Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मराठी माध्यमांच्या शाळांवर संक्रांत

0
0
शिक्षकेत्तर कर्मचारी निवडीवर घालण्यात आलेले निर्बंध, वेतनेत्तर अनुदानावर टाकण्यात आलेली बंदी आणि पटपाडतळणीनंतर शिक्षक भरतीवर आलेली मर्यादा पाहता राज्यातील खासगी अनुदानित शाळा संपवण्याचा घाट शिक्षण विभागाने घातल्याचे स्पष्ट होते.

बीएड अभ्यासक्रमात पाली भाषा

0
0
पुणे विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने नव्याने घेतलेल्या निर्णयानुसार बीएडच्या शिक्षणशास्त्र या विद्याशाखेंतर्गत पाली भाषेचाही समावेश करण्यात आला आहे.

देवळा तालुक्याकडे पावसाची पाठ

0
0
संपूर्ण जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली असली तरी देवळा तालुक्यात पावसाने पूर्णतः पाठ फिरविली. त्यामुळे सध्या गिरणा नदीला पूर आला असून लोहणेर येथून गिरणा कालव्याला पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी जि. प. सदस्य तथा भाजपचे गटनेते केदा आहेर यांनी केली.

कैद्यांनी शिवले भावी सैनिकांचे ड्रेस

0
0
शाळेचे युनिफॉर्म शिवण्याबाबत अनेकदा गोंधळ होतो. पण नाशिकरोड कारागृहाने यावर उपाय शोधला आहे. कारागृहातील कैद्यांनी भोसला मिलिटरी स्कूलच्या एक हजार रामदंडींचे (भावी सैनिक) ड्रेस तयार केले आहेत. या माध्यमातून कैद्यांना आतापर्यंत दीड लाखाचे उत्पन्न मिळाले.

३४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा?

0
0
बिहारमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून झालेल्या विषबाधेच्या घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत असतानाच धुळ्यातील एका आश्रमशाळेतील ३४ विद्यार्थ्यांना बुधवारी सकाळी उलट्या व जुलाब होऊ लागल्याने खळबळ उडाली.

गाडीवर झाड कोसळून चार जण ठार

0
0
शिर्डी येथे देवदर्शनासाठी हैदराबादहून आलेल्या भाविकांच्या गाडीवर झाड कोसळल्याने चार जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये १३ वर्षांची मुलगी बचावली असून तिला शिर्डी येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. येवला तालुक्यातील नगरसूल विश्रामगृहाजवळ गुरुवारी पहाटे ही घटना घडली.

मामाचा ‘मामा’

0
0
बाईकवरुन ट्रीपल सीट जाणे धोकादायक व नियम मोडणारे असले तरी आजच्या तरूण पिढीकडून नियम धाब्यावर बसविला जातोच. मात्र नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसुलीसाठी चौका चौकात मामालोक म्हणजे ट्रॅफिक पोलिस असतातच.

कॅनडा कॉर्नर परिसर खड्डेमय

0
0
शरणपूर रोडहून कॅनडा कॉर्नरची चौफुली ओलांडताच सुरू होणारी खड्ड्यांची मालिका वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरते आहे. कॉलेजरोडला समांतर असणाऱ्या आणि अव्दैत कॉलनीच्या समोरील या रस्त्यावर खड्ड्यांचे अडथळे पार पाडण्याची सर्कस करावी लागते आहे.

आता लक्ष राज्य सरकारकडे

0
0
वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (एनईईटी) सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी रद्द केली. ही परीक्षा लागू करण्यास नाशिकमधील पालकांनीही विरोध करीत न्यायालयात याचिका दाखल केली होती. या निर्णयामुळे दिलासा मिळाला असला तरी विद्यार्थ्यांचे लक्ष राज्य सरकारच्या भूमिकेकडे लागले आहे.

उड्डाणपुल होणार अधिक सोयीचा

0
0
शहरातील मुंबई-आग्रा हायवेवर उभारलेल्या पाच उड्डाणपूलांचा शहरवासियांना अधिकाधिक फायदा व्हावा यादृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी नाशिककरांनी केली होती.

प्रिमिअर... लोकांसाठी फुकट

0
0
कुठलाही सिनेमा प्रदर्शित व्हायच्या आधी त्याच्या प्रिमिअरची चर्चा जोरावर असते. सिनेमा जेवढा मोठा तेवढा त्याच्या प्रिमिअरचा झगमगाट मोठा. अंथरलेल्या रेडकार्पेटवर येणारे रथी-महारथी, तारे-तारका..

सिमकार्ड हवे? अंगठा दाखवा

0
0
सिमकार्डांचा गैरवापर रोखण्यासाठी कितीही कठोर नियम झाले, तरी हे कार्ड चुकीच्या हातात जाण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. यावर तोडगा म्हणून केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत दूरसंचार मंत्रालयाला काही सूचना केल्या आहेत.

सर्वशिक्षाचे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात

0
0
सर्वशिक्षा अभियानांतर्गत वर्षानुवर्षे तुटपुंज्या पगारावर काम करत असलेल्या कंत्राटी कर्मचारी आंदोलनाच्या पवि‌त्र्यात आहेत. आपल्या विविध मागण्या पावसाळी अधिवेशनामध्ये पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडणार असल्याची माहिती संघटनेमार्फत देण्यात आली.

'निरी'चे ८० लाख महापालिकेनेच द्यावेत!

0
0
गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासंदर्भात पाहणी करून उपाययोजना सुचविणाऱ्या 'निरी' संस्थेला ८० लाखांचेे मानधन महापालिकेनेच द्यावे, असा आदेश गुरुवारी मुंबई हायकोर्टाने दिला.

शहरातील रस्त्यांची परिस्थिती वाईटच

0
0
पावसाळ्यास सुरुवात झाल्यानंतर शहरातील अनेक रस्ते खड्ड्यात गेले असून महापालिका मुरूम किंवा खडी टाकून ते सुधारण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, प्रत्येक पावसानंतर रस्त्यांची परिस्थिती वाईट होत असल्याची कबुली प्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकी दरम्यान दिली.

झाडांसाठी होणार त्र्यंबकरोडचा सर्व्हे

0
0
नाशिक त्र्यंबक रस्त्याच्या चौपदरीकरणाअंतर्गत होणारी वृक्षतोड लक्षात घेता या मार्गातील शक्य तितके वृक्ष वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमींसह, अधिकारी या मार्गाचा सर्व्हे करणार आहेत. गुरुवारी बांधकाम भवन येथे अधिकारी, पर्यावरणप्रेमी व ठेकेदारांच्या बैठकीत हे मान्य करण्यात आले.

मान्यता नाही आणि अनामत रक्कमही

0
0
शिक्षण​ विभागात अधिकारांचे मोठ्या प्रमाणात केंद्रीकरण झाल्यामुळे भरती प्रक्रियेपासून नवीन शाळांच्या मान्यतेपर्यंत प्रत्येक निर्णयासाठी संस्थाचालकांना मंत्रालयातील ‘बाबूच्या’ मर्जीनुसार कामे करावे लागते.

मोकाट जनावरे, हतबल महापालिका

0
0
शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट झाला असून, रस्त्यांवरील वाहनचालकांच्या डोक्यावर कायम अपघाताची टांगती तलवार असते. रस्त्यांवर आपली गुरेढोरे सोडून वाहतूक व नागरिकांना अडचण निर्माण करणाऱ्या मालकांविरुध्द महापालिकेने कडक कारवाई करण्याची गरज आहे.

शाळा प्रवेशाचा अहवाल अपूर्णच

0
0
मुदतीनंतर पाच महिने उलटूनही शहरातील दीडशे शाळांनी २५ टक्के राखीव प्रवेशाचा अहवालाच शिक्षण विभागाकडे सादर केलेला नसल्याचे निदर्शनास आले आहे. या शाळांना ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती महापालिका शिक्षण मंडळाने दिली.

महापालिकेत पेटले सुपारी युद्ध

0
0
तीनशे वर्षांपासून सुरू असलेला फुलबाजार हटवण्यासाठी महापालिकेने सराफ असोसिएशनकडून सुपारी घेतल्याचा गंभीर आरोप शिवसेनेसह राष्ट्रवादीने गुरूवारी स्थायी समितीच्या बैठकीत केला. फुलविक्रेत्यांच्या स्थलांतरवरून यापुढे मनसेविरूध्द सेना आणि राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images