Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जानेवारीत नाशिकला ‘हाफ ट्रायथलॉन’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक ही हेल्थ सिटी व्हावी यासाठी प्रयत्न असून, येत्या २७ जानेवारी रोजी नाशिकमध्ये 'हाफ ट्रायथलॉन'चे आयोजन करण्यात येणार येणार आहे. यामध्ये दोन किमी स्विमिंग, ९० किमी सायकलिंग आणि २१ किमी रनिंग यांचा समावेश असेल. यानिमित्ताने नाशिकमध्ये देश विदेशातून अनेक पर्यटक येतील, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी दिली.

अनरॅवल नाशिक डॉट कॉम या वेबसाइटच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते. फ्रान्समध्ये झालेल्या स्पर्धेत 'आयर्न मॅन' चा गौरव प्राप्त केल्यामुळे त्यांचा सत्कार यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. सिंगल यांनी सांगितले की, मी आयर्न मॅन मिळवल्यानंतर हा उपक्रम नाशिकमध्ये सुरू करण्याचा विचार आला. पण, त्यासाठी पहिल्या टप्यात आयर्नमॅन स्पर्धेत असलेल्या सर्व स्पर्धा हाफ पद्धतीने घेण्यात येणार आहेत. त्यातून अनेकांना या स्पर्धेत भाग घेता येणार आहे. गंगापूर धरणाचा परिसर या स्पर्धेसाठी निवडला असून, येथेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. , पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्यासह विविध संस्थाचा सहभाग असणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा नाशिकसाठी अनोखी असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बाजराला खरेदीने बूस्ट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रीनिमित्त बाजारात तेजी आली असून, घागऱ्यापासून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू अन् होम अॅप्लायन्सेसपासून सोने खरेदीपर्यंतच्या वस्तूंसाठी बाजारात खरेदीची धूम सुरू आहे. या स्पर्धेत ऑनलाइन कंपन्यादेखील उतरल्या असून, अनेक उत्पादनांवर ५० टक्के ते ८० टक्क्यांपर्यंत भरघोस सूट दिली जात आहे. पितृपक्षानंतर मोठ्या प्रमाणावरील खरेदीने बाजाराला जणू बूस्ट मिळाला आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ग्राहकांनी खरेदीला चांगला प्रतिसाद दिला आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या जाहिराती केल्या असून, जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वांकडून होत आहे. विविध शोरूम्स, कंपन्यांनी तरुणवर्गाला प्राध्यान्य दिल्याचे दिसून येत आहे. रेडिमेड कपड्यांच्या अनेक कंपन्यांनी भरघोस सूट देऊ केली आहे. नवरात्रीच्या नवरंगांसाठी बाजारात नऊ रंगांच्या साड्यांचा सेट विक्रीस उपलब्ध आहे. त्याला, तसेच एम्ब्रॉयडरी केलेली चनिया-चोली, विविध प्रकारचे घागरा-चोली, मुन्नी स्टाइल घागरा-चोली, मेटलचे दागिने, मुलांसाठीचे केडीयू ड्रेसेस आदींना मोठी मागणी दिसून येत आहे. मेनरोड, शिवाजीरोड, शालिमार, कॉलेजरोड, विविध ठिकाणचे मॉल्स येथे मोठ्या प्रमाणावर खरेदीस पसंती मिळत आहे.

दागिने बनावटीवर सूट

महिलांनी सोने-चांदीच्या खरेदीला प्राधान्य दिले आहे. काही सराफ व्यावसाय़िकांनी दागिन्यांच्या बनावटीवर भरघोस सूट दिल्याने अनेकांनी बुकिंग करण्यास प्राधान्य दिले आहे. अनेक नामांकित कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या स्कीम बाजारात आणल्या आहेत. वाहन खरेदीसाठीही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, दुचाकी, चारचाकी खरेदीने यंदा मोठी उलाढाल होईल, असे जाणकरांचे म्हणणे आहे. ऑनलाइन मार्केटही तेजीत असल्याची स्थिती आहे.

---

कालिकेचरणी लोटला जनसागर

नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिकेचरणी रविवारी दिवसभर जनसागर लोटल्याचे चित्र दिसून आले. कालिकामातेच्या मंदिरापासून संदीप हॉटेलपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. दर्शनासाठी काही तास रांगेत थांबावे लागत असूनदेखील भाविकांचा उत्साह कमी होत नव्हता. उलट रांगेतील भाविकांकडून कालिकामातेचा जयघोष सुरू होता. या यात्रेतील खेळणींच्या दुकानांतील आवाज करणाऱ्या पिपाण्या आणि तत्सम वस्तूंना बच्चेकंपनीची पसंती दिसून आली. येथील मोकळ्या मैदानावरील विविध खेळणी, खाद्यपदार्थांची दुकाने हाऊसफुल्ल झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्समधून मोबाइलसह मुद्देमाल लांबवला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कालिका माता मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील मोबाइल आणि ५०० रुपये असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना शनिवारी (दि.१३) दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली.

या प्रकरणी अमृता परेश पंडित (रा. गुरूदत्तनगर, गंगापूररोड) यांनी फिर्याद दिली. पंडित आपल्या कुटुंबीयांसह देवी दर्शनासाठी कालिका मंदिर येथे गेल्या होत्या. दर्शन घेऊन बाहेर येईपर्यंत चोरट्यांनी त्यांच्या पर्समधील मोबाइल आणि पैसे काढून घेतले.

--

वाहतूक पोलिसाला मारहाण

रिक्षा थांबवली याचा राग आल्याने रिक्षाचालकाने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसाला शिवीगाळ करीत मारहाण केली. सिटी सेंटर मॉल चौफुली येथे शनिवारी (दि. १३) रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

फिरोज इसाक खान (वय २६, रा. बागवानपुरा) असे या संशयित रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी संदीप प्रकाश सावळे यांनी फिर्याद दिली. शहर वाहतूक शाखेत कार्यरत असलेले सावळे सिटी सेंटर मॉल चौफुलीवरील सिग्नलवर कर्तव्य बजावत असताना ही घटना घडली. रिक्षात (एमएच १५, ईएच ०३९०) फ्रंट सीट प्रवाशी घेऊन मायको सर्कलकडून सिडकोकडे जाणाऱ्या संशयित फिरोज खान यास सावळे यांनी सिग्नलजवळ थांबविले. पुढील कारवाई सुरू होताच संशयित खान याने शिवीगाळ दमदाटी करीत थेट सावळे यांची कॉलर पकडली. हाताच्या चापटीने मारहाण करीत संशयिताने सरकारी कामात अडथळा आणला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जांगीड ब्राह्मण महासभेची कार्यकारिणी जाहीर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अखिल भारतीय जांगीड ब्राह्मण महासभा नाशिक जिल्हासाठी पुढील तीन वर्षांकरिता काम करणारी नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यानुसार महासभेच्या नाशिक जिल्हाध्यक्ष पदावर ओमप्रकाश जांगीड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महासभेचे माजी अध्यक्ष रामावतार जांगीड यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. नवीन नियुक्त कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष पदावर राहुल जांगीड, रामचंद्र जांगीड, महामंत्री पदावर महेशकुमार जांगीड, संघटनमंत्री पदावर रामलाल जांगीड, दामोदर जांगीड, रतनलाल जांगीड, प्रचारमंत्री पदावर राजुलाल जांगीड यांची नियुक्ती केली आहे. कार्यकारिणीच्या नियुक्ती कार्यक्रमात महासभेचे संरक्षक मोहन शर्मा, प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद जांगीड, चंपालाल जांगीड, जीवन जांगीड यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौतम बुध्दच देशीवादाचे जनक

$
0
0

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक बाबर यांचे प्रतिपादन

…..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

देशीवाद हा कुणी आणला याबद्दल अनेक लोक आपापसात भांडत असतात. काही लोक म्हणतात नेमाडेंनी आणला, काही म्हणतात अमुक एकाने आणला, तर दुसरा गट म्हणतो तमुक एकाने आणला. देशीवाद हा खरा गौतम बुध्दांनी आणला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अशोक बाबर यांनी केले.

सार्वजनिक वाचनालयाच्या ५१ व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित परिसंवादात ते बोलत होते. 'देशीवाद - भ्रम आणि वास्तव' हा डॉ. चंद्रकांत वर्तक स्मृती परिसंवादाचा विषय होता. या परिसंवादात डॉ. अशोक बाबर, राकेश वानखेडे, सुदाम राठोड, भास्कर ढोके यांनी सहभाग घेतला. यावेळी सुदाम राठोड म्हणाले की, देशीवाद वास्तव आहे. परंतु, तो जसाच्या तसा स्वीकारता येत नाही. देशीवाद हा वाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. या वादात काहीही अर्थ नाही. विरोध करणाऱ्यांना देशीवाद समजत नाही व समर्थन करणाऱ्यांनाही देशीवाद समजत नसल्याचे ते म्हणाले. भास्कर ढोके म्हणाले की, देशीवादाची आवश्यकता का निर्माण झाली याचा विचार करणे गरजेचे आहे. चुलीवरची मिसळ, ठेचा, भाकरी हा देशीवाद आहे. ती जगण्याची एक पध्दत आहे. या सर्व गोष्टींचा परंपरेशी धागा जोडला तर देशासमोर मॉडेल ठेवू शकतो. देशीवाद ही दीर्घपणे समजावून घेण्याची प्रक्रिया आहे. देशीवादाचा सिध्दांत आजपर्यंत कुणी नाकारला नाही व नाकारूही शकत नाही, असे ते म्हणाले. राकेश वानखेडे म्हणाले की, नेमाडेंचा देशीवादी विचार हा आंबेडकर वादाच्या पोटात जातो. देशीवाद ही आंबेडकरवादाची पोटशाखा आहे. त्यात वेगळे काहीही नाही. फक्त आपण वेगळे आहोत हे दाखवण्यासाठी नेमाडेंनी जातीचं समर्थन करण्याची भूमिका घेतलेली दिसते. यावेळी श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘टाइम्स ग्रुप’चे रुपेश शर्मा यांचा सत्कार

$
0
0

जाहिरात क्षेत्रातील उल्लेखनीय कामाबाबत आठ जणांचा सत्कार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय जाहिरात दिनाचे औचित्य साधत फेडरेशन ऑफ अॅडव्हर्टायझिंग अँड मार्केटिंग आंत्रप्रेन्युअर्स (फेम) व नाशिक अॅडव्हर्टायझिंग एजन्सीज् वेल्फेअर असोशिएशन (नावा) यांच्या वतीने वृत्तपत्राच्या जाहिरात विभागात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या सोहळ्यात 'टाइम्स ग्रुप'मधील रुपेश शर्मा यांना सन्मानित करण्यात आले. या वेळी 'टाइम्स ग्रुप'च्या रिस्पॉन्स हेड मंजिरी शेख उपस्थित होत्या.

फेम व नावा यांच्या वतीने आयोजित सन्मान सोहळा शनिवारी (दि. १३) सायंकाळी ५ वाजता शालिमार येथील आयएमए हॉलमध्ये सोहळा झाला. या सोहळ्यात 'माध्यमांतील जाहिरात' या विषयावर आनंद अॅग्रो ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक उद्धव अहिरे यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला. नावाचे सदस्य श्रीकांत नागरे यांनी जाहिरातीचे महत्त्व सांगताना, जाहिरातीचे शास्त्रोक्त शिक्षण सध्या घेतले जात आहे. जाहिरातीच्या क्षेत्रात डिजीटल तंत्रज्ञानुसार बदल होणे अपेक्षित आहे. जाहिरात क्षेत्राची वाढती मागणी लक्षात घेता या व्यवसायात अधिक नफा मिळविण्यासाठी प्रत्येकाने लक्ष द्यायला हवे. ग्राहकांचे समाधान आणि आकर्षक जाहिरात देण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. सोहळ्यात फेमचे अध्यक्ष विठ्ठल देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. 'नावा'चे संस्थापक मोतीराम पिंगळे यांनी पुरस्कार देण्यामागचा उद्देश विशद केला. या वेळी माध्यमांतील जाहिरात व संपादक विभागात कार्यरत असलेले प्रतिनिधी उपस्थित होते.

यांचा झाला सन्मान...

सोमनाथ शिंदे, जगदीश कुलकर्णी, आनंद राईकर, रावसाहेब उगले, श्रीनिवास पाठक, नीलेश अमृतकर व वृत्तपत्र वितरक मिलिंद धोपावकर यांना सोहळ्यात सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बुद्धम शरणम्’च्या सूरातून समानतेच्या संदेशाची पेरणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोल्फ क्लब येथे आयोजित महाबौद्ध धम्म मेळाव्यातील श्रामणेरांची गोल्फ क्लब ते देवळाली गाव अशी लक्षवेधी मिरवणूक रविवारी काढण्यात आली. हजारो श्रामणेर यात सहभागी झाले. 'बुद्धम शरणम् गच्छामि...'च्या सूरात मिरवणुकीत समानतेचा संदेश सर्वत्र पसरविण्यात आला.

भन्ते ज्ञानज्योती, भन्ते शीलरत्न, भन्ते धम्मरत्न, भन्ते अभयपुत्र, भन्ते कौटिण्य आणि भन्ते संघरत्न मेळाव्यात श्रामणेरांना बौद्ध धर्माची तत्वे यांची शिकवण देत आहेत. मेळाव्याच्या निमित्ताने बौद्ध धर्माची समानतेची, शांततेची शिकवण सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी मिरवणूक सोहळा झाला. मिरवणुकीला दुपारी १२ वाजता प्रारंभ करण्यात आला. मिरवणुकीच्या अग्रस्थानी भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांची वेशभूषा करीत तरुण चित्ररथात सहभागी झाले. मिरवणूक मार्गावर गुलाब जल आणि फुलांच्या पाकळ्या टाकण्यात आल्या. अत्यंत शिस्तबद्ध व शांततेत निघालेली मिरवणूक गोल्फ क्लब मैदान, द्वारका, काठेगल्ली, उपनगर, बिटको पॉईंट, नाशिकरोड या मार्गावरून देवळाली गाव येथे पोहचली. या ठिकाणी बुद्धविहारात मिरवणुकीचा समारोप झाला. या मेळाव्याचे संयोजन बीएमए ग्रुपचे मोहन अढांगळे, राहुल बच्छाव, के. के. बच्छाव, बाळासाहेब शिरसाठ, अशोक गवई, नितीन मोरे, संस्कार प्रमुख भारतीय बौद्ध महासभेचे वाय. डी. लोखंडे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी करत आहेत. दरम्यान, हा मेळावा १८ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे.

लोगो : सोशल कनेक्ट

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुविधा देण्यासाठी महासंघ प्रयत्न करणार

$
0
0

सुविधा देण्यासाठी

महासंघ प्रयत्न करणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र वीज कामगार महासंघातर्फे नाशिक विभागात कार्यरत महिला कर्मचाऱ्यांसाठी 'सक्षमीकरण अभियान' आयोजित करण्यात आले. राका कॉलनी परिसरातील कामगार महासंघ कार्यालयात रविवारी हे अभियान संपन्न झाले.

यावेळी अभियानासह महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली. कार्यालयीन कामकाजात अनेक तांत्रिक समस्यांना सामोरे जावे लागते, असे महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी महासंघाचे महामंत्री शंकर पाहाडे यांनी तांत्रिक अडचणींसह महिलांना इतरही सुविधा मिळाव्यात यासाठी महासंघ प्रयत्न करत असल्याचे आश्वासित केले. महासंघाच्या उपमहामंत्री शर्मिला पाटील यांनी महिला कर्मचाऱ्यांना भेडसावणाऱ्या सर्व समस्यांना महासंघ दूर करेल, असे सांगितले. या अभियानात दीडशेहून अधिक महिला कर्मचारी उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


देशविचारातून समाज उभा राहील

$
0
0

विभाग प्रचारक रोहित रिसबूड यांचे प्रतिपादन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सामान्य व्यक्ती निस्वार्थपणे देश, समाजाचा विचार करेल, समाजात जी काही कमी आहे ती दूर करण्याची जबाबदारी माझी आहे ही भावना जागृत होईल तेव्हा खऱ्या अर्थाने हा समाज उभा राहील, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाशिक विभाग प्रचारक रोहित रिसबूड यांनी केले.

संघाच्या टिळकनगर भागातर्फे पंडित कॉलनीतील लायन्स क्लबमध्ये शस्त्रपूजन उत्सव झाला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लायन्स क्लबचे अध्यक्ष सुरेश पाटील तसेच नाशिक विभाग कार्यवाह संजय कुलकर्णी, नाशिक शहर कार्यवाह संजय चंद्रात्रे, टिळक नगर कार्यवाह श्रीपाद दाबक उपस्थित होते.

रोहित रिसबुड म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराजांनी सामान्य माणसातील विविध कौशल्ये ओळखून त्यांना संघटित करून, त्यांच्या मनात स्वराज्याविषयी प्रेम निर्माण करून हजारो वर्षांच्या जुलमी मुगल राजवटीला उलथवून टाकले. त्याच प्रेरणेने डॉ. हेडगेवारांनी १९२५ मध्ये संघाची स्थापना केली. आज ९० वर्षांनंतर देशात लाखो सेवाकार्यांच्या माध्यमातून संघ स्वयंसेवक समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचून निस्वार्थपणे देशसेवा करत आहे.

अधिक स्वयंसेवकांनी सक्रिय होऊन थोडा वेळ दिला पाहिले. थोड्या स्वयंसेवकांनी अधिक वेळ दिला तर संपूर्ण हिंदू समाजाच्या संघटनेचे जे ध्येय आपण बाळगले आहे त्याकडे आपण खऱ्या अर्थाने अग्रेसर होऊ, असेही रिसबुड यांनी सांगितले. प्रमुख पाहुणे सुरेश पाटील म्हणाले, संघ स्वयंसेवकांची शिस्त, संस्कार तसेच देशातील नैसर्गिक आपत्तीच्यावेळी धावून जात निस्वार्थ सेवा करण्याची वृत्तीही वेळोवेळी दिसून येते.

शस्त्रपूजन उत्सवात टिळक नगरातील बाल, व्यावसायिक तसेच प्रौढ शाखांनी विविध प्रकारची प्रात्यक्षिके सादर केली. योग, गण समता, सूर्यनमस्कार, देशभक्तीपर नाटिका अशी प्रात्यक्षिके उपस्थित स्वयंसेवक, नागरिक आणि माता भगिनींसमोर सादर झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ते होणार खड्डेमुक्त

$
0
0

बांधकाममंत्री पाटील यांचे आश्वासन

...

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी वारंवार होणारा खर्च टाळून दीर्घकाळ दर्जेदार रस्ते व्हावेत, यासाठी शासनाने चांगले धोरण आखले आहे. ठेकेदारांवर दहा वर्षे रस्त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी राहणार असल्याने जनतेची खड्ड्यातून कायमस्वरूपी मुक्तता होईल, असे प्रतिपादन राज्याचे बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

नाशिक-वणी-कळवण-नामपूर या रस्त्याचे काम हायब्रिड अॅन्युइटी कार्यक्रमांतर्गत होणार असून, सदर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन व अवनखेड येथे विविध विकासकामांचे उद्घाटन बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री गिरीश महाजन होते. पाटील पुढे म्हणाले की, केंद्राबरोबरच राज्य सरकारने विविध महामार्गांना निधी देत रस्ते विकासावर भर दिला आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळात रस्ते झाले की ते वर्षात नादुरुस्त होऊन खड्डे पडायचे व पुन्हा रस्त्याचे कामे व्हायचे. पण, आताच्या सरकारने त्यात बदल केला आहे. सरकार चाळीस टक्के खर्च सरकार करणार असून, उर्वरित खर्च ठेकेदारांना करावा लागणार आहे. त्यांना ते टप्प्याटप्प्यात अदा होणार आहे. रस्त्याच्या कामाची जबाबदारी ही दहा वर्षे संबंधित ठेकेदाराला दिली जाणार आहे. त्यात दोन वेळा नूतनीकरण व देखभाल दुरुस्तीचे काम करण्याची जबाबदारी राहणार आहे. त्यामुळे आता एकदा रस्ता झाला की पुढील दहा वर्षे सदर रस्ते व्यवस्थित राहणार आहेत. भूसंपादनाचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावले जातील. राज्यात दुष्काळी परिस्थिती असून, टंचाईग्रस्त तालुके जाहीर करण्यात आले आहेत. पुन्हा आढावा घेऊन जे गावे टंचाईग्रस्त आहेत, त्यांना टंचाईग्रस्त म्हणून घोषित करीत उपाययोजना केल्या जातील असे त्यांनी नमूद केले. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून मतदारसंघात विविध रस्ते, पायाभूत सुविधा होत असल्याचे सांगितले. यावेळी आमदार नरहरी झिरवाळ, आमदार जे. पी. गावित, लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, तालुकाध्यक्ष संजय कावळे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तालमणिका

$
0
0

तबला हे पुरुषांचे वाद्य, असा आजही काही लोकांचा समज आहे. नाशिक शहरात महिला तबलावादक बोटावर मोजण्याइतक्याच, परंतु त्यातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, वैष्णवी भडकमकर हीने.

जन्माला येतानाच तिच्या कानावर तबल्यातील कायदे-पलटे, तिहाई इत्यादींचे बोल पडू लागले. तिचे बाबा स्व. प्रमोद भडकमकर नाशिकमधील ख्यातनाम तबलावादक. वैष्णवी जशी मोठी होऊ लागली तसे तिला तबल्याची आवड निर्माण झाली. तिच्या बाबांनीही तिला शिकवण्यास सुरुवात केली. एकीकडे शालेय शिक्षण व दुसरीकडे तबल्याचे शिक्षण असे दोन्ही सुरू होते. तिला तबल्याची समज इतकी चांगली होती की, वयाच्या सातव्या वर्षी तिने पहिल्यांदा एकल तबलावादन केले. त्यानंतर सातत्याने चार वर्षे पवार तबला अकादमीच्या व अदिताल तबला अकादमीच्या गुरुपौर्णिमा उत्सवात तिने वादन केले. बीवायके महाविद्यालयातून बीकॉमची पदवी प्राप्त केल्यानंतर अनेक संधी तिला उपलब्ध होत्या. परंतु, त्या नाकारून तिने तबला हेच करिअर निवडले. बाबांच्या बरोबरीने ती रियाजाला बसत होती. तिचे बाबा स्व. प्रमोद भडकमकर स्वभावाने जरी मिश्किल होते, तरी रियाजाच्या बाबतीत कडक होते. जोपर्यंत तबल्यातून व्यवस्थित बोल येत नाहीत, तोपर्यंत त्यांनी वैष्णवीकडून घोटून रियाज करून घेतला. त्यामुळे वैष्णवी आज उत्तमप्रकारे वाजवते आहे. बालाजी मंदिर व संस्कारभारतीतर्फे आयोजित केलेल्या अनेक महोत्सवात तिने वादन सादर केलेले आहे. त्याचप्रमाणे पारनेर येथील पूर्णवादी फेस्टिव्हलमध्येही तिने आपली कला सादर केली आहे. तिच्यातील वादनाचे कौशल्य पाहून पं. लच्छू महाराज संगीत महोत्सवातदेखील तिला वादनासाठी पाचारण करण्यात आले होते. त्याचप्रमाणे प्रमोद भडकमकर यांची निर्मिती असलेल्या Bandish- the classical Fusion या कार्यक्रमातदेखील तिने महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. प्रमोद भडकमकर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या मुखड्याची बंदिश या कार्यक्रमात वादन केले होते. तिला ब्रह्मचैतन्य पुरस्कारानेदेखील सन्मानित करण्यात आले आहे. अनेक मान्यवरांनी तिचे वादन गौरवले असून, विविध संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

(शब्दांकन : प्रशांत भरवीरकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लढा शोषणाविरुद्ध हवा

$
0
0

सावाना मेळावा अध्यक्ष अपर्णा वेलणकर यांचे प्रतिपादन

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'मी टू' ही चळवळ पुरुषविरोधी आहे, याबाबत मला चिंता वाटायला लागली आहे. मला वाटते ही चळवळ शोषणाविरोधातली हवी. मग ते स्त्रीने पुरुषाचे केलेले असो, अगर पुरुषाने स्त्रीचे केलेले असो. एकटा पुरुषच का यात भरडला जातोय. त्यानेही पुढे होऊन चार गोष्टी सांगायला हव्यात. आपला लढा शोषणाविरुद्ध हवा, स्त्री किंवा पुरुष विरोधात नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय नाशिक आयोजित ५१ व्या जिल्हा मेळाव्याच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. यावेळी प्रा. डॉ. वृन्दा भार्गवे यांनी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधला. 'मी टू' या चळवळीबद्दल काय वाटते या प्रश्नाचे उत्तर देताना वेलणकर म्हणाल्या की, ही चळवळ पुरुषाच्या विरोधात चालली आहे. त्याबद्दल चिंता वाटू लागली आहे. अर्थात कित्येक वर्षांनी आपल्यावरील लैंगिक शोषणाविषयी वाचा फोडणाऱ्या स्त्रियांची मल टिंगल करायची नाही. परंतु, त्याबद्दल कुतूहल मात्र व्यक्त करायचे आहे. भारतीय संस्कृतीमुळे या प्रकरणाला एकूण कसे वळण मिळते हे कुणी सांगू शकत नाही. मात्र या मोहिमेनंतर काय होणार आहे हे मात्र आताच सांगू शकत नाही. या लढ्याला पुरुष विरुद्ध स्त्री असे रूप मिळत आहे. तसे व्हायला नको. असे अनेक पुरुष आहेत, जे त्रास देणाऱ्या स्त्रियांचे श्राद्ध गंगेच्या काठावर येऊन घालतात. त्याकडे लक्षपूर्वक पाहिले जात नाही. हे स्त्री-पुरुष विरुद्ध सामने लावणे सोडले पाहिजे.

यावेळी व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष विलास औरंगाबादकर, कवीसंमेलनाचे अध्यक्ष संजय चौधरी, कार्यवाह श्रीकांत बेणी यांची उपस्थिती होती. वसंत खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. मुलाखतकार व मुलाखातदार यांचा परिचय अनुक्रमे डॉ. वेदश्री थिगळे व संगीता बाफणा यांनी करून दिला. डॉ. धर्माची बोडके यांनी प्रास्ताविक केले. मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम झाला.

..

कुतूहलातून भूमिका

पत्रकार, संपादक, अनुवादक, लेखक यातले कोणते बिरूद लावायला आवडेल याचे उत्तर देताना वेलणकर म्हणाल्या की, खरे तर एका भूमिकेतून दुसरी उलगडत गेली आहे. मला अनेक गोष्टींचे कुतूहल असते, ते पूर्ण करण्यासाठी म्हणून या भूमिका आल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार दत्ता सराफ यांची झालेली भेट, त्यांनी कळत नकळत केलेले संस्कार, पत्रकारितेतील जीवन, दिवाळी अंकाचे वेगळेपण जपण्यासाठी केलेली धडपड, आपल्या परदेशवाऱ्या याविषयी वेलणकर मनापासून बोलल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगले कथाकथन

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी

सावाना जिल्हा मेळाव्यात यंदा कथाकथन ठेवण्यात आले होते. युवा साहित्यिक किरण सोनार यांनी यावेळी नवकथाकार अरविंद गोखले यांची 'शुभा' नावाची कथा सादर केली. या कथेत शुभा हे पात्र आहे. ती तिच्या वडिलांना रियल हिरो समजते. तिच्या दृष्टीने तेच आदर्श असतात. परंतु, एक दिवस तिला वडिलांना आलेले एक पत्र सापडते. त्यात तुमची देवदासी अंबालिका असा मजकूर असतो. तिचा वडिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. पुढे कालांतराने तिला समजते, ती देवदासी वेडेपणामुळे हे सर्व करीत असते. त्यावेळी तिला पश्चाताप होतो. अशा अशयाची ही कथा होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धिबळातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अधिकृत-अनधिकृतच्या फेऱ्यात सापडलेल्या नाशिक जिल्ह्यातील बुद्धिबळ संघटनांमधील अंतर्गत वादाने पुन्हा डोके वर काढले आहे. हे वाद संपत नसतानाच ऑल मराठी चेस असोसिएशनने (एएमसीए) जिल्ह्यात हंगामी समिती (अॅड हॉक) नियुक्त केल्याने नाशिकच्या बुद्धिबळातील शुक्लकाष्ट संपणार नसल्याचेच यातून आता स्पष्ट झाले आहे. 'एएमसीए'ने यापूर्वी द अमॅच्युअर चेस असोसिएशनला दिलेले संलग्नत्वही यामुळे रद्द झाले आहे. जिल्ह्यात बुद्धिबळावर हंगामी समिती नियुक्त होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

'एएमसीए'ने हंगामी समिती नियुक्त करण्यामागचे कारण मात्र स्पष्ट केलेले नाही. मात्र, बुद्धिबळ संघटनांमधील अंतर्गत वाद हेच त्यामागचे कारण असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या कार्यकाळात तीन वर्षांपूर्वी नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे संलग्नत्व रद्द करण्यात आले होते. त्यानंतर आता 'एएमसीए'च्या कार्यकाळात हंगामी समिती नियुक्त झाल्याने नाशिकमध्ये संघटनात्मक बांधणी सक्षम नसल्याचेच यातून समोर येत आहे. देवधर यांच्या अध्यक्षतेखालील नाशिक जिल्हा बुद्धिबळ संघटनेकडे यापूर्वी 'एएमसीए'चे संलग्नत्व होते. मात्र, या संघटनेतील अंतर्गत वादामुळे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने हस्तक्षेप करीत नऊ जणांचे विश्वस्त मंडळ नियुक्त केले. मात्र, विश्वस्तांवर विश्वास न ठेवता 'एएमसीए'ने नाशिकमधील नव्यानेच स्थापन झालेल्या द अमॅच्युअर चेस असोसिएशनला संलग्नत्व दिले. मात्र, हे संलग्नत्वही औटघटकेचे ठरले. काही महिन्यांतच ते काढून घेऊन आता हंगामी समिती नियुक्त झाल्याने अंतर्गत वादाला पुन्हा फोडणी मिळाली आहे.

हंगामी समिती नियुक्त झाल्याने नाशिकमध्ये बुद्धिबळाचे सर्वाधिकार या समितीला देण्यात आले आहेत. त्यामुळे यात खेळाडूंचे नुकसान टळणार असले तरी हंगामी समितीचा कार्यकाळ मर्यादित राहणार आहे. त्यानंतर 'एएमसीए' संलग्नतेचा निर्णय घेईल. दोन संघटनांना नाकारल्याने आता संलग्नता कोणाला मिळणार, हा संभ्रमही कायम आहे. २०१५ पासून संलग्नतेत सातत्याने होणारे बदल खेळाडूंमध्ये गोंधळ निर्माण करणारे असल्याने जिल्ह्यात एकच कायमस्वरूपी संघटना असावी, अशी अपेक्षा बुद्धिबळप्रेमींनी व्यक्त केली आहे.

हंगामी समितीवर महाशब्दे

हंगामी समितीला संघटनेइतकेच अधिकार बहाल करण्यात आले आहेत. या तीन जणांच्या हंगामी समितीत अध्यक्षपदी डॉ. के. ई. महाशब्दे, सचिवपदी सुधीर पगार, तर सदस्यपदी अण्णासाहेब देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जायकवाडी’ घेणार सहा टीएमसी पाणी

$
0
0

राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केली चिंता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात अनेक तालुक्यात पाऊस कमी पडल्याने चिंतेचे वातावरण असताना आता गोदावरी खोऱ्यातून जायकवाडी धरणास साधारणपणे सहा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळ १५ ऑक्टोबरनंतर आढावा बैठक आहे. त्यात हा आदेश कार्यकारी संचालक देण्याची शक्यता असल्याची माहिती जलचिंतन ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी दिली. त्यामुळे पुढील महिन्यात नाशिक-नगर विरुद्ध मराठवाडा असे पाणी वाद पुन्हा होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली.

जायकवाडी धरण ६५ टक्केपेक्षा कमी भरल्यास समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार उर्ध्व गोदावरी खोऱ्यातील गंगापूर-दारणा-पालखेड-प्रवरा-मुळा धरण समूहातून मेंढेगिरी समितीच्या तक्ता सहानुसार पाणी सोडण्याचे हायकोर्टाने आदेश आहेत. त्यानुसार यंदा जायकवाडी धरणाचा एकूण उपयुक्त पाणीसाठा ७६ टीएमसी (१०० टक्के) इतका आहे. आजचा पाणीसाठा २९ टीएमसी (३८ टक्के) असून खरीप हंगामाचा वापर धरून ४४ टीएमसी झाला आहे. त्यामुळे हा निर्णय होण्याची शक्यता आहे.

या विषयावर जाधव म्हणाले, की जिल्ह्यात खरीप हंगामाचा पाऊस नाशिकच्या पूर्व भागात पुरेसा व वेळेवर न झाल्याने पिकांची अवस्था दयनीय झाली आहे. उर्ध्व भागात धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणे भरली आहेत; मात्र पूर्व भागात खरीपाची पिके अडचणीत आली. काही भागात आजही टँकर सुरू आहेत. त्यामुळे रब्बी हंगामात पाणी मिळण्याच्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. मात्र, जायकवाडी धरणात पाणीसाठा पुरेसा झाला नसल्याने नाशिक, नगरमधून जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागणार आहे.

नदीजोड आवश्यक

पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी तातडीने नदीजोड प्रकल्प राबवण्याची आवश्यकता आहे. त्याबाबत सदर नदीजोड प्रकल्पांचे अहवाल राज्य सरकारने तातडीने १ वर्षात तयार करून केंद्र सरकारला सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने २०१६ मध्ये दिले होते. मात्र, त्या बाबतीत सरकारी पातळीवर उदासिनता आहे. हे सरकार मराठवाड्याचे पाणी संकट दूर करण्याची फक्त घोषणा करीत असून प्रत्यक्षात नदी जोड प्रकल्पाचे अहवाल तयार करीत नाही.

नागरिकांनी जलसाक्षर व्हावे

शेतकरी व शहरातील नागरिक जलसाक्षर होऊन सरकारवर दबाव निर्माण केला पाहिजे, असे मत जाधव यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील नांदगाव, येवला, चांदवड, सिन्नर व मराठवाड्याच्या दुष्काळी तालुक्यांना भागातील लोकांना अजून पाणी मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यासाठी नदी-जोड प्रकल्प व पाण्याचा पुनर्वापर काळाची गरज बनली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बहुढंगी रामलीला...

$
0
0

बहुढंगी रामलीला...

गांधीनगर येथील होमगार्ड कार्यालयासमोर १९५५ पासून सुरू असलेल्या बहुढंगी रामलीलेस परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. या सोहळ्याने चित्रपटसृष्टीला अनेक कलाकार दिलेले असून, आजही कलाकारनिर्मितीचा कारखाना म्हणून या सोहळ्याकडे पाहिले जाते. स्टेजवरील कलाकारच नव्हे, तर संगीतकार, कोरिओग्राफर, तांत्रिक बाजू सांभाळणारे अनेक कलाकार या रामलीलेने सिनेसृष्टीला दिले आहेत. या रामलीलेचे संपूर्ण संयोजन खुद्द कलाकारच करतात. मेकअप करणे, सतरंजी टाकण्यापासून रामचंद्रांची भूमिका साकारण्यापर्यंतचे कामही या कलाकारांनाच करावे लागते. या सोहळ्यातील पडद्यामागच्या हालचाली आणि रंगमंचावरचा आविष्कार याचे दर्शन घडविणारे हे चित्रवृत्त...

सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्यिकांना पारितोषिके प्रदान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ५१ व्या साहित्यिक मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी संध्याकाळी लिमये सभागृहात पार पडला.

या निमित्ताने आयोजित चंद्रकांत महामिने विनोदी कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक विनोद गोरवाडकर, द्वितीय क्रमांक राजेंद्र उगले, तर तृतीय क्रमांक सुशीला संकलेचा यांना मिळाला.

कवी गोविंद काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांक जावेद शेख, द्वितीय क्रमांक काशीनाथ गवळी यांना, तर तृतीय क्रमांक संजय गोराडे व राजश्री भिरुड यांना देण्यात आला. ऑ. अ. वा. वर्टी कथा स्पर्धेत प्रथम क्रमांक रावसाहेब जाधव, द्वितीय क्रमांक रोशनकुमार पाटील, तृतीय क्रमांक किरण सोनार यांना, तर उत्तेजनार्थ पारितोषिक सप्तर्षी माळी यांना देण्यात आले. कै. जयश्री राम पाठक उत्कृष्ट काव्यसंग्रह स्पर्धेत सुदाम राठोड यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. कै. जयश्री राम पाठक उत्कृष्ट कविता सादरीकरणाचे प्रथम पारितोषिक सुशीला संकलेचा यांना देण्यात आले. कै. जयश्री राम पाठक छंदोबध्द कविता पुरस्कार काशीनाथ महाजन यांना देण्यात आला. कवी संमेलन काव्य कवी प्रशांत कापसे पुरस्कृत पुरस्कार डीडीजाधव व भीमराव कोते यांना देण्यात आला. माजी आमदार नानासाहेब बोरस्ते काव्य पुरस्कार सामाजितक कवितेसाठी प्रमोद अंबाडकर यांना व ग्राम संवेदना पुरस्कार भीमराव कोते यांना प्रदान करण्यात आला. डॉ. दिलीप पवार पुरस्कृत काव्य पुरस्कार गझलसाठी संजय गोराडे, सामाजिक आशयसाठी प्रमोद राठोड, ग्रामीण कवितेसाठी दयाराम गिलाणकर, स्त्री जीवन काव्यासाठी सुमती पवार यांना देण्यात आले. या स्पर्धासाठी विजयकुमार मिठे, सुरेखा बोऱ्हाडे, अनुप गोसावी, अजित अभंग, विवेक उगलमुगले, राजेंद्र सांगळे, मनोहर विभांडीक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थोडक्यात

$
0
0

धन्वंतरीमध्ये \Bविद्यार्थ्यांना

सायबर सुरक्षेचे धडे

\Bनाशिक : धन्वंतरी इन्स्टिट्यूट अँड डिझाइन टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये सायबर सुरक्षा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. सोशल मीडियाचा वापर करताना बाळगायची सावधानता यासोबतच सेफ ऑनलाइन व्यवहार यांचे प्रशिक्षण देण्यात आले. सायबर गुन्हे यांची माहिती देत सायबर क्राइमच्या कायद्यांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सायबर विषय तज्ज्ञ ओंकार गंधे यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे दिले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य अनिल बागुल यांसह प्राध्यापक उपस्थित होते.

\Bआरोग्यावर व्याख्यान

\Bनाशिक : सेंटर फॉर पर्सनॅलिटी अॅसेसमेंट अँड ग्रॅफिओलॉजीतर्फे मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत 'तरुणाई आणि मानसिक आरोग्य' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. गंगापूर रोड येथील निर्मला कॉन्व्हेंट शाळेजवळील 'सोहम' बंगला येथे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानात स्वामी विवेकानंद, इरिक्सॉन आणि व्हिक्टर फ्रॅन्कल यांची तत्वे विद्यार्थ्यांना सांगण्यात येणार आहे. मानशास्त्र विषयाचे प्राध्यापक तन्मय जोशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे आहेत. मानसशास्त्र विषायात रूची असणाऱ्या व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

\Bढोलपथकाचा सत्कार \B(फोटो आहे)

नाशिक : सिंहगर्जना ढोलपथकाने १५ ऑगस्ट रोजी कळसुबाई शिखरावर ढोलवादन करत विश्वविक्रम केला. ढोलवादन पथकाच्या या कामगिरीची दखल घेत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते ढोलपथकाचा सत्कार करण्यात आला. ढोलपथकाने केलेल्या विश्वविक्रमाबद्दल अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी यावेळी शुभेच्छा दिल्या. सिंहगर्जना ढोलपथकाचे अध्यक्ष प्रितम भामरे यांसह ढोलवादक यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांकडून फसवणूक

$
0
0

दुसऱ्याची जमीन परस्पर विकली

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जागा, नोकरी किंवा खरेदी विक्री यासारख्या व्यवहारांत फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले असून, जमीन खरेदीत बाहुबलींचा सहभाग लपून राहिलेला नाही. अशाच प्रकारच्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यात आजी-माजी नगरसेवकांची नावे समोर आली असून, या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जमीनमालकाची परवानगी न घेताच चौघांनी मिळून त्याची जागा परस्पर दुसऱ्यास विक्री केली. एस. बी. गांगुर्डे (वय ३५, रा. कॅनलरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गांगुर्डे यांच्या फिर्यादीनुसार यात आजी-माजी नगरसेवकांचा समावेश आहे. दिनकर गोटीराम आढाव (वय ५८, रा. नारायणबापू नगर, जेलरोड), विलासराज मोहन गायकवाड (वय ४५, रा. पिंपळपट्टी दसक, मोरेमळा), दीपक विष्णू सदाकळे (वय ४२, रा. नाशिकरोड) आणि पवन चंद्रकांत पवार या चौघांनी गांगुर्डे यांची परवानगी न घेता बेकायदेशीररित्या त्यांची जमीन परस्पर गुंठेवारी पद्धतीने विक्री केली. सात ते आठ वर्षांपासून संशयितांनी हा प्रकार केला असून, त्या ठिकाणी आता घरे बांधून नागरिक राहण्यासही आले आहेत. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश शिंदे करीत आहेत.

..

यांच्यावर गुन्हा दाखल

एस. बी. गांगुर्डे यांची जमीन आजी-माजी नगरसेवकांनी परवानगी न घेता परस्पर विकली. विद्यमान नगरसेवक दिनकर आढाव यांच्यासह विलासराज गायकवाड, दीपक सदाकळे आणि माजी नगरसेवक पवन पवार यांनी जागेची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फसवणुकीचा सुकाळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जमीन खरेदी तसेच नोकरी देण्याच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी उपनगरसह मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पतीनेच एजंटच्या मदतीने पत्नी-मुलाच्या नावे असलेली जमीन परस्पर विक्री केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशाल दिंडे यांना वडिलोपार्जित नांदूरनाका येथील जमीन मिळाली असून, ती जमीन दिंडे यांच्या पत्नी आणि मुलाच्या नावे आहे. संशयित विशाल दिंडे याने एजंट अशोक मारुती उबाळे (रा. मेरी, पंचवटी) याच्या मदतीने जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार केली. ऑगस्ट २०१७ पासून अशोक आणि विशाल यांनी ही कागदपत्रे तयार करून दुय्यम निबंधक कार्यालयात जमा केली. तसेच, विशालने पत्नीऐवजी दुसरीच महिला पत्नी असल्याचे भासवून ओळख दिली व तिचा फोटोही जोडला. ही जमीन अनिल निंबा पाटील (वय २९, रा. आडगाव) यांच्यासह आणखी एकास विक्री केली. त्यापोटी संशयितांनी खरेदीदारांकडून ४४ लाख ८६ हजार रुपयांची रोकड घेतली. अनिल पाटील यांनी कागदपत्रांची पाहणी केली असता, विशालच्या पत्नीऐवजी दुसऱ्याच महिलेचा फोटो असल्याचे त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी शहानिशा केली असता, हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये अशोक उबाळे याच्यासह विशाल दिंडे आणि एका महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

..

नोकरीच्या आमिषाने वृद्धेस गंडवले

मुलास नोकरी मिळवून देतो, असे सांगत एकाने वृद्धेची ९० हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी ललिता दिलीप तेजाळे (वय ६३, रा. जुना सायखेडा रोड, जेलरोड) यांनी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. रमेश मोतीराम कापडनीस (वय ६०, नर्मदा पार्कजवळ, सटाणा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. १ ऑगस्ट ते १३ ऑक्टोबर या कालावधीत संशयित रमेश कापडणीस यांनी ललिता यांना त्यांच्या मुलास नोकरी मिळवून देतो, असे आमिष दाखवून तेजाळे यांच्याकडून ९० हजार रुपये उकळले. पैसे मिळाल्यानंतर संशयिताने नोकरी दिली नाही. तसेच, पैसे देण्यास टाळाटाळ करून दमदाटी केली. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एस. ई. कांबळे हे करीत आहेत.

..

जेसीबी व्यवहारात पाच जणांनी घातला गंडा

जेसीबीचा व्यवहार करण्याच्या बहाण्याने पाच जणांनी मिळून जेसीबीमालकास चुना लावला. रामचंद्र अमृता ढेरिंगे (वय ७३, रा. ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे. दिलीप विश्‍वनाथ शिंदे (रा. जालना), अजिंक्य अमोल बेंडा उर्फ हुंबे पाटील (रा. ता. नेवासा, जि. नगर), गोपीनाथ होन उर्फ सोनू पाटील (रा. जिल्हा औरंगाबाद), रोहन उर्फ रोनित निवृत्ती पगार उर्फ मोहिते (रा. उपनगर) अशी या संशयितांची नावे आहेत. ढेरिंगे यांच्याकडे एमएच १४ सीजी ०४४५ क्रमांकाचा जेसीबी असून, त्याचा व्यवहार संशयित दिलीप शिंदे सोबत झाला होता. मात्र शिंदे याने करारनाम्याचा भंग करीत जेसीबी मशिन ढेरिंगे यांना न देता ते परस्पर अजिंक्य पाटील यास दिला. त्यामुळे ढेरिंगे यांची फसवणूक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images