Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

नारीशक्तीचे भगूरला दर्शन

$
0
0

देवळाली कॅम्प : नवरात्रीनिमित्त भगरू परिसरात रंगलेल्या नवरात्री महोत्सवात नारीशक्तीचे दर्शन घडले. स्वतःमध्ये दडलेल्या सहनशील, सामर्थ्यशाली, धाडसी अशा विविध रुपांची उजळणी करीत महिलांनी या महोत्सवाचा आनंद लुटला. दांडियासह विविध स्पर्धा रंगल्या. त्यातही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महोत्सवाचा समारोप बुधवारी नृत्य स्पर्धा व बक्षीस वितरणाने झाला. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, सुशीला बलकवडे, दगूबाई फोकणे, शीतल बलकवडे, भारती बलकवडे, मंगल भागवत, ज्योती कस्तुरे, स्वाती काळे, मीरा उक्के, पूजा डावरे, वर्षा पंढोरे, स्वाती मोरे, संगीता झांजरे, जयश्री पंढोरे आदींची उपस्थिती होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वाहनचालकांनी हॉर्नवापर कमी करावा

$
0
0

सोमनाथ तांबे यांचे प्रतिपादन

म. टा. वृत्तसेवा सिडको

ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी वाहन धारकानीं हॉर्नचा कमी वापर करून सहकार्य करावे, असे मत अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी व्यक्त केले.

अंबड पोलिसांच्या पुढाकाराने पाथर्डी फाटा परिसरात हॉर्न, सिटबेल्ट आणि हेल्मेट संदर्भात जनजागृती करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. सिट बेल्ट व हेल्मेट घालणाऱ्या चारचाकी व दुचाकी वाहनचालकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तर नियम मोडणाऱ्यांचे प्रबोधन करण्यात आले. ध्वनी पप्रदूषणाला आळा घाला, हॉर्नचा वापर टाळा, स्टॉप नॉइज पोल्युशन नो हॉर्न प्लीज, आता दर सोमवार आवाज गोंगाट सीमापार अशा प्रकाराच्या घोषणा फलकाद्वारे यावेळी वाहनधारकाचे प्रबोधन करण्यात आले.

याप्रसंगी पोलिस उपनिरीक्षक हरेश्वर घुगे, समाजिक कार्यकर्ते सोमनाथ बोराडे, जयश पोकळे, व्ही. आर. शिंपी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नेहमी वाहनचालकांना या ना त्या कारणावरून दंड आकारणाऱ्या पोलिस विभागाने अशा प्रकारच्या जनजागृती करणारी मोहीम राबविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावठी कट्ट्यासह जिवंत राउंड जप्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोडला दसकगाव स्मशानभूमी जवळील मोकळ्या पटांगणावर गावठी कट्ट्यासह फिरून दहशतीचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने अटक केली. अमोल अंबादास वाडेकर (वय २३, रा. पानसरे चाळ, गणेशनगर, जेलरोड) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि दोन जिवंत राउंडही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

पोलिस कॉन्सटेबल विशाल पाटील यांनी नाशिकरोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवारी (दि. १५) रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांना दसक स्मशानभूमी परिसरात एक तरुण गावठी कट्टा घेऊन फिरत असून दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शोध पथकाने अमोल वाडेकर या तरुणास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यात ५० हजार रुपयांचा गावठी कट्टा आणि २ हजार रुपयांचे दोन जिवंत काडतुसे व मॅगेझीन आढळून आले. पोलिसांनी अमोलवर गुन्हा दाखल केला. गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरिक्षक बी. एन. काबुगडे, पोलिस हवालदार मिलिंद पवार, किशोर खिल्लारे, प्रकाश आरोटे, मुदत्सर पठाण, महेश सावळे आदींच्या पथकास कारवाई करण्याचे आदेश दिले.

मध्य प्रदेश कनेक्शन?

अमोलकडे गावठी कट्टा कसा आला याचा तपास नाशिकरोड पोलिसांना मंगळवारपर्यंत लागला नव्हता. मात्र, यापूर्वीही याच भागात एकलहरे येथेही एका तरुणाकडे कट्टा आढळून आला होता. याशिवाय सत्कार पॉईंट येथेही एकाकडे गावठी कट्टा सापडला होता. त्यामुळे नाशिकरोड परिसरात गावठी कट्टा पुरविण्याचे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता वाढली आहे. पोलिस त्याच दिशेने तपास करीत आहेत. मध्य प्रदेशातील उंबरठी येथून गावठी कट्टे नाशिकरोड येथे पोचविणारे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला फुलली बाजारपेठ

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा अर्थातच विजयादशमी हा सण आश्‍विन शुद्ध दशमीला म्हणजेच गुरुवारी (दि. १८) साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या पूर्वसंध्येला खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे बाजारपेठेत उत्साह ओसंडून वाहत होता. शहरातील सर्व प्रमुख बाजारपेठांमध्ये रात्री उशिरापर्यंत ग्राहकांची गर्दी यामुळे दिसून आली. झेंडूची फुले, आपट्याची, आंब्याच्या झाडांची पाने खरेदी केली जात होती.

शत्रूवर पराक्रमाने, अज्ञानाने ज्ञानावर विजय मिळवण्याच्या या दिवसाला विशेष महत्त्व असते. यादिवशी दारी झेंडूची फुले व आंब्याच्या पानाचे तोरण लावले जात असल्याने तसेच आपट्याची पाने एकमेकांना दिली जात असल्याने या खरेदीसाठी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ फुलली होती. दसऱ्याच्या दिवशी सकाळी शाळांमध्ये सरस्वतीपूजन केले जाते. पाटीवर अंकरुपी सरस्वती काढून त्यावर हळदी-कुंकू वाहून पूजा केली जाते. शालेय विद्यार्थ्यांना या दिवसाचे महत्त्व यानिमित्ताने सांगितले जाते. तसेच, आपट्याची पाने, फुले वाहून पूजा, नव्या कार्याचा शुभारंभ करण्याची, आपट्याची पाने 'सोने' म्हणून लुटण्याची परंपरा असल्याने दिवसभर या सणामुळे चैतन्य निर्माण होते. या दिवसाच्या मुहूर्तावर खरेदी करणे शुभ मानले जात असल्याने आज मोठी उलाढाल बाजारात होणार आहे. दसऱ्याला खरेदीसाठी प्राधान्य दिले जात असल्याने अनेक मोठे दुकानदार दसऱ्याच्या काही दिवसांपूर्वीपासूनच तयारीला लागले होते.

ऑफर्सची बरसात

अनेकांनी मोठमोठ्या ऑफर्स खरेदीवर दिल्या असून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अनेकांनी गृहपयोगी वस्तू, वाहन, घरे यांची बुकिंग करून ठेवली असून दसऱ्याच्या मुहूर्तावर गृहप्रवेश व विविध वस्तू घरात आणल्या जाणार आहेत. तसेच सोने खरेदीही आजच्या मुहूर्तावर महत्त्वाची मानली जात असल्याने सराफी पेढ्यांनी घडणावळीवर सवलत जाहीर केली आहे.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिवर्तनासाठी पुढाकार

$
0
0

जन्म एका दुर्लक्षित वस्तीमध्ये झाला. बालपणापासून परिस्थितीच्या अनेक झळा त्यांनी सोसल्या. परिस्थितीचा परीघ बदलण्याची प्रचंड इच्छा मनात खदखदत होती. समस्यांच्या वर्तुळावर फुली मारण्यासाठी त्यांनी परिवर्तनाचा वसा घेतला. दुर्लक्षित वस्त्यांमधल्या स्त्रियांच्या आरोग्याच्या प्रश्नांपासून तर महाविद्यालयीन तरुणांच्या मानसिकतेत बदल घडविण्यापर्यंतचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. परिवर्तनासाठी सरकारी नोकरीवर पाणी सोडत संपूर्ण जीवन समाजकार्यासाठी त्यांनी वाहून घेतले आहे. ही कथा आहे, सामाजिक कार्यकर्त्या अनिता पगारे यांची.

नाशिकच्या एका दुर्लक्षित वस्तीमध्ये अनिता पगारे यांचे बालपण गेले. गरिबांचा शिक्षणासाठीचा लढा त्यांनी जवळून अनुभवला. त्यासोबतच इतर समस्यांची जाणिव त्यांना झाली होती. यावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रीय सेवा दलामार्फत त्यांनी कार्य सुरू केले. समाजहिताच्या चळवळीचे कार्य सुरू झाल्यानंतर १९९९ मध्ये संगिनी महिला जागृती मंडळाची अनिता पगारे यांनी सुरुवात केली. बीए राज्यशास्त्र विषयाचे शिक्षण घेऊन पुढे एमएसडब्लूचे पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शहरासह ग्रामीण भागातील दुर्लक्षित वस्तीमधील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न, गटारांची समस्या, पाणी प्रश्न, अंगणवाडी समस्या यांवर प्रत्येकाला जागे करणे त्यांनी सुरू केले. 'संघर्षात्मक जीवनाला आता पर्याय उरला नाही. विविध विषायांसाठीच्या चळवळीतील संघटना फक्त विचारांची दिशा देऊ शकतात. जीवनातील वंचित गोष्टींवर प्रकाशझोत टाकणे स्वतःला जमले पाहिजे. त्यासाठी प्रत्येकात नेतृत्वगुण असावे', असे अनिता पगारे सांगतात.

सामाजिक कार्य करतानाच त्यांनी महिला हक्क संरक्षण समिती, रेशनिंग कृती समिती, स्पेशल सेल फॉर वुमन अँड चिल्ड्रेन या सरकारी विभागात कार्य केले. सरकारी नोकरीतही महिला आणि बालकांच्या हितासाठी कार्य करायला मिळाले, याचा त्यांना सामाजिक कार्यात अधिक फायदा झाला. सरकारी नोकरी करीत असताना महिलांच्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना त्यांनी जवळून पाहिल्या. डिप्रेशनचा अॅटॅक आल्यानंतर त्यांनी सरकारी नोकरीला रामराम ठोकला. त्यानंतर समाजकार्यासाठी पूर्णतः त्यांनी वाहून घेतले. सध्या संगिनी महिला मंडळाच्या अंतर्गत शाळा-कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या मानसिकेतत बदल घडविणे, त्यांच्यामध्ये सामाजिक लिंगभाव या संदर्भात जनजागृती करणे यासह मासिक पाळी संदर्भात सर्वेक्षण, महिलांच्या विविध अडचणींवर त्या कार्य करत आहेत. 'तरुणाईमध्ये सध्या प्रचंड हिंसाचार वाढला आहे. कोणत्याही क्षुल्लक गोष्टींवरून तरुण पिढी क्रोधित होते. हिंसाचारामागे अनेक कारणे आहेत. महिलांची शक्ती आता अधिक वाढली आहे. त्यामुळे पुरुषांच्या तरुणाईच्या हिंसाचारावर काम करणार आहे', असे अनिता पगारे सांगतात. शाळा-कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाढणारी प्रेम भावना, मैत्री आणि लिंग समभाव यांवरचे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.

(शब्दांकन - सौरभ बेंडाळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जल’आंदोलनाची दुंदुभी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या धरणांमधून एकीकडे जायकवाडीला पाणी सोडण्याची भूमिका पालकमंत्री घेत असताना, दुसरीकडे भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी विरोधाची भूमिका घेतली आहे. यावरून शिवसेना, काँग्रेस, मनसे राष्ट्रवादीने भाजपवर हल्लाबोल करीत, निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन भाजप हे षडयंत्र करीत असल्याची टीका केली. सन २०१६मध्ये पाणी सोडण्याचे समर्थन करणारे भाजपचे आमदार आता विरोध का करीत आहेत, असा सवाल विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला. जायकवाडीला पाणी सोडण्यास आमचा विरोध असून, या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे आक्षेप नोंदवण्यासह गंगापूर धरणावरच जनआंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणानुसार जायकवाडी धरणाला नाशिक आणि नगरच्या धरणातून पाणी सोडण्याची तयारी सुरू झाली आहे. नगरमधून पाणी सोडण्याला तीव्र विरोध होत असतानाच, नाशिकमधील भाजपच्या आमदार प्रा. फरांदे यांनीही विरोध केला आहे. दुसरीकडे पालकमंत्री गिरीश महाजन पाणी सोडण्यावर ठाम आहेत. यावर शिवसेनेचे अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, मनसेचे गटनेचे सलीम शेख, काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी एकत्रितपणे पत्रकार परिषद घेऊन, नाशिकमधून पाणी सोडण्यास तीव्र विरोध केला आहे. नाशिक जिल्ह्यात दहा तालुक्यांमध्ये भीषण दुष्काळ असताना, मराठवाड्याला पाणी सोडण्यास सर्वपक्षीयांनी विरोध केला आहे. जायकवाडीला पिण्यासाठी पुरेसे पाणी असताना, निव्वळ तेथील सिंचन, बिअरचे कारखाने आणि साखर कारखाने पोसण्यासाठी पाणी सोडण्याचा डाव आखला जात असल्याचा आरोप बोरस्ते यांनी केली. मुळात समन्यायी पाणीवाटप धोरणाचे पाच वर्षांनी पुनरावलोकन करणे अपेक्षित असताना तसेच नाशिकच्या पाण्याचा कोटा निश्चित करण्यापूर्वीच पाणी सोडणे चुकीचे असून, हा निव्वळ नाशिकच्या पाण्यावर डोळा ठेऊन पाणी सोडण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

विरोधी नेते आक्रमक

याबाबत भूमिका मांडताना विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते म्हणाले की, भाजपच्या आमदारांनी विरोधकांना सोबत येण्याचे आवाहन करण्याऐवजी सर्व प्रथम आपल्या आमदारांची एकत्रीत मोट बांधून पालकमंत्र्याकडे प्रश्न मांडावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे म्हणाले की, नाशिकमध्येच दुष्काळ असताना, इथले पाणी मराठवाड्याला नेले तर, पाण्याचाच अपव्यव होणार आहे. जायकवाडी धरणातून पाण्याची प्रचंड चोरी होते. मनसेचे गटनेते सलीम शेख म्हणाले की, मराठवाड्यातील बिअर, साखरेचे कारखाने पोसण्यासाठी नाशिकचे हक्काचे पाणी पळवण्याचा घाट घातला जात आहे. काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे म्हणाले की, नाशिकबाबत भाजप आणि राज्यसरकारकडून नेहमी दुजाभावाची भूमिका घेतली जाते. गेल्या वेळीही पाणी सोडले अन् आता विरोधाची नौंटकी करून पुन्हा पाणी सोडणार आहेत.

मंगळवारी कायदेतज्ज्ञांची बैठक

जायकवाडीला पाणी सोडण्याविरोधात न्यायालयीन तसेच कायदेशीर मार्ग अवलंबण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. शहरातील जलतज्ज्ञ आणि राजकीय पक्षाशी निगडीत कायदेतज्ज्ञांची बैठक येत्या मंगळवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यासह पाणी सोडण्याविरोधात थेट सुप्रीम कोर्टापर्यंत लढा देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. पाणी सोडण्यास विरोध करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आक्षेप नोंदवणार आहेत. या आंदोलना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, माकप, भाकप व भारीप बहुजन महासंघही समाविष्ट होणार आहे. त्यामुळे भाजपची अडचण वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मशिन ऑपरेटर ते यशस्वी उद्योजक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कधीकाळी आयटीआयचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी एका कंपनीत ड्रिलिंग मशीन ऑपरेटर म्हणून काम करणारा कामगार स्वत:ची कंपनी सुरू करून उत्पादीत माल सातासमुद्रापार पाठवेल, यावर कदाचित कुणाचा सहजासहजी विश्वास बसणार नाही. परंतु, शेतकरी कुटुंबातून आलेल्या एन. डी. ठाकरे या धडपड्या व्यक्तीने मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर हे सीमोल्लंघन करून दाखविले आहे.

नानासाहेब दादाजी ठाकरे असे या उद्योजकाचे नाव. परंतु, ते एन. डी. ठाकरे म्हणूनच अधिक ओळखले जातात. चांदवड तालुक्यातील काजी सांगवी हे त्यांचे मूळगाव. आई-डील शेती करतात. कोरडवाहू शेतीत कितीही राबले, तरी त्यातून जीवनाला आकार देता येईल याची शाश्वती नसल्याने ठाकरे यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले. आयटीआयमध्ये शिक्षण घेत असतानाच त्यांनी एका कंपनीत ड्रिलिंग मशिन ऑपरेटर म्हणून काम सुरू केले. त्यानंतर त्यांनी डिप्लोमा पूर्ण केला. श्री दुर्गा इंडस्ट्रीमध्ये सुपरवायझर म्हणून काम करताना सेल्स आणि सर्व्हिसेसच्या निमित्ताने देशभर फिरता आले. यातून दृष्टी अधिक व्यापक झाली. कामगार म्हणून केवळ चरितार्थ चालविता येईल. परंतु, इतरांना काम देऊन स्वत:चाही उत्कर्ष साधण्यासाठी त्यांनी स्वत:चा उद्योग सुरू करण्याचा विचार केला. चालून आलेली राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सरकारी नोकरीची संधी नाकारली. सिलिंग टेक्नॉलाजी लिकेजविरहीत व्हावी, या उद्देशाने त्यांनी १९९१ मध्ये उद्योगात पदार्पण केले. फार्मास्युटिकल्स, शुगर इंडस्ट्री, केमिकल फॅक्टरीज आणि डिस्टिलरीजला मेकॅनिकल सील्स पुरविण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला. त्यामुळे कारखान्यांमध्ये वीजेची बचत होऊन केमिकल लिकेजची समस्याही दूर झाली. इंडो सिल्स प्रायव्हेट लिमिटेडच्या यशस्वी घौडदौडीनंतर २००७ मध्ये इंडो पंप्स प्रायव्हेट लिमिटेडची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. कंपनीच्या उत्पादनांना देशभरातील कारखान्यांसह केनिया, फिलिपाइन्स, दक्षिण अफ्रिका, सुदान आणि जर्मनीत मागणी असून, कंपनीची कोट्यवधींची उलाढाल आहे. त्यांनी ८५ जणांना रोजगारही उपलब्ध करुन दिला आहे.

(शब्दांकन : प्रवीण बिडवे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्योती पेपर्सच्या संचालकांवर गुन्हा

$
0
0

नाशिक : गुंतवणुकीवर १८ टक्के व्याज देऊ, असे आमिष दाखवून एका दाम्पत्याने दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद एका महिलेने दिली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी ज्योती पेपर्स उद्योग लिमिटेडच्या संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयंत दगडू खैरनार (वय ४०) व अलका जयंत खैरनार (वय ३५, रा. शांती सदन, वेद मंदिर, त्र्यंबकरोड) अशी संशयितांची नावे आहेत. सपना मनोज गुप्ता (वय ३८, रा. गुप्ता वाडी, त्र्यंबकरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ संशयित खैरनार दाम्पत्याने त्यांच्या कंपनीमध्ये व्यवसायासाठी डिपॉझिट म्हणून पैसे गुंतविल्यास १८ टक्के व्याज देऊ असे आमिष दाखविले़ त्यानुसार गुप्ता व त्यांच्या सासूला १५ लाख रुपये गुंतविण्यास भाग पाडले. परंतु, खैरनार दाम्पत्याने एकदाच १६ हजार ५०० रुपये व्याज दिले़ उर्वरित व्याज व राहिलेली मुद्दल दहा लाख रुपये परत न करता या रकमेचा अपहार केल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


५१ फुटी रावणाचे होणार दहन

$
0
0

मेहरुण तलावावर होणार आतषबाजी; जलसंपदामंत्री महाजन यांची उपस्थिती

म. टा. प्रतिनिधी, जळगाव

जळगाव शहरातील मेहरुण तलाव चौपाटीवर सालाबादप्रमाणे गुरुवारी (दि.१८) विजयादशमीला रावणाच्या प्रतिकृतीचे दहन करण्यात येणार आहे. यासाठी ५१ फूट उंच रावणाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते रावणाचे दहन होणार आहे. यावेळी होणारी फटाकांची आतषबाजीचे विशेष आकर्षण राहणार आहे.

शहरातील एल. के. फाउंडेशनतर्फे रावण दहनाचे आयोजन करण्यात आले आहे. राजेश नाईक हे आठवडाभरापासून ५१ फुटाचा रावणाची प्रतिकृती तयार करीत आहेत. आज सायंकाळपर्यंत रावणाची प्रतिकृती पूर्ण होणार आहे. तसेच मेहरुण तलावाच्या चौथाऱ्यावर रावण दहनाचा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी ६ वाजता पार पडणार आहे. यावर्षी रावणदहन हे पर्यावरणपूरक होण्यासाठी रावणाचा सांगाडा हा बांबू वापर न करता त २५० किलो लोखंडी पाइप वापरुन तयार करण्यात आला आहे. हा सांगडा शरीफ काकर यांनी तयार केला आहे. तसेच तयार करण्यात आलेल्या रावणाचे दहा तोंड हे सुमारे १८ फुटाचे असून गेल्यावर्षी रावणाची प्रतिकृती ४१ फूट होती. मात्र यावर्षी ५१ फुटांचा रावणाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. रावण दहन करण्याासाठी संगमनेर येथील जमीर फायरवर्क्स यांच्याकडून रावणाच्या प्रतिकृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आताषबाजी करण्यात येणार आहे. ही आताषबाजी सुमारे ३० मिनिटांपर्यंत सुरू राहणार असल्याने आतषबाजीचे विशेष आकर्षण राहणार आहे. रावणाचे दहन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला आमदार सुरेश भोळे, चंदुलाल पटेल, स्मिता वाघ, महापौर सीमा भोळे, उपमहापौर डॉ. अश्‍विन सोनवणे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे, आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्यासह सर्व जळगावकर उपस्थित राहणार आहे.

वाहतूक मार्गाात बदल

दसऱ्याच्या दिवशी मेहरुण चौपाटीवर रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानिमीत्त शहरातील वाहतुक मार्गात बदल करण्यात आला आहे. यामध्ये उद्या दुपारी ३ वाजेपासून ते रात्री १० वाजेपर्यंत मोहाडी रोडपासून ते ग्रॅपीज हाटेल जवळील हाजी मलंग दर्जापर्यंत सर्व वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हा रस्ता केवळ अत्यावश्यक वाहनांसाठी खुला राहणार आहे. तसेच नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी मोहाडी रोड बाय पॉईंटपासून महाबळ चौक या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिस विभागातर्फे करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंग गडावर फडकली कीर्तिध्वजा

$
0
0

मिरवणुकीत भाविकांचा उत्साह; आज दसऱ्यानिमित्त गर्दी उसळणार;

म. टा. वृत्तसेवा, कळवण

श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवानिमित्त सप्तशृंग गडाच्या शिखरावर फडकविण्यात येणाऱ्या कीर्तिध्वजाची गडावर बुधवारी सायंकाळी मिरवणूक काढण्यात आली. जिल्हा न्यायाधीश श्रीमती नंदेश्वर, देवस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या ध्वजाची पूजा हस्ते करण्यात आली. त्यानंतर गावातून मिरवणूक काढून पहिल्या पायरीजवळ कीर्तिध्वजा आणली. मध्यरात्री १२ वाजता गवळी परिवाराने ही कीर्तिध्वजा गडाच्या उंच माथ्यावर दिमाखात फडकविली आणि गडावर 'सप्तशृंगी माते की जय, बोल अंबे की जय', असा जयघोष करण्यात आला.

प्राचीन परंपरा असलेल्या कीर्तिध्वज घेवून दरेगाव (व) येथील एकनाथ गवळी पाटील कुटुंब शिखरावर जातात. वर्षातून दोन वेळा होणाऱ्या यात्रोत्सवाच्या वेळी एकनाथ लक्ष्मण गवळी व गवळी परिवारातील सदस्यांकडून हा कीर्तिध्वज गडाच्या शिखरावर फडकविली जाते. यावेळी कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, कळवणचे पोलिस निरीक्षक सुधाकर मांडवकर, पोलिसपाटील शशिकांत बेनके, उपसरपंच राजेश गवळी, संदीप बेनके, गिरीश गवळी उपस्थित होते.

हजारो भाविक नतमस्तक

नवरात्रोत्सव निमित्ताने सप्तशृंग गडावर भाविकांचा ओघ सुरू आहे. पहिल्या पायरीपासून बाऱ्या लागलेल्या आहेत. हजारो भाविकांनी मनोभावे भगवतीचे दर्शन घेतले. देवस्थानमार्फत ठिकठिकाणी पाण्याची व मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आल्यामुळे भाविकांना कुठेही अडचण भासत नाही. मुंबई, पुणे, नागपूर, सुरतसह कळवण, देवळा, सटाणा, मालेगाव, धुळे, नंदुरबार, जळगाव परिसरातून हजारोंच्या संख्येने भाविक गडावर आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुटखा पकडला

$
0
0

दिंडोरी : स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी वणी शहरातील मनोज बोथरा यांच्या गोडावूनवर धाड टाकून गुटखा व सुगंधी तंबाखू जप्त केली. वणी पोलिसांत याबाबत तक्रार दाखल केली आहे. पुढील कारवाई लवकरच करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा जळाला

$
0
0

मनमाड : दुष्काळामुळे जनावरांसाठी चाऱ्यासाठी सर्वांची वणवण सुरू असताना नांदगावनजीक खिर्डी येथे चारा घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला विजेचा धक्का लागून तब्बल दोन ट्रॉली चारा खाक झाला. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास खिर्डी येथे ही घटना घडली. शेतकरी भावराव मते यांनी बाहेर गावाहून चारा मागवला होता. मात्र तो जनावरांपर्यंत पोहोचण्याआधीच खाक झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थीनी झाल्या १७ पुस्तकांतून व्यक्त

$
0
0

वाचनातून व्यक्त झाले विद्यार्थी

बिटको कॉलेजात अनोखा उपक्रम

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या आर. एन. चांडक आर्टस्, जे. डी. बिटको कॉमर्स ॲण्ड एन. एस. चांडक सायन्स कॉलेजमधील मराठी विभागातील १७ विद्यार्थ्यांनी आजच्या युगातील तरुणांना वाचनाचे वेड असायला हवे, तरच वाचन संस्कृतीत वाढ होईल आणि पर्यायाने त्याचा उत्तम युवापिढी घडण्यासाठी उपयोग होईल अशा १७ थोर नेत्यांच्या पुस्तकांचा परिचय करून दिला.

वाचताना आपण लेखकाचं म्हणणे ऐकत असतो. सध्याच्या जीवनात ऐकण्यासाठी कोणाला वेळ नसतो. वाचनामुळे आपल्याला इतरांच ऐकायची सवय लागते. ऐकण्यासाठी संयम असायला हवा. वाचनामुळे आपण आपोआप संयम राखायला शिकतो. थोर नेत्यांच्या जीवनातील आवडलेले प्रसंग वाचनानंदामुळे जीवनाला कशा प्रकारची दिशा देतात हे सर्व विद्यार्थ्यांनी सांगितले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अनंत येवलेकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. धनेश कलाल, उप्राचार्य डॉ. एस. एन. तुपे होते तर प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉ. दिलीप बेलगावकर उपस्थित होते. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. आर. टी. आहेर यांनी केले. अध्यक्ष डॉ. तुपे म्हणाले की, वाचनामुळे सामान्य ज्ञान वाढते. आपल्याला जर वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळ, लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो. त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यात मदत होते. वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो.

यावेळी वाचलेल्या पुस्तकाविषयी पूजा दंडगव्हाळ, प्रियांका तायडे, धनश्री कुलकर्णी, दीपाली शिंदे, निरंजना बिडगर, गौतमी पगारे, सोमनाथ अहीर, संतोष टोचे, दीपक जाधव, पंढरीनाथ गवळी, उज्ज्वला रंधे, शीतल कंक, तेजस्विनी सहाणे, मोना बागुल, प्रियंका कटारे, छाया काळे यांनी स्वत: वाचलेल्या पुस्तकाविषयीचा माहितीपट थोडक्यात मांडला. यावेळी डॉ. उत्तम करमाळकर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनपटाची चित्रफित सादर केली. प्रा. आर. टी. आहेर यांनी वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने उत्कृष्ट पुस्तक वाचन करणाऱ्या १७ विद्यार्थ्यांना पुस्तके भेट दिली. यावेळी डॉ. रमाकांत कराड, प्रा. कौतिक लोखंडे, डॉ. विजया धनेश्वरी, डॉ. उत्तम करमाळकर, डॉ. संभाजी शिंदे व मराठी विभागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवानी शहाणे हिने सूत्रसंचालन केले तरा प्रियंका चंद्रमोरे हिने आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रावण दहनामुळे वाहतूक मार्गात बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील दसऱ्यानिमित्त चर्तुसंप्रदाय आखाड्याच्या वतीने रामकुंड येथील मैदानावर रावणदहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी (दि.१८) होणाऱ्या या कार्यक्रमासाठी पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केला आहे. गाडगे महाराज पुलाकडून मालेगाव स्टॅण्डकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना दुपारी तीन ते रात्री दहा यावेळेत प्रवेश बंद असणार आहे.

पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. गुरुवारी (दि.१८) दसऱ्यानिमित्त चतुसंप्रदाय आखाड्याचे महंत कृष्णचरणदास महाराज यांच्या वतीने रावणदहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी सायंकाळी सहा वाजता आखाड्यापासून श्री राम-लक्ष्मण सेनेची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मालेगाव स्टॅण्ड-मालवीय चौक-शिवाजी चौक-सितागुंफा रोडने श्री काळाराम मंदीर-सरदार चौक-साईबाबा मंदिरमार्गे ही मिरवणूक रामकुंड पार्किंग मैदानापर्यंत येणार आहे. तेथे रामलीलेत राम व रावणाच्या युद्धाचा प्रसंग दाखविण्यात येणार असून, त्यानंतर रात्री आठ वाजता रावण दहनाचा कार्यक्रम होणार आहे. याखेरीज दुपारी चार ते रात्री नऊ या कालावधीत ओझर येथील नवरात्र मंडळाची मिरवणूक रामकुंडावर येणार असून, देवी मूर्तीचे विसर्जन होणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दुपारी तीन ते रात्री १० या वेळेत एकेरी वाहतूक सुरू ठेवली जाणार आहे. मालेगाव स्टॅण्ड-रामकुंड-सरदारचौक ते गाडगे महाराज पूल हा एकेरी मार्ग म्हणून सुरू राहणार आहे. गाडगे महाराज पुलाकडून मालेगाव स्टॅण्डकडे येणाऱ्या वाहनांना गणेशवाडी-काट्या मारुती पोलिस चौकी-निमाणी बसस्थानक-पंचवटी कारंजामार्गे मालेगाव स्टॅण्डकडे येता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात अधिकाऱ्यांची चौकशी

$
0
0

चौकशी अधिकारीपदी बाबूराव हांगे; खुलासा करण्यासाठी धावपळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ग्रीनफिल्ड प्रकरणातील तीन बड्या अधिकाऱ्यांसह महापालिकेतील तब्बल सात अधिकाऱ्यांच्या विभागीय चौकशीला महासभेचा हिरवा कंदील कंदील दाखवत, चौकशीलाही सुरुवात केली आहे. या अधिकाऱ्यांच्या चौकशीची जबाबदारी बाबूराव हांगे यांच्याकडे देण्यात आली असून त्यांनी संबधितांना नोटिसा पाठवून खुलासा मागवला आहे. खुलासा सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या चौकशीसाठी सरकारकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

उच्च न्यायालयाची स्थगिती असतानाही गंगापूररोडवरील बहुचर्चित ग्रीनफिल्ड लॉन्सवरील कारवाईचे प्रकरण महापालिकेच्या तीन बड्या अधिकाऱ्यांच्या अंगाशी आले. 'ग्रीनफिल्ड'चे अतिक्रमण पाडण्यात आल्याने न्यायालयाने आयुक्तांना माफीनामा सादर करायला लावत, सदर संरक्षित भिंत बांधून देण्याचे आदेश दिले. या प्रकरणात अतिरिक्त आयुक्त बोर्डे यांच्यासह उपायुक्त रोहिदास बहिरम व नगररचना विभागाचे कार्यकारी अभियंता पी. बी. चव्हाण यांच्यावर दुर्लक्षित केल्याचा ठपका ठेवत दोषारोप निश्चित केले आहे. आयुक्तांनी त्यांच्या विभागीय चौकशीचे आदेश दिला आहे. तसेच निवृत्त झालेले प्रभारी शहर अभियंता यू. बी. पवार, मुख्य अग्निशमन अधिकारी अनिल महाजन आणि उपमुख्य लेखाधिकारी सुरेखा घोलप, वैद्यकीय अधिकारी राजेंद्र भंडारी यांचीही विभागीय चौकशी सुरू केली आहे.

पवार यांच्यावर नियंत्रणहिनता, निविदा प्रक्रियेतील अनियमितता आणि आर्थिक तरतुदींचे नियोजन न करता ठेकेदारांची देयके अदा केल्याचा ठपका आहे. महाजन यांच्यावर 'ना हरकत' दाखल्यांच्या प्रकरणात तफावत, नवीन बिटको रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेच्या कामात अनियमितता, अग्निसुरक्षा निधीतील गोंधळ, अग्निशमन सेवा शुल्काची आकारणी न केल्याचा दोषारोप आहे. घोलप यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप आहे. या सर्वांची विभागीय चौकशी सुरू करत, त्यासंदर्भातील माहितीचा प्रस्ताव महासभेवर अगोदरच ठेवला आहे.

राजकीय हस्तक्षेपाला ब्रेक

अधिकाऱ्यांच्या चौकशीत राजकीय हस्तक्षेप होत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे आयुक्तांनी थेट चौकशी करून कारवाईचा अहवालच महासभेत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, त्यापूर्वी महासभेला या अधिकाऱ्यांची चौकशीची माहिती सादर केली आहे. महासभेत माहिती सादर केली असली तरी त्यापूर्वीच चौकशी सुरू करत अधिकाऱ्यांनाकडून खुलासे मागवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या प्रकरणात राजकीय हस्तक्षेपाला ब्रेक लागला असून एका दगडात दोन पक्षी मारण्याचे काम आयुक्तांनी केले आहे.

लोगो : ग्रीनफिल्ड कारवाई प्रकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मासिक पाळीच्या पलीकडे बघा

$
0
0

अमृता फडणवीस यांचे आवाहन; विद्यार्थिनींना दहा लाख सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मासिक पाळीबद्दल समाजात अद्यापही संकुचित मानसिकता असून ती शरीराची नैसर्गिक क्रिया आहे, हे मनात पक्क करणे गरजेचे आहे. आजच्या धावपळीच्या काळात पुरुषांच्या बरोबरीने स्वत:ला सिद्ध करायचे असेल तर मासिक पाळीच्या पलीकडे बघा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शालेय विद्यार्थिनींना केले.

अहिल्या फाऊंडेशन व जिल्हा परिषदेच्या सहकार्याने 'संकल्प स्त्रीत्वाच्या सन्मानाचा' हा कार्यक्रम कालिदास कलामंदिर येथे बुधवारी झाला. यावेळी जिल्ह्यातील १ हजार ६४ शाळांमधील दीड लाख मुलींना एकाचवेळी दहा लाख सॅनिटरी नॅपकिन वाटून जागतिक विक्रम करण्यात आला. वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. माजी आमदार जयंत जाधव यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. याप्रसंगी फडणवीस म्हणाल्या, की इतिहासात डोकावून पाहिल्यास मासिक पाळी आलेल्या मुलीची पूजा केली जात असे. तिला नवीन कपडे घेतले जात असते. तिला शारीरिक स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले जात असे. त्यामुळे ही लाजिरवाणी बाब कधीच नव्हती. आज जागतिक स्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धा, खेळ यातून मेडल्स आणणाऱ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. कारण त्या मासिक पाळीत अडकून न पडता त्यातून बाहेर पडल्या आहेत. महिला सक्षमीकरण खऱ्या अर्थाने करायचे असेल, तर सुदृढ आरोग्यावर लक्ष केंद्रीत करा, असेही त्या विद्यार्थिनींना उद्देशून म्हणाल्या.

कार्यक्रमाचा प्रारंभ मोहिनी भुसे हिच्या संबळवादनाने झाला. किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीविषयी जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले. तसेच जिल्ह्यातील या उपक्रमाची प्रेरणा राज्यातील इतर जिल्हेही घेतील, असा आशावाद व्यक्त केला. तर एमईटी कॉलेजच्या शेफाली भुजबळ यांनी समाजात मासिक पाळीविषयी असलेला संकुचित दृष्टीकोन बदलण्याची गरज व्यक्त केली.

उपाध्यक्षा नयना गावित, महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे, आमदार दीपिका चव्हाण, शेफाली भुजबळ, शांती राधाकृष्णन्, अर्चना मुंढे, डॉ. अनिला सावंत, अनिता भुसे, रोहिणी दराडे, जान्हवी जाधव, जयश्री गिते, वैशाली झनकर, आमी छेडा आदींची मंचावर उपस्थिती होती. माजी आमदार जाधव यांची कन्या सुप्रिया जाधव हिने 'दसऱ्यापूर्वीच आरोग्याचे सोनं लुटण्याचा हा दिवस आहे', अशी भावना व्यक्त करत या उपक्रमाबाबत अभिमान व्यक्त केला. केटीएचएम कॉलेज, व्ही. एन. नाईक कॉलेज व एसएमआरके कॉलेज यांना व्हेंडिंग मशिन भेट देण्यात आले. तसेच शासकीय माध्यमिक कन्या विद्यालय, सारडा कन्या विद्यालय, आदर्श माध्यमिक विद्यालय, वाय. डी. बिटको, आण्णासाहेब वैशंपायन माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थिनींना प्रातिनिधीक स्वरुपात सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले.

चित्र बदलण्याची गरज

देशातील ८० टक्के स्त्रिया आजही पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन्सचा वापर न करता कापड वापरतात. यामुळे आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात. आजपासून प्रत्येक मुलीने आत्मविश्वासाने सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी करावेत. या नॅपकिन्सचे दर कमी झाले आहेत, ते अजून कमी करण्याचे व देशभरातील अधिकाधिक महिलांनी त्याचा वापर करावा, याविषयी जनजागृती करण्याचे सरकारचे ध्येय असल्याचे फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवसायक पॅनलसाठी अर्ज करण्याचे आवाहन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील अवसायनातील संस्थांच्या कामकाजासाठी पॅनल तयार करायचे असून त्यासाठी विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांच्याकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

अर्ज करणाऱ्या व्यक्ती न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश व सेवानिवृत्त विधी अधिकारी, प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेट्स, चार्टर्ड अकाउंटन्ट, कॉस्ट अकाउंटन्ट, कंपनी सेक्रेटरी राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका, भूविकास बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, व्यापारी बँका, नागरी सहकारी बँका, राज्य सहकारी बँका यांचे सेवेतील व्यवस्थापक दर्जापेक्षा कमी नसलेले सेवानिवृत्त अधिकारी, सहकार विभागातील सेवानिवृत्त वर्ग-१, वर्ग-२ अर्जाचे अधिकारी आणि प्रथम श्रेणी व द्वितीय श्रेणी दर्जाचे कर्मचारी, महसूल विभागातील सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी किंवा कंपनी लिक्विडेटर म्हणून कामकाज केलेले अनुभवी व्यक्ती किंवा सहकारी संस्थेच लेखापरिक्षण केल्याच्या १० वर्षांच्या अनुभवी प्रमाणित लेखापरिक्षक असावे.

अर्जदार व्यक्तींवर कोणत्याही स्वरुपाचे गुन्हे दाखल नसावेत. शासकीय सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी असल्यास त्यांची कोणत्याही प्रकारची खातेनिहाय चौकशी चालू नसावी व सेवेत कोणताही ठपका ठेवलेला नसावा. वयोमर्यादा ७० वर्षांपर्यंत असावी. शारीरीक व मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम असावा. प्रॅक्टिसिंग ॲडव्होकेटस व चार्टर्ड अकाउंटन्ट, कॉस्टह अकाउंटन्ट, कंपनी सेक्रेटरी यांना सहकारी संस्थेचे कामकाजाचा ५ वर्षांचे अनुभव असणे आवश्यक आहे. तो कोणत्याही सहकारी संस्थेचा थकबाकीदार नसावा किंवा कलम ८३ व ८८ च्या चौकशीबाबत जबाबदार नसावा. यातील व्यक्ती कोणत्याही काळ्या यादीमध्ये समाविष्ट नसावी. निवड झालेली व्यक्ती सबंधित विभागाच्या सहनिबंधक, सहकारी संस्था, कार्यालयाच्या अधिपत्याखाली येणाऱ्या जिल्ह्यातील रहिवासी असावी. एक व्यक्ती एकावेळी एकाच जिल्ह्यातून अर्ज दाखल करू शकेल.

अर्जाचे विहित नमुने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक गृहनिर्माण भवन, ३ रा मजला, गडकरी चौक, नाशिक यांच्या कार्यालयात ३० ऑक्टोबरपर्यंत कार्यालयीन वेळेत मिळू शकतील. प्राप्त अर्जाची छाननी १३ नोव्हेंबर रोजी पूर्ण होऊन १७ नोव्हेंबरपर्यंत प्रारुप नामिका प्रसिद्ध केली जाईल. त्यावर हरकती मागवून निर्णय घेण्यात येईल. हरकतीचा निर्णय करून ३० नोव्हेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. याबाबतची जाहीर सूचना कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, असे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक विभाग नाशिक यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनमाडमध्ये भरदिवसा घरफोडी

$
0
0

दोन लाख लंपास; दोघांपैकी एका चोरट्यास अटक

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथील श्रावस्ती नगर येथे बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने असा २ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दोघा चोरट्यांपैकी एका चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले असून, फरार चोराचा पोलिस तपास करीत आहेत. बुधवारी रात्री या बाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनमाड येथील व्यावसायिक नुरुद्दीन भारमल हे बुधवारी कुटुंबियांसह आपल्या दुकानात गेले होते. दुपारनंतर ते घरी आले असता

त्यांच्या बंगल्याचे दाराचे कुलूप तोडलेले आढळून आले. बंगल्यातील कपाट फोडून रोख रक्कम २८ हजार सह सोन्या चांदीचे दागिने असा दोन लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे आढळून आले. त्याचवेळी दोन संशयित बंगल्याच्या आवारातून पळून जात असल्याचे त्यांनी पाहिले. भारमल यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र एक जण त्यांच्या तावडीत सापडला व दुसरा निसटला. दरम्यान भारमल यांच्या फिर्यादीवरून मनमाड पोलिसांनी बुधवारी रात्री घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गृहोपयोगी वस्तूंसाठी झुंबड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला पसंती देण्यात आली. अनेकांनी मोबाइल, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, लॅपटॉप यांसह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली होती. शहरातील मुख्य बाजारपेठेसह मॉल्समध्येही ग्राहकांची झुंबड दिसून आली.

दसऱ्याच्या मुहुर्तावर शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू व्यावसायिकांनी अनेक ऑफर्स जाहीर केल्या होत्या. या ऑफर्सचा ग्राहकांनी फायदा करून घेतला. यंदा फोरजी मोबाइलला अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. मोबाइलच्या किमतीवर डिस्काउंटसह काही ठिकाणी कॅशबॅक ऑफर्सही देण्यात आल्या. सोबतच एलईडी टीव्ही, वॉशिंग मशिन, स्वयंपाकघरातील उपकरणे यांच्या खरेदीला अधिक पसंती होती. ४० टक्के डिस्काउंट, बंपर ऑफर यासह काही दुकानदारांनी स्क्रॅच कार्डचा वापर करत ग्राहकांना आकर्षित केले. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानांच्या बाहेर होर्डिंग लावत ऑफर्सची जाहिरात करण्यात आली. लॅपटॉप खरेदीवर डिस्काउंटसह काही अॅक्सेसरीज मोफत देण्यात आल्या. टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन या वस्तूंवरही ३० ते ४० टक्के डिस्काउंट देण्यात आला. सकाळी १० वाजेपासून शहरातील मेनरोड, गंगापूर रोड, कॉलेज रोड, सातपूर, नाशिकरोड, जेलरोड, पंचवटी या भागातील सर्व बाजारपेठेत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी झुंबड उडालेली दिसून आली.

\Bऑनलाइनला पसंती\B

ई-कॉमर्स कंपन्यांनी ऑफर्स दिल्यामुळे अनेकांनी ऑनलाइन वस्तूखरेदीस पसंती दिली. दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक घरांत ऑनलाइन शॉपिंगमधून मागविलेल्या वस्तू पोहोचल्या. अपडेटेड लाइफस्टाइलचा परिणाम सणोत्सवातील खरेदीवर होत असल्याचे यामुळे पुन्हा अधोरेखित झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपहृत मुलगा पुण्यात सापडला

$
0
0

सिडको : बहिणीशी भांडण झाल्यानंतर घरात आपले कोणी ऐकून घेत नाही, असा समज करून अल्पवयीन मुलगा घरातून निघून गेला. मात्र, पोलिसांनी तपास करून त्याला पुण्यात ताब्यात घेऊन पालकांच्या स्वाधीन केल्याची माहिती अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी दिली. सावतानगर येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी दिली होती. यात पोलिसांना मिळालेल्या काही माहितीवरून पुणे येथे एक पथक रवाना केले. तेथे शिवाजीनगर येथे हा मुलगा एका हॉस्टेलमध्ये असल्याचे पोलिसांना समजले. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन नाशिकला आणले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images