Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सफाई कर्मचाऱ्यासह तिघे निलंबित

$
0
0

सफाई कर्मचाऱ्यासह तिघे निलंबित

गैरहजर १६१ सफाई कर्मचाऱ्यांची वेतनकपात; बड्या अधिकाऱ्यांनाही नोटीसा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर स्वच्छतेबाबत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मंगळवारी राबविलेल्या तपासणी मोहीमेत गैरहजर आढळेल्या १६१ सफाई कर्मचाऱ्यांचे प्रशासनाने एक दिवसांचे वेतन कापले आहे. यासोबतच विभागीय स्वच्छता निरीक्षक, सहा विभागीय अधिकारी तसेच घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प विभागाच्या संचालकांस कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. स्वच्छतेच्या कामात डमी कर्मचारी ठेवणारा सफाई कर्मचारी तसेच त्यावर नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या मुकादम व स्वच्छता निरीक्षकास आयुक्तांनी निलंबित केले आहे.

शहर स्वच्छता आणि घंटागाडीच्या अनियमिततेवरून सत्ताधाऱ्यासह विरोधकांनी महासभेत हल्लाबोल केला होता. तसेच, स्थायी समितीतही यावर वादळी चर्चा होवून घंटागाडी ठेक्यांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर मुंढे यांनी मंगळवारी पहाटे अचानकपणे शहरात तपासणी मोहीम राबवली होती. यात प्रशासनाच्यात कारभाराचे वाभाडे समोर आले असून, अकार्यक्षमतेची पोलखोल झाली आहे. शहरातील सर्व ३१ प्रभागांमधील हजेरी शेडवर खातेप्रमुखांना सकाळी ६ वाजता पाठवत सफाई कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. प्रत्येक हजेरी शेडवर किती कर्मचारी काम करतात, प्रत्यक्षात किती कर्मचारी कामावर आहेत, किती कर्मचारी विनापरवानगी गैरहजर आहेत, याची तपासणी खातेप्रमुखांमार्फत करण्यात आली. या तपासणीत तब्बल १६१ सफाई कर्मचारी विनापरवाना गैरहजर आढळले, तर २०७ कर्मचारी रजेवर असल्याचे सांगण्यात आले. काही कर्मचारी पाच-पाच महिन्यांपासून गायब असल्याचेही समोर आले होते. नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक २३ मध्ये तर एका सफाई कर्मचाऱ्याने डमी कर्मचारी नियुक्त केल्याची गंभीर बाबही या तपासणी मोहीमेतून समोर आली होती. आयुक्त मुंढे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, डमी कर्मचारी ठेवणारा सफाई कर्मचारी रमेश भोसले यास निलंबित करण्यात आले आहे. भोसले याने डमी कर्मचारी ठेवल्यानंतरही त्याला पाठीशी घातल्याप्रकरणी कामाच्या सोईने मुकादम असलेल्या चंद्रकांत सोनवणे व स्वच्छता निरीक्षक राजू रतन बोरीसा या दोघांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, तर उर्वरीत बड्या अन्य अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे या कारवाईने सफाई कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

हा बदनामीचा डाव!

प्रशासनाच्या तपासणी मोहिमेसह त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईवर महापालिका सफाई कामगार संघर्ष समितीने आक्षेप घेतला आहे. सदरची कारवाई ही सफाई कर्मचाऱ्यांच्या बदनामीसाठी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दिवाळीत सुट्ट्या नसल्याने दिवाळीनंतर सफाई कर्मचारी रजेवर गेले. परंतु रीतसर रजेवर असलेल्या कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली असून, प्रशासनाकडून सफाई कर्मचाऱ्यांना गुलामासारखी वागणूक दिली जात आहे. त्यामुळे ही कारवाई मागे घेण्यात यावी अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


स्मार्ट रस्त्यासाठी मार्चची डेडलाईन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अशोक स्तंभ ते त्र्यंबकनाका या स्मार्ट रस्त्याचे काम मार्च २०१९ पर्यंत पूर्ण केले जाईल, असा दावा या प्रकल्पाचे प्रमुख कर्नल एस. पी. सिंग यांनी बुधवारी केला.

स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका या मध्यवर्ती भागातील रस्त्याचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या स्मार्ट रोडबाबतचे सादरीकरण बुधवारी पोलिस आयुक्तालयामध्ये करण्यात आले. त्यावेळी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, वाडीया टेक्नो इजिंनिअरींग कंपनीचे प्रतिनिधी कर्नल सिंगल, विजय अपतुरकर, ओमकार कुलकर्णी, सुशील काळे, ऋषिकेश बच्छाव आदी उपस्थित होते. कर्नल सिंग यांनी स्मार्ट रोड नेमका कसा असेल याबाबतचे सादरीकरण केले. या स्मार्ट रोडमध्ये कोणकोणत्या बाबी समाविष्ट असतील, या रस्त्याचे काम नेमके कोणत्या टप्प्यात आहे, याबाबत माहिती दिली. सुमारे एक ते सव्वा किलोमीटर लांबीचा स्मार्ट रस्ता करण्यासाठी १४ कोटी ५३ लाख २९ हजार ३२४ रुपये खर्च अपेक्षित आहे. एप्रिल महिन्यात पहिल्या टप्प्यात मेहेर सिग्नल ते सीबीएस सिग्नल या ४४० मीटर अतरांवरील रस्त्याचे काम सुरू झाले. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून, पर्यायी रस्त्यावर वाहतुकीचा ताण येऊ लागला आहे. मार्च २०१९ पर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असून, एप्रिलमध्ये हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो, असा अंदाज सिंग यांनी वर्तविला. या मार्गावर सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग, सीसीटीव्ही, स्वयंचलित सिग्नल यंत्रणा, बसथांबे, डिजीटल जाहिरात फलक असणार आहेत. तसेच पादचाऱ्यांकरीता बैठक व्यवस्था, वायफाय सेवाही देण्याचे नियोजन आहे. हा मार्ग स्मार्ट झाल्यानंतर पुन्हा खोदकाम करणे शक्य नाही. त्यामुळे भूमीतंर्गत तारा, पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका सिग्नलपर्यंतच्या मार्गावरील काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असून, मार्चपर्यंत त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ या मार्गावरील कामही पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अयोध्या स्वारीला नाशिकमधून बळ

$
0
0

विशेष ट्रेनद्वारे शिवसैनिक २३ रोजी करणार कूच

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यात नाशिकमधील शिवसैनिकांकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली असून अयोध्या स्वारीत नाशिकचा वाटा मोठा असणार आहे. नाशिकमधील पदाधिकाऱ्यांवर अयोध्येत ठाकरे यांच्या सभेची जबाबदारी असून नाशिकमधून रेल्वेने तब्बल दीड ते दोन हजार शिवसैनिक २३ नोव्हेंबर रोजी अयोध्याला जाणार आहेत. शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे यांच्यावर त्याची जबाबदारी सोपवण्यात आली असून त्यासाठीचे नियोजन सध्या सुरू आहे.

अयोध्येतील राम मंदिराच्या विषयावरून शिवसेनेने भाजपची कोंडी केली असून चार वर्षात राम मंदिर बांधू न शकलेल्या भाजपला उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत धडक देवून भाजपसमोर आव्हान उभे केले आहे. राम मंदिरासाठी ठाकरे २४ व २५ नोव्हेंबर असे दोन दिवस अयोध्या दौऱ्यावर आहेत. त्यासाठीचे नियोजन सध्या शिवसेनेकडून केले जात आहे. ठाकरे थेट अयोध्येत जाऊन रामललाचे दर्शन घेणार असून तिथे सभेलाही संबोधित करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत उत्तर प्रदेशमध्ये उत्सुकता लागून आहे. त्यांच्या दौऱ्याची विशेष जबाबदारी मुंबई आणि नाशिकमधील पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे. नाशिकमधून विजय करंजकर, अजय बोरस्ते, सुहास कांदे, सुधाकर बडगुजर, विलास शिंदे यांच्यावर विशेष जबाबदारी टाकण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख संजय राऊत, नाशिकचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी याबाबतचा आढावाही घेतला आहे. नाशिकच्या पदाधिकाऱ्यांकडे उद्धव ठाकरे यांच्या सभेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठीचे नियोजन हे पदाधिकाऱ्यांकडून केले जात असून नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत दोन वेळा अयोध्येला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे. सहा दिवसांच्या दौऱ्यानंतर हे पदाधिकारी नाशिकमध्ये बुधवारी परतले आहे. नाशिकमधून ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यासाठी तब्बल दीड ते दोन हजार पदाधिकारी व शिवसैनिक जाणार आहेत. त्यासाठी विशेष ट्रेन बूक करण्यात आली असून ही ट्रेन शुक्रवार, २३ नोव्हेंबरला येथून निघणार आहे. त्यामुळे ठाकरेंच्या अयोध्या स्वारीला नाशिकमधून मोठे बळ मिळणार आहे.

बैठकांचा जोर

दौऱ्याच्या आयोजनासाठी नाशिक पूर्व विधानसभा मतदार संघात बुधवारी प्रभाग निहाय बैठका घेण्यात आल्या. अयोध्या दौऱ्यासाठी (दि. २३) नोव्हेंबरला नाशिकरोड स्टेशनवरून निघण्याचे ठरविण्यात आले आहे. आडगाव आणि नांदूर येथे बुधवारी झालेल्या बैठकींमध्ये शिवसेनेचे महानगरप्रमुख महेंद्र बडवे, शिवसेना नेते राजू लवटे, दिलीप मोरे, माजी नगरसेवक शिवाजी निमसे, विधानसभा प्रमुख नितीन चिडे, मल्हारी मते, सुरेश मते, उपमहानगर प्रमुख सुनील जाधव, शैलेश सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी, समन्वयक शिवा ताकाटे, सुनील निरगुडे, नीलेश मोरे, पोपट शिंदे, संजय माळोदे आदी उपस्थित होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची मोठी जबाबदारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. ठाकरेंच्या आदेशानुसार नियोजन केले जात आहे. नाशिकमधून थेट अयोध्येला जाण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठीचे नियोजन सध्या केले जात आहे.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कायदे बदलासाठी देवळालीतून १५ सूचना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भारतीय संरक्षण मंत्रालयाने पुणे येथील दक्षिण कमान विभागात येणाऱ्या सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डांना पत्र पाठवून कॅन्टोन्मेंट बोर्ड कायद्यात सुधारणा करण्याबाबत सूचना मागविल्या आहेत. त्यानुसार देवळालीतील कॅन्टोन्मेंट नगरसेवकांच्या बैठकीत नागरी विभागाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या १५ सूचनांची सूची तयार करून संरक्षण मंत्रालयाने नेमलेल्या समितीकडे पाठविण्यात येणार आहे.

देशभरातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी अर्थ मंत्रालयाकडून वार्षिक ४७६ कोटी रुपये खर्च होत आहेत. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील नागरिकांना उद्भवणाऱ्या विविध समस्यांचे निराकारण करण्यासाठी कॅन्टोन्मेंट कायद्यात दुरुस्तीचे निर्देश दिले होते. त्यानुसार सर्वच कॅन्टोन्मेंट बोर्डातील सूचनांचा योग्य त्या पद्धतीने तयार करून त्या संबंधित समितीकडे पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी कॅन्टोन्मेंट कार्यालयात उपाध्यक्षा मीना करंजकर यांच्यासह बाबुराव मोजाड, दिनकर आढाव, सचिन ठाकरे, दिनकर आढाव, भगवान कटारिया, कावेरी कासार, प्रभावती धिवरे, आशा गोडसे आदींनी नागरी विकासाच्या दृष्टीने अभ्यास करून १५ सूचनांची यादी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सुशिक्षित बेरोजगारांसाठी प्रशिक्षण योजना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या. नाशिक यांच्यामार्फत २०१८-१९ या वर्षासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या आर्थिक विकासासाठी विनामूल्य प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे दोन छायाचित्रे, शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रक, कुठल्याही ओळखपत्राची एक प्रत, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला सादर करावा. अर्जदार किमान १० वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. इच्छुकांनी आपले अर्ज कागदपत्रांच्या पुर्ततेसह महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा कार्यालय, नासर्डी पुलाजवळ, नाशिक-पुणे रोड नाशिक येथे २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सादर करावे. अधिक माहितीसाठी ०२५३-२२३६४१० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ यांनी कळविले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहीद जवानाच्या कुटुंबियांना मदतीचा ओघ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

शहीद जवान नायक केशव गोसावी यांचे कुटुंबियांना आता तालुक्यातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. सिन्नर पंचायत समिती, सिन्नर तालुका ग्रामसेवक युनियन व नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने बुधवारी तातडीची आर्थिक मदत सुपूर्द करण्यात आली.

सैन्य दलाच्या २४ मराठा बटालीयनमध्ये नेमणुकीवर असलेले शिंदेवाडी (श्रीरामपूर, ता. सिन्नर) येथील जवान नायक केशव गोसावी रविवारी नौशेरा भागात आतंकवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. त्यांचे कुटुंबिय व संपूर्ण शिंदेवाडी गावासह तालुक्यात शोककळा पसरली आहे. शहीद जवानाच्या पश्चात अपंग वडील, पत्नी व विवाहीत बहिणी असा परिवार आहे. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. सिन्नर तालुका ग्रामसेवक युनियनच्या वतीने रोख रक्कम २५ हजार रुपये, सिन्नर पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी यांच्यावतीने रोख ३१ हजार रुपये अशी आर्थिक मदत शहीद जवानाच्या वडिलांकडे सुपुर्द करण्यात आली. तसेच नाशिक जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेचे वतीने २१ हजारांचा धनादेश देण्यात आला. यावेळी सिन्नर पंचायत समितीचे सभापती भगवान पथवे, उपसभापती जगनपाटील भाबड, गटनेते संग्राम कातकाडे, गटनेते विजय गडाख, गटविकास आधिकारी डॉ. लता गायकवाड, सहा. गटविकास अधिकारी रत्नाकर पगार, गटशिक्षण अधिकारी शिवनाथ निर्मळ, बालविकास प्रकल्प अधिकारी गोरख शेवाळे, नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे, ग्रामसेवक युनियनचे तालुकाध्यक्ष संजय गिरी, कृषी अधिकारी कैलास भदाणे, पशुधन विकास अधिकारी डॉ. मिलिंद भणगे, लेखाधिकारी विजय आघाव, ग्रामसेवक युनियन तालुका सचिव जालींदर वाडगे, सहसचिव प्रमोद शिरोळे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चा : चौकट

$
0
0

व्यावसायिकांत अस्वस्थता

शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चा पोहोचल्यानंतर शालिमार ते सीबीएस आणि सीबीएस ते शालिमार या दुतर्फा रस्त्यावर शेतकऱ्यांनी बसकन मारली. इतकेच नव्हे; तर उन्हाच्या चटक्यापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी तर शालिमार रस्त्यावरील दुकानांसमोरच्या मोकळ्या जागेत जागा पटकावली. या मार्गावर नजर पुरेल तेथे शेतकरीच दिसत होते. मोर्चाचे सभेमध्ये रूपांतर झाल्यानंतर बराचवेळ पदाधिकाऱ्यांची भाषणे सुरू होती. रस्ता वाहतुकीसाठी बंद असल्याने ग्राहकही या परिसरातील दुकानांकडे फिरकू शकले नाहीत. तब्बल दोन-तीन तास हा रस्ता ठप्प असल्याने व्यावसायिकांमध्ये घालमेल सुरू होती. परिसरातून हे शेतकरी केव्हा बाहेर पडतील, अशी विचारणाही व्यावसायिकांकडून केली जात होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुलगी झाली म्हणून सुनेला काढले घराबाहेर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

माहेरून पैसे आणत नाही आणि त्यातच मुलगी झाल्याचा राग आल्याने सुनेला घराबाहेर काढल्याचा प्रकार सिडको परिसरात घडला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रियांका कृष्णा गोसावी (२७, अंबड लिंकरोड) यांनी अंबड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रियांका यांचे लग्न कृष्णा सुरेश गोसावी यांच्याबरोबर झाले असून, लग्नानंतर हुंडा दिला नाही तसेच सोने-नाणे आणत नाही म्हणून सासरकडून त्यांचा सतत छळ सुरू होता. त्यात प्रियांका यांना २२ नोव्हेंबर २०१६ मुलगी झाली. प्रियांका मुलीसह सासरी आल्यानंतर तुला मुलगी झाली असून, 'तू आल्यापासूनच घरात बाहेरचे काही तरी झाले आहे', असा आरोप करण्यात येत होता. मुलगी झाली आणि माहेरून पैसे आणत म्हणून सासू संगीता सुरेश गोसावी, सासरे सुरेश गोसावी, दीर धनंजय गोसावी व पती कृष्णा सुरेश गोसावी यांनी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला होता. त्यानंतर संशयितांनी प्रियांकाला घराबाहेर काढले. प्रियांकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुळे डाव्या कालव्याचे पाणी सोडण्याची मागणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी सुळे डाव्या कालव्यास सोडण्यात येणारे पाणी पिळकोस गावापर्यंत न सोडता यंदा खामखेडा-सावकी शिवारापर्यंत सोडा, अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याशी चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन दिले. परिसरातील गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. विहिरींनी तळ गाठला आहे. पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. अशा विपरित परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून सुळे डाव्या कालव्याचे पाणी खामखेडा व सावकी शिवारापर्यंत सोडल्यास शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकणार आहे. पिळकोससह सावकी, खामखेडा, विसापूर, भादवन, बिजोरे, घनगरपाडा आदी गावांमधील शेतकऱ्यांना या सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा लाभ मिळू शकणार आहे. पाण्याचे आवर्तन तात्काळ मिळावे, खामखेडा व सावकी येथील पाझर तलावासाठी गेट टाकण्यात यावेत आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. खामखेडा व सावकी शिवारातील कालव्यास पाझर तलावाच्या नाल्यावर गेट टाकल्यास पावसाळ्यात या कालव्यास पाणी सोडल्यास तसेच पूर पाण्याने हे तलाव भरल्यास भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास मदत होईल, असे या निवेदनामध्ये म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकला दोन पदके

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे येथे सुरू असलेल्या ४९ व्या आंतर जिल्हा व ८० व्या राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धेत सांघिक स्पर्धेत सब ज्युनियर मुलींच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करीत रजत पदक मिळविले. नाशिकच्या संघात तनिषा कोटेचा, सायली बक्सी, मिताली पुरकर यांचा समावेश आहे.

तसेच कॅडेट मुलाच्या, मुलींच्या व पुरुषांच्या संघाने कांस्यपदक मिळविले. कॅडेट मुलांच्या संघात कुशल चोपडा, पियुष जाधव, आर्यन पोळ तर कॅडेट मुलीच्या संघात सायली बक्सी, मिताली पुरकर, अनन्या फडके, पुरुषांच्या संघात पुनीत देसाई, पंकज राहणे, अजिंक्य शिंत्रे व अर्चित भडकमकर यांचा समावेश आहे. या स्पर्धेत २३ जिल्हाच्या संघांनी सहभाग घेतला. विजयी खेळाडूंना पदक देऊन गौरविण्यात आले. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष नरेंद्र छाजेड, सचिव शेखर भंडारी व राजेश भरवीरकर यांनी जिमखान्याचे सचिव राधेश्याम मुंदडा, नितीन चौधरी तसेच संघटनेचे मिलिंद कचोळे, सतीश पटेल, संजय वसंत, अभिषेक छाजेड, जय मोडक, अजिंक्य शिंत्रे, हर्षल पवार आदींसह पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकार्पणापूर्वीच नेहरू उद्यान खुले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाकवी कालिदास कलामंदिराच्या लोकार्पणापाठोपाठ आता स्मार्ट सिटीअंतर्गत विकसित केलेल्या नेहरू उद्यानाच्या लोकार्पणाचाही वाद उफाळून आला आहे. अर्धवट कामामुंळे लोकप्रतिनिधींनी नेहरू जंयतीच्या दिवशी उद्यानाचा लोकार्पण सोहळा हाणून पाडल्यानंतरही बुधवारी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी परस्पर उद्यान नागरिकांसाठी खुले करण्याचे आदेश कंपनीला दिले. त्यामुळे जयंतीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर हे उद्यान सुरू झाल्याने आयुक्त विरुद्ध लोकप्रतिनिधी वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. आयुक्तांच्या या कृतीचा सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी निषेध केला असून, हा प्रकार दादासाहेब गायकवाड यांचा अवमान करणारा असल्याचा आरोप महापौरांनी केला आहे.

आयुक्त मुंढे आणि पालिकेतील लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत कालिदास कलामंदिराचे लोकार्पण होण्याआधीच आयुक्त मुंढे यांनी परस्पर उद्घाटनाचा सोपस्कार पार पाडला होता. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि आयुक्तांमध्ये वाद उफाळला होता. हा वाद ताजा असतानाच, आता नेहरू उद्यानाच्या लोकार्पणाबाबत लोकप्रतिनिधींना तसाच अनुभव आला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत नेहरू उद्यानाचा पुनर्विकास करण्यात आला आहे. तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून या उद्यानाचे रुपडे पालटण्यात आले आहे. नेहरू जयंतीचे निमित्त साधून स्मार्ट सिटी कंपनीमार्फत लोकार्पण सोहळा आयोजित करण्याचे नियोजन कंपनीच्या वतीने गेल्या चार दिवसांपासून सुरू होते. स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून संचालकांना निमंत्रणे दिली जात असतानाच त्यास विरोध करण्यात आला. उद्यानाचे काम अपूर्ण असून, उद्यानातील दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याची रंगरंगोटी बाकी आहे. त्यामुळे काम सुरू असतानाच सोहळा आयोजित का व कुणासाठी करत आहात असा सवाल करून काँग्रेसने आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे यांनी याबाबत लेखी हरकत घेतली होती. सत्ताधारी भाजपनेदेखील काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा दिल्यानंतर वाढता विरोध लक्षात घेऊन कंपनीकडून लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम मागे घेण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. परंतु, गुरुवारी सकाळी जयंतीनिमित्त नेहरुंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आल्यानंतर आयुक्त मुंढे यांनी उद्याने खुले करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याने नवा वाद निर्माण झाला.

भाजपकडून पालकमंत्र्यांच्या हस्ते थाटामाटात या उद्यानाचे लोकार्पण केले जाणार होते. परंतु, त्याआधीच सत्ताधारी भाजपचा श्रेय घेण्याचा प्रयत्न आयुक्तांनी हाणून पाडल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. लोकार्पण करण्याचा आयुक्तांचा डाव लोकप्रतिनिधींनी हाणून पाडल्यानंतर आयुक्तांनीही लोकार्पणापूर्वीच उद्यान खुले करून देत, लोकप्रतिनिधींना चेकमेट दिला आहे. महापौर रंजना भानसी यांच्यासह सभागृह नेते दिनकर पाटील, काँग्रेस गटनेते शाहु खैरे व मनसेचे गटनेते सलीम शेख यांनी ही निंदनीय घटना असल्याचे सांगत आंदोलनाचा इशारा दिला.

मानापमान नाट्य

दरम्यान नेहरू जंयतीनिमीत्त उद्यानातील नेहरूंच्या पुतळ्याला हार घालण्यावरून महापौर आणि आयुक्तांमध्ये मानापमान नाट्य रंगले होते. महापौर व अन्य पदाधिकारी सोहळ्यासाठी उपस्थित असतानाच आयुक्तांनी उशिराने एंट्री केली. यावेळी हार घालण्यास जाण्याऐवजी मुंढे यांनी अधिकाऱ्यांना घेऊन प्रथम उद्यानाची पाहणी केली. महापौरांनी दहा मिनिटे आयुक्तांची वाट पाहिली. परंतु, आयुक्त न आल्याने नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांच्या हस्ते पुतळ्याला हार अर्पण करण्यात आला. याची वार्ता आयुक्तांना समजल्यानंतर उशिराने त्यांनी उपस्थिती लावून फोटोची औपचारिकता पार पाडली.

उद्यानाचे काम अपूर्ण असून, प्रांगणातील दादासाहेब गायकवाड यांच्या पुतळ्याचे काम अर्धवट आहे. त्यामुळे लोकार्पण कार्यक्रम घेणे दादासाहेब गायकवाड यांचा अवमान ठरला असता. परस्पर घोषणा करण्यात आल्याने आयुक्तच याला जबाबदार राहतील.

- रंजना भानसी, महापौर

नगरसेवक, स्मार्ट सिटी संचालकांना विश्‍वासात घेवून लोकार्पण करणे अपेक्षित असताना परस्पर लोकार्पणाची घोषणा आयुक्तांनी केल्याने लोकप्रतिनिधींचा अपमान आहे. बैठकीत याबाबत जाब विचारला जाईल.

- दिनकर पाटील, सभागृह नेते

नेहरु उद्यानात अद्याप कामे अपूर्ण असताना परस्पर लोकार्पणाची घोषणा करणे निंदनीय आहे. काँग्रेस पक्ष आयुक्तांच्या भूमिकेचा निषेध करीत असून, ही बेबंदशाही सहन केली जाणार नाही.

- शाहु खैरे, काँग्रेस गटनेते

नगरसेवकांना विश्‍वासात घेवून लोकार्पण सोहळा आयोजित करणे गरजेचे होते. कालिदासप्रमाणे आयुक्तांनी पुन्हा एकदा लोकप्रतिनिधींना डिवचले असून, याचे उत्तर प्रशासनाला द्यावे लागणार आहे.

- सलीम शेख, मनसे गटनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोम्बिंग ऑपरेशनमध्ये १५९ जण ताब्यात

$
0
0

नाशिक : शहरातील सर्व झोपडपट्टी परिसरात मंगळवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन करून पोलिसांनी १५९ जणांना ताब्यात घेतले. पोलिस मुख्यालयातील बराक १७ मध्ये ओळख परेड घेऊन संबंधितांची छायाचित्रे, सध्या ते कोठे राहतात, काय करतात यांसारखी माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. शहरात सातत्याने गुन्हेगारी घटना घडत आहेत. घरफोडी, चेनस्नॅचिंग, चोरी, जबरी चोरी, वाहनचोरी इतकेच नव्हे तर हाणामाऱ्या, खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे गुन्हे वाढतच आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी मंगळवारी मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबविले. कारवाईत पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे यांसह सर्व सहायक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, गुन्हे शोध पथकाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिस महिलेस पंचवटीत शिवीगाळ

$
0
0

पोलिस महिलेस पंचवटीत शिवीगाळ

नाशिक : रस्त्यात अडथळा ठरणारी मोपेड बाजूला घेण्यास सांगितले म्हणून महिला पोलिसाशी एका तरुणाने हुज्जत घातली. पंचवटीतील खांदवे सभागृहासमोर मंगळवारी (दि. १३) सायंकाळी हा प्रकार घडला.

निखिल विलास धारणे (वय २६, ब्रह्मपुत्र सोसायटी, मेरी, पंचवटी) असे संशयित दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलिस मुख्यालयातील महिला पोलिस शिपाई कोमल विजयसिंग यादव यांनी तक्रार दिली आहे. त्या छटपूजेनिमित्त लावण्यात आलेल्या बंदोबस्तात कार्यरत होत्या. धारणे याने सायंकाळी सात वाजता खांदवे सभागृहासमोरील रस्त्यावर मोपेड उभी केली. यादव यांनी त्याला गाडी काढून घेण्यास सांगितले. त्यावेळी त्याने त्यांच्याशी हुज्जत घालत शिविगाळ केली. याप्रकरणी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मद्यसाठा जप्त

नाशिक : राज्यात विक्रीस बंदी असलेल्या मद्याची कारमधून चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना गिरणारे शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून स्विफ्ट कारसह पावणे सहा लाखाचा मद्यसाठा जप्त करण्यात आला. हे मद्य हरसूलमार्गे शहरात आणले जात होते.

अब्दुल कादर अब्दुल हमीद शेख व रिझवान खान मेहबुब खान पठाण (दोघे रा. सुरत, गुजरात) अशी मद्य वाहतूक करणाऱ्यांची नावे आहेत. विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे यांना याबाबतची माहिती मिळाली होती. गिरणारे शिवारात सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. त्यावेळी १ लाख ८५ हजार २८० रुपयांचा मद्यसाठा मिळून आला. निरीक्षक एम. बी. चव्हाण, एस. डी. चोपडेकर, दुय्यम निरीक्षक एस. एस. रावते, आर. आर. धनवटे, डी. एन. पोटे, दीपक आव्हाड, श्याम पानसरे, कैलास कसबे, अमित गांगुर्डे आदींनी ही कारवाई केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदामाच्या आगीत लाखोंचे साहित्य खाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळालीतील वॉर्ड क्रं. ७ मधील चारणवाडी येथील मोकळ्या पटांगणात असलेल्या गोदामाला दुपारी बारा वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. इंडिका कारसह दोन मोटारसायकल, लसूण, कांद्याचीही यात राखरांगोळी झाली आहे. फिर्यादी पुंडलिक जाधव यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत सुरेश रघुनाथ कुसाळकर यांनी कुणाच्या तरी मार्फत ही आग लावल्याचे नमूद केले आहे.

या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांत व्यापारी पुंडलिक जाधव यांनी दिलेल्या फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आपण गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाल्याचा व्यवसाय करत असून, त्याचे साहित्य ठेवण्यासाठी राहत्या घरासमोरील मुल्ला अँड मुल्ला यांच्या मालकीच्या पत्र्यांची दोन शेड उभारली आहेत. गुरुवारी दुपारी १२ वाजता अचानक लागलेल्या आगीत ४० बाय २० फुटांचे दोन शेड, प्लास्टिकच्या १०० जाळ्या, आतमध्ये ठेवलेला हजारो रुपये किमतीचा लसूण आणि कांदे, एमएच ०४, बीडी ३७२७ ही चालू स्थितीतील इंडिका गाडी, दोन दुचाकी वाहने, आतमध्ये ठेवलेल्या लाकडाचे दरवाजे व खिडक्यांसह दोन्ही शेड आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. आग लागल्याचे समजताच त्यांच्या शेजारी राहत असलेल्या नागरिकांनी त्यांना फोनवरून आपल्या गोडाऊनला आग लागल्याची माहिती फोनवरून दिली. लागलीच जाधव यांनी ही माहिती आपला भाचा बांधकाम व्यावसायिक गुंडाप्पा देवकर यांना मोबाइलवर कळविली. त्यांनी तातडीने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन विभागास संपर्क साधून त्वरित पाण्याचा बंब पाठविण्याबाबत सांगितले. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे गोडाऊनसह त्यामध्ये असलेले सर्व साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन दलाचे कर्मवीर जगपाल, भाऊसाहेब सानप, दिलीप बोराडे, संजय सकट आदी जवान तब्बल ४ तास झटत होते. या आगीवर नियंत्रण मिळवायला एका बंबाची तीन वेळा ने-आण करावी लागली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून भादंवि ४३६,४२७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पाच डंपर वाचले

या आग लागलेल्या ठिकाणसापासून अवघ्या पाच मीटर अंतरावर उभ्या असलेल्या खडीडबरच्या पाच गाड्या उभ्या होत्या. आग लागल्यानंतर दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आधी आजूबाजूच्या परिसरातदेखील पाण्याचा मारा केल्याने आग तेथपर्यंत पोहचू शकली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाढदिवस

$
0
0

नाशिक वाढदिवस

०००००००

प्रवीण बेन्स

अध्यक्ष, कलर लॅब असो, नाशिक

शिवदास डागा,

माजी संचालक, नामको बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा बँकेच्या आशा मुख्यमंत्र्यांमुळे पल्लवीत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुर्नवैभव प्राप्त करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसावले असून, विधानसभा अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्र्यानी बँकेची आढावा बैठक बोलवली आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी बुधवारी मुख्यमंत्र्याची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यानी ही बैठक बोलवली असून, त्यामुळे बँकेला निधी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी बुधवारी (दि.१४) मुख्यमंत्री फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. या भेटीत अध्यक्ष आहेर यांनी बँकेच्या अडीअडचणी मुख्यमंत्र्यासमोर मांडल्या. नोटाबंदी व कर्ज वसुली न झाल्याने जिल्हा बँक अडचणीत सापडली असल्याचे सांगत, कठीण परिस्थितीतही बँकेची वसुली वाढविल्याचा दावा त्यांनी मुख्यमंत्र्याकडे केला. परंतु, या वसुली मोहिमेस चांगले यश मिळत असतानाच दुष्काळ जाहीर झाला. यामुळे दुष्काळी तालुक्यातील वसुली पुन्हा थांबविण्यात आली आहे. बँकेकडे पुरेसा निधी नसल्या कारणाने शेतकऱ्यांची मागणी असतानाही खरीप हंगामात कमी कर्ज पुरवठा करावा लागला. रब्बी हंगामातही बँक शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करू शकत नाही शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा व्हावा यासाठी एक हजार कोटींची मदत मिळावी, अशी मागणीसह प्रस्ताव राज्य सहकारी बँकेकडे पाठविण्यात आला. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे अध्यक्ष आहेर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशनास आणून दिले. शेतकऱ्यांचा बँकेवर पूर्ण विश्वास आहे, त्यांना नियमित कर्ज पुरवठा केल्यास, परतफेड वेळेत करणारे शेतकरी आहेत. त्यासाठी बँकेला निधीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवळालीसाठी निधी

$
0
0

एक कोटीचा निधी

देवळाली कॅम्प : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत देवळाली मतदारसंघातील १४ गावांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार योगेश घोलप यांनी दिली. मतदारसंघातील विकासासाठी घोलप यांनी गेल्या चार वर्षांत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यात पाणीपुरवठा, अभ्यासिका, सामाजिक सभागृह, संगणक, रस्ते आदींचा समावेश असून, सन २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी शासनाने सामाजिक विकास योजनेअंतर्गत विविध प्रस्तावांना मंजुरी देताना देवळाली मतदारसंघाला प्राधान्य दिले आहे. त्यानुसार जाखोरी येथे सामाजिक सभागृह (१० लाख), ओढा- अभ्यासिका (१० लाख), पळसे - रस्ता काँक्रिटीकरण (५ लाख), शिंदे-रस्ता काँक्रिटीकरण (५ लाख), शिलापूर-रस्ता तयार करणे (५ लाख), विल्होळी संघर्षनगर येथे सभागृह बांधणे (१० लाख), माडसांगवी- रस्ता काँक्रिटीकरण (५ लाख), बेलगाव ढगा - अभ्यासिका (५ लाख), सय्यद पिंप्री - रस्ता काँक्रिटीकरण (१० लाख), जातेगाव - रस्ता तयार करणे (५ लाख), सारूळ - रस्ता काँक्रिटीकरण (५ लाख), महिरावणी रस्ता काँक्रिटीकरण (१० लाख), दहेगाव - रस्ता व गटार बांधणे (५ लाख), बाभळेश्‍वर - रस्ता काँक्रिटीकरण (५ लाख) आदी कामांचा समावेश असून, अनुसूचित जाती वस्तीमध्ये ही सर्व कामे येत्या आर्थिक वर्षात केली जाणार असल्याचे आ. घोलप यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सादरीकरण मानधन वाढविण्याचा ठराव करणार

$
0
0

नाट्य परिषद अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य नाट्य स्पर्धेच्या पारितोषिकांच्या रकमा अधिक आहेत; मात्र सादरीकरणासाठी जे मानधन शासनाकडून मिळते ते अगदीच तुटपुंजे आहे. हे मानधन सहा हजाराहून दहा हजार व्हावे, अशी रंगकर्मींची अपेक्षा असून येत्या नाट्य संमेलनामध्ये तसा ठराव नाट्यपरिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांनी केले.

महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला गुरुवारी सुरुवात झाली. यावेळी अध्यक्षपदावरून प्रा. कदम बोलत होते. मंचावर नाट्य परिषदेच्या नियामक मंडळाचे सदस्य सुरेश गायधनी, अभिनेत्री धनश्री क्षीरसागर, परीक्षक मानसी राणे, दीप चहांदे, श्रीराम धुमणे, राज्य नाट्य स्पर्धा समन्वयक राजेश जाधव, सहसमन्वयक मीना वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. कदम म्हणाले, की गेली ५० वर्षे महाराष्ट्र शासन राज्य नाट्य स्पर्धेचे शिवधनुष्य पेलत आहे. या स्पर्धेने आपल्याला किती नवे चेहरे दिले. चित्रपट, मालिका, रंगभूमी यातील अनेक यशस्वी चेहरे याच स्पर्धेतून पुढे आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याप्रमाणे तालुका पातळीवरही अशी स्पर्धा होते गरजेचे आहे. तेथेही प्रचंड टॅलेंट आहे, ते समोर आले पाहिजे. त्यासाठी राज्य शासनानेही काही बाबतीत हात आखडता घ्यायला नको. सादरीकरणाचे मानधन वाढवून दिले पाहिजे. नाटक तळागाळात पोहोचले पाहिजे, असेही कदम म्हणाले. नाशिक केंद्रातून २२ च नाटके का? ४४ नाटके हवीत, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. सुरेश गायधनी यांनी उद्घाटक म्हणून छोटेखानी भाषण केले. समन्वयक राजेश जाधव यांनी प्रास्ताविक केले. राजेश शर्मा यांनी सूत्रसंचालन केले.

प्रियांका आणि दोन चोर

'राज्य नाट्य'च्या प्रारंभी अंबिका चौक मित्र मंडळाच्या वतीने 'प्रियांका आणि दोन चोर' हे दोन अंकी नाटक सादर करण्यात आले. श्याम मनोहर लिखित हे नाटक राजेश शर्मा यांनी दिग्दर्शित केले होते. निर्मिती राजा पाटेकर यांची होती. बांधकाम साईटवर रखवालदारी काम करणारी प्रियांका आणि बिल्डरच्या नकळत एका फ्लॅटमध्ये भाडे देऊन रहाणारे दोन चोर अश तीन पात्रांभोवती हे नाटक गुंफण्यात आले होते. कथानक सामाजिक मनोवृत्तीचे विविध पैलू दाखवून जाते. आठवड्याभराचे सामान भरून ठेवणारी प्रियांका आणि या दोन चोरांना वाटणारे तिचे आकर्षण यावर हे नाटक आधारित आहे. प्रकाशयोजना रवी रहाणे यांची तर रंगभूषा ललित कुलकर्णी, संगीत शुभम शर्मा, नेपथ्य शैलेन्द्र गौतम तर या नाटकात वैशाली देव, हेमंत गव्हाणे व अमोल थोरात यांनी भूमिका केल्या.

आजचे नाटक

मुकुंद कुलकर्णी लिखित 'आधार शीला' नाटक

स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ७ वाजता

लोगो : राज्य नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४०० तळीराम कोर्टाकडून ‘सरळ’

$
0
0

मद्यपींमधून साडेसात लाखांची दंडवसुली

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मद्याचे पेग रिजवून आपल्यासह इतरांचे जीव धोक्यात घालणाऱ्या तळीरामांना शहर वाहतूक शाखेने दंडाचा उतारा दिला. जानेवारी ते डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत वाहतूक पोलिसांनी ४०९ तळीरामांवर कारवाई कोर्टात पाठवले. कोर्टाने या तळीरामांकडून सात लाख २८ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला.

प्राणघातक अपघातांमध्ये सर्वाधिक प्रमाण हिट अॅण्ड रन्सचे असते. ओव्हर स्पीड आणि मद्यपान ही अपघाताची प्रमुख दोन कारणे मानली जातात. देशभरात अपघातांच्या घटनांमध्ये दिसून येणारे साधर्म्य लक्षात घेता मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर हायकोर्टासह सुप्रीम कोर्टाने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत शहर वाहतूक शाखेने एकूण ४०९ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली. मद्यपी वाहनचालकांच्या श्वासाद्वारे त्याच्या शरिरातील अल्कोहोलचे प्रमाण मोजले जाते. यासाठी पोलिस ब्रेथ अॅनालायझरचा वापर करतात. यानंतर संबंधित वाहनचालकास लागलीच सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठवले जाते. वाहनचालकाच्या रक्तात देखील प्रमाणीत मात्रेपेक्षा अधिक स्वरूपात अल्कोहोल आढळून आल्यास त्यास पुढील कारवाईसाठी कोर्टात हजर करण्यात येते. तेथे कोर्ट साधारणतः पंधराशे रुपयांपर्यंत दंड करू शकते. काही प्रकरणांमध्ये ही रक्कम आणखी वाढू शकते. या प्रकारे यंदा शहर वाहतूक शाखेने कोर्टात पाठवलेल्या मद्यपींकडून सात लाख २८ हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. आगामी नववर्षारंभ पार्ट्यांच्या आयोजनामुळे हा आकडा वाढू शकतो.

विना हेल्मेट, सिटबेल्ट पडले महागात

यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत शहर पोलिसांनी एकूण एक लाख ६० हजार ६५० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करीत तीन कोटी ८७ कोटी ५४ हजार ५०० रुपयांचा दंड केला. हा आकडा गतवर्षी प्रमाणे चार कोटीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. यात विना हेल्मेट १२ हजार ३०७ दुचाकीस्वारांकडून ६१ लाख ५३ हजार ५०० रुपयांचा तर सिट बेल्टचा वापर न करणाऱ्या १७ हजार १२३ चालकांकडून २७ लाख ८७ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

अशी दिली दंडाची मात्रा

कारवाई..........केसेस................दंड वसूल

विना हेल्मेट........१२,३०७........६१,५३,५००

सिट बेल्ट........१७,१२३........२७,८७,२००

मोबाइल वापर.....२,२७३........४,५४,६००

राँगसाईट........३,१३१........६,२६,६००

मद्यप्राशन........४०९........७,२८,२००

अवैध वाहतूक........५७८........१६,६७,७००

इतर................१,३५,८१६........२,८७,३३,२००

एकूण केसेस........१,७०,६५०........३,७८,५४,५००

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रावळगावला गतवैभव प्राप्त करून देणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यात पाच वर्षांपासून बंद असलेल्या रावळगाव साखर कारखान्याची चाके गुरुवारी पुन्हा फिरायला सुरुवात झाली. आ. जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डी. एल. कराड, व्यवस्थापक भगवान पाटील, चेअरमन तुषार गोसावी, सतीश टकले आदींसह शेकाप पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आ. पाटील म्हणाले, की रावळगाव कारखान्यामुळे कधी काळी येथे सोन्याचा धूर निघायचा, असे बोलले जायचे. कालांतराने कारखाना बंद पडला; मात्र आता आम्ही नव्याने कारखाना सुरू केला असून रावळगाव परिसराला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देऊ. राज्यात सर्वात चांगले भाव आम्ही देऊ. रावळगाव परिसरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्री यांना भेटणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. आ. जयंत पाटील यांनी हा कारखाना खरेदी केला असून एस. जे. शुगर डिस्टिलरी अॅण्ड पॉवर प्रा. लि. नामकरण करण्यात आले आहे. कारखाना पुन्हा सुरू झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी परिसरातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images