Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बनावट सोन्याची विक्री करणाऱ्या तिघांना अटक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

खोदकाम करताना सोने सापडल्याचे सांगून बनावट सोन्याची विक्री करून फसवणूक करणाऱ्या टोळीला आडगाव पोलिसांनी पकडले. आडगाव शिवारात ही टोळी शुक्रवारी (दि. १२) रोजी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. आडगाव पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावर सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले. बनावट सोन्याची विक्री करणाऱ्या या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

उपनगर येथे राहणाऱ्या एका व्यक्तीला बुधवारी (दि. १०) रोजी खोदकाम करीत असताना सोने सापडले आहे. ते सोने २० हजार रुपये तोळे या दरात विक्री करायचे आहे असे लाला किसन सोलंकी (वय ४२, रा. अहमदाबाद, गुजरात), दिलीप अशोक चव्हाण (वय २३) व सुभाष चैतराम मोहिते (३४) दोघे (रा. आडगाव शिवार) यांनी सांगितले. तेव्हा त्या व्यक्तीने सोने दाखविण्यास सांगितल्यावर सोन्याच्या माळेतील एक मणी त्या देण्यात आला. त्या व्यक्तीने सोन्याचा भाव जास्त असल्याचे सांगितल्यावर १५ हजार रुपये तोळा या प्रमाणे भाव ठरविण्यात आला. शुक्रवारी (दि. १२) रोजी सोने खरेदी-विक्री करण्याचे ठरले.

संशयित ठरल्यानुसार मुंबई-आग्रा महामार्गावरील ९ वा मैल परिसरात येणार असल्याची माहिती आडगाव पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बिजली यांना मिळाली. त्यांनी या ठिकाणी पोलिस उपनिरीक्षक दिनेश मुळे, योगिता जाधव, हवालदार मुनीर काझी, विजय सूर्यवंशी, विनोद लखन, दशरथ पागी, दत्तू खुळे, किरण निकम, वैभव खांडेकर, रोहिणी साबळे यांच्या पथकाचा सापळा रचला. संशयित टिव्हीएस अपाचे (एम एच १५, सी एफ ६७७२) या दुचाकीवरून तेथे आले असता पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले. त्यांच्याकडून दोन किलो सोने हस्तगत करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पॉइंटर्स

$
0
0

सद्गग्रंथांचे अध्ययन हीच सत्संगती -२

नगरसेवकांचा प्रश्नांचा भडिमार -३

नको तुमची नेतेगिरी! -४

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिंडोरी येथे शेतकरी आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी तालुक्यातील चाचडगाव येथे पुरुषोत्तम विजय गांगोडे (वय २७) या तरुण शेतकऱ्याने शुक्रवारी (दि. १२) आत्महत्या केली. आतापर्यंत ७९ जणांनी जीवनयात्रा संपविली असून, या घटनांची आढावा बैठक सोमवारी (दि. ५) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बोलावण्यात आली आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी, बँकांचा तगादा यासह अन्य अनेक कारणांस्तव शेतकरी मृत्यूला कवटाळतात. अशा घटनांत सरकारी मदतीसाठी पात्र आणि अपात्र लाभार्थी ठरविण्यासाठी सोमवारी बैठक होणार आहे. बैठकीत ३० प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल कंपनीला दणका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोबाइल हँडसेटमध्ये तांत्रिक दोष आढळल्यास त्यातून होणारा मन:स्ताप नवा नाही. ग्राहकांना यातून फसवले जात असल्याच्याही तक्रारी वाढत असतानाच एका ग्राहकाला मात्र ग्राहक न्यायमंचाच्या निकालाने दिलासा मिळाला आहे.

न्यायमंचाने या निकालात मोबाइल कंपनीला ग्राहकास नवीन हँडसेट देण्याचे आदेश दिले असून, शक्य नसल्यास हँडसेटचे ६ हजार १९९ रुपये व्याजासह देण्याचे निर्देशही दिले आहेत. त्याचप्रमाणे मानसिक त्रासापोटी पाच हजार व अर्ज खर्चापोटी तीन हजार रुपयांचा दंडदेखील ठोठावला आहे. त्यामुळे कंपनीला ग्राहकाकडे दुर्लक्ष करणे चांगलेच महागात पडले आहे.

पंचवटी येथे राहणाऱ्या संगीता पुंडलिक साळवे यांनी मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्स कंपनीविरोधात जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात तक्रार दाखल केल्यानंतर हा निकाल देण्यात आला आहे. साळवे यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंग साइटवरून मायक्रोमॅक्स इन्फॉर्मेटिक्स कंपनीचा मोबाइल हँडसेट खरेदी केला. सदर हँडसेटमध्ये तांत्रिक बिघाड होऊन त्यातील सर्व डाटा दिसेनासा होऊन हँडसेट वापरात अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे तो सर्व्हिस सेंटरकडे दिला. पण, त्यात तांत्रिक दोष असल्याने त्यांनी तो कंपनीकडे दुरुस्तीस पाठवला. दहा दिवसांत तो मिळेल असे सांगण्यात आले. पण, त्यानंतर अनेक वेळा हँडसेट मिळावा म्हणून संपर्क साधला. वकिलांमार्फत नोटीस देऊनही उपयोग झाला नाही. शेवटी हा हँडसेट दोन महिन्यांनंतर देण्यात आला. पण, तो पूर्णपणे खराब होता. त्याबद्दल विचारल्यानंतर कंपनीने असा पाठवला, असे सर्व्हिस सेंटरकडून सांगण्यात आले. यासंदर्भात ग्राहक न्यायमंचाने दोन्ही बाजू ऐकल्यानंतर उत्पादित दोष असलेला हँडसेट कंपनीने विक्री करून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करून सेवा देण्यास कमतरता केली, असा ठपका ठेवून न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे, सचिन शिंपी यांनी वरील निकाल दिला. साळवे यांच्यातर्फे अॅड. आर. एस. गायकवाड यांनी युक्तिवाद केला.

-----------------------

(((((((( यावेळी हेल्पलाईनवर संपर्क साधा असे सांगितले. हेल्पलाईनवर संपर्क केल्यानंतरही आश्वासन व्यतिरिक्त काही मिळाले नाही. याबाबत कंपनीच्या सर्व्हिस सेंटरकडून सांगण्यात आले की, मोबाईच्या मदरबोर्डचा प्रॉब्लेम होता. त्यानंतर तो कंपनीने बदलून दिला. त्यानंतर पुन्हा दुरुस्तीला टाकल्यानंतर पुन्हा मदरबोर्ड बदलून देण्यात आला. पण, साळवे यांना नवीन हॅण्डसेट हवा होता. तो देण्यास कंपनीने नकार दिला. त्यामुळे सेवा देण्यास कोणती कमतरता केली नाही. कंपनीतर्फे मात्र कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे त्यांच्या जबाबविना या तक्रारीवर सुनावणी करण्यात आली.)))))))

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

गेल्या तीन दिवसांपासून सातपूर भागात अपघाताची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी सातपूर औद्योगिक वसाहतीत ट्रकच्या धडकेने कामगार तरुणाचा मृत्यू झाला. योगेश कैलास मोंढे (वय २१, रा. देवरगाव) असे मृताचे नाव आहे. सातपूर पोलिसांनी ट्रकसह चालकास ताब्यात घेतले आहे.

सातपूर औद्योगिक वसाहतीतील नाईस भागात कृषभ त्रिशाला कंपनीच्या समोरील वळणावर ट्रकने दुचाकीचालकास जोरदार धडक दिली. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने योगेश मोंढे हा दुचाकीचालक गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी रवींद्र मोंढे यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मसगा’त स्टार्टअप यात्रेचा प्रचार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

योग मंत्रालय, भारत सरकार व महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी तसेच कौशल्य विकास रोजगार विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ३ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत 'महाराष्ट्र टार्टअप यात्रा'चे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालयात दाखल झाली होती.

भारत सरकारचे अधिकारी करणसिंग यांनी स्टार्टअप उपक्रम, नउद्योजक त्यांच्या यशोगाथा याविषयी माहिती दिली. यामध्ये महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा बुट कॅम्पसाठी १०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. सदर यात्रेचे बूट कॅम्प राज्यात १४ ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये कोणतेही विद्यार्थी व भारी उद्योजक उपस्थित राहून आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पना सादरीकरण करू शकतील. यामध्ये निवड होणाऱ्या ३ ते ५ स्पर्धकांना नागपूर येथे २१ व २२ नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात येईल. ३ नोव्हेंबर रोजी महाअंतिम फेरी हाईल. यात निवड होणाऱ्या ९ उद्योजकांना रोख पारितोषिक प्राप्त झाले आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डा. वाय. टी. पवार यांनी करनसिंग, संपत चाटे, प्रदीप गावित यांचा सत्कार केला. सदर कार्यक्रमाचे आयोजन एन. सी. सी विभागाचे कॅप्टन आर. ए. पवार व लेफ्टनंट भाग्यश्री वाघमारे, एनसीसीचे विद्यार्थी यांनी केले. याप्रसंगी वरीष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सी. एम. निकम, डॉ. पी. ए. अहिरे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सत्कार्माचा मार्ग स्विकारा

$
0
0

फोटो - सतीश काळे

'सत्कर्माचा मार्ग स्वीकारा'

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्या जीवनाला सार्थ करण्यासाठी प्रत्येकाने सत्कर्माचा मार्ग स्वीकारायला हवा. जीवनाला अंत आहे त्यामुळे प्रत्येकक्षण लाख मोलाचा आहे, हे सर्वांनी कायम लक्षात ठेवावे. आपल्या कार्यातून दुसरी व्यक्ती दुखावली जाणार नाही याची काळजी घ्यावी. लोभ, मत्सर, द्वेष, क्रोध यांना बाजूला सारत गौतम बुध्दांच्या शिकवणीनुसार सत्कर्म करावेत, असे निरूपण भदन्ते ज्ञानज्योती यांनी केले.

गोल्फ क्लब मैदानात होत असलेल्या मेळाव्यात श्रामणेरांना भदत्ने ज्ञानज्योती, शीलरत्न, धम्मरत्न, अभयपुत्र, कौटीण्य आणि संघरत्न बौद्ध धर्मातील तत्वांची माहिती व शिकवण देत आहे. शनिवारी सकाळच्या सत्रात श्रामणेरांना विपश्येचे महत्त्व सांगण्यात आले. दुपारच्या सत्रात श्रामणेरांनी वंदना सूत्रपठण केले. त्यावेळी भदत्ने म्हणाले, की समाजकल्याणासाठी प्रत्येकाने कार्य करायला हवे. आपले जीवन मर्यादीत आहे. मरणोत्तर आपले कार्य उल्लेखले जावे यासाठी सत्कर्म करणे गरजेचे आहे. शांतता आणि सन्मार्ग यांचा पुरस्कार प्रत्येकाने करा, असे निरुपण भदन्ते यांनी केले. आज (१४ ऑक्टोबर) रोजी शहरात श्रामणेरांची भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रियंका, साक्षी, ईश्वरीराज्याच्या क्रिकेट संघात

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बीसीसीआयच्या वतीने ओडिशा राज्यातील कटक येथे रविवारपासून १९ वर्षांखालील मुलींची टी-२० क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाकडून नाशिकच्या तीन महिला खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. त्यात प्रियंका घोडके, साक्षी कानडी व ईश्वरी सावकार यांचा समावेश आहे.

प्रियंका घोडके मूळची सिन्नर येथील असून, यापूर्वी प्रियंका व साक्षी यांनी महाराष्ट्राच्या १६ व १९ वर्षांखालील महिला संघात प्रतिनिधित्व केले आहे. ईश्वरीने यापूर्वी १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघात प्रतिनिधित्व केले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने गोल्फ क्लब मैदानावर प्रशिक्षक भावना गवळी व सुनील मालुसरे यांनी या खेळाडूंना क्रिकेटचे प्रशिक्षण दिले आहे. असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे आदींनी या खेळाडूंचा गौरव केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘मसाप’च्या शाखेतर्फे उद्या गुणगौरव सोहळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नाशिकरोड शाखेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येणार आहे. मार्च २०१८च्या राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात, प्रत्येक विद्यालयात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव केला जाणार आहे. याचबरोबर परिसरातील सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचा देखील सन्मान केला जाणार आहे.

नाशिक तालुक्यातील लहवितपासून सैय्यद पिंप्रीपर्यंतच्या सर्व शाळा यात सहभागी होणार आहेत. हा समारंभ सोमवारी (दि. १५) सायंकाळी ४ वाजता जेलरोड येथील राजराजेश्वरी मंगल कार्यालयात होणार आहे. यंदा ७४ विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्याध्यक्ष उन्मेष गायधनी, उपाध्यक्ष दत्ता गायकवाड, प्रसाद पवार, रवींद्र मालुंजकर आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काकाणीत ग्रंथप्रदर्शन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी सोमवारी १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनानिमित्त येथील प. बा. काकाणी नगर वाचनालयात बालसाहित्य प्रदर्शन आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

सकाळी १० वाजता बालसाहित्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. हे प्रदर्शन दोन दिवस ठेवले जाईल. विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवरची मनोरंजक आणि माहितीपूर्ण पुस्तके यात पाहावयास मिळतील. प्रदर्शन सर्व विद्यार्थ्यांसाठी मोफत आहे. यावर्षी प्रथमच 'वाचनाध्यास' हा नवीन उपक्रम आयोजित केला असून, वाचनालयाच्या वेळेत तेथे बसून वाचकांना आपल्या आवडीचे कोणतेही पुस्तक वाचता येईल. या उपक्रमात भाग घेणाऱ्या वाचकांना अल्पोहारही देण्यात येणार आहे. वाचनालयात नियमित येणाऱ्या व विविध विषयांवरील पुस्तके वाचणाऱ्या नियमित व चोखंदळ वाचकांचा सत्कारही या निमित्त आयोजित करण्यात आला आहे. सर्व कार्यक्रमांसाठी रसिक, वाचक आणि विद्यार्थ्यांनी सकाळी १० वाजता वाचनालय सभागृहात उपस्थित राहावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष अजय शाह व सर्वश्री प्रदीप कापडिया, अॅड. उदय कुलकर्णी, मिलिंद गवांदे, सुरेंद्र टिपरे, रविराज सोनार,पुरुषोत्तम तापडे आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तडीपार संशयितास अटक

$
0
0

नाशिक : शहर व जिल्ह्यातून तडीपार केलेले असताना विनापरवानगी शहरात आलेल्या पंचवटीतील तडीपार संशयितास क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. गणेश गौतम गायकवाड ऊर्फ पटल्या (२०, रा. अवधूतवाडी, फुलेनगर, पंचवटी) असे संशयिताचे नाव आहे. परिमंडळ एकच्या पोलिस उपायुक्तांनी १५ जुलै २०१७ रोजी संशयित पटल्या यास शहर व जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले होते. मात्र, तो शनिवारी रात्री ९ वाजता दिंडोरी रोडवरील वज्रेश्‍वरी झोपडपट्टीजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयाजवळ आला असल्याची माहिती युनिट एकच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयोगाने ऐकल्या अल्पसंख्यांकांच्या तक्रारी

$
0
0

अल्पसंख्यांक आयोगाने

ऐकल्या शिक्षकांच्या तक्रारी

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

'शिक्षणाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय आम्हाला अचानक कामावरून कमी करण्यात आले. इतकेच नव्हे; तर फेब्रुवारी २०१८ पासून आमचे वेतनही संस्थेने दिलेले नाही. संस्थेची ही भूमिका नियमबाह्य असून, आम्ही जगायचे कसे', असा सवाल जळगावातील ७ अल्पसंख्यांक शिक्षकांनी अल्पसंख्यांक आयोगासमोर उपस्थित केला. यावर आयोगाच्या पदाधिकाऱ्यांना अन्यायग्रस्त शिक्षकांचे गाऱ्हाणे ऐकूण घेत त्यांचा पगार सुरू करण्याच्या आणि या प्रकरणी योग्य ती चौकशी करून आयोगास अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या.

निमित्त होते शासकीय विश्रामगृहावर अल्पसंख्यांक आयोगाचे उपाध्यक्ष जगन्नाथ अभ्यंकर यांच्या दौऱ्याचे. यावेळी त्यांनी अल्पसंख्यांक घटकांशी संवाद साधत त्यांच्या विविध तक्रारी समजून घेतल्या. संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. अल्पसंख्यांक घटकांकडून काही संस्थांसंदर्भात भ्रष्टाचारासह शासनाच्या विविध योजनाच्या लाभासंबंधीही काही अडचणी नागरिकांनी मांडल्या. अल्पसंख्यांक समाजातील विविध व्यक्ती, संघटना, पदाधिकारी, योजनांचे लाभार्थी यांच्याशी संवाद साधून त्यांनी आढावा घेतला. यानंतर त्यांनी अल्पसंख्यांक समुदायाच्या शिक्षकांच्या मेळाव्यास उपस्थित राहत त्यांच्या समस्या समजावून घेतल्या. शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव आणि जिल्हा परिषद, महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांशीही संवाद साधत त्यांनी अल्पसंख्यांक समुदायाकडून शिक्षणासंदर्भात येणाऱ्या अडचणींवर त्वरीत उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज दसरा मेळावा

$
0
0

\Bआज दसरा मेळावा\B

नाशिक : अखिल भारतीय प्रबोधन संस्था वैद्यकीय आघाडीतर्फे डॉक्टरांचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आज, रविवारी (१४ ऑक्टोबर) रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत मुंबई नाका येथील नवीन नगरकर हॉस्पिटलमधील रुद्र ऑडिटोरिअममध्ये हा मेळावा होणार आहे. डॉ. गिरीश बदरके, डॉ. चैतन्य बोराडे, डॉ. निलेश वसेकर, डॉ. पालवे, डॉ. प्रकाश पंडित या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर हा समाजातील एक प्रमुख घटक असून प्रबोधनयुक्त विकासाच्या वाटचालीसाठी त्यांना एकत्रित आणण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉटेल्स, कॅफे रडारवर

$
0
0

'वॉक विथ कमिशनर'मध्ये आयुक्तांचे कारवाईचे निर्देश

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोड परिसरातील हॉटेल्स, कॅफे, शाळा आणि कॉलेजेससाठी पार्किंगची पुरेशी सुविधा नाही. काही हॉटेल्स व कॅफे रस्त्यापर्यंत टेबल लावतात. या समस्यांसह अतिक्रमणावर कारवाई करा, अशी मागणी नागरिकांनी शनिवारी 'वॉक विथ कमिशनर' या उपक्रमात केली. या हॉटेल्स, कॅफे आणि शाळा-कॉलेजेसला पार्किंगसंदर्भात नोटिसा द्या, नोटीस देऊनही पार्किंगची समस्या कायम राहिल्यास कारवाई करा, असे निर्देश महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

महापालिका आयुक्त मुंढे यांचा 'वॉक विथ कमिशनर' हा उपक्रम प्रभाग क्रमांक ७ मध्ये घेण्यात आला. गंगापूर रोड येथील आकाशवाणी केंद्राजवळील समर्थ जॉगिंग ट्रॅकवर हा उपक्रम आयोजित केला होता. त्यावेळी मुंढे जॉगिंग ट्रॅकवर येताच नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचण्यास सुरुवात केली. नागरिकांनी सर्वाधिक समस्या हॉटेल, खाद्यपदार्थांच्या गाड्या व कॅफेसंदर्भात मांडल्या. त्या सोबतच परिसरातील रस्त्यांची दुर्दशा, ड्रेनेज समस्या, पाणीपुरवठा यासंदर्भात तक्रारींचा पाढाच वाचला. यावर आयुक्त मुंढे म्हणाले, की प्रत्येकाच्या समस्यांचे निराकरण होईल. पण, नागरिक म्हणून तुमचेदेखील कर्तव्य आहे. समस्यांना वाचा फोडण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. महापालिकेच्या कार्यासंदर्भात कोणतीही तक्रार असल्यास ऑनलाइन स्वरुपात नोंदवा. त्याची दखल नक्कीच घेतली जाते.

हॉटेल्स व कॅफेंचे अतिक्रमण आणि पार्किंगच्या समस्येवर मुंढे म्हणाले की, महापालिका या हॉटेल्स व कॅफेवर कारवाई करेल. पण, नागरिकांनी देखील रस्त्यावर चुकीच्या पध्दतीने वाहने पार्क करू नयेत. नवरात्रोत्सवात लॉन्समधील गरबा नाइट्सचा आवाजा त्रासदायक ठरतो, अशी तक्रार काही नागरिकांनी केली. संध्याकाळपर्यंत लॉन्स व आयोजकांना समज द्या, आवाज व पार्किंगची समस्या न सुटल्यास कारवाई करा, अशी सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना केली.

..

\Bशेतकऱ्यांच्या खासगी जमिनींवर कर का?

\Bखासगी जागांवर कारवाई करण्याचा महापालिकेला अधिकार नाही, असं तुम्ही म्हणतात. मग, शेतकऱ्यांच्या जमिनीदेखील खासगी आहेत, त्यांच्यावर करवाढ का लागू करतात, असा संतप्त सवाल एका ज्येष्ठ नागरिकाने विचारला. मात्र मुंढे यांनी, तो प्रश्न वेगळा आहे, त्यावर आता चर्चा होऊ शकत नाही असे सांगत वेळे मारून नेली.

..

\Bकॉम्प्लेक्सचे काम पूर्ण करा\B

आकाशवाणी केंद्राजवळील भाजी मार्केट कॉम्प्लेक्सचे बांधकाम लवकर पूर्ण करा. बांधकाम होईपर्यंत भाजी विक्रेत्यांना रस्त्यावर बसण्याची परवानगी दिलेली नाही. रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांवर आठ दिवस सलग कारवाई करा, अशी सूचना मुंढेंनी केली. यावेळी मुंढे यांनी कॉम्प्लेक्सच्या बांधकामाची पाहणी करीत लवकरात लवकर कॉम्प्लेक्सचे काम पूर्ण करण्याची सूचना केली.

...

\Bस्विमिंग पुलावर फुली \B

गंगापूर रोड परिसरातील पाच एकर जागेवर क्रीडांगण होणार आहे. त्यासाठीची आरक्षित जागा महापालिकेच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच क्रीडांगणासाठीचे काम सुरू होईल. जॉगिंग ट्रॅक, सायकल ट्रॅक, बास्केटबॉल, स्केटिंग, हॅडबॉल यांसह इतर मैदानी खेळांसाठी हे क्रीडांगण वापरता येईल. त्यासाठीच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. पण, या क्रीडांगणात स्विमिंग पूलचा समावेश होणार नाही, असे आयुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले.

..

\B...तर पूर्ण बिल्डिंग पाडणार!

\Bआमच्या अपार्टमेंटच्या टेरेसवर एकाने बेकायदेशीर बांधकाम केले आहे. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यात यावे, अशी मागणी एका नागरिकाने केली. त्यावर मुंढे म्हणाले की, अपार्टमेंटच्या टेरेसवर अनधिकृत बांधकाम झाल्यास ते काढून घेण्याचे काम इतर रहिवाशांचे आहे. अनधिकृत बांधकाम केले जात असेल आणि त्याची तक्रार महापालिकेकडे आली तर पूर्ण बिल्डिंग पाडली जाईल, असेही त्यांनी बजावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हात धुवा दिन’ सोमवारी

$
0
0

आंतरराष्ट्रीय दिवसामुळे जिल्ह्यात कार्यक्रम

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा तसेच, अंगणवाड्यांमध्ये १५ ऑक्टोबर रोजी 'हात धुवा दिन'चे आयोजन करण्यात आले आहे. शाळांमधून स्वच्छतेची प्रतिज्ञा आणि प्रात्यक्षिके घेण्याच्या सूचना सर्व तालुक्यांच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली.

राज्यभरात स्वच्छतेविषयी लोकचळवळ निर्माण होण्यासाठी १५ ऑक्टोबर हा दिवस 'आंतरराष्ट्रीय हात धुवा दिन' म्हणून साजरा करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातही हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिनानिमित्त प्रत्येक शाळा, अंगणवाड्यांतील विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात येणार आहे. हात धुण्याचे महत्त्व यावेळी सांगण्यात येणार आहे. या उपक्रमात ग्रामपंचायत, ग्रामस्वच्छता समिती, निर्मलग्राम समिती, संपूर्ण स्वच्छता अभियान कृती दल, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, बचतगट, युवा मंडळे, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थ्यांचा सहभाग घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याची जबाबदारी प्रत्येकाने घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा संदेश घरापर्यंत पोहचविण्यासाठी जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियान अंतर्गत हात धुवा दिनाचे आयोजन करण्यात आल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नाशिकः भरधाव कारची ७ मुलांना धडक, १ ठार

$
0
0

नाशिक

नवरात्रीनिमित्त कालिका देवीच्या दर्शनासाठी निघालेल्या ७ लहान मुलांना एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली आहे. यात एका मुलाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य सहा जण जखमी झाले आहेत. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

नाशिकमधील इंदिरा नगर भागातील जॉगिंग ट्रॅकजवळ ही घटना घडली. ही सर्व मुले इंदिरानगर भागातून कालिका मंदिराकडे दर्शनासाठी जात असताना एका भरधाव आलेल्या कारने मुलांना धडक दिली. या भीषण अपघातात विशाल पवार (वय ११) या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा मुले जखमी झाली. यातील दोन मुलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एका अज्ञात कारने मुलांना धडक दिली असून यात एकाचा मृत्यू झाला आहे ही घटना समजताच मुलांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली आहे. मुलांना धडक देऊन पसार झालेल्या गाडीचा पोलीस शोध घेत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीत रंगभूमीचा उज्ज्वल भविष्यकाळ ‘देवबाभळी’

$
0
0

'देवबाभळी' संगीत नाटकाविषयीच्या संवादातील सूर

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संगीत देवबाभळी हे जमून आलेले नाटक असून, संगीत रंगभूमीचा उज्ज्वल भविष्यकाळ त्यातून दिसतो आहे. अनेकजण या नाटकाविषयी बोलतात, ज्येष्ठ रंगकर्मी हे नाटक पाहून अचंबित होतात, त्याविषयी भरभरून बोलतात. त्यामुळे हे नाटक जरी नाशिकच्या मातीतले असले तरी आज ते महाराष्ट्राने उचलून डोक्यावर घेतले आहे. संगीत रंगभूमीचा भविष्यकाळ उज्ज्वल करणारे ते नाटक आहे, असा सूर 'देवबाभळी' या नाटकाविषयीच्या संवादातून निघाला.

देवबाभळीचे लेखक प्राजक्त देशमुख, निर्माता प्रसाद कांबळी, प्रकाशयोजनाकार प्रफुल्ल दीक्षित व संगीतकार आनंद ओक यांच्याशी नाटकाविषयी संवाद साधण्यात आला. हा संवाद प्रसिद्ध नाटककार दत्ता पाटील यांनी साधला. प्राजक्तला देवबाभळीचा हा काटा कसा रूतला याविषयी विचारले असता, त्याने या नाटकाच्या जन्माची हकिकत सांगितली. तुकाराम महाराजांवर काम करण्यासाठी देहूला गेलो असता, काही सुचत गेले. तुकारामाची बायको आवलीच्या पायात घुसणारा काटा, पांडुरंगाने पाय हातात घेऊन तो काटा काढणे, त्यामुळे रखुमाईचे पांडुरंगावर नाराज होणे आणि तुकारामाचे पांडुरंगासोबत भांडण अशा चौकटी दिसल्या आणि नाटक पुढे गेले, असे सांगितले.

प्रफुल्ल दीक्षित प्रकाश योजनेविषयी म्हणाले की, हौशी ते व्यावसायिक हा प्रवास होता. दोघांमध्येही जबाबदारी असते. हौशीमध्ये लिमिटेड साहित्य वापरायला लागते तसे बंधन व्यावसायिकला नसते. संगीताविषयी बोलताना आनंद ओक म्हणाले की, संगीतातले फारसे ज्ञान नाही. परंतु, कुठे काय करायचे हे मात्र माहित आहे. संगीत काव्यात असते ते शोधून काढले पाहिजे. देवबाभळीच्या बाबतीत मी तेच केले. या नाटकाच्या निर्माणाविषयी प्रसाद कांबळी म्हणाले की, देवबाभळी मी पाहिलेले नव्हते, परंतु ऐकून होतो. प्राजक्तला दोन अंकी लिहायला लावले. त्याची वेगळीच भाषा मला भावली. पठडीला छेद देणारे काही होते, म्हणून मी ते केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेश शिक्षणाची ओबीसींनाही संधी

$
0
0

अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे मिळणार स्कॉलरशिप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींचा लाभ प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतील खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाही घेता यावा यासाठी काही दिवसांपूर्वी सरकारने अध्यादेश काढला; मात्र यात ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी तरतूद नसल्याच्या मुद्द्यावरून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे आणि इतर मागासवर्ग मंत्री प्रा. राम शिंदे यांना पत्र पाठवून हा मुद्दा मांडला होता. त्याची दखल घेत सरकारने नव्या शासननिर्णयानुसार विजाभज, इमाव व विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली आहे. या निर्णयाचा लाभ या प्रवर्गातील १० विद्यार्थ्यांना होऊ शकणार आहे.

अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व आदिवासी विभागातर्फे शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या धर्तीवर सरकारने खुल्या गटातील विद्यार्थ्यांसाठीही याच उद्देशाने ही योजना नव्या शैक्षणिक वर्षापासून सुरू केली होती. या योजनेत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश नसल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधला होते.

अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच परदेशी शिष्यवृत्तीच्या धर्तीवर खुल्या व ओबीसी प्रवर्गातील विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून ही योजना सुरू करण्याचा निर्णय २१ ऑगस्ट रोजी मंत्रिमंडळाने घेतला. दरवर्षी २० विद्यार्थ्याना या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय सरकारमार्फत घेण्यात आला. यामध्ये १० विद्यार्थी ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातून राहणार होते. मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार अनुसरून राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने चार ऑक्टोबर २०१८ रोजी गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना परदेशातील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मंजूर करण्याबाबत सरकार निर्णय जारी केला. यात आता सुधारणा करण्यात येऊन परदेशी उच्च शिक्षणासाठी इच्छूक ओबीसी वर्गातील विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळाला आहे.

शाखानिहाय असा मिळणार लाभ

विद्याशाखा... मंजूर कोटा

कला................१

वाणिज्य............१

विज्ञान..............१

व्यवस्थापन........१

विधी................१

औषधनिर्माणशास्त्र............१

अभियांत्रिकी-वस्तुकलाशास्त्र............४

एकूण........................१०

लोगो : शाळा/ कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समरसतेचा मंत्रच वर्तमानात उद्धारक

$
0
0

भैय्याजी जोशी यांचे प्रतिपादन

...

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

वर्तमानस्थितीत संकुचिततेचे मोठे आव्हान समग्र समाजाच्या पुढ्यात आहे. व्यापक आणि उदार मनोभूमिकेकडे जाण्यास सध्या समाजमन तयार नाही. या वास्तवाला सकारात्मकतेने सामोरे जाण्यासाठी हिंदुत्वाने अनुसरलेला समरसतेचा मंत्रच उद्धारक ठरेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले.

नाशिक जिल्ह्याचे माजी संघचालक कै. बाळासाहेब अहिरे यांच्या 'बिल्वदल' या स्मृतीग्रंथाचे प्रकाशन जोशी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित या सोहळ्यास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली.

जोशी पुढे म्हणाले की, 'समरसता हे आचरणात आणण्याचे तत्त्व आहे. समाजातील संकुचित मानसिकतेला भेदण्याचे कार्य महापुरुषांप्रमाणेच संघही नऊ दशकांपासून अविरत करीत आला आहे. सत्य सिद्ध करण्यासाठी बहुमताची आवश्यकता नसते, या तत्त्वावर श्रध्दा असल्याने सत्याधिष्ठीत हिंदू धर्माने कधीही धर्मांतरणासारख्या गोष्टींवर भर दिलेला नाही. सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आणि काळाशी सुसंगत असाच विचार हिंदुत्वाचे प्राचीन कालखंडापासून मांडला आहे', असे ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, बन्सी जोशी, प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, स्मृतिग्रंथ समितीचे अध्यक्ष कैलास साळुंखे उपस्थित होते. प्रचार विभागाचे प्रांत प्रमुख दिलीप क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. रवी बेडेकर यांनी वैयक्तिक गीत सादर केले. नीलिमा पवार, बन्सी जोशी, मेघा बोरसे, शीतल खोत आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

...

आहेरांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी

स्वर्गीय बाळासाहेब आहेर यांच्या समर्पित संघजीवनाबाबत जोशी यांनी गौरवोद्गार काढले. समर्पण, निष्ठा, आत्मयिता, मित्रत्व, सक्रियता आदी सद्गुणांनी त्यांचे व्यक्तिमत्व खच्चून भरलेले असल्याने प्रेरणादायी होते, असे ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकची पर्यटनस्थळे ऑनलाइन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील पर्यटनाची एकत्रित मााहिती देणाऱ्या 'www.unravelnashik.com (अनरॅवल नाशिक डॉट कॉम) या वेबसाइटचा अनावर सोहळा महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते रविवारी हॉटेल गेटवे येथे झाला. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या संकल्पनेतून या वेबसाइटची निर्मिती करण्यात आली असून, त्यात जिल्ह्यातील पर्यटनासंबधी सर्व माहिती देण्यात आली आहे.

या अनावरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर रंजना भानसी, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, महसूल आयुक्त राजाराम माने, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे, एमटीडीसीचे सहव्यवस्थापक आशुतोष राठोड यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी या वेबसाइटची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील पर्यटनाची एकत्रित माहिती या वेबसाइटमध्ये देण्यात आली आहे. यात निसर्ग, अध्यात्मिक, ऐतिहासिक व पौराणिक वारसा असलेली स्थळे, साहसी पर्यटनस्थळे, संस्कृती, वाइन, वेलनेस तसेच खाद्यसंस्कृती याचे वेगवेगळे विभाग केले असून, त्याची सखोल माहिती देण्यात आली आहे. या सोहळ्यात एमटीडीसीचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन मुंडावरे, 'तान'चे अध्यक्ष दत्ता भालेराव, 'क्रेडाई'चे अध्यक्ष उमेश वानखेडे, भूम कार्सचे रोमिल, यात्रा डॉट कॉमचे नितिका खन्ना यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पर्यटकांना घरगुती निवास पुरविणारी एअर बी. एन. बी., हॉटेल बुकिंग, यात्रा डॉट कॉम, तसेच कार सेवा देणारी झूम कार्स यांच्या सेवांचे नियोजनही या वेबसइईटवरून पर्यटकांना करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. गेले वर्षभर या वेबसाइटचे काम सुरू होते. त्यासाठी पर्यटनासाठी विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांची मदत झाली. त्यात क्रेडाई, मेट्रो, ग्रीन स्पेसेसचे संचालक तेजस चव्हाण व मुंबईच्या हायपर क्नेट कम्युनिकेशनचे किरण खडके यांनी परिश्रम घेतल्याचे राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.

वेबसाइटबरोबर टूरही हव्यात

आपल्याकडे बघण्यासाठी अनेक स्थळे असतात, पण त्यांची माहिती नसते. त्यामुळे या सर्व स्थळांची एकत्रित माहिती एका ठिकाणी मिळण्यासाठी तयार केलेली वेबसाइट महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे पर्यटनात वृद्धी होईल. या वेबसाइटबरोबरच पर्यटनाच्या विविध टूर आयोजित केल्या तर पर्यटन अधिक वाढेल, असे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. पालकमंत्री गिरीश महाजन यावेळी म्हणाले की, जगातील अनेक देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे. नाशिक जिल्ह्याला निसर्गाचे वरदान मिळाले असून, साधूसंतांच्या मते हा साक्षात स्वर्ग आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या पर्यटनासाठी येथे मोठ्या संधी आहेत. ही वेबसाइट त्यासाठी महत्त्वाची असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. या वेबसाइटवर माहिती एकाच ठिकाणी असल्यामुळे ती पर्यटकांना उपयुक्त ठरेल. सप्तशृंगी गडावरील ट्रॉलीच्या सुविधेनंतर ब्रह्मगिरीवरही लवकरच रोप वे होणार असून, त्र्यंबकश्वरच्या विकासासाठी भरपूर निधी मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. \B

\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images