Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पणतीने उजळल्या दिवंगतांच्या स्मृती

$
0
0

'कुसुमाग्रज'मध्ये दिवंगत शिक्षिकांचे स्मरण

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

समाजाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या आणि संस्कारक्षम पिढ्या घडवित अनेकांचे संसार उजळविणाऱ्या दिवंगत शिक्षिकांच्या नावे एकेक आकाशकंदील आणि पणती पेटवून दिवाळीनिमित्त अनोख्या पद्धतीने त्यांना वंदन करण्यात आले. निमित्त होते कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित प्रकाशयात्रा आठवणींची या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे.

कुसुमाग्रज स्मारकामध्ये रविवारी सायंकाळी हा उपक्रम राबविण्यात आला. उपक्रमाचे यंदाचे हे चवथे वर्ष होते. यंदाच्या प्रकाशयात्रेमध्ये दिवंगत ९९ शिक्षिकांचे स्मरण करण्यात आले. नाशिकचं वैभव वृद्धिंगत करणाऱ्या आणि नाशिकरांना खऱ्या अर्थाने शिक्षित करणाऱ्या दिवंगत स्त्री शिक्षिकांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचिव मो. स. गोसावी उपस्थित होते. साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण आणि समाजसेवा हे कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रजांचे आवडीचे विषय होते. काळाच्या पडद्याआड गेलेल्या शिक्षिकांच्या नावे आकाशकंदील तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या हस्ते एक पणती प्रज्ज्वलित करून स्मृतींना उजाळा देण्यात आला. गोसावी यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये मनोरमा शिरवाडकर यांच्या नावे आकाशकंदील आणि पणती प्रज्वलित करून या आठवणींच्या प्रकाशयात्रेला सुरुवात झाली. मनीष चिंधडे, डॉ. श्रीया कुलकर्णी, अपर्णा क्षेमकल्याणी, सुहास जाधव, भुषण मटकरी, नुपूर सावजी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

वातावरणात उमटली भावूकता

यावेळी मनोगत व्यक्त करताना गोसावी म्हणाले, की शिक्षक हे समाजावर संस्कार करण्याचे काम करीत असतात. समाजाच्या जडणघडणीला दिशा देणाऱ्या आणि सुसंस्कृत आणि संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या शिक्षकांचा सरकारने नव्हे तर जनतेने गौरव करायला हवा, असे कुसुमाग्रज म्हणत असत. ही प्रकाशयात्रा त्या दिशेने टाकलेले आश्वासक पाऊल आहे. समाज ज्या मूल्यांवर चालतो ते मूल्य निर्माण करण्यामध्ये शिक्षकांची भूमिका मोलाची राहिली आहे. दिवाळीपूर्वी अशा दिवंगत शिक्षिकांना वंदन करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. दिवंगत ९९ शिक्षिकांची माहिती चित्रफितीद्वारे सादर होत असतानाच संबंधित शिक्षिकांच्या नातलगांकडून एक पणती प्रज्वलित केली जात होती. यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना उजाळा मिळत असल्याने वातावरण अत्यंत भावूक बनले होते.

फोटो : सतीश काळे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनसेचे निवेदन

$
0
0

आरोपींवर कारवाईसाठी

मनसेचे निवेदन

नाशिक : गुन्हेगारी आटोक्यात आणावी, तसेच तपोवन परिसरातील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने भद्रकाली पोलिस स्टेशनच्या निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या वेळी मनसे महिला सेनेच्या शहराध्यक्षा रिना सोनार, सिडको विभाग अध्यक्ष अरुणा पाटील, शहर उपाध्यक्षा संगीता सोनवणे, सुनीता येलमामे, रोशनी चौधरी आदी उपस्थित होते.

बागमारला कोठडी

नाशिक : चिरायू नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज देण्याच्या नावाखाली मालमत्तेची कागदपत्रे आणि कर्ज मंजूर करण्यासाठी दिलेले १२ लाख रुपये हडपल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राहुल बागमार/जैन या संशयितास आज, रविवारी इंद्रकुड आणि रविवार कारंजा या भागात तपासासाठी घेऊन गेले. कोर्टाने बागमारला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिवाळसणात प्रवाशांना दिलासा!

$
0
0

वाहतुकदारांनी फसवणूक केल्यास थेट 'आरटीओ'त तक्रारची संधी

saurabh.bendale@timesgroup.com

Tweet : SauabhbMT

नाशिक : दिवाळीच्या सुटीत रेल्वे, परिवहन मंडळाच्या बसेस गर्दीने फुल्ल असतात. परगावी जाण्यासाठी खासगी वाहतुकीचा पर्याय स्वीकारावा लागतो. प्रवाशांची गरज आणि गर्दीचा फायदा घेत बहुतांश खासगी वाहतुकदार दुप्पट भाडे आकारणी करतात. पैसे व इतर बाबतीत होणाऱ्या फसवणुकीविरोधात तक्रार करावी तरी कोठे, असा प्रश्न प्रवाशांना पडतो. मात्र, आरटीओ म्हणजेच, प्रादेशिक परिवहन विभागात खासगी वाहतुकदारांविरोधात तक्रार करता येणार आहे. प्रवाशांची तक्रार आल्यास संबंधित वाहतूकदारावर निश्चित कारवाई होईल, असे आरटीओ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दिवाळीच्या सुटीत पर्यटन किंवा नातेवाइकांकडे जाण्यासाठी खासगी बस, टॅक्सी यांचा पर्याय निवडला जातो. प्रवाशांकडून येणारी मोठी मागणी लक्षात घेता, वाहतूकदार नेहमीच्या भाडे शुल्कापेक्षा दुप्पट किंवा त्यापेक्षा अधिक भाडे आकारतांना दिसून येतात. तसेच खासगी वाहनांमध्ये अनेकदा क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी कोंबले जातात. त्यामुळे दुप्पट पैसे मोजूनही प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. खासगी बस व वाहने अनेकदा नियोजित वेळेपेक्षा उशिराने निघतात. प्रवाशांच्या नव्हे तर चालकांच्या सोयीनुसार थांबे घेतले जातात, प्रवाशांना योग्य सोयीसुविधा पुरविल्या जात नाहीत. त्यांच्याशी उर्मटपणे बोलले जाते, असे अनेक अनुभव प्रवाशांना येतात. याविरोधात आवाज उठविण्यासाठी प्रवाशांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा, असे आवाहन 'आरटीओ'ने केले आहे.

येथे करा तक्रार

राज्य परिवहन विभागाच्या https://transportcomplaints.mahaonline.gov.in/ या वेबसाइटवर प्रवासी तक्रार नोंदवू शकतात. प्रवाशांनी अधिक माहितीसाठी ०२२- ६२४२६६६६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.

अशी करता येणार तक्रार

- तक्रारदाराची माहिती : नाव, संपर्क क्रमांक, पत्ता व इ-मेल नोंदवावा लागतो.

- तक्रारीचा तपशील : वाहन क्रमांक, तक्रारीचे कारण, तक्रारीची माहिती, तक्रारीशी संबंधित फोटो

- वाहनचालक, ऑपरेटर किंवा मालकाचे चुकीचे वर्तन, जादा भाडेआकारणी तसेच इतर तक्रारी नोंदविता येतात.

- मोबाइलच्या माध्यमातून नोंदविण्यात आलेल्या तक्रारीचे ट्रॅकिंग करता येणार

- तक्रारसंदर्भात केलेल्या कार्यवाहीची माहिती तक्रारदाराला ऑनलाइन पाहता येते.

दिवाळीच्या सुटीत किंवा इतरही वेळी खासगी वाहतुकदारांनी प्रवाशांची लूट केली. त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्याल्या जात नाहीत. प्रवाशांनी याविरोधात ऑनलाइन तक्रार दाखल करावी. प्रवाशांनी तक्रारीत योग्य माहिती नमूद केल्यास संबंधित वाहतूकदारापर्यंत पोहोचण्यास मदत होते. आरटीओकडून त्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. फसवणुकीच्या विरोधात प्रवाशांनी स्वतःहून पुढाकार घेत तक्रारींची नोंद करावी.

- विनय आहिरे,

सह प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक

खासगी बस ऑपरेटर प्रवाशांना चुकीची माहिती देतात. बस उशिराने सोडतात. दिवाळीच्या सुटीत हमखास भाडेवाढ होते. पुणे-नाशिक प्रवास करताना त्यांच्या सोयीनुसार अनेक ठिकाणी थांबा घेतात. प्रवाशांनी बसमधली सीट फुल्ल असूनही कॅबिनमध्ये प्रवासी बसवतात. या विरोधात तक्रार केल्यास ऑपरेटर उडवाउडवी करतात. त्यामुळे आरटीओच्या या नव्या प्रणालीचा आम्ही प्रवाशांना निश्चितच फायदा होणार आहे.

- पुष्कर तिवारी, प्रवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिन दिन दिवाळी, धांदल उडवी अवकाळी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरासह जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये वादळवारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवाळीनिमित्त खरेदीचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच पावसाच्या सरी कोसळू लागल्याने व्यावसायिकांसह सर्वांचीच धांदल उडाली. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासूनच वातावरणातील उकाडा वाढला असून, त्यामुळे थंडी काहीशी लांबणीवर पडणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

काही दिवसांपासून उकाडा वाढत असल्याचा अनुभव शहर आणि जिल्हावासीय घेत होते. ३१ ऑक्टोबर रोजी १३.५ अंश सेल्सिअसवर असलेले किमान तापमान अवघ्या चार दिवसांत २२.१ अंश सेल्सिअसवर पोहोचले. गेल्या चार दिवसांत किमान तापमान तब्बल आठ अंश सेल्सिअसने वाढले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता मुंबई हवामान विभागाने वर्तविली होती. नाशिकमध्येही पावसाच्या हलक्या किंवा मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला होता. ढगाळ हवामान असल्याने रविवारी सकाळपासूनच उकाडा जाणवत होता. दुपारनंतर तो अधिकच वाढल्याने साडेचारच्या सुमारास नाशिकरोडसह द्वारका, आडगाव नाका, मुंबई नाका परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. दिवाळीनिमित्त खरेदीची धामधूम सुरू असतानाच बिगरमोसमी पावसाने रविवारी दुपारनंतर शहराच्या विविध भागांसह सिन्नर, दिंडोरी तालुक्यांमध्ये जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसाने व्यावसायिकांसह खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच धांदल उडविली. शहरात बहुतांश भागात वेगवेगळ्या वेळेत सुमारे अर्धा तास पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह आलेल्या पावसामुळे रस्त्यांवर तळी साचली. सिन्नरसह दिंडोरी, बागलाण, मालेगाव, इगतपुरी तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. येवला, चांदवड, पेठ, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण असले तरी पाऊस झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाच प्रकरणी दोघांना पाच वर्षांची सक्तमजुरी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तक्रारदाराच्या वैद्यकीय उपचारांच्या खर्चापोटी पावणेतीन लाखांचे बिल जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठविण्यासाठी २१ हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांना न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील तिसऱ्या संशयिताची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, एका तक्रारदारास त्याच्या वैद्यकीय उपचारांसाठी झालेल्या खर्चापोटी २ लाख ८८ हजार रुपयांचे बिल मंजुरीसाठी वैद्यकीय पडताळणी प्रमाणपत्रासह जिल्हा शल्य चिकित्सकांकडे पाठवायचे होते. या कामासाठी शहरातील शासकीय सामान्य रुग्णालयातील सहायक अधीक्षक पदावरील रवींद्र चुडामण बाऱ्हे आणि कक्ष सेवक सुदाम लक्ष्मण पाटील यांनी तक्रारदाराकडे २१ हजार रुपयांची लाच मागितली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली असता विभागाने सापळा रचून २५ फेब्रुवारी २०१० रोजी बाऱ्हे व पाटील यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून सरकारवाडा पोलिसात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. यानंतर या दोघांवर नाशिक न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

खटल्याचा निकाल शनिवारी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांच्या न्यायालयाने देताना बाऱ्हे व पाटील यांना दोषी ठरवत कलम ७ प्रमाणे पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ वर्ष साधी कैद आणि कलम १३ प्रमाणे पाच वर्षे सक्तमजुरी, १० हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ वर्ष साधी कैद अशी शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणातून डॉ. आसाराम दादासाहेब भालसिंग यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. सरकार पक्षातर्फे खटल्याचे कामकाज अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पी. पी. जाधव यांनी पाहिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेच्या पर्समधील दागिन्यांवर डल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिलेच्या खांद्यास अडकविलेल्या पर्समधील पाकिटावर चोरट्यांनी डल्ला मारीत जवळपास पाऊणे चार तोळ्याचे दागिने चोरले. चोरीची घटना शनिवारी (दि. ३) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास सीबीएस येथे घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तुळशीदास रमाकांत आहेर (रा. अंबड लिंकरोड, शिवराज सोसायटी) यांनी चोरीची फिर्याद दिली. तुळशीदास यांच्या पत्नी स्वाती यांच्या पर्समधील दागिने चोरीस गेले. खांद्याला अडकविलेली पर्स उघडून चोरट्यांनी आतील पाकीट हातोहात काढले. पाकिटात २८ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, तर नऊ ग्रॅमचे कानातील टॉप्स असा ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल होता.

लॅपटॉपसह बॅग लंपास

रिक्षाची प्रतीक्षा करणाऱ्या पलक रवींद्र आहुजा (१८, रा. महावीरनगर, ता. साक्री) या युवतीची लॅपटॉप बॅग चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. ३) सकाळी ७ वाजेच्या सुमारास संत कबीरनगर कॉर्नरजवळील नाल्याच्या पुलाच्या कठड्यावर घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांनी एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरील दोघा अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. चोरी झालेल्या बॅगमध्ये लॅपटॉप, दोन मोबाइल असा ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिथॉनमध्ये होणार युवा शेतकऱ्यांचा सन्मान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ह्युमन सर्व्हिस फाउंडेशनतर्फे नोव्हेंबर अखेर होणाऱ्या कृषिथॉन या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनात कृषी क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यात युवा शेतकरी, प्रयोगशील युवा कृषी संशोधक, प्रयोगशील युवा कृषी उद्योजक या गटात पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत, अशी माहिती कृषिथॉनचे आयोजक संजय न्याहारकर यांनी दिली.

प्रयोगशील युवा शेतकरी पुरस्काराच्या पुरुष गटातून रामहरी सुरासे (नाशिक), सचिन येवले (पुणे), शरद सुकासे (औरंगाबाद), दत्ता वाळके (अमरावती), विशाल भागडे (नागपूर) यांची निवड करण्यात आली आहे. तर महिला गटातून संगीता सांगळे (नाशिक), नेहा घावटे (पुणे), अर्चना माने (औरंगाबाद), कविता चांदोरकर (कोकण), विभा तालोकर (अमरावती), हर्षा कळंबे (नागपूर) यांची निवड करण्यात आली आहे. प्रयोगशील युवा कृषी संशोधक पुरस्कारासाठी डॉ. ओमप्रकाश हिरे (नाशिक), डॉ. जयदीप रोकडे (पुणे), डॉ. राहुल सूर्यवंशी (औरंगाबाद), डॉ. विशाल पांचाळ (कोकण), डॉ. अनंत इंगळे (अमरावती), डॉ. प्रशांत उंबरकर (नागपूर) यांची निवड करण्यात आली. प्रयोगशील युवा कृषी उद्योजक पुरस्काराकरिता अंकुश मोगल (नाशिक), समीर डोंबे (पुणे), प्रवीण घनघाव (औरंगाबाद), मयुरी आंबटकर (अमरावती), अनंत इखार (नागपूर) यांची निवड करण्यात आली आहे.

विशेष गौरवही होणार

विशेष गौरव पुरस्कार डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. प्रमोद येडगिरवार, सतीश पाटील, प्रशांत नाईकवाडी, यशवंत जगदाळे, संवरमल चौधरी यांना जाहीर झाला आहे. राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठानचे माजी सहसंचालक डॉ. सतीश भोंडे, ज्येष्ठ कृषी शास्रज्ञ डॉ. जयराम पुरकर व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांच्या समितीने या पुरस्कारांची निवड केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसामुळे द्राक्षबागांचे नुकसान

$
0
0

अवकाळी पावसाचा फटका द्राक्षबागांना बसणार असल्याने दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. ऑक्टोबरमध्ये द्राक्षबागांची पहिली छाटणी होते. त्यानंतर तेथे पेस्ट लावली जाते; परंतु पावसामुळे ही पेस्ट धुतली गेली असून द्राक्ष बागायतदारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. बागांवरील औषध फवारणीचा खर्च वाढणार आहे. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक शेतामध्येच ठेवले होते. पावसामुळे हे पीकही ओले झाले असून, त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. पाऊस आणि दमट हवामान यामुळे कांदा पिकावरही रोग पडण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘कथक रंग’तून प्रकाशपर्वाची नृत्यमय पहाट

$
0
0

…..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रचना ट्रस्ट, कीर्ती कलामंदिर, कलानंद व अभिजात या नृत्य संस्थांच्या वतीने दिवाळीची पहिली पहाट नृत्यमय झाली. या संस्थांच्या वतीने 'नायक नायिका-कथक रंग' या विशेष थीमवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

गंगापूर रोडवरच्या नवरचना विद्यालयात रविवारी सकाळी झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला पं. जितेंद्र अभिषेकींनी स्वरबद्ध केलेल्या कवी शंकर रामाणी यांच्या 'दिवे लागले रे' या गीतावर अभिजातच्या विद्यार्थ्यांनी दीपनृत्य सादर केले. त्यानंतर कलानंदच्या पुरुष नर्तकांनी 'धीरोदात्त नायक' सादर केला, तर त्याला जोडून कलानंदच्या मुलींनी 'ए री सखी' ही मुग्धा नायिका व कवित्ताच्या माध्यमातून 'अभिसारिका' नायिका सादर केल्या.

कीर्ती कलामंदिरच्या मुलींनी 'विरोहत्कंठिता' व 'अभिसारिका' नायिका सादर केल्या. अदिती पानसे यांनी डोह या कवितेवर 'मध्या' नायिका, तर रेखा नाडगौडा यांनी 'उत्तमा' नायिका मांडल्या. अभिसारिका नायिकामध्ये सख्याच्या भेटीची ओढ म्हणून त्याला भेटायला जाताना सगळी खबरदारी घेऊन ही नायिका निघाली. हळूच दबक्या पावलांनी ती दाराबाहेर पडणार इतक्यात तिचे पैंजण वाजले. कारण कोणाला चाहूल लागू नये म्हणून सगळी आभूषणे काढून ठेवताना ती पैंजण काढायचे विसरली. स्त्रियांची आभूषणे ही जितकी त्यांचे सौंदर्य वाढवतात, तितकीच सूनबाई कुठे आहेत याची सासूला, नणंदेला, भावजयीला चाहूल देतात. म्हणून ती म्हणते 'पायलियां बाजे रे मोरा सय्या' ही रचना सादर करण्यात आली. 'विरोहत्कंठिता' रचनेत नायिकेचा पती घरी न येता सौतन के घर गेला आहे; पण ही नायिका अशी आहे, की जी सखीला म्हणते त्याला तिकडे जायचे असेल तर जाऊ दे; पण मी ही जाणार त्याच्याकडे. त्याच्यावर रागावू शकत नाही; कारण आता त्याला जर ती प्रिय असेल तर असू दे; पण तरीही मला त्याला नजरेसमोरून दूर करायचे नाही. 'चल री सखी सौतन के घर' ही रचना रेखाताई नाडगौडा यांनी सादर केली.

विद्या देशपांडे यांनी 'केही कारन सुंदर हात जल्यो' या समस्यापूर्तीतून पं. रोहिणी भाटे यांनी नृत्यबद्ध केलेली मुग्धा सादर केली. कार्यक्रमाचा शेवट अभिजातच्या मुलींनी 'कट्यार काळजात घुसली' या नाटकातील 'मुलतानी ते भैरवी' या रागमालेतून विरोहत्कंठिता, मानिनी, प्रणयिनी अशा विविध नायिका मांडल्या. या कार्यक्रमाला पढंत ही सुमुखी अथनी व गुरू संजीवनी कुलकर्णी यांनी केली, तर तबला संगत पं. नितीन पवार यांनी केली. गायनाची साथ पुष्कराज भागवत व सुनील देशपांडे यांनी केली. मानसी केळकर व मधुरा जोशी यांचे सूत्रसंचालन होते. कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. उपस्थितांमध्ये अश्पाक खलिफा, मकरंद हिंगणे, डी. जे. हंसवाणी, विवेक गरूड, चारुदत्त कुलकर्णी, डॉ. भरत केळकर, डॉ. श्रीराम उपाध्ये, मकरंद महादेवकर, राधिका गोडबले आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाटक हे जिवंतपणाचे लक्षण

$
0
0

आज (दि. ५ नोव्हेंबर) मराठी रंगभूमीदिन. त्यानिमित्त प्रायोगिक नाटकाचे काय चाललेय हे जाणून घेण्यासाठी प्रायोगिक रंगकर्मी, दिग्दर्शक प्रवीण काळोखे यांच्याशी केलेली बातचीत...

---

-प्रायोगिक रंगभूमीचे मराठी रंगभूमीसाठी योगदान काय?

-प्रायोगिक रंगभूमी मला नेहमी चिरतरुण वाटते. त्यामुळे आशय, विषय, सादरीकरणात विविध प्रयोग करण्याची भीती तिला कधीच नसते. लौकिकार्थाने यश-अपयशाच्या गणितात तिचे मूल्यमापन करता येत नाही. प्रायोगिक रंगभूमी नेहमी पूर्वापार चालत आलेल्या संकेतांना छेद देत आपल्या आगळ्यावेगळ्या वाटा धुंडाळत असते. ही खऱ्या अर्थाने मराठी रंगभूमीची प्रयोगशाळा आहे. या प्रयोगातून (व्यावसायिक आणि समांतर) मराठी रंगभूमीला अविरत ऊर्जा पुरविली जाते. प्रायोगिक रंगभूमी कलावंतांची आणि प्रेक्षकांची अभिरुची समृद्ध करीत असते आणि त्याबरोबरच रंगभूमीला ऊर्जितावस्थेकडे नेण्याच्या प्रक्रियेत सगळ्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजवाते. कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करून कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपल्या सत्त्वाचे दान रंगभूमीला देत असते.

--

-नाटकाकडे येऊ पाहणाऱ्या तरुणाईला काय सांगाल?

-नाटकाकडे येऊ पाहणाऱ्या कलावंतांनी स्वतःला प्रश्न विचारायला शिकले पाहिजे. मी नाटक का करतोय? कुठल्या प्रकारचे नाटक मला करायला आवडते? मी नाटकाकडे जीविका म्हणून पाहतो की उपजीविका म्हणून? नाटकासंदर्भात अभिनय, दिग्दर्शन व लेखन याव्यतिरिक्त इतरही महत्त्वाच्या बाबी आहेत. त्यांचा सखोल अभ्यास मी करतो का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे शोधली पाहिजेत. आपल्या जगण्याशी संबंधित, आपल्या अनुभवाचे नाटक करायला हवे ना! समरसून जगता आले पाहिजे. भवतालातून, त्या अनुभवातून नाटक निर्माण व्हावे. समाजभान, निसर्गाचे अमर्याद सौंदर्य, माणूस, त्याचे जगण समजले पाहिजे. प्रत्येक नाट्य कलाकृती उत्तमापर्यंत पोहोचेलच असे नव्हे, तरीही प्रयत्नांत सातत्य हवे. नुसते नाटकाचे तंत्र शिकून कसे भागेल? आपण अभिरुचीपेक्षा कुठल्याही प्रकारच्या निव्वळ फॅशनकडे आकर्षित होत असू, तर स्वतःला तपासून पाहा. शरीराबरोबर मनाची मशागत व चांगल्या समविचारी मित्रांच्या संगतीने वाचन, मनन, चिंतन यातून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करुयात. नाटकात सर्व कला समाविष्ट आहेत. त्यामुळे डोळे, कान, नाक, त्वचा आणि जीभ या पंचेंद्रियांची संवेदनशीलता वाढविली पाहिजे. ज्यांना जगणे समजून घेता येईल त्यांनाच उत्तम नाटक करता येईल. स्वतःचा रंगमंच, प्रेक्षक स्वतः शोधला पाहिजे.

--

-रंगकर्मींनी पाळावयाची पथ्ये कोणती?

-नाट्य स्पर्धा महत्त्वाच्या असतातच, पण वर्षानुवर्षे आपले नाटक फक्त स्पर्धांच्या भोवऱ्यात न अडकवता त्याला मुक्त अवकाश प्राप्त करून देता आले पाहिजे ना! त्यामुळे आपले नाटक फक्त स्पर्धांमध्ये विरून न जाण्याचे पथ्य पाळले पाहिजे. स्वानंद, कलात्मकतेला आर्थिक गणिताची जोड़ दिली नाही, तर आपली नाट्यनिर्मिती, त्यांची प्रयोग संख्या यांना मर्यादा येऊन नाट्य संस्थेच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कलात्मकतेबरोबरच कलेचे व्यवस्थापन व कलेचे अर्थकारण दुर्लक्षित न करण्याचे पथ्य रंगकर्मींनी पाळले पाहिजे. रंगकर्मींनी समकालाचे भान बाळगल पाहिजे. स्वतःशी स्पर्धा करायला शिकले पाहिजे. रंगभूमीवर आपल्या भवताली आणि इतर ठिकाणीही घडणाऱ्या घटनांचा मागोवा घेता आला आणि उत्तम नाटक करण्याचे पथ्य पाळले, तर आपला हक्काचा प्रेक्षकवर्ग निर्माण होण्यावाचून राहणार नाही. तोच आपल्याला जगवेल.

--

-प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमी हस्तांदोलन करणार की नाही?

-प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीचा तसा परस्परांशी जवळचा संबंध आहेच. त्यांची जवळीक 'कभी हाँ, कभी ना' अशा स्वरूपाचीच पाहायला मिळते. वर्षानुवर्षे हा खेळ असाच सुरू आहे. त्या-त्या काळातील काही सन्माननीय नाटकांचा अपवाद वगळता त्यांचे अस्तित्व स्वतंत्रच पाहायला मिळते. थोड़ा वेळ लागेल, पण प्रेक्षक आणि कलावंतांच्या संपन्न अभिरुचीतून भविष्यात प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांच्या सीमारेषा पुसट होऊन उत्तम रंगभूमीची स्वप्ने पाहायला हरकत नाही.

--

-छोटा पड़दा आणि मोठ्या पडद्याचे आकर्षण नाटकाला आड येते का?

-या प्रश्नाचे उत्तर काही ठिकाणी हो असे आहे, तर काही ठिकाणी नाही असे आहे. रंगभूमीला तिच्या विविध टप्प्यांत अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. तरी तिचे अस्तित्व अबाधित राहिले आहे आणि राहील. प्रत्येक माध्यमाची शक्तिस्थळे वेगवेगळी आहेत आणि मर्यादाही वेगवेगळ्या आहेत. नाटकाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे नाटक हे जिवंतपणाचे माध्यम आहे. प्रेक्षक आणि कलावंत वर्तमानात एकाच वेळी एकाच ठिकाणी अनुभवांचे आदान-प्रदान करीत असतात. याचे आकर्षण सर्व कलावंत, प्रेक्षकांना असते. पण, बरीच चांगली कलावंत मंडळी जेव्हा छोटा पड़दा गिळंकृत करते तेव्हा तात्पुरती हानी होतेच. पण, या माध्यमांचा योग्य वापर करून प्रेक्षकांपर्यंत नाटक पोहोचायला मदत करून घेता येईल. नाटकाची जादू आणि आकर्षण कालातीत आहे.

(शब्दांकन : प्रशांत भरवीरकर)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे मागितल्याने महिलेचा विनयभंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

हात उसणे दिलेले पैसे मागितल्यानंतर दोघांनी मिळून महिलेचा विनयभंग केल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी सांयकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सातपूर परिसरातील आनंद छाया बस स्टॉपजवळील अवंतिका कॉम्प्लेक्ससमोरील रोडवर घडली.

या प्रकरणी सातपूर पोलिसांनी हरमणसिंग (गंगापूररोड) आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेच्या दिवशी पीडित महिला हरमण सिंग याच्याकडे आपले पैसे मागण्यासाठी गेली होती. हरमण आपल्या मित्रासमवेत कारमध्ये बसलेला होता. संशयित आरोपीने पैसे दिले नाही तसेच महिलेला कारमध्ये ओढून अश्लिल शेरेबाजी करीत विनयभंग केला. यानंतर संशयिताने दोन अज्ञात व्यक्तींना महिलेच्या घरी पाठवून दमबाजी केली. घटनेचा पुढील तपास पीएसआय चव्हाण करीत आहेत.

अपघातात तरुणाचा मृत्यू

भरधाव वेगातील आयशर ट्रकने दिलेल्या धडकेत विजय विलास म्हस्के (३१, रा. कोटमगाव, ता. नाशिक) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. ३) सांयकाळी पाऊणेसहा वाजेच्या सुमारास हॉटेल ज्युपिटरसमोर तसेच किर्लोस्कर कंपनीसमोर घडली. दुचाकीने (एमएच १५, बीव्ही, ४२२९) जाणाऱ्या विजयला टेम्पोने धडक दिली. अपघातानंतर अज्ञान वाहनचालक फरार झाला. या प्रकरणी सागर म्हस्के याने दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देवळालीत आत्महत्या

देवळाली कॅम्प येथील डेव्हल्पमेंट एरिया परिसरातील लाल साई सोसायटी येथे राहणाऱ्या दीपक अवसराम दलानी (४५) या व्यक्तीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. दलानी यांच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नसून, या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. दलानी यांनी शुक्रवारी (दि. २) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास काहीतरी विषारी औषध प्राशन केले होते. यानंतर त्यांनी देवळालीतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवारी (दि. ३) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.

दुचाकीची चोरी

नाशिकरोड : पळसे येथील साई विश्व अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केलेली नुरजहा मुस्तफा चौधरी (वय ४४) यांच्या मालकीची २० हजार रुपये किंमतीची ॲक्टिव्हा गाडी (एमएच ४१ एके ७५१७) ३० ऑक्टोबरच्या रात्री चोरीस गेली आहे. नूरजहा चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात संशयितांविरोधात नाशिकरोड पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

लोगो : क्राइम डायरी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ॲपवरील तक्रारी फोल!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

प्रभाग क्रमांक २३ मधील झाडांत हरवलेल्या पथदीपांची मुक्तता करण्यासाठी महापालिकेच्या ॲपवर तक्रार करूनदेखील ही समस्या सोडविण्याऐवजी विद्युत व उद्यान विभागाचे अधिकारी याची जबाबदारी एकमेकांवर ढकलून मोकळे झाले आहेत. त्यामुळे बहुचर्चित अॅपवरील तक्रारींचा फोलपणा उघड झाला आहे.

एकीकडे महापौर आणि महापालिका आयुक्त नागरिकांच्या समस्या जाणून त्यांची सोडवणूक करण्यासाठी शहरभर दौरे घेत असले, तरी नागरिकांच्या तक्रारी सोडविण्यासाठी महापालिकेचे विविध विभाग नागरिकांच्या तक्रारींची टोलवाटोलवी करण्यापलीकडे काही एक करीत नसल्याचे या प्रकारामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सध्या शहरातील समस्या सोडविण्यासाठी महापौरांकडून महापौर आपल्या प्रभागात, तर आयुक्तांकडून वॉक विथ कमिशनर हे उपक्रम सुरू आहेत. महापालिकेचे हे दोघेही कारभारी आपणच कसे भारी हे दाखविण्यासाठी जणूकाही शर्यतीत उतरले असल्याचे चित्र नागरिकांना बघावयाला मिळत आहे. मात्र, असे असले, तरी प्रत्यक्षात चित्र मात्र वेगळे आहे. महापालिकेच्या मोबाइल ॲपवर तक्रारी करूनही अनेक समस्या सुटलेल्या नसल्याचे दिसून आले आहे. काही तक्रारींवर खोटी माहिती देऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून अशा तक्रारी 'क्लोज' केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काही तक्रारी सोडविण्याची जबाबदारी कोणाची यावऱ्ऊन महापालिकेचे विभाग टोलवाटोलवी करीत आहेत. असाच अनुभव नुकताच नाशिक-पुणे महामार्गावरील प्रभाग २३ मधील नागरिकांना आला आहे. टागोरनगरमधील इरिगेशन कॉलनी परिसरातील काही पथदीप झाडांच्या फांद्यांनी झाकले गेले आहेत. परिणामी रस्त्यावर उजेड पडत नाही. विद्युत विभागाकडून या पथदीपांभोवतीच्या फांद्या तोडण्याची जबाबदारी उद्यान विभागाची असल्याचे सांगितल्याने, तर उद्यान विभागानेही फांद्या तोडण्याचे अधिकार आपल्याला नसल्याचे सांगितल्याने तक्रारदार नागरिक हैराण झाले आहेत. हे पथदीप महापालिकेच्या जागेवरील झाडांच्या फांद्यांनीच वेढलेले असूनही विद्युत व उद्यान विभागाने आपली जबाबदारी झटकली आहे.

प्रभाग रचनेचा बसतोय फटका

प्रभागरचनेमुळे शहरातील प्रभागांत समस्यांचा ढीग वाढला आहे. चार नगरसेवकांपैकी कोणत्याही नगरसेवकांकडून समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे. उलट काही नगरसेवक समस्यांबाबत दुसऱ्या नगरसेवकांकडे बोट दाखवित आहेत. काही नगरसेवक तर इतक्या किरकोळ समस्या सोडविण्यास आपल्याला सवड नसल्याचे सांगत असल्याने प्रभाग रचनेचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे.

पथदीपांभोवतीच्या झाडांच्या फांद्यांची तक्रार महापालिकेच्या मोबाइल ॲपवर केली होती. विद्युत विभागाने ही जबाबदारी उद्यान विभागाची असल्याचे कळवून तक्रार 'क्लोज' केली. उद्यान विभागाने संबंधित झाड खासगी की सार्वजनिक जागेवर आहे, याविषयीची कागदपत्रे मागितली. या दोन्हीही विभागांनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.

-तानाजी वाघ, तक्रारदार, प्रभाग २३

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलित-आदिवासींच्या हक्कांसाठी निदर्शने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सामनगाव एकलहरे हद्दीतील अतक्रमित घरे कायम करणे व ग्रामीण भागातील दलित-आदिवासी गावांना मूलभूत सुविधा मिळाव्या, यासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष कैलास पगारे, जिल्हाध्यक्ष शशी उन्हवणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

सामनगाव ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक ४ मध्ये दलित-आदिवासी असल्याने दिवाबत्ती, रस्ता, शौचालय, पाणी, घरकुल या मूलभूत सुविधांपासून हेतू पुरस्करवंचित ठेवण्यात येते. क्रेंद व राज्य सरकारने २०२२ पर्यंत सर्वांना घरे देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. शासकीय जागेवरील अतक्रमण नियमित करून मंजुरी देण्यात आलेली आहे. पण, त्यासाठी ग्रामपंचायत प्रयत्न करत नाही. तसेच दिंडोरी तालुक्यातील मावडी, जऊळके, येवला तालुक्यातील मुखेड येथील प्रश्नही या निवेदनात मांडण्यात आले. निवेदन देतांना भिकाजी सावंत, पप्पू जाधव, प्रकाश दुर्धवळे, सोपान जाधव, विलास खरात, प्रा. भाऊसाहेब नेहरे, रंगनाथ शिंदे, नीलेश उन्हवणे आदी उपस्थित होते.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धन-धान्याची पूजा

$
0
0

आश्विन कृष्ण तृतीयेस धनत्रयोदशी हा सण घराघरांत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. धनत्रयोदशीच्या निमित्ताने अनेकांनी दिवसभर उपवास केला गेला. धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील धन, धान्य व संपत्तीची पूजा करण्यात येते. त्यानिमित्ताने घरातील द्रव्य व अलंकारांची साफसफाई करण्यात आली. या द्रव्य व अलंकारांची घरोघरी विधीवत पूजा करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांनी धान्य कोठारांची आणि इतरांनी घरातील धान्य कोठ्यांची पूजा केली. धन्वंतरी देवतेची आराधना निरोगी आरोग्य लाभावे, यासाठी करण्यात आली. धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर, विष्णू -लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांच्याही पूजेला विशेष महत्व आहे. संध्याकाळी सर्व घरांत या देवतांची पूजा करून पायसाचा नैवेद्य दाखविण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेशनधारकांची दिवाळी ‘कडू’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ऐन दिवाळीत सर्व्हर डाउन झाल्याने जिल्ह्यातील रेशन दुकानांमधील पॉस मशिन्स सोमवारी बंद पडले. तीन ते चार तास हे मशिन बंद असल्याने दिवाळीसाठी साखर आणि तत्सम शिधा घेण्यासाठी येणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना हात हलवित परतावे लागले. ऐन दिवाळीत दुसऱ्यांदा असा प्रकार घडल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त होते आहे.

दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) कुटुंबांना दिवाळीत गोडधोड पदार्थ बनविता यावेत, या उदात्त हेतून सरकार रेशनदुकानांवर साखर उपलब्ध करून देते. यंदाही २ हजार ६०९ रेशन दुकानांवर साखरेसह चनाडाळ, तूरडाळ, उडीदडाळ उपलब्ध करून देण्यात आली आहे. साखर आणि डाळी १ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रेशन दुकानांमधून सध्या पॉस (पीओएस) मशिन्सद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने रेशनवरील धान्याचे वाटप केले जाते. परंतु, सोमवारी (दि.५) सकाळपासूनच एनआयसीचा (नॅशनल इर्न्फोमेशन सर्व्हीस) सर्व्हर डाउन असल्याने हे मशिन्स बंद पडले. त्यामुळे सातपूर, श्रमिकनगर परिसरातील रेशन दुकानांमध्ये आलेल्या ग्राहकांची निराशा झाली. दुकानात धान्य उपलब्ध असूनही ते मिळत नसल्याने ग्राहकांनी दुकानदारांशी वाद घालण्यास सुरुवात केली. नेटवर्क न मिळणे, धान्य देताना मशिन्सवर लाभार्थ्याचे बायोमेट्रिक घेऊनही त्याची नोंद न होणे, मशिनमधून पावती न निघणे यासारख्या अडचणी रेशन दुकानदारांना भेडसावत आहे. दोन दिवसांपूर्वी देखील एनआयसीचा सर्व्हर दिवसभर डाउन होता. दुसऱ्यांदा सर्व्हर डाउन झाल्याने दुकानदार आणि ग्राहक दोहोंनाही मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महापौरांच्या अधिकारात प्रशासनाचा हस्तक्षेप

$
0
0

एसएनडीची विद्यापीठाच्या सीनेट निवडीचा वाद

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठावर (एसएनडीटी) सिनेट सदस्य निवडीच्या महापौरांच्या अधिकारावर प्रशासनाने परस्पर हस्तक्षेप केल्याची खमंग चर्चा महापालिका वर्तुळात पसरली आहे.

विद्यापीठाच्या वतीने महापालिकेतून एका नगरसेवकाची शिफारस करण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यासाठी पक्षाशी चर्चा करून महापौर रंजना भानसी यांनी गटनेता संभाजी मोरुस्कर यांचे नाव सुचवले. परंतु, प्रशासनाने मोरुस्कर यांच्या नावावर फुली मारत, महिला सभापतीचे नाव सुचवले होते. महापौर मात्र मोरुस्कर यांच्या नावावर ठाम राहिल्याने प्रशासनातील अधिकाऱ्यांचे प्रयत्न अखेर अपयशी ठरले आहे.

एसएनडीटी विद्यापीठावर महापालिका क्षेत्रातून एका सिनेट सदस्याची शिफारस करावी, असा प्रस्ताव आला होता. त्यासाठी प्रशासनने महापौरांना पत्र दिले होते. या सदस्यपदासाठी महापौरांनी पक्षाशी चर्चा करून मोरुस्कर यांचे नाव सुचवले. परंत, प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सदर प्रस्तावात फेरफार करत, महिला विद्यापीठ असल्याने या ठिकाणी महिलेचीच निवड करावी, अशी शिफारस करत, एका महिला सभापतीचे नावही सुचवले. हा प्रस्ताव पुन्हा महापौरांकडे पाठविण्यात आला. परंतु, महापौरांनी प्रशासनाच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवत, मोरुस्कर यांचीच शिफास विद्यापीठाकडे करावी, असा प्रस्ताव पाठवला. त्यामुळे महापौरांच्या अधिकारात हस्तक्षेप केल्याची चर्चा महापालिका वर्तुळात पसरली आहे. महापौरांनीही पक्षाच्या आदेशानुसार ठाम राहून प्रशासनाने सूचविलेल्या नावावर फुली मारल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंधरा दिवसांनी गोदावरी धावली

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

मनमाड, नाशिकच्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची असणारी गोदावरी एक्स्प्रेस सोमवारी पुन्हा धावली. पंधरा दिवसांपासून ही गाडी इगतपुरी येथील मेगा ब्लॉकमुळे बंद होती.

मनमाडहून मुंबईला जाण्यासाठी ही गाडी उपयुक्त आहे. तसेच नाशिकला येण्यासाठीही प्रवाशांना तिचा मोठा उपयोग होतो. मुंबई-भुसावळ दरम्यान तिसरा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम वेगात सुरू आहे. इगतपुरी रेल्वेस्थानकात रुट रिले इंटरलॉकिंग पॅनल आणि यार्ड रिमॉडलिंग संबंधित कामामुळे महिनाभरापासून रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

पंचवटी रविवारी दौंड-पुणे मार्गे मुंबईला पोहचली. तर भुसावळ-नाशिक-पुणे गाडी रद्द करण्यात आली होती. काही पॅसेंजर गाड्याही रद्द झाल्या आहेत. तर अनेक गाड्या उशिराने धावत आहेत. पंचवटीच्या बरोबरीने नाशिककरांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या गोदावरी, राज्यराणी या गाड्याही सारख्या रद्द कराव्या लागत होत्या. गोदावरी १५ दिवस बंद होती. ती सोमवारपासून सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रिक्त जागांचा प्रश्न कायम

$
0
0

माने यांनी घेतला आरोग्य सुविधांचा आढावा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील सामान्य रुग्णालय व पालिका रुग्णालय येथील आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी मालेगावी भेट दिली. काही दिवसांपासून सातत्याने आरोग्य सुविधांचा आढावा घेतला जात आहे. यात वेळोवेळी सुचविण्यात आलेल्या सुधारणा होत असल्या तरी अद्याप सुधारणांना वाव आहे. प्रामुख्याने सामान्य रुग्णालयातील रिक्त जागांचा प्रश्न कायम असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील आरोग्य सुविधांबाबत सामाजिक कार्यकर्ते राकेश भामरे यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने एक समिती गठीत केली होती. या समितीचे पुनर्गठन करण्यात आले आहे. सोमवारी यासंदर्भात आयुक्तांनी मालेगावी भेट दिली. सामान्य रुग्णालय व अली अकबर रुग्णालयास भेट देऊन आरोग्य सुधारणांची पाहणी केली. यानंतर शासकीय विश्राम गृहावर बंद दाराआड बैठक झाली. यावेळी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, महापौर रशीद शेख, आयुक्त संगीता धायगुडे, उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी डॉ. किशोर डांगे, याचिकाकर्ते राकेश भामरे उपस्थित होते. बैठकीनंतर आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, न्यायालयाने समितीचे पुनर्गठन केले असून, त्यात स्थायिक आमदार, विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त, नगरसेवक व याचिकाकर्ते असतील. दवाखान्यात भेटी दरम्यान बऱ्याच सुधारणा झाल्याचे दिसले. सामान्य रुग्णालयात मात्र रिक्त पदांचा प्रश्न अद्याप कायम आहे. पालिकेने यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. मात्र डॉक्टर्स यायला तयार नसल्याने खासगी डॉक्टर्सच्या मदतीने आरोग्य शिबिर आयोजित करण्याबाबत चर्चा झाल्याचे माने यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान

$
0
0

\B

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्ह्यातील शरद संपत शिंदे आणि लक्ष्मण जनार्दन रासकर यांचा राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. फळे, फुलशेती व भाजीपाला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबाबत या शेतकऱ्यांसह बारा शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. मुंबईतील राजभवनात सोमवारी (५ नोव्हेंबर) रोजी हा सोहळा पार पडला.

राज्यातील १२ शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामागिरी केल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते लॅपटॉप देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, कृषि सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सचिंद्रप्रताप सिंग यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. भारताची अस्सल संस्कृती कृषी क्षेत्राचा विकास आहे. कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांच्या संसोधनातून अमूलाग्र बदल होत आहेत. ही बाब अतिशय कौतुकास्पद आहे. शेतकऱ्यांमधील संशोधनवृत्ती वाढावी, यासाठी हा सन्मान करण्यात येत आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. या सोहळ्यात बीड जिल्ह्यातील नेकनूर तालुक्यातील संजय शिंदे (जल व्यवस्थापन), सोलापूर जिल्ह्यातील सोगाव तालुक्यातील ब्रह्मदेव सरडे (कृषी क्षेत्रात संशोधन), चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील दत्तात्रय गुंडावार (कृषी अभिनव उपक्रम), जालना जिल्ह्यातील डोंगरगाव तालुक्यातील ईश्वरदास घनघाव (ग्रामीण कृषी प्रक्रिया उद्योग), उस्मानाबाद जिल्ह्यातील बाळासाहेब गिते (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय), रायगड जिल्ह्यातील अशोक गायकर (मत्स्य व्यवसाय), बुलढाणा जिल्ह्यातील विद्या गुंजकर (कृषी व सामाजिक वनीकरण), सुधाकर राऊत (कृषी उद्योग), अहमदनगर जिल्ह्यातील ताराचंद गागरे व श्रीकृष्ण सोनुने (कृषी विस्तार क्षेत्र) यांना सन्मानित करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीत विद्यार्थ्यांची पर्यावरणपूरक दिवाळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली सडा-रांगोळी, फुलवाती अंगणात सोनसकाळी, आली दिवाळी, आली दिवाळी... यांसह दिन दिन दिवाळी... अशा दिवाळीच्या गाण्यांचे सादरीकरण अन दिवाळीतील धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा व भाऊबीज अशा सणांचे महत्त्व विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांनीच सांगत फटाके न फोडण्याचे आवाहन करीत देवळाली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक दिवाळी साजरी केली.

विद्यार्थ्यांना शाळेतदेखील आपल्या सहकाऱ्यांसमवेत सणाचा आनंद घेता यावा या उद्देशाने शाळेतर्फे सुटी लागण्याच्या दिवशी शाळेतच दिवाळी साजरी करण्यात आला. प्रारंभी एक विद्यार्थी निवडून त्याच्याजवळील वही, पुस्तके, पेन यांचे पूजन सहसचिव अशरफी घडियाली, मुख्य कार्यकारी अधिकारी गोवर्धनदास मनवानी, मुख्याध्यापक हेमंत मोजाड, उपमुख्याध्यापिका लतिफा खान, शर्मिला वैद्य आदींच्या हस्ते करण्यात आले. संकेत जाधव, प्रांजल पोरजे यांनी दीपावलीचे महत्त्व, तर नंदिनी बरकले, साक्षी बोराडे या विद्यार्थ्यांनी संस्कृत गीतातून मामाच्या गावची मजा वर्णन केली. धनश्री हगवणे या विद्यार्थिनीने सादर केलेले आली दिवाळी हे गाणे सर्वांना आनंदी करून गेले. राष्ट्रीय हरित सेना विभागाच्या अंकिता करंजकर व धनश्री पाळदे या विद्यार्थ्यांनी फटाक्यांमधील घटक व विषारी रसायनयुक्त घटकांची माहिती देत त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम विशद केले.

भव्य रांगोळीतून गिरविले काळ!

शाळेसमोरील मैदानावर शिक्षिका रुपाली पवार यांच्यासह दहावी कच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या २० फूट व्यासाच्या रांगोळीतून विद्यार्थ्यांना 'मी दिवाळी साजरी करीत आहे' या वाक्याचे तीन काळ व त्याद्वारे बारा उपप्रकारांमध्ये तयारी होणारी वाक्ये रेखाटण्यात आली. श्रेया मोजाड या विद्यार्थिनीने त्याचे याचे लेखन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images