स्वप्नील गोरे, तन्मय महाले व वरुण वाघ याने विभागीय बुद्धिबळ संघात स्थान मिळविले आहे. स्वप्नील गोरे हा १४ वर्षाखालील गटात खेळत असून, त्याचे आंतरराष्ट्रीय क्लासिकल एलो रेटिंग १२३६, रॅपिड रेटिंग १२६० असे आहे. तन्मय महाले हा १७ वर्षाखालील गटात खेळत असून, त्याचे आंतरराष्ट्रीय क्लासिकल एलो रेटिंग १४४३, रॅपिड रेटिंग १२०६ असे आहे. वरुण वाघ हा १७ वर्षाखालील गटात खेळत असून त्याचे आंतरराष्ट्रीय क्लासिकल एलो रेटिंग १५६५, रॅपिड रेटिंग १३८२ असे आहे. या तिघांनी उत्कृष्ट खेळ करून नाशिक विभागाच्या संघात स्थान मिळविले आहे. मीनाताई ठाकरे स्टेडियम, विभागीय क्रीडा संकुल, नाशिक येथे २६ सप्टेंबर रोजी आंतरशालेय विभागीय मुलांच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत झाली. २१ ते २४ ऑक्टोबर रोजी रत्नागिरी येथे होणाऱ्या आंतरशालेय राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नाशिक विभागाचे ते प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व क्रीडाप्रेमींनी कौतुक केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिक गुजराती फोरमतर्फे उद्यापासून व्यवसाय मेळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

व्यापार आणि उद्योग वाढीला चालना मिळावी, या माध्यमातून रोजगाराच्या संधी वाढाव्यात या उद्देशाने नाशिक गुजराती बिझनेस फोरमच्या वतीने पहिल्यांदाच एका व्यवसाय मेळावा आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सिटी सेंटर मॉलजवळील ठक्कर डोम येथे ५ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत हा मेळावा होणार आहे.

फोरमच्या माध्यमातून नाशिकमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारच्या मेळावा आयोजनाचा प्रयोग होतो आहे. या मेळाव्यात नाशिकमधील नामांकित उद्योग तसेच व्यापार प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. बांधकाम व्यावसायिक दीपक बिल्डर या मेळाव्याचे प्रायोजक असून त्यामध्ये विविध उद्योगांचे ७५ स्टॉल्स असणार आहेत. सकाळी ११ ते रात्री आठ या वेळेत हे स्टॉल्स खुले राहणार आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने नागरिकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महिलांसाठी सौंदर्य स्पर्धा, चिमुकल्यांसाठी होणाऱ्या चित्रकला स्पर्धेचा समावेश असल्याची माहिती आयोजक उर्विश जोशी, निकेन जोगनपुत्रा, अॅड. मृणाल पंड्या, उपेंद्र दिनानी, शिल्पा मेहता, दिपाली गांधी आदींनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उस्ताद शाहिद परवेझ संगीत गुरुकुलतर्फे ‘स्वरवंदना’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सतारीतून निघणारा झाला, विविध प्रकारच्या रागातील बंदीशी, त्यातून निघणारे स्वर याने कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृह स्वरमय झाले. निमित्त होते उस्ताद शाहिद परवेझ संगीत गुरुकुलतर्फे आयोजित 'स्वरवंदना' या कार्यक्रमाचे.

कुसुमाग्रज स्मारकात बुधवारी सायंकाळी झालेल्या स्वरवंदना कार्यक्रमाची सुरुवात डॉ. उद्धव अष्टुरकर, गुरुकुलाच्या उपाध्यक्ष उमा निशाणदार, ज्येष्ठ वादक मोहिनी कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी राग मारुबिहाग सादर करण्यात आला. त्रितालाच्या रचनेतून सुजाता मंजुनाथ, स्वाती शहा आणि अंजली कुलकर्णी यांनी तोडे, झाला यांचे सादरीकरण केले. त्यानंतर ज्योती डोखळे, शर्मिला जोशी आणि गीताली भट यांनी राग यमन सादर केला. सोळा मात्रांच्या त्रितालात त्यांनी विविध हरकती घेत वादन केले. विनया फणळकर यांनी यमना कल्याण राग सादर केला. यात त्रितलातील ठाय लय, मध्य लय, द्रुत लयीत वादन सर्वाना मोहित करून गेले.

सायंकाळच्या रागातील मुख्य समजला जाणारा राग गोरख कल्याण नीलिमा कुलकर्णी, स्मिता कापडणीस आणि सुनीता देशपांडे यांनी सादर केला. या रागातील आर्तता प्रेक्षकांना भावली. उस्ताद शाहिद परवेझ संगीत गुरुकुलाच्या ज्येष्ठ वादक उमा निशाणदार, मोहिनी कुलकर्णी, वासंती खाडिलकर, राधिका गोडबोले, अंजली नांदूरकर, सोनल शहाणे, सुनीता जळगावकर यांनी राग पुरीया कल्याण सादर केला. त्रितालातील या रचनेने स्वरवंदना कार्यक्रमाला चार चांद लावले.

डॉ. उद्धव आष्टुरकर यांनी सादर केलेल्या राग जोगकंसने कार्यक्रमाची सांगता झाली. या रागाची गत त्यांनी रुद्रतालात बांधली होती. त्यांच्या शिवरंजनी रागातील धून मनात गुणगुणत रसिक प्रेक्षक सभागृहा बाहेर पडले. संपूर्ण कार्यक्रमाला तबला साथ गौरव तांबे, नकुल दायमा, शुभम जोशी यांनी केली.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इनोव्हेशन क्लस्टरला मान्यता

$
0
0

इनोव्हेशन क्लस्टरला

राज्यपालांकडून मान्यता

नाशिक : नावीन्यपूर्ण प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक इंजिनीअरींग क्लस्टरला 'इनोव्हेशन सेंटर'ची मान्यता देण्यात आली आहे. उद्योगविश्वातील नव्या संकल्पनांना पूर्ण करीत नव्या क्षेत्रात काम करण्याची संधी नाशिक इंजिनीअरिंग क्लस्टरला या माध्यमातून लाभणार आहे. राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडून क्लस्टरला इनोव्हेशन सेंटरच्या मान्यतेचे पत्र देण्यात आले. राजभवनात पार पडलेल्या समारंभात नाशिक इंजिनीअरींग क्लस्टरला 'इन्क्यूबेशन पार्टनर' म्हणून घोषित करण्यात आले. केंद्रीय मंत्री सूरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते. 'इनोव्हेशन सेंटर'ला मान्यता दिल्याचे पत्र क्लस्टरचे अध्यक्ष नरेंद्र गोलीया यांना देण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौपाळेप्रकरणी हंडा मोर्चा

$
0
0

संबंधित रिसॉर्ट संचालकावर गुन्हा

म. टा. वृत्तसेवा, धुळे
नंदुरबार जिल्ह्यातील चौपाळेत पाण्यावरून झालेल्या प्रकारानंतर बुधवारी (दि. ३) सकाळी चौपाळे ग्रामस्थांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी चौपाळे गावाला तत्काळ पाणीपुरवठा करण्यास सूचना केल्या. तसेच, कृष्णा पार्क रिसॉर्टची दोन दिवसांत चौकशी करून प्रकल्प सील करण्याचेही आदेश दिले आहेत.

चौपाळे ग्रामस्थांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीवरून मंगळवारी अचानक वाद उफाळून आला होता. गावाच्या ग्रामसभेत ठराव करूनही कृष्णा पार्क रिसॉर्ट बंद करण्यात आलेले नाही. तसेच, संबंधित रिसॉर्ट संचालक योगेंद्र दोरकर यांच्यावर पोलिसांनी अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या विभागीय अध्यक्ष घन:श्याम चौधरी यांच्यासमवेत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी गावकऱ्यांना धरणातील पाणी तत्काळ देण्यात येईल आणि अवैध व्यवसाय सुरू असलेल्या कृष्णा पार्कची दोन दिवसांत चौकशी करून प्रकल्प सील करण्याचे आदेश दिले. तसेच, २७ गावकऱ्यांवर दाखल गुन्ह्यांबाबतही चौकशी करून न्याय देण्यात येण्याचे सांगितले.
गावाला पिण्यासाठीचे पाणी वावद लघू तलावातून करण्यात आलेल्या विहीर व बोअरवेलमधून करण्यात येत होता. परंतु, कृष्णा पार्कचे संचालक योगेंद्र दोरकर यांनी हा पुरवठा बंद केल्यानेच ग्रामस्थांनी संप्तत होऊन रिसॉर्टच्या तोडफोडीचा प्रकार घडला. रिसॉर्टच्या नावाखाली कुंटणखान्यासारखे अवैध व्यवसाय सुरू आहेत, असे निवदेनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत वेळोवेळी ग्रामपंचायतीकडून ठराव करून जिल्हा प्रशासनाला कृष्णा पार्क बंद करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र,याबाबत कोणतीही दखल घेण्यात आली नाही. जोपर्यंत पार्क बंद होत नाही व शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असेही निवेदनात नमूद केले आहे.

चौपाळे गावात झालेल्या वादप्रकरणी गावातील २७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर कृष्णा पार्क रिसॉर्टचे संचालक योगेंद्र दोरकर यांच्यावरही ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे. मात्र, या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.

-चंद्रकांत गवळी, अप्पर पोलिस अधीक्षक, नंदुरबार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंटेनरची कारला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

$
0
0

चिंचगव्हाण फाट्यावरील घटना

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

चाळीसगाव ते धुळे या राष्ट्रीय महामार्गावर (क्र. २११) असलेल्या चिंचगव्हाण फाट्यावर चारचाकीला धुळ्याकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनरने समोरून धडक दिली. या अपघातात कारचालकासह मालक व अन्य एक प्रवासी असे तिघांचा मृत्यू झाला. एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून, मृत दोघे तालुक्यातील दहिवदचे तर एक जण चिंचगव्हाणचा रहिवासी होत.

मेहुणबारे नजिकचा चिंचगव्हाण फाट्याजवळ बुधवारी (दि. ३) सायंकाळी ५.३० वाजता पुन्हा एकदा भीषण अपघात झाला. गोकुळ पंडित केदार (वय ५२), भूषण सुभाष वाघ (वय २५) तसेच पुरूषोत्तम पंडित बागूल (वय ४५, रा. चिंचगव्हाण) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. तर विजय संजय बागूल (वय २०, रा. दहिवद) हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले आहे. भरधाव कंटेनर (एनएल. ०१ - एबी ५४३७) बंगळूरूकडून दिल्लीकडे चाळीसगाव ते धुळेमार्गे जात होता. तर प्रवासी कार (एमएच. ०६ - जे. ९७००) ही चिंचगव्हाण येथून दहिवदकडे निघाली होती. कंटेनरने कारला जोरदार धडक दिल्याने कारचा चक्काचूर झाला. चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला उतरून शेतात शिरला. कंटेनरचे दरवाजे लॉक असल्याने त्यात काय सामान आहे हे समजू शकले नाही. अपघात होताच कंटेनरचालक घटनास्थळावरून फरार झाला. मृत पुरूषोत्तम बागूल हे कारचे चालक होत. ते मेहुणबारे ते दहिवद या दरम्यान खासगी प्रवासी वाहतूक करीत असत. ते भूषण वाघ यांच्या कारवर चालक होते. अपघातात कारचे चालक अन् मालक असे दोघांचा मृत्यू झाला. अपघातात मृत झालेले गोकुळ केदार यांच्या पत्नी दहिवद ग्रामपंचायत सदस्या असून त्यांना दोन मुले आहेत. खासगी कामानिमित्त बाहेर जात असल्याचे त्यांनी आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सर्जिकल स्ट्राईक दिन साजरा

$
0
0

सर्जिकल स्ट्राईक दिन

नाशिक : मविप्र समाजाचे कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कॉलेजमध्ये राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने २९ सप्टेंबर हा दिवस सैनिकांचे शौर्य मनोबल वाढविण्याचे दृष्टाने साजरा व्हावा, यासाठी महाविद्यालयात सर्जिकल स्ट्राईक दिन म्हणून साजरा करण्यात आला. सिन्नर कॉलेजचे संरक्षण विभागाचे प्रमुख प्रा. आर. व्ही. पवार हे प्रमुख पाहुणे होते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारत पाकिस्तान संबधांविषयी माहिती दिली. सूत्रसंचालन प्रा. आर. एम. आंबेकर यांनी केले तर आभार उपप्राचार्य प्रा. देविदास गिरी यांनी मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिष्यवृत्ती’च्या सराव परीक्षा घ्या

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका शिक्षण विभागातील शिष्यवृत्ती परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती अॅड. रवींद्र पगार यांनी शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी नितीन उपासनी यांच्याकडे केली आहे.

अॅड. पगार यांनी मागणीचे निवेदनही दिले. महापालिका शिक्षण मंडळाचा उपसभापती म्हणून कामकाज करत असतांना शिष्यवृत्ती परीक्षेत बसलेल्या विद्यार्थ्यांच्या सातत्याने सराव चाचणी परीक्षा तत्कालीन मंडळाने घेतल्या होत्या. त्याचा परिपाक म्हणून सुमारे १७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत झळकले होते. याच धर्तीवर विद्यार्थ्यांना सराव चाचणी परीक्षा संच व प्रश्नोत्तरे मार्गदर्शक उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अॅड. पगार यांनी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नोत्तरे असलेले मार्गदर्शक, प्रश्नपत्रिका संच व इतर साहित्य उपलब्ध करून द्यावे, असेही त्यात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासी महिला निसर्गत: कार्यकुशल

$
0
0

डॉ. दिनेश भोंडे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी महिलांमध्ये मुळातच अनेक कौशल्ये असतात. कौशल्याधिष्ठीत प्रशिक्षण कार्यशाळेमुळे त्यांना उपजीविकेचे नवे मार्ग गवसतील. त्यातून त्यांच्या उत्पन्नात भर पडेल व त्यांचे जीवनमान उंचावेल, असा विश्वास यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी व्यक्त केला.

मुक्त विद्यापीठात राज्य महिला आयोग व विद्यापीठाची शिक्षणशास्त्र विद्याशाखा यांच्यातर्फे आदिवासी महिलांसाठी दोन दिवसीय कौशल्याधिष्ठीत प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन डॉ. भोंडे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांची आदिवासी महिलांना माहिती, त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी विद्यापीठ नेहमीच प्रयत्नशील राहील, असेही ते म्हणाले.

आदिवासी महिलांमधील कौशल्यांना उजाळा व वाव मिळणे गरजेचे आहे, असे कार्यशाळेच्या प्रमुख समन्वयक प्रा. डॉ. कविता साळुंखे यांनी सांगितले. जिल्ह्यातील विविध भागातून एकत्र आलेल्या आदिवासी महिलांमधील शिकण्याच्या तळमळीचे कार्यशाळेच्या समन्वयक प्रा. डॉ. संजीवनी महाले यांनी कौतुक केले.

यावेळी राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक विष्णू शेवाळे, आयोगाच्या जिल्हा समुपदेशक वैशाली शेवाळे, प्रशिक्षिका प्रा. रुपा शहा, वसुंधरा शिवणेकर, कृषी विज्ञान केंद्राच्या विषय विशेषज्ञ अर्चना देशमुख, शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या प्रा. डॉ. विजया पाटील, प्रा. विजयकुमार पाईकराव आदी उपस्थित होते. विद्या बागूल यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती लष्करी, साधना लामतुरे व शर्मिष्ठा ओक यांनी तीनही सत्रांचे संयोजन केले. राहुल ढेरे यांनी आभार मानले.

कार्यशाळेत याविषयी मार्गदर्शन

कार्यशाळेच्या प्रथम सत्रात स्वाती वानखेडे व डॉ. दयाराम पवार यांनी विविध आकारातील कागदी पिशव्यांची निर्मिती याविषयी मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रात स्वाती वानखेडे व डॉ. सुभाष सोनुने हे झाडांच्या पानांपासून द्रोण तयार करण्याबाबत माहिती दिली. दुपार सत्रात स्वरूप दंडनाईक आणि डॉ. संजीवनी महाले यांनी बियांपासून विविध अलंकार कसे बनवायचे याविषयी सांगितले. कार्यशाळेत जिल्ह्यातील नाशिक, त्र्यंबक, कळवण, पेठ व दिंडोरी या तालुक्यांमधून ६२ आदिवासी महिला सहभागी झाल्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नसती उठाठेव’तर्फे उद्या पितरांचा महोत्सव

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्राद्ध कर्म करून लोकांना जेवण देण्यापेक्षा उपाशी गरजवंतांना एक घास द्या, या संकल्पनेतून नसती उठाठेव मित्र परिवाराच्या वतीने शनिवारी (दि. ६) सकाळी ८ ते दुपारी २ या कालावधीत पितरांचा महोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान मंदिर, नरसिंह नगर, गंगापूर रोड येथे हा कार्यक्रम होईल. या महोत्सवाचे यंदा दहावे वर्ष आहे.

नसती उठाठेव मित्र परिवारातर्फे २००९ पासून पितरांचा महोत्सव हा अनोखा उपक्रम राबविला जातो. आपल्या पूर्वजांविषयी प्रत्येकाच्या मनात आदरयुक्त भावना असते. ही भावना प्रकट करण्यासाठी पितृपक्षात पूर्वजांचे स्मरणार्थ श्राद्ध कर्म करून चार लोकांना बोलवून जेवण देत असतात, पिंडदान करतात. तसेच पितरांच्या स्मरणार्थ काही दान करायला उद्युक्त होतात. हीच भावना लक्षात घेऊन मंडळाने श्राद्ध कर्म करून उपाशी व गरजू लोकांना जेवण देण्याचे लोकांना आवाहन केले होते. या उपक्रमात परिसरातील व्यक्तींकडून धान्य किंवा रोख रक्कम दान म्हणून स्वीकारण्यात येते. मागील वर्षी एकूण ५५ क्विंटल धान्य तेल व गुळाचे वाटप सिडको येथील दिलासा संस्था, पडसाद कर्णबधीरांची शाळा, प्रबोधिनी ट्रस्ट मानसिक मुलांची शाळा, वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालय, गाडगे महाराज आश्रमशाळा इत्यादी संस्थाना मदतीचा हात देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तीन मंत्र्यांचाही आज नाशिकला भेट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकाच्या दीक्षांत संचलन समारंभ शुक्रवारी (दि. ५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री विभागीय आयुक्त कार्यालय येथे जिल्ह्यातील प्रलंबित योजना व कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक घेणार आहे. या दोन्ही कार्यक्रमासाठी पालकमंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहे. तसेच दीक्षांत संचालनात गृह राज्यमंत्री दीपक केसरकर व डॉ. रणजित पाटील हे उपस्थित राहणार आहे.

मुख्यमंत्री सकाळी शासकीय विमानाने नाशिककडे प्रयाण करणार आहे. सकाळी ७.५० वाजता ओझर विमानतळ येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर ते शासकीय वाहनाने महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनी (एमपीए) मुख्य कवायत मैदान नाशिककडे प्रयाण करणार आहे. सकाळी ८ वाजता महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनी येथे होणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकच्या दीक्षांत संचलन समारंभास उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या प्रकल्प योजनांबाबत आढावा बैठक विभागीय आयुक्त कार्यालय येथे होणार आहे. त्यानंतर नाशिक जिल्हा कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक दुपारी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्याची ‘लेक’ करणार जकार्तात ‘तिरंदाजी’

$
0
0

व्हीलचेअरवरील मिताली गायकवाडची पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड

संजय लोणारी, येवला

प्रबळ इच्छाशक्ती, प्रचंड ध्येय अन् अंगी कसब असल्यास अपंगात्वर देखील मात करून सातासमुद्रापार होणाऱ्या जगातील अत्यंत महत्त्वाच्या क्रीडा स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी होण्याची अगदी मोठी किमया साधता येवू शकते हे कुमारी मिताली श्रीकांत गायकवाड या येवल्याच्या लेकीने आपल्या झालेल्या निवडीतून दाखवून दिले आहे. इंडोनेशियातील जकार्ता येथे शनिवार (दि. ६) पासून सुरू होणाऱ्या पॅरा एशियन क्रीडा स्पर्धेसाठी व्हील चेअरवरील मिताली गायकवाड हिची निवड होतानाच, आपल्या संघासोबत रवाना झालेली येवल्याची ही 'लेक' जकार्तात 'तिरंदाजी' करणार आहे. काही वर्षांपूर्वी दोन्ही पायाला अचानक आलेले एकप्रकराचे अपंगत्व अन् त्यातून आजतागायत धरावी लागलेली व्हील चेअर...असं एकीकडे अगदी मोठं दुखः असतानाही डगमगून न जाता तिरंदाजीची आवड निर्माण झाली. मितालीने व्हीलचेअरवरूनच तिरंदाजीचा विविध ठिकाणी सराव केला. या कर्तृत्वाच्या जोरावर आज पॅरा एशियन क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने थेट सातासमुद्रापार विदेशात पोहचताना तेथे आपली कर्तबगारी दाखवणार आहे.

येत्या सहा ऑक्टोबरपासून इंडोनेशियातील जकार्ता येथे सुरू होणाऱ्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय पॅरा तिरंदाजी टीमची घोषणा होताना चार पुरुष व तीन महिला तिरंदाज अशा ७ तिरंदाजांसह प्रत्येकी दोन प्रशिक्षक व सहाय्यक अशी एकूण ११ जणांचा संघ जकार्ताकडे रवाना झाला. निवड झालेल्या सात भारतीय परा तिरंदाजी महिला संघात ज्योती बलियान (उत्तर प्रदेश), व्हील चेअरवरील तिरंदाज मिताली गायकवाड (महाराष्ट्र) व महिला रिकर्व ओपन मध्ये पूजा (हरियाना) या तिघींचा समावेश आहे. पुरुष तिरंदाजांमध्ये साहिल व हरविंद्र (दोघेही हरियाना), श्यामसुंदर स्वामी (राजस्थान) व व्हील चेअरवरील तिरंदाज राकेशकुमार (जम्मु काश्मीर) या चौघांचा समावेश आहे. संघासोबत प्रशिक्षक म्हणून संजय सुहाग व कुलदीप वेगवान आहेत. तर व्हील चेअरवरील अजयक कुमार व मिताली गायकवाड यांचे सहाय्यक म्हणून दोघांना जकार्ता येथे पाठविण्यात आलेले आहे.

भारतीय पॅरा 'तिरंदाजी' संघात निवड झालेल्या तीन महिला तिरंदाजांमधील मिताली गायकवाड (वय २४) ही येवल्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा व्यावसायिक श्रीकांत गायकवाड यांची कनिष्ठ कन्या. एक भाऊ व दोन बहिणीमधील लहान असलेल्या मितालीस काही वर्षांपूर्वी अचानक दोन्ही पायांना आजार जडल्याने एकप्रकारे अपंगत्व आले आहे. लहानपणी येवला शहरातील जनता विद्यालयात माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरवीत पुढे एफवाय बी.कॉम.चे शिक्षण घेतलेल्या मितालीच्या पायास काही वर्षांपूर्वी अपंगत्व येताना आजवर धरावी लागलेली 'व्हील चेअर' म्हणजे गायकवाड कुटुंबियांसमोर मोठी चिंता. व्हीलचेअरवरच असताना एरवी कुणीही हमखास डगमगून जाईल. मात्र, डगमगून न जाता मितालीने तिच्यात अचानक आवड निर्माण झालेली 'तिरंदाजी'ची आवड अधिकाधिक जोपासली. यावर्षीच्या जुलै महिन्यातील १८ व १९ तारखेस रोहतक (हरियाना) येथील राजीव गांधी क्रीडा संकुलात आयोजित तिरंदाजी चाचणी स्पर्धेत सहभाग तिने नोंदवला. याठिकाणी देशातील २२ तिरंदाजांनी आपापले निशाने लावताना, त्यातून जकार्ता येथे होणाऱ्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी चार पुरुष व तीन महिला अशा एकूण सात तिरंदाजांची भारतीय संघ निवडण्यात आली.

कामिगरीकडे लक्ष

निवड झालेल्या तीन महिला भारतीय तिरंदाजांमध्ये मिताली हिचा समावेश असून ती याच आठवड्यात आपल्या संघासोबत जकार्ताकडे रवाना झाली. मिताली हिच्या निवडीमुळे येवल्याची 'कन्या' आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या तिरंदाजीचे कर्तृत्व दाखवणार असून, जकार्तामधील स्पर्धेदरम्यान तिरंदाजी मैदानाकडे येवलावासियांसह नाशिक जिल्हयाचे लक्ष असणार आहे. नव्हे तर, व्हील चेअरवरील मितालीच्या तिरंदाजीचे बाण नेमके कसे अचूक 'लक्ष्य' साधताना तिची कामगिरी कशी होते, याकडे सर्वांच्याच नजरा असणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लू संशयिताचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलच्या स्वाइन फ्लू वॉर्डात उपचार घेत असलेल्या सिन्नर तालुक्यातील एकाचा गुरुवारी मृत्यू झाला. सप्टेंबरअखेरपर्यंत मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ३५ इतका असून, त्यात आता या महिन्यात भर पडते आहे.

पुरुषोत्तम बाबुराव भोजणे (ब्राह्मणवाडे, ता. सिन्नर) असे उपचारादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. भोजणे यांना नुकतेच स्वाइन फ्लू कक्षात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. आजमितीस स्वाइन फ्लू कक्षात १५ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यातील दोन जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे तपासणी अहवालाद्वारे स्पष्ट झाले आहे. परतीच्या पावसाचे शहरात आगमन झाले असून, वातावरणात होणाऱ्या लक्षणीय बदलामुळे स्वाइन फ्लूचा फैलाव वाढण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.

नाशिकमध्ये नऊ बळी

ग्रामीण भागासोबतच शहरातही स्वाइन फ्लूचा उद्रेक कायम असून, स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत नऊ जणांचा बळी घेतला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत १५५ जणांना स्वाइन फ्लूची लागण झालेली आहे. संशयितांचा आकडा शेकडोच्या घरात आहे. शहरातील अनेक रुग्णालयांमध्ये विविध आजारांमुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इस्त्रोमुळे भारत विकसित देशांच्या यादीत

$
0
0

विरेंद्रकुमार यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारताच्या अणुविज्ञानाचा पाया विक्रम साराभाई यांनी घातला. त्यांनी विज्ञानाच्या प्रगतीला दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर अणुशक्ती, ऊर्जानिर्मित्ती या क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यासाठी तसेच 'इस्त्रो'च्या स्थापनेसाठी विक्रम साराभाई यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 'इस्त्रो'मुळेच भारत आज विकसित देशांच्या यादीत आहे, असे प्रतिपादन 'इस्त्रो'च्या डीईसीयू विभागाचे डायरेक्टर विरेंद्रकुमार यांनी केले.

मविप्र समाज संस्था व नॅशनल स्पेस सोसायटी (यूएसए) नाशिक इंडिया चॅप्टर यांच्यातर्फे आयोजित जागतिक अंतराळ सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात गुरुवारी सायंकाळी हा कार्यक्रम झाला. यावेळी विरेंद्रकुमार म्हणाले, की २०२२ पर्यंत भारतीय बनावटीच्या उपग्रहातून भारतीय अवकाशात जाऊन सुखरुप परत येऊ शकतील, अशी व्यवस्था विकसित करण्याचा आमचा मानस आहे. आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीने वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासून कायम विज्ञानाची कास धरली पाहिजे. 'इस्त्रो'ने आतापर्यंत ८८ सॅटेलाइट सोडले असून राष्ट्र विकासासाठी हे मोठे योगदान आहे.

मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी विज्ञानाची गरज सांगितली. तर नॅशनल स्पेस सोसायटी नाशिक चॅप्टरचे अध्यक्ष अविनाश शिरोडे यांनी नॅशनल स्पेस सोसायटीची माहिती दिली. यावेळी 'इस्त्रो'चे राहुल शर्मा, नॅशनल स्पेस सोसायटी नाशिक चॅप्टरचे ओमप्रकाश कुलकर्णी, विजय बाविस्कर, बीएसएनएलचे जनरल मॅनेजर नितीन महाजन आदींची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांशी साधला संवाद

'इस्त्रो'च्या डीईसीयू विभागाचे डायरेक्टर विरेंद्रकुमार यांनी अंतराळ सप्ताहानिमित्त आयएमआरटी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्याकडे शंभर वर्षे असून सृष्टी वाचविण्यासाठी आपल्याला पृथ्वी सोडून जावे लागेल, असे भाकीत स्टिफन हॉकिंग यांनी वर्तविले होते. तसेच मनुष्य आणि समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी स्पेस तंत्रज्ञानाच्या मदतीने नवीन वैज्ञानिक तंत्रज्ञानाच्या वापराने मार्ग शोधावा लागेल. विद्यार्थ्यांनी जिज्ञासा वाढवून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे महत्त्वाचे आहे, असे विरेंद्रकुमार यांनी सांगितले. यावेळी मंचावर संस्थेचे सभापती राघो अहिरे, राहुल शर्मा, अविनाश शिरोडे, प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, शिक्षणाधिकारी प्रा. एस. के. शिंदे, डॉ. एन. एस. पाटील उपस्थित होते.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंजाबच्या सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विषारी सर्प हाताळण्याचा अनुभव असलेला आणि याच कलेमुळे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या पंजाबमधील सर्पमित्राचा नाशिकरोडच्या सामनगाव येथे बुधवारी (दि. ३) सायंकाळी सर्पदंशाने मृत्यू झाला. सामनगावात त्याने विषारी सर्प पकडल्यानंतर तो हाताळताना ही घटना घडली. हा सर्प किंग कोब्रा असल्याचे त्याच्यासोबतच्या साथीदारांनी सांगितले. वन्यजीव सप्ताहातच अनुभवी सर्पमित्राचा सर्पदंशानेच मृत्यू आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

विक्रमसिंग मलौत (वय ३८, रा. श्री आनंदपूर साहिब, ता. अनंतपुरी, रूपनगर, पंजाब) असे या सर्पमित्राचे नाव आहे. सामनगाव येथे बुधवारी अतिविषारी व दुर्मिळ प्रजातीच्या सापासोबत स्टंट करताना ही घटना घडली. विक्रमसिंग काही दिवसांपूर्वी नांदेड येथील गुरुद्वारा येथे आला होता. यानंतर त्यांच्या कारचा अपघात झाला. त्यामुळे वाहन दुरुस्त करण्यासाठी तो नाशिकमध्ये आला होता. वाहनाचे काम दोन दिवसांत पूर्ण होणार असल्याने त्याने नाशिकरोडच्या सामनगाव येथील सर्प पकडणे सुरू केले. विक्रम बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक विषारी सर्प पकडला. हा सर्प हाताळत असताना त्याला सर्पाने हाताच्या बोटाजवळ दंश केला. या दंशामुळे काही वेळातच विक्रम अत्यवस्थ झाला. या वेळी त्याच्यासोबत असलेल्या भावांनी आणि इतर साथीदारांनी त्याला सायंकाळी सहा वाजता सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याच्यावर शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. दरम्यान, या घटनेमुळे हादरलेल्या विक्रमसिंग याच्या इतर साथीदारांनी त्याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, येथेही डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. विक्रमसिंगचा मृतदेह ताब्यात घेऊन त्याच्या मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटल गाठले. तेथे त्याच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. वन्यजीव सप्ताहातच हा प्रकार घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

सोशल मीडियावर हिरो

विक्रमसिंग पंजाबमधील असून, अल्पावधीत त्याने सर्प पकडण्याची कला अवगत केली होती. विक्रमची ही कला पंजाबमध्ये चर्चेचा विषय ठरली. त्यातूनच तो लोकप्रियदेखील झाला होता. फेसबुक, इन्स्टाग्राम, यू ट्यूब व ट्विटर या सोशल नेटवर्किंग साइटवर सक्रिय असल्याने त्याच्या सर्प पकडण्याच्या व्हिडिओंना हजारोंनी लाइक मिळत होते, तसेच वेगवेगळ्या प्रजातींच्या सर्पांसोबत तो नेहमीच फोटो व व्हिडिओ सोशल साइटवर अपलोड करीत होता. या एकूणच व्हिडिओंमध्ये तो धोकादायक पद्धतीने सर्पांना हाताळत असल्याचे दिसते. सर्प पकडताना योग्य ती खबरदारी घेतली नसल्याने सर्पदंशाचे प्रकार घडतात, असे स्थानिक सर्पमित्रांनी स्पष्ट केले.

तो सर्प कोब्रा?

सामनगावात विक्रमला किंग कोब्रा सापाने दंश केल्याचे त्याच्या साथीदारांनी सांगितले. या वक्तव्याबाबत शंका व्यक्त केली असून, या घटनेबाबत नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणात विविध प्रश्‍न उपस्थित होत असून, त्या दृष्टीनेही पोलिस तपास करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कारभाराचे वाभाडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यालयातील टेबलवर बसून आणि बैठका घेऊन आदेश सोडणे एवढीच कामे आयुक्त तुकाराम मुंढेंकडून केली जात आहेत, असा थेट हल्लाबोल महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी केला. नाशिकरोड येथील दोन प्रभागांची पाहणी केल्यानंतर सायंकाळी रामायण या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन महापौर भानसी यांनी प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले.

शहरातील बिघडलेल्या आरोग्यस्थितीसह नागरी प्रश्नांना प्रशासनप्रमुख म्हणून आयुक्तच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला असून, कार्यालयात बसून आदेश दिले म्हणजे शहराचे प्रश्न सुटत नाहीत, असा टोला लगावला. प्रत्यक्ष फिल्डवर वस्तुस्थिती पाहता शहरात प्रशासन कार्यरत आहे, असे वाटत नाही, असा आरसाच त्यांनी मुंढेंना दाखविला आहे. महापौरांचा वचक काय असतो ते आपण आता प्रशासनाला दाखवून देऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे मुंढे विरुद्ध महापौर असा संघर्ष पुन्हा सुरू झाला आहे.

शहरात सर्व काही सुरळीत असल्याचा भास प्रशासनाकडून निर्माण केला जात असला, तरी प्रत्यक्ष प्रभागांत मात्र भयावह स्थिती आहे. शहराचे आरोग्य सलाइनवर आहे. रस्ते, ड्रेनेज, पाणी, लाइट यांची अवस्था बिकट आहे. प्रशासनाकडून शाळा आणि रुग्णालयांचीसुद्धा स्वच्छता केली जात नाही. या पाहणीत प्रशासनाच्या कारभाराचा कच्चाचिठ्ठा समोर आला असून, नागरिकांना पायाभूत सुविधाही दिल्या जात नसल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये नागरिकांवर २४ तास उपचार करणे अपेक्षित असताना रुग्णालयांत डॉक्टरही वेळेवर येत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाने जनतेची कामे होत नसतील, तर आम्हाला तसे स्पष्ट सांगावे, असे सांगत, आरोग्य व वैद्यकीय विभागाला त्यांनी तातडीने आराखड्याची अंमलबाजणी करण्याचे आदेश दिले. शहराच्या सर्व बिघडलेल्या स्थितीला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप करीत मुंढेंचे शहराकडे लक्ष नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाणार असून, शुक्रवारी त्यासंदर्भात होणाऱ्या बैठकीत या विषयाला वाचा फोडली जाईल, असा दावा त्यांनी केला. मुंढेंविरोधात थेट महापौरच आता रिंगणात उतरल्याने महापौर विरुद्ध आयुक्त असा संघर्ष शिगेला पोहोचणार आहे.

--

'मुंढे टोळ्या घेऊन फिरतात'

पत्रकार परिषदेत सभागृह नेते दिनकर पाटील यांनी पुन्हा आयुक्त मुंढेंवर तोंडसुख घेतले. मुंढे हे आपल्या निवडक लोकांच्या टोळ्या घेऊन वॉक विथ कमिशनरमध्ये फिरत असल्याचा आरोप त्यांनी केला. आमची बांधिलकी गोरगरिबांशी आहे. परंतु, मुंढे हे कॉलेजरोडसारख्या श्रीमंत वस्त्यांमध्येच फिरतात. ग्रामीण भागात, जुने नाशिक आणि सातपूरमध्ये त्यांनी वॉक विथ कमिशनर उपक्रम घेऊन दाखवावा, असे आवाहनही त्यांनी केल. मुंढेंची चमचेगिरी करण्यापेक्षा गोरगरिबांची करेन, असा दावाही त्यांनी यावेळी केला. आता मुंढेंना स्थायी समिती आणि महासभेतच बघू, असा दम भरतानाचा मुंढे आमचे बॉस नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे महासभेत आणि स्थायीमध्ये मुंढेंविरुद्ध पाटील असा संघर्ष पाहायला मिळणार आहे.

--

३३७ तक्रारी प्रलंबित

आयुक्त मुंढेंनी सुरू केलेल्या वॉक विथ कमिशनर या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असला, तरी या उपक्रमात प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे पूर्णपणे निराकरण होत नसल्याचे चित्र आहे. या उपक्रमात प्राप्त होणाऱ्या तक्रारींपैकी ३३७ तक्रारीचे अद्याप निराकरण झाले नसल्याचे समोर आले आहे. नगररचना, सार्वजनिक बांधकाम आणि अतिक्रमण निर्मूलन विभाग प्रलंबित तक्रारींच्या बाबतीत आघाडीवर असून, १८८ तक्रारी महिनाभरापेक्षा अधिक कालावधी उलटला तरी सुटू शकल्या नसल्याचे वास्तव समोर आले आहे. यामध्ये १४९ तक्रारी या सात दिवसांपेक्षा अधिक, तर १८८ तक्रारी ३० दिवसांपेक्षा अधिक प्रलंबित राहिल्या आहेत. आज, शुक्रवारी (दि. ५) सायंकाळपर्यंत या तक्रारींचे निराकरण करून उचित कार्यवाही करण्याचे आदेश आयुक्त मुंढे यांनी संबंधित खातेप्रमुखांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही नागरिकांना थातूरमातूर उत्तरे देऊन परत पाठविले जात असल्याच्याही तक्रारी याबाबत प्राप्त झाल्या आहेत.

------------------------------------------------------------------------------------------

समस्यांचा सुकाळ अन् कर्मचाऱ्यांची बेबंदशाही

--

नाशिकरोडला 'महापौर आपल्या प्रभागात'मध्ये अधिकारी धारेवर

--

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष आयुक्तांच्या कार्यकाळातच नाशिकरोड विभागातील बांधकाम, पाणीपुरवठा, विद्युत, वैद्यकीय, आरोग्य व स्वच्छता, रस्ते आणी ड्रेनेज या सर्व विभागांतील समस्यांचा सुकाळ आणि कर्मचाऱ्यांची बेबंदशाही बघून महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी अक्षरशः कपाळाला हात लावून घेतला.

'महापौर आपल्या प्रभागात' या उपक्रमाच्या प्रारंभाप्रसंगीच शाळा, रुग्णालयांची दुरवस्था पाहिल्यानंतर महापौरांच्या अंगावर शहारे आले. प्राथमिक सुविधांबाबत असलेली नागरिक आणि नगरसेवकांची बोंबाबोंब अनुभवल्यानंतर शिस्तप्रिय आयुक्तांचा हाच का कारभार, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. या दौऱ्यानंतर महापौरांनी बिघडलेल्या आरोग्य स्थितीसह अन्यत्रच्या वाईट स्थितीबाबतही मुंढेंवर हल्लाबोल केला. या सर्व स्थितीला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोपही केला.

आयुक्त तुकाराम मुंढेंकडून वॉक विथ कमिशनरच्या माध्यमातून नगरसेवकांच्या हक्कावर गदा आणली जात असल्याने त्याला आता सत्ताधाऱ्यांनीही प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. महापौर रंजना भानसी यांच्या 'महापौर आपल्या प्रभागात' या उपक्रमास गुरुवारी प्रभाग क्रमांक १९ व २२ पासून झाली. त्यांच्यासोबत सभागृह नेते दिनकर पाटील हेदेखील होते. या दौऱ्यास सिन्नर फाटा येथून सुरुवात झाली. सिन्नर फाटा येथील महापालिका शाळा, महापालिकेचे रुग्णालय, स्टेशनवाडी, सोनवणे मळा, भोर मळा, खर्जुल मळा, वडनेर गाव, पिंपळगाव खांब, देवळालीगावातील यशवंत मंडई आदी ठिकाणी त्यांनी भेट देऊन पाहणी केली. नगरसेवक पंडित आवारे बाजीराव भागवत, जयश्री खर्जुल, संतोष साळवे, केशव पोरजे, सुनीता कोठुळे, सत्यभामा गाडेकर आदींनी या प्रभागातील समस्यांकडे महापौरांचे लक्ष वेधले. याप्रसंगी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्यासह बांधकामचे कार्यकारी अभियंता सतीश हिरे, प्रभाग सभापती पंडित आवारे, नगरसेवक बाजीराव भागवत, जयश्री खर्जुल, संतोष साळवे, सत्यभामा गाडेकर, सरोज अहिरे, अंबादास पगारे, मीरा हांडगे, शरद मोरे, संगीता गायकवाड, विशाल संगमनेरे, केशव पोरजे, विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर, बिटकोचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जयंत फुलकर आदींसह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

या पाहणीत सिन्नर फाटा येथील शाळेत शौचालय आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था एकाच ठिकाणी आढळली. सर्वत्र कचरा अन् मैदानावर रानगवत फोफावल्याचे दिसून आले. मुलांना बसायला व्यवस्थित जागा नव्हती. त्यामुळे ही शाळा की कोंडवाडा असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सावित्रीबाई फुले रुग्णालयाची दुरवस्था बघून हे हॉस्पिटल आहे की कचराकुंडी, असा सवाल त्यांनी केला. डॉक्टर्स उपलब्ध नाहीत, हॉस्पिटलमध्ये पिण्याचे पाणी नाही, शस्रक्रिया विभागात गाद्या ठेवल्याचे विदारक चित्र त्यांना आढळून आले. स्मशानभूमीचीही अशीच दुरवस्था दिसून आली. स्टेशनवाडीत महापौर येताच स्थानिक नागरिकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. येथे महिलांनी महापौरांना घेराव घातला. आम्ही कसे दिवस काढतोय हे आम्हालाच माहिती, फक्त कोपरे बघुन जाऊ नका…, अशा शब्दांत या ठिकाणी नागरिकांनी रोष व्यक्त करताच महापौरांसह सर्वच नगरसेवक व अधिकाऱ्यांनी लागलीच येथून काढता पाय घेतला.

बांधकाम विभागाचे उपअभियंता राजू आहेर यांच्याकडून मनमानी कारभार सुरू असून, ते नगरसेवकांना जुमानत नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. भोर मळ्यात महापौरांनी भेट दिली असता येथील रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी नगरसेवक व नागरिकांनी केली. यावेळी बांधकाम उपअभियंता आहेर यांच्यावर टीका करताना प्रभाग सभापती पंडित आवारेंची जीभ घसरल्याने तो चर्चेचा विषय ठरला. शिवसेनेच्या नगरसेविका जयश्री खर्जुल, बाजीराव भागवत यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली. उपअभियंता आहेर गैरहजर असल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश महापौरांनी यावेळी दिले.

--

खोटारडेपणा झाला उघड

सिन्नर फाटा येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयात महापौरांचा ताफा आला असता प्रवेशद्वारावरच मेलेले उंदीर, वाढलेले रानगवत बघून महापौर संतापल्या. येथील रुग्णांनी औषधे मिळत नसल्याची तक्रार केली. वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी बच्छाव रुग्णालयात हजर नसल्याने सभागृह नेते दिनकर पाटील भडकले. फरशा, पाण्याची टाकी, ऑपरेशन थिएटरमधील टेबलावर रचलेला गाद्यांचा ढीग, फुटलेल्या ट्यूबलाइट्स बघून महापौरांनी कपाळाच हात लावला. विद्युत विभागाचे उपअभियंता कुलकर्णी यांच्यावर कारवाईचे आदेश या ठिकाणी महपौरांनी दिले. काही वेळाने डॉ. बच्छाव हजर झाल्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णाची भेट घेण्यास गेल्याचे त्यांनी सांगितल्यावर महापौर व सभागृह नेत्यांनी संबंधित हॉस्पिटलमध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले. त्यावेळी डॉ. बच्छाव यांचा खोटारडेपणा उघड झाला. त्यानंतर महापौरांनी त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.

---

नगरसेवकांचा आक्रोश

महापालिकेच्या सिन्नर फाटा येथील सावित्रीबाई फुले रुग्णालयात महापौर आल्या असता भाजपसह शिवसेनेचे नगरसेवक महापौरांपुढे या रुग्णालयातील समस्यांचा पाढा वाचत होते. यावेळी केवळ भाजपच्याच नगरसेवकांच्या तक्रारींना प्राधान्य दिले जात असून, शिवसेनेच्या नगरसेवकांना बोलू दिले जात नसल्याचा जाहीर आरोप शिवसेनेचे नगरसेवक संतोष साळवे यांनी केला व थेट महापौरांपुढेच नाराजी व्यक्त केली. महापौर दौऱ्यात पक्षपात का करता, असा थेट सवाल त्यांनी विचारल्यावर महापौरांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश राठोड यांचा जामिनासाठी अर्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जन्मनोंदीच्या रेकॉर्डमध्ये फेरफार करून वारस नोंद केल्याचा आरोप असलेल्या प्रकरणात शहर पोलिसांत दाखल गुन्ह्यात नाशिकचे उपजिल्हाधिकारी गणेश राठोड यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असून शुक्रवारी (दि. ५) नाशिकच्या न्यायालयात त्यांच्यासह इतर संशयितांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

आनंदवली येथील जागेच्या वारसनोंदी लावण्यात तत्कालीन तहसीलदार गणेश राठोड यांनी व त्यांच्या अधिनस्त महसूल अधिकाऱ्यांनी संगनमत करून जन्मनोंदीच्या मूळ रेकॉर्डमध्ये फेरफार करून वारस नोंद केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या गुन्ह्यासंदर्भात नाशिकच्या जिल्हा न्यायालयात उपजिल्हाधिकारी राठोड यांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. त्यांच्या या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होत आहे. राठोड यांच्यावर यापूर्वी २०१६ मध्येही नाशिकरोड पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेला होता. मात्र, पोलिस तपासात हा गुन्हा खोटा असल्याचे प्रथमदर्शनी आढळल्याने राठोड यांच्या विरोधात पोलिसांकडून आरोपपत्र दाखल करण्यात आले नसल्याची माहिती नाशिकरोड पोलिसांनी दिली.

आनंदवली येथील प्रॉपर्टीच्या वादाशी संबधित आपल्यासह इतर अधिकाऱ्यांविरोधात संगनमत करून वारसनोंद केल्याचा गुन्हा दाखल आहे. मात्र, या प्रकरणात माझे कोणत्याही प्रकारचे आदेश नव्हते. वारस नोंद तक्रार चालविण्याचे अधिकार नायब तहसीलदारांना असतात. तर रेकॉर्डमधील फेरफार प्रकारास रेकॉर्डरुमचे अव्वल कारकून जबाबदार असतात. त्यामुळे या प्रकारात माझा कोणताही संबध येत नाहीच. तीन दिवसांपूर्वीच न्यायालयाकडे अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यात दाखल गुन्हाही खोटा असल्याचा पोलिसांचा अहवाल न्यायालयात सादर झालेला आहे.

- गणेश राठोड, उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हेमंत टकले ‘नॅब’चे अध्यक्ष

$
0
0

नाशिक : नॅशनल असोसिएशन फॉर दी ब्लाईंड इंडिया या दृष्टीबाधितांसाठी राष्ट्रीय स्तरावर कार्यरत संस्थेवर नॅब महाराष्ट्राचे विश्वस्त व संस्थापक हेमंत टकले यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी तर नॅब महाराष्ट्रचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी तर सूर्यभान साळुंके यांची कार्यकारी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

नाशिकमधील तीन व्यक्तींची एकाचवेळी राष्ट्रीय स्तरावर निवड करण्यात आल्याने नॅब नाशिकचा गौरव झाल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहे. याबरोबरच नाशिकमध्ये त्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार हेमंत टकले म्हणाले की, वंचिताची सेवा कायम ठेवून दृष्टीबाधितांच्या जीवनात आत्मविश्वास व त्यांना सक्षम करण्यासाठी कटीबद्ध राहू. दृष्टीबाधितांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्काराची उर्जा ऊब देत राहील, असेही ते म्हणाले. रामेश्वर कलंत्री व सूर्यभान साळुंके यांनीदेखील यावेळी भावना व्यक्त केल्या. यावेळी नॅबचे मानद महासचिव गोपी मयूर, मंगला कलंत्री, संजीवनी वंडेकर, शाहीन शेख, विनोद जाधव आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिंग टेनिक्वाइट स्पर्धेत मराठा हायस्कूल आघाडीवर

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नाशिक जिल्हा टेनिक्वाइट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय रिंग टेनिक्वाइट स्पर्धेत मराठा हायस्कूलच्या संघाने आघाडी घेतली. १४ वर्षे मुलांच्या स्पर्धेत मराठा हायस्कूलचा संघ विजयी ठरला तर

सातपूरचा छत्रपती विद्यालयाचा संघ उपविजेता ठरला. १४ वर्षे मुलींमध्ये छत्रपती विद्यालय, सातपूर आणि नॅशनल हायस्कूल, नाशिक यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात सातपूरच्या छत्रपती विद्यालयाच्या संघाने विजय मिळविला. नॅशनल हायस्कूलचा संघ उपविजयी ठरला. १७ वर्षे मुलामध्ये अंतिम लढतीत पुन्हा सातपूरच्या छत्रपती विद्यालयाच्या संघाने सुंदर खेळ करून विजेतेपद मिळविले. मराठा हायस्कूलचा संघ उपविजयी ठरला. १७ वर्ष मुलींच्या स्पर्धेत छत्रपती विद्यालय सातपूरचा संघ विजयी झाला. १९ वर्ष मुलांच्या गटात मराठा हायस्कूलने तर मुलींच्या गटात छत्रपती विद्यालयाने बाजी मारली. उर्वरित स्पर्धा आज (शुक्रवार) रोजी होणार असल्याची माहिती या स्पर्धेचे प्रमुख जिल्हा सचिव संजय होळकर यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बॅडमिंटन संघटनासेक्रेटरीपदी एस. राजन

$
0
0

नाशिक : नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे माजी अध्यक्ष एस. राजन यांची महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेमध्ये 'प्रशिक्षण शिबिर' व 'बॅडमिंटन प्रसार' या पदावर सेक्रेटरी म्हणून सन २०१८ ते २०२२ या कालावधीकरिता बिनविरोध निवड झाली. एस. राजन यापूर्वी महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. 'प्रशिक्षण शिबिर' व 'बॅडमिंटन प्रसार' या पदावर सेक्रेटरी म्हणून एस. राजन यांची निवड झाल्याबद्दल नाशिक जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी संघटनेच्या उपाध्यक्षा डॉ. शर्मिला कुलकर्णी, डॉ. सुचेता बच्छाव, संघटनेचे सचिव अनंत जोशी, सहसचिव योगेश योगबोटे, प्रकाश सिकची, राजगोपाल मेमन हे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>