Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कालिकेस जाणाऱ्या आठ बालकांना चिरडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

पहाटेच्या सुमारास कालिका देवीच्या दर्शनासाठी वडाळागावाततून निघालेल्या सात ते आठ अल्पवयीन मुलांना अज्ञात वाहनाने धडक दिली. यात, ११ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले. ऐन नवरात्रोत्सवात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

विशाल नामदेव पवार (११, रा. वडाळागाव) असे या अपघतात मृत्यूमुखी पडलेल्या बालकाचे नाव आहे. कृष्णा दत्तू खोडे (९), ऋषिकेश सुनील वाघ (१०), रोहन बापू मोरे (१२), साहिल खंडू कडाळे (१४), अश्विन दत्तू खोडे (१४), राहुल बापू मोरे (१५), तुषार गोविंद खाडम (१५, सर्व रा. वडाळागाव) अशी इतर जखमी मुलांची नावे आहेत. नवरात्रोत्सवात ग्रामदैवत कालिकेच्या दर्शनासाठी शहरवासीय मोठी गर्दी करतात. पहाटेच्या सुमारास दर्शनास अनेकजण पसंती देतात. रविवारी पहाटे तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास वडाळा गावातील ही मुले कालिकेच्या दर्शनाला पायी निघाली होती. साईनाथनगर येथील चौफुलीवर या मुलांना एका भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. यात विशाल नामदेव पवार हा मुलगा जागीच ठार झाला, तर इतर मुले जखमी झाली. अपघातानंतर वाहनचालक फरार झाला. या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी लागलीच या जखमींना पोलिस व्हॅनमधूनच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोज करंजे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वडाळागावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सुरक्षितता महत्त्वाची

पहाटेच्या वेळी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी घराबाहेर पडतात. यात महिलांची संख्याही मोठी असते. बहुतांश रस्ते निर्मनुष्य असल्याने वाहनचालक भरधाव वेगात वाहने चालवितात. अनेकदा अंधाराचा फायदा घेऊन चेन स्नॅचिंगसारखे प्रकार घडू शकतात. नागरिकांनी सुरक्षिततेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन या निमित्ताने पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कित्येक लटकतात फासावर, बातमीसुद्धा येत नाही

$
0
0

समता परिषदेतर्फे आयोजित कवीसंमेलनात संवेदनेचा हुंकार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'आमचचं आम्हाला मूल्य, बाजारात कुणीच विकत घेत नाही, कित्येक लटकतात फासावर, टीव्हीवर बातमीसुद्धा येत नाही...' शेतीच्या सद्यस्थितीवर मार्मिक भाष्य करणारे चळवळीतले कवी संदीप जगताप यांच्या या संवेदनशील शब्दांनी दादासाहेब गायकवाड सभागृहास अंतर्मुख केले. निमित्त होते राष्ट्रवादी काँग्रेस, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या वतीने माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कवीसंमेलनाचे.

सामाजिक-राजकीय घडामोडींपासून तर प्रेमभावना जागविणाऱ्या एकापेक्षा एक संवेदनशील कविता यावेळी सादर झाल्या. कवी शाहीर अनंत फंदी द्विशताब्दी स्मृती वर्ष व संगीतकार सुधीर फडके, कवी व लेखक गदिमा आणि पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीस हे कवी संमेलन समर्पित करण्यात आले होते. राज्याच्या विविध प्रांतातील नामांकीत कवींनी या संमेलनात सहभाग घेत सादरीकरणात रंगत आणली.

तर, 'एका कुंकूवापायी दूर, मैना उडून जाईन, राघू एकला राहीन, याद मैनेची येईन..' या कल्याण येथील कवी प्रा. प्रशांत मोरे यांच्या अतिशय तरल शब्दांनी श्रोत्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. पुण्याचे अनिल दीक्षित यांनी महागाईवर सादर केलेली कविता अन् नटसम्राटमधील उताऱ्याचे विडंबन सादर करत अमरावतीच्या नितीन देशमुख यांनी महागाईच्या मुद्द्यावर केलेल्या 'कोणी अच्छे दिन देता का अच्छे दिन?' या जळजळीत भाष्यालाही श्रोत्यांच्या टाळ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.

कवी रामदास फुटाणे यांनी या संमेलनात खास शैलीत 'मित्रो ...' म्हणून साद घालताच सभागृहाचा माहोल हल्का-फुल्का बनला. एकेक कवीच्या सादरीकरणादरम्यान फुटाणे यांचे चालू घडामोडींवरील मार्मिक भाष्य, विनोदी चारोळ्या अन् रंगतदार किस्से यांनी कवितेची मैफल उत्तरोत्तर रंगत गेली. मध्यंतरादरम्यान छगन भुजबळ यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. या सोहळ्यास सर्व क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांसह बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती होती.

परखड भाष्याला दाद

महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे यांची 'सरकार' कविता, नांदेडचे नारायण पुरी यांची गाजलेली 'प्रेमाचा जांगडगुत्ता' ही कविता, करमाळ्याचे सुरेश शिंदे यांनी राजकीय व्यवस्थेवर 'मतांचे पीक' या कवितेद्वारे केलेले भाष्य अन् ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब मांडणाऱ्या इगतपुरी येथील तुकाराम धांडे, लासलगावचे कवी प्रकाश होळकर, पुण्याचे भरत दौंडकर यांच्या कवीतांनाही रसिकांनी भरभरून दाद दिली.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरला राज्य कबड्डी अजिंक्यपद स्पर्धा

$
0
0

नाशिक : सिन्नर येथील आडवा फाटा येथे ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने व जिल्हा परिषद नाशिक व सह्याद्री युवा मंच सिन्नरतर्फे ६६ व्या वरिष्ठ गट पुरुष व महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

शासकिय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. सन १९८५ साली मनमाड येथे वरिष्ठ गटाच्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल ३३ वर्षांनी या स्पर्धा भरविण्याचा मान नाशिक जिल्ह्याला मिळाला आहे.

या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत राज्यातील महिलांचे २५ व पुरुषांचे २५ असे ५० संघातील सहाशेच्यावर खेळाडू सहभागी होणार आहेत. त्याच प्रमाणे या स्पर्धेला ५० प्रशिक्षक, ५० संघ व्यवस्थापक, १०० पंच व विविध जिल्ह्यातील संघटनांचे व राज्य संघटनेचे १०० पदाधिकारी तसेच १०० स्वयंसेवक असे १ हजाराच्यावर व्यक्ती यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तथा प्रो कबड्डी लीग मध्ये खेळलेले खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धा पाच दिवस चालणार आहेत. या स्पर्धेतून राष्ट्रीय अजिंक्य व निवड चाचणी स्पर्धेसाठी राज्याच्या पुरुष व महिला संघाची निवड होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोवर्धने महाविद्यालय

$
0
0

मविप्रच्या कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. उपप्राचार्य प्रा. देवीदास गिरी यांनी वाचनाचे महत्त्व विशद केले. यावेळी डॉ. कलाम यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. महाविद्यालयातील डॉ. एन. यू. पाटील, प्रा. डॉ. डी. डी. वाळके, डॉ. एस. ए. इंगळे, प्रा. यू. एन. सांगळे, प्रा. पी. जी. खळे, प्राध्यापक, प्राध्यापकतेतर कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देशमुख महिला महाविद्यालय

$
0
0

देशमुख महिला महाविद्यालय

नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै. बिंदू रामराव व देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात सांस्कृतिक विभागांतर्गत सरस्वतीपूजन व प्रतिमापूजनासह विविध कार्यक्रम झाले. अॅड. मिलिंद चिंधडे प्रमुख पाहुणे होते. विद्यार्थिनींनी मान्यवर कवींच्या कविता सादर केल्या. प्रा. स्मिता माळवे यांनी विद्यार्थिनींना 'नो गॅझेट डे'ची शपथ दिली. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना वाचन या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. कलाम यांच्या कार्याला उजाळा दिला. अॅड. चिंधडेंनी मंगेश पाडगावकरांची 'वाचन आहे प्रवास सुंदर...' ही कविता सादर केली. प्राचार्या डॉ. लीना पांढरे यांनी अधिकाधिक वाचन करण्याचा संदेश यावेळी दिला. सांस्कृतिक विभागप्रमुख व कार्यक्रम समन्वयक प्रा. स्मिता माळवे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. मीनल बर्वे यांनी परिचय करून दिला. पर्वणी साळवे हिने सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरब्याचा जल्लोश टिपेला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रोत्सव म्हणजे तरुणाईचा आनंदोत्सव. पारंपरिक राजस्थानी-गुजराती वेशभूषेतील तरुण-तरुणींकडून गरबा-दांडियाचा आनंद सध्या लुटला जात आहे. या उत्सवाचे अखेरचे अवघे तीन दिवस उरले असल्याने गरबा, दांडिया खेळणाऱ्यांचा जल्लोश टिपेला पोहोचला आहे.

अखेरचे दिवस मध्यरात्री बारावाजेपर्यंत गरबा, दांडिया सुरू ठेवण्यास मंडळांना परवानगी देण्यात आली असून, त्यामुळे तरुणाईच्या आनंदाला उधाण आले आहे. शहरातील विविध भागांमध्ये या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याने संपूर्ण शहरात गरब्याचा जल्लोष दिसून येत आहे. नवरात्रोत्सवात देवीच्या आराधनेबरोबरच गरबा व दांडिया खेळणे शुभ मानले जाते. या पारंपरिक उत्सवाला आता आधुनिक स्वरूपही प्राप्त झाले आहे. पारंपरिक वेशभूषांना आधुनिक टच देत तरुणाई या उत्सवात सहभागी होत आहे. गुजराती पारंपरिक गाणी, बॉलिवूडमधील गाणी, फ्यूजन अशा संगीतांमुळे प्रफुल्लित करणारा माहोल या ठिकाणी दिसून येत असून, त्यामुळे तरुणाईचा वाढता उत्साह वातावरणात चैतन्य निर्माण करीत आहे. दसऱ्याला सहसा कोणी गरबा व दांडिया खेळण्यास जात नसल्याने आज, मंगळवारी आणि बुधवारी तरुणांचा ओढा गरबा-दांडियाचा आनंद लुटण्याकडे राहणार आहे.

विशेष उपक्रमांनी रंगत

शहर, तसेच उपनगरांत विविध संस्था, मंडळांतर्फे विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून, तेथे नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याची स्थिती आहे. गंगापूररोड येथील समर्थ जॉगिंग ट्रॅक येथे नवरात्रोत्सवानिमित्त जागर आदिशक्तीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यात आमदार प्रा. देवयानी फरांदे, नगरसेविका स्वाती भामरे यांनीही गरब्यावर ठेका धरला होता. एसटी कॉलनी महिला मंडळ, स्पर्श महिला ग्रुप व दिशा महिला मंडळाच्या सदस्यांनीही या उत्सवात सहभाग घेतला. १०८ दिव्यांसह या ठिकाणी झालेले गरबा नृत्य नाशिककरांसाठी आकर्षणाचा विषय ठरले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आजपासून गरब्याची रंगत रात्री बारापर्यंत

$
0
0

\B

\Bम. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रोत्सवाची रंगत आज, सोमवारपासून दसऱ्यानिमित्त वाढत जाणार आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता. १५) दसऱ्यापर्यंत (ता. १८) गरबा, रास दांडिया रात्री बारापर्यंत सुरू राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहर पोलिसांचा मध्यरात्रीपर्यंत बंदोबस्त कायम राहणार आहे. निर्भया, तसेच दामिनी पथकासह स्थानिक पोलिस स्टेशनतर्फे बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. मुली व महिलांची छेडछाड रोखण्यासाठी या विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नवरात्रोत्सव मंडळांच्या संख्येत वाढ झाली असून, यंदा लहान-मोठी ३८२ मंडळांची नोंदणी पोलिसांकडे झाली आहे. गेल्या वर्षी शहरात लहान-मोठ्या अशा ३३७ नवरात्रोत्सव मंडळांनी नोंदणी केली होती. यंदा ही संख्या ४५ ने वाढून ३८२ झाली आहे. यामध्ये २६८ लहान मंडळे, ८५ मोठी मंडळे, तर ३५ मौल्यवान मंडळांचा समावेश आहे. शहरात ठक्कर डोम, मते लॉन्स, चोपडा लॉन्स बँक्वेट हॉल, गंगापूर रोडचे तुळजा भवानी मंदिर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गरबा, तसेच दांडियांचे सशुल्क आयोजन केले जाते. नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिकामाता, तसेच भगूरच्या रेणुकादेवीच्या यात्रांना घटस्थापनेपासून गर्दी होत असून, दसरा समीप येऊ लागला तशी गर्दीत वाढ होताना दिसते आहे. यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. मध्यरात्री ते पहाटेदरम्यान दर्शनासाठी महिलांचे प्रमाण मोठे असते. आता रात्री बारापर्यंत रास दांडिया खेळण्याची परवानगी असल्याने मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असणार आहे. या वेळी मुली, तसेच महिलांची छेडछाड, सोनसाखळ्या हिसकावणे, लूट असे प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेता, शहर पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री गस्ती पथकांचे नियोजन करण्यात आले असून, पहाटे चार ते सकाळी नऊ व सायंकाळी सहा ते रात्री अकरा अशा विविध वेळांत ही पथके गस्त घालत आहेत. यामध्ये महिलांच्या दामिनी, तसेच निर्भया मोबाइल व्हॅन पथकाच्या गस्तीपथकांचा प्रामुख्याने समावेश आहे. यासह सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशननिहाय राखीव पोलिस दल, गुन्हे शाखांची गस्तीपथके तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दांडिया, गरबा होत असलेल्या ठिकाणी प्रारंभीच बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वानपथक जाऊन तपासणी करीत आहेत. अशा ठिकाणी एक वरिष्ठ पोलिस अधिकारी व दोन कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. साध्या वेशांतील पोलिस कर्मचारी कार्यरत असून, मुलींची छेडछाड, तसेच गोंधळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘येमको’च्या चेअरमनपदी हर्षाबेन पटेल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

तालुक्यातील येवला मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी हर्षाबेन परेश पटेल यांची निवड करण्यात आली. संचालक मंडळीमधील दुहीमुळे बँकेचे चेअरमन पंकज पारख यांनी आपल्या पदाचा राजीनामा देणे पसंत केले. त्यामुळे महिनाभरानंतर बँकेच्या नूतन चेअरमन निवडीसाठी सहकार विभागाच्या वतीने सोमवारी बँकेच्या संचालक मंडळाची विशेष सभा घेण्यात आली.

'येमको' बँकेच्या या चेअरमनपदासाठीच्या निवड सभेत सहकारातील राजकारणाचे आगळे-वेगळे 'रंगढंग' पुन्हा एकवार समोर आले. हर्षाबेन परेश पटेल या आपल्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या संचालिका पद्मा सुनील शिंदे यांचा सात विरुद्ध सहा मतांनी पराभव करत बँकेच्या चेअरमनपदी विराजमान झाल्या.

पारख यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे राजीनामा दिला होता. बँकेच्या नूतन चेअरमन निवडीसाठी सहकार विभागाने निवडणूक कार्यक्रम घोषित करताना सोमवारी (दि.१५) बँकेच्या सभागृहात बँकेच्या संचालक मंडळाची बैठक घेतली. सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेत चेअरमनपदासाठी हर्षाबेन परेश पटेल व पद्मा सुनील शिंदे यांचा उमेदवारी अर्ज होता. माघारीच्या १५ मिनिटांच्या निर्धारित वेळेत दोघींपैकी कुणीही माघार न घेतल्याने मतदान घेण्यात आले. गोपनीय पद्धतीने चिठ्ठीद्वारे एकूण १३ संचालकांचे मतदान केले. पटेल यांना ७, तर शिंदे यांना ६ मते मिळाल्याने पटेल यांची निवड झाल्याचे जाहीर केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुरू, संतांची शिकवण आचरणात आणा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जीवन जगण्याची शक्ती गुरू आणि संतांकडून मिळते. त्यामुळे मनःशांती आणि सुखप्राप्तीसाठी संत आणि गुरू यांची शिकवण आचरणात आणून लोभ, मत्सर व क्रोधविरहित जीवन जगा, असा संदेश आनंदमूर्ती गुरू माँ यांनी सत्संगाच्या समारोपाच्या निरूपणात भाविकांना दिला.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहात ऋषीचैतन्य सेवा समितीच्या वतीने आनंदमूर्ती गुरू माँ यांच्या अमृतवर्षा या सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दि. ११ ते १४ ऑक्टोबर या काळात हा सत्संग सोहळा संपन्न झाला. या सत्संग सोहळ्याच्या समारोपाच्या निरूपणात आनंदमूर्ती माँ बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की संतांची शिकवण मानवाला खऱ्या अर्थाने परमार्थाच्या मार्गावार घेऊन जाते. सध्या प्रत्येकाच संपत्तीचा हव्यास बळावत चालला आहे. मानवामध्ये अध्यात्मिक विचारांचा प्रभाव कमी होत लोभीवृत्ती अधिक वाढत आहे. ही मानसिकता मनःशांती बिघडण्यास कारण बनते आहे. त्यामुळे गुरू तथा संतांचा शिकवण आचरणात आणावी. देशाची जडणघडण विद्यार्थ्यांच्या हाती आहे. विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि आध्यात्मिक ज्ञानाचा खजिना वाढविण्याची गरज आहे. अध्यात्म आणि साधनेचे महत्त्व मानवी जीवनात अधिक आहे. त्याचे मोल समजून घेणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. साधू, संत आणि सज्जन व्यक्ती समाजासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे सन्मार्गाचा पुरस्कार सर्वांनीच करायला हवा, असेही त्या म्हणाल्या. जिल्हाभरातून आलेले हजारो भाविक सत्संग सोहळ्यात सहभागी झाले होते. सत्संगास स्वामी भोलाराम परमहंस, आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, माजी महापौर अशोक मुर्तडक, गुरुमित बग्गा आदी उपस्थित होते.

--

\Bभक्तांना मिळाली मंत्रदीक्षा

\Bगंगापूररोड येथील शंकराचार्य कुर्तकोटी सभागृहात आनंदमूर्ती गुरू माँ यांनी शंभराहून अधिक भाविकांना रविवारी सकाळी १० वाजता मंत्रदीक्षा दिली. यावेळी आनंदमूर्ती गुरू माँ यांचे दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविक उपस्थित होते. गुरू साधनेच्या मार्गावरील तत्त्वे अमृतवर्षा सत्संगातून समजली. अध्यात्मासह विज्ञानवादी दृष्टिकोनातून सुसंस्कारित करण्यासाठी हा सत्संग महत्त्वाचा ठरला, असे मत यावेळी भाविकांनी व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘अखंडित वाचीत जावे!’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपण, रोज वाचनाशिवाय माझा दिवस वाया जाऊ देणार नाही, असा संकल्प करूया, असे आवाहन प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे यांनी केले.

त्र्यंबकेश्वर येथील मविप्रच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात झालेल्या वाचन प्रेरणादिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, की माणसाने भाषेनंतर लिपीचा शोध लावला, लाकडावर कोरून लिहिण्यापासून सुरुवात केली. हळूहळू प्रगती होत होत आज आपण मोबाइलमध्येच लिहू-वाचू लागलो. परंतु, ग्रंथांमध्ये, पुस्तकांमध्ये जी मौल्यवान विचारसंपत्ती दडून आहे ती वाचनाशिवाय, अभ्यासाशिवाय आपल्याला प्राप्त होणार नाही. आत्मसात केलेला विचार इतरांना सांगेन, विचारांच्या शिदोरीशिवाय समाजात ज्ञानाची गंगा प्रवाहित होणार नाही. त्यामुळे लोप पावत चाललेली वाचन संस्कृती प्रवाहित करण्यासाठी 'दिसामाजी काहीतरी लिहित जावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे।' या दासोक्तीप्रमाणे आपण रोज वाचलेच पाहिजे व इतरांनाही तसा आग्रह केला पाहिजे.

संयोजक ग्रंथपाल आनंदा जाधव, प्रा. सुरेश देवरे, प्रा. माधव खालकर, प्रा. सी. डी. खैरनार, डॉ. छाया शिंदे, डॉ. नयना पाटील, डॉ. संदीप माली, डॉ. नीता पुणतांबेकर, डॉ. शरद कांबळे, प्रा. मिलिंद थोरात, प्रा. संदीप गोसावी, प्रा. दrपाली पडोळ, प्रा. राजश्री शिंदे, प्रा. सुलक्षणा कोळी आदींसह सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

विविध बाबींसंदर्भात मार्गदर्शन

शब्दकोश कसे पाहावेत, ग्रंथ कसे वाचावेत, वाचन, चिंतन, मनन, अध्ययन या सर्व महत्त्वाच्या बाबींबाबत प्राचार्या डॉ. थिगळे यांनी मार्गदर्शन केले. विश्वकोशदर्शन, अभिवाचन आदी उपक्रम झाले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाने आयोजित केलेले ग्रंथप्रदर्शन पाच दिवसांकरिता खुले ठेवण्यात येत आहे, त्याचा विद्यार्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ग्रंथपाल जाधव व ग्रंथालय परिचर बाळासाहेब हांडगे यांनी केले. प्रा. माधव खालकर यांनी सूत्रसंचालन केले. जाधव यांनी आभार मानले. संजय गायकर, गोटीराम गोसावी आदींनी यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंध व्यक्तींना पांढऱ्या काठीचे वाटप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन व लायन्स क्लब ऑफ नाशिक कॉर्पोरेटतर्फे सोमवारी जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गरजू अंध व्यक्तींना पांढरी काठी, पेन ड्राइव्ह व धान्याचे वाटप करण्यात आले.

लायन्स क्लबचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. लायन्स क्लब हा नेहमी संस्थेसोबत असून, एका अंध व्यक्तीला रोजगारासाठी स्टॉल मिळवून देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. महिंद्रा अँड महिंद्राचे हिरामण आहेर यांनी एकविसाव्या शतकात ज्या तंत्रज्ञानाची गरज आहे. त्याचा वापर करून स्वविकास करण्याचे आवाहन उपस्थितांना केले. संस्थेचा परिचय मानद अध्यक्षा कल्पना पांडे यांनी केला. दि ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी शिष्यवृत्ती उपक्रम व पांढरी काठी दिनाचे महत्त्व विशद केले. या वेळी जनार्दन इंगळे व सचिन आहिरे या व्यक्तींना आरोग्यासाठी मदत, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व भगवान पवार या एका कॅन्सर पीडितास उपचारासाठी मदत करण्यात आली. दत्ता पाटील, राजीव व्यास, विलास पाटील, सोमेश्वर काबरा, सपना चांडक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोर पकडला

$
0
0

वाहनचोर पकडला

नाशिक : शहरातून दुचाकी चोरी करणारा संशयित आरोपी साहिल दिलावर शेख (२०, रा. भगूर) यास क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरलेली एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक गुरुवारी (दि. १८) गस्तीवर असतांना संशयित शेख अशोक स्तंभ परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ढोल्या गणपती मंदिर भागातील एका टायर दुकानाजवळ सापळा रचून त्यास अटक केली.

त्याच्या ताब्यातून एमएच १५ सीपी २२५१ या क्रमाकांची दुचाकी हस्तगत करण्यात आली. संशयिताने ही दुचाकी नाशिकरोड परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास नाशिकरोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा निराधार लेकींच्या पाठीशी

$
0
0

शु‌भवार्ता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिव्यांगांपाठोपाठ महापालिका आता विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित आणि निराधार महिलांच्या मदतीलाही धावली असून, समाजातील या उपेक्षित व दुर्लक्षित घटकांना आर्थिक सहारा देऊ केला आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर नाशिकमध्येही आता विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, तसेच निराधार महिला, तरुणींच्या लग्नासाठी महापालिकेच्या वतीने एक लाख रुपयापर्यंत आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. सोबतच त्यांच्या पाल्यांनाही आर्थिक आधार देण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे. या संदर्भातील प्रस्ताव प्रशासनाच्या वतीने येत्या महासभेवर सादर केला जाणार आहे. महिला व बालकल्याण विभागासाठी अंदाजपत्रकात राखीव असलेल्या पाच टक्के निधीतून या योजनांसाठी खर्च केला जाणार आहे.

आमदार बच्चू कडू डोसनंतर महापालिकेने शहरातील दिव्यांगांसाठी योजनांचा पेटारा खोलत, त्यांच्यासाठी विविध योजना जाहीर करीत अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानंतर आता महापालिका क्षेत्रातील निराधार, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटितांनाही आर्थिक सहाय्य देणार आहे. नवी मुंबईच्या धर्तीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नाशिकमघ्येही या महिलांसह त्यांच्या पाल्यांना आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. शहरात तीन वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, निराधार महिलांच्या लग्नासाठी एक लाखापर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार आहे. पतीच्या मृत्यूचा दाखला, परित्यक्ता असल्याचा दाखला, घटस्फोटित असल्याचा दाखला, तसेच रहिवासी पुरावा असणे या योजनेच्या लाभासाठी बंधनकारक असणार आहे. वार्षिक चार लाखांच्या आत उत्पन्न असणाऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. मुलीचा विवाह झाल्यानंतर दोन वर्षांच्या आत या योजनेसाठी अर्ज करणे बंधनकारक असेल. अर्जासोबत विवाह नोंदणी प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. सोबत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित, निराधार महिलांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठीही महापालिकेच्या वतीने शिष्यवृत्ती योजना राबविली जाणार आहे. या योजनेंतर्गत पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी चार हजार, पाचवी ते सातवीकरिता सहा हजार, आठवी ते दहावीकरिता आठ हजार, अकरावी-बारावीकरिता दहा हजार, पदवी शिक्षण घेणाऱ्यांसाठी १२ हजार, तर पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्यांसाठी सोळा हजार रुपये वार्षिक शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. याचबरोबर तांत्रिक शिक्षण घेणाऱ्यांनादेखील आठ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. अनाथ, निराश्रित मुलांच्या वार्षिक शैक्षणिक शुल्कासाठीही महापालिकेच्या वतीने अर्थसहाय्य दिले जाणार आहे. त्यात सहा हजार ते पंचवीस हजारापर्यंत अर्थसहाय्य राहणार आहे. महापालिका शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र याचा लाभ घेता येणार नाही. महासभेच्या मंजुरीनंतर या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे.

दत्तक पालकांनाही मदत

अनाथ व निराधार मुलांना दत्तक घेणाऱ्यांना पालकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान देण्याची योजना महापालिकेने तयार केली आहे. अनाथ मुले दत्तक घेताना कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. या निर्णयामुळे अनाथ व निराश्रित बालकांची संख्या कमी होण्यास मदत होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. गुजर शाळेत कार्यक्रम

$
0
0

डॉ. गुजर शाळेत कार्यक्रम

देवळाली कॅम्प : येथील डॉ. गुजर सुभाष शाळेत सकाळच्या सत्रात डॉ. अबदुल कलाम यांच्या प्रतिमेचे विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. मुख्याध्यापक बन्सीलाल गाडीलोहार, अनुपमा पाटील, ज्योती भाटिया , लता दियालानी व्यासपीठावर होते. यावेळी वाचन प्रेरणा दिनाबद्दल मुख्याध्यापक गाडीलोहार यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. हिंदी, मराठी, इंग्रजी विषयांतील स्पर्धांत उत्कृष्ट वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दीपाली जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रुपाली पवार यांनी आभार मानले.

---

वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे नेत्र अन् दंत तपासणी शिबिर

--

वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त डॉ. कलाम यांना अभिवादन

--

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती नाशिकरोड परिसरातील वृत्तपत्र विक्रेत्या बांधवांनी वाचन प्रेरणादिन आणि वृत्तपत्र विक्रेतादिन म्हणून साजरा केली.

वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे नेत्र आणि दंत तपासणी शिबिर झाले. ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करून त्यांना गौरविण्यात आले. नेत्र आणि दंत तपासणी शिबिरासाठी जैन श्रावक संघ आणि नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता सेवाभावी संस्थेने पुढाकार घेतला. सोमनाथ माळवे, नारायण नागरे, नरेश भावे, किरण ठोसर या ज्येष्ठ वृत्तपत्र विक्रेत्यांचा सत्कार करण्यात आला. नाशिकरोड वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष सुनील मगर, महेश कुलथे, भारत माळवे, गौतम सोनवणे, सतीश आहेर, किशोर सोनवणे, बाळासाहेब ओहोळ, सचिन गडाख, मनोहर खोले, उल्हास कुलथे, सुभाष घिया, राजेंद्र मंडलेचा, डॉ. किरण धाडिवाल, जितेंद्र भावे, राजेंद्र धाडिवाल, डॉ. आनंद भुजबळ, शुभांगी पवार, महेंद्र शहा, उत्तम संघवी, राजेंद्र भंडारी, मनोज गिडिया, दीपाली पुरोहित आदी उपस्थित होते.

--

'मनविसे'तर्फे सत्कार

पाऊस, ऊन, थंडी असा कशाचाही विचार न करता भल्या पहाटे उठून वाचकांना अविरत सेवा देणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'मनविसे'तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. वृत्तपत्र विक्रेता ते भारताचे राष्ट्रपती असा विस्मयकारक प्रवास करणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त हा सोहळा झाला. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशिकांत चौधरी, बाजीराव मते, नाशिकरोड अध्यक्ष नितीन धानापुणे, संदीप आहेर, सागर दाणी, दीपक बोराडे, स्वप्निल विभांडिक आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंझर झोनचे वृत्त हे षडयंत्र

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपने एका संस्थेकडून केलेल्या जनमत चाचपणीचा धुळे लोकसभा मतदारसंघातील सर्वेक्षणाचा कौल माझ्या बाजूने असतानाही विरोधकांनी षडयंत्र रचून चुकीच्या पद्धतीने प्रसारमाध्यमांना माहिती पुरवल्याचा आरोप संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केला आहे. भाजपने धुळे लोकसभा मतदारसंघासाठी केलेल्या सर्वेक्षणात आपल्याला १९ टक्के पसंती मिळाल्याचे वृत्त खोडसाळपणाचे असून, या सर्व्हेत ५० टक्के जनता पाठीशी असल्याचा दावा केला आहे. त्या संदर्भातील पुरावेही त्यांनी सादर केले असून, डॉ. भामरे डेंजर झोनमध्ये असल्याचे वृत्त म्हणजे विरोधकांनी केलेली निव्वळ दिशाभूल असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस आणि भाजपने राज्यातील मतदारसंघांचे सर्वेक्षण करीत, त्यातून राज्यात सहा खासदार डेंजर झोनमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यात धुळे लोकसभा मतदारसंघातील डॉ. भामरेंना १९ टक्के नागरिकांची पसंती असल्याचे वृत्त पसरले होते. धुळे लोकसभा मतदारसंघाच्या सहा विधानसभा क्षेत्रांत झालेल्या सर्व्हेत संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांना तब्बल ५० टक्के जनतेने पसंती दिलेली असतानाही काही विरोधकांनी प्रसारमाध्यमांना चुकीची आकडेवारी देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप डॉ. भामरे यांनी केला आहे. या पुराव्यासाठी डॉ. भामरेंनी सर्व्हेची प्रत जाहीर केली असून, त्यात डॉ. भामरे यांना ५० टक्के जनतेने योग्य खासदार असल्याचे म्हंटले आहे. ३८ टक्के जनतेने इतरांना पसंती दिली आहे, तर १२ टक्के जनतेने आपली भूमिका तटस्थ ठेवली आहे. धुळे ग्रामीणमध्ये भाजपला ४३ टक्के, धुळे शहरात ४३ टक्के, सिंदखेडा मतदारसंघात ४४ टक्के, मालेगाव मध्य १० टक्के, मालेगाव बाह्य ५० टक्के, तर बागलाण विधानसभा मतदारसंघातून भाजपला ४१ टक्के पसंती आहे. असा स्पष्ट सर्व्हे असतानाही विरोधकांनी चुकीच्या वावड्या उठवून मतदारांची दिशाभूल सुरू केल्याचे डॉ. भामरे यांनी म्हटले आहे.

कोट...

आम्ही खासदार किंवा आमदार कोणत्या मतदारसंघात कमी पडतो आहोत, आगामी काळात आम्हाला कोणत्या ठिकाणी सुधारणा कराव्या लागतील, यासाठी हा सर्व्हे करण्यात आला होता. हा सर्व्हे गोपनीय ठेवावा अशा सूचनादेखील सर्वांना देण्यात आल्या होत्या. असे असतानाही विरोधकांनी कोणताही ठोस पुरावा नसताना मी डेंजर झोनमध्ये असल्याची चुकीची माहिती प्रसारमाध्यमांना पुरवून त्यांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याने मला नाइलाजाने हा सर्व्हे जनतेसमोर सादर करावा लागला आहे.

- डॉ. सुभाष भामरे, संरक्षण राज्यमंत्री

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कामाच्या वेळेचा खाद्य महामंडळाला फटका

$
0
0

संदीप देशपांडे, मनमाड

भारतातील पहिल्या क्रमांकाचे भारतीय खाद्य गोदाम म्हणून लौकिक असलेले मनमाड येथील अन्न धान्य महामंडळाला रेल्वेवर अवलंबून राहावे लागत आहे. धान्य मंडळासाठी निर्धारित केलेली वेळ व या महामंडळाची स्वत:ची कामाची वेळ यातील तफावतमुळे अन्न धान्य महामंडळाला आर्थिक फटका बसत आहे. मात्र नाशिक जिल्ह्यात केंद्रीय वखार मंडळाकडे वितरण व्यवस्था दिल्याने सर्वसामान्य नागरिकांना अद्याप रेल्वे व धान्य मंडळाच्या वेळेतील फरकाचा फारसा फटका बसलेला नाही. डॅमरेज चार्जेस वेळोवेळी भरावे लागत असल्याने आता तरी रेल्वेने वेळेबाबत काहीतरी तडजोड करावी व दिलासा द्यावा अशी मागणी महामंडळ प्रशासनाची आहे.

रेल्वेने धान्य रॅक खाली करण्यासाठी अन्न धान्य मंडळाला सकाळी ६ ते रात्री १० ही वेळ निर्धारित केली आहे. तर अन्न धान्य महामंडळाचे कामाची वेळ सकाळी १० ते ५.३० अशी आहे. आता सकाळी काम सुरू करायचे किंवा रेल्वे प्रमाणेरात्री १० पर्यंत सुरू ठेवायचे तर ते महामंडळ प्रशासनाला शक्य नाही. त्यांना कामगारांना ओव्हरटाइम द्यावा लागतो. आणि तसे प्रत्येक दिवशी शक्य नसल्याचे प्रशासन सांगते. त्यात रेल्वेने रॅक खाली करण्यासाठी विशिष्ट वेळ दिलेली असल्याने त्या वेळेत काम पूर्ण न झाल्यास रेल्वेला

डॅमरेज चार्जेस देणे महामंडळाला अनिवार्य आहे., म्हणूनच हा आर्थिक बोजा मंडळासाठी डोकेदुखी ठरत आहे. केंद्रापर्यंत पाठपुरावा करून तसेच रेल्वे मंत्रालयाकडे मागणी करूनही वेळेचा तिढा सुटलेला नाही. मात्र रेल्वे प्रशासन निर्णयावर ठाम असल्याने तिढा कधी सुटणार हा प्रश्न कायम आहे.

हे खाद्य निगम महामंडळाच्या गोदामात सध्या लाखो मेट्रिक टन गहू, तांदळाचा साठा आहे. देशातील लष्कराला मनमाडच्या याच गोदामातून तांदूळ जात असल्याने देशाच्या सैनिकांसाठी सध्या नियमित स्वरुपात तांदूळ पुरवठा होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादित मालाचा चांगला भाव मिळावा, ग्राहकांना चांगले धान्य योग्य दरात उपलब्ध व्हावे हा दृष्टिकोन ठेऊन महामंडळ कार्यरत असल्याचे क्षेत्रीय अधिकारी अमोल सदानंदे व सहकारी अधिकारी राकेश रंजन, बी एस कुलकर्णी व अण्णासाहेब आवारे यांनी सांगितले. सध्या मंडळात ४५ अधिकारी,१६४ कर्मचारी व ३६१ कामगार कार्यरत आहेत.केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या महामंडळात एकूण ११२ मोठी व १२ लहान अशी १२४ गोदाम आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिदास प्रकरणी अल्पसा दिलासा

$
0
0

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिराशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा होऊन प्रशासनाने मराठी नाटकांवर भाड्याव्यतिरिक्त लावलेला अधिभार मागे घेण्याचे आश्वास दिले आहे. त्यामुळे नाटकाला काही अंशी दिलासा मिळाला आहे. सोमवारी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे, स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्याशी अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी चर्चा केली. त्यावर प्रशासनाने नाटकाला काही अंशी दिलासा दिला असून, संगीत व नृत्य याबाबत मात्र काहीच निर्णय झालेला नाही. नाटकाचा अधिभार मागे घेण्याचे मान्य केल्याने कालिदास नाट्यगृहावर मराठी नाटकांचा बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. कालिदासमधील विविध त्रुटी सोडविण्यासाठी तत्काळ नियोजन करण्याचेही मान्य केले असून, मराठी नाटकांचा आस्वाद सुसज्ज नाट्यगृहात नाशिककरांना घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्ययनातून ‘त्यांच्या’त वाढतेय अॅबिलिटी!

$
0
0

'लर्निंग डिसअॅबिलिटी' असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जन्मतःच अध्ययन क्षमता कमी असूनही भविष्यातील उज्ज्वल करिअरच्या दिशा त्यांनी ठरविल्या आहेत. करिअर घडविताना अध्ययन क्षमता वाढविण्याची थेरेपी घेताना आत्मविश्वास आणि संवाद कौशल्याचे धडेही ते गिरवत आहेत. त्यासाठी तेजस्वी दिवे, ग्रिटिंग्ज आणि नोटपॅड स्वतः बनवत त्यांच्या विक्रीतून अंक गणित, अक्षरज्ञान आणि संभाषणाचे कौशल्य ते आत्मसात करत आहेत. ही गोष्ट आहे, अॅबिलिटी फाउंडेशनमध्ये अध्ययन घेणाऱ्या विद्यार्थ्यांची.

'लर्निंग डिसअॅबिलिटी' आजार असलेल्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनासाठी कॉलेजरोडला अॅबिलिटी फाउंडेशन काम करते. काही विद्यार्थ्यांना जन्मतःच 'लर्निंग डिसअॅबिलिटी' हा न्यूरॉलॉजिकल आजार असतो. यात अक्षर आणि अंकांचा बोध त्यांना होत नाही. अशा विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढावी यासाठी मानसशास्त्रीय संकल्पनांच्या आधारे अक्षर आणि संख्यांच्या ओळखीत पारंगत करण्याचा वसा तरुणा समनोत्रा यांनी उचलला आहे. पंचवटी कॉलेजमधून एम. ए. क्लिनिकल सायकॉलॉजीची पदवी त्यांनी घेतली आहे. 'लर्निंग डिसअॅबिलिटी'च्या विद्यार्थ्यांमधील अध्ययन क्षमता वाढविण्यासाठी त्यांनी गेल्या वर्षी फाउंडेशनची सुरुवात केली. शालेय शिक्षण घेणारे ६ ते २० वर्षे वयोगटातील १५ विद्यार्थी सध्या फाउंडेशनध्ये रोज सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत येतात.

पालकांसह शिक्षक आजाराबाबत अनभिज्ञ

विद्यार्थी आणि आजाराबाबत तरुणा सांगतात, की 'लर्निंग डिसअॅबिलिटी' हा आजार वेळीच लक्षात यायला हवा. या आजारावर कायमस्वरुपी उपचार नाहीत. पण मानसशास्त्रीय उपचारांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये अध्ययन क्षमतेत निश्चितपणे वाढ करता येते. अनेक शाळांत असे विद्यार्थी आहेत. पण मानसिक आजारांबाबत पालक आणि शिक्षक दोघेही अनभिज्ञ आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून अशा विद्यार्थ्यांवर उपचार केले जात आहेत. विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेत वाढ होण्यासाठी वेगवेगळे प्लॅन तयार केले आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा, बौद्धिक क्षमतेचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्याला शिकविण्यात येते. विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय उपचारांसोबतच चित्रकला, नृत्य, गायन यांचेही धडे दिले जातात.

प्रवेशापूर्वी समुपदेशन

फाउंडेशनमध्ये विद्यार्थ्यांला भरती करण्यापूर्वी पालकांचे व विद्यार्थ्यांचे समुपदेशन केले जाते. त्या अहवालानुसार विद्यार्थ्यावरील थेरेपींची पद्धती ठरते. आर्थिक परिस्थिती कमकुवत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पंखांत बळ भरण्यासाठी फाउंडेशन पुढाकार घेत असल्याचे तरुणा सांगतात. पालकांना विद्यार्थ्याच्या लर्निंग अॅबिलिटीबाबत संशय असल्यास मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा, असेही त्या सांगतात.

अध्ययनाला उपक्रमाची साथ

अध्ययन क्षमतावाढीसाठी विद्यार्थी सध्या दिवे, ग्रिटिंग्ज आणि नोटपॅड तयार करीत आहेत. यातून विद्यार्थ्यांची संख्या ओळख अधिक चांगली होते. त्यांनी तयार केलेल्या वस्तू शाळा-कॉलेजांमध्ये विकतात. यावेळी सर्व व्यवहार विद्यार्थी करतात. यातून त्यांच्यात संख्या, अक्षरज्ञानासोबतच संभाषण कौशल्य आणि आत्माविश्वास वाढतो. विद्यार्थ्यांनी विक्री केलेल्या वस्तूंच्या उत्पन्नातून फाउंडेशनचा खर्च उचचला जातो. फाउंडेशनच्या माध्यमातून स्कूल बस आणि 'लर्निंग डिसअॅबिलिटी' असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा लवकर सुरू करणार असल्याने समनोत्रा सांनी सांगितले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनचोर पकडला

$
0
0

वाहनचोर पकडला

नाशिक : शहरातून दुचाकी चोरी करणारा संशयित आरोपी साहिल दिलावर शेख (२०, रा. भगूर) यास क्राइम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून चोरलेली एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली. शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक गुरुवारी (दि. १८) गस्तीवर असतांना संशयित शेख अशोक स्तंभ परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी ढोल्या गणपती मंदिर भागातील एका टायर दुकानाजवळ सापळा रचून त्यास अटक केली.

त्याच्या ताब्यातून एमएच १५ सीपी २२५१ या क्रमाकांची दुचाकी हस्तगत करण्यात आली. संशयिताने ही दुचाकी नाशिकरोड परिसरातून चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास नाशिकरोड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शरीरात कापसाचा बोळा प्रकरणाची चौकशी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

डॉ. झाकिर हुसैन रुग्णालयमध्ये प्रसूतीदरम्यान डॉक्टर आणि नर्सच्या हलगर्जीपणामुळे कापसाचा बोळा महिलेच्या शरीरातच राहिल्याच्या घटनेची महापालिकेच्या वैद्यकीय व आरोग्य अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली आहे. संबंधित रुग्णालय प्रमुखाने या प्रकरणात प्राथमिक अहवाल सादर करीत, डॉक्टर सोडून एका नर्सवर त्याची जबाबदारी ढकलली होती. त्यामुळे आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल गायकवाड यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी डॉ. प्रशांत थेटे यांची नियुक्ती केली असून, त्यांना तीन दिवसांत चौकशी अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेच्या डॉ. हुसैन रुग्णालयात २२ सप्टेंबर रोजी महिलेची प्रसूती करताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेच्या शरीरात कापसाचा बोळा राहिला. महिलेला प्रसूतीनंतर डिस्चार्ज दिल्यानंतर वेदना जाणवू लागल्या. त्यामुळे महिला तपासणीसाठी डॉ. हुसैन रुग्णालयात पुन्हा आली. त्यावेळी प्रसूतीनंतर वेदना होतातच, असे कारण देत डॉक्टरांनी वेदनेची तपासणी न करता महिलेला माघारी पाठविले. महिलेला होणाऱ्या वेदनांचे प्रमाण अधिक वाढले. महिलेच्या तिच्या नातेवाइकांसह रुग्णालयात पुन्हा आली. डॉक्टरांवर दबाव आणल्यानंतर महिलेची तपासणी करण्यात आली. त्या तपासणीमध्ये महिलेच्या शरीरात प्रसूतीवेळी कापसाचा बोळा राहिल्याचे समोर आले. त्यानंतर डॉक्टरांनी ऑपरेशन करून महिलेच्या शरीरातील कापसाचा बोळा बाहेर काढला. त्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या हलगर्जीपणाबाबत जाब विचारला. त्यानंतर रुग्णालय प्रमुख डॉ. जयंत फुलकर यांनी या घटनेची प्राथमिक चौकशी करून पालिकेला अहवाल सादर केला. त्यात शस्रक्रियेदरम्यान उपस्थित असलेल्या नर्सवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवण्यात आला. सदरील शस्रक्रियेत स्त्रीरोग तज्ज्ञांचाही समावेश असताना त्यांना मात्र वाचवण्याचा प्रयत्न दिसून आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images