Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

राज्यपालांच्या आदेशांचे होतेय उल्लंघन

$
0
0
राज्यभरात ज्युनिअर कॉलेजमधील लॅब असिस्टंटची पदे रद्द करून त्यांचा समावेश चतुर्थ श्रेणीत करावा, असा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र, हा निर्णय घेताना शालेय संहिता आणि राज्यपालांच्या आदेशांचे उल्लंघन होत असल्याची बाब काही कर्मचाऱ्यांनी उघड केली.

७ हजार कर्मचाऱ्यांना मिळणार फायदा

$
0
0
सैन्य दलाच्या धर्तीवर पोलिस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या सद्भावना पोलिस कॅण्टीनचे मंगळवारी पोलिस प्रबोधनचे संचालक संजय बर्वे यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. या कॅण्टीनसाठी दोन वर्षांपासून पोलिस प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. या कॅण्टीनचा तब्बल ७ हजार पोलिस कर्मचाऱ्यांना फायदा मिळण्याची शक्यता आहे.

‘प्रिमिअम’च्या कामगारांना ले ऑफ

$
0
0
महिंद्र अॅण्ड महिंद्र पाठोपाठ प्रीमिअम टूल्स कंपनीने देखील २१ जुलैपासून उत्पादनप्रक्रिया बंद करीत कामगारांना बेमुदत ले-ऑफ जाहीर केला आहे. मंदीच्या कारणामुळे कारखान्याने 'नो वर्क नो पे'ची नोटीस लावल्याने कामगारांनी कामगार उपायुक्तांकडे धाव घेतली.

धुळे महापालिकेचा कारभार वाऱ्यावर

$
0
0
धुळे महापालिकेचे आयुक्त जीवन सोनवणे यांची बदली होऊन पंधरा दिवस उलटले तरीही नवे आयुक्त रुजू झालेले नाहीत. दोन सहाय्यक आयुक्तांच्या रिक्त जागांवर नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नाही.

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी ६३ कोटींची तरतूद

$
0
0
नियोजित मनमाड-इंदूर रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारने २०१३-१४च्या अर्थसंकल्पात ६३ कोटी, ७२ लाख रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे. आ. गोटे यांनी १७ एप्रिल, २०१३ रोजी विधानसभेत औचित्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर सरकारकडून लेखी पत्राव्दारे ही माहिती देण्यात आली आहे.

नांदगावमध्ये महिलेवर बलात्कार

$
0
0
एका विवाहितेवर तीन वर्षांपासून वारंवार बलात्कार केल्याची घटना नांदगाव तालुक्यातील बाभूळवाडी येथे उजेडात आल्यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली. या प्रकरणी नांदगाव पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून सात संशयितांना अटक केली, तर एक आरोपी फरार आहे.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार

$
0
0
सिन्नरमध्ये ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. मात्र संवेदनशील प्रकरण असल्याचे कारण पुढे करीत सिन्नर पोलिसांनी माहिती दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला.

कॉलेज निवडणुकांना विरोध

$
0
0
कॉलेज निवडणुकांमध्ये धनदांडग्या पक्ष कार्यकर्त्यांकडून वारेमाप पैशाची उधळपट्टी करण्यात येईल. शिवाय हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल, त्यामुळे या निवडणुकांना भारतीय विद्यार्थी सेनेचा विरोध राहील, अशी भूमिका संघटनेचे जिल्हा संघटक पंकज गोरे यांनी जाहीर केली.

रस्ता कामासाठी निधी मंजूर

$
0
0
बागलाण तालुक्यातील रस्ता कामांसाठी सिंहस्थ योजनेतून अकरा कोटी रुपये तर विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत तीन कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार उमाजी बोरसे यांनी दिली.

१२ बालविवाह उधळले

$
0
0
नाशिक शहर परिसरात गेल्या सहा महिन्यात तब्बल १२ बालविवाह रोखण्यात आले आहेत. यातील एका बालविवाहाप्रकरणी तालुका पोलिस स्टेशनमध्ये नवऱ्या मुलासह काही उपस्थित नागरिकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणातून पाणीचोरी

$
0
0
मळगाव भामेर व कजवाडे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातून सर्रास पाण्याची चोरी होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी महसूल अधिकाऱ्यांकडे केली आहे. ही पाणी चोरी न थांबल्यास उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

करमणूक कर भरा प्रशासनाकडे

$
0
0
केबल ऑपरेटर्सनी करमणूक कर विभागाकडे कराचा भरणा करावा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने मंगळवारी दिले आहेत. हा कर घेण्यास राज्य सरकारने नकार दिल्यास तो कोर्टाकडे जमा करावा, असेही कोर्टाने म्हटले आहे. तसेच, यासंदर्भात कोर्टाने सरकारला नोटीसही बजावली आहे.

पाऊस पडला निम्मा!

$
0
0
पावसाचा नाशिक जिल्ह्यातील मुक्काम कायम असून गेल्या दीड दिवसात शहर परिसरात १९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यंदा दीड महिन्यातच पावसाने सरासरीचा निम्मा टप्पाही गाठला आहे. परिणामी जिल्ह्यातील धरणसाठाही ३० टक्क्यांवर पोहोचला आहे.

नाशिकरोड रेल्वे स्टेशनची कसून तपासणी

$
0
0
महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे स्टेशनवर बॉम्ब स्फोट घडवून आणले जाण्याची शक्यता राज्याच्या गुप्तचर यंत्रणेने वर्तविल्याने बुधवारी दिवसभर सुरक्षा यंत्रणांकडून स्थानकांची कसून तपासणी करण्यात आली.

राशीनुसार मिळणार सौंदर्याचा मंत्र

$
0
0
तुमची रास बघून तुम्हाला सौंदर्याचा मंत्र मिळणार असं कोणी सांगितलं तर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवणार नाही. पण खरोखरच आता तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे सौंदर्याच्या टीप्स मिळणार आहेत. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘सौंदर्य तुमच्या राशीला’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून.

मखराच्या किंमतीही वाढल्या

$
0
0
गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून थर्माकोलची आकर्षक मंदिरे आणि मखर विक्रीसाठी बाजारात दाखल झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मखराच्या किमतीत २० टक्के भाववाढ झाली असली तरी मागणीत मात्र फरक पडलेला नाही.

गोरामोरा चेहरा...

$
0
0
चार दिवसापूर्वी कालिदास कलामंदिरात एका संघटनेतर्फे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिनिधी हजर होते. येणाऱ्या पाहुण्यांसाठी सर्व व्यवस्था चोख होती. आलेल्या प्रत्येकाला काय हवे काय नको याची विचारपूस चालली होती. काही कार्यकर्ते खरच काम करत होते तर काही करत असल्याचा आव आणत होते.

ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशनच्या अध्यक्षपदी दत्ता टाक

$
0
0
ट्रॅव्हल्स एजंट असोसिएशन ऑफ नाशिक (तान) यांच्या वार्षीक सर्वसाधारण सभेत दत्ता टाक यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

...तरीही विद्यार्थी सेनेचा दणदणाट !

$
0
0
शिवसेनाप्रमुखांच्या निधनामुळे शिवसैनिकांनी साधेपणाने कार्यक्रम करावे असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुखांनी केल्यानंतरही बुधवारी नाशिकमधील विद्यार्थी सेनेच्या नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा डीजेच्या दणदणाटात पार पडला. मुख्य म्हणजे हा समारंभ शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सेना कार्यालयात पार पडल्याने शिवसैनिकच पक्षप्रमुखांचे आवाहन विसरले की काय अशी चर्चा होती.

नाशिकरोडची शक्तीस्थळे दुर्लक्षित

$
0
0
उत्तर महाराष्ट्राचे नेत्वृत्त्व करू पाहणाऱ्या नाश‌िक शहराच्या एकूणच विकासात नाश‌िकरोडची भूम‌िका मोलाची ठरली आहे. नाशिकरोड परिसरातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गुजराथ टुर‌िझमचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. यासाठी स्थानिक ट्रॅव्हल कंपन्यांना भरगच्च कमिशन दिले जात आहे.
Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images