Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

२४ तीर्थंकर पादुकांचे भूमिपूजन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दिगंबर जैनांचे भारतभर प्रसिद्ध असलेले सिद्धक्षेत्र गजपंथा येथे २४ तीर्थंकर चरण पादुकांचे भूमिपूजन जैन मुनी विकसंतसागरजी यांच्या उपस्थितीत झाले.

दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथा ट्रस्ट यांच्या अख्यातरित्या येणाऱ्या म्हसरुळ येथील जागेवर सदर भूमिपूजन करण्यात आले. जैन धर्मामध्ये २४ तीर्थंकरांचे विशेष महत्त्व आहेत. त्यांच्या चरण पादुका येथे उभारण्यात येणार आहे. या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी एक फेरीमार्ग ही तयार करण्यात येणार आहे. अनेक वर्षांपूर्वी या जागेवर २४ तीर्थंकरांच्या पादुका अस्तित्वात होत्या; परंतु त्यांची पडझड झाली होती. त्याच जागेवर दुरुस्ती करून परत त्या पादुका उभारण्यात येत आहे. भूमिपूजन संस्थेचे सहसचिव रवींद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुनी विकसंतसागरजी महाराज यांनी मंगल पाठद्वारे विधी केला. यावेळी मुनी अध्ययनसागरजी, मुनी आवश्यकसागरजी, आर्यिका समिधीमती माताजी, सुनंदामती माताजी, क्षुल्लिका सुलोचनामती माताजी उपस्थित होत्या.

लोगो : सोशल कनेक्ट

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आजारासोबतच आरोग्यावरही संशोधन व्हावे

0
0

सेंद्रीय शेतीचे अभ्यासक जितेंद्र कुटमुटिया यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध हॉस्टिपल्समध्ये आजारांच्या विषयांवर मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. किंबहुना सध्या आजारांपासून वाचण्यासाठी किंवा आजारांची माहिती देणारेही चर्चासत्रे होतात. मात्र, या सोबतच निरोगी आरोग्य या विषयावर अधिकाधिक संशोधनाची गरज आहे, अशी अपेक्षा सेंद्रीय शेतीचे अभ्यासक जितेंद्र कुटमुटिया यांनी व्यक्त केली. विश्वास हॉलमध्ये आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

गंगापूर रोडवरील विश्वास हॉलमध्ये सेंद्रीय शेतीचे अभ्यासक जितेंद्र कुटमुटिया यांचे 'हेल्दी राहण्याचे मंत्र' या विषयावर रविवारी सकाळी व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक प्रकारचे आजार संभावत आहेत. या आजारांवर औषधांची मात्रा गुणकारी ठरते. आजारांवर उपाय म्हणून होणाऱ्या संशोधनप्रणालीचा वापर आरोग्यासाठीही होण्याची गरज आहे. तंदुरुस्त आरोग्य जगण्यासाठी काय करता येईल, यावर अधिक संशोधन झाल्यास आजारांचेही प्रमाण कमी होणार आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

औषधांची सवय शरीरास करून घेऊ नका. एकदा औषधांची सवय झाल्यास औषधे तुमची पाठ सोडत नाहीत. डोकेदुखी, सर्दी यासारख्या आजारांच्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधे घ्या. डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधे घेतल्यास औषधे सेवन करून वेदनामुक्त राहण्याची सवय शरीरास होते. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होण्याची शक्यता असते, असे त्यांनी सांगितले. हेल्दी राहण्यासाठी फक्त आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे नसते. भूक लागल्यावर तुमचे मन जे सांगेल ते खा. मानसिकता आणि शरीर यांची योग्य सांगड घालणे व्यक्तीला जमले पाहिजे. यामुळे शरीराच्या तक्रारींचे निवारण तुम्हाला स्वतःलाच करता येते, असेही ते म्हणाले.

नकार प्रवृत्ती घालवा

आहार, आचार, विचार आणि विहार या चतु:सुत्रीनुसार जीवन जगताना त्याला व्यायाम आणि मेडिटेशनचीही जोड देणे गरजेचे आहे. तुमच्या आहारात ज्या प्रमाणे समतोल आवश्यक असतो; तसेच तुमच्या विचारांमध्ये सकारात्मता असणे अतिशय गरजेचे असते. सकारात्मक विचार करण्यासाठी 'नकार' ही प्रवृत्ती तुमच्या मनातून कायमची घालवा, असा सल्ला त्यांनी या वेळी दिला.

फोटो : पंकज चांडोले

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाइन फ्लूमुळे एकाचा मृत्यू

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील एकाचा स्वाइन फ्लूमुळे शनिवारी मृत्यू झाला. कृष्णा कोळी असे या रुग्णाचे नाव आहे. ते २ नोव्हेंबरपासून उपचार घेत होते. उपचारादरम्यान शनिवारी (दि. १०) त्यांचा मृत्यू झाला. त्यांना स्वाइन फ्लूची लागण झाली होती. दरम्यान, स्वाइन फ्लू कक्षामध्ये सध्या चार पुरुष आणि दोन महिला उपचार घेत आहेत. त्यांचे वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने त्यांना स्वाइन फ्लू आहे की नाही हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वकिली व्यवसायामध्येही व्यापारी संस्कृतीचा शिरकाव

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आज संपूर्ण देश एका गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जात आहे. व्यापारी संस्कृतीने सर्वच क्षेत्रांवर आक्रमण केले आहे. त्याला वकिली व्यवसायही अपवाद नाही. डॉक्टर, इंजिनीअर, बिल्डर अशा साऱ्याच क्षेत्रात व्यापार शिरला आहे. आमच्या क्षेत्रातही ७० टक्के कचरा आणि ३० टक्के चांगले उरले आहेत. त्यामुळे त्या उरलेल्यांवर विश्वास ठेवा, असे प्रतिपादन अॅड. दौलतराव घुमरे यांनी केले.

संवाद संस्थेच्या वतीने अॅड. दौलतराव घुमरे यांची मुलाखती झाली. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी मंचावर संवादचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब गुंजाळ, अॅड. नितीन ठाकरे, अॅड. क. का. घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

अॅड. घुमरे यांनी बालपणीच्या प्रश्नापासून तर राजकीय प्रश्नापर्यंत सर्वांनाच दिलखुलास उत्तरे दिली. वकिली व्यवसायाबद्दल ते म्हणाले, की रोज कोर्टाच्या पायऱ्या झिजवायला हिंदुस्थानचे लोक वेडे नाहीत. त्यांचा वकिलांवर विश्वास असतो, तो काहीतरी चांगले करतो म्हणून ते कोर्टात येतात. त्यांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवावा.

बालपण दारिद्र्यात गेले. त्यामुळे अंगात रग होती. अन्यायाविरुद्ध चिड होती. उद्रेक होता. गरिबीचे चटके सहन केल्याने तो उद्रेक कधी कुणावरीही व्हायचा त्यामुळे तरुणपणी अशा अनेक गोष्टी हातून घडल्या, की ज्यांचा आता पश्चाताप होतो. महात्मा गांधी यांच्याविरोधात मराठा नेते बोलतात, त्यांना वाईट शिव्या देतात म्हणून मी अनेक तरुणांना घेऊन मोर्चा काढला होता. त्याची परिणिती मला उदोजी बोर्डिंगमधून काढून टाकण्यात आले. संस्थेतून बडतर्फ केले. पुन्हा तेथे प्रवेश मिळणार नाही, अशी सोयही करून ठेवण्यात आली; परंतु मी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वाट्टेल ते करण्यास तयार होतो. त्यानंतर मी वकिलीला प्रवेश घेतला. निवडणुकांदरम्यान चहा पार्टीसाठी इराणी हॉटेलमध्ये भाषण झाडत असताना त्याकाळी आमदार झालेले रावसाहेब थोरात यांनी मला बोलावून घेतले. याला मी बडतर्फ केले मात्र हा चांगला नेता झाला, अशी पावती दिली. अशा मोठ्या लोकांच्या सहवासातून मी घडलो. गांधीजींचा खून करण्यात आल्यानंतर आम्ही एका तरुणांच्या टोळक्यांनीही दगडफेक केली होती. त्यात काही अनुचित घटनाही घडल्या. तरुण रक्त होते, त्यामुळे तेव्हा जे घडले ते बरोबर नव्हते, असे आता वाटते, असेही अॅड. घुमरे म्हणाले.

वकिली व्यवसाय हा देखील नोबेल असून देशातील सर्व पुढारी, नेते वकीलच होते. कोणताही नेता बघा, गांधी, सावरकर, आंबेडकर, नेहरू सगळे वकील होते. त्यामुळे हा वादाचा मुद्दाच होऊ शकत नाही. हा व्यवसाय पूर्वीही चांगला होता आताही त्यात अनेकजण चांगले आहेत. त्यांचा विचार करावा असा सल्ला घुमरे यांनी दिला.

कार्यक्रमात अशोक बोऱ्हाडे व राजेंद्र सांगळे यांचा सत्कार मान्यवरांच्या वतीने करण्यात आला. डॉ. बाळासाहेब गुंजाळ यांनी प्रास्ताविक केले. प्रा. अशोक सोनवणे यांनी मानपत्राचे वाचन केले. याप्रसंगी वासंती देशपांडे यांनी छोटेखानी मनोगत व्यक्त केले. सुरेखा बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निवृत्त वेतनासाठी न्यायालयात धाव

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन द्यावे, असे हायकोर्टाने आदेश देऊनही विद्युत कंपन्या कर्मचाऱ्यांना निवृत्त वेतनापासून वंचित ठेवत आहे. त्याविरुद्ध कर्मचारी संघटनेने न्यायालयात दावा दाखल केला असून २७ नोव्हेंबर रोजी त्याची सुनवणी होणार आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील कर्मचारी गेल्या २५ वर्षांपासून निवृत्ती वेतनाची मागणी करीत आहेत. कर्मचारी संघटनांनी या मागणीसाठी अनेकवेळा आंदोलने केली आहेत. विद्युत मंडळाने ३१ डिसेंबर १९९६ रोजी क्रमांक ६२४ अन्वये ठराव मंजूर करून 'कर्मचारी निवृत्ती वेतन १९९५' ही योजना लागू केली. ती १ एप्रिल १९९३ पासून अंमलात आणण्याचे ठरविले. दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेली इपीएस ९५ कर्मचारी हिताची नाही, असे ठरवून मंडळाच्या कर्मचाऱ्यांना त्यापासून वंचित ठेवले आहे.

न्यायालयीन प्रक्रियेनुसार ही केस रखडत होती आणि निर्णय होत नव्हता; म्हणून मार्च २०१६ मध्ये उच्च न्यायालयास दिरंगाई बद्दल कल्पना देत या प्रकरणी लवकर निकाल देण्यासाठी विनंती करण्यात आली. परिणामी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १६ नोव्हेंबर २०१७ रोजी निर्णय दिला. संबंधित कंपन्यांनी आपसात चर्चा करून ठराव क्रमांक ६२४ च्या अंमलबजावणीबाबत जबाबदारीने निर्णय तीन महिन्यांत घ्यावा, असे आदेश दिले.

या निर्णयामुळे सर्व कर्मचाऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले. परंतु, तीन महिन्यांत काहीच प्रतिसाद प्राप्त न झाल्याने मूळ अर्जदारांनी अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर मंडळाकडून कळविण्यात आले, की ६ फेब्रुवारी २०१८ रोजी संचालकांची मीटिंग होऊन ठराव क्रमांक ७१८-२०१८ पारित करण्यात येऊन मंडळाच्या आर्थिक अडचणी व शासन योजनेचा आर्थिक बोजा घ्यायला तयार नसल्याने मंडळ ठराव क्रमांक ६२४-१९९६ प्रमाणे निवृत्तीवेतन देण्यास असमर्थ आहे.

अवमान याचिकेच्या सुनावणीत उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशात 'याचिकाकर्त्यांनी पेन्शन विषयाशी संबंधित सर्व समावेशक मुद्दे समाविष्ट करून नवीन याचिका दाखल करावी, जेणेकरून १९९६ पासून प्रलंबित असलेला निवृत्तीवेतनाचा प्रश्न हे न्यायालय लवकर सोडविण्याचा प्रयत्न करील' असे नमूद केले. त्या अनुषंगाने आता याचिका दाखल करण्यात आली. त्यावर १६ ऑक्टोबर २०१८ रोजी सुनावणी होऊन प्रतिवादी ऊर्जा सचिव, महाराष्ट्र शासन व चारही वीज कंपन्यांचे व्यवस्थापक यांना नोटीस बजावण्यात येऊन २७ नोव्हेंबरपर्यंत बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पूर्ववैमनस्यातून गंजमाळला हाणामारी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पूर्ववैमनस्यातून समोरासमोर आलेल्या दोन गटांमध्ये शनिवारी (दि. १०) रात्री गंजमाळ परिसरात तुंबळ हाणामारी झाली. यामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये ठार मारण्याच्या प्रयत्नासह दरोड्याचा परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर शालीमारसह सिव्हिल हॉस्पिटल परिसरात दिवसभर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला.

शकील शाकीर कुरेशी (रा. खडकाळी) याने या प्रकरणी फिर्याद दिली आहे. भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये तीन वर्षांपूर्वी ठार मारण्याच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये राकेश उर्फ बाबा खैरनार, राजेंद्र खैरनार हे संशयित होते. या गुन्ह्याच्या सुनावणीला सोमवारपासून (दि.११) सुरुवात होणार आहे. त्यामुळे शनिवारी रात्री नऊच्या सुमारास खडकाळी परिसरात संशयित राकेश उर्फ बाबा अर्जुन खैरनार (वय ३६, रा. ढिकलेनगर, पंचवटी) हे त्यांच्या साथीदारांसह आले. न्यायालयामध्ये आमच्या विरोधात साक्ष देऊ नको. हा गुन्हा मिटवून घेऊ, असा दम देण्यास सुरुवात केली. परंतु, त्यांना विरोध केल्याने खैरनार व त्यांच्या साथीदारांनी धारदार हत्यारांनी जीवघेणा हल्ला केला. त्यामध्ये शकीलसह त्यांचा भाऊ मोबीन शाकीर कुरेशी (वय ३६) हा देखील गंभीर जखमी झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तर महम्मद अन्सारी (वय २६ , रा. जोगवाडा) यांनीही परस्पर विरोधी फिर्याद दिली. नेपाळी कॉर्नर परिसरात व्यवसाय करीत असताना संशयित कुरेशी बंधुंसह त्यांच्या काही साथीदारांनी आमच्याजवळील पैसे हिसकावून नेले. आम्ही पैसे आणण्यासाठी कुरेशी बंधुकडे गेलो असता त्यांनी आमच्यावर हल्ला केल्याची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून या हल्ल्यात मोबीन आणि शकील या दोघा बंधूसह राकेश खैरनार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सिव्हिलमध्ये उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त आर. आर. पाटील, भद्रकाली स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. तणाव निर्माण झाल्याने गंजमाळसह शालिमार आणि सिव्हिलमध्ये पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी दीपक खैरनार, ललित खैरनार, लंकेश खैरनार, शोहेब अन्सारी, मोहम्मद अन्सारी या पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

विक्रेत्यांना हटविले

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी शालिमार परिसरात बेकायदेशीररित्या दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांना हटविण्यास सुरुवात केली. त्यामुळे या परिसरात दिवसभर शुकशुकाट होता. ही अनधिकृत दुकाने कायमस्वरूपी हटवावीत, अशा आशयाचे पत्र महापालिकेला देण्यात येणार असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गतिमंद मुलीसह बालिकेवर अतिप्रसंग

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पळसे येथील दारणा संकुल येथे सोळा वर्षीय गतिमंद मुलीला संशयित खंडू मुरलीधर खुरे (वय ७०) या शेजारी राहणाऱ्या वृद्धाने स्वतःच्या घरात नेवुन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी दुपारी घडली.

संशयित खुरे याने पीडितेला स्वतःच्या घरात नेल्यावर शेजारी राहणाऱ्या महिलांच्या लक्षात ही घटना आली. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादेवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात खुरे याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. तसेच सुभाषरोडवरील पवारवाडी येथे शनिवारी (दि. १०) सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान तीन वर्षाच्या मुलावर शेजारी राहणाऱ्या मनोज श्रीवंत उर्फ साई (वय ४०) याने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मनोज हा पीडितेच्या घरात टीव्ही बघण्यासाठी नेहमी येत असे. घरात कोणी नसल्याने त्याने बालिकेवर अतिप्रसंग केला. नाशिकरोड पोलिस ठाण्यात मनोज विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मंत्री,अधिकाऱ्यांना पोत्यात घालून हाणा - शेट्टी

0
0

मंत्री,अधिकाऱ्यांना पोत्यात घालून हाणा

दुष्काळ निवारण व ऊस उत्पादक शेतकरी परिषदेप्रसंगी राजू शेट्टी यांचा इशारा

म. टा. प्रतिनिधी, बीड

पंतप्रधान पीक विमा योजनेसह विविध शेतकरी योजनेत ‛राफेल विमान खरेदी घोटाळ्यापेक्षा मोठा घोटाळा झाला आहे. यातील घोटाळेबाजांना सरकार अभय देत आहे. शेतकऱ्यांनी कर्जमाफी, दूध दर, ऊस भाव वाढ या मागण्यांसाठी यापुढे रस्त्यावर उतरावे असे आवाहन करत वेळप्रसंगी मंत्री व अधिकाऱ्यांचे कपडे काढून, पोत्यात घालून हाणावे. तुमच्यासोबत आपण आहोत, असे वक्तव्य खासदार राजू शेट्टी यांनी केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित दुष्काळ निवारण व ऊस उत्पादक शेतकरी परिषद केज तालुक्यातील जवळबन येथे पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बनेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अंकुश काळदाते हे होते. यावेळी व्यासपीठावर वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश पोपळे, रसिका ढगे, पूजा मोरे, विद्यार्थी आघाडीच्या शर्मिला येवले, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, जिल्हा कोषाध्यक्ष धनंजय मुळे उपस्थित होते.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी हे विविध शेतकरी प्रश्नावर कडाडले. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या निष्क्रीयतेवर बोट ठेवले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाची हाक दिल्यानंतर राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला मात्र, निवारण केले नाही. राज्य सरकारने दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेऊन हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान त्वरीत द्यावे. चारा लावणीला न देता जनावरांच्या दावणीला द्यावा, अशा विविध मागण्या यावेळी खासदार शेट्टी यांनी केल्या.

'राम मंदिर नाही झाले तरी चालेल'

हक्काच्या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी रस्त्यावर यावे, आपण अखेरपर्यंत साथ देऊ असा शब्द रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना दिला. यावेळी ते म्हणाले, प्रभू रामाचा आदर आहे. राम मंदिर दोन महिन्यांनी झाले तरी चालेल. मात्र, सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये दुष्काळी अनुदान त्वरीत द्यावे, अशी मागणी करत संपूर्ण कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी लढा उभारण्याचे आवाहन तुपकर यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नीट’ अर्जासाठी वीस दिवस

0
0

५ मे २०१९ रोजी होणार परीक्षा; एनटीएचे आयोजन

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

एमबीबीएस आणि बीडीएससह वैद्यकीय शाखेतील अभ्यासक्रमांसाठी दरवर्षी सीबीएसईच्या वतीने घेण्यात येणारी नीट (नॅशनल इलिजीबिलिटी कम एन्टरन्स टेस्ट)\B \Bपरीक्षा यंदा एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) च्या वतीने घेण्यात येणार आहे. ही परीक्षा पुढील वर्षी ५ मे २०१९ रोजी पार पडणार असली तरीही यासाठी अर्ज करण्यास विद्यार्थ्यांच्या हाती अवघा २० दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. १ डिसेंबर २०१८ नंतर या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार नाही.

वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी केंद्रीय स्तरावर ही परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी काही वर्षांपूर्वी ठेवण्यात आलेले ड्रेसकोडचे नियम आगामी परीक्षेतही कायम राहतील. परीक्षेसाठी अर्ज करण्यास १ नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. १ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पध्दतीने हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी खुल्या प्रवर्गाकरिता १४०० रुपये, तर आरक्षित वर्गासाठी ७५० रुपये शुल्क भरावे लागणार आहे.

..

७२० गुणांसाठी बहुपर्यायी प्रश्न\B \B

फिजिक्स, केमेस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांसाठी ही परीक्षा घेण्यात येईल. फिजिक्स आणि केमेस्ट्रीकरिता प्रत्येकी १८० गुण, तर बायोलॉजी या विषयाकरिता ३६० गुणांसाठी ही परीक्षा होईल. हे तीन विषय मिळून एकूण १८० बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यावी लागतील. हे प्रश्न सोडविण्यासाठी तीन तासांचा अवधी देण्यात येईल. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी चार पर्याय उपलब्ध असतील. ५ मे रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत ही परीक्षा होईल. देशभरातील ११ प्रादेशिक भाषांमध्येही यातील मूळ प्रश्नांचे भाषांतर विद्यार्थ्यांना त्यांच्या मागणीनुसार मिळणार आहे.

..

\Bनीटसाठी महत्त्वाच्या तारखा \B

- नीट परीक्षेचा मुख्य दिवस : ५ मे २०१९

- अर्ज सादर करण्यास अंतिम मुदत : १ डिसेंबर २०१८ पर्यंत

- अॅडमिट कार्ड उपलब्ध : १४ एप्रिल २०१९ पासून एनटीएच्या वेबसाईटवर

- निकालाची संभाव्य तारीख : ५ जून २०१९

- ओळखपत्र म्हणून ग्राह्य कागदपत्र : आधार कार्ड नंबर, निवडणूक आयोगच्या ओळखपत्रावरील इपिक नंबर, रेशन कार्ड, बँक अकाउंट नंबर, पासपोर्ट नंबर यापैकी एखादे शासकीय ओळखपत्र.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दैव बलवत्तर म्हणून तो बचावला!

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

पांडवलेणीवर फिरायला आलेला एक युवक पाय घसरून खाली पडून जखमी झाला आहे. या युवकाला एका वृक्षाचा आधार मिळाल्याने तो बचावल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पांडवलेणीवर याआधीही वारंवार अपघात झाले असून, प्रशासनाने सुरक्षाव्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

दिवाळीच्या सुट्या सुरू असल्याने पांडवलेणीवर फिरायला येणाऱ्यांचीही गर्दी वाढत आहे. काल रविवारी सकाळी ऋषिकेश सरोदे (वय १६) हा त्याच्या मित्रांसमवेत येथे फिरायला आला होता. चालताना ऋषिकेश याचा पाय घसरल्याने तो सुमारे शंभर फूट खोल डोंगरावरून खाली घसरत गेला. मात्र, तो एका वृक्षात अडकला. यावेळी पांडवलेणी येथे नियमित फिरायला येणाऱ्या डॉ. अजय जाधव, डॉ. प्रशांत परदेशी, डॉ. पंकज बदाने, डॉ. अभिजीत इंगळे, डॉ. हेमंत बोरसे, डॉ. अमोल आहेर आदींनी तातडीने पोलिस आणि अग्निशामक दलाला ही माहिती दिली. या पथकाने तातडीने ऋषिकेश यास दोरीच्या सहाय्याने वर काढले. या घटनेमुळे ऋषिकेश प्रचंड घाबरल्याने त्यास प्रथम धीर देऊन त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्याचा शरीरास खरचटले आहे. यावेळी इंदिरानगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जगदीश गावित, सुनील बोडके यांच्यासह अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले होते.

यापूर्वीही अपघाताच्या घटना

पांडवलेणी येथे यापूर्वीही २८ मे रोजी एक युवक अशाच पद्धतीने घरसरून पडला होता, त्यात त्याचा मृत्यू झाला होता. तर ११ मार्च रोजी दोन युवक पडून गंभीर जखमी झाले होते. वारंवार होणाऱ्या या घटनांचे गांभीर्य प्रशासनाने लक्षात घेणे आवश्यक आहे. पांडवलेणी हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ असूनही पर्यटकांच्या सुरक्षेबाबत काहीच तजवीज नाही. पांडवलेणीवर पर्यटकांबरोबरच अनेक नाशिककर दररोज व्यायामासाठी जात असतात. या सर्वांचा विचार करून वन विभाग, पुरातत्व विभाग आणि महानगरपालिका यांनी संयुक्‍तरीत्या सुरक्षेचा विचार करण्याची गरज असल्याचे मत व्यक्‍त होत आहे. धोकदायक भागाजवळ फलक बसविण्याची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुलाबी थंडीची चाहूल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट झाली असून, नाशिककरांना थंडीची चाहूल लागली आहे. नाशिकमध्ये रविवारी १३.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच थंडी जाणवू लागल्याने येत्या महिन्यामध्ये थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

नोव्हेंबर महिना सुरू झाला की, थंडीची चाहूल लागण्यास सुरुवात होते. यंदा दिवाळीदरम्यान झालेल्या बेमोसमी पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्याचाच परिणाम थंडीचे प्रमाण वाढण्यावर होणार असल्याचे सांगितले जात आहे. ६ नोव्हेंबरला १८.७ अंश सेल्सियस, ७ नोव्हेंबरला १५.३ अंश सेल्सियस, ८ नोव्हेंबरला १३.० अंश सेल्सियस, ९ नोव्हेंबरला १४.२ अंश सेल्सियस, १० नोव्हेंबरला १४ अंश सेल्सियस तापमान होते. हे किमान तापमान रविवारी, ११ नोव्हेंबरला १३.६ अंश सेल्सियसवर स्थिरावले. यावरुन तापमानामध्ये दिवसागणिक होत असलेली घट दिसून येत आहे. नुकताच दिवाळीचा सण साजरा झाला असून खरेदीसाठी फुललेले मार्केट आता थंडावले आहे. परंतु, थंडीचा जोर हळूहळू वाढण्याची चिन्हे असल्याने स्वेटर, मफलर खरेदीसाठी लवकरच बाजार पुन्हा गजबजणार आहे. थंडीच्या काळात ऊबदार कपड्यांना मोठी मागणी मिळत असल्याने विक्रेत्यांनीही त्यादृष्टीने तयारी केली असून दुकानांमध्ये उबदार कपडे झळकण्यास सुरुवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकास हाच मुद्दा

0
0

राममंदिराच्या मुद्याला भाजप प्रदेशाध्य दानवे यांच्याकडून बगल

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकीत विकास हाच मुद्दा असणार असल्याचे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राममंदिर प्रश्नाच्या मुद्दाला बगल दिली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभर पुन्हा राममंदिर मुद्दा चर्चिला जात असल्याने हा मुद्दा निवडणुकीत असेल का, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी असे उत्तर दिले.

नाशिक येथे दिंडोरी व नाशिक लोकसभाच्या मतदारसंघाच्या आढावा बैठकीसाठी दानवे नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दानवे हे राज्यभर आढावा बैठका घेत असून जळगाव व धुळे येथे त्यांना पक्षाच्या अंतर्गत संघर्षाला सामोरे जावे लागले. पण, नाशिकमध्ये असलेला वाद उघडपणे त्यांच्यासमोर कोणी मांडला नाही. त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. यावेळी पत्रकारांशी बोलतांना ते म्हणाले, की मी राज्यभर दौरा करत असून कार्यकर्त्यांना सक्रिय करणे, बुथ गठण करतांना सांगितलेली २३ कामांची पूर्तता झालेली आहे का, ते बघणे व लोकसभा निवडणुकीत भाजपला विजयी करण्याचा उद्देश या दौऱ्यात आहे. राज्यात विधानसभा निहाय २०८ विस्तारक तर लोकसभा निवडणुकीसाठी ४८ विस्तारक काम करत आहे. तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघात बुथ तयार केले असून एका विधानसभा मतदारसंघात सरासरी ३०० बुथ प्रमुख आहे. त्यांच्याबरोबरच ७ हजार ५०० कार्यकर्ते काम करतात. त्यामुळे एका लोकसभा मतदारसंघात ४८ ते ५० हजार कार्यकर्ते काम करणार असल्याचा हिशोबही त्यांनी मांडला.

कुठेय महागाई?

देशात मागणी आणि पुरवठा यातील अंतर वाढत गेले तर वस्तूंच्या किमतीही वाढत जातात. पण, ते तात्पुरते असतात. देशात महागाई कुठे आहे? असा प्रतिप्रश्नही दानवे यांनी पत्रकारांना केला.

मित्रपक्षाच्या मतदार संघातही काम

राज्यात आम्ही मित्रपक्षाच्या मतदार संघातही पक्ष मजबूत करत आहोत. ज्यावेळी त्यांना हा मतदारसंघ सुटेल त्यावेळी त्यांना या कार्यकर्त्यांचा फायदा होईल, असे सांगून दानवे यांनी शिवसेनेबद्दल अधिक बोलणे टाळले. आमचे लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांची माहिती देण्यावर आहे. त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना आम्ही बळ देणार आहोत, असेही ते म्हणाले.

भामरे-गोटे वादावर सौम्य भूमिका

धुळे येथे जाहीर सभेत आमदार अनिल गोटे यांच्या समर्थकांनी फोटो लावला नाही म्हणून घातलेल्या धुडगुसावर पक्ष काय कारवाई करणार, या प्रश्नावर दानवे यांनी 'या संघटनात्मक बाबी आहेत. केंद्रीय मंत्री डॉ. सुभाष भामरे व आमदार अनिल गोटे यांच्यातील वाद पक्ष हस्तक्षेप करून सोडवेल' असे सांगितले.

गुंडांमुळे वाढतात मतदार

धुळे येथे गुंडांना पक्षप्रवेश दिल्याने भाजपवर टीका होत असतांना दानवे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. प्रवेश देतांना वेगवेगळ्या पक्षातून लोक येतात. त्यांना आम्ही पद कुठे देत आहोत, त्यांच्या प्रवेशामुळे मतदार वाढत असेल तर काय हरकत, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पक्षप्रवेश देतांना स्थानिक पदाधिकाऱ्यांची जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बोगस बिल प्रकरणी आंदोलन स्थगित

0
0

आमदार शेख यांना महापालिकेचे आश्वासन

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील दीड हजार विकासकामांच्या बिलांची शासकीय त्रयस्थ समितीमार्फत सखोल चौकशी आदेश सरकारने दिलेले असतानाही महापालिकेकडून अदा करण्यात आलेल्या काही बिले अदा करण्यात आली होती. याविरोधात आमदार आसिफ शेख यांनी सोमवारपासून (दि. १२) आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, महापालिका प्रशासनाकडून याबाबत सखोल चौकशी करण्याचे पत्र आ. शेख यांना देण्यात आले असून सोमवारी धरणे आंदोलन करू नये, अशी विनंती केली आहे.

महापालिकेतील सुमारे दीड हजार विकासकामांची बिले त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करण्याचे आदेश सरकारने दिले असताना यातील काही बिले पाच नोव्हेंबर रोजी यातील अदा करण्यात आली. यावेळी आमदार शेख यांनी बिले अदा केल्याप्रकरणी मध्यरात्रीपर्यंत आंदोलन नाट्य घडले होते. तसेच आ. शेख यांनी सोमवारी (दि. १२) पर्यंत संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करावी; अन्यथा गांधी पुतळा येथे आंदोलन करू, असा इशारा दिला होता.

या संदर्भात महापालिकेने अदा केलेल्या बिलांची शासकीय त्रयस्थ समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात येईल तसेच चौकशीअंती खोटी बिले आढळल्यास त्या ठेकेदारांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. तसेच याकामी ज्या महापालिका अभियंता, उपअभियंता, शहर अभियंता यांनी आपली कर्तव्य इमानदारीने पार पाडली नाही. अशा अधिकाऱ्यांवर देखील नियमानुसार कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने सोमवारचे (दि. १२) आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती आमदार शेख यांनी दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षणविकासासाठी प्राध्यापकांची उजळणी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिक्षण हे विद्यार्थी विकास साधणारी विद्यार्थी केंद्रीत प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया अधिक प्रभावी होण्यासाठी प्राध्यापकांसाठी उजळणी वर्ग महत्त्वाचे ठरतात. या वर्गांमुळे शिक्षकांचा सर्वांगीण विकास साधून विद्यार्थी हित आणि समाजहित साधले जाते, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे 'एचआरडीसी'चे सहाय्यक समन्वयक डॉ. सचिन सुर्वे यांनी केले.

लोकनेते व्यंकटराव हिरे कॉलेजमध्ये उजळणी वर्ग झाला. त्याच्या समारोपाप्रसंगी डॉ. सुर्वे बोलत होते. या कोर्सच्या आयोजनामागील हेतू त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या विश्वस्त डॉ. योगिता हिरे उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, की काळ बदलतो तशी स्पर्धा वाढते. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शिक्षण आणि शिक्षक यांचा दर्जा वाढविणे गरजेचे असते. उच्च शिक्षणाचा विचार करतांना संबंधित शिक्षक, प्राध्यापक यांनी अपडेट राहणे आवश्यक आहे. यासाठी उद्बोधन वर्ग आणि उजळणी वर्ग महत्त्वाचे आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिघावकर यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करून कॉलेजचा परिचय करून दिला. वर्गाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. किरण पिंगळे यांनी करून दिला. याप्रसंगी पाच प्राध्यापकांना प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते उजळणी वर्गाचे प्रमाणपत्र देण्यात आले. कला व वाणिज्य शाखा प्रमुख डॉ. विनीत रकिबे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य डॉ. ए. व्ही. पाटील यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य डॉ. रवींद्र देवरे, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. एन. बी. पवार, उजळणी वर्गाचे समन्वयक डॉ. किरण पिंगळे सह मान्यवर उपस्थित समारोप पार पडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवनीच्या बछड्यांना वाचवा

0
0

\B

\Bम. टा. प्रतिनिधी, नाशिक

आईविना तिच्या लेकरांची जशी अवस्था होते तशीच अवनी या वाघिणीच्या मृत्यूनंतर तिच्या बछड्यांची झाली आहे. या बछड्यांचा थांगपत्ता लागत नसल्याने प्राणिमित्रांच्या काळजाचे ठोके चुकत असून, ती सुखरूप असतील की नाही या काळजीने झोप उडाल्याची भावना नाशिकमधील प्राणिमित्रांमधून व्यक्त होऊ लागली आहे. याच भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी रविवारी कॉलेजरोड परिसरातून रॅली काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या प्राणिमित्रांनी अवनीच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त करतानाच तिच्या बछड्यांच्या दीर्घायुष्यासाठी मंगलकामना केली.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावच्या जंगलात वन विभागाच्या रेस्क्यू टीमने अवनी वाघिनीला दोन नोव्हेंबर रोजी गोळ्या घातल्या. या घटनेचे पडसाद महाराष्ट्रतच नव्हे, तर जगभरातील प्राणिमित्रांमधूनही उमटू लागले आहेत. अवनीला निर्दयीपणे ठार मारल्याच्या मुद्द्यावरून राजकीय पक्षांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपला खिंडीत गाठण्यास सुरुवात केली असताना तिच्या दोन बछड्यांचा जीव वाचावा यासाठी प्राणिमित्रांनी मोहीम हाती घेतली आहे. देशभरात आणि अन्य काही देशांमध्ये रविवारी रॅली काढून अवनीच्या हत्येचा निषेध नोंदविण्यात आला. नाशिकमधील प्राणिमित्रही दुपारी चारच्या सुमारास रस्त्यावर उतरले. शरण फॉर अॅनिमल, गिव्ह आणि इको इको यांसारख्या स्वयंसेवी संस्थांनी फेसबुक, व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत प्राणिमित्र मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले. अवनीच्या हत्येमुळे सरकारचा निषेध करण्यासाठी प्राणिमित्रांनी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केटपासून या रॅलीला सुरुवात झाली. कॉलेजरोड, बिगबझार, बीवायके महाविद्यालय, डिसुझा कॉलनी कॉर्नरपासून भोसला कॉलेजच्या प्रवेशद्वारापर्यंत ही रॅली पोहोचली. याच मार्गाने पुन्हा वसंत मार्केटजवळ रॅलीचा समारोप झाला. विविध संदेश असलेले बॅनर्स हाती घेऊन या प्राणिमित्रांनी नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. बछड्यांचा लवकरात लवकर शोध घेतला जावा, तसेच त्यांच्या सुरक्षेची हमी सरकारने घ्यावी, अशी मागणी या वेळी प्राणिमित्रांकडून करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुभाजकाअभावी होतोहेत अपघात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर-शिर्डी महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम रेंगाळले असून, या महामार्गावरील दुभाजकांचा अभावही अपघातांना कारणीभूत ठरू लागला आहे. चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित असल्याने या रस्त्याची डागडुजी खोळंबली असून, परिणामी अनेकांना अपघातांमध्ये हकनाक जीव गमवावा लागत आहे. देवपूर फाटा येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दोन कुटुंबातील बापलेकांसह पाच जणांचा मृत्यू झाला असून, ही कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. मृतांसह अपघातातील जखमी बालिकेलाही रविवारी पहाटे मुंबईला हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शिर्डीहून सिन्नरकडे येणारी मुंबईतील भाविकांची इनोव्हा कार आणि नाशिकहून शिर्डीकडे चाललेली खासगी बस यांच्यात शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास देवपूर फाट्याजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात पाचजण ठार झाले, तर एक बालिका गंभीर जखमी झाली. मृतांपैकी तिघांची ओळख पटविण्यात पोलिसांना रात्री उशिरा यश आले. अपघातात नीलेश दशरथ जोशी (वय ३८) त्यांचा मुलगा पावणस नीलेश जोशी (वय १४), उदय जिनेंद्र वराळे (वय ४८) त्यांचा मुलगा रिषी उदय वराळे (वय १४) हे बापलेक मृत्युमुखी पडले. याखेरीज अगनेल आयपुमी चक्रमाकीन (वय ४८) यांचा या अपघातात मृत्यू झाल्याची माहिती वावी पोलिसांनी दिली. अपघातामध्ये पावणी नीलेश जोशी (वय ८) हिच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. हे सर्वजण मुंबईतील मीरारोड पूर्व परिसरातील हॅबटाऊन गार्डेनिया या भागातील रहिवासी होते. मृतांपैकी तिघांचे सिन्नर येथील नगरपालिका हॉस्पिटलमध्ये, तर दोन मुलांचे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विच्छेदन करण्यात आले. मध्यरात्री तीनच्या सुमारास हे मृतदेह घेऊन त्यांचे नातलग आणि सहप्रवासी मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक संदीप बोरसे यांनी दिली. पाच वाहनांमधून २८ भाविक शिर्डी येथे दर्शनासाठी आले होते. चार वाहने अन्य मार्गाने गेले, तर इनोव्हा सिन्नरकडे मार्गस्थ झाल्याची माहिती पुढे आली आहे.

..

महामार्गाच्या कामाला गती आवश्यक

सिन्नर ते शिर्डी महामार्गावर नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत वावी आणि पांगरी या दोन मोठ्या गावांच्या जवळपासच रस्त्यावर दुभाजक आहेत. अन्य मार्गावर दुभाजक नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरूनच वाहने चालवावी लागतात. या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येणार असून, त्यास केंद्र सरकारची मान्यतादेखील मिळाली आहे. नाशिक जिल्ह्यातील १९ गावांमधून ४३ किलोमीटरचा हा महामार्ग जाणार आहे. त्यासाठी प्रशासनाला ५६ हेक्टर क्षेत्र संपादित करावे लागणार आहे. भूसंपादनासाठीची ही प्रक्रिया सुरू असली तरी ती पूर्ण होऊन प्रत्यक्ष महामार्गाच्या चौपदरीकरणास काही कालावधी जाऊ द्यावा लागणार आहे. चौपदरीकरणाचा काम हाती घ्यावयाचे असल्याने आहे त्या महामार्गाच्या डागडुजीचे काम खोळंबले आहे. परिणामी या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून, त्यामध्ये वाहनधारकांना जीव गमवावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणीपातळीच्या खोलीने गाठला तळ!

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भूजल पातळीत वेगाने घट होत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांतील ६ हजार ७२ पैकी तब्बल २ हजार ३१६ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील विभागातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी उपाययोजना आखण्यासाठी प्रशासनाची युद्धपातळीवर धावपळ सुरू झाली आहे. दुष्काळाची दुसरी कळ लागू झालेल्या तालुक्यांची यादी सरकारने नुकतीच जाहीर केली असून उत्तर महाराष्ट्रातील त्यात ५४ पैकी ३९ तालुक्यांचा समावेश आहे. स्थानिक प्रशासनानेही संभाव्य पाणीटंचाईचा आराखडा तयार केला आहे.

नाशिक विभागातील ५४ पैकी तब्बल ४९ म्हणजे ९० टक्क्यांपेक्षा अधिक तालुक्यांतील भूजल पातळीत तीन मीटरपर्यंत घट आली आहे. गेल्या पाच वर्षांच्या सरासरीचा विचार करता भूजल पातळीत घट झालेल्या तालुक्यांची संख्या प्रथमच वाढली आहे. पाणीपातळीत घट झालेल्या २३ तालुक्यांमध्ये १ मीटर, १५ तालुक्यांमध्ये १ ते २ मीटर, ७ तालुक्यांमध्ये २ ते ३ मीटर आणि ४ तालुक्यांमध्ये ३ मीटरहून जास्त भूजल पातळीत घट आली आहे. नाशिक जिल्ह्यातील ८, धुळे जिल्ह्यातील ३, नंदुरबारमधील ४, जळगावमधील १३ आणि नगरमधील ११ तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांत समावेश आहे. विभागातील नंदुरबार, भुसावळ, रावेर आणि यावल या चार तालुक्यांतील भूजल पातळीत ३ मीटरपेक्षा जास्त घट आल्याने या तालुक्यांतील गावांना पाणीटंचाईची झळ सर्वांत जास्त बसणार आहे.

टंचाईग्रस्त गावे वाढणार

विभागातील सरासरी पर्जन्यमानात मोठी घट आल्याने प्रशासनाने जाहीर केलेल्या संभाव्य टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाच्या अहवालानुसार, ऑक्टोबर ते डिसेंबर या पहिल्या टप्प्यात ४६९, जानेवारी ते मार्च २०१९ या दुसऱ्या टप्प्यात ६४२ आणि एप्रिल ते जून २०१९ या तिसऱ्या टप्प्यात १ हजार २०५ अशा एकूण २ हजार ३१६ गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, भूजल पातळीत घट आलेल्या तालुक्यांची संख्या विचारात घेत टंचाईग्रस्त गावांच्या संख्येत दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे.

८८९ गावांमध्ये पाणीबाणी

पावसाळा सरून महिना उलटला नाही तोच विभागातील १९४ गावे आणि ६९५ वाड्यांवर पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या गावे व वाड्यांवरील ४ लाख १९ हजार ७७१ नागरिकांना प्रशासनातर्फे ५३ शासकीय आणि १४१ खासगी अशा १९४ टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. प्रशासनाकडे सध्या शेकडो गावांचे टँकर्स मागणीचे प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल झालेले आहेत. त्यामुळे हा टंचाईग्रस्त गावांचा आकडा जानेवारीपर्यंत २ हजारांवर पोहचण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून नागरिकांना पाणीटंचाईच्या तडाख्यातून वाचवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विभागातील पशुधन आणि उपलब्ध चाऱ्याची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विभागातील १०१ विहिरींचे अधिग्रहणही करण्यात आले आहे.

विभागातील टंचाई स्थिती

नाशिक जिल्हा

तालुका गावे/वाड्या टँकर्स

मालेगाव ६९ १६

नांदगाव ६५ ६

सिन्नर १२२ १८

येवला ४६ १८

देवळा ४ १

बागलाण ९ ७


धुळे जिल्हा

तालुका गावे/वाड्या टँकर्स

शिंदखेडा ८ ६

धुळे १ १


जळगाव जिल्हा

तालुका गावे/वाड्या टँकर्स

जळगाव १ १

भुसावळ २ २

चाळीसगाव ५ ३

अमळनेर १७ ८


नगर जिल्हा

तालुका गावे/वाड्या टँकर्स

संगमनेर ८४ २२

पारनेर १४३ २५

पाथर्डी २६४ ५३

नगर १९ ३

शेवगाव ६ ४

एकूण ८८९ १९४


पाणीटंचाईत होरपळणारी जनता

जिल्हा लोकसंख्या

नगर २,१४,७१६

नाशिक १,५१,७२६

जळगाव ३०,१४२

धुळे २३,१८७

एकूण ४,१९,७७१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचे निधन

0
0

नाशिक

मनमाडमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार कॉम्रेड माधवराव गायकवाड यांचं आज सकाळी निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. स्वातंत्र्य सैनिक, खंडकरी शेतकऱ्यांचे नेते, झुंजार व लढवय्ये व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती.

डाव्या चळवळीतील एक झुंजार नेते म्हणून गेली ५ ते ६ दशकं कॉम्रेड माधवराव गायकवाड कार्यरत होते. आदर्शवत व तत्वनिष्ठ राजकारणाने त्यांनी देशभर आपली आगळी छाप उमटवली होती. खंडकरी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी मिळवून देण्यासाठी अनेक वर्षे संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्यात गायकवाड यांनी मोलाची कामगिरी केली. शेतकरी, कामगार, महिलांच्या प्रश्नासाठी त्यांनी शासन दरबारी वेळोवेळी आवाज उठवला होता. गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. मनमाड येथील राहत्या घरी आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी कुसुमताई, कन्या अॅड. साधना असा परिवार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जवान चौकट

0
0

शासकीय इतमामात

गोसावींवर अंत्यसंस्कार

..

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

भारत-पाक सीमेवर पाक सैनिकांच्या गोळीबारात वीरमरण आलेले सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथील जवान नाईक केशव गोसावी यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. समाजाच्या संस्कारानुसार नाईक गोसावी यांच्या पार्थिवाचा दफनविधी करण्यात आला.

जवान गोसावी यांचे पार्थिव वायूसेनेच्या विशेष विमानाने ओझर येथे आणण्यात आले. ओझरहून त्यांचे पार्थिव श्रीरामपूर येथे नेण्यात आले. जवानांनी बंदुकीच्या २१ फैरी झाडत शहीद गोसावी यांचे तिरंगामध्ये लपटलेले पार्थिव दफनविधीसाठी त्यांच्या कुटुंबीयांचे स्वाधीन केले. दरम्यान, जवान नाईक केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे २५ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पान १ शहीद जवान

0
0

शासकीय इतमामात

गोसावींवर अंत्यसंस्कार

..

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

भारत-पाक सीमेवर पाक सैनिकांच्या गोळीबारात वीरमरण आलेले सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी (श्रीरामपूर) येथील जवान नाईक केशव गोसावी यांच्या पार्थिवावर सोमवारी रात्री शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. समाजाच्या संस्कारानुसार नाईक गोसावी यांच्या पार्थिवाचा दफनविधी करण्यात आला.

जवान गोसावी यांचे पार्थिव वायूसेनेच्या विशेष विमानाने ओझर येथे आणण्यात आले. ओझरहून त्यांचे पार्थिव श्रीरामपूर येथे नेण्यात आले. शहीद गोसावी यांचे तिरंगामध्ये लपटलेले पार्थिव दफनविधीसाठी त्यांच्या कुटुंबीयांचे स्वाधीन केले. दरम्यान, जवान नाईक केशव गोसावी यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे २५ लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images