Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मराठा आरक्षणाचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत: चंद्रकांत पाटील

0
0

नाशिक:

मराठा क्रांती मोर्चानं आरक्षणासाठी पुन्हा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलंय. हे सरकार मराठा आरक्षण निश्चितच देणार आहे. त्यासंबंधीचा समितीचा अहवाल १० ते १५ नोव्हेंबरपर्यंत येणार आहे. कायद्याच्या कसोटीवर उतरणारं आरक्षण असेल, असं पाटील यांनी सांगितलं. पिंपळगाव बसवंत येथील सभेत त्यांनी ही माहिती दिली.

राज्यात शिवसेना आणि भाजप सत्तेत असले तरी या दोघांमध्ये विस्तवही जात नाही. दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. त्याचवेळी पिंपळगाव बसवंत येथील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील एकत्र येणार असल्यानं त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या कामगिरीचं कौतुकच केलं. चंद्रकांत पाटील यांनी सरकारच्या विविध कामांची माहिती दिली. तसेच मराठा आरक्षणासंबंधी महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. हे सरकार मराठा आरक्षण निश्चितच देणार आहे. १० ते १५ नोव्हेंबरपर्यंत समितीचा अहवाल येणार आहे. कायद्याच्या कसोटीवर उतरणारं आरक्षण असेल, असं आश्वासन त्यांनी दिलं. भीमा-कोरेगाव आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. यात उद्धव ठाकरे यांचा महत्वाचा सहभाग होता, असंही त्यांनी सांगितलं.

यावेळी उद्धव ठाकरे यांचंही भाषण झालं. मला फटाके वाजवायला दिवाळीची गरज नाही. आता चांगल्या प्रकाशाचे दिवे लावण्याची वेळ आहे. आम्ही एकत्र कसे याचे आश्चर्य सगळ्यांनाच वाटते. पण मी सरकारच्या चांगल्या कामात कधी खोडा घालत नाही. गेल्या चार वर्षांचा अभ्यास करा. मी सरकारवर टीका करत नाही. मी जनतेच्या बाजूनं बोलतो, असंही ते म्हणाले. राम मंदिराचं भूमिपूजन लवकर होण्यासाठी एकत्र या, असं आवाहनही त्यांनी केलं. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कामाचं कौतुक केलं. रस्ते, ट्रॉमा केअर सेंटर ही चांगली कामं करण्यात त्यांनी पुढाकार घेतला, असं ते म्हणाले. राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. कोकणातही यंदा दुष्काळ आहे. नैसर्गिक संकटं येताहेत, असं ते म्हणाले.

यावेळी त्यांनी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनाही सल्ला दिला. पाणी सोडणे महत्वाचं तसं माणसं जोडणंही गरजेचं आहे. थेट चर्चा करून प्रश्न सोडवा. जनतेचे प्रश्न महत्वाचे आहेत,0 राजकारण नाही. घरं पेटवण्यापेक्षा चुली पेटवणं मला महत्वाचं वाटतं. कर्जमाफी दिली. त्याचा योग्य आढावा घ्या. पात्र-अपात्रांची माहिती घेणं हे सरकारचं काम आहे, असंही त्यांनी सांगितलं.

तत्पूर्वी शिवसेनेचे निफाडचे आमदार अनिल कदम आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचीही भाषणे झाली. आमदार कदम यांनी महाजन आणि चंद्रकांत पाटील यांचे उद्धव ठाकरे यांच्यासमोरच कौतुक केले. महाजन हे खरे पालकमंत्री आहेत. पाण्यावरून त्यांनी मराठवाडा आणि नाशिक या दोन्ही भागांत योग्य समन्वय साधला. शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारे ते कार्यक्षम पालकमंत्री आहेत. चंद्रकांत पाटील हेही कार्यक्षम मंत्री आहेत, असं ते म्हणाले. तर महाजन यांनीही शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. उद्धवजी, आपलं किती चांगलं चाललं आहे. सर्वाधिक कामे शिवसेनेच्या आमदारांनी केली आहेत. शिवसेना-भाजपमध्ये वाद आहेत, अशी चर्चा आहे. पण आमच्यात कोणतेही वाद नाहीत. आम्ही एकत्रच आहोत. शिवसेना आमदारांच्या मतदारसंघात कोणतंही काम होत नाही,असा आरोप होतो, पण ३०० कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ झाला आहे. हे सरकार युतीचं आहे, असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

पाणी हे सगळ्यांचं आहे. मराठवाड्यालाही पाणी आवश्यक आहे. मात्र, नाशिकचा शेतकरीही तितकाच महत्वाचा आहे. सुरुवातीला पाणी रोखलं, पण त्यानंतर पाणी सोडण्यात आलं. दोघांवरही अन्याय होऊ दिला नाही. तसंच गुजरातला एक थेंबही पाणी जाऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सर्वरोगनिदान शिबिर आज

0
0

नाशिक : ज्ञान अमृत बहुउद्देशिय आदिवासी संस्थेतर्फे आज, रविवार ४ नोव्हेंबर रोजी सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत अथर्व शॉपी, महिला बँकेजवळ, आकाश पेट्रोलपंप, दिंडोरी रोड, म्हसरूळ येथे हे शिबीर संपन्न होणार आहे. शिबीराचे उद्घाटन विश्वास को-ऑप. बँकेचे संस्थापक अध्यक्ष विश्वास ठाकूर यांच्या हस्ते होणार असून, प्रमुख पाहुण्या म्हणून ब्रह्मकुमारी वासंती दीदीजी उपस्थित राहणार आहेत. शिबिरात मधुमेह, संधिवात, अर्ध डोकेदुखी, महिलांचे आजार, केसांवरील उपचार, मुळव्याध, कमजोरी, अशक्तपणा, चरबी कमी करणे, त्वचेचे आजार (चेहऱ्यावरील मुरूम व डाग) यांवर तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व तपासणी करण्यात येणार आहे. तसेच सशुल्क हर्बल (युनानी) औषधांद्वारे खात्रीशीर उपचार करण्यात येईल. शिबिरास उपस्थित राहण्याचे आवाहन कैलास सुर्यवंशी, डॉ. पवन सोनवणे, प्रविण पवार, अशोक ठाकूर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरोघरी आनंदपेरणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरोघरी चैतन्य, उत्साह अन् आनंदपेरणी करणाऱ्या दीपोत्सवास आज, रविवार (दि. ४)पासून प्रारंभ होत आहे. वसुबारसनिमित्त आज परंपरेप्रमाणे गाय-वासराची पूजा करून बळीराजा लक्ष्मीच्या आगमनासाठी प्रार्थना करणार आहे.

दीपोत्सवाचा हा पहिला दिवस साजरा करून नाशिककर सुख-समृद्धी घेऊन येणाऱ्या दिवाळीचे स्वागत करणार आहेत. रमा एकादशी झाली, की गोवत्स द्वादशीला वसुबारस साजरी करण्यात येते. यंदा ही वसुबारस रविवारी येत असून, दिवाळीचा हा पहिला दिवस समजला जातो. वसु म्हणजे द्रव्य अर्थात, धन. त्यासाठी आलेली बारस म्हणजेच द्वादशी म्हणून हा वसुबारसचा सण साजरा करण्यात येतो. दुष्काळसदृश परिस्थितीला सामोरा जाणारा बळीराजा दिवाळीनिमित्त लेकरांच्या मुखात गोड घास घालण्यासाठी सरसावला आहे. ग्रामीण भागात या दिवशी बळीराजाचे कुटुंब गायीसह तिच्या पाडसांची पूजा करते. घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे याकरिता ही पूजा करण्याची परंपरा यंदाही जपण्यासाठी बळीराजा सज्ज झाला आहे.

घरोघरी झळाळणार पणत्या

वसुबारसनिमित्त अंगणात सडासंमार्जन करून रविवारपासून घरोघरी पणत्या पेटविण्यास सुरुवात होणार आहे. वसुबारसला उपवास करण्याची परंपरा असून, महिला या दिवशी गहू आणि मूग खाणे टाळतात. कालौघात शहरी भागात उपवासाची परंपरा काहीशी मागे पडली असली, तरी संस्कृतीप्रिय महिलांकडून ती जोपासली जात आहे. शहरातील गोशाळांमध्येदेखील वसुबारसनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लसीकरण मोहीमेचा घेतला आढावा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात गोवर व रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या पूर्वतयारीचे परीक्षण करण्यासाठी भारत सरकारची कमिटी नाशिकमध्ये दाखल झाली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, आरोग्य-शिक्षण सभापती यतींद्र पगार आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गीते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या तयारी संदर्भात बुधवारी भारत सरकारचे राष्ट्रीय परिक्षक त्रिपाठी यांनी जिल्हा परिषदेत भेट दिली. यावेळी भारत सरकारच्या निर्देशानुसार शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, महिला बालकल्याण विभाग या विभागांनी मोहिमेसाठी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच जिल्हास्तरावर नेमण्यात आलेल्या विविध समित्या, अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांनी नियोजित कामे यांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, लस साठवणूक विभाग यांच्या तयारीचा त्रिपाठी यांनी प्रत्यक्ष भेट आढावा घेतला. त्रिपाठी यांच्या समवेत जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, जागतिक आरोग्य संघटनेचे जिल्हास्तरीय प्रतिनिधी डॉ. कमलाकर लष्करे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.कैलास भोये, शिक्षण विभागाच्या श्रीमती देशमुख हे अधिकारी उपस्थित होते. गोवर आणि रूबेला लसीकरण मोहिमेच्या पूर्व तयारी संदर्भात आज, गुरुवारी महानगरपालिका आणि नगरपालिकेच्या क्षेत्राचा आढावा घेण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नऊ दिवस बाजर समिती सुटीवर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिवाळी व साप्ताहिक सुटीमुळे जिल्ह्यातील नाशिकसह सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज नऊ दिवस ठप्प होणार आहे. जिल्ह्यात लासलगावसह बहुतांश तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. त्यात शेतमालाचा लिलाव होत असतो. पण, या सलग सुटीमुळे कोट्यवधींचा व्यवहारही ठप्प होणार आहे.

शनिवार व रविवारी आलेल्या साप्ताहिक सुटीनंतर सलग पाच दिवस दिवाळीची सुटीमुळे शुक्रवारपर्यंत या बाजार समिती बंद राहणार आहेत. त्यानंतर पुन्हा दोन दिवसाची साप्ताहिक सुटी असल्यामुळे १२ नोव्हेंबर रोजीच बाजार समितीचा व्यवहार सुरळीत होतील. जिल्ह्यात कांद्याची मोठी बाजारपेठ असून, त्यामुळे या बंदचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसणार आहे. कांद्याचे भाव घसल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांची चिंता वाढलेली असताना सुटी त्यांना अधिकच मारक ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहनाच्या धडकेने बिबट्या ठार

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा येथील भावडबारी घाटात शनिवारी पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेने रस्ता ओलांडताना बिबट्या जागीच ठार झाला. याबाबत देवळ्याचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. शनिवारी पहाटे चारच्या दरम्यान भावडबारी घाटाच्या पायथ्याशी रस्ता बिबट्याला अज्ञात वाहनाने धडक दिली. धडकेत बिबट्या जागीच ठार झाला. रात्री गस्त घालत असताना देवळा पोलिसांना बिबट्या रस्त्यावर मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी या घटनेची माहिती वनविभागाला दिली. घटनास्थळी देवळ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एन. शेख, उमरण्याचे वन परिमंडळ अधिकारी अशोक सोनवणे, वनपाल बी. पी. गवळी यांनी मृत बिबट्या ताब्यात घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यागांसाठी पालिकेत स्वतंत्र कक्ष

0
0

मालेगावी आढावा बैठकीत आयुक्त धायगुडेंच्या सूचना

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील दिव्यांगाना पालिकेच्या अंदाजपत्रकातील ३ टक्के निधीतून द्यावयाच्या विविध सुविधा तसेच समस्यांबाबत पालिका आयुक्त संगीता धायगुडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. ३ टक्के राखीव निधीतून दिव्यांगासाठी पालिकेत पालिकेत स्वतंत्र कक्ष उभारण्याचा सूचना धायगुडे यांनी दिल्या. तसेच दिव्यांगांसाठी एकूण ९० लाख रुपयांचा दिव्यांग निधी निश्चित करण्यात आला आहे. या निधीतून एकूण ४१ व्हीलचेअर घेण्यात आल्या असून, २७ व्हीलचेअरचे वाटप करण्यात आल्याची माहिती सहा. आयुक्त गोसावी यांनी दिली.

या बैठकीस उपायुक्त नितीन कापडणीस, सहा. आयुक्त विलास गोसावी यांच्यासह दिव्यांगासाठी काम करणाऱ्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. शासनाने दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाना ३ टक्के राखीव निधी ठेवण्याचे आदेश आहेत. त्यानुसार या निधीतून पालिकेकडून विविध सुविधा देण्यासंदर्भात व दिव्यांगांच्या समस्याबाबत चर्चा करण्यात आली. आयुक्त धायगुडे यांनी पालिकेकडून दिव्यांग बांधवांसाठी हाती घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यात दिव्यांग व्यक्तींना घरकुल, व्यापारी गाळे स्टॉल उभारणीसाठी १० हजार रुपये सहाय्य देण्यात येणार आहे. तसेच विवाहासाठी देखील ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल. तसेच उर्वरित १४ व्हीलचेअर्स शहरातील बसस्थानक, पालिका मुख्य इमारत, पालिका रुग्णालय व शाळांमध्ये देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ३ डिसेंबर रोजी दिव्यांग दिन निमित्त दिव्यांगसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे धायगुडे यांनी सांगितले.

वाडिया रुग्णालयात दिव्यांग कक्ष

पालिकेच्या नूतन इमारतीत पाच मजले असल्याने दिव्यांग व्यक्तींना विविध कामांसाठी चढ उतर करण्यास त्रास होत असतो. लिफ्टची सुविधा असली तरी दिव्यांग व्यक्तींना तळमजल्यावरच सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. आयुक्तांनी याची दखल घेत तत्काळ पालिकेच्या जुन्या इमारतीसमोरील वाडिया रुग्णालयात दिव्यांग कक्ष उभारण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. त्यामुळे दिव्यांगांची परवड थांबणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिक मर्चंन्टस बँकेची २३ डिसेंबरला निवडणूक

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या पाच वर्षापासून प्रशासक राजवट असलेल्या नाशिक मर्चंन्टस को-ऑप बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. या बँकेच्या २१ संचालकपदासाठी २३ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. त्यानंतर २६ डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे. सहकार विभागाचे विभागीय सहनिबंधक व निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांनी हा कार्यक्रम घोषित केला आहे.

एक लाख ७९ हजार ९०५ सभासद, ८० शाखा व कोट्यवधींची उलाढाल असलेल्या या बँकेवर अनिमियतेतचे कारण पुढे करत रिझर्व्ह बँकेने ६ जानेवारी २०१४ मध्ये प्रशासक म्हणून जे. बी. भोरीया यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी वारंवार करण्यात आली. पण, प्रशासकाचे पाच वर्षे पूर्ण होण्याअगोदर रिझर्व्ह बँकेने या निवडणूक घेण्याचे दोन महिन्यापूर्वी आदेश दिले. त्यानंतर या निवडणुका आता होणार आहे. त्यासाठी सहकार विभागाचे अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

अशी आहे बँकेची आर्थिक स्थिती

व्यापारी बँक म्हणून लौकिक मिळालेल्या मर्चंन्ट बँकेची स्थापना १९५९ साली झाली. आज या बँकेला ५९ वर्षे पूर्ण झाले आहे. बँकेकडे शेअर भांडवल म्हणून ५० कोटी ५८ लाख आहे. तर रिझर्व्ह फंडाचे ४४४ कोटी १४ लाख, ठेवी १३७४ कोटी ८१ लाख, कर्ज ८३५ कोटी ७० लाख, गुंतवणूक ९६२ कोटी ४९ लाख व खेळते भांडवल २१४५ कोटी ८४ लाख अशी बँकेची आर्थिक स्थिती आहे.

बँकेच्या ८० शाखा

बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाबरोबच ८० शाखा आहे. त्यातील ३३ शाखा या नाशिक शहरात आहे. जिल्ह्यात बँकेच्या २९ तर जिल्ह्याबाहेरील शाखेची संख्या १६ आहे. त्याचप्रमाणे राज्यबाहेर बँकेच्या दोन शाखा असून, एक हैद्राबाद तर दुसरी शाखा सुरत येथे आहे.

निवडणुकीसाठी विशेष सर्वसाधारण सभा

दि मल्टी स्टेट को -ऑप सोसायटी अॅक्ट २००२ व त्याखालील नियम तसेच बँकेचे मंजूर उपविधीमधील तरतुदीनुसार बँकेच्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा सोमवार १९ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजता बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात सातपूर येथे होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार आहे. यात ही निवडणूक प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

असे निवडले जाणार २१ संचालक

सर्वसाधारण - १८

अनुसूचित जाती - जमाती - १

महिला राखीव - २

असा आहे निवडणूक कार्यक्रम

नामनिर्देश पत्र विक्री - १९ ते २७ नोव्हेंबर सकाळी - ११ ते ३

नामनिर्देशन पत्र यादी प्रसिध्द - १९ ते २७ नोव्हेंबर - सायंकाळी ५

नामनिर्देशन पत्राची छाननी - २९ नोव्हेंबर - सकाळी १० वाजता

वैध नामनिर्देश यादी - ३० नोव्हेंबर - सकाळी ११ वाजता

उमेदवारी माघार घेणे - १ ते ४ डिसेंबर - सकाळी ११ ते दुपारी ३

अंतिम यादी चिन्हांसह - ५ डिसेंबर - सकाळी ११ वाजता

मतदान घेण्याची तारीख - २३ डिसेंबर - सकाळी ८ ते सायंकाळी ५

मतमोजणी - २६ डिसेंबर २०१८ - सकाळी ८ पासून संपेपर्यंत

निवडणूक निकाल जाहीर करणे - २८ डिसेंबर २०१८ - दुपारी ४ वाजता

५ डिसेंबर रोजी दी. मल्टी स्टेट को - ऑप सोसायटीज रुल्स २००२ चे नियम १९(२) अन्वये जर निवडून द्यावयाच्या जागांइतकेच वैध नामनिर्देश पत्रे आल्यास ही निवडणूक बिनविरोध होईल. त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी हे उमेदवार निवडून आल्याचे विशेष सर्वसाधारण सभेत घोषित करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अत्याचार प्रकरणी आरोपीस सक्तमजुरी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पाच वर्षाच्या मुलीला खाऊचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या आरोपीस प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी पाच वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

विद्यासागर उर्फ समाधान प्रकाश पाटील (३३, रा. पाटीलनगर, सिडको) असे आरोपीचे नाव आहे. १ एप्रिल २०१८ रोजी पाच वर्षांची अल्पवयीन मुलगी तिचा भाऊ व मैत्रिणीसोबत खेळत होती. त्यावेळी आरोपी समाधान याने तिला खाऊसाठी पैसे देतो, असे आमिष दाखवले. यानंतर तिला तो राहत असलेल्या वरच्या खोलीत घेऊन गेला. त्याठिकाणी त्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. त्यावेळी तिचा भाऊ आणि मैत्रीण तिला शोधत आले असता त्यांनी ही घटना पाहिली. मुलीने ही बाब घरी येऊन आईला सांगितली. पालकांनी लागलीच अंबड पोलिस स्टेशन गाठून फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी विनयभंग व पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी ३१ मे रोजी कोर्टात दोषारोपपत्र दाखल केले. प्रधान जिल्हा न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्यासमोर खटला चालला. सरकारी पक्षतर्फे अॅड. शिरीष कडवे यांनी आठ साक्षीदार तपासले. यात अल्पवयीन पीडित मुलीसह तिचा लहान भाऊ आणि मैत्रिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच न्यायाधिश शिंदे यांनीही चिमुकल्यांनी धाडसाने कोर्टात साक्ष दिल्याचे कौतुक केले. समोर आलेल्या साक्षी पुराव्यांनुसार कोर्टाने आरोपीस पाच वर्षे सक्तमजुरी आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यात सुनावणी पूर्ण करीत कोर्टाने आपला निर्णय सुनावला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धुळ्यात नाशिकमध्ये गावठी दारूची तस्करी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

टायर-ट्यूबमधून होणारी मद्याची वाहतूक रोखण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत वाहनासह तब्बल दीड लाख रुपयांची गावठी दारू हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून, ही मालेगाव-दरेगाव रस्त्यावर करण्यात आली. या कारवाईमुळे हातभट्यांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

संदीप कैलास मदाणे (२७, रा. वडजाई, ता. जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. धुळे जिल्ह्यातील हातभट्टीची दारू मालेगाव शहरात विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस मद्यवाहतूक करणाऱ्यांच्या मागावर असताना अ‍ॅटोरिक्षातून टायरमध्ये गावठी दारू वाहतूक केली जात असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी शुक्रवारी रात्री मालेगाव दरेगाव मार्गावर सापळा रचला होता. मालेगाव परिसरातील दरेगाव येथील एका पुलाखालून येणाऱ्या एमएच १८ डब्ल्यू ८९७२ अ‍ॅपे रिक्षास पोलिसांनी अडवून तपासणी केली असता हा संशयित मद्यसाठ्यासह पोलिसांच्या हाती लागला. रिक्षा झडतीत पुढील सिटाच्याखाली लोखंडी बॉक्समध्ये सफेद रंगाच्या दोन गोण्यांमध्ये टायरच्या ट्युबमध्ये अंबट उग्र वासाची १०० लिटर गावठी दारू मिळून आली. चालकाच्या चौकशीत पिंप्री (जि.धुळे) येथील भाईदास उर्फ रायसिंग आहिरे याच्या दारू अड्डयावरून हे मद्य मालेगाव शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली त्याने दिली. संशयिताच्या ताब्यातून १०० लिटर गावठी दारू व ऍअ‍ॅपेरिक्षा असा १ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पवारवाडी पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरोधात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय दराडे, मालेगावचे अपर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे, सहाय्यक निरीक्षक संदिप दुनगहू, सुनिल आहिरे, हवालदार राजू मोरे, वसंत महाले, सुहास छत्रे, पोलिस नाईक राकेश उबाळे, देवा गोविंद, शिपाई फिरोज पठाण, रतिलाल वाघ आदींच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिग्नलवर गोंधळ;१७ जणांवर गुन्हा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पुणे रोडवरील उपनगर सिग्नलच्या पुढे भररस्त्यात आरडाओरड करून गोंधळ घालणाऱ्या १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आल्याचे समजताच या संशयितांनी आपआपल्या वाहनांमधून धूम ठोकली होती. मात्र, गस्त पथकावरील पोलिसांनी एका वाहनाच्या क्रमाकांवरून सर्वांचा शोध घेतला.

आदित्य भानुदास सैंदाणे (रा. शिवाजीनगर, उपनगर), हर्षद सोनावणे (रा. टागोरनगर), प्रसन्ना केदार (रा. नाशिकरोड), अनिश डुकले (रा. टागोरनगर), आदित्य शिंदे (रा. शिवाजीनगर, नाशिकरोड) व त्यांच्या १० ते १२ साथीदारांचा या घटनेत समावेश आहे. शुक्रवारी (दि. २) दुपारी अडीच वाजता पुणे रोडवरील उपनगर सिग्नलच्या पुढे हे संशयित आरडाओरड करीत होते. यावेळी उपनगर पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक संजय भोये व त्यांच्या सोबतचे बीट मार्शल येथे गेले. त्यांनी या संशयितांना हटकले. त्यानंतर आरडाओरड करणारे हे सर्व संशयित आपापल्या चारचाकी वाहनांत बसून निघून गेले. पोलिसांनी एमएच ०२ बीजे ०६१९ हा वाहनाचा नंबर नोंद करून घेत वाहनमालक व चालकाची माहिती घेतली. तेव्हा ही गाडी भानुदास सुखलाल सैंदाणे यांची असल्याचे समोर आले. हे वाहन संशयित आदित्य सैंदाणे हा बाहेर घेऊन गेल्याचे समजले. त्यानुसार संशयित आदित्य सैंदाणे याच्यासह त्याच्या १६ साथीदारांविरुद्ध बेकायदेशीर जमाव जमविल्याचा व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास एएसआय काकड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ऐन दिवाळीत रेल्वेगाड्या रद्द

0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

रेल्वे प्रवाशांना ऐन दिवाळीत गैरसोय सहन करावी लागणार आहे. दिवाळीपूर्वीचा रविवार म्हणजे नाशिककरांचा मुंबईला जाऊन खरेदी करण्याचा सुपर संडे. मात्र, ब्लॉकमुळे बहुतांश गाड्या रद्द करण्यात आल्याने रविवारच्या खरेदीचा बेत हुकणार आहे. येत्या रविवारी (ता. ४) इगतपुरी रेल्वेस्थानकात रेल्वेतर्फे महत्त्वाची कामे केली जाणार असल्याने काही गाड्या रद्द, तर काहींचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रविवारची मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस मनमाड-दौंड-कल्याणमार्गे धावणार आहे, तर एलटीटी- मनमाड- एलटीटी एक्स्प्रेस, मुंबई-भुसावऴ एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस, भुसावळ- पुणे- भुसावळ एक्स्प्रेस, इगतपुरी- मनमाड- इगतपुरी पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईला जाण्यासाठी नाशिककर प्रामुख्याने या गाड्यांचा आधार घेतात.

इगतपुरीत रविवारी पहाटे पावणेचारपासून दुपारी दोनपर्यंत ट्रॅफिक, पॉवर आणि एस अँड टी ब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंबईला जाणाऱ्या व मुंबईहून सुटणाऱ्या रेल्वेगाड्या ब्लॉकच्या काळात अर्धा ते दीड तास उशिरा धावतील, तर ब्लॉकनंतर अर्धा ते एक तास उशिरा धावतील. मध्ये रेल्वेच्या नव्या तिसऱ्या मार्गासाठी रूट रिले इंटरलॉकिंग पॅनल आणि यार्ड रिमॉडलिंग काम केले जात आहे. त्याचा परिणाम महिनाभरापासून गाड्यांवर होत आहे.

या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

- एलटीटी-गोरखपुर एक्स्प्रेस १०.५५ ऐवजी दुपारी एकला प्रस्थान करेल. अडीचपासून ते पावणेपाचपर्यंत ती आटगाव स्टेशनवर थांबून राहील. एलटीटी- गोरखपूर एक्स्प्रेस सकाळी ११.१० ऐवजी दुपारी १.२० वाजता सुटेल. दुपारी २.४० ते ४.५० या वेळेत ती वासिंद स्टेशनवर थांबून राहील.

- मुंबई-हावडा एक्स्प्रेस सकाळी ११.०५ ऐवजी दीडला प्रस्थान करेल. ही गाडी २.५० पासून ५.२० पर्यंत खडवली स्टेशनवर थांबेल. एलटीटी-पाटलीपुत्र एक्स्प्रेस रात्री ११.३५ ऐवजी ५ नोव्हेंबर रोजी पहाटे ४.३० वाजता निघेल. मुंबई-गोरखपूर विशेष गाडी २.२० ऐवजी पाच नोव्हेंबरला रात्री साडेबाराला निघेल.

- तीन नोव्हेंबरची पाटलीपुत्र-एलटीटी एक्स्प्रेस, छपरा-एलटीटी एक्स्प्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस, गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेस वाया अलाहाबादवरून आपल्या सुरुवातीच्या स्टेशनवरून नव्या वेळापत्रकानुसार धावेल. मुंबईला त्या उशिरा पोहोचतील.

या गाड्यांचा आज खोळंबा

- एलटीटी-दरभंगा एक्स्प्रेस दुपारी २.१३ पासून सायंकाळी पाचपर्यंत कसारा येथे थांबून राहील. एलटीटी-वाराणसी कामायनी एक्स्प्रेस २.२० पासून ४.५० पर्यंत खडवली स्टेशनमध्ये थांबेल. कल्याणमार्गे जाणारी एर्नाकुलम-हजरत निझ़ामुद्धीन मंगला एक्स्प्रेस २.५० पासून ४.५० पर्यंत आसनगाव येथे थांबेल. लखनौ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेस, तसेच बरेली- एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या भुसावळ मंडळ येथे थांबतील आणि आपल्या निर्धारित स्थानी उशिरा पोहोचतील.

या गाड्यांची मर्यादित धाव

नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिक रोड स्टेशनपर्यंतच धावेल. मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस नाशिकरोडहून प्रस्थान करेल. दोन नोव्हेंबरची राजेंद्रनगर- एलटीटी एक्स्प्रेस ठाण्यापर्यंतच धावेल.

मार्गात बदल

दोन नोव्हेंबरला सुटणारी हावडा-एलटीटी एक्स्प्रेस जळगाव-वसई रोड-दिवामार्गे, तर तीन नोव्हेंबरला सुटणारी अलाहाबाद-एलटीटी दुरांतो एक्स्प्रेस मनमाड-दौंड-कल्याणमार्गे धावली. रविवारी सुटणारी एलटीटी-कामाख्या एक्स्प्रेस आणि मुंबई-हुजूरसाहेब नांदेड तपोवन एक्स्प्रेस कल्याण-दौंड-मनमाडमार्गे धावेल. रविवारची जालना- दादर जनशताब्दी एक्स्प्रेस मनमाड-दौंड-कल्याणमार्गे आणि दादर- जालना जनशताब्दी एक्स्प्रेस कल्याण-दौंड-मनमाडमार्गे धावेल. रविवारची मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस मनमाड-दौंड-कल्याणमार्गे धावेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनैतिक संबंधाच्या संशयतातून युवतीची हत्या

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पती-पत्नी म्हणून एकत्र राहणाऱ्या जोडप्यात अनैतिक संबंधावरून झालेल्या भांडणात संशयित आरोपीने केलेल्या मारहाणीत साडेसतरा वर्षाच्या युवतीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास भद्रकाली परिसरातील मांतगवाडा येथे घडली. पोलिसांनी संशयितास लागलीच अटक केली.

गायत्री दिलीप थाटसिंगार (१७, रा. तपोवन) असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. तर हत्येप्रकरणी पोलिसांनी दिलीप थाटसिंगार (२१, मातंगवाडा) यास अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे मागील तीन महिन्यांपासून मांतगवाडा येथे पती पत्नी म्हणून एकत्र राहत होते. शुक्रवारी (दि. २) संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोघांमध्ये वाद झाले. यावेळी संशयित दिलीपने गायत्रीला जबर मारहाण केली. यामुळे बेशुद्ध झालेल्या गायत्रीला नागरिकांनी लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. गायत्रीच्या डोक्याला, डोळ्याला अनेक गंभीर जखमा झाल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलिसांनी तातडीने संशयित दिलीपला अटक केली. या गुन्ह्याबाबत बोलताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांनी सांगितले की, संशयित आरोपी आणि अल्पवयीन मुलगी एकत्र राहत होते. दोघांच्या नातेवाइकांनी त्यांचे लग्न झालेले नाही, असे सांगितले. गायत्री येत्या सोमवारी अन्य एका मुलाबरोबर निघून जाणार असल्याची माहिती दिलीपला समजली होती. त्याचा राग आल्याने शुक्रवारी संध्याकाळी दोघांमध्ये वाद झाला. त्यातून दिलीपने गायत्रीला बेदम मारहाण केली. अनैतिक संबंधातून हा सगळा प्रकार घडला असून, संशयित आरोपीस अटक करण्यात आली असल्याचे पीआय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्र्यंबक रोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात पोहणाऱ्या १८ वर्षाच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी घडली असून, यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

देवव्रत सदाशिव गायकवाड (१८, रा. नवज्योती सोयायटी, एसटी वर्कशॉपपाठीमागे गंजमाळ) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. देवव्रत आज सकाळी सात वाजेच्या सुमारास नाशिक महापालिकेच्या सावरकर जलतरण तलाव येथे पोहण्यासाठी आला होता. सव्वा सात वाजेच्या सुमारास तो पाण्यात पोहतानाच त्याने पाण्यात मान टाकली. काहीतरी गडबड असल्याचे ओळखत तेथे नियुक्त असलेले जीव रक्षक राजू वायकर यांनी लागलीच पाण्यात उडी घेऊन देवव्रतला पाण्याबाहेर काढले. मात्र, तोपर्यंत बराच उशिर झाला होता. नाका तोंडात पाणी गेल्याने घटनेची माहिती लागलीच पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुबारस : दीपोत्सवाची नांदी

0
0

वैद्य विक्रांत जाधव

दिवाळीचे सर्व दिवस हे संस्कारांचे आहेत. प्रत्येक दिवसाला एक वेगळे महत्त्व असून, त्यायोगे शरीर-मनोपोषक संस्कार केले गेले आहेत. हे सर्व संस्कार आरोग्यवर्धन करणारे, तृप्त करणारे आहेत. पहिला दिवस द्वादशी हा दिवाळीमध्ये गणला जातो. आज वसुबारस असून, प्रथम गायीला स्मरण करून वंदन करून दीपोत्सवाची सुरुवात होते.

वसुबारस हा दिवस गाय व गोऱ्ह्याची पूजा केली जाते. या दिवसाला गुरुद्वादशी असेही म्हणतात. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हिंदू संस्कृतीनुसार गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो म्हणून तिचे पूजन केले जाते, तो दिवस म्हणजे वसुबारस होय. या दिवशी श्री विष्णू भगवान यांच्याकडून गायीमार्फत जलतत्त्व पृथ्वीवर येत असते, अशी कल्पना आहे. त्यामुळे ते तत्त्व गायीकडून आपल्याकडे येण्यासाठी या दिवशी गायीची पूजा करण्यास शास्त्राने सांगितले आहे, ज्यामुळे आपल्यामध्ये पृथ्वीवरील सर्व जिवांवर विष्णूतत्त्व संक्रमित होईल. याचा परिणाम मनावर होताना दिसतो.

धर्मशास्त्राने दिवसाला आहाराची जोड देऊन शरीर व मनाचे स्वास्थ्य अबाधित ठेवण्याची योजना केली आहे. आयुर्वेदानुसार गायीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंचगव्य हे अनेक पूजा, धार्मिक विधीमध्ये वापरले गेले आहे, ते याच तत्त्वाने. गायीचे दूध हे सर्वश्रेष्ठ सांगितले आहे. गायीचे तूप हे उत्तम जखम भरणारे असून, त्यामुळे अनेक आजार बरे होतात. गोमूत्र हे औषधी असून, त्यात सोन्याचा अंश असल्याचे नुकतेच संशोधनात सिद्ध झाले आहे. अशा उपयुक्त असलेल्या गायीचे पूजन करून तिच्याप्रति स्नेहभाव व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपण आपणास उपयोगी सर्व प्राण्यांचे पूजन करतो त्याचाच हा दिवस होय. गायीबरोबर तिच्या वासराचे पूजन करणे म्हणजे मातृत्व भावाचे पूजन करणे आहे. गायीचे तिच्या वासराप्रति असलेले वात्सल्य सर्वांना पूजनीय आहे. त्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी सायंकाळी गायीची तिच्या वासराबरोबर पूजा करून तिला बाजरी व गूळ खाण्यास देतात. तिच्या पायांवर दूध-पाणी टाकले जाते. नंतर गायीचे औक्षण केले जाते. या दिवसाला गुरुद्वादशी असेही म्हणतात. गुरूंचे पूजन करून कृतज्ञता व्यक्त केली जाते. प्रत्येक व्यक्तीला गुरू असतोच, त्या गुरूचे पूजन या दिवशी करतात. अशा तऱ्हेने गुरू, गोमाता आणि आनंद याचा मेळ वसुबारसच्या दिवशी होतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मराठा आरक्षण नोव्हेंबरमध्येच

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठा आरक्षणाची प्रक्रिया नोव्हेंबरअखेरपर्यंतच पूर्ण केली जाईल, असा दावा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी केला. पिंपळगाव बसवंत येथे शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या जाहीर सभेत बोलताना पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत हे महत्त्वपूर्ण वक्तव्य केले.

मराठा क्रांती मोर्चाने आरक्षणासाठी पुन्हा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा दिल्यानंतर महसूलमंत्री पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचा दावा केला. युतीचे सरकार मराठा आरक्षण निश्चितच देणार असून, त्यासंबंधी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल १० ते १५ नोव्हेंबरपर्यंत येणार आहे. त्याची योग्य ती पूर्तता झाल्यानंतर कायद्याच्या कसोटीवर टिकणारे मराठा आरक्षण लागू होईल, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाने सरकारला नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने नोव्हेंबरपर्यंत आरक्षण दिले नाही, तर राज्यभर पुन्हा आंदोलने करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाकडे सर्वांचे लक्ष लागून असतानाच पाटील यांनी युती सरकारच्या काळातच मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल असे सांगत, मराठा आरक्षणासाठी नियुक्त केलेल्या समितीचा १० ते १५ नोव्हेंबरपर्यंत अहवाल येणार असल्याचे स्पष्ट केले. हा अहवाल आल्यानंतर त्याची छाननी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कायद्याच्या कसोटीवर टिकेल असे आरक्षण आमचे सरकार देणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

गुन्हे मागे घेण्याचा निर्णय

मराठा आरक्षणासाठी झालेली आंदोलने आणि भीमा कोरेगाव दंगलीनंतर उसळलेल्या हिंसाचारात ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, अशांचे सर्व गुन्हे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. ज्या ठिकाणी दहा लाखांपेक्षा कमी नुकसान झाले असेल, अशा ठिकाणचे सर्व गुन्हे मागे घेतल्याचे सांगत त्याचा 'जीआर' शुक्रवारीच काढल्याचे त्यांनी या वेळी स्पष्ट केले. त्यासाठी उद्धव ठाकरेंनीही पाठपुरावा केल्याची पुश्ती त्यांनी जोडली. पुढील वर्षभरात राज्यात ज‌वळपास ५२ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते होणार असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

निफाड तालुक्यातही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार अनिल कदम यांनी केल्यानंतर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचा दावा केला. सरकारने १५१ तालुक्यांनंतर राज्यातील २६८ मंडळांमध्येही दुष्काळ जाहीर केला आहे. त्यासाठी एक समिती नियुक्त केली असून, ही समिती दुष्काळी भागांची पाहणी करणार आहे. त्यांच्या अहवालानंतर या भागातील शेतकऱ्यांनाही सरकार सर्व ती मदत करेल, असे आश्वासन त्यांनी या वेळी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जायकवाडीला आज पोहचेल पाणी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जायकवाडी धरणाला गंगापूर धरणातून पाणी सोडण्याचा वाद संपल्यानंतर शनिवारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाणी जायकवाडीला लवकर कसे पोहचेल यावर लक्ष केंद्रीत केले. दुपारपर्यंत दारणा, मुळा व निळवंडे धरणातून ५ टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला. रविवारी सकाळपर्यंत हा ६.२० टीएमसी होण्याचा अंदाज आहे. मुळा धरणातील रात्रीपर्यंत सर्व पाणी विसर्ग झालेले असल्याचेही जलसंपदा विभागाने सांगितले.

जलसंपदा विभागाने मुळा व दारणाचे सोडलेले सर्व पाणी रविवारी सायंकाळीपर्यंत पोहचेल असे नियोजन केले आहे. पण, निळवंडेचा विसर्ग कमी झाल्यामुळे उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जायकवाडी धरणात ८.९९ टीएमसी पाणी नाशिक व नगर येथील धरणातून देण्याची प्रक्रिया गुरुवारी सुरू झाली. जिल्ह्यातील गंगापूर व दारणा धरणातून सकाळी १० वाजता पाणी सोडण्यात आले. पण, नाशिकला पाण्याची टंचाईची स्थिती निर्माण होवू नये म्हणून सायंकाळी त्याला स्थगिती दिली. त्यामुळे या धरणातून ६०० दशलक्ष घनफुटातून फक्त ८० दशलक्ष घनफुट पाण्याचा विसर्ग झाला. या निर्णयामुळे शनिवारी सर्व पाणी दारणा धरण समुहातून सोडण्यात येत आहे.

पाणी सोडल्यानंतर ठिकठिकाणी नदी प्रवाह, पाझर तलाव व सर्व माहिती औरंगाबाद व नाशिक व नगरचे पथक घेत आहे. त्यामुळे पाण्याचे मोजमाप अचूक व्हावे यासाठी जलसंपदाचा प्रयत्न आहे. पाण्याची चोरी होवू नये यासाठी काळजी घेण्यात येत आहे. पाणी विसर्ग होत असलेल्या प्रवाह मार्गावर कालवा निरीक्षक व पोलिसांचा कडा पहारा आहे.

असे पोहचते पाणी

नाशिक जिल्ह्यात असलेल्या दारणा व जायकवाडीचे अंतर १२० कि.मी आहे. दारणातून पाणी सोडल्यानंतर ४८ तास लागतात. तर अहमदनगर जिल्ह्यायातील मुळा धरणाचे अंतर ५२ असून या धरणातून २४ तासात पाणी जायवाडीला पोहचते. तर निळवंडे धरण ते जायवाडी अंतर १५० कि.मी असून येथे ५० तास लागतात. पण, हे अंतर व तासाचा वेग पाण्याचा विसर्गावर अवलंबून आहे.

दुपारपर्यंत ५ टीएमसी पाणी

जायवाडीसाठी मुळा धरणातून १.९० टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. या धरणातून शनिवारी दुपारपर्यंत १.६० टीएमसी पाणी सोडले गेले. रविवारपर्यंत १.९० पाणी पोहण्याचा अंदाज आहे. निळवंडे धरणातून ३.८५ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. दुपारपर्यंत १.२० टीएमसी पाणी सोडण्यात आले. रविवारपर्यंत १.५० टीएमसी पाणी पोहचेल. दारणा धरणातून ३.२४ पाणी दिले जाणार आहे. त्यात गंगापूरच्या पाण्याचा समावेश आहे. या धरण समुहातून २.२० पाणी दुपारपर्यंत गेले आहे. रविवारपर्यंत २.८० टीएमसी पाणी जायकवाडाली पोहचेल

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बोंडअळीच्या नुकसान भरपाईपोटी द्यावयाच्या मदतीचा आठ कोटी ७७ लाख रुपयांचा तिसरा हप्ता जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. दुष्काळाचा सामना करणाऱ्या येवला आणि मालेगावमधील ३८ हजार ६३ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही मदत वर्ग करण्यात येणार आहे. दिवाळीच्या तोंडावर ही मदत आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गतवर्षी खरीपात सात तालुक्यांमध्ये कापसाच्या पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे या तालुक्यांमधील ५३ हजार ३९३ कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने या नुकसानीचा पंचनामा करून त्याचा अहवाल सरकारकडे पाठविला. नुकसान भरपाईपोटी २६ कोटी ३० लाख रुपयांची मागणी करण्यात आली. त्यानुसार एप्रिल २०१८ मध्ये पहिला तर जुलैमध्ये दुसरा हप्ता प्रशासनाला प्राप्त झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांना या मदतीचे वाटप करण्यात आले. आतापर्यंत १७ कोटी ५६ लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आली. आता पुन्हा मालेगावसाठी पाच कोटी ३९ लाखाची तर येवल्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तीन कोटी ३७ लाख रुपयांची मदत प्राप्त झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली आहे. सोमवारनंतर ही मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बाजारपेठा ओसंडल्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील विविध कंपन्यांमधील कामगारांसह खासगी क्षेत्रातील नोकरदारांनी सुटीची पर्वणी साधत शनिवारी सहकुटुंब दिवाळीच्या खरेदीला पसंती दिल्याने मेनरोडसह शहर, तसेच उपनगरांतील बाजारपेठा गर्दीने ओसंडल्या होत्या.

कपडे, फराळ, पणत्या, आकाशकंदील, रोषणाई यांसह इतर वस्तूंच्या खरेदीला उधाण आले होते. मेनरोड, दहीपूल, रविवार कारंजा या मुख्य बाजारपेठेसह मॉल्स व उपनगरांतील बाजारपेठांत रात्री उशिरापर्यंत खरेदीचा उत्साह टिकून होता. ग्राहकांची वाढती गर्दी लक्षात घेत दुपारी ४ नंतर मुख्य बाजारपेठेकडे जाणारे रस्ते पोलिसांनी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केले होते.

विक्रेत्यांना दिलेल्या ऑफर्सची लयलूट यावेळी ग्राहकांनी केली. पणत्या, आकाशकंदील आदींसह फराळाच्या विविध पदार्थांची मेनरोडसह इतर बाजारपेठांत चलती दिसून आली. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, वाहन, दागिन्यांच्या बुकिंगलाही ग्राहकांची विशेष पसंती दिसली. लहानग्यांसह ज्येष्ठांपर्यंत सर्वांमध्येच दिवसभर खरेदीचा उत्साह टिकून होता.

--

\Bआजही उसळणार गर्दी\B

दिवाळीच्या अगोदरचा रविवार असल्याने आजही मुख्य बाजारपेठेत ग्राहकांची सकाळपासूनच गर्दी उसळण्याची चिन्हे आहेत. ग्राहकांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. बाजारपेठेत बहुतांश ठिकाणी बॅरिकेडिंग करीत साध्या वेशातील पोलिस तैनात करण्यात आले आहेत. ग्राहकांची गर्दी वाढू लागल्यास रविवार कारंजा, शालिमार व रेड क्रॉसकडून मेनरोडकडे जाणारे सर्व रस्ते वाहनांना बंद करण्यात येतील. दुपारी ४ नंतर वाहनांना प्रवेश बंद असेल, असे नियोजन पोलिसांनी केले आहे.

--

\Bयेथे करावे पार्किंग

\Bग्राहकांना वाहनांचा त्रास होऊ नये म्हणून मेनरोड परिसरात जाणारे रस्ते सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहेत. त्यामुळे बी. डी. भालेकर मैदानाचा वापर ग्राहक पार्किंगसाठी करू शकतात. रेड क्रॉस, शालिमार व रविवार कारंजा भागात पोलिसांच्या सांगण्यानुसार वाहने पार्किंग करू शकतात. चुकीच्या ठिकाणी वाहने पार्किंग करू नये. पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

\B--

कोंडी अन् पोलिसांची अरेरावी

\Bदिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याने शालिमार, अशोक स्तंभ, रविवार कारंजा परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसले. शालिमार परिसरात रस्त्याच्या कडेला लावलेली वाहने वाहतूक पोलिसांनी टोइंग केल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. परिसरात राहणाऱ्या नागरिकांची वाहनेही मेनरोडकडे जाऊ देत नसल्याने पोलिस आणि रहिवाशांमध्ये वादावादी झाली. पोलिसांनी अरेरावी केल्याचा आरोप नागरिकांनी केला.

००००००००००००००००००००००००००००००

पॉइंटर्स...

--

उत्सव नात्यांचा -२

मुंढेंवर प्रश्नांची सरबत्ती -३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोर्टात आज पुन्हा कोम्बिंग

0
0

कोर्टात पुन्हा कोम्बिंग

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी आज, शनिवारी सकाळी जिल्हा कोर्टात कोम्बिंग ऑपरेशन राबवत ४० संशयितांना ताब्यात घेतले. या सर्वांची चौकशीनंतर त्यांना संध्याकाळी सोडून देण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्हा कोर्टात राबता असलेल्या सराईतांची चांगलीच पंचायत झाली.

पंचवटीतील भेळ विक्रेता सुनील वाघ याच्या हत्येप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या खटल्याची सुनावणी सुरू असून, आज गुन्ह्यातील संशयितांना कोर्टात हजर करण्यात आले होते. दुसरीकडे धुळे येथील एका मोक्का प्रकरणाच्या सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम हजर होते. या पार्श्वभूमीवर पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रकाली, मुंबई नाका, गंगापूर, सरकारवाडा, पंचवटी आणि म्हसरूळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांनी कोर्टात येणाऱ्या नागरिकांची तपासणी सुरू केली. यात ४० संशयित नागरिक पोलिसांच्या हाती लागले. हे संशयित आरोपींना मदत करण्यासाठी हजर आले होते. या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. संध्याकाळी कोर्टाचे कामकाज संपल्यानंतर सर्वांना सोडून देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images