Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

थोडक्यात -

$
0
0

\Bवधू वर मेळावा\B

नाशिक : चर्मकार समाजाचा वधू वर परिचय मेळावा झाला. मेळाव्यात महाराष्ट्रासह गुजरातमधील समाज बांधव सहभागी झाले. मेळाव्यातून एकोणीस जोडप्यांची रेशीमगाठ जुळणार आहे. तीनशेहून अधिक वधू वर व सहाशे समाज बांधवांची मेळाव्यास उपस्थिती होती. मेळाव्याचे आयोजन राजेंद्र अहिरे, दौलत समशेर यांनी केले. दीपक अहिरे, बापू ठाकरे, माधुरी आहिरे, योगीता चव्हाण यांचे सहकार्य मेळाव्यासाठी लाभले.

--

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कबड्डीपटूंपुढे येत्या काळात मोठे आव्हान

$
0
0

रामराजे निंबाळकर यांचे भकीत; सिन्नरला कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

म. टा. वृत्तसेवा सिन्नर

कबड्डीचे सामने भरविणे आणि यशस्वी करणे यावरच संयोजकांना थांबून चालणार नाही. कारण जगभरातील खेळाडू आता या खेळाचे कौशल्य आत्मसात करू पाहत आहेत. यावरून कबड्डी व्यावसायिक खेळ होत आहे. त्यामुळे येत्या काळात आपल्याकडील खेळाडूंना हे एक मोठे आव्हान पेलावे लागणार असल्याचे, प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.

राज्यस्तरीय कबड्डीचे क्रीडा महोत्सव बुधवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी नाईक-निंबाळकर बोलत होते. उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभी खेळाडूंचे पथसंचलन, शपथविधी व मशाल प्रज्वलील करण्यात आली.

निंबाळकर म्हणाले, मैदानी आणि मातीतला तसेच ग्रामीण भागातला खेळ म्हणून ओळख असलेला कबड्डी खेळाची लय आता बदलत चालली आहे. शहरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कबड्डी रंगते. म्हणूनच खेळाडूंनी आता कबड्डीकडे करिअर म्हणून पहायला हरकत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्य देश या खेळात प्रावीण्य मिळवित आहेत. त्यामुळे भारताला या खेळावरील पकड पुन्हा मजबूत करावी लागणार आहे. तशी क्षमता ग्रामीण खेळाडंमध्ये असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सिन्नर दुष्काळी तालुका असला तरी संकटावर मात करण्याचा काटकपणा याच मातीतून आमच्यात आला असल्याचे नमूद करीत आमदार राजाभाऊ वाजे यांनी याच मातीतून उद्याचे राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू तयार होणार असल्याचे निक्षून सांगितले. जिल्हा परिषदेच्या विविध विकासकामांच्या बरोबरच खेळाला वेगळी उंची निर्माण करुन देण्याचा या स्पर्धेच्या निमित्ताने प्रयत्न असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी व्यक्त केले.

परदेशी खेळाडूंनी आपले कौशल्य आत्मसात केल्याने स्पर्धेत टिकण्यासाठी आपल्याला अधिक कसून तयारी करावी लागणार असल्याचे माजी आमदार किशोर पाटील म्हणाले. उदय सांगळे यांनी ग्रामीण कबड्डी खेळाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वैशिष्ट्यपूर्ण वलय प्राप्त होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कबड्डीला पाठबळ देण्यासाठी राज्यस्तरीय सामने यंदा नाशिक जिल्ह्यात आणि त्यातल्या त्यात सिन्नरला आयोजित केले असल्याचे सांगितले.

खासदार हेमंत गोडसे, विजय करंजकर, जयंत जाधव यांचीही भाषणे झाली.

तत्पूर्वी राज्यभरातून आलेल्या २५ जिल्ह्यांतील कबड्डी संघांनी मैदानावर प्रशिक्षकांसमवेत संचलन केले. नाशिक जिल्ह्यातून हजारो प्रेक्षक सामने पाहण्यासाठी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चारचाकी गाडीत आढळली हत्यारे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

आरडाओरड करीत बेशिस्तीने चारचाकी वाहन चालवून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करतेवेळी दोघा संशयितांनी पोलिस ठाण्यात येण्यास नकार दिल्यावर पोलिसांनी चारचाकीची झडती घेतली असता काही हत्यारे आढळून आल्याने पोलिसांनी या दोघा संशयितांविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. करण रमेश घुगे (वय २८) आणि विष्णू सहादू घुगे (वय ३८, दोघे रा. कोटमगाव, ता. जि. नाशिक) अशी या दोघा संशयितांची नावे आहेत.

नाशिकरोड पोलिस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पथक मंगळवारी रात्री नाशिक-पुणे महामार्गावरील चेहेडी जकात नाका भागात पेट्रोलिंग करीत असतांना नाशिकरोडकडून सिन्नरच्या दिशेने एमएच १५ सीटी ७५६० या क्रमांकाची कार भरधाव वेगाने जात होती. या गाडीतून मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येत होता. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी या चारचाकीचा पाठलाग केला. पुढे ही कार पळसे येथील एका पेट्रोलपंपावर थांबली. पोलिसांनी या कारमधील करण घुगे व विष्णु घुगे या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. आमचे कुणीच काही करू शकत नाही अशा शब्दांत पोलिसांनाच प्रतिआव्हान दिले. यावेळी पोलिसांनी या दोघांना नाशिकरोड पोलिस ठाण्यास येण्याचे सांगताच या दोघांनी नकार दिला. त्यावर पोलिसांनी त्यांच्या कारची झडती घेतली. गाडीत लाकडी व लोखंडी दांडा आणि एक लोखंडी फायटर अशी हत्यारे पोलिसांना आढळून आली. यानंतर पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देऊन आणखी कुमक मागवून घेत या दोघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्या विरोधात शहर पोलिस आयुक्तांच्या आदेशांचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेची आत्महत्या; सासरच्या अंगणात रचली चिता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

तालुक्यातील कळमदरे येथील विवाहितेने मंगळवारी घराच्या छताला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. विवाहितेच्या माहेरच्या नातेवाइकांनी मात्र सासरच्या मंडळींविरोधात घातपाताचा संशय व्यक्त करीत बुधवारी तिच्या सासरी घरासमोर अंत्यसंकार केल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला. दरम्यान सासरची सर्व कुटुंब फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

शकुंतला केदू गांगुर्डे (वय २७) असे त्या विवाहितेचे नाव आहे. कळमदरे येथील बारभाही मळ्यात राहतील रहिवासी केदू काशिनाथ गांगुर्डे यांची ती पत्नी होती. तिच्या पश्चात सहा वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी आहे. शकुंतला हिने मंगळवार (दि. ३०) रोजी दुपारी राहत्या घराच्या छताला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. कळमदरे येथील महादू, काशिनाथ, जयराम व राजाराम गांगुर्डे या चार भावाचे एकत्रित कुटुंब असून, त्यात लहान मोठे असे एकूण ३५ ते ४० सदस्य आहेत. काशिनाथ याचा मोठा मुलगा केदू याच्याशी वडनेरभैरव येथील वक्ते परिवारातील शंकुतला हिचा एप्रिल २०१२ मध्ये विवाह झाला होता. दरम्यान, आत्महत्या संदर्भात मयत महिलेच्या नातेवाइकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्याने महिलेचा बुधवारी रोजी नाशिक येथे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी कळमदरे येथे सासरच्या घरासमोर चिता रचून अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मयत महिलेचा सहा वर्षाचा मुलगा ओमने अग्नीडाग दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘होवेत्झर अन् वज्र’ने लष्कर होणार सशक्त

$
0
0

\Bआर्टिलरी सेंटरमध्ये भाऊबीजेला संरक्षणमंत्री करणार सुपूर्द \B

..

bhavesh.brahmankar@timesgroup.com

@BhaveshBMT

..

नाशिक : संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन भाऊबीजेला देवळाली आर्टिलरी सेंटरमध्ये येणार आहेत. यावेळी त्या अत्याधुनिक दोन तोफा भारतीय लष्कराच्या हवाली करणार आहेत. तब्बल तीस वर्षांनी आधुनिक पिढीच्या तोफा लष्कराला मिळणार असून, त्याद्वारे चीन सीमा अधिक सशक्त होणार आहे.

देवळाली कॅम्प येथील आर्टिलरी सेंटरमध्ये लष्करी जवानांना तोफांचे प्रशिक्षण दिले जाते. आशिया खंडातील हे सर्वात मोठे तोफखाना केंद्र आहे. याठिकाणी रणगाडे/तोफखाना यांचे संग्रहालयही आहे. हे केंद्र १९४७ मध्ये पाकिस्तानातून नाशिकमध्ये स्थलांतरीत केल्याची नोंद आहे. देवळालीच्या आर्टिलरी सेंटरमध्ये संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या येत्या ९ नोव्हेंबर रोजी येत आहेत. अमेरिकेबरोबर करार झाल्यानंतर तयार करण्यात आलेली होवेत्झर ही तोफ आणि दक्षिण कोरियाबरोबर कराराद्वारे विकसित करण्यात आलेली वज्र ही तोफ या दोन्ही तोफा भारतीय लष्कराकडे संरक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीत सुपूर्द केल्या जाणार आहेत. सन १९८० मध्ये भारतीय लष्करात बेफोर्स तोफा दाखल झाल्या होत्या. त्यानंतर आता या दोन आधुनिक तोफा लष्कराला मिळणार आहेत.

...

जवानांमध्ये उत्साह

संरक्षणमंत्री सितारामन या भाऊबीजेच्या दिवशीच आर्टिलरी सेंटरमध्ये येणार असल्याने सेंटरमधील अधिकारी व जवानांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. भाऊबीज ही महाराष्ट्रातच साजरी केली जाते. याच दिवशी बहिण भावाला ओवाळते. संरक्षणमंत्री याच दिवशी जवानांना भेटणार आहेत.

...

चीन सीमेवर फायदा

अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीनच्या सीमेवर सुरक्षा प्रभावी करण्यासाठी या दोन्ही तोफा फायदेशीर ठरणार आहेत. पर्वतावर किंवा पर्वताच्या खाली अशा दोन्ही प्रकारे लक्ष्य भेदण्याची क्षमता या तोफांमध्ये आहे. सद्यस्थितीत लष्कराकडे बोफोर्स हीच अलिकडची तोफ आहे. या दोन्ही तोफांच्या माध्यमातून लष्कराची ताकद वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चौथ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

चौथ्या मजल्याच्या गॅलरीतून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना सकाळी जयभवानीरोड येथे घडली. उपनगर पोलिस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.

ज्योत्सना नितीन महाजन (३३) असे तिचे नाव आहे. महाजन या बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास गॅलरीत साफसफाईचे काम करत होत्या. अचानक त्यांचा तोल जाऊन त्या खाली पडल्या. उंचावरून पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. कुटुंबीयांनी त्यांना बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. सिस्टर गायकवाड यांनी उपनगर पोलिसांना याची माहिती दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मराठवाड्याचे ‘सिंचन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नगर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची विशेष याचिका सुप्रीम कोर्टाने बुधवारी फेटाळल्याने मराठवाड्यातील जायकवाडी धरणात गंगापूर आणि दारणा धरणामधून पाणी सोडणे अनिवार्य ठरले आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता पाणी सोडा, असे आदेश जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला दिले असून पाटबंधारेसह पोलिस आणि महावितरण यंत्रणा त्यासाठी सज्ज झाली आहे. पाणी सोडण्याच्या मुद्दयावरून कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

मराठवाड्यातील पैठण येथील जायकवाडी धरणात पाण्याची तूट असल्याने समन्यायी पाणी वाटपाच्या तत्वानुसार नाशिक आणि नगर जिल्ह्यातील काही धरण समूहांमधून एकूण ८.९९ टीएमसी पाणी सोडा, असे आदेश गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने २३ सप्टेंबर रोजी दिले होते. नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, पालखेड आणि दारणा समूहातून ३.२४ टीएमसी पाणी सोडा, असे महामंडळाच्या आदेशात म्हटले होते. मात्र, या धरणांच्या पाण्यावर अवलंबून असलेला जिल्ह्याचा बहुतांश भाग दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करीत असल्याने पाणी सोडण्यास तीव्र विरोध दर्शविण्यात आला. महामंडळाच्या या आदेशाला विखे पाटील कारखान्याने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. परंतु न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याचे गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने बुधवारी दुपारी जिल्हा प्रशासनाला कळविले. त्यामुळे गुरुवारी (दि.१ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता पाणी सोडण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. पाणी सोडण्याच्या अनुषंगाने सोमवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी समन्वयाच्या बैठकीत दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करा, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी पाटबंधारे, पोलिस आणि महावितरण विभागाला दिले आहेत. त्यामुळे सकाळी १० वाजता गंगापूर आणि दारणा धरणातून एकाचवेळी पाणी सोडण्यात येणार आहे. ४८ ते ६० तासांमध्ये हे पाणी जायकवाडी धरणाच्या प्रवरासंगमजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. वहन मार्गात पाणीउपसा होऊ नये, यासाठी महावितरणकडून खबरदारी घेण्यात येत आहे. गोदावरी, दारणा नदीपात्राच्या दोन्ही बाजूचा वीजपुरवठा सकाळी खंडित केला जाणार आहे.

टप्प्या-टप्प्याने वेग वाढविणार

गंगापूर धरणातून ६०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्याचे महामंडळाचे आदेश आहेत. गुरुवारी सकाळी १० वाजता २५०० क्युसेक्सने पाणीविसर्ग सुरू करण्यात येणार आहे. टप्प्या-टप्प्याने तो वाढविला जाणार आहे. २५०० ते ३५०० क्युसेकने पाणीविसर्गाचे नियोजन करण्यात आले आहे. दारणा आणि मुकणे धरणातून २.४० टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. सकाळी आठ हजार क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात होईल. टप्प्या-टप्प्याने हा वेग वाढविण्यात येणार असून १५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

पोलिसांची कुमक सज्ज

जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडू नये याकरीता विविध स्तरावर आंदोलने झाली आहेत. महामंडळाच्या आदेशाची अंमलबजावणी होतेवेळी देखील पाणी सोडण्यास विरोध केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरीता ग्रामीण पोलिसही सज्ज झाले आहेत. गंगापूरसह अन्य धरणांवर बुधवारी सायंकाळी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. राज्य राखीव पोलिस दल, दंगल काबू नियंत्रण पथकाची बंदोबस्तासाठी मदत घेण्यात आली आहे. पाण्याच्या वहन मार्गावर ठिकठिकाणी हा बंदोबस्त असणार आहे.

नदीकाठच्या रहिवाशांना इशारा

दारणा धरणातून ११ हजार क्युसेकने, गंगापूर धरणातून ३५०० क्युसेकने तर मुकणे धरणातून १००० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्याची तयारी पाटबंधारे विभागाने केली आहे. त्यामुळे दारणा आणि गोदावरी नदीतून पाण्याचा मोठा प्रवाह वाहणार असल्याने नदीकाठच्या रहिवाशांनी कोणतेही आंदोलन करून पाण्याच्या विसर्गास अडथळा आणू नये, असे आवाहन नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे यांनी केले आहे. कुणीही नदीपात्रात उतरू नये, नदीपात्रातील वीजपंप सुरक्षित ठिकाणी ठेवावेत असे आवाहन करण्यात आले आहे. कुठल्याही प्रकारची मालमत्तेची अथवा जीवितहानी झाली तर जलसंपदा विभाग त्यास जबाबदार राहणार नाही असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

महामंडळाच्या आदेशानंतर जिल्ह्यात लोकशाही मार्गाने आंदोलने झाली आहेत. त्यामुळे आंदोलकांवर कारवाई करण्याची आवश्यकता भासली नाही. परंतु, पाणी सोडतेवेळी अनुचित प्रकार घडण्याची किंवा कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा निर्माण केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कडेकाट पोलिस बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.

- संजय दराडे, पोलिस अधीक्षक

गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने दिलेल्या आदेशाचे पालन करणे आणि सुरक्षितरित्या पाणी जायकवाडीमध्ये पोहोचविणे ही जिल्हा प्रशासनाची जबाबदारी आहे. गुरुवारी सकाळी १० वाजता गंगापूर आणि दारणा या धरणसमूहांमधून पाणी सोडण्याबाबतच्या सूचना पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत. पाणी सुरक्षितरित्या जायकवाडीत पोहोचावे याकरीता पोलिस, महावितरण, पाटबंधारे विभागाने काय खबरदारी घ्यावी याबाबतच्या सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे गुरूवारपासून महामंडळाच्या आदेशाची अंमलबजावणी होईल.

- रामदास खेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

काश्यपी धरणग्रस्तांचा आज आंदोलनाचा इशारा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गंगापूर धरणातून जायकवाडीत पाणी सोडण्यास विरोध होत असतानाच या संघर्षात आता काश्यपी धरणग्रस्तांनी उडी घेतली आहे. शहरासाठी काश्यपीमधून गंगापूर धरणात पाणी सोडल्यास काश्यपी धरण परिसरात ठिय्या मांडू, असा इशारा आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटनेने बुधवारी जिल्हा प्रशासनाला दिला आहे.

काश्यपी धरणासाठी लगतच्या देवरगाव, धोंडेगाव, गाळोशी, खाड्याची वाडी या गावातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. परंतु, यापैकी अनेक धरणग्रस्तांच्या वारसांना महापालिकेत अजूनही नोकरी देण्यात आलेली नाही. ३६ धरणग्रस्त कुटुंब नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या २५ वर्षांपासून याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. मागण्या मान्य होण्यासाठी धरणात उड्या मारूनही सरकारचे लक्ष वेधण्यात आले. परंतु, त्याचीही गांभीर्याने दखल घेण्यात आलेली नाही. काश्यपी धरणाच्या पाण्याची नाशिकला आवश्यकता नाही असे महापालिकेने म्हटल्याने धरणग्रस्तांच्या जखमेवर मीठच चोळले गेले होते. यातच जायकवाडी धरणासाठी गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्याने बुधवारी दुपारी धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.

जायकवाडीसाठी गंगापूर धरणातून पाणी दिल्यास निश्चितच या धरणातील पाणीसाठा वाढविण्यासाठी काश्यपी धरणातून पाणी उचलण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जाईल. परंतु, काश्यपीग्रस्तांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत काश्यपीतून गंगापूर धरणात पाणी सोडण्यास धरणग्रस्तांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. तरीही प्रशासनाने पाणी सोडण्याचा प्रयत्न केला तर धरणालगतचे तीन हजार ग्रामस्थ काश्यपी धरणावर ठिय्या आंदोलन करतील असा इशारा संघटनेचे प्रवीण कडाळे, दिलीप गांगुर्डे, देविदास वाटाणे, भागिरथ फसाळे, सोमनाथ मोंढे, किरण गायकवाड आदींनी जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फार्मा कंपनीच्या बसवर दगडफेक

$
0
0

सिटू संघटनेवर संशय

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केटा फार्मा कंपनीच्या व्यवस्थापनाच्या बसवर दगडफेक झाल्याने कंपनी मालक श्रीकांत करवा यांनी सातपूरमधील निमा हाऊस येथे पत्रकार परिषद घेऊन सिटू कामगार संघटनेवर संशय व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी व्यवस्थापन व युनियनमध्ये वेतनवाढीच्या प्रस्तावावर २०१५ पासून चर्चा झाल्याचेही सांगितले.

निमा हाऊसमध्ये कार्यकारणीची बैठक सुरू असताना कारवा आले. त्यांनी कंपनीविरुद्ध घडलेला प्रकार सांगितला. कंपनीची वार्षिक उलाढाल १ कोटी ६० लाखाची आहे. वेतनासाठी ३० लाख रुपये खर्च होतात. ही टक्केवारी सरासरी ३० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कंपनीला वाढीव वेतन देणे शक्य नाही. २०१५ पासून युनियन व व्यवस्थापनामध्ये वेतनवाढीच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. पण, सिटू युनियनने नोटीस देऊन कामबंद केले. पण, आम्ही काम सुरू ठेवले. त्यामुळे ही दगडफेक केल्याचा आम्हाला संशय आहे. आमच्याकडे सर्व अकुशल कामगार आहे. त्याप्रमाणे आम्ही वेतन देत असल्याचे कारवा यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेच्या वेळी 'निमा'चे पदाधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमधून अॅन्टेना होणार हद्दपार

$
0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, जेलरोड

नाशिकसह परिसरातील दूरदर्शन प्रेक्षकांची प्रक्षेपण सेवा १८ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून बंद करण्यात येणार आहे. दूरदर्शनच्या कारभार पाहणाऱ्या प्रसार भारतीने नाशिक दूरदर्शनला तसे पत्र पाठवले आहे. दूरदर्शन प्रक्षेपणासाठी जुने अॅन्टेना वापरणाऱ्या प्रक्षकांना दूरदर्शनचे राष्ट्रीय आणि प्रादेशिक कार्यक्रम पाहता येणार नाही. मात्र, आधुनिक डिश लावून डीटीएच पद्धतीने ते प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकतील.

खासगी वृत्त आणि मनोरंजन चॅनेल्सच्या दर्जेदार कार्यक्रमांमुळे शहरी प्रेक्षक दूरदर्शनपासून दूर गेला असला तरी आजही ग्रामीण भागात दूरदर्शनचे प्रेक्षक मोठ्या प्रमाणात आहेत. दूरदर्शन सेवा निःशुल्क आहे. मुंबईच्या सह्याद्री आणि दिल्ली राष्ट्रीय दूरदर्शन केंद्रातर्फे कृषी, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी कार्यक्रम प्रसारित केले जातात. ग्रामीण प्रेक्षक ते आवडीने पाहतात. नाशिक दूरदर्शन लघु शक्ती केंद्राची चॅनेल नंबर नऊची (२०३.२५ मेगाहर्टझ) राष्ट्रीय आणि प्रादेशिक सेवा बंद १८ नोव्हेंबरपासून केली जाईल, असे प्रसार भारतीने नाशिक दूरदर्शन केंद्राल पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. त्यामुळे या कार्यक्रमांना प्रेक्षक मुकतील. नाशिकच्या सूत्रांनीही याला दुजोरा दिला आहे.

नाशिकचा कारभार

दूरदर्शनचे नाशिक केंद्र १९८४ साली सुरू झाले. नाशिकशिवाय रायगड जिल्ह्यातील कर्जत, बदलापूर, खोपोली, नगर जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डी, गुजरातमधील उमरगाव, केंद्रशासित सिल्वासा, पुण्यातील जुन्नर येथील एकूण दहा केंद्र नाशिकच्या नियंत्रणाखाली काम करतात. सर्व मिळून ३२ कर्मचारी-अधिकारी आहेत. नाशिक आकाशवाणीच्या आवारात असलेल्या दूरदर्शन केंद्रात प्रशासकीय आणि प्रक्षेपण असे दोन विभाग आहेत. हे केंद्र विभागातील केंद्रांना तांत्रिक सहाय्य, स्पेअरपार्ट पुरवते. येथे दोन ट्रान्समीटर्स आहेत. एकातर्फे बातम्या तर दुसऱ्यातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम प्रक्षेपित केले जाते. सांस्कृतिक, शैक्षणिक आदी कार्यक्रम प्रसारित करणारा ट्रान्समीटर १८ नोव्हेंबरपासून बंद होणार आहे.

टप्प्याटप्प्याने केंद्रे बंद

नाशिक केंद्रातील सांस्कृतिक, शैक्षणिकचा ट्रान्समीटर बंद होणार असला तरी पूर्णवेळ बातम्या देणारा दिल्ली दूरदर्शनचा ट्रान्समीटर सुरुच राहणार आहे. नाशिकचा ट्रान्समीटर बंद करण्याआधी प्रसार भारतीने जुन्नर, कर्जत ही केंद्रे गेल्या ३१ जानेवारीला बंद केली तर गेल्या २६ मार्चला सिल्वासा, उमरगा केंद्र बंद केले. नाशिक विभागांतर्गत आता नाशिक, संगमनेर, खोपोली, शिर्डी, बदलापूर केंद्र सुरू आहे.

प्रेक्षकांनी हे करावे

ट्रान्समीटर बंद झाल्यानंतर १८ नोव्हेंबरपासून नाशिक दूरदर्शन केंद्राच्या तीस किलोमीटर परिसरातील अॅन्टेनाधारक प्रेक्षकांना फटका बसणार आहे. प्रामुख्याने शिंदे-पळसे, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, निफाड, दिंडोरी येथील दूरदर्शनचे अनेक प्रेक्षक आजही जुना अॅन्टेना वापरतात. त्यामुळे दूरदर्शनच्या चॅनल नंबर नऊपासून ते वंचित राहतील. दूरदर्शनची सेवा सुरू राहण्यासाठी सेट टॉप बॉक्स, डिश अॅन्टेना आणि इतर साहित्य स्थानिक इलेक्ट्रॉनिक्स दुकानामध्ये उपलब्ध आहे. जुना अॅन्टेना बदलून हे साहित्य लावल्यानंतर नाशिक दूरदर्शनच्या प्रेक्षकांना भविष्यात कायम विनामूल्य सेवांचा लाभ घेता येईल. प्रेक्षकांनी अधिक माहितीसाठी नाशिक दूरदर्शन केंद्राशी (वेबसाईट www.ddindia.gov.in) संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोड्यांनी वाढविली धास्ती

$
0
0

नाशिक शहरातील उच्चभ्रू रहिवाशांचे माहेरघर असलेल्या गंगापूररोड भागातील रहिवाशांत वाढत्या घरफोड्यांनी धास्ती निर्माण झाली आहे. पोलिसांनी पेट्रोलिंग वाढविल्यास घरफोडीच्या घटनांना आळा बसू शकेल. स्थानिकांनी संशयास्पद व्यक्तींची माहिती पोलिसांना वेळीच कळविल्यास चोरट्यांवर वचक बसू शकेल, असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

--

पोलिसांनी वाढवावे पेट्रोलिंग

उच्चभ्रू लोकवस्ती असलेल्या गंगापूररोड भागात घरफोड्या वाढल्याने रहिवासी धास्तावले आहेत. याबाबत पोलिसांनी लक्ष घालून पेट्रोलिंग वाढविले पाहिजे. नागरिकांनीदेखील संशयास्पद व्यक्तींची माहिती पोलिसांना देण्याची गरज आहे. त्यामुळे असे प्रकार थांबू शकतील.

-रमेश बाहेरे

--

'त्यांची' केली जावी चौकशी

शहरात गेल्या काही वर्षांत चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. रोजच होणाऱ्या घटनांमध्ये स्थानिक पोलिस स्टेशनला चोरीचे गुन्हे दाखल केले जातात. किरकोळ गुन्हे होत असले, तरी चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळत नाहीत. पोलिसांनी गुन्हे दाखल असणाऱ्यांची चौकशी केली पाहिजे.

-रघुनाथ चैना

--

स्थानिकांनीही दाखवावी सतर्कता

गंगापूररोडच्या वाढलेल्या लोकवस्तीत पोलिसांची संख्या अल्प आहे. त्यामुळे रहिवासी भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. वाढते गुन्हे रोखण्यासाठी भुरट्या चोरांवरही पोलिसांनी नजर ठेवली पाहिजे. स्थानिकांनीही पुरेशी सतर्कता दाखविली पाहिजे.

-दीपक जगताप

--

ठोस उपाययोजनांची गरज

अलीकडच्या काही वर्षांत झपाट्याने विकसित झालेल्या गंगापूररोड भागात घरकुल खरेदी करण्यासाठी अनेकांची पसंती दिसते. मात्र, चोरट्यांनीही या भागाकडे वक्रदृष्टी वळविली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत ठोस उपाययोजनांची गरज आहे.

-राजू रोकडे

--

पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष नको

पोलिसांकडून अनेकदा भुरटे चोर अथवा संशयित व्यक्तींची माहिती द्यावी, असे आवाहन केले जाते. परंतु, नागरिक पोलिसांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करीत असल्याने चोऱ्या होतात. संशयित व्यक्तींची माहिती पोलिसांनी दिली गेल्यास अशा चोरीच्या प्रकारांना नक्कीचा आळा बसू शकेल.

-बंडू आहेर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरीच्या व्यथेवर रविवारी संवाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संस्कारभारती संस्थेतर्फे यंदा संपूर्ण देशभर नदी या विषयावर ९३५ कार्यक्रम होणार आहेत. नाशिकमध्ये २८, २९, ३० डिसेंबर २०१८ रोजी 'गोदा स्पंदन' या कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी केंद्राच्या एजीएनसीएचे अधिकारी अभय मिश्रा बैठकीसाठी रविवारी येणार असून, गोदावरीची स्थिती जाणून घेण्यासाठी रविवारी, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता रामकुंड परिसराला भेट देऊन गोदावरीशी संबंधित काम करणाऱ्या व्यक्तींशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती संस्कारभारतीतर्फे देण्यात आली आहे.

डिसेंबरमध्ये होणाऱ्या गोदा स्पंदन कार्यक्रमात सेमिनार, संगीत, पथनाट्य, नृत्य, रांगोळी, स्मरणिका (साहित्य), चित्रकला, कवी संमेलन, फोटोग्राफी अशा विषयांवर विविध कार्यक्रम शंकराचार्य संकुल व गोदावरी नदीकाठी होणार आहेत. या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी दिल्लीहून केंद्राच्या एजीएनसीएचे अधिकारी अभय मिश्रा येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहिता आत्महत्याप्रकरणीपरस्पराविरोधात गुन्हा दाखल

$
0
0

विवाहिता आत्महत्याप्रकरणी

परस्पराविरोधात गुन्हा दाखल

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

तालुक्यातील कळमदरे येथील विवाहितेच्या आत्महत्याप्रकरणी गुरुवारी तिचे वडील त्र्यंबक बाबुराव वक्ते (वय ५९ रा. वडनेरभैरव) यांनी चांदवड पोलिसात सासरच्या आठ जणाविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला. तर मयत शकुंतलाचे चुलत सासरे जयराम गांगुर्डे यांनी तिच्या माहेरच्या ५ जणांविरुद्ध घरातील तसेच शेतातील साहित्याची नासधूस व वहानाचे नुकसान केले म्हणून गुन्हाची नोंद केली आहे.

तालुक्यातील कळमदरे येथील बारभाई मळा येथे मंगळवारी शंकुतला गांगुर्डे हिने रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या संदर्भात तिचे वडील त्र्यंबक वक्ते यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार शकुंतलाच्या लग्नानंतर सासरच्या मंडळीकडून ट्रॅक्टर व मोटारसायकल घेण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी त्रास दिला जात होता. तसेच एकत्रित कुटुंबातील खंडू माधव गांगुर्डे हा तिच्याकडे नेहमी वाईट नजरेने बघत होता. तो नेहमी शकुंतलास त्रास देत असे. तसेच शकुंतलाचा दीर बापू गांगुर्डे याचे लग्न शंकुतलाच्या लहान बहिणीसोबत करावे यासाठी तिच्या वडिलांनी विरोध केला होता. याचा राग मनात धरून शंकुतलाचा वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यामुळे खंडू माधव गांगुर्डे (चुलत भाया), जयराम शंकर गांगुर्डे (चुलत सासरे), केदू काशिनाथ गांगुर्डे (नवरा), उषा खंडू गांगुर्डे (चुलत जाव), बापू काशिनाथ गांगुर्डे (दीर), कल्पना जयराम गांगुर्डे (चुलत सासू), माधव शंकर गांगुर्डे (चुलत सासरे), कमलाबाई माधव गांगुर्डे (चुलत सासू) यांच्या विरोधात हुंडाबळीच्या कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कळमदरे येथील मयत शंकुतलाचे चुलत सासरे जयराम गांगुर्डे यांनी वडनेरभैरव येथील रोशन बाबुराव वक्ते, सोपान वक्ते, त्र्यंबक बाबुराव वक्ते, शिवाजी बाबुराव वक्ते, राजेंद्र वक्ते व त्याच्या सोबत असलेल्या इतर चार जणांविरोधात पिकअप, ट्रॅक्टर जाळला. शेतातील विहिरीवरील मोटार व पाइप तसेच घरातील साहित्याची तोडफोड असे दोन लाख साठ हजाराची नुकसान केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे. हुंडाबळीच्या गुन्हात पोलिसांनी सासरचे तिघांना अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रवाशांनो, करा आरटीओकडे तक्रार

$
0
0

saurabh.bendale@timesgroup.com

Tweet : SaurabhbMT

नाशिक : रेल्वे, राज्य परिवहन महामंडळाच्या बस दिवाळीच्या सुटीत गर्दीने फुल्ल असतात. परगावी जाण्यासाठी खासगी वाहतुकीचा पर्याय असतो. प्रवाशांची गरज आणि गर्दीचा फायदा घेत खासगी वाहतूकदार मनमानी भाडेआकारणी करतात. अनेकदा जास्त प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. दुप्पट पैसे देऊनही प्रवाशांना मनस्तापाला बळी पडावे लागते. मात्र, यंदा प्रवाशांच्या तक्रारी आल्यास प्रादेशिक परिवहन विभागाकडून अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

दिवाळीच्या सुटीत पर्यटनासाठी किंवा नातेवाईकांकडे जाण्यासाठी खासगी बस, टॅक्सी यांचा पर्याय निवडला जातो. प्रवाशांची खाजगी वाहतुकीस असलेली मोठी मागणी लक्षात घेता, वाहतूकदार नेहमीपेक्षा जास्त भाडे आकारताना दिसून येतात. तसेच अनेकदा खासगी बस व टॅक्सीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी बेकायदेशिररित्या बसविले जातात. त्यामुळे दुप्पट पैसे मोजूनही इतर प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. शहरातून मुंबई, पुणे, औरंगाबाद, अहमदाबाद, इंदूर यांसह इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर खासगी बस आणि टॅक्सी जातात. या बस अनेकदा नियोजित वेळेपेक्षा उशिराने निघतात. तसेच त्यांच्या सोयीनुसार थांबे घेतले जातात. सुटीच्या गर्दीचा फायदा घेत योग्य सोयीसुविधा प्रवाशांना पुरविल्या जात नाहीत. प्रवाशांशी उर्मट वागणे, असे अनेक अनुभव प्रवाशांना येतात. याविरोधात आवाज उठविण्यासाठी प्रवाशांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे आवाहन राज्य प्रादेशिक परिवहन विभागाने केले आहे. सुटीत किंवा इतरही वेळेस खासगी बस, टॅक्सी किंवा इतर वाहतूकदारांनी फसवणूक केली असेल किंवा योग्य सोयीसुविधा दिल्या नसतील, तसेच कायद्याचे उल्लंघन केले असेल तर त्यासंदर्भातची तक्रार महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या https://transportcomplaints.mahaonline.gov.in/ या वेबसाइटवर नोंदवता येईल. अधिक माहितीसाठी ०२२- ६२४२६६६६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आरटीओतर्फे करण्यात आले आहे.

अशी आहे तक्रारीची पद्धत

- तक्रारदाराची माहिती : नाव, संपर्क क्रमांक, पत्ता व ई-मेल नोंदवावा लागतो.

- तक्रारीचा तपशील : वाहन क्रमांक, तक्रारीचे कारण, तक्रारीची माहिती, तक्रारीच्या संबंधित फोटो

- वाहन चालकाचे, ऑपरेटरचे किंवा मालकाचे चुकीचे वर्तन, जास्तीचे भाडे आकारणी तसेच इतर तक्रारी नोंदविता येतात.

- मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून नोंदविण्यात आलेल्या तक्रारीचे ट्रॅकिंग करता येते.

- तक्रारीच्या संदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदाराला ऑनलाइन पाहता येते.

दिवाळीच्या सुटीत किंवा इतरही वेळी खासगी वाहतूकदारांनी प्रवाशांची लूट केली, त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत तर त्या विरोधात ऑनलाइन तक्रार दाखल करावी. आरटीओ प्रशासनाकडून त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येते.

- विनय आहिरे, सह प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक

खासगी बस ऑपरेटर अनेकदा प्रवाशांना चुकीची माहिती देतात. ५.३० ची वेळ असेल तर बस ६ वाजता येते. दिवाळीच्या सुटीत तर हमखास भाडेवाढ करतात. त्यामुळे गैरसोय होते.

- पुष्कर तिवारी, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिपब्लिकनतर्फे मागण्यांसाठी निदर्शने

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष नाशिक शहर शाखेतर्फे विविध मागण्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ गुरुवारी निदर्शने केली.

संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, दादर रेल्वे स्थानकास डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव देऊन गौरव करावा, मुंबई इंदूमिल दादर येथील स्मारकाच्या कामास गती मिळावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. त्याबरोबरच, शिर्डी येथील सागर शेजवळ या हत्या झालेल्या तरुणाच्या कुटुंबाला आर्थिक मदत व शिर्डी संस्थानमध्ये कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, अद्याप ते पूर्ण झालेले नसून, याची दखल शेजवळ कुटुंबाला त्वरीत न्याय द्यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चोरी गेलेल्या वस्तू मिळाल्या परत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत गेल्या वर्षभरात घडलेल्या चोरीच्या घटनांमधील चोरट्यांना अटक करीत त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पोलिसांनी गुरुवारी (दि. १) फिर्यादींना त्यांच्या चोरी झालेल्या वस्तूंचे वाटप केले.

गेल्या वर्षभराच्या काळात पंचवटी पोलिस स्टेशनच्या हद्दीत घरफोडीच्या काही घटना घडल्या होत्या. यात अभय अरविंद शहाणे (रा. शिवशक्ती नगर, हिरावाडी) यांच्या घरातून ४ तोळे वजनाची सोन्याची पोत चोरीला गेली होती. सुभाष रामकृष्ण भुतडा (रा. पंचवटी) यांच्या १ तोळे वजनाच्या सोन्याच्या २ अंगठ्या चोरट्यांनी लांबविल्या होत्या, तर शरद राजाराम टेमगर (रा. साईनगर, पंचवटी) यांच्या वाहनातील २ बॅटऱ्या चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. या तीनही गुन्ह्यांतील संशयितांना पंचवटी पोलिसांनी अटक करीत त्यांच्याकडून संबंधित मुद्देमाल हस्तगत केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी गुरुवारी (दि. १) या तीनही फिर्यादींना त्यांचा चोरी गेलेला मुद्देमाल परत केल्याने, फिर्यादींच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूर मध्यमेश्वरमधून आज पाणीप्रवाह वाढणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

जायकवाडी धरणासाठी गुरुवारी रात्री आठ वाजता निफाड तालुक्यातील नांदूर मध्यमेश्वर धरणाच्या पाच पैकी दोन गेटमधून ६ हजार ८१० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पाणी विसर्ग शुक्रवार (दि. २) सकाळपर्यंत १५ हजार क्युसेसने वाढवण्यात येईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. मुकणे आणि दारणा धरणातील पाण्याचा हा विसर्ग होत आहे.

नाशिक जिल्ह्यातील दारणा आणि मुकणे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर नांदूर मध्यमेश्वर धरण परिसरात विरोध होऊ नये, याची दक्षता घेत चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. नांदूर मध्यमेश्वर धरणावर १४५ पोलिसांचा जागता पहारा आहे. उजव्या बाजूच्या दोन गेटमधून गोदापत्रातून या पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

निफाड येथील उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडिले यांच्या नेतृत्त्वाखाली तीन पोलिस निरीक्षक, सात सहायक पोलिस निरीक्षक आणि १२५ पोलिसांचा बंदोबस्त होता. याच ठिकाणी वैजापूर पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता यू. के. पठाण, शाखा अभियंता एस. आर. वाईकर, सहायक अभियंता डी. सी. महाले, एच. एम. शार्दूल, पी. बी. साबळे, कालवा चौकीदार एस. बी. पायमोडे, नाशिकचे ढोकणे, उपअभियंता नागपुरे शाखा डोखळे, संदेशक के. एन. कातकाडे यांच्यासह बांधकाम विभागाचे एकूण ४५ अधिकारी, कर्मचारी व चांदोरी येथील आपत्ती व्यवस्थापन समितीचे सागर गडाख व टीम उपस्थित होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान एकसाठी शेतकरी आत्महत्या आणि शिक्षक मारहाण दोन बातम्या फोटोसह

$
0
0

वागळूद येथे शेतकऱ्याची आत्महत्या

दिंडोरी : शेतमालाला भाव मिळत नसल्याने व कर्जाची परतफेड करता येत नसल्याने हतबल झालेले वागळूद येथील साहेबराव तुकाराम कड (वय ५७) या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. कड यांनी बुधवारी सायंकाळी सात वाजता शेतात विषारी औषध घेतले. त्यांना दिंडोरी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. कड यांच्यावर बँकेचे १९ लाख रुपये कर्ज आहे.

0000

मुलाला मारले म्हणून शिक्षकावर प्राणघातक हल्ला

चांदवड तालुक्यातील घटना; हल्लेखोरावर कारवाईची शिक्षक संघटनेतर्फे मागणी

म. टा. वृत्तसेवा, चांदवड

शाळेत मुलाला का मारले, असे विचारण्यास गेलेल्या पालकाने शिक्षकाशी वाद घातला. दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन पालकाने शिक्षकाच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार केल्याने शिक्षक गंभीर जखमी झाला आहे. शिक्षकावर नाशिक येथे उपचार सुरू आहे. तालुक्यातील शिंगवे (खालचे) येथील प्राथमिक शाळेत गुरुवारी ही घटना घडली. या घटनेचा चांदवड तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेने निषेध केला असून, हल्लेखोरास त्वरित अटक करावी, असे निवेदन पोलिसांना दिले.

शिंगवे (खालचे) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत संजय हरी गवळी हे प्रभारी मुख्याध्यापकपदी कार्यरत आहेत. शाळेच्या प्रांगणात बुधवारी (ता. ३१) तिसरीतील विद्यार्थी सार्थक बोरसे हा इतर तीन मित्रांसोबत खेळताना एकमेकांना खडे मारीत होते. हा सर्व प्रकार प्रभारी मुख्याध्यापक गवळी यांनी पाहताच, त्यांनी सार्थक व मित्रांना दटावले. खडे मारू नका, असे त्यांनी सांगितले. शाळेत घडलेला हा सर्व प्रकार सार्थकने घरी सांगितला. यामुळे सार्थकचे वडील भाऊसाहेब सोपान बोरसे गुरुवारी (ता. १) शाळेत आले. त्यांनी गवळी यांना 'तुम्ही मुलाला का मारले' असे सांगत शिवीगाळ करू लागले. या दरम्यान मुख्याध्यापक गवळी व पालक भाऊसाहेब बोरसे यांच्यात शाब्दिक चकमक झडली. बोरसे यांनी गवळी यांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात गवळी जागीच कोसळले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू होता. हे पाहून भाऊसाहेब बोरसे पसार झाले. त्याच वेळी शाळेच्या दोन शिक्षकांनी आरडाओरड करून ग्रामस्थांना मदतीस बोलावून गवळी यांना चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले. या घटनेची माहिती चांदवड तालुका प्राथमिक शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, सभासदांना कळताच त्यांनी चांदवड पंचायत समितीच्या शिक्षण विभागासमोर एकत्रित येऊन हल्लेखोर पालकाला त्वरित अटक करून कारवाई करण्याची मागणी केली.

'शाळा बंद'चा निर्णय स्थगित

या घटनेचा निषेध म्हणून शिक्षकांनी शुक्रवारी काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला होता. मात्र, जिल्हा परिषदेचे गटनेते डॉ. आत्माराम कुंभार्डे, डॉ. सयाजीराव गायकवाड, सभापती डॉ. नितीन गांगुर्डे, नितीन आहेर यांनी शिक्षकांची समजूत काढत, परीक्षा सुरू असल्याने शाळा बंद न करण्याचे आवाहन केले. या वेळी चांदवड पोलिसांचे प्रतिनिधी विजय जाधव, मंगेश डोंगरे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर शिक्षकांनी शुक्रवारचे आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे. या वेळी प्राथमिक शिक्षक संघटनेचे नेते काळूजी बोरसे, केदू देशमाने, सयाजीराव शिंदे आदींसह १०० ते १५० शिक्षक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२१ कोटींचा मोबदला वादात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही प्रशासनाने एका बड्या बिल्डरशी संबंधित सर्वे क्रमांक ७०५ या जागेच्या भूसंपादनापोटी उर्वरित २१ कोटी रुपये देण्याची कारवाई तातडीने सुरू केली आहे. हायकोर्टाच्या आदेशाचा दाखला देत प्रशासनाने सुरू केलेल्या या अतितत्पर कारवाईवर सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनीच लेखी आक्षेप घेत सदरील प्रस्ताव महासभेवर ठेवण्याची मागणी केली आहे.

संबंधित जागामालकाला रोख रकमेऐवजी टीडीआर का देत नाहीत, असा सवाल करीत सभागृह नेते दिनकर पाटील यांनी या प्रकरणात एका त्रयस्त व्यक्तीकडून मध्यस्थी केली जात असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे २१ कोटींची मोबदला फाइल आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालयाशेजारील क्रीडांगणासाठी आरक्षित असलेल्या सर्वे क्रमांक ७०५ या जागेच्या भूसंपादनाच्या बदल्यात ५६ कोटींचा मोबदला देण्याचा विषय तीन वर्षांपूर्वी महापालिकेत चांगलाच गाजला होता. संबंधित जागेची बाजारभावानुसार किंमत कमी असतानाही रेडिरेकनरच्या चढ्या दरामुळे हा मोबदला देण्याचा आरोप त्यावेळी स्थायी समितीत करण्यात आला होता. भाजपच्या एका बड्या दिवंगत नेत्याशी संबंधित, तसेच एका मोठ्या बिल्डरचाही या जमिनीशी संबंध असल्याने त्यावेळी स्थायी समितीने मागच्या दाराने हा ठराव मंजूर करीत घाईगडबडीत २९ कोटी रुपये मोबदला देण्याचा ठरावही करण्यात आला होता. त्यामुळे संबंधित जागामालकाने उर्वरित शिल्लक रकम मिळविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून महापालिकेडे तगादा लावला होता. हायकोर्टाचा आदेश असल्याने हा मोबदला द्यावा लागेल, असा दावा महापालिकेतील अधिकारी करीत असून, त्यासाठी उर्वरित २१ कोटींचा मोबदला देण्यासाठी गेल्या आठवड्यापासून ही फाइल अतितातडीने फिरविली जात आहे. सदरील मोबदला देण्यासाठीचा प्रस्ताव हा स्थायी समितीवर येणे आवश्यक होते. परंतु, त्यापूर्वीच हा प्रस्ताव तयार करण्यात येऊन गुरुवारी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आयुक्त कार्यालयाकडून संबंधित फाइल लेखा विभागाकडे पाठविण्यात आली.

निधी नसल्याने व आर्थिक स्थितीचे कारण सांगत नगरसेवकांची कामे फेटाळणाऱ्या प्रशासनाच्या या फाइलसंदर्भातील अतितत्पर कार्यवाहीवर सत्ताधारी भाजपच्याच पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. सभागृह नेते दिनकर पाटील यांनी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, नगरचना सहायक संचालक सुरेश निकुंभे, लेखाधिकारी डॉ. सुहास शिंदे यांना लेखी पत्र देत सदरील कारवाई थांबविण्याची मागणी केली आहे. संबंधित जागामालकास रोख स्वरूपात मोबदला देण्याऐवजी टीडीआर देण्याची मागणी त्यांनी केली असून, आर्थिक स्थिती चांगली नाही, तर एवढा पैसा कसा देणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. सदरील मोबदला द्यायचा असेल, तर त्यासाठी हा प्रस्ताव महासभेवर ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, मनसेचे गटनेते सलिम शेख यांच्यासह भाजपचे पदाधिकारीही उपस्थित होते.

--

शेतकऱ्यांना १५ वर्षांपासून प्रतीक्षा

सन २००२-०३ मध्ये झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यावेळी पंचवटी आणि तपोवनात अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी रस्त्यांसाठी घेण्यात आल्या आहेत. या शेतकऱ्यांना या जागांचा मोबदला अद्यापही मिळालेला नसून, शेतकरी मोबदल्यासाठी महापालिकेत चकरा मारून थकले आहेत. यासंदर्भाती स्थायी समिती आणि महासभेत नगरसेवक उद्धव निमसे यांनी वेळोवेळी आक्षेप घेत बिल्डरांनाच भूसंपादनाचे पैसे दिले जातात, शेतकऱ्यांचे का नाही, असा सवाल उपस्थित केला होता. दोन वर्षांपूर्वी तर चक्क जागेचे भाडे देण्याची तयारीही चालविली होती. त्यामुळे एकीकडे पंधरा वर्षांपूर्वी जागा देऊनही शेतकऱ्यांना पैसे दिले जात नाहीत, तर दुसरीकडे बिल्डर आणि राजकीय नेत्यांशी संबंधित जमिनीच्या मोबदल्याचे प्रस्ताव तातडीने हाताळले जात असल्याबद्दल संशय व्यक्त केला जात आहे.

--

क्रीडांगणासाठी अनेक भूखंड महापालिकेच्या ताब्यात असून, त्यांच्या विकासासाठी महापालिकेकडे निधी नाही. नगरसेवकांसाठीही निधी नाही, तर दुसरीकडे जागेची गरज नसतानाही संबंधित जागामालकास टीडीआर देण्याऐवजी रोख मोबदला देण्याची घाई का? महापालिकेशी संबंधित नसलेल्या वाघनामक त्रयस्थ व्यक्तीकडून ही फाइल फिरविली जाणे संशयास्पद आहे.

-दिनकर पाटील, सभागृह नेता, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस - २ नोव्हेंबर

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images