Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ऋतुजा घुसळे राज्यात प्रथम

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलच्या परिचारिका प्रशिक्षण कॉलेजच्या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र परिचर्या परिषदेकडून जाहीर करण्यात आला आहे. त्यात ऋतुजा घुसळे हिने वैद्य शल्य परिचर्या दोन या विषयात १०० पैकी ९४ गुण मिळवून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यानिमित्त तिचा सत्कार करण्यात आला.

परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात जनरल नर्सिंग मिडवायफरी (तीन वर्षांचा) व ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी (दोन वर्षांचा) असे दोन प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाते. नाशिक व नंदुरबार जिल्ह्यांतील विद्यार्थिनींना बारावीच्या गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जातो. जुलै २०१८ मध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. यात नर्सिंग मिडवायफरी तृतीय वर्षाचा निकाल १०० टक्के व द्वितीय वर्षाचा निकाल ८९.४७ टक्के लागला. ऑक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी द्वितीय परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून, या कॉलेजने राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. यामध्ये जीएनएम तृतीय वर्ष परीक्षेत नयना हरिणखेडे या विद्यार्थिनीने प्रथम, किरण पाटील हिने द्वितीय, तर प्रियंका चव्हाण हिने तृतीय क्रमांक मिळविला. जीएनएम द्वितीय वर्ष परीक्षेत ऋतुजा घुसळे हिने प्रथम, गायत्री सोमासे हिने द्वितीय, तर अनिल भोये याने तृतीय क्रमांक मिळविला. एनएमएम द्वितीय वर्ष परीक्षेत ज्योती मिंदे हिने प्रथम, रेखा रुपवते यांनी द्वितीय, तर वैशाली अहिरे हिने तृतीय क्रमांक मिळविला. सर्व विद्यार्थ्यांचे सिव्हिल सर्जन डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त सिव्हिल सर्जन डॉ. निखिल सैंदाणे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील, अधिसेविका मानिनी देशमुख, प्राचार्य राजन इनामदार यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.

--

गुणवत्तेला प्राधान्य हे सर्वच बाबतींतील सूत्र असून, विद्यार्थ्यांनी केलेल्या अभ्यासाचा, विद्यार्थ्यांसाठी सर्वांनी घेतलेल्या मेहनतीचा चांगला परिणाम निकालातून दिसून आला. दर वर्षी निकालाची चांगली परंपरा कायम असल्यानेच केंद्र सरकारने बी. एस्सी नर्सिंग कोर्ससाठी मान्यता दिली.

-डॉ. सुरेश जगदाळे, सिव्हिल सर्जन

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा समाज निवडणूक आखाड्यात

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठा समाजाच्या असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी व समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आठ नोव्हेंबर रोजी दिवाळीच्या पाडव्याला नवीन राजकीय पक्षाची स्थापन केली जाणार असल्याची माहिती मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली. भोर तालुक्यातील (जि. पुणे) रायरेश्वर मंदिरात ही घोषणा झाली असून, त्याचवेळी पक्षाचा झेंडा व उद्दिष्ट सांगण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हॉटेल प्लाझा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांच्या नेत्यांना बाजूला ठेवून या पक्षाची स्थापना केली जाणार आहे, असे सांगितले. नव्या पक्षातर्फे लोकसभेच्या पाच, तर विधानसभेच्या ५० जागा लढवण्यात येणार आहेत. मराठा समाजाचा पक्ष असावा, यासाठी आम्ही कोकण, पुणे, मुंबई, पश्चिम महाराष्ट्रात जिल्हानिहाय दौरे केले. आता उत्तर महाराष्ट्रात दौरा सुरू असून, नाशिकला प्रमुख लोकांशी चर्चा केली. मराठा आंदोलनातील १७ ते १८ संघटना आमच्या बाजूने असून, त्यांनी पक्ष स्थापनेला पाठिंबा दिला आहे, तसेच सोशल मीडियातूनही प्रतिसाद वाढत असल्याचे पाटील म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वर मंदिरातच हिंदवी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली होती.

मराठा समाज हा लढवय्या म्हणून ओळखला जातो. या समाजाच्या पाठिंब्यावर राजकीय पक्ष आणि नेत्यांनी सत्ता भोगली. समाजाच्या जडणघडणीत मराठा समाजाचे विशेष योगदान आहे. मात्र, नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, या न्याय मागणीसाठी तब्बल दोन तपांहून अधिक काळ मराठा समाजाला झगडावे लागले. राजकीय पक्ष व नेते मागण्या पूर्ण करण्यासाठी अडचणी व मजबुरी नमूद करतात. त्यामुळेच राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी परेश भोसले (कोल्हापूर), रणजीत बाबर (पुणे), चंद्रकांत सावंत (मुंबई), नितीन देसले, बापू गांगुर्डे उपस्थित होते.

आघाडी-युतीवर टीका

काँग्रेस व राष्ट्रवादीने सत्तेत असतांना १५-२० वर्षे मराठा समाजाचा वापर केला. पण, समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही. त्यानंतर भाजप व शिवेसेची सत्ता आली. त्यांनीही मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसली. त्यामुळे दबाव गट निर्माण करण्यासाठी पक्ष स्थापन करण्यात येणार आहे. पक्षात मुख्य संघटक, कोअर कमिटी, जिल्हानिहाय १० पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी घेतलेल्या या भूमिकेला खासदार उदयनराजे यांचेही पाठबळ लाभले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खुसखुशीत अंकांची ‘क्रेझ’...........

0
0

खुसखुशीत अंकांची 'क्रेझ' (प्लस पान ४, फोकस)

चोखंदळ वाचकांसाठी दिवाळी अंक म्हणजे जणू मनोरंजनाचा खुसखुशीत फराळच ठरतात. गेल्या १२५ वर्षांपासून दिवाळी अंक येतात आणि माहिती-मनोरंजनरुपी फराळाने रसिकजनांना तृप्त करून जातात. काहीशा साचेबद्ध असलेल्या काळातील दिवाळी अंक आता नवे रूप लेवून येत आहेत. दिवाळी अंकांचे हे वेगळेपण मांडणारा फोकस...

--

नाही खरेदीला तोटा! (फ्लस पान १ लीड)

आनंदाची आणि सुख-समृद्धीची उधळण करीत येणाऱ्या दिवाळीसाठी नाशिककर सज्ज झाले आहेत. 'दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा' या उक्तीनुसार खरेदीच्या उत्साहामुळे बाजारातील मरगळ झटकली गेली असून, चैतन्याचे वारे वाहू लागले आहेत. हाती आलेला बोनस अन् रविवारची सुटी यामुळे बाजारपेठा खुलून गेल्या होत्या.

--

जलसंपदाची सज्जता (मुख्य अंक पान ३ लीड)

जायकवाडीला पाणी सोडण्याची जलसंपदा विभागाची तयारी पूर्ण झाली आहे. रविवारी सुटी असतानाही कार्यालयात दुपारपर्यंत अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी धरणांची पाहणी करण्यासाठी गेले. जलसंपदा विभागाने यासाठी तीनशेवर कर्मचारी नियुक्त केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाननंतर पाणी सोडले जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर ‘तुम्हाला’ उलटे टांगू!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना धमकीवजा पत्र लिहिल्याचा निषेध करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मनुस्मृतीची प्रत जाळली. भुजबळांच्या केसाला धक्का लावला तर शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना उलटे टांगू, असा इशाराही राष्ट्रवादीच्या संतप्त कार्यकर्त्यांनी रविवारी दिला.

भुजबळ यांना पत्राद्वारे ठार मारण्याची धमकी देऊन महाराष्ट्राला कलंक लावण्याचे काम शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा निषेध नोंदविण्यासाठी पंचवटी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्रित जमले. मनुस्मृतीची प्रत जाळत त्यांनी शिवप्रतिष्ठानला आव्हान दिले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून कार्यकर्त्यांना रोखले. आमच्यासारखे पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांचे संरक्षण कडे भुजबळ यांच्याभोवती आहे. त्यांच्या केसाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला उलटे टांगू, असा इशारा या वेळी देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवल्यात आज आंदोलनधग

0
0

शिवसेनेतर्फे 'रास्तारोको'; शेतकरी संघटनेचे धरणे

म. टा. वृत्तसेवा, येवला

दुष्काळाच्या दाहकतेमुळे सहा महिन्यांपासून गावोगावी सुरू असलेली टँकरवारी अन् जनावरांच्या चारापाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला असताना तालुका दुष्काळी जाहीर करण्याबाबत शासनस्तरावर कुठलीही हालचाल दिसत नसल्याने शिवसेनेच्या वतीने सोमवारी विंचूर चौफुलीवर रास्ता रोको केला जाणार आहे. तर दुसरीकडे शेतकरी संघटनेच्या वतीने येवला तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

येवला तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी सकाळी ११ वाजता विंचूर चौफुलीवरील रास्ता रोको केला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे येवला-लासलगाव विधानसभा मतदार संघाचे संघटक रुपचंद भागवत यांनी दिली. शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी सहभागी होणार आहेत. पालखेड डावा कालव्याचे आवर्तन नियमानुसार वेळोवेळी सोडावे, पाटपाणी चारी क्रमांक ५२ पर्यंत पाणी सोडून सर्व आरक्षित बंधारे पिण्याच्या पाण्यासाठी भरून द्यावे, जायकवाडीला पाणी सोडू नये, तालुक्यातील जळालेली सर्व रोहित्र नवीन बसविण्यात यावी, सक्तीची कर्जवसुली थांबवावी, पीक विम्याची भरपाई मिळावी, इंधन दरवाढ कमी करावी या व इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन केले जाणार आहे.

शेतकरी संघटनाही आक्रमक

शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू झांबरे यांच्या अध्यक्षतेखाली येवला तहसिलसमोर विविध मागण्यांसाठी धरणे धरले जाणार आहे. तालुक्यातील तब्बल ५० पेक्षा अधिक गावे अन् वाडया-वस्त्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून आहेत. मुक्या जनावरांच्या पाणी व चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. पशुधन वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची वणवण सुरू आहे. अत्यल्प पावसाने यंदा खरिपाची वाताहत झाली आहे. या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तालुका तत्काळ दुष्काळी जाहीर करावा आणि पालखेड डाव्या कालव्याचे आवर्तन येत्या १५ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण क्षमतेने दिले जावे यासाठी आंदोलन करणार असल्याचे झांबरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उशिराच्या बिलाने भुर्दंड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या अनेक महिन्यांपासून वीज देयकाची मुदत संपल्यानंतर वीजबिले घरी येतात. परिणामी वीजबिल भरताना अधिकची रक्कम भरावी लागत असल्याने नाहक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची तक्रार घनकर गल्ली परिसरातील रहिवाशांनी महावितरणकडे केली आहे.

गेल्या चार ते पाच महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने वीजबिल भरण्याच्या अंतिम तारखेच्या आतच बिले द्यावीत, यासाठीची प्रक्रिया अधिक गतिमान करावी, अशी मागणीही येथील रहिवाशांनी महावितरणकडे केली आहे. घनकर गल्ली परिसरात राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येक महिन्याची वीजबिले मुदतीनंतर मिळतात, अशी तक्रार येथील रहिवाशांकडून वारंवार केली जात आहे. चालू वीजबिलासाठी दि. २५ ऑक्टोबर ही अंतिम तारीख होती. मात्र, रहिवाशांना दि. २७ ऑक्टोबर रोजी वीजबिले मिळाली. बिल भरण्याची अंतिम तारीख उलटल्यानतर दोन दिवसांनी बिले मिळाल्याने ३० ऑक्टोबरपूर्वी जास्तीची रक्कम भरून रहिवाशांना बिल भरावी लागत आहेत. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून घडत आहे. प्रत्येक महिन्यात अंतिम मुदतीनंतरच बिले मिळत असल्याने येथील रहिवाशांनी शनिवारी भद्रकाली परिसरातील महावितरणच्या कार्यालयात धाव घेतली. मात्र, चौथा शनिवार असल्याने महावितरणच्या कार्यालयात कोणतेही अधिकारी भेटू शकले नाहीत. त्यामुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडेच वीजबिले मिळण्यास दिरंगाई होत असल्याची तक्रार रहिवाशांनी नोंदविली. पुढील महिन्यापासून अंतिम मुदतीच्या आत वीजबिले सर्वांना मिळतील, याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. यावेळी किशोर मगर, बाळकृष्ण परदेशी, विजय पवार, शेखर काळे यांच्यासह घनकर गल्लीतील अन्य रहिवासी उपस्थित होते.

--

\Bकॉन्ट्रॅक्टरकडून दिरंगाई!

\Bवीजबिले ग्राहकांना घरपोच मिळण्यात दिरंगाई होत असल्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, महावितरण विभाग वेळेत वीजबिलांची प्रत काढते. वीजबिले ग्राहकांकडे पोहोचविण्याचे कॉन्ट्र्रॅक्ट देण्यात आले आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरकडून दिरंगाई होते, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ज्या ग्राहकांना वेळेत वीजबिले मिळत नसतील त्यांनी महावितरणच्या कार्यालयात संपर्क साधावा. आपला मोबाइल क्रमांक आणि ई मेल आयडी महावितरण विभागात नोंदविल्यास वीजबिलांची संपूर्ण माहिती ग्राहकांना मिळते. ग्राहकांनीही थोडे सजग व्हावे, असे सांगत दिरंगाईच्या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोट ३

0
0

कोट

०००

नाशिकच्या हक्काचे पाणी मिळावे ...

राज्यातील परिस्थिती लक्षात घेता पिण्याच्या पाण्याचे काटकसरीने वापर करण्याचे नियोजन सर्वत्र करण्याची गरज आहे. मराठवाडा असो अथवा नाशिक, बेकायदेशीर पाणी उपशावर आळा घालणे गरजेचे आहे. जायकवाडी धरणातून होणारा बेकायदेशीर पाणी उपसा, बीअर कंपनीला पाणी देण्याची गरज नाही. नाशिक, नगर, मराठवाडा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नारपार, अंबिका, औरंगा, दमनगंगा प्रकल्प पूर्णत्वास येण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. दमणगंगा खोऱ्याचे पाणी वळवल्यास मराठवाडाचा पाणीप्रश्न सुटू शकतो. नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी मिळाले पाहिजे. अनेक शेतकऱ्यांनी हजारो कोटी रुपये खर्च करून उभ्या केलेल्या फळबागांना पाणी उपलब्ध झाले नाही तर शेतकरी उद्ध्वस्त होईल. आगामी आठ महिने नाशिककरांना काटकसरीने काढायचे आहेत; त्यामुळे नाशिकच्या हक्काचे पाणी नाशिकला मिळायला हवे.

- दादा भुसे , ग्रामविकास राज्यमंत्री

पाणी सोडायला माझा पूर्ण विरोध आहे. जायकवाडीमध्ये पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे तर नाशिकचे पाणी सोडण्याची गरज काय? इकडे दुष्काळाची स्थिती गंभीर असताना प्रशासनाने जायकवाडीला पाणी सोडण्याचा अट्टाहास धरण्यापेक्षा या भागातील जनतेला पिण्याचे पाणी व जनावरांना चारा कसा उपलब्ध करता येईल, यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे.

- राजाभाऊ वाजे, आमदार, सिन्नर

कधी नव्हे इतक्या भीषण दुष्काळाला जिल्हावासीय सामोरे जात आहेत. भीषण पाणीटंचाई व सिंचनाचा प्रश्न गंभीर आहे. आपल्याच ताटात वाढण्यासारखे काही नाही. नाशिक उपाशी आणि मराठवाडा तुपाशी अशी गत नाशिक-नगरवासीयांची होणार आहे. यामुळे कोणत्याही परिस्थिती जायकवाडीचे पाणी जाऊ देण्यास आपला विरोध आहे. सरकार केवळ आपल्या राजकीय हितासाठी सर्वसामान्य जनतेवर अन्याय करीत आहे. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री हेच जलसंपदा विभागाचे मंत्री अहेत. नाशिकसह जिल्ह्यातील भीषणतेची जाणीव असतांना त्यांनी हे पाप करू नये.

- दीपिका चव्हाण, आमदार, बागलाण

नाशिकचे पाणी पळविण्यास आमचा तीव्र विरोध आहे. दुष्काळ सदृश्य परिस्थिती विचारात घेता व भविष्याचा विचार करता हे पाणी देणे चुकीचे आहे. तसेच या विषयाचे राजकारण न करता सर्व नाशिककरांनी याला विरोध केला पाहिजे. आमचा सुद्धा या गोष्टीला विरोधच आहे यासाठी करावे लागणाऱ्या लढाईत हमी सक्रीय आहोत

- सीमा हिरे, आमदार, नाशिक पश्चिम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेड क्रॉस सिग्नलपासून दहीपुलापर्यंत वाहनबंदी करा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीत वाहनांची वर्दळ, खरेदीदारांच्या गर्दीमुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास यामुळे रेड क्रॉस सिग्नल ते दहीपूल रस्ता दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाहनांसाठी बंद करावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देवीकर यांना दिले आहे.

या मार्गावरील गर्दीमुळे पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागतो. चारचाकी वाहनांच्या कर्कश हॉर्नमुळे लहान मुले घाबरतात. गर्दीमुळे अनेक चोरीच्या घटनाही घडलेल्या आहे. टवाळखोरांसाठी गर्दी ही पर्वणीच असते. त्यामुळे वाहनांना या काळात बंदी असावी. दिवाळी काही दिवसांवर आल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी सध्या नागरिक मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत आहेत. नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंसह इतरही वस्तू मेनरोड परिसरात सहजतेने उपलब्ध होतात. त्यामुळे मेनरोड परिसरात अधिक गर्दी होते. मात्र, येथील रस्त्याच्या तुलनेत नागरिकांची संख्या वाढल्याने गर्दीत चालणेही अवघड होते. त्यातच खरेदीसाठी येणाऱ्या महिला व युवतींची छेडछाड केली जाते. त्यामुळे दिवाळीच्या कालावधीत रेड क्रॉस सिग्नल ते दहीपूल रस्ता दुपारी बारा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वाहनांकरिता बंद करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदन देताना अॅड. चिन्मय गाढे, नीलेश सानप, डॉ. संदीप चव्हाण, संतोष भुजबळ, भूषण गायकवाड, मितेश राठोड, रोहित जाधव, राज रंधावा, संतोष पुंड, सचिन देशमुख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


यंत्रणा सज्ज; आदेशाची प्रतीक्षा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूरसह पालखेड आणि दारणा धरणातून पाणी सोडण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि. २९) संबंधित यंत्रणांची समन्वयाची बैठक बोलावली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी साडेदहा वाजता ही बैठक होणार असून, मंगळवारपासून पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तविली आहे.

गोदावरी मराठा विकास महामंडळाने जायकवाडी धरणातील पाण्याची तूट भरून काढण्यासाठी समन्यायी पाणीवाटपाच्या निकषानुसार नाशिकसह अहमदनगर जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांमधून तब्बल ८.९९ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. यापैकी ३.२४ टीएमसी पाणी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणा आणि पालखेड या तिन्ही धरणसमूहांमधून सोडावे लागणार आहे. मात्र, जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरे जात असून, अन्य तालुक्यांमध्येही पुरेशा पाण्यासाठी रहिवाशांना आतापासूनच वणवण करावी लागते आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यास तीव्र विरोध होऊ लागला आहे. पाणी सोडले जाऊ नये यासाठी अल्प कालावधीत उभारण्यात आलेला न्यायालयीन लढाही अपयशाच्या वाटेवर असून, सोमवारपासून पाणी सोडण्याचे नियोजन आहे, असे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केले होते. पाणी सोडण्यात आणि ते जायकवाडीमध्ये पोहोचविण्यात ज्या यंत्रणांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, अशा यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक बोलावली आहे. बैठकीस शहर आणि ग्रामीण पोलिसांसह, पाटबंधारे, महावितरणचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी करावयाच्या तयारीचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात येणार आहे. गंगापूरसह दारणा आणि पालखेड या दोन्ही धरणसमूहांमधून मंगळवारी सकाळपासून पाणी सोडले जाण्याचे संकेत प्रशासनातील विश्वसनीय सूत्रांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी प्रवाहावर औरंगाबादची ‘नजर’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडीला पाणी सोडण्यात येणार असल्याने जलसंपदा विभागाच्या नाशिक कार्यालयाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी औरंगाबादचे पथक शहरात दाखल झाले आहे. या पथकाने रविवारी धरणांमधील पाणीपातळीची प्रत्यक्ष भेट देत माहिती घेतली. हे पथक नाशिकमध्येच मुक्कामी राहणार असून पाणी सोडण्यात गडबड होऊ नये यावर त्यांचे लक्ष राहणार आहे.

नाशिककरांचा प्रचंड विरोध असल्याने औरंगाबादच्या या पथकाने विशेष काळजी घेतली आहे. या पथकात अभियंत्ययासह कर्मचारी असून ते पाणी सोडण्याच्या वेळी ठिकाणापासून तर पाणी पोहचेपर्यंत सर्व प्रवाहाची पाहणी करणार आहेत. ठिकठिकाणी हे पथक प्रवाहाच्या ठिकाणीची पातळी तपासणार आहे. तसेच हे पथक दररोज धरणाची पातळीसुध्दा तपासणार आहेत. कोठे पाण्याची चोरी होते आहे का? तसेच इतर नोंदी व पाणी केव्हा सोडले जाणार, जायकवाडीत कधी पोचणार याची माहिती संकलित करून ती औरंगाबादला पथकामार्फत पाठविली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घटस्फोट टाळण्यासाठी सुसंवादाची गरज

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पती-पत्नीच्या एकमेकांकडून वाढत चाललेल्या अपेक्षा, गैरसमज यामुळे विसंवाद निर्माण होऊन घटस्फोटांचे प्रमाण वाढत आहे. हे प्रकार थोपविण्यासाठी मुला-मुलींचे विवाह जुळवितानाच वधू-वर पक्षांनी एकमेकांशी सुसंवाद साधणे गरजेचे आहे. संसार टिकविण्यासाठी तडजोड आवश्यक असल्याचे प्रतिपादन अहिराणी साहित्याच्या अभ्यासक प्रा. डॉ. उषा सावंत यांनी रविवारी नाशिकमध्ये केले.

बापूसाहेब संतोषराव सूर्यवंशी धुळे संचलित खान्देशातील समस्त पाटील समाजाचा वधू-वर परिचय मेळावा मुंबई नाका येथील कालिका माता मंदिराच्या सभागृहात पार पडला. याप्रसंगी डॉ. सावंत बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर श्री कालिका माता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशवराव पाटील, बापूसाहेब सूर्यवंशी, राजू महाले आदी उपस्थित होते. सुमारे ४०० विवाहेच्छुकांनी या परिचय मेळाव्यात नावनोंदणी केली होती. ६० हून अधिक विवाहेच्छुकांनी व्यासपीठावर आपला परिचय दिला. मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी प्रा. सावंत म्हणाल्या की, घटस्फोटांच्या वाढत्या प्रमाणामुळे कुटुंबव्यवस्थेपुढे आव्हान निर्माण होत आहे. अलीकडच्या काळात हे प्रमाण वाढत असून, संसार टिकविण्यासाठी तडजोड गरजेची आहे. घटस्फोटासारखे प्रकार घडू नयेत याकरिता विवाह जुळवितानाच उभय पक्षांनी काळजी घ्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले. विवाहांमधील हुंड्याची पध्दती बंद व्हावी, विवाह जुळविताना कुंडलीला किती महत्त्व द्यायला हवे याचाही विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा बापूसाहेब सूर्यवंशी यांनी व्यक्त केली. अमळनेर येथे २५ नोव्हेंबर रोजी राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा होणार असून, त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वेळीच उठवावा आवाज

0
0

गुगलसारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेने 'मी टू' मोहिमेत आरोप झाल्याने आपल्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली हे स्वागतार्ह आहे. यामुळे पुरुषी मानसिकता समोर आली आहे. 'मी टू'चे वादळ भारतातही सुरू झाल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. मात्र, भारतात स्त्रियांचा सन्मान केला जात असल्याची अनेक उदाहरणे आहेत, तरीही अन्याय झालाच तर त्याविरुद्ध त्वरित आवाज उठविला पाहिजे, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

--

गुगलची कारवाई अनुकरणीय

गुगलसारख्या कंपनीने लैंगिक छळाच्या आरोपातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले, ही अनुकरणीय घटना आहे. 'मी टू'मुळे समाजातील अपप्रवृत्तींचा बुरखा फाडला जात आहे. विकृत पुरुषी मानसिकता 'मी टू'मुळे जगापुढे येत आहे. मात्र, या केसेस शहानिशा करून हाताळाव्यात.

-डॉ. मेघा जंगम

--

पुरुषांवर अन्यायकारक ठरू नये

गुगलने आपल्या कार्यालयातील हा प्रकार गाजावाज न करता हाताळला हे चांगले आहे. असभ्य वागणूक करणाऱ्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. मात्र, हे तातडीने घडावे, दहा वर्षांनी येणाऱ्या तक्रारी पुरुषवर्गावर अन्यायकारकच आहेत. त्यामुळे 'मी टू' ही मोहीम पुरुषांवर अन्यायकारक ठरायला नको.

-भूषण आवारे

--

'त्यांचा'ही पूर्वेतिहास तपासावा

एखाद्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे जणू देशभरात असेच होत असल्याचे रंगवलेले चित्र देशाच्या संस्कृतीचा अपमान करणारे आहे. अन्यायग्रस्त स्त्रियांना पुरुषवर्गाने न्याय मिळवून दिल्याची असंख्य उदाहरणे आहेत. त्यामुळे अन्याय जगजाहीर करणाऱ्यांचा पूर्वेतिहासही तपासला जावा.

-सुजाता तनपुरे

--

त्वरित करावी अन्यायाची तक्रार

सोशल मीडिया, तसेच प्रसारमाध्यमांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या 'मी टू' चळवळीमुळे स्त्रियांच्या होणाऱ्या शारीरिक शोषणाच्या प्रश्नाचे गांभीर्य नव्याने समोर येत आहे. परंतु, अनुचित प्रकार घडल्यानंतर लवकरात लवकर तक्रार केली पाहिजे. त्यामुळे असे प्रकार रोखता येतील.

-अॅड. रुपाली पगार

--

प्रवृत्ती अनेक ठिकाणी सारखीच

स्त्रियांच्या बाबतीत कायद्यातील तरतुदींचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे. परंतु, अनेक कार्यालये अथवा संस्थांत तसे होत नाही. 'मी टू'चे वादळ हे गुगलसारख्या हायप्रोफाइल आस्थापनेतही घोंगावले, यातून विकृत प्रवृत्ती अनेक ठिकाणी सारखीच असल्याचे समोर आले आहे.

-अॅड. विकास दाते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समृद्ध बारामतीला दुष्काळाचा शाप

0
0

\Bछटा दुष्काळाच्या

'मटा' विशेष\B

म. टा. वृत्तसेवा, बारामती

एकाबाजूला विकासाची पंढरी अशी ओळख आणि दुसऱ्याबाजूला तालुक्याच्या चाळीस टक्के भागाला भेडसावणारी पाणी समस्या, अशी स्थिती बारामती तालुक्याची आहे. येथील लोकप्रतिनिधींकडून नेहमी चकाचक बारामतीचाच उदोउदो होत असला तरी जिरायती भागाला लागलेला दुष्काळाचा शाप कधी संपणार असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. सध्या तालुक्यातील सहा गावे व ३५ वाड्यावस्त्यांमधील १२ हजार एकशे ८४ नागरिकांना सहा सरकारी टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दुष्काळी परिसरात आतापर्यंत २४ कोटी रुपये खर्चून ७१ पाणीपुरवठा योजना उभारल्या. मात्र, तांत्रिकदृष्ट्या या योजना असंक्षम असल्याने यातील अनेक योजना सध्या गंजलेल्या अवस्थेत आहेत.

तालुक्यातील तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मूर्टी, सोनवडी सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काऱ्हाटीसह या बावीस गावांसह ३५ वाड्यावस्त्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. बारामती तालुक्याचा पश्चिम भाग सोडून इतर सर्व तालुका नीरा डावा कालव्यामुळे मोठ्या प्रमाणावर सुजलाम-सुफलाम झाला. शहरात कृषी संशोधनासाठी जागतिक पातळीवरील कृषी विज्ञान केंद्राची निर्मितीही करण्यात आली. अनेक संस्था, संघटना, दूध संघांचे जाळे उभे राहिले. मात्र, एका बाजूला सर्व काही अनुकूल परिस्थिती असतानाही दुसऱ्या बाजूला साठ वर्षांनंतरही तालुक्याच्या पश्चिम भागात कायम दुष्काळी परिस्थिती असते. लोकप्रतिनिधींकडून दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते. हा सर्व भाग जिरायत समजला जातो. याठिकाणी नापिकी, जनावरांना चारा नसणे आणि पिण्यासाठी पाण्याचा अभाव असे एकत्रित संकट नेहमीच उभे असते. येथील नागरिकांना सिंचनासाठी नव्हे तर पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. गेल्या तीन वर्षांत तालुक्यातील पावसाचे प्रमाणही कमी झालेले दिसत आहे.

'सध्या बारामती तालुक्यातील अनेक गावांतील विहिरींनी तळ गाठला आहे. तरडोली, देऊळगाव रसाळ, मोराळवाडी, मूर्टी, सोनवडी सुपे, कुतवळवाडी, बोरकरवाडी, काऱ्हाटीसह ३५ वाड्यावस्त्यांना सहा सरकारी टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यातील जनावरांचा चारा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच नियोजन करण्यात येणार आहे,' असे तहसील प्रशासनाने 'मटा'ला सांगितले.

\Bशेतकरी, ग्रामस्थ आक्रमक\B

बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकरी आणि ग्रामस्थ सततच्या दुष्काळामुळे आक्रमक झाले आहेत. शरद पवार यांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून बारा डिसेंबर २०१३ मध्ये पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी मोठे जनआंदोलान केले होते. काही गावांत घरांवर काळे ध्वज लावून व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. यानंतरही प्रत्येक लोकसभा, विधानसभा निवडणुकांवेळी या भागातून मोठा विरोध केला जातो.

---------

\Bबारामती तालुक्यातील सरासरी पर्जन्यमान

\Bसन सरासरी पर्जन्यमान

२०१६ ४५० मिमी ४४४.७५ मिमी

२०१७ ४५० मिमी ५४८.३७ मिमी

२०१८ ४५० मिमी २२८.०० मिमी

--------

\Bसंभाव्य पाणीटंचाई असणारी गावे\B

\Bमहिना गावांची संख्या\B

नोव्हेंबर २०१८ ०५

डिसेंबर २०१८ ०९

जानेवारी २०१९ ११

फेब्रुवारी २०१९ ११

मार्च २०१९ १५

एप्रिल २०१९ ०५

मे २०१९ ०५

एकूण ६६

(यासाठी नियोजन म्हणून ९ बोअर आणि सात विहिरींचे प्रशासनाकडून अधिग्रहण करण्यात येणार आहे.)

---------

\B२४ कोटी खर्चूनही ७१ पाणीपुरवठा बंद

\Bतालुक्यात आतापर्यंत ७१ पाणीपुरवठा योजना उभारल्या. तांत्रिकदृष्ट्या या योजना असंक्षम असल्याने २४ कोटी रुपये खर्चूनही त्या सद्यस्थितीत गंजलेल्या अवस्थेत आहेत. पश्चिम भागातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक गावात अंदाजे दोन किंवा चार पाणीयोजना पूर्ण करण्यात आल्या आहेत. तालुक्यात २००४ ते २०१५ या कालावधीत पाणी प्रश्न निकाली काढण्याच्या उद्देशाने तब्बल ७१ योजना राबविण्यात आल्या आहे. यामध्ये स्वजलधारा ८, वर्धित वेग कार्यक्रमांतर्गत २७, भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत १०, बिगर आदिवासी २६ अशा एकूण ७१ योजनांचा समावेश आहे. यासाठी २४ कोटी ८६ लाख ४३ हजार ६०३ रुपये खर्च करण्यात आला. 'संबंधित विभागाने या भागांत योजना सुरू करताना पाणीपुरवठ्याचे जीआयएस मॅपिंग व ग्रामीण पाणीपुरवठ्याचा 'हायड्रॉलिक वॉटर सिम्युलेशन'ने अभ्यास केला नसल्याने पुढील दोडशे वर्षे अशा योजना राबविल्या तरी वाड्या-वस्त्यांवर टँकर सुरूच राहतील,' अशी माहिती एका सेवानिवृत्त अभियंत्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर 'मटा'ला दिली.

--------

दुष्काळ आमच्या पाचवीलाच आहे. आम्हांला शेतीसाठी पाणी नाही दिले तरी चालेल. मात्र, पिण्यासाठीतरी पाणी द्या. नेहमीच या भागाकडे दुर्लक्ष करण्यात येत असते.

- ज्ञानेश भापकर

----------

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विंधन विहिरी, विहीर खोदाई, पाणीउपसा बंदी करावी लागणार आहे. नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी उपलब्ध असणारे पाण्याचे स्रोत्र आरक्षित करण्यात येणार आहेत. प्रत्येक नागरिकांना पिण्याचे पाणी मिळण्यासाठी नियोजन आराखडा तयार करण्यात येणार आहे.

- हनुमंत पाटील, तहसीलदार, बारामती

--------

\Bमूर्टी\B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्तीच्या अर्जांची मान्यताप्रक्रिया आजपासून

0
0

नाशिक जिल्ह्यासाठी बीवायके कॉलेजचे केंद्र

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उच्च शिक्षण संचालनालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तींसाठी आता नव्याने तयार करण्यात आलेले महाडीबीटी पोर्टल हे कार्यान्वित करण्यात आले आहे. या पोर्टलवर छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांकडून रविवारी सायंकाळपर्यंत ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले आहेत. दरम्यान, या शिष्यवृत्तीसह विविध प्रकारच्या शिष्यवृत्तींसाठी करण्यात आलेल्या अर्जांना मान्यता देण्याची प्रक्रिया आजपासून (दि. २९) सुरू करण्यात येणार आहे.

सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित कॉलेजांच्या इन्स्टिट्यूट प्रोफाईलला महाडीबीटी पोर्टलव्दारे ही मान्यता देण्यात येत आहे. यासाठी आता २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत प्रक्रिया राबविली जाणार आहे. याशिवाय ज्या कॉलेजांच्या इन्स्टिट्यूट प्रोफाईलला मान्यता दिली नसेल, त्यांनाही येथे मान्यता देण्यात येणार आहे.

नाशिक शहर व जिल्ह्यातील कॉलेजांसाठी ही प्रक्रिया बीवायके कॉमर्स कॉलेजमध्ये राबविण्यात येईल. २९ ते ३१ ऑक्टोबर या तीनही दिवशी सकाळी १०.३० वाजेपासून कामकाज सुरू होणार आहे. आज, सोमवारी पहिल्या टप्प्यात नाशिक शहरासह निफाड, मालेगाव या तालुक्यांमधील सर्व कला-वाणिज्य व विज्ञान, विधी, शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र कॉलेजेसमधील प्रकरणांना मान्यता देण्यात येईल. उद्या (दि. ३०) इगतपुरी, कळवण, चांदवड, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी, देवळा या तालुक्यांमधील तर ३१ ऑक्टोबर रोजी नांदगाव, पेठ, बागलाण, येवला, सिन्नर, सुरगाणा या तालुक्यांमधील कॉलेजच्या प्रकरणांना मान्यता देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी 'शाळा बंद'

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रिक्त जागांची भरती प्रक्रिया, अत्यंत तटपुंजे मिळणारे शिक्षकेतर अनुदान आणि महत्वाच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षण महामंडळास बैठकीसाठी चार वर्षांपासून डावलल्याच्या भावनेमुळे महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाने शुक्रवारी (२ नोव्हेंबर) रोजी लाक्षणिक बंद पुकारला आहे. शिक्षणसंस्थांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवस राज्यातील शाळा बंद ठेवण्यात येतील. यात राज्यभरातून सुमारे ७ हजारांवर शाळा सहभाग घेतील, असा दावा महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

वर्षानुवर्षे जुन्याच समस्यांना संस्थाचालकांना सामोरे जावे लागते आहे. भाजपा सरकारनेही संस्थाचालकांच्या मागण्यांना प्रतिसाद दिलेला नाही. या मागण्यांसाठी चार वर्षांपासून महामंडळ मुख्यमंत्री फडणवीस यांची वेळ मागते आहे. मात्र राज्यातील शिक्षणसंस्थांशी बोलण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही. दुसरीकडे खासगी संस्था चालविणे कठीण होऊन बसले आहे, यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी एकदिवसीय शाळा बंद आंदोलन पुकारण्यात येत असल्याचे पाटील म्हणाले. सरकारने या बंदलाही प्रतिसाद न दिल्यास लवकरच बेमुदत शाळा बंद आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणहक्क कायद्याचा शिक्षण विभागाच्या वतीने सोयीनुसार अर्थ लावला जात असल्याने कायदेशीर अडचणी निर्माण झाल्या आहेत, शिपाई पदासारखी शिक्षकेतर आवश्यक भरती करण्यासही सरकार प्रतिसाद देत नाही, शाळांकडून अवास्तव, अव्यवहार्य माहिती मागविण्यात येत असल्याने त्या कामाचा थेट बोजा शिक्षकांवर पडून त्यांच्या कामकाजावर परिणाम होतो आहे, शिक्षकेतर अनुदान मिळण्यात अनेक अडचणी असून हे अनुदान वर्तमानकाळात तटपुंज आहे, शिक्षक नियुक्ती मान्यतेसाठीही हजारो शिक्षकांना न्यायालयात धाव लागते, सन२०१२ पासून शिक्षक भरतीही बंद आहे, शिक्षण संस्थाचालकांना अधिकाऱ्यांकडून दुय्यम वागणूक दिली जाते. शिक्षणसंचालकांना लेखी आदेश देऊनही अनेक जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थाचालकांना वेळच दिलेला नाही या प्रमुख मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सूतिगरणी कामगारांवा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

गेल्या २४ वर्षांपासून ठेंगोडा सूतगिरणी कामगारांची थकीत रक्कम मिळत नसल्याने तत्कालीन संचालक, अवसायक व अधिकारी यांचा निषेध म्हणून यंदा दिवाळी साजरी न करण्याचा निर्णय कामगार संघटनेचे नेते आण्णा सोणवने यांच्या वतीने जाहीर करण्यात आला.

सूतगिरणी कामगारांचे थकीत पगार, बोनस, ग्रॅज्युटी इत्यादी रक्कमेच्या प्रतिक्षेत २४ वर्षांपासून गिरणी कामगार आहेत. सन १९९४ पासून गिरणी अवसायनात निघाली व अवसायकांच्या ताब्यात आली. आजवर अनेक अवसायक बदलून गेले त्यांच्याकडे वारंवार थकीत रकमेची मागणी कामगारांच्या वतीने करण्यात आली. परंतु कामगारांच्या मागणीकडे कुणीही लक्ष दिले नाही. कोणतीही संस्था अवसायनात निघाल्यास तिची समापण मर्यादा असते. परंतु स्थानिक आमदार व लोकप्रतिनिधींनी लक्ष न दिल्याने कामगारांची एक पिढी सरकारी यत्रणेची शिकार झाली कामगारांची हक्काची रक्कम त्यांना अद्याप मिळाली नाही. गिरणी कामगारांनी वयाची ६५ ओलांडली. आपले प्रश्न कुणीतरी सोडेल या अपेक्षेने कामगार जगत आहेत. लवकर न्याय मिळावा, अशी मागणी अण्णा सोणवने, यशवंत पाटील, आर. के. आहीरे, कारभारी पगार, निंबा धोंडगे, त्र्यंबक जगताप यांनी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयएमए नाशिक टीम विजेती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महाराष्ट्र शाखेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत नाशिकच्या संघाने औरंगाबाद संघाला अंतिम सामन्यात पराभूत करीत सलग चौथ्यांदा विजय मिळवला. डॉ अनिरुद्ध भांडारकर ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. कपिल पाळेकर यांच्या कुशल नेतृत्वामुळे ही विजयश्रीची माळ नाशिकच्या गळ्यात पडली. विजयी संघात दिनेश ठाकूर, मिलिंद गांगुर्डे, नितीन चिताळकर, विशाल गुंजाळ, सचिन अहेर, सुशील अंतुरलीकर, भूषण नेमाडे, मुकेश खैरनार, गणेश सांगळे, सुहास कोटक, लखुजी चौधरी यांचा समावेश होता. अंतिम सामन्यात औरंगाबाद संघाने १२ षटकात ९५ धावा केल्या. नाशिक संघाने धावांचा पाठलाग करताना अवघ्या ११ षटकात १०० धावा करीत विजय प्राप्त केला सामन्याचे मानकरी डॉ दिनेश ठाकूर ठरले त्यांनी अवघ्या २२ चेंडूच्या ४७ धावा ठोकत सामना जिंकून दिला, नाशिकच्या विजयाबद्दल आय एम ए नाशिक चे अध्यक्ष डॉ आवेश पलोड यांनी अभिनंदन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तूर्तास पाणीदिलासा!....

0
0

तूर्तास पाणीदिलासा! (मुख्य अंक पान १ लीड)

नगरमधून जायकवाडीत पाणी सोडण्याविरोधात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याने सोमवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर बुधवारी (दि. ३१) सुनावणी होणार आहे. त्यामुळे पाणी सोडणे लांबणीवर पडल्याने नगर आणि नाशिककरांनाही तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

---

बोनस आला रे! (प्लस पान १ लीड)

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील सातपूर आणि अंबड औद्यौगिक वसाहतींमधील ३३ कंपन्यांनी कामगारांसाठी घसघशीत बोनस देण्याची घोषणा केली आहे. कामगारांना १६ ते ५० हजार रुपयांपर्यंत बोनस मिळणार असून, त्यामुळे शहरातील बाजारपेठेत मोठे चलनवलन घडून येणार आहे. बोनस जाहीर झाल्यामुळे कामगारांत समाधानाचे वातावरण आहे.

---

नाशकात १७ 'ट्रॅप' (प्लस पान २ लीड)

नाशिक विभागात लाचखोरीच्या गुन्ह्यांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) यावर्षी आतापर्यंत ८० सापळे लावले आहेत. त्यात उत्तर महाराष्ट्राचा विचार करता जळगाव जिल्हा लाचखोरीत सर्वांत आघाडीवर असून, त्यातही महसूल आणि पोलिस खाते नेहमीप्रमाणे सर्वांत पुढे आहे. नाशिकमध्ये १७ सापळे यशस्वी करीत 'एसीबी'ने २१ जणांना अटक केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साध्या सायकलवर मारली राज्यस्तरापर्यंत मजल

0
0

fanindra.mandlik@timesgroup.com

Tweet @FanindraMT

नाशिक : पेठ तालुक्यातील कोहोर पाडा येथील सुजाता वाघेरे या १३ वर्षांच्या आदिवासी सायकलिस्टने विभागीय स्तरावर झालेल्या सायकल स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला असून, तिची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिच्याबरोबर सहभागी झालेल्या सायकलिस्टनी अत्यंत महागड्या सायकली वापरून या स्पर्धेत सहभाग घेतला. मात्र, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या सुजाताने हे यश साध्या सायकलवर मिळवले आहे.

सुजाता कालिदास वाघेरे ही सायकलिस्ट पेठ तालुक्यातील कोहोर या गावातील रहिवासी असून, वडील शेती करतात. सुजाताला लहानपणापासून सायकलची आवड होती. घर ते शाळा हे चार किलोमीटरचे अंतर पायी जात असताना मिळेल त्याची सायकल घेऊन सुजाता सराव करीत होती. तिच्यातील गुण हेरून सुजाताच्या वडिलांनी विश्व हिंदू परिषदेच्या हरसूल येथील कन्या छात्रालयात प्रवेश घेतला. येथे आल्यावर तिच्यातील क्रीडागुणांना चालना मिळाली. नुकत्याच त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत तिने यश मिळवले. ती राहत असलेले घर साधे कौलारू असून, शेतीवर तिच्या कुटुंबाची गुजराण होते. सायकल कशी चालवायची याचे तांत्रिक ज्ञान नसताना तिने हे यश मिळवले आहे. सायकल स्पर्धेत सहभाग घेताना वेगळ्या प्रकारचा ड्रेस लागतो. हेल्मेट लागते, हेदेखील तिला माहीत नव्हते. स्पर्धेच्या ठिकाणी आल्यानंतर धावपळ करून तिला या सुविधा पुरविण्यात आल्या. तिची मोठी बहीण दहावीला असून लहान बहीण चौथीला आहे. मोठ्या बहिणीलादेखील सायकल चालवण्याची आवड आहे. एक वर्षापूवी कन्या छात्रालयातील शिक्षकांनी सुजाताला स्पर्धेत सहभागी होण्याचा सल्ला दिला, म्हणून तिने सर्वप्रथम तालुकास्तरावर झालेल्या स्पर्धेत सहभाग घेतला. येथे तिला यश मिळाले. त्यानंतर तिने जिल्हा पातळीवर झालेल्या स्पर्धेत सहभाग घेतला. येथेही ती अव्वल ठरली. त्यानंतर नाशिक येथे झालेल्या विभागीय स्पर्धेत तिने सहभाग घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला. तिच्याकडे अत्याधुनिक सायकल नसताना मिळवलेले यश पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. तिच्यातील सायकल चालविण्याचे कसब पाहून प्रा. हेरंब गोविलकर व अॅड. शाम घरोटे, सतीश चितळे, चंदूभाई पटेल यांनी तीला मदत केली.

मला सायकलची लहानपणापासून आवड असून, माझ्याकडे असलेल्या साध्या सायकलवरच सराव करते. या भागात शास्त्रशुद्ध शिकविणारे कुणीही नाही. अनुभवातून शिकते आहे.

- सुजाता वाघेरे, सायकलिस्ट

सुजाताचे कुटूंब अत्यंत गरीब आहे. वडिलांची थोडीशी शेती आहे. त्यावर त्यांची गुजराण चालते. सुजातामध्ये प्रचंड टॅलेंट आहे. आम्ही आमच्या परीने जितकी मदत करता येईल तितकी करीत असतो. सध्या ती राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेसाठी सराव करते आहे.

- अॅड. शाम घरोटे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फोटोळ

0
0

फोटोळ

०००००००००००

सज्जता अन् दिलासा!

जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याच्या तयारीच्या पार्श्वभूमिवर सोमवारी सकाळी गंगापूर धरणावर बंदोबस्तासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस फाटा पाठविण्याची तयारी करण्यात आली. यावेळी पोलिसांसह जवानांनाही दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, दुपारनंतर सर्वोच्च न्यायालयाने पाणीप्रश्नी ३१ तारखेला पुढील करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर बंदोबस्तासाठी रवाना झालेला फौजफाटा माघारी परतला.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images