Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पोलिस मुख्यालयात सॅनेटरी वेंडिंग मशिन्स

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ग्रामीण पोलिस दलातर्फे सुरू करण्यात आलेल्या जागर स्त्री आरोग्याचा या उपक्रमांतर्गत आज, मंगळवारी नाशिक ग्रामीण पोलिस मुख्यालयात सॅनेटरी नॅपकीन वेंडिंग मशिन्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या वेळी महिलांच्या आरोग्यविषयक समस्या व उपाययोजनांवर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.

हल्लीच्या धकाधकीच्या काळात महिलांना घर आणि नोकरी अशी दुहेरी जबाबदारी पार पाडावी लागते. यामुळे महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. महिलेचे आरोग्य बिघडले, की कुटुंबाचे स्वास्थ्य बिघडते. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण पोलिस दलाने जागर स्त्री आरोग्याचा हा उपक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत आज आडगाव पोलिस मुख्यालयातील बहुउद्देशीय हॉलमध्ये आरोग्यविषयक समस्या व उपाय याबाबत व्याख्यान झाले. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, रोहिणी संजय दराडे, मिसेस ग्लोबल युनायटेड लाइफटाइम क्वीन नमिता कोहक, मनमाड उपविभागाच्या सहाय्यक पोलिस अधीक्षक रागसुधा आर., तसेच जिल्ह्यातील पोलिस सखी मंचच्या सदस्या, महाविद्यालयीन विद्यार्थी व महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होत्या. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सॅनेटरी नॅपकीन वेंडिंग मशीन सुविधेचे अनावरण करण्यात आले. स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुवर्णा वापर यांनी महिलांना कामाच्या ताणामुळे निर्माण होणाऱ्या समस्या, रोग व्याधी, वंध्यत्व उपचार, गर्भसंस्कार याबाबत माहिती दिली. नमिता कोहक यांनी मनोगत व्यक्त केले. महिलांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत महिलांना जागरूक करणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे ग्रामीण पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी सांगितले. पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा महाजन यांनी प्रास्ताविक केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पार्थिवावरील अंत्यसंस्कारासाठी दीड तासांची प्रतीक्षा

$
0
0

अमरधाममधील विद्युत शवदाहिनी अवघ्या १२ दिवसांत बंद

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील अमरधाममध्ये पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेली विद्युत शवदाहिनी नावापुरतीच असल्याचे दाहक वास्तव समोर आले आहे. पारंपरिक पद्धतीने दहन करण्याऐवजी विद्युत शवदाहिनीद्वारे अंत्यसंस्काराचा निर्णय एका कुटुंबाने घेतला. मात्र, ऐन अंत्यसंस्काराच्या वेळीच विद्युत शवदाहिनीचा दरवाजा उघडला गेला नाही. शवदाहिनी सुरू होईल म्हणून तब्बल दीड तासांची प्रतीक्षा केली. त्यानंतरही शवदाहिनी सुरू न झाल्याने अखेर नाइलाजाने पार्थिवावर पारंपरिक पद्धतीने अग्निडाग देऊन अंत्यसंस्कार करावे लागले. हा भावनांवर घाला घालणारा हा प्रसंग मंगळवारी शहरातील कर्णिक कुटुंबीयांवर गुदरला.

स्मार्ट सिटीअंतर्गत ५ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचवटीतील अमरधाममध्ये विद्युत शवदाहिनीचे लोकार्पण केले. त्याला अवघे १२ दिवस होत नाही तोच शवदाहिनी बंद पडल्याचा अनुभव शरणपूर रोड परिसरातील कर्णिक कुटुंबीयांना आला. इन्शुरन्स कॉर्पोरेशन इम्प्लॉइज युनियनचे ज्येष्ठ नेते माधवराव कर्णिक (वय ८६) यांचे मंगळवारी निधन झाले. एलआयसीमध्ये प्रथम श्रेणी अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. निवृत्तीनंतर एलआयसी कर्मचाऱ्यांच्या युनियन उभारणीत त्यांनी पुढाकार घेतला होता. कर्णिक निधनानंतर त्यांच्यावर विद्युत शवदाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला. कर्णिक यांचे पार्थिव मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास पंचवटीतील अमरधाममध्ये आणण्यात आले. मात्र, पिन तुटल्याने शवदाहिनीचा दरवाजाच उघडत नव्हता. तब्बल दीड तास वाट पाहिली. त्यामुळे पार्थिवासह कर्णिक कुटुंबीय आणि अंत्यसंस्कारास उपस्थित सर्व जण ताटकळत राहिले. अखेर शवदाहिनीत अंत्यसंस्कार करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने कर्णिक कुटुंबीयांनी नाइलाजाने पारंपरिक पद्धतीने अंत्यसंस्काराचा निर्णय घ्यावा लागला.

मनपाचा भोंगळ कारभार

महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा फटका अंत्यसंस्काराच्या वेळेसही बसू लागला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत सुविधा होतात. त्यासाठी जबाबदार व्यक्तीची नेमणूक का होत नाही, असा संतप्त सवाल या वेळी उपस्थितांनी विचारला आहे. स्मार्ट सिटीच्या विद्युत शवदाहिनीच्या तांत्रिक बाबी सांभाळण्यासाठी इंजिनीअरची नेमणूक व्हावी, अमरधाममधून शवदाहिनी बंद असल्याचे कळताच वेळीच दुरुस्तीसाठी व्यक्ती पाठविण्यात यावा, मृत्यूनंतर महापालिका यातना सहन करायला का लावते, नागरिकांच्या सोयींबाबत अभाव असतोच; पण अंत्यसंस्काराच्या सुविधेतही महापालिकेचा कसूर दिसून येतो. याला जबाबदार कोण, असा प्रश्न ज्येष्ठ कामगार नेते करुणासागर पगारे यांनी या वेळी व्यक्त केला.

\Bडिझेल शवदाहिनीही बंद

\Bअमरधाममधील डिझेल शवदाहिनीही कित्येक महिन्यांपासून बंद आहे. ही शवदाहिनी बंद असल्याची समस्या कित्येक महिन्यांपासून आहे. त्याचप्रमाणे अवघ्या १२ दिवसांत बंद पडलेल्या विद्युत शवदाहिनीची समस्याही कायम राहणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

\Bइंजिनीअर केव्हा येणार?

\Bडिझेल शवदाहिनीचे काम सुरू असून, काही महिन्यांत ती पूर्ववत सुरू होईल, असे अमरधाममधील महापालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले. 'आम्हाला विद्युत शवदाहिनीतील तांत्रिक बाबींची माहिती नाही. शवदाहिनी सुरू झाल्यापासून रोज किमान चार ते पाच पार्थिवांवर अंत्यसंस्कार होतात. मात्र, अचानक उद्भवलेल्या तांत्रिक अडचणी आम्हाला समजत नाहीत. महापालिकेला संबंधित अडचणींबाबत कळविले आहे. जेव्हा इंजिनीअर येतील, तेव्हा विद्युत शवदाहिनी सुरू होईल,' असे अमरधाम येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीसंघर्षाची धार तीव्र

$
0
0

जायकवाडीला पाणी देण्यास लोकप्रतिनिधींचा विरोध

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक-नगरच्या धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्याने नाशिक व नगरमधून विरोध वाढू लागला आहे. नगरमधील सर्वपक्षीय नेत्यांनी विरोधाची मोट बांधल्यानंतर नाशिकमध्येही उशिरा का होईना लोकप्रतिनिधी जागे झाले असून, नाशिकच्या धरणांमधून पाणी सोडण्यास विरोध करू लागले आहेत. यामुळे पाणीसंघर्ष तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पाणी वाटपासंर्दर्भात नुकतीच औरंगाबाद येथे बैठक झाली. त्यात औरंगाबादने सहा ते सात टीएमसी पाण्याची मागणी नोंदवली आहे. या विरोधात नगरमधील राजकीय नेते आणि शेतकऱ्यांनी मोट बांधत एल्गार पुकारल्यानंतर नाशिकमधूनही विरोध वाढू लागला आहे. नाशिक जिल्ह्यात दहा तालुक्यांमधील दुष्काळाची दाहकता लक्षात घेत भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी या विरोधात उशिरा का होईना पाणी न सोडण्याची भूमिका जाहीर करीत जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. त्या पाठोपाठ आता शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेनेही पाणी सोडण्याच्या विरोधात भूमिका घेण्याची तयारी सुरू केल्याने पाण्याचा वाद पुन्हा उफाळून येणार आहे. आज, बुधवारी पाण्यासंदर्भात सर्वपक्षीय बैठक होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पाणी सोडण्याचा निर्णय झाला, तर नाशिक शहरावर पाणीकपातीचे संकट गहिरे होणार आहे. जायकवाडी धरणात पिण्यासाठी पुरेसा पाणीसाठा असतानाही केवळ समन्यायी पाणीवाटपानुसार नाशिक-नगरच्या धरणातून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जायकवाडी धरणात मृतसाठा २६ टीएमसी व जिवंत पाणीसाठा २७ टीएमसी आहे. त्यामुळे जवळपास ५३ टीएमसी पाणीसाठा आहे. परंतु, नाशिकमधील दारणा आणि गंगापूर धरण समूहात अवघा १५ टीएमसी पाणी आहे. त्यामुळे दारणा आणि गंगापूर धरण समूहातून चार किंवा पाच टीएमसी पाणी सोडल्यास नाशिक शहरासह या पाणीसाठ्यावर अवलंबून असलेल्या नाशिकच्या पश्चिम पट्ट्यावर पाणीबाणीचे संकट कोसळणार आहे. गंगापूर धरणातील गाळ बघता हा साठा सात ते आठ टीएमसीवर येणार आहे. त्यात शेतीचाही मोठा वाटा आहे. त्यामुळे पश्चिम पट्ट्यातील ३५ लाख लोकसंख्येला पुढील नऊ महिने शेतीलाही पाणीपुरवठा शक्य नसल्याने जिल्ह्यातच पाण्यावरून संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे.

..

दहा तालुक्यांत भीषण दुष्काळ

नाशिकसह मालेगाव, सिन्नर, नांदगाव, बागलाण, देवळा, चांदवड, इगतपुरी, निफाड, येवला या दहा तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह या तालुक्यांची तहान भागवण्याचा प्रश्न असताना जायकवाडीला पाणी सोडणे प्रशासनाला महागात पडणार आहे. सद्यस्थितीत निम्म्या तालुक्यात आज टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

...

धरण समूहातील पाणीसाठा

- गंगापूर - ८८.३८ टक्के

- कश्‍यपी - ९९.६७ टक्के

- गौतमी-गोदावरी - ९९.७९

- दारणा - ९२.७६ टक्के

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

यंत्रणेने दाखवावे गांभीर्य

$
0
0

राज्यात बालविवाह आणि कुमारीमातांची समस्या बिकट होत असून, त्यात अडकलेल्या मुलींची सुटका करण्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यांवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी राज्यातील १७ जिल्ह्यांमध्ये आयोगाच्या पुढाकाराने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. मात्र, या मोहिमेबाबत यंत्रणेने पुरेसे गांभीर्य दाखविण्याची गरज असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भातील उपाययोजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्याचे मतही मांडले आहे.

अंकुश, पारदर्शकतेची निकड

सामाजिक दृष्टीने हा विषय अत्यंत गंभीर आहे. मुलींना शिकविण्यासाठी परावृत्त न करणे, लोकशिक्षणाचा अभाव, मुलींचे लवकर लग्न होणे अशा बाबींकडे आजही दुर्लक्षच होत असते. त्यादृष्टीने ही मोहीम योग्य पाऊल आहे, त्याचे स्वागतच करूया. मात्र, ही मोहीम म्हणजे पुन्हा ये रे माझ्या मागल्या असे होता कामा नये. त्यावर अंकुश असावा व ती पारदर्शक व्हावी.

-सायली बिरारी

बालरक्षकांची भूमिका महत्त्वाची

राज्यात शिक्षण विभागाकडून अंदाजे वीस बालरक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. बालमजुरी, बालविवाह, शोषण या विषयांवर हे रक्षक काम करतात. आरोग्य, शिक्षण, मानवी हक्क आणि सामाजिक स्वीकारार्हता या सगळ्याच पातळ्यांवर बालिकांचे हक्क जपले जावेत यासाठी हे रक्षकही सोबत काम करणार असतील, तर ते अधिक योग्य ठरू शकेल.

-विनोद खैरनार

सकारात्मक प्रयत्न स्वागतार्ह

मुलगी ओझे असण्याचा समज आजही काही ठिकाणी आहे. मात्र, अशी स्थिती असतानादेखील अनेक क्षेत्रांमध्ये मुली अग्रेसर ठरताना दिसून येत आहेत. मुली मुलांच्या बरोबरीने गुणी ठरत आहेत. आता मुलींना वैद्यकीय उपचार वेळेत मिळणे गरजेचे झाले आहे. प्रतिकूल स्थितीतील मुलींचे मन खंबीर करण्यासाठी प्रयत्न होत असतील, तर त्याचे स्वागतच करता येईल.

-ज्ञानेश्वर बागुल

तक्रारींची त्वरित घ्यावी दखल

मुलींचे सातत्याने शोषण, बालविवाह आणि कुमारीमाता या तिन्ही महत्त्वाच्या समस्या आहेत. शोषणाबद्दल आजही अपेक्षित आवाज उठविला जाताना दिसत नाही. तक्रारी केल्यास सामाजिक पातळीवरील दबाव वाढतो. अशा तक्रारींची तात्काळ दखल घेतली जाणे खूप महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीनेही वेळीच योग्य ती पावले उचलली जाणे गरजेचे झाले आहे.

-योगेश महाजन

प्रामाणिक प्रयत्न व्हावेत

सरकारचा अशी विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय अत्यंत योग्य आहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी कशी होईल यावर आता लक्ष केंद्रित केले पाहिजे. राज्यभरातील १७ जिल्ह्यांत ही मोहीम यशस्वीपणे पार पडली पाहिजे. अज्ञानाच्या गर्तेत सापडलेल्या मुली आणि त्यांचे कुटुंबीय यांना विश्वास मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न व्हायला हवेत.

-सुनील पगार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डस्टबिन झालेत गायब!

$
0
0

पंचवटी : धार्मिक स्थळांच्या ठिकाणी उघड्यावर कचरा टाकण्याऐवजी तो डस्टबिनमध्ये टाकावा या उद्देशाने कपालेश्वर मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत बसविण्यात आलेले डस्टबिनच सध्या गायब झाले आहेत. येथे केवळ डस्टबिनचे स्टँडच शिल्लक राहिलेले आहेत. डस्टबिन नसल्यामुळे कचरा कुठेही टाकला जात परिसरात अस्वच्छता पसरत असून, महापालिकेने उपाययोजना करण्याची मागणी परिसरातून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीला पाणी देणार नाही!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानुसार, नाशिक व नगरच्या धरणांमधून सहा टीएमसी पाणी सोडण्याच्या निर्णयावर नगरपाठोपाठ नाशिकमधील सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी विरोध केला आहे. जायकवाडीत पिण्यासाठी पुरेसा जलसाठा असून, धरणातील तूट भरून काढण्यासाठी सरकारने जायकवाडीचा मृत साठा वापरायला परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी केली. जिल्ह्यातच दहा तालुके दुष्काळात असताना, जायकवाडीसाठी गंगापूर आणि दारणा धरणातून पाणी सोडणे चुकीचे असून, त्याला आमचा विरोध आहे. पाणी सोडण्याचा निर्णय झाला तर भाजपसह सर्वपक्षीयांची मोट बांधून त्या विरोधात तीव्र जनआंदोलन उभे करू, असा इशाराच आमदार फरादेंनी दिला आहे.

जायकवाडी धरणाची तूट भरून काढण्यासाठी नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या निर्णयावरून नाशिक- नगर विरुद्ध मराठवाडा असा वाद पेटला असून, या वादात आता सत्ताधारी भाजपनेही उडी घेतली आहे. जायकवाडीला पाणी सोडावे लागेल, अशी घोषणा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केली असली तरी नाशिक मध्यच्या आमदार फरादे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाणी सोडण्यास तीव्र विरोध केला आहे. मेंढगिरी अहवालावर आपण यापूर्वीच आक्षेप घेतल्याचे सांगत, २०१६ मध्ये झालेला निर्णय आताही लागू कसा असेल, यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणने केलेला २००५ चा कायदाच चुकीचा आणि अन्यायकारी असल्याचे सांगत, फरांदेंनी जायकवाडीचा मृत साठा हा २६ टीएमसी आहे. यंदा त्यात ४३.५ टीएमसी जिवंत पाणीसाठा होता; परंतु खरिपासाठी यातून १६ टीएमसी पाणी वापरण्यात आले आहे. हा संपूर्ण साठा धरून यंदाचा साठा ६९ टीएमसी एवढा आहे. त्यामुळे जायकवाडीने यापूर्वीच ६५ टक्के जलसाठ्याची अट पूर्ण केली आहे. मात्र, आता अधिकाऱ्यांकडून १६ टीएमसी पाण्याचा हिशेब पकडला जात नाही, तसेच जायकवाडीमधून मृत साठा वापरायला बंदी आहे. तरीही मराठवाड्यातील शेतकऱ्यांसह औद्योगिक कंपन्यांकडून दरवर्षी मृत साठ्याचा वापर होतो. मृत साठा वापरल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आपण यापूर्वीच केली असून, अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. पाण्याच्या नियोजनासाठी औरंगाबादचे प्राधिकरण नियुक्त केले आहे. त्यामुळे या प्राधिकरणाकडून न्याय मिळत नसल्याचे सांगत मराठवाड्याला पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध असल्याने नाशिकमधून पाणी सोडण्यात येऊ नये, अशी मागणी त्यांनी केली आहे.

५० टक्के पाणी वाया जाणार

२०१६ मध्ये गोदावरी खोऱ्यातून जायकवाडीसाठी १०.४० टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. प्रत्यक्षात धरणात ३.५ टीएमसीच पाणी पोहोचले. त्यामुळे गेल्या वेळेस जवळपास ६५ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होऊन ते पाणी वाया गेले होते. त्यामुळे नाशिक-नगरसह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचेही नुकसान होते. त्यामुळे आताही पाणी सोडल्यास ५० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी वाया जाईल. त्यामुळे पुन्हा नाशिक आणि नगरमधील शेतकऱ्यांचेच नुकसान होणार असल्याने आमचा पाणी सोडण्यास तीव्र विरोध आहे. या संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांसोबतच चर्चा केली जाणार आहे. पाणी सोडण्याचा निर्णय झाला तर या निर्णयाविरोधात जनआंदोलन तीव्र केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

पालकमंत्र्यांची कोंडी

दोन दिवसांपूर्वीच नाशिक दौऱ्यावर असलेले पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मराठवाड्याला पाणी सोडण्याबाबत सकारात्मक होते. जलसंपदा विभाग त्यांच्याकडेच असल्याने मराठवाड्याला पाणी सोडावे लागेल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्याउलट भाजपच्या आमदारांनी मात्र आगामी निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून पाणी सोडण्याविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांचीही कोंडी होणार आहे. मराठवाड्याला पाणी सोडल्यास नाशिकमधील आमदारांचा रोष पत्करावा लागेल, तर दुसरीकडे मराठवाड्याला पाणी सोडले नाही, तर मराठवाड्यातील आमदारांचा रोष सहन करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता फरांदे-मुंढे जुंपणार!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राजवळील महापालिकेच्या जागेवर जलतरण तलाव मंजूर असून, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी येथे क्रीडांगण होणार अशी भूमिका घेतली असून, आमदार देवयानी फरांदे यांनी येथे जलतरण तलावच होणार, असे ठामपणे स्पष्ट केले आहे. यावरून आता मुंढे विरुद्ध आमदार फरांदे जुगलबंदी रंगणार आहे.

आयुक्त मुंढे यांनी आमदार बाळासाहेब सानप आणि सीमा हिरे यांना दणका दिल्यानंतर आता आमदार फरांदेंनाही जलतरण तलावाच्या प्रकरणात जेरीस आणले आहे. फरांदे यांनी सरकारच्या शंभर टक्के अनुदानातून आकाशवाणी केंद्राजवळील क्रीडांगणाच्या जागेत जलतरण तलाव मंजूर करून आणला आहे. राज्य सरकारने ५ जानेवारी २०१७ रोजी शासन निर्णय काढत, त्यासाठी निधीही मंजूर केला. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची प्रकिया पूर्ण करण्याचे आदेशही दिले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत महापालिकेला पत्र लिहून प्रक्रिया सुरूही केली. ६ मे २०१७ रोजी महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने राज्याच्या दक्षिण विभागातील सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहून मनपा पॅनलवरील आर्किटेक्ट अँड असोसिएशट यांच्यामार्फत त्याचे बजेट तयार केल्याची माहिती दिली. त्याची छायांकित प्रत देताना सदर प्रस्तावाबाबतचे नकाशे मंजुरीसाठी स्वतंत्ररीत्या महापालिकेच्या नगररचना विभागाकडे पाठवावे, असेही कळवले. राज्य सरकारच्या बांधकाम विभागाने आयुक्तांना पत्र लिहून ४ कोटी ९९ लाख रुपये मंजूर असल्याचे सांगत, बांधकाम अनुज्ञेय संदर्भात विचारणा केली. तत्कालिन आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्या कार्यकाळात नगररचना विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र लिहून मंजूर विकास योजना आराखड्यानुसार व प्रस्तावित प्रारूप आराखड्यानुसार संबंधित जागा क्रीडांगणासाठी आरक्षित असून, समावेशक आरक्षण नियमावलीअंतर्गत त्याचा ताबा पालिकेकडे असल्याचा दावा केला. या जागेचे नियोजन प्राधिकरण महापालिका असून, ९० टक्के जागा क्रीडांगणासाठी, तर उर्वरित १० टक्के जागेवर जलतरण तलावाचे बांधकाम करण्यास हिरवा कंदिल दर्शविला. त्यानुसार या कामाची निविदा प्रक्रियाही सुरू झाली असून, कार्यारंभ आदेश काढण्याची तयारी सुरू आहे.

जलतरण तलाव दृष्टिपथात असतानाच, आयुक्त मुंढे यांनी गेल्या आठवड्यात 'वॉक विथ कमिशनर' या उपक्रमात 'जर आरक्षण क्रींडांगणासाठी असेल, तर येथे क्रीडांगणच होईल,' असे स्पष्टपणे ठणकावून सांगितले. या ठिकाणी जलतरण तलाव होणार नसल्याचे सांगत, जागा महापालिकेच्या ताब्यात नसल्याचाही दावा त्यांनी केला. मुंढे यांच्या या भूमिकेमुळे आणि यापूर्वीही आमदारांची कामे त्यांनी परस्पर रद्द केल्याने स्थानिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. हा आमदार फरांदे यांनाही मोठा धक्का मानला जात आहे. यावर आमदार फरांदे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन जलतरण तलावाबाबतच्या परवानग्या आणि त्याबाबतची कागदपत्रे सादर केली. तसेच एका आयुक्ताने याला परवानगी दिली असताना, दुसरा आयुक्त हे काम रद्द कसे करू शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुंढे यांनी याबाबतच्या कागदपत्रांचा आणि प्रस्तावाचा अभ्यास करून बोलावे, अशा शब्दांत त्यांनी मुंढे यांना ठणकावले. कोणी कितीही विरोध केला, तरी जलतरण तलाव येथेच होणार असे सांगत, त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रे त्यांनी जाहीर केली आहेत. महापालिकेने परवानगी दिल्यानंतरही दिशाभूल का केली जाते, असा सवालही त्यांनी केला. मुंढे यांचा जलतरण तलावाला विरोध, तर फरांदे येथेच जलतरण तलाव करण्यावर ठाम असल्याने दोघांमध्येच आता जुगलबंदी रंगणार आहे.

अबकी बार आमदार फरांदे!

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भाजपच्या तीनही आमदारांचा तीस कोटींचा निधी यापूर्वीच पाणीपुरवठा विभागाकडे परस्पर वर्ग केला. आमदार सानप यांना दलित वस्तीची कामे आणि अभ्यासिका प्रकरणात यापूर्वीच मुंढे यांनी दणका दिला आहे. तर आमदार हिरेंना सिडको आणि गाळे प्रकरणात मुंढे यांनी अडचणीत आणले आहे. परंतु, मुंढेंबाबत सहानुभूती बाळगणाऱ्या आमदार फरांदेंनाच त्यांनी जलतरण तलावाच्या प्रकरणात डिवचल्याची चर्चा आहे. त्यामुळे 'अबकी बार आमदार फरांदे' अशी चर्चा पालिका वर्तुळात असून, मुंढेंविरुद्ध फरांदेंच्या जुगलबंदीत कोण बाजी मारते, याकडे लक्ष लागून आहे. आता मुंढे याबाबत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आयुक्त मुंढे यांनी या प्रस्तावाची कागदपत्रे तपासून आणि माहिती घेऊनच बोलावे. अर्धवट माहिती आधारे जनतेमध्ये संदिग्धता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. सरकारने यासाठी निधी मंजूर केला असून, जलतरण तलाव त्याच जागेवर होणार. मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच या कामाचा नारळ आपण फोडू.

- प्रा. देवयानी फरांदे, आमदार, नाशिक मध्य

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टँड नक्की कशासाठी?

$
0
0

गंगापूररोड

स्टँड नक्की कशासाठी?

गंगापूररोडवर केटीएचएम कॉलेजच्या बाहेर सायकलसाठी स्टँड केलेला आहे. पण, तेथे सायकलसोडून इतर वाहनेच सर्रासपणे लावली आहेत. हा काय प्रकार आहे? यासंदर्भात कोणीही फारसे गंभीर नसल्याचे दिसून येते. संबंधित यंत्रणा याची दखल घेतील का?

-शैलेश सुर्वे

--

सर्व्हिसरोड

रस्त्यातील पार्किंग थांबवावे

शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा हायवेच्या सर्व्हिसरोडवर मोठ्या प्रमाणात वाहने लावलेली असतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होताना दिसतो. मात्र, या समस्येबाबत कुठलीच दखल घेतली जात नाही. पोलिसांनी याप्रश्नी कडक कारवाई करण्याची गरज आहे.

-राकेश दळवी

--

अशोका मार्ग

जलवाहिनीची गळती रोखावी

नाशिक-पुणे महामार्गालगतच्या अशोका मार्गावरील हा फोटो आहे. या भागातील गटारीला लागूनच पाण्याची वाहिनी गेलेली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही जलवाहिनी फुटल्यामुळे येथे असे पाणी साचत आहे. येथे होणाऱ्या अपव्ययाची महापालिकेने दखल घ्यावी.

-अजित मुठे

--

जेलरोड

फांद्या छाटण्याची गरज

जेलरोड, जुना सायखेडारोडवरील अभिनव शाळा ते नारायणबापू चौक यादरम्यानचे पथदीप आजबाजूच्या झाडांच्या अनावश्यक फांद्यांमुळे असे झाकोळले गेले आहेत. त्यांचा प्रकाश फांद्यांमुळे अडतो आहे. त्यामुळे या भागात अंधार पसरत आहे. अशा फांद्या त्वरित छाटाव्यात.

-भागवत गुरव

--

नाशिकरोड

बिटको चौकाची दुरवस्था

नाशिकरोड येथील अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वाधिक वर्दळीच्या बिटको चौकाची काही काळापासून दुरवस्था झाली आहे. रस्त्यातच पार्किंग, झेब्रा क्रॉसिंग नसणे अशा अनेक समस्या या चौकात निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे प्रामाणिक वाहनचालक, पादचाऱ्यांची गैरसोय होत आहे.

-सुषमा भालेराव

--

सिडको

रस्ते गेले खड्ड्यात!

त्रिमूर्ती चौक सिग्नल ते खेतवाणी लॉन्स यादरम्यानच्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत. सिडकोतील अनके रस्त्यांवर अशी स्थिती दिसून येते. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींचेही त्याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. हे खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत.

-सुधीर गांगुर्डे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लक्ष प्रकाशकिरणांनी उजळणार काळाराम मंदिर

$
0
0

'लेझर शो'साठी दीड कोटीचा खर्च; चाचणी यशस्वी

..

Prashant.bharvirkar@timesgroup.com

Tweet : bharvirkarPMT

...

नाशिक : स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असलेले श्री काळाराम मंदिर हे भाविकांसाठी मोठे श्रद्धास्थान असून, आता या मंदिराला तंत्रज्ञानाच्या आधारे आणखी एक वेगळी ओळख मिळणार आहे. काळाराम मंदिरावर अनोखा लेझर शो करण्याचे प्रस्तावित असून, मंगळवारी त्याची चाचणी घेण्यात आली. त्यात काही सुधारणा करून डिसेंबर महिन्यात या प्रकल्पाचा शुभारंभ केला जाणार आहे.

'मंदिरांचे नाशिक' असे बिरूद मिरवणाऱ्या जनस्थानमध्ये अनेक देवी-देवतांची विलोभनीय मंदिरे आहेत. त्यावर असणाऱ्या ट्रस्टने आपापल्या पद्धतीने ही मंदिरे सजवली असून, भाविकांचा त्याकडे ओढा कसा वाढेल यावर लक्ष केंद्रित केले आहे. कपालेश्वर देवस्थान, सुंदरनारायण मंदिर, सांडव्यावरची देवी, नारोशंकर मंदिर, एकमुखी दत्त मंदिर या मंदिरांमध्ये अनोख्या सुविधा देण्यात आल्या आहेत. परंतु, यापैकी एकाही मंदिरावर लेझर शो नाही. त्यामुळे काळाराम मंदिर वेगळे भासणार आहे.

एक ते दीड कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, बेंगळुरूस्थित कंपनी तो साकारणार आहे. शासनाने पर्यटन विकासांतर्गत पैसे मंजूर केले आहेत. काळाराम मंदिर काही प्रमाणात दुर्लक्षित असून, या लेझर शोमुळे त्याला पुन्हा झळाळी मिळणार असल्याचे विश्वस्तांचे म्हणणे आहे.

...

पर्यटकांसाठी आकर्षण

काळाराम मंदिराच्या दर्शनी आणि मागील बाजूस हा लेझर शो करण्यात येणार आहे. त्यात रामाचे चित्र दिसणार असून, भाविकांसाठी ते खास आकर्षण ठरणार आहे. याआधी नाशिकमधील एकाही मंदिरावर असा लेझर शो नसल्याने पर्यटकांना खेचण्यासाठी त्याचा मोठा फायदा होणार आहे.

...

आज तांत्रिक स्वरूपाची चाचणी घेतली. येत्या दोन महिन्यात हा लेझर शो सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे भाविक अधिक प्रमाणात मंदिराकडे वळणार आहेत.

- न्या. गणेश देशमुख, अध्यक्ष, काळाराम मंदिर ट्रस्ट

---

लेझर शोच्या बाबतीत विश्वस्त मंडळ सकारात्मक निर्णय घेणार आहे. आमच्या कारकीर्दीतच या शोचे उद्घाटन करण्याचा आमचा मानस आहे. तो आमचा संकल्पही आहे.

- अॅड. अजय निकम, विश्वस्त, श्री काळाराम मंदिर ट्रस्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘चौफेर वाचनाने समृद्धी’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चौफेर वाचनातून माणूस खऱ्या अर्थाने समृद्ध होतो आणि जीवनातील विविध प्रसंगांना सक्षमपणे तोंड देऊ शकतो, असे प्रतिपादन 'रेड टेप' कादंबरीचे लेखक तथा 'दिव्य मराठी'चे डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी यांनी केले.

राज्य सरकारची राज्य मराठी विकास संस्था आणि सार्वजनिक वाचनालय, नाशिकतर्फे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'वाचनध्यास... सलग वाचनाचा उपक्रम-२०१८'च्या प्रारंभावेळी ते बोलत होते. कादंबरीचा लेखक असलो, तरी प्रारंभापासून वाचक आहे आणि या वाचनाच्या माध्यमातूनच मला लिखाणाची प्रेरणा मिळाली, असे ते यावेळी म्हणाले.

प्रारंभी सरस्वती आणि डॉ. कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. ग्रंथ सचिव बी. जी. वाघ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. अर्थ सचिव शंकरराव बर्वे यांनी आभार मानले. कार्याध्यक्ष डॉ. धर्माजी बोडके, बालभवनप्रमुख संजय करंजकर, मुक्तद्वार विभागप्रमुख वसंत खैरनार उपस्थित होते. कार्यक्रमास भालचंद्र गायधनी, पुंडलिक गवांदे , अशोक पाटील, रमेश सरवदे, किरण सोनार, मधुकर झेंडे, पां. भा. करंजकर, बी. एस. गांगुर्डे, रमेश महाले, आर. के. सावे, सुवर्णा बच्छाव, शशिकांत उपासनी, प्रकाश वैद्य आदी उपस्थित होते. यानिमित्त 'सावाना'च्या औरंगाबादकर सभागृहात स्थानिक लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. जिज्ञासू वाचकांचा त्याला प्रतिसाद लाभला.

पुस्तक वाचन अन् सत्कार

या सोहळ्यात रघुनाथ महाबळ, मंजूषा पुरंदरे, प्रभाकर बागुल, कृष्णा पवार, चंद्रकांत ढासे, सावळीराम तिदमे, शरद पुराणिक, प्रा. यशवंतराव पाटील, वासंती देशपांडे, वंदना रकिबे, सी. एल. कुलकर्णी यांनी विविध पुस्तकांमधील उताऱ्यांचे वाचन केले. विविध वाचकांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइनवर ‘सर्व्हिलन्स’ची मात्रा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयित, तसेच पॉझिटिव्ह रुग्ण आणि त्याच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकावर नजर ठेवणे (सर्व्हिलन्स) आवश्यक आहे. याद्वारे संभाव्य स्वाइन फ्लू रुग्णांना वेळीच औषधोपचार मिळून पुढील प्रकारांना आळा बसू शकतो. त्यादृष्टीने सर्वांनी नियोजन करावे, असा आदेश आरोग्यसेवा विभागाचे संचालक डॉ. संजीव कांबळे यांनी दिले.

जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय कळवण, तसेच सप्तशृंगी देवी यात्रा आरोग्य कक्ष या ठिकाणी भेटी देऊन डॉ. कांबळे यांनी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्हा रुग्णालयामध्ये सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी रुग्णालयाच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या सूचनादेखील केल्या. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असून, महापालिका कार्यक्षेत्रातील रुग्णदेखील जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी येताना दिसतात. त्यामुळे रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत मनुष्यबळ, तसेच पायाभूत सुविधांची कमतरता दिसून येते. मात्र, या परिस्थितीतसुद्धा रुग्णालयाचे काम चांगले असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट करीत सर्वांना त्यांच्या कामाची पावती दिली. जिल्हा रुग्णालयाने कायाकल्प योजनेमध्ये राज्यात प्रथम क्रमांकाचा ५० लाखांचा पुरस्कार मिळविला असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

कामकाजाचा घेतला आढावा

राज्यात नाशिक आणि पुणे या ठिकाणी स्वाइन फ्लूने डोके वर काढले असून, त्याचा आढावा त्यांनी घेतला. स्वाइन फ्लू एकामुळे दुसऱ्यास सहजतेने होतो. त्यामुळे संशयित रुग्ण आढळून आला, की त्याच्या संपर्कात आलेल्या आणि येणाऱ्या प्रत्येकावर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे डॉ. कांबळे यांनी यावेळी स्पष्ट केले. स्वाइन फ्लूची साथ नियंत्रणात आणण्यासाठी त्यांनी इतर सूचनाही केल्या. दरम्यान, कळवण उपजिल्हा रुग्णालयाची संपूर्ण पाहणी करीत त्यांनी प्रसूती कक्ष, विविध आंतररुग्ण व बाह्यरुग्ण विभागांतील कामकाजाचा आढावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस - १८ ऑक्टोबर

$
0
0

वाढदिवस - १८ ऑक्टोबर

--

निवास मोरे....... अभिनेता

संजय अमृतकर...... ट्रेकर

रविंद्र मालुंजकर..... कवी

मनिषा बागुल.......कार्यकारी संचालिका, धन्वंतरी कॉलेज

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगच्या त्रिकुटाचे ‘स्मार्ट सिटी’ला बूस्ट!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पदवी घेतली म्हणजे नोकरीच केली पाहिजे, या पारंपरिक समजाला फाटा देण्याचे अनेकांचे स्वप्न निवृत्ती होऊनही साकार होत नाही... परंतु, या पारंपरिक चित्राला शहरातील अवघ्या बाविशीतील तीन विद्यार्थ्यांनी मोठ्या कल्पकतेतून छेद दिला आहे... नव्याने स्मार्ट बनू पाहणाऱ्या शहरातील घरे आणि सोसायट्यांच्या मेन्टेनन्सचा स्टार्ट अप उद्योग सुरू करून संदीप इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंगमध्ये शिक्षण घेणाऱ्या तिघा विद्यार्थ्यांनी सीमोल्लंघन केले आहे... एकिकडे इंजिनीअरिंगचे शिक्षण सुरू असताना दुसरीकडे त्यांनी नव्या उद्योगाचा केलेला हा श्रीगणेशा इतर युवकांसाठीही नक्कीच प्रेरणादायी आहे.

इंजिनीअरिंगच्या मेकॅनिकल विद्याशाखेत पदवी मिळविल्यानंतर अपेक्षित रोजगार शोधण्यासाठी पायपीट करायची, की स्वत:च इतरांसाठी नोकरीच्या संधी निर्माण करायच्या या विचारावर हर्षल मायाप्पा वाडकर, सागर कैलास खांडबहाले आणि गणेश गोपीनाथ गायकवाड या वर्गमित्रांनी विचारविनिमय सुरू केला. यादरम्यान असणारी स्मार्ट सिटी आणि स्वच्छता अभियानाची लाट विचारात घेत तिघांचेही मेन्टेनन्स सर्विस सुरू करण्यावर एकमत झाले आणि त्यांनी सेवाक्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यानंतर या क्षेत्रातील बारकाव्यांचा अभ्यास, सर्वेक्षण सुमारे वर्षभर करून सुरुवातीला स्वत:च तिघांनीही 'वर्कर' म्हणून अनुभव घेण्यास सुरुवात केली. सागर हा महिरावणी येथील शेतकरी कुटुंबातील असून, गणेशच्या कुटुंबियांची सुद्धा ढकांबे येथे शेती आहे. हर्षलला व्यावसायिक पार्श्वभूमी असून, त्याचे वडील प्रिंटिंग उद्योगात आहेत. तिघांचीही कौटुंबिक स्थिती उत्तम असतानाही कामासाठी लाज न बाळगण्याचा पहिला नियम त्यांनी येथे अमलात आणला. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांनी 'वर्धन मेन्टेनन्स सर्विसेस' या नावाने हे स्टार्ट अप सुरू केले आहे. त्यांच्या या धडपडीमुळे सुरुवातीच्या टप्प्यात कुटुंबासह आप्तेष्टांच्या संभ्रमात पडलेल्या नजरांमध्येही आता या युवकांप्रती विश्वास वाढला आहे. मेन्टेनन्समध्ये तब्बल ३२ प्रकारच्या सेवा पुरविण्याची क्षमता त्यांनी अल्पकाळात निर्माण केली आहे. 'वर्धन'च्या टीममध्ये या कोअर टीमला सानिका सैतवडेकर, सोनाली माळूंजकर, गणेश यादव आदी उच्चशिक्षित सहकारी तसेच मित्र परिवाराची उत्तम साथ लाभते आहे. हा मुख्य संघ व्यवस्थापनाची सूत्र अचूकपणे हलवून बाजारपेठेच्या मागणीनुसार रास्त दरांमध्ये सुविधा देतो आहे. त्यांची ही धडपड सीमोल्लंघनासाठी चाचपडणाऱ्या इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणादायी अशीच आहे.

शब्दांकन : जितेंद्र तरटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाईन फ्लूचे तीन बळी

$
0
0

दोन दिवसात सहा जणांनी गमावले प्राण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशकात स्वाईन फ्लूचे थैमान सुरूच असून सोमवार तिघांचा बळी गेला असतानाच मंगळवारीही स्वाईन फ्लूमुळे अन्य तीन जणांना जीव गमावला लागला आहे. त्यामुळे ४८ तासांमध्ये नाशिकमध्ये स्वाईन फ्लूने सहा जणांचा बळी गेला असून नाशकातील स्वाईन फ्लू बळींची संख्या आता ५७वर पोहोचली आहे.

स्वाईन फ्लू आजाराचा मृत्यू दर दिवसेंदिवस वाढतच असताना त्यावर नियंत्रण मिळविण्याची जबाबदारी असलेली प्रशासकीय यंत्रणा मात्र हातावर हात धरून बसल्याने ऐन सणासुदीच्या काळात नाशिककरांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या मनपा हद्दीबाहेरील तिघांचा मंगळवारी स्वाईन फ्लूमुळे जीव गेला आहे. १ ते १७ ऑक्टोबर या कालावधीतच १३८ जणांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील ५९ तर महापालिका क्षेत्राबाहेरील परंतु महापालिका हद्दीतील खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या ७९ जणांचा समावेश आहे.

आजाराची तीव्रता वाढली

गेल्या १७ दिवसांमध्येच महापालिका हद्दीतील सात तर मनपा हद्दीबाहेरील २२ रुग्णांचा या आजाराने बळी घेतल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे. विशेष म्हणजे ऑक्टोबर २०१७च्या तुलनेत ऑक्टोबर २०१८ मधील स्वाईन फ्लू बाधित व मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा अधिक असल्याचे दिसत असल्याने गतवर्षीच्या तुलनेत यंदा या आजाराचा प्रादूर्भाव अधिक वाढल्याचे दिसत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात पोलिस अधिकाऱ्यांना पदोन्नती

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यातील २९ सहायक पोलिस आयुक्त, उपविभागीय अधिकाऱ्यांना पोलिस उपायुक्त, अधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. गृहविभागाने काढलेल्या या आदेशानुसार नाशिक शहरात कार्यरत तीन, जिल्हा ग्रामीण पोलिस दलातील दोन, तर महाराष्ट्र पोलिस अकादमीतील दोन अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळाली आहे़

शहर पोलिस आयुक्तालयातील सहायक पोलीस आयुक्त बापू बांगर यांना सोलापूर शहर पोलिस उपायुक्त (गुन्हे) म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त अजय देवरे यांना नाशिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस अधीक्षकपदी तर दीपक गिऱ्हे यांना महाराष्ट्र पोलिस अकादमीत अपर पोलीस अधीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. पेठ येथे उपविभागीय अधिकारी पदाची धुरा सांभाळणारे सचिन गोरे यांची धुळे येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहाच्या समादेशकपदी तर नाशिक ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल झेंडे यांची अपर पोलीस महासंचालक कार्यालय आर्थिक गुन्हे शाखेत पोलीस अधीक्षकपदी पदोन्नतीने बदली झाली आहे़

महाराष्ट्र पोलिस अकादमीत कार्यरत पोलिस उपअधीक्षक डॉ़ राहुल खाडे आता औरंगाबाद शहरात पोलिस उपायुक्त म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. तर पोलिस उपअधीक्षक विशाल ठाकूर यांची मुंबई शहरात पोलिस उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली झाली आहे़ महाराष्ट्र पोलिस अकादमीत शिर्डी देवस्थानचे पोलिस उपअधीक्षक आनंद भोईटे, गुन्हे अन्वेषण विभागातील पुणे येथील पोलीस उपअधीक्षक वैशाली कडूकर, जळगाव जिल्ह्यातील चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार चव्हाण व औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर उपविभाग उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांना अपर पोलीस अधीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे़

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चार अंध मुलांना अमानुष मारहाण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नासर्डी पुलाजवळील अंध विद्यार्थी वसतिगृहातील चार मुलांना वसतिगृहाचा केअरटेकर संदीप कांबळे याने अमानुषपणे मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी (ता. १३) रात्री घडला आहे. या वसतिगृहात सध्या राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील ४० विद्यार्थी वास्तव्यास आहेत. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांना वर्षभरापासून मारहाणीबरोबरच निर्दयीपणे वागविले जात असल्याची माहितीही पुढे आली आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील समाजकल्याणच्या सामाजिक न्यायभवन इमारतीच्या आवारात दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठीचे समाजकल्याण विभागाचे शासकीय वसतिगृह आहे. तेथे नाशिकसह वैजापूर, जालना, दिंडोरी, हिंगोली आदी ठिकाणचे ४० विद्यार्थी वास्तव्यास असून, हे सर्व विद्यार्थी नाशिकरोडमधील एका शाळेत ५ वी ते १० वीच्या वर्गांत शिक्षण घेत आहेत. यातील चार विद्यार्थ्यांना वसतिगृहाचा केअरटेकर संदीप कांबळे याने शनिवारी रात्री क्षुल्लक कारणांवरून बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित चारही मुलांनी या मारहाणीच्या प्रकाराबाबत पालकांना माहिती दिल्यावर या पालकांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यानंतर 'मनविसे'च्या पदाधिकाऱ्यांनी या वसतिगृहाचे अधीक्षक एम. एम. वझात यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केअरटेकर कांबळे याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकारानंतर कांबळे रजेवर गेला आहे. येत्या शुक्रवारी किंवा शनिवारी तो पुन्हा नोकरीवर हजर होण्याची शक्यता आहे. कांबळेने माफी मागितल्याची माहिती अधीक्षक वझात यांनी दिली आहे. जखमी मुलांना उपचारांसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एवढा गंभीर प्रकार घडूनही बुधवारी सायंकाळपर्यंत या घटनेप्रकरणी पोलिसांत रितसर तक्रार दाखल करण्याची तसदी वसतिगृहाच्या वरिष्ठ प्रशासनाने घेतली नव्हती.

'केअरलेस' माणूस

संदीप कांबळे हा अत्यंत केअरलेस आणि निर्दयी माणूस असल्याचे पीडित मुलांनी दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे. तो विद्यार्थ्यांना पाया पडायला सांगत असे. नंतर विद्यार्थ्यांच्या पाठीवर बसत असे. स्वच्छतागृहात लघवी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाठीमागून लाथेने मारत असे. काही वेळा तो क्रिकेटची बॅटही मुलांना फेकून मिळत असे. तसेच, आपल्याला हाफ मर्डर करण्याची परवानगी असल्याची धमकी या अंध मुलांना देत असे. संदीपकडून होत असलेल्या या छळवणुकीबाबत या पीडित मुलांनी वसतिगृहाच्या वरिष्ठांना कळविण्याचा प्रयत्नही केला. परंतु, वरिष्ठांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष करून त्याला पाठीशी घातल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बोकडबळी’वरून पुन्हा खल

$
0
0

कळवण : सप्तशृंगी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी ट्रस्टच्या आवारात बोकडबळीच्या पुन्हा प्रथा सुरू होणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याने ऐन नवरात्रोत्सवात सप्तशृंग गडावरील वातावरण तापले. बोकडबळीच्या मुद्द्यावरून बुधवारी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दुकाने बंद ठेवत ट्रस्ट कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन छेडले. ट्रस्ट प्रशासन व ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गडावरील बोकडबळीच्या प्रथेला पुन्हा सुरू करण्यासाठी चर्चा झाली. मात्र ट्रस्टने या प्रथेला जोरदार विरोध दर्शविला आहे.

दसऱ्याच्या निमित्ताने सप्तश्रृंगी गडावर बोकडबळी देण्याची प्रथा होती. गेल्या वर्षी या प्रथेच्या निमित्ताने देण्यात आलेल्या सलामीवेळी (बंदुकीतून हवेत गोळीबार करणे) काही भाविक, देवस्थानचे कर्मचारी वर्गाला दुखापत झाली होती. त्या अनुषंगाने देवस्थान ट्रस्टमार्फत ही प्रथा सुरक्षिततेच्या दृष्टीने बंद करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी आदेशही काढले होते. ग्रामस्थांनी त्यावेळी गावाबाहेर जिल्हा परिषदेच्या शाळेत बोकडबळीचा कार्यक्रम केला होता. देवस्थान ट्रस्टच्या आवाराबाहेर बोकडबळीला आजही हरकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र बुधवारी दुपारी कळवण तालुका प्रशासन व ग्रामस्थ व भाविक यांच्यात बोकडबळी होऊ द्यावे, दुष्काळी परिस्थिती आहे, जुन्या परंपरेला खंडित होऊ देऊ नका अशी मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी यांनी याबाबत सुरक्षिततेच्या दृष्टीने देवस्थान ट्रस्ट आवारात ही प्रथा पूर्णपणे बंद राहील, अशी भूमिका घेतली. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी आपले व्यवसाय दीड तास बंद ठेवले.

तहसीलदार कैलास चावडे यांनी समजूत काढल्यानंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सानुग्रह अनुदानाबाबत हात आखडता?

$
0
0

सफाई कर्मचाऱ्यांसह वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांना लाभ देण्याचा विचार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे वेतन हे शासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांपेक्षाही अधिक असल्याने प्रशासनाकडून यंदा सानुग्रह अनुदानाबाबत आर्थिक शिस्तीचे कारण देत हात आखडता घेण्याची तयारी सुरू केली आहे. सत्ताधाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांसह कंत्राटी कर्मचारी, अधिकारी आणि पालिका कर्मचाऱ्यांसह तब्बल सात हजार जणांना सानुग्रह अनुदान देण्याचा ठराव प्रशासनाकडे अंमलबजावणीसाठी पाठवला आहे. त्यावर गरजवंतानाच सानुग्रह अनुदान देण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. सफाई कर्मचाऱ्यांसह वर्ग तीनपर्यंतच्याच कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जाण्याची शक्यता असून, त्यासाठीची पावले उचलली जात आहेत. त्यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाची परंपरा यंदा खंडित होणार असल्याने नवा वाद निर्माण होणार आहे.

महापालिकेत दिवाळीनिमित्त सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याची परंपरा आहे. गेल्यावर्षी दिवाळीत प्रत्येकी १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. दिवाळी सण जवळ येऊ लागल्याने पालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाचे वेध लागले आहेत. यंदा सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना प्रत्येकी १७ ते २० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळावे, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर, शिवसेनाप्रणित म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रवीण तिदमे व कॉँग्रेस नगरसेवक समीर कांबळे यांनी गेल्या महिन्यातील महासभेत तसा ठराव मंजूर केला. महापौरांनी या प्रस्तावावर तात्काळ स्वाक्षरी करीत तो अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे पाठवला. परंतु, आर्थिक शिस्तीचे कारण देत प्रशासनाने मात्र सर्वांनाच सरसकट सानुग्रह अनुदान देण्यास नकार दिल्याचे समजते. शासनाच्या कर्मचाऱ्यांसह खासगी आस्थापनावरील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान दिले जात नाही. याउलट पालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार हे शासनापेक्षा अधिक आहे.त्यामुळे सर्वांनाच सानुग्रह अनुदान देणे शक्य नसल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. सफाई कर्मचाऱ्यांनाच सानुग्रह अनुदान देण्याबाबत प्रशासन राजी असून, त्याची मर्यादा वर्ग तीनपर्यंत वाढविण्याबाबत सध्या विचार सुरू आहे. त्यामुळे वर्ग दोन आणि वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना यंदा सानुग्रह अनुदान मिळण्याची शक्यता कमी आहे. वर्ग एक व दोनच्या अधिकाऱ्यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. दुसरीकडे सरसकट सर्वांनाच सानुग्रह अनुदान न दिल्यास राजकीय पक्षांकडून त्याचे पुन्हा आयुक्तांविरोधात भांडवल केले जाण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मी टू’बाबत मंथन चांगलंच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मी टू चळवळ हे एक वादळ असून त्यामुळे स्त्रीया पुढे येत आहेत, त्यांच्यावर होणारा अन्याय, शोषण याविषयी मंथन केले जात आहे, ही बाब चांगली आहे. मात्र, ही चळवळ अद्याप ठराविक शहरांपुरती किंवा प्रामुख्याने बॉलीवूडभोवतीच फिरत आहे. याविषयी ग्रामीण भागातील स्त्रीया, मुलींमध्ये जागरुकता निर्माण होणे गरजेचे आहे, असे मत मांडत अमृता फडणवीस यांनी मी टू चळवळीला पाठिंबा दिला.

कालिदास कलामंदिरात अहिल्या फाउंडेशनच्या वतीने दहा लाख सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करत जागतिक विक्रम करण्यात आला. कार्यक्रम समारोपानंतर त्यांनी 'मी टू'विषयी मत व्यक्त केले. 'मी टू'बाबत खऱ्या-खोट्या अशा अनेक धक्कादायक बाबी बाहेर येत आहेत. छोट्या शहरात, गावांमध्ये शोषण म्हणजे काय, याविषयी जागरुकता निर्माण केली पाहिजे. स्वत:चा बचावासाठी खरी शोषित नारी जेव्हा समोर येईल, तीच 'मी टू'ला खरी दिशा असेल, असेही त्या म्हणाल्या.

स्त्रीया आज अन्यायाविरोधात उभ्या राहत आहेत हा मोठा सकारात्मक बदल या चळवळीमुळे समोर येत आहे. यातील खरे, खोट विश्लेषणातून भविष्यात समोर येईलच; परंतु त्या काय म्हणत आहेत, हे ऐकून घेणे महत्त्वाचे आहे. लैंगिक छळाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्या राजीनाम्याविषयी मात्र त्यांनी मौन बाळगले. याबरोबर, शबरीमला मंदिरातही सर्वांना समान हक्क असून सर्वांना मंदिरात प्रवेश मिळाला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

असेही सीमोल्लंघन

$
0
0

रोजगारनिर्मितीतून जपले वेगळेपण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्त्री-पुरुष समानतेविषयी अनेकदा चर्चा रंगत असल्या तरी प्रत्यक्षात आजही अनेक क्षेत्रांमध्ये पुरुषी वर्चस्व सहजरित्या दिसून येते. त्यातील एक क्षेत्र म्हणजे, हाऊस किपिंग आणि सिक्युरिटीज हे सेवा क्षेत्र. या सेवा पुरविण्याचे काम करणारे पुरुषच अधिक आहेत, असे चित्र दिसून येते. परंतु, येथील भाग्यश्री दशपुते यांनी हे चित्र बदलण्यास सुरुवात केली आहे. या क्षेत्रातच व्यवसाय सुरू करुन इतरांना रोजगार उपलब्ध करुन देण्याबरोबर यशस्वीपणे काम त्या करत आहेत. एकप्रकारे त्यांचे हे सिमोल्लंघनच आहे.

आजच्या काळात उच्चशिक्षितांनाही नोकरी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. भाग्यश्री यांनी संदीप फाउंडेशनमध्ये एचआर व मार्केटिंगमध्ये एमबीए केले. त्यानंतर मुंबईमध्ये दोन वर्ष नोकरी केली. यादरम्यान, नोकरीसाठी करावा लागणारा संघर्ष त्यांनी जवळून अनुभवला. हा संघर्ष पाहता आपणच व्यवसाय सुरू करून इतरांना नोकरी का देऊ नये, असा विचार करत १६ फेब्रुवारी २०१६ रोजी अस्तित्व मल्टिपर्पज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली. खूप गुंतवणूक करावी लागणार नसल्याने या क्षेत्रात सेवा देण्याचा विचारही यामागे होता. हाऊस किपिंग आणि सिक्युरिटीज या दोन सेवांवर ही कंपनी नाशिक आणि मुंबई येथे काम करते. शाळा, कॉलेज, खासगी इमारती यामध्ये या सेवा पुरवल्या जातात. गुणवत्ता हा निकषाला प्राधान्य देऊन त्या काम करत आहेत. अधिकाधिक व्यक्तींना रोजगार उपलब्ध करून देणे, हा या कंपनीचा उद्देश असून नोकरी देताना महिलांना मोठे प्राधान्य दिले जाते. यासाठी वय, शिक्षणाची कोणतीही अट नसल्याने महिलांना आर्थिक, सामाजिक सक्षम करण्यास यातून महत्त्वाचे पाऊल उचलले जात आहे.

शब्दांकन : अश्विनी कावळे

लोगो : असेही सीमोल्लंघन

फोटो आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images