Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

गाड्यांनी भरणार ‘सावाना’चे आवार!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय नाशिकचे आवार आणि परशुराम साईखेडकर नाट्यगृहासाठी पे अँड पार्क करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, आता पार्किंगसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. आज निविदा जमा करण्याची अंतिम मुदत आहे. परंतु, त्यामुळे सावाना आवार गाड्यांनी खचाखच भरणार असून, वाचकांना गाडी लावायला जागा मिळाली नाही, तर त्यात नवल वाटू नये!

परशुराम साईखेडकर नाट्यगृह हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असून, तेथे महिन्यातून रोजच काही ना काही कार्यक्रम होत असतो. त्यासाठी बऱ्यापैकी गर्दीही असते. परंतु, या गर्दीचा फायदा घेऊन अनेक जण येथे गाडी लावून शहराला प्रदक्षिणा मारून येतात, असे निदर्शनास आले आहे. काहींना मेनरोडला खरेदी करायची असेल, तरी प. सा.बाहेर किंवा 'सावाना'च्या आवारात गाडी लावून आपला कार्यभाग उरकल्यावर येथून गाडी नेणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मात्र, गणेशोत्सव, दिवाळी या काळात शहराच्या मध्यवर्ती भागात इतक्या मोक्याच्या ठिकाणी पे अँड पार्क मिळत असेल, तर त्याचा फायदा अनेक जण घेणार असून, वाचनालयात पुस्तक बदलण्यासाठी येणाऱ्या सभासदांच्या गैरसोयीत मात्र त्यामुळे भर पडणार आहे.

पे अँड पार्कच्या व्यवस्थेसाठी निविदा देणाऱ्यांना किती ठिकाणी हे काम ते करीत आहेत, याची यादी द्यावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या काढण्याची जबाबदारीही उमेदवाराचीच असेल हेदेखील अधोरेखित करण्यात आले असून, नाट्यगृहात सशुल्क कार्यक्रम, नाटक असेल, तर त्यावेळी येणाऱ्या रसिकांना पार्किंग व्यवस्था मोफत उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.

---

प. सा.बाहेर होणार उपाहारगृह

परशुराम साईखेडकर नाट्यगृहाबाहेर उपाहारगृह करण्यासाठीदेखील निविदा मागविण्यात आल्या आहेत. चारचाकी गाडीमध्ये उपाहारगृह चालवावे, अशी सूचना देण्यात आली असून, संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य, सेवक यांना उपाहारगृहाची व्यवस्था सवलतीच्या दरात उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. उपाहारगृह व्यवस्था राबविताना ग्राहकांशी वाद निर्माण झाल्यास संस्थेची जबाबदारी राहणार नाही. उपाहारगृहाची उभारणी स्वखर्चाने करण्यात यावी, अशी अट असून, या उपाहारगृहातील पदार्थांचे दर कार्यकारी मंडळाकडून मंजूर करून त्यानुसार आकारणी करणे बंधनकारक राहणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘सिडको’ची जप्ती तुर्तास टळली

0
0

म. टा. वृत्तसेवा सिडको

सिडकोतील सर्वच प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येवून सिडकोकडे असलेली थकीत रक्‍कम प्रकल्पग्रस्तांना देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सिडकोने ही रक्‍कम प्रकल्पग्रस्तांना दिली नाही तर सिडको कार्यालयाची जप्ती करण्याचे आदेश दिले होते. याच आदेशानुसार सोमवारी सिडको कार्यालयाची जप्ती होणार होती, मात्र सिडकोच्या प्रशासकांनी दोन महिन्यांची मुदत वाढवून मागून त्याबाबतचे लेखी पत्र दोन दिवसांत देण्याची विनंती केल्याने तुर्तास ही जप्तीची कारवाई टळली आहे. मात्र, सिडकोसमोर ला आता ही प्रकल्पग्रस्तांची रक्‍कम लवकरात लवकर देण्याची आवाहन उभे राहिले आहे.

नाशिक शहरात सिडको या गृहनिर्माण संस्थेने सहा योजना उभ्या केल्या असून, सिडकोतील मिळकतींच्या हस्तांतरणासाठी व अन्य कामासाठी सिडकोने कार्यालय उभारले आहे. मात्र या कार्यालयाला लागलेली साडेसाती केव्हा संपणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सिडकोने घेतलेल्या जमिनीचा मोबदला अत्यंत कमी असल्याने सिडकोतील ५९ प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येवून ही रक्‍कम वाढविण्यासाठी दावा केला होता. त्यानुसार जिल्हा न्यायालयाने १९९४ मध्येच ही रक्‍कम वाढवून देण्याची सूचना केली हेाती. १९९६ मध्ये पुन्हा उच्च न्यायालयात याबाबत अपील करण्यात आले. त्याचा निकाल १९९७ साली भुधारकांच्या बाजुने लागला. त्यानंतर पुन्हा उच्च न्यायालयात झालेल्या अपिलानंतर हा खटला २००६ पर्यंत प्रलंबितच राहिला होता. २०१७ साली न्यायालयाने वाढीव मोबदला हा न्यायालयात सिडको प्रशासनाने भरण्याचे आदेश दिले आहेत.

मागील महिन्यांतच प्रकल्पग्रस्तांचे पैसे दिले नसल्याने ॲड. जयंत जायभावे यांनी केलेल्या दाव्यानुसार सिडकोने प्रकल्पग्रस्तांना त्यांची रक्‍कम द्यावी अथवा कार्यालयातील साहित्याची जप्ती करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. यावेळी सिडकोने लेखी हमी देवून काही दिवसांची मुदत मागून घेतली होती. मात्र आता तर सिडकोतील सर्वच प्रकल्पग्रस्तांनी एकत्र येवून सिडकोकडे असलेली थकीत रक्‍कम प्रकल्पग्रस्तांना देण्याची मागणी केली आहे. त्यानुसार उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सिडकोने ही रक्‍कम प्रकल्पग्रस्तांना दिली नाही तर सिडको कार्यालयाची जप्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याच आदेशानुसार सोमवारी सिडको कार्यालयाची जप्ती होणार होती, मात्र सिडकोच्या प्रशासकांनी दोन महिन्यांची मुदत वाढवून मागून त्याबाबतचे लेखी पत्र दोन दिवसांत देण्याची विनंती केल्याने तुर्तास ही जप्तीची कारवाई टळली आहे. मात्र सिडकोला आता ही प्रकल्पग्रस्तांची रक्‍कम लवकरात लवकर देण्याची आवाहन उभे राहिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात उद्यापासून कृषिथॉन

0
0

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात कृषिथॉन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून गुरूवारी (दि.२२) सकाळी साडेदहा वाजता माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ठक्कर डोम येथे या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. यंदा दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर हे प्रदर्शन होत असून जलसंधारणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गावांचा आदर्श वस्तुपाठ प्रदर्शनातून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांपुढे मांडला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेतून दिली.

शेतकऱ्यांना शेती पद्धतींची माहिती व्हावी, ज्ञान आणि कौशल्य विकासाद्वारे शेतकरी समूहापर्यंत जागतिक स्तरावरील नवीन तंत्रज्ञान कृषिथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून पोहचविण्यात येते. शहरात २२ ते २६ नोव्हेंबर या काळात ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन व मीडिया एक्झिबिटर्स प्रा. लि. यांच्यातर्फे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत माहिती देण्यासाठी झालेल्या पत्रकार परिषदेला संजय न्याहारकर, लक्ष्मीकांत जगताप, अरुण मुळाणे, विजय पाटील, भगवान खैरनार, चंद्रकांत ठक्कर, सतीश पाटील आदी उपस्थित होते.

कृषी क्षेत्राच्या विस्तारासाठी जलसंधारण, कृषी निर्यात, अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान यांसारख्या महत्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव प्रदर्शनात करण्यात येणार आहे. 'ऍग्रो ट्रेड मीडिया' या मासिकाचे प्रकाशनही होणार आहे. शेती उत्पादनात वाढ करण्यासाठी ग्रीन हाउस, पॉली हाउस, फळबाग व्यवस्थापन आणि आधुनिक सिंचन पद्धती, विविध कृषी जोडधंद्याची माहिती कृषी प्रदर्शनातून मिळू शकणार आहे. 'अन्नप्रक्रिया उद्योगातील संधी', 'राज्यस्तरीय नर्सरी उद्योजक परिषद', 'द्राक्ष शेतीतील यांत्रिकीकरण व निर्यातक्षम द्राक्ष व्यवस्थापन', 'देशी व गोवंश संवर्धन व सेंद्रिय दूध निर्मिती' आणि 'डाळिंब शेती मधील यांत्रिकीकरण आणि नवनवीन संधी' या विषयांवर चर्चासत्र आणि परिसंवाद होणार असल्याची माहिती न्याहारकर यांनी दिली.

शेतीत विविध प्रयोग करून शेतीला नवी ओळख निर्माण मिळवून देणाऱ्या कृषी उद्योजक, कृषी संशोधकांना कृषिथॉन सन्मान पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना या प्रदर्शनाचा लाभ घेता यावा याकरीता राज्यभरात दीड लाख शेतकऱ्यांना मोफत पास वाटप केल्याची माहिती आयोजकांनी दिली.

महिला शेतकऱ्यांचा होणार सन्मान

न्याहारकर म्हणाले, की यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कृषिथॉन घेण्यात येत असून जलसंधारणात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील २२ गावांतील प्रतिनिधी आणि सहा संस्थांचा सत्कार केले जाणार आहे. पाणीटंचाईची समस्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येतात याबाबतचा संवादही हे प्रतिनिधी शेतकऱ्यांशी साधतील. शेतामध्ये सर्वाधिक राबणारी महिलाच असते. परंतु, तरीही तिचे काम कायम दुर्लक्षित राहते. मात्र, यंदा प्रथमच आम्ही शेतीमध्ये विविध प्रकारचे उत्पादन घेणाऱ्या २२ महिलांना उत्कृष्ट महिला शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करणार आहोत. यामध्ये जिल्ह्यातील कविता पवार, ज्योत्सना दौंड, मिराबाई जाधव, उषा महाले, वैशाली देसले, सुनिता खालकर, इंदुबाई शेवाळे, लता जाधव, मंगला ढिकले, यशोदा पाटील, शोभा पाटील, रोहिणी निकम, वंदना गवारे, मनीषा जाधव, लिलाबाई भोर यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विंचुरीदळवी येथे शिक्षकाची आत्महत्या

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सिन्नर तालुक्यातील विंचुरीदळवी येथील शिक्षक योगेश विश्राम शेळके (३३) यांनी घरात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भगूर येथे शिक्षक असलेल्या योगेश यांनी नेमक्या कुठल्या कारणास्तव आत्महत्या केली, याचे कारण स्पष्ट झाले नाही. गेल्या सात ते आठ वर्षांपासून ते शिक्षक म्हणून नूतन विद्या मंदिर, देवळाली कॅम्प येथे सेवा बजावत होते. अतिशय हसऱ्या स्वभावाचा व मितभाषी शिक्षक असल्याने त्यांच्या अचानक जाण्याने शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वीच 'शिक्षण सेवक' म्हणून त्यांना जिल्हा परिषदेकडून पत्रही प्राप्त झाले होते. दरम्यान, याप्रकरणी पोलिस कर्मचारी जे. डी. परदेशी अधिक तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड येथे आज वाहतूक मार्गात बदल

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ईद-ए-मिलादनिमित्त नाशिकरोड भागात ज, बुधवारी (दि. २१) मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. या मिरवणूक मार्गात उभारण्यात येणारे स्टेज आणि मिरवणुकीमुळे रहदारीस निर्माण होणारा अडथळा लक्षात घेता वाहतूक विभागाने येथील वाहतूक मार्गात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. वाहतूक मार्गातील बदल सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत लागू असणार आहेत. गोसावीवाडी-सुभाषरोड येथून डॉ. आंबेडकर पुतळा-शिवाजी पुतळा-बिटको चौक-महात्मा गांधीरोडने सत्कार पाइंट-देवळालीगाव पोलिस चौकीसमोरून विहितगाव येथून फिरून पुन्हा देवळालीगावातील गांधी पुतळा-साने गुरुजीरोडने गाडेकर मळा- देवळालीगाव असा मिरवणुकीचा मार्ग राहणार आहे.

--

या मार्गांवरून होणार वाहतूक

देवळाली कॅम्पकडे जाण्यासाठी अनुराधा चौक, आर्टिलरी सेंटररोड ते रोकडोबावाडी पुलावरून विहितगाव, बागुलनगर अशी वाहतूक वळविण्यात आली आहे. सिन्नरकडून येणारी वाहतूक सिन्नर फाटा उड्डाणपुलावरून दत्त मंदिर सिग्नल चौक येथून इतरत्र जाईल. नाशिककडून सिन्नरकडे जाणारी वाहतूक दत्त मंदिर येथून उड्डाणपूलमार्गे होईल. देवळाली कॅम्पकडून नाशिकरोडकडे जाणारी वाहतूक बागुलनगर-विहितगाव-रोकडोबावाडी पूल-आर्टिलरी सेंटररोडने दत्त मंदिराला येऊन इतरत्र जाईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला बेपत्ता

0
0

महिला बेपत्ता

नाशिक : भारती नंदू कुमावत (वय २५) ही महिला भगतसिंग चौक, साईबाबा नगर, सिडको येथून गुरुवारी (दि.१५) पासून बेपत्ता झाली आहे. गुरुवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आधार कार्ड काढण्यासाठी सांगून गेलेली ही महिला अद्याप घरी परतलेली नाही. महिलेचा नवरा नंदू कुमावत यानी दिलेल्या फिर्यादेनुसार अंबड पोलिस स्टेशनमध्ये तक्रारीची नोंद करण्यात आली आहे. नागरिकांना शरीराने मध्यम, उंची ५ फूट, रंग गोरा, अंगात आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेली भारती कुमावत ही महिला आढळून आल्यास अंबड पोलिस स्टेशनमध्ये कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस पाइपलाइन कामाचा उद्या प्रारंभ

0
0

गॅस पाइपलाइन कामाचा उद्या प्रारंभ

नाशिक : देशातील १७४ जिल्ह्यांमध्ये नॅचरल गॅस पाइपलाइनच्या कामाचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २२) होणार आहे. नाशिकमधूनही ही पाइपलाइन जाणार असल्याने रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या कार्यक्रमास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे उपस्थित राहणार आहेत. इंधन आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने देशभर नॅचरल गॅस पुरवठा करण्याची योजना तयार केली आहे. त्यांतर्गत पहिल्या टप्यात देशभरात १७४ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये नाशिकचा समावेश आहे. राज्यात सात जिल्ह्यांत हा पुरवठा केला जाणार आहे.

--

\Bबालहक्कदिनी जनजागृती (फोटो)\B

नाशिक : बालदिन सप्ताहानिमित्त समाजकार्य महाविद्यालय व नवजीवन फाऊंडेशन संचलित चाइल्डलाइन नाशिकतर्फे बालहक्कदिन साजरा करण्यात आला. यावेळी नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात चाइल्डलाइन टीमने भव्य रांगोळी काढून त्याद्वारे बालकांचे हक्क, बेटी बचाओ बेटी पढाओ याविषयी संदेश देऊन रेल्वे परिसरातील मुलांना आपल्या मूलभूत हक्कांविषयी माहिती दिली. त्यांच्यासोबत विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. त्यांना शैक्षणिक साहित्य, खाऊवाटप करण्यात आले.

०००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

\B(((( \Bनाशिक : देशातील १७४ जिल्ह्यांमध्ये नॅचरल गॅस पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते (दि.२२) नोव्हेंबर रोजी होणार आहे. नाशिकमधूनही ही पाईपलाईन जाणार असल्याने रावसाहेब थोरात सभागृहात दुपारी साडेतीन वाजता होणाऱ्या कार्यक्रमास केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे उपस्थित राहणार आहेत.

इंधन आयातीवरील खर्च कमी करण्यासाठी केंद्र सरकारने देशभर नॅचरल गॅस पुरवठा करण्याची योजना तयार केली आहे. त्यांतर्गत पहिल्या टप्यात देशभरात १७४ जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये नाशिकचा समावेश आहे. राज्यात सात जिल्ह्यात हा पुरवठा केला जाणार असून त्याकरीता पाईलपाईन टाकण्यात येणार आहे. घरगुती वापरासाठी नॅचरल गॅस (पीएनजी) व वाहनांसाठी कॉप्रेस्ड गॅस (सीएनजी) सर्वांसाठी पोहचवण्याची ही योजना आहे. नाशिक जिल्ह्यातील शुभारंभाचा कार्यक्रम रावसाहेब थोरात सभागृहात होणार आहे. त्यास डॉ. भामरे उपस्थित राहणार आहेत.

--

\Bबालहक्कदिनी जनजागृती

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालदिन सप्ताहानिमित्त समाजकार्य महाविद्यालय व नवजीवन फाऊंडेशन संचलित चाइल्डलाइन नाशिकतर्फे बालहक्क दिन साजरा करण्यात आला. यावेळी नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात चाईल्ड लाईन टीम यांनी भव्य रांगोळी काढून त्याद्वारे बालकांचे हक्क, बेटी बचाव बेटी पढाओ या विषयी संदेश देऊन रेल्वे परिसरातील मुलांना आपल्या मुलभूत हक्कांविषयी माहिती दिली. त्यांच्यासोबत विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. तसेच मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. तसेच सर्व मुलांना खाऊचे वाटपही करण्यात आले. रेल्वे स्टेशन प्रबंधक ए. के. शर्मा, रेल्वे सुरक्षा बल पोलिस निरीक्षक जे. ए. पठाण, रेल्वे मुख्य वाणिज्य निरीक्षक कुंदन महापात्रा, सहाय्यक उपनिरीक्षक संजय गांगुर्डे यांच्या हस्ते रेल्वे स्टेशन परिसरात चाईल्ड लाईन जनजागृती फलकाचे आणि बालकांचे हक्क या फलकाचे अनावरण करण्यात आले. 'चाईल्डलाईन से दोस्ती' हा उपक्रम यावेळी फ्रेंडशिप बॅण्ड बांधून साजरा करण्यात आला. रेल्वेस्टेशनवरील हमालाचे काम करणाऱ्या व्यक्तींसोबत बालकांच्या हक्काबाबतची मानवी साखळी तयार करुन चाईल्डलाईन जनजागृती पोस्टरद्वारे करण्यात आली. यावेळी पोलिस अधीक्षक (ग्रामीण) यांसह चाईल्ड लाईनची टीम उपस्थित होती.केली))))

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अनिल महाजनांमागे ‘एसीबी’चे शुक्लकाष्ठ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका सेवेतून निवृत्त झालेले अग्निशमन अधिकारी अनिल महाजन यांच्यामागील चौकशांचा ससेमिरा कायम असून आता लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडूनही (एसीबी) त्यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

महाजन यांना देण्यात येणारे वेतन, भत्ते तसेच देयकांसह त्यांच्या कार्यकाळात गाजलेले 'ना हरकत दाखला' प्रकरणाची माहिती विभागाने महापालिकेडून मागवली आहे. त्यामुळे महाजन यांच्या अडचणीत भर पडण्याची शक्यता आहे. महाजन यांच्याशी वितुष्ट असलेल्या काही व्यावसायिकांकडून त्यांची थेट 'एसीबी'कडे तक्रार झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

महापालिकेत कार्यरत असतांना महाजन यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली होती. महाजन हे जुलैमध्ये महापालिका सेवेतून निवृत्त झाले. व्यावसायिकांना अग्निशमन विभागाकडून अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी असल्याने त्यांच्यामागे चौकशीचे शुक्लकाष्ठ लागले होते. अग्निसुरक्षा उपाययोजना करताना संबंधित ना हरकत दाखल्यापासून तर अग्निशमन विभागासाठी उपकरण खरेदी, विशिष्ट एजन्सीकडूनच काम करून घेण्याबाबतचा आग्रह हा त्यांच्या अंगलट आला होता. 'ना हरकत दाखला'बाबतचे परिपत्रक दडवून ठेवल्याप्रकरणी तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महाजन यांना सेवाकाळात एक लाख रुपये दंड ठोठावला होता. निवृत्तीनंतरही महाजन यांची विभागीय चौकशी सध्या प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याची चौकशी सुरू असतांनाच, आता 'एसीबी'ने महापालिकेकडून महाजन यांच्या संदर्भात काही माहिती मागवली आहे. विभागाकडे प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने विभागाने ही चौकशी सुरू केल्याची चर्चा आहे.

व्यावसायिक वादातून तक्रारी

'एसीबी'ने ६ ऑक्टोबर २०१८ रोजी महापालिकेला पत्र पाठवून महाजन यांच्याशी संबंधित वेतन, भत्ते, देयकांसह त्यांच्या मालमत्तेसंदर्भातील विवरणपत्रे मागवली आहेत. २०१४ मधील वादग्रस्त शासन निर्णय दडवण्याचे प्रकार, त्यानंतर वितरित केलेले ना हरकत दाखले आदी विषयी माहिती मागविल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यावसायिक वादातूनच महाजन यांची 'एसीबी'कडे तक्रार झाल्याची चर्चा असून विभागाने मागितलेली माहिती देण्याची तयारी महापालिकेकडून सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


महिला नगरसेविकांचा पिठासनावर ठिय्या

0
0

अंगणवाडी सेविका, मदतनिसांवरून गदारोळ

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने बंद केलेल्या १३६ अंगणवाड्यामंधील सेविका व मदतनीस यांना कामावर घेण्यासंदर्भात महापौरांनी दोन वेळा आदेश देऊनही प्रशासनाने अंमलबजावणी न केल्याने संतप्त झालेल्या सर्वपक्षीय महिला नगरसेवकांनी सोमवारच्या महासभेत रौद्रावतार दाखवला.

सभागृहातील सर्वपक्षीय महिला नगरसेवकांनी महापौरांच्या पिठासनावर जावून ठिय्या आंदोलन केले. अंगणवाडी सेविका व मदतनिसांना पुन्हा कामावर घेण्याची मागणी केली. यावेळी महिला नगरसेवकांनी आयुक्तांसमोर 'दादागिरी नही चलेगी' अशा घोषणा दिल्या. अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचे आदेश महापौरांनी यावेळी प्रशासनाला दिले.

महासभेत मनपा हद्दीतील निराधार, विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांच्या मुलींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य देणे, मुलांना शिष्यवृत्ती देणे, अनाथ मुलांना दत्तक घेतलेल्या पालकांना प्रोत्साहानात्मक अनुदान देण्यासाठी दोन कोटी खर्चाचा प्रस्ताव आला. यापूर्वीच्या बंद केलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे काय, या अंगणवाड्या सुरू होणार ही नाही, असा जाब नगरसेविका प्रियंका माने यांनी मुंढे यांना विचारला. त्यावर मुंढे यांनी कोणतेही उत्तर न दिल्याने संतप्त महिला नगरसेविका अधिकच आक्रमक झाल्या. या महिलांनी आपली जागा सोडून थेट महापौरांच्या पिठासनाकडे धाव घेत पिठासनाचा ताबाच घेतला. थेट पिठासनावर ठिय्या आंदोलन करत आयुक्तांसह महापौरांना घेराव घातला.

यावेळी महिला नगरसेवकांनी 'दादागिरी नही चलेगी' अशा घोषणा दिल्या. वत्सला खैरे, प्रतीभा पवार, समिना मेमन, वर्षा भालेराव, स्वाती भामरे, डॉ. हेमलता पाटील, कल्पना पांडे, सत्यभामा गाडेकर, आशा तडवी, सुषमा पगारे यांनी आताच निर्णय घेण्याची मागणी केली. त्यावेळी मुंढे यांनी नकार देत २० ते २५ पटसंख्येबाबत विचार करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनाची धार अधिक तीव्र झाली. अखेर महापौर भानसी यांनीही आक्रमक होत तीन महिने संधी देण्याचे मान्य करत आदेश दिले. त्यामुळे आक्रमक झालेल्या महिला नगरसेवकांनी पीठासनाचा ताबा सोडला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पदकविजेत्या खेळाडूंना अर्थसहाय्य

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध खेळांमध्ये राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर नाशिकचा नावलौकिक वाढविणाऱ्या पदकविजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना तीन हजार ते एक लाखापर्यंतची आर्थिक मदत देण्याचा निर्णय महासभेने घेतला आहे.

नाशिकच्या क्रीडा क्षेत्राला यामुळे चालना मिळणार असून, महासभेने या महत्त्वाकांक्षी योजनेला मान्यता दिली आहे. महापौर रंजना भानसी यांच्या अध्यक्षतेखाली यासाठी समिती गठित करण्यात येणार आहे. महापालिका क्षेत्रातील विविध खेळाडू राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये उज्ज्वल कामगिरी करून नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवत असतात. परंतु, स्पर्धेतील बक्षीस वगळता या खेळाडूंना प्रोत्साहनरुपात कोणतीही मदत केली जात नाही. कठीण परिस्थितीत खेळाडू परिश्रम करून यश मिळवीत असतात. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून आर्थिक सहाय्य देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून क्रीडा संघटनांकडून होत होती. आयुक्त मुंढे यांनी या मागणीची दखल घेत यासंदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे आदेश क्रीडा विभागाला दिले होते. या प्रस्तावाला सोमवारच्या महासभेत मंजुरी देण्यात आली.

कामगिरीनिहाय मिळणार मदत

या प्रस्तावानुसार आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रीडा प्रकारांत प्रथम येणाऱ्या नाशिकच्या खेळाडूस एक लाख रुपये, तर द्वितीय, तृतीय येणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे ७५ हजार व ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा प्रकारांत पदक मिळविणाऱ्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार, तर राज्य पातळीवरील स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार व ३ हजार रुपयांची रोख आर्थिक मदत दिली जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१२ लाखांचा मद्यसाठा सुरगाणा तालुक्यात जप्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात विक्रीस बंदी असलेल्या दमन, दादरा-नगर हवेली येथील मद्याची तस्करी रोखण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाला यश मिळाले. पथकाने केलेल्या कारवाईत वाहनासह मोठा मद्यसाठा हाती लागला असून, ही कारवाई सुरगाणा तालुक्यातील उंबरठाण बर्डीपाडा मार्गावर करण्यात आली. पथकाची चाहूल लागताच मद्यतस्कर आपले वाहन सोडून पसार झाले. भरारी पथकाने पिकअपसह तब्बल १२ लाखाचा मद्यसाठा जप्त केला.

सुरगाणा तालुक्यातील सिमाभागातून दमन, दादरा नगर हवेली निर्मित मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती विभागीय भरारी पथकास मिळाली. त्यानुसार, उपायुक्त प्रसाद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी सायंकाळी उंबरठाण बर्डीपाडा मार्गावरील वनविभागाच्या चेक नाक्यावर पथकाने नाकाबंदी लावली. भरारी पथकाचे कर्मचारी वाहन तपासणी करीत असतांना चेक नाक्यापासून काही अंतरावरच पिकअपमधील चालकासह काही आरोपी जंगलातून पसार झाले. पथकाने वाहनाजवळ जावून तपासणी केली असता वाहनासह मद्याचे घबाड भरारी पथकाच्या हाती लागले.

बोलेरो पिकअपच्या (एमएच ४८ एजी १७६६) झडतीत वेगवेगळ्या कंपनीच्या मद्याच्या आणि बियरचे बॉक्स असा सुमारे सव्वा सात लाखाचा मद्यसाठा आढळून आला. भरारी पथकाने पाच लाखाच्या पिकअपसह मद्यसाठा असा सुमारे १२ लाख २ हजार ७२ रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मद्यतस्करांचा एक्साईज विभाग शोध घेत असून ते लवकरच हाती लागतील असा विश्वास विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. ही कारवाई निरीक्षक एम. बी. चव्हाण, दुय्यम निरीक्षक डी. एन. पोटे, एस. एस. रावते, जवान कैलास कसबे, अमित गांगुर्डे, दीपक आव्हाड, अमन तडवी, सोनाली चंद्रमोरे, अनिता भांड आदींच्या पथकाने केली. अधिक तपास निरीक्षक चव्हाण करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे भरा, सदस्यत्व मिळवा!

0
0

सावाना कार्यकारिणीचा 'त्या' माजी पदाधिकाऱ्यांना प्रस्ताव

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय अनियमितता प्रकरणातून सभासदत्व रद्द झालेले 'सावाना'चे तत्कालीन कार्यवाह मिलिंद जहागिरदार, अर्थसचिव स्वानंद बेदरकर आणि कायार्ध्यक्षा प्रा. विनया केळकर यांनी चोरडिया अहवालात निश्चित केलेली रक्कम देणगी म्हणून 'सावाना'ला दिल्यास त्यांचे सभासदत्त्व त्यांना परत देऊ, असे आवाहन 'सावाना'चे प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

सावाना, परशुराम साईखेडकर नाट्यगृहाबाहेर पे अॅण्ड पार्क करण्याची माहिती देण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील आवाहन केले. 'सावाना'च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ सभासद श्रीकृष्ण शिरोड यांनी कोर्ट कचेऱ्यांवरील खर्च कमी करा, या केलेल्या सूचनेचे उत्तर देताना 'सावाना'ने शिरोडे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की सभासदत्त्व रद्द केल्याच्या तसेच एकूणच मुद्द्यावर जहागिरदार यांनी आक्षेप नोंदवत हे प्रकरण कोर्टात नेले. त्यामुळे त्यांना उत्तर द्यावे लागणार होते. तरीही 'सावाना'ने अद्याप वकील दिलेला नाही. परंतु आज, त्यांना असे आवाहन करण्यात येत आहे की त्यांच्यावर निश्चित करण्यात आलेली रक्कम त्यांनी वाचनालयाला देणगी म्हणून दिल्यास त्यांना त्यांचे सभासदत्त्व पुन्हा बहाल करण्यात येईल.

मुकुंद बेणींचे सभासदत्त्व रद्द

वाचनालयाचे सभासद मुकुंद बेणी यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत 'सावाना'च्या कर्मचाऱ्यांवर पुस्तक खरेदी प्रकरणी पैसे घेतल्याचा आरोप केला होता. त्यांना याबाबत पुरावे देऊन त्यांचा हा आरोप सिद्ध करण्यासाठी 'सावाना'ने पाचारण केले होते; परंतु मिटिंगमध्ये त्यांना पुरावे सादर न करता आल्याने 'सावाना'ची बदनामी केल्याच्या कारणावरून त्यांचे सभासदत्त्व रद्द केल्याची माहिती प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी दिली.

'ते' ७१ हजार कोण भरणार?

पसा नाट्यगृहाचे व्यवस्थापक दिलीप बोरसे यांच्या निलंबनप्रकरणी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची यादीच पत्रकार परिषदेत देण्यात आली असून कार्यकारी मंडळाची मंजुरी न घेता त्यांनी केबिन बनविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ही केबिन 'पसा'च्या उरलेल्या मटेरियलमधून करण्यात येणार आहे; तसेच सुतारदेखील कामाचे पैसे घेणार नाही, असे सांगण्यात आले होते. मात्र, या आता या केबिनचे ७१ हजार रुपयांचे बिल 'सावाना'ला देण्यात आले आहे. आम्ही हे पैसे भरणार नाही, कारण हे काम आम्हाला विचारून झालेले नाही, असे प्रमुख कार्यवाहांनी सांगितले असून आता हे ७१ हजार कोण भरते याची उत्सुकता वाढली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एअर डेक्कनवर अखेर फुली!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

बेभरवशाची आणि प्रवाशांची छळवणूक करणाऱ्या एअर डेक्कन कंपनीवर अखेर केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने कारवाईचा बडगा उगारला. या सेवेबाबत 'मटा'ने वृत्तमालिकेद्वारे प्रकाश टाकला होता. या कंपनीला दिलेले सर्व हवाई मार्ग मंत्रालयाने रद्द केले आहेत. आता हे मार्ग अन्य कंपनीला दिले जातील.

'उडे देश का आदमी' या घोषवाक्याखाली केंद्र सरकारने उडान योजना गेल्यावर्षी जाहीर केली. त्याअंतर्गत नाशिक-पुणे, नाशिक-मुंबई, जळगाव-पुणे, जळगाव-मुंबई, कोल्हापूर-मुंबई, सोलापूर-मुंबई या मार्गासाठी एअर डेक्कन कंपनीची निवड करण्यात आली. मात्र कंपनीने कुठलीही तयारी नसताना गेल्या डिसेंबरमध्ये सेवेचा श्रीगणेशा केला.

अव्यवसायिक पध्दतीने कंपनीने सेवा दिली. जेथे हवाई सेवा नव्हती. तेथे कंपनीने अत्यंत बेभरवशाची सेवा दिल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड असंतोष होता. तसेच प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. याचीच दखल घेत 'मटा'ने वृत्त मालिकेद्वारे प्रकाश टाकला. राज्य सरकार, खासदार हेमंत गोडसे, धनंजय महाडिक यांनी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे तक्रारी केल्या आणि त्याचा पाठपुरावाही केला. मंत्रालयाने कंपनीला नोटीस देऊन खुलासा मागितला. पण तो असमाधानकारक नसल्याचे दिसून आले. अखेर उडान अंतर्गत दिलेले हवाई मार्ग मंत्रालयाने रद्द केले आहेत. कंपनीला दिलेली सेवा टर्मिनेट केली जात आहे, असे पत्र मंत्रालयाने दिले आहे. त्यामुळे नाशिक, पुणे, कोल्हापूर, जळगाव, मुंबई येथे दिलेले हवाई मार्ग आता दुसऱ्या कंपनीला दिले जाणार होते. त्याची लिलाव प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे.

एअर डेक्कची सेवा अतिशय वाईट होती. मात्र या साऱ्या प्रक्रियेत वर्ष वाया गेले. सरकारची सेवाही बदनाम झाली. पाठपुराव्याने कंपनीवर कारवाई झाली आहे. आता हे मार्ग अन्य कंपनीला मिळावे यासाठी आग्रही असेल. - हेमंत गोडसे, खासदार

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सराईतांवर नजर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी आपला मोर्चा दोन किंवा त्यापेक्षा अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असणाऱ्या सराईत गुन्हेगारांकडे वळविला आहे. सर्वच संशयितांवर तडीपारीची कारवाई करण्यात येते आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईनाका, सरकारवाडा आणि भद्रकाली पोलिस स्टेशन हद्दीतील तिघा सराईतांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून, आणखी ४४ सराईतांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

आगामी निवडणुका शांततेत, निर्भय वातावरणात पार पडाव्यात याकरिता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मंडळींवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यासाठी शहरात कोम्बिंग, ऑलआऊट यासारख्या मोहीमा राबवण्यात येत आहेत. पोलिस स्टेशनतंर्गत पोलिसांनी गुन्हेगारांची लांबलचक जंत्री तयार केली असून, प्राणघातक हल्ला, शरीरिक स्वरुपाचे गंभीर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीस आळा घालण्यासाठी पोलिसांनी हद्दपार कारवाईस प्रारंभ केला आहे. पहिल्या टप्प्यात जय भाऊ दास नेटारे (२१, मिलिंदनगर, तिडके कॉलनी), विशाल उर्फ बग्गा दिपक सौदे (२३, महालक्ष्मी चाळ, भद्रकाली) आणि विजय देवराम कांदळकर (३८, टिळकवाडी, त्र्यंबकरोड) या सराईत गुन्हेगाराच्या तडीपार प्रकरणाची चौकशी उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी पूर्ण केली असून, चौकशीअंती तीनही गुन्हेगारांना प्रत्येकी दोन वर्षांसाठी नाशिक शहर आणि नाशिक ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आले आहे. त्यातील जय नेटारेला तडीपारीचा आदेश बजावण्यात आला असून, तडीपारीच्या काळात तो अहमदनगर येथे राहणार असल्याने त्यास पोलिस पथकाने नगर येथे सोडले आहे. सौदे आणि कांदळकर यांना लवकरच ताब्यात घेऊन त्यांना हवे असेल त्या जिल्ह्यात पोलिस पथकांमार्फत सोडण्यात येणार आहे. आतापर्यंत परिमंडळ एक म्हणजे मुंबई नाका, गंगापूर, सरकारवाडा, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली आणि आडगाव या पोलिस स्टेशन हद्दीतील ८५ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून, ४४ सराईत गुन्हेगारांच्या तडीपार प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि राजकीय नेत्यांचा वरदहस्त असलेल्या संशयितांचा समावेश आहे.

वर्ष प्रस्ताव सादर तडीपार प्रलंबीत इतर

२०१७ ७२ ४० ५ २७

२०१८ ५४ ५ ४४ १०

प्रतिबंधक कारवाई सातत्याने सुरू असते. आता गती देण्यात येते आहे. तडीपारीनंतर शहरात वास्तव्यास असलेल्या व्यक्ती सापडल्यातर त्यांच्याविरुध्द आणखी कडक कारवाई करण्यात येणार आहे.

- लक्ष्मीकांत पाटील, पोलिस उपायुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारवाईच्या धडाक्याने रस्त्यांवरून रिक्षा गायब

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर पोलिसांनी मंगळवारी दुपारी अचानक कारवाई सुरू करीत बेशिस्त रिक्षाचालकांना दणका दिला. पोलिसांनी सकाळच्या ऐवजी दुपारी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारल्याने रिक्षाचालकांची भंबेरी उडाली. पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी अनेक रिक्षाचालकांनी व्यवसाय बंद ठेवला. त्यामुळे अनेक रस्त्यांवरून रिक्षा गायब झाल्याचे दिसून आले.

शहरभरात रिक्षांची संख्या रोडावल्याने प्रवाशांचे हाल झाले. अनेक ठिकाणी दुप्पट भाडे आकरण्याचे प्रकार घडले. शहर पोलिसांनी सोमवारी रिक्षाचालकांवर धडक कारवाई केली होती. त्यामुळे मंगळवारी सकाळी ही कारवाई होईल, असे अपेक्षित असताना पोलिसांनी ही वेळ टळू दिली. मात्र, दुपारच्या सुमारास अचानक पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला. शालिमार, द्वारका, सीबीएस, नाशिकरोड अशी रिक्षाचालकांची मक्तेदारी असलेल्या भागात पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यामुळे रिक्षाचालकांची एकच दैना उडाली. कुठे कागदपत्रे नाहीत, तर कुठे फ्रंट सीट वाहतूक करणारे रिक्षाचालक पोलिसांच्या हाती लागले. सर्व पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक, जवळपास २५० पोलिस कर्मचारी, वाहतूक विभागाचे १० अधिकारी व २२५ वाहतूक पोलिसांनी या मोहिमेत सहभागी होऊन एक हजार १७२ रिक्षाचालकांवर कारवाई केली. त्यातून दोन लाख ३४ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. रिक्षा, तसेच हेल्मेट आणि सीट बेल्टबाबत कारवाई सातत्याने सुरू राहणार असून, सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर पोलिसांनी केले आहे.

--

सर्वसामान्यांची मात्र पंचाईत

पोलिसांची कारवाई सुरू होताच बहुसंख्य रस्त्यांवरील रिक्षा गायब झाल्या होत्या. पोलिसांच्या कारवाईला तोंड देण्यापेक्षा शेकडो रिक्षाचालकांनी घराकडे कूच केले. त्यामुळे दुपारच्या सुमारास रस्त्यांवर तुरळक रिक्षा धावल्यात्त्याचा फटका प्रवाशांनादेखील बसला. सीबीएस येथून सिडकोत जाण्यासाठी रिक्षाचालकांनी प्रतिप्रवासी ३० रुपये घेतले. बेशिस्त रिक्षाचालकांवर मोठ्या पोलिसी कारवाईमुळे उद्भवलेल्या या स्थितीमुळे सर्वसामान्यांची मात्र पंचाईत झाल्याचे चित्र दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शिक्षेच्या भीतीने चिमुकलीसह पित्याची आत्महत्या

0
0

पित्याची मुलीसह आत्महत्या

पत्नीच्या मूत्यूचा आरोप, मुर्री येथील घटना

म. टा. वृत्तसेवा, गोंदिया

पत्नीच्या मृत्यू प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान शिक्षेस पात्र ठरणार, या भीतीपोटी सोमवारी रात्री तीन वर्षीय चिमुकलीला विष पाजून पित्याने आत्महत्या केली. दोघे बापलेक झोपेतून जागे झाले नसल्याने ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. योगेश देवराव वंजारी (वय ३२), अलीन्न्या योगेश वंजारी (वय ३ ) असे मृत्यू झालेल्या बापलेकीचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.

स्थानिक श्रीनगर मुर्री चौकी येथील योगेश देवराव वंजारी यांच्या पत्नीचा विष प्राशन केल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणी आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या आरोपाखाली गोंदिया शहर पोलिस ठाण्यात योगेश वंजारीविरूद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना २१ नोव्हेंबरला सुनावणी होती. मुर्री चौक येथे राहणाऱ्या योगेशच्या पत्नीने मार्च २०१८ मध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या आत्महत्येला योगेश जबाबदार असल्याचा ठपका ठेवण्यात आला व त्याच्यावर गुन्हा दाखल करून प्रकरण न्यायप्रविष्ठ करण्यात आले. तत्पूर्वी योगेश व त्याची मुलगी अलीन्न्या हे सोबत राहायचे. न्यायालयाचे निर्णय अंगलट येण्याची शक्यता योगेशला झाली असावी व याच विवंचनेत त्याने १९ नोव्हेंबरच्या रात्री दरम्यान अलीन्न्याला विष पाजून स्वत:ही प्राशन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नात्यांचा विणलेला गोफ ‘ऋतू आठवणींचे’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाते हे गुंफलेले असते, ते कितीही उलगडण्याचा प्रयत्न केला तरी शेवटपर्यंत त्याचे मर्म कळत नाही, अशा नात्यांच्या आठवणी 'ऋतू आठवणींचे' नाटकातून उजळवण्यात आल्या.

५८ व्या राज्य नाट्य स्पर्धेत मंगळवारी कलाकुंभ बहुद्देशीय संस्थेच्या (फिल्मी कट्टा) वतीने 'ऋतू आठवणींचे' हे नाटक सादर करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात झालेल्या या नाटकाचे लेखन पराग घोंगे यांनी तर दिग्दर्शन हेमंत गव्हाणे यांनी केले होते. पती-पत्नी, आई व प्रेयसी अशा चार पात्रांभोवती हे नाटक फिरते. प्रेयसीसाठी पती पत्नीला घटस्फोट देण्याची प्रक्रिया सुरू करतो. या दरम्यान हे चौघे जण एकमेकांना भेटत राहतात. या भेटीत त्यांना समोरची व्यक्ती तिच्या जागी कशी योग्य आहे, याची जाणीव होते. मात्र, तरी घटस्फोट होतो आणि आठवणींच्या कोलाजातून प्रत्येकाला घुसमट सहन करावी लागते, अशी नाटकाची कथा होती.

या नाटकात महेश खैरनार, निशिगंधा घाणेकर, गायत्री पवार, मयूरी विसपुते यांनी भूमिका साकारल्या. नेपथ्य राजेश भालेराव, संगीत वेदांत हातवळणे, प्रकाशयोजना रवी रहाणे, रंगभूषा ललित कुलकर्णी यांची होती. मनोज नागपुरे, राजा पाटेकर, अरुण गिते, रफीक सय्यद, राजेश जाधव, संध्या दुबे, ज्ञानेश्‍वर वाघ, अमोल थोरात यांनी निर्मिती सूत्रधाराची जबाबदारी सांभाळली.

आजचे नाटक

लोकहितवादी मंडळाचे 'कळसुत्री'

स्थळ : परशुराम साईखेडकर नाटगयृह

वेळ : सायंकाळी ७ वाजता

लोगो : राज्य नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वयमच्या सृजनशीलतेचा गौरव

0
0

केंद्र सरकारचा पुरस्कार; राष्ट्रपतींच्या हस्ते होणार सन्मान

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

डाउन सिंड्रोम आजारावर मात करीत नाशिकच्या स्वयंम पाटील या जलतरणपटूने राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घातली आाहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारीता मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा सृजनशील बालकाचा पुरस्कार त्यास जाहीर झाला आहे. हा पुरस्कार ३ डिसेंबर रोजी राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

स्वयंमने डाउन सिंड्रोमवर मात करीत अनेक स्पर्धा जिंकल्या असून प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने समुद्रीय जलतरण स्पर्धेतही यश मिळवले आहे. मुंबई सागरातील संकरॉक ते गेटवे ऑफ इंडिया हे पाच किलोमीटरचे अंतर त्याने अवघ्या एक तासात पूर्ण केले. याबद्दल त्याची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरला आहे. कर्नाटकमधील उडपी येथे ३० डिसेंबर २०१७ रोजी झालेल्या स्पर्धेत १ किलोमीटर अंतर पोहून गेल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार झाला होता. तसेच ७ जानेवारी रोजी गुजरात येथील पोरबंदर येथील स्पर्धेत त्याने दोन किलोमीटर पोहून सागरी अंतर यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. सायकल स्पर्धेतही त्याने यश मिळविले आहे.

रोज चार तासांचा सराव

स्वयंम हा रोज चार तास स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावात सराव करतो. स्वयंमने आतापर्यंत कर्नाटक, गुजरात, गोवा, मालवण अशा राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत चुणूक दाखवली आहे. त्याने १० सुवर्ण, १ रौप्य व ८ कांस्य पदके मिळविली आहेत. थायलंड येथील पुकेत येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिन स्विमिंग प्रकारात त्याने ५० मीटर व १०० मीटर प्रकारात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या स्पर्धेत सहभाग घेणारा स्वयंम हा सर्वात कमी वयाचा खेळाडू होता. स्वयमला सध्या स्पीच थेरपीद्वारे बोलावे लागते. कान, नाक, घसा आजारासाठी त्याच्यावर आतापर्यंत तीन शस्त्रक्रीया झाल्या आहेत.

…पस्तीस वर्षांपासून दिव्यांग जलतरणपटूंना प्रशिक्षण देण्याचे काम करतोय. आतापर्यंत माझ्याकडून प्रशिक्षण घेतलेल्या पहिल्याच जलतरणपटूला हा पुरस्कार मिळाल्याने आनंद होत आहे. स्वयम आंतरराष्ट्रीय स्तरावरही चांगली कामगिरी करेल.

- हरी सोनकांबळे, प्रशिक्षक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट रोडवर आता एकेरी वाहतूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या अशोक स्तंभ ते त्र्यंबक नाका या रस्त्याच्या कामामुळे या मार्गाच्या अर्ध्या भागातून दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मात्र, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते़ या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम होईपर्यंत त्र्यंबक नाका सिग्नल बाजूकडून अशोक स्तंभाकडे जाणाऱ्या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात येत आहे़

या वाहतूक बदलामुळे वाहनधारकांना त्र्यंबक नाक्यापासून अशोक स्तंभाकडे येता येईल. मात्र, अशोक स्तंभाकडून त्र्यंबक नाक्याकडे जाता येणार नाही. स्मार्टरोडचे काम सुरू असल्याने त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ व त्र्यंबक नाका ते किटकॅट कॉर्नर परिसरात नो हॉल्टिंग, नो पार्किंग झोन कार्यरत करण्यात आले आहेत़ या नियमांचे पालन केले नाही तर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

--

वाहनधारकांसाठी पर्यायी मार्ग

--

पंचवटीकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी

या वाहनांना सीबीएसकडे जायचे असल्यास त्यांनी रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-शालिमार-शिवाजीरोड-सीबीएस या मार्गाचा अवंलब करावा. त्र्यंबक नाका-सातपूरकडे जायचे असल्यास शालिमार-खडकाळी सिग्नल-जिल्हा परिषदमार्गे त्र्यंबक नाका या मार्गाचा वापर करावा.

--

गंगापूररोड-रामवाडी पुलाकडून येणारी वाहतूक

सर्व प्रकाराच्या वाहनांना मेहेर सिग्नल-सीबीएस-त्र्यंबकनाकाकडे जायचे असल्यास त्यांनी अशोकस्तंभ-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-मेहेर सिग्नल- अशोकस्तंभ-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-शालिमार-शिवाजीरोड-सीबीएस-

अशोकस्तंभ-रविवार कारंजा-सांगली बँक सिग्नल-शालिमार-खडकाळी सिग्नल-जिल्हा परिषद-त्र्यंबक नाका-सातपूर या मार्गांचा किंवा गंगापूर नाका-कॅनडा कॉर्नर-टिळकवाडीमार्गे सीबीएस या मार्गाचा वापर करावा.

--

मुंबई नाक्याकडून पंचवटीकडे येताना

मुंबई नाका-वडाळा नाका-द्वारका-आडगाव नाका-काट्या मारुती-निमाणी

--

सिडको व सातपूरकडून पंचवटीकडे येताना

मायको सर्कल-जुना सीटीबी सिग्नल-एचडीएफसी सर्कल-कॅनडा कॉर्नर-जुना गंगापूर नाका-रामवाडी किंवा ड्रीम कॅसलमार्गे पंचवटीकडे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुसऱ्या दिवशी १४८ अर्जांचे वितरण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक मर्चंट बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज वितरण आणि अर्ज स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंगळवारी १४८ नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाले. दोन दिवसांत एकूण ३२२ अर्जांचे वितरण झाले आहे. दोन दिवसांत १३० जणांनी हे अर्ज नेले असून मंगळवारी एक उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.

नामको बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज वितरणास सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अर्जासाठी कोणतेही शुल्क न ठेवत बँकेने सभासदांना दिलासा दिला आहे. पहिल्याच दिवशी ७४ सभासद १७४ अर्ज घेऊन गेले. तर मंगळवारी (दि. २०) दुसऱ्या दिवशी देखील ५६ व्यक्ती १४८ अर्ज घेऊन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये सुरेश पाटील, आकाश छाजेड, प्रशांत दिवे, सोहनलाल भंडारी, राहुल दिवे, नरेंद्र पवार, विजय साने, ईश्वरलाल बोथरा आदी इच्छुक अर्ज घेऊन गेले.

निवडणूक रंग : नामको बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images