Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘गोदावरी’साठी रेल्वे व्यवस्थापकास घेराव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

इगतपुरी येथील रेल्वेची विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे मेगा ब्लॉक घेण्यात आले आहेत. या मेगाब्लॉकमुळे मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्याने संतप्त चाकरमाने व प्रवाशांनी मंगळवारी सकाळी मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे व्यवस्थापकांना घेराव घातला. तसेच निदर्शने करीत गोदावरी एक्स्प्रेस नाशिकपर्यंत सोडण्याची मागणी केली. मनमाड-कुर्ला एक्स्प्रेस ही चाकरमान्यांसाठी सोयीची गाडी आहे. मात्र मेगाब्लॉकमुळे ही रेल्वे ३ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे प्रवासी, नोकरदार, विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. या वेळेत सोयीस्कर रेल्वे नसल्याने प्रवाशांच्या मनस्तापात भर पडत आहे. मंगळवारी प्रवासी संघटना पदाधिकारी, सदस्य व काही प्रवाशांनी कुर्ला एक्स्प्रेस रद्द असल्याने तीव्र संताप व्यक्त केला. तसेच रेल्वे व्यवस्थापक कार्यालय येथे जमून निदर्शने केली. रेल्वे अधिकारी गलांडे यांना प्रवाशांनी घेराव घालत जाब विचारला. रेल्वे अधिकारी, कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात, असा आरोप प्रवाशांनी केला. यावेळी आपले म्हणणे वरिष्ठांपर्यंत पोहचविण्यात येईल, याबाबत वरतून काही आलेले नाही, असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

प्रवासी, विद्यार्थी नोकरदार यांच्या सोयीची गाडी

शेकडो पासधारक करतात अप-डाऊन

महिलांची संख्या लक्षणीय

मनमाड, लासलगाव, निफाडच्या विद्यार्थ्यांसह नोकरदारांचे हाल

गोदावरीच्या वेळेदरम्यान दुसरी गाडी नसल्यामुळे प्रवाशांची नारजी

कोणत्याच गाडीला पासधारक डबा नसल्याने गैरसोय

गेल्या अनेक दिवसांपासून गाडी रद्द होतेय

गाडीच्या स्थितीबद्दल माहिती मिळत नसल्याचा आरोप

लासलगाव-निफाडमधील प्रवाशांना दुसरी रेल्वे नसल्याने हाल

विद्यार्थी, प्रवासी, नोकरदार यांच्या सोयीची असलेली गोदावरी किमान नाशिकपर्यंत सोडून प्रवाशांचे हाल थांबवा अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.

-नितीन पांडे, पदाधिकारी, रेल्वे सल्लागार समिती

कुर्ला एक्स्प्रेस रद्द असल्याने रेल्वे व्यवस्थापक गलांडे यांच्याशी मंगळवारी सकाळी दूरध्वनीवरून बोललो. प्रवाशांचे हाल होत आहेत, हे समजावून सांगितले. नाशिकपर्यंत गाडी सोडण्याची प्रवाशांतर्फे विनंती केली. मात्र कुर्लाच्या वेळेत कोणतीही रेल्वे मिळाली नाही. त्यामुळे प्रवाशांचा हिरमोड झाला.

- विनय आहेर, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भरत बलवल्लींचा स्वर पिंपळपारावर ‍घुमणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिककरांनी पाडव्याच्या पहाटे पिंपळपारावरील गाणे ऐकले नाही तर दिवाळी सण कोरडा गेल्याची भावना होते. याठिकाणी गाणे सादर करण्यासाठी बडी गायक मंडळी सुद्धा आतूर असतात. ज्या गानमंचाला स्वरसम्राट पंडित भीमसेन जोशी यांचा स्पर्श झाला आहे त्याचठिकाणी यंदाच्या पहाट पाडव्यासाठी सुप्रसिध्द गायक भरत बलवल्ली येणार आहे.

पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्येही पाडवा पहाटच्या मैफली प्रचंड गर्दीत होता. 'संस्कृती नाशिक' या संस्थेतर्फे पिंपळपारावर होणारा पहाटपाडवा म्हणजे या मैफलींमधला मेरूमणी असून तेथे यंदा प्रतिभावान गायक भरत बलवल्ली यांचे गायन होणार आहे. पिंपळपारावरील पहाट पाडवा नाशिककरांना नेहमीच मोहवत आला आहे.

नाशिकमध्ये पहाट पाडव्याची अनोखी संस्कृती रुजविणाऱ्या 'संस्कृती नाशिक' या संस्थेने आतापर्यंत पंडित भीमसेन जोशी, मुकुल शिवपुत्र, पंडित शौनक अभिषेकी, किशोरी आमोणकर, सुरेश वाडकर, संजीव अभ्यंकर, शुभा मुद्‌गल, अश्‍विनी भिडे-देशपांडे, गुंदेचा बंधू, रोणू मुजुमदार, जयतीर्थ मेहुंडी, उदय भवाळकर, कौशिकी चक्रवर्ती, भुवनेश कोमकली आदी दिग्गज कलावंतांना या पारावर आमंत्रित करून नाशिककर रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे.

'संस्कृती नाशिक'चे यंदाचे १९ वे वर्ष असून २० वा कार्यक्रम आहे. शास्त्रीय गायनासोबतच अभंग, नाट्यसंगीत, निर्गुणी भजन, दोहे यांचे सादरीकरण बलवल्ली करणार आहेत. त्यांना पखवाजवर दादा परब, ऑर्गनवर पंडित विश्वनाथ कान्हेरे, तबल्यावर पंडित प्रसाद करंबळेकर, बासरीवर वरद कठापूरकर व सिंथेसायझरवर सागर साठे यांची साथसंगत राहणार आहे.

पाडवा पहाटच्या स्वरयात्रेत के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचा संस्कृती गौरव पुरस्काराने सन्मान होणार असून पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांचा नागरी सत्कारही यावेळी होणार आहे. पाडवा पहाटेच्या या मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन 'संस्कृती नाशिक'चे अध्यक्ष शाहू खैरे यांनी केले आहे.

लोगो : कल्चर वार्ता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फटाक्यांबाबत निर्बंध लागू

$
0
0

परीक्षेने केला बे'रंगमंच'! -2

अघोषित भारनियमन -३

धनही असावे स्वच्छ! -४

देवळालीत 'शाम-ए-गझल' -५

'सीझेरियन' वाढतंय -६

0000000000000000

\Bफटाक्यांबाबत निर्बंध लागू

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फटाका उडविणाऱ्या जागेपासून चार मीटर अंतरापर्यंत १२५ डेसिबल आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांचे उत्पादन, विक्री आणि वापरावर जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बंदी घातली आहे. संबंधित परवाना प्राधिकारी यांनी गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यांवर, शाळा व महाविद्यालयाजवळ, तसेच धार्मिक स्थळाजवळ फटाका विक्रीस परवाना देऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

साखळी फटाक्यांसाठी ५०, १०० आणि त्यावरील फटाके असल्यास आवाजाची मर्यादा फटाका उडविण्याच्या जागेपासून चार मीटर अंतरापर्यंत अनुक्रमे ११५, ११० व १०५ डेसिबल असायला हवी. रात्री १० ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा या कालावधीत कुठल्याही प्रकारचे आवाज करणारे फटाके उडविण्यास बंदी करण्यात आली आहे. प्रत्येक स्टॉलमध्ये ५० किलोग्रॅम फटाके व ४० किलो शोभेच्या फटाक्यांपेक्षा अधिक फटाके असू नयेत, स्टॉलमध्ये सुरक्षित अंतर असावे आदी सूचनाही देण्यात आल्या आहेत. आदेशाचा भंग केल्यास मुंबई पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम ३३ नुसार आठ दिवसांपर्यंत कारावास आणि १२५० रुपये दंडाची शिक्षा होईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

---------------------------------

एका ठिकाणी फटाक्यांचे १०० पेक्षा जास्त स्टॉल्स नसावेत. फटाक्याच्या दुकानांचा आपत्कालीन मार्ग नेहमी खुला असावा. स्टॉल्सच्या ठिकाणी धुम्रपानास मनाई करण्यात आली असून अग्निप्रतिबंधक उपाययोजना असणे अनिवार्य आहे. खराब स्थितीत असलेल्या फटाक्यांसह २५ ग्रॅमपेक्षा अधिक वजनाचे, ३.८ सेंटिमीटरपेक्षा अधिक लांबीचे व ॲटमबॉम्ब नावाने ओळखल्या जाणाऱ्या फटाक्यांची व क्लोरेटचा समावेश असलेल्या फटाक्यांची विक्री करू नये असे आदेशही देण्यात आले आहेत.

फुटफुटी किंवा तडतडी, मल्टीमिक्स, चिलपाल, चिडचिडीया, बटरफ्लाय या नावाने ओळखल्या जाणाऱ्या पिवळ्या फॉस्फरसयुक्त अत्यंत विषारी फटाक्यांची विक्री करू नये. तसेच १८ वर्षाखालील मुलांसोबत प्रौढ व्यक्ती असल्याशिवाय फटाक्यांची विक्री करू नये.

मनाई केलेले आपटबार व उखळी दारु उडविण्यास बंदी आहे. १० हजार फटाक्यांपेक्षा जास्त लांबीची फटाक्यांची माळ असू नये, असेही आदेशित करण्यात आले आहे.

००००००००००००००००००००००००००००००००

मध्य प्रदेशातील संशयित जेरबंद

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

मध्यप्र देशात खून करून फरार झालेला संशयित आरोपी इंदिरानगर भागात असल्याची माहिती मिळाल्यानंतर इंदिरानगरचे पोलिस आणि मध्य प्रदेशातील पोलिसांनी या संशयिताचा शोध घेत त्याला एका बांधकाम साइटवर जेरबंद केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी ही माहिती दिली. मध्य प्रदेशातील उमराळा जिल्ह्यातील यादव नावाच्या व्यक्तीचा खून करण्यात आला होता. हा खून संशयित आरोपी विजय बर्मन (वय २५) याने केला असून, तो घटना घडल्यापासून फरार झाला होता. मध्य प्रदेशातील पोलिसांनी याचा शोध सुरू केल्यावर तो इंदिरानगर भागात असल्याचे समजले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

----------------------------

आज मध्यप्रदेशातील पोलीसांच्या आलेल्या पथकाने इंदिरानगर पोलीसांना याबाबत माहिती दिली. पोलीस निरीक्षक आबा पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप यांचेसह मनोज परदेशी व राजाराम बाळनोथ यां दोन बिट मार्शलने या संशयिताचा तपास सुरु केला. त्यावेळी हा संशयित राजीवनगर येथील झोपडपट्टी व परिसरातील बांधकामांच्या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली. यावेळी सखोल चौकशी केली असता, वाळूच्या ठिय्याजवळील एका बांधकामाच्या साईटवर नवीन युवक आल्याची माहिती पोलीसांना मिळाली, त्यानुसार पोलीसांनी याठिकाणी जावून विजय बर्मन यास ताब्यात घेवून मध्यप्रदेश पोलीसांच्या स्वाधीन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

केरळ पूरग्रस्तांना २८ लाखांचा मदतनिधी

$
0
0

आर. सी. पटेल ट्रस्टच्या वतीने सामाजिक उपक्रम

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्या आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्टच्या वतीने केरळ राज्यातील पूरग्रस्तांसाठी मदतनिधी देण्यात आला. यामध्ये एकत्रित गोळा केलेला १८ लाख, ६२ हजार, ६८५ रुपये आणि संस्थेच्या अनुदानित शाखांमधील कर्मचारी यांच्या एक दिवसाचे वेतन नऊ लाख, ४३ हजार, ९७३ रुपये असा एकूण २८ लाख, सहा हजार, ६५८ रुपयांचा निधी केरळ पूरग्रस्तांसाठी देण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष आमदार अमरिश पटेल, कार्याध्यक्ष भूपेश पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना प्रत्यक्ष भेटून त्या संबंधीचे पत्र दिले. केरळ पूरग्रस्तांसाठी रिलीफ फंड म्हणून शिरपूर एज्युकेशन सोसायटीच्यावतीने खासगी स्वरुपात ५ लाख रुपये तर ‘शिरपूर रिलीफ चॅरिटेबल ट्रस्ट’ने ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. या व्यतिरिक्त आर. सी. पटेल संकुलाच्या विना अनुदानित शाखांमधील कर्मचारी यांच्याकडून ए­क दिवसाचा पगार एकूण आठ लाख, ८५ हजार, ५९३ रुपये केरळ पूरग्रस्तांसाठी देण्यात आले. संस्थेच्यावतीने शिरपूर शहरात मेनरोड, बाजारपेठ, सर्व दुकानदार, व्यापारी, नागरिक यांच्याकडून तसेच शहरातील विविध भागातून, ग्रामीण भागात संस्थेच्या तेथील शाळांनीही रॅली काढून निधी गोळा केला होता. संस्थेतील विद्यार्थी व त्यांचे पालक यांच्याकडून १ लाख, ८४ हजार, २६५ रुपये गोळा करण्यात आले. संस्थेच्यावतीने सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावांच्या नोंदीसाठी काँग्रेसचा मोर्चा

$
0
0

धडगाव तालुक्यातील ७३ गावे सुविधांविना

म. टा. वृत्तसेवा, धुळे

भारताला स्वातंत्र्य मिळवून सात दशकांपेक्षा जास्त काळ उलटल्यानंतरही खान्देशातील आदिवासीबहूल नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात ७३ पेक्षाही जास्त वन गावे महसूल खात्यात रुपांतर झालेली नाहीत. याबाबत आवाज उठविण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सोमवारी धडगाव तहसील कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला.

महाराष्ट्रातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात अजूनही सत्तरपेक्षा जास्त वन गावे महसूल खात्यात रुपांतर झालेली नाहीत. यामुळे या गावातील आदिवासी जनतेला विकासापासून दूर रहावे लागत आहे. ही गावे महसूल विभागात रुपांतर न झाल्यामुळे येथील जनतेला सात-बारा मिळत नसल्याने शासनाच्या कोणत्याही योजनांचा उपभोग या लोकांना घेता येत नाही. यामुळे हा मोर्चा काढण्यात येत आहे अशी माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. या वेळी विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार के. सी. पाडवी, रतन पाडवी, विक्रमसिंग पाडवी, सुनील पाडवी, हारसिंग पाडवी, ललीत जाट, गौतम जैन, नगरसेवक परवेज खान आदींसह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

जनतेच्या अज्ञानाचा फायदा
धडगाव तालुक्यातील वन गावे महसूल खात्यात रुपांतरित व्हावीत आणि येथील जनतेला सात-बारा मिळून त्यांना सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेता यावा, यासाठी धडगावचे स्थानिक आमदार के. सी. पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली हा महामोर्चा काढण्यात आला. यामध्ये मोर्चानंतर धडगाव तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार पाडवी यांनी आरोप करत म्हटले की, महसूल खात्याने या वन गावांचा सर्वे पूर्ण केला आहे, भूमिअभिलेख आकारसह महसूल खात्यात रेकॉर्ड रूमवर उपलब्ध असून, येथील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत महसूल विभागाने वन गावे महसूल खात्यात रूपांतर केले नाहीत. जोपर्यंत महसूल विभाग हा रेकॉर्ड आम्हाला दाखवणार नाही तोपर्यंत आमचे धरणे आंदोलन चालूच राहणार आहे, असा इशारा आमदार के. सी. पाडवी यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांच्या वक्तव्याचा कर्मचाऱ्यांकडून निषेध…

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नागपूर येथे झालेल्या महापौर परिषदेत नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबद्दल नकारात्मक आशयाचा ठराव केल्याबद्दल कृतिशिल निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्थेतर्फे निषेध नोंदवण्यात आला आहे. या निषेधाची प्रत विभागीय आयुक्तांना देण्यात आली असून, ही संस्था आयुक्त तुकाराम मुंढेच्या पाठीशी उभी राहील, असे सांगण्यात आले आहे.

मागील आठवड्यात नागपूर येथे महापौर परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते. यावेळी राज्यातील महापौरांनी ठराव करुन कोणत्याही महापालिकेत तुकाराम मुंढे यांना पाठवू नये, असे निवदेन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, लालफीत आणि लाल दिवा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे जनहित संरक्षणार्थ आणि जनसंवर्धनाचे घटक असून, त्यांच्या दरम्यान परस्पर सहकार्य अपेक्षित आहे. लालदिवा हा कधीही विझू शकतो लालफीत ही शाश्वत आणि घटनादत्त आहे. चिरंतन स्थायी व्यवस्था असून निरपेक्ष भावनेने घटनेस जबाबदार आहे. या दोन्हीमध्ये मालक नोकर असा संबंध नसून, परस्परांमध्ये सहकार्य, समन्वय असणे अपेक्षित आहे. असा प्रकारची महापौरांकडून मागणी करणे जनहिताला व निकोप लोकशाही प्रक्रियेमध्ये मारक व बाधक आहे. यांचे विस्मरण होऊ न देणे हे सर्व संबंधितांचे कर्तव्य आहे. महात्मा फुले, राजर्षी शाहू, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची उज्ज्वल आणि त्यागी परंपरा असलेले महाराष्ट्र राज्य पुरोगामी म्हणून भारतात ख्यातकिर्त असून, अशा अनिष्ट प्रथा या महान परंपरेला साजेशा नसून भुषणावह नाहीत.'

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमीन मोजणीत हवी सुलभता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा नाशिकरोड

भूमी अभिलेख कार्यालयाकडून मिळकतींची मोजणी करण्याच्या कामातील जाचक अटींत शिथिलता आणण्यासंदर्भात नगरसेवक बाजीराव भागवत यांनी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयाचे अधीक्षक महेशकुमार शिंदे यांना सोमवारी निवेदन दिले.

मनपा हद्दीतील गावांतील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींची मोजणी करण्याच्या कामात भूमि अभिलेख व सिटी सर्व्हे कार्यालयाकडून सहकार्य होत नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या पोट हिश्श्याची मोजणी करुन मिळत नाही. पोट हिश्श्याची मोजणी करण्यासाठी संपूर्ण सर्व्हे नंबरची मोजणी फी भरावी लागते. एवढे करुनही भूमी अभिलेख कार्यालयाकडून पोटहिश्श्याचा स्वतंत्र नकाशा शेतकऱ्यांना मिळत नसल्याची बाब यावेळी नगरसेवक बाजीराव भागवत, शिवाजी म्हस्के, गणेश खर्जुल, योगेश भोर आदींनी भूमी अभिलेख कार्यालयाचे जिल्हा अधीक्षक महेशकुमार शिंदे यांच्या निदर्शनास आणुन दिली. मात्र मनपाकडून जमिनीच्या विकासासाठी पोटहिश्श्याचाही नकाशा मागितला जातो. याशिवाय भूमी अभिलेख कार्यालयाकडुन सिटी सर्व्हे लागू झालेल्या क्षेत्रात मोजणीसाठी पालिकेचा ना हरकत दाखला मागितला जातो. परंतु मोजणीसाठी पालिकेकडून चाळी गुंठेखालील क्षेत्राला ना हरकत दाखला देण्यास मनाई केली जाते. परिणामी शेतकऱ्यांना त्यांच्या चाळीस गुंठेपेक्षा कमी क्षेत्राच्या मिळकतींचा विकास करण्यासाठी अडचणी येत असल्याची बाबही यावेळी नगरसेवक बाजीराव भागवत यांनी भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षकांच्या निदर्शनास आणली. या कामी सुलभता आणण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने सिटी सर्व्हे लागू झालेल्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना पोट हिश्श्याची मोजणी करुन द्यावी व तसा नकाशाही देण्यात यावा, अशी लेखी मागणी नगसेवक बाजीराव भागवत, शिवाजी म्हस्के, गणेश खर्जुल, योगेश भोर यांनी भूमी अभिलेख कार्यालयाचे जिल्हा अधीक्षकांकडे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकतेचा दिला संदेश

$
0
0

जिल्ह्यात एकता दौडला उत्फूर्त प्रतिसाद

टीम मटा

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने जिल्हाभरात रन फॉर युनिटीचा नारा देण्यात आला. मालेगाव, सटाणा, निफाडसह संपूर्ण जिल्ह्यात एकदा दौडचे आयोजन करण्यात आले होते.

मालेगाव : रन फॉर युनिटीचा नारा देत बुधवारी शेकडो मालेगावकर एकता दौडमध्ये धावले. लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या वतीने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे यांच्या उपस्थितीत या दौडला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी दराडे यांच्या समवेत अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल, प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार ज्योती देवरे, माजी आमदार मौलाना मुफ्ती, उपायुक्त नितीन कापडणीस, पोजिस उपअधीक्षक अजित हगवणे, रत्नाकर नवले आदी उपस्थित होते. पोलिस परेड मैदानावर दौडसाठी स्टेज उभारण्यात आले होते. पहाटे या दौडमध्ये सहभागी होण्यासाठी मालेगावकारांनी गर्दी केली होती. एकात्मता चौकातून दौडचा प्रारंभ झाला. एकूण ५ कि.मी.चे अंतर निश्चित करण्यात आले होते. एकात्मता चौकापासून सुरू झालेली दौड फुले पुतळा, शिवाजी पुतळा, आंबेडकर पूल, महात्मा फुले रोडमार्गे पुन्हा पोलिस परेड मैदानावर समारोप करण्यात आला. समारोपाप्रसंगी सहभागी नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले.

निफाड : सरदार वल्लभभाई पटेल जंयत्ती निमित्ताने निफाड पोलिस स्टेशन व लासलगाव पोलिस स्टेशनच्या वतीने निफाड येथे एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या दौडला तरुण, तरुणी आणि ज्येष्ठ नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

बुधवारी सकाळी ६.३० वाजता मार्केट कमिटी निफाड येथे सर्व स्पर्धक आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्रित जमले. उगाव त्रिफुली निफाड ते सांगळे कोल्ड स्टोअर तेथून उगाव त्रिफुलीपर्यंत एकता दौड पार पडली. प्रांत महेश पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी माधव पडीले, पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड, नगरसेवक राजाभाऊ शेलार, जावेद शेख, दिलीप कापसे आदींच्या उपस्थितीत दौडला हिरवी झेंडा दाखिवण्यात आला. ४०० पेक्षा अधिक नागरिकांनी या दौडमध्ये सहभाग घेतला.

सटाणा : सटाणा पोलिस स्टेशनच्या पाठक मैदानावर एकता दौडचे आयोजन करण्यात आले. पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही दौड आयोजित करण्यात आली. प्रांताधिकारी प्रवीण महाजन, तहसीलदार प्रमोद हिले, वासुदेव देसले, नगराध्यक्ष सुनील मोरे, प्राचार्य दिलीप धोंडगे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्र राका, किशोर भांगडिया, भास्कर तांबे, आंनदा महाले, किशोर कदम, आगार प्रमुख उमेश बिरारी, डॉ. प्रकाश जगताप, उमेश सोनी, अ‍ॅड. पंडित भदाणे आदींसह शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यात सहभागी घेतला.

पिंपळगाव बसवंत : नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने पिंपळगाव हायस्कूलच्या मैदानावर एकतेची शपथ घेत एकदा दौड घेण्यात आली. पिंपळगाव हायस्कूल निफाड फाटा, भोले ट्रान्सपोर्ट, वणी चौफुली जवळून पुन्हा हायस्कूल मैदानावर या दौड परतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पटेल जयंती

$
0
0

वल्लभभाई पटेल यांना अभिवादन

नाशिकरोड : महावितरणच्या नाशिक परिमंडळ कार्यालयात बुधवारी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती साजरी करण्यात आली. तर दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या स्मृतीनिमित्त राष्ट्रीय संकल्प दिन पाळण्यात आला. कार्यकारी अभियंता धनंजय आहेर यांच्या हस्ते सरदार पटेल आणि इंदिरा गांधी यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मानव संसाधन विभागाचे व्यवस्थापक सुरेश रोकडे, सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने, उपकार्यकारी अभियंता भूषण आचार्य, कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहायक विधी अधिकारी प्रशांत लहाने यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भ्रष्टाचार नष्ट झाल्यास देश विकासाला चालना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

'भ्रष्टाचार भारताच्या विकासात अडथळा आणत आहे. प्रत्येक भारतीयाने भ्रष्टाचाराला विरोध करणे गरजेचे आहे. भ्रष्टाचाराची प्रवृत्ती ही एक भारतीय कार्यप्रणालीला लागलेली कीड आहे. ही कीड नष्ट करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा. भ्रष्टाचाराच्या घटनांविरोधात प्रत्येकाने आवाज उठवावा. तसेच भ्रष्टाचार घडणार नाही, यासाठीही पुढाकार घेतला पाहिजे. भ्रष्टाचाराच्या मुद्दावर सर्वांनी एकत्रित येत चळवळ उभारावी. देशातून भ्रष्टाचार नष्ट झाल्यास देश विकासाला चालना मिळणार आहे,' असे प्रतिपादन एचएलचे चिफ डिझायनर आर. व्ही. हुलिराज यांनी केले.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) मध्ये दक्षता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. २९ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत हा सप्ताह होत आहे. सप्ताहाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी चिफ डिझायनर आर. व्ही. हुलिराज, जनरल मॅनेजर बी. व्ही. सेशागिरीराव आणि ए. बी. घराड उपस्थित होते. यावेळी भ्रष्टाचाराच्या समस्येवर विचारमंथन करण्यात आले. सप्ताहाच्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच भ्रष्टाचाराला आळा घालण्याच्या संदर्भात अधिक जनजागृती व्हावी. यासाठी कोकणगाव व सुकेणे या गावांमध्ये ग्राम सभेचेही एचएलतर्फे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस - १ नोव्हेंबर

$
0
0

वाढदिवस - १ नोव्हेंबर

--

अशोक सावंत..... अध्यक्ष, जी डी सावंत शिक्षण संस्था

खलिल मोमिन.... साहित्यिक

विवेक गोगटे ......उद्योजक

प्रविण खरडे.......वकील

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेची ४५ लाखांची फसवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

फ्लॅट खरेदीसाठी ४५ लाख रुपये घेऊनही त्याची परस्पर दुसऱ्याला विक्री करण्यात आल्याची कैफियत एका महिलेने पोलिसांकडे मांडली आहे. पैसे परत मागण्यासाठी गेले असताना संशयिताने जातीवाचक शिवीगाळ करीत जीवे मारण्याची फिर्याद तिने गंगापूर पोलिस स्टेशनला दिली आहे.

क्रिस्टन जोधनपरी पचाऊ (वय ४८, रा. ईस्ट खासी, मेघालय) यांनी तक्रार दिली आहे. नारायण किशनचंद हेमनानी (रा. महात्मानगर) असे संशयिताचे नाव आहे. ६ मे २०१३ ते २१ डिसेंबर २०१३ या कालावधीत महात्मानगर परिसरात हा प्रकार घडल्याची पचाऊ यांची तक्रार आहे. फ्लॅट खरेदीच्या व्यवहारात हेमनानी याने पचाऊ यांचेकडून वेळोवेळी ४५ लाख रुपये घेतले. परंतु संबंधित फ्लॅट त्यांना न देता त्याची परस्पर दुसऱ्याला विक्री करून पचाऊ यांच्या पैशाचा अपहार केला. त्या पैसे मागण्यासाठी गेल्या असता त्यांना 'तुम जंगली आदिवासी कभी नही सूधरोगे. पैसों के लिये सिलॉंग से नाशिक आ गयी' असे जातीवाचक शब्द वापरून अपमानित केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

हिरावाडीत घरफोडी

हिरावाडीतील बनासरीनगर परिसरात घरफोडी करून चोरट्याने ३० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले. सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला. राणी मारूती नागरे (वय २२, रा. रूद्रा रेसिडेन्सी) यांनी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. चोरट्याने भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून ३० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जबरदस्तीने चेक हिसकावला

हरलेल्या पॉईन्टचे रमीचे १० हजार रुपये दिले नाहीत या कारणावरून हातपाय तोडण्याची धमकी देऊन भारतीय स्टेट बँकेचा चेक वटविण्यासाठी हिसकावल्याचा गुन्हा गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाला आहे. अमोल संपत फुले (वय ३५, रा. त्रिमूर्ती चौक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेरू, रिझवान जब्बार खान (रा. आनंदवली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आनंदवली येथील मनोरंजन क्लब येथे हा प्रकार घडला. अमोल फुले हा क्लबमध्ये पत्ते खेळण्यासाठी गेला होता. यावेळी संशयितांनी संगनमत करून हरलेल्या पॉईन्ट रमीचे दहा हजार रुपये दिले नाहीत या कारणावरून कुरापत काढली. हातपाय तोडू अशी धमकी देऊन त्याच्या खिशातील भारतीय स्टेट बँकेचा चेक जबरदस्तीने काढून घेत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

जुगार अड्ड्यावरून दोघे ताब्यात

सातपूर परिसरातील महादेववाडी येथे जुगार अड्ड्यावरून पोलिसांनी दोघांना अटक केली. त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. सुधीर गोविंदराव शिंदे (वय ५२. रा. पिंपळगाव बहुला), शरद विठ्ठल जाधव (वय ४२, रा. स्वारबाबानगर, सातपूर) अशी अटक करून जामिनावर सोडलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिस कर्मचारी बापु बाळू महाजन यांनी फिर्याद दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मिठाईविक्रेत्यांनो, पळवाटा शोधू नका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीच्या निमित्ताने मिठाई व फरसणाची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे. शीतगृहात ठेवण्यात आलेल्या कच्च्या मालाची नासाडी होणार नाही याची काळजी सर्व उत्पादकांनी घ्यावी. मिठाई व फरसाणमध्ये भेसळ करण्याचा प्रयत्न करू नये. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांतर्गत कायद्यांचे पालन करत पदार्थांची साठवण व विक्री करावी. जे उत्पादक किंवा विक्रेते कायद्याच्या पळवाटा शोधतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील मिठाई उत्पादकांना दिला आहे.

दीपोत्सवात देवी-देवतांच्या पूजाविधीत प्रसादासाठी तसेच आप्तेष्ट आणि नातेवाइकांना भेट देण्यासाठी मिठाईची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. पाच दिवसांवर आलेल्या दिवाळीच्या निमित्ताने शहरातील मिठाईचे विविध प्रकार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. ग्राहकांच्या मागणीचा फायदा घेत फरसाण व मिठाईमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. असे होऊ नये म्हणून नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील मिठाई व फरसाण उत्पादकांची बैठक घेतली. या बैठकीत उत्पादक व विक्रेत्यांची कानउघडणी प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. बैठकीत अन्न सुरक्षा अधिकारी प्रमोद पाटील यांनी अन्न सुरक्षा व कायद्यांची माहिती दिली. अन्न पदार्थांत भेसळ करण्याचा प्रयत्न केल्यास कारवाईचा करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. कच्च्या मालाची साठवणूक किंवा विक्री करताना काळजी घ्या, असा सल्ला यावेळी उत्पादकांना देण्यात आला. अश्वमेध प्रयोगशाळेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपर्णा फरांदे यांनी मिठाईच्या दुकानात भेसळ रोखण्यासंदर्भातले मार्गदर्शन केले. विभागाचे सहआयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी कायद्यातून पळवाटा शोधू नका. ग्राहकाच्या हितासाठी प्रयत्न केल्यास फायद्यात रहाल, असा सल्ला उत्पादकांना दिला. यावेळी विभागाचे सहाय्यक आयुक्त एम. एन. चौधरी, बी. डी. मोरे, अन्नसुरक्षा अधिकारी सर्वश्री सोनवणे यांसह इतर अधिकारी व शहरातील मिठाई उत्पादक व विक्रेते उपस्थित होते.

\Bनाशिकमध्ये भेसळ नाही\B

शहरातील सर्व उत्पादक व विक्रेते अन्न व औषध प्रशासनाच्या कायद्यांचे तंतोतंत पालन करीत आहेत. कायद्यातील तरतुदींनुसारच शहरातील सर्व मिठाई व फरसाण व्यावसायिक पदार्थांची विक्री करत आहेत. अद्याप कोणत्याही दुकानात भेसळ झालेली नाही. प्रत्येक विक्रेता व उत्पादक ग्राहकांना योग्य सेवा पुरवित आहे. त्यामुळे नाशिकमध्ये कोणत्याही मिठाईत भेसळ होणार नाही, असा विश्वास नाशिक जिल्हा मिठाई उत्पादक विक्रेते संघटनेचे अध्यक्ष मनोज कोतकर यांनी बैठकीत व्यक्त केला.

वरवंडीरोडवर कारवाई

सातपूर : काही दिवसांपूर्वी वरवंडीरोड, नांदूर नाका येथे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी एका मिठाईच्या दुकानावर कारवाई केली. संबंधित दुकानात गलिच्छ जागेवर दिवाळीचे

फराळ बनविण्याचे काम सुरू होते. यावेळी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिवाळीच्या फराळाचे पदार्थ जप्त करून त्यांची विल्हेवाट लावल्याचे सांगितले. दीपावलीत व्यावसायिकांनी गलिच्छ जागेत अथवा आरोग्याला हानीकारक ठरतील असे पदार्थ विकू नयेत, असे आवाहन अन्न-औषध प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काँग्रेस आंदोलन जोड

$
0
0

काँग्रेस आंदोलन जोड

या आंदोलनाचे आयोजन जिल्हा अध्यक्ष स्वप्निल पाटील व दिनेश चोथवे यांनी केले. काँग्रेस शहर अध्यक्ष शरद आहेर, गटनेते शाहु महाराज खैरे, प्रदेश प्रवक्ता डॉ. हेमलता पाटील, सुरेश मारू, उद्धव पवार, राजकुमार जेफ, भारत टाकेकर, सचिव कोठावदे आदी यावेळी उपस्थित होते. आंदोलन यशस्वीतेसाठी सचिव मिलिंद चित्ते, जयेश पोकळे, कल्यणी रांगोळे, महासचिव गौरव पानगव्हाणे, धनंजय कोठुळे, यशश्री शिरोडे आदींनी परिश्रम घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळीसाठी एसटीच्या १८० जादा बस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळीनिमित्त ठिकठिकाणी राज्य परिवहन महामंडळाने जिल्ह्यातून १८० जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारपासून या बस २० दिवस धावणार आहेत. या काळातच १० टक्के भाडेवाढही करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी बुधवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली आहे. येत्या २० नोव्हेंबरपर्यंत ही वाढीव भाडेवाढ राहणार आहे.

दिवाळीनिमित्त महाविद्यालये व शाळांना सुटी असल्याने गावी जाणाऱ्यांची एसटीला गर्दी असते. नोकरीनिमित्त बाहेर असलेले कर्मचारी या सणात घरी जातात. त्यातील बहुतांश जण एसटीला प्राथमिकता देतात. त्यामुळे एसटीने ही संधी साधून दरवर्षीप्रमाणे भाडेवाढ केली आहे. पण, ती गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी आहे.

एसटीने जादा बसच्या नियोजनात धुळे, नंदुरबार, पुणे येथे सर्वाधिक बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील नाशिक, सिन्नर, पेठ, कळवण, पिंपळगाव, इगतपुरी, सटाणा, लासलगाव, येवला, मनमाड, नांदगाव या आगारांतून जादा बस सोडण्यात येणार आहेत. नाशिक १ आगारातून धुळे, नंदुरबारसाठी जादा बस असणार आहेत, तर धुळ्यासाठी नाशिक १ आगारातून ५ बसेस तर नंदुरबारसाठी ३ बस सोडण्यात येणार आहेत. नाशिक २ आगारातून धुळ्यासाठी ३ बस सोडण्यात येणार आहेत.

धार्मिक स्थळांसाठी बस

एसटीने दिवाळी देवदर्शनासाठी भाविकांना जाता यावे यासाठी तुळजापूर, कोल्हापूर, माहुरगड, अक्कलकोट येथे जादा बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पुसद, लातूर, बुलढाणा, चोपडा, कल्याण, येथेही या बस धावणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भावी वकील ताठकळले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सोशल मीडियाचा धसका केवळ कायदा अन् सुव्यवस्था यंत्रणाच नव्हे; तर शिक्षण क्षेत्रानेही घेतल्याचा अनुभव बुधवारी लॉ अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने लेबर लॉ विषयाची प्रश्नपत्रिका तब्बल ३५ मिनीटे उशीराने परीक्षा केंद्रांना पाठविली. त्यानंतर केंद्रांच्या हाती मिळालेल्या प्रश्नपत्रिकांच्या छापील प्रती तयार करणे आणि वितरण या प्रक्रियेत केंद्रांचा वेळ जाऊन सुमारे पाऊण तासापेक्षाही अधिक वेळ विद्यार्थ्यांना खोळंबावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील इतर जिल्ह्यांमधील केंद्रांवरही हाच प्रकार घडला आहे.

'लेबर लॉ अँड स्टॅच्युटरी कम्प्लीन्सेन्स' या विषयाचा पेपर बुधवारी सकाळी १० वाजता विद्यापीठाच्या पूर्वनियोजनात होता. ठरलेल्या वेळेच्या अगोदर विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थित झाले. पण परीक्षागृहात बसूनही पुढे हाती प्रश्नपत्रिका पडत नसल्याने अशी प्रतीक्षा किती वेळ वाट्याला येणार या प्रश्नाने विद्यार्थी हवालदिल झाले. अखेर ३५ मिनीटांनंतर प्रश्नपत्रिका केंद्रांना मिळाली. यानंतर केंद्रांना या प्रश्नपत्रिकेच्या छापील प्रती तयार कराव्या लागल्या. झालेल्या उशीरानंतर विद्यार्थ्यांना विद्यापीठ नियमानुसार उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला असला तरीही तयारीनिशी परीक्षाकेंद्रावर गेल्यानंतर हा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला.

\Bविद्यापीठाने घेतला सोशल मीडियाचा धसका

\Bपुणे विद्यापीठाच्या नुकत्याच झालेल्या सिनेट अधिसभेतही सोशल मीडियावरून विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका फुटत असल्याचा मुद्दा गाजला आहे. या धर्तीवर विद्यापीठाने आता आठ सदस्यीय समितीची नेमणूक केली आहे. विद्यापीठाचा आयटी सेल बळकट करण्यासाठी ही समिती कार्यरत राहील, अशी माहिती सिनेट सभेत विद्यापीठ प्रशासनाने जाहीर करून दोन दिवस होत नाहीत तोच लॉ विद्याशाखेतील पेपरच्या या अनुभवामुळे विद्यापीठाने सोशल मीडियाचा धसका घेतल्याची चर्चा नाशिक जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर रंगली होती. हा पेपर सोशल मीडियावरून व्हायरल होऊ नये यासाठी ठराविक वेळेत ती केंद्रांना पाठविण्याची काळजी घेतली जाते. पण या पेपरला ही काळजी अधिक प्रमाणात घेतली गेल्याने विद्यार्थीच काळजीत पडले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारवर्षीय चिमुरडीची स्वाईन फ्लूवर मात

$
0
0

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

\Bस्वाईन फ्लू आजाराशी दिर्घकाळ झुंजत साडेचार वर्षाच्या मुलीला अत्यवस्थ स्थितीतून बाहेर काढण्यात मविप्रच्या डॉ. वसंतराव पवार मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या टीमला यश मिळाले आहे. शासकीय योजनेतून गरजू कुटुंबातील या चिमुरडीस उपचारांसाठी सुविधा उपलब्ध करून देत येथील डॉक्टरांनी तिच्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले अन् अखेर या प्रयत्नांना यश आले.

येवला तालुक्यातील उंदिरवाडी हे छोटेसे गाव. येथील रहिवासी बापूसाहेब क्षीरसागर यांची साडेचार वर्षाची मुलगी श्रेया ही आजारी पडल्याने तिला तालुकास्तरावर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांना सुरुवात झाल्यानंतर तिची प्रकृती गंभीर बनली. यानंतर आणखी उपचारांसाठी तिला नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे दीड दिवसातच तिची प्रकृती खालावली. दुसरीकडे कुटुंबाच्या बेताच्या परिस्थितीमुळे उपचारांना आर्थिक मर्यादाही होत्या. परिणामी हतबल झालेल्या कुटुंबीयांनी अखेरची एक आशा म्हणून या चिमुरडीस मविप्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर बालरोग विभागातील तज्ज्ञांनी येथे तिच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती विचारात घेत रुग्णालयाने श्रेयावर महात्मा फुले आरोग्यदायी योजनेअंतर्गत उपचार सुरू केले. ११ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत कृत्रीम श्वासोच्छवासावर असलेल्या श्रेयाच्या प्रकृतीत नंतरच्या कालावधीत चांगली सुधारणा झाल्याने नातेवाईकांना आनंदाश्रू आवरता आले नाहीत.

श्रेयाच्या कुटुंबीयांनी अधिष्ठाता डॉ. मृणाल पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. आर. डी. दरेकर, वैद्यकिय अधीक्षक डॉ. अजित पाटील, योगेश शिंदे व डॉक्टरांचा सत्कार केला. बालरोग विभागप्रमुख डॉ. रविंद्र सोनवणे, डॉ. नीलेश आहिरे, डॉ. सुहास पाटील, डॉ. सागर सोनवणे, डॉ. प्रशांत भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी डॉक्टर डॉ. दिपक मारकवाड, डॉ. नेहा कुलकर्णी, डॉ. संजिता चढ्ढा, परिचारिका यांच्या संघाचे आभार मानले. डॉक्टरांनी आई प्रतिभा, मामा नारायण सोनवणे, आजोबा पुंडलिक क्षीरसागर, गोरक्ष गायकवाड यांचा सत्कार केला. यावेळी श्रेयाच्या कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भरारी पथकांचा वॉच

$
0
0

'जलसंपदा'ला पोलिस महावितरणचे बळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडी धरणाला पाणी सोडण्यावरून दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतर पाणी सोडण्यासाठी जलसंपदा विभागाने पुन्हा बैठक घेऊन आपली तयारी पूर्ण केली. 'जलसंपदा'ने आठ संयुक्त भरारी पथक तयार केले आहे. यात 'जलसंपदा'चे अधिकारी कर्मचारी, पोलिस व वीज महावितरण कंपनीचे कर्मचारी असणार आहे. हे पथक पाणी सोडल्यानंतर प्रवाहाच्या ठिकठिकाणी पाहणी करणार आहे. प्रत्येक पथकाला हद्द देण्यात आली आहे.

'जलसपंदा'ने याअगोदर केलेले नियोजन फिस्कटले होते. त्यामुळे दोन दिवसाच्या अंतराने हे पाणी आता सोडण्यात येणार आहे. प्रत्येक धरण व केटीवेअर बंधाऱ्यावर अधिकारी व कर्मचारी असणार आहे. तसेच पाण्याच्या प्रवाहाचे निरीक्षण करण्यासाठी कालवा निरीक्षक असणार आहे. त्यामुळे पाणी सोडण्याच्या ठिकाणाहून ते थेट पोहचेपर्यंत त्यावर नजर ठेवली जाणार आहे. 'जलसंपदा'चे ३०० हून अधिक कर्मचारी या प्रक्रियेत असणार आहे. वीज महावितरण कंपनी, पोलिस व इतर अधिकारी त्यांच्या मदतीला असणार आहे. 'जलसंपदा'ने बुधवारी आढावा बैठक घेऊन नियोजन केले. यात सर्व अधिकाऱ्यांना पाणी प्रवाहाच्या मार्गावरील पोलिस स्थानक, वीज महावितरण कंपनीचे अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी यांचे मोबाइल नंबर देण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याला संपर्क करणे त्यामुळे सोपे होणार आहे.

संकलन पथक

धरणातून पाणी सोडल्यानंतर प्रत्येक ठिकाणी हे संकलन पथक पाण्याची पातळी तपासणार आहे. धरणाची पातळी सुध्दा ते तपासली जाणार आहे. या पथकामुळे पाण्याचा प्रवाह लक्षात येणार आहे. पाणी किती वेळेत कोठे पोहचले, याची माहिती यामुळे कळणार आहे. हे पथक ही सर्व माहिती वरिष्ठांपर्यंत देणार असल्यामुळे एकत्रित माहिती गोळा होणार आहे.

औरंगाबादचे पथकही कार्यरत

औरंगाबादचे पथकही नाशिकमध्ये अगोदरच दाखल झाले आहे. हे पथक धरणाची पातळी व प्रवाहाची पातळी सर्व ठिकाणी तपासणार आहे. पाणी बरोबरच सोडले जाते आहे का? यासह ते इतर माहिती गोळा करुन ती औरंगाबादला पाठवणार आहे.

२४ तासात पाणी पोहचणार

२४ तासात पाणी जायकवाडी धरणात पोहचावे असे नियोजन जलसंपदा विभागाने केले असून त्याची तयारी केली आहे. हे पाणी गुरुवारी सकाळी १० वाजता सोडल्यानंतर ते शनिवार पर्यंत जायकवाडीला पोहचेल असे नियोजन आहे.

नदीकाठावर शटडाउन

नदीकाठावर पाण्याची चोरी होऊ नये म्हणून दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे या काठावर असलेल्यांची वीज खंडित केली जाणार आहे. ऐन दिवाळीचे काम सुरु असतांना ही वीज खंडीत होण्याच्या प्रकारामुळे अधिकाऱ्यांना संतापाला सामोरे जावे लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोकाट जनावरांचा प्रश्न सुटणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या जनावरांना पकडून ठेवण्यासाठी नाशिक महापालिकेकडे कोणतीही व्यवस्था नसल्याने मोकाट जनावरांवर कारवाई केली जात नव्हती. आता मात्र मनपाच्या कोंडवाड्यात जनावरांना पकडून आणण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. जनावरे उचलून नेण्याचा खर्च मालकांकडून वसूल केला जाणार असल्याने हा प्रश्न सुटणार आहे.

शहरातील अनेक गोठेमालक दिवसा आपल्याकडील जनावरांना रस्त्यावर सोडून देत होते. त्यामुळे अनेकदा वाहतुकीला अडथळा होऊन अपघातदेखील घडले आहेत. त्याचप्रमाणे रस्त्याच्या मधोमध ही गुरे उभे राहात असल्याने अनेक दुचाकीस्वारांना दुखापती झाल्या होत्या. सारडा सर्कल परिसरात तर हा शहरातील चौक आहे की, गुरांचा गोठा हे समजत नव्हते. अनेकदा लोकांनी गुरांना टाकलेल्या अन्नामुळे दुर्गंधी पसरत होती. या मोकाट जनावरांवर कोणतीही कारवाई होत नसल्याने मालक निर्धास्त होते. मध्यंतरी मोकाट जनावरांना पकडण्यासाठी खासगी कॉन्ट्रॅक्टरकडून मोहीम सुरू करण्यात आली होती. मात्र, काही प्राणीप्रेमींनी यावर आक्षेप घेतल्याने ती थंडावली होती. आता या कारवाईला बळ मिळणार आहे. मोकाट गुरांना पकडण्यासाठी नाशिक महापालिकेने विशेष मोहीम सुरू केली असून, त्याबाबतची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. रस्त्यात फिरणारी मोकाट जनावरे पकडून कोंडवाड्यात टाकणे, त्यांची नियमानुसार खाण्याची व्यवस्था करणे इत्यादी कामांसाठी खासगी तत्त्वावर निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जनावरे पकडल्यानंतर दंडात्मक कारवाईबरोबरच जनावरे उचलून नेण्याचा व त्यांच्या खाण्याचा खर्च जनावरांच्या मालकांना करावा लागणार आहे. त्यामुळे मोकाट गुरे बाहेर फिरण्यास आळा बसणार आहे. ही रक्कम मोठी असल्याने मालकांना चांगला भुर्दंड बसणार आहे. नुकतीच कोऱ्या निविदांची विक्री करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांडपाणी प्रकल्पाचा मार्ग मोकळा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पिंपळगाव खांब येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाच्या (एसटीपी) कामातील अडथळे दूर झाले असून, त्याच्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक महापालिकेच्या इलेक्ट्रीकल आणि तांत्रिक विभागाने या कामाची निविदा प्रसिद्ध केली आहे. लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे.

पिंपळगाव खांब येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नेहमी चर्चेत राहिला आहे. या प्रकल्पामध्ये पिंपळगाव खांब येथील १५ बाधित शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत. या जमिनी घेताना महापालिकेने जमीन हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया व्यवस्थित राबवली नव्हती, म्हणून ती प्रक्रिया पुन्हा नव्याने राबवावी असे आदेश कोर्टाने दिले होते. त्यानुसार नाशिक महापालिकेने पुन्हा कार्यवाही केली असून, हा प्रकल्प उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

गोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी गंगापूर शिवारातील मौजे पिंपळगाव खांब येथे मनपा एसटीपी (मलजल शुद्धीकरण) प्रकल्प उभारत आहे. त्यासाठी २०१४ मध्ये पिंपळगाव खांब येथील खासगी क्षेत्र संपादीत करण्याची प्रक्रिया पहिल्यांदा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आली. यामध्ये १७ शेतकऱ्यांच्या पाच हेक्टर जागेचे संपादन करण्यात येत होते. मात्र, १५ बाधित शेतकऱ्यांनी त्यावेळी उच्च न्यायालयात धाव घेतली. तसेच भूसंपादन कायदा २०१३ ची प्रशासनाने पूर्तता न केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे हा प्रकल्प रखडला होता.

गोदावरी नदीत नेहमी मलजल सोडले जात असल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञांकडून केला जातो. गोदावरीच्या शुद्धतेबाबत न्यायालयानेही नाशिक महानगरपालिकेला चपराक लगावली होती व यावर उपाययोजना कराव्यात असे आदेश दिले होते. शहरातील मलजल प्रकल्प कार्यान्वित करावेत, असेही त्या आदेशात सांगितले होते. त्याचप्रमाणे मलजल शुद्ध करून त्याची विल्हेवाट लावावी, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images