Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पालखेडच्या आवर्तनासाठीशेतकरी आक्रमक

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या संपूर्ण नाशिक जिल्हा दुष्काळात होरपळत असताना जायकवाडीला पाणी देण्याचा घाट घातला जात आहे. आपल्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारला जात आहे. नव्हे तर यासाठीच येवला तालुक्याचे नाव दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे, असा आरोप करीत शासनाचा हा डाव तालुक्यातील शेतकरी हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी दिला. येवला तालुक्यातील एरंडगाव येथे आयोजित पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

पालखेडच्या आवर्तनासाठी डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची रविवारी (दि.२१) एरंडगाव येथील पालखेड डावा कालवा कार्यालयाच्या प्रांगणात बैठक झाली. रब्बी हंगामासाठी लवकरात लवकर दोन आवर्तने पूर्ण क्षमतेने मिळावेत यासाठी लढा उभारण्याबरोबरच पालखेड धरण समुहातील पाणी जायकवाडीसाठी जाऊ नये यासाठी न्यायालयीन लढाई लढणे, जलहक्क समितीअंतर्गत पालखेड डावा कालवा कृती समिती स्थापन करणे आदींबरोबरच इतर विषयांवर याबैठकीत चर्चा करण्यात आली. पाण्यासाठी न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. भागवंतराव सोनवणे, हरिभाऊ महाजन, अनिस पटेल, एकनाथ गायकवाड, सुनील गायकवाड, किरण चरमळ आदींनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापालिका आयुक्तांनी अरेरावी थांबवावी!

0
0

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची नाशिकला बदली झाल्यानंतर आम्हाला फार आनंद झाला होता. नाशिकचा कायापालट होणार अशी आशा निर्माण झाली होती. नाशिक शहराला एक चांगला प्रशासक मिळाला, अशी भावना होती. मात्र, ती काही दिवसांतच फोल ठरली.

एकंदरीत त्यांचे नागरिकांशी असलेले वर्तन पाहून हा प्रशासक नव्हे, तर हा हुकूमशहा असल्याचे जाणवले. मी म्हणेण तीच पूर्व दिशा असे त्यांचे वागणे सुरू आहे. त्यांनी जनतेचे गाऱ्हाणे ऐकून घेण्यासाठी वॉक विथ कमिशनर हा उपक्रम सुरू केला खरा. मात्र, या उपक्रमात जनतेची गाऱ्हाणी ऐकणे सोडून त्यांनाच दम देण्याचे प्रकार आयुक्तांनी सुरू केले आहेत. गेल्या शनिवारच्या गोविंदनगरमधील वॉक विथ कमिशनर उपक्रमाला चक्क 'टॉक ऑफ कमिशनर'चे स्वरूप आले असल्याचे दिसले. स्वतः आयुक्त आपल्या तक्रारी ऐकून त्यावर उपाययोजना करतील या आशेने येथील नागरिक सकाळपासून उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान आलेल्या बहुतांश तक्रारी मुख्यतव्ये सार्वजनिक स्वच्छता, अतिक्रमणे व रस्त्यांवरील अपघात अशा साध्या विषयांशी निगडित असूनही आयुक्तांतर्फे महिला व ज्येष्ठ नागरिकांशी केलेला संवाद हा अत्यंत एकतर्फी, अरेरावीचा व प्रशासनिक उदासीनतेचा पुरस्कार करणारा असल्याचे दिसले. नागरिक आपल्याच तक्रार निवारणाच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आले असल्याचे साधे भानही आयुक्तांनी ठेवले नाही. आयुक्तांच्या अपेक्षेनुसार जनहितार्थ मांडलेल्या अपघातांच्या तक्रारींवरसुद्धा त्यांनी याला नागरिकच जबाबदार असल्याचा जावईशोध लावला. या प्रकारामुळे उपक्रमाचा मूळ उद्देशच साधला गेला नाही आणि नागरिकांचा अपेक्षाभंग झाल्याची चर्चा या कार्यक्रमानंतर नागरिकांमध्ये ऐकायला मिळाली. यावरून आयुक्तांवरील जनतेच्या विश्वासात घट होत असल्याचे जाणवले. किमान यापुढे तरी आयुक्तांनी अरेरावी थांबवून नागरिकांशी चांगले वागावे.

-त्रस्त रहिवासी, गोविंदनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौधरी, वाघ यांना सूर्योदय पुरस्कार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जळगाव शहरातील सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या सोळाव्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे सूर्योदय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, त्यात नाशिकचे बालसाहित्यिक संजय वाघ आणि कवी संजय चौधरी यांचा समावेश आहे.

दलूभाऊ जैन राज्यस्तरीय सूर्योदय साहित्यरत्न पुरस्कार मूर्तिजापूर येथील रवींद्र जमादे यांच्या दिवेलागण या ललित लेखसंग्रहास जाहीर करण्यात आला आहे. नाशिकचे संजय वाघ यांच्या जोकर बनला किंगमेकर या बालकादंबरीस, तर औरंगाबाद येथील डॉ. विशाल तायडे यांच्या छोट्या राजूची मोठी गोष्ट या बालकादंबरीसही पुरस्कार जाहीर झाला आहे. स्व. दलिचंद बस्तिमल सांखला यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय सूर्योदय काव्य पुरस्कार काव्य नाशिकचे संजय चौधरी यांच्या कविताच माझी कबर या काव्यसंग्रहाला जाहीर करण्यात आला आहे. इतरही विविध पुरस्कार जाहीर झाले असून, पुरस्कार वितरण सोहळा लवकरच होणार आहे. प्रा. डॉ. चारुता गोखले, माया धुप्पड, चंद्रकांत चव्हाण, देवीदास महाजन यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.

---

((((((स्व. श्रीमती.रामकुंवरबाई इंदरचंद देसर्डा यांच्या स्मरणार्थ सूर्योदय अक्षररत्न पुरस्कार शिरपूर येथील प्रा.डॉ. फुला बागुल यांच्या खारं आलनं या अहिराणी साहित्य समीक्षा या पुस्तकाला जाहीर करण्यात आला असून रूपये दोन हजाराचा धनादेश गौरवपत्रअसे या पुरस्काराचे स्वरूप आहे. स्व.राजेंद्र राणीदान जैन यांच्या स्मरणार्थ श्री दलुभाऊ जैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित सूर्योदय कथा पुरस्कार धरणगाव येथील डॉ.संजीवकुमार सोनवणे यांच्या गाव कुठे आहे ? या कथासंग्रहास जाहीर करण्यात आला असून रूपये दोन हजारचा धनादेश व गौरवपञ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दलुभाऊजैन चॅरिटेबल ट्रस्ट प्रायोजित सूर्योदय साहित्य पुरस्कार मुंबई येथील रमेश सावंत यांच्या जंगलगाथा या काव्यसंग्रहाला तर दोंडाईचा येथील कवयित्री लतिका चौधरी यांच्या चंद्राचा रथ या बालकाव्यसंग्रहास जाहीर करण्यात आला असून या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रूपये एक हजाराचा धनादेश गौरवपञ असे आहे.)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माहेश्वरी समाजाचे वधू-वर संमेलन

0
0

सोशल कनेक्ट लोगो

'विवाह यशस्वी तर जीवन सार्थक'

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

विवाह हे अनेक पिढ्यांचे नाते असते. परंतु, सध्याचे गतीमान जीवन, करिअरला जास्त महत्त्व, वाढते ताणतणाव, चुकीची विचारधारा, संस्कारांचा अभाव यामुळे विवाह अयशस्वी होत आहेत. यामुळे पती-पत्नीबरोबरच दोन कुटुंबे उध्वस्त होतात. बदनामी व शत्रुत्व वाढते. वैवाहिक नाते यशस्वी झाले तरच जीवनाचे सार्थक होते. जीवनात वास्तववादी राहा, अवास्तव अपेक्षा ठेवू नका, असे प्रतिपादन माजी पोलिस उपायुक्त धनराज दायमा यांनी केले.

नाशिकरोड माहेश्वरी सभा आणि महेश सेवा समितीतर्फे जिल्हास्तरीय माहेश्वरी युवक-युवती परिचय संमेलन येथे झाले. यावेळी ते बोलत होते. अखिल भारतीय माहेश्वर सभेचे उपाध्यक्ष अशोक बंग, नाशिकरोड अध्यक्ष श्रीनिवास लोया, उद्योजक वसंत राठी, अशोक तापडिया, रामविलास बूब, उमेश मुंदडा आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दायमा म्हणाले की, विवाह जमवताना स्पष्टता, सत्यता हवी. वास्तवात जगा. विवाह म्हणजे शारीरिक संबंधाची सोय नाही तर शारीरिक, वैचारिक, भावनिकता यांचा संगम आहे. श्रीमंतांनी साधा विवाह केल्यास गरीब अनुकरण करतील. वैवाहिक जीवनात समस्या आल्यास कोर्टात न जाता ज्येष्ठांचा, समुपदेशकाचा सल्ला घ्या. कुटुंबात एकता, विश्वास असेल तर कोणीच कुटुंब फोडू शकत नाही. बाल्यवस्था, किशोरावस्था, गृहास्थाश्रम हे जीवनचक्र आहे. त्यात यशस्वी होण्याचे प्रत्येकाचे लक्ष्य असते. पैसा, प्रतिष्ठा, करिअर हेच सर्वस्व नाही. घरात सुखी वातावरण असेल तर जीवन सुखी होते असेही ते म्हणाले. श्रीनिवास लोया यांनी स्वागत तर अशोक तापडिया यांनी प्रास्तविक केले. युवक-युवती परिचय पुस्तिकेचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एलईडीचा लखलखाट लांबणीवर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीअंतर्गत नाशिकमध्ये ऊर्जा बचतीच्या धोरणातून तब्बल ९१ हजार एलईडी दिवे लावण्याचे स्वप्न आता आणखी लांबणीवर पडले आहे. एलईडी दिव्यांसाठी आतापर्यंत मनपाने दोन वेळा निविदा काढल्या तरी त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता तिसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ पालिकेवर ओढावली आहे. दुसऱ्या निविदेत मेसर्स इन्सफ्रिरा ही कंपनी पात्र ठरली, मात्र कंपनीला योग्य सादरीकरण करण्यात अपयश आल्याने तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आली आहे.

महापालिका हद्दीत स्मार्ट सिटीअंतर्गत एबीडी एरियात एलईडी दिवे बसवण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु, त्यात पुन्हा बदल करीत, केंद्र सरकारच्या ऊर्जाबचत धोरणातून ही योजना संपूर्ण शहरभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. जानेवारी महिन्यात तत्कालीन आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्मार्ट लायटिंगचा प्रस्ताव तयार केला. साधारण, ९१ हजार फिटिंग्ज शहरभर लावून एलईडीचा झगमगाट हाणे अपेक्षित होते. मात्र, त्यासाठी कोणते मॉडेल निवडायचे यावरून बराच गोंधळ सुरू होता. अचानक कृष्णा यांची बदली होऊन पालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली. त्यातच राज्य सरकारने आदेश काढत, केंद्राच्या ईईएसएल कंपनीकडूनच दिवे बसवण्याचे फर्मान काढले. परंतु, या कंपनीला ठेका देण्यास विरोध झाला. सोबतच या कंपनीचे ट्रॅक रेकॉर्डही खराब असल्याने त्यावर फुली मारण्यात आली. कशीबशी निविदा काढण्यात येऊन पथदीपांवर जाहिराती लावून त्यात २० टक्के उत्पादन पालिकेला देण्याची अट टाकण्यात आली. परंतु, याकडे ठेकेदारांनी पाठ फिरवली. त्यामुळे जूनमध्ये दुसऱ्यांदा निविदा काढण्यात आली. केंद्र शासनाच्याच एका कंपनीकडून एलईडी बसवण्याबाबतही आदेश होते. मात्र, या कंपनीला काम देण्याबाबत विरोध सुरू होता. अशातच कृष्णा यांची बदली झाली व आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली.

ठेकेदार फिरकलेच नाहीत

पहिल्या निविदेत पथदीपावर जाहीराती लावून त्यातील २० टक्के उत्पन्न पालिकेला देण्याची अट होती. यामुळे ठेकेदार फिरकलेच नाहीत. अखेर पाच महिने प्रतीक्षा केल्यानंतर जून महिन्यात एलईडीसाठी दुसरी निविदा काढली. या निविदेला तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली. त्यात मेसर्स इन्सफ्रिरा या कंपनीने निविदा भरली. परंतु, ही कंपनी सादरीकरणात अपयशी ठरल्याने त्यावरही काट मारण्यात आली. आता तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आल्याने एलईडी झगमगाट लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘हिंदीचा प्रसार करा’

0
0

'हिंदीचा प्रसार करा' (फोटो)

जेलरोड : कोणतीही भाषा वाईट नाही. राष्ट्रभाषा हिंदीचा प्रसार करा. मुलांमध्ये बालवयातच हिंदीचे संस्कार करा, असे आवाहन वाराणसी येथील हिंदी साहित्यिक कपिलदेव प्रसाद मिश्र यांनी केले. अखिल हिंदी साहित्य सभेतर्फे जेलरोड येथे राष्ट्रीय हिंदी साहित्य संमेलन आणि पुरस्कार वितरण कार्यक्रमात कपिलदेव मिश्र बोलत होते. यावेळी विविध राज्यांतील कवींना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष सुबोध मिश्र, निमाचे माजी अध्यक्ष धनंजय बेळे, भरत सिंह, रमेश शर्मा, शीला डोंगरे, स्वप्निल कुलकर्णी, रामकृष्ण सहस्त्रबुद्धे, भरत शहा, भरत सिंग, श्रद्धा शिंदे, सुनीता माहेश्वरी, राजेश झनकर, दीपा कुचेकर, अतुल देशपांडे, प्रदीप दुबे, अनिता दुबे आदींची उपस्थिती होती.

-------------------------------------------

राजस्थान, उत्तरप्रदेश, आंध्रप्रदेश, हरयाना, छत्तीसगड आदी राज्यातील कविंना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार्थींमध्ये सुशील पांडे, अशोक तिवारी, भाग्यम शर्मा, मंजरी बेलापुरकर, कृपाशंकर शर्मा, नीलम देवी, ब्रजबिहारी शुक्ल, ब्रजेन्द्र व्दिवेदी, शांती तिवारी, सादिका नवाब, अल्का पांडे यांचा त्यात समावेश होता. उमाकांत वाजेयी, विजय मिश्र, सतीश शर्मा, जयप्रकाश सूर्यवंशी, विद्या सागर, वीरेंद्र गुप्त, सुरेश मिश्र, पूनम बंसल यांना साहित्य श्री पुरस्कार देण्यात आला. धनंजय बेळे म्हणाले की, युवा पिढीने सोशल मिडीयाचा अतिरेक टाळावा. साहित्यिकांमुळेच युवा पिढीवर चांगले संस्कार होतील. त्यांचे भवितव्य घडेल. सी. पी. मिश्रा आणि नेहा अवस्थी यांनी सूत्रसंचलन केले.

दुपारच्या सत्रात काव्यसंमेलन झाले. त्यामध्ये जयप्रकाश सूर्यवंशी, लक्ष्मीकांत कोतकर, प्रतिभा माही, विद्यासागर मिश्र, सुनिता माहेश्वरी, दौलत राय, निलिमा मिश्रा, रागिनी बाजपेयी, सुनील वाघ, शैलेश, ब्रजबिहारी शुक्ल, रामस्वरुप शाहूजी, इर्शाद आदींनी विविध विषयांवर हिंदी कविता सादर करुन श्रोत्यांना अंतर्मुख केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऑस्ट्रेलियावारीवर मुंढे

0
0

ऑस्ट्रेलियावारीवर मुंढे

नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अभ्यासदौऱ्यासाठी महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यादरम्यान महापालिकेतील प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. देशभरातील स्मार्ट शहरांच्या आयुक्तांकरीता ऑस्ट्रेलियन ट्रेड ॲण्ड इन्व्हेस्टमेंट कमिशन या संस्थेमार्फत हा दौरा होत आहे. मुंढे या दौऱ्यासाठी विमानाने ऑस्ट्रेलियाला रवाना झाले. ते सोमवार, २९ ऑक्टोबरपर्यंत ऑस्ट्रेलियात असणार आहेत. स्मार्ट सिटीच्या निर्मितीकरीता आदर्श प्रकल्पांचे सादरीकरण या दौऱ्यात केले जाणार असून ऑस्ट्रेलियातील एका कार्यक्रमात आयुक्त मुंढे यांचे भाषणही असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उसळ विक्रेत्याची चाकू भोसकून हत्या

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गाडी काढण्याच्या क्षुल्लक कारणावरून उद्भवलेल्या वादाचे पर्यावसन एका उसळ विक्रेत्याच्या खुनात झाल्याची घटना नाशिकरोड येथील एकलहरेरोडवरील अरिंगळे मळ्यात रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.

या खळबळजनक घटनेत पाच हल्लेखोरांनी केलेल्या जिवघेण्या हल्ल्यात पोटावर चाकूचे वार झाल्याने नरसिंग गोपीनाथ सोनवणे या उसळ विक्रेत्याचा मृत्यू झाला असून, त्यांचा मुलगा संदीप याच्याही पोटात हल्लेखोरांनी चाकूचे वार केल्याने तो गंभीर जखमी झाला असून, त्याची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. या घटनेनंतर मृत नरसिंग शिंदे यांचा मुलगा मारुती शिंदे (रा. श्रीकृष्णनगर, अरिंगळे मळा) याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात हल्लेखोर दीपक शंकर पाडळे (वय २६), आकाश शंकर पाडळे (वय २३), अमोल शंकर पाडळे (सर्व रा. पाण्याची टाकी, अश्विनी कॉलनी, सामनगावरोड), सुरेश ऊर्फ पिंट्या पांडुरंग सोनवणे आणि पिंट्याचा एक अल्पवयीन मुलगा अशा पाच जणांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.

-----------------------

सुरेश उर्फ पिंट्या सोनवणे याने हातातील चाकु नरसिंग शिंदे यांच्या पोटात खुपसला.तर दिपक व आकाश पाडळे यांनी गवतात पडलेल्या संदिपवर लाकडी दांड्याने हल्ला केला यावेळी सुरेश सोनवणे याने संदिपच्याही पोटासह,खांद्यावर आणि हातावर चाकुचे वार केले.यावेळी झालेला आरडा ओरड ऐकुण नागरिक धावुन आल्याने पाचही हल्लेखोर पळुन गेले. ऊसळ विक्रेता नरसिंग शिंदे हत्या प्रकरणातील संशयित आरोपींपैकी अमोल शंकर पाडळे (वय २४) यानेही नरसिंग शिंदे व त्याच्या मुलांनी आपल्यासह आजी मिराबाई सोनवणे, भाऊ दिपक पाडळे यास लाकडी दांड्याने मारहाण केल्याचा जबाब पोलिसांना दिला असुन पोलिसांनी नरसिंग शिंदे याच्या कुटुंबियाविरोधात गुन्हा दाखल केला आहे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जाळ्यात अडकूनमच्छीमाराचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

येथील कादवा नदीत मासेमारी करणाऱ्या भारत बळवंत जाधव (वय ३५, रा. सिद्धार्थ नगर पिंपळगाव ब) या युवकाचा मासेमारीच्या जाळीत पाय अडकल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या संदर्भात पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्च्या पाश्चात आई, पत्नी, चार मुली, मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे पिंपळगाव बसवंत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भारत जाधव शनिवारी सकाळी दरम्यान मासेमारी करीत असताना पाय जाळ्यात अडकल्याने कादवा नदी पात्रात पडला. काही काळानंतर ही घटना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी लगेच पिंपळगाव येथील अग्निशमग दलास संपर्क साधला. अग्निशामक प्रमुख सुनील मोरे

कार्मचारी घटनास्थळी बोलाविले. त्यांनी जाधव यास पाण्याच्या बाहेर काढले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी करणाऱ्याकडून सोने हस्तगत

0
0

तिडके कॉलनीतील गुन्हा उघडकीस

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपीस पकडून पोलिसांनी ९० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम सोने जप्त केले. ही कारवाई क्राईम ब्रँचच्या युनिट एकच्या पथकाने केली. संशयिताच्या अटकेमुळे तिडके कॉलनी येथील घरफोडीचा एक गुन्हा उघडकीस आला असून, आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शौकत फरीद शेख (वय ३०, रा. महादेववाडी, सातपूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. संशयिताने दोन महिन्यांपूर्वी तिडके कॉलनी येथे घरफोडी केली होती. या व इतर गुन्ह्याचा तपास सुरू असताना युनिट एकचे पोलिस निरीक्षक आनंदा वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब दोंदे, हवालदार अनिल दिघोळे, संजय मुळक, पोलिस नाईक रावजी मगर आदींचे पथक १६ ऑक्टोबर रोजी गस्त घालत असताना त्यांना संशयित शेखची टीप मिळाली. शेख ठक्कर बाजार येथे येणार असल्याची पक्की माहिती मिळाल्याने या पथकाने तेथे सापळा रचून शिताफिने त्याला अटक केली. शेखला कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली. पोलिस कोठडी दरम्यान केलेल्या चौकशीत संशयित शेखने तिडके कॉलनी येथील राजा शिवाजी मार्गदर्शन केंद्रासमोरील त्रिमूर्ती नावाच्या बंगल्यात घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ९० हजार रुपये किमतीचे ३० ग्रॅम सोने हस्तगत केले. या घरफोडीबाबत मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून, गुन्ह्याचा तपास हवालदार अनिल दिघोळे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालापाचोळ्याचे उद्यानांमध्येच खत

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका क्षेत्रातील शहराच्या हद्दीतील रस्त्यांवरील, तसेच उद्यानांमधील पालापाचोळ्यातून कंपोष्ट खत निर्मितीचा अभिनव उपक्रम महापालिकेच्या उद्यान विभागाने हाती घेतला आहे. स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर-आडके यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम आकाराला येत आहे. महापालिकेच्या ४९० उद्यानांपैकी ८० उद्यानांमध्ये राष्ट्रीय सेंद्रीय शेती संस्थेच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर पालापाचोळ्यापासून खत निर्मितीचा हा प्रकल्प सुरू झाला आहे. पालिका हद्दीतील वृक्षांसह उद्यानांतील झाडांसाठीच हे खत वापरले जाणार आहे. स्वच्छता, कीडरोग नियंत्रणासह वृक्षांचे आरोग्य सुधारण्यासाठी या खताचा वापर होणार असून, शिल्लक खताची पालिकेकडून विक्रीही केली जाणार आहे.

रस्त्यासह पालिकेच्या उद्यानांमध्ये पडलेला पालापाचोळा हा नागरिकांसह पालिकेसाठी डोकेदुखी ठरतो. महापालिकेकडून घंटागाडीद्वारे आठवड्यातून एक दिवस हा पालापाचोळा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली जाते. परंतु, पालापाचोळा उचलण्यासाठीची सक्षम यंत्रणाच नसल्याने तो जागेवरच सडून रोगराईला आमंत्रण देतो. यावर उपाय म्हणून पालापाचोळ्यापासून गांडूळ खतनिर्मितीचा उपक्रम पालिकेने सुरू केला होता. परंतु, तो खर्चिक असल्याने पालिकेने त्याचा विस्तार केला नाही. हिमगौरी आहेर-आडके यांनी राष्ट्रीय सेंद्रीय शेती संस्थेने पेटंट केलेल्या 'डिकंपोजिक कल्चर' या रसायनाने पालापाचोळ्यापासून कंपोष्ट खत निर्माण करण्याचा प्रस्ताव उद्यान विभागाला सादर केला होता. उद्यान विभागानेही या प्रस्तावावर तत्काळ अंमलबजावणी करण्यास सुरू केली आहे. पालिका हद्दीत ४९० उद्याने असून त्यापैकी ८० उद्यानांमध्ये या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी राष्ट्रीय सेंद्रीय शेती संस्थेकडून हे रसायन मागवण्यात आले आहे. या उद्यानांमध्ये ३ बाय १० चा दोन फूट खड्डा खोदला जाईल. त्यात पालापाचोळा टाकून ४० ग्रॅम रसायन, पाच किलो गूळ हे २०० लिटर पाण्यात मिसळून खड्ड्यातील पालापाचोळ्यावर टाकले जाते. त्यामुळे दोन ते तीन आठवड्यात त्यातून सकस कंपोष्ट खत तयार होते. हेच खत पालिकेच्या उद्यानांसह वृक्षलागवडीसाठी वापरले जाणार आहे. टप्प्या-टप्प्याने पालिकेच्या सर्व उद्यानांमध्ये हा कंपोष्ट खतनिर्मितीचा प्रकल्प राबविला जाणार आहे.

नागरिकांनाही करता येणार

शहरातील मोठ्या हाउसिंग सोसायट्यांमध्ये नागरिकांना आपल्या हद्दीतच या पालापाचोळ्याचे विरेचन करता येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडूनच ५०, १०० आणि २०० लिटर डिकंपोजिक कल्चर मिश्रीत पाणी मिळणार आहे. पालिकेकडून अत्यंत अल्पदरात नागरिकांना हे पाणी मिळणार असल्याने सोसायट्यांनाही त्यांच्या आवारातील कचऱ्यावर त्यांच्याच हद्दीत प्रक्रिया करता येणार आहे. त्यामुळे घंटागाडीची वाटही बघावी लागणार नाही. महापालिकेच्या सर्व ४९० उद्यानांमध्ये हा उपक्रम सुरू झाल्यानंतर गरजेपेक्षा जास्त खत तयार झाल्यास त्याची पॅकेजिंग करून विक्री केली जाणार आहे. त्यातून पालिकेलाही आर्थिक फायदा होणार आहे. शिवाय, रस्त्यावरील तसेच उद्यानांवरील पालापाचोळा उचलला गेल्याने शहराच्या स्वच्छतेतही भर पडणार आहे.

उद्यानांमध्येच पालापाचोळ्यातून खतनिर्मिती झाल्यास, शहर स्वच्छतेला मोठा हातभार लागेल. सोबतच खतप्रकल्पावरील खताप्रमाणेच अधिकच्या खताची महापालिकेकडून पॅकेंजिग करून विक्रीही करता येईल.

- हिमगौरी आहेर-आडके, सभापती, स्थायी समिती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्मयोगी, कृषितपस्वी पुरस्कारांचे उद्या वितरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने सामाजिक आणि कृषी क्षेत्रातील विशेष योगदानासाठी देण्यात येणाऱ्या कर्मयोगी व कृषीतपस्वी पुरस्कारांचे वितरण बुधवारी (दि. २४) दुपारी ३ वाजता संस्थेच्या प्रांगणात करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

मानसिक अपंगत्व आलेल्या मुलींसाठी कार्यरत घरकुल संस्थेच्या संस्थापक विद्या फडके व शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी योगदान देणारे आयएएस अधिकारी शेखर गायकवाड यांना या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. प्रत्येकी एक लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गडकरी यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, हरिश्चंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ असतील.

..

कर्मयोगिनी पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या घरकुल संस्थेच्या संस्थापक विद्याताई फडके यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. २००६ मध्ये त्यांनी मानसिक अपंगत्व आलेल्या मुलींसाठी घरकुल या संस्थेची स्थापना केली. सद्यस्थितीत येथे ४५ प्रकारांचे अपंगत्व आलेल्या २२ मुलींचे संगोपन आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी त्या अहोरात्र प्रयत्नशील आहेत.

कृषीतपस्वी या पुरस्कारासाठी निवडण्यात आलेले पुरस्कारार्थी आयएएस अधिकारी व पुणे येथील भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा या संस्थेचे संचालक शेखर गायकवाड यांचे कृषी क्षेत्रातील योगदान या पुरस्कारासाठी विचारात घेण्यात आले आहे. शेतीच्या कायद्यांबाबत समाज जागृती, शेतकऱ्यांची फसवणूक थांबविण्यासाठीचे प्रबोधन, शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध लढा आदी उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगी गडावर आज छबिना सोहळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कोजागरी पौर्णिमेनिमित्त सप्तशृंग गडावर दरवर्षी प्रमाणे तृतीयपंथीयांचा छबिना निघणार आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागातून तृतीयपंथी गडाकडे येण्यास सुरुवात झाली आहे.

तृतीयपंथीयांकडून दरवर्षी गडावर देवीला साडी चोळी अर्पण केली जाते. कोजागरी पौर्णिमेनिमित्त राज्याच्या विविध भागातून तृतीयपंथी गडावर येण्यास सुरुवात झाली असून ठिकठिकाणी पूजेची तयारी असल्याचे दृष्य गडावर पहायला मिळते. आपल्या घरातील देवीच्या मूर्ती या सप्तश्रृंगी देवीला भेटण्यासाठी घेऊन येत असतात. मुंबई व उपनगरातून सर्वात जास्त तृतीयपंथी गडावर पोहचले आहेत. नाशिक तसेच उत्तर महाराष्ट्रातील तृतीयपंथी गडावर पोहचतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. वाजतगाजत देवीला त्यांच्यातर्फे नैवेद्य दाखवला जाणार असून त्यानंतर ते आपल्या घराकडे परतणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संकलित मूल्यमापन चाचणी

0
0

संकलित मूल्यमापन चाचणीस सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत घेण्यात येणारी संकलित मूल्यमापन चाचणी यंदा शाळास्तरावर घेण्यात येत असून सोमवारी त्यास सुरुवात झाली. परीक्षेची प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून सर्व नियोजन यंदा शाळेकडे सोपविण्यात आले आहे. दिवाळीपूर्वी तोंडी व लेखी परीक्षा पूर्ण होतील, असे शाळांच्या वतीने सांगण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्य सरकारतर्फे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय पातळीवरील विविध संस्थांच्या मूल्यमापनात महाराष्ट्राचा देशात प्रथम तीन क्रमांकांमध्ये समावेश करणे उद्दिष्ट समोर ठेवून ही चाचणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या शैक्षणिक वर्षापासून मात्र, प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून न देता शाळास्तरावरून देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या विषयात मागे आहे, याची माहिती शिक्षकांना सरल प्रणालीमध्ये उपलब्ध असून एखाद्या विषयामध्ये सर्वाधिक मागे असलेल्या विद्यार्थ्यांचा विचार करुन त्यावर आधारित प्रश्नपत्रिका व अध्यापनासाठी करण्याचे स्वातंत्र्य शाळांना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शैक्षणिक प्रगती चाचणीचे स्वरुप, आयोजन, विद्यार्थी गुणांची नोंद करण्याची पद्धती, मुलभूत क्षमतांवर भर या बाबींमध्ये बदल करण्यात आले आहेत. या निर्णयाप्रमाणे

- -

आतापर्यंत प्रश्नपत्रिका राज्यस्तरावरून देण्यात येत होत्या. यंदा मात्र, प्रश्नपत्रिका तयार करणे, छापणे सर्व जबाबदारी शाळांकडे सोपविण्यात आली आहे. सोमवारपासून तोंडी परीक्षांना सुरुवात झाली असून बुधवारी लेखी परीक्षांना सुरुवात होणार आहे.

नितीन पाटील, मुख्याध्यापक, सुखदेव प्राथमिक विद्यामंदिर

- -

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परिसर स्वच्छतेचा लोकसहभागातून जागर

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक शहर परिसराच्या स्वच्छतेच्या बाबतीत केवळ महापालिकेवर विसंबून न राहता स्वच्छता अभियानात जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळाने लोकसहभागातून स्वच्छता मोहीम राबविली.

डासांच्या उत्पत्तीची स्थाने नष्ट करणे आणि गोरक्षनगर परिसर प्लास्टिकमुक्त करणे या दिशेने पाऊल टाकण्यास रविवारी या मोहिमेत सुरुवात करण्यात आली. त्यात परिसरातील रहिवाशांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंडळातर्फे शहराच्या विविध भागात एक परिसर एक रविवार हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. आमदार बाळासाहेब सानप यांनी आपल्या परिसर स्वच्छ ठेवल्याने होणाऱ्या फायद्यांची माहिती दिली.

स्वच्छतेतून आरोग्य हा विचार रुजविण्यासाठी हा उपक्रम गोरक्षनगरवासीयांच्या सहभागातून महिन्यातून किमान एक दिवस सातत्याने राबविण्यात येणार आहे. मंडळातर्फे एक परिसर- एक रविवार, स्वच्छतेसाठी गोरक्षनगर सांस्कृतिक मंडळ आहे तयार' असा नारा देण्यात आला. या नाऱ्यानुसार पुढे हे स्वच्छता अभियान केवळ गोरक्षनगरापुरते मर्यादित न ठेवता मंडळाचे कार्यकर्ते विविध परिसरातील विविध भागात जाऊन त्या ठिकाणी हे स्वच्छता अभियान राबविणार आहेत, तसेच तेथील नागरिकांना स्वच्छता अभियानात सहभागी करून घेणार असल्याचे अध्यक्ष जाधव यांनी सांगितले.

डॉक्टरांचा सक्रिय सहभाग

अभियानात सहभागी झालेल्या डॉ. उल्हास साकळे, डॉ. संजीव तोरणे, डॉ. रविकिरण निकम, डॉ. देवेंद्र देशपांडे, डॉ. जायभावे या डॉक्टरांनी डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याविषयीची माहिती दिली. स्वच्छतेचे महत्त्व सांगून परिसर स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचे आवाहन केले. मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जाधव यांनी शहरातील नागरिकांना आपल्या परिवाराच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी स्वच्छता अभियान कायमस्वरुपी सुरू ठेवले पाहिजे. त्यासाठी घराबरोबरच परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे, असे ‌आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दहा वर्षांनी बोलणे चूकच : सिंधुताई

0
0

शेवगाव : राजकारण आणि बॉलिवूडमध्ये वादळ निर्माण करणाऱ्या 'मी टू' मोहिमेवर ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी टीकास्त्र सोडले आहे. 'अत्याचार झाला तेव्हाच आवाज का उठवला जात नाही. दहा-पंधरा वर्षांनी बोंबलणं चूकच आहे. त्यामुळे निर्दोषही भरडले जातील,' अशी टीका सिंधुताईंनी केली. अहमदनगर जिल्ह्यातील लाडजळगाव येथे एका कार्यक्रमाला आले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली. 'मी टू'ची मोहीम अत्यंत वाईट आहे. त्यामुळे निर्दोष लोकांनाही शिक्षा भोगावी लागते, असे त्या म्हणाल्या.

चोक्सी घोटाळ्यांची

जेटलींना पूर्वकल्पना

नवी दिल्ली : भारतीय बँकांना २६ हजार ३०६ कोटींचा गंडा घालून विदेशात पळ काढणारे नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या घोटाळ्यांची केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना पुरेपूर कल्पना होती. त्यांची कन्या व जावई हे चोक्सी पळून जाईपर्यंत गीतांजली जेम्सचे वकील म्हणून काम करीत होते, असा आरोप करीत काँग्रेसने जेटली यांची अर्थमंत्रिपदावरून तात्काळ उचलबांगडी करण्याची मागणी सोमवारी केली.

सविस्तर वृत्त...१२

सौदी युवराज अडचणीत

इस्तंबूल : पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येशी सौदीचे युवराज महम्मद बिन सलमान यांचा संबंध असल्याचा दावा तुर्कस्तानच्या (टर्की) प्रसारमाध्यमांनी सोमवारी केला. या हत्येची उकल आपण केल्याचा शपथपूर्वक दावा तुर्कस्तानचे अध्यक्ष अर्दोगान यांनी केल्यानंतर प्रसारमाध्यमांनी वरील विधान केले आहे.

सविस्तर वृत्त...१२

लीड चौकट

पोलिस उपअधीक्षक अटकेत

नवी दिल्ली : लाचखोरीचा आरोप असलेले केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे(सीबीआय) विशेष संचालक आणि दुसऱ्या क्रमांकाचे अधिकारी राकेश अस्थाना अटक प्रकरणात सीबीआयने पोलिस उपअधीक्षक देवेंदर कुमार यांना सोमवारी अटक केली. देवेंदर कुमार यांना सतीश सना यांची खोटी साक्ष घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. मांस निर्यातदार मोईन कुरेशी प्रकरणाचेही ते चौकशी अधिकारी होते. शिक्षेत सवलत मिळविण्यासाठी कुमार यांनी लाच देऊ केली, असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. राकेश अस्थाना यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून सना यांचा जबाब २६ सप्टेंबर २०१८ रोजी नोंदविण्यात आला होता, असे सांगण्यात आले होते; परंतु त्या दिवशी सना हे हैदराबादमध्ये होते, असे सीबीआयकडून करण्यात आलेल्या चौकशीतून निष्पन्न झाले आहे.

सविस्तर वृत्त...११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्काऊट-गाइडचा आता डिसेंबरमध्ये मेळावा

0
0

नाशिकरोड : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाइड्स मुंबई आणि अहमदनगर भारत स्काऊट्स आणि गाइडस जिल्हा संस्थेतर्फे अहमदनगर येथे दि. १२ ते १८ नोव्हेंबरदरम्यान सहाव्या राज्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते. मात्र, अपरिहार्य कारणास्तव हा राज्य मेळावा पुढे ढकलण्यात आला असून, आता हा राज्य मेळावा सुधारित वेळापत्रकानुसार अहमदनगर येथे दि. १ ते ७ डिसेंबर या कालावधीत होणार असल्याची माहिती राज्य चिटणीस सारिका बांगडकर यांनी कळविली आहे. नाशिक जिल्ह्यातील स्काऊट्स आणि गाइड्स यांनी नोंद घेण्याची आवाहन त्यांनी केले आहे.

--

\Bशुल्कासाठी आजची मुदत\B

नाशिक : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने डिसेंबर महिन्यात आर्टिझन टू टेक्नोक्रॅट' या योजनेंतर्गत तृतीय स्तरीय परीक्षा घेण्यात येणार आहे. या योजनेतील तृतीय स्तरीय परीक्षेत याअगोदर अनुत्तीर्ण झालेल्या, तसेच द्वितीय स्तर परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना आज, मंगळवारी (दि. २३) परीक्षा शुल्क जमा करण्याची अखेरची मुदत आहे. ही परीक्षा दि. ४ ते ७ डिसेंबर २०१८ या कालावधीत होईल. ज्यांनी अद्याप परीक्षा अर्ज भरलेला नाही त्यांनी आज शुल्क व परीक्षा अर्ज भरावा, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अतिक्रमण निर्मूलनाचा फार्स

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने सोमवारी पुन्हा एकदा नाशिकरोडमधील विविध ठिकाणी अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली. मात्र, त्यापैकी काही ठिकाणी यापूर्वी अनेकदा अतिक्रमण निर्मूलन कारवाई होऊही या अतिक्रमणधारकांवर ठोस कायदेशीर कारवाई न झाल्याने महापालिकेची कारवाई निव्वळ फार्स ठरत आहे.

महापालिकेच्या पथकाने सोमवारी बिटको रुग्णालयाजवळील भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई केली. येथील विक्रेत्यांनी विरोध केल्याने त्यांच्याकडील सुमारे एक ट्रक भाजीपाला अतिक्रमण निर्मूलन पथकाने ताब्यात घेतला. भीमनगर येथेही पाच दुकाने आणि ओट्यांचे अतिक्रमण हटविले. चेहेडी पपिंग स्टेशन येथील भगवा चौकातील गुरव चाळ येथे साइड मार्जिनमधील पक्क्या बांधकामाचे अतिक्रमणही हटविण्यात आले. नाशिक-पुणे महामार्गालगत सेंट झेविअर हायस्कूल परिसरात कपड्यांची विक्री करणाऱ्यांच्या अनधिकृत स्टॉल्सवरही सायंकाळी साडेसहा वाजता कारवाई करण्यात आली.

--

अतिक्रमण लगेच जैसे थे!

बिटको रुग्णालयाजवळील भाजीविक्रेत्यांचे अतिक्रमण हटविल्यानंतर या पथकाने आपला मोर्चा मुक्तिधाम चौकाकडे वळविला.या ठिकाणी देवळाली रस्त्यावर सोमाणी गार्डनच्या भिंतीलगत बसलेल्या फुगे विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पथक थांबले असता मुक्तिधाम चौकातील सर्व हातगाडे व्यावसायिक आणि कुल्फी विक्रेत्यांनी पोबारा केला. काही वेळातच अतिक्रमण पथक येथे हजर झाले. परंतु, संपूर्ण चौक मोकळा असल्याचे बघून पथक पुढे निघून गेले. त्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच सर्व हातगाडे व्यावसायिक आणि कुल्फी विक्रेते पुन्हा रस्त्यावर अवतरले होते.

धनदांडग्यांना अभय?

मुक्तिधामजवळील कारवाईवेळी फुगे व लहान मुलांच्या करमणुकीचे साहित्य विक्री करणाऱ्या महिलांकडील सर्व साहित्य पथकाने जप्त केले. या महिला पथकाचे अधिकारी, कर्मचारी व पोलिसांकडे याचना करीत होत्या. परंतु, त्यांच्याकडे पथकाने दुर्लक्ष केले. येथेच फुटपाथवर आजी-माजी नगरसेवकांनी दुकाने थाटलेली आहेत. त्यांच्याच नावाने शेकडो हातगाडे फुटपाथच्याही खाली उभे आहेत. मात्र, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने या पथकाकडून या धनदांडग्यांना अभय दिले जात असल्याचे व गोरगरिबांच्या साहित्याची जप्ती केली जात असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घर खाक

0
0

आगीत घर खाक

कळवण : कळवण तालुक्यातील ईंशी गावी राहणारे शानू बदा भोरे यांचे अकस्मात आग लागून राहते घर जळाले असून घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू व सामान जळाले.यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत शासकीय यंत्रणेकडून पंचनामा केला जात असून,या आदिवासी कुटुंबातील सदस्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यासाठी शासनाने ती द्यावी ही मागणी आदिवासी बांधवांसह कुटुंबातील सदस्यांनी केली आहे. आग लागण्याचे स्पष्ट कारण समजू शकले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांचा मनपाला दणका

0
0

फटाक्यांच्या ७० स्टॉल्सना परवानगी नाकारली; सुरक्षेसह वर्दळीचे दिले कारण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पोलिसांच्या परवानगीपूर्वीच फटाके विक्री स्टॉल्सचा लिलाव काढणाऱ्या महापालिकेला पोलिसांनी पुन्हा दणका देत शहरातील १० ठिकाणच्या ७० फटाके विक्री स्टॉल्सना परवानगी नाकारली आहे. सुरक्षा तसेच वर्दळीचे कारण देत, ही परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे महापालिकेने काढलेल्या ४७० पैकी आता ४०० स्टॉल्सचा लिलाव होणार आहे.

महापालिका आणि पोलिसांचा वाद आता नेहमीच झाला आहे. गेल्या वर्षासह नवरात्रोत्सवातील गाळ्यांचा वाद ताजा असताना महापालिकेने दिवाळीतल्या फटाके विक्रीच्या स्टॉल्सच्या लिलावाबाबत घाई केली. नवरात्रोत्सवात पोलिसांनी लिलावाच्या दिवशीच कालिका मंदिर परिसरातील स्टॉल्सला परवानगी नाकारली होती. त्यानंतरही प्रशासनाने त्यातून धडा घेतला नाही. त्याचाच फटका महापालिकेला पुन्हा बसला आहे. पोलिस प्रशासनाच्या परवानगीच्या अधिन राहून महापालिकेने यंदा सहाही विभागातील २७ ठिकाणी तब्बल ४७० फटाके विक्री स्टॉल्सची उभारणी करण्यासाठी २५ व २६ ऑक्टोबर रोजी लिलाव काढले होते. या लिलावाची प्रक्रिया सुरू होण्यास चार दिवसांचा कालावधी शिल्लक असतानाच पोलिस उपायुक्त (मुख्यालय) माधुरी कांगणे यांच्या स्वाक्षरीचे पत्र महापालिकेला प्राप्त झाले असून त्यात ४७० पैकी ७० स्टॉल्सची परवानगी नाकारण्यात आली आहे. यामध्ये नाशिक पूर्व विभागातील १, पंचवटी ४, नाशिकरोड ४, सातपूर विभागातील एक अशा १० ठिकाणांचा समावेश आहे. वर्दळीचे ठिकाण, संभाव्य वाहतूक कोंडी, सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न अशी कारणे या परवानगी नाकारण्यामागे देण्यात आली आहे.

ईदगाह मैदानाला हिरवा कंदील

पोलिसांनी ईदगाह मैदानावर अटीशर्थींच्या अधीन राहून ५० फटाके स्टॉल्स उभारणीस परवानगी दिली आहे. जिल्हा रुग्णालयासमोरचा परिसर हा सायलेन्स झोन आहे. त्यामुळे रस्त्यावर परवानगी मिळणार नाही. हा परिसर वर्दळीचा असल्याने सुरक्षेच्या सर्व उपायोजनांची जबाबादारी महापालिकेवर असेल, असे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे येथील विक्रेत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हसरूळ गीतानगर येथील श्रीकृष्ण मंगल कार्यालयाशेजारी वस्ती असल्याने अग्निप्रतिबंधक उपाययोजना करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images