Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

फराळ उत्सवाची आज रंगत

0
0

मटा कल्चर क्लबतर्फे आयोजन

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदाच्या दिवाळीत फराळाच्या पदार्थांत नावीन्यता यावी. नव्या चवीचा फराळ चाखता यावा. फराळासोबतच मिठाईच्या नव्या डिशेसनी दिवाळीची रंगत अधिक वाढावी, यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे 'फराळ उत्सव' आयोजित करण्यात आला आहे. आज (दि. २०) दुपारी १२ ते ४ या वेळेत हा उत्सव रंगणार आहे. उत्सवात फराळाच्या नव्या पदार्थांच्या रेसिपी शिकविल्या जाणार आहेत.

दरवर्षी दिवाळीत फराळात तेच तेच पदार्थ पाहून नकोसे वाटते. यंदा उत्सवासोबतच फराळातही वैविध्य आणण्यासाठी मटा कल्चर क्लबतर्फे फराळ उत्सव होणार आहे. इंदिरानगर परिसरातील अजय मित्रमंडळ हॉलमध्ये दुपारी १ ते ४ या वेळेत हा उत्सव होईल. यंदाच्या दिवाळीत नेहमीच्या चोखंदळ व्यक्तींना फराळाची नवी चव चाखता यावी. या हेतूने हा उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवात चीज शेव, पालक पुदीना शेव, टोमॅटो शेव, भाजणीच्या चकली यासह चॉकलेट पेढा, ड्रायफ्रूट चॉकलेट फज, अफगाणी व्हेज बेक डिसर्टचा बकलावा आणि केसर मिल्क बर्फी या मिठाईच्या रेसिपी शिकविण्यात येणार आहेत. शेफ विवेक सोहनी उत्सवात सहभागी होणाऱ्यांना प्रात्यक्षिकांसह या सर्व पदार्थांच्या रेसिपी शिकविणार आहेत.

..

नावनोंदणी आवश्यक

फराळ उत्सवात सहभागी होण्यासाठी नावनोंदणी आवश्यक असून, कल्चर क्लब सभासदांसाठी १००, तर इतरांसाठी ४०० रुपये शुल्क असणार आहे. नावनोंदणीसाठी महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड येथे दुपारी ११ ते ६ या वेळेत संपर्क साधू शकतात किंवा ०२५३-६६३७९८७, ९४२२५१३५६९ या क्रमांकावर फोन करू शकतात.

....

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

वेबसाइट - www.mtcultureclub.com

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

ट्विटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गणवेश खरेदीवर चौकशीफेरा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शाळांमध्ये झालेली बोगस गणवेश खरेदी आणि शाळांमधील असुविधांवर सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी हल्लाबोल करीत, प्रशासनाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. अठरा हजार विद्यार्थ्यांसाठीच्या शालेय गणवेश खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत, तत्कालीन शिक्षणाधिकारी नितीन उपासनींवर कारवाईची मागणी सभागृहनेते दिनकर पाटील यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. मात्र, गणवेश खरेदीचे खापर शालेय व्यवस्थापन समितीवर फोडत आयुक्त मुंढे यांनी त्यांना क्लीनचीट देण्याचा प्रयत्न केला. तथापि, गणवेश खरेदीची जबाबदारी प्रशासनाचीच असल्याचे सांगत, उपासनी यांनी केंद्रप्रमुखांवर विशिष्ट ठेकेदारांरामार्फत खरेदीसाठी दबाव आणल्याचा गौप्यस्फोट महापौर रंजना भानसी यांनी केला. त्यामुळे या संपूर्ण गणवेश खरेदीची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

पालिकेची महासभा महापौर भानसी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झाली. महासभेच्या सुरुवातीलाच प्रश्नोत्तराच्या तासात सभागृहनेते दिनकर पाटील यांनी शालेय गणवेश खरेदीत भ्रष्टाचाराला तत्कालीन शिक्षणाधिकारी उपासनी जबाबदार असल्याचा आरोप केला. गणवेश खरेदीत मोठी अनागोंदी झाल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा दावा करीत, गणवेशांचे लॅबमधून तपासलेले सॅम्पलही बोगस असल्याचा आरोप केला, तर गणवेश खरेदीत अटीशर्तींचा भंग झाला असून, ठरावीक निर्देशांकानुसार गणवेश खरेदी केली गेली नसल्याने या प्रकरणाची चौकशी करून तत्कालीन शिक्षणाधिकारी उपासनी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी अपक्ष नगरसेवक मुशीर सय्यद यांनी केली. वर्षा भालेराव यांनी मनपाच्या शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्ननुसार शिक्षण देण्याची मागणी केली. कल्पना पांडे यांनी प्रशासनाने आपल्या प्रभागात करण्यात आलेल्या शाळा बंद केल्यावरून आयुक्तांनावर हल्लाबोल केला. तुमच्या मनाने कारभार कसा हाकता, असा सवाल केला. प्रत्येकजण मुंढे झाला आहे, अशी टीका त्यांनी केली. सातपूरच्या शाळेत विद्यार्थीसंख्या नसताना ३०० शालेय गणवेश पुरवठा कोणाला केला, असा सवाल शशिकांत जाधव यांनी केला. मुलांना अर्धवट गणवेश पुरविण्यात आल्याचा आरोपही नगरसेवकांनी यावेळी केला. मनसे गटनेते सलीम शेख, शिवसेना गटनेते विलास शिंदे, राष्ट्रवादी गटनेते गजानन शेलार, माजी महापौर अशोक मुर्तडक, समिना मेमन, डॉ. हेमलता पाटील, कॉँग्रेस गटनेते शाहु खैरे, सुदाम डेमसे, प्रवीण तिदमे यांनी आपापल्या प्रभागातील शाळांच्या दुरवस्थेच्या कहाण्या सभागृहात मांडल्या. नाशिकरोड प्रभाग सभापती पंडित आवारे यांनी नवीन नगरसेवकांच्या प्रभागातील कामे अधिकारी करीत नसल्याची खंत व्यक्त केली. अधिकारी आमचे ऐकत नसतील तर यायचे कशाला, असा सवाल त्यांनी केला. त्यावर महापौर भानसी यांनी गणवेश खरेदीतील भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश प्रशासनाला दिले. गणवेश खरेदी शालेय व्यवस्थापन समित्यांमार्फत होत असली, तरी त्या प्रक्रियेवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाचीच असल्याचे नमूद करीत गणवेशाच्या कापडाचा दर्जा शासकीय प्रयोगशाळेमार्फत तपासणी करण्याचे त्यांनी सुचविले. समग्र शिक्षा अभियानांतून मुली व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पुरवठा करताना त्याचवेळी मनपा निधीतून खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवठ्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेशही महापौरांनी दिले. त्यामुळे गणवेश खरेदीवरून पुन्हा उपासनींची कोंडी झाल्याचे चित्र आहे.

उपासनी चौकशीच्या फेऱ्यात

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शालेय गणवेश खरेदी ही शालेय व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून करण्यात आल्याने उपासनींचा या खरेदी प्रक्रियेत थेट संबंध नसल्याचे सांगत, त्यांना क्लीनचीट देण्याचा प्रयत्न केला. त्यावर महापौरांनीच उपासनी यांनी कशाप्रकारे केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांवर विशिष्ट ठेकेदाराकडूनच गणवेश खरेदीसाठी दबाव आणल्याचा आरोप केला. त्यामुळे सदस्यांचा आक्षेप असल्यास गणवेशाच्या दर्जाची प्रयोगशाळेमार्फत तपासणी केली जाईल, असे नमूद करताना उपासनी यांच्याविषयी अनेक तक्रारी असल्याने त्यांच्या विभागीय चौकशीचा प्रस्ताव यापूर्वीच प्रशासनाने राज्य सरकारकडे पाठविल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे उपासनींच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत.

'एकदा खेड्यात या!'

महापौरांच्या प्रभागनिहाय दौऱ्यात दिसून आलेली महापालिकेच्या शाळांची दुरवस्था सभागृहासमोर मांडताना कर्तव्यदक्ष आयुक्त मुंढे यांचे या शाळांकडे दुर्लक्ष कसे झाले, असा सवाल दिनकर पाटील यांनी सभागृहात केला. 'वॉक विथ कमिशनर' हा उपक्रम राबवायचाच असेल, तर तो त्यांनी मनपा क्षेत्रातील खेडी भागात करून दाखवावा, असे आव्हानही पाटील यांनी मुंढेंना दिले. खेड्यातील लोकांनाही त्यांच्या समस्या विचारा, असा टोला त्यांनी लगावला.

मुंढे यांचा अभ्यासवर्ग

शाळांची दुरवस्था आणि गणवेश खरेदीवरून सदस्यांनी आरोप प्रत्यारोप केल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत नगरसेवकांचाच अभ्यासवर्ग घेतला. शाळांची स्थिती आणि सध्या सुरू असलेल्या शिक्षण पद्धतीवर कोरडे ओढत, सर्व सिस्टिमच कशी चुकीची आहे, त्यावर प्रहार केला. आयुक्त मुंढे यांनी शाळांची दुरवस्था, कमी पटसंख्या, शाळांच्या समायोजनाबद्दल माहिती दिली. शिक्षण मंडळ अस्तित्वात असताना शाळा खोल्यांचा निधी कसा गेला, वर्ग खोल्या बांधण्यासाठी महापालिकेच्या बजेटमध्ये स्वतंत्र लेखाशीर्ष कसे नव्हते, आदी मुद्द्यांना हात घातला. आपण आल्यापासून कारभार सुधारतोय असे सांगत, पालिकेच्या काही शाळा सीबीएसई बोर्डामार्फत चालविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंढे यांनी तब्बल ४५ मिनिटे भाषण ठोकल्यावर महापौर, उपमहापौरांसह नगरसेवकांनाही डोक्याला हात लावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांचा पाहणी दौरा ठरला निव्वळ फार्स

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापौर आपल्या प्रभागात या उपक्रमांतर्गत महापौर रंजना भानसी यांनी नाशिकरोड विभागात केलेल्या पाहणी दौऱ्याला दोन आठवड्यांच्या कालावधी उलटूनही त्यावेळी आढळलेल्या अनेकत समस्या अद्यापपर्यंत सुटू शकलेल्या नाहीत. त्यामुळे हा दौरा निव्वळ फार्स ठरल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

प्रभाग १९ मधील भोर मळ्यातील समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या कोणत्याही विभागाचे अधिकारी फिरकले नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. महापौरांच्या दौऱ्यात सामनगावरोडवरील भोर मळ्यातील समस्या बघून महपौरांनी या समस्या तात्काळ सोडविण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, येथे कोणीही न फिरकल्याने संबंधित अधिकाऱ्यांना येथील समस्यांचा विसर पडला, की काय अशी भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

महापौर रंजना भानसी यांनी महापौर आपल्या प्रभागात या उपक्रमाची सुरुवातच नाशिकरोड प्रभागातील प्रभाग क्रमांक १९ व २२ मधून केली. या प्रभागांची पाहणी केली असता उपस्थित नागरिकांनी प्रभागातील समस्यांविषयीच्या तक्रारींचा पाढाच महापौरांपुढे वाचला होता. स्थानिक नगरसेवक पंडित आवारे, बाजीराव भागवत, संतोष साळवे, जयश्री खर्जुल या लोकप्रतिनिधींनीही आपल्या प्रभागातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असल्याचे महापौरांना प्रत्यक्ष दाखवून दिले होते. महापालिका प्रशासनाकडून या निमशहरी प्रभागांतील रस्ते, पथदीप, ड्रेनेज, उद्याने, पाणीपुरवठा या सुविधांकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचा आरोप याप्रसंगी उपस्थित स्थानिक नगरसेवकांनी महापौर आणि सभागृह नेत्यांकडे केला होता.

या समस्यांबाबत दिलेत आदेश

रस्ते दुरुस्ती, पथदीप दुरुस्ती आणि ड्रेनेज लाइनच्या समस्याची तात्काळ दखल घेऊन कामे करण्याचे आदेश महापौर रंजना भानसी यांनी या दौऱ्यादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, महापालिकेच्या रस्ते, बांधकाम, विद्युत, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज विभागाच्या उपस्थित सर्व अधिकाऱ्यांनी महापौरांच्या या आदेशांना केराची टोपली दाखवली आहे. महापौरांचा दौऱ्याला दोन आठवडे उलटूनही संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी भोर मळा, सोनवणे मळा, सामनगावरोड या भागात भेट देऊन समस्यांची पाहणी केलेली नाही. परिणामी महापौरांचा दौरा केवळ फार्स ठरल्याचे उघड झाले आहे.

---

सामनगावरोडवरील मळे विभागातील नागरिक आजही सर्व प्रकारच्या मूलभुत सुविधांपासून वंचित आहेत. महापालिका प्रशासन आमच्याकडून सर्व करांची वसुली करते. पण, सुविधा पुरविताना मात्र दुजाभाव करीत आहे.

-संगीता भोर, नागरिक, प्रभाग १९

--

आजही आम्ही जणू काही एखाद्या खेडेगावात राहत असल्यासारखी परिस्थिती आहे. महापालिका प्रशासनाकडून मळे विभागाच्या विकासाकडे दुर्लक्ष होत आहे. महापौरांच्या आदेशानंतरही अधिकाऱ्यांनी दखल घेतलेली नाही.

-दशरथ भोर, नागरिक, प्रभाग १९

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विस्कळीत वाहतुकीचारेल्वे प्रवाशांना फटका

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

इगतपुरी येथे सुरू असलेल्या रूट रिले इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमॉडेलिंगसाठी १९ ते २२ ऑक्टोबरपर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या रेल्वे वाहतुकीवर परिणाम होणार आहे. काही दिवसांपासून मध्य रेल्वेची वाहतूक सातत्याने विस्कळीत होत असल्याने रेल्वे प्रवासी वैतागले आहेत.

मुंबईत दर रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक असतो. इगतपुरी येथे याआधीही ब्लॉक घेण्यात आला होता. मुंबई एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस, मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर या गाड्या १९ ऑक्टोबर रोजी रद्द करण्यात आल्या होत्या, तसेच अनेक गाड्या एक-दोन तास विलंबाने धावल्या. भुसावळ-पुणे एक्स्प्रेस आणि पुणे-भुसावळ एक्स्प्रेस १८ ते २१ ऑक्टोबरपर्यंत नाशिकऐवजी मनमाड-दौंडमार्गे धावत आहेत. त्यामुळे पुण्याला रेल्वेने जाणाऱ्या नाशिककरांची गैरसोय झाली आहे.

आता पुन्हा इगतपुरीत २० ऑक्टोबरला सकाळी सव्वाअकरा ते सव्वाचारपर्यंत, २१ ऑक्टोबरला सकाळी सव्वाअकरा ते दुपारी सव्वातीनपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. २२ ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वाअकरा ते दुपारी सव्वाचार या‌ वेळेत गाड्या अर्धा ते पाऊण तास उशिराने धावतील, अशी माहिती रेल्वेच्या भुसावळ विभागाने दिली आहे.

रद्द होणाऱ्या गाड्या

एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस, मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजर गाड्या २० ऑक्टोबरला रद्द करण्यात आल्या आहेत, तर दादर-जालना जनशताब्दी एक्स्प्रेस दुपारी दोनऐवजी अडीच वाजता दादरवरून सुटेल. भुसावळ-पुणे एक्स्प्रेस मनमाड-दौंडमार्गे धावेल, तसेच ही गाडी भुसावळला परतताना दौंड-मनमाडमार्गेच धावेल. राजेंद्रनगर-एलटीटी एक्स्प्रेसला ठाण्यास अंतिम थांबा राहील.

आजही होणार विलंब

एलटीटी-गोरखपूर गाडी क्रमांक ११०५९ आणि गाडी क्रमांक १२५४२, एलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस, एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस, सीएसएमटी-जबलपूर गरीबरथ एक्स्प्रेस, एर्नाकुलम-हजरत निझामुद्दीन मंगला एक्स्प्रेस, लक्षद्वीप एक्स्प्रेस, एलटीटी-टाटानगर अंत्योदय एक्स्प्रेसला २० ऑक्टोबर रोजी एक ते पावणेदोन तास विलंब होईल. २१ ऑक्टोबरलाही काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्स्प्रेस, मुंबई-भुसावळ-मुंबई पॅसेंजरचा समावेश आहे. तसेच एलटीटी-गोरखपूर एक्स्प्रेस सकाळी १०.५५ ऐवजी एलटीटीवरून दुपारी एकला सुटेल. पुणे-भुसावळ एक्स्प्रेस व्हाया दौंड-मनमाडमार्गे धावेल. पाटलीपुत्र-एलटीटी एक्स्प्रेस, अलाहाबाद-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस, छापरा-एलटीटी एक्स्प्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या उशिरा धावतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुला वाइनचा पुरस्कारांनी गौरव

0
0

सुला वाइनचा

पुरस्कारांनी गौरव

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंडिया वाईन अॅवॉर्डस २०१८ अंतर्गत नाशिकच्या सुला वाइनचा विविध क्षेत्रातील सहा पुरस्कारांनी गौरव करण्यात आला.

यामध्ये सर्वोत्कृष्ट व्हाइट वाइन, स्पार्कलिंग वाइन एक्सकलूडींग शॅम्पेन यासह इतर चार पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. त्यामुळे सुला वाइनच्या शिरपेचात पुन्हा नव्या पुरस्कारांचा समावेश झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निधनवार्ता

0
0

नाशिक -निधनवार्ता

सीताराम गोडसे

नाशिक : माडसांगवी येथील सीताराम धोंडिबा गोडसे (वय ७२) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

ईश्वर चौधरी

नाशिक : जुने सिडको येथील ईश्वर लक्ष्मण चौधरी (करनकाळ) (वय ५८) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व विवाहित दोन मुले असा परिवार आहे.

शांताराम काकड

नाशिकरोड : शिंदे येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसचे कर्मचारी शांताराम दादा काकड (वय ५७) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, आई, दोन मुले, दोन बहिणी असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीकपातीतून दिलासा

0
0

- जिल्ह्यात सद्यस्थितीत उपलब्ध पाणी : ५० हजार ४४८ दलघफू

- \B४६०० दलघफुच्या मागणीवर मनपा ठाम\B

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहराला पाणीपुरवठा करणारी महापालिका ४६०० दशलक्ष घनफूट पाण्याच्या मागणीवर ठाम आहे. शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या पाणी आरक्षण आढावा बैठकीत पुन्हा ही मागणी नोंदविण्यात आली. नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्यात कपात केली जाणार नाही, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली असून, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. उपलब्ध पाण्यापैकी ८० टक्के पाण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

मराठवाड्यातील जायकवाडी धरणाकरिता सहा ते सात टीएमसी पाणी सोडावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. परंतु, सरासरी एवढाही पाऊस न पडल्याने यंदा जिल्ह्यातील धरणे पूर्ण भरू शकलेली नाहीत. त्यामुळे नाशिकमधून पाणी देण्यास नाशिककरांकडून विरोध दर्शविला जाऊ लागला आहे. ३१ ऑक्टोबरच्या आत पाणी आरक्षणाची बैठक घेणे अनिवार्य असल्याने विविध यंत्रणांची पाण्याची मागणी समजून घेण्यासाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, महापालिकेचे अधीक्षक अभियंता शिवाजी चव्हाणके, एमआयडीसी, जिल्हा परिषद, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात सद्यस्थितीत ५० हजार ४४८ दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेने दारणा आणि मुकणेतून प्रत्येकी ३०० दशलक्ष घनफूट, तर गंगापूर धरणातून ४००० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी केली आहे. गतवर्षी महापालिकेला गंगापूर धरणातून ३९००, तर दारणातून ४०० दशलक्ष घनफूट पाणी देण्यात आले होते. तेवढे पाणी पुरेसे असताना अधिकचे पाणी का द्यावे, अशी विचारणा महापालिकेच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली. गतवर्षी प्रमाणेच दारणातून ४०० तर गंगापूरमधून ३९०० दशलक्ष घनफूट पाणी देण्यास जिल्हा प्रशासन सकारात्मक दर्शवली. मालेगावसाठी गिरणा धरणातून ९०० दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी असून, औद्योगिक वसाहतींसाठी २३१ दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी कोर्टाच्या दारी!

0
0

मुंबईला रिट पिटीशन, तर औरंगाबाद हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करणार

...

- नाशिक पाणी बचाव समितीची स्थापना

- जायकवाडीला पाणी सोडण्याविरोधात सर्वपक्षीय एकवटले

- एक थेंबही पाणी न सोडण्याचा निर्धार

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक-औरंगाबाद जलवाटपाचा तिढा यंदा दुष्काळामुळे तीव्र झाला असून, नाशिकचे पाणी पुढे जाऊ न देण्यासाठी नाशिकच्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी नाशिक पाणी बचाव समितीची स्थापना केली आहे. या समितीमार्फत मुंबईला जनहित याचिका दाखल करण्यात येणार असून, औरंगाबाद हायकोर्टात सुद्धा हस्तक्षेप याचिका दाखल करण्याचा निर्णय समितीच्या शुक्रवारी झालेल्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला.

यंदा पावसाने ओढ दिल्याने नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती उद्भवली आहे. जवळपास १२ तालुक्यांमध्ये शेतीसह पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न भेडसावू लागला आहे. त्यातच जलवाटप नियमानुसार उत्तर महाराष्ट्रातील धरणांमधील पाणी जायकवाडी धरणात सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मोट बांधली असून, जिल्ह्यातील धरणांमधील एक थेंबही पाणी बाहेर जाऊ न देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीदरम्यान नाशिक पाणी बचाव समितीची स्थापना करण्यात आली. बैठकीस खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, आमदार देवयानी फरांदे, नरहरी झिरवळ, दीपिका चव्हाण, सीमा हिरे, राहुल आहेर, अनिल कदम व माजी आमदार जयंत जाधव उपस्थित होते. खासदार हरिश्चंद्र चव्हाण आजारी असल्याने हजर राहू शकले नाहीत. आमदार बाळासाहेब सानप हे बाहेरगावी असल्याची माहिती समिती सदस्यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सर्वांनी पक्षभेद विसरून पाणी वाचविण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे बैठकीत निश्चित करण्यात आले. मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्याची जबाबदारी आमदार फरांदे यांच्यावर सोपविण्यात आली. ही जनहित याचिका कोणाच्या नावे करावी याबाबत बराच काळ खल झाला. औरंगाबाद हायकोर्टात हस्तक्षेप याचिका दाखल करण्याची जबाबदारी खासदार गोडसे यांच्याकडे देण्यात आली.

--

महसूलवर दबाव

अपुऱ्या पर्जन्यमानामुळे पिकांची वाढच झाली नाही. मात्र, पीक पेऱ्याची नोंद झाली आहे. महसूल विभागावर प्रचंड दबाव असून, त्यामुळे दुष्काळातील वस्तुस्थिती समोर येत नसल्याचा मुद्दा आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासह इतर आमदारांनी उपस्थित केला. दुष्काळाची दाहकता समोर आली, तर त्याचा वापर पाणी वाटपाबाबत दाखल करण्यात येणाऱ्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान होईल. त्यामुळे दोन दिवसात सर्व आमदारांनी याबाबतचे अहवाल संकलित करून समितीला सादर करावे असे ठरले.

..

जिल्ह्यातील सर्व शेतकरी, नागरिकांची बाजू हायकोर्टात मांडण्यासाठी जनहित याचिका दाखल करण्यात येणार आहे. यामुळे दुष्काळाची दाहकता समोर येईल.

- हेमंत गोडसे, खासदार

..

जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी मिळून ही समिती स्थापन केली असून, पाणीवाटपात नाशिकवर अन्याय होणार नाही याकडे ही समिती लक्ष देईल. जिल्ह्यात कमी पाऊस पडल्याने दुष्काळाची परिस्थिती आहे.

- देवयानी फरांदे, आमदार, मध्य नाशिक

...

सिन्नरसह इतर तालुक्यांमध्ये शेतीसह पिण्याच्या पाण्याची अवघड स्थिती आहे. आता कुठे ऑक्टोबर महिना सुरू असून, पुढील वर्षाच्या जुलै महिन्यापर्यंत पाण्याची स्थिती आणखी अवघड होईल. यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत.

- राजाभाऊ वाजे, आमदार, सिन्नर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


झारखंडच्या मोबाइल चोरट्यांचीही नाशिकला पसंती!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

उत्तम हवामान, धार्मिक महत्त्व आणि पर्यटनासाठी नावारूपास आलेल्या नाशिकला देशभरातून पसंती मिळत आहे. मात्र, पर्यटकांबरोबरच आता चोरटेही नाशिकला पसंती देत आहे की काय, असा चक्रावणारा प्रश्न पडला आहे. मोबाइल चोरी करण्यासाठी झारखंडहून नाशिकला आलेल्या एका टोळीला सरकारवाडा पोलिसांनी शिताफीने शुक्रवारी दुपारी ताब्यात घेतले. या टोळीकडून तब्बल ३० मोबाइल हस्तगत करण्यात आले असून, संशयितांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा आणि एका स्थानिकाचा समावेश आहे.

अटक करण्यात आलेल्या या संशयितांनी नवरात्रोत्सवादरम्यान मोबाइल स्नॅचिंगचे गुन्हे केले आहेत. फुले घेण्यासाठी १८ ऑक्टोबर रोजी मार्केटमध्ये गेलेले प्रदीप पांडुरंग दुसाने यांना सात- आठ जणांनी भररस्त्यात भरदुपारी चाकूचा धाक दाखवून लुटले. या गुन्ह्याचा तपास करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. ए. शेळके यांना महत्त्वाचा सुगावा लागला. त्यानुसार त्यांनी कपालेश्वर मंदिराजवळील धर्मशाळेत खोली घेऊन राहणाऱ्या दहा ते बारा वयोगटातील दोन मुलांना ताब्यात घेतले. या मुलांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सदानंद जोगिंद्र चौधरी (वय ३२), कुंदनकुमार उपेंद्र चौधरी (२२), श्रवणकुमार शंकर महातो (२६), मुकेश रामचंद्र महातो (२५), चंदनकुमार उमेश महातो (२५, सर्व रा. झारखंड) आणि दीपक बाळासाहेब उगले (वय ३०, रा. राजदूतनगर गल्ली, फुलेनगर) या सहा जणांना पकडले. या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली असून, उर्वरित संशयितांना कोर्टाने २२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हे सर्व संशयित उगलेच्या मदतीने शहरात पोहोचल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. चोरीचे मोबाइल झारखंडमध्ये विक्री करण्यात येणार होते. पत्रकार परिषदेला पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्त शांताराम पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत उपस्थित होते. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील रोहकले, एपीआय व्ही. ए. शेळके, पीएसआय ए. एस. बागूल, हवालदार बाळकृष्ण उगले, पोलिस नाईक प्रशांत मरकड, रवींद्रकुमार पानसरे, प्रवीण वाघमारे, राजेंद्र शेळके, धनंजय शिंदे, हमंत पाटील, सुरेश शेळके, कॉन्स्टेबल अरुण भोये, सागर हजारी, दीपक निकम आदींच्या पथकाने केली.

किल्लीने लागला सुगावा

दोन अल्पवयीन मुले राहत असलेल्या धर्मशाळेच्या खोलीची झडती घेत असताना पोलिसांनी एक किल्ली हाती लागली. ही किल्ली दुसऱ्या रूमची होती. पोलिसांनी मुलांकडे चौकशी केली असता, ती शिर्डीतील एका हॉटेलची असल्याचे पुढे आले. संशयित एका दिवसाच्या अंतराने शहरात येऊन मोबाइल स्नॅचिंग करीत असल्याचे स्पष्ट झाले. मुलांकडून १५ मोबाइल हस्तगत करीत पोलिस तातडीने शिर्डीला रवाना झाले. तेथून उर्वरित १५ मोबाइल आणि संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

नवरात्रोत्सवादरम्यान मोबाइल स्नॅचिंग झालेली असल्यास नागरिकांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. ही आंतरराज्यीय टोळी असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोबाइल चोरीसाठी झारखंडहून गाठले नाशिक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मोबाइल चोरी करण्यासाठी झारखंडहून थेट नाशिकला आलेल्या एका टोळीला सरकारवाडा पोलिसांनी शिताफीने अटक केली. या टोळीकडून ३० मोबाइल हस्तगत करण्यात आले. संशयितांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा आणि एका स्थानिकाचा समावेश आहे.

नवरात्रोत्सवादरम्यान संशयितांनी मोबाइल स्नॅचिंगचे गुन्हे केले. अवघ्या चार दिवसांत शहरात मोबाइल स्नॅचिंगच्या घटनांनी जोर पकडला. फुले घेण्यासाठी १८ ऑक्टोबर रोजी गेलेले प्रदीप पांडुरंग दुसाने यांना सात ते आठ जणांनी भररस्त्यात भरदुपारी चाकूचा धाक दाखवून लुटले. या गुन्ह्याचा तपास करताना सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. ए. शेळके यांना सुगावा लागला. त्यानुसार त्यांनी कपालेश्वर मंदिराजवळील धर्मशाळेत खोली घेऊन राहणाऱ्या दहा ते बारा वयोगटातील दोन मुलांना ताब्यात घेतले. या मुलांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सदानंद जोगिंद्र चौधरी (वय ३२), कुंदनकुमार उपेंद्र चौधरी (२२), श्रवणकुमार शंकर महातो (२६), मुकेश रामचंद्र महातो (२५), चंदनकुमार उमेश महातो (२५, सर्व रा. झारखंड) आणि दीपक बाळासाहेब उगले (वय ३०, रा. राजदूतनगर गल्ली, फुलेनगर) या सहा जणांना पकडले. संशयितांच्या ताब्यातून वेगवेगळ्या कंपन्यांचे ३० मोबाइल हस्तगत केले. अल्पवयीन मुलांना बालसुधारगृहात रवाना करण्यात आले असून, उर्वरित संशयितांना कोर्टाने २२ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हे सर्व संशयित उगले याच्या मदतीने शहरात पोहोचल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. संशयित मोबाइल स्नॅचिंग करीत होते. सर्व मोबाइल झारखंडमध्ये विक्री करण्यात येणार होते. पत्रकार परिषदेला पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर, लक्ष्मीकांत पाटील, बापू बांगर, सहायक पोलिस आयुक्त शांताराम पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत उपस्थित होते. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील रोहकले, एपीआय व्ही. ए. शेळके, पीएसआय ए. एस. बागूल, हवालदार बाळकृष्ण उगले, पोलिस नाईक प्रशांत मरकड, रवींद्रकुमार पानसरे, प्रवीण वाघमारे, राजेंद्र शेळके, धनंजय शिंदे, हमंत पाटील, सुरेश शेळके, कॉन्स्टेबल अरुण भोये, सागर हजारी, दीपक निकम आदींच्या पथकाने केली.

किल्लीने लागला सुगावा

दोन अल्पवयीन मुले राहत असलेल्या धर्मशाळेच्या खोलीची झडती घेत असताना पोलिसांनी एक किल्ली हाती लागली. ही किल्ली दुसऱ्या रूमची होती. पोलिसांनी मुलांकडे चौकशी केली असता, ती शिर्डीतील एका हॉटेलची असल्याचे पुढे आले. संशयित एका दिवसाच्या अंतराने शहरात येऊन मोबाइल स्नॅचिंग करीत असल्याचे स्पष्ट झाले. मुलांकडून १५ मोबाइल हस्तगत करीत पोलिस तातडीने शिर्डीला रवाना झाले. तेथून उर्वरित १५ मोबाइल आणि संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

नवरात्रोत्सवादरम्यान मोबाइल स्नॅचिंग झालेली असल्यास नागरिकांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा. ही आंतरराज्यीय टोळी असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हर्षलच्या कुटुंबीयांचे हात वर!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडवून देणाऱ्या मिरजकर सराफ घोटाळ्यातील मुख्य सुत्रधार हर्षल नाईक याची कर्नाटकमधील गुलबर्गा जिल्ह्यातील चिडिगुपा येथील मालमत्ता पोलिसांनी शोधून काढली आहे. मात्र, या मालमत्तेशी हर्षलचा काहीही संबंध नसल्याचा दावा त्याच्याच कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या मालमत्तेशी नाईकचा संबंध असल्याचे पुरावे पोलिसांना संकलित करावे लागत आहेत.

मिरजकर सराफच्या संचालकांनी २०१५ ते २०१७ या कालावधीत शेकडो गुंतवणूकदारांकडून रोख रक्कम आणि सोने याची गुंतवणूक घेतली गेली. जानेवारी २०१८ पासून संचालकांकडून पैसे परत करण्याचे प्रमाण घटत गेले. २० जुलै रोजी अखेर या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. बारापेक्षा अधिक संशयित आरोपींपैकी काहींना अटक करण्यात आली. मात्र, गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हर्षल नाईक, भागीदार अनिल चौगुले अद्याप फरारी आहेत. यापूर्वी अटक केलेल्या संशयित आरोपींकडून दोन कार आणि १६ किलो चांदी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र, त्यानंतर फारसे काही हाती आत्ले नाही.

बँक व्यवहार रडारवर

मुख्य सूत्रधार हर्षल नाईक हा मूळचा कर्नाटक राज्यातील असल्याने पोलिसांनी तेथे तपास केला. त्यात त्याची स्थावर मालमत्ता असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ही मालमत्ता रेकॉर्डवर घेतली. मात्र, काही दिवसांपूर्वी नाईकचे भाऊ-बहीण नाशिकला आले. या मालमत्तेशी हर्षलचा कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. या पार्श्वभूमीवर आर्थिक गुन्हे शाखेने आपला मोर्चा हर्षल व त्याच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यातील व्यवहारांकडे वळविला आहे. हर्षल नाईकचा संबंध नाही, तर त्याने त्यांना पैसे पुरविण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी सांगितले. या व्यवहारांबाबत बँकांकडून माहिती येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बँक व्यवहारत सर्व समोर येईल, त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असे मगर म्हणाले.

--

या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपी अद्याप फरारी आहेत. त्यांच्या तपासासाठी क्राइम ब्रँचसह इतर पथके तैनात आहेत. सर्व शक्यतांनुसार संशयितांचा शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप ते आमच्या हाती लागलेले नाहीत.

-डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर तालुक्यात शेतकरी आत्महत्या

0
0

नाशिक : जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची संख्या दिवसागणिक वाढतच असून, सिन्नर तालुक्यात एका तरुण शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले आहे. त्यामुळे चालू वर्षात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या आता ८२ झाली आहे. दीपक रघुनाथ डुंबरे (वय ३३, रा. पिंपळगाव) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरा या घटनेचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला. बुधवारी (दि.१७) दुपारी दीडच्या सुमारास गट क्र.४० मधील पोल्ट्रीशेडमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काळाराम अन् नारोशंकरही संरक्षित यादीत!

0
0

(मटा विशेष)

Ramesh.padwal@timesgroup.com

Tweet : MTramesh

..

नाशिक : नाशिकचे वैभव असलेले पेशवेकालीन काळाराम मंदिर व गोदाकाठावरील नारोशंकर मंदिर लवकरच पुरातत्त्व विभागाकडून संरक्षित वास्तूच्या यादीत समाविष्ट केले जाणार आहे. यासाठीची प्रक्रियेला सुरुवात झाली असून, लवकरच पुरातत्त्व विभागाकडून याबाबत शिक्कामोर्तब केले जाणार आहे. पुरातत्त्वच्या यादीत या मंदिरांचा समावेश झाल्याने या ऐतिहासिक मंदिरांचे प्राचीन वैभव व शिल्पे टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न होतील.

सध्याचे काळाराम मंदिर हे पेशवेकालीन म्हटले जात असले तरी मंदिराला प्राचीन इतिहास आहे. या मंदिराला श्रीचक्रधरस्वामींनी तेराव्या शतकात, संत एकनाथ महाराज(१५९९), समर्थ रामदास स्वामी, तसेच गजानन महाराज (शेगांव) यांनी भेट दिल्याचे दाखले उपलब्ध आहेत. काळाराम मंदिराचा जीर्णोद्धार सरदार रंगराव ओढेकर यांनी सवाई माधवराव पेशवे यांच्या सल्लामसलतीने १७८०-९० च्या दरम्यान केला. मंदिराला रामशेज किल्ल्याचा दगड वापरल्याचे म्हटले जाते, तर हे मंदिर मय संहितेनुसार बांधण्यात आले आहे. या संहितेच्या ११० ग्रंथांचा उपयोग हे मंदिर बांधताना केला गेला आहे. त्यामुळे मंदिर वैशिष्ट्यपूर्ण असून, त्याचा पुरातत्त्व यादीत समावेश झाल्यास या वास्तूला झळाळी मिळणार आहे.

एखादी वास्तू संरक्षित करायची असेल तर पुरातत्त्व विभागाकडून केल्या जात असलेल्या प्रक्रियेत संबंधित विभागातील तहसीलदारांची भूमिका महत्त्वपूर्ण असते. एकीकडे जिल्हाधिकारी जिल्ह्याचे पर्यटन वाढावे व त्याला बूस्ट मिळावा म्हणून प्रयत्न करताना दिसतात, तर दुसरीकडे त्यांचेच कर्मचारी पुरातत्त्व विभागाला सहकार्य करताना दिसत नसल्याने जिल्ह्यातील २० किल्ले, पाचहून अधिक मंदिरे संरक्षित यादीत घेण्यास अडथळे येत आहेत. नाशिकच्या तहसीलदारांनी तर कार्यवाही करतो, असे म्हणत वर्षभरापासून मंदिरांची कागदपत्रांची पूर्तता केली नसल्याचा आरोप पुरातत्त्व अधिकाऱ्यांनी केला आहे.

...

वास्तूचा ताबा नव्हे; जतन प्रक्रिया!

एखादी वास्तू पुरातत्त्व विभाग संरक्षित करतं म्हणजे तिचा ताबा घेतं, असा गैरसमज बऱ्याचदा ट्रस्ट अथवा मंदिर मालकांमध्ये असतो. तर असे काही नसून, पुरातत्त्व विभाग मंदिराचा कोणत्याही प्रकारचा ताबा घेत नाही. मंदिर व तेथील शिल्पांचे जतन व्हावे म्हणून प्रयत्न करते तेही पुरातत्त्व विभागाच्या खर्चाने. यासाठी ट्रस्टला अथवा संबंधित मालकाला कोणताही खर्च करावा लागत नाही. काळाराम मंदिर व नारोशंकर मंदिर संरक्षित करण्यासाठी यापूर्वीही प्रयत्न झाले होते. मात्र, संबंधितांशी चर्चा करून वास्तू संरक्षित करण्याचे फायदे सकारात्मक रीतीने समजून सांगितले तर नक्कीच याला विरोध होणार नाही. आपला वारसा पुढील अनेक पिढ्यांपर्यंत टिकवायचा असेल, तर जतनाच्या दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी पुरातत्त्व विभाग नेहमीच सकारात्मक प्रयत्न करेल, अशी भूमिका पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक विलास वहाने यांनी घेतली आहे.

- नारोशंकरही होणार संरक्षित... पान ३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘लेझर शो’च्या तीव्रतेवर प्रश्नचिन्ह

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्री काळाराम मंदिरावर लेझर शो करण्याचे प्रस्तावित असून, नुकतीच त्याची चाचणी घेण्यात आली. त्यात काही सुधारणा करून डिसेंबर महिन्यात या प्रकल्पाचा प्रारंभही केला जाणार आहे. मात्र, अशा लेझर शोमुळे मंदिराच्या दगडांवर विपरित परिणाम होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे हा लेझर शो आगामी काळात कळीचा मुद्दा ठरण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

पुरातत्त्व विभागाने याबाबत अभ्यास करून मत मांडू, अशी भूमिका घेतली आहे. मंदिराच्या दगडावर परिणाम असेल, तर याबाबत फेरविचार व्हायला हवा, अशी मागणी होऊ लागल्याने लेझर शो वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. अनेकांनी काळाराम मंदिराभोवतीची अतिक्रमणे काढण्याची, तसेच भाविकांना सुविधा देण्याची मागणी केली आहे.

'मंदिरांचे नाशिक' असे बिरूद मिरविणाऱ्या जनस्थानमध्ये अनेक देवी-देवतांची विलोभनीय मंदिरे आहेत. तेथील ट्रस्ट आपापल्या पद्धतीने ही मंदिरे सजवीत असून, भाविकांचा त्याकडे ओढा कसा वाढेल यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. मात्र, या नादात मंदिराची जतन प्रक्रिया रखडली असून, लेझर शोसारख्या दगडावर परिणाम करणाऱ्या शोमुळे काळाराम मंदिराचे नुकसान होऊ शकते, अशी प्रतिक्रिया काळाराम मंदिराचे माजी विश्वस्त सुशील पुजारी यांनी व्यक्त केली आहे.

भक्तांना आकर्षित करण्यासाठी लेझर शोची गरज नाही. भाविक रामाच्या दर्शनासाठी येतात. लेझर शोमुळे ते मंदिरात येतील हा निव्वळ दिखाऊपणा आहे. रामाला भेटण्यासाठी येणाऱ्या भाविकांना सोयीचे व्हावे म्हणून आपण कोणत्या सुविधा देतो याचा विचार ट्रस्टने करायला हवा. १९५४ मध्ये मंदिराच्या ट्रस्ट झाला. तेव्हापासून मंदिराच्या विकासासाठी प्रयत्न केले गेले. मात्र 'लेझर शो'ऐवजी भाविकांसाठी शौचालय, वाहनतळ, सोलर वीजसंच, शुद्ध पाणी, मोफत भोजन व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, निवासव्यवस्था अशा सुविधांची गरज आहे.

लेझर शोबाबत करणार अभ्यास

लेझर शो थेट मंदिरांवर वापरण्याचा प्रयोग यापूर्वी कुठेही झालेला नाही. यामागे लेझरमुळे मंदिरांच्या दगडावर परिणाम होतो का, अथवा याचा कोणता परिणाम मंदिरावर होईल, याचा अभ्यास होण्याची गरज आहे. प्रकाशाच्या तीव्र झोतामुळे प्राचीन वास्तूवर परिणाम होऊ शकतो. यामुळेच संग्रहालयात अथवा लेणींमध्ये असा प्रकाशझोत वापरला जात नाहीत. लेझर शोच्या किरणांमुळे पेशवाई काळातील काळाराम मंदिरावरील परिणामांबाबत लवकरच अभ्यास करून संबंधितांशी चर्चा करू, असे पुरातत्त्व विभागाचे सहसंचालक विलास वहाने यांनी 'मटा'ला सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिठाई दुकानांच्या तपासणीची मागणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

आगामी सण-उत्सवांच्या काळात मिठाईची मागणी मोठ्याप्रमाणावर वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर शहर परिसरातील मिठाई दुकानांची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी छावा संघटनेच्या देवळालीतील मुस्लिम आघाडीतर्फे देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

परिसरातील सर्वच मिठाई व हॉटेल व्यावसायिकांना खाद्यपदार्थांची विक्री करताना कॅन्टोन्मेंट बोर्डाचे पदसिद्ध मेडिकल ऑफिसर व आरोग्य अधीक्षक यांच्याकडून परवानगी घेणे आवश्यक आहे. या दुकानदारांनी उत्पादित केलेल्या खाद्यपदार्थांची वेळोवेळी तपासणी करणेही अनिवार्य आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी या निकषांनुसार मिठाई व खाद्यपदार्थांच्या दुकानांची तपासणी व्हावी, जेणेकरून गतवर्षीप्रमाणे काही व्यावसायिकांकडून दुकानात शिळी मिठाई व निकृष्ट खाद्यपदार्थांची विक्री होणार नाही, याची खबरदारी घ्यावी. अशा प्रकारांमुळे नागरिकांच्या जिवाला धोका उत्पन्न होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद केले आहे. निवेदन देताना आदिवासी प्रदेशाध्यक्ष शत्रुघ्न झोंबाड, मुस्लिम आघाडीचे प्रदेश कार्याध्यक्ष राशीद सय्यद, जिल्हाध्यक्ष मोहम्मद असिफ शेख, सरचिटणीस सादिक कॉन्ट्रॅक्टर, जिल्हा उपाध्यक्ष खुर्शिद अन्सारी, मुदस्सर खान, दीपक हेंबाडे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आज सरपंच संसद

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंट महाराष्ट्र सरपंच संसदेच्या अंतर्गत सरपंच संसद होणार आहे. गंगापूर रोडलगतच्या चोपडा लॉन्स येथे रविवारी (दि. २१) सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत ही परिषद होईल. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन होईल. या वेळी खासदार हेमंत गोडसे, राज्यमंत्री दादा भुसे, एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटचे संस्थापक राहुल कराड उपस्थित राहतील. केंद्र व राज्य सरकारचे ग्रामविकास धोरण, केंद्र व राज्य सरकारच्या ग्रामविकासच्या प्रमुख योजना, ग्रामविकासासाठी सीएसआर निधी नियोजन, आदर्श ग्रामविकासाचे नियोजन आणि ग्रामविकास प्रक्रियेतील दैनंदिन समस्या व उपाययोजना आदी विषयांवर संसदेत मार्गदर्शन होईल. आदर्शगाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार, महाराष्ट्र राज्य कृषिमूल्य आयोगाचे चेअरमन पाशा पटेल आदी मार्गदर्शन करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारा-पाण्याच्या बेगमीसाठी तांडा चालला...

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

दुष्काळाच्या झळांमुळे शेतकऱ्यांसह शेतीपूरक व्यवसाय करणारेही होरपळून निघाले आहेत. दुभत्या जनावरांना पोटभर चारा-पाणी मिळत नसल्यामुळे नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी येथील म्हशीपालन करणाऱ्या ९० कुटुंबांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे.

चारा-पाण्याशिवाय दीड हजार म्हशींना जगवायचे कसे, असा प्रश्न वीरशैव लिंगायत गवळी कुटुंबीयांना पडला आहे. पाण्याच्या शोधात घरातील कर्ती मंडळी निफाड, नाशिक भागात जाणार आहेत. दिवाळी पाडव्यानंतर सुमारे दीड हजार म्हशींसह हे लोक स्थलांतर करणार आहेत.

पाण्यासाठी व जनावरांच्या चाऱ्यासाठी नांदगाव तालुकावासीयांची वणवण सुरू आहे. पाणी व चारा नसल्याने जनावरांचे पोट भरायचे कसे, असा प्रश्न आता गवळी कुटुंबापुढे आहे. न्यायडोंगरीपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या गवळीवाड्यात वीरशैव लिंगायत गवळी समाजाचे वास्तव्य आहे. दीडशे कुटुंब म्हैसपालन करतात. त्यांच्यापैकी प्रत्येकाकडे १० ते १५ म्हशी आहेत. एकूण हजारापेक्षा जास्त म्हशींची पाण्याची सोया कशी करायची? विहिरींची अवस्था बिकट. तळ गाठलेल्या विहिरींचे पाणीदेखील दुरापास्त. त्यात चाऱ्याची वानवा. यामुळे आता गवळी परिवारातील ९० कुटुंबे गाव सोडून म्हशींसह दुसरीकडे आपले बस्तान नेण्याच्या विचारात असल्याचे गवळी कुटुंबांतील ज्येष्ठांचे म्हणणे आहे.

मुले अन् वृद्धांना ठेवणार गावी

या परिसरात अंगणवाडी व प्राथमिक शाळा सुविधा असल्याने वस्तीवरील मुले येथेच शिकतात. त्यामुळे मुलांना व वृद्धांना गावीच ठेवण्याचा त्यांचा निर्णय झाला आहे. कितीतरी वर्षांत अशी टंचाई आम्ही बघितली नाही. साखर कारखान्याच्या परिसरात आम्ही म्हशींसह स्थलांतर करू, पावसाळ्यापर्यंत तेथेच राहू. तिथल्या काही हॉटेलचालकांसोबत आमचे बोलणे झाले आहे. त्यामुळे दुधाची विक्रीही तेथेच करणार आहोत, असे गवळी कुटुंबातील ज्येष्ठ सांगतात. मात्र, गाव सोडण्याची आपल्यावर आल्यामुळे ते सारे हवालदिल झाले आहेत.

नांदगाव तालुक्याची दुष्काळी स्थिती काळीज पिळवटून टाकणारी आहे. बोअरवेल आटल्या अन् विहिरींन्ही तळ गाठलाय. हिरवा चारा दिसत नाही. निदान दुसरीकडे तरी म्हशींना पोटभर खायला मिळेल. त्यामुळे स्थलांतराचा निर्णय घेतला आहे.

-वाल्मीक गवळी, न्यायडोंगरी

म्हशींना घेऊन दहा ते १५ जणांचा एक गट याप्रमाणे आम्ही गावाबाहेर पडणार आहोत. दसऱ्यानंतर जागा आणि पाण्याची सोय पाहून येण्यास प्रारंभ केला आहे. त्यानंतर दिवाळी पाडवा झाला, की आम्ही म्हशींसह गाव सोडू.

-शंकर गवळी, न्यायडोंगरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सर्वसामान्यांची सत्ता बहुजनांनी आणावी’

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

धर्माच्या नावाखाली नागरिकांना फसविले गेले. त्यांना अशिक्षित ठेवण्यात आले. बहुजन समाज, आंबेडकरवादी, अल्पसंख्याकांना सत्तासंपत्तीपासून वंचित ठेवण्यात आले. बहुजन समाजाने आगामी निवडणुकीत सर्वसामान्यांची सत्ता आणावी, असे प्रतिपादन रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले.

त्रिशरण लेणी येथे धम्म परिवर्तन दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा, भारिप बहुजन महासंघ, रिपब्लिकन सेनेतर्फे धम्म सभा झाली. त्या वेळी आंबेडकर बोलत होते. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश बागूल अध्यक्षस्थानी होते. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय दोंदे, राजाभाऊ दोंदे, विलास गांगुर्डे, रविकांत भालेराव, इंद्रजित भालेराव, विजय भालेराव, उन्मेश थोरात, रामा निकम, बापू लोखंडे, संजय सांबळे, पी. के. गांगुर्डे, भिकचंद चंद्रमोरे, भिवानंद काळे, दीपचंद दोंदे, संजय जाधव, जितेंद्र जाधव, अंबादास सोनवणे आदी उपस्थित होते.

आंबेडकर म्हणाले, की सम्राट अशोकाने बौद्ध धम्मप्रचाराकरिता देशात अनेक बौद्ध लेणी निर्माण केल्या. त्यापैकी नाशिकमधील त्रिशरण लेणी आहे. मनुवादी हा इतिहास दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत. मनुवादी विचारांनी शिवाजी महाराजांनाही त्रास दिला. संभाजी महाराज, संत तुकाराम यांच्याबद्दल चुकीचे लिखाण केले. संजय दोंदे यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण बागूल यांनी स्वागत केले. प्रभाकर कांबळे, संतोष सोनवणे, मनोज गाडे, प्रल्हाद उघाडे, शरद भोगे आदींनी संयोजन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकलहरे प्रकल्पावर मळभ

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक जिल्ह्यातील रतन इंडिया पॉवर लिमिटेड (इंडिया बुल्स) औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प कर्जाच्या खाईत बुडाल्याने हा प्रकल्प महानिर्मितीने चालविण्यास घेण्याचा प्रस्ताव पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन (पीएफसी)ने राज्याच्या ऊर्जा खात्याकडे पाठविला आहे. ऊर्जा खात्याने या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविल्यास एकलहरे वीजनिर्मिती प्रकल्प इतिहासजमा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात रतन इंडिया पॉवर लिमिटेड या कंपनीने १३५० मेगावॅट क्षमतेचा औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प उभारलेला आहे. या प्रकल्पाचे अगोदरचे नाव इंडिया बुल्स असे होते. २०१७ मध्ये या प्रकल्पाची उभारणी पूर्ण झालेली आहे. मात्र, गेल्या वर्षभरापासून हा वीजनिर्मिती प्रकल्प धूळ खात पडलेला आहे. रतन इंडिया पॉवर लिमिटेड या कंपनीचे राज्यात अमरावती व नाशिक येथे दोन वीजनिर्मिती प्रकल्प आहेत. अमरावती येथील वीजनिर्मिती प्रकल्प याआधीच महानिर्मितीकडे सोपविण्यात आलेला आहे. परंतु, नाशिकच्या प्रकल्पातील प्रत्यक्ष वीजनिर्मिती विविध समस्यांमुळे रखडलेली होती. परिणामी या वीजनिर्मिती प्रकल्पावर ९००० कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. रतन इंडिया पॉवर लिमिटेड या वीजनिर्मिती प्रकल्पावरील थकबाकी वाढल्याने भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या तरतुदींच्या आधारे हा प्रकल्प नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून घोषित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे तांत्रिक आर्थिक परीक्षण केल्यावर ही बाब उघड झाली होती. त्यामुळे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनने हा प्रकल्प राज्याच्या महानिर्मितीने ताब्यात घ्यावा, अशा स्वरुपाचा लेखी प्रस्ताव राज्याच्या ऊर्जा विभागाकडे सादर केला आहे.

--

केंद्र सरकारचे धोरणही मुळावर

रतन इंडिया पॉवर लिमिटेडसोबत ९५० मेगावॅट विजेचा करार झालेला होता. परंतु, हा करार प्रत्यक्षात आलाच नाही. रतन इंडिया पॉवर लिमिटेड कंपनीकडूनही सकारात्मक प्रतिसाद आलेला नव्हता. अशातच गेल्या दोन वर्षांपासून राज्यात विजेची मागणी वाढलेली आहे. त्यामुळे महानिर्मितीकडूनही वीजनिर्मितीची क्षमता वाढविण्याच्या विचार सुरू आहे. अशा परिस्थितीत नवीन प्रकल्प उभा करण्यापेक्षा आहे तो प्रकल्प चालविण्यासाठी घेणे अधिक व्यवहार्य ठरणार आहे. परंतु, रतन इंडिया पॉवर लिमिटेड हा वीज प्रकल्प विविध समस्यांच्या गर्तेत अडकलेला आहे. रेल्वे मार्गाचे कामही अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रस्तामार्गे कोळसा वाहतूक अधिक खर्चिक होणार आहे. मात्र, असे असले, तरी केंद्र सरकारने कार्बनचे प्रमाणापेक्षा जास्त उत्सर्जन करणारे वीजनिर्मिती प्रकल्प सुपरक्रिटिकल घोषित करून ते बंद करण्याचे धोरण आखलेले आहे. या धोरणानुसार एकलहरे प्रकल्प २०१९ मध्ये कालबाह्य ठरणार आहे. या परिस्थितीत सबक्रिटिकल गटातील वीजनिर्मिती प्रकल्पांत गुंतवणूक करण्यास केंद्र सरकारचेही प्राधान्य मिळण्याची दाट शक्यता असल्याने निधीसाठी ऊर्जा खात्याकडून पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास एकलहरेतील सध्याचा प्रकल्प इतिहासजमा होण्याबरोबरच प्रस्तावित ६५० मेगावॅट क्षमतेचा प्रकल्पही मृगजळच ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

००००००००

'एकलहरे वाचवा'चा ग्रामपंचायतींचा ठराव

--

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांना साकडे

--

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातील आहे त्या वीजनिर्मिती संचांचे नूतणीकरण करण्यात यावे किंवा प्रस्तावित ६६० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात यावा, अशी मागणी करणाऱ्या एकलहरे परिसरातील पाच ग्रामपंचायतींच्या ठरावाचे निवेदन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना देण्यात आले.

एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पातील काही वीजनिर्मिती संच सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहेत. आजवर या वीजनिर्मिती प्रकल्पाने राज्याच्या विकासात मोलाचे योगदान दिलेले आहे. याशिवाय या प्रकल्पामुळे हजारो कुटुंबांना रोजगारही मिळालेला आहे. अशा परिस्थितीतही या प्रकल्पातील काही वीजनिर्मिती संच यापूर्वीच कायमस्वरूपी बंद करण्यात आलेले आहेत. उर्वरित वीजनिर्मिती संचही शेवटच्या घटका मोजत आहेत. काही वर्षांपूर्वी दोन वीजनिर्मिती संच कायमस्वरुपी बंद करताना एकलहरेत ६६० मेगावॅट क्षमतेचा नवीन वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. परंतु, प्रत्यक्षात हे आश्वासन आजवर पूर्ण झालेले नाही. एकलहरे वीजनिर्मिती प्रकल्पातील संचांचे नूतनीकरण करण्यात यावे किंवा प्रस्तावित ६६० मेगा वॅट क्षमतेचा नवीन वीजनिर्मिती प्रकल्प लवकरात लवकरात उभारण्यात यावा, अशी मागणी करणारा ठराव एकलहरेसह हिंगणवेढे, कोटमगाव, सामनगाव आणि ओढा या पाच गावांच्या ग्रामपंचायतींनी नुकताच केला आहे. या ठरावाचे निवेदन माजी ऊर्जामंत्री तुकाराम दिघोळे, माजी खासदार देवीदास पिंगळे,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाराम धनवटे आदींनी नुकतेच माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना दिले. सरकारने याप्रश्नी सकारात्मक विचार न केल्यास सरकारला जनतेच्या असंतोषाचा सामना करावा लागेल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कावडधारक निघाले सप्तशृंगीकडे

0
0

म. ट. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

दसरा आटोपताच त्र्यंबकेश्वर येथून हजारो कावडधारक सप्तशृंगी गडाकडे रवाना होत आहेत. पूर्वपरंपरेनुसार कोजागिरी पौणिर्मेस तीर्थराज कुशावर्ताचे जल आई जगंदबा संप्तशृंगीमातेच्या चरणी अपर्ण करण्यासाठी खांद्यावर कावड घेऊन भावीक पायी चालत दोन दिवसात हा प्रवास करणार आहेत. पूर्वी केवळ स्थानीक नागरिक जात असत त्यात आता बाहेरगावच्या भाविकांची लक्षणीय संख्येने भर पडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images