Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सुवर्णमहोत्सवी वर्षात दिग्गजांचे मार्गदर्शन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

२०१८-२०१९ हे वर्ष महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित रचना विद्यालय सुवर्ण महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करत असून या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये डॉ. मोहन आगाशे, सत्यजित भटकळ, अच्युत गोडबोले, विश्वास मंडलिक, सुधा मूर्ती, ज्ञानेश्वर बोडके आदी मान्यवर उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती रचना शाळेतील विद्यार्थ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

५१ दीप प्रज्वलन करून रचना शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. या वर्षात शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांनी एकत्रितपणे अनेक उपक्रमांचे आयोजन केले आहे. कलाविष्कार या महोत्सवामध्ये केंद्रस्थानी असून रचना बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक विभागातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच कला या विषयावर महोत्सवानिमित्त शाळेच्या भिंती रंगविण्यात येणार आहे. 'फक्त लढ म्हणा' ही व्याख्यानमाला व स्टार व्याख्यानमाला या वर्षाअंतर्गत होणार असून डॉ. मोहन आगाशे, सत्यजित भटकळ, अच्युत गोडबोले, विश्वास मंडलिक, सुधा मूर्ती, ज्ञानेश्वर बोडके अशी दिग्गज मंडळी या महोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

स्वच्छता अभियान, शाळेची नवीन वेबसाइट लॉन्चिंग, माजी विद्यार्थ्यांतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी आरोग्य आणि लैंगिक शिक्षण या विषयावर चर्चासत्र व कार्यशाळा, स्टार व्याख्यानमाला आणि फक्त लढ म्हणा हे दोन कार्यक्रम व्याख्यान स्वरूपाचे असतील. तसेच रचना विद्यालयामध्ये १९७८ पासून कर्णबधीर विभाग स्थापन झाला असून या विभागाच्या विद्यार्थ्यांचाही सहभाग या कार्यक्रमांमध्ये असणार आहे.

शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जान्हवी पवार, निशा भंडारी, अमृता धांडे, अथर्व धांडे, स्वातंत्रकूमार राठोड, आदित्य गायकवाड, श्रावणी देवरे, राजनंदिनी मुंढे यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्याध्यापिका संगीता टाकळकर, संस्थेचे सदस्य शांताराम आहिरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. ११ जून २०१९ रोजी या महोत्सवाचा समारोप होणार आहे.

लैंगिक शिक्षणावर मार्गदर्शन

रचना विद्यालयातर्फे इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लैंगिक शिक्षण व समुपदेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ५ ते ७ ऑक्टोबर रोजी शालेय वेळेत घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रुग्णाच्या फुफ्फसात कांदा कुजविणारा बॅक्टेरिया

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वाइन फ्लूविरोधात गतवर्षी वापरलेल्या प्रतिजैविकांची मात्रा यावर्षी गुणकारी ठरत नसल्याने उपचार करणाऱ्या डॉक्टरांसमोर प्रत्येक रुग्णागणिक नवे आव्हान निर्माण होत आहे. असाच एक अनुभव डॉ. अनिकेत गांगुर्डे (एम. डी., चेस्ट) यांनी काही दिवसांपूर्वी घेतला. कुजक्या कांद्यावर आढळून येणारा बॅक्टेरिया एका रुग्णाच्या फुफ्फुसात आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

देशात २००९ मध्ये प्रथमच स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर दर वर्षी पावसाळा संपण्याच्या कालावधीत स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होऊन कमी-अधिक प्रमाणात नागरिकांचा बळी जात आहे. या आजारावर टॅमी फ्लू हे औषध असले, तरी ते पुरेसे ठरते असे नाही. अनेकदा रुग्णाला महागडी प्रतिजैविके देऊनही फायदा होत नाही. याबाबत बोलताना डॉ. गांगुर्डे यांनी सांगितले, की स्वाइन फ्लूचा फैलाव एका विशिष्ट बॅक्टेरियामार्फत होतो. हे बॅक्टेरिया थेट फुफ्फुसावर हल्ला करतात. टॅमी फ्लूसारख्या औषधाने स्वाइन फ्लूवर नियंत्रण मिळविता येत असले, तरी फुफ्फुसाला झालेले नुकसान भरून काढता येत नाही. एकदा का फुफ्फुसावर परजंतूंचा हल्ला झाली, की नवनवीन आव्हाने निर्माण होतात. कधी तर दर दोन दिवसांनी फुफ्फुसात वेगवेगळ्या प्रकाराचे बॅक्टेरिया, बुरशी आढळून येतात. महिनाभरापूर्वी एका रुग्णाचा मृत्यू झाला. उत्तम प्रतिजैविकांनाही त्याच्या शरीराने दाद दिली नाही. त्यामुळे या रुग्णाच्या फुफ्फुसाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यात बुर्कहोल्डरिया कॅपसिया हा बॅक्टेरिया आढळून आला. हा बॅक्टेरिया कांदा कुजविण्याचे काम करतो. स्वाइन फ्लू नावाची त्सुनामी येऊन गेली, की फुफ्फुस हतबल होते. अशावेळी त्यास पुनर्जीवन देण्याचे काम हाती घ्यावे लागते, असे डॉ. गांगुर्डे यांनी स्पष्ट केले. स्वाइन फ्लू असो की डेंग्यू यांसारख्या आजारात प्रतिजैविकांची भूमिका महत्त्वाची असून, सर्वांनी त्यातील गांभीर्य लक्षात घ्यायला हवे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दातृत्वाची ‘परीक्षा’

$
0
0

मुख्यमंत्री आज नाशकात; जिल्ह्यातील कामांचा घेणार आढावा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी (दि. ५) आढावा बैठक होणार आहे. यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्याच्या घरकुलांसाठी जागा उपलब्ध करणे, मनरेगासाठी केंद्राकडून प्रलंबित निधी मिळवणे तसेच वाढत्या स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू आजाराच्या वाढत्या प्रार्दुभावाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजना आणि जिल्ह्यातील टंचाई या विषयावर प्रामुख्याने चर्चा होणार आहे.

या अनुषंगाने प्रशासनाकडून गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी करण्यात आली. प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षकांच्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर येत असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री स्वत: जिल्ह्याचा आढावा घेणार असल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन सर्व विभागप्रमुखांची बैठक घेत शुक्रवारी होणाऱ्या बैठकीची पूर्वतयारी केली. यावेळी पॉवर प्रेझेंटेशनद्वारे प्रत्येक योजनेचा आढावा घेण्यात आला.

बैठकीत प्रामुख्याने पंतप्रधान आवास योजना, पेयजल योजना, कृषी सिंचन योजना, रस्ते विकास, जलयुक्त शिवार, कायदा आणि सुव्यवस्था, समृद्धी महामार्ग याबाबतचा आढावा घेणार आहेत. तसेच मनरेगा अंतर्गत कुशल देयकांअभावी प्रलंबित कामांसाठी ११०० कोटी रुपये इतका निधी केंद्र सरकारकडून प्राप्त करून घेणे, २००९-२०१० पर्यंतच्या अनुसुचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांच्या जुन्या घरकुलांना अतिरिक्त निधी उपलब्ध करून देणे, घरकुल बांधणीसाठी सरकारच्या असलेल्या गायरान जागा उपलब्ध करून देणे यासह दुष्काळी स्थिती आणि आरोग्यप्रश्‍नी केलेल्या उपायोजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीला जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहे.

असा असेल दौरा

मुख्यमंत्र्यांचे सकाळी ८ वाजता ओझर विमानतळावर आगमन होईल. तेथून ते महाराष्ट्र पोलिस प्रबोधिनी (एमपीए) येथील पोलिस कवायत मैदानावर पोलीस उपनिरीक्षक ११५ च्या दीक्षांत संचलन समारंभास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते सकाळी १० वाजता नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयाकडे प्रयाण करतील. तेथे महत्त्वाच्या प्रकल्प योजनांबाबत आढावा घेणार आहेत. ओझर येथून मुंबईकडे सायंकाळी रवाना होणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुधारित लीड

$
0
0

मालेगावात ऑनर किलिंग!

पुतण्याच्या मदतीने जन्मदात्यांनीच घोटला मुलीचा गळा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मालेगावमधील कलेक्टर पट्टा भागातील १८ वर्षीय तरुणीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचे गूढ उकलले असून, जन्मदात्या माता-पित्यानेच पुतण्याच्या मदतीने तिचा गळा आवळून खून केल्याचे गुरुवारी उघड झाले. नेहा शरद चौधरी असे या मृत तरुणीचे नाव आहे. तिच्या प्रेमसंबंधांना असलेल्या विरोधातूनच कुटुंबीयांनी टोकाचे पाऊल उचलले. पोलिसांनी तरुणीच्या कुटुंबातील तिघांना अटक केली आहे. हा नुसता खून नव्हे, तर ऑनर किलिंग असल्याने नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

संबंधित तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. २) उजेडात आली होती. कुटुंबीयांकडून मंगळवारी सकाळी घाईघाईने तिच्यावर अंत्यसंस्कार केले जात असतानाच पोलिस नियंत्रण कक्षाला एक निनावी फोन आला. त्यानंतर छावणी पोलिसांनी स्मशनाभूमीत दाखल होत सरणावरून मृतदेह ताब्यात घेतला आणि तो शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर सायंकाळी उशिरा या तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुणीचा मृत्यू नैसर्गिक नव्हे, तर संशयास्पद असल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तरुणीचे वडील शरद चौधरी, आई सुनीता व चुलतभाऊ नीलेश चौधरी यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली. सोमवारी रात्रीच्या जेवणातून तरुणीला झोपेच्या गोळ्या खाऊ घालण्यात आल्या. तिला गुंगी आल्यानंतर आई-वडिलांनी हातपाय दाबून धरले आणि चुलतभावाने तिचा गळा आवळल्याची बाब तपासात स्पष्ट झाली. पोलिसांनी या तिघांनाही गुरुवारी अटक केली. दरम्यान, जेथून झोपेच्या गोळ्या विकत घेण्यात आल्या होत्या, त्या मेडिकलच्या संचालकालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आज, शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

प्रेमसंबंधांना होता विरोध

महाविद्यालयात सोबत शिक्षण घेणाऱ्या एका तरुणासोबत नेहाचे प्रेमसंबंध असल्याचे समजते. संबंधित तरुण परजातीतला असल्याने नेहाच्या प्रेमसंबंधांना तिचे वडील शरद चौधरी यांचा तीव्र विरोध होता. यावरून घरात अनेकदा वादही झाल्याचे समजते. त्यातूनच हा सगळा प्रकार घडल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.

वाढदिवशीच घोटला गळा!

नेहाच्या संशयास्पद मृत्यूनंतर परिसरात चर्चांना उधाण आले होते. नेहाचा सोमवारी वाढदिवस असल्याने ती प्रियकरासोबत बाहेरगावी फिरण्यास गेली होती. याबाबतची कुणकुण तिच्या कुटुंबांला लागली आणि ती घरी परतल्यानंतर रात्रीच्या सुमारास तिचा गळा घोटण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐ वतन मेरे वतन आबाद रहें तू...

$
0
0

सरगम स्वरमिलाप कार्यक्रमातून सजली सुरमयी सायंकाळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऐ वतन मेरे वतन आबाद रहें तू... (राझी), वेडात मराठे वीर दौडले सात... अशा अंगावर शहारे आणणाऱ्या गीतांचे सादरीकरण होत असताना समर्पणाच्या भावनांच्या अनेक छटा उलगडत गेल्या. तुम आशा विश्वास.., हीच आमुची प्रार्थना... अशा देवभक्तीच्या गीतांमध्ये नाशिककर तल्लीन झाले.

सरगम सुगम संगीत अकादमीतर्फे गुरुवारी सायंकाळी झालेल्या सरगम स्वरमिलाप या गीतगायन कार्यक्रमाचा नाशिककरांनी आस्वाद घेतला. प्रथमच आयोजित या कार्यक्रमात कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात सा (षड्ज), रे (रिषभ), ग (गंधार), म (मध्यम), प (पंचम), ध (धैवत), नि (निषाद), सां (सरगम) या स्वरांना अनुसरून आठ गटांत गायिका नमिता राजहंस आणि त्यांच्या ७० हून अधिक विद्यार्थिनींनी गीते सादर केली.

गणनायकाय, तू बुद्धी दे..., राम का गुणगान, इतनी शक्ती हमें देना दाता... या भक्तिरसाने भरल्या गाण्यांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर ज्योत से ज्योत जगाते चलो..., प्रेम की गंगा बहाते चलो, तू प्यार का सागर है... या प्रेमरसात गुंतवणाऱ्या गीतांच्या समूह गायनाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. ओ री चिरैय्या... या मुलीचे घरात वास्तव्य असण्याचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या गाण्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. मेरा कर्मा तू..., अनादी निर्गुण..., भाग्यदा लक्ष्मी बारम्मा... तसेच ये हौसला आणि आशयें या लोकप्रिय हिंदी गीतांचेही एकत्रित सादरीकरण झाले.

कार्यक्रमात प्रार्थना, देशभक्तीपर आणि प्रेरक गीतांचा समावेश होता. देवाच्या आणि देशभक्तीत असणाऱ्या समर्पणाच्या भावना व्यक्त करताना सर्वस्वाचा त्याग केला जातो असा संदेश देणारी गीते सादर झाली. वाद्यवृंद संयोजन अमोल पाळेकर (तबला) तर अभिजित शर्मा (अँपो पॅड), नमिता राजहंस (हार्मोनियम) निखील खैराते, समीर शेख (कीबोर्ड), सचिन तिडके (ध्वनी) यांची साथसंगत रसिकांना मंत्रमुग्ध करून गेली. किशोरी किणीकर यांनी सूत्रसंचालन केले.

गायन अनुभूतीसाठी आयोजन

आपल्यावर होणाऱ्या शिक्षणाच्या संस्कारांची सुरुवातच प्रार्थनांनी होते. या प्रार्थना कळत-नकळत आपल्या अंतर्बाह्य बदल घडवत असतात. विद्यालयात सराव करताना विद्यार्थिनींना तबला आणि हार्मोनियम याच वाद्यांची साथसांगत लाभते; मात्र सर्वच वाद्यांची साथसंगती असताना गायन करण्याचा अनुभव आणि आनंद मिळावा, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे केंद्राच्या संचालिका नमिता राजहंस यांनी सांगितले.

लोगो : कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

५२ कर्मचाऱ्यांना नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका सेवेत रुजू होवूनही जात प्रमाणपत्र वेळेत सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाने आता रडारवर घेतले आहे. राज्य सरकारच्या सुचनेनुसार जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असताना आतापर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र किंवा समितीकडे दाखल केल्याची पोच सादर करणाऱ्या पालिकेच्या ५२ कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्ग, इतर मागासवर्गीय प्रवर्गात सेवेत दाखल झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे राज्य शासनाने ३० जानेवारी २०१३ ला आदेश काढून बंधनकारक केले आहे. ज्या जातीच्या संवर्गातून नोकरी मिळवली, त्या जातीचे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे आ‌वश्यक असताना अनेक कर्मचाऱ्यांनी अद्यापही ते सादर केले नसल्याचे समोर आले आहे. शासनाच्या लोकलेखा समितीसमोर महापालिकेने दिलेल्या साक्षीत प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांची माहिती देण्यात आली. त्यात महापालिका सेवेत असलेल्या ८७ कर्मचाऱ्यांनी अद्याप जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्याचे समोर आले आहे.

जात पडताळणी प्रमाणपत्र प्राप्त नसले तरी किमान पडताळणी समितीकडे अर्ज केल्याची पोच पावती सादर करणे गरजेचे होते. त्यामुळे ८७ पैकी ३५ कर्मचाऱ्यांनी पोच जमा केली. तर उर्वरीत ५२ कर्मचाऱ्यांनी पोच सादर न केल्याने या सर्व ५२ कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. जोपर्यंत जात प्रमाणपत्र सादर केले जात नाही तोपर्यंत आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ संबंधित कर्मचाऱ्यांना देता येत नाही, असेही महापालिकेने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापालिकेकडून झाडांखालीच वृक्षारोपण!

$
0
0

दक्षताच प्रभावी मात्रा!

डेंग्यू, स्वाइन फ्लू, चिकुनगुन्या या, तसेच अन्य साथींच्या विकारांना प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांनी आरोग्यविषयी पुरेशी दक्षता घेणे आवश्यक आहे, असे मत 'मटा राऊंड टेबल'मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांनी गुरुवारी व्यक्त केले.

पान ४

------

शोभायात्रेतून अंतराळ प्रबोधन -२

वाहतूक कोंडीचा जाच -३

वृद्धाश्रमात रंगला स्नेहमेळावा -४

मैत्रीचा मुरांबा! -5

…आणि स्वप्न पूर्ण झालं -६

---------------

महापालिकेकडून झाडांखालीच वृक्षारोपण! (फोटो)

गंगापूररोड : वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी महापालिकेकडून चक्क वन विभागाच्या झाडांखालीच वृक्षारोपण करण्याचा प्रकार सुरू आहे. गंगापूर शिवारातील वन विभागाच्या जागेसमोरील रस्त्यालगत महापालिकेच्या उद्यान विभागाकडून असा प्रकार सुरू आहे. येथे अगोदरच वन विभाग व वृक्षप्रेमींनी वृक्ष लागवड केलेली असल्याने या प्रकाराबाबत पर्यावरणप्रेमींकडून नाराजी व्यक्त होत आहे.

--

विद्यार्थ्यांना फटका

नाशिक : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या इंधनाच्या किमतीचा सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांनादेखील फटका बसत आहे. पेट्रोल नव्वदीपार पोचल्याने रिक्षाचालकांनीदेखील भाडेदर वाढविल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. कॉलेजला जाणारे अनेक विद्यार्थी स्कूटी, बाईकचा वापर करतात, तर काही विद्यार्थी बस, रिक्षा आदी खासगी वाहनांचा वापर करतात. मात्र, इंधन दरवाढीने या विद्यार्थ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

या मागण्यांप्रश्नी साकडे

$
0
0

या मागण्यांप्रश्नी साकडे

कलावंतांनी सभापतींना भेटून प्रस्तावित भाडेवाढ पूर्ण रद्द करावी, कालिदासचे पूर्वीचे प्रचलित दर व नियमांचीच अंमलबजावणी करावी, अशी मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे. शनिवार रविवार केवळ नाटकांसाठी आरक्षित असावेत, या दरावर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार ठेवू नयेत, कालिदास कलामंदिराची देखभाल व त्रुटी निवारण, तसेच भविष्यातील अडचणी दूर करण्यासंदर्भात समिती स्थापन करावी, रंगभूमीदिन, कालिदासदिन, शिरवाडकर, कानेटकर पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी एक सत्र विनामूल्य परिषदेला उपलब्ध करावे, कालिदासच्या पूर्वीच्या प्रचलित दरात यापुढे दर तीन वर्षांनी ५ टक्के वाढ करावी, वर्षभरात असलेल्या सर्वसाधारण ११०० सत्रांपैकी हौशी व व्यावसायिक नाटकासाठी अंदाजे २५० सत्रे आरक्षित केली जातात. त्याव्यतिरिक्त इतर सत्रांसाठीचे महापालिकेने प्रस्तावित केलेले दर हे कालिदास कलामंदिराच्या उत्पन्नवाढीसाठी योग्य आहेत. स्थानिक हौशी नाट्यसंस्थासाठी महिन्यातील एका नाट्यसंस्थेला एक सत्र १००० रुपयांत उपलब्ध करून द्यावे, नाटकाच्या रंगीत तालिम व पूर्वतयारीसाठी एक सत्र १५०० या दराने उपलब्ध व्हावे, त्यासाठी वातानूकुलित यंत्रणेची आवश्यकता नाही, बालनाट्य, संगीत नृत्य आणि मराठी हिंदी वाद्यवृंदांच्या कार्यक्रमासंबंधातही पूर्वीचेच प्रचलित दर आकरले जावे या मागण्या निवेदनात आहेत. निवेदनावर नाट्य परिषद नाशिक शाखा अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष शाहू खैरे, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे यांच्यासह सदानंद जोशी, सचिन शिंदे, उमेश गायकवाड, अभय ओझरकर, विनोद राठोड, श्याम लोंढे यांच्या सह्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कांद्याला फुटले कोंब

$
0
0

निफाड : कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असतानाच शेतकऱ्यांकडून नाफेडने खरेदी केलेला कांदाही सडत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. या मालाची लवकर विक्री झाली नाही तर सरकारला मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वृत्त...४

भाजपचे देश तोडण्याचे काम...५

महागाईचा भडका, ज्येष्ठांना चटका...५

दोन्ही निर्देशांकाच्या गटांगळ्या...८

ऊसदराला राजकीय तुरे...७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकशाही संपविण्याचे षडयंत्र

$
0
0

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांचा भाजपवर आरोप

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

भाजपकडून संविधानासह लोकशाहीच संपविण्याचे काम सुरू आहे. पुन्हा सत्तेत आल्यास निवडणुकादेखील रद्द करण्याचे षडयंत्र भाजप रचत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज फैजपूर येथे केला. महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्या भाजपाचे सरकार उलथून लावण्याचे आवाहनदेखील त्यांनी यावेळी केले.

काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ गुरुवारी (दि. ४) जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथून झाला. या वेळी व्यासपीठावर भाजपचे लोकसभा नेते मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे , विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखेपाटील, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, नसीम खान, प्रवक्ते हुसेन दलवाई, हर्षवर्धन पाटील, शरद रणपिसे, आमदार भाई जगताप, भालचंद्र मुणगेकर, विलास औताडे, डॉ. राजू वाघमारे, दिलीपकुमार सानंदा, रत्नाकर महाजन, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, प्रदेश सचिव शिरीष चौधरी, प्रदेश चिटणीस डी. जी. पाटील, जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, शहराध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, कार्याध्यक्ष डॉ. राधेशाम चौधरी, सेवादलाचे अध्यक्ष राजस कोतवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

ऐतिहासिक अधिवेशनाच्या आठवणींना उजाळा
फैजपूर येथे सन १९३६ मध्ये काँग्रेसचे पहिले अधिवेशन घेण्यात आले होते. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ येथून करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते साने गुरूजींच्या काळातील मशाल पेटवून यात्रेला सुरुवात करण्यात आली. या वेळी स्वातंत्र्य सैनिकांचा जागेवर जाऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित नेत्यांनी सन १९३६ मधील ऐतिहासिक अधिवेशनाच्या आठवणींना उजाळा दिला.

कुणावर ३०२ दाखल करायचा?
यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी, राज्यातील फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. २०१९ मध्ये जर भाजप पुन्हा सत्तेवर आली तर ते पुन्हा निवडणुका होऊ देणार नाही, असे षडयंत्र भाजप रचत आहे. देश राहिला तर आपण राहू, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. भाजपवाल्यांना गांधीजींचे विचार माहित नाही तरीही आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून ते चरखा हाती घेऊन फोटो काढत आहेत. मात्र, केवळ काँग्रेसच गांधीजींचे विचार अंमलात आणू शकते, असा दावा खासदार चव्हाण यांनी केला. शेतकरी आत्महत्येबाबत विरोधीपक्षात असताना ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची भाषा करणाऱ्या आमदार एकनाथ खडसे व मंत्री गिरीश महाजन यांनी आता कुणावर कलम ३०२ अन्वये गुन्हे दाखल करावे हे सांगावे, असा प्रश्नही चव्हाण यांनी उपस्थित केला.

सरकारची संवेदनशीलता संपली
मराठवाडा, विदर्भ, खान्देशमध्ये पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती आहे. याबाबत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील म्हणतात, केंद्राची समिती आल्यानंतर पाहणी करेल मात्र याला सहा महिने लागतील. यावरून सरकारची संवेदनशीलता संपली आहे. आता त्यांनी अंत न पाहता तातडीने दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानावर टीका करीत महिलांवर अत्याचार करणाऱ्यांमध्ये भाजपचे नेते व कार्यकर्ते पुढे आहेत यामुळे ‘भाजपवालोसें बेटी बचाओ’ अशी म्हणण्याची वेळ आली असल्याचा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला.

तरुणांची दिशाभूल
देशातील तरुणांना नोकऱ्यांचे आश्वासन देऊन केवळ स्वप्न दाखविले. त्यांची दिशाभूल करीत केवळ मते मिळवली. महागाई, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलत नाहीत. ते केवळ मते मागतात, अशी टीकाही काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. या वेळी प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनीही केंद्र सरकारसह राज्य सरकारवर निशाणा साधला. भाजप सरकारच्या काळात धार्मिक, वैचारिक हिंसाचार वाढल्याचा आरोप काँग्रेस नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत तब्बल २३५ वेळा सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली. मात्र, प्रत्यक्षात ते बाहेर पडलेच नाही, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. अयोध्येत जाण्यापेक्षा राज्यात फिरा असा उपरोधिक सल्लाही त्यांनी यावेळी ठाकरे यांना दिला.

खान्देशसाठी काय केले?
खान्देशातील प्रकल्प पळविण्याचे काम या राज्यातील मंत्र्यांनी केले असून, हे आम्हाला प्रश्न विचारतात अशी खरमरीत टीकाही काँग्रेस नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी केली. येत्या अधिवेशनात राज्यातील मंत्र्यांची पोलखोल करणार असल्याचेही विखेपाटील म्हणाले. या जनसंघर्ष यात्रेत फैजपूरनंतर भुसावळ, जळगाव असा प्रवास करीत पुढे धुळे, नंदुरबार जिल्ह्यात जाणार आहे. फैजपूरच्या ऐतिहासिक स्वातंत्र्यपूर्व १९३५ च्या अधिवेशनाची आठवणी यावेळी ताज्या झाल्या आहेत. त्या अधिवेशनाला गाडगे महाराज हे खराटा घेऊन उपस्थित होते. या वेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, डी. जी. पाटील, काँग्रेसचे माजी आमदार शिरीष चौधरी, जळगाव कार्याध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी आदींसह नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडसेंचे झाले नाही ते तुमचे काय होणार?

$
0
0

विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांचा चिमटा

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव जिल्ह्यात केळी व कापूस संशोधन केंद्र मंजूर झाले होते मात्र ते कोणी पळवले, पोलिस प्रशिक्षण केंद्रासह अनेक मंजूर प्रकल्प कोणी पळवले हे त्यांच्याच मंत्र्यांना माहित नाही या राज्यातील प्रत्येक मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केल्याशिवाय राहणार नाही, असा दावा विखेपाटील यांनी केला. माजी मंत्री एकनाथ खडसे व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनाही चिमटा काढत जो पक्ष त्यांच्याच आमदार एकनाथ खडसेंना झाला नाही तो सर्वसामान्यांचा काय होर्इल. असा चिमटा राज्याचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी काढला.

शिवसेनेचा खरपूस समाचार घेत विखेपाटील यांनी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तब्बल २३५ वेळा सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा केली. आतातर ते अयोध्येला जाण्याची भाषा करीत आहेत. मात्र, नेहमीप्रमाणे ही त्यांनी नौटंकी आहे. अयोध्येला जाण्यापेक्षा त्यांनी सत्तेतून बाहेर पडून दाखवावे, असे आव्हान त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले. आपल्या देशाचे चौकीदार ‘जागते रहो’ ऐवजी ‘भगाते रहो’ नीती वापरत आहे. यामुळे कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करणारे देशाबाहेर पळून गेले, असा आरोप त्यांनी केला.

माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शेतकरी व शेतमजूरांचे प्रश्न सोडवण्यासाठी कॉंग्रेस कटीबध्द असल्याचे म्हणाले. प्रास्ताविक माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले. यावेळी डॉ. उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक् केले. कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील स्वातंत्र सैनिंकाचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, हुसेन दलवार्इ, भार्इ जगताप, दिलीप सदानंद, हर्षवर्धन पाटील, शरद रणपिसे, सत्यजित तांबे, भालचंद्र मुणगेकर, संदीप पाटील, प्रभाकर सोनवणे आदी उपस्थित होते.

रावेर लोकसभेची जागा मागणार
माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना रावेर लोकसभा मतदार संघ कॉंग्रेसला मिळावा अशी मागणी केली हाच धाग पकडत चव्हाण यांनी राष्ट्रवादीच्या ताब्यातील हा मतदारसंघ कॉग्रेसकडे घेण्याची शिफारस करु असे व्यासपीठवरुन जाहीर केले. डा. पाटील यांनी शिरीष चौधरी यांना मंत्रीपद देण्याची मागणी देखिल केली होती. यावर खरगे यांनी सत्ता तर येवून द्या ते देखिल करु असे सांगीतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘शिष्यवृत्तींचे अर्ज निकाली काढा’

$
0
0

'शिष्यवृत्तींचे अर्ज निकाली काढा'

जेलरोड : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि फ्री शिप चे अर्ज अद्याप महाविद्यालयीन स्तरावर मोठया प्रमाणात प्रलंबित आहेत. त्या अर्जांवर महाविद्यालयांनी तत्काळ कारवाई करावी, असे आवाहन समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्राची वाजे यांनी केले आहे. दि. ६ ऑक्टोबरपर्यंत समाजकल्याण आयुक्तांकडे प्रलंबित पात्र व परिपूर्ण अर्जासह बी-स्टेंटमेट सादर न केल्यास सदर प्रलंबित अर्ज रद्द झाल्याचे समजण्यात येतील. हे अर्ज ऑनलाईन संगणक प्रणालीमधून काढून टाकण्यात येतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामे केव्हा पूर्ण करता?

$
0
0

मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांना खडा सवाल; सूस्त यंत्रणा लागली कामाला

म. टा प्रतिनिधी, नाशिक

काही ठिकाणी सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणीला दिरंगाई होत असल्याच्या मुद्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी बोट ठेवले. धिम्या गतीने सुरू असलेल्या कार्यवाहीबाबत जाब विचारतानाच कामे केव्हापर्यंत पूर्ण करता अशी थेट विचारणा केल्याने अधिकारी गडबडले. प्रशासनाने मागून घेतलेल्या मुदतीचीही मुख्यमंत्र्यांनी नोंद घेतली असून त्यामुळे जिल्ह्यातील विविध विभागांची यंत्रणा कामाला लागली आहे.

केंद्र व राज्य सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या जिल्ह्यतील सद्यस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. नाशिकरोड येथील विभागीय महसूल आयुक्तालयाच्या नियोजन हॉलमध्ये झालेल्या या आढावा बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह विविध विभागांचे प्रधान सचिव, नाशिकचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांसह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यातही यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्यात ७७ टक्के तर जिल्ह्यात ८७ टक्के पाऊस झाला. अनेक तालुक्यांमध्ये ५० टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाल्याने दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात उत्पादनात सरासरी २० ते २५ टक्के घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पाण्याअभावी रब्बीबाबतही शेतकऱ्यांना धाकधूक असून त्यावरील उपाययोजनांबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत झालेले पंचनामे, त्याचे निष्कर्ष याबाबतचा सविस्तर व वस्तुनिष्ठ अहवाल पाठविण्याचे आदेश यंत्रणेला दिले. दुष्काळावर मात करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेचा आढावाही घेण्यात आला. जिल्ह्यात १११ कामे अद्याप पूर्ण झाली नसून त्यापैकी ४७ कामे एकट्या चांदवडमधील तर २६ कामे सुरगाण्यातील असल्याची माहिती बैठकीत पुढे आली. ही कामे प्रलंबित का, अशी विचारणा करतानाच ती केव्हापर्यंत पूर्ण करता हेही अधिकाऱ्यांकडून वदवून घेण्यात आले. पंतप्रधान आवास योजना, पेयजल योजना, कृषी सिंचन योजना, रस्ते विकास, समृद्धी महामार्ग याबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. रेंगाळलेल्या कामांबाबत उत्तरे देताना अधिकाऱ्यांची धांदल उडाली.

आवश्यकतेनुसार मदत

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत असून नाशिक अशा आंदोलनांचे केंद्रबिंदू ठरले आहे. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र, अनेक तालुक्यांकडे पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांपुढं निर्माण झालेले प्रश्न या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. निफाड, नांदगाव, मालेगाव यांसारख्या काही तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असून टंचाईग्रस्त भागात सरकार आवश्यकतेनुसार मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. निविदा प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींबाबत विभागीय आयुक्तालयापर्यंत पाठपुरावा करा, असे निर्देशही देण्यात आले.

योजना पूर्णत्वासाठी नियोजन करा

सरकारने राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतल्या असून ही कामे फेब्रुवारी २०१९ अखेर पूर्ण होण्यासाठी सर्व विभागांनी नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. बैठकीला पालकमंत्री महाजन यांच्यासह ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, मुख्य सचिव डी. के. जैन, अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, प्रा. देवयानी फरांदे, राहुल आहेर, विभागीय आयुक्त राजाराम माने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव पी. वेलरासू, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गीते आदी उपस्थित होते.

..

आढावा बैठकीत

विषयांची वानवा

दस्तुरखुद्द मुख्यमंत्री आढावा घेत असल्याने जिल्ह्याचे अनेक प्रलंबित विषय मार्गी लागण्याची संधी या निमित्ताने चालून आली. बैठकीच्या अजेंड्यावरही जिल्हावासीयांच्या विकासाला गती देणारे विषय असणे आवश्यक होते. मात्र, अवघे दोन-तीन राज्य पातळीवरील विषय जिल्ह्याच्या बैठकीत घुसविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घसा कोरडा होईपर्यंत प्रश्न मांडणारे आमदार आपल्या मतदार संघांमधील विकासाला गती देणारे महत्त्वाचे प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात अपयशी झालेत की जिल्हा प्रशासनाला हे प्रश्न अजेंड्यावर घेण्यास सवड झाली नाही, अशी चर्चा रंगली.

रस्त्यांची मलमपट्टी

मुख्यमंत्र्यांचा ताफा महाराष्ट्र पोलिस अकादमीमधून नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयापर्यंत जाणार होता. त्यानंतर तेथून पुन्हा ओझर विमानतळापर्यंत हा ताफा जाणार असल्याने या मार्गांच्या डागडुजीची विशेष काळजी प्रशासनाकडून घेण्यात आली. एरवी ज्या मार्गावरून नागरिकांना नेहमी खड्ड्यातून वाट काढावी लागते त्या नाशिक-पुणे महामार्गासह अन्य काही रस्त्यांवरील खड्डे गुरुवारी (दि. ४) रात्रीच घाईघाईने मुरूम टाकून बुजविण्यात आले.

आयुक्तालय जणू छावणीच

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह काही मंत्र्यांचा ताफा नाशिकरोड येथील विभागीय आयुक्तालयामध्ये येणार असल्याने या परिसराला छावणीचे रूप आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा ठिकठिकाणी तैनात करण्यात आला होता. विभागीय आयुक्तालयाकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर नागरिकांची तपासणी करण्यात येत होती. नाशिक-पुणे महामार्गावर पोलिसांचा ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई करा

$
0
0

मुख्यमंत्र्यांचा पोलिसांशी थेट संवाद

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकरोडच्या विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात कायदा-सुव्यवस्थेची आढावा बैठक घेतली. पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप देत अवैध धंद्याविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करताना मुख्यमंत्रांनी थेट विविध पोलिस ठाण्यांच्या पोलिस निरीक्षकांना उभे करून त्यांच्याकडून माहिती घेतली. पोलिसांच्या इतिहासात थेट मुख्यमंत्र्यांशी 'फेस टू फेस' सवाल जबाब करण्याची संधी निरीक्षकांना देण्याचा हा पहिलाच प्रयोग होता.

बैठकीला राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता फडसलगीकर, अतिरिक्त महासंचालक तसेच नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक दोरजे, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, पोलिस अधीक्षक संजय दराडे आदींसह वरिष्ठ अधिकारी हजर होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याऐवजी थेट निरीक्षकांशीच संवाद साधण्याचा स्ट्रटेजी अवलंबली. थोडे दडपण वाटत असले तरी हा वेगळाच अनुभव होता. आमचा उत्साह दुपटीने वाढला आहे, अशी प्रतिक्रिया नाशिकरोडचे पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे आणि उपनगरचे प्रभाकर रायते यांनी 'मटा'शी बोलताना दिली.

तंत्रज्ञानाचा वापर करा

शहरात ड्रग्ज आणि ग्रामीण भागात अवैध दारू विक्रीच्या विरोधात मोहिमा राबवून कडक कारवाई करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. सामान्यांचा पोलिसांवरील विश्वास वाढण्यासाठी प्रयत्न करा. किरकोळ गुन्ह्यांकडे दुर्लक्ष न करता त्याचा तपास त्वरित लागेल याकडे लक्ष द्या. गुणवत्ता आधारित पोलिसिंगचा विचार करा. जनतेला सुरक्षितेचा अनुभव यावा यासाठी आवश्यक कार्यप्रणाली राबवा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. अधिकाऱ्यांनी पोलिसांशी संवाद साधावा. त्यामुळे गुणवत्तेवर चांगला परिणाम होईल. गुन्ह्यांचा तपास करतांना तंत्रज्ञानाचा अधिक वापर करावा. पोलिसांना मोबाइल फॉरेन्सिक व्हॅन देण्यात आले असून गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांचा अधिक उपयोग करावा. पोलिसांच्या कल्याण कार्यक्रमाकडे विशेष लक्ष देण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.

कौतुकाची थाप

नाशिकचा गुन्हा शोध दर चांगला आहे. तो दहा ते सतरा टक्क्यांनी वाढला आहे. तर गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे. महिला अत्याचारविषयक गुन्ह्यांचा शोध लागण्याचे प्रमाण ९० टक्के आहे, असे सांगून अवैध धंद्यांवर नियमित कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. पोलिसांची गृहप्रकल्प योजना लवकरच मार्गी लावली जाईल, असे ठोस आश्वासन त्यांनी दिले.

विश्वासाचे प्रतिक

मुख्यमंत्री म्हणाले की, गुन्हे दाखल जास्त झाले तरी हरकत नाही. ते नागरिकांचे पोलिसांवरील विश्वासाचे प्रतिक आहे. लोकांच्या मनात सुरक्षा भावना निर्माण होणे आवश्यक आहे. ज्या पोलिस ठाण्यांचा गुन्हा शिक्षा दर जास्त आहे आणि ज्यांचा कमी आहे, असा पोलिस ठाण्यांची निवड नमुना तत्वावर मुख्यमंत्र्यांनी केली होती. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे, दाखल झालेले एकूण गुन्हे, उघडकीस आलेले गुन्हे, शिक्षा होण्याचे प्रमाण याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सगळ्याच गोष्टी माथी मारू नका!

$
0
0

दत्तक शब्द झोंबला; जादा करवाढीचे समर्थन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे दत्तकविधान मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना आता झोंबत आहे. आपण नाशिक दत्तक घेतले पण त्याकडे दुर्लक्ष केले नसल्याचे सांगताच, सगळ्याच गोष्टी माझ्या माथी मारू नका, असे उद्विग्न उद्गार त्यांनी काढले.

पत्रकारांशी बोलतांना मुख्यमंत्री 'दत्तक नाशिक'बाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरून बॅकफुटवर गेल्याचे दिसून आले. महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्र्यानी नाशिक दत्तक घेण्याची घोषणा केली. परंतु, दीड वर्षांपासून महापालिकेतला कारभार भरकटल्याबद्दल आणि नाशिकला काय दिले, याबद्दल प्रश्न विचारल्यावर मुख्यमंत्री भडकले. नाशिक दत्तक घेतले हे खरे आहे, परंतु त्याकडे माझे दुर्लक्ष नाही. सगळ्याच गोष्टी माझ्या माथी मारायला तुम्ही निघालात, आपलाही अंकुश राहू द्या, अशा शब्दात त्यांनी नाशिककरांनाच खडे बोल सुनावले.

नाशिकचे प्रकल्प नागपूरला पळविल्याबद्दल विचारल्यावर तुम्हीच सांगा नाशिकचे कोणते प्रकल्प पळवले, असा प्रतिप्रश्न मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना केला. महापालिकेत भाजप अंतर्गत सुरू असलेल्या वादाचे खापरही मुख्यमंत्र्यानी माध्यमांवरच फोडण्याचा प्रयत्न केला. प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये वाद आहेत, यात दुमत नाही. परंतु, तुम्ही नकारात्मक प्रसिद्ध देऊ नका, असा सल्ला त्यांनी देऊन टाकला. महापौरांचे अधिकार कायम राहतील, असे सांगत त्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

करवाढीचे समर्थन

शहरावर लादलेल्या अवाजवी करवाढीचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी समर्थन केले. नागरी सेवा द्यायच्या असतील तर करवाढ करावीच लागते. राज्यातील अन्य महापालिकांच्या तुलनेत नाशिकमध्ये कमी कर आहे. ज्या मालमत्ता या करवाढीमध्ये नाहीत, त्यांचाही समावेश करावा असे मी आदेश दिल्याचे त्यांनी यावे‌ळी सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्र्याकडे जाऊन मुंढे यांनी लावलेली निम्मे करवाढही कमी करू, असा दावा करणारे भाजपचे पदाधिकारी पुन्हा तोंडावर पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गाईडसाठी

$
0
0

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कडक निर्बंधांच्या इशाराला न जुमानता शुक्रवारी भारताने रशियासोबत ५.४३ अब्ज डॉलर किंवा सुमारे ४० हजार कोटींच्या 'एस-४०० ट्रायम्फ' या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांच्या खरेदीचा करार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसतिगृहातील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

बांभोरी शिवारातील आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहात २५ वर्षीय विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी पावणेसहा वाजता उघडकीस आली. या विद्यार्थ्यांचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला की त्याने आत्महत्या केली? याचा खुलासा अद्याप झालेला नाही. दरम्यान वसतिगृह प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच विद्यार्थ्यांचा बळी गेल्याचा आरोप करीत सहविद्यार्थी व नातेवाइकांनी गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह उचलू न देण्याची भूमिका घेतल्याने गोंधळ निमाण झाला होता. योगेश ओजऱ्या पावरा (वय २५ रा. रोशमाळ बु. ता. धडगाव जि. नंदुरबार) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

यागेश हा कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सामाजिक शास्त्राच्या प्रथम वर्षात शिकत होता. तो विद्यापीठलगत असलेल्या आदिवासी वसतिगृहात तो रुम नंबर ३०३ मध्ये राहत होता. त्याला गेल्या दोन महिन्यांपासून डीबीटी (जेवणासाठी मिळणारी पैसे) मिळाली नसल्याने आर्थिक चितेंत असल्याचे त्याच्या मित्रांनी सांगीतले. मित्रांसोबत जेवण केल्यानंतर योगेश रात्री बारा वाजता चौथ्या वसतिगृहाच्या गच्चीवर मोबाइलवर बोलत निघून गेला. आज पहाटे पावणेसहा वाजता काही विद्यार्थी आंघोळीसाठी वसतिगृहाच्या बाथरुममध्ये गेले असता खिडकीतून योगेश खाली पडलेल्या अवस्थेत दिसला. त्यांनी इतर विद्यार्थ्यांना माहिती दिली. प्रशासनाकडून मुद्दाम अडवणूक केली जाते तसेच वसतीगृहात सोयीसुविधा, पाणी, नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याने आरोप त्यांनी केला.

विद्यार्थ्यांचे आंदोलन

विद्यार्थ्यांनी घटनेची माहिती प्रभारी गृहपाल ज्ञानेश्‍वर पाटील यांना दिली. पण बारा वाजेपर्यंत कोणीच अधिकारी व गृहपाल न आल्याने विद्यार्थ्यांचा संताप झाला होता. तसेच डॉक्‍टरला देखील प्रशासनाने बोलवले नाही. त्यामुळे जो पर्यंत दोषी अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत मृतदेह उचलणार नाही असा पवित्रा घेत विद्यार्थ्यांना आंदोलन सुरू केले. यामुळे दुपारी दीड वाजता योगेशचे वडील, काका व नातेवाईक आल्यावर पुन्हा नातेवाई व विद्यार्थ्यांनी जोपर्यंत येथेच दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवित नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी पवित्रा घेतला. पोलिस अधिकाऱ्यांनी नातेवाईक व विद्यार्थ्यांची समजूत घालून तक्रार लिहून घेतली. याप्रकरणी प्रभारी गृहपाल ज्ञानेश्‍वर पाटील खबरीवरून धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेने थापल्या निषेधाच्या भाकरी

$
0
0

निफाड : शिवसेनेने निफाड तहसील कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढला. तालुका प्रमुख सुधीर कराड यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या मोर्चात तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन देण्यात आले. येथील मार्केट कमिटी हॉलपासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात उपतालुकाप्रमुख इरफान सय्यद, पंचायत समिती सभापती राजेश पाटील, सदस्य पंडित आहेर, बाळासाहेब जाधव, प्रदीप अहिरे, निफाड शहरप्रमुख संजय कुंदे, नगरसेवक मुकुंद होळकर, जावेद शेख उपस्थित होते. लासलगावी देखील शिवसेनेच्या वतीने सरकारच्या विरोधात ढोल-ताशाचा गजर करीत घोषणाबाजी करण्यात आली. हातगाड्यांवर मोटारसायकल व गॅस सिलिंडर ठेवून लासलगावातील प्रमुख मार्गावरून दरवाढीच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला. तालुका प्रमुख प्रकाश पाटील, बाळासाहेब जगताप, निवृत्ती जगताप यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

'मालेगाव दुष्काळी जाहीर करा'

मालेगाव : येथील अपर जिल्हाधिकारी कार्यालासमोर शिवसेनेतर्फे आंदोलन करण्यात आले. मालेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे सरकारने तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. उपमहापौर सखराम घोडके, श्रीराम मिस्तरी, प्रमोद शुक्ला, सुनील देवरे उपस्थित होते.

त्र्यंबकला मोर्चात बैलगाडी

त्र्यंबकेश्वर : शिवसेनेकडून त्र्यंबकेश्वर येथे मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, संपर्क प्रमुख जयंत साठे, माजी तालुका प्रमुख मनोहर मेढे, समाधान बोडके, निवृत्ती लांबे, संपत चव्हाण उपस्थित होते. मोर्चात शिवसैनिक बैलगाडी घेऊन सहभागी झाले होते. तहसीलदार महेंद्र पवार यांना निवेदन देण्यात आले.

कळवण, देवळ्यात निषेध

कळवण : कळवण तालुका शिवसेनेच्या वतीने शहरात धडक मोर्चा काढण्यात आला. शिवसैनिकांनी मोटारसायकली न्यायालयाजवळून बस स्थानकापर्यंत ढकलत आणून बैलगाडीत तिरडी ठेवून अंत्ययात्रा काढली. तालुकाप्रमुख अंबादास जाधव, माजी जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, शहरप्रमुख साहेबराव पगार, दशरथ बच्छाव, संभाजी पवार, संजय रौदळ, डॉ. पंकज मेने यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने हा मोर्चा काढत तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन दिले. देवळ्यात पाचकंदीलजवळ शिवसेनेकडून आंदोलन छेडण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार अनिल चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. ललित शाहीवाले, सुनील पवार, देवानंद वाघ, बापू जाधव उपस्थित होते.

दिंडोरीत निवेदन

दिंडोरी : दिंडोरी तालुका शिवसेना व युवासेनेच्या वतीने सुनील पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीजवळून मोर्चा काढण्यात आला. नाशिक-कळवण मार्गावरील पालखेड चौफूली येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. सेनेच्या आंदोलनाला प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तालुका प्रमुख सुकदेव खुर्दळ यांनी पाठिंबा दर्शविला. तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना निवेदन देण्यात आले. मोर्चात

बैलगाडीवर दुचाकी ठेवण्यात आली होती.

आमदारांनी धरला कासरा

येवला : शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाच्या अग्रभागी पायी दुचाकी ढकलत तहसीलकडे सरसावणारे शिवसैनिक अन् तहसीलबाहेर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी चुलीवर भाजलेल्या भाकरी, यामुळे शिवसेनेचे येवल्यातील हे इंधन दरवाढ विरोधी आंदोलन लक्षवेधी ठरले. येवला-कोपरगाव रोडपासून या मोर्चास सुरुवात झाली. मोर्चात बैलगाडीवर दुचाकी, रिकाम्या गॅस टाकीसह इंधन भरल्या जाणाऱ्या पेट्रोल पंपावरील मशिनची प्रतिकृती ठेवण्यात आली होती. मोर्चात बैलगाडीच्या बैलांचा कासरा शिवसेनेचे विधानपरिषदेतील आमदार नरेंद्र दराडे यांच्या हाती होता. अनिल कोकीळ, सहसंपर्कप्रमुख संभाजी पवार, संघटक रुपचंद भागवत, जिल्हा समन्वयक कुणाल दराडे, जिल्हा उपप्रमुख भास्कर कोंढरे उपस्थित होते.

चांदवडलाही संताप

मनमाड : चांदवड तालुका दुष्काळी जाहीर करावा, इंधनाचे दर करावेत या मागण्यांसाठी चांदवड शिवसेनेतर्फे शुक्रवारी तहसीलसमोर चूल मांडून भाकरी थापण्यात आल्या. बैलगाडीतून मोटारसायकलची अंत्ययात्रा काढून मित्र पक्ष शिवसेनेने भाजप सरकारला घरचा आहेर देत टीकास्त्र सोडले. मोर्चा गणूर चौफुलीवर पोहचताच टाळ-मृदूंगाच्या गजरात भजन गात रिंगण आंदोलन करीत सरकारचा निषेध करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महंगाई डायन खाये जात है

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नाशिकमध्ये असताना शिवसेनेने इंधन दरवाढीवर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून भाजप सरकारविरोधात आपला संताप व्यक्त केला. 'वाह रे मोदी तेरा खेल, महंगा गॅस, महंगा तेल' अशा घोषणा देत हा मोर्चा दुपारी १२ वाजता शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून निघाला व अवघ्या तासाभरातच तो जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचला. पण, येथे सर्वच प्रमुख अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसाठी विभागीय कार्यालयात गेल्यामुळे शिवसेनेचे हे निवेदन भूसंपादन विभागाच्या उपजिल्हाधिकारी वासंती माळी यांनी स्वीकारले.

इंधन दरवाढीच्या विरोधात विविध फलक घेऊन निघालेल्या या मोर्चात क्रेन व बैलगाडीने लक्ष वेधले. क्रेनच्या सहाय्याने मोटारसायकल फासावर लटकवल्याचे दृश्य बोलके होते. 'अच्छे दिनचे गाजर दाखवणारे भ्रष्टाचारात अडकले, या इंधन दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले' असा फलकही क्रेनवर लावण्यात आला होता. बैलगाडीचा वापर करुन इंधन दरवाढीचा निषेधही या मोर्चात करण्यात आला. भगवे झेंडे व फलक हातात घेऊन निघालेला हा मोर्चा शालिमार चौकातून सीबीएसवर आला. त्यानंतर तो जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. या मोर्चामुळे वाहतुकीची कोंडी झाली.

मोर्चात जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख महेश बिडवे, सचिन मराठे, माजी महापौर विनायक पांडे, गटनेता विलास शिंदे, महिला पदाधिकारी सत्यभामा गाडेकर, शामला दीक्षित, मंदा दातीर यांसह शिवसेनेचे नगरसेवक व पदाधिकारी सामील झाले होते. मोर्चात महिला पदाधिकारीही मोठ्या संख्येने होत्या.

दर परवडतात का?

शिवसेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात ज्यावेळी क्रूड ऑइलची किंमत ३० डॉलर प्रतिबॅरल होती, तेव्हादेखील शासनाने त्यावर वेगवेगळे कर लादत भाव चढेच ठेवल्याने महागाई कायम राहिली होती. आता हे दर ९० डॉलरवर वाढले आहेत. तुटपुंज्या कमाईतून आपल्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांना हे दर परवडतात का, असा प्रश्न उपस्थित केला. 'एक देश एक कर' अशा वल्गना देणारे सरकार पेट्रोल जीएसटीअंतर्गत का आणत नाही, असा सवालही यातून करण्यात आला.

वाहतुकीची कोंडी

मोर्चा सीबीएस चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाताना वाहतुकीची मोठी कोंडी झाली. स्मार्ट रस्त्यांचे काम सुरू असताना या रस्त्यावर अगोदरच वाहनांना जाणे अवघड असताना या मोर्चामुळे एका बाजूचा रस्ता ब्लॉक झाला. त्यामुळे वाहनधारकांना दुसऱ्या मार्गाने आपली वाहने वळवावी लागली. जिल्हाधिकारी कार्यालयात मोर्चा आल्यानंतर पोलिसांची धावपळ झाली. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निवेदन देण्यासाठी जावे असे पोलिसांनी सांगितले. पण, बंद गेट उघडल्यानंतर सर्वांनी जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे येथे धक्काबुक्की झाली. पोलिसांनी नंतर गेट बंद केले. त्यामुळे पोलिसांनी चांगलीच धावपळ उडाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्लक्षित तपोवन चकाचक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर दुर्लक्षित झालेला तपोवन परिसर शुक्रवारी महापालिका कर्मचाऱ्यांनी चकाचक केला. सिंहस्थाच्या तिन्ही पर्वण्या संपल्यानंतर या भागात पहिल्यांदाच अशा प्रकारची स्वच्छता वॉक विथ कमिशनर उपक्रमासाठी करण्यात आली. त्यामुळे यानिमित्ताने का होईना परिसर चकाचक झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

यतपोवन भागातील पादचारी मार्गांवरील पेव्हर ब्लॉकमध्ये वाढलेले गवत काढण्याचे कामही या कर्मचाऱ्यांनी केले. या उपक्रमानिमित्त तपोवनाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंचा पादचारी मार्ग स्वच्छ झाला. गेल्या आठवड्यात होणारा गोदाकाठावरच्या भागातील वॉक विथ कमिशनर उपक्रम पावसाळी वातावरणाचे कारण देत रद्द करण्यात आला होता. तो कार्यक्रम ज, शनिवारी (दि. ६) सकाळी साडेसहाला तपोवन रस्त्यालगतच्या साधुग्रामच्या वृक्षवल्लीच्या छायेत घेण्याचे ठरविण्यात आले. त्यामुळे या भागाची स्वच्छता करण्यासाठी सकाळपासून जेसीबी लावण्यात आला होता. येथील झाडांमधील भागातील गवत काढून तो भाग स्वच्छ करून तो सपाट करण्यात आला. या ठिकाणी स्टेजची उभारणी करण्यात येत होती.

तपोवनाच्या याच भागातून सकाळी जॉगिंग करणाऱ्यांची गर्दी होत असते. त्याच मार्गालगत वॉक विथ कमिशनरचा स्टेज उभारण्यात येणार आहे. सिंहस्थानंतरच्या तीन वर्षांच्या कालावधीनंतर या भागातील पहिल्यांदा स्वच्छता होत आहे. दोन्ही बाजूंच्या पादचारी मार्गाच्या स्वच्छतेवर जास्त भर देण्यात आलेला आहे. बाजूला वाढलेले गवत काढण्यात येऊन त्याचा कचरा वाहून नेण्यात येत होता. सिंहस्थानंतर या भागाला अवकळा आली होती. स्वच्छतेमुळे हा भाग चकाचक झाला आहे.

कार्यक्रमस्थळाबाबत संभ्रम

या उपक्रमासाठी सिंहस्थाच्या वेळी येथे लावण्यात आलेला शर्वायेश्वर महादेव मंदिर गेट क्रमांक ४ या फलकचा पत्ता देण्यात आलेला आहे. मंदिरापासून हे अंतर जास्त असल्यामुळे नेमका कार्यक्रम कुठे आहे, याविषयीचा संभ्रम नागरिकांत निर्माण झाला आहे. हा कार्यक्रम गर्द झाडीच्या भागात घेण्यात येत असल्यामुळे येणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येईल यासाठी प्रयत्न करण्याची तयारी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी करीत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images