Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गावठी कट्ट्यासह युवक ताब्यात

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील आडवण गावातील एका पंचवीस वर्षीय संशयित युवकास शनिवारी घोटी पोलिसांनी घोटी टोल नाक्यावर सिनेस्टाइल पाठलाग करून पकडले. पोलिसांनी त्या युवकाकडील गावठी कट्टा व दुचाकी ताब्यात घेतली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, घोटी येथील टोल नाक्यावर एक युवक गावठी बनावटीचा कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती घोटी पोलिसांना मिळाली. शनिवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घोटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली अनिल धुमसे, रविराज जगताप, बाळकृष्ण केदारे, प्रकाश कासार, कृष्णा कोकाटे, संतोष दोंदे, शीतल गायकवाड, शरद कोठुळे, संदीप मथुरे महाले आदींच्या पथकाने घोटी टोलनाक्यावर सापळा लावला होता. यावेळी एक युवक दुचाकीवर (एमएच १५, एफएक्स ७२४७) नाक्यावर आला असता पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून वीस हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा व दुचाकी ताब्यात घेतली आहे.

या युवकाचे नाव गोकुळ शिवाजी गणेशकर असे असून तो इगतपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आडवण गावचा असल्याची माहिती त्याने पोलिसांनी दिली.

प्रवाशांना रस्त्यावर उतरवून लांबविले दागिने

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

द्वारका ते भारतनगर प्रवासादरम्यान रिक्षातील महिलेची पर्स चोरट्यांनी लंपास केली. पर्समध्ये ४८ हजार ५०० रुपयांचे दागिने होते. या चोरीत रिक्षाचालकाचाही समावेश असल्याची शक्यता असून, त्याने रिक्षा बंद पडल्याचे कारण सांगून महिलेसह तिच्या समवेत असलेल्यांना अर्ध्यारस्त्यावर उतरवून दिले. यानंतर साथिदारासमवेत पोबारा केला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

श्याम रमाकांत कल्याणकर (रा. कोटमगावरोड, येवला) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. गुरुवारी (दि.४) कामानिमित्त कल्याणकर शहरात आले होते. सासू व पत्नीस सोबत घेवून ते द्वारका येथून रिक्षाने प्रवास करीत असताना ही घटना घडली. वडाळारोडने भारतनगर येथे जाण्यासाठी कल्याणकर कुटुंबिय प्रवास करीत असताना चालकाने त्यांना भारतनगर चौफुली येथे रिक्षात बिघाड झाल्याचे सांगत उतरवून दिले. त्यानंतर एका सहप्रवाशास घेवून त्याने पोबारा केला. कल्याणकर कुटुंबिय दुसरी अ‍ॅटोरिक्षा पकडून नातेवाईकाच्या घरी पोहचले असता चोरीचा प्रकार उघडकीस आली. रिक्षाप्रवासात सहप्रवाशी असलेल्या तरुणाने कल्याणकर यांच्या पत्नीच्या बॅगेतील पर्स चोरली. पर्समध्ये दोन सोन्याच्या पोती, कानातले झुमके व चांदीचा ग्लास असा सुमारे ४८ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल होता. अधिक तपास हवालदार आहिरे करीत आहेत.

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


युवक महोत्सवाच्या उत्साहावर विरजण

0
0

उत्साहावर विरजण

युवक महोत्सवाची ऐन परीक्षेच्या काळात निवड फेरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत आयोजित करण्यात येणाऱ्या युवक महोत्सवाकडे दरवर्षी विद्यार्थी कलाकारांचे लक्ष लागलेले असते. या युवक महोत्सवातून आपली कला व कौशल्ये आंतराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ मिळते. मात्र, हे व्यासपीठ ऐन परीक्षांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे युवक महोत्सवाच्या नियोजनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. यंदा युवक महोत्सवाच्या उत्साहावर विरजण पडल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे.

सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत दरवर्षी आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. यंदा युवक महोत्सवाच्या तारखा जाहीर होण्यास थोडा विलंब झाला. दरवर्षी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात युवक महोत्सव होत असतो. पण यंदा ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्हास्तरीय निवड फेरी विद्यापीठाने आयोजित केली आहे. याच काळात शहरातील सर्व कॉलेजांमध्ये परीक्षांचे वेळापत्रक देखील जाहीर झाले आहे. तर ११ ते १६ ऑक्टोबरपर्यंत युवक महोत्सवाच्या विभागीय निवड फेरी होणार आहेत. याच काळात परीक्षाही सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. परीक्षांच्या काळातच युवक महोत्सवाची निवड फेरी होणार असल्याने विद्यार्थ्यांना निवड फेरीत सहभागी होणे कठीण झाले आहे.

--

निवड फेरी येथे

पंचवटी येथील लोकनेते व्यंकटराव हिरे आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये शुक्रवारी (१२ ऑक्टोबर) युवक महोत्सवाची नाशिक विभागीय फेरी होईल. यामध्ये नाशिक शहर, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण, इगतपुरी, सिल्वासा या तालुक्यातील कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.

--

प्रतिक्रिया

कलाकारांना विद्यापीठस्तरीय युवक महोत्सवातून कला क्षेत्रातील करिअरसाठी व्यासपीठ मिळते. दरवर्षी युवक महोत्सवाच्या नियोजनात काही तरी घोळ असतोच. यंदादेखील ऐन परीक्षांचा काळात विद्यापीठाने निवड फेरी आयोजित केली. विद्यार्थ्यांमधील कलागुणांचे व्यासपीठ हिरावले जात आहेत.

- अपूर्व इंगळे, विद्यार्थिनी

--

विद्यापीठ युवक महोत्सवातून आपली कला सादर करत कला क्षेत्रातील करिअरच्या नव्या संधी विद्यार्थी कलाकार शोधत असतात. मात्र, ऐन परीक्षांच्या काळात विद्यापीठाने निवड फेरी आयोजित केल्याने युवक महोत्सवात सहभाग नोंदवता येणार नाही. विद्यापीठाने विद्यार्थ्यांचा परीक्षांचा कालावधी युवक महोत्सवाच्या नियोजनात विचारात घ्यायला हवा होता.

- रिध्दी भावसार, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनधिकृत होर्डिंग्जचा सुकाळ नागरिकांच्या जिवावर

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड विभागात सार्वजनिक ठिकाणी अधिकृत होर्डिंग्ज लावण्याची अवघी २३ ठिकाणे असल्याची नोंद महापालिका विभागीय कार्यालयातील विविध कर विभागाच्या दप्तरी आहे. प्रत्यक्षात मात्र परिसरात अनधिकृत होर्डिंग्जचा सुकाळ झाल्याचे चित्र असून, काही सार्वजनिक व खासगी जागेतील होर्डिंग्ज धोकादायक स्थितीत असूनही महापालिका याप्रश्नी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची स्थिती आहे.

अनधिकृत होर्डिंग्जवरील कारवाईबाबत महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयातील अतिक्रमण व विविध कर विभागाकडून माहिती देण्यासही टाळाटाळ केली जात असल्याने होर्डिंग्जधारक आणि कारवाईची जबाबदारी आलेल्या अधिकाऱ्यांत साटेलोटे असण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत या धोकादायक व अनधिकृत होर्डिंग्जमुळे नागरिकांचा जीव मात्र धोक्यात आला आहे. होर्डिंगखाली सापडून चार नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना पुणे शहरात नुकतीच घडल्याने राज्यभरातील महापालिका आणि ३६३ नगर परिषदांतील होर्डिंग्जचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. होर्डिंग्जसंदर्भात उच्च न्यायालयाने नियम घालून दिलेले असले, तरी महापालिका प्रशासनाकडून अनधिकृत होर्डिंग्जला अभय दिले जात आहे. सिग्नल्स, चौक आणि झेब्रा क्रॉसिंग येथे होर्डिंग्ज लावण्यास मनाई असली, तरी शहरात नेमक्या अशाच ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्जचे पेवच फुटल्याचे चित्र आहे.

या भागात गंभीर चित्र

नाशिकरोड भागातील बिटको चौक, सिन्नर फाटा, एकलहरे टी पॉइंट, चेहेडी, देवळालीगाव, रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार, वास्को चौक, दत्त मंदिर चौक, जेलरोडवरील इंगळेनगर चौफुली, शिवाजीनगर, सैलानीबाबा चौक, दसक, नारायणबापूनगर,उपनगर चौक, नवले कॉलनी, शिवाजी पुतळा, सीएनपी प्रेस गेट, के. एन. केला हायस्कूल चौक आदी ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट झालेला आहे. यात विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या होर्डिंग्जचाही समावेश आहे. बिटको चौक आणि दत्त मंदिर चौकात तर थेट सिग्नलच्या खांबालाच होर्डिंग्ज बांधलेले असतात. मात्र, असे असले, तरी महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन व विविध कर विभाग मात्र या होर्डिंग्जप्रश्नी बघ्याची भूमिका घेत आहे.

इमारतींवरही बिनबोभाट उभारणी

शहरात रेल्वे स्टेशनरोड आणि परिसर, वॉस्को चौकातील इमारती, उड्डाणपुलालगतच्या नवले चाळ आणि जुना ओढारोड परिसरातील खर्जुल मळा भागातील इमारती, एकलहरे टी पॉइंटवरील हॉटेलजवळील होर्डिंग्ज अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. या होर्डिंग्जच्या लोखंडी फ्रेम्स अतिभव्य व अवजड असून, या होर्डिंग्जखालुन पादचारी रस्ते असल्याने येथून दिवस-रात्र वर्दळ सुरू असते. व्यावसायिकांचे हातगाडे, दुकाने यांनाही या होर्डिंग्जचा धोका आहे. काही होर्डिंग्ज वाहनचालकांचे लक्ष विचलित करण्यासही कारणीभूत ठरू लागले आहेत. मात्र, असे असले तरी महापालिका प्रशासनाकडून या सर्व होर्डिंग्जवर मेहेरबानी केली जात असल्याने नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवक महोत्सवाच्या उत्साहावर विरजण (प्रतिक्रिया)

0
0

विद्यापीठाच्या युवक महोत्सवातून विद्यार्थ्यांना कला सादरीकरणाची संधी असते. भविष्यात याच व्यासपीठाचा फायदा विद्यार्थ्यांना होणार असतो. कॉलेजेसला परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यापूर्वी विद्यापीठाने सूचित करायला हवे होते. इच्छा व कौशल्य असूनही विद्यापीठाच्या युवक महोत्सवाच्या संधीचा फायदा विद्यार्थी कलाकारांना होणार नाही.

- शिवानी कुयटे, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केडिया घागरा अन् इंडो वेस्टर्न जॅकेटला पसंती

0
0

फोटो - पंकज चांडोले

..

लोगो - वेध नवरात्रीचे

केडिया अन् इंडो वेस्टर्न जॅकेटची क्रेझ

गरबा पेहरावांचे तरुणाईकडून बुकिंग सुरू

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रीच्या गरबा आणि दांडियासाठी पारंपरिक पेहरावाची बुकिंग करण्यास सुरुवात झाली आहे. गुजराती आणि राजस्थानी प्रकारच्या पारंपरिक पेहरावांना यंदा तरुणाईकडून पसंती मिळत आहे. कश्मिरी, कच्छी घागरा, केडिया, धोती यासह इंटो वेस्टर्न जॅकेटला सर्वाधिक मागणी आहे. गरबा आणि दांडियासाठीचे कपडे खरेदी करण्यापेक्षा भाड्याने घेण्यासाठी तरुणाईची लगबग बाजारात दिसून येत आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर दहीपूल, मेनरोड यासह शहरातील उपनगरांतील बाजारपेठेत गरब्याच्या कपड्यांच्या बुकिंगमधून हजारोंची उलाढाल होत आहे.

नवरात्रोत्सवात शहरातल्या अनेक ठिकाणी दांडिया आणि गरबा नाइट्सचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाच्या उत्साहात रंग भरण्यासाठी तरुणाईकडून पारंपरिक पेहरावाना पसंती देण्यात येते. तरुणींसाठी घागरा-चोली तर तरुणांसाठी केडिया, धोती आणि इंडो वेस्टर्न जॅकेट बाजारात उपलब्ध झाले आहेत. पारंपरिक पेहरावाच्या सोबतच वेस्टर्न आऊटफिट वापरणारे तरुणतरुणी जीन्सवर केडिया जॅकेट परिधान करण्यास पसंती देतात. त्यामुळे यंदाच्या नवरात्रीतही केडिया आणि इंडो वेस्टर्न जॅकेटची क्रेझ कायम आहे. या वर्षी बाजारात दोन रंगांचा घागरा उपलब्ध झाला आहे. गरबा खेळताना काही वेळानंतर या घागऱ्याचा रंग बदलणे शक्य आहे. घागरा, केडिया, धोती, जॅकेट्स भाड्याने घेण्यासाठीची किंमत एका दिवसासाठी ३५० रुपयांपासून तर ८०० रुपये अशी आहे.

--

राजस्थानी साफा ठरतोय आकर्षण

केडिया, जॅकेट, धोती यांसह डोक्यावर फेटा किंवा पगडी असल्यास गरब्याची रंगत अधिक वाढते. राजस्थानी पद्धतीच्या या पगडीला साफा म्हणतात. यंदाच्या नवरात्रात साफा तरुणांना अधिक आकर्षक करत आहे. साफाला गोंडा, कुंदण, लटकण, कवड्या लावलेल्या असल्याने उठून दिसत आहे. ४०० रुपये ते १ हजार रुपयांपर्यंत साफाची किंमत आहे.

--

नवरात्रोत्सावाच्या निमित्ताने घागरा, जॅकेट, केडिया यासह साफा आणि इतर वस्तूंची बुकिंग तरुणाईकडून सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही नव्या व्हरायटीला तरुणाईकडून अधिक मागणी आहे. राजस्थानी पारंपरिक कपड्यांना यंदा सर्वाधिक पसंती दिली जात आहे.

- वृषाली माहेगावकर, विक्रेता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सद्गुरूंकडून जनसेवेचे अखंड व्रत’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वामी शांतिगिरीजी महाराज कृतिशील संत असून, समाजोद्धारासाठी अनेक प्रकारचे नियम अंगीकारताना त्यांचे जनसेवेचे अखंड व्रत सुरू असल्याचे प्रतिपादन स्वामी परमेश्वरानंदगिरीजी महाराज यांनी केले.

मातोश्री जगदमाऊली म्हाळसामाता यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त ओझर येथील देवभूमी आणि संतभूमीचा संगम असलेल्या जनशांतीधाम येथे सुरू असलेल्या जय म्हाळसामाता धर्मसंस्कार सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, की जगद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आणि समर्थ सद्गुरू स्वामी शांतिगिरीजी महाराजांसारखे दिव्य सद्गुरूं आपल्याला लाभले हे परमभाग्य असून, बाबाजींनी दाखविलेल्या मार्गानेच भाविकांनी मार्गक्रमण करावे. जगदमाऊली म्हाळसामातांचे जय बाबाजी भक्त परिवारावर अनंत उपकार असून, त्यांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सुरू असलेल्या सोहळ्यात भाविकांनी जप, यज्ञ, अन्नदान, श्रमदान आदी पुण्यकर्म करावे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी हृदयानंद माऊली यांनी बाबाजींच्या धर्मकार्याची माहिती दिली. संत नागेश्वरानंद महाराजांनी जगद्गुरू बाबाजींच्या प्रवचनाचे वाचन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला.

विविध कार्यक्रमांचे आयोजन

या सोहळ्यांतर्गत महिलांसाठीच्या मौनव्रतातील जपानुष्ठानाबरोबरच भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यात अखंड नंदादीप, यज्ञ, हस्तलिखित नामजप साधना, रोज पहाटे ५ वाजता नित्यनियम विधी, ध्यान, प्राणायाम, एकनाथी भागवत ग्रंथवाचन, श्रमदान आदींचा समावेश आहे. या कार्यक्रमांदरम्यान दररोज सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीनही सत्रांत सत्संग होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवंगत जवानाच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत

0
0

विष्णू भागवत व रुपचंद भागवत या बंधूंनी शुक्रवारी सीआरपीएफमधील दिवंगत जवान तथा येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक गावचे सुपुत्र दिगंबर शेळके यांच्या कुटुंबीयास एक लाखाची मदत केली. तेजपूर (आसाम) येथे सेवेत असताना येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील जवान दिगंबर शेळके यांचे गेल्या महिन्यात निधन झाले होते. जवान शेळके यांच्या अकाली निधनाने शेळके कुटुंबियांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता. जवान शेळके यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी त्यानंतर अनेकांचे मदतीचे हात पुढे सरसावतानाच, शुक्रवारी (दि. ५) येवला-लासलगाव शिवसेना विधानसभेचे संघटक तथा येवला पंचायत समितीचे उपसभापती रुपचंद भागवत आणि नारायणगिरी महाराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शेळके कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील, नारायणगिरी महाराज फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू भागवत, रुपचंद भागवत उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जनसंघर्ष यात्रा आज मालेगावी

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

काँग्रेसपक्षाकडून केंद्र व राज्यातील भाजप सरकार विरोधात जनसंघर्ष यात्रा काढण्यात येते आहे. या यात्रेच्या दुसऱ्या टप्पास जळगाव येथून सुरुवात झाली आहे. जनसंघर्ष यात्रा रविवारी सकाळी मालेगावी दाखल होत असल्याचे काँग्रेसचे प्रांतिक सदस्य डॉ. तुषार शेवाळे यांनी सांगितले. या निमित्ताने पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोरदार तयारी सुरू आहे. मालेगावी जनसंघर्ष यात्रेदरम्यान काँग्रेसप्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, सरचिटणीस रणदीप सिंह सुरजेवाला,अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष जावीद नदीम खान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधीपक्ष राधाकृष्ण विखे पाटील, माजी प्रदेश माणिकराव ठाकरे, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हा अध्यक्ष राजाराम पानगव्हाणे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत. येथील सटाणा रोडवरील पक्ष कार्यालयात सकाळी १० वाजता यात्रेचे आगमन होणार असून, येथेच जाहीर सभा होईल. यानंतर यात्रा सटाणाच्या दिशेने रवाना होईल. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

000

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डेंग्यूचे खापर नागरिकांवर!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरात सार्वजनिक स्वच्छता चांगली आहे. मात्र, नागरिकांच्या घरातच डेंग्यूच्या अळ्या आढळतात, असे सांगत डेंग्यूला नागरिकच जबाबदार असल्याचा दावा महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. आयुक्तांच्या या अजब तर्कटाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नागरिकांच्या घरात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळल्यास ५०० रुपये दंड करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी आपल्या विशेषाधिकारात डेंग्यूचा फैलाव करण्यास जबाबदार असणाऱ्यांना २०० रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीत सदस्यांनी बिघडलेल्या आरोग्याला आरोग्य व वैद्यकीय विभागालाच जबाबदार धरले असताना आता आयुक्तांच्या या निर्णयाने अधिकाराचे नवे वादळ निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

शहरात सध्या डेंग्यू, स्वाइन फ्लू, व्हायरल फीवरसह साथीच्या आजारांनी अक्षरश: थैमान घातले आहे. सप्टेंबर महिन्यातच 'ऑक्टोबर हीट'चा तडाखा जाणवला असला, तरी या महिन्यात शहर परिसरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूने कहर केला असून, शहरात डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि साथींच्या आजारांनी हायअॅलर्टसदृश स्थिती उद्भवली आहे. सप्टेंबर महिन्यात शहरात डेंग्यूचे १६५, तर स्वाइन फ्लूचे १३६ बाधित रुग्ण आढळून आले असून, संशयितांचा आकडा हा ५२० वर पोहोचला होता. ऑक्टोबर महिन्यातही साथीच्या आजारांचा प्रकोप सुरूच आहे. विशेष म्हणजे सरकारी आणि खासगी रुग्णालये स्वाइन फ्लू व डेंग्यूसह व्हायरल फीवरच्या रुग्णांनी फुल्ल असून, असंख्य रुग्ण वेटिंगवर असल्याचे चित्र आहे. स्वाइन फ्लूने महिनाभरात शहरात सात जणांचा बळी गेला आहे, तर दुसरीकडे महापालिका आणि जिल्हा रुग्णालयांकडून काळजी घेण्याचे सोपस्कार पार पाडले जात आहेत.

महापौर रंजना भानसी यांनी शहराच्या बिघडलेल्या आरोग्याला प्रशासनालाच जबाबदार धरले असताना प्रशासनाकडून आता हे खापर नागरिकांवरच फोडले जात आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने शहरातील ७० हजार घरांना भेटी दिल्या असून, त्यात १८०० घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याचा दावा करीत आयुक्त मुंढेंनी डेंग्यूच्या प्रकोपाला नागरिकांनाच जबाबदार धरले आहे. विशेष म्हणजे डेंग्यूच्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी आता दंडाची मात्रा अवलंबली जाणार असून, नागरिकांच्या घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळल्या, तर त्यांना २०० रुपये दंड करण्याचा निर्णय घेतला आहे.

सार्वजनिक स्वच्छता चांगलीच

तपोवनात शनिवारी झालेल्या 'वॉक विथ कमिशनर' या उपक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त मुंढेंनी याबाबतचे आदेश आपण आपल्याच अधिकारात काढल्याचे सांगत सार्वजनिक स्वच्छता चांगली असल्याचा दावा केला. स्वच्छतेची जबाबदारी ही नागरिकांचीदेखील आहे. नागरिकांच्या घरातच डेंग्यूच्या अळ्या आढळतात. त्यामुळे डेंग्यूचा फैलाव करण्यास नागरिकही जबाबदार असल्याने त्यांनाही दंड करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे आरोग्य व वैद्यकीय विभागाकडून तपासणीत नागरिकांच्या घरात, शासकीय कार्यालये, मोकळे भूखंड, चालू बांधकामे या ठिकाणी डेंग्यूच्या अळ्या सापडल्यास संबंधितांना आता २०० रुपये दंड भरावा लागणार आहे.

--

स्थायीच्या अधिकारांवर गदा

आरोग्य व वैद्यकीय समिती सभापती सतीश कुलकर्णी यांच्या पत्राचा आधार घेत वैद्यकीय विभागाने स्थायी समितीवर यापूर्वीच नागरिकांच्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडल्यास ५०० रुपये दंड करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. परंतु, स्थायी समितीत भाजप सदस्यांसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. विशेष म्हणजे डेंग्यूसह स्वाइन फ्लू आणि साथींच्या आजाराला आरोग्य व वैद्यकीय विभागाच जबाबदार असून, ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी करीत हा प्रस्ताव फेटाळला होता. त्यामुळे दंडाचा विषय बारगळला, अशी चर्चा असतानाच आता आयुक्त मुंढेंनी स्थायीचा निर्णय बदलवत आपल्या विशेषाधिकारात २०० रुपये दंड लागू केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फड‌णवीस यांनी शुक्रवारी नाशिकमध्ये असताना लोकप्रतिनिधींच्या अधिकारांवर गदा नको, अशा कानपिचक्या दिल्या असतानाही आयुक्त मुंढेंनी घेतलेल्या या निर्णयावरून नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. महासभेपाठोपाठ आता स्थायीच्या अधिकारांवरही गदा येत असल्याचे भांडवल भाजपकडून केले जाण्याची शक्यता आहे.

----------------

रस्ताकामे सोडून बोला!

--

'वॉक विथ कमिशनर'मध्ये आयुक्तांची स्पष्टोक्ती

--

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिकच्या नागरिकांना पाणी, पथदीप, ड्रेनेज, उद्यान यांच्या सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. मात्र, महापालिकेच्या तिजोरीत पुरेसा पैसा नसल्याने रस्त्यांची कामे होऊ शकणार नाहीत. नगरसेवक काही अधिकारी नाहीत, तुमची कामे प्रशासन करते, तुमच्या तक्रारी आणि समस्या ऑनलाइन टाका, असे आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.

तपोवनात शनिवारी झालेल्या 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमात नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी वरील स्पष्टोक्ती केली. तपोवन परिसरात फिरण्यासाठी मोकळ्या मैदानाची मागणी केली असता आयुक्त मुंढे यांनी येथे फिरण्यासाठी फूटपाथ आहे, मोकळी जागा मुबलक पडली आहे. मग मैदानाची काय आवश्यकता आहे, असा उलटप्रश्न केला. आडगाव नाका परिसरातील बाप्पा सीताराम मार्गाची आठवड्यातून एकदाच साफसफाई होत असल्याच्या तक्रारीवरून आरोग्य अधिकाऱ्यांना फैलावर घेण्यात आले.

अपघात घडणाऱ्या मार्गांवर गतिरोधक बसविण्याची मागणी होताच आयुक्त मुंढे यांनी, रस्ता चांगला नसल्यावर आणि वाहनचाक नियम पालन करीत नसल्यावर अपघात घडू शकतात. गतिरोधक बसविल्यावर अपघात थांबत नाहीत असे सांगून 'आरटीओ'ची परवानगी असेल तेथेच गतिरोधक टाकले जातील, असे अधोरेखित केले. रस्त्यावरील भाजीबाजारामुळे नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्यामुळे रस्त्यावरील भाजीबाजार, तसेच अनधिकृत मांसविक्री करणारे दुकाने हटविण्याचे आदेशही देण्यात आले.

कुत्र्यांप्रश्नी परखड सल्ला

मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढल्याच्या प्रश्नावर आयुक्त मुंढे यांनी नागरिकांना तुम्हीच कुत्र्यांना खायला घालता, खायला मिळते म्हणूनच त्यांची संख्या वाढली आहे. महापालिका त्यांचे निर्बीजीकरण करू शकते. त्यांना खायला देणे बंद करा, आपोआप त्यांची संख्या कमी होईल, असा परखड सल्लाही त्यांनी नागरिकांना दिला. परिसरातील बंद पाणपोई त्वरित पाडण्याचे आदेशही यावेळी देण्यात आले.

थेट कामकाजावरच आक्षेप

नागरिकांनी ड्रेनेज, पथदीप, अतिक्रमण, भटकी कुत्री, पाणी व स्वच्छता याबाबतच्या समस्या मोठ्या प्रमाणात मांडल्याने आयुक्त मुंढे यांनी थेट पंचवटी विभागाच्या कामकाजावरच आक्षेप घेतला. पंचवटी विभागाने आगामी काळात आपले काम सुधारावे आणि नागरिकांच्या समस्या सोडवाव्यात, असे सांगितले.

--

तुम्ही मंदिरात बघा, मी बाहेरचे बघतो!

पंचवटीतील श्री काळाराम मंदिराच्या परिसर हॉकर्स झोन नको, तेथे फेरीवाले बसतात, अशी तक्रार घेऊन येणाऱ्या एका विश्वस्तालाच आयुक्त मुंढे यांनी, मंदिरात फेरीवाले कुणी बसविले, काळाराम मंदिरातील अतिक्रमण आधी हटवा, तुम्ही मंदिराच्या आतले बघा, मी बाहेरचे बघतो, असे सुनावले आणि तेथील हॉकर्स झोन बदलणार नसल्याचे स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीचा फेर‘फटका’

0
0

मालेगावात उड्डाणपुलाच्या कामामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड

तुषार देसले, मालेगाव

शहरातील उड्डापुलाचे काम पूर्ण होईल तेव्हा होईल मात्र सध्या या पुलाच्या कामाचा सर्वसामान्य प्रवाशांना दररोज आर्थिक फटका बसत आहे. मालेगावातून धुळे आणि नाशिककडे जाणाऱ्या बसेस जुन्या बसस्थानकातून सोडण्यात येत असल्यामुळे एसटी महामंडळाने प्रवासाच्या वाढलेल्या 'फेराचा फटका' स्वत: सहन करता त्याचे 'ओझे' प्रवाशांच्या माथी मारले आहे. त्यामुळे ही दरवाढ त्वरीत मागे घ्यावी, अन्यथा आंदोलन करून असा इशारा प्रवाशांनी एसटी महामंडळाला दिला आहे.

शहरातील नवीन बसस्थानक परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी पालिकेकडून उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नवीन बसस्थानक जुन्या बसस्थानकात स्थलांतरित करण्याची मागणी होती. त्यानुसार १ ऑक्टोबरपासून धुळे तसेच नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या बसेस जुन्या बसस्थानकातून सोडण्यात येत आहेत. उड्डाणपूल कामामुळे दरेगावकडून जाणाऱ्या बसेस मनमाड चौफुलीमार्गे वळविण्यात आल्या आहेत. यामुळे १० किमी अंतर वाढले असल्यामुळे भाडेवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

१ ऑक्टोबरपासून मालेगावहून धुळे, शिरपूर, जळगाव, नंदूरबारकडे जाणाऱ्या आणि तिकडून नाशिककडे येणाऱ्या सर्व बसेस जुन्या बसस्थाकातून सोडण्यात येत आहेत. तसेच दरेगावकडून ये-जा करण्याचा मार्ग वरील मागावरील बसेससाठी बंद करण्यात आला आहे. या बसेस मोसमपूल मनमाडचौफुलीमार्गे नाशिक व धुळ्याच्या दिशेने रवाना होत आहेत. बसेसच्या वाहतूक मार्गात बदल झाल्याने दरपत्रक ( तिकीट दर) व प्रवासाचे टप्पे वाढले आहेत. सुमारे दहा किमी फेरा वाढल्याने एसटीच्या धुळे, जळगाव, नाशिक विभागाने भाडेवाढ केली आहे. याचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशी व वाहक यांच्यात यावरून वादाचे प्रसंग उभे राहत आहेत. विशेषतः नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने मालेगाव-धुळे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मालेगाव ते झोडगे तिकिटाचा दर २५ रुपयांवरुन ४० रुपयांवर गेला आहे. उड्डाणपुलाच्या कामाचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, ही भाडेवाढ मागे घेण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.

पुणे बससेवा नव्या बसस्थानकातून

नवीन बसस्थानकातून सुटणाऱ्या चाळीसगाव, पुणे बसेस मात्र अद्याप नवीन बसस्थानकातूनच सोडण्यात येत आहेत. तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील बससेवा देखील नव्याच बसस्थानकातून सुरू आहेत. टप्प्याटप्प्याने या बसेस देखील जुन्या बसस्थानकातून सोडण्यात येतील. धुळे-नाशिकच्या सुमारे ३०० बसफेऱ्या आता जुन्या बसस्थानकातून सुरू झाल्याने दरेगावकडील रस्त्यावर बसवाहतुकीचा भार कमी झाला आहे.

जुन्या स्थानकात यंत्रणा सज्ज

आतापर्यंत जुन्या बसस्थानकातून औरंगाबाद, सटाणा, कळवण, सुरत ही बससेवा सुरू होती. सुमारे २०० फेऱ्या दिवसभरातून होत. आता धुळे नाशिकच्या देखील ३०० फेऱ्या येथून होणार आहेत. बसस्थानकाचे आवार मोठे असल्याने जागेचा प्रश्न सुटला आहे. एसटी प्रशासनाकडून २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. नवीन बस स्थानकात ध्वनीक्षेपकाद्वारे धुळे-नाशिक बसेसबाबत उद्घोषणा सुरू असतात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून यंत्रणा सज्ज असल्याचे आगारप्रमुख धनवटे यांनी सांगितले.

बसेसच्या प्रवासात दहा कि.मी.चे अंतर वाढल्याने इंधनदेखील जास्त लागणार आहे. त्यामुळेच एसटी प्रशासनाकडूनच धुळे, नाशिक, जळगाव विभागांना या संदर्भात प्रवासाचे टप्पे व दरपत्रकात बदल करण्याचे आदेश देण्यात आलेत. मालेगाव आगाराकडून ही भाडेवाढ झालेली नाही.

- किरण धनवटे, आगारप्रमुख

नोकरीच्या निमित्ताने रोज मालेगाव-झोडगे प्रवास करावा लागतो. उड्डाणपूल कामामुळे दरेगावकडून जाणाऱ्या बसेसचा मार्ग बदलण्यात आला आहे. यामुळे मोठी भाडेवाढ एसटीकडून करण्यात आली आहे. एरवी देखील अनेकवेळा असा वाहतूक मार्गात बदल केला जात होता मात्र भाडेवाढ केली जात नव्हती.

- मनोहर देसाई, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निफाडला आजपासूनशारदीय व्याख्यानमाला

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शारदीय व्याख्यानमाला कार्यकारी समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने ७ ते ९ आक्टोबर दरम्यान निफाड येथील रविराज मंगल कार्यलयात रोज रात्री ८ वाजता शारदीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे हे सहावे वर्ष आहे. ७ आक्टोबर रोजी रात्री ८ वाजता नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचे उद्घाटन होणार आहे. पाहिले पुष्प साहित्यिक मोहिब काद्री हे ध्येयासक्त जीवन या विषयावर गुंफणार आहेत. सोमवारी नाशिकच्या समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. विलास देशमुख हे 'आपण खरोखरच सुधारलो आहोत काय' या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत. ९ आक्टोबर रोजी स्मार्ट व्हिलेजचे प्रणेते व आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील हे 'स्मार्ट व्हिलेज काळाची गरज' या विषयावर तिसरे पुष्प गुंफणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या विश्वेशने घेतली रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट

0
0

पुतिन यांच्यासोबतचा संवाद प्रेरणादायी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या विश्वेश भराडिया या विद्यार्थ्याला रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. दिल्लीत आयोजित वैज्ञानिक प्रदर्शनात रशियाचे अध्यक्ष पुतिन व पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांसमवेत संवाद साधला. या संवादासाठी भारतातून दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये नाशिकच्या विश्वेशला संवाद साधण्याचा मान मिळाला.

दिल्लीतील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स) मधून विश्वेश एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. जुलै २०१८ मध्ये इराण येथे झालेल्या इंटरनॅशनल बायोलॉजी ऑलिम्पियाड स्पर्धेत विश्वेशने भारताचे प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेत विश्वेशला सिल्वर मेडल प्राप्त झाले. विश्वेशच्या या विशेष प्राविण्याची दखल घेत, रशियाचे अध्यक्ष पुतिन व भारताचे पंतप्रधान मोदी यांना भेटण्याची व संवाद साधण्याची संधी त्याला देण्यात आली.

पुतिन आणि मोदी यांच्या सोबत साधलेल्या संवादाबाबत बोलताना विश्वेश म्हणाला, की रशिया अध्यक्ष पुतिन व पंतप्रधान मोदी यांच्यासोबतची भेट अविस्मरणीय आहे. या दोन दिग्गजांसोबतचा संवाद खूप काही शिकविणारा होता. रिसर्च आणि इनोव्हेशन संदर्भात दोघा दिग्गजांनी केलेले मार्गदर्शन भविष्यात कामी येणार आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन यांना आयर्न मदनानी या विद्यार्थाने कोणत्या क्षेत्रातील संशोधनास वाव आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर, २० वे शतक फिजिक्स विषयातील संशोधनाचे होते. २१ व्या शतकात बायोलॉजीच्या संशोधनाला सर्वाधिक वाव असणार आहे, असे पुतिन यांनी सांगितले. यानुसार, भविष्यात बायोलॉजीतील संशोधनावर अधिक भर देणार असून भारताचे बायोलॉजी क्षेत्रात प्रतिनिधीत्व कायम ठेवणार असल्याचे विश्वेशने सांगितले. रशियातील विद्यार्थ्यांसोबतचा अनुभव सांगताना विश्वेश म्हणाला, की भारतीय विद्यार्थ्यांपेक्षा रशियातील विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि प्रॅक्टिकल बेस ज्ञान अधिक आहे. रशियाचे अध्यक्ष पुतिन व भारताचे पंतप्रधान मोदी यांची भेट व संवाद उज्ज्वल भवितव्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे विश्वेशने अधोरेखित केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टॅमी फ्लू’ गोळ्यांचा शहरात मुबलक साठा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात आरोग्याचा बोजवारा उडाला असताना शिवसेनेने शहरातील दवाखान्यांवर हल्लाबोल आंदोलन सुरू केले आहे. त्यात नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात टॅमी फ्ल्यूच्या गोळ्यांचा साठा कमी असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेने याबाबत खुलासा केला असून, शहरात टॅमी फ्ल्यूच्या गोळ्यांचा पुरेसा साठा आहे. त्यामुळे रुग्णांना काहीही अडचण येणार नसल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक राहुल गायकवाड यांनी दिली.

शहरात स्वाइन फ्लूने थैमान घातले असताना आणि रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या रांगा लागत असताना रुग्णालयांत टॅमी फ्लूचा साठा नसल्याची धक्कादायक बाब उघड झाल्याचा दावा शिवसेनेने केला होता. याबाबत महापालिकेने खुलासा केला असून, ७५ एमजीच्या १ हजार १०० गोळ्या, ४५ एमजीच्या १०० गोळ्या, तर ३० एमजीच्या ५०० गोळ्या उपलब्ध आहेत, तसेच रुग्णालयांमध्ये १ हजार ३०० गोळ्या देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर लहान मुलांना देण्याच्या औषधाच्या ११२ बॉटल्स उपलब्ध असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.

महापौर रंजना भानसी यांनीही नाशिकरोडच्या सिन्नर फाटा येथील दवाखान्याला भेट दिली असता तेथील ऑपरेशन थिएटरमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली होती, त्याचप्रमाणे रुग्णांना औषध मिळत नसल्याची तक्रारदेखील प्राप्त झाली होती. त्यावेळी रक्त तपासणी होत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. याबाबत सहा ठिकाणी २४ तास रक्त तपासणी केंद्रे सुरू असल्याचे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे. नाशिकरोडचे बिटको रुग्णालय, इंदिरा गांधी हॉस्पिटल, मायको हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल, झाकिर हुसेन हॉस्पिटल, सातपूर येथील हॉस्पिटलमध्ये २४ तास रक्त तपासणी करण्यात येत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

'ओपीडी'चे वेळापत्रक लावणार

महापौर भानसी यांनी सिन्नर फाटा येथील हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर तेथे डॉक्टरच हजर नसल्याचे आढळून आले होते. त्यावर वौद्यकीय अधीक्षकांना याबाबत तातडीने कारवाई करावी, असे सांगण्यात आले होते. आता 'ओपीडी'ची वेळ आणि बाहेर जाण्याची वेळ यांचे वेळापत्रक हॉस्पिटलच्या बाहेर लावण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत. दुपारी १.३० पर्यंत सर्व डॉक्टरांनी दवाखान्यातच थांबावे, असे आदेशही देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश निश्चित

0
0

फोटो - सतीश काळे

..

'अभ्यासात सातत्य हवे'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना नियमित सराव असायला हवा. जेईई, नीट आणि सीईटीचा अभ्यास करताना संदर्भ पुस्तकांसह विद्यार्थ्यांनी स्वतःच्या नोट्स तयार कराव्यात. या नोट्स परीक्षेच्या काळात वाचल्यास अभ्यासाचे दडपण येत नाही. अभ्यासाचे वेळापत्रक योग्यरित्या पाळायला हवे. स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात विद्यार्थ्यांनी सातत्य ठेवायला पाहिजे. स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वाचन विद्यार्थ्यांनी नियमित केल्यास ऐच्छिक यश गाठता येते, असा सल्ला स्पर्धा परीक्षा तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना दिला.

राजहंस प्रकाशनतर्फे सीईटी, जेईई आणि नीट या स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. मेळाव्यात माधव देशपांडे आणि संदिप कुलकर्णी या स्पर्धा परीक्षा तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी तज्ज्ञ म्हणाले, की स्पर्धा परीक्षेत विशेष प्राविण्य पटकविण्यासाठी अभ्यासाचे योग्य नियोजन महत्त्वाचे असते. अभ्यासक्रमांनुसार परीक्षेच्या कालावधीपर्यंत विद्यार्थ्यांनी योग्य ते नियोजन करायला हवे. प्रत्येकाने स्वतःच्या अभ्यासाचे नियमितपणे परीक्षण करावे. आपला अभ्यास कितपत झाला आहे, याची कल्पना विद्यार्थ्यांना असते. त्यामुळे नेहमी विद्यार्थ्यांनी नोट्स काढण्यासोबत प्रश्नपत्रिकांचा सोडविण्याचा सराव करायला हवा. यामध्ये प्रत्येक मुद्दा लक्षात घेणे, विषय समजून घेणे, त्या मुद्द्यांवर विचार करणे अशी अभ्यासाची पद्धत असावी. सध्या जेईई, सीईटी व नीटच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. त्यानुसार प्रत्येकाने स्वतःला सिद्ध करण्यासाठी नियोजन करावे. विद्यार्थ्यांमधील आत्मपरीक्षण व आत्मविश्वास यशाला गवसणी देण्यास मदत करतो, असे तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतराळ सप्ताह

0
0

फोटो आहे

अंतराळक्षेत्रात भारत प्रगतीपथावर

ए. एस. किरणकुमार यांचा विश्वास

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशाच्या प्रगतीसाठी आतापर्यंत इस्रोने १६८ मोहिमा केल्या असून त्यापैकी ४५ यानांचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले आहे. २०१७ साली एकाच वेळी १०४ उपग्रह सोडून संपूर्ण जगाचे लक्ष भारताने वेधले आहे. अंतराळक्षेत्रात भारताची प्रगती उल्लेखनीय असून येत्या काळात देश अंतराळविषयक प्रगतीत पहिल्या स्थानावर असेल, असा विश्वास इस्रो अहमदाबादचे माजी चेअरमन ए. एस. किरणकुमार यांनी व्यक्त केला.

मविप्र समाज संस्था व नॅशनल स्पेस सोसायटी (यूएसए) नाशिक इंडिया चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंतराळ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी किरणकुमार 'स्पेस टेक्नोलॉजीमध्ये भारताची याशोगाथा-काल, आज आणि उद्या' या विषयावर बोलत होते. यावेळी त्यांनी भारताने अंतराळात केलेल्या प्रगतीविषयी माहिती दिली. पुढे ते म्हणाले की, अवकाश तंत्रज्ञानाच्या वापराने अनेक क्षेत्रात जलद प्रगती साधता येईल, विक्रम साराभाई यांच्या या भूमिकेमुळे व त्यांच्या पुढाकाराने १९७५ मध्ये भारतातील २४०० खेड्यांमध्ये टेलिव्हिजनद्वारे माहिती प्रसारणाचा पहिला प्रयोग यशस्वी झाला. अवकाश तंत्रज्ञानाच्या मदतीने जागतिक सुरक्षितता, भूकंप, त्सुनामी, हवामान, नैसर्गिक धोके आदींविषयी माहिती देणारे तंत्रज्ञान विकसित करण्यातही मोलाची भूमिका बजावली आहे. याबरोबरच आरोग्य व शैक्षणिक सेवांसाठी त्याचप्रमाणे ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी मनरेगासारख्या उपक्रमासाठी सरकारला ऑनलाइन सेवा पुरविण्याचे काम इस्रोमार्फत केले जाते असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते, संचालक डॉ. प्रशांत देवरे, सचिन पिंगळे, इंजिनीअर अविनाश शिरोडे, डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुषार पाटील व प्रा. कांचन बागुल यांनी केले.

- -

तरुणांनी पुढे येण्याची गरज

अंतराळक्षेत्रात संशोधनाची मोठी गरज असून तरुणांना अनेक संधी त्यात उपलब्ध आहेत. यासाठी तरुण पिढीने पुढे येण्याची गरज किरणकुमार यांनी यावेळी व्यक्त केली. दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तराच्या माध्यमातून विविध गोष्टी जाणून घेतल्या. तसेच चांद्रयान १, मंगल मोहीम, इन्सॅट, जीसॅट, नॅव्हिक, गगन पेलोड आदी सॅटेलाइटद्वारे अर्थ ऑब्झर्वेशन, नैसर्गिक व सागरी धोके तसेच शेती, पाणी आणि हवामान याबाबत मार्गदर्शन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


थोडक्यात

0
0

अशोक बिल्डकॉनच्या

पारख यांचा सन्मान

नाशिक : अशोका बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय संचलाक सतीश पारख यांना कन्स्ट्रक्शन वीक इंडिया अॅवॉर्ड २०१८ च्या इन्फ्रास्टक्चर पर्सन ऑफ द इयर या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेल्या वर्षी इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात अशोका बिल्डकॉन कंपनीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 'दिल्ली इस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वे'चे काम कंपनीने ४८२ दिवसांत पूर्ण करून नवा विक्रम केला. तसेच रेल्वे ओव्हर ब्रीजचे काम अवघ्या १०० दिवसांत कंपनीने पूर्ण केले. रस्ते, ऊर्जा, गॅस डिस्ट्रिब्युशन व रेल्वे क्षेत्रात कंपनी देशभरात कार्यरत आहे. कंपनीच्या प्रगतीची दखल घेत, मुंबईतील सहारा हॉटेलमध्ये कंपनीचे बिझनेस डेव्हलपमेंट हेड मोहित हजेला यांच्या हस्ते पारख यांचा सत्कार करण्यात आला.

'दिव्य'तर्फे कपडे वाटप

नाशिक : महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने दिव्य फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना कपडे वाटप करण्यात आले. त्र्यंबकेश्वर जवळच्या दापुरे व पाटीलवाडी या खेड्यातील विद्यार्थ्यांना व नागरिकांना कपड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष शाम मानकर, सुयोग कुलकर्णी, अनिरुध्द मसके, जगदीश साळवे, विशाल बरगे यांसह इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कुठल्याही आपत्तीचे निवारण हे आव्हानात्मक काम असून, याकरीता प्रत्येक कार्यालयाने आपला आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करावा, असे आदेश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी शनिवारी दिले.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते. यावेळी राधाकृष्णन म्हणाले, आपत्तीमुळे होणारी आर्थिक आणि जीवीत हानी टाळणे हे सर्वात मोठे आव्हान असते. त्यासाठी आपत्ती निवारणाचा अद्ययावत आराखडा तयार करणे आवश्यक आहे. आपत्तीला वेळेत प्रतिसाद देणे आणि योग्य संवाद यंत्रणा उभी केल्यास आपत्तीवर मात करणे शक्य होते. आपत्ती व्यवस्थापनाबाबतची तालुका यंत्रणा सक्षम करण्यासाठी तहसीलदार आणि गट विकास अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत.'

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मानवी जीवनासाठी महत्त्वाचे योगदान असल्याचे मत यावेळी डॉ. गिते यांनी व्यक्त केले. आपत्ती निवारण सप्ताहात जनजागृतीवर भर द्यावा आणि प्रात्यक्षिकातून लक्षात आलेल्या त्रुटी दूर करण्याकरीता प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी जनजागृतीसाठी तयार केलेल्या भित्तीपत्रक, कापडी फलक आणि घडीपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. आपत्ती निवारण कार्यात चांगले योगदान देणाऱ्या अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि नागरिकांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरवासीयांत धास्ती अन् प्रशासनाला उपरती

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डेंग्यू, स्वाइन फ्लूसह साथींच्या रोगांचा प्रकोप वाढल्यानंतर उशिरा का होईना महापालिका प्रशासन जागे झाले असून, सोमवार (दि. ८)पासून शहरात प्रभागनिहाय स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

वैद्यकीय, मलेरिया, घनकरचा आणि शिक्षण अशा चार विभागांकडून ही मोहीम राबविली जाणार असून, डेंग्यू आणि स्वाइन फ्लूबाबत जनजागृतीसह प्रभावी उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी दिली. महापालिकेसह खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डेंग्यूची प्रतिज्ञा दिली जाणार आहे. प्रभागातील नागरिक, सामाजिक, स्वयंसेवी संस्था आणि शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना या रॅलीत सहभागी करून घेण्यात येणार आहे.

शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लू, तसेच अन्य साथरोगांनी थैमान घातले आहे. डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या सहाशेपर्यंत गेली आहे. स्वाइन फ्लू सर्वाधिक जीवघेणा ठरला असून, या आजाराने महापालिका क्षेत्रातील सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांतच नऊ जणांचा बळी गेला आहे. आतापर्यंत १६८ जणांना स्वाइन फ्लूची लागण झाली आहे. या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून, महापालिकेच्या, तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी झाल्याने आता रुग्ण दाखल करून घेण्यासाठीदेखील जागा शिल्लक उरली नसल्याने शहरवासीयांत धास्ती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाकडून अन्य तीन विभागांच्या मदतीने आता स्वच्छता व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. डास निर्मूलनासाठी जंतुनाशकांची फवारणी व धुरळणी करण्याच्या सूचना देतानाच डेंग्यू, स्वाइन फ्लू या आजारांची लागण होण्याची कारणे आणि उपायांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रभागनिहाय रॅलीचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दि. ८ ते १५ ऑक्टोबर अशी आठवडाभर ही मोहीम राबविली जाणार आहे. मलेरिया विभागाकडून डेंग्यूग्रस्त भागाची पाहणी करून धूरफवारणीसह उपाययोजना केल्या जाणार आहेत. शिक्षण विभागाकडून शाळाशाळांमध्ये जाऊन डेंग्यूच्या काळजीबाबतची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना डेंग्यू, स्वाइन फ्लूविषयक पत्रकांचे वाटप केले जाणार असून, पत्रक वाचल्याबाबतची स्वाक्षरी पालकांकडून घेतली जाणार आहे. महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते आणि आयुक्त तुकाराम मुंढे, तसेच महापालिकेतील पदाधिकारी आणि नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत या जनजागृती रॅलीचा प्रारंभ सोमवारी केला जाणार आहे. या रॅलीत प्रभागातील नागरिकांबरोबरच सामाजिक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.

---

स्वाइन फ्लूने दोघांचा मृत्यू

शहरात डेंग्यूचा प्रकोप सुरूच असून, दि. १ ते ६ ऑक्टोबरदरम्यान डेंग्यूचे ४४ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. संशयितांचा आकडा १८० पर्यंत पोहोचला आहे. आठवडाभरात स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये तेराने भर पडली असून, दोघांचा स्वाइन फ्लूने जीव गेला आहे, तर दोन डेंग्यू संशयितांच्या मृत्यूचीही चौकशी आरोग्य व वैद्यकीय विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे स्वाइन फ्लू आणि डेंग्यूचा कहर ऑक्टोबर महिन्यातही सुरू असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोनशे कर्मचाऱ्यांना झटका

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सफाई कर्मचारी म्हणून नियुक्ती असतानाही कामाच्या सोईनुसार अन्य विभागात कार्यरत दोनशे सफाई कर्मचाऱ्यांना आयुक्त तुकाराम मुंढेंनी झटका दिला आहे. या सर्व दोनशे सफाई कर्मचाऱ्यांच्या हाती पुन्हा झाडू सोपवित त्यांची अन्य विभागातून तातडीने सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सुटाबुटात वावरणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या हाती पुन्हा झाडू येणार आहे.

महापालिकेच्या आस्थापना परिशिष्टावर सफाई कर्मचाऱ्यांची १९९३ पदे मंजुर आहेत. परंतु सफाई कामासाठी के‌वळ दीड हजारच कर्मचारी उपलब्ध होते. पाचशेच्या आसपास कर्मचारी हे अन्य विभागांमध्ये कार्यरत होते. कुणाकडे लिपीक पदाचा तर कुणाकडे संगणक साक्षर म्हणून कार्यरत होते. काही कर्मचारी हे राजकीय नेत्यांच्या दिमतीला होते. आयुक्त मुंढेंनी पदभार घेतल्यानंतर यातील तीनशे जणांना मूळ सेवेत पाठवले होते. त्यामुळे सफाई कामांसाठी जव‌ळपास १७५० कर्मचारी उपलब्ध झाले होते.

लोकसंख्येच्या आधारे शहरात सुमारे पाच हजार सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. परंतु सध्या दोन हजारही कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच असून, त्यातून ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग साचणे, अस्वच्छता दिसून येत असून, शहराचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळे कामाच्या सोईने अन्य विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन्हा सफाईचे काम देण्याचे आदेश आयुक्त मुंढे यांनी दिले आहेत. त्यामुळे या सर्व कर्मचाऱ्यांची सुटका करण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने या विभागांनी दुसऱ्या कर्मचाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘ते’ एजंट परागंदा!

0
0

बनावट वाहन पॉलिसी प्रकरण; पोलिसांनी फिरवली तपासचक्रे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

एका कारवाईच्या खटल्यात बनावट विमा प्रमाणपत्र सादर करून आरटीओला गंडा घालण्याचा प्रयत्न करणारे दोघे संशयित आरोपी गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत. या प्रकरणी २६ सप्टेंबर रोजी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, संशयितांच्या अटकेनंतरच या गुन्ह्यातील सर्व पाळेमुळे शोधून काढता येणे शक्य होणार आहे.

समद जाकिर सय्यद हुसेन (रा. मुस्तफा सोसा., वडाळागाव) आणि हरिश्चंद्र केशव थोरात (रा. दर्शन बंगला वाघेश्वरीनगर, जेलरोड) अशी संशयितांची नावे आहेत. बनावट वाहन पॉलिसीमुळे प्रादेशिक परिवहन विभागाने राज्यभरात वाहन तपासणी हाती घेतली. या मोहिमेत कालबाह्य वाहनांचा शोध घेऊन कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. त्याच धर्तीवर नाशिक आरटीओने केलेल्या कारवाईचा निपटारा लावण्यासाठी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस न्यायदानाचे कामकाज हाती घेतली असता दोघा संशयिताचा कारनामा समोर आला.

संशयितांच्या वाहनांचा विमा संपल्याने आरटीओने त्यांच्यावर कारवाई केली होती. त्यानुसार २५ सप्टेंबर रोजी दोघांना वाहन विमा काढल्याचा पुरावा घेऊन आरटीओत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मेमोनुसार संबंधितांनी विमा प्रमाणपत्र सादर केले. मात्र, तपासणीअंती ते प्रमाणपत्र खोटे असल्याचे पुढे आले. आरटीओने या प्रकाराची गंभीर दखल घेत, या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दिली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक दीपक गिरमे करीत आहेत.

या गुन्ह्याबाबत बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरमे यांनी सांगितले की, संशयितांपैकी एक जण आरटीओ एजंट असून, दुसरा व्यक्ती पॉलिसी उतरविण्याचे काम करतो. गुन्हा दाखल झाल्यापासून एक पथक त्यांच्या मागावर असून, ते परजिल्ह्यात पळाले आहेत. या प्रकरणी संशयितांनी नाशिक जिल्हा कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज सादर केला असून, लवकरच संशयितांना अटक होईल, असा विश्वास गिरमे यांनी व्यक्त केला.

लवकर सोक्षमोक्ष लावावा

मागील वर्षी आरटीओमध्ये वाहनाच्या बनावट फिटनेस सर्टिफिकेटचा प्रकार समोर आला होता. यात आरटीओतील एका क्लार्कचा थेट समावेश असल्याचे समोर आले होते. शेकडो प्रमाणपत्रांचे खिरापतीप्रमाणे वाटप करण्यात आले. मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून तपास आणि दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत सर्वच आलबेल नव्हते. काही फरक पडत नाही, अशी काही प्रवृत्ती येथे कार्यरत असून, बनावट वाहन पॉलिसी प्रकरणात सोक्षमोक्ष लावण्याची मागणी प्रामाणिक एजंटाकडून करण्यात येते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images