Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जोड : प्रेमानंद गज्वी

0
0

लेखनप्रवासाचा हा सन्मान

समाजातील शोषित, पीडित माणसांवर परखडपणे भाष्य करणारा हा नाटककार आहे, तो एका जातीवर्गावर बोलत नाही. समाजातील तळागाळातील वर्गाचे वास्तव हा नाटककार मांडतो. सध्याच्या काळात ही निवड होणे ही आनंदाची बाब आहे, खूपच सकारात्मक आहे. जे बघितले, भोगले ते वास्तव मांडले आहे. त्यांनी आपला लेखनप्रवास सोडलेला नाही. त्याबाबतीत त्यांचे वेगळेपण जाणवते. पोटतिडकीने व उद्देशाने हा लेखनप्रवास चालू ठेवलेला आहे. त्या प्रवासाचा हा सन्मान आहे.

प्रवीण काळोखे, ज्येष्ठ रंगकर्मी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


बोअरवेलमुळे जलसंवर्धन धोक्यात

0
0

आमदार बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

..

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

यंदा उद्भवलेल्या दुष्काळजन्य परिस्थितीमुळे शेती व्यवसायाला पुरक पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. जलसंवर्धनाचे अल्प प्रमाण असल्याने शेतीसाठी पाणी उपलब्ध करणे अधिक कठीण होणार आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंवर्धन प्रभावी पर्याय असतो. पण, बोअरवेलमुळे जलसंवर्धन धोक्यात येत आहेत. बोअरवेलचा वापर वाढल्याने जलसंवर्धन करणे शक्य होत नाही. बोअरवेलचा वापर कमी करत जलसंवर्धानाकडे भर द्यावा, असे प्रतिपादन आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.

ठक्कर डोम येथे आयोजित कृषिथॉन २०१८ प्रदर्शनात शनिवारी (दि .२४) आदर्श जलसंवर्धन पुरस्कार वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार बाळासाहेब थोरात, आमदार हेमंत टकले, कृषी जलसंधारण व रोजगार हमी योजनेचे सचिव एकनाथ डवले यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात वहागाव, हसनाबाद, पिंपरखेड, दिपेवडगाव, खटाव, लिंगनूर, निढळ, कळगाव, नवानगर, वाघळी, वडगाव, लंगडी भवानी, वाठवाडा, पुणतांबा, गोहरण, बोराडी, नवीन बोराडी या गावांनी जलसंवर्धनात योगदान दिल्याने ग्रामस्थांना गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटी-कंटेनर धडकेत २४ जखमी

0
0

दसेगाव फाट्यावरील घटना

म. टा. वृत्तसेवा, चाळीसगाव

भरधाव एसटी व कंटेनरची समोरासमोर धडक झाल्याने बसच्या चालकासह बसमधील २४ प्रवासी जखमी झाले. धुळे रस्त्यावरील दसेगाव फाट्याजवळ शनिवारी (दि. २४) दुपारी २.३० वाजता हा अपघात झाला. जखमींमध्ये तीन महिलांसह तीन बालकांचा समावेश आहे.

दसेगाव फाट्याजवळ विनावाहक असलेली धुळे औरंगाबाद बस (एम.एच. २० बी.एल. २५९९) ही दुपारी औरंगाबादकडे निघाली होती. चालक एस. एस. सय्यद चालवत या बसमध्ये एकूण ४५ प्रवासी होते. दुपारी अडीच वाजता धुळे-सोलापूर महामार्ग क्र. २११ वरील मेहुणबारेजवळच्या दसेगाव फाट्याजवळ ही बस पोहचली असता बस आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची (एन.एल. ०१ क्यू. ४१३६) धडक झाली. हा कंटेनर होपूर (तमिळनाडू) कडून हिम्मतनगर (गुजराथ) कडे निघाला होता. या धडकेत बसमधील प्रवाशांना चेहऱ्याला, हाताला व पायाला मार लागला असून, जखमी प्रवासी हे प्रामुख्याने बीड, औरंगाबाद, धुळे व शिरपूर येथील आहेत. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव, मेहुणबारे व शिरसगाव येथील १०८ रुग्णवाहिकेने घटनास्थळी धाव घेत जखमींना चाळीसगाव व मेहुणबारे येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले.

बस चालकाविरोधात गुन्हा
या प्रकरणी एसटीतील प्रवासी प्रमोद सुधाकर देवरे यांनी मेहुणबारे पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून बसचे चालक एस. एस. सय्यद यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. एसटीचा चालक बस सरळ रस्त्यावर नागमोडी पद्धतीने भरधाव चालवत होता. बसच्या पुढे चालणाऱ्या ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात त्यांचे बसवरील नियत्रंण सुटल्याने समोरून येणाऱ्या कंटेनरला जबर धडक दिली, असे तक्रारीत म्हटले आहे.

टेम्पोचा अपघातात एक ठार
चाळीसगाव : तमाशाचा कार्यक्रम आटोपून शहादाकडे जाणाऱ्या तमाशा कलावंतांचा टेम्पो उलटला. यात टेम्पोतील एकाचा जागीच मृत्यू तर अन्य दोन जण जखमी झाले. शनिवारी (दि. २४) सकाळी धुळे रस्त्यावरील चिंचगव्हाण फाट्याजवळ ही घटना घडली. किशोर रतन कोल्हे (रा. बोरगाव, जि. बुलढाणा) असे मृत तमाशा कलावंताचे नाव आहे. तालुक्यातील शिरसगाव येथे तमाशाचा कार्यक्रम आटोपून टेम्पो (एम. एच. १७ बी.डी. १११५) शहादा तालुक्यातील जावदा येथे निघाला होता. यामध्ये चालक अंबादास बाबुराव सदावर्ते, नुराभाई शेख व दादा आचारी हे तिघे जखमी झाले. याप्रकरणी टेम्पो चालकाविरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बस-ट्रकची धडक
जळगाव : बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची घटना पारोळा ते जळगाव महामार्गावर कन्हेरी फाट्याजवळ शनिवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. या अपघातात १० प्रवाशांसह ट्रकचालक जखमी झाला आहे. जळगावकडून धुळ्याच्या दिशेने जाणारी बस आणि धुळ्याकडून जळगावकडे येणाऱ्या ट्रकची कन्हेरी फाट्याजवळ समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही वाहनांचा समोरचा भाग चक्काचूर झाला. बस व ट्रकच्या चालकांनाही जबर मार लागला असून, बसमधील १० प्रवासी जखमी झाले आहेत. सर्व जखमींना पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या अपघाताची माहिती मिळताच पारोळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. हा अपघात झाला तेव्हा आमदार डॉ. सतीश पाटील हे महामार्गावरून जात होते. त्यांनी घटनास्थळी थांबून जखमींना मदत केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मनपा निवडणुकीत आरोपांची ‘फोडणी’

0
0

धुळ्यात मंत्री डॉ. भामरे, आमदार गोटेंची आगपाखड

म. टा. वृत्तसेवा, धुळे

महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, उद्या (दि. २६) माघारीअंती निवडणूक रिंगणातील उमेदवार निश्चित होऊन सर्वच लढती स्पष्ट होतील. यात मंत्री डॉ. भामरे विरुद्ध आमदार गोटे यांच्या प्रतिष्ठेची टक्कर आहे.

दररोज नवनवीन आरोपांची फोडणी सुरू झाली असून, यात डॉ. भामरे आणि आमदार गोटे यांनी माध्यमांवर आगपाखड केली आहे. यामुळे माध्यमांमध्ये दोन्हींविषयी कुठेतरी नाराजी व्यक्त केली जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांच्या बरोबरीला निवडणूक रिंगणात आपल्या उमेदवारांना घेवून प्रचारासाठी सतर्क झाले आहेत.

शहरात महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून, भाजपविरुद्ध स्वाभिमानी भाजप अशी लढत होत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनादेखील आपले शक्तिप्रदर्शन दाखविण्यासाठी मैदानात उतरले आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपकडून केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी निवडणूक प्रचाराचा नारळ दोन दिवसांपूर्वी फोडला. त्यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना, माझ्यावर ज्यावेळी आरोप-प्रत्यारोप केले जातात त्यावेळी माध्यम मोठी प्रसिद्धी देतात मग आता झोपलेले आहेत का? तर दुसरीकडे आमदार गोटेंनी माध्यम दलाल असल्याचे म्हटले आहे. असे प्रकार होत असतानादेखील या दोन्ही नेत्यांना माध्यमांनी वेळोवेळी योग्य प्रसिद्धी दिली. मात्र, तरीदेखील दोघांचा रोष माध्यमांवरच आहे. आमदार गोटेंना अपेक्षित आहे की, शब्द न शब्द छापून यावा, आणि डॉ. भामरेंना अपेक्षित आहे की, त्यांच्या विरोधात काहीही येऊ नये. मात्र, हे माध्यमांकडून होवू शकत नाही. कारण निवडणुकीच्या काळात जो कोणी त्याची भूमिका मांडेल ती भूमिका मांडणे माध्यमांचे काम आहे. असे असताना दोन्ही नेत्यांची त्यांना अपेक्षित असलेले माध्यमांनी प्रसिद्धी देणे हे लोकशाहीमध्ये करणे चुकीचे आहे. तसेच हे दोन्ही नेत्यांना सत्तेत आल्यापासून याचा विसर पडली असावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोककला ही इंटरनेटहून प्रभावी: चंदनशिवे

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आपली संस्कृती 'आयटम साँग'ची नसून लोकगीतांची आहे. जेथे ऑनलाइन नेटवर्क अजून पोहोचत नाही तेथेसुद्धा ही लोककला आहे. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणात आपल्या मातीतील या लोककला, लोकसंस्कृती, मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात वंचितांपर्यंत पोहोचलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन सुप्रसिद्ध लोकगीत गायक तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे यांनी येथे केले.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दोन दिवसीय केंद्रीय युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास वसाहतीतील 'नॅब‌‍'च्या इमारतीत आयोजित या महोत्सवाच्या उद्घाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे होते. व्यासपीठावर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राच्या संचालिका प्रा. डॉ. विजया पाटील, विद्यापीठाचे वित्त समिती सदस्य डॉ. संजय खडक्कर, नाशिक विभागीय संचालक प्रा. डॉ. धनंजय माने, 'नॅब‌‍चे' सचिव गोपी मयूर, सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्राचे सहाय्यक कुलसचिव चंद्रकांत पवार उपस्थित होते.

प्रा. डॉ. चंदनशिवे म्हणाले, की शिक्षण हे जसे प्रगतीचे कारण आहे, तशीच जगण्याची ताकद लोककलेत आहे. गेल्या कित्येक शतकांपासून एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित होत जाणाऱ्या या लोककलेचे कालौघात जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. यावेळी त्यांनी काही गीते सादर केली. 'बाजीराव मस्तानी' या गाजलेल्या चित्रपटातील त्यांनी गायिलेले 'नभातुनी आली अप्सरा', तसेच 'माझी मैना गावावर राहिली' ही गाणी सदर करून त्यांनी युवा महोत्सवात रंग भरला. अध्यक्षीय भाषणात विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भोंडे यांनी आगामी काळात विद्यापीठात 'नाट्य व लोककला' विद्याशाखा सुरू करण्याचे सूतोवाच केले. दिवसेंदिवस दूरस्थ शिक्षण पद्धतीचे महत्त्व वाढत असून, आगामी काळात विविध शिक्षण पद्धती व त्यांचे मूल्यांकन यात मोठ्या प्रमाणात बदल होईल, असेही ते म्हणाले. गोपी मयूर यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने नॅब‌‍च्या सहकार्याने डी. एड. कॉलेज सुरू केल्यामुळे अंध व अपंग व्यक्तींच्या शिक्षणाची मोठी सोय झाली असल्याचे गौरवोद्गार काढले. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण व बहि:शाल केंद्राच्या संचालिका प्रा. डॉ. विजया पाटील व विद्यापीठाचे वित्त समिती सदस्य डॉ. संजय खडक्कर यांचीही भाषणे झाली. नाशिक विभागीय संचालक प्रा. डॉ. धनंजय माने यांनी प्रास्ताविक केले. श्याम पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. विद्यापीठाच्या नाशिक विभागीय केंद्राचे सहाय्यक कुलसचिव चंद्रकांत पवार यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाच्या विविध विभागीय केंद्रांचे अधिकारी-पदाधिकारी, विविध लोककलांचे तज्ज्ञ परीक्षक, विद्यार्थी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

आज पारितोषिक वितरण

शनिवारपासून दोन दिवस चालणाऱ्या या केंद्रीय युवक महोत्सवात विद्यापीठाच्या विविध विभागीय केंद्रांवरील साधारण दोनशेहून अधिक विद्यार्थी विविध लोककला व गुणदर्शन प्रकारांत सहभागी झालेले आहेत. त्यात प्रामुख्याने एकांकिका, नाटिका, मूकाभिनय, नकला, शास्त्रीय, समूह, सुगम व पाश्चात्य गायन, हार्मोनियम, तबला, पखवाजवादन, फोक ऑर्केस्ट्रा, समूह व शास्त्रीय नृत्य, काव्यवाचन, वक्तृत्व, वादविवाद व प्रश्नमंजूषा, रांगोळी, पेंटिंग, पोस्टर मेकिंग, कोलाज, कार्टून, स्पॉट फोटोग्राफी आदी स्पर्धा शनिवारी रंगल्या. आज, रविवारी (दि. २५) या स्पर्धांचा बक्षीस समारंभ होऊन महोत्सवाचा समारोप होईल. या स्पर्धांत विजयी ठरणाऱ्या विद्यार्थी कलाकारांची इंद्रधनुष्य-२०१८ या आंतरविद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वागत कमानीस मुहूर्त केव्हा?

0
0

सातपूरवासीयांची उपेक्षा; लोकप्रतिनिधींच्या मागणीकडे मनपाचे दुर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

औद्योगिक वसाहतीला हजारो एकर शेतजमीन देणाऱ्या सातपूरकरांना आजही महापालिकेकडून सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून ताटकळत पडलेल्या स्वागत कमानीला मुहूर्त केव्हा लागेल, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

सातपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून यासाठी सतत पाठपुरावा केला जात आहे. मात्र, त्याकडे महापालिका प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. याबाबत परिसरातील नगरसेवकांसह नागरिकांनी अनेकवेळा सांगूनही मनपादरबारी सातपूरवासीयांची उपेक्षाच होत आहे. त्यामुळे सातपूर गावाच्या स्वागत कमानीला मुहूर्त लावून हे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

मूलभूत सुविधा नाहीच

औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाल्यावर सातपूर व अंबड गावातील शेतकऱ्यांनी हजारो एकर शेतजमिनी कारखान्यांसाठी दिल्या होत्या. शेतकऱ्यांनी दिलेल्या शेतजमिनींवर आज हजारो कारखाने उभे राहिले आहेत. सर्वसाधारण कर प्रणाली (जीएसटी) लागू होण्याअगोदर कारखान्यांकडूनच मोठा कर महापालिकेला मिळत होता. परंतु, त्याच सातपूर व अंबड गावाला महापालिकेकडून आजही सुविधा पुरविल्या जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

निधीअभावी रखडले काम?

काही वर्षांपूर्वी सातपूर गावाची स्वागत कमान वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने कोडमडली होती. यानंतर महापालिकेच्या सातपूर विभागाचे माजी सभापती तथा नगरसेवक सचिन भोर यांनी कमानीचे काम हाती घेण्याची मागणी केली होती. माजी नगरसेविका उषा शेळके यांनीदेखील सातपूरला नवीन स्वागत कमान उभारण्यात यावी यासाठी ठरावही केला होता. परंतु, याकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सातपूर गावाच्या स्वागत कमानीची आजही प्रतीक्षाच लागून आहे. दरम्यान प्रभाग क्रमांक ११ च्या नगरसेविका सीमा निगळ यांनी स्वागत कमानीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी महापालिकेकडे केली होती. परंतु, निधीअभावी स्वागत कमानीचे काम रखडले असल्याचे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे या कामासाठी निधी उपलब्ध करीत कमान लवकरात लवकर उभारून सातपूरकरांची प्रतीक्षा दूर करण्याची मागणी केली जात आहे.

कारखान्यांसाठी हजारो एकर शेतजमिनी देणाऱ्या सातपूर गावाला गेल्या कित्येक दिवसांपासून स्वागत कमानीची प्रतीक्षा लागून आहे. याबाबत महापालिका व नगरसेवकांनी पाठपुरावा करून स्वागत कमान उभारायला हवी.

- अनिल मौले, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी प्रश्नात राजकारण नको

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

'पाणी हा आता कळीचा मुद्दा झाला असून, पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी पाणी प्रश्नात राजकारण व पक्षीय मतभेद नकोत. शेतकरी बांधवानी कमी पाण्यात होणाऱ्या शेतीची आधुनिक तंत्रे शिकावी.' असे प्रतिपादन माजी उपमुख्यमंत्री व आमदार छगन भुजबळ यांनी कृषिथॉनमध्ये केले.

कृषिथॉन २०१८ प्रदर्शनाच्या चौथ्या दिवशी सकाळी 'महिला शेतकरी सन्मान सोहळा' आयोजित करण्यात आला. यावेळी भुजबळ बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, जि.प.सदस्या अमृता पवार ,माजी खासदार देविदास पिंगळे, नाडाचे अध्यक्ष विजूनाना पाटील तसेच संयोजन समिती अध्यक्ष खा. हरिशचंद्र चव्हाण उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत संयोजक संजय न्याहारकर यांनी व संचालिका अश्विनी न्याहारकर यांनी केले.

भुजबळ म्हणाले,'शेतीमध्ये ७५ टक्के महिलांचे योगदान असले तरी त्यांच्या नावावर शेतीचा हिस्सा फक्त १२ टक्के आहे. शेतीत महिला राबतात. जगातील प्रगतशील देशांमध्ये राष्ट्रीय उत्पन्नात ४० टक्के वाटा महिलांचा असतो. भारतात तो फक्त १७ टक्के आहे, असेही ते म्हणाले.

हरितक्रांती होऊनही आत्महत्या

भुजबळ म्हणाले, 'शेतमालाला दीडपट हमीभावाची घोषणा झाली. मात्र त्यामध्ये शेतकऱ्यांच्या व त्याच्या परिवाराच्या कष्टांचा विचार होत नाही. देशात हरितक्रांती होऊनही शेतकरी आत्महत्या का होतात? याचा विचार व्हायला हवा. शेती खर्चिक झाली असून, जीएसटीचा बोजा वाढला आहे.'

तापीचे पाणी गुजरातला

'तापी खोऱ्यातील पाणी आपण अडवू शकत नसल्याने गुजरातला जाते. मांजरपाडा प्रकल्प पूर्ण होत आला आहे. त्याचा लाभ शेतकऱ्यांना होईल,' असे सांगून ते पुढे म्हणाले, शेतीतील प्रगतीसाठी अनेक मार्ग आहेत. योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी मार्गदर्शनाचा उपयोग करून घ्यावा.'

समुद्राचे पाणी शुद्ध करा

खा. हरिशचंद्र चव्हाण म्हणाले,'नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी मुंबईला देण्यापेक्षा समुद्राचे पाणी शुद्ध करून मुंबईकरांना द्यावे. ही काळाची गरज असून, हे अशक्य नाही. त्यामुळे पाण्यावरून होणारा संघर्ष कमी होईल.'

हेल्मेटबाबत जनजागृती

नागरिकांमध्ये वाहतूक शिस्त यावी व हेल्मेट वापराबाबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने कृषिथॉन प्रदर्शनात विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गंगापूर पोलिस ठाण्यातर्फे घेण्यात आलेल्या या उपक्रमाचे उद्घाटन पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांशी, नागरिकांशी संवाद साधला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरवलेली परप्रांतीय महिला सुखरुप परतली

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

मायेचा ओलावा असलेली माणसे जात, प्रांत, वय यापलिकडे जाऊन माणुसकीच्या भावनेतून मदतीचा हात पुढे करीत गरजूंना उभे करण्यासाठी प्रयत्न करतात. याचाच अनुभव बिहारसारख्या परप्रांतातून चुकून सातपूर परिसरात आलेल्या वृद्ध महिलेला आला. सुखरुपपणे मूळ गावी पाठविल्याने तिने भरभरून आशीर्वाद देत कृतज्ञता व्यक्त केली.

त्र्यंबकेश्वर रोडवरील सातपूर परिसरात गेल्या आठवड्यात रस्ता चुकलेली एक वृद्ध महिला पपया नर्सरीलगतच्या रस्त्यावर बसलेली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रवींद्र देवरे यांनी मिळाली. त्यांनी दिलासा देत तिची आस्थेने विचारपूस केली. सुमादेवी असे तिचे नाव असल्याचे त्या बिहारमधील छपरा जिल्ह्यातील असल्याचे त्यांना समजले. कोलकाता एक्स्प्रेसने त्या आपल्या कुटुंबीयांसह मुंबईकडे जात होती. मात्र, नजर कमजोर झालेल्या सुमादेवी नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर उतरल्या. त्या स्टेशन परिसरात फिरत असल्याचे काही रिक्षाचालकांनी पाहिले. सातपूर परिसरात परप्रांतीय तसेच बिहारमधील अनेक नागरिक रहात असल्याने यातील एका रिक्षाचालकाने सुमादेवींना पपया नर्सरी येथे आणून सोडले. पायाला दुखापत झालेली वृद्ध महिला दोन दिवसांपासून भटकत असल्याची माहिती देवरे यांनी मिळाली. सुमादेवींचे बोलणे लक्षात येत नसल्याने त्यांनी मूळ बिहारचे रहिवाशी असलेल्या काही नागरिकांना मदतीला बोलावले. यावेळी काही जण सुमादेवीच्याच गावाकडील असल्याचे समजले. सुमादेवी यांना जेवण देण्यात आले. तसेच देवरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना आर्थिक मदत केली. याशिवाय सुमादेवींना तिकीट काढून देत पवन एक्स्प्रेसने बसवून देत मूळ गावी रवाना केले. कोणत्या गाडीने बसवून दिले आहे याची सुमादेवी यांच्या कुटुंबीयांना मोबाइलद्वारे कल्पना देण्यात आली.

..

मौले हॉल ते पपया नर्सरीच्या रस्त्यावर पायाला दुखापत झालेली वृद्ध महिला फिरत होती. चौकशी केली असता त्या बिहारी असल्याचे समजले. यानंतर बिहारी बांधवांना माहिती घेण्यासाठी बोलावले. यातून महिलेची ओळख पटली. त्यांना गावाकडे सुखरूप रवाना केले.

- रवींद्र देवरे सामाजिक कार्यकर्ते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुन्हेगारीत अंबड अव्वल

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घनदाट लोकवस्ती, स्थलांतरितांची मोठी संख्या, यातून निर्माण होणाऱ्या नवनवीन झोपडपट्ट्या भाग आणि हायवेपासून अगदीच जवळ असलेला परिसर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी प्रमाणे अंबड पोलिस स्टेशनमध्ये यंदा सर्वाधिक गुन्हे दाखल आहेत. यापाठोपाठ पंचवटी, उपनगर या पोलिस स्टेशनचा क्रमांक येतो.

शहरातील १४ पोलिस स्टेशनमध्ये १ जानेवारी ते ३० सप्टेंबरपर्यंत दाखल झालेल्या एकूण गुन्ह्यांचा विचार करता अंबड पोलिस स्टेशन सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. या पोलिस स्टेशनमध्ये ३५३ गुन्हे दाखल झाले. यानंतर पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये ३०८, आणि नाशिकरोडमध्ये २६३ गुन्ह्यांची नोंद झालेली दिसते. या कालावधीत दोन हजार ७४० गुन्हे दाखल झाले असून, गत वर्षी हा आकडा दोन हजार ६८८ इतका होता. सप्टेंबर महिन्यांपर्यंत तुलानात्मक विचार करता यात ५२ गुन्ह्यांनी वाढ झालेली दिसते. गत वर्षी अंबड पोलिस स्टेशनमध्ये ३२९ गुन्हे दाखल झाले होते. तर, २८८ गुन्ह्यांनी उपनगर पोलिस स्टेशन दुसऱ्या क्रमांकावर होते. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अंबड पोलिस स्टेशनचा मोठा भाग मुंबई आग्रा हायवेशी संलग्न आहे. याचा फायदा गुन्हेगारांना मिळतो. दुसरीकडे अंबडचा मोठा भाग घनदाट लोकवस्तीचा असून, एमआयडीसीमुळे स्थलांतरीत लोकसंख्येमध्ये दिवसागणिक वाढ होते आहे. पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले की, कामगार वर्गाची घनदाट लोकसंख्या आणि मद्यप्राशनानंतर होणाऱ्या मारमाऱ्यांचा याचा मोठा परिणाम येथील गुन्हेगारीवर होतो. काही सामाजिक प्रश्न आहेत. या भागातून महिला व मुली पळून जाण्याचे प्रमाण सुध्दा खूप मोठे आहे. येथील भौगोलिक परिस्थितीमुळे घरफोडी, चोरी वा वाहनचोरीसारख्या घटना होतात, असे कोकाटे यांनी स्पष्ट केले.

एमआयडीसी पोलिस स्टेशनची आवश्यकता

अंबड पोलिस स्टेशनची हद्द वाढत असून, येथील लोकसंख्येच्या प्रमाणानुसार अंबड एमआयडीसी व चुंचाळे शिवार परिसर यासाठी स्वतंत्र पोलिस स्टेशनची आवश्यकता आहे. उपायुक्त कोकाटे यांनी सांगितले की, या पोलिस स्टेशनबाबतच प्रस्ताव यापूर्वीच पाठवण्यात आला आहे. पोलिस स्टेशनला आगामी काळात मंजुरी मिळेल. या भागात आणखी एक पोलिस स्टेशन सुरू झाले की गुन्हेगारी आणखी कमी होईल.

गुन्हे शोधण्याचे प्रमाण ७१ टक्के

अंबड पोलिस स्टेशनमध्ये सर्वात जास्त गुन्हे दाखल झाले असले तरी दाखल झालेल्या गुन्ह्यांचा शोध लावला जात असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी सांगितले. १ जानेवारी ते २० सप्टेंबर या कालावधीत दाखल झालेल्या ३५३ गुन्ह्यांपैकी २४९ गुन्हे उघड झाले असून, गुन्हे उघड होण्याचे प्रमाण ७१ टक्के असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पोलिस स्टेशन- दाखल गुन्हे

अंबड-३५३

पंचवटी-३०८

नाशिकरोड-२६३

उपनगर-२६१

सरकारवाडा-२४७

मुंबई नाका-२०९

गंगापूर-१८७

इंदिरानगर-१८२

सातपूर-१७४

भद्रकाली-१७२

आडगाव-१५९

म्हसरूळ-१०३

देवळाली कॅम्प-९७

सायबर पोलिस- २५

एकूण-२७४०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

क्रेनखाली आल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथील रेल्वे कारखान्यात ड्युटीवर असताना क्रेनच्या खाली सापडून ३० वर्षीय रेल्वे कर्मचारी ठार झाला. अनिल पांडुरंग सुपेकर असे त्याचे नाव आहे. रविवारी घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनमाड येथील केंद्रीय इंजिनीअरिंग कारखान्यात रेल्वेच्या पुलाचे काम चालते. तेथे मोठमोठ्या क्रेन आहेत, काही जमिनीवर तर काहीवर रेल्वे ट्रॅकवर चालतात. यातील जमिनीवर चालणाऱ्या क्रेनवर कार्यरत असलेला अनिल पांडुरंग सुपेकर हा तरुण रविवारी काम करत असताना अचानक तोल गेल्याने क्रेनच्या मागील चाकाखाली आला. यात तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर मनमाड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी नाशिक येथे नेले जात असतांना त्याचा मृत्यू झाला. या घटनेने रेल्वे कर्मचारी वर्गात शोककळा पसरली आहे. नांदगांव येथील अनिलचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला आहे. अप्रेंटिस करून रेल्वे परीक्षा उत्तीर्ण होऊन अनिल कामास लागला होता. अत्यंत मनमिळाऊ स्वभाव असलेल्या अनिलच्या अपघाती जाण्याने त्याच्या मित्र परिवारला मोठा धक्का बसला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मतभेद

0
0

'रिझर्व्ह व केंद्रात

मतभेद नाहीत'

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'रिझर्व्ह बँक व केंद्र शासनात कोणतेही मतभेद नाहीत. एकमेकांमधील दृढ संबंधाच्या आधारे देशाची अधिकाधिक आर्थिक प्रगती करणे याचसाठी दोन्ही संस्था कार्यरत आहेत असे रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे यांनी स्पष्ट केले.

आयडीबीआय बँक अधिकारी संघटनेच्या २२ व्या द्वैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन मराठे व आयडीबीआय बँकेचे कार्यकारी संचालक (मनुष्यबळ विकास) गोपाळकृष्ण तडस यांच्या हस्ते झाले. आयडीबीआय बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक ब्रिजमोहन शर्मा, भारतीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष के लक्ष्मारेड्डी व आयडीबीआय बँकेचे अधिकारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप वेलणकर या वेळी उपस्थित होते.

'देशाच्या बँकिंग व आर्थिक प्रगतीबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधी महासंघ व जागतिक बँकेनेही कौतुकास्पद उद्गार व्यक्त केले आहेत. बँकिंग व आर्थिक क्षेत्र पुन्हा उंच भरारी घेईल. अनुत्पादित कर्जांचे वाढते प्रमाण ही गंभीर समस्या असली तरीही बँकांनी त्याची वसुली करण्याबाबत चांगली पावले उचलली आहेत. थकित कर्जांची वसुली व नवीन तंत्रज्ञानामार्फत अधिकाधिक चांगल्या सुविधा देणेबाबत बँकांनी आणखी नियोजनपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. बँकिंग क्षेत्रातील नवनवीन आव्हानांना बँक कर्मचाऱ्यांनी सकारात्मक वृत्तीने सामोरे जाण्याची गरज आहे,' असे मराठे यांनी सांगितले.

'लघुउद्योजकांचा देशाच्या आर्थिक विकासात पन्नास टक्क्याहून अधिक वाटा आहे. उद्योजकांना व स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्यांना भरपूर संधी उपलब्ध आहेत. 'मेक इन इंडिया' योजनेचा आपल्या देशात खूप सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे लोकांनी देशाच्या आर्थिक स्थितीबाबत कोणतीही चिंता करण्याची गरज नाही,'असेही मराठे यांनी सांगितले.

आयडीबीआय बँक व आयुर्विमा महामंडळ यांच्यात होणारे विलिनीकरण या दोन्ही संस्थांना फायदेशीर ठरणार आहे असे सांगून तडस म्हणाले, 'आयुर्विमा महामंडळाची विविध आकर्षक उत्पादने विकण्याची संधी बँकेला मिळेल. तर आयुर्विमा महामंडळाच्या विमा पॉलिसीधारकांना आमच्या बँकेच्या विविध सेवांचा फायदा मिळेल. आयुर्विमा महामंडळाचे ३५ कोटी पॉलिसीधारकांना कशी चांगली सेवा मिळेल यावर आम्ही भर देणार आहोत. भांडवलवृद्धीसाठी आजपर्यंत शासनाने भरपूर मदत केली आहे. तथापि थकित कर्जांची वसुली व खर्चांमधील बचत यास प्राधान्य देण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे,'. 'अनुत्पादित कर्जांची वसुली व नवनवीन उत्पादनांचे विपणन यावर बँकेतील सर्व सहकाऱ्यांनी भर दिला पाहिजे. बँकिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानात खूप बदल होत आहेत. डिजिटल बॅँकिंग, मोबाईल बँकिंग यावर अधिकाधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे,'असेही तडस म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संत तुकारामांची नीती यशवंतरावांनी स्वीकारली

0
0

अभ्यासक अॅड. मयूर जाधव यांचे मत

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

क्षमाशील वृत्ती, नम्रता, प्रामाणिकपणा हे गुण यशवंतरावांमध्ये होते. त्यांनी समोरच्या माणसाला कधीही निराश केले नाही, कुणी संधान करीत असेल तर त्याला माफ केले. यशवंतरावांनी संत तुकारामांची नीती आपलीशी केली होती, असे मत यशवंतराव चव्हाण यांच्या चरित्राचे अभ्यासक अॅड. मयूर जाधव यांनी व्यक्त केले.

सार्वजनिक वाचनालयाच्या पुस्तक मित्रमंडळातर्फे यशवंतराव चव्हाण यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्ताने मु. शं. औरंगाबादकर सभागृहात यशवंतनीती या विषयावर व्याख्यान झाले. 'सावाना'चे उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते मंचावर उपस्थित होते. यावेळी अॅड. जाधव यांनी संत तुकारामांच्या अभंगांचे दाखले देत, अनेक किस्से-आठवणी सांगत यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व उभे केले. चव्हाण हे व्यक्ती म्हणून अत्यंत साधे, संयमी होते. ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या पत्नीकडे साधा ट्रान्झिस्टर विकत घेण्यासाठी शंभर रुपयेही नव्हते. ते त्यांना दुसऱ्याकडून उसने घ्यावे लागले होते. चव्हाण यांनी पदाचा मोठेपणा कधीच मिरवला नाही. त्यांच्या आईच्या मैत्रिणीने आणून दिलेल्या ज्वारीच्या भाकरी ते चवीने खात आणि त्या माऊलीचा चरणस्पर्श करीत. आचार्य अत्र्यांनी त्यांच्यावर प्रचंड टीका करूनही चव्हाण यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले नाही. उलट त्यांना क्षमा केले. परिणामी, आचार्य अत्र्यांनी त्यांचे 'मोरूची मावशी' हे नाटक चव्हाण यांना अर्पण केले. शब्दांना महत्त्व देणाऱ्या या नेत्याच्या राजकीय कारकीर्दीला १९८० नंतर उतरती कळा लागली. इंदिरा गांधींकडून त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून डावलण्यात आले. मात्र, त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. पत्रकारांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्‍नालाही त्यांनी अत्यंत संयत भाषेत उत्तर दिल्याचे अॅड. जाधव यांनी सांगितले.

सुभाष सबनीस यांनी स्वागत केले. शंकर बर्वे यांनी प्रास्ताविक केले. रमेश कडलग यांनी परिचय करून दिला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुचाकी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

0
0

मायको सर्कल येथील घटना

...

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भरधाव दुचाकी दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मायको सर्कल येथे घडली.

रोशन चंद्रकात हिरे (वय २९, रा. तिडके कॉलनी, बाजीरावनगर) आणि प्रसाद भागवत शेरमाळे (वय २९, रा. डीजीपीनगर, उपनगर) अशी अपघातात ठार झालेल्या दोघा युवकांची नावे आहेत. दोघे युवक आपल्या हार्ली डेव्हीडसन (एमएच १५, एफपी ००९८) या दुचाकीवरून हॉटेल ग्रीन व्हूच्या बाजूने सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. भरधाव वेगातील दुचाकी हंस इलेक्ट्रीकल या दुकानासमोरील डिव्हायडरला जोरात जाऊन धडकली. यामुळे दोघांच्या डोक्यास व शरीरास इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली. मात्र एवढ्या रात्री त्यांना वेळेत मदत मिळू शकली नाही. या ठिकाणाहून जाणारे पोलिस नाईक राजेंद्र शेळके यांनी दोघा युवकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. यानंतर त्यांनी घटनेची माहिती दिली. या दोघांना अडीच वाजेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता रुंदीकरणामध्ये हजारो वृक्षांवर कुऱ्हाड

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

वृक्षारोपण उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा नारा दिला जात असताना रस्तेविकासासाठी हजारो वृक्ष कापले जात असल्याचा प्रकार नांदगाव-चाळीसगाव मार्गावर होत आहे. याबाबत नागरिक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

चाळीसगाव रोडवरील हिरापूर ते नांदगाव फुलेनगर दरम्यान रस्ता रुंदीकरण केले जात आहे. या मार्गालगत अडथळे ठरणारी हजारो झाडे तोडली जात असून यामुळे प्राणवायू देणाऱ्या झाडांचे आयुष्य तर संपलेच; पण पक्ष्यांची घरटीही उद्ध्वस्त होत आहे. ३० फूटी रस्ता ६० फूटी करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आह. यातून मार्गवरील अनेक वृक्षांची कत्तल सुरू आहे. आता रस्त्यालगतच्या वस्त्या, घरे, दुकाने, लहान-मोठे व्यावसायिक यांचेही संसार खिळखीळे होणार आहे. यात नांदगाव शहरालगत सुमारे ५०० अतिक्रमण व्यवसायधारकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे. या संदर्भात नांदगाव उपअधीक्षक भूमी अभिलेखा कार्यालयाशी रस्ते महामंडळाने पत्रव्यवहार करून रस्त्यालगतच्या जमिनीचे मोजमाप करण्याच्या प्रक्रिया पूर्ण करून घेत तशा सीमाही आखल्या आहेत. त्यामुळे आता रस्त्याचा रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या मार्गावर चिंचाची शेकडो झाडे होती. त्यापाठोपाठ वड, पिंपळ, हजारोच्या संख्यने निंबाची झाडे होती. हिरापूर ते चाळीसगाव ते नांदगाव, फुलेनगर दरम्यान ८० किलोमीटरपर्यंतची ११०० वृक्षांची कत्तल झाली आहे. यासाठी पर्यावरण विभागाची परवानगीही घेण्यात आली असून त्यासाठी सरकारकडे ४० लाख रुपये लिलावात पोटी भरण्यात आले आहेत. दरम्यान, तालुक्यतील नांदगाव तालुक्यात न्यायडोंगरी, परधाडी, जळगांव खुर्द, जळगांव बुद्रूक, पोखरी, गिरणानगर, श्रीरामनगर, फुलेनगर, पिंपरखेड या गावालगतची रस्त्यालगतची जमिनी संपादित करण्याचे काम हाती घेतले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वनवासी मंदिरात रामनामाचा जप

0
0

येवला : अयोध्येत जन्मस्थळी श्रीराम मंदिराची निर्मिती व्हावी यासाठी राज्यातील हजारो शिवसैनिक अयोध्यानगरीत गेले. येवला तालुक्यातील ८० जणांचा यामध्ये समावेश आहे. मात्र, अयोध्यात जाऊ न शकलेल्या शेकडो युवा शिवसैनिकांनी येवल्यातील पुरातनकालीन प्रसिद्ध अशा वनवाशी राम मंदिरात महाआरती केली. यावेळी विधान परिषद आमदार किशोर दराडे, पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार, नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र लोणारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. आयोध्येत राम मंदिर निर्मितीच्या मागणीसाठी जोरदार घोषणा देण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


लॉकरमधील गहाळ दागिन्यांची भरपाई करा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र बँकेच्या लॉकरमधून गहाळ झालेल्या दागिन्यांची जबाबदारी बँकेने झटकल्यानंतर जिल्हा ग्राहक न्यायमंचाने बँकेला दणका देत गहाळ दागिन्यांचे ४ लाख ६ हजार रुपये व्याजासह देण्याचे आदेश बँकेला दिले आहेत. त्याचप्रमाणे मानसिक त्रासापोटी सात हजार व अर्जाचा खर्च पाच हजार असा बारा हजारांचा दंडही ठोठावला आहे. या निकालामुळे ग्राहकांच्या सेवेकडे दुर्लक्ष करणे बँकेला चांगलेच महागात पडले आहे.

गंगापूर रोडवर राहणाऱ्या जॅकलीन विजय फ्रान्सिस यांनी कॉलेजरोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेविरुद्ध जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार केल्यानंतर हा निकाल देण्यात आला आहे. फ्रान्सिस यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मौल्यवान दागिने व महत्त्वाची कागदपत्रे सुरक्षित राहण्यासाठी २०१४ मध्ये २५ हजार रुपये अनामत रक्कम भरुन लॉकर घेतले. या लॉकरमध्ये सोन्याचे नेकलेस, मोठी पोत, मंगळसूत्र, बांगड्या असे सहा लाख रुपये किमतीचे दागिने ठेवले होते. नाताळ सणानिमित्त यातून दागिने काढले. त्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा लॉकरमध्ये ते ठेवले. त्यानंतर पतीच्या मृत्यूचा दाखला व एफडीच्या पावत्या व इतर कागदपत्रांची आवश्यकता असल्याने महिनाभरानंतर बँकेत गेले. त्यानंतर बँक व्यवस्थापकाने प्रतिनिधी पाठवला व त्यांनी लॉकर उघडून दिले. त्यावेळी शिपाईसुद्धा लॉकर रूममध्ये आला व फोटोला हार लावत होता. तेव्हा शिपायाला इनचार्ज महिलेने 'तू माझ्या परवानगीशिवाय लॉकर रूममध्ये कसा आला' अशी विचारणा केली. 'ही हार लावण्याची वेळ आहे का' असेही सुनावले व नंतर ती निघून गेली. दरम्यान, आपण लॉकर बघितल्यानंतर सोन्याचे दागिने असलेला बॉक्स नसल्याचे आढळले. त्यानंतर लगेच इनचार्जच्या लक्षात आणून दिले. त्यांनी आम्हाला काहीही माहिती नाही. लॉकर तुमचे आहे. त्याची चावी तुमच्याकडे असते. तुम्ही लॉकरचा वापर करता. तेव्हा आम्ही तेथे नसतो. लॉकर बंद केले व त्यातून सोन्याच्या दागिन्यांचा डबा गेला तर त्याची जबाबदारी आमची नाही, असे सांगितले. त्यानंतर बँक व्यवस्थापकाकडे याबाबत तक्रार करण्यासाठी गेले तर त्यांनी नियम व अटी वाचा, असे सांगून मदत करण्यास नकार दिला. यावेळी सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याची विनंती केली. पण, त्यालाही नकार दिला. उलट अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू, अशी धमकी दिली. त्यानंतर तीन दिवसांनी आपण गंगापूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली. पण, पोलिसांना बँकेने तपासाकामी सहकार्य केले नाही. सीसीटीव्ही फुटेज पंधरा दिवसांचे असते, असे बँकेने पोलिसांना सांगितले. त्यामुळे दागिने गहाळ होण्यामागे बँकेच्या कर्मचाऱ्यांचा हात असल्याचा संशय आला. पोलिसांनीही घटनेचा तपास केला नाही.

बँकेने फेटाळले आरोप

या तक्रारीवर बँकेने आपली बाजू मांडतांना सांगितले की, लॉकरच्या दोन चाव्या असतात. त्यापैकी एक लॉकरधारकाकडे व दुसरी संबंधित बँकेच्या व्यवस्थापकाकडे असते. दोन्ही चाव्या लावल्याशिवाय लॉकर उघडले जाऊ शकत नाही. लॉकर उघडताना व्यवस्थापक बरोबर जातो व त्यानंतर तो बँकेची चावी लावून ते बाहेर पडतात. त्यामुळे लॉकरधारकाने कोणती वस्तू ठेवली व बाहेर काढली हे व्यवस्थापकाला माहीत नसते. त्यामुळे लॉकरमधून झालेल्या चोरीस अगर नुकसानीची कोणतीही जबाबदारी नाही. बँकेच्या नियमानुसार चौकशी केली आहे. पैसे उकळण्यासाठी तक्रार केली आहे. ती फेटाळण्यात यावी.

सेवेत कमतरतेचा ठपका

या दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ग्राहक न्यायमंचाने निकाल देताना सांगितले की, लॉकरमधून चोरी अगर नुकसानीची जबाबदारी बँकेची नाही. पण, लॉकर्सबाबत सुरक्षा व्यवस्था ठेवण्याची आहे. लॉकर्सच्या ठिकाणी बँक इनचार्जशिवाय कोणाला प्रवेश दिला जात नाही. पण, शिपाई आला होता. त्याचप्रमाणे दागिने गहाळ झाल्यानंतर बँकेने तक्रार दाखल करायला हवी होती. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही फुटेज ९० दिवसांपर्यंत ठेवता येते, असे मुद्दे उपस्थित करून सेवा देण्यास कमतरता केली असे सांगत दागिन्यांचे पैसे करण्याचे आदेश देऊन दंडही ठोठावला. हा निकाल न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्य प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी, सचिन शिंपी यांनी दिला. फ्रान्सिस यांच्या बाजूने अॅड. के. एस. शेळके यांनी युक्तिवाद केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...तर ऑर्गन इतिहासजमा झाले असते!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ऑर्गन या वाद्याला नवे स्वरूप दिले नसते तर ते आतापर्यंत इतिहासजमा झाले असते. आज ते केवळ वस्तुसंग्रहालयात पहायला मिळाले असते. मी ऑर्गनला माझे आयुष्य दिले आणि त्याने मला जगप्रसिद्ध बनवले. आता त्याचा भारतातून परदेशात हा प्रवास मनाला सुखकारक वाटतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ ऑर्गन निर्माते उमाशंकर ऊर्फ बाळ दाते यांनी केले.

'आयाम' निर्मित आणि 'ग्रंथ तुमच्या दारी' यांच्या वतीने 'अवलिया' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी एकमेव ऑर्गन निर्माता उमाशंकर दाते यांची मुलाखत व गाण्यांचा कार्यक्रम शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात रंगला. यावेळी दाते पुढे म्हणाले की, ऑर्गन हे युरोपातून ब्रिटिशांबरोबर आलेले वाद्य आहे. परंतु, ते भारतात स्थिर झाले आणि ते नामशेष होण्याच्या काळात त्यावर संशोधन करून त्याचा प्रचार प्रसार वाढवला. त्याचबरोबर अनेक कार्यक्रमदेखील केले. त्याची परिणती म्हणून आपल्याकडे ऑर्गन निर्मितीच्या ऑर्डर येण्यास सुरुवात झाली. आता संपूर्ण जगात आपण ऑर्गन पुरवतो. मी सध्याचा एकमेव ऑर्गन निर्माता असून महाराष्ट्र, भारत आणि संपूर्ण जगात मी ऑर्गन वाजविण्याचे कार्यक्रम केलेले आहेत. काळाच्या ओघात नामशेष होऊ पाहणाऱ्या रिड ऑर्गनचे संशोधन करून त्याची पुनर्निर्मिती करून या दुर्मिळ वाद्याला नवसंजीवनी दिली आहे. त्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील घेण्यात आली. स्वत: सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी आपल्या कार्यशाळेला भेट दिली आणि हे काम समजावून घेतले तो अविस्मरणीय क्षण होता. विशेष म्हणजे या ऑर्गनच्या निर्मितीसाठी मला वर्षभराची रजा मंजूर करून देण्याचे काम मंत्री महोदयांनी केले, ही घटना भावनाशील करणारी आहे. रत्नागिरी जवळच्या अडिवऱ्हे या गावाचे नाव संपूर्ण जगात गाजत आहे. कारण तेथे एकमेव ऑर्गन निर्माता राहतो, तेथून सर्व जगभरात ऑर्गन जातात हे अभिमानास्पद कार्य असल्याचे दाते म्हणाले.

कार्यक्रमाचा प्रारंभ 'पंचतुंड नररूंड मालधर' या संगीत शाकुंतलमधील नांदीने करण्यात आला. या कार्यक्रमाची संकल्पना आणि दिग्दर्शन जयेश आपटे यांचे होते. मुलाखत मधुरा गोरे यांनी घेतली. गायन आनंद अत्रे यांनी केले. तर त्यांना तबल्यावर साथ शुभम जोशी यांनी केली. तांत्रिकबाजू आदित्य राहणे यांनी सांभाळली.

ऑर्गनवरील गाण्यांची मेजवानी

मुलाखतीच्या दरम्यान 'दिन गेले भजनाविन सारे' हे संत कबीराचे भजन आनंद अत्रे यांनी सादर केले. त्यानंतर 'कोण तुजसम सांग मज गुरूराया' हे 'संगीत सौभद्र'मधील पद दाते यांनी ऑर्गनवर सादर केले. आनंद यांनी, 'हे सुरांनो चंद्र व्हा', 'सूरत पिया की' तर ऑर्गनवर दाते यांनी 'वद जाऊ कुणाला शरण' हे पद वाजवून दाखवले. या प्रस्तुतीनंतर बॉलिवूडच्या गाण्यांना ऑर्गन वापरता येईल का, या प्रयोगशीलतेतून 'आओगे जब तुम साजना', 'फिर ले आया दिल', 'लागी तुमसे मन की लगन' या तीन गाण्यांची एकत्रित मेडली ऑर्गनवर सादर केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सोमानी उद्यानाच्या कर्मचाऱ्यास मारहाण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोडच्या मुक्तिधाम येथील महापालिकेच्या सोमानी गार्डनमध्ये दारू पिण्यास मज्जाव केल्याच्या कारणावरून तिघांनी कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला. राजेंद्र किसन पाठक (रा. इच्छामणीनगर, शिवाजीनगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली.

पाठक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमानी गार्डनचे त्यांनी शुक्रवारी (दि. २३) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास गेट बंद केले. त्यावेळी संशयित निखिल (रा. भालेराव मळा, नाशिकरोड), हर्षद (रा. सुभाषरोड, नाशिकरोड), ओम (रा. भालेराव मळा, नाशिकरोड) हे तिघे आले आणि त्यांना गार्डनमध्ये बसून मद्यप्राशन करायचे होते. त्यासाठी त्यांनी गेट उघडण्यास सांगितले. कर्मचारी पाठक यांनी नकार दिल्याने संशयित तिघांनी त्यांना लाठ्याकाठांनी बेदम मारहाण केली. पाठक यांना बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

घरातून दागिने लंपास

जेलरोडच्या नेहरूनगरमध्ये घरातून अज्ञात चोरट्याने नऊ हजार रुपयांचे दागिने चोरून नेलेत. या प्रकरणी के. प्रसाद के. कृष्णा (रा. नेहरूनगर, जेलरोड) यांनी फिर्याद दिली. अज्ञात चोरट्याने १९ ऑक्टोबर ते २१ नोव्हेंबर या दरम्यान कृष्णा यांच्या घरात प्रवेश करून सुटकेसमध्ये ठेवलेले नऊ हजार रुपयांचा सोन्याचे झुमके चोरून नेले. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

आडगाव नाका येथे घरफोडी

आडगाव नाका येथील अभंगनगरमध्ये बंद घराचा कुलूप कोयंडा तोडून घरफोडी करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने चोरून नेले. नरेंद्र निंबाजी देशमुख (रा. भालचंद्र अपार्ट., अभंगनगर, आडगावनाका) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, देशमुख कुटुंब २१ ते २४ तारखेदरम्यान घरी नसताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप कोयंडा तोडून आत प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी घरातून सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याचे झुमके, अर्धा ग्रॅमची नथ असा ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉ. जयंत पवार यांची‘आएमए’वर निवड

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य व मविप्रचे मालेगाव तालुका संचालक डॉ. जयंत पवार यांची दिल्ली येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) कार्यकारिणीवर बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

देशभरातून डॉक्टरांची आयएमएच्या कार्यकारिणीवर निवड केली जाते. डॉक्टरांच्या हिताबरोबरच समाजहितासाठी आयएमए काम करीत आहे. १९२८ मध्ये स्थापना झालेल्या 'आएमए'चे तीन लाख डॉक्टर सभासद आहेत. ही संघटना जगातील सर्वांत मोठी स्वयंसेवी संस्था आहे. या संघटनेच्या भारतभर दोन हजार शाखा आहेत. या संस्थेच्या कार्यकारिणीवर डॉ. जयंत पवार यांची बिनविरोध निवड झाली. याबद्दल डॉ. पवार यांचे मविप्र संस्था व मालेगावातील डॉक्टरांच्या संघटनांनी अभिनंदन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माओवादाचा मार्ग हिंसेचाच

0
0

कॅप्टन स्मिता गायकवाड यांचे प्रतिपादन

\B

म. टा. प्रतिनिधी, नाशिक \B

हिंसेच्या माध्यमातून सत्ता हस्तगत करण्याचे, हिटलरपेक्षा तीव्र उद्दिष्ट माओवाद्यांचे असते. त्यामुळे शहरापर्यंत पोहचू पाहणाऱ्या या विषयाबाबत नागरिकांनी सजग असायला हवे, असे मत कॅप्टन स्मिता गायकवाड यांनी व्यक्त केले.

गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात 'शहरी माओवादाचे संकट' या विषयावर त्यांनी स्लाईड शोद्वारे सादरीकरण केले. यावेळी मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संचालक डॉ. मधुकर आचार्य, डॉ. सुरेश हावरे, रविराज बावडेकर, पत्रकार किरण शेलार उपस्थित होते. देशाच्या सुरक्षा यंत्रणेसमोर आव्हान बनू पाहणाऱ्या शहरी माओवादाचा चेहरा अलिकडे स्पष्ट होऊ लागला आहे. पण या शहरी माओवादाच्या बांधणीला सत्तरच्या दशकापासूनच सुरुवात झाली आहे. नक्षलवादाच्या नावाखाली माओची लोकशाहीविरोधी विचारसरणी यात छुप्या मार्गाने कार्यरत राहते. लोकशाहीसाठी हा माओवाद म्हणजे येऊ घातलेले संकट आहे, असे गायकवाड यांनी सांगितले.

कोरेगांव भीमा प्रकरण व एल्गार परिषदेनंतर माओवादाचा प्रश्न प्रखरतेने जनतेसमोर आला. या प्रकरणी सत्यशोधन समितीच्या अहवालातील नोंदीही त्यांनी स्लाईड शोद्वारे मांडल्या. जनतेच्या भावना भडकावून त्यांचे भांडवल करायचे आणि समाजात असंतोष निर्माण करायचा. संसदीय मार्गाच्या अनुसरणाचा देखावा करून आतून मात्र हिंसेच्या मार्गाचेच समर्थन करायचे, असा माओवाद्यांचा अजेंडा आहे. सरकारविरोधात सत्तेसाठीच्या या हिंसक युद्धात निरपराध जनतेलाही माओवादी ओढत आहेत, असे त्यांनी सांगितले.

वेळीच सावध व्हा!

'मी टू अर्बन नक्षल हॅशटॅग' अशी मोहिमसुद्धा सोशल मीडियावर चालवली गेली. पण यात सहभागी होणाऱ्या सेलिब्रेटींपासून तर जनसामान्यांपर्यंत अनेकांना यामागील माओवाद्यांचा चेहरा ठाऊक नाही. अशा पद्धतीने माओवाद्यांची कारस्थाने तुमच्या शहरांपर्यंत व पर्यायाने तुमच्यापर्यंत पोहचत असल्याने वेळीच सावध व्हा, असे आवाहन त्यांनी केले. माओवाद्यांना करण्यात आलेली अटक ही त्यांनी माओवादाच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलेल्या कार्यक्रमांमुळे झाल्याचेही गायकवाड म्हणाल्या.

\B

(फोटो : सतीश काळे) \B

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images