Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सरकारने जनतेला लुटले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये केंद्र व राज्य सरकारने केलेली कपात म्हणजे ‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’ अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेत नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील साक्री येथे शनिवारी (दि. ६) आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. सरकारवर चौफेर टीका करताना ते म्हणाले की, या सरकारने मागील ४ वर्षांत केलेल्या भाववाढीच्या तुलनेत दोन दिवसांपूर्वी केलेली कपात अतिशय कमी आहे. स्वयंपाकाच्या गॅसमध्येही सरकारने जनतेची लूट केल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेताना धुळे जिल्ह्यातील साक्री येथे आयोजित सभामध्ये ते म्हणाले की, सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येत नाही. धुळ्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांवर ऑक्टोबरमध्येच दुष्काळ घोंगावत आहे. पण, सरकार अजून दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. दोन वर्षांपूर्वी विदर्भातल्या ११ हजार गावात दुष्काळ असतानाही या सरकारने त्याची घोषणा केली नाही. शेवटी काँग्रेसचे कार्यकर्ते नागपूर खंडपीठात गेले. त्यामुळे न्यायालयाने सरकारची कानउघाडणी करून दुष्काळ जाहीर करण्याचे आदेश दिले. यंदा तरी सरकार स्वतःहून दुष्काळ जाहीर करणार आहे का, असा प्रश्न उपस्थित करून विखे पाटील यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणी केली.

या सरकारची कर्जमाफी योजना फसवी ठरली असून, धुळे जिल्ह्यातील धर्मा पाटील यांना न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी थेट मंत्रालयात जाऊन विष प्राशन केले, असे विखेपाटील म्हणाले. या सरकारने वारंवार जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे आता लोकांनी हे सरकार खाली खेचण्याचा निर्धार केल्याचेही राधाकृष्ण विखे पाटील यावेळी म्हणाले.

‘भाजप सरकारला कर्करोग’
नंदुबार येथे काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी नंदुरबार येथे संबोधित करताना सांगितले भाजपला कर्करोग झाला आहे आणि तो वाढत चालला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अपयशी झाले आहेत. शेतकरी आणि महिला सुरक्षित राहिले नाहीत. नोटंबंदीमुळे राज्याचा विकास घटला आहे. नंदुरबार हा काँग्रेसचा बालकिल्ला आहे. त्यामुळे काँग्रेसला नक्कीच चांगले दिवस आता येतील. परिवर्तन घडल्याशिवाय आता राहणार नाही असे खासदार चव्हाण म्हणाले. यानंतर काँग्रेसची संघर्षयात्रा धुळे शहरात पोहोचली. शहरातील हिरे भवनात शनिवारी (दि. ६) रात्री उशिरा काँग्रेसची सभा घेण्यात आली.

यंदाही महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. मात्र, महसूलमंत्री दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करतील आणि त्यानंतर दुष्काळ जाहीर करतील, तोपर्यंत अजून शेतकरी आत्महत्या करून मरतील. त्यामुळे हे सरकार फक्त घोषणांचा पाऊस करीत आहे. आता लोकांचा विश्वास राहिलेला नसून, खान्देश व मराठवाड्याला शासनाने लवकर दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी खासदार अशोक चव्हाण यांनी शिरपूर येथे जाहीर सभेत बोलताना केली. शिरपूर येथील जनसंघर्ष यात्रेस व जाहीर सभेपूर्वी शहरातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या मैदानावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्यावतीने जन संघर्ष यात्रेची सभा घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री नसीम खान, खा. हुसेन दलवाई, माजी मंत्री माणिकराव गावित, रत्नाकर महाजन, आमदार अमरिश पटेल, सचिन सावंत आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुचाकीस्वारांवर सोकावतोय काळ!

$
0
0

मटा विशेष

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : रस्ते अपघातांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाली आहे. दुचाकीस्वारांच्या मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढता असून, या वर्षी सरासरी ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुसाट वेग आणि हेल्मेट वापराकडे होणारे दुर्लक्ष हे यामागचे कारण असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

रस्ते अपघातांबाबत करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर २०१६ आणि २०१७ या वर्षात जीवघेणे अपघात आणि मृत्यूमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण कमी होत गेले. २०१६ मध्ये शहरात एक हजार ३१ अपघात झाले होते. २०१७ मध्ये हे प्रमाण थेट ६३१ इतके म्हणजे ३८.८० टक्के इतके कमी झाले. रस्ते अपघात कमी करण्यात नाशिक शहर राज्यात अव्वल ठरले होते. २०१८ मध्ये यात सुधारणा होणे अपेक्षित होते. मात्र, या वर्षातील पहिल्या ९ महिन्यांत अपघातांचा आणि मृत्यूचा सेन्सेक्स वाढतोच आहे. २०१७ मध्ये ६३ दुचाकीस्वार रस्ते अपघातात ठार झाले होते. यंदा सप्टेंबर महिन्यापर्यंत ८९ दुचाकीस्वारांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला असून, रस्ते अपघातात दुचाकीपाठोपाठ सर्वाधिक बळी पादचाऱ्यांचे गेले असून, यात सुधारणा होणे आवश्यक झाले आहे. रस्ता ओलांडताना पादचारी भरधाव वाहनांचे शिकार ठरतात. शहरात दुचाकीस्वारांचे प्रमाण सर्वाधिक असून, हेल्मेटच्या वापराकडे आणि वेग नियंत्रणांकडे होणारे दुर्लक्ष रस्ते अपघातांसाठी कारणीभूत ठरत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. हेल्मेट वापराबाबत सातत्याने कारवाई होते. मात्र, वाहनचालक कारवाईपासून वाचण्यासाठी हेल्मेटचा वापर करता आपला जीव वाचविण्यासाठी नाही. पादचाऱ्यांच्या मृत्यूबाबतदेखील अनेक समस्या असून, पायाभूत सुविधा, जनजागृती आणि बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई यामुळे त्यास आळा घालता येऊ शकतो, असे संबंधित अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

मृत्यूचे दीडशतक पूर्ण

यंदा सप्टेंबर महिन्यापर्यंत रस्ते अपघातात एकूण १५० जणांचा बळी गेला आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये हे प्रमाण १२० इतके होते. पुढील तीन महिन्यात रस्ते अपघातातील बळींचा आकडा २०० पर्यंत पोहचण्याची शक्यता व्यक्त आहे. १४५ जीवघेण्या अपघातांमध्ये हे बळी गेले आहेत. गंभीर अपघातांमध्ये गत वर्षीच्या तुलनेत जवळपास ११ टक्के वाढ झाली आहे. २०१७ मध्ये २०२ तर यंदा सप्टेंबरअखेरीस २२४ गंभीर अपघातांची नोंद झाली आहे.

वर्ष-जीवघेणे अपघात-मृत्यू-गंभीर अपघात-किरकोळ अपघात-जखमी-एकूण अपघात

२०१७-१२०-१२९-२०२-५२-३७७-३७४

२०१८-१४५-१५०-२२४-५५-४३४-४२४

वाढ-२५-२१-२२-३-५७-५०

वर्ष- युनिट एक- युनिट दोन- युनिट तीन- युनिट चार

२०१७-३६-२४-३२-२२

२०१८-३४-३१-४५-३५

युनिटमधील पोलिस स्टेशन हद्द

युनिट एक-पंचवटी, आडगाव, म्हसरूळ

युनिट दोन-सरकारवाडा, भद्रकाली, गंगापूर, मुंबई नाका

युनिट तीन-सातपूर, अंबड, इंदिरानगर

युनिट चार-उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प

वर्ष-पादचारी-दुचाकी-चारचाकी-बस-अवजड वाहने-रिक्षा-सायकल-इतर-एकूण

२०१७-४०-६३-१३-१-३-२-२-५-१२९

२०१८-४२-८९-८-०-२-२-४-३-१५०

महामार्गनिहाय अपघात

राष्ट्रीय महामार्ग-४५

राज्य महामार्ग- ०९

इतर रस्ते-९१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतीकडून तोडफोड

$
0
0

नाशिक : मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून माहेरी राहणाऱ्या पत्नीला मारहाण करीत घरातील वस्तूंची तोडफोड करून एक लाख रुपयांचे नुकसान करणाऱ्या पतीला उपनगर पोलिसांनी अटक केली. साक्षी रवी लालवाणी (रा. जेलरोड, नाशिकरोड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. संशयित रवी रामचंद्र लालवाणी (रा. घाटकोपर इस्ट, मुंबई) शनिवारी (दि. ६) पत्नीच्या घरी आला. या वेळी त्याने पत्नीसह तिचे आईवडील व मुलीला मारहाण करीत, वस्तूंची तोडफोड केली. घरातील गॅस सिलिंडरची नळी काढून पेटवून देण्याची धमकी दिली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृद्धेला मारहाण

नाशिक : जेलरोडच्या शिवाजीनगरमध्ये राहणाऱ्या सतीबाई रामसुंदर कैथवास (वय ७३, रा. शिवाजीनगर, जेलरोड) या वृद्धेला घरात घुसून मारहाण करून तिच्याकडील दागदागिने व पाच हजार रुपयांची रोकड बळजबरीने हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी संशयित रिना रोश कैथवार (२९), अशोक चनावरी पासी (३६), सरिता अशोक पासी (३२), सरिताचे आईवडील, (सर्व रा. एरिया येलंडू, पो. येलंड, तेलंगणा) यांच्याविरुद्ध नाशिकरोड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना २४ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीत घडली.

दुचाकींची चोरी

नाशिक : कॉलेज रोडवरील दुकानाच्या पार्किंगमधून चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. इंद्रजितसिंह शंकरराव शिंदे (रा. चैतन्यनगर, गंगापूर रोड) यांनी शुक्रवारी (दि. ५) टाइम कीपर दुकानासमोर त्यांची मोपेड पार्क (एमएच १५/जीसी २२५७) केली होती. गंगापूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. दरम्यान, दिलीप रामराव वाजे (रा. चेतनानगर) यांची दुचाकी (एमएच १५/डीडब्लू ४९१८) एक ऑक्टोबर रोजी दिव्य अॅडलॅब परिसरातील राजलक्ष्मी बँकेसमोरून चोरट्याने लंपास केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पृथ्वीच्या पोटात दडलंय काय?

$
0
0

मटा विशेष

pravin.bidve@timesgroup.com

Tweet : BidvePravinMT

नाशिक : जिल्ह्याच्या भूकंपप्रवण क्षेत्रात भूगर्भात घडणाऱ्या हालचाली अभ्यासण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणचे पथक नाशिकमध्ये दाखल झाले आहे. जिल्ह्याच्या विविध भागांत हे पथक तळ ठोकणार असून, भूकंपप्रवण क्षेत्रातील भूगर्भातील हालचालींचा अगदी सूक्ष्म पातळीवर वेध घेणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भूगर्भातील हालचालींचा बारीकसारीक अभ्यास या पथकाद्वारे होणार असून, याबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाला आपत्ती व्यवस्थापनाकरिताही मोलाचा ठरणार आहे.

जिल्ह्याने अनेकदा भूकंपाचे धक्के अनुभवले आहेत. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण अर्थात जीएसआयच्या भूकंप मोजणीच्या परिमाणानुसार नाशिक जिल्हा झोन तीनमध्ये गणला जातो. या धक्क्यांची तीव्रता १.८ ते ३.२ रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे. ती कमी असल्याने सुदैवाने जिल्ह्यात जीवितहानी अथवा फारशा वित्तहानीचे प्रकार घडलेले नाहीत; परंतु अशा नैसर्गिक आपत्तींनी जिल्हावासीयांना अनेकदा भयभीत केले आहे. जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत तब्बल दहा वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. कळवण तालुक्यातील दळवट येथे तर सातत्याने असे धक्के जाणवतात. याखेरीज देवळा, बागलाण, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यांमध्येही अनेकदा भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील भूगर्भामधील हालचालींचा अभ्यास केला जावा, तसेच संभाव्य धोके टाळण्याकरिता मदत व्हावी या उद्देशाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केंद्राच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाशी जानेवारीत पत्रव्यवहार केला होता. नाशिक शहरासह ग्रामीण भागाचे सर्वेक्षण केले जावे, अशी मागणी त्यामध्ये नोंदविली होती. त्यानुसार या सर्वेक्षणासाठी नागपूर येथून तीन शास्त्रज्ञांचे पथक शनिवारी नाशिकमध्ये दाखल झाले. सर्वेक्षणासाठी दोन वर्षांचा कालावधी निश्चित करण्यात आला असून, टप्प्याटप्प्याने ते केले जाणार आहे. हे पथक कॅम्प ऑफिस स्वरूपात जिल्ह्यात काम करणार असून, यापूर्वी जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे तपशील त्यांनी जिल्हा प्रशासनाकडून घेतले आहेत.

झोन बदलण्याची शक्यता

शास्त्रज्ञांचे हे पथक जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये तळ ठोकणार आहे. यापूर्वी जिल्ह्यात दळवट, अंबानेर, अभोणा, कनाशी, उमराळे, पेठ, पांडाणे, माळेदुमाला, गोंदे, बाहेगाव अशा काही गावांच्या परिसरात भूकंपाची नोंद झाली आहे. याउलट चांदवड, येवला ही भूकंपप्रवण क्षेत्रे असूनही तेथे भूकंपाचे धक्के जाणवलेले नाहीत. त्यामुळे भूगर्भातील सूक्ष्म हालचालींच्या अभ्यासानंतरच नेमके निष्कर्ष पुढे येऊ शकणार आहेत. जीएसआयच्या परिमाणानुसार नाशिक झोन तीनमध्ये असले तरी जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागांत हा झोन बदलू शकतो. कदाचित काही भागांची नोंद भूकंपाच्या झोन दोन किंवा अगदी एकमध्येदेखील होऊ शकते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उद्या मिरवणूक

$
0
0

नाशिक : जिवाची महाले यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी (दि.९) अखिल भारतीय जिवा सेनेतर्फे मिरवणूक काढण्यात येणार आहे. जिवाची महाले यांची ३८३ वी जयंती नाभिक समाजातर्फे साजरी करण्यात येणार आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता रविवार कारंजा येथील साक्षी गणपती मंदीर येथून मिरवणूक काढण्यात येणार आहे. कपालेश्वर मंदिराजवळ या मिरवणुकीचा समारोप होणार आहे. त्यानंतर गोसावी समाज हॉलमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख समाधान निकम, दीपक मगर, विजय पंडित आदी परिश्रम घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्षद गोळेसर ठरला शिवसेना आयडॉल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवसेनेच्या वतीने झालेल्या उत्तर महाराष्ट्र आयडॉल स्पर्धेत सिन्नरचा गुणवंत कलाकार हर्षद गोळेसर याने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मालेगाव येथील रमीजभाई राजा यांना तर तृतीय क्रमांक पियुष गायकवाड व अंकुश देहाडे यांना विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ १४ पारितोषिक देण्यात आली.

अंतिम फेरी रविवारी कालिदास कलामंदिर येथे सुप्रसिद्ध गायक जॉली मुखर्जी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, खासदार हेमंत गोडसे व शिवसेना पूर्व नाशिक विधानसभा संपर्कप्रमुख मिलिंद घनकुटकर, पश्चिम नाशिक शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख नीलेश चव्हाण हे पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जॉय मुखर्जी यांच्या हस्ते नटराजाचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी जॉली मुखर्जी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत सदाबहार गाणी सादर केली.

नाशिकचा गायक इंडियन आयडॉल होत नाही तोपर्यंत या स्पर्धेचे आयोजन करीत राहणार असल्याचा निर्धार स्पर्धेचे आयोजक तथा शिवसेनेचे महानगरप्रमुख महेश बडवे व लीना मोरे यांनी यावेळी व्यक्त केला. रवी शेट्टी यांनी सूत्रसंचालन केले तर शिवसेना पदाधिकारी शिरीष गलवटे यांनी आभार मानले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २६ सप्टेंबर रोजी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात येथे ऑडिशन घेण्यात आली होती. यात ५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. उपांत्य फेरीसाठी ५० तर अंतिम स्पर्धेसाठी ३० स्पर्धक निवडण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवसेना नगरसेवक सुनील गोडसे, शिवसेना नाशिक जिल्हा कार्यालयप्रमुख राजेद्र वाकसरे, शिवसेना पदाधिकारी साहेबराव जाधव, शैलेश सूर्यवंशी, महेंद्र बडवे, सचिन चौघुले, अविनाश मोरे, नरेश सेवकरमाणी, किशोर पारखे, मुन्ना मायदळे आदींनी विशेष प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महत्त्वाच्या फाइलवर तात्काळ चर्चा करा

$
0
0

जि. प. 'सीइओं'चे खातेप्रमुखांना आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेत पेडिंग फाइलबाबत तक्रारी वाढत असतांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (सीईओ) महत्त्वाच्या फाइलीबाबत तत्काळ चर्चा करण्याचे आदेश दिले. चर्चेस आठ दिवसापेक्षा जास्त विलंब झाल्यास यास खातेप्रमुख जबाबदार राहणार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

या अगोदर विविध विभागांमार्फत सादर करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या फाइलबाबत तत्काळ चर्चा करा, असा अभिप्राय नोंदवूनही खातेप्रमुख दीर्घकाळ चर्चा करीत नसल्याने 'सीइओ' डॉ. नरेश गिते यांनी याबाबत परिपत्रक काढून सर्व फाईलीबाबत वेळ घेऊन तत्काळ चर्चा करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमार्फत विविध योजनांच्या फाइली, आर्थिक बाबींशी निगडीत फाइल तसेच अस्थापनाविषयक प्रकरणावर प्रशासकीय दृष्ट्या योग्य निर्णय तत्काळ होण्यासाठी खातेप्रमुखांना चर्चा करणेबाबत आदेश दिलेले आहेत. मात्र, अनेक खातेप्रमुख चर्चा करणेस विलंब करीत असल्याने महत्वाच्या फाइलींबाबत विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे 'सीइओं'नी याबाबत परिपत्रक काढून आठ दिवसाच्या आत चर्चा करण्याचे व विलंब झाल्यास संबंधित खात्याची जबाबदारी राहणार असल्याचे परिपत्रकात नमूद केले आहे.

फाइल ट्रेकिंग महत्त्वाचे

कोणत्याही कामाची फाइल तयार केली जाते. त्यावर मात्र निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे त्या पेडिंग फाइल म्हणून त्याचा उल्लेख केला जातो. यासाठी फाइल ट्रेकिंग महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोणती फाइल कोठे आहे, त्यावर काय निर्णय झाला, त्याला किती विलंब झाला या सर्व गोष्टी समोर येऊ शकतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुरापत काढून युवकाचा खून

$
0
0

सिडको : अंबड परिसरात रविवारी सायंकाळी एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सोपान माणिकराव टाळीकुटे (२३, रा. महालक्ष्मी नगर, अंबड) यांना अनोळखी व्यक्तीचा फोन आला. त्यानंतर सोपान हे जवळचे नातेवाईक किरण यांच्यासमवेत घराबाहेर पडले. तितक्यात बाहेरून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला एक अल्पवयीन मुलगा, बंटी दोंदे व भय्यानामक व्यक्तीने मागील कुरापत काढून धारदार शस्त्राने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांनी संबंधित संशयितांना चोप देऊन धरून ठेवले. अंबड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संशयितांना ताब्यात घेतले. सदर माहिती पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. याप्रसंगी अंबड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिग २१ विमानांचे सर्वाधिक अपघात

$
0
0

आधुनिकीकरणाची नितांत गरज

..

bhavesh.brahmankar@timesgroup.com

@BhaveshBMT

..

नाशिक : भारतात सर्वप्रथम निर्मित झालेल्या मिग २१ या लढाऊ विमानांचे सर्वाधिक अपघात झाले असल्याची बाब समोर आली आहे. हवाई दलाच्या सक्षमतेबरोबरच देशाच्या संरक्षणाचा विचार करताना जुन्या तंत्रज्ञानावर आधारीत या विमानांसह अलिकडच्या काळातील विमानांचेही आधुनिकीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, मिग २१ हे ओझर येथील हिन्दुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मध्येच निर्मित झालेले आहे.

भारतीय स्वातंत्र्यानंतर हवाई दलाला सक्षम करण्यासाठी जेव्हा लढाऊ विमानांचा विचार झाला तेव्हा रशियन बनावटीच्या मिग २१ विमानांचा पर्याय पुढे आला. तंत्रज्ञान हस्तांतराच्या निर्णयानंतर १९६६ मध्ये ओझर येथील एचएएलच्या कारखान्यात या विमानांची निर्मिती सुरू झाली. साधारण सहाशेहून अधिक विमाने हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली. त्यामुळे सर्वाधिक संख्या आणि वापर असलेली ही विमाने आहेत. विशेष म्हणजे, ही विमाने अलिकडे १९९० मध्ये कारगील युद्धातही वापरली गेली. बर्फाळ प्रदेश, अधिक उंचीचे ठिकाण, पर्वतरांगा अशा विविध परिस्थितीत या विमानांचा वापर करण्यात आला आणि होतो आहे. जुन्या तंत्रज्ञानावर आधारलेली ही विमाने मात्र धोकादायक ठरत असल्याचे दिसून येत आहे. संरक्षण मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार, २००१ ते २०१४ या १४ वर्षांच्या काळात लढाऊ विमानांचे एकूण १२५ अपघात झाले. त्यात ही पूर्णपणे नष्ट झाली. मात्र, यातील तब्बल ६१ विमाने ही मिग २१ होती. तर, याच काळात लढाऊ विमानांचे ३५ जीवघेणे अपघात झाले. त्यातील १९ अपघात हे मिग २१ विमानांचे होते. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे मिग २१ विमानांबाबत संशयाचे वातावरण तयार झाले. याबाबत हवाई दल आणि संरक्षण मंत्रालयाने सातत्याने अभ्यास केला आहे. मिग २१ विमानांचे आधुनिकीकरण करण्याशिवाय गत्यंतर नसल्याचे हवाई दलातील तज्ज्ञांचे मत आहे.

- 'मिग २१'चे आधुनिकीकरण शक्य...२

...

- २००१ ते २०१४ या काळात लढाऊ विमानांचे एकूण १२५ अपघात

- अपघातातील तब्बल ६१ विमाने मिग २१

- याच काळात लढाऊ विमानांचे ३५ जीवघेणे अपघात

- त्यातील १९ अपघात हे मिग २१ विमानांचे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात -

$
0
0

पोस्ट तिकीटांचे प्रदर्शन

नाशिक : भारतीय पोस्ट विभागातर्फे जिल्हास्तरीय पोस्ट तिकीटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 'नापेक्स २०१८' हे प्रदर्शन २० आणि २१ ऑक्टोबर रोजी शालिमार येथील महात्मा फुले कलादालन येथे होणार आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातील पोस्ट तिकीट संग्रहक आपल्या संग्रहातील तिकीटे प्रदर्शित करु शकणार आहेत. त्यासाठीचे प्रवेश अर्ज प्रवर डाक अधीक्षक, नाशिक विभाग यांच्या कार्यालयातून प्राप्त करुन घेण्याचे आवाहन, पोस्ट विभागाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शासन दिरंगाईवर प्राध्यापकांची नाराजी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, या मागणीसह विविध मागण्यांसाठी स्पुक्टो व प्राध्यापक महासंघ यांच्या वतीने छेडलेल्या कामबंद आंदोलनावर अद्याप उतारा सापडू शकलेला नाही. त्यातच प्राध्यापकांचे प्रश्न वित्त विभागाकडे नसल्याचे हा विभाग सांगतो तर शिक्षण विभाग या प्रश्नांसंदर्भात वित्त विभागाकडे बोट दाखवितो. पण या टोलवाटोलवीत शासनाकडून मूळ प्रश्नांना बगल दिली जात असल्याचा आरोप प्राध्यापकांमधून केला जात आहे.

कामबंद आंदोलनाचा रविवारी तेरावा दिवस आहे. प्राध्यापकांकडून वारंवार या मागण्यांचा पाठपुरावा केला गेला; मात्र शासनाने याकडे दुर्लक्ष केले त्यामुळे या आंदोलनाचा पर्याय स्वीकारावा लागल्याची भूमिका संघटनांनी घेतली आहे. दरम्यान, दिवाळी सत्रातील परिक्षांना आता सुरुवात होत असल्याने उत्तरपत्रिका तपासणीचा प्रश्न आंदोलनाने निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तरीही विद्यार्थी संघटनांनी आंदोलनास पाठिंबा जाहीर केला आहे. कामबंद आंदोलन सुरू असले तरीही प्रश्नपत्रिकांच्या कामावर बहिष्कार टाकणार नसल्याची प्राध्यापकांची भूमिका आहे. दुसरीकडे, या सत्रातील अंतर्गत गुणदानही सुरू असून आतापर्यंतचा अभ्यासक्रमही पूर्ण झाला आहे. सरकारच्या दोन विभागांमध्ये या मागण्यांबाबत असणाऱ्या विरोधाभासी वक्तव्यांमुळे प्राध्यापक शासनाच्या भूमिकेविषयी संभ्रमात पडले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राफेलबाबत पंतप्रधान गप्प का?

$
0
0

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल

म. टा. वृत्तसेवा, धुळे

देशात राफेल विमान खरेदी हा जगातील सर्वात मोठा घोटाळा आहे. ५५० ते ६०० कोटी रुपयांचे राफेल १६७० कोटी रुपयांना खरेदी केले. तर ४० हजार कोटी रुपये अधिक किंमत मोजण्यात आली. इतकी किंमत का वाढली याबाबत पंतप्रधान मोदी बोलायला तयार नाहीत. देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनीही यापकरणी मौन का बाळगले आहे, असा प्रश्न उपस्थित करून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसतर्फे काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा शनिवारी (दि. ६) रात्री धुळ्यात पोहचली. त्यानंतर शहरातील हिरे भवनात सभा झाली. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात ही जनसंघर्ष यात्रा धुळ्यात दाखल झाली. या वेळी राष्ट्रीय सरचिटणीस संदीप कुमार, माजी मंत्री रोहिदास पाटील, डॉ. हेमंत देशमुख, डॉ. शोभा बच्छाव, आमदार कुणाल पाटील, जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, युवराज करनकाळ, सभापती मधुकर गर्दे, आमदार शरद रणपिसे, डॉ. तुषार शेवाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रथम शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पूष्पहार अर्पण करीत ही जनसंघर्ष यात्रा हिरे भवनात दाखल झाली.

यावेळी पुढे बोलताना माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, काँग्रेसचे सरकार असताना पेट्रोल, डिझेलवर कमी व्हॅट होता. परंतु, आता केंद्र व राज्य सरकारने ३९ टक्क्यांपर्यंत व्हॅट लावला आहे. परिणामी, इंधनाचे दर वाढले आहेत. केंद्र व राज्य सरकारने व्हॅटच्या माध्यमातून १५ लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे देशावर गंभीर आर्थिक संकट उभे ठाकले आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. कृषी अर्थव्यवस्था आठ टक्क्यांनी घसरली असून, रुपयाचे दररोज अवमूल्यन होत आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थी सेनेतर्फे आरोग्यप्रश्नी निदर्शने

$
0
0

भारतीय विद्यार्थी सेनेचे

आरोग्यप्रश्नी निदर्शने

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

नाशिकरोड परिसरात साथीचे आजार पसरले आहेत. या रुग्णांची खाजगी रुग्णांलयाकडून तपासणीच्या नावे पिळवणूक सुरू असून, ती थांबवावी, बिटको रुग्णालयात सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात आदी मागण्यांसाठी शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेनेने रविवारी महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयासमोर

निदर्शन केली. यावेळी विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गोसावी यांना निवेदन देण्यात आले.

नाशिकरोड परिसरात सध्या साथीच्या रोगामुळे नागरिक आजारी पडत आहेत. खाजगी रुग्णांलयाकडून त्यांचा गैरफायदा घेतला जात आहे. अनेक रुग्णांकडून अनावश्‍यक तपासण्याच्या नावे पिळवणूक करण्यात

येत आहे. पॅथलाजी लॅब रुग्णांकडून जादा शुल्क आकारणी करत आहेत. ठराविक लॅबमधूनच चाचणी करण्याची सक्ती हॉस्पिटल्स करत आहेत. या दोघांवर कारवाई करावी. पॅथॉलॉजी लॅबमध्ये दरपत्रक लावावे. महापालिकेच्या रुग्णालयात या तपासण्यांची सुविधा उपलब्ध करावी. आरोग्य विभागाने साथीच्या रोगाबद्दल जनजागृती फलक लावावेत. मलेरिया औषधे फवारणी करावी आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर संदेश लवटे, श्रीकांत मगर, आकाश काळे, अजिंक्य गायधनी, आकाश उगले, विकास पाटील, बंटी मोरे, राहुल सानप, ऋषीकेश नेहे, गौरव घाडगे, समीर कांबळे, मयुर मगर, भाग्येश माकोडे आदींच्या सह्या आहेत.

जिवंत पत्नींचा पिंडदानाचा प्रयत्न

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

विवाहानंतर पती व पत्नी यांच्या विविध कारणांनी पटेनासे होते. पत्नी पतीपासून घटस्फोट न घेता वेगळी राहते. अशा मुंबई येथील सुमारे १०० पत्नी पीडितांनी जिवंत पत्नीचे पितृपक्षात पिंडदान घालण्याचा प्रयत्न रविवारी (दि.७) रोजी रामकुंड परिसरात केला. पुरोहितांनी या पत्नी पीडितांनाची समजूत काढली. जिवंत व्यक्तीचे पिंडदान करता येत नाही. तेव्हा तुमच्या पितरांचे पिंडदान करायचे असेल तर ते करू शकता, असे सांगितल्यावर त्या पतींनी त्यांच्या पितरांचे पिंडदान केले.

सध्या पितृपक्ष सुरू असल्याने रामकुंड परिसरात पिंडदान करण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दीत पत्नी पीडितांची भर पडली. एकाच वेळी अनोख्या पद्धतीने जिवंत पत्नीचे पिंडदान घालण्याचा प्रयत्न मुंबई येथील पुरुषांच्या मानवीय हक्कांसाठी लढणारी 'वास्तव फाउंडेशन'ने केला. या पिंडदान आयोजित केले होते. या संघटनेने या पुरुषांना मानसिक धीर मिळवा यासाठी रामकुंड येथील लक्ष्मण कुंड येथे रविवारी (दि.७) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पत्नी पीडितांनी जिवंत पत्नीच्या नावाने पिंडदान करण्याचा प्रयत्न करायला आलेल्यांना पुरोहित संकेत गायधनी यांनी समजूत काढली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पितरांचे पिंडदान केले. या प्रकाराची पंचवटी परिसरात चर्चा सुरू होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोक चव्हाणांची जीभ घसरली

$
0
0

मालेगाव :

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची जीभ घसरली. शाळेत गैरप्रकार करणारा खोडकर मुलगा व त्याच्या वडिलांशी चव्हाण यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांची तुलना केली. या वक्तव्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत, नंतर चव्हाण यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

मालेगाव येथे जनसंघर्ष यात्रेदरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांवर टीका करताना एक गोष्ट सांगितली. एका खोडकर मुलाच्या गैरवर्तणुकीची तक्रार करण्यासाठी मास्तर त्या मुलाच्या घरी गेले असता, त्याचे वडील तशीच गैरवर्तणूक करताना दिसले. अशीच स्थिती देशात व राज्यात झाली आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. चव्हाण यांच्या या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपचारांसाठी डॉक्टर नसतात उपलब्ध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जुने नाशिक परिसरात साथीच्या आजारांचे प्रमाण वाढते आहे. परिसरातील अस्वच्छता साथीच्या रोगांना आमंत्रण देणारी ठरत असल्याचे दिसून येते. परिसरातल्या बहुतांश घरांमध्ये तापाचे पेशंट आहेत. स्वाइन फ्लू, डेंग्यू यांसह इतर साथीच्या आजारांचा फैलाव या परिसरात अधिक आहे. दिवसाकाठी परिसरातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये तीसहून अधिक पेशंट साथीच्या आजारांवर उपचार घेत आहेत.

जुने नाशिक भागातील कथडा हॉस्पिटलमधील पेशंटला उपचारांसाठी अनेकदा बिटको किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात येते. या हॉस्पिटलमध्ये औषधांचा तुटवडा कायम असतो. अनेकदा अत्यावश्यक पेशंट उपचारासाठी दाखल झाल्यावर या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नसल्याचे दिसते. त्यामुळे पेशंटवर वेळीच उपचार होण्यामध्ये अडचण निर्माण होत असल्याचे वास्तव आहे. तसेच या हॉस्पिटलमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यामुळे तपासणीसाठी आलेल्या पेशंटला आणि नातेवाइकांना पिण्याचे पाणीदेखील उपलब्ध होत नाही. औषधांचा तुटवडा असल्याने पेशंटच्या नातेवाइकांना बाहेरुन औषधे आणण्यासाठी सांगितले जाते. त्यामुळे पेशंटसह नातेवाइकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. कथडा हे सरकारी हॉस्पिटल असल्याने परिसरातील बहुतांश नागरिक या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येतात. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे पेशंटना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची माहिती पेशंटच्या नातेवाइकांनी आणि परिसरातील नागरिकांनी दिली आहे.

जुने नाशिकमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याने परिसरातील खासगी हॉस्पिटलमध्ये साथीच्या रोगावर उपचार घेण्यासाठी पेशंट गर्दी करताना दिसतात. परिसरातील खासगी हॉस्पिटलमध्ये नेहमी तीसपेक्षा अधिक पेशंट तपासणी व उपचारासाठी येत आहेत. कथडा हॉस्पिटलमध्ये सध्या स्वाइन फ्लूचे उपचार घेणाऱ्या पेशंटची संख्या ५ आहे. तर खासगी हॉस्पिटलमध्येही १० ते १२ पेशंट स्वाइन फ्लूचे उपचार घेत आहेत. परिसरात वाढत्या साथीच्या आजारांमुळे नागरिकांनी सतर्क राहत आरोग्य तपासणी करुन घेणे गरजेचे आहे.

रविवारी एकच डॉक्टर

जुने नाशिक परिसरात साथीच्या आजारांच्या पेशंटची संख्या अधिक आहे. असे असूनही कथडा हॉस्पिटलमध्ये रविवारी सुटी असल्याने फक्त एकच डॉक्टर कार्यरत होते. सकाळी डॉक्टरांचा महिला वार्डमध्ये राउंड सुरू असताना अतिदक्षतेचा पेशंट आल्याने त्या डॉक्टरांनाच धावपळ करावी लागली. रविवारी संपूर्ण हॉस्पिटलमध्ये एकच डॉक्टर असल्याने पेशंटलाही तपासणीसाठी कित्येकवेळ तात्काळत बसावे लागले. परिसरात साथीच्या आजाराच्या पेशंटची संख्या वाढत असताना डॉक्टर सुटी कशी घेऊ शकतात, असा प्रश्न यावेळी पेशंटच्या नातेवाइकांनी उपस्थित केला होता.

आमच्याकडे माहिती नाही!

डेंग्यू, स्वाइन फ्लूसह साथीच्या वाढलेला प्रादुर्भावामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंनी वैद्यकीय विभागात फेरबदल केले. त्यामुळे बदली करण्यात आलेल्या नव्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे कथडा हॉस्पिटलमधील पेशंटची आकडेवारी नाही. हॉस्पिटलमधले डॉक्टर देखील ही माहिती देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवरंगांत बहरतेय नाशिक

$
0
0

फोटो - सतीश काळे

नवरात्रीच्या नवरंगांप्रमाणे शहरातील बाजारपेठादेखील नवरंगांत बहरल्या आहेत. शहरातील बाजारपेठांमध्ये नवरात्रोत्सवाच्या मुहूर्तावर विविधरंगी दांडिया, घट, टोपली, फुलमाळा यांची दुकाने थाटण्यात आली आहेत. गरब्यासाठी केडियो घागरा, धोती, वेस्टर्न जॅकेट्नी दुकाने सजली आहेत. त्यासोबत शहरातील ग्रामदेवतेच्या मंदिरासह उपनगरातील देवी मंदिरांचे नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने रंगकाम अंतिम टप्यात आले आहे. ग्रामदेवतेच्या यात्रेनिमित्ताने पाळण्यांची उभारणीदेखील पूर्ण झाली आहे. विविध रंगांतल्या वस्तूंनी थाटण्यात आलेली दुकाने अन् देवी मंदिराचे नव्या रंगात खुलणारे रूप बघता नवरात्रोत्सवाच्या दोन दिवस अगोदरच शहरात नवरंगांची बहार दिसू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लू

$
0
0

स्वाइन फ्लूने

एकाचा मृत्यू

नाशिक : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या दिलीप किसनराव पाईकराव (वय ५०, रा. पंचशीलनगर, नाशिक) या व्यक्तीचा स्वाइन फ्लूसदृश आजाराने शनिवारी मृत्यू झाला. खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या पाईकराव यांना शुक्रवारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. स्वाइन फ्लू वॉर्डात सध्या आठ महिला तर नऊ पुरुषांवर उपचार सुरू आहेत. त्यातील एका पेशंटचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, १६ पेशंटचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ते कॉल पाकिस्तानातून नाहीच!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तब्ब्ल २५ लाखांची लॉटरी लागल्याचे सांगत एका महिलेकडून चोरट्यांनी ऑनलाइन २७ लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलिसांचा तपास अंतिम टप्प्यावर पोहोचला असून, संशयिताने हे कॉल पाकिस्तानातून नव्हे, तर देशातूनच एका अॅप्लिकेशनद्वारे केले आहेत. लवकरच मुख्य सूत्रधाराला अटक होईल. त्यानंतर यातील सर्व तथ्ये बाहेर येतील, असा विश्वास सायबर पोलिसांनी व्यक्त केला.

या प्रकरणी मोना फारूक इराणी (वय ५४, रा. संसरी नाक्याजवळ, लॅमरोड, देवळाली कॅम्प) या महिलेने तक्रार दिली आहे. इराणी यांचे शालिमार परिसरात हॉटेल असून, त्यांच्या दोन्ही मुली परदेशात असतात. आठ एप्रिल २०१३ आणि त्यानंतरच्या कालावधीत इराणी यांना त्यांच्या मोबाइलवर ०९२ या क्रमांकाने सुरू होणाऱ्या मोबाइल क्रमाकांवरून संपर्क साधण्यात आला. मोबाइलवर बोलणाऱ्या संशयिताने इराणी यांना २५ लाख रुपयांची लॉटरी लागल्याचे भासवून विश्वास संपादन केला. तुम्हाला लॉटरीचे २५ लाख रुपये देण्यासाठी काही प्रमाणात आमच्याकडे सायनिंग अमाउंट भरावी लागेल, असे संशयिताने इराणी यांना सांगितले. त्यानंतर २०१३ ते २२ ऑगस्ट २०१८ या कालावधीत इराणी यांनी संशयितांनी सांगितल्याप्रमाणे, ८६ वेळा बँकांमध्ये पैसे भरले. संशयितांचा फोन आला, की इराणी यांनी एक लाख, दोन लाख, तर कधी अगदी १० हजार या पद्धतीने पैसे भरणे सुरू ठेवले. इराणी यांनी लॉटरीचे २५ लाख रुपये मिळण्यासाठी आपले स्वत:चे दागिने गहाण ठेवले, तसेच मुलींकडून व नातेवाइकांकडून पैसे उसने घेऊन बँकेत जमा केले. मागील पाच वर्षांत इराणी यांनी २५ लाखांच्या रकमेसाठी स्वत:कडील २६ लाख ९५ हजार रुपये संशयितांच्या बँक खात्यावर भरले. विशेष म्हणजे इराणी यांनी या प्रकाराबाबत कधीही वाच्यता केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस स्टेशन गाठून घटनेची माहिती दिली. त्यानुसार ऑगस्टच्या अखेरीस गुन्हा दाखल करण्यात आला. इराणी यांना आलेल्या मोबाइल्स कॉल्सच्या क्रमांकांची सुरुवात ०९२ ने होते. भारतासाठी ०९१, तर पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रमांक म्हणून ०९२ क्रमांक वापरला जातो. मात्र, एका अॅप्लिकेशनच्या मदतीने ही बनवाबनवी करण्यात आली असून, इराणी यांना सर्व कॉल्स भारतातूनच झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यातील संशयितांना लवकरच अटक होईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मायलेकीत असावे मैत्रीचे नाते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किशोरवयीन अवस्थेत मुलींमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल, तसेच रजोनिवृत्तीच्या आधी व नंतरची स्थिती हा स्त्रियांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मात्र, याबाबत समाजात मोकळेपणाने बोलले जात नाही. किशोरवयीन मुली आणि आई या दोघींमध्ये मैत्रीचे नाते असणे आणि दोघींमध्ये या विषयावर मनमोकळी चर्चा होणे आवश्यक आहे. असे झाल्यास मुलींमध्ये न्यूनगंड निर्माण होणार नाही, असे प्रतिपादन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुनंदा मुंदडा यांनी केले.

जल्लोष फाउंडेशनने 'महिला आणि स्वस्थ जीवनशैली' या विषयावर उपनगर येथे परिसंवाद झाला. जल्लोष फाउंडेशनच्या अध्यक्षा नीलम हासे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले. डॉ. मुंदडा म्हणाल्या, की महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी दिवसातला किमान एक तास तरी नियमितपणे द्यावा, तसेच सात्त्विक आहार व आहारात रक्तवृद्धीकर व कॅल्शियमयुक्त घटक जास्त असलेले पदार्थ खावे. आजच्या या स्पर्धात्मक युगात स्त्रीने स्वतःला सर्वच क्षेत्रांत सिद्ध केले आहे. घरातील सर्व जबाबदाऱ्या लीलया सांभाळून स्त्रिया नोकरी-व्यवसाय करून कुटुंबाला आर्थिक हातभारदेखील लावत आहेत. मात्र, हे सर्व करीत असताना ती आणि कुटुंबातील व्यक्ती तिच्या आरोग्याबाबत तेवढे जागरूक आहेत का? स्त्री हा कुटुंबाचा कणा आहे. स्वतः निरोगी व मजबूत असेल तरच ती सर्व जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या निभावू शकते. ती जेव्हा आजारी पडते तेव्हा मात्र कुटुंबाची सर्व घडीच विस्कटते, असेही या वेळी सांगण्यात आले. या परिसंवादास उपनगर व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महिलांच्या शंकांचे निरसनदेखील प्रश्नोत्तराच्या माध्यमातून या वेळी करण्यात आले. नीलम हासे व पुष्पा ताजनपुरे यांनी सहकार्य केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘पालवी’च्या स्पर्धेत रसिका खुळे विजेती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पालवी फाउंडेशनच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेत मराठा हायस्कूलच्या रसिका खुळे हिने विजेतेपद पटकाविले. जनता विद्यालयातील मानसी वाघने उपविजेतेपद मिळवले तर त्रिषा गुप्ताने तिसरा क्रमांक मिळविला.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालवी फाउंडेशनकडून नैसर्गिक घटकांपासून गणेशमूर्ती बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल फाउंडेशनतर्फे जाहीर करण्यात आला. फाउंडेशनच्या डॉ. सुवर्णा पवार, डॉ. राजश्री कुटे, दीपाली खेडकर, मोना गुलाटी यांनी याविषयी माहिती दिली. कापूस, फळे, डाळी, धान्य, नारळ, सुपारी अशा नैसर्गिक घटकांपासून बनविलेल्या गणेशमूर्ती बनविण्यास प्रोत्साहन देण्यासाठी पालवी फाउंडेशनतर्फे स्पर्धा घेण्यात आली. नैसर्गिक घटकांपासून बनविलेल्याच मूर्ती स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात आल्या होत्या. याशिवाय, गणेशमूर्तींचे विसर्जनही पर्यावरणपूरक असणे आवश्यक होते. रसिका खुळे, मानसी वाघ व त्रिषा गुप्ता यांनी बनविलेल्या गणेशमूर्ती स्पर्धेचे निकष पूर्ण करणारे असल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images