Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गोळेसर, जोशी, ओक नाट्यगीत स्पर्धेत चमकले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई मराठी साहित्य संघाद्वारे आयोजित नाट्यगीत गायनात हर्षद गोळेसर याने प्रथम क्रमांक पटकावला. त्याने कट्यार काळजात घुसली या नाटकातील सुरत पियाकी हे नाट्यगीत सादर केले. द्वितीय क्रमांक अजिंक्य जोशी याने मिळवला, त्याने ययाती देवयानी नाटकातील हे सुरांनो चंद्र व्हा हे नाट्यगीत सादर केले, तर तृतीय क्रमांक आरोह ओक याला मिळाला. त्याने पद्मनाभा नारायणा हे नाट्यपद सादर केले.

मुंबई मराठी साहित्य संघाद्वारे कुसुमाग्रज स्मारकात या प्राथिमक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण आठ केंद्रांवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. नाशिकला नाट्यगीत गायनासाठी प्रथमच संघात सामावून घेण्यात आले होते. पहिल्याच वर्षी नऊ स्पर्धकांनी नोंदणी करीत शुभारंभ केला. बेळगाव, गोवा, कणकवली, रत्नागिरी, कल्याण-डोंबिवली, ठाणे, मुंबई या विविध केंद्रावर या स्पर्धा घेण्यात आल्या. विविध केंद्रातून निवडून आलेल्या सर्व स्पर्धकांची अंतिम स्पर्धा मुंबई येथे पार पडणार आहे. ही अंतिम स्पर्धा अ. ना. भालेराव यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून १२ डिसेंबर रोजी मुंबईला होणार आहे.

नाशिकला झालेल्या स्पर्धेत पूर्वा क्षीरसागर, श्रेया पिसोळकर, प्राची खोत, सेजल काळे, संगीता चव्हाण, प्रणाली शंकपाळ यांनी सहभाग घेतला. या सर्व स्पर्धकांना संवादिनीवर आनंद अत्रे व तबल्यावर सुजीत काळे यांनी साथसंगत केली. नितीन पवार व मनोहर सोमण यांनी परीक्षण केले. नाट्यसंगीत ही आपली संस्कृती असून, त्याला उत्तेजन देण्यासाठी दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती यावेळी साहित्य संघाचे अनंत गोडबोले यांनी दिली. स्पर्धा यशस्वीतेसाठी मनोहर सोमण, आनंद पालव, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्हा परिषदेत टंचाई कक्षाची स्थापना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने टंचाई कक्षाची स्थापना केली असून, यामध्ये सात कर्मचाऱ्यांचा समावेश केला आहे. जिल्ह्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती.

राज्य सरकारने जिल्ह्यातील आठ तालुके दुष्काळी जाहीर केले आहेत. दुष्काळी परिस्थितीत कृती आराखड्यातील उपाययोजनांची अंमलबजावणी करणे, टंचाई कालावधीत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत येणाऱ्या अडचणींचे निराकरण करणे, विविध माहिती तयार करणे, विविध बैठकांना उपस्थित राहणे, विविध टंचाई निवारणाची कामे करावयाची आहेत. या कक्षात सात कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, कक्ष प्रमुख म्हणून उपकार्यकारी अभियंता ए. एन. पाटील यांची नियुक्ती केली आहे. हा कक्ष सातही दिवस कार्यरत राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रबोधिनी एकादशीनिमित्त पंढरपूरसाठी जादा बसेस

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्षातून एकदा येणाऱ्या प्रबोधिनी अर्थात कार्तिकी एकादशीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून पंढरपूरच्या यात्रेसाठी खास बस सोडण्यात आल्या आहेत.

कार्तिक मासातील शुक्लपक्ष एकादशीला देवशयनी एकादशी देखील म्हटले जाते. या दिवशी भगवान विष्णू ४ महिन्यानंतर निद्रेतून जागे होतात. या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाहीत. तसेच विवाह देखील होत नाहीत. या दिवसांपासून शुभविवाहाला सुरुवात होते. या दिवशी शहरात तुलसी विवाहाचे आयोजन करण्यात येते. नाशिक शहरातील नामदेव विठ्ठल मंदिरांमध्ये खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात तुलसी विविह होणार आहेत. या तुलसी विवाह समारंभासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. तुलसी विवाहाचे साहित्य घेण्यासाठी रविवार कारंजा परिसारत गर्दी झाली होती. ज्या परिसरात तुलसी विवाह होणार आहेत अशा सोसायट्यांमध्ये रोषणाई करण्यात आली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माजी नगरसेवक दलोड यांच्यावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पूर्ववैमनस्यातून माजी नगरसेवक सुरेश दलोड यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. शनिवारी (दि. १७) रात्री अकरा वाजेच्या सुमारास वडाळा नाका परिसरात तिघा संशयितांनी दलोड यांच्यावर हल्ला केला.

दलोड हे त्यांच्या कार्यालयाजवळ उभे असताना संशयितांनी डोक्यावर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केले़ यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून, खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ हल्ल्यानंतर संशयित फरार झाले असून, भद्रकाली पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत. माजी नगरसेवक दलोड यांचे संशयित बापू उर्फ विक्रम तसंबड, पिंटू तसंबड आणि सोनू उर्फ संदीप साळवे यांच्याशी वाद होते. या वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले. भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये तिघा संशयितांवर ठार मारण्याचा प्रयत्न केल्यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन लाख नवमतदार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमात तब्बल दोन लाखांहून अधिक नवमतदारांनी नोंदणी करीत भरभरून प्रतिसाद दिला आहे. विशेष म्हणजे नवमतदारांच्या सर्वाधिक नोंदणीत नाशिकचा राज्यात तिसरा क्रमांक लागला असून, हा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांची पाठ थोपटली आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीला निवडणूक आयोगाने सुरुवात केली आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण करणारी कोणतीही व्यक्ती मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये याकरिता नवमतदार नोंदणी मोहिमेवर भर द्या, असे निर्देश निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनांच्या निवडणूक शाखांना देण्यात आले होते. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेने बीएलओंच्या मदतीने मतदार पुनरीक्षण कार्यक्रम प्रभावीपणे राबविला. तब्बल दोन महिने सुरू असलेल्या मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत तब्बल दोन लाख ११ हजार ९१७ नवमतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक मतदारांच्या नोंदणीत नाशिकने मुंबई, ठाण्यानंतर तिसरे स्थान पटकावले आहे. जिल्ह्यात मालेगाव मध्य मतदारसंघामध्ये सर्वाधिक २२ हजार १७६ नवमतदारांनी नोंदणी केल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत मतदार याद्या पुनरीक्षण मोहीम राबविण्यात आली. निवडणूक विभागाने बीएलओंच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातील कुटुंबांना भेटी देऊन १८ वर्षे पूर्ण झालेल्या युवकांचे अर्ज भरून घेतले. याकामी राजकीय पक्ष, महाविद्यालये, वसतिगृह, सरकारी कार्यालये, एनजीओ, विविध संस्थांची देखील मदत घेण्यात आली. निवडणूक शाखेची यंत्रणा मतदारांच्या दारापर्यंत पोहोचल्याने नवमतदार नोंदणीला मोठा हातभार लागला आहे. विशेष म्हणजे प्राप्त एकूण अर्जांपैकी १० टक्के अर्ज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन पध्दतीने भरण्यात आले आहेत. प्राप्त अर्जांपैकी दोन लाख ४ हजार ९१७ अर्जांच्या डेटा एन्ट्रीचे काम आयोगाच्या संकेतस्थळावर पूर्ण झाले आहे. सात हजार अर्जांची माहिती भरण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नाशिक पूर्वमधून १९ हजार ५३६ नवमतदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. मतदार यादीतून नाव वगळणे, पत्ता, नाव, जन्म तारखेतील दुरुस्तीची मोहीमही या कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आली. परंतु, मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणाची मोहीम सातत्याने सुरू असल्याने अशा अर्जांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा तहसीलदार गणेश राठोड यांनी केला आहे.

...

मतदारसंघनिहाय नवमतदार नोंदणी

तालुका नोंदणी संख्या

मालेगाव मध्य २२,१७६

नाशिक पूर्व १९,५३६

नाशिक मध्य १८,२६९

नाशिक पश्‍चिम १४,९७३

दिंडोरी १४,६८७

बागलाण १३,१८१

सिन्नर १२,६४३

मालेगाव बाह्य १२,५६५

देवळाली १२,५४९

नांदगाव १२,०१६

येवला ११,५०६

निफाड ११,१४५

इगतपुरी १०,९३०

कळवण ९,७९४

चांदवड ८,९४७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांसाठी वाढविणार पोलिस बळ

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची वर्षभर वर्दळ असते. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव बंदोबस्तासाठी असलेले संख्याबळ कमी पडते. त्यामुळे पोलिसांची संख्या आणि चौकी वाढविण्याचे संकेत गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहेत.

त्र्यंबकेश्वर येथे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी देवदर्शनानिमित्ताने भेट दिली. त्यांनी येथील पोलिस ठाण्याची स्थिती जाणून घेतली. त्र्यंबकेश्वर येथे वाहनतळ, बसस्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी कायम स्वरूपी पोलिस नेमणूक करणे गरजेचे आहे. तसेच कुशावर्त तीर्थावर असलेल्या पोलिस चौकीत पूर्वीप्रमाणे पोलिस नेमणूक करण्याचे उपस्थित शिवसैनिकांनी निदर्शनास आणून दिले. दरम्यान दीपक केसरकर यांनी विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी त्र्यंबकराजाच्या दरबारात आल्याचे त्यांनी सांगितले. त्र्यंबकराजाच्या मंदिरात त्यांनी पूजा-अभिषेक केला. पंडित लक्ष्मीकांत थेटे आणि मयूर थेटे यांनी पौरोहित्य केले. त्यांच्या या भेटी दरम्यान तालुका समाधान बोडके पाटील, तालुका प्रमुख संपत चव्हाण, मंदिर विश्वस्त तथा माजी नगराध्यक्ष संतोष कदम, शहर प्रमुख सचिन दीक्षित, भूषण अडसरे, सागर पन्हाळे, डॉ. पंकज बोरसे, दिलीप माळी आदी उपस्थित होते.

अर्ध्या तासाची प्रतीक्षा

पूजा-अभिषेक आटोपला त्याच दरम्यान मंदिर गर्भगृह नैवद्यासाठी बंद झाले. त्यामुळे जवळपास अर्धा तास मंत्री केसरकर यांनी सभामंडपात थांबून प्रतीक्षा केली. विशेष म्हणजे त्यानंतर रात्रीची आरती होते. त्यासाठीही मंत्री उपस्थित राहिले. मंदिर ते कुशावर्त असे शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक यांच्या समवेत पायी जाऊन कुशावर्तावर दर्शन घेतले. तेथील स्वच्छता आणि सुरक्षितता याची माहिती घेतली. त्यांच्या समवेत मंदिर विश्वस्त संतोष कदम उपस्थित होते. त्यांच्याकडून येथील परिस्थिती समजावून घेतली.

ठाकरे यांना अभिवादन

मंदिर ते कुशावर्त दरम्यान असलेल्या लक्ष्मीनारायण चौकात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी शिवसेनेने मंच तयार केला होता. तेथे दीपक केसरकर यांनी ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण केला. या उपक्रमाबद्दल त्यांनी उपस्थित शिवसैनिकांचे कौतुक केले. संत निवृत्तिनाथ मंदिर विश्वस्त पवन भुतडा यांच्या निवासस्थानी त्यांनी भेट दिली. त्यांच्या संपूर्ण दौऱ्यात पोलिस उपअधीक्षक उत्तम कडलग, पोलिस निरीक्षक रविकांत सोनवणे, सहायक निरीक्षक हेमंत बेंडाळे, कैलास आकुले, किरण मेहेर आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकचे चेतन अग्निहोत्री ठरले आयर्नमॅन

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मलेशिया येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत चेतन अग्निहोत्री यांनी नाशिकचा झेंडा पुन्हा अटकेपार फडकवला. त्यांनी ही स्पर्धा १५ तास १० मिनीटे ४६ सेकंदात पूर्ण केली आहे. अग्निहोत्री हे नाशिक जिल्ह्यातील चौथे आयर्नमॅन ठरले आहेत.

मलेशिया येथे झालेल्या या स्पर्धेत ९६४ स्पर्धक सहभागी झाले. त्यात अग्निहोत्री यांनी ६४८ वे स्थान पटकावले. पुरुषांच्या गटात ८४३ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यात त्यांचा ५६२ वा क्रमांक आला. तर ४० ते ४४ या वयोगटात १९७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता त्यात ते १२० क्रमांकांनी स्पर्धा पूर्ण करणारे ठरले. स्पर्धेत ४२ किलोमीटर रनिंग, ३.८ किलोमीटर स्विमिंग, आणि १८० किलोमीटर सायकलिंग असे तिनही प्रकार करावे लागतात. या तीनही प्रकारात अग्निहोत्री यांनी बाजी मारली आहे. त्यांचे रविवारी रात्री मुंबई विमानतळावर आगमन झाले. नाशिक शहरात त्यांचे सोमवारी (दि. १९) सकाळी आगमन होणार आहे. त्यांच्या या यशाने नाशिकच्या खेळाडूंमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. आपली खासगी नोकरी सांभाळून मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रत्येक स्पर्धकाच्या मनात आर्यनमॅन स्पर्धा पूर्ण करण्याचे स्वप्न असते. त्यानुसार चेतन अग्निहोत्री यांनी देखील ही स्पर्धेत उतरण्याचा निश्चय केला. सुरुवातीच्या काळात चेतन यांनी फक्त सायकलिंगचा सराव केला. हा सराव करीत असताना डेक्कन क्लिफ हँगर तसेच पुणे ते गोवा असलेली मानाची सायकल स्पर्धा पूर्ण केली. यामुळे ते रॅम स्पर्धेसाठी पात्र ठरले. आतापर्यंत आयर्नमॅन ही स्पर्धा नाशिकमधून अमर मियाजी, व्हावळ व पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पूर्ण केली आहे.

असा केला सराव

चेतन अग्निहोत्री हे आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सहा महिन्यांपासून सराव करीत होते. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुण्याचे डॉ. राडकर यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. रोज १०० ते १५० किलोमीटर सायकलिंग, नाशिकरोडच्या जलतरण तलावावर एक ते दोन तास स्विमिंग व रोज पन्नास किलोमीटर रनिंगचा त्यांनी सराव केला. खुल्या पाण्यातील स्विमिंगचा सराव करण्यासाठी ते अंबोली धरणावर जात होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरसंख्येत वाढ

$
0
0

३२५ गावे, वस्त्या तहानलेल्या

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी भागात जाणवू लागलेली दुष्काळाची दाहकता आणि त्यामुळे निर्माण झालेले पाण्याचे दुर्भिक्ष्य यामुळे खेडोपाडी तहानेने व्याकूळ होऊ लागली आहेत. तहान शमविण्यासाठी टँकर्सची मागणी जोर धरत असून, जिल्ह्यात आजमितीस ७५ गावे आणि २५० वाड्या टँकर्सच्या पाण्यावर अवलंबून आहेत. ८७ टँकर्सद्वारे या गावांना पाणीपुरवठा केला जात असून, ही संख्या वाढतच जाणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

जिल्ह्यातील बहुतांश भागाकडे पावसाने यंदा पाठ फिरवली. त्यामुळे धरणे व अन्य जलाशये पूर्ण क्षमतेने भरू शकली नाहीत. जिल्ह्यात साधारणत: जानेवारी-फेब्रुवारीनंतरच टँकरदवारे पाणीपुरवठा करावा लागतो. परंतु, यंदा काही भागात पावसाळ्यापासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची नामुष्की जिल्हा प्रशासनावर ओढावली आहे. दिवसागणिक टँकर्सची ही संख्या वाढतच असून, शनिवारी पुन्हा १२ गावे आणि ३० वाड्यांसाठी जिल्हा प्रशासनाने नऊ टँकर्स मंजूर केले आहेत. जिल्ह्यात ७५ गावे आणि २५० वाड्या अशा ३२५ ठिकाणी ८७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.

सिन्नर तालुक्यात सर्वाधिक ठिकाणी दुष्काळाची धग जाणवू लागली आहे. तालुक्यातील ११ गावे आणि १२४ वाड्या अशा १३५ ठिकाणी २६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येवल्यातील २९ गावे आणि २१ वाड्या अशा ५० ठिकाणी २४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. खालोखाल मालेगावातील १६ गावे आणि ५७ वाड्या अशा ७३ ठिकाणी २० टॅँकर ग्रामस्थांची तहान भागविण्याचे काम करीत आहेत.

..

तालुका टँकर्स

बागलाण ८

चांदवड १

दिंडोरी ०

देवळा ४

इगतपुरी ०

कळवण ०

मालेगाव २०

नांदगाव ४

नाशिक ०

निफाड ०

पेठ ०

सुरगाणा ०

सिन्नर २६

त्र्यंबकेश्वर ०

येवला २४

एकूण ८७

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

$
0
0

'नामको'च्या निवडणुकीसाठी बँक प्रशासन सज्ज

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंन्ट बँकेच्या (नामको) २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या २१ संचालकांच्या जागांसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. या निवडणुकीसाठी उपविधीमधील तरतुदीनुसार सकाळी सभासदांची विशेष सर्वधारण साधारण सभा होणार आहे. त्यात निवडणुकीचा कार्यक्रम वाचून प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर अर्ज दाखल करणारी प्रक्रिया सुरू होईल.

निवडणुकीसाठी तब्बल नऊ दिवस ही प्रक्रिया बँकेच्या मध्यवर्ती कार्यालात सुरू राहणार आहे. त्यासाठी १९ ते २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रविवारी तयारी पूर्ण केली. 'नामको'च्या ८० शाखांमधील तब्बल १ लाख ७९ हजार ९०५ सभासंदाना निवडणुकीत सहभागी होता येणार आहे. यातील इच्छुक उमेदवारांना मात्र नाशिक येथील मध्यवर्ती कार्यालयातच अर्ज दाखल करावे लागणार आहेत. आतापर्यंत या निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील सभासदांनीच उमेदवारी केली आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाने नामनिर्देशनपत्र घेण्यासाठी तीन टेबल लावले आहे. त्यात सर्वसाधारण १८ जागांसाठी एक स्वतंत्र टेबल, अनुसूचित जाती - जमातीच्या १ जागेसाठी दुसरा टेबला, महिला राखीवच्या ३ जागांसाठी तिसरा टेबल असणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद भालेराव या सर्व प्रक्रियेत असणार आहे.

निवडणुकीची उत्सुकता

पहिल्या दिवशी अर्ज विक्रीची शक्यता जास्त आहे. त्यामुळे या दिवशी कोण अर्ज भरतो हेही उत्सुकतेचे असणार आहे. गेल्या पाच वर्षांपासून प्रशासकीय कारकीर्द असल्याने या निवडणुकीबद्दल सभासदांमध्ये उत्सुकता आहे. तर निवडणुकीत इच्छुकांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम

अर्ज विक्री - १९ ते २७ नोव्हेंबर सकाळी ११ ते ३

उमेदवारी यादी प्रसिद्ध - १९ ते २७ नोव्हेंबर सायंकाळी ५

अर्जांची छाननी - २९ नोव्हेंबर - सकाळी १० वाजता

वैध उमेदवार यादी - ३० नोव्हेंबर - सकाळी ११ वाजता

उमेदवारी माघार - १ ते ४ डिसेंबर - सकाळी ११ ते ३ वाजता

अंतिम यादी चिन्हासह - ५ डिसेंबर - सकाळी ११ वाजता

मतदान तारीख - २३ डिसेंबर - सकाळी ८ ते सायंकाळी ५

मतमोजणी - २६ डिसेंबर २०१८ - सकाळी ८ पासून संपेपर्यंत

निवडणूक निकाल जाहीर करणे - २८ डिसेंबर - दुपारी ४ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विकासकामांच्या मान्यतेसाठी धावाधाव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आगामी लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता नववर्षाच्या सुरुवातीला केव्हाही लागू होण्याची शक्यता असून त्यामुळे प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा परिषदेची लगबग सुरू झाली आहे. १३० कोटींच्या निधीपैकी केवळ ३३ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता घेऊ शकलेल्या जिल्हा परिषदेने उर्वरित १०० कोटींचा निधी आचारसंहितेच्या कचाट्यात अडकू नये, याकरीता धावाधाव सुरू केली आहे. आठ दिवसांत मान्यतेसाठी प्रस्ताव द्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

पुढील वर्ष निवडणुकांचे असणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार असून त्याची तयारी आतापासूनच सुरू झाल्याचे पहावयास मिळते आहे. विकासकामांच्या माध्यमातून लाभ पदरात पाडून घेण्याची धडपड हा राजकारणाचा भाग आहे. जिल्हा नियोजन समितीच्या कामांना आचारसंहितेपूर्वीच प्रशासकीय मान्यता देण्यासाठी हालचाली गतिमान करण्यात आल्या आहेत. डिसेंबर-जानेवारीमध्येच नियोजन समितीची बैठक घेऊन आचारसंहितेपूर्वी कामे मंजुरीचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. विविध सरकारी यंत्रणाकडून त्यास प्रतिसादही मिळत असला तरी जिल्हा परिषदेचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची बाब पुढे आली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या आराखड्यात जिल्हा परिषदेशी संबंधित १३३ कोटींच्या कामांपैकी केवळ ३३ कोटींच्या कामांनाच प्रशासकीय मान्यता घेण्यात आली आहे. उर्वरित १०० कोटींच्या कामांना अजूनही प्रशासकीय मान्यताच मिळाली नसल्याची बाब शनिवारी (दि. १७) जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीतून पुढे आली. ही कामे आचारसंहितेच्या कचाट्यात अडकू नयेत, याकरीता जिल्हा परिषदेच्या यंत्रणेला धावाधाव करावी लागते आहे. अन्य एजन्सीजचा १७१ पैकी १३१ कोटींचे प्रस्ताव प्राप्त झाले असून उर्वरित प्रस्तावही पुढील आठ दिवसांत प्राप्त होणे अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा नियोजन विभागातील सूत्रांनी दिली आहे.

केंद्रीय निधीची प्रतीक्षा

केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित निधीमधून अनेक विभागाची कामे प्रस्तावित आहेत. मात्र, अनेक योजनांना केंद्र सरकारकडून निधीच उपलब्ध झालेला नाही. त्यामुळेही प्रशासकीय यंत्रणेची कोंडी होत आहे. राज्याच्या हिश्शाची कामे करताना केंद्रीय हिस्सा कधी मिळतो, याकडेही यंत्रणेचे लक्ष आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या २० कोटींच्या निधीसह अन्य लहान-सहान योजनांसाठी अपेक्षित असलेला निधीही केव्हा प्राप्त होणार याची प्रतीक्षा कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसैनिक अयोध्या

$
0
0

त्र्यंबकचे शिवसैनिक

जाणार अयोध्याला

त्र्यंबकेश्वर : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे हे राममंदिर प्रश्नावर अयोध्या येथे भेट देणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे तालुका समन्वयक यांनी त्र्यंबक शहर आणि तालुक्यातून शेकडो शिवसैनिक अयोध्या येथे जाणार असल्याचे सांगितले. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली याबाबत नियोजन पूर्ण झाले आहे. खासदार हेमंत गोडसे यांनी याबाबत रेल्वेचे नियोजन केले आहे. त्र्यंबकेश्वर येथून कुशावर्ताचे जल घेऊन जाणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. गुरुवारी (दि. २२) रात्री अयोध्याचा प्रवास सुरू होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिनविरोधसाठी जोर

$
0
0

संभाव्य उमेदवारांच्या नावांची पॅनलनुसार चर्चा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंन्ट बँकेच्या (नामको) २१ जागांसाठी होणाऱ्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी हालचालींनी वेग घेतला आहे. अर्ज भरण्यास सोमवारपासून (दि. १९) सुरुवात होणार असल्याने संभाव्य उमेदवारांची नावेही पुढे आली आहे. हे उमेदवारांचे नाव तूर्त अंतिम नसले तरी पॅनलप्रमाणे त्यांची चर्चा सुरू आहे. दरम्यान, निवडणूक बिनविरोध करता येते का, यासाठी प्रयत्न केले जात आहे.

'नामको'च्या २३ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत तीन पॅनल होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यात सत्ताधारी माजी संचालकांचे प्रगती पॅनल असणार असून त्यात सोहनलाल भंडारी, वसंत गिते, विजय साने, हेमंत धात्रक, रंजना जातेगावकर, शोभा छाजेड, कांतीलाल जैन, सुभाष नहार, प्रफुल्ल संचेती, अविनाश गोठी, नंदू पवार, प्रकाश दायमा, भानूदास चौधरी, महेंद्र बुरड, शिवनाथ डागा, अरुण मनोत, अशोक सोनजे, रंजन ठाकरे व प्रशांत दिवे यांचे नाव चर्चेत आहे. सहकार पॅनलमध्ये भास्करराव कोठावदे, अजय ब्रह्मेचा, गजानन शेलार, ललित मोदी, सुनील बुब, सुनील केदार, किशोर बाफणा, सुरेश पाटील, अंनत सूर्यवंशी, यांची नावे चर्चेत आहे. तर अजित बागमार यांच्या नम्रता पॅनलमधून अजित बागमार, प्रवीण तिदमे, भास्कर निकम, दिलीप पवार, अनिल भोर, महेश पठाडे, धरमचंद पगारिया, गोरख चौधरी यांची नावे पुढे आली आहे. या नावांची अद्याप चर्चा असून त्यावर पॅनलप्रमुखांकडून अद्याप शिक्कामोर्तब करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यात बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे एकाही पॅनलकडून आपल्या उमेदवारांची पूर्ण नावे पुढे आलेली नाहीत. त्यातील सत्ताधारी माजी संचालकांचे पॅनलमध्ये काही बदल केले असून काही उमेदवारांच्या नावावर अद्याप चर्चा सुरु आहे. तर विरोधी गटाने 'वेट अॅण्ड वॉच'ची भूमिका घेतली असून सत्ताधारी माजी संचालकांचे पॅनल जाहीर झाल्यानंतर ते त्यांच्या पॅनलची नावे जाहीर करणार आहे.

पॅनल व्यतिरिक्त अनेक इच्छुक

प्रबळ तीन पॅनल चर्चेत असले तरी अनेक सभासदांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे ते या निवडणुकीत अर्ज दाखल करणार आहे. त्यामुळे ती सर्वांसाठी अडचणीची ठरणार आहे. या उमेदवारांमध्ये काही उमेदवार प्रबळ सुद्धा आहे.

दबाव अन् पळवापळवी

निवडणुकीत पॅनलच्या उमेदवारांची पळवापळवी सुरू झाली आहे. तसेच दबाव तंत्राचा वापरही सुरू झाला आहे. तर काही उमेदवारांचा नाराजी सुद्धा पुढे येत आहे. त्यामुळे पॅनलची नावे जाहीर करण्यास विलंब होत असल्याचे बोलले जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दरोड्याच्या तयारीतील टोळी मालेगावात जेरबंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघा सराईत गुन्हेगारांच्या टोळीला येथील पवारवाडी पोलिसांच्या पथकाने शनिवारी रात्री गजाआड केले. त्यांच्याकडून दरोडा टाकण्याचे साहित्य, मोबाइल व मोटारसायकल जप्त करण्यात आली असून, पवारवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांचा फास आवळण्यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख संजय दराडे यांनी जिल्ह्यातील ४० पोलिस स्टेशननिहाय गुन्हे शोध पथके तयार करून सशस्त्र नाकाबंदी व दरोडा गस्त योजना तयार केली आहे. दरोडा, जबरी चोरी, घरफोडी व चोरीचे गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यानुसार येथील अपर पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव शहरातील पोलिस स्टेशनिनिहाय सराईत गुन्हेगारीस प्रतिबंध होण्यासाठी धडक कारवाई सुरू आहे.

या कारवाई दरम्यान शनिवारी रात्रीच्या सुमारास शहरात गस्तीवर असलेले पवारवाडी पोलिस स्टेशनकडील अधिकारी व कर्मचारी यांनी ओवाडीनाला परिसरात सापळा रचून दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार सराईत गुन्हेगारांना पाठलाग करून ताब्यात घेतले. यातील दोन गुन्हेगार पसार झाले. मात्र मोहम्मद युसूफ मोहम्मद याकूब (वय २२, रा. पवारवाडी), अब्दुल रहेमान शेख शब्बीर (वय १९, रा. पवारवाडी) मोहमद मुस्तफा मोहमद आमीन (वय १८, रा. नजमाबाद) वसिम अहमद नसीर अहमद (वय १९, रा. पवारवाडी) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १ तलवार, १ लोखंडी रॉड, स्कूड्रायव्हर, दोर व मिरचीची पूड असे दरोडा तयारीचे साहित्य हस्तगत केले. तसेच आरोपींनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल व चार मोबाइलही जप्त केले आहेत.

..

याकूबवर गंभीर गुन्हे दाखल

आरोपी मोहम्मद युसूफ मोहम्मद याकूब हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध पवारवाडी पोलिस स्टेशनमध्ये दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने अलिकडेच त्याची गँग तयार केली होती. अटक केलेल्या आरोपींकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘भय इथले संपत नाही’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रत्येकाच्या मनात एक प्रकारचे भय कायम असते. कोणतेही काम करीत असताना त्या भयाची चाहूल सतावते. प्रत्येक क्षणाक्षणाला याचे अस्तित्व जाणवत असते. या भयापासून दूर जाण्याचा प्रयत्न प्रत्येक जण नेहमी करीत असतो. शेवटी प्रत्येकाला हा प्रश्न कायम सतावतो आणि आपसूक मनाची समजूत घातली जाते. स्त्री मनातल्या भयावर भाष्य करणारे 'भय इथले संपत नाही' एच. ए. ई. डब्ल्यू. आर. सी. रंगशाखा एचएएलच्या वतीने ५८ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सादर करण्यात आले.

रविवारी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या नाटकाच्या सुरुवातीच्या प्रसंगात दिवस उजाडतो तोच मुळी वर्तमानपत्रामधून वाचनात येणाऱ्या सद्यस्थितीतील महिलांवरील फसवणूक, अत्याचार, लोभ, मोह, क्रोध, आणि तीव्र अशा गुंतागुंतीच्या बातम्यांच्या चर्चेतून यात असलेले पात्र महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर लक्ष केंद्रित करते. महिलांनी असे किती दिवस कुढत बसायचे, किती दिवस अत्याचार सहन करायचा आपणच आपले अश्रुगीत गात जायचे या नाटकांतून प्रभावीपणे मांडण्यात आले. नाटकाचे लेखन रवींद्र बेंद्रे यांचे होते. दिग्दर्शन संदेश सावंत यांनी केले. सहनिर्मिती लक्ष्मीकांत खैरनार यांची होते. संदेश सावंत (मी), दीपक टावरे (तो), राखी लढ्ढा (मोगरा), विद्या भालेराव (रातराणी), सोनाली पगारे (रजनीगंधा), भरत जाधव (नावाडी) यांनी भूमिका केल्या. नेपथ्य राजेंद्र जाधव, प्रकाश योजना विनोद राठोड, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा मिलिंद मेधणे, संगीत अतुल राहुल, रंगमंच सहाय्य विजय जगताप यांचे होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान, तरुणाई होतेय ‘कुत्ता गोळी’ची शिकार!

$
0
0

नाशिक :

विविध औषधांचा वापर नशेसाठी होत असल्याने, त्याचा थेट परिणाम मेंदूच्या कार्यप्रणाली होतो. आता यात ‘कुत्ता गोळी’ने थैमान घातले असून, या गोळीमुळे महाविद्यालयीन तरुणाईबरोबरच शाळकरी मुलांचेही आयुष्य धोक्यात आले आहे. मालेगावमध्ये या कुत्ता गोळीचा अनधिकृत वापर उघडकीस आला असून, ही नशाखोरी रोखण्याचे आव्हान प्रशासकीय यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे. या गोळीच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकणारी मालिका आजपासून.

नाशिक : मॉलिवूड, जातीय दंगली, पॉवरलूम अशा एका ना अनेक कारणांमुळे चर्चेत येणारे मालेगाव गेल्या महिन्यात कुत्ता गोळीमुळे पोलिसांसह अन्न व औषध प्रशासन विभागाच्या रडारवर आले आहे. औषध म्हणून घेण्यात येणाऱ्या या झोपेच्या गोळीमुळे मालेगावकरांचीच नव्हे, तर जिल्ह्याची झोप उडाली आहे. कारण ही गोळी नशेसाठी घेतली जात असून, त्यामुळे तरुण पिढीचे आयुष्य वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन या दोन्ही विभागांनी जवळपास सहा महिन्यांतच आठहून अधिक संशयितांना अटक करीत त्यांच्याकडून सुमारे सहा हजार टॅब्लेट जप्त केल्या आहेत. यात सराईत गुन्हेगार असलेल्या नसीम अख्तर मो. सलीम उर्फ नसीम मोट्या (रा. हकीमनगर) याचाही समावेश होता.

औषधांचा नशेसाठी वापर होणे नवीन नाही. खोकल्याची औषधे, झोपेची औषधे यासाठी वापरली जातात. सराईत गुन्हेगारांबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थीही या नशेचे शिकार झाले आहेत. मात्र, आता कुत्ता गोळीची पाळेमुळे महाराष्ट्रात पसरल्याने शाळकरी मुलांचेही आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे ही गोळी अधिक चर्चेत आली. त्यातूनच अल्प्रालोझम ही झोपेशी संबंधित गोळी चर्चेत आली आणि तिचे दुष्परिणाम समोर येताच अखेर तिची गंभीर दखल अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री गिरीश बापट यांना घ्यावी लागली आहे.

काय आहे कुत्ता गोळी?

औषध म्हणून कुत्ता गोळीचा वापर केला जात असला, तरी काही समाजकंटकांनी तिचा नशेसाठी वापरण्यास सुरुवात केली आहे. या गोळीत उत्तेजक रसायनांचे मिश्रण केले जात असून, त्यामुळे ती आरोग्यास घातक ठरत आहे. या गोळीच्या सेवनाने संपूर्ण शरीर बधिर होते. शरीराला वेदनाही जाणवत नाहीत. या गोळीच्या सेवनाने बेभान झाल्यागत होते, तसेच कोणतेही कृत्य करण्यास अशी व्यक्ती मागे-पुढे पाहत नाही. त्यामुळेच या गोळीला ‘कुत्ता गोळी’ असे म्हंटले जाते. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अल्प्राझोलम असे या गोळीचे शास्त्रीय नाव आहे. कुत्ता गोळीच्या सेवनाने मनुष्य निद्रावस्थेत जातो. निद्रावस्था टाळल्यास अशी व्यक्ती स्वत:वरचे नियंत्रण गमावते. या नियंत्रणहीन झालेल्या व्यक्तीच्या भावना भडकल्यास ती कोणतेही कृत्य करण्यास उद्युक्त होते.

नशेचा नवा बाजार

कुत्ता गोळीचा प्रवास नेमका कुठून झाला, याची उकल अद्याप झालेली नसली तरी नशेचा हा नवा बाजार असल्याचा हा प्रकार आहे. या टॅब्लेट मध्य प्रदेशसह इतर काही ठिकाणांहून मागविण्यात येत असल्याचे सांगितले जाते. सुरुवातीला स्वस्त वाटणाऱ्या या टॅब्लटे्सची मागणी वाढली की तस्कर त्या चढ्या भावाने खरेदीदारास देतात. यामागे मोठे रॅकेट असण्याचा कयास व्यक्त होत आहे. अगदी दोन रूपयात एक गोळी मिळत असल्याने स्वस्तात तरुण या नशेच्या आहारी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. ०.२५ आणि ०.५० या दोन स्वरूपात या गोळ्या उपलब्ध असून, शेड्युल वन या कॅटेगरीत येत असल्याने त्यांची विक्री करताना विक्रेत्यांना काळजी घ्यावी लागते. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय अशा गोळ्या देता येत नाही. मात्र, नशेसाठी वापरण्यात येणारी इतरही बरीच औषधे असून, त्यातून मोठी उलाढाल होते आहे.

कोणत्याही टॅब्लेट डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक असते. मेंदुशी संबंधित औषधे असतील तर त्याकडे गांभीर्याने पाहायला हवे. अनावश्यक पद्धतीने औषधे घेतल्यास शरीरास त्याची सवय लागते. मग हळूहळू औषधांची मात्रा वाढविल्याशिवाय पर्याय नसतो. नशेखोरीमध्ये हेच होते. कोणत्याही कारणास्तव अशा औषधांचा वापर थांबला की त्या व्यक्तीला अस्पष्ट दिसणे, आत्मविश्वास कमी होणे एवढेच नव्हे तर फिट्स येणे असे प्रकार घडू शकतात.

- डॉ. प्रणव शिंदे, मेंदूविकार तज्ज्ञ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रिक्षाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बस थांब्यावर उभ्या असलेल्या वृद्ध प्रवाशास अ‍ॅटो रिक्षाने धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. अपघाताची घटना आंबेडकर नगर परिसरात झाली असून, या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जनार्दन भागाजी रोकडे (७२, रा. तेजाळे चौक, मोठा राजवाडा) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. रोकडे हे आंबेडकरनगर येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी रविवारी गेले होते. रात्री परतीच्या प्रवासासाठी ते बसथांब्यावर उभे असतांना हा अपघात झाला. आंबेडकरनगर बस थांब्यावर ते बसच्या प्रतिक्षेत असतांना अज्ञात भरधाव रिक्षाने त्यांना धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ आडगाव येथील वसंतराव पवार मेडिकल कॉलेज येथे दाखल केले होते. यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सोमवारी दुपारी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खडसे दमानिया

$
0
0

खडसेंना दणका;

दमानियांना दिलासा

औरंगाबाद : माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलासा दिला आहे. त्यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध मुक्ताईनगर येथे दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. विभा कंकणवाडी यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे माजी मंत्री खडसे यांना चांगलीच चपराक बसली आहे. अंजली दमानिया यांनी मुंबई उच्च न्यायालयात डिसेंबर २०१६ मध्ये जनहित याचिका दाखल केलेली होती.

या याचिकेमध्ये त्यांनी श्री. खडसे यांचे चोपडा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवरील ९ कोटी ५० लाखाचा एक १० लाखांचा असे दोन डीडी जोडलेले आहेत. या संदर्भात नोटीस प्राप्त झाल्यावर श्री. खडसे यांनी, चौकशी केली असता हे डीडी खोटे असून, बनावट दस्तेवजआधारे तयार करण्यात आलेले आहेत. आपली बदनामी करण्याच्या उद्देशानेच हे करण्यात आले. हे बनावट डीडी आणि त्या संदर्भातील खोटा दस्तऐवज खरे असल्याचे भासवून खंडपीठात दाखल याचिकेमध्ये त्याचा उपयोग करण्यात आला. हे डीडी आरोपींनी कसे मिळविले, त्यांच्याकडे कसे आले याच्या तपासासंदर्भात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली. मात्र गुन्हा नोंदविण्यास नकार देण्यात आल्यानंतर मुक्ताईनगर न्यायालयातून १५६ (३) अन्वये आदेश प्राप्त करवून फसवणूक, कटकारस्थान, बनावट दस्तऐवज तयार करणे आदी विविध कलमांखाली श्रीमती अंजली दमानिया, रोशनी राऊत, गजानन मालपुरे, सुशांत कुऱ्हाडे, सदाशिव सुब्रमण्यम आणि चार्मीन फर्न्स यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.खोटे स्टँप्स बनवून फसवणूक केल्याचा आरोपही त्यात करण्यात आला. मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अंजली दमानिया व अन्य पाच जणांविरुद्ध १३ जून २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 'शेल' कंपनीमधील पैसा हा मंदाकिनी खडसे आणि गिरीष चौधरी यांच्या खात्यात आला. याविषयीची संपूर्ण माहिती दमानिया यांनी याचिकेत दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एकनाथ खडसे यांना क्लीन चीट दिली होती. कुठलाही तपास न करता या विभागाने राजकीय दबावामुळे त्यांना व खडसे यांना या प्रकरणातून वाचविल्याचे याचिकेत म्हटले होते. दमानिया यांचा मानसिक छळ करण्यासाठीच १५ महिन्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्दबात्तल करण्यात यावा, अशी विनंती दमानिया यांनी औरंगाबाद खंडपीठात केली होती. जळगाव, नाशिक, धुळे, बुलढाणा, जालना आणि नंदूरबार या सहा जिल्ह्यांमध्ये अंजली दमानिया यांच्याविरुद्ध २८ अब्रू नुकसानीचे दावे दाखल करण्यात आले आहेत. त्यातील एक गुन्हा ऑगस्ट महिन्यातच औरंगाबाद खंडपीठाने रद्द केला होता. सोमवारी खंडपीठाने मुक्ताईनगरमध्ये दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.

एकनाथ खडसे यांच्याविरुद्धचा लढा चालूच ठेवणार आहे, असे अंजली दमानिया यांनी सांगितले. या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले आहे. या याचिकेत दमानिया यांनी स्वत:च आपली बाजू मांडली. अन्य पाच याचिकाकर्त्यांतर्फे विजय पाटील यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोफत पास, त्याला नियमांचा फास!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुष्काळी तालुक्यांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतींअंतर्गत मोफत बससेवेचा लाभ दिला जाणार असून, नाशिक तालुक्याचाही त्यामध्ये समावेश आहे. या तालुक्यांना सरकारने देऊ केलेल्या सवलती लागू असतील, असा शासननिर्णय असला तरी नाशिक तालुक्यात समाविष्ट शहरातील विद्यार्थ्यांना मात्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोफत बसपासच्या सुविधेपासून दूर लोटले आहे. दोन सरकारी विभागांच्या समन्वयाच्या अभावामुळे नागरिकांमध्ये संभ्रम कायम आहे.

दुष्काळी परिस्थितीपासून काहीसा दिलासा मिळावा याकरिता सरकारने राज्यातील १८० तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना आणि सवलती लागू केल्या आहेत. त्यामध्ये शैक्षणिक, तांत्रिक, तसेच व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २०१८-१९ च्या उर्वरित शैक्षणिक सत्राकरिता शिक्षणासाठी मोफत प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे याबाबतचे पत्र नाशिक विभागाला ५ नोव्हेंबर रोजी प्राप्त झाले असून, शनिवारपासून (ता. २४) ही सवलत लागू करण्याची तयारी नाशिक विभागाने सुरू केली आहे. या सवलतीचा लाभ जिल्ह्यातील ५५ हजार विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे.

५५ हजार विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ

१८० दुष्काळी तालुक्यांसाठी राज्यात मोफत पास सवलत

२४ नोव्हेंबरपासून सवलत लागू करण्याची तयारी

सवलतीच्या निर्णयानंतर पडलेले प्रश्न

नाशिक तालुका दुष्काळी असताना या तालुक्यातील शहरी विद्यार्थ्यांना सवलत का नाही?

दुष्काळी तालुक्यातील नव्याने पास घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ का मिळू नये?

मोफत पासबाबत विद्यार्थ्यांत संभ्रम

दुष्काळी तालुक्यांमध्ये नाशिकचाही समावेश असल्याने शहरी विद्यार्थ्यांनाही मोफत बस प्रवासाची सवलत देणे अनिवार्य असल्याची भूमिका सोमवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केली. मात्र, राज्यमार्ग परिवहन महामंडळाने ही मोफत बसपास सेवा शहरी बससेवेकरिता अनुज्ञेय नाही, असे परिपत्रकान्वये स्पष्ट केल्याने शहरी विद्यार्थ्यांना मोफत बसपास सेवेचा लाभ मिळणार की नाही, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. इतकेच नव्हे, तर शहर वगळता नाशिक तालुक्यातील अनेक गावांपर्यंत शहर बस धावतात. या बसेस विद्यार्थ्यांची मोफत वाहतूक करणार की नाही, असा सवालही आता तालुक्यातील शेतकरी वर्गाकडून उपस्थित होऊ लागला आहे.

सविस्तर वृत्त...२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खो-खो स्पर्धेचे आयोजन

$
0
0

…म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन व जिल्हा परिषद शाळा तोरंगण (हरसूल) यांच्या संयुक्त विद्यमाने ३० नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान जिल्हा परिषद शाळा तोरंगण येथे किशोर व किशोरी गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतून जळगाव येथे होणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्याचा प्राथमिक संघ निवडण्यात येणार आहे ही स्पर्धा जिल्हा परिषद शाळा तोरंगण ( हरसूल ) येथे होणार असून स्पर्धेचा उद्घाटन समारंभ ३० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी अन्य पर्यायांचा अवलंब करण्याऐवजी आत्महत्येसारखा टोकाचा पर्याय जिल्ह्यातील शेतकरी अवलंबत आहेत. एकीकडे पाणीटंचाईमुळे शेती कसणे कठीण झाले असताना शेतकरी आत्महत्याही वाढू लागल्या आहेत. बागलाण, दिंडोरी व नांदगाव ही तीन तालुके शेतकरी आत्महत्येच्या घटनेने पुन्हा हळहळली आहेत. जिल्हा प्रशासनाकडे चालू वर्षात ९२ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे.

दिंडोरी तालुक्यातील परमोरी या गावातील रहिवासी विलास सुकदेव महाले (वय ४८) यांनी रविवारी सकाळी शेतामध्ये विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. गावात गट क्र. २२२ मध्ये त्यांचे सामाईक क्षेत्र आहे. दुसरी घटना बागलाण तालुक्यात घडली आहे. येथील टेंभे गावात अशोक उत्तम ठोके यांनी १६ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला सोमवारी (दि. २२) प्राप्त झाला. ठोके यांच्या नातलगांनी शवविच्छेदन न करताच अंत्यविधी केल्याचे बागलाण तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविलेल्या अहवालात म्हटले आहे. तिसरी घटना नांदगाव तालुक्यातील पळाशी येथे घडली. योगेश नाना सांगळे (वय ३२) या शेतकऱ्याने सोमवारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट नाही. मात्र, या घटनांबाबत जाबजबाब नोंदवून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images