Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कालिका दर्शनास अलोट गर्दी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकचे ग्रामदैवत कालिका देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी दसऱ्याचा मुहूर्त साधला. श्री कालिका देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटे पाच वाजेपासून गर्दी केल्याचे दिसले. नवरात्रोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने कालिका मातेच्या चरणी लीन होण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

गुरुवारी नवरात्रोत्सवाचा अखेरचा आणि महत्त्वाचा दिवस असल्याने भाविकांची गर्दी लक्षात घेत पोलिस प्रशासन व मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने चोख व्यवस्था करण्यात आली. यात्रेतून गृहोपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, विविध प्रकारची खेळणी या वस्तू खरेदीकडे भाविकांचा अधिक कल होता. सोबतच यात्रोत्सवातील पाळण्यांची मौज अनुभण्यात नाशिककर दंग झाल्याचे दिसले. भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पहाटेपासून वर्दीतील पोलिसांसह साध्या वेशातील पोलिसांच्या तुकड्या यात्रोत्सवात गस्त घालत होत्या. वाहतुकीला अडसर होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी योग्य नियोजन केले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Shirdi: पंतप्रधान मोदींच्या हस्ते घरकुल वाटप

$
0
0

शिर्डी:

साई समाधीच्या शताब्दी सोहळ्यानिमित्त शिर्डी इथं आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज घरकुल योजनेतील ११ हजार लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचं वाटप करण्यात आलं. पंतप्रधानांनी स्वत: दहा लाभार्थ्यांना चाव्या देऊन या उपक्रमाचा शुभारंभ केला. नंदूरबार, नागपूर येथील लाभार्थ्यांशी यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मराठीत संवाद साधला.

ठाणे, नंदूरबार, अमरावती, सोलापूर, नागपूर, लातूर, साताऱ्यासह विविध जिल्ह्यातील ११ हजार लाभार्थ्यांना यावेळी ई गृहप्रवेश देण्यात आला. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी लाभार्थ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधला. घर मिळाल्याबद्दल तुमच्या मनात काय भावना आहेत?, घरकुल योजनेतून मिळवण्यासाठी लाच द्यावी लागली का?, घर महिलेच्या नावावर केल्यामुळं पुरुषांच्या मनात राग तर नाही ना?, असे अनेक प्रश्न पंतप्रधानांनी विचारले. लाभार्थ्यांनीही त्यांना मोठ्या उत्साहानं उत्तरं दिली. तसंच, नवे घर मिळवून दिल्याबद्दल सरकारचे आभारही मानले. सरकारी योजना आणि सर्वसामान्यांच्यातील मध्यस्थांची साखळी आम्ही तोडल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं.

चौधरी चहाची आठवण

नंदूरबारच्या घरकुल लाभार्थ्यांशी संवाद साधताना पंतप्रधान विशेष खुलले होते. नंदूरबार आमच्या गुजरातचा शेजारी आहे. मला जसं थोडं-थोडं मराठी येतं, तसं नंदूरबारकरांनाही गुजराती येतं, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी नंदूरबारच्या प्रसिद्ध चौधरी चहाची आठवण काढली. नंदूरबारमध्ये जायचो, तेव्हा तो चहा आम्ही प्यायचोच, असंही त्यांनी सांगितलं. यावर नंदूरबारला या, असं आमंत्रणच तेथील महिलांनी मोदींना दिलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Modi in Shirdi: दुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण मदत करू; मोदींची ग्वाही

$
0
0

शिर्डी:

'महाराष्ट्रात यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळं दुष्काळाचं सावट आहे. राज्य सरकार त्यावर मात करण्याचा प्रयत्न करते आहेच, पण काही मदत लागलीच तर महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ. पंतप्रधान पीक विमा योजनेतून मदत करू,' असा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिला.

शिर्डी साई समाधीच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शिर्डी दौऱ्यावर आले होते. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना चावी वाटपासह अनेक विकासकामांचं लोकार्पण यावेळी त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. भाषणाची सुरुवात मराठीतून करताना शिर्डीत येता आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. तसंच, राज्य सरकारच्या कामाचंही कौतुक केलं. 'दुष्काळाच्या समस्येवर मात करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. जलयुक्त शिवारातून १६ हजार गावं दुष्काळमुक्त झाली आहेत. आणखी नऊ हजार गावं दुष्काळमुक्तीच्या मार्गावर आहेत,' असं मोदी म्हणाले.

घरकुल योजनेच्या अंमलबजावणीचाही पंतप्रधानांनी यावेळी आढावा घेतला. घर देण्याचे प्रयत्न यापूर्वी सुद्धा झाले. अनेक योजना होत्या. मात्र, गरिबांना सशक्त करण्याऐवजी एका कुटुंबाचा उदो उदो करण्यात हेतू त्यामागे होता. व्होट बँक तयार करण्याचा उद्देश होता, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीका केली. गेल्या चार वर्षांत भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने १ कोटी २५ लाख घरे बांधली आहेत. काँग्रेसच्या सरकारला हे काम करण्यासाठी २० वर्षे लागली असती, असं सांगून, सेवेची भावना मनात असली की काम वेगाने होते,' असा टोला त्यांनी हाणला. 'आयुषमान भारत' योजनेचा आतापर्यंत १ लाख लोकांनी लाभ घेतला आहे. याच योजनेतून नवीन रुग्णालय उभारण्याचा आमचा प्रयत्न आहे,' असंही त्यांनी सांगितलं.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुर्गा माता की जय’चा देवळाली परिसरात गजर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

दुर्गा माता की जय, अंबे माता की जय, प्यार से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी... अशा देवीच्या जयघोषात देवळालीत विविध ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या देवीच्या मूर्तींची शुक्रवारी शहर परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दारणा पात्रात देवीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

देवळालीतील लष्करी भागातील दुर्गा पूजा उत्सवाचादेखील समारोप झाला. यावेळी लष्करी अधिकारी व बंगाली बांधवांनी पूजन करीत विसर्जन मिरवणूक काढली. यामध्ये ब्रिगेडियर बीजीएस आर. चौधरी, समीर मुखर्जी यांच्यासह लष्करी अधिकारी-जवान व त्यांचा परिवार सहभागी झाला होता. नानेगाव येथील दारणा तीरावर दुर्गामातेसह गणेश, सरस्वती आदी देवतांच्या मूर्तींचे भक्तिभावात विसर्जन करण्यात आले. लामरोड युवक मित्रमंडळाने स्थापन केलेल्या हरसिद्धी मातेच्या मूर्तीची देवळाली परिसरातून मिरवणूक काढून संसरीच्या दारणा तीरावर विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीत खासदार हेमंत गोडसे, मंडळाचे अध्यक्ष रमेश गायकर आदी सहभागी झाले होते. शहरातील अन्य मंडळांनीदेखील दारणातीरी विसर्जन केले.

--

हिंदी प्रसारणी सभेतर्फे पूजन

सातपूर : कामगारनगरी असलेल्या सातपूर भागात हिंदी भाषिकांनी उत्साहात नवरात्री साजरी केली. हिंदी प्रसारणी सभेतर्फे नऊ दिवस देवीचे पूजन करून विजयादशमीनिमित्त देवीची मिरवणूक काढण्यात आली. सातपूर कॉलनीत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

००००००००००००००००००००००

(थोडक्यात)

---

मेरी-म्हसरूळ परिसरात उद्या महास्वच्छता अभियान

पंचवटी : मेरी-म्हसरूळ परिसरात गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे रविवारी (दि. २१) सकाळी ७ वाजेपासून महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात डॉक्टरांचा समावेश राहणार असून, ते उपस्थिताना स्वच्छता कशी राखावी आणि साथीच्या आजारांपासून कशाप्रकारे बचाव करता येईल याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. आमदार बाळासाहेब सानपदेखील मार्गदर्शन करणार आहेत. हे अभियान केवळ गोरक्षनगरापुरते मर्यादित न ठेवता आणि महापालिकेवरच अवलंबून न राहता त्याला व्यापक स्वरूप देऊन इतरही भागात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात डॉ. उल्हास साकळे, डॉ. संजीव तोरणे, डॉ. अरुण विभांडिक, डॉ. रविकिरण निकम, डॉ. देवेंद्र देशपांडे, डॉ. कल्पेश सुराणा, डॉ. धनंजय सांगळे, डॉ. कुणाल लहरे, डॉ. प्रकाश चौधरी, डॉ. दत्तात्रय मुळे, डॉ. सतीश देशमुख यांचा सहभाग राहणार आहे.

---

ड्रेनेजमध्ये जलवाहिनी (फोटो)

सातपूर : अशोकनगर भागात चक्क ड्रेनेज लाइनमध्येच पिण्याच्या पाण्याची वाहिनी टाकण्यात आली आहे. येथील मिठाईच्या दुकानातील चिकट पदार्थ ड्रेनेज लाइनमध्ये सोडले जात असल्याने परिसरातील नागरिकांना ड्रेनेज तुंबण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित दुकानदाराने त्यासाठी पाइपलाइनच टाकल्याचा आरोप होत आहे. या ड्रेनेज लाइनमधूनच पिण्याच्या पाण्याची वाहिनी टाकली गेल्याने महापालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

----

दुभाजक बसविण्यास गती

सातपूर : शहरातून जाणाऱ्या त्र्यंबकेश्वररोडवर महापालिकेने पंक्चरच्या ठिकाणी दुभाजक टाकण्याचे काम हाती घेतले आहे. शुक्रवारी सातपूर पोलिस स्टेशन व स्टेट बँकेसमोरील बॅरिकेडिंग काढत त्या ठिकाणी दुभाजक टाकण्याचे काम सुरू होते. या रस्त्यावर अनेक ठिकाणी पंक्चर ठेवल्याने या भागात अपघातांची मालिका सुरू असल्याबाबत 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महापालिका व वाहतूक पोलिस यांनी पाहणी करून गरजेच्या नसलेल्या पंक्चरच्या ठिकाणी पोलिसांचे बॅरिकेडिंग केले होते. परंतु, तरीही अघात थांबत नसल्याने येथे दुभाजक टाकावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मांगीतुंगी देणार विश्वशांतीचा संदेश

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तीर्थक्षेत्र मांगीतुंगी येथे होणाऱ्या विश्वशांती अहिंसा संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. संमेलनातून जगाला शांततेचा आणि अहिंसेचा संदेश दिला जाणार असून देशभरातून १० हजार बांधव या सोहळ्याला उपस्थित राहतील, अशी माहिती भगवान ऋषभदेव १०८ फुट मूर्ती निर्माण समितीने शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.

गणिनी प्रमुख आर्यिका श्री ज्ञानमती माताजी यांचा ६७ व्या त्याग दिवस आणि ८५ व्या जन्मदिनानिमित्त मांगीतुंगी येथे २२ ते २५ ऑक्टोबर दरम्यान शरद पौर्णिमा महोत्सवात विश्वशांती अहिंसा संमेलन होणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी (दि. २२) या संमेलनाचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आयोजकांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी ज्ञानमती माताजी, स्वस्तिश्री रवींद्रकीर्ती स्वामीजी, महामंत्री संजय पापडीवाल, अधिष्ठाता इंजिनीअर सी. आर. पाटील, कार्याध्यक्ष अनिल जैन, प्रमोद कासलीवाल, पारस लोहाडे आदी उपस्थित होते. संमेलनासाठी ६० हजार चौरस फुटांचा मंडप उभारण्यात येतो आहे. भगवान ऋषभदेव यांच्या अहिंसेच्या तसेच जगा आणि जगू द्या या संदेशाचा प्रचार आणि प्रसार करणे हा या संमेलनाचा उद्देश असल्याची माहिती ज्ञानमती माताजी यांनी दिली. राष्ट्रपती सैन्यदलाच्या हेलिकॉप्टरने येणार असून शनिवारी प्रशासनाकडून या हेलिकॉप्टर्सची चाचणी घेण्यात येणार आहे.

स्वागताचा मान सरपंचांना

संमेलन स्थळापासून जवळच हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली आहे. राष्ट्रपती कोविंद यांच्या स्वागताचा मान आमदार दीपिका चव्हाण यांच्यासह भिलवाड येथील सरपंच बाळूलाल पवार, दसवेलचे सरपंच रवींद्र सोनवणे, ताहराबाद येथील सरपंच इंदुबाई सोनवणे यांना देण्यात आला आहे. यावेळी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुमेर काला देखील उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात पंचक्रोषीतील स्थानिकांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. गावकऱ्यांना हा कार्यक्रम पाहता यावा, यासाठी विशेष मंडप आणि एलईडी स्क्रीनची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

ग्रंथाचे लोकार्पण, पुरस्कार वितरण

उद्घाटन सोहळ्यात दुपारी साडेतीन वाजता सर्वोच्च दिगंबर जैन प्रतिमा या ग्रंथाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. याखेरीज मुरादाबाद येथील तीर्थंकर महावीर विश्वविद्यालयास भगवान ऋषभदेव इंटरनॅशनल अॅवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे. ११ लाखांचा धनादेश, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. प्रत्येक सहा वर्षांनी हा पुरस्कार देण्यात येईल, अशी माहिती महामंत्री संजय पापडीवाल यांनी दिली.

आदर्श गाव म्हणून विकास व्हावा

भगवान ऋषभदेव यांच्या १०८ फुटी भव्य मूर्तीमुळे मांगीतुंगीचे नाव जगाच्या नकाशावर गेले आहे. या भागात आदिवासी बांधव तसेच मागास घटक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत. या परिसरात आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या दर्जदार सुविधांची कमतरता असून त्या उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने विशेष प्रयत्न करायला हवेत. आदर्श गाव म्हणून हा परिसर नावारुपाला यायला हवा, अशी अपेक्षा कर्मयोगी पीठाधीश स्वस्तिश्री रवींद्रकीर्ती स्वामी यांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘दुर्गा माता की जय’चा देवळाली परिसरात गजर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

दुर्गा माता की जय, अंबे माता की जय, प्यार से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी... अशा देवीच्या जयघोषात देवळालीत विविध ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या देवीच्या मूर्तींची शुक्रवारी शहर परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर दारणा पात्रात देवीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

देवळालीतील लष्करी भागातील दुर्गा पूजा उत्सवाचादेखील समारोप झाला. यावेळी लष्करी अधिकारी व बंगाली बांधवांनी पूजन करीत विसर्जन मिरवणूक काढली. यामध्ये ब्रिगेडियर बीजीएस आर. चौधरी, समीर मुखर्जी यांच्यासह लष्करी अधिकारी-जवान व त्यांचा परिवार सहभागी झाला होता. नानेगाव येथील दारणा तीरावर दुर्गामातेसह गणेश, सरस्वती आदी देवतांच्या मूर्तींचे भक्तिभावात विसर्जन करण्यात आले. लामरोड युवक मित्रमंडळाने स्थापन केलेल्या हरसिद्धी मातेच्या मूर्तीची देवळाली परिसरातून मिरवणूक काढून संसरीच्या दारणा तीरावर विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीत खासदार हेमंत गोडसे, मंडळाचे अध्यक्ष रमेश गायकर आदी सहभागी झाले होते. शहरातील अन्य मंडळांनीदेखील दारणातीरी विसर्जन केले.

--

हिंदी प्रसारणी सभेतर्फे पूजन

सातपूर : कामगारनगरी असलेल्या सातपूर भागात हिंदी भाषिकांनी उत्साहात नवरात्री साजरी केली. हिंदी प्रसारणी सभेतर्फे नऊ दिवस देवीचे पूजन करून विजयादशमीनिमित्त देवीची मिरवणूक काढण्यात आली. सातपूर कॉलनीत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

००००००००००००००००००००००

(थोडक्यात)

---

मेरी-म्हसरूळ परिसरात उद्या महास्वच्छता अभियान

पंचवटी : मेरी-म्हसरूळ परिसरात गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे रविवारी (दि. २१) सकाळी ७ वाजेपासून महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात डॉक्टरांचा समावेश राहणार असून, ते उपस्थिताना स्वच्छता कशी राखावी आणि साथीच्या आजारांपासून कशाप्रकारे बचाव करता येईल याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. आमदार बाळासाहेब सानपदेखील मार्गदर्शन करणार आहेत. हे अभियान केवळ गोरक्षनगरापुरते मर्यादित न ठेवता आणि महापालिकेवरच अवलंबून न राहता त्याला व्यापक स्वरूप देऊन इतरही भागात हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात डॉ. उल्हास साकळे, डॉ. संजीव तोरणे, डॉ. अरुण विभांडिक, डॉ. रविकिरण निकम, डॉ. देवेंद्र देशपांडे, डॉ. कल्पेश सुराणा, डॉ. धनंजय सांगळे, डॉ. कुणाल लहरे, डॉ. प्रकाश चौधरी, डॉ. दत्तात्रय मुळे, डॉ. सतीश देशमुख यांचा सहभाग राहणार आहे.

---

ड्रेनेजमध्ये जलवाहिनी (फोटो)

सातपूर : अशोकनगर भागात चक्क ड्रेनेज लाइनमध्येच पिण्याच्या पाण्याची वाहिनी टाकण्यात आली आहे. येथील मिठाईच्या दुकानातील चिकट पदार्थ ड्रेनेज लाइनमध्ये सोडले जात असल्याने परिसरातील नागरिकांना ड्रेनेज तुंबण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित दुकानदाराने त्यासाठी पाइपलाइनच टाकल्याचा आरोप होत आहे. या ड्रेनेज लाइनमधूनच पिण्याच्या पाण्याची वाहिनी टाकली गेल्याने महापालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

----

दुभाजक बसविण्यास गती

सातपूर : शहरातून जाणाऱ्या त्र्यंबकेश्वररोडवर महापालिकेने पंक्चरच्या ठिकाणी दुभाजक टाकण्याचे काम हाती घेतले आहे. शुक्रवारी सातपूर पोलिस स्टेशन व स्टेट बँकेसमोरील बॅरिकेडिंग काढत त्या ठिकाणी दुभाजक टाकण्याचे काम सुरू होते. या रस्त्यावर अनेक ठिकाणी पंक्चर ठेवल्याने या भागात अपघातांची मालिका सुरू असल्याबाबत 'मटा'ने वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर महापालिका व वाहतूक पोलिस यांनी पाहणी करून गरजेच्या नसलेल्या पंक्चरच्या ठिकाणी पोलिसांचे बॅरिकेडिंग केले होते. परंतु, तरीही अघात थांबत नसल्याने येथे दुभाजक टाकावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्ल्यूचे चार बळी

$
0
0

नागपूर : एकीकडे सणावारांचा उत्साह असताना दुसऱ्या बाजूला विदर्भावर आजाराचे सावट कायम आहे. स्क्रब टायफस, डेंग्यूसोबतच विदर्भात स्वाइन फ्लूचा विळखा घट्ट होत आहे. नागपूरच्या विविध रुग्णालयांत ऐन दसऱ्याच्या काळात चारजणांचा या आजाराने बळी घेतला. त्यापैकी सर्वाधिक तीन मृत्यू यवतमाळ जिल्ह्यातील असल्याची नोंद नागपूर महापालिकेने घेतली आहे. या तिघांवरही नागपुरात उपचार सुरू होते. उपराजधानीतही या आजाराने एक रुग्ण दगावला. शहरातील रुग्णालयांत दोनजण आजही व्हेंटिलेटरवर असल्याचे पुढे आले आहे. मंगला सहारे (५१, बेलतरोडी, नागपूर), ज्योती तावडे (३३), गणेशलाल जयस्वाल (६४), सीताराम डोंगरे (७२, तिघेही रा. यवतमाळ) असे स्वाइन फ्लूने दगावलेल्या रुग्णांची नावे आहेत. या रुग्णांमध्ये स्वाइनची लक्षणे आढळल्यावर प्रथम त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयांत उपचार करण्यात आले. प्रकृती खालवल्यावर त्यांना नागपूरच्या वेगवेगळ्या खासगी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याचकाळात स्वाइन फ्लूचे एकूण १२ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी दोन अत्यवस्थ रुग्ण व्हेंटिलेटवर असून त्यांच्यावर उपराजधानीतील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महामंडळाकडून बसेसचे नियोजन

$
0
0

शिर्डी येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी घरकुल लाभार्थींशी संवाद साधणार होते. त्यामुळे नाशिकमधून सुमारे २० हजार नागरिकांना शिर्डी येथे घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ३९० बसेस सज्ज ठेवल्या होत्या. नवरात्रोत्सवात वणी येथील सप्तशृंग गडावर जाण्यासाठी २९० बसेसची व्यवस्था महामंडळाने केली होती. नवरात्रोत्सव गुरुवारी संपल्याने याच बसेस शिर्डीकडे सोडण्यात आल्या. याशिवाय धुळे येथील राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून १०० बसेसची मदत घेण्यात आली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतल्याची माहिती महामंडळातील सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आयुक्तांची बदलीची भविष्यवाणी

$
0
0

आयुक्त मुंढे यांच्यावरील अविश्वास नाट्य फसल्यानंतर मुंढेची बदली होणार अशी चर्चा सुरू होती. मुंढेंनी बदलीच्या चर्चेला महासभेत शुक्रवारी हवा दिली. शाळांच्या स्थितीवर बोलतांना मुंढे यांनी एकमेकांवरील ब्लेमगेम सुरूच राहील, असे सांगत स्थिती सुधारण्याासाठी महत्त्वपूर्ण प्रस्ताव ठेवणार आहे. परंतु, त्यापूर्वीच माझी बदली होईल असे भाकीत वर्तवतांना, यापूर्वीही अशीच बदली झाली आणि इथेही तसेच होणार आहे अशी कबुली दिली. नवी मुंबईत मी सादर केलेल्या एका प्रस्तावाला सदस्यांनी विरोध केला. परंतु, माझाच प्रस्तावावर माझे नाव बदलून रामास्वामी हे नाव आल्यावर त्याला मंजुरी दिली. त्यामुळे इथेही सिच्युएशन रिपीट होणार, अशी भविष्यवाणी त्यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नामको’च्या चुकांची होणार चौकशी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेमध्ये (नामको) झालेल्या चुकीच्या बाबींची भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (आरबीआय) चौकशी केली जाणार आहे.

नामको बँकेचे सभासद तसेच ठेवीदार संघटनेचे श्रीधर व्यवहारे यांनी 'आरबीआय'कडे बँकेत झालेल्या चुकीच्या व्यवहारांची चौकशी करत कारवाई करावी, अशी मागणी करणारे पत्र २८ जूनला दिले होते. याबाबत 'आरबीआय़'ने व्यवहारे यांच्या पत्राची दखल घेत नामको बँकेत झालेल्या चुकीच्या बाबींची चौकशी होणार असल्याचे पत्र दिले आहे. सभासद व्यवहारे यांनी प्रशासकीय काळात दिले गेलेले कर्जांचीही चौकशी करण्याची मागणी केली होती. तसेच निवडणूक जाहीर करण्यात यावी, याबाबतही 'आरबीआय़'कडे पाठपुरावा केला होता. अखेर 'आरबीआय'चे व्यवस्थापक सुशील पाटील यांनी व्यवहारे यांच्या पत्राला उत्तर देत चुकीच्या बाबींची चौकशी केली जाणार असल्याचे पत्रद्वारे कळविले असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तर लष्कराच्या जागा रिक्त राहिल्या नसत्या

$
0
0

कमांडर आगाशे यांची खंत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वातंत्र्याचे आणि सिमांचे संरक्षणाचं महत्त्व आपल्या नागरिकांना समजले असते तर भारतीय लष्करातील सुमारे ४० टक्के जागा रिक्त राहिल्या नसत्या, अशी खंत १९७१ च्या भारत-पाक युद्धात अलौकीक शौर्य गाजविणारे कमांडर विनायक आगाशे यांनी व्यक्त केली.

सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या वस्तुसंग्रहालयातील शस्त्रांचे पूजन विजयादशमीनिमित्त कमांडर आगाशे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. सुमारे १ हजार वर्षे गुलामगिरीत घालविल्यानंतर १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर ते स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी लष्करातील असंख्य अधिकारी आणि जवानांनी हौतात्म्य पत्करले. अहोरात्र परिश्रम घेऊन जवान भारतीय सिमांचे रक्षण करतात, त्यावेळी आपण आपले नित्यकर्म सुव्यवस्थितपणे पार पाडू शकत असतो. परंतु, दुर्दैवाने आपल्याला स्वातंत्र्याचे महत्त्व आजही समजलेले नाही आणि त्यामुळेच भारतीय लष्करामध्ये आवश्यक ते नैपुण्य प्राप्त जवान मिळत नसल्याने सुमारे ४० टक्के जागा रिक्त आहेत. समाजात लष्करात काम करणाऱ्या व्यक्तींबाबत जे सन्मानाचे स्थान मिळावयास हवे होते ते न मिळाल्याने ही परिस्थती ओढोवल्याचे मत त्यांनी यावेळी मांडले.

१९७१ च्या युद्धातील अविस्मरणीय प्रसंगही त्यांनी कथन केले. या युद्धात अलौकीक कामगिरी बजावल्याबद्दल कमांडर आगाशे यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदकाने गौरविण्यात आले. महाराष्ट्र गौरव पुरस्काराने राज्य सरकारने त्यांना गौरविले. कमांडर आगाशे यांच्याहस्ते शस्त्रांचे पूजन झाले. सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत वस्तुसंग्रहालय सचिव देवदत्त जोशी यांनी केले. गिरीश नातू यांनी आभार मानले. यावेळी कर्नल आनंद देशपांडे, सावानाचे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते, प्रमुख सचिव श्रीकांत बेणी, सांस्कृतिक कार्य सचिव डॉ. शंकर बोऱ्हाडे, बालभवन प्रमुख संजय करंजकर कार्यकारी मंडळ सदस्य वसंत खैरनार, प्रा. संगिता बाफना, जयप्रकाश जातेगावकर, प्रा. अनिल भंडारे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पीएफ ग्राहकांचा हिरमोड

$
0
0

कार्यालयाची सुटी दिल्याने बसला फटका

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

भविष्य निर्वाहनिधी कार्यालयाने विजयादशमीची सुटी गुरुवारऐवजी शुक्रवारी घेतल्याने नाशिक विभागातून आलेल्या ग्राहकांचा हरमोड झाला. केवळ सलग तीन दिवस सुट्यांसाठी पीएफ कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अट्टाहास केल्याचा आरोप ग्राहकांनी केला.

विभागातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव व नगर जिल्ह्यातील आलेल्या पीएफधारकांना बंद कार्यालयाने मनस्ताप सहन करावा लागला. भाडे खर्च करून पीएफ कार्यालयात कामानिमित्ताने आलो याचा खर्च पीएफ कार्यालय देईल का, असा संतप्त सवाही पीएफधारकांनी केला. पीएफ कार्यालय बंद असल्याने तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांना आलेल्या पीएफधारकांच्या रोषाचा सामना करावा लागला. सुटीची अगोदरच सूचना देण्याची गरज होती, असे मत पीएफधारकांनी व्यक्त केले.

राज्यात विजया दशमी अर्थात दसरा सण गुरुवारी साजरा करण्यात आला. यासाठी राज्य सरकारकडून शासकीय सुटी दिली जाते. परंतु, केंद्र सरकारच्या अत्यारित असलेल्या पीएफ निधी कार्यालयाला दसऱ्याच्या दिवशी सुटी न देता शुक्रवारी जाहीर करण्यात आली. यामुळे नाशिक विभागातून आलेल्या पीएफग्राहकांना माघारी परतावे लागले. पहिल्यांदाच विजयादशमीच्या दिवशी सुटी देण्याऐवजी दुसऱ्या दिवशी दिली गेल्याने यामागे गौडबंगाल असल्याचा आरोप पीएफग्राहकांनी केला. यात एकामागून एक असे तीन दिवस सलग सुट्या मिळाव्यात या हट्टापायीच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दसऱ्याऐवजी दुसऱ्या दिवशी सुटी घेतल्याचर आरोप केला. शुक्रवार, शनिवार व रविवार असे सलग दिवस पीएफ कर्मचाऱ्यांना सुटीचा अट्टाहास करण्यात आल्याने नाशिक विभागातून आलेल्या पीएफग्राहकांना मनस्ताप सहन करण्याची वेळ आली. सुटीचा दिवस नेमका कुणाच्या सांगण्यावरून बदल्यात आला असा सवालही ग्राहकांनी केला. अगोदरच पीएफ कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना प्रवेशद्वारापासून तर थेट ज्यांच्याकडे काम आहे त्यांच्याकडे जाण्यासाठी अथक परिश्रम घ्यावे लागतात. त्यातच अचानक दसऱ्याच्या सणाच्या दुसऱ्या दिवशी सुटी दिली गेल्याने भाडेखर्च करून आलेल्या ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शनिवार व रविवार पीएफ कार्यालयाला सुट्टी असल्याने शुक्रवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिंडोरी येथून आलो. परंतु, पीएफ कार्यालयात आल्यावर सुटी असल्याचे सांगण्यात आले. दसरा गुरुवारी साजरा केला जात असतांना शुक्रवारी सुटी देण्यामागे कारणच काय असा आमचा सवाल आहे.

- संतोष पाटील, पीएफ ग्राहक

नाशिक विभागात असलेल्या पीएफ कार्यालयात आलो असता विजयादशमीची सुटी असल्याचे सांगण्यात आले. गुरुवारी दसरा साजरा होत असल्याने शासकीय सुटी दिली जाते. मात्र, पीएफ कार्यालयाने सलग तीन दिवस सुट्या मिळाव्यात म्हणून शुक्रवारी सुटी घेतली.

- रफीक शेख, पीएफधारक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साथीच्या आजारांना प्रशासनच जबाबदार

$
0
0

सर्वपक्षीय नगरसेवकांची आयुक्तांवरच कारवाईची मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्वाईन फ्लने होणारे मृत्यू,डेंग्यूचे थैमान आणि शहरात पसरलेल्या साथींच्या आजाराचे खापर महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनावर फोडले. शहराची आरोग्य स्थिती बघण्यासाठी 'वॉक विथ कमिशनर बंद कर' आणि आरोग्य विथ कमिशर सुरू करा, अशी बोचरी टीका करीत भाजप नगरसेवकांनी करीत रामनगरी नव्हे रोगनगरी असल्याचा हल्लाबोल यावेळी केला. शहरातील रोगराईला आयुक्तच जबाबदार असून त्यांच्यावरच कारवाई करा, अशी मागणी शाहू खैरे यांनी केली. तर, सभागृहात बसण्याचीही लाज वाटत असल्याचा टोला सत्यभामा गाडेकर यांनी केला आहे. शहराच्या बिघडलेल्या आरोग्य स्थितीला प्रशासन जबाबदार असल्याचा ठपका महापौर रंजना भानसी यांनी ठेवला आहे.

डेंग्यू आणि स्वाईन फ्लूमुळे दररोज जाणारे बळी आणि साथींच्या आजारानी संपूर्ण शहर आजारी असल्याने विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीवर चर्चा करताना सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासकीय अनास्थेवर बोट ठेवले. प्रशासकीय अनास्थेवर ठपका ठेवत, भाजपच्याच नगरसेविका प्रियंका माने यांनी सभात्याग केला. तर शामकुमार साबळे नाशिक हे रामभूमी नव्हे तर रोगभूमी झाल्याचा आरोप करत, दत्तक पित्याचे नाशिककडे लक्ष नसल्याची टीका केली. सत्ताधारी आणि ठेकेदारांची मिलीभगत असल्याचा आरोप केल्याने सभागृहात गोंधळ निर्माण झाला. सतीश कुलकर्णी यांनी शहराची परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे सांगत, ५० ठराव केले; परंतु त्याचे पुढे काहीच झाले नाही असा आरोप केला. सगळेच काम आयुक्त पाहणार असतील तर बाकीच्यांनी करायचे काय, असा प्रश्न टोला त्यांनी उपस्थित केला. शाहू खैरे यांनी तर थेट आयुक्तांवरच आरोप करत, बिघडलेल्या आरोग्य स्थितीला मुंढेच जबाबदार असल्याचा आरोप केला. तसेच त्यांच्यावरच कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

तुमची बहीणही नाही येणार

भगवान दोंदे, अशोक मुर्तडक, दीपाली कुलकर्णी, अशोक धिवरे, शिवाजी गांगुर्डे, अलका अहिरे, अर्चना थोरात यांनी प्रशासनाच्या अपयशाचा पाढा वाचला. डॉ. हेमलता पाटील यांनी 'वॉक विथ कमिशनर' का घेतले जाते, याचा जाब विचारत महापालिकेवर मोर्चा आणण्याचा इशारा दिला. सत्यभामा गाडेकर यांनी तर सभागृहात बसण्याची लाज वाटत असल्याचे सांगत, आयुक्तांची बहीणही शहरात यायला घाबरेल, अशी स्थिती असल्याचे विषद केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामचुकारांना आयुक्तांचे अभय

$
0
0

मनसेचा आरोप; आंदोलन करण्याचा इशारा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आरोग्यच्या प्रश्नावरून मनसेचे गटनेते सलिम शेख यांनी सातपूरच्या विभागीय अधिकाऱ्यांचा प्रतापाचा पाढाच वाचला. विभागीय अधिकाऱ्यांकडे नागरिक तक्रार करायला गेलेत तर अधिकारी त्यांचे व्हिडिओ शुटिंग करतात, असा आरोप केला.

सातपूरच्या विभागीय अधिकाऱ्यांच्या वर्तवणुकीची तक्रार करूनही आयुक्तांनी कारवाई केली नसल्याचा आरोप शेख यांनी केला. आयुक्तच त्यांना पाठीशी घालत असल्याचे सांगत कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आम्ही जनतेसाठी जेलमध्येही जायला तयार आहोत. या उर्मट अधिकाऱ्यांची बदली करून त्यांच्यावर कारवाई केली नाही, तर पुढच्या महासभेत आंदोलन करू असा इशारा शेख यांनी दिला.

रोज टीव्हीवर का दिसता?

उद्धव निमसे यांनी आयुक्तांच्या कार्यशैलीवरच हल्लाबोल केला. लोकांच्या करावर तुमचे पगार होतात आणि तुम्ही त्यांच्या जीवावर उठलेत असा आरोप करत, तुम्ही महासभेचेही ठराव मानत नाहीत. त्यामुळे हा घटनाकारांचा अवमान असल्याचा आरोप केला. राज्यातील एकही कमिशनर टीव्हीवर चमकत नाही; परंतु आपले आयुक्त टीव्हीवर रोज दिसतात. हे लोकशाहीला साजेसे नाही, असा टोला त्यांनी मुंढेंना लावला. घंटागाडी ठेकेदार दुचाकीवर जीपीएस बसवून गल्लोगल्ली कचरा गोळा करत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. शहराच्या स्थितीला प्रशासनाच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रियंका मानेंचा सभात्याग

पंचवटीच्या नगरसेविका प्रियंका माने यांच्या सासऱ्यांच्या मृत्यू प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या तत्कालीन आरोग्य व वैद्यकीय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांच्यासह पंचवटीचे डॉ. सुरेश इंदुरकर यांच्या निलंबनाचा ठराव देऊनही त्यावर कारवाई न केल्याप्रकरणी माने यांनी सभात्याग केला. यावेळी माने यांनी सभागृहात कागद फेकून देत आपल्या सत्तेतील प्रशासनाचा निषेध केला. इंदूरकर यांच्यावर कारवाई केल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी यावेळी दिले. तसेच कोठारी यांचा थेट संबध नसल्याचे सांगितल्याने माने यांनी संतप्त होऊन सभात्याग केला.

सभागृहात लक्षवेधी

- मनसे नगरसेवकांचे मास्क लावून सभागृहात आगमन

- शिवसेनेने टोप्यांवरील निषेधातून सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र

- दिनकर पाटील-मुंढे यांच्यात जुगलबंदी

-दत्तक शब्दावरून सत्ताधारी विरोधक भिडलेत

- मुंढे यांच्याविरुद्ध सभागृह असे चित्र

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकला सीसीटीव्हीचे कवच

$
0
0

डिसेंबर महिन्याअखेपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबकेश्वर शहरामध्ये डिसेंबर महिन्याअखेरपर्यंत १७ ठिकाणी ३३ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. २५ लाख रुपये खर्च असलेल्या या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, तांत्रिक पूर्ततेनंतर लागलीच कामास सुरुवात होणार आहे. सीसीटीव्हीमुळे त्र्यंबकेश्वर शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलिसांची २४ तास नजर राहणार आहे.

त्र्यंबकराजाचा दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. श्रावण महिन्यासह इतर वेळी सुद्धा भाविकांची वर्दळ असते. मंदिरात सीसीटीव्ही असले तरी मंदिर परिसर अद्याप सीसीटीव्हींच्या नजरेपासून दूर आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने याबाबत ग्रामीण पोलिसांना पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. याबाबत बोलताना पोलिस सूत्रांनी सांगतिले की, या कामासाठी इच्छूक संस्था पुढे आल्या की त्यातून एका संस्थेची निवड केली जाईल. मुख्य मंदिराच्या तीन बाजू, कुशावर्त कुंड, बस स्टॅण्ड, मंदिरांच्या दिशेने जाणारे मार्ग, पार्किंग यासह बाजारपेठेत सीसीटीव्ही बसवण्यात येतील. यासाठी त्र्यंबकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये एक नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येणार असून, तेथून पूर्ण शहरावर पोलिसांना नजर ठेवणे शक्य होणार आहे. नियंत्रण कक्षाच्या मदतीने कोणत्याही आपत्तकालीन परिस्थितीत पोलिसांची मदत कमीत कमी वेळेत पोहचू शकेल. टेंडर प्रक्रियेतील तांत्रिक बाबी पुढील महिन्याच्या सुरूवातीस पूर्ण होण्याची शक्यता असून, ठेका मिळणारी संस्था डिसेंबर महिन्याच्या अखेरीस सर्व सीसीटीव्ही कार्यन्वीत करेल, अशी अपेक्षा संबंधीत सूत्रांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कुत्र्याने घेतला चावा

$
0
0

सिडको : सिडकोतील सात वर्षीय मुलीस भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली. सिडकोतिल राजरत्न नगर येथे राहणारी ईश्वरी शरद काळे ही मुलगी हिरे शाळेत पहिलीचे शिक्षण घेते. शुक्रवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर ईश्वरी नेहमीप्रमाणे घरी येत होती. घराजवळ येताच एका भटक्या कुत्र्याने तिच्यावर हल्ला करून चावा घेतला. आपला जीव वाचवत तिने कशीबशी सुटका केली. घरच्यांनी तिला जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. कुत्रे पकडणाऱ्या ठेकेदरावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंध विद्यार्थ्यांना मारहाण;अखेर गुन्हा दाखल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मद्याच्या नशेत अंध विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण करणाऱ्या शासकीय अंधशाळेच्या कनिष्ठ काळजी वाहकाविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौकशी समितीच्या अहवालानंतर हा गुन्हा दाखल झाला असून, या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.

संदीप भिमराव कांबळे (रा. सामाजिक न्याय भवन आवार) असे संशयित काळजीवाहकाचे नाव आहे. गेल्या शनिवारी सायंकाळी ६ ते रात्री ८ वाजेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना मारहाणीची घटना घडली होती. सामाजिक न्याय भवन आवारातील शासकीय अंधशाळेत कांबळे काळजीवाहक म्हणून कार्यरत आहे. शिक्षण घेणाऱ्या १४ ते १७ वयोगटातील पाच विद्यार्थ्यांना कांबळेने मद्याच्या नशेत लाकडी बॅट आणि लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करीत जखमी केले. यावेळी संस्थेतील स्वंयपाकी, दुसरे काळजीवाहक, पहारेकरी यांनी कांबळे यास थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो जुमानला नाही. या सर्वांनी प्रयत्नपूर्वक कांबळेला संस्थेच्या बाहेर काढले. दरम्यान, दुसऱ्या दिवशी या प्रकरणाविषयी विचारणा केली असता, मुले ऐकत नसल्याने मारहाण केल्याचे उत्तर त्याने वरिष्ठांना दिले. यानंतर सुट्टीचा अर्ज सादर करून तो निघून गेला. या अमानुष मारहाणीची वाच्यता झाल्यानंतर समाज कल्याण विभागाकडून चौकशी समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या चौकशीत कांबळे विरुद्ध पुरावे समोर आले. त्यानुसार संस्थेच्या अधीक्षका मानसी वाझट यांनी या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांनी बालकांची काळजी आणि संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनिरीक्षक काळे करीत आहेत. दरम्यान, संशयित आरोपीस अद्याप अटक झालेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. असे प्रकार यापूर्वी घडले आहेत काय किंवा नाही, या दृष्टिकोनातून तपास करण्यात येणार असल्याचे संबंधित सूत्रांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पुन्हा तारीख

$
0
0

भिडे प्रकरणी

पुन्हा तारीख

नाशिक: 'माझ्या शेतातील आंबे खाल्यानंतर ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होतो' असे वक्तव्य करीत कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू असलेल्या शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना नोटीस मिळाली की नाही, याबाबत संभ्रम कायम असल्याने कोर्टाने ही सुनावणी २ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. शुक्रवारी सुनावणीसाठी भिडे किंवा त्यांचे वकील हजर नव्हते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निर्माल्यात हरवली गोदा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

घटस्थापनेनिमित् घरोघरी बसविण्यात आलेल्या देवी आणि घटांचे विसर्जन गुरुवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर भाविकांकडून करण्यात आले. मात्र, काही जणांकडून थेट गोदापात्रातच असे विसर्जन करून निर्माल्यही टाकण्यात आल्याने शुक्रवारी ठिकठिकाणचे गोदापात्र निर्माल्यात हरवल्याचे चित्र दिसून आले.

शहरासह नाशिकरोड भागतही गोदापात्रात विविध ठिकाणी निर्माल्य टाकण्यात आलेले आहे. त्याचा थर पाण्यावर तरंगत आहे. त्यामुळे गोदापात्राचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होऊनही शुक्रवारीदेखील संबंधित यंत्रणांनी गोदा स्वच्छतेबाबत उदासीनता दाखविल्याने गोदाप्रेमींसह नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. पाऊस थांबल्यापासून गोदापात्रात पाणी सोडण्यात येत नसल्यामुळे गोदेचा प्रवाह सध्या स्थिर आहे. जे काही पाणी वाहते आहे, ते पाणी अगोदरच घाण आहे. फेस आणि दुर्गंधीयुक्त पाणी असताना त्यात निर्माल्याची भर पडल्यामुळे या पाण्याला आणखीच दुर्गंधी पसरली आहे. गोदावरीच्या पाण्याचे प्रदूषण करण्यात येऊ नये असा न्यायालयाचा आदेश असतानादेखील हे प्रदूषण रोखण्यात महापालिका अपयशी ठरत आहे. पाण्याचा प्रवाह वाहता राहत नाही, त्यावेळी गोदा प्रदूषणात प्रचंड वाढत होते. त्यातच आता विजयादशमीच्या दिवशी गोदापात्रात साचलेल्या निर्माल्याने आणखीच अवकळा आली आहे. मात्र, चोवीस तास उलटूनही गोदापात्राची साफसफाई केली जात नसल्याने गोदाप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.

या भागात तरंगतेय निर्माल्य

गणेशोत्सवाच्या काळात अनंत चतुर्दशीला ज्याप्रमाणे निर्माल्य संकलनाची व्यवस्था करण्यात आली होती, त्याप्रमाणे विजयादशमीला करण्यात आलेली नसल्यामुळे निर्माल्य गोदापात्रातील भागात पडून असल्याची स्थिती आहे. निर्माल्य कलश ठेवण्याचा सोपस्कार महापालिकेने पार पाडला असला, तरी सार्वजनिक सुटीमुळे कर्मचाऱ्यांचा अभाव असल्याने निर्माल्य इतरत्र फेकण्यात आले. हे निर्माल्य इतक्या मोठ्या प्रमाणात साचले, की गोदापात्राचा गांधी तलाव, रामकुंड, लक्ष्मणकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगणाजवळील गोदापात्रात प्रचंड प्रमाणात निर्माल्य तरंगत आहे. काठावरच्या भागात घट, घट मांडताना वापरण्यात आलेली माती, घटाभोवती टाकण्यात आलेले उगवलेले गव्हाचे कोंब, फुले आणि फुलांचे हार यांचा खच पडलेला आहे. या निर्माल्यामुळे गोदापात्रात प्रदूषूत झालेले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लाली’ला लागली दृष्ट

$
0
0

कांदादरात साडेपाचशेंची घसरण

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या हंगामात सुरुवातीचे तब्बल पाचसहा महिने उन्हाळ कांदा प्रतिक्विंटल ७०० ते ८०० अशा अगदी कवडीमोल बाजारभावाने विकण्याची वेळ आलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दहाबारा दिवसातील बाजारभावाच्या वर सरकलेल्या आलेखाने काहीसा दिलासा मिळला. मात्र शुक्रवारी पुन्हा एकदा उन्हाळ कांदा गडगडला. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य क्षणिक ठरले. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बुधवारच्या तुलनेत शुक्रवारी उन्हाळ कांदा बाजारभावात सरासरी तब्बल साडेपाचशे रुपयांनी घसरण झाली.

यंदा उन्हाळ कांदा साधारण एप्रिल महिन्यात बाजारात येण्यास सुरुवात झाल्यापासून बाजारभाव उतरतेच होते. जवळपास पाच ते सहा महिने शेतकऱ्यांसमोर आपला हा उन्हाळ कांदा अत्यल्प बाजारभावाने विकावा लागला. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमधील यंदाच्या उन्हाळ कांदा बाजारभावावर नजर टाकली तर, यंदा एप्रिल ते पुढील ऑगस्ट-सप्टेंबरपर्यंत असे तब्बल पाचसहा महिने उन्हाळ कांदा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती जवळपास प्रतिक्विंटल किमान ५०० ते १ हजार (सरासरी ७००) रुपये पडले होते. या पाचसहा महिन्यांच्या मोठया अर्थसंकटानंतर या महिन्यातील ४ तारखेपासून उन्हाळ कांदा बाजारभावाचा आलेख दिवसागणिक काहीसा वरवर सरकत गेल्याने, ज्यांच्याकडील कांदाचाळीत आजही 'उन्हाळ' आहे अशा शेतकऱ्यांच्या आशाअपेक्षा पल्लवित झाल्या होत्या. गेल्या दहा-बारा दिवसात बऱ्यापैकी पैसे हाती पडले. मात्र, गेल्या दोन तीन दिवसात पुन्हा एकदा कांदा बाजारभावाने नांगी टाकली.

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (दि.१७) प्रतिक्विंटल किमान ५०० ते कमाल २७०० रुपये (सरासरी २१००) असा बाजारभाव होता. गुरुवारच्या सुटीनंतर शुक्रवारी (दि.१९) ४०० ते कमाल २१८२ (सरासरी १६५०) असा भाव मिळाला. बुधवारच्या तुलनेत शुक्रवारी उन्हाळ कांदादरात ५५० रुपयांची घसरण झाली. शुक्रवारी येवला बाजार समितीत ७ हजार क्विंटल इतकी उन्हाळ कांदा आवक झाली.

वार बाजारभाव (प्रतिक्विंटल)

शनिवार----१२००

सोमवार----१६००

बुधवार---२१००

शुकवार---१६५०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images