Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

भगवानबाबा स्मारकाचे दसऱ्याला होणार लोकार्पण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात संत भगवानबाबा यांच्या श्रीक्षेत्र सावरगाव (घाट) या जन्मगावी गुरुवारी (दि. १८) दसऱ्याच्या निमित्ताने मेळावा होणार आहे. यात भगवानबाबांच्या स्मारकाचे लोकार्पण होणार असून त्यासाठी नाशिकमधून मोठ्या संख्येने जाण्याचा निर्धार वंजारी समाजबांधवांनी केला आहे. 'एक दिवस एकीसाठी, लोकनेत्याच्या लेकीसाठी' असा नाराच दसरा कृती समितीने दिला आहे.

भगवानबाबा यांची कर्मभूमी असलेल्या भगवान गडावर दसरा मेळावा घेण्याची परंपरा आहे. परंतु, गडाचे महंत नामदेवशास्त्री यांनी विरोध केल्याने ही परंपरा खंडित झाली आहे. त्यामुळे मंत्री पकंजा मुंडे यांनी भगवानबाबा यांचे जन्मगाव असलेल्या सावरगाव घाट येथे मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. गतवर्षीच्या मेळाव्यात भगवानबाबा यांच्या जन्मगावी भव्य स्मारक उभारण्याची घोषणा पकंजा मुंडे यांनी केली होती. वर्षभरात स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे आले असून दसऱ्याला सकाळी ११ वाजता या स्मारकाचे लोकर्पण होणार असल्याची माहिती माजी आमदार गोविंद केंद्रे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

कृती समितीची बैठक

मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर जुना गंगापूर नाका येथील समर्थ हॉलमध्ये दसरा मेळावा कृती समितीची बैठक झाली. यावेळी हेमंत धात्रक, आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सागंळे, डी. पी. आव्हाड, शिवसेना जिल्हा प्रमुख सुहास कांदे, ॲड. पी. आर. गिते, जगन्नाथ भाबड, दिगंबर गिते आदी उपस्थित होते.

असे असणार स्मारक

सावरगावमध्ये १२ एकर जागेत भगवानबाबा यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. पाण्यावर बसून ज्ञानेश्‍वरी वाचन करणारे भगवानबाबा या स्मारकात दिसणार आहेत. मेळावा यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘दिलखुलास’मध्ये डॉ. नरेश गिते

0
0

नाशिक : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांची मुलाखत होणार आहे.

'प्रधानमंत्री आवास योजनेची नाशिक जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी' या विषयावर ही मुलाखत असणार आहे. राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवारी आणि शनिवारी (दि. १२ व १३ ऑक्टोबर) सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेची उत्कृष्ट अंमलबजावणी, ग्रामीण भागात घर बांधण्याचे उद्दिष्ट, योजनेच्या प्रचारासाठी प्रसारमाध्यमांचे उपयोग, स्वच्छ जिल्हा सर्वेक्षणात जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी, जिल्ह्यात एकात्मिक बालविकास योजनेची अंमलबजावणी, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी नवीन सोयी-सुविधा, पोषण आहार व स्वच्छता ही सेवा अभियान, तसेच नाशिक जिल्ह्याच्या पुढील विकासाबाबतची माहिती डॉ. गिते विशद करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिल्डर, ठेकेदारावर गुन्हा

0
0

गवंड्याच्या मृत्यूप्रकरणी गंगापूर पोलिसांची कारवाई

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

निर्माणाधीन इमारतीचे बांधकाम करणाऱ्या गवंड्याचा इमारतीवरून पडल्याप्रकरणी बिल्डरसह बांधकाम ठेकेदाराविरुद्ध गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. गवंड्याचा मृत्यू होण्याची घटना आनंदवल्ली शिवारातील यंन्श हाईट्स येथे शुक्रवार (दि. ७ सप्टेंबर) घडली होती.

विजय पन्नालाल टाटिया (रा. अरिहंत, वसंत मार्केटसमोर, गंगापूर रोड) असे बिल्डरचे नाव असून, खान मोहम्मद सलिम नूरमहम्मद (रा. सातवड गुजर सोसायटी, सिडको) असे बांधकाम ठेकेदाराचे नाव आहे. आनंदवल्ली शिवारात बिल्डर विजय टाटिया याच्या यंन्श हाईट्स या इमारतीचे ७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता बांधकाम सुरू असताना मिंटू मुकेश्‍वर पंडित (४०, रा. आंबेडकर चौक, सातपूर, नाशिक) हा सोसायटीच्या मजल्यावर गवंडी काम करीत होता. याच वेळी गवंडी काम करताना पंडित हे खाली पडले. यात गंभीर जखमी झालेल्या पंडित यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पोलिस तपासादरम्यान विजय टाटिया व बांधकाम ठेकेदार खान मोहम्मद सलिम नूरमहम्मद यांनी बिल्डिंगचे प्लॅस्टर करणाऱ्या कामगार, गवंडी व मजुरांना उंचावर काम करीत असतानाही त्यांच्या जीविताच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेट, कमरपट्टा, त्यासाठी लागणारा दोर, प्लॅस्टरच्या कामासाठी वर उभे राहण्यासाठी जास्त रुंदीची फळी व सुरक्षित जाळी उपलब्ध करून दिली नसल्याचे समोर आले. या दोघांनी निष्काळजीपणा दाखविल्याने पोलिस तपासात स्पष्ट झाल्याने पोलिस हवालदार प्रदीप भूमकर यांच्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाळदे करीत आहेत.

दुचाकी अपघातात चालक ठार

दुचाकीसमोर कुत्रे आडवे आल्याने चालकाने ताबडतोब ब्रेक मारला असता गाडी स्लीप होऊन झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. याबाबत उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

त्र्यंबक बहिरू खताळ (५७, रा. नांदडगाव, ता. इगतपुरी) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्र्यंबक खताळ हे रविवारी (दि. ७) सकाळी आपल्या दुचाकीने (एमएच १५ डीएक्स ५२५) घराकडून नाशिककडे येत असताना हा अपघात झाला. पिंपळगाव खांब ते वडनेर गेट रोडने भरधाव दुचाकीला कुत्रे आडवे आले. त्यामुळे त्यांनी गाडीचा ब्रेक दाबला. मात्र, दुचाकी स्लीप झाली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शिवाजी सोनवणे (मु. पो. मनेगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक) यांनी फिर्याद दाखल केली असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाकले करीत आहेत.

चेहेडीत आत्महत्या

नाशिकरोडच्या जुन्या चेहेडीतील गिते वस्ती येथे राहणाऱ्या व्यक्तीने गळफास घेत आत्महत्या केली. याबाबत नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुरेश आनंदराव बोरे (४२, रा. शाळेजवळ, गिते वस्ती, जुने चेहेडी, नाशिकरोड) असे या व्यक्तीचे नाव आहे. सुरेश बोरे यांनी अज्ञात कारणातून घरातील सिलिंग फॅनच्या सहाय्याने स्वत:ला गळफास लावून घेत आत्महत्या केली. पुढील तपास पोलिस हवालदार गुंबाडे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संधीवात होतोय ‘तरुण’!

0
0

बदलती लाईफ स्टाईल कारणीभूत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बदलती लाईफ स्टाईल आणि व्यायामाचा अभाव यामुळे कधीकाळी वयाच्या ६० वर्षांनंतर सुरू होणारा संधीवाताचा त्रास आता अगदीच ३५ वर्षांच्या तरुणांना होतो आहे. आहार विहारात वेळीच बदल झाले नाही तर भविष्यात सर्वसाधारण कुटुंबाच्या बजेटमधील मोठा खर्च या आजाराकडे वळण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करतात.

संधीवात म्हणजे हाडांच्या सांध्यामध्ये होणारी झीज. ही झीज वयानुसार वाढत जाते. त्यामुळे पूर्वी वृद्ध म्हणजे अगदी ६० वर्षांनंतर हा त्रास सुरू व्हायचा. आता संधीवात अगदी ३२ ते ३५ वर्षांच्या तरुणांमध्येही दिसून येतो. संधीवाताचे प्रमुख तीन प्रकार असतात. वाढते वय, आम्ल आणि पित्त यासह संधीवात होण्यासाठी इतर काही कारणीभूत असतात. वाढत्या वयात आढळून येणाऱ्या संधीवाताबाबत सांधारोपण ही शस्त्रक्रिया केली जाते. नवीन सांधा मिळाल्याने शरीराचे वजन पेलले जाते. याउलट पित्त आणि आम्ल सांधीवाताचे असून, यात व्यक्तीची लाईफ स्टाईल म्हणजे आहार विहार महत्त्वाचा असतो. दुर्दैवाने शहरी भागात लाईफ स्टाईल कमालीची बदलली असून, योग्य व्यायामाचा अभाव असल्याने तरुणांना या समस्येचा सामाना करावा लागतो आहे.

संधीवाताची लक्षणं

सांध्यांना सूज येणं, सांध्यांमध्ये वेदना असणं, सांध्यांमध्ये कडकपणा येणं, सांध्यांची हालचाल मंदावणं अथवा त्यात अडथळा येणं, सांध्यांमध्ये विकृती होणं, सांधे वाकडे होणं ही लक्षणं कमी-अधिक प्रमाणात आढळतात. काहीवेळा ही लक्षणं तात्पुरत्या स्वरूपात तर काही लक्षणं ही कायमस्वरूपाची असतात. या लक्षणांमुळे दैनंदिन हालचालींमध्ये तसेच चालणं, उठणं, बसणं, चढ-उतार, वस्तू उचलणं आणि ठेवणं यावरही परिणाम होतो.

चहा अथवा कॉफीचे सेवन बंद केल्यास संधीवात होण्याची शक्यता मावळते. शरीरात आम्ल व पित्त वाढणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. तरुणांमध्ये संधीवाताचे प्रमाण वाढत असून, हे रोखण्यासाठी योग्य मार्गदर्शनाखाली व्यायाम करणे आवश्यक आहे.

- डॉ. हेमंत चौधरी, सांधेरोपण तज्ज्ञ

संधीवाताच्या प्रकारानुसार पेशंटने व्यायाम करणे आवश्यक आहे. आहारात कॅल्शियम, व्हिटामिन यांचा अंतर्भाव होईल, असा आहार महत्त्वाचा ठरतो. आम्ल व पित्तामुळे संधीवात झाल्यास पेशंटच्या आहारात बदल करावा लागतो. मद्यपानासह इतर व्यसन टाळून योग्य व्यायाम केल्यास संधीवातावर मात करणे शक्य होते.

- वैभव महाजन, फिजीओथेरपिस्ट

लोगो : संधीवात दिन विशेष

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहिती-तंत्रज्ञान विभागप्रमुखांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या ऑनलाइन सेवांना बळ देणाऱ्या माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक प्रशांत मगर यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मुंढे आणि लोकप्रतिनिधींच्या संघर्षात लोकप्रतिनिधींकडून आयुक्तांच्या गुड बुकमध्ये असलेल्या मगर यांना लक्ष्य केले जात असल्याची चर्चा महापालिकेत दबक्या आवाजात सुरू आहे. त्यामुळे मगर यांच्या अर्जावर आयुक्त मुंढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आयुक्त मुंढेंनी महापालिकेत पारदर्शक कामाला सुरुवात करत एनएमसी ई कनेक्ट अॅप नव्याने लाँच केले आहे. त्यातच अनेक सेवा ऑनलाइन केल्या असून, नागरिकांच्या तक्रारी थेट अॅपवरून सोडविल्या जात आहेत. त्यामुळे महापालिकेतील नगरसेवकांसह पदाधिकारी दुखावले गेले आहेत. मुंढेंच्या या मोहिमेला मगर यांनी खंबीर साथ दिली असून, ते आयुक्तांच्या गुड बुकमध्ये आहेत. त्यामुळे दुखावलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी आता मुंढे यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे बोलले जाते. गेल्याच आठवड्यात महापालिकेतील एका पदाधिकाऱ्याने मगर यांची झाडाझडती घेत संताप व्यक्त केला होता. त्यानंतर मगर यांनी आज प्रशासनाकडे स्वेच्छानिवृत्ती अर्ज सादर केला. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता वैयक्तिक कारणामुळे स्वेच्छानिवृत्ती अर्ज सादर केल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयुक्तांच्या घरावर विक्रेत्यांची धडक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

कालिका यात्रोत्सवात पोलिसांनी परवानगी नाकारलेल्या २५ ते ३० खेळणी व अन्य साहित्य विक्रेत्या महिलांनी गुरुवारी सायंकाळच्या सुमारास महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निवासस्थानावर धडक देत गाळे उभारणीची मागणी केली.

महिलांच्या या अचानक धडक आंदोलनामुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. महापालिकेने यात्रोत्सवात एकाच बाजूने गाळे उभारण्यास परवानगी दिली आहे. परंतु, त्यामुळे परराज्यांतून आलेल्या खेळणी विक्रेत्यांची अडचण झाली असून, त्यांच्यावर महापालिकेकडून कारवाई केली जात आहे. त्यामुळे या विक्रेत्यांनी पोलिसांकडे परवानगीसाठी अर्ज केले आहेत. परंतु, पोलिसांनी नकार दिल्याने या विक्रेत्यांनी सायंकाळी थेट आयुक्त मुंढेंच्या निवासस्थानी धडक देत परवानगीसाठी आंदोलन सुरू केले. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त सुहास शिंदे, महेश बच्छाव, रोहिदास बहिरम यांनी निवासस्थानी धाव घेत त्यांची समजूत काढली. मंडप धोरणाचे कारण देत त्यांची समजूत काढली. मुंढे बाहेरच्या दौऱ्यावर असल्याने या विक्रेत्यांनीही नमते घेत आंदोलन मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्रह्मोत्सवात नाशिककर मुग्ध

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री तिरुपती श्लोकाने झालेली सुरुवात नाशिककरांना समाधान देऊन गेली, निमित्त होते शंकराचार्य न्यासाच्या वतीने आयोजित 'गोड तुझे रूप' या मैफलीचे. मीना निकम आणि आनंद अत्रे यांच्या भक्तिप्रासादिक गायनाने रसिक मुग्ध झाले. गंगापूर धबधब्याजवळील व्यंकटेश बालाजी मंदिरात गायनाचा हा कार्यक्रम झाला.

निधीपती नारायण, देवाचिये द्वारी, हरिओम नमो नारायणा, माझ्या मना लागो छंद, परब्रह्म माते महालक्ष्मी, जय जय रामकृष्ण हरी, माझी रेणुका माऊली, कृपासरोवर कमल मनोहर, बाजे रे मुरलिया बाजे, अच्युतम केशवम, रुपे सुंदर सावळा गं माये, श्रीनिवासा गोविंदा, विठू माऊली तू माऊली जगाची, गोविंद बोलो हरिगोपाल बोलो ही गाणी यावेळी सादर करण्यात आली. यावेळी नृत्य, शिल्प व अक्षर यांच्या माध्यमातून व्यंकटेशाला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. नृत्य श्रृती व श्रेया फाटक यांचे, शिल्प श्रेयस गर्गे यांचे, तर अक्षर पूजा, नीलेश, चिंतामण यांचे होते. वाद्यवृंद संयोजन अमोल पाळेकर व अभिजित शर्मा यांचे होते. निवेदन श्रीपाद कोतवाल यांचे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट काम, सहा महिने थांब!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीअंतर्गत हाती घेण्यात आलेल्या अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या स्मार्ट रोडचे काम अजून सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या स्मार्ट रोडच्या कामाची मुदत येत्या १६ ऑक्टोबरला संपत असली, तरी आतापर्यंत केवळ २० टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या कामाला आणखी सहा महिने मुदतवाढ देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने नाशिककरांची परवड कायम राहणार आहे.

स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित करण्यात येत असलेल्या स्मार्टरोडवर १६ कोटी रुपयांचा खर्च केला जात असून, हा रस्ता मॉडेल रस्ता म्हणून तयार केला जात आहे. एक किलोमीटरच्या या रस्त्यावर विविध अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. दोन्ही बाजूंनी दोन हजार दोनशे मीटर रस्त्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी ठेकेदाराला १६ ऑक्टोबरची मुदत देण्यात आली होती. परंतु, सध्याचे काम संथगतीने सुरू असल्याने या मुदतीत केवळ २० ते २५ टक्केच काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे उर्वरित कामासाठी अजून मुदतवाढ देण्याची आवश्यकता आहे. रस्ता विकसित करताना ठेकेदाराला मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. त्यामुळे काम लांबणीवर पडले असून, या कामासाठी अजून सहा महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्याला आणखीन सहा महिने मुदतवाढ देण्याची तयारी सुरू झाल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इंधनदरवाढीचा थेट पंपावर निषेध

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सततच्या इंधनदरवाढीच्या निषेधार्थ शहर युवक काँग्रेसतर्फे गुरुवारी थेट शहरातील पेट्रोलपंपावरच निषेध आंदोलन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेस काळे फासून दरवाढीचा निषेध नोंदविण्यात आला. पेट्रोलपंपाबाहेरच गॅस सिलिंडर ठेवून त्यावर स्वयंपाक करीत जोरदार निदर्शने करण्यात आली. वाहनधारकांना पत्रक देऊन सरकारच्या दुटप्पी भूमिकेची माहितीही देण्यात आली.

पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती दररोज वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिक बेजार झाले आहेत. त्यामुळे युवक काँग्रेसतर्फे गुरुवारी राज्यभरात निषेध आंदोलन करण्यात आले. नाशिकमध्येही युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्र्यंबक नाका परिसरातील पेट्रोलपंपावर हे आंदोलन झाले. पेट्रोल, डिझेल व गॅसचे दर प्रचंड वाढले आहेत. देशातील सर्व वस्तू व पदार्थ 'जीएसटी'च्या कक्षेत आणल्यानंतर केवळ इंधनाला 'जीएसटी' का लागू केला नाही, हा प्रश्न सामान्यांना पडला आहे. यामागे सरकारचे मोठे षडयंत्र आहे, त्यांना इंधनाचे दर कमी व्हावेत, असे वाटत नाही. त्यामुळेच 'जीएसटी'च्या कक्षेतून इंधन बाजूला केले आहे. आजवर 'अच्छे दिन'च्या घोषणा करीत सामान्य नागरिकांना वाईट दिवसांचा अनुभव घेण्यास भाग पाडले. सरकार केवळ दिशाभूल करीत असल्याचे त्यांच्या धोरणांवरून स्पष्ट होत आहे. सामान्य नागरिक आज अडचणीत आल्याने तो संतप्त आहे. सरकारच्या कोणत्याही धोरणाचा त्याला फायदा होत नाही. याउलट सरकारी धोरणांचा प्रतिकूल परिणाम त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे जनतेची ही नाराजी आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करीत आहोत. यापुढेही दरवाढीविरोधात आंदोलन करीत राहणार असल्याचा इशारा शहराध्यक्ष पाटील यांनी दिला. आंदोलनात शहराध्यक्ष शरद आहेर, सेवादलाचे शहराध्यक्ष वसंत ठाकूर, युवकचे गौरव पानगव्हाणे, जयेश पोकळे, धनजंय कोठुळे, यशश्री शिरोदे, त्रिरश्मी तिगोटे, ज्ञानेश्वर गाडे, रोहन कातकाडे, जयेश सोनवणे, दिलीप मुळाणे, आकाश घोलप, ज्ञानेश्वर काळे, उद्धव पवार आदी सहभागी झाले होते.

सरकारविरोधात घोषणाबाजी

मोदी सरकार हाय हाय, मोदी हटाव देश बचाओ, चार वर्षांत केले काय, वरती पाय खाली डोकं... अशा घोषणा देत मोदी यांची प्रतिकृती उलटी दर्शवून वाढत्या दरवाढीचा निषेध करण्यात आला. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोदी यांच्या प्रतिमेस काळे फासत निषेध व्यक्त केला. यावेळी पंपावर आलेल्या सर्वसामान्यांना पत्रकांचे वाटप करून सरकारच्या दुटप्पी भूमिकेबाबत जनजागृती करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धमकी दिल्याप्रकरणी चार आरोपींना शिक्षा

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

कोयत्याने मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात २०११ मध्ये दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपींविरोधातील गुन्हा नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सिद्ध झाल्याने या गुन्ह्यातील चार आरोपींना दोन वर्षांसाठी चांगली वर्तणूक व शांतता ठेवण्याकामी न्यायालयाने १५ हजार रुपयांचा बॉण्ड लिहून घेण्याची शिक्षा ठोठावली आहे.

प्रमोद वसंत डोंगरे, राज अशोक गांगुर्डे, सागर दत्तू भवर, खंडू सुखदेव वाघ (सर्व रा. महादेववाडी, सातपूर, नाशिक) अशी शिक्षा झालेल्या चार आरोपींची नावे आहेत. या चौघांनी ऑक्टोबर २०११ मध्ये फिर्यादी दीपक विश्वनाथ हिरे यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली होती.

दुचाकीची चोरी

नाशिकरोड : सामनगाव रोडवरील अश्विनी कॉलनीतून एका दुचाकीची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अजिज अनिस पठाण (वय ४३) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यांच्या मालकीची दुचाकी (एमएच १५ डीए ७८६५) बुधवारी (दि. १०) रात्री त्यांच्या घराच्या पार्किंगमध्ये उभी केलेली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना गाडी आढळून आली नाही. त्यांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्ट आवारात पुन्हा कोम्बिंग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा कोर्टाच्या आवारात विनाकारण फिरणाऱ्या तसेच तारखेसाठी आलेल्या खटल्यातील फिर्यादी आणि साक्षीदार यांना दमदाटी करणाऱ्या संशयितांची पोलिसांनी गुरुवारी (दि. ११) धरपकड केली. या कारवाईमुळे गुन्हेगारांचे नातेवाईक, पाठराखण करणाऱ्यांबरोबरच जामिनासाठी दलाली करणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. शहर पोलिसांनी ८ सप्टेंबर रोजी ही मोहीम हाती घेतली होती. त्यात तब्बल ६० जणांवर कारवाई करण्यात आली.

जिल्हा कोर्टात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांचा वावर वाढल्याने तसेच तारखेसाठी येणाऱ्या फिर्यादींसह साक्षीदारांवर दबाव टाकण्यात येत असल्याचे उघड झाल्याने पोलिसांनी ही मोहीम सुरू केली आहे. कोर्ट आवारात गुन्हेगार आणि पाठराखण करणाऱ्यांकडून अनेकदा कोर्टाबाहेर प्रकरण मिटवण्याचे प्रकार होतात. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी कोर्ट आवारातील रिकामटेकड्यांना लक्ष्य केले आहे. त्यात व्यावसायिक जामिनदारही पोलिसांच्या रडारवर असून, वेगवेगळ्या कोर्टात छायाचित्र बदलून जामीन मिळवून देणाऱ्यांनाही चाप बसविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील व सहाय्यक आयुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी शहर हद्दीतील सर्व पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी आणि गुन्हे शाखा व आयुक्तालयातील स्ट्रायकिंग फोर्स जवानांनी या मोहिमेत भाग घेतला. पोलिसांचा मोठा फौजफाटा कोर्टात ११ वाजेच्या सुमारास दाखल होताच परिसरात धावपळ उडाली. या कारवाईच्या पहिल्या सत्रात २९ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली.

टोळक्यांचा बंदोबस्त

पोलिसांनी न्यायालास वेढा देत परिसर पिंजून काढल्याने गुन्हेगारांना भेटण्यासाठी आलेल्यांसह वकिलांच्या पक्षकारांची भंबेरी उडाली. पोलिसांकडून तीन दिवसात दोनदा मोठी कारवाई झाली असून, त्याचे सर्वच स्थरातून स्वागत होते आहे. गुन्हेगारांची पाठराखण करण्यासाठी कोर्टात येणाऱ्या टोळक्यांचा बंदोबस्त करण्याचे काम सातत्याने होणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेगवेगळ्या अपघातात तीन ठार

0
0

टीम मटा

सातपूर आणि पिंपळगाव बहुला आणि चांदवडजवळ झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. पिंपळगाव बहुला गावाजवळ दुभाजकाला धडकून बोलेरो गाडी थेट नंदिनी नदीत कोळसली.

बोलेरो नदीत कोसळून एक ठार

सातपूर : त्र्यंबकेश्वररोडवर असलेल्या हॉटेलमधून खासगी कार्यक्रम आटोपून घराकडे निघालेल्या प्रवाशांची बोलेरा गाडी पिंपळगाव बहुलाजवळ नंदिनी नदीत कासळली. या अपघातात दोनजण गंभीर जखमी झाले. स्थानिक तरुणांनी दोघांनाही बोलेरोतून बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले मात्र उपचारादरम्यान जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला. अपघातातील दुसऱ्या जखमीवर उपचार सुरू आहे. बुधवारी रात्री हा अपघात झाला.

बुधवारी रात्री संस्कृती हॉटेल येथून घरगुती कार्यक्रम आटोपून मुळेचे शिवडी (ता. निफाड) येथील पंडित क्षीरसागर व राजाराम क्षीरसागर घराकडे निघाले होते. पिंपळगाव बहुला गावातील पुलावरील दुभाजकावर त्यांची बोलेरो धडकून डाव्या बाजूला असलेल्या लोखंडी कथडे तोडून थेट नंदिनी नदीत कोसळली. अचानक आवाज झाल्याने गावातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणांनी दोघेही जखमींना बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात हलविले. दरम्यान, पंडितत क्षीरसागर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

दुचाकी-व्हॅन अपघातात तरुणाचा मृत्यू

सातपूर : भरगाव वेगाने जाणाऱ्या तरुणाची दुचाकी व्हॅनवर जोरदार धडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी सातपूर परिसरातील अशोका इमारतीच्या समोर हा अपघात झाला. शिवाजीनगर भवर टॉवर येथे राहणारा राहूल चंद्रकांत साळुंखे दुपारी ४च्या सुमारास अशोकनगर रोडवरून चालला होता. अशोका इमारतीच्या बाजूने वळण घेत असताना समोरून येणाऱ्या व्हॅनला राहूलच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. दुचाकी वेगात असल्यामुळे व्हॅनला धडकून राहूल व्हॅनखाली सापडला. परिसरातील व्यावसायिकांनी तत्काळ राहूलला त्याच व्हॅनमधून खासगी रुग्णालयात हलविले. परंतु गंभीर जखमी असलेल्या राहूलला खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी राहूलला मयत घोषित केले.

दुचाकीस्वार ठार

कळवण : सटाणा-देवळा रस्त्यावरील माळवाडी फाट्याजवळ झालेल्या पीकअप व मोटारसायकलच्या अपघातात दुगाव (ता. चांदवड) येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. दुगाव येथील रहिवासी व लासलगाव येथे वीजवितरन कंपनीत वरिष्ठ तांत्रिक म्हणून नोकरीस असलेले विरेश श्रीधर सोनवणे (वय ३०) हे माळवाडी येथे आपल्या चुलत शालाकाच्या अंत्यविधीस मोटारसायकलने जात होते. त्याचवेळी समोरून येणाऱ्या पीकअपने (एमएच ४१ एजी १०७०) जोरदार धडक दिल्याने विरेश सोनवणे हे जागीच ठार झाले. मयत विरेश सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षांचा मुलगा, आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. याबाबत देवळा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूमाफियांकडून तलाठ्यास मारहाण

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा तालुक्यातील लोहोणेर-ठेंगोडा गावालगत गिरणा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी गुरुवारी पहाटे भरारी पथकातील लोहोणेर येथील तलाठी अंबादास रामदास पुरकर यांना जबर मारहाण केली. त्यांच्या डोक्याला व छातीला मार लागला असल्याने देवळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अवैध वाळू उपसा करणाऱ्या व तलाठ्यांना मारहाण करणाऱ्या वाळूमाफियांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नाशिक जिल्हा तलाठी संघाच्या वतीने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

गुरुवारी सकाळी सहा वाजता तालुक्यातील गिरणा नदीपात्रात होत असलेल्या अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी लोहोणेरचे तलाठी अंबादास पुरकर,नरवडे व लहानगे तहसीलदारांच्या वाहनाने नदीपात्रात गेले होते. सटाणा व ठेंगोडा तेथील १५ ते २० वाळूमाफियांनी तलाठी अंबादास पुरकर यांना जबर मारहाण केली. हा वाळूमाफियांच्या गराडा बघून अन्य दोन्ही तलाठी पळून गेल्याने ते मारहाणीतून वाचले. मात्र पुरकर वाळूमाफियांच्या गराड्यात सापडल्याने त्यांना जबर मारहाण करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सुखांना तिलांजली अपरिहार्य’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सामाजिक काम करताना स्वत:च्या वैयक्तिक सुखांना तिलांजली देणे अपरिहार्य आहे, हे ध्यानी ठेवणे महत्त्वाचे आहे, अशी भावना 'महान' संस्थेचे सर्वेसर्वा तथा मेळघाटात सामाजिक कार्य करणारे डॉ. आशिष सातव यांनी व्यक्त केली.

आदिवासी समाज हा अंधश्रद्धेमुळे डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेत नाही, असे सहज बोलले जाते. परंतु, आदिवासी भागांमध्ये परिस्थिती वेगळी असून, त्यांच्यापुढील सामाजिक प्रश्न डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेण्यापेक्षा कित्येक पटींनी मोठे आहेत. त्यामुळे मातामृत्यू, बालमृत्यू, कुपोषण याचे प्रमाण अतिशय चिंताजनक असून, त्यांच्यासाठी प्राधान्याने काम करण्याची गरज आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात गुरुवारी नीलवसंत मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटर या सामाजिक संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या डॉ. वसंतराव पवार स्मृती पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळघाटातील आदिवासींसाठी आपले आयुष्य वेचलेल्या डॉ. आशिष सातव आणि डॉ. कविता सातव या दाम्पत्याला यंदा या पुरस्काराने गौरविण्यात आले. योगदान समितीचे अध्यक्ष शंकरराव कोल्हे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. सातव बोलत होते. डॉ. सातव म्हणाले, की मेळघाटात ८० टक्के जनता आदिवासी आहे. त्यातील ९० टक्के दारिद्र्यरेषेखालील असून, झोपडीत राहतात. येथील प्रश्न सरकारच्या समोर आणून देण्याचा प्रयत्न अनेक वेळा केला. मात्र, यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी विविध समस्या आमच्यापुढे त्याबदल्यात उभ्या केल्या. आज मात्र परिस्थिती बदलली असून, कुपोषणासाठी आमच्या सर्वेक्षणांचा आधार घेतला जात आहे. महात्मा गांधींनी दिलेली शिकवण या कामात मोलाची ठरल्याचेही ते म्हणाले. डॉ. कविता सातव यांनी मेळघाटात काम करताना आलेले अनुभव कथन केले.

वनाधिपती डॉ. विनायकदादा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते. जोपर्यंत भारतात स्वयंसेवीवृत्ती जपली जात आहे, तोपर्यंत भारताचे भवितव्य चांगले असून, देशाला काहीही अडचण येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलनाने करण्यात आला. त्यानंतर प्रशांत महाबळ व त्यांच्या संचाने स्वागतगीत सादर केले. यावेळी मविप्र संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, नीलवसंत फाऊंडेशनच्या डॉ. प्राची पवार, डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी, के. के. वाघ संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, रंजना पाटील आदी उपस्थित होते. डॉ. अविनाश आंधळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रमेश मंत्री यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वंदे मातरमने कार्यक्रमाचा समारोप झाला.

- -

\Bपुरस्काराची रक्कम कुपोषितांसाठी\B

मानपत्र, सन्मानचिन्ह आणि एक लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ही सर्व रक्कम मेळघाटातील कुपोषितांसाठी खर्च केली जाईल, असे डॉ. सातव दाम्पत्याने यावेळी जाहीर केले. डॉ. वसंतराव पवार यांना हीच खरी आदरांजली असेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन पुस्तकांचे सोमवारी प्रकाशन

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सुरेखा बोऱ्हाडे लिखित 'बालक पालक' आणि 'लाडकी लेक' या पुस्तकांचा प्रकाशन सोमवारी (दि. १५) सायंकाळी साडेपाच वाजता 'मविप्र'च्या सीएमसीएस महाविद्यालय, उदोजी मराठा बोर्डिंग कॅम्पस, प्रसाद सर्कल, गंगापूर रोड येथे होणार आहे.

माजी मंत्री वनाधिपती विनायकदादा पाटील, ज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने, ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले यांच्या हस्ते हा प्रकाशन समारंभ होणार आहे. 'मविप्र'च्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा प्रकाशन समारंभ होणार आहे. सुरेखा बोऱ्हाडे यांनी या पुस्तकातून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी करावयाचे संस्कार तसेच मुले आणि पालक यांच्यातील सहजसुंदर संवाद मांडला आहे. तर 'लाडकी लेक'या पुस्तकातून मुलींशी पालकांचा हस-खेळत सुसंवाद मांडला आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन 'संवाद', नाशिक आणि 'आम्ही निफाडकर फाउंडेशन'च्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आनापान शिबीर रविवारी

0
0

आनापान शिबीर रविवारी

नाशिक : किशोरवयीन मुला-मुलींसाठी रविवार (दि. १४) कॉलेजरोडवरील द झोन, बिग बाझारच्या वर एक दिवसीय आनापान ध्यान शिबिर होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणाऱ्या या शिबिरात ११ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रवेशासाठी नोंदणी आवश्यक आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आपली नावे ९४२३२६६६९९ या मोबाइल नंबरवर नोंदवावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थ्रोबॉल स्पर्धेसाठी ‘डे केअर’ची निवड

0
0

थ्रोबॉल स्पर्धेसाठी

'डे केअर'ची निवड

नाशिक : राज्य सरकारच्या जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय थ्रोबाँल स्पर्धेत डे केअर सेंटर शाळेची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत ३५ शालेय संघांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेत १४ वर्षे मुलींच्या आणि १७ वर्षे मुलांच्या गटात डे केअर सेंटर शाळा प्रथम येत दुहेरी मुकुटाचा मान पटकावला आहे. दोन्ही संघ जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. सहभागी खेळाडू विद्यार्थी व क्रीडा शिक्षक बाळासाहेब रणशूर यांना पुढील लढतीसाठी शुभेच्छा देत अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालिकेचा रंगकर्मींना ठेंगा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी अभियानांतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या दरवाढीबाबत दिलासा मिळावा या मागणीसाठी महापालिकेचे उंबरठे झिजविणाऱ्या रंगकर्मींच्या पदरी अखेर निराशाच पडली आहे. स्थायी समितीने अल्पसा दिलासा देत, मंजूर केलेल्या भाडेवाढीच्या ठरावाचीच अंमलबजावणी प्रशासनाने सुरू केली असून, भाडे दरपत्रकासह नियमावली अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे भाडेवाढीच्या वादावर आता तूर्तास पडदा पडला असून, वाढीव दरांनुसारच रंगकर्मींना कालिदास कलामंदिराचा वापर करावा लागणार आहे. वाढीवर भाडेशुल्कात कपात करण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या रंगकर्मींच्या लढ्याला अखेर अपयश आले आहे.

शहरातील सांस्कृतिक व नाट्य चळवळीचे केंद्र असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीवरून महापालिका प्रशासन आणि रंगकर्मींमध्ये वाद सुरू आहेत. सध्या वादळ उठले आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत कालिदास कलामंदिराच्या नूतनीकरणासाठी साडेनऊ कोटींचा खर्च केला आहे. या कलामंदिराच्या देखभाल दुरुस्तीचा खर्च वसूल करण्यासाठी प्रशासनाने कलामंदिराच्या भाडेदरात पाच पटींपर्यंत भाडेवाढीचा प्रस्तावाला रंगकर्मींनी विरोध दर्शवला होता. नवीन भाडे हे सहा ते ३९ हजारांपर्यंत जाणार असल्याने कलावंतांनी थेट आंदोलनाचे हत्यार उपसले होते. भाजप वगळता सर्व पक्षांनी या भाडेवाढीला विरोध केला होता. वाढता दबाव लक्षात घेता सत्तारूढ भाजपने नमते घेत भाडेदरात कपात करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, स्थायी समितीच्या पटलावर हा प्रस्ताव गेल्यानंतर स्थायी समितीने भाडेदरात अल्पसा दिलासा देत प्रशासनाच्या भूमिकेला मूकसंमती दिली होती. स्थायी समितीकडून भाडेदरात मोठी कपात अपेक्षित असताना समितीने दरात गोलमाल करीत, दराचा रेशो साडेचार हजार ते २९ हजारांपर्यंत आणला होता. वाढीव पाचपट दर हे चौपटपर्यंत खाली आणले होते. शिवाय, दरवर्षी पाच टक्के वाढ करण्यासही मंजुरी दिली. यासंदर्भातील ठरावदेखील प्रशासनाकडे सत्वर पाठविण्यात आला. यामुळे निराशा झालेल्या रंगकर्मींनी भाडेदरात आणखी कपात करण्यासाठी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके-आहेर यांची भेट घेत दर आणखी कपात करण्याची मागणी केली. परंतु, ठराव प्रशासनाकडे पोहोचला असल्याने रंगकर्मींना आश्वासन देण्यापलीकडे स्थायी सभापतींच्या हाती काही शिल्लक राहिले नव्हते. दुसरीकडे स्थायी समितीचा ठराव प्राप्त होताच प्रशासनाने ठरावातील मंजूर दरांनुसार कालिदास कलामंदिरासाठी दरपत्रक अंतिम केले आहे. त्यामुळे रंगकर्मींना पालिकेने ठेंगा दाखवल्याची चर्चा आहे.

नियमावली जाहीर

पालिकेने कालिदास कलामंदिरासह महात्मा फुले कलादालनाच्या वापराबाबत नियमावलीही तयार केली आहे. त्यानुसार कालिदास कलामंदिरासाठी आता बुकिंगची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. यामुळे एकगट्ठा बुकींगचे राजकारण बंद होणार आहे. प्रशासनाने या आदेशाची अंमलबजावणी सुरू केल्याने महापालिकेत ठराव पास होऊन पालिकेच्या पायऱ्या झिजविणाऱ्या रंगकर्मींच्या पदरी मोठी निराशा पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोसावी कॉलेजच्या खेळडूंची राज्यपातळीवर निवड

0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र यांच्या वतीने झालेल्या विविध क्रीडा स्पर्धांमध्ये डॉ. एम. एस. गोसावी कॉलेजच्या खेळाडूंची राज्यपातळीवर निवड झाली आहे. सन २०१८-२०१९ मध्ये विविध पातळीवर झालेल्या स्पर्धेंत सर डॉ. एम. एस. गोसावी ज्यु. कॉलेजमधील खेळाडूंनी जिल्हास्तरीय व विभागीय पातळीवर यश संपादन केले. २६ सप्टेंबर रोजी विभागीय क्रीडा संकूल येथे झालेल्या १९ वर्षाआतील विभागीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत विशाल बिस्ट याने प्राविण्य संपादन केले. २१ ते २४ ऑक्टोबर रोजी विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट डेरवण ( चिपळूण) या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेंसाठी त्याची निवड झाली. ४ ऑक्टोबर रोजी विभागीय क्रीडा संकूल ,पंचवटी येथे झालेल्या १९ वर्षाआतील जिम्नॅस्टीक स्पर्धेत कल्याणी सातपुते हीने उत्कृष्ठ कामगिरी करीत यश संपादन केले. तिची सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय जिम्नॅस्टीक स्पर्धेंसाठी निवड झाली आहे. ८ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रीडा संकूल, धुळे या ठिकाणी झालेल्या १७ वर्षाआतील विभागीय शालेय मैदानी स्पर्धेत अमेरा शाह या खेळाडूने थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. १३ ऑक्टोबरपासून सातारा येथे सुरू होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. किक बॉक्सिंग मध्ये मिहीर कुमावत या खेळाडूने जिल्हास्तरीय शालेय १९ वर्षाआतील किकबॉक्सिंग स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार उपप्राचार्य प्रा. अशोक पवार यांच्या हस्ते गुच्छ देवून करण्यात आला. राज्यपातळीवर निवड झालेल्या खेळाडूंना मान्यवरांनी राज्यस्तरीय शालेय स्पर्धेंसाठी शुभेच्छा दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिपोर्ट कार्डने धडकी!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार आणि खासदारांच्या चार वर्षांतील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड आमदारांच्या हाती ठेवल्यानंतर नाशिकमधील तीनही आमदारांच्या कामगिरीकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. नाशिकच्या तीनपैकी दोन आमदारांचे रिपोर्ट कार्ड समाधानकारक नसल्याचा दावा भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून केला जात असून, ते दोन आमदार कोण, याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगत आहे.

विकासाऐवजी आपसातील संघर्ष या आमदारांना महागात पडला असून, पक्षाकडून पर्यायी उमेदवारांचा शोध घेण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे रिपोर्ट कार्डने आमदारांमध्ये धडकी भरवली असून, अन्य पक्षांतर्गत इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्यासाठी ताकद पणाला लावली आहे. त्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक जिल्ह्यातील विकासकामांच्या आढावा घेण्याचा सपाटा सुरू केला आहे. सोबतच पक्षाच्या १२१ आमदारांसह राज्यातील १६ खासदारांच्या कामगिरीचाही सर्वे केला आहे. दिल्लीस्थित एका खासगी संस्थेकडून प्रत्येक मतदारसंघात जाऊन त्रयस्थपणे त्यांच्या कामगिरीचे अवलोकन करून अहवाल तयार केला आहे. या अहवालानुसार राज्यातील सहा खासदारांसह १२१ पैकी ४५ आमदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याचा दावा करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच या आमदारांच्या हातात हे रिपोर्ट कार्ड टेकवले असून, घरी जाऊन ते उघडण्याचे आदेश दिले होते. या रिपोर्ट कार्डमुळे भाजपच्या आमदारांमध्ये 'कही खुशीं कहीं गम' अशी स्थिती आहे. नाशिकमध्ये शहरात भाजपचे तीन आमदार आहेत. या तीनही आमदारांचे रिपोर्ट कार्ड त्यांना प्राप्त झाले असून, तिघांपैकी दोन आमदारांची कामगिरी समाधानकारक नसल्याची चर्चा पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. नाशिकमधील तीन आमदारांपैकी एक आमदार काठावर पास झाले असून, दोन आमदार मात्र ४० ते ४५ टक्क्यांच्या दरम्यान असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे 'डेंजर झोन'मध्ये आलेल्या दोन्ही आमदारांची धाकधूक वाढली असून, यावर आता पर्याय काय शोधायचा या विवंचनेत ते आहेत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमध्ये आमदारांच्या या रिपोर्ड कार्डची चर्चा असून, त्यांना पर्याय कोण, असा विचार पक्षातील नेत्यांमध्ये सुरू झाला आहे. रिपोर्ट कार्डात 'नापास' असलेल्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असलेल्या अन्य पक्षांतर्गत विरोधकांसाठी हे रिपोर्ट कार्ड मोठे आधार ठरणार आहे. त्यामुळे या विरोधकांकडून आता हे रिपोर्ट कार्ड जाहीर होण्याची वाट पाहिली जात आहे.

--

पक्षांतर्गत संघर्षाचा परिणाम

शहरात भाजपचे तीन आमदार असले, तरी या आमदारांचे एकमेकांशी पटत नाही. महापालिकेतील वर्चस्वावरून या आमदारांमध्ये सत्तास्पर्धा असून, या स्पर्धेतून निर्माण होणाऱ्या भांडणामुळे भाजपची प्रतिमा दिवसेंदिवस मलीन होत आहे. महापालिकेत सुरू असलेल्या मुंढे विरुद्ध भाजप वादाचे परिणाम या रिपोर्ट कार्डमध्येही उमटले असल्याची चर्चा असून, त्याचाही फटका भाजपसह आमदारांना बसणार आहे. आपसातील वाद आणि संघर्षामुळे नाशिकमध्ये भाजपचे मोठे नुकसान होत असून, त्यामुळे दोन आमदारांचे काम चांगले असूनही त्यांना 'डेंजर झोन'मध्ये जावे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images