Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

अर्थसंकल्पाचा लाभ शेवटच्‍या व्‍यक्‍तीला मिळावा : मुनगंटीवार

$
0
0

चंद्रपूर : अर्थशास्त्राला सामान्य माणसाच्या आयुष्यात उतरवताना प्रगत चिंतन करणे गरजेचे आहे. जगाची साधनसामुग्री काही टक्के लोकांच्या हातामध्ये का आली आहे? या पद्धतीचे जागतिक चिंतन सध्या सुरू आहे. एक अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच सरप्लस अर्थसंकल्प मांडण्याचे सौभाग्य मला लाभले. मात्र या सरप्लस अर्थसंकल्पाचा लाभ शेवटच्‍या व्‍यक्‍तीपर्यंत का पोहचत नाही, ही चिंतेची बाब असल्याचे मत व्यक्त करत यावर अर्थशास्त्राच्या सर्व तज्ज्ञांनी विचार करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे वित्त,नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सरदार पटेल महाविद्यालयात या राष्ट्रीय परिषदेचे अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. चंद्रपूरमध्ये शनिवार ते सोमवारपर्यंत चालणाऱ्या मराठी अर्थ परिषदेच्या ४२ व्या अधिवेशनाचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष तथा अर्थशास्त्र परिषदेच्या स्वागताध्यक्ष सुधा शांताराम पोटदुखे या होत्या, तर यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष रमेश मामीडवार, सचिव प्रशांत पोटदुखे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे कुलगुरू डॉ. एन. व्ही. कल्याणकर, आमदार नाना शामकुळे, ४२ व्या मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष प्रा. चारुदत्त गोखले उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘केजीएस’विरोधात पुन्हा तक्रारी

$
0
0

ऊस उत्पादकांचे पेमेंट रोखले, चेकही झाले बाऊन्स

म. टा. वृत्तसेवा, निफाड

मागील महिन्यात उसाचे पेमेंट मिळावे यासाठी थेट बॉयलरवर चढून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या के. जी. एस. शुगर विरोधात आता पुन्हा तक्रारी यायला सुरुवात झाली. निपाणी पिंपळगाव येथील के. जी. शुगर कारखान्याने सन २०१५-१६ या गळीत हंगामातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे उर्वरित २७५ रु प्रतिक्विंटल रक्कम अनेकदा खेटा घालूनही दिलेली नाही. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार निफाड तहसील कार्यालयासह साखर आयुक्तांकडे केली आहे. ही रक्कम त्वरित न मिळाल्यास तहसीलसमोर उपोषण करण्याचा इशारा या शेतऱ्यांनी दिला आहे.

के. जी. एस. शुगर कारखान्याने सन २०१५-१६ या वर्षातील गाळप हंगामासाठी निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर, तारुखेडले, धानोरे, रुई गावातील ऊस उत्पादकांकडून ऊस खरेदी केला होता. या हंगामात उसाची पहिली उचल अंतिम दर २५२५ रु प्रतीटन ठरली होती. आतापर्यंत कारखान्याने १९५० रु दिले असून, उर्वरित २७५ रुपये येणे बाकी आहे. या बाबत कारखाना प्रशासनाकडे अनेकदा विनंती, अर्ज करूनही ही रक्कम मिळालेली नाही. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे आता तुम्हीच आमचे पैसे मिळवून द्या अन्यथा कार्यालयासमोर उपोषणाला बसावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

नामदेव डांगले, दशरथ शिंदे, बाबासाहेब गुजर, विक्रम डांगले यांच्यासह १३ शेतकऱ्यांच्या या निवेदनावर सह्या आहेत. निफाड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १५ दिवसांपूर्वी केलेल्या ऊस उत्पादक व कामगारांच्या ठिय्या आंदोलनाप्रसंगी के. जी. एस. शुगरच्या वतीने थकबाकिदारांना पैसे देण्यात येईल असे आश्वासन दिले होते पण पुन्हा एकदा थकबाकीच्या तक्रारी आल्याने स्वाभीमानी शेतकरी संघटना आक्रमक होईल असे चिन्ह आहेत. या कारखान्याने सन २०१७-१८ हंगामात वैजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलेले धनादेशही बाऊन्स झाल्याच्या तक्रारी निवृत्ती वाघ, प्रकाश निकम, किरण डमाळे आदी शेतकऱ्यांनी साखर आयुक्त पुणे यांच्याकडे केल्या आहेत.

के. जी. एस. कारखान्याकडे शेतकऱ्यांची बाकी असूनही त्यांना गाळप परवाना का दिला याबाबत नगर येथील साखर उपायुक्त संगीता डोंगरे याना विचारणा केली. तेव्हा त्यांनी कारखान्याने शेतकऱ्यांची थकबाकी नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याने परवाना दिल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या तक्रारी सादर करा आम्ही कारखान्यावर कारवाई करू असे डोंगरे म्हणाले आहेत.

-सुधाकर मोगल, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतीतील यांत्रिकीकरणावर पडणार प्रकाश

$
0
0

गुरुवारपासून कृषीथॉन प्रदर्शन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतीतील यांत्रिकीकरण या संकल्पनेवर आधारित कृषीथॉन प्रदर्शन २२ ते २६ नोव्हेंबरदरम्यान नाशिकमध्ये होणार आहे. १९९८ मध्ये प्रदर्शनाची सुरुवात झाली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बदलत्या प्रवाहात नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने यंदाची संकल्पना ठेवण्यात आली आहे.

कृषीथॉन प्रदर्शनाच्या १३ व्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतीमध्ये विविध प्रयोग करून शेतीला नवी ओळख निर्माण मिळवून देणाऱ्या युवा व महिला शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी संशोधक यांना कृषीथॉन युवा सन्मान हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. जल संधारण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायती, सामाजिक संस्था यांचा सन्मान 'आदर्श जलसंवर्धक पुरस्कार' देऊन केला जाणार आहे. शेतीत विविध प्रयोग करून विविध पिकांमध्ये भरघोस उत्पन्न मिळवणाऱ्या ५००० महिलांच्या मेळावा व निवडक महिलांचा गौरव या ठिकाणी होणार आहे. कृषीथॉन प्रदर्शनात कृषीविषयक माहितीशिवाय बीटूबी विभागात कृषीसंबंधी उद्योजक, इतर उद्योजकांना एकत्र आणून त्यांच्यात व्यवसायपूरक संधी निर्माण करून देणाऱ्या व्यावसायिक भेटींचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यांचबरोबर भाजीपाला नर्सरी उद्योजकांचा मेळावा यांसारखे विविध शेतीविषयक उपयुक्त कार्यक्रम असून, महाराष्ट्रासह भारतभरातून अनेक शेतकरी या प्रदर्शनाला भेटी देणार आहेत. ठक्कर डोम येथे हे प्रदर्शन होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अक्षयपात्र योजनेत बचतगटांना समाविष्ट करा

$
0
0

फोटो आहे

अक्षयपात्र योजनेत बचतगटांना समाविष्ट करा

मनसेची अतिरिक्त आयुक्तांकडे मागणी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या शाळांमध्ये अक्षयपात्र योजना राबविण्यात येणार असून, या माध्यमातून महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सकस आहार सेंट्रल किचनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणार आहे. या निर्णयाने महापालिका शाळांमध्ये सकस आहार पुरविणाऱ्या ७० बचतगटांवर गंडांतर येणार आहे. त्यामुळे अक्षयपात्र योजनेत बचतगटांच्या महिलांचा समावेश करण्यात यावा आणि सेंट्रल किचनऐवजी विभागनिहाय किचन बनविण्यात यावेत, अशी मागणी मनसेच्या वतीने अतिरिक्त आयुक्तांकडे करण्यात आली आहे.

सरकारच्या अक्षयपात्र योजनेला विरोध करण्यासाठी मनसेच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेऊन त्यांना मागणीचे निवेदन सादर केले. मनसेचे गटनेते सलीममामा शेख, मनसेचे नाशिक शहराध्यक्ष अनिल मटाले, मनसेच्या नगरसेविका वैशाली भोसले, मनसे शहर उपाध्यक्ष अॅड. अतुल सानप, सत्यम खंडाळे, मनविसे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर, मनसे पंचवटी विभाग अध्यक्ष भाऊसाहेब निमसे, मनसे सातपूर विभाग अध्यक्ष प्रकाश निगळ, खंडूभाऊ बोडके, मनविसे नाशिक शहराध्यक्ष सौरभ सोनवणे, मनोज कोकरे आदी उपस्थित होते. सरकारच्या धोरणानुसार महापालिकेच्या ९० शाळांमधील २३ हजार विद्यार्थ्यांना बचतगटांमार्फत आहार दिला जातो. महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सध्या विविध महिला बचतगटांच्या माध्यमातून खिचडी आणि तत्सम आहार दिला जातो. मात्र, अक्षयपात्र योजनेमुळे बचतगटांचा रोजगार जाणार आहे. सध्या ७० बचतगटांना सकस आहार पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. महापालिका अक्षयपात्र योजनेच्या माध्यमातून ही योजना राबविणार येत असेल तर यात शहरातील बचतगटांच्या रोजगारावर गंडांतर येऊ नये, तसेच योजनेला राबविताना बचतगटांना सामावून घेऊन योजना राबविली जावी अशी मागणी या वेळी करण्यात आली. शहरात अक्षयपात्र योजना ही सेंट्रल किचनच्या माध्यमातून राबविली जाणार आहे. मात्र, सेंटर किचन केल्यास शहरातील शाळा सातपूर, पंचवटी, नाशिकरोड, सिडको, मध्य नाशिक व नाशिक मनपा हद्दीतील आजूबाजूची खेडी या ठिकाणी या योजनेंतर्गत आहार पोहचविला जाणार आहे. मात्र, हे बचतगटांना शक्य नसल्याने विभागनिहाय सेंट्रल किचन करण्याची मागणी या वेळी करण्यात आली. त्यावर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन प्रशासन अधिकारी देवरे यांनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्याध्यापक अन् शिक्षणाधिकाऱ्यांची ‘गट्टी टूर’

$
0
0

दुबईला लवकरच होणार रवाना, शाळांचा अभ्यास करणार

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दोन व्यक्तींचं भांडण झालेलं असेल आणि पुढे तेच हातात हात घालून गप्पा मारताना दिसले तर त्यांच्या कृतीबद्दल निश्चितच आश्चर्य व्यक्त केलं जातं. यांचं भांडण नक्की मिटलं कसं, असे प्रश्नही उपस्थित केले जातात. असेच चित्र सध्या नाशिकमधील शैक्षणिक वर्तुळात दिसते आहे. मुख्याध्यापक संघातील मुख्याध्यापकांकडून शिक्षण विभागातील कार्यपद्धतीवर वारंवार शिंतोडे उडवले जातात. मात्र, दुबई 'स्टडी टूर'च्या निमित्ताने मुख्याध्यापक आणि शिक्षण अधिकारी हातात हात घालून चक्क सहलीसाठी रवाना होत आहेत.

प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी मुख्याध्यापक संघाकडून शिक्षण विभागाच्या वारंवार पायऱ्या झिजवल्या जातात. उपोषण, आंदोलने केली जातात. एवढेच काय तर अनेकदा विभागातील अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर आरोप केले जातात. शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांवर असलेल्या मुख्याध्यापकांचा रोषच यातून समोर येतो. पण अचानक दुबई टूरमुळे या दोघांचीही चांगलीच गट्टी जमणार असल्याचे दिसत आहे. १८ ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही स्टडी टूर आयोजित करण्यात आली असून, नाशिक जिल्ह्यातून ४५ जण या टूरसाठी जाणार आहेत. त्यामध्ये शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव, उपशिक्षणाधिकारी के. डी. मोरे, मुख्याध्यापक संघाचे एस. बी. शिरसाठ, एस. बी. देशमुख हेदेखील असणार आहेत. एका व्यक्तीला या टूरसाठी ६६ हजार रुपये खर्च आला असून, हा खर्च प्रत्येकाने वैयक्तिक केल्याचे सांगण्यात येत आहे.

शाळांना भेटी

या टूरदरम्यान दुबईमधील तीन शाळांना भेटी दिल्या जाणार आहेत. तेथील शैक्षणिक पद्धती, भौतिका सुविधा, गुणवत्ता यांचा अभ्यास करणार असल्याचे सांगितले जात आहे. या टूरची शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांची परवानगी असल्याचे मुख्याध्यापक संघाचे सचिव एस. बी. देशमुख यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गंजमाळचा श्वास मोकळा

$
0
0

गंजमाळ येथे फुटपाथवर दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांना महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने शनिवारी हिसका दाखविला. सायंकाळी पाचच्या सुमारास महापालिकेच्या पथकाने फर्निचर जप्तीची कारवाई केल्याने व्यावसायिकांची धांदल उडाली. ही अतिक्रमणे काढून शहरवासीयांसाठी रस्ता मोकळा करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली असून ती यापुढेही सुरूच ठेवण्याचा इशारा पथकाने दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांना मिळाला आधार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सिन्नर येथील एस पब्लिक स्कूल येथे दिव्यांगासाठी मोफत कृत्रिम अवयव रोपण शिबिराचे आयोजन कररण्यात आले. तीन दिवसीय या शिबिरात अपंगांना कृत्रिम अवयवांचे वाटप करण्यात आल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उजळले होते. यावेही नीलकमलचे चेअरमन वामनराय पारेख उपस्थित होते. मुंबई येथील नीलकमल फाउंडेशनच्यावतीने येथील हे शिबिर घेण्यात आले. व्यासपीठावर नीलकमलचे उपाध्यक्ष दिनकर कठाडे, पंचायत समितीचे गटनेते विजय गडाख, तहसीलदार नितीन गवळी, पोलिस निरीक्षक मुकूंद देशमुख उपस्थित होते. नीलकमल फाउंडेशनने या शिबिराच्या माध्यमातून अपंगांना खऱ्या अर्थाने आधार देण्याचे कार्य हाती घेतले आहे. शिबिराचे सर्व श्रेय नीलकमल फाउंडेशनचे असून माध्यमिक लोकशिक्षण मंडळाने त्यांना सहकार्य केल्याचे अध्यक्ष अण्णासाहेब गडाख यांनी सांगितले. या शिबिरासाठी दीडशेहून अधिक गरजूंनी नोंदणी केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

साहित्यिक पाटीलयांना निमंत्रण

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

जामनेर (जि. जळगाव) येथे ३० डिसेंबरला होणाऱ्या 'तावडी बोली'च्या पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनासाच्या अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आलेले ज्येष्ठ साहित्यिक तथा सेवानिवृत्त प्राध्यापक गो. तु. पाटील यांना संमेलनाचे आयोजक असलेल्या जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळ पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (दि. १७) अधिकृत निमंत्रण दिले. शनिवारी दुपारी येवला शहरात पोहचलेल्या जामनेर साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी येवला शहरातील पटेल कॉलनी भागातील प्रा. गो. तु. पाटील यांची निवासस्थानी भेट घेतली. तावडी बोली साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत पत्र पाटील यांना दिले.

जामनेर येथे होणारे पहिले राज्यस्तरीय 'तावडी बोली' साहित्य संमेलन हे या भागातील तावडी बोली भाषिकांसह परिसरातील साहित्यकांसाठी अस्मितापूर्वक व अभिमानास्पद असे साहित्य संमेलन आहे. नवोदित साहित्यकांना प्रेरणा मिळावी यासाठीच आपली निवड करण्यात आली असल्याचे या भेटीदरम्यान जामनेर साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पाटील यांना सांगितले. पाटील यांनी आयोजकांच्या निमंत्रणाचा स्वीकार करीत आपण साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणार असल्याचे सांगितले. जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डी. डी. पाटील, उपाध्यक्ष चंद्रकांत मोरे, सचिव डॉ. अशोक कोळी, सहसचिव डॉ. आधार पाटील,मंडळाचे सदस्य आकोश कोळी येवल्यात आले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


धुळ्यात जळगावचाच कित्ता!

$
0
0

भाजप गुंडांना प्रवेश देत असल्याचा अजित पवारांचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, धुळे

भाजपने पैशांच्या जोरावर आणि गुंडगिरी करून निवडणूक जिंकण्याचे तंत्र सध्या सुरू केले आहे. जळगाव, जामनेरमध्ये जे झाले तेच धुळ्यात होत आहे, असा थेट आरोप माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. भाजपमध्ये गुंडांना उघडपणे प्रवेश देऊन भाजपचे धुळे महापालिका निवडणूक जिंकण्याचे प्रयत्न आहेत. गुंडांना पक्षाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर शेजारी बसविले गेल्याने भाजपची ही गुंडगिरी आहे, अशी टीका पवार यांनी शनिवारी (दि. १७) धुळ्यातील जाहीर सभेत केली.

काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे इर्शाद जहांगीरदार यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या वेळी शहरातील चाळीसगाव रोडलगत आएशा मशिदीच्या मैदानावर राष्ट्रवादीचा मेळावा घेण्यात आला. या वेळी मेळाव्याला विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी, आमदार डॉ. सतीश पाटील, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, रामकृष्ण पाटील, महापौर कल्पना महाले, माजी आमदार अपूर्व हिरे, जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, संदीप बेडसे आदींसह राष्ट्रवादीचे धुळे, जळगाव, नंदुबार येथील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मेळाव्याला उपस्थित होते. या वेळी अजित पवार म्हणाले, की देशात सध्या अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालेले असून, राज्यात आघाडी सरकारची सत्ता असताना मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला होता. याचबरोबर मुस्लिम समाजालाही पाच टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आणि उच्च न्यायालयाने आरक्षणालादेखील मान्यता दिली होती.

डॉ. भामरेंसह दानवेंना टोला
भाजपमध्ये सध्या अनेकांना प्रवेश दिला जात असून, त्यात गुंड, माफियांचा प्रामुख्याने समावेश आहे. तुम्ही कोणालाही पक्षात घ्या, मात्र मनपाची सत्ता मिळविण्यासाठी गुंडांना घेण्याचे समर्थन करणाऱ्यांनी भारतीय लोकशाहीचा आणि मतदारांचा अपमान केला आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. शहरातील तथाकथित गुंडाने पोलिस अधिकाऱ्यावर हल्ला केला होता. अशा गुंडास आश्रय देवून पोलिस दलाचाही अवमान करण्यात आल्याची टीकाही त्यांनी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

HAL बनवणार १२३ तेजस लढावू विमान

$
0
0

नाशिक

भारतीय वायू दलाच्या ताफ्यात १२३ तेजस विमान येणार आहेत. या विमानाची निर्मिती 'हिन्‍दुस्‍तान अॅरोनॉटिक्‍स लिमिटेड' (HAL) कंपनी करणार असून या कंपनीला १ लाख कोटींची ऑर्डर देण्यात आल्याची माहिती केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी आज दिली.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या डॉ. सुभाष भामरे यांनी एचएएल कंपनीला १२३ तेजस लढाऊ विमान बनवण्यासाठी ऑर्डर दिल्याची माहिती दिली. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे डिफेन्स इनोवेशन हब (Defense Innovation Hub) नाशिकमध्ये होणार असून यासंबंधीची घोषणा येत्या दहा ते पंधरा दिवसात अधिकृतपणे कार्यक्रम घेऊन करू, अशी माहितीही डॉ. भामरे यांनी यावेळी दिली. संरक्षण दलातील डिफेन्स इनोवेशन हब नागपूरला पळवण्यात येणार असल्याची केवळ अफवा असून हे हब नागपूरमध्ये नव्हे तर नाशिकमध्येच होणार असल्याचे डॉ. भामरे यांनी यावेळी स्पष्ट केले. १२३ लढावू तेजस विमानाचा समावेश झाल्यानंतर भारतीय वायू दलाची क्षमता आणखी वाढणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमएसएमई व्हिजन परिषद ३ डिसेंबरला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

इंडो-आफ्रिकन चेंबर ऑफ कॉमर्स व आयमा यांच्या संयुक्त विद्यमाने ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्र एमएसएमई व्हिजन-२०२३ वर एक दिवसाची कॉन्फरन्स नाशिकमध्ये होणार आहे. या कॉन्फरन्समध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) उद्योगांसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. सरकारने सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजकांना प्रोत्साह देण्यासाठी अनेक योजना जाहीर केल्या आहे. त्यामुळे त्यांना त्यातून मार्गदर्शन मिळावे, उद्योगांना योजनेचा लाभ घेता यावा यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. तसेच या उद्योगांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळावे, असा या कॉन्फरन्समागील उद्देश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घरफोडी करणाऱ्या संशयितांना अटक

$
0
0

- दोन गॅस सिलिंडर, एक कॅमेरा, दोन एलईडी टीव्ही, मोबाइल फोन व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

...

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरफोडी करणाऱ्या दोघा संशयित आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. संशयितांच्या ताब्यातून ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

प्रशांत शांतिलाल वाघ (वय २७, रा. उद्योग भवनजवळ, ता. सिन्नर) आणि राहुल दिलीप धोत्रे (वय २०, रा. आडवा फाटा, ता. सिन्नर) अशी या दोघा संशयित आरोपींची नावे आहेत. यामुळे सिन्नर पोलिस स्टेशनमध्ये दाखल घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला. दाखल गुन्ह्यांमधील पाहिजे असलेल्या आरोपींचा माग काढीत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे यांना या दोघांची माहिती मिळाली होती. दोघेही सिन्नरमधील उद्योग भवन परिसरातील साई मंदिराजवळ येणार असल्याची पक्की माहिती मिळाल्याने पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. दोघे संशयित तिथे आले असता, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी सप्टेंबर महिन्यात सिन्नर शहरातील द्वारकानगरी परिसरातील बंद घरांचे कुलूप तोडून घरफोड्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी संशयितांकडून दोन गॅस सिलिंडर, एक कॅमेरा, दोन एलईडी टीव्ही, मोबाइल फोन व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा ५७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोघे संशयित सराईत गुन्हेगार असून, त्यांनी सिन्नर शहरासह नाशिकरोड व सातपूर परिसरात घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे संशयितांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक करपे, हवालदार रवींद्र वानखेडे, प्रकाश चव्हाणके, दिलीप घुले, पोलिस नाईक प्रीतम लोखंडे, किरण काकड, कॉन्स्टेबल नीलेश कातकडे, संदीप लगड, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम, भूषण रानडे यांच्या पथकाने केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालखेडमधून आज सुटणार पाणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. दिंडोरी, निफाड, येवला आणि नांदगाव तालुक्याच्या काही भागासाठी सोमवारी (दि. १९) पाणी सोडण्यात येणार असून त्यामुळे या भागातील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचा प्रश्नही मार्गी लागणार आहे.

पाण्याअभावी मान टाकू लागलेली पिके आणि पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी ग्रामस्थांना करावी लागणारी धडपड असे चित्र सध्या दुष्काळी आणि दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या तालुक्यांमध्ये पहावयास मिळते आहे. पाण्यासाठीची वणवण थांबावी यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून हक्काचे पाणी सोडावे, अशी मागणी गेल्या काही दिवसांपासून शेतकरी करीत आहेत.

माजी उपमुख्यमंत्री व येवल्याचे आमदार छगन भुजबळ यांनी याबाबत शनिवारी (दि. १७) जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेऊन पाणी सोडण्याची मागणी केली. सोमवारी पाणी सोडण्यात येईल, अशी ग्वाही पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. त्यानुसार पाणी सोडण्याची तयारी देखील पूर्ण करण्यात आली आहे. सिंचनासाठी १५०० दशलक्ष घनफूट आणि पिण्यासाठी ३५० दशलक्ष घनफूट पाणी एकाचवेळी सोडण्यात येणार असून सकाळी १० नंतर हे पाणी सोडले जाऊ शकते, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी रविवारी दिली.

चार तालुक्यांना दिलासा

सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचे आवर्तन असल्याने डोंगळ्यांवर कारवाईचा फारसा प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. परंतु, पाण्याच्या वहन मार्गावर अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी लक्ष पुरविण्याच्या सूचना ग्रामीण पोलिस विभागाला करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिस सज्ज असून या पाण्यामुळे मनमाड, येवला, निफाड, दिंडोरी या चार तालुक्यातील रहिवाशी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एचएएलची ‘तेजस’भरारी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचा (एचएएल) 'राफेल' या लढा‌ऊ विमानांच्या करारात विचार झाला नसला तरी तेजस या आधुनिक लढाऊ विमानांची निर्मितीचे काम एचएएलला मिळणार असल्याची शुभवार्ता आहे. ओझर आणि बेंगलुरू या दोन्ही ठिकाणच्या एचएएलच्या कारखान्यांत एकूण १२३ विमानांची निर्मिती केली जाणार आहे. यातून एचएएलला १ लाख कोटी रुपयांचे काम मिळणार असल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी नाशिक येथे दिली. देशातील दुसरे डिफेन्स हब नाशिकलाच होणार असल्याचेही डॉ. भामरे यांनी स्पष्ट केले.

आडगाव नाका येथील स्वामिनारायण सभागृहात रविवारी अग्रनारी प्रांतीय महिला असोसिएशनचे १५ वे महिला अधिवेशन झाले. या अधिवेशनात डॉ. भामरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अधिवेशनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, असता त्यांनी ही माहिती दिली. डॉ. भामरे म्हणाले, की २०२० नंतर सुखोई विमानांचे काम संपल्यानंतर ओझर कारखान्याचे पुढे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, संरक्षणमंत्र्यांनीच या प्रश्नी उत्तर देत एचएएलमध्ये कामे सुरूच राहणार असल्याचे सांगितले आहे. एचएएलला संरक्षण मंत्रालयाने एक लाख कोटी रुपयांचे काम दिले आहे. त्याद्वारे ओझर आणि बेंगलुरू येथे एकूण १२३ तेजस या लढाऊ विमानांची निर्मिती केली जाणार आहे. ही विमाने हवाई दलाला अधिक बळकट करतील, असा विश्वासही डॉ. भामरे यांनी व्यक्त केला.

इनोव्हेशन हब नाशिकमध्येच

कोईम्बतूर येथील डिफेन्स इनोव्हेशन हबनंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे 'डिफेन्स इनोव्हेशन हब' नाशिकमध्ये होणार आहे. नाशिकमध्ये संरक्षण क्षेत्राशी निगडित अनेक उद्योग असून, त्यांना संशोधन क्षेत्रात चालना देण्यासाठी हे इनोव्हेशन हब निर्माण केले जाणार असल्याचेही डॉ. भामरे यांनी सांगितले. हे हब नागपूरला पळवण्यात आल्याची अफवा पसरली असली तरी हे हब नाशिकमध्येच होणार आहे. येत्या दहा ते पंधरा दिवसांत कार्यक्रम घेऊन याची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ध्वनी, वायू प्रदूषणावरमालेगावात जनजागृती

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे रविवारी रस्ता सुरक्षा तसेच, ध्वनी व वायू प्रदूषण याबाबत जनजागृती करण्यासाठी मालेगाव शहरातून महावॉकेथॉन रॅली आयोजित करण्यात आली होती.

सकाळी आठ वाजता उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मार्केट यार्ड येथून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, मोटार वाहन निरीक्षक पद्माकर पाटील, किरण लोंढे, अतुल सूर्यवंशी, सुनील पाटील, नरेंद्र जाधव आदींच्या प्रमुख उपस्थितीत या महावॉकेथॉनचा प्रारंभ झाला. मोसमपूल, सटाणा रोड, एकात्मता चौक, कॉलेज स्टॉप, रावळगाव नाका, सोमवार बाजार, मोची कॉर्नर मार्गे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे समारोप झाला. रस्ता सुरक्षितता संदर्भातील विविध घोषणावाक्ये असलेले फलक लक्षवेधी ठरले. सुमारे ३०० व्यक्तींनी या रॅलीत उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी अनावश्यक हॉर्न न वाजवता ध्वनी प्रदूषण टाळण्याचे आवाहन करणारी पत्रके नागरिकांना वाटण्यात आली.

यावेळी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक अमर शेवाळे, अभिषेक आहिरे, हेमंत जयकर, मालेगाव शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक नरेंद्र भदाणे, आगार व्यवस्थापक किरण धनवटे, निखिल पवार, अतुल लोढा, अतुल शाह, आदींसह उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील व सार्वजनिक बांधकाम विभागातील कर्मचारी सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शहरातील बेघरांना मिळणार दिलासा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

ग्रामीण भागातील गावठाण व शासकीय जमिनींवरील घरांचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय शासनाने फेब्रुवारी २०१८ मध्ये घेतला होता. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहरी भागातील अतिक्रमण नियमित करण्यासंदर्भात राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. आता शहरी भागातील नागरिकांनाही सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी दिली.

भुसे यांनी ग्रामीण भागातील गावठाण व शासकीय जमिनीवरील घरांचे अतिक्रमण नियमित करण्याचा निर्णय व्हावा यासाठी पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्र्यांनीदेखील यासाठी भुसेंच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून याचे धोरण तयार करण्यास सांगितले होते. अखेर भुसेंच्या पाठपुराव्याने शासनाने फेब्रुवारी २०१८ ला हा निर्णय घेतला होता. ग्रामीण भागाप्रमाणे शहरालगत वास्तव्य करीत असलेल्या शासकीय सरकारी जागेवरील अतिक्रमणही नियमित करावे, अशी मागणी भुसेंनी केली होती. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शहरी भागातील अतिक्रमण नियमित करण्यासंदर्भात राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी निर्णय घेतला आहे. राज्यातील ३८२ शहरे व त्यालगतच्या क्षेत्रामध्ये या योजनेचा लाभ मिळणार आहे.

शासनाच्या या निर्णयामुळे मालेगाव महापालिका हद्दवाढीत समावेश झालेल्या सोयगाव, द्याने, सायने, भायगाव, दरेगाव व म्हाळदे या गावांतील अतिक्रमणधारक बेघर लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे, असे भुसे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता सुरक्षा, जीवन रक्षा!

$
0
0

नाशिकमध्ये तीन ठिकाणी महावॉकेथॉन

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रस्ता सुरक्षेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभागाने नाशिक शहरात तीन ठिकाणी महावॉकेथॉनचे आयोजन केले होते. सकाळी ८ वाजता या महापदयात्रेची सुरुवात झाली. के. के. वाघ महाविद्यालय, मोतीवाला होमॅपॅथीक कॉलेज व सपकाळ नॉलेज हब येथे ही महापदयात्रा काढण्यात आली. नाशिकसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील २०० ठिकाणी हा जनजागृतीपर कार्यक्रम झाला. सडक सुरक्षा, जीवन रक्षा असे फलक घेऊन जनजागृती करण्यात आली.

रस्ते सुरक्षिततेसाठी पोलिसांनी एकीकडे नाशिकमध्ये हेल्मेट सक्तीची धडक मोहीम हाती घेऊन १८ लाखाचा दंड तीन तासात वसूल केलेला असताना, दुसरीकडे शासनाच्या विविध विभागातून ही जनजागृती केली जात आहे. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या महावॉकेथॉनमध्ये के. के. महाविद्यालयातील ४०० हून अधिक विद्यार्थी, अधिकारी व महाविद्यालयाचे प्राध्यापक सहभागी झाले होते. त्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे भरत कळसकर, विनय अहिरे, हेमंत हेमाडे, सिध्दार्थ घुगे, निर्मला वसावे, योगेश सरोदे तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता एच. एस. पगारे, सुरेंद्र कंकरेजा, एस. ए. तांबे, एस. एस. आहिरे, प्राचार्य के. ए. नंदकुमार, रजिस्टार अजिंक्य जोशी, डॉ. नानासाहेब गुरुले, संजीव अहिरे उपस्थित होते. मोतीवाला होमॅपॅथिक महाविद्यालयात विनोद साळवी, हेमंत देशमुख, शब्बीर शेख, संदीप तुरकाने, पल्लवी दौंड यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. सपकाळ नॉलेज हब येथेही हा कार्यक्रम झाला.

..

फलकातून संदेश

वाहन सुरक्षा नियम पाळू या, सुरक्षित जीवनाकडे वळू या, वेग असेल आरक्षित तर जीवन असेल सुरक्षित, सडक सुरक्षा, जीवन रक्षा, शराब पीके गाडी चलाना मतलब मौत को गले लगाना, जेव्हा चालवू वाहन तेव्हा करू या नियमांचे पालन यासारखे विविध फलक घेऊन या पदयात्रेला सुरुवात झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

युवकास बेदम मारहाण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हातगाडीवर वीट पडल्याचा राग आल्याने काका-पुतण्यांनी मिळून एकास बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी पेठफाट्यावरील एरंडवाडी परिसरात घडली. या प्रकरणी सोनू राजू जहाल (वय २६, रा. पेठफाटा) याने पोलिसांकडे तक्रार दिली.

या मारहाणीत सोनू हा जखमी झाला. त्याच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये उत्तम पांडुरंग दिघोळे (वय ५९, रा. एरंडवाडी) याच्यासह त्याच्या दोन पुतण्यांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. पंचवटी पोलिसांनी संशयित उत्तम दिघोळेस अटक केली आहे. सोनू याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक थेटे करीत आहेत.

..

बस प्रवासात दागिने लंपास

गावी जाण्यासाठी बसमध्ये बसलेल्या महिलेकडील सुमारे दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केल्याची घटना ४ नोव्हेंबरला दुपारी दीड वाजता जुने सीबीएस परिसरात घडली. या प्रकरणी अनिता बापुराव महाजन (रा. पनवेल) यांनी चोरीची फिर्याद दिली. अनिता महाजन या ४ नोव्हेंबरला गावी जाण्यासाठी जुने सीबीएस येथून दुपारी दीड वाजेच्या सुमारास बसमध्ये बसल्या होत्या. त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडील पिशवी एका बॉक्समध्ये ठेवली होती. मात्र चोरट्याने बॉक्समधून पिशवी काढत त्यातील सुमारे आठ तोळे वजनाचे दागिने लंपास केले. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस हवालदार एस. बी. निकम अधिक तपास करीत आहेत.

...

दागिन्यांची चोरी

सराफी दुकानाचे शटर वाकवून चोरट्याने घरफोडी करीत सुमारे पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना २९ ते ३० जूनदरम्यान शिवाजीनगर परिसरात घडली. या प्रकरणी नितीन दिलीप दाभाडे (वय ३१, रा. शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली. चोरट्याने नितीन यांच्या श्री नरसिंह ज्वेलर्स दुकानाचे शटर वाकवून घरफोडी केली. चोरट्याने दुकानातील सोन्या-चांदीचे एक लाख ७६ हजार रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. त्यात साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे, तर तेराशे ग्रॅम चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार जी. वाय. पाटील अधिक तपास करीत आहेत.

...

एसएमएसद्वारे विनयभंग

मोबाइलवर अश्लिल मेसेज पाठवून एकाने महिलेचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेने अंबड पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित मोबाइल क्रमांकाचा वापर करणाऱ्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडितेच्या फिर्यादीनुसार ११ ते १६ नोव्हेंबर दरम्यान, अंबड येथील उपेंद्रनगर परिसरात राहत असताना संशयिताने एका मोबाइल क्रमांकावरून वारंवार अश्लिल मेसेज पाठवले. तसेच मोबाइलच्या माध्यमातून पीडितेचा पाठलाग केला. त्यामुळे संशयिताविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक घुगे हे तपास करीत आहेत.

..

हत्यार बाळगणारे दोघे जेरबंद

पंचवटीतील गौरी पटांगण परिसरात धारदार शस्त्र हातात घेऊन दहशत माजवत फिरणाऱ्या दोघां संशयितांना पंचवटी पोलिसांनी शनिवारी (दि. १७) सायंकाळी अटक केली. विकी बाळू जाधव (वय १८, रा. दिंडोरी रोड, पंचवटी) आणि मंजित उर्फ लाल्या मनोज रॉय (वय १९, रा. अवधुतवाडी, दिंडोरी) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास संशयित हातात शस्त्र घेऊन गंगा घाटावर दशहत पसरवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पंचवटी पोलिसांनी ही कारवाई केली. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलिस नाईक डी. बी. निंबाळकर करीत आहेत.

...

तरुणाची आत्महत्या

क्रांतीनगर परिसरातील वेडेबाबा मठासमोर राहणाऱ्या देवीदास दयाराम जडेजा (वय ३१) या तरुणाने राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि.१७) सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी जितेंद्र पाटील यांनी दिलेल्या खबरीनुसार पंचवटी पोलिसांनी आकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास हवालदार डी. एम. वणवे करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोतवाल संघटनेचे आजपासून आंदोलन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

सहावा वेतन आयोग लागू करणे आणि चतुर्थ श्रेणीत समावेश या दोन मुख्य मागण्यांसह राज्यभरातील कोतवाल सोमवारपासून (दि. १९) बेमुदत कामबंद ठेवून धरणे आंदोलन करणार आहेत. महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेकडून नाशिक विभागीय महसूल आयुक्त कार्यालयासमोर होणाऱ्या या आंदोलनात नाशिक विभागासह राज्यातील इतर विभागांतील कोतवाल सहभागी होणार आहेत.

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील कोतवाल संघटनेतर्फे मागण्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री, महसूलमंत्री, वित्तमंत्री व मुख्य सचिव आदींना यासंदर्भात वेळोवेळी निवेदने देण्यात आली होती. मात्र, कोतवालांच्या मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत. सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी राज्यातील कोतवालांच्या संघटनेने काम बंद ठेवून नाशिक येथे धरणे आंदोलन केले जाणार आहे. सरकार कोतवालांना चतर्थ श्रेणीचा दर्जा, सहाव्या वेतन आयोगानुसार कॅबिनेट मंत्रिमंडळात मंजूर देत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे कोतवाल संघटनेचे राज्याध्यक्ष गणेश इंगोळे यांनी म्हटले आहे. आंदोलनात अधिकाधिक कोतवालांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे राज्य सरचिटणीस भारत पवार, कैलास कोळी,उमेश आवारे, संजय राऊत आदींनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यंकटेशकुमारांच्या स्वरात हरवले नाशिककर

$
0
0

शंकराचार्य कुर्तकोटी संगीत समारोह

..

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जगप्रसिध्द गायक पद्मश्री व्यंकटेशकुमार गाण्यासाठी बसताच प्रेक्षागृहात टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. धारवडच्या पंडितजींची गायकी म्हणजे धीरगंभीर, भारदस्त आवाज. पंडितजी गायकी म्हणजे ग्वाल्हेर, किराणा आणि पतियाळा अशा तिन्ही गायकीचे मिश्रण. पंडितजींनी पहिला षड्ज लावला आणि भरगच्च भरलेल्या प्रेक्षागृहतील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव त्यांनी घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीलाच पुरीया धनश्री राग पंडितजींनी गायला आणि प्रेक्षकांचे कान तृप्त केले. त्यानंतर मैफलीला रंग चढू लागला. पंडितजींच्या गाण्याने प्रेक्षागृह मंत्रमुग्ध झाले. त्यानंतर त्यांनी एक ख्याल सादर केला. बंदिशीचीही पेशकश केली.

शंकराचार्य न्यासाच्या 'कुर्तकोटी संगीत' महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राची सुरुवात रमाकांत गायकवाड या हरहुन्नरी गायकाच्या गायनाने झाली. सकाळी श्रोत्यांना आगळी संगीत पर्वणी ऐकायला मिळाली. रमाकांत गायकवाड यांनी किराणा आणि पतियाळा अशा दोन दमदार घराण्यांची गायकी आत्मसात केली. सुरुवातीपासूनच गाण्यावरील त्यांची पकड श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून गेली. त्यांनी गाण्याची सुरुवात राग तोडी ने करून प्रेक्षकांची वाहवा मिळविली. यानंतर पारंपरिक बंदिश 'याद पियाकी आये' सादर केली. रमाकांत यांना तबल्यावर सुप्रसिद्ध तबला वादक रामकृष्ण करंबळेकर यांनी साथ केली. हार्मोनियमवर नाशिकचे सुप्रसिद्ध वादक सुभाष दसककर होते. प्रारंभी रमाकांत यांचे आणि सर्व वादकांचे स्वागत ठाणे जनता बँकेचे संचालक रमेश कनानी यांनी केले.

तीन सत्रात अनेक नामवंत आणि जगप्रसिद्ध गायक-वादकांच्या मैफलीची पर्वणी नाशिककरांना शंकराचार्य न्यासाने उपलब्ध करून दिली. यास्मिन दांडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

..

डागर यांनी मिळवली वाहवा

दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध रुद्रवीणा वादक उस्ताद बहाउद्दीन डागर यांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. या वाद्याचे स्वर सर्वव्यापी असून, ते स्वर श्रोत्यांना वेगळ्या ध्यान अवस्थेत नेतात, याची नेमकी प्रचीती उस्ताद डागर यांचे वीणा वादन ऐकताना आली. त्यांना पखवाजवर ज्ञानेश्वर देशमुख यांनी साथ केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images